बुधवार, २३ मार्च, २०२२

२३ मार्च शहीद दिन➖➖* 〰️〰️〰️〰️➰➰➰〰️〰️〰️〰️ भगतसिंग, राजगुरू, सुखदेव

 ➰➰➰➰➰➰➰➰➰➰➰

    *➖➖२३ मार्च शहीद दिन➖➖*

〰️〰️〰️〰️➰➰➰〰️〰️〰️〰️

 

भगतसिंग, राजगुरू, सुखदेव हे देशभक्त २३ मार्च १९३१ ला लाहोर तुरूंगात हसत हसत फाशीवर चढले.


आज शहीद स्मृती दिवस... ! 


शहिद भगतसिंग, सुखदेव नि राजगुरू यांचा स्मृतिदिन... ! 


शहिदांना त्रिवार वंदन...!


२३ मार्च १९३१ रोजी या तिघांना फाशी दिले गेले. इंग्रजांचा अधिकारी सँडर्स याच्या हत्येचा आरोप या तिघांवर होता. हे तिघे यांच्या जहाल (इंग्रजांच्या मते) देशभक्ती-देशप्रेम व निधड्या वृत्तीमुळे इंग्रजांना अतिशय डोईजड झालेच होते. संपूर्ण हिंदुस्तानात जहाल क्रांतीची धगधगती मशाल पेटली होती. कुठल्या न कुठल्या आरोपाखाली लवकरात लवकर यांचा बंदोबस्त इंग्रजांनी केलाच असता. हे तिघे व अनेक क्रांतिकारी स्वतंत्र भारताचे स्वप्न पाहत होते. इंग्रजांच्या गुलामीतून तर भारत मुक्त झाला. हजारो वीरांनी आपल्या प्राणांची-घरादाराची आहुती देऊन पारतंत्र्यातला भारत देश गुलामगिरीच्या जोखडातून सोडवून येणाऱ्या पिढीला एक खुशहाल आपला भारत देश, मोकळा श्वास घेण्यासाठी दिला. त्यावेळी इंग्रज हे एकमेव व संपूर्ण हिंदुस्तानाचे शत्रू होते. परंतु ज्या कारणांमुळे इंग्रजांनी आपली पावले इथे रोवली आणि राज्य केले तीच कारणे, अंतर्गत कलह-बंडाळ्य़ा-स्वार्थ मात्र आजही तशीच आहेत. शहीदांना सलाम ठोकले-उगाच दोनचार कार्यक्रम केले (तेही कोणाला आठवण राहिली तरच), यानिमित्ते मिडियासमोर मिरवले "अहो, म्हणून तर केला ना हा दिखावा.. नाहीतर आम्हाला काय घेणं देणं हो.. ते देशासाठी बलिदान वगैरे आम्हाला काही समजत नाही.. आणि गरजही नाही." खरेच आहे ना.


जी गोष्ट आयती ताटात फुकट वाढून मिळते त्याची किंमत नसतेच. इंग्रजांच्या तावडीतून देश स्वतंत्र झाला आणि भ्रष्टाचार- नेतेगिरी-गुंडगिरी यांच्या तावडीत अडकला, अडकतच गेला. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू हे व तमाम क्रांतिकारी फक्त इतिहासाच्या पानातच राहिले. त्यातही काही ठिकाणी चक्क ते आतंकवादी होते असेही म्हटले आहे. इंग्रजांनी आतंकवादी म्हटले तर समजून घेता येईल पण चक्क आपल्यातील काही लोक त्यांना आतंकवादी म्हणतात म्हणजे.. तर कुठे गांधीजींनी या तिघांची फाशी थांबविण्यासाठी प्रयत्न का केले नाहीत हा वाद. परंतु भगतसिंग-राजगुरू-सुखदेव यांच्या विचारसरणीचा, देश स्वतंत्र का व कशातून झाला पाहिजे या दृष्टिकोनाचा कोणीही विचारच करत नाही. समोर दिसणाऱ्या शत्रूशी निदान निकराने व एकमुखाने लढता तरी येते. परंतु या न दिसणाऱ्या व तहहयात पोखरणाऱ्या आपल्यातील स्वार्थाशी-स्वार्थी प्रवृत्तींशी कसे लढायचे? 


आजकाल तर अनेक मुलांना हे क्रांतिकारी माहीत तरी असतील का, अशी शंका येते. पाठ्यपुस्तकातून धडेच्या धडे हा इतिहासच इतिहासजमा करून टाकला जात आहे. उरलासुरला एकमेव मार्गही उखडून टाकला जाताना दिसतो. निदान एखादी लाट यावी तसे ते चार-पाच सिनेमे आले म्हणून तरी बऱ्याच मुलांना यांनी केलेले महान कार्य-त्याग समजला. (दुर्दैव सिनेमे पाहून समजला पण समजला हे जास्त महत्त्वाचे).


फक्त स्वकेंद्रित होऊन जगण्याने आपण सारेच देशाला कुठे घेऊन गेलो आहोत आणि जात आहोत हे पाहिले की भीती वाटते. या सगळ्या वीरांचे बलिदान सार्थकी लागलेय का? याला आपणही जबाबदार आहोतच. मूठभर शोषण करणाऱ्यांना आपण आपले शोषण करू देतो म्हणजे आपणही तितकेच दोषी. भगतसिंग शेजाऱ्याच्या घरी जन्माला यावा आपण मात्र सुखनैव राहावे.. नाही. भगतसिंग आपल्या प्रत्येकाच्या घरी जन्माला यायला हवा.


भारताला स्वातंत्र्य मिळून देण्यासाठी हसत-हसत फासावर गेलेल्या शहीद भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांची आज पुण्यतिथी आहे. २३ मार्च १९३१ला शहीद भगतसिंग, सुखदेव व राजगुरू तिघांनाही लाहोर जेलमध्ये फाशी देण्यात आली होती. आजचा दिवस 'शहिद दिन' म्हणूनही ओळखला जातो.


*भगतसिंग*

भगतसिंग यांचा जन्म १९०७ च्या २८ सप्टेंबर रोजी बंगा येथे झाला. भगतसिंगांच्या जन्माच्या वेळी सरदार किशनसिंग आणि सरदार अजितसिंह यांची जेलमधून सुटका झाली, म्हणून हा मुलगा भाग्यवान आहे असे जाणून आजीने त्याचे नाव भगतसिंग ठेवले. जालियनवाला बागेचे हत्याकांड भगतसिंग यांच्या मनावर खोल परिणाम करून गेले होते. प्रसिद्ध क्रांतिकारक भगवतीचरण हे कॉलेजात भगतसिंगांच्या पुढे २ वर्षे होते तर सुखदेव हे त्यांचे वर्गमित्र होते. वीर सावरकरांचा प्रसिद्ध ग्रंथ 'दि इंडियन वॉर ऑफ इंडिपेन्डेन्स - १८५७' भगतसिंगांना तोंडपाठ होता. घरच्या लोकांनी लग्न ठरवल्यावर त्यांनी घर सोडले. देशसेवेचे व्रत घेतल्यामुळे आपण लग्न करू शकत नाही असे वडिलांना कळवून त्यांनी त्यांची क्षमा मागितली. कानपूरला आल्यावर 'बलवंतसिंग' या नावाने त्यांनी अनेक लेख लिहिले. अनेक धाडसी सत्कार्यात ते सक्रिय होते. लाला लजपत राय यांचा पोलिसांच्या मारहाणीमुळे मृत्यू झाला. त्यांना मारणार्याि स्कॉटचा बदला घेत असताना साँडर्स तावडीत सापडल्याने साँडर्सला उडविण्यात आले. या प्रकरणात सर्वजण फरारी झाले. क्रांतिकारकांचे म्हणणे काय आहे हे जाहीररीत्या सर्वांना समजावे यासाठी त्यांनी एक योजना आखली. 'पब्लिक सेफ्टी' बिलाविरूद्ध देशभर संताप व्यक्त होत होता. या बिलावर सेंट्रल असेंबलीत चर्चा चालू असताना बटुकेश्वर दत्त आणि भगत सिंह यांनी असेंबलीत बाँब फेकून गोंधळ उडवून दिला. स्वतःहून अटक करून घेतली. कोर्टात आपली बाजू प्रभावीपणे मांडली. कोर्टाने भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना फाशीची शिक्षा फर्मावली. २३ मार्च १९३१ ला 'इन्कलाब झिंदाबाद' च्या घोषणा देत ते तिघेही हसत हसत फासावर चढले.


*राजगुरु*

शिवराम हरि राजगुरू यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील खेड (सध्या राजगुरूनगर) येथे १९०८ साली झाला. जालियनवाला बाग हत्याकांडाचे पडसाद त्यांच्या मनावर चांगलेच उमटले होते. अनेक पराक्रम करून त्यांनी क्रांतिकारकांच्या मनात मानाचे स्थान मिळवले होते. लाला लजपतरायांच्या हत्येचा सूड म्हणून त्यांनी साधलेल्या अचूक नेमबाजीमूळे साँडर्स वध घडवून आणलेला होता. पुढे फरारी असताना त्यांना फितुरीमुळे अटक झाली. लाहोर मध्ये झालेल्या खटल्यात त्यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली.


*सुखदेव*

सुखदेव थापर यांचा जन्म लायलपूर मध्ये १५ मार्च १९०७ रोजी झाला. भगतसिंग यांनी असेंम्बलीमध्ये बाँब टाकल्यानंतर सुरू झालेल्या छापेसत्रात लाहोरमध्ये छापे टाकण्यात आले. तेव्हा काश्मिर बिल्डींगमध्ये पडलेल्या छाप्यात काही बाँब जप्त करण्यात आले होते. ते बाँब सुखदेव यांनी तयार केले होते, म्हणून त्यांनाही अटक करण्यात आली. लाहोर कटाच्या पहिल्या खटल्यात १६ आरोपींचा नेता म्हणूनच सुखदेव यांची नोंद करण्यात आली. नवे सदस्य गोळा करून त्यांना क्रांतिदलात समाविष्ट करून त्यांच्या लायकीप्रमाणे काम देण्यात सुखदेव तरबेज होते. लाहोर केसमध्ये त्यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. भगतसिंग, राजगुरू बरोबर सुखदेव देखील २३ मार्च १९३१ ला लाहोर तुरूंगात फाशी गेले.

**************************************

संकलन -)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

शनिवार, १९ मार्च, २०२२

सर आयझॅक न्यूटन🧲*

 *🧲🧲सर आयझॅक न्यूटन🧲🧲*

*एक थोर भौतिकशास्त्रज्ञ,गणितज्ञ व तत्त्वज्ञ*


*स्मृतिदिन - २० मार्च  इ.स. १७२७*


सर आयझॅक न्यूटन (एफ.आर.एस्.) (४ जानेवारी १६४३ - २० मार्च १७२७) हे एक थोर इंग्रज भौतिकशास्त्रज्ञ, गणितज्ञ व तत्त्वज्ञ होते. त्यांनी वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडून केप्लर चे नियम सिद्ध केले.

गतिकीमध्ये त्यांनी न्यूटनचे तीन गतीचे नियम मांडले. त्यांनी परावर्ती दुर्बीण बनवली, व प्रकाशाचे मूलभूत रंगात विघटन करून दाखविले.

गणितामध्ये त्यांनी ग्यॉटफ्रीड लिब्नित्झ याच्याबरोबर कलन ही गणितशाखा विकसीत केली.

बालपण

सर आयझॅक न्यूटन ४ जानेवारी इ.स. १६४३ रोजी इंग्लंडमधील लिंकनशायर काउंटीच्या वूलस्थॉर्प या गावात जन्मले. आयझॅक न्यूटनचे वडील वारल्यानंतर त्यांच्या आईने दुसरे लग्न केल्यामुळे आयझॅक त्याच्या आजीजवळ राहिले. वयाच्या १२ वर्षांपर्यंत आयझॅक जेमतेम दोन वर्षे शाळेत होते. त्यांना गणिताची आवड उत्पन्न होऊ लागली होती. तेवढ्यात त्यांचे सावत्र वडील स्मिथ वारले. आपल्या नूतन बाळाला घेऊन आयझॅकची आई हाना लिंकनशायरला परत आली. तिने आयझॅकला शाळेतून काढून शेताच्या कामाला लावले. एक दिवस दुपारी आयझॅक दमूनभागून झाडाच्या सावलीत बसले होते. मंद वारा वाहत होता. आयझॅकची तीक्ष्ण बुद्धी त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. आयझॅकना वाटले, आपण वार्‍याचा वेग मोजावा. त्यांच्याजवळ वेग मोजायला काही साधन नव्हते. आयझॅकने एकदा वार्‍याच्या दिशेने उडी मारली. जिथे उडी पडली तिथे एक दगड ठेवला. मग जरा वेळाने वार्‍याच्या उलट दिशेने उडी मारली व त्या उडीच्या जागी दगड ठेवला. या दोन दगडांतील अंतर एका दोरीच्या साह्याने आयझॅक मोजत असताना त्यांचे मामा, विल्यम आयस्कॉफ शेतावर आले. विल्यम आयस्कॉफ केंब्रीजमध्ये ट्रिनिटी कॉलेजमध्ये व्यवस्थापक होते. त्यांनी विचारले, "हे तू काय करतोस?"

आयझॅक म्हणाले, "मी वार्‍याचा वेग मोजतो आहे". या उत्तराने मामा अवाक झाले. त्यांना आयझॅकची तीव्र असामान्य बुद्धी कळली. घरी जाऊन त्यांनी हानाला आयझॅकला शाळेत घालायला सांगितले. १६६१ मध्ये आयझॅक ट्रिनिटी कॉलेजमध्ये दाखल झाले. त्यांचा गुरुत्वाकर्षणाचा शोध सर्वांनाच माहीत आहे. १६६८ मध्ये त्यांनी ६ इंच लांब, एक इंच रुंद दुर्बीण शोधून काढली. आजही लंडन म्युझियममध्ये ही दुर्बीण आहे. ३१ मार्च इ.स. १७२७ ला त्यांचा मृत्यू झाला.

न्यूटनचे गती-नियम

प्रथम नियम

कोणतीही स्थिर अथवा स्थिर गतीतील वस्तु बाह्य बला शिवाय आपल्याच मूळ स्थितीत राहते.

द्वितीय नियम

कोणत्याही वस्तुच्या संवेगाच्या बदलाचा दर हा त्या वस्तूवरील बलाच्या प्रमाणात असतो.

तृतीय नियम

कोणत्याही वस्तूवरील क्रिया व प्रतिक्रिया समान व विरुद्ध दिशेने असतात.

🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

संकलन -)

गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

मारियो जे. मोलिना🧫🧫* 🧪🧪🧪🧪🧪🧪🧪🧪🧪🧪🧪 *मेक्सिकन रसायनशास्त्रज्ञ*

 *🧫🧫   मारियो जे. मोलिना🧫🧫*

🧪🧪🧪🧪🧪🧪🧪🧪🧪🧪🧪

*मेक्सिकन रसायनशास्त्रज्ञ*

⚗️⚗️⚗️⚗️⚗️⚗️⚗️⚗️⚗️⚗️⚗️

    *जन्म: १९ मार्च १९४३*

 

मारियो जे. मोलिना (स्पॅनिश: Mario José Molina-Pasquel Henríquez;

 जन्म: १९ मार्च १९४३) हा एक मेक्सिकन रसायनशास्त्रज्ञ आहे. पृथ्वीच्या वातावरणामधील अंटार्क्टिकावर पडलेले मोठे छिद्र शोधुन काढण्यासाठी त्याला पॉल जे. क्रुट्झन व फ्रँक शेरवूड रोलंड ह्या शास्त्रज्ञांच्या समवेत १९९५ सालचे रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले. नोबेल पारितोषिक मिळवणारा तो पहिला मेक्सिकन व्यक्ती आहे.   


🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

संकलन -)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

शुक्रवार, १८ मार्च, २०२२

*ज्ञान-विज्ञान* 🌎 ═════════════ 📙 *बेटांची श्रुंखला*


════════════

   @ संकलन @

  *श्री. गजानन गोपेवाड 

═════════════

            🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

═════════════ 

📙 *बेटांची श्रुंखला* 

*******************

बेट म्हणजे मुख्य जमिनीपासून समुद्रामुळे बाजूला पडलेले भूभाग. मुख्य जमिनी म्हणजे प्रमुख खंडे. भारताची बेटे म्हणजे अंदमान व निकोबार. पण अंदमान किंवा निकोबार बेटे म्हणजे बेटांची एक श्रुंखला आहेत. काही प्रमुख बेटांवर वस्ती आहे, तर काही बेटे तशीच ओसाड आहेत. जगाच्या पाठीवर जवळपास हाच प्रकार आढळतो. बहुतेक ठिकाणी अशा श्रृंखला आढळतात. मग त्या भर समुद्रात असतील किंवा एखाद्या प्रमुख भूखंडाच्या जवळपास असतील. असे का व्हावे ?


 याकरता थेट पुरातन काळाकडे वळावे लागते. पृथ्वीची मध्यभागापासून पृष्ठभागापर्यंतची विभागणी कोअर, मँटल व क्रस्ट अशा तीन आवरणात होते. सर्वसाधारणपणे क्रस्टची म्हणजे भूकवचाची जाडी बत्तीस ते पन्नास किलोमीटर असते. पण हीच जाडी समुद्रातळाशी जेमतेम तीन ते पाच किलोमीटर इतकी कमी होते. पृथ्वीचे मँटल किंवा मध्यावरण हे अतितप्त असते. येथील आण्विक घटकांचे विभाजन काही वेळा सुरू होते, तेव्हा समुद्रतळाशी असलेले भूकवच फोडून आतील तप्त लाव्हा बाहेर पडतो. पृथ्वीचा गाभा हा त्याहूनही तप्त असला, तरी तो प्रचंड गुरुत्वाकर्षणाच्या दाबाखाली अाकसलेला आहे. संपूर्ण पृथ्वीच्या भूकवचावर समुद्रातळाशी किमान एकशेवीस ठिकाणी अशी अतितप्त ठिकाणे भूगर्भशास्त्रज्ञांनी माहीत करून शोधून ठेवली आहेत.


 खोल समुद्राच्या पोटात या अतितप्त ठिकाणी जेव्हा ज्वालामुखीचा लाव्हा उफाळून बाहेर पडू लागतो, तेव्हा तो अर्थातच थंड होऊन त्याची शिला बनू लागते. या प्रचंड शिलाखंडाचेच बेट बनते. असे हे नवनिर्मित बेट जेव्हा पाण्यावर दिसू लागते आणि पसरते, तेव्हा भूकवचाची जाडी वाढत जाते. समुद्रतळाशी असलेल्या अतितप्त ठिकाणाची गडबड मात्र थांबलेली नसते. ज्वालामुखी पूर्ण थंडावलेला नसतो. पण वरच्या तोंडावर मात्र भले मोठे झाकण बसून ते बंद झालेले असते. या सगळ्यांची गोळाबेरीज म्हणून समुद्रतळाशी असलेल्या भूकवचाची थोडीशी हालचाल होऊ लागते. ते पुढे सरकते. म्हणजेच नवीन बेटे तयार झालेला भाग पुढे गेल्यावर पुन्हा एकदा ज्वालामुखीचा उद्रेक सुरू होतो. या ठिकाणी पुन्हा एखादे बेट तयार होते, पण जोवर अंतर्भागाचा उद्रेक थंड होत नाही, तोवर ही प्रक्रिया चालूच राहते. आता आपण जी प्रक्रिया पाहिली, ही सर्वसाधारणपणे हजारो वर्षांच्या कालावधीत घडते व बेटांमधील अंतर पंचवीस ते पंचवीसशे किलोमीटर इतके असू शकते. अशा प्रकारच्या बेटमालिका वा बेटांच्या श्रृंखला जगाच्या पाठीवर अनेक ठिकाणी सापडतात.


एक विरोधाभासही यातील काही ठिकाणी सापडतो. समुद्राच्या खोलवर भागांतील बेटांचा पृष्ठभाग कंच हिरवागार असतो. पण क्वचित तेथेच एखादे ज्वालामुखीचे तोंड (क्रेटर) धूर ओकत असते.


विविध बेटांचा माणसाने काय उपयोग केला ? एकांडे शिलेदार तेथे वस्तीला गेले. काही ठिकाणी गुन्हेगारांना शिक्षा म्हणून पाठवले गेले. मोक्याच्या ठिकाणी बेटांवर लष्करी ठाणी वसवली जाऊन आसपासच्या चार पाचशे किलोमीटरवर देखरेख ठेवायला उपयोग केला गेला. ज्या बेटांवर मुबलक पाणी उपलब्ध झाले तेथील वस्तीच वाढत गेली. छोटे देश म्हणून ही बेटे उदयाला आली आहेत. मालदीव, मॉरिशस ही अशी काही उदाहरणे तर दिएगो गाॅर्सिया हे दक्षिण हिंदी महासागरातील एकमेव बेट लष्करीदृष्ट्या फार मोक्याचे ठरले आहे. साखलीन बेटमालिका ही पॅसिफिकमधील लष्करीदृष्ट्या महत्त्वाची बेटमालिका आहे.


*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*

════════════

*ज्ञान-विज्ञान* 🌎 ═════════════ 📙 *बिग बँग / महास्फोट*


═════════════

   @ संकलन @

  *श्री. गजानन 

═════════════

            🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

═════════════

📙 *बिग बँग / महास्फोट* 📙 

*******************


जॉर्ज एडवर्ड लेमेत्रे या बेल्जियन अॅस्ट्रोफिजिसिस्टकडे बिग बँग वा महास्फोटाची कल्पना मांडण्याचे पितृत्व जाते. १८९४ साली जन्मलेल्या या शास्त्रज्ञांनी १९२७ मध्ये ही कल्पना मांडली. या कल्पनेबद्दल विविध विचार त्यांनंतर तब्बल १० वर्षे मांडले जात होते.


'साऱ्या विश्वाची उत्पत्ती एका महास्फोटामध्ये अंदाजे वीस अब्ज वर्षांपूर्वी झाली असून सर्व विश्वात सध्या विखुरलेले मूलकण एका अंडाकृती आकारात होते. त्यांचा अचानक महाप्रचंड स्फोट झाला. या स्फोटामुळे एकत्र असलेले मूलकण विलक्षण वेगाने, विलक्षण तप्तावस्थेत चहूकडे भिरकावले गेले. जसजसा यानंतरचा काळ लोटत गेला, तसतसे हे मूलकण हळूहळू गार होत गेले. त्यातूनच प्रथम विविध तारकासमूह निर्माण होत गेले. आपली आकाशगंगा ही या अनेकांतील एक. त्यानंतर आजही विश्व पसरतच असून ही क्रिया अव्याहत चालू राहणार आहे.' महास्फोटाची कल्पना थोडक्यात अशी मांडली गेली.


ही कल्पना मांडली गेल्यानंतर त्यावर विविध मते मांडली जाणे ओघानेच आले. काहींना ही कल्पनाच पूर्णत: विसंगत वाटत होती, तर काहींच्या मते ठरावीक कालांतराने विश्व आकुंचन पावून पुन्हा एकदा महास्फोट होण्याची प्रक्रिया सतत चालू राहणार होती. याशिवाय विश्व हे उत्पत्तीनंतर पसरत नसून एका 'कायमस्थिती'त असल्याचीही एक उपपत्ती जोरदारपणे मांडली जात होती. निरीक्षणे व सिद्धांत या दोन्हींच्या आधारावर ही चर्चा तब्बल तीस वर्षे चालू होती.


 यानंतरच्या अवकाश निरीक्षण व रेडिओलहरींच्या ग्रहणानंतर विश्व अफाटपणे पसरत आहे, हे लक्षात येत आहे. डॉपलर इफेक्ट म्हणजे दृश्य प्रकाशाच्या वर्णपटातल्या रेषा लाल / निळ्या टोकाकडे सरकलेल्या दिसतात. याचाही पडताळा आता मिळत आहे. अनेक आकाशगंगा लालसर रंगाचा प्रकाशलहरींचे तरंग पाठवत असल्याने विश्व पसरतच आहे, याची खात्री पटत आहे.


 संपूर्ण विश्वात पसरलेल्या अणूंची एका घनमीटरमध्ये असलेली संख्या हाही एक अभ्यासाचा व निष्कर्षांचा भाग मानला गेला आहे. अलीकडेच झालेल्या एका निरीक्षणात ही घनता जेमतेम एक अणू एका घनमीटरमध्ये एवढीच आहे; पण याहून जास्त अदृश्य पदार्थ अस्तित्वात असावेत.


 महास्फोटानंतरच्या पहिल्या काही मिनिटांतच विश्वात पसरलेल्या मूलