रविवार, १६ जानेवारी, २०२२

ज्ञान विज्ञान उत्क्रांती म्हणजे काय?


══════════════════════

    @ संकलन गजानन गोपेवाड 

  

══════════════════════

            🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════   

📙 *उत्क्रांती म्हणजे काय ?* 📙 

******************************

*भाग - १ (१/६)*


*ही कहाणी सुरू होते खूप खूप वर्षांपूर्वी म्हणजे जवळजवळ साडेचार अब्ज वर्षांपूर्वी.


*त्याच काळात केव्हातरी आपल्या पृथ्वीचा जन्म झाला. त्यावेळची पृथ्वी म्हणजे तप्त द्रवरूप धातू, धूळ आणि वायू यांचा गोळा होता. अनेक लक्ष वर्षे गेली आणि गोळ्याचा पृष्ठभाग हळूहळू थंड होत त्याचे रूपांतर कठीण कवचात होत गेले. हे कवच म्हणजेच खडकांनी बनलेला पृथ्वीचा पृष्ठभाग. सुरुवातीच्या काळात हा पृष्ठभाग बनत होता. आतल्या तप्त द्रवाच्या धडकांनी पुन्हा फुटत होता, पुन्हा घडत होता, जागा बदलत होता. पृथ्वीवर सापडलेल्या सर्वात पुरातन खडकाचे वय सुमारे चार अब्ज तीस लाख वर्षे आहे.

*

 पृथ्वीचा हा पृष्ठभाग बनत होता, त्याबरोबर त्या पृष्ठभागावर पाणी जमा होत होते आणि भोवती वातावरणाचा थरही बनत होता. मात्र हे वातावरण बनले होते मुख्यतः कार्बन डायऑक्साइड, मिथेन, अमोनिया, हायड्रोजन या वायुंनी. पृथ्वीभोवतीच्या वातावरणात ऑक्सिजन जवळजवळ नव्हताच. वेगवेगळ्या भौतिक व रासायनिक प्रक्रियांमधून हळूहळू अॉक्सिजनचे प्रमाण वाढत गेले. जीवसृष्टीच्या उदयाला हा बदल अत्यंत उपयुक्त ठरला. 

 

 या सगळ्यांचे मिळून बनलेले हे रसायन पृथ्वीच्या पृष्ठभागावर पसरलेले होते आणि त्यावर सतत आदळत होते सूर्याचे अतिनील किरण. त्या रसायनात घडत होता विजांचा चमचमाट. या भौतिक आणि रासायनिक प्रक्रियांमधूनच केव्हातरी पहिल्या सजीव पेशीच्या जन्माला आवश्यक असणाऱ्या वेगवेगळ्या घटकांचा मुख्यतः प्रथिने बनवणाऱ्या अमिनो अॅसिडचा उद्भव झाला.

 पृथ्वीच्या जन्मापासून आजपर्यंतच्या काळाचे शास्रज्ञांनी वेगवेगळे भाग पाडले आहेत.

 

 अगदी सुरुवातीचा सुमारे दोन अब्ज वर्षांचा काळ आर्चिअन इआॅन (आर्चिअन कल्प) या नावाने ओळखला जातो. या काळात पृथ्वीवर सजीव पेशी जन्माला आली नव्हती.

 

 आर्चिअन कल्पानंतरचा सुमारे एक अब्ज नव्वद कोटी वर्षांचा काळ प्रोटेरोझोइक इआॅन (प्रोटोरोझोइक कल्प) या नावाने ओळखला जातो.

 या दोन्ही कालखंडांना मिळून प्रिकेंब्रिअन इरा (प्रक्रेंब्रिअन युग) असेही नाव दिले आहे. पृथ्वीच्या आजवरच्या इतिहासापैकी जवळजवळ ८० टक्के काळ हा प्रिकेंब्रिअन युगानेच व्यापलेला आहे.

 *क्रमश:*


'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*

═══════════════════════

गुरुवार, १३ जानेवारी, २०२२

पहिले भारतीय अंतरिक्ष राकेश शर्मा

 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

                        *राकेश शर्मा*

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

*अंतरिक्षात जाणारे पाहिले भारतीय*

👨‍🚀👨‍🚀👨‍🚀👨‍🚀👨‍🚀👨‍🚀👨‍🚀👨‍🚀👨‍🚀👨‍🚀👨‍🚀

*जन्मदिन - १३ जानेवारी १९४९*

👨‍🚀👨‍🚀👨‍🚀👨‍🚀👨‍🚀👨‍🚀👨‍🚀👨‍🚀👨‍🚀👨‍🚀👨‍🚀

राकेश शर्मा हे अंतरिक्षात जाणारे पाहिले भारतीय आहेत.

भारताचा पहिला आणि जगाचा १३८ वा अंतराळवीर बनण्याचा सन्मान विंग कमांडर राकेश शर्मा यांनी पटकावला तो २ एप्रिल १९८४ रोजी भारत-रशिया अवकाश संशोधन मंडळ कार्यक्रमांतर्गत रशियाच्या सोयूझ टी-२ यानातून दोन रशियन अंतराळ संशोधकासमवेत राकेश शर्माने अवकाश सफरीचा अनुभव घेऊन या क्षेत्रात प्रगतीचे नवे दालन भारतीयांसाठी खुले केले.

राकेश शर्मा पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी अंतराळातून बोलत होते. अंतराळातून भारत कसा दिसतो, या प्रश्‍नाला त्यांनी "सारे जहाँसे अच्छा हिंदोस्ताँ हमारा' असे अभिमानी उत्तर दिले होते.

पतियाळात जन्मलेला राकेश भारतीय वायू दलात वैमानिक होता.

नंतर च्या काळात त्यांचा अशोक चक्र देऊन सन्मान केल्या गेला.

🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

संकलन -)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा-यवतमाळ ४४५२०६

प्रभात दर्शन

 🌳⛳ *शुभ प्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

पौष मास,शुक्ल पक्ष,*एकादशी*,कृतिका नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,शिशिर ऋतु,युगाब्द ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

गुरुवार, १३ जानेवारी २०२२.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                         *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


        *"कुछ बोलने और तोड़ने में केवल एक पल लगता है, जबकि बनाने और मनाने में पूरा जीवन लग जाता है। प्रेम सदैव क्षमा माँगना पसंद करता है और अहंकार सदैव क्षमा सुनना पसंद करता है... अब यह आप पर निर्भर है कि आपको अपने अंदर प्रेम का सृजन करना है अथवा अहंकार का..."*


*जीवन आपका-निर्णय आपका*

 ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*लोहड़ी पर्व की हार्दिक बधाई*

सोमवार, १० जानेवारी, २०२२

 ➿➿➿➿➿➿➿➿➿➿

             *गाथा बलिदानाची*

➿➿➿➿➿➿➿➿➿➿

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳👨🏻🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

       

            *तिरुपुर कुमारन*

          (भारतीय क्रांतिकारी)


   जन्म : ४ अक्टूबर १९०४

(चेनिमलाई,ईरोड,मद्रास प्रेसिडेंसी,ब्रिटिश इंडिया)


 *मृत्यु : ११ जनवरी १९३२* 

                  (उम्र २७)


(तिरुपुर,मद्रास प्रेसिडेंसी,ब्रिटिश इंडिया)


मृत्यु का कारण : सत्याग्रह के दौरान पुलिस की क्रूरता

राष्ट्रीयता : भारतीय


कुमारन को तिरुपुर कुमारन भी कहा जाता है! एक भारतीय क्रांतिकारी थे जिन्हों ने भारतीय स्वतंत्रता आंदोलन में भाग लिया था।


भारत को अंग्रेजों से स्वतंत्र कराने की जंग में कइयों ने अपना महत्वपूर्ण योगदान दिया। किसी का लहू बहा तो कोई सालों तक जेल में बंद रहा। अंग्रेजों की यातनाएं सही, लेकिन देश के वे वीर जांबाज पीछे नहीं हटे और अपनी अंतिम सांस तक देश की आजादी के लिए लड़ते रहे।


इन्ही जांबाजों में से एक नाम है तिरुपुर कुमारन, एक ऐसा नाम जो अंग्रेजी हुकूमत की लाठी के आगे नहीं टूटा और सीना फख्र से चौड़ा कर अपने देश को स्वंतंत्र कराने की लड़ाई में कूद पड़ा।


कुमारन ने स्वतंत्रता आंदोलन में भाग ले अपना संपूर्ण जीवन भारत को आजाद कराने में लगा दिया, इसके बावजूद भारत के इस महान स्वतंत्रता सेनानी का नाम इतिहास के पन्नों में कहीं गुम हो गया।


