बुधवार, २४ मार्च, २०२१

जागतिक क्षय दिन लेख गजानन गोपेवाड

 *२४ मार्च*

➿➿➿➿➿➿➿➿➿➿

*🔘जागतिक क्षय रोगदिन🔘*

➿➿➿➿➿➿➿➿➿➿

🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘

क्षय रोग हा एक जिवाणुजन्य आजार आहे. क्षयरोग हा आजकाल बहुधा पूर्ण बरा होणारा आजार आहे. एके काळी हा रोग दुर्धर समजला जाई. सामान्यतः या आजाराला टीबी (ट्युुबरक्युलॉसिस) म्हणून ओळखले जाते. हा आजार 'मायकोबॅक्टेरिया' या प्रकारच्या जिवाणूंमुळे होत असतो. त्यातील मुख्यत्वे 'मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलॉसिस' या प्रकारामुळे माणसाला क्षयरोग होतो. यात मुख्यतः ७५% रुग्णांमध्ये फुफ्फुसांना बाधा होत असते. काही रुग्णांमध्ये फुफ्फुसेतर अवयवांना ही बाधा होत असते. साधारण ३५ टक्के वा जास्त लोकांच्या शरीरात क्षयरोगाचे जंतू वास्तव्य करून असतात. पण या सर्वानाच क्षय रोग होत नाही कारण हे जंतू निद्रिस्त अवस्थेत असतात. पण शरीरातील प्रतिकारशक्ती कमी झाल्यास हे झोपी गेलेले जंतू जागे होतात. क्षयरोग हा मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसीस नावाच्या जंतूमुळे होणारा अत्यंत संसर्गजन्य असा रोग आहे. इ.स.१८८२ साली डॉ.रॉबर्ट कॉक यांनी क्षयरोगाच्या जिवाणूंचा शोध लावला.त्यांचा प्रबंध जागतिक शास्त्रज्ञांच्या परिषदेत मांडला व त्यास दिनांक २४ मार्च रोजी मान्यता मिळाली.म्हणून दरवर्षी २४ मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो.ज्या व्यक्तीला क्षयरोग (टि.बी.) असेल तो माणूस बोलला, थुंकला किंवा शिंकला तरी त्याच्या शरीरातील क्षयाचे जंतू बाहेर पडतात आणि हवेद्वारे जवळ असलेल्या निरोगी व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतात व त्या निरोगी व्यक्तीला क्षय जंतूचा संसर्ग होतो. संसर्ग झालेल्या व्यक्तीची रोग प्रतिकार शक्ती कमी झाल्यास अशा व्यक्तींना क्षयरोगाची लागण होते.एखाद्या व्यक्तीला सतत दोन आठवड्यापेक्षा जास्त काळ खोकला असणे, वजन कमी होणे, भूक मंदावणे, हलकासा परंतु संध्याकाळी वाढणारा ताप, छातीत दुखणे, रात्री घाम येणे इत्यादी पाठवून देऊन त्याची दोन बेडक्याची तपासणी करून घेणे आवश्यक आहे.फुफ्फुसांशिवाय इतर अवयवांमध्ये क्षयरोग होतो. उदा. हाडे सांध्याचा क्षयरोग,लसिकाग्रंथीचा क्षयरोग, मज्जासंस्थेचा क्षयरोग,आतड्यांचा क्षयरोग इत्यादी. हा रोग पूर्णपणे बरा होण्यासाठी ६ महिने अथवा अधिक काळ उपचार घेणे गरजेचे असून जर उपचार मधेच बंद केले तर क्षयरोग परत उलटण्याची शक्यता असते. रुग्णांचा compliance (औषधांना चिकटून रहाणे) ही गोष्ट क्षयरोगाच्या उपचारांत अतिशय आवश्यक आहे.


ते अवयव

मेंदूची आवरणे,

मणके व इतर हाडे,

लैंगिक अवयव.


क्षय रोग 


उपवर्ग

primary bacterial infectious disease,

mycobacterium infectious disease,

endemic disease,

संसर्गजन्य रोग

मध्ये प्रकाशित

Annals of Internal Medicine (ITC6, 150)

मृत्युंची संख्या

१७,००,००० (worldwide, इ.स. २०१६)

अधिकार नियंत्रण

विकिडाटा Q12204

प्रकार संपादन करा

फुफ्फुसाचा क्षयरोग

दूषित थुंकी (स्पुटम पॉसिटिव्ह)

अदूषित थुंकी (स्पुटम निगेटिव्ह)

फुफ्फुसाव्यतिरिक्त इतर अवयवांचा

ग्रंथीचा क्षय्ररोग ( लिम्फ नोड )

हाडाचा व सांध्याचा क्षय्ररोग

जनन व विसर्जन संस्थाचा क्षयरोरोग (जनायटो-युरिनरी ट्रॅक्ट )

मज्जासंस्थेचा क्षय्ररोग (नर्व्हस सिस्टिम )

आतडयाचा क्षय्ररोग



क्षय रोगाची लक्षणे

कमी होणारे वजन

थकवा

श्वास घेण्यास त्रास होणे

ताप

रात्री येणारा घाम

भूक न लागणे

आजार टाळण्याचे उपाय "

क्षय रोगासाठी बी.सी.जी नावाची लस वापरली जाते.हि लस लहान मुलांना या रोगापासून वाचवते.पण मोठ्यांना लस टोचून घेतल्यावरहि हा रोग होण्याची शक्यता आहे.

क्षय रोगासाठी एक लस उपलब्ध आहे .ती म्हणजे बी. सी.जी. ही लस लहान मुलांना या रोगापासून वाचवते, पण मोठ्या माणसांना मात्र लस टोचल्यावरही हा रोग होऊ शकतो.

क्षय रोग टाळण्यासाठीच्या चांगल्या पद्धती म्हणजे


पौष्टिक आहार घेऊन रोगप्रतिकारकशक्ती वाढवणे.

क्षय रोग तपासण्या करून घेणे

क्षय रोग झाला असेल तर इतरांपासून दूर राहणे

तोंड झाकणे

लक्षणे संपादन करा


क्षयरोगाच्या रुग्णांची लक्षणे

दोन आठवडय़ांहून अधिक काळ


बेडकायुक्त खोकला (१५ दिवसांपेक्षा जास्त काळ असणारा )

हलकासा परंतु रात्री येणारा ताप

घटणारे वजन.

भूक कमी होणे.

बेडक्यातून रक्त पडणे.

थकवा

छातीत दुखणे

रात्री येणारा घाम

मानेला गाठी येणे (इंग्लिश: Lymph Node - लिम्फ नोड )

जीवाणू पसरण्याचे मार्ग संपादन करा


*जीवाणू*

उपचार न घेतलेला क्षयरोगाचा एक रुग्ण वर्षभरात १० ते १५ व्यक्तींना संसर्ग करू शकतो दाट लोकवस्ती, कोंदट घरे, प्रदूषण, एड्सचे वाढते प्रमाण, कुपोषण, अस्वच्छता, अपुरे/चुकीचे उपचार अशा अनेक कारणांनी हा रोग होतो.


दूषित धुलिकण

बाधित व्यक्तीची थुंकी.

बाधित व्यक्तीचे इतर स्राव

क्षय रोग होण्याची जास्ती शक्यता असलेले लोक संपादन करा

जास्ती वय असलेले

लहान बाळे

दुसऱ्या कोणत्यातरी कारणांनी ज्यांची रोग प्रतिकारक शक्ती कमी झाली आहे असे

कमी पोषकता

दारूच्या आहारी गेलेले

जास्ती गर्दीच्या ठिकाणी राहणारे

गरीब लोक

अस्वच्छतेत राहणारे

उपचार संपादन करा

सहा ते नऊ महिन्यांकरिता विविध औषधोपचाराच्या पद्धती

औषधोपचार खूप कालावधीसाठी चालतो कारण ह्या रोगाचे जीवाणू खूप हळूहळू वाढतात व अौपधोपचाराने खूप हळूहळू मरतात.

जीवाणू कमी करण्यासाठी विविध औषधे घ्यावी लागतात.

*निदान*

खकाऱ्याची तपासणी, एक्सरे, रक्ताच्या चाचण्या यांवरून या क्षयरोगाचे रोगनिदान केले जाते.


चाचण्या-)


*खकाऱ्याची तपासणी-*

वयस्कांमध्ये- सकाळीचचा खकारा निर्जंतुक बाटलीत घेतला जातो. तो काचपट्टीवर पसरवून त्यावर अल्कोहोलची प्रक्रिया करून चिकटवला जातो. त्यावर झिअल नेल्सन स्टेन या पद्धतीने पेशींना रंग देउन सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने निरीक्षण केले जाते. यामध्ये जर जीवाण् सापडले तर अशा रुग्णास थुंकी दूषित रुग्ण समजले जाते.

लहान मुलांमध्ये- सकाळीच उपाशीपोटी अन्ननलिकेतून एनजीटी टाकून जठरातील द्रव निर्जंतुक बाटलीत घेतला जातो. तो काचपट्टीवर पसरवून त्यावर अल्कोहोलची प्रक्रिया करून चिकटवला जातो. त्यावर झिनलेन्स स्टेन या पद्धतीने पेशींना रंग देऊन सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने निरीक्षण केले जाते.

मॉन्टुक्स टेस्टद्वारेही रोगाचे निदान केले जाते.

*रक्ताच्या तपासण्या-*

इएसआर- (एरिथ्रोसाइट सेडिमेंटेशन रेट) यामध्ये रक्ताचा नमुना न गोठू देणाऱ्या द्रवाच्या सहाय्याने संकलित करून तो नलिकेमध्ये भरला जातो व त्या नलिकेवरील आकड्यांनुसार नोंद घेतली जाते. ही तपासणी विश्वासार्ह नाही, कारण इतर रोगांमध्येही ही तपासणी असामान्य असू शकते.

*आजारपणातील घ्यावयाची काळजी*

खोकताना तोंडावर हातरूमाल धरणे.

खूप कफ पडत असल्यास एका कपात जंतुनाशक (डेटॉल, सेव्हलॉन, इ.) घालून त्यातच थुंकावे; इतरत्र कुठेही न थुंकणे महत्त्वाचे.

रुग्णाच्या राहण्याची व कामाची जागा हवेशीर ठेवावी

लहान मुलांचा व रुग्णाचा संपर्क टाळणे

घरात इतरांनीही टीबीची काही लक्षणे वाटल्यास वैद्यकीय तपासणी करून घेणे आवश्यक असते.


*उपलब्ध उपचार*


क्षयरोगाचा जागतिक नकाशा

TB incidence.png

क्षयरोगाच्या उपचारासाठी प्रभावी व गुणकारी औषधे उपलब्ध आहेत. दोन, तीन किंवा चार औषधे एकत्रितपणे व कमीत कमी सहा महिने घ्यावी लागतात. रायफामपिसिन, आयसोनिआझिड, पायराझिनामाईड, इथॅमबूटॉल, स्ट्रेप्टोमायसिन ही काही प्रतिजैविक औषधे आहेत मात्र ती डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावीत. उपचारांच्या पहिल्या एक ते दीड महिन्यातच रुग्णाला चांगला गुण येतो. खोकला कमी होतो, वजन वाढू लागते, ताप येणे बंद होते. पण उपचार अर्धवट सोडून देऊ नयेत. असे केल्यास नवीन प्रकारचे क्षयरोगाचे जीवाणू तेथे येतात औषधांना दाद न देणारा, घातक स्वरूपाचा रेझिस्टंट क्षयरोग होतो.


*औषधांचे दुष्परिणाम*

या औषधांचे काही दुष्परिणाम दिसू शकतात. उदा.- सांधेदुखी, हाता-पायांना जळजळ, बधीरता, काविळ, दृष्टीदोष, कमी ऐकू येणे, लघवीस लाल रंग, मळमळ, उलटी इत्यादी. पण सहसा रुग्ण औषधांना सरावतात व फारसे दुष्परिणाम न होता उपचार घेऊ शकतात. पण कुठल्याही दुष्परिणामाची थोडी जरी शक्यता वाटली तरी स्वतःच उपचार बंद करू नयेत. त्वरीत वैद्यकीय सल्ला घेणेच योग्य असते.पण हा रोग बरा होतो


*आजार टाळण्यासाठीची काळजी*

समतोल आहार, नियमित व्यायाम, धूम्रपान टाळणे अशी काही पथ्ये पाळल्यास प्रतिकारशक्ती उत्तम ठेवू शकतो. सार्वजनिक ठिकाणी न थुंकणे, स्वच्छता बाळगणे जरूरीचे असते.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

संकलन -)

गजानन गोपेवाड राज्य समन्वयक महाराष्ट्र राज्य  

उमरखेड जिल्हा - यवतमाळ ४४५२०६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Featured Post

व्यायाम व योगा अवश्य करावा*

*व्यायाम व योगा अवश्य करावा*  *व्यायाम व योगा करण्याचे दहा फायदे:-*  1) व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते: व्यायाम करणारी...