कुमारन ने यह जानते हुए कि उस समय ब्रिटिश सरकार के भारत में तिरंगा के फहराने पर पूरी तरह से मनाही है, राष्ट्रीय ध्वज तिरंगे को लहराने पर जोर दिया था।


वह तिरुपुर के रहने वाले थे और तिरुपुर में एक शांतिपूर्ण असहयोग आन्दोलन के दौरान ब्रिटिश पुलिस द्वारा किए गए लाठीचार्ज में वह गंभीर रूप से घायल हो गए। इसी आंदोलन में घायल हुए कुमारन ने अपना दम तोड़ दिया।

अपने वतन की आजादी के लिए इस शख्स ने अंग्रेजों की कई लाठियां खाई, लेकिन अपनी मातृभूमि को आजाद कराने के उद्देश्य पर वह दृढ़ हो डटे रहे।


कुमारन का जन्म भारत मद्रास प्रेसिडेंसी, चेन्नई (तमिलनाडु में वर्तमान ईरोड जिला) में चेननिमालाई में हुआ था। उन्होंने देश बंधु युवा संघ की स्थापना की और अंग्रेजों के खिलाफ विरोध प्रदर्शन किया। ११ जनवरी १९३२ को ब्रिटिश सरकार के खिलाफ एक विरोध मार्च के दौरान तिरुपुर में नौय्याल नदी के तट पर पुलिस हमले से बने चोटों से उनकी मृत्यु हो गई। उनकी मृत्यु के समय, वह भारतीय राष्ट्रवादियों का ध्वज पकड़ रहे थे, जो कि अंग्रेजों द्वारा प्रतिबंधित कोडी कथथा कुमारन (कुमारन ने ध्वज की रक्षा की) को उकसाया। 


अक्टूबर २००४ में भारत की १०० वीं जयंती पर एक स्मारक डाक टिकट जारी किया गया था।  तिरुपुर में उनके सम्मान में एक मूर्ति बनाई गई है जिसे अक्सर सार्वजनिक प्रदर्शनों के लिए एक केंद्र बिंदु के रूप में उपयोग किया जाता है।

🇮🇳🇮🇳🇮🇳 *जयहिंद*🇮🇳🇮🇳🇮🇳

🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

संकलन -)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

रविवार, ९ जानेवारी, २०२२

सँम्युअल काँल्ट अमेरिकन शंशोधन

 ➿➿➿➿➿➿➿➿➿➿

                 *सॅम्युअल कॉल्ट*

➿➿➿➿➿➿➿➿➿➿

      *अमेरिकन संशोधक*

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

*स्मृतिदिन - १० जानेवारी  इ.स. १८६२*


सॅम्युअल कॉल्ट (जुलै १९, इ.स. १८१४:हार्टफर्ड, कनेक्टिकट - जानेवारी १०, इ.स. १८६२) हा अमेरिकन संशोधक होता. त्याने रिव्होल्व्हर पिस्तुलचा शोध लावला.

कॉल्टने अगदी लहानपणी त्याच्या वडीलांच्या कापडगिरणीतील यंत्रे पाहिली होती व ती कशी चालतात याचा अभ्यास केला होता. वयाच्या १५व्या वर्षी त्याने घर सोडले व भारताला जाणाऱ्या जहाजावर तो खलाशी झाला. अमेरिकेहून भारताच्या सफरीत त्याने जहाजाचे कॅप्स्टन पाहिले व त्यावरून त्याला स्वयंचलित पिस्तुलाची कल्पना आली.

इ.स. १८३५मध्ये त्याने आपल्या या कल्पनेचा युरोपीय पेटंट घेतला व पुढील वर्षी अमेरिकन पेटंटही मिळवला. मार्च ५, इ.स. १८३६ रोजी त्याने पहिले रिव्होल्व्हर पिस्तुल पॅटरसन, न्यूजर्सी येथे तयार केले परंतु अमेरिकन लोकांनी या नवीन शोधाला अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद दिला नाही व कॉल्टच्या कंपनीने इ.स. १८४२मध्ये दिवाळे काढले. इ.स. १८४६ पर्यंत त्याने नवीन पिस्तुले तयार केली नाहीत.

इ.स. १८४७मध्ये त्याने पुन्हा उत्पादन सुरू केले व स्वतः सगळे (कच्चा माल घेण्यापासून तयार पिस्तुले विकण्यापर्यंत) करण्याऐवजी त्याने पगारदार मदतनीस घेतले. यानंतर लवकरच अमेरिकन सरकारने त्याच्याकडून पिस्तुले विकत घेण्यास सुरूवात केली. यानंतर कॉल्ट व त्याच्या कंपनीने मागे वळून पाहिले नाही व आत्तापर्यंत कोट्यावधी पिस्तुले विकली आहेत.

🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

संकलन -)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा - यवतमाळ ४४५२०६

10 जानेवारी निरंजन घाटे जन्मदिन

 *निरंजन घाटे*


*विज्ञानलेखक*


*जन्मदिन - १० जानेवारी १९४६*


आकाशवाणीच्या विविध केंद्रांवर कार्यक्रम अधिकारी आणि केंद्रप्रमुख आणि अनेक मराठी मासिकांचे संपादक म्हणून निरंजन घाटे परिचित आहेत. १५० पुस्तके, ३०० विज्ञानकथा आणि ३००० वैज्ञानिक लेख असे निरंजन घाटे यांचे विपुल प्रमाणात लेखन आहे.


मराठी भाषेतून विज्ञान-तंत्रज्ञानाचा प्रभावी प्रसार करण्यासाठी निरंजन घाटे यांनी सातत्याने ४० वर्षे लेखन केलेले आहे. त्यांनी आघाडीवरील विज्ञान-तंत्रज्ञानाची अद्ययावत माहिती विविध नियतकालिकांमधून आणि वृत्तपत्रांच्या रविवार पुरवण्यांमार्फत मराठी वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष प्रयत्न केले. अग्रगण्य वैज्ञानिक शोधनिबंधांमधील इंग्रजी भाषा ही विशिष्ट क्षेत्रात संशोधन करणाऱ्या संशोधकाची माहिती आणि संदर्भासाठी योजलेली असते. त्यातील जटिल कल्पना अवजड शब्दांमध्ये व्यक्त झालेल्या असतात. घाटे यांनी मराठी वाचकांसाठी वैज्ञानिक संकल्पनांमधील क्लिष्ट आशय सोप्या आणि सुबोध मराठी भाषेत प्रकट करण्यासाठी लेख व विज्ञानकथाही लिहिल्या. त्यांनी २००९ सालापर्यंत लिहिलेल्या १५० पुस्तकांपैकी अनेक वैज्ञानिक पुस्तकांचे पुनर्मुद्रण करावे लागले किंवा आवृत्त्या काढाव्या लागल्या. देशी आणि परदेशी शास्रज्ञांची चरित्रे, त्यांना आलेल्या अडचणी, त्यांची अनन्यसाधारण व्यक्तिमत्वे, त्यांच्या वैज्ञानिक कामगिऱ्या त्यांनी उलगडून दाखविल्या आहेत. पर्यावरण, उत्क्रांती यांसंबंधीचे लेखन करून त्यांनी जनजागृतीचे कार्यही केलेले आहे.


निरंजन घाटे यांनी भूशास्त्र हा विषय घेऊन पुणे विद्यापीठाची एम.एस्सी. पदवी १९६८ साली मिळवली. त्यानंतर त्याच विभागात त्यांनी सतत ९ वर्षे प्रयोगदर्शक आणि व्याख्याता म्हणून कार्य केले.


१९७७ साली त्यांना कार्यक्रम अधिकारी म्हणून नागपूर, जळगाव आणि सांगली आकाशवाणीच्या केंद्रांवर काम करण्याची संधी मिळाली. नवव्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने त्यांची १९८२ साली मराठी कार्यक्रम प्रमुखपदी निवड झाली. तेथे त्यांनी लक्षणीय कामगिरी केली. त्यांची सांगली आकाशवाणीच्या केंद्रप्रमुख पदावर नेमणूक करण्यात आली. आकाशवाणीचे पदाधिकारी  म्हणून घाटे यांनी ६००पेक्षा अधिक उत्तम कार्यक्रम श्रोत्यांसाठी सादर केले. त्यांमध्ये रूपके, एकांकिका, संवाद आणि विज्ञानविषयक भाषणांचा समावेश होता. १९८३ नंतर पुण्याच्या महात्मा फुले वस्तुसंग्रहालयामध्ये घाटे यांनी प्रारंभी उपसंचालक आणि नंतर संचालक म्हणून कार्य केले. 


पंधरा वर्षांच्या सेवेनंतर त्यांनी पूर्ण वेळ लेखनासाठी द्यायचे ठरवले. तथापि पुढील काही वर्षे त्यांनी अनेक मराठी मासिकांसाठी संपादकाची भूमिका बजावली. घाटे यांनी ‘सृष्टिज्ञान’ (१९८३-९३), ‘बुवा’, ‘पैंजण’ (१९८६-९२), ‘अद्भुत कादंबरी’, ‘ज्ञानविकास’ (१९८६-९२), ‘किर्लोस्कर’ (१९९३-९४), ‘विज्ञानयुग’ या मासिकांच्या संपादक मंडळावर उत्साहाने काम केले. पुण्यातील मराठी विज्ञान परिषद, मराठी साहित्य परिषद आणि महात्मा फुले वस्तू संग्रहालय यांचे ते आजीव सदस्य आहेत.


त्यांनी सतत नावीन्याचा ध्यास बाळगल्याचे दिसून येते. त्यांच्या विज्ञान लेखनासाठी आवश्यक असणारी विशाल ग्रंथसंपदा त्यांनी मेहनतीने उभारलेली आहे. विज्ञान लेखनाप्रमाणे ते युद्धकथा, साहसकथा, हेरकथा आणि बालकुमार वाङ्मयनिर्मितीमध्ये रमतात. सभा, संमेलने, सत्कार अशा गोष्टींपासून घाटे अलिप्त असतात, परंतु अशा प्रकारच्या कार्यक्रमात भाग घेऊन त्यांनी भाषणातून सडेतोडपणे आपली आग्रही, आणि व्यवहारी मते मांडली आहेत. घाटे यांच्या ‘ज्ञानदीप’, ‘ऊर्जाविश्व’, ‘वसुंधरा’, ‘अंटार्क्टिका’, ‘आकाशगंगा’, ‘शोधवेडे शास्त्रज्ञ’, ‘जीवनचक्र’, ‘आत्मवेध’, ‘आधुनिक युद्धसाधने’, ‘स्पेसजॅक’, अशा अनेक उत्तम पुस्तकांना वाचकांची पसंती आणि विविध पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांच्या पुस्तकांना आठ वेळा राज्य पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांमध्ये यदुनाथ थत्ते, रेव्हरंड ना.वा. टिळक, पंजाबराव देशमुख, वि.म. गोगटे, गो.रा. परांजपे, र.द. आंबेकर यांच्या नावाने दिल्या जाणार्‍या पुरस्कारांचा विशेष उल्लेख करायला पाहिजे. मराठी विज्ञान परिषदेतर्फे १९८५  साली त्यांना उत्कृष्ट विज्ञान प्रसारक म्हणून मानपत्र मिळाले.  


त्यांना मिळालेले इतर काही सन्मान : ‘स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार’ (पुणे मराठी ग्रंथालय, १९९२), ‘मो.वा. चिपळोणकर पुरस्कार’ (इंडियन फिजिक्स असोसिएशन, १९९७). घाटे यांच्या विज्ञानकथांना अनेक स्पर्धांमध्ये बक्षिसे मिळालेली आहेत. उदाहरणार्थ : ‘नवयुग कथास्पर्धा’ (१९७१,७२,७३), ‘विरंगुळा कथा स्पर्धा’ (१९७४), ‘मराठी विज्ञान परिषद, विज्ञानकथा स्पर्धा’ (१९७१,७२,७४). घाटे पुणे विद्यापीठाच्या भूशास्त्र विभागामध्ये अध्यापन करीत असताना, त्यांच्या संशोधनावर आधारित असलेले नऊ शोधनिबंध त्यांनी भूशास्त्राशी संबंधित नियतकालिकात प्रकाशित केलेले आहेत.


निरंजन घाटे यांनी शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात असताना क्रिकेटच्या अनेक स्पर्धांमध्ये भाग घेऊन त्यांचे प्रावीण्य दाखवले होते. पुण्यातील सदू शिंदे लीग क्रिकेट स्पर्धांमध्ये त्यांनी १९६६ ते १९७३ या काळात चार वेळा उत्कृष्ट गोलंदाज म्हणून मानपत्रेसुद्धा मिळवली आहेत.


त्यांनी लिहिलेल्या वसुंधरा, एकविसावं शतक आणि नवे शतक या पुस्तकांना राज्य पुरस्कार मिळाले आहेत. त्यांची निवडक पुस्तके पुढीलप्रमाणे - 'वाचत सुटलो त्याची गोष्ट', 'आपल्या पूर्वजांचे विज्ञान', 'असे घडले सहस्रक', 'असे शास्त्रज्ञ असे संशोधन', 'जिज्ञासापूर्ती', 'ज्याचं करावं भलं', 'पर्यावरण प्रदूषण', 'वसुंधरा', 'वेध पर्यावरणाचा'.

🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

संकलन -)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

प्रभात दर्शन

 🌳⛳ *शुभ प्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

पौष मास,शुक्ल पक्ष,*अष्टमी*,रेवती नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,शिशिर ऋतु,युगाब्द ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

सोमवार, १० जानेवारी २०२२.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                        *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


          *"संतुष्ट जीवन, सफल जीवन से सदैव श्रेष्ठ होता है क्योंकि सफलता का मापदण्ड सदैव दूसरों के द्वारा आंकलित एवं दूसरों पर ही निर्भर होता है जबकि संतुष्टि स्वयं के मन और मस्तिष्क द्वारा निर्धारित होती है"*


*गौधन, गजधन, बाजधन*

                *और रतन धन खान,*

*जब आवे सन्तोष धन,*

                *सब धन धूरी समान*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

शनिवार, ८ जानेवारी, २०२२

गुरूगोविंद सिंग शिखाचे 10 वे धर्मगुरू

 ➿➿➿➿➿➿➿➿➿➿

*शीखांचे दहावे धर्मगुरु गुरु गोविंद सिंह* 

➿➿➿➿➿➿➿➿➿➿

जन्म -) ०९ जानेवारी १६६६

देहवसान -)  १७०८

शिखांचा सिख्ख धर्म हा भक्तीमार्ग शिकवतो. त्यात प्रेम आणि अहिंसा ही प्रमुख तत्त्वे आहेत. गुरुनानकांना बाबरने कारागृहात डांबले. तरीही पहिल्या ९ धर्मगुरूंनी त्यांच्या उपदेशात केवळ भक्ती अन् प्रेम यांचाच संदेश दिला. मुसलमानांचा प्रतिकार करावयास सांगितले नाही. शिखांचे ९ वे धर्मगुरु तेग बहाद्दूर यांनाही मोगलांनी हालहाल करून मारले. श्री गुरु गोविंद सिंह हे शीख धर्माचे दहावे गुरू होते. त्यांचा जन्म १६६६ मध्ये पाटना येथे गुजरीजी व श्री गुरु तेगबहादुरजी यांच्या गरीब कुटुंबात झाला. त्यावेळी गुरु तेगबहादुरजी बंगालमध्ये होते. त्यांच्या म्हणण्यानुसार गुरुजी यांचे नाम गोविंद राय असे ठेवण्यात आले होते. नंतर १६९९ मध्ये बैसाखीच्या दिनी गुरु गोविंद राय हे गुरु गोविंद सिंह बनले होते. त्यांचे बालपणाचे पाच वर्ष पाटना येथेच गेले. १६७५ मध्ये कश्मीरच्या ब्राम्हणांच्या विनंतीला मान देऊन श्री गुरु तेगबहादुरजींनी दिल्ली येथील चांदणी चौकात देहत्याग केला होता. श्री गुरु गोविंद सिंहजी ११ नोव्हेंबर १६७५ रोजी गुरु गादीवर विराजमान झाले. धर्म व समाजाच्या संरक्षणासाठी गुरु गोविंद सिंहजी यांनी १६९९ मध्ये खालसा पंथाची स्थापना केली. ‘खालसा’ म्हणजे शुद्ध, पवित्र. खालसा पंथीय ही प्रार्थना करतात, ‘परमेश्वरा, मी योग्य कारणासाठीच लढीन. मी युद्धावर जातांना मला निर्भय बनव. ‘मी युद्धात जिंकेनच’, असा आत्मविश्वास माझ्यात निर्माण कर. माझ्यात तुझ्या कीर्तनाची आवड निर्माण कर आणि मृत्यूसमयी तुझ्या चरणी विलीन करून घे.’ खालसा पंथ हा निरंकारी आहे. निरंकारी म्हणजे ईश्वराला निराकार मानणारा. याचा दुसरा अर्थ आहे ‘निरहंकार.’ ‘श्री’ हे देवीचे नाव आहे आणि भगवती म्हणजे तलवार. त्यांच्या योद्ध्यांना ‘संत-सिपाही’, असे म्हणतात. खालसा पंथाच्या माध्यमातून त्यांनी जातीय भेद नष्ट करून समानता प्रस्तापित केली. शीख बांधवामध्ये आत्म-सन्मानाची भावना वाढीस लावली. गुरु गोविंद सिंह यांना तीन पत्नी होत्या. माता जीतोजी, माता सुंदरीजी व माता साहिबकौरजी अशी त्यांची नावे होती. बाबा अजित सिंह, बाबा जुझार सिंह ही त्यांची मुले होती. ती चमकौरच्या युद्धात शौर्यमरण प्राप्त झाले होते. तर बाबा जोरावर सिंह व फतेह सिंह या लहान मुलांना सरहंदच्या नवाबने जिवंत भिंतींत पुरले होते. केसगड, फतेहगड, होलगड, आनंदगड व लोहगड हे किल्ले त्यांनी युद्धात जिंकले होते. गुरुजी दररोज गुरूवाणीचे पठण करून आपल्या भक्तांना त्याचा सविस्तर अर्थही सांगत असत. तेव्हा त्यांचे लहान भाऊ मनी सिंहजी ते लिहीत असत. सलग पाच महिने लिहून गुरुवाणी पूर्ण झाली होती. गुरु गोविंद सिंहजी यांनी ४२ वर्षापर्यंत शत्रूविरुद्ध सामना केला होता. १७०८ मध्ये त्यांनी महाराष्ट्रातील नांदेड येथील सचखंडमध्ये आपला देह त्यागला होता.

संकलन -)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६


सुंदरलाल बहुगुणा पर्यावरवादी

 ➿➿➿➿➿➿➿➿➿➿

*प्रख्यात भारतीय पर्यावरणवादी सुंदरलाल बहुगुणा*

➿➿➿➿➿➿➿➿➿➿

*जन्मदिन - ०९ जानेवारी १९२७*

        (मारोडा-टेहरी, उत्तराखंड,

 

सुंदरलाल बहुगुणा हे एक प्रख्यात भारतीय पर्यावरणवादी असून चिपको आंदोलनाचे प्रणेते आहेत.


चिपको आंदोलन

महात्मा गांधींच्या तत्त्वांना अनुसरून सुंदरलाल बहुगुणा यांनी ब्रिटिश सरकारविरुद्ध लोकांना एकत्र केले. त्यासाठी त्यांनी हिमालयातील जंगले आणि आणि पर्वतांमधून ४ हजार सातशे किलो मीटरचा पायी प्रवास केला. त्यावेळी मोठ्या प्रकल्पांमुळे हिमालयातील नाजुक पर्यावरणावर होणारे गंभीर दुष्परिणाम त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे खेड्यांतील लोकांच्या जीवनावर होणारा परिणामही त्यांनी जवळून अनुभवला. यातूनच १९७३ साली चिपको आंदोलनाची सुरुवात झाली. जंगले व झाडे वाचवण्यासाठी सुंदरलाल बहुगुणांनी दुर्गम भागांतील खेड्यापाड्यांतील जनतेला झाडे तोडण्यासाठी आलेल्या कामगारांना थोपवण्यासाठी झाडांना मिठी मारून चिपकण्याची कल्पना दिली. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी चर्चा करून त्यांनी १९८० साली वृक्षतोडीवर १५ वर्षांची बंदी आणली.


टेहरीसाठी उपोषण

टेहरीसारख्या मोठ्या धरणालाही सुंदरलाल बहुगुणा यांचा विरोध होता. १९९५ साली हे धरण होऊ नये यासाठी त्यांनी ४५ दिवसांचे उपोषण केले. त्यानंतर तत्कालीन पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव यांनी टेहरी धरणामुळे पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी एक समिती नेमली. धरणाचे काम सुरूच राहिल्यांने बहुगुणांनी महात्मा गांधींच्या समाधिस्थळाजवळ बसून ७४ दिवसांचे प्रदीर्घ उपोषण केले. काम तात्पुरते थांबले. मात्र २००१ साली या धरणाचे काम परत सुरू झाल्यावर सुंदरलाल बहुगुणा यांना अटक झाली.


भागीरथी नदीच्या काठी कोटी या गावाजवळ त्यांचे पर्यावरण रक्षणाचे काम आजही (२०१७ साली) चालू आहे.

🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

संकलन -)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

प्रभात दर्शन

 🌳⛳ *शुभ प्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

पौष मास,शुक्ल पक्ष,*सप्तमी*,रेवती नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,शिशिर ऋतु,युगाब्द ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

रविवार, ०९ जानेवारी २०२२.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                       *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


       *ईश्वर ने हमारे शरीर की रचना कुछ इस प्रकार की है कि ना तो हम अपनी पीठ थपथपा सकते हैं और ना ही स्वयं को लात मार सकते हैं। इसीलिए वास्तविक संतुलन के लिए हमारे जीवन में अच्छे मित्र एवं आलोचकों का होना अति आवश्यक है।*

 ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

शुक्रवार, ७ जानेवारी, २०२२

गॅलिलिओ गँलिली

 *गॅलेलियो गॅलिली*


*इटलीचा भौतिकशास्त्रज्ञ, गणितज्ञ, व तत्त्वज्ञ*


*स्मृतिदिन - ०८ जानेवारी  १६४२*

गॅलेलियो गॅलिली (फेब्रुवारी १५, इ.स. १५६४ - जानेवारी ८, इ.स. १६४२) हा इटलीचा भौतिकशास्त्रज्ञ, गणितज्ञ  होता.

१६०४ साली त्याला आकाशात एक नवीन उज्ज्वल तारा दिसला. १६०९ साली त्यान कुठल्याशा उपकरानाविषयी एक दंतकथेवजा अफवा ऐकली. कुणीतरी नळकांड्यात भिंग बसवून ते उपकरण बनवलं होत. त्यातून दूरवरच्या बोटी खूप स्पष्टपने दिसत. या दुर्बीणविषयीच्या अनेक कथा प्रसिद्ध आहेत. गॅलेलियोला वाटलं कि, याच दुर्बिणीतून आपण समुद्रावरच्या बोटीऐवजी जर आकाशातले ग्रहतारे न्याहाळले तर? आणि गॅलेलियोन ती दुर्बीण आकाशाकडे फक्त वळवली आणि सर्व विज्ञानाचा, खगोलशास्त्राचा इतिहासच बदलला! या दुर्बिणीतून त्यान चंद्रावरचे डोंगर आणि ज्वालामुखी बघितले. १६१० साली गुरूच निरीक्षण करून त्याभोवती फिरणारे उपग्रह, चंद्र शोधून काढले. शुक्रतारा आणि त्याच्या 'कला' यांचाही अभ्यास केला. या सगळ्या शोधावर मग त्याने 'दी स्टारी मेसेंजर' हे पुस्तकही लिहिल. गुरुभोवती चंद्र बगून 'चंद्र हे काही फक्त पृथ्वीलाच नाहीयेत, त्यामुळे पृथ्वी ही काही या विश्वात केंद्रस्थानी मानण्याचे कारण नाही; आणि कोपर्निकसच म्हणन बरोबर असल पाहिजे, असं त्याच ठाम मत झालं. या पुस्तकामुळे गॅलेलियो चक्क रातोरात हिरो बनला! पण 'या दुर्बीणीतून दिसणाऱ्या चंद्रावरचे पर्वत , डाग आनि इतरही गोष्टी या खऱ्या नसून दिशाभूल करणाऱ्या आहेत, असंच चर्च म्हणायला लागलं.व गॅलेलियो विरुद्ध खटला चालू झाला, सहा महिन्याच्या खटल्यानंतर २२ जून १६३३ रोजी जवळपास अंधत्व आलेल्या गॅलेलियोने पुन्हा हार मानली. त्याची नजरकैद चालू होती, या नजर कैदेत त्याची बरीच वर्षे नैर्याशात गेली आणि अशातच कडाक्याची थंडी पडली असता ८ जानेवारी १६४२ रोजी गॅलेलियो मृत्यूमुखी पडला.

 गॅलेलियो हा पाहिला आधुनिक शास्त्रज्ञ म्हणता येईल. त्याविषयी ब्रेख्यन एक सुंदर कलाकृतीही लिहिलीय. त्याच बोट हे इटलीच्या एका संग्रहालयात जपून ठेवलाय. अँटकिन्स नावाच्या सुप्रसिद्ध ब्रिटीश लेखकाने 'गॅलेलियोज फिंगर' नावच विज्ञानावर सुरेख पुस्तकही लिहिलंय! गॅलेलियोजेव्हा मरण पावला तेव्हा विज्ञानाच्या क्षितिजावर सूर्यच निस्तेज झाला होता!

🙏🌞🙏शुभ प्रभात🙏🌞🙏

संकलन -)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

प्रभात दर्शन

 🌳⛳ *शुभ प्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

पौष मास,शुक्ल पक्ष,*षष्ठी*,उ.भा.नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,शिशिर ऋतु,युगाब्द ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

शनिवार, ०८ जानेवारी २०२२.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                          *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


बलवानप्यशक्तोऽसौ 

                 धनवानपि निर्धनः।

श्रुतवानपि मूर्खोऽसौ 

                 यो धर्मविमुखो जनः॥


भावार्थः- *जो व्यक्ति धर्म (कर्तव्य) से विमुख होता है, वह व्यक्ति बलवान् हो कर भी असमर्थ, धनवान् हो कर भी निर्धन तथा ज्ञानी हो कर भी मूर्ख होता है।* 

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

गुरूचे आयो युरोपा

 *७ जानेवारी १६१०*

🔭🔭🔭🔭🔭🔭🔭🔭🔭🔭

*गुरूचे आयो,युरोपा,गॅनिमीड व कॅलिस्टो हे चार चंद्र गॅलिलिओने दुर्बिणीद्वारे शोधले.*

🔭🔭🔭🔭🔭🔭🔭🔭🔭🔭🔭

गुरू ग्रहाला एकंदर ७९ चंद्र आहेत. त्यांपैकी ठळकपणे दिसणारे चार उपग्रह गॅलिलियन उपग्रह म्हणून ओळखले जातात.


बृहस्पति सौर प्रवाहातील कुठल्याही ग्रहाचे वाजवी स्थिर अवस्थेत असलेल्या चंद्राची संख्या अधिक होते.

       सर्वात मोठे चंद्रमार्ग म्हणजे गॅलिलियो गॅलीली आणि सायमन मारिअस यांनी १६१० मध्ये स्वतंत्रपणे शोधलेले गॅलिलियन चंद्रातील चार ग्रह आणि त्या पहिल्या ऑब्जेक्ट्स होत्या ज्यांना शरीर किंवा पृथ्वी सूर्यप्रकाशास लागलेली नव्हती. १९ व्या शतकाच्या अखेरीस डझनभर लहान जोव्हिन चंद्राचे शोध लावले गेले आहेत आणि रोमन देव बृहस्पति किंवा त्यांच्या ग्रीक समूदास झ्यूसच्या चाहत्यांच्या मुलींचे नाव मिळाले आहे. ज्युपिटरच्या चंद्रमार्गांपैकी आठ नियोजित उपग्रह आहेत, ज्यात प्रोजेक्ट आणि जवळजवळ परिपत्रक कक्ष आहेत जे ज्युपिटरच्या इक्वेटोरियल प्लेनच्या संदर्भात फारशी आवडत नाहीत. गॅलिलिअन उपग्रह ग्रहांच्या वस्तुमानामुळे जवळजवळ गोलाच्या आकाराचा गोलाकार आहेत आणि जर ते सूर्यमालेत थेट कक्षेत असतील तर त्यांना (बौद्ध) ग्रहांचा विचार केला जाईल. इतर चार नियमित उपग्रह बरेच लहान आहेत आणि बृहस्पति जवळ आहेत; हे ज्युपिटरच्या रिंग्जमुळे बनलेल्या धूळचे स्रोत म्हणून काम करतात. ज्युपिटरचे चंद्रमार्ग उर्वरित अनियमित उपग्रह आहेत ज्याचा प्रोजेक्ट आणि प्रतिगामी कक्षिका बृहस्पतिपासून फार दूर आहेत आणि उच्च प्रलोभन व विलक्षणता आहेत. कदाचित या चंद्रमार्ग कदाचित सौरभांगातून गुरू ग्रहाने पकडले असतील. अठराव्या अनियमित उपग्रहांची नावे अद्याप देण्यात आलेली नाहीत.

🙏🌞🙏शुभ प्रभात🙏🌞🙏

संकलन -)गजानन गोपेवाड 


उमरखेड जिल्हा - यवतमाळ ४४५२०६

प्रभात दर्शन

 🌳⛳ *शुभ प्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

पौष मास,शुक्ल पक्ष,*पँचमी*,पू.भा.नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,शिशिर ऋतु,युगाब्द ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

शुक्रवार, ०७ जानेवारी २०२२.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                        *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


        *इस चराचर जगत में लक्ष्मी चंचला है अर्थात लक्ष्मी कहीं भी स्थिर नही रहती है, नष्ट हो जाती है अथवा हस्तांतरित हो जाती है। प्राण भी नाशवान है, जीवन और यौवन भी नष्ट होने वाले हैं। इस चराचर संसार में एकमात्र धर्म, राष्ट्र और संस्कृति ही है जो स्थिर है। अतः जो जीवन धर्म, राष्ट्र और संस्कृति की रक्षा के लिए अपना योगदान नही देता, ऐसा जीवन व्यर्थ हैं एवं पशु तुल्य है।*

 ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

मंगळवार, ४ जानेवारी, २०२२

जाँर्ज वाशिगटंन

 ➿➿➿➿➿➿➿➿➿➿

         *जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर*

*अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय शास्त्रज्ञ*

➿➿➿➿➿➿➿➿➿➿

जन्म -) १२ जुलै  १८६४ 

मृत्यू  -) *०५ जानेवारी १९४३*


 जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर हे अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय शास्त्रज्ञ होते. गुलामगीरीच्या काळात जन्माला आलेले कार्व्हर यांना त्यांचे मालक मोझेस कार्व्हर यांनी मोठे केले व आपले नावही दिले. गुलामगीरी नष्ट झाल्यानंतर कृष्णवर्णीयांना शिक्षणाची दारे खुली झाली होती. चित्रकला, गायन व अनेक कलेत निपुण असलेल्या कार्व्हर यांना त्यांच्या आयुष्यात अनेक हितचिंतकांनी उच्च शिक्षण घेण्यास प्रोत्साहन दिले. जात्याच प्रगल्भ असल्याने शेती विषयक क्षेत्रात उच्च शिक्षण पूर्ण केले. चित्रकला वा इतर कलेत प्राविण्य असूनही त्यांनी पुढील आयुष्यात आपल्या कार्याचा उपयोग इतर कृष्णवर्णीय बांधवाना व्हायला पाहिजे या जाणिवेने त्यांनी आपले आयुष्य शेतीविषयक संशोधनाला वाहून घेतले. शेंगदाण्यापासून तेल, डिंक, रबर, इ. वस्तू तयार करण्यासाठीच्या प्रक्रियांचा त्यांनी अभ्यास केला. आयुष्यभर कोणत्याही पदाची, पैशाचा मोबदला यांचा हव्यास न धरता आपले कार्य करत राहिले. आज कार्व्हर यांचा अमेरिकेला घडवणाऱ्या महानायकांमध्ये समावेश होतो.

मराठीत वीणा गवाणकर यांनी कार्व्हर यांच्या आयुष्यावर आधारित एका होता कार्व्हर हे राजहंस प्रकाशनाकडून प्रकाशित पुस्तक लिहिले आहे.

🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

संकलन -)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा - यवतमाळ ४४५२०६

गाथा बलिदानाची

 ➿➿➿➿➿➿➿➿➿➿

           *गाथा बलिदानाची*

➿➿➿➿➿➿➿➿➿➿

      

           *जे.सी. कुमारप्पा*

  (जोसेफ चेल्लादुरई कॉर्नेलिअस)


      *जन्म : ५ जनवरी १८९२*

         (तंजावर,मद्रास, भारत)


     *मृत्यु : ३० जनवरी १९६०*

              (मदुरई,भारत)


कर्म भूमि : भारत

कर्म-क्षेत्र : स्वतंत्रता सेनानी

मुख्य रचनाएँ : इकोनोमी ऑफ़ प्रमानेन्स, गांधीयन इकोनोमिक थोट

शिक्षा : स्नातक

विद्यालय : सायराक्रुज़ 

                            विश्वविद्यालय

नागरिकता : भारतीय

संबंधित लेख : महात्मा गाँधी

अन्य जानकारी गाँधीजी की अनुपस्थिति में कुमारप्पा ने यंग इण्डिया के सम्पादन की ज़िम्मेदारी उठायी और इनके आक्रामक लेखन के कारण ब्रिटिश सरकार ने इन्हें गिरफ्तार करके ढाई साल के लिए ज़ेल भेज दिया। जेल से रिहा होने के बाद इन्होंने बिहार में विनाशकारी भूकम्प के राहत-कार्य के पैसे के लेन-देन का काम देखने लगे।


जे सी कुमारप्पा भारत के एक अर्थशास्त्री थे। उनका मूल नाम 'जोसेफ चेल्लादुरई कॉर्नेलिअस' था। वे महात्मा गांधी के निकट सहयोगी रहे। वे ग्राम-विकास सम्बन्धी आर्थिक सिद्धान्तों के अग्रदूत थे। उन्होने गांधीवाद पर आधारित आर्थिक सिद्धान्तों का विकास किया।


जे सी कुमारप्पा को भारत में गाँधीवादी अर्थशास्त्र का प्रथम गुरु माना जाता है। अपने जीवनकाल में कुमारप्पा ने गाँधीवादी अर्थशास्त्र से जुड़े विषयों पर न केवल विशद लेखन किया बल्कि एक पूर्णकालिक कार्यकर्ता के रूप में भारत के दूरस्थ स्थानों में अनेक आर्थिक सर्वेक्षण करके ग्रामीण अर्थव्यवस्था के कायाकल्प के लिए सार्थक कार्यनीति का प्रतिपादन भी किया। कुमारप्पा का अर्थशास्त्र स्वतंत्र भारत के हर व्यक्ति के लिए आर्थिक स्वायत्तता एवं सर्वांगीण विकास के अवसर देने के उसूल पर आधारित था। भारत की ग्रामीण अर्थव्यवस्था और इसके प्राकृतिक स्वरूप को उन्नत करने के हिमायती कुमारप्पा ऐसे बिरले अर्थशास्त्री थे जो पर्यावरण संरक्षण को औद्योगिक-वाणिज्यिक उन्नति से कहीं अधिक लाभप्रद मानते थे। गाँधी के आर्थिक दर्शन से कांग्रेस पार्टी में उनके अपने सहयोगी भी पूर्णतः सहमत नहीं थे। इसीलिए स्वतंत्र भारत की आर्थिक नीतियों और गाँधीवादी आर्थिक नीतियों के बीच कोई समानता नहीं रही। परिणास्वरूप स्वतंत्र भारत ने पाश्चात्य अर्थव्यस्था के नमूने के अंधानुकरण की होड़ में कुमारप्पा को जल्दी ही विस्मृत कर दिया।


💁‍♂ *जीवन परिचय*


कुमारप्पा का जन्म तमिलनाडु के तंजावुर शहर में ४ जनवरी १८९२ में एक ईसाई परिवार में हुआ था। बचपन का नाम जोसफ़ चेल्लादुरै कॉर्नेलियस था। उनका उन्होंने मद्रास से अपनी स्कूली शिक्षा पूरी करने के बाद लंदन जाकर लेखा-विधि (एकाउंटेंसी) में प्रशिक्षण प्राप्त किया और फिर वहीं लंदन में एकाउंटेंट के रूप में कुछ वर्षों तक काम भी किया। प्रथम विश्वयुद्ध की समाप्ति पर और अपनी माता के बुलाने पर वे भारत लौटे और बम्बई में कुछ समय तक एक ब्रिटिश कम्पनी में काम करने के बाद १९२४ में अपना व्यवसाय शुरू किया। १९२७ में वे उच्च अध्ययन के लिए अमेरिका गये और सायराक्रुज़ विश्वविद्यालय से वाणिज्य एवं व्यापार प्रबंधन में स्नातक की उपाधि प्राप्त की। इसके बाद उन्होंने कोलम्बिया विश्वविद्यालय में सार्वजनिक वित्त का अध्ययन करके अपने समय के प्रख्यात अर्थशास्त्री एडविन सेलिग्मन के मार्गदर्शन में 'सार्वजनिकवित्त एवं भारत की निर्धनता' पर शोध पत्र लिखा जिसमें भारत की आर्थिक दुर्दशा में ब्रिटिश औपनिवेशिक शासन की नीतियों से हुए नुकसान का अध्ययन किया गया था। इस अध्ययन के दौरान ही कुमारप्पा ने पाया कि भारत की दयनीय आर्थिक स्थिति का मुख्य कारण ब्रिटिश औपनिवेशिक शासन की अनैतिक और शोषक नीतियाँ हैं। इसी बीच उन्होंने अपने मूल पारिवारिक नाम कुमारप्पा को अपने नाम के साथ जोड़ने का फ़ैसला किया।


स्वतंत्रता आंदोलन से जुड़े लोगों में भी अंग्रेज़ों द्वारा भारत के आर्थिक शोषण को लेकर बैचेनी थी। इस बेचैनी के केंद्र में था ब्रिटिश साम्राज्य पर चढ़ा वह सार्वजनिक ऋण जिसे वह भारत में शासन चलाने के नाम पर औपनिवेशक भारतीयों के मत्थे मढ़ना चाहती थी। कांग्रेस के १९२२ के गया अधिवेशन और इसके बाद १९२९ के लाहौर अधिवेशन में इस विषय पर चर्चा भी हुई थी। इसी बीच १९२९ में अमेरिका से भारत लौटने के बाद कुमारप्पा भारतीय आर्थिक शोषण पर लिखे अपने लेख को प्रकाशित करने के संदर्भ में गाँधी से मिलने साबरमती आश्रम गये। गाँधी ने अपने पत्र यंग इण्डिया में इस लेख को प्रकाशित करने में रुचि भी दिखायी और कुमारप्पा से गुजरात के ग्रामीण क्षेत्रों में आर्थिक सर्वेक्षण करने का आग्रह किया। गाँधी के कहने पर कुमारप्पा गुजरात के खेड़ा जिले के मातर ताल्लुका में सर्वेक्षण करने गये। गुजरात का यह इलाका पिछले कई सालों से कम वर्षा के कारण भीषण जल संकट से गुज़र रहा था लेकिन इसके बावजूद राजस्व वसूली के लिए सरकारी अमला बेहद सख्ती दिखा रहा था। कुमारप्पा ने मातर ताल्लुका के ४५ गाँवों के निवासियों का आर्थिक सर्वेक्षण करके लगान वसूली की दर और कृषि आधारित अर्थव्यवस्था के बीच जटिल संबंध को पहली बार सांख्यिकीय आँकड़ों के माध्यम से प्रदर्शित किया। इसी दौरान यंग इण्डिया में कुमारप्पा के लेख ‘सार्वजनिक वित्त और हमारी निर्धनता’ का सिलसिलेवार प्रकाशन भी शुरू हो गया। साथ ही मातर ताल्लुका के आर्थिक सर्वेक्षण का प्रकाशन भी हो रहा था। इन प्रकाशनों के बीच गाँधी ने नमक सत्याग्रह के लिए दांडी यात्रा भी शुरू कर दी। नमक सत्याग्रह में भाग लेने के कारण जब ब्रिटिश प्रशासन ने गाँधी को गिरफ्तार कर लिया तो यंग इण्डिया के संचालन की ज़िम्मेदारी कुमारप्पा पर आ गयी। इस पत्र में लेखन के कारण कुमारप्पा को भी गिरफ्तार करके डेढ़ साल के लिए जेल भेज दिया गया। १९३१ में गाँधी-इरविन समझौते के बाद कुमारप्पा रिहा हुए और उन्हें लाहौर कांग्रेस अधिवेशन में ब्रिटिश सरकार और भारत के बीच के वित्तीय लेन देन की समुचित पड़ताल करने के लिए गठित समिति का अध्यक्ष बनाया गया। इस कांग्रेस अधिवेशन के बाद गाँधी गोलमेज़ सम्मेलन में भाग लेने के लिए इंग्लैण्ड चले गये। गाँधी की अनुपस्थिति में कुमारप्पा ने यंग इण्डिया के सम्पादन की ज़िम्मेदारी फिर से उठायी और उनके आक्रामक लेखन के कारण ब्रिटिश सरकार ने उन्हें पुनः गिरफ्तार करके ढाई साल के लिए ज़ेल भेज दिया।


१९३३ में ज़ेल से छूटने के बाद कुमारप्पा ने बिहार में विनाशकारी भूकम्प के राहत-कार्य के पैसे के लेन-देन का काम देखा। अत्यंत ईमानदार व समर्पित स्वयंसेवक की तरह कुमारप्पा ने इस राहत कार्य में हाथ बँटाने आये गाँधी को भी उनके आने-जाने का ख़र्चा देने से इनकार कर दिया। गाँधी ने १९३४ में वर्धा आश्रम में कुमारप्पा के नेतृत्व में अखिल भारतीय ग्राम उद्योग संघ की स्थापना की जिसमें ग्रामीण अर्थव्यवस्था के अनुकूल उत्पादों के निर्माण, संरक्षण एवं प्रसार का अभियान चलाया गया। कुमारप्पा भारतीय अर्थव्यवस्था की मज़बूती में ग्रामीण आर्थिक स्थिति के योगदान को अच्छी तरह पहचानते थे और इसलिए उन्होंने इस ग्राम उद्योग संघ को कारगर बनाने में पूरा समय लगाया। अखिल भारतीय ग्राम उद्योग संघ में अपने इस अनुभव के आधार पर सन् १९३६ में कुमारप्पा ने 'ग्राम आंदोलन क्यों?' शीर्षक से एक पुस्तक प्रकाशित की जो गाँवों की आर्थिक उन्नति पर केंद्रित गाँधीवादी अर्थशास्त्र के सिद्धांतों के घोषणा पत्र के समान है। १९३९-४० के दौरान कुमारप्पा ने मध्य प्रदेश और उत्तर पश्चिम सीमांत प्रदेश में व्यापक आर्थिक सर्वेक्षण किये। १९४२ में जब ब्रिटिश सरकार द्वितीय विश्वयुद्ध का अधिकतर ख़र्च भारत पर डालना चाहती थी तो कुमारप्पा ने इसके विरोध में एक लेख ‘स्टोन फ़ॉर ब्रेड’ लिखा और जिसके प्रकाशन के बाद उन्हें एक बार फिर ज़ेल भेज दिया गया। कुमारप्पा ने अपने इस ज़ेल-प्रवास का सदुपयोग करते हुए 'प्रैक्टिस ऐंड परसेप्ट्स ऑफ़ जीसस' एवं 'इकॉनॉमी ऑफ़ परमानेंस' शीर्षक से दो पुस्तकें लिखीं। पहली पुस्तक ईसा मसीह का अनुशीलन व ज्ञानबोध में ईसाइयत के सच्चे आदर्शों के बारे में विवेचना थी। निरंतरता का अर्थशास्त्र में पर्यावरण संरक्षण के साथ मानव के आर्थिक विकास की परिकल्पना का प्रतिपादन किया गया है। इस पुस्तक को कुमारप्पा की सर्वश्रेष्ठ कृति माना जाता है।


⏳ *निधन*


३० जनवरी १९६० को कुमारप्पा का निधन हुआ। उनकी स्मृति में कुमारप्पा इंस्टीट्यूट ऑफ़ ग्राम स्वराज की स्थापना की गयी।

*🇮🇳🇮🇳🇮🇳जयहिंद🇮🇳🇮🇳🇮🇳*

🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

संकलन -)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

प्रभात दर्शन

 🌳⛳ *शुभ प्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

पौष मास,शुक्ल पक्ष,*तृतीया*,श्रवण नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,शिशिर ऋतु,युगाब्द ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

बुधवार, ०५ जानेवारी २०२२.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                         *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


पठतो नास्ति मूर्खत्वं 

               अपनो नास्ति पातकम्,

 मौनिनः कलहो नास्ति 

               न भयं चास्ति जाग्रतः॥


*भावार्थः- पढ़ने वाले को मूर्खत्व नहीं आता, जपने वाले को पातक नहीं लगता, मौन रहने वाले का झगड़ा नहीं होता और जागृत रहने वाले को भय नहीं होता।*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

ओझैन म्हणजे काय


══════════════════════

   *📒📒📒 @ संकलन @📒📒📒*

  *श्री. गजानन गोपेवाड 

══════════════════════

            🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════   

📙 *ओझोन म्हणजे काय ?* 

******************************

या दशकातला बहुचर्चित वायू म्हणजे ओझोन. प्राणवायूमध्ये ऑक्सिजनच्या दोन अणूंनी रेणू बनतो. तर ओझोनच्या तीन अणूंनी. पण या छोट्याशा फरकाने दोन्हींच्या गुणांत खूपच फरक पडतो. ओझोन हा फिक्कट निळा, तीक्ष्ण वास असलेला वायू आहे. विजेची मोटार चालू करताना व विजेची बटणे सतत उघडझाप केल्यास एक विशिष्ट वास जाणवतो, तो ओझोनचा.


अोझोन वातावरणाच्या अगदी वरच्या थरात म्हणजे वीस ते तीस किलोमीटरमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळतो. येथे त्याचे प्रमाण वातावरणातील दर दहा लाख अन्य रेणूंमध्ये दहा रेणू (10 parts per million) इतके आढळते. याचा उपयोग अतिनील किरणे पृथ्वीवर पोहोचू नयेत म्हणून होतो. याउलट हाच ओझोन जेव्हा वातावरणाच्या खालच्या थरात येतो, तेव्हा तो त्रासदायक बनतो. याच्या सान्निध्याने अनेक कृत्रिम गोष्टी म्हणजे रबर, प्लॅस्टिक, रसायने यांचे उन्हात विघटन होऊ लागते. धूळ, धूर व ओझोन यांच्या मिश्रणाने स्माॅग तयार व्हायला मदत होते. असेही एक मत आहे.


ओझोनचा व्यावहारिक उपयोग पाणी शुद्धीकरण व ब्लीचिंगसाठी केला जातो. औद्योगिक वापरासाठी ओझोन तयार करण्याची पद्धत म्हणजे बंदिस्त वातावरणात ठरावीक दाबाचा हवेमध्ये विद्युत ठिणग्या सतत पाडल्या जातात. या हवेत ओझोनचे प्रमाण वाढत जाते व प्राणवायूचे कमी होत जाते. वातावरणात ज्यावेळी प्रचंड विजांचा कडकडाट नैसर्गिकरित्या होतो, तेव्हाही ओझोन तयार होतोच.


१९७० सालच्या आसपास ओझोनचा थर अंटार्क्टिकांवरती काही भागांत नष्ट झाला असून तेथे अतिनील किरणांचे प्राबल्य वाढले असल्याचे लक्षात आले. याचा शोध घेताना मानवनिर्मित क्लोरोफ्लुरोकार्बन (सीएफसी) च्या द्रव्याचा हा परिणाम असल्याचे लक्षात आले. हा एक तर्क आहे. हे सीएससीचे निरुपद्रवी कण जेव्हा हळूहळू ओझोनच्या थरातील ओझोनबरोबर संयोग पावतात, तेव्हा मोठ्या प्रमाणातील विघटनाला सुरुवात होते. यामुळे अतिनील किरणांचा पृथ्वीवर मारा वाढल्यास कातडीचे कर्करोग वाढतील व उष्णता वाढून बर्फ वितळून पाण्याची जागतिक पातळी वाढेल, अशी भीती व्यक्त केली गेली. 


या सर्वांचा परिणाम म्हणून ओझोन वायू या दशकात चर्चेचा केंद्रबिंदुच बनला आहे. सीएफसीचा वापर सर्व एरोसोलमध्ये व शीतीकरणासाठी केला जातो. याचे उत्पादन बंद करून त्याचे पर्याय सर्वांनी वापरावेत, या स्वरूपाचा सर्व देशांनी एक करार मॉन्ट्रियल येथे केला आहे. टप्प्याटप्प्याने उत्पादन कमी करणे व पर्यायी वापर सुरू करणे हे त्यात अपेक्षित आहे.


काही शास्त्रज्ञांच्या मते ओझोनचा थराची थर नष्ट होणे यामध्ये मानव व प्राणिजातीला अणुयुद्धाएवढाच धोका उद्भवतो. काहींचे मत याला प्रतिकूल आहे. पण एक गोष्ट निर्विवाद आहे, ती म्हणजे ओझोनचा थर आहे तसाच टिकणे, हे आपल्यालाच काय, पण पृथ्वीवरच्या सर्वच सजीव सृष्टीला आवश्यक आहे.


*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*

═══════════════════════

  

सोमवार, ३ जानेवारी, २०२२

आपल्या ला भुख का लागते


══════════════════════

  @ संकलन @गजानन गोपेवाड 

  

══════════════════════

            🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════   

📙 *आपल्याला भूक का लागते ?* 📙 


आपलं शरीर सतत काम करत असतं. जेव्हा आपण विश्रांती घेत असतो किंवा झोपेत असतो तेव्हाही श्वसन, रक्ताभिसरण, हृदयाची धडधड यांसारख्या प्रक्रिया चालूच असतात. त्यामुळे शरीराला सतत ऊर्जेची गरज भासते. हिचा पुरवठा अखंड असण्यासाठी शरीराला वेळोवेळी पोषण मिळणं आवश्यक असतं. आपण जेव्हा अन्न खातो तेव्हा हे पोषण मिळतं. ते साठवूनही ठेवलं जातं. पण तो साठा संपला की परत पोषक पदार्थ शरीराला मिळण्याची गरज असते. याचीच जाणीव आपल्याला करून देण्यासाठी भुक लागण्याची भावना निर्माण होते.


आपल्या मेंदूमधील हायपोथॅलॅमस या अवयवामध्ये भुकेवर नियंत्रण ठेवणारं केंद्र असतं. त्याला संदेश मिळाला की ते कार्यरत होतं आणि भुकेची भावना जागृत करतं. त्या केंद्राला मिळणारे संदेश विविध प्रकारचे असतात. त्यातले काही शरीराच्या आतून उत्पन्न होतात. म्हणजेच ते अंतर्गत असतात, तर काही बाहेरून येणारे असतात.


शरीराला ऊर्जा मिळते ते ग्लुकोजच्या ज्वलनातून. त्यामुळे रक्तात ग्लुकोजचं प्रमाण एका निर्धारित पातळीवर नेहमी राहील याची व्यवस्था केलेली असते. ते जर त्या पातळीपेक्षा फारच चढलं तर ते आरोग्याला बाधक असल्यानं इन्सुलीन या संप्रेरकाचा  पाझर सुरू होतो. ते संप्रेरक ग्लुकोजची निर्धारित पातळी राखण्यात मदत करतं. जर ग्लुकोजची पातळी या निर्धारित प्रमाणापेक्षा फारच घसरली तर तो संदेश मिळून भुकेचं केंद्र जागृत होतं. त्यावेळी आपण पुरेसं अन्न पोटात टाकलं तर मग भुक मिटल्याची भावनाही याच केंद्रातून निर्माण केली जाते.

आपल्या पोटाचं आकारमानही विशिष्ट पातळीवर ठेवण्याची व्यवस्था केली जाते. तसंच ते काही विविक्षित प्रमाणात भरलेलं असेल हेही बघितलं जातं. पोट जर रिकामं झालं तर ते आकुंचन पावून त्याचं आकारमान घटतं. भुकेचं केंद्र जागृत करायला तोही एक संदेश पुरतो. अशा वेळी पाणी पिऊन आकारमान वाढवलं तरीही भुक भागल्याची भावना निर्माण होते.


आज जरी आपल्याला हवं तेव्हा अन्न उपलब्ध होत असलं तरी आदिमानवाच्या काळात जेव्हा रानावनात कंदमुळे गोळा करून किंवा शिकार करून मनुष्यप्राणी आपली पोषणाची गरज भागवत होता. तेव्हा अन्न केव्हा मिळेल याची शाश्वती नव्हती. त्यामुळे असं ते मिळालं की प्रत्यक्ष पोषणाची आवश्यकता असो-नसो, त्याच्या दर्शनाने किंवा गंधानंही भुकेची भावना चाळवली जात असे. उत्क्रांतीच्या ओघात हा गुणधर्म टिकून राहिला आहे. त्यामुळे स्वादिष्ट अन्न दिसलं किंवा त्याचा दरवळ नाकपुड्यांना चाळवून गेला म्हणजेही आपल्याला भूक लागते.


*-डाॅ.बाळ फोंडके यांच्या'का?'या पुस्तकातुन* 

═══════════════════════

कुतूहल


══════════════════

           *🤔 【 कुतूहल 】 🤔*  

______________________________

*🖥️✒️संकलन✒️💻*

गजानन गोपेवाड 

~==========================~


*कुतूहल : आणि जीवनाचे सूप तयार झाले!*


निसर्गात पहिल्या जीवाचा प्रवेश नेमका कसा झाला असेल बरे? ‘प्रारंभी पृथ्वीच्या वातावरणात प्राणवायूचे अस्तित्व नव्हते. म्हणूनच सेंद्रिय संयुगे तयार होण्यासाठी योग्य परिस्थिती होती. याच सेंद्रिय संयुगांनी जीवसृष्टीच्या उत्पत्तीला कच्चा माल पुरवला. ‘यावर कोणी तरी प्रयोग करायला हवा.’ हॅरॉल्ड युरे आपल्या भाषणात बोलत होते. स्टॅनले मिलर या विद्यार्थ्यांने ही कल्पना तात्काळ उचलून धरली. मिलरने आपल्या प्रयोगासाठी मिथेन, अमोनिया, बाष्प आणि हायड्रोजन यांचे मिश्रण वापरले. मिश्रणाला ऊर्जा पुरवण्यासाठी त्याने ‘स्पार्क डिस्चार्ज’चा उपयोग केला. दोन विद्युत अग्रांमध्ये थोडे अंतर ठेवून त्यांना प्रचंड विद्युत दाब दिला म्हणजे अग्रांमधील जागेत प्रकाशमय ठिणगी उमटते, त्याला स्पार्क डिस्चार्ज (विद्युतन्मोच) असे म्हणतात. हवा ही वस्तुत: विद्युत दुर्वाहक असली तरी प्रचंड विद्युत दाबाखाली हवेची विद्युत दुर्वाहकता नष्ट होते. पृथ्वीवरील प्रारंभीच्या वातावरणातील विद्युल्लतेचा चमचमाट म्हणजेच हा स्पार्क डिस्चार्ज. वायूच्या मिश्रणात स्पार्क डिस्चार्जद्वारा ऊर्जा प्रविष्ट केल्यानंतर पावसाचा आभास निर्माण करण्यासाठी ते मिश्रण एका थंड नळीतून जाऊ देण्यात आले. त्यामुळे पाण्याला उष्णता देऊन सागरातील पाण्याचे बाष्पीभवन होते तशी स्थिती निर्माण झाली. उष्णता पुरवण्याचा वेग, मिश्रणातील वायूंचे प्रमाण, तापमान, स्पार्क (ठिणगी) आणि थंडपणा या घटकात थोडे थोडे बदल करून मिलरने आपला प्रयोग सात दिवस चालू ठेवला. प्रयोग समाप्त झाला त्या वेळी उपकरणाच्या तळाशी ग्लायसिन आणि अ‍ॅनेलीन ही दोन अ‍ॅमिनो आम्ले साचलेली आढळली. अ‍ॅमिनो आम्ले जीवसृष्टीच्या धारणेचे मूळ घटक आहेत. आपल्या शरीरात एकूण २० उपयुक्त अ‍ॅमिनो आम्ले निसर्गाने वापरलेली आहेत. त्या उपकरणाच्या तळाशी युरिया, फॉर्मिक आम्ल, अ‍ॅसेटिक आम्ल आणि प्रॉपिऑनिक आम्ल असे सेंद्रिय रेणूदेखील तयार झालेले आढळून आले. हे सर्व रेणू जीवनिर्मितीसाठी आवश्यक आहेत. फॉर्मिक, अ‍ॅसेटिक आणि प्रॉपिऑनिक ही आम्ले स्निग्ध पदार्थाचे घटक आहेत. अ‍ॅमिनो आम्लशृंखलाच पुढे प्रथिने तयार करते. युरियामधील नत्र हे तर अनेक जैविक प्रक्रियांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.


या प्रयोगाचे निष्कर्ष प्रसिद्ध झाल्यावर विज्ञान जगतात कुतूहलाची एक लाट निर्माण झाली. प्रारंभीच्या काळात पृथ्वीवर मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेल्या साध्या रसायनांद्वारे जीवसृष्टी धारण करू शकेल अशी सेंद्रिय संयुगे निर्माण झाली. हीच संयुगे विविध प्रकारांनी सम्मीलित होऊन त्यामधून अत्यंत प्राथमिक स्तरावरील सूक्ष्म जीव निर्माण झाले. पुढे डार्विनच्या ‘नैसर्गिक निवड’ तत्त्वानुसार अधिक गुंतागुंतीची जीवसृष्टी विकसित होत गेली.



Featured Post

व्यायाम व योगा अवश्य करावा*

*व्यायाम व योगा अवश्य करावा*  *व्यायाम व योगा करण्याचे दहा फायदे:-*  1) व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते: व्यायाम करणारी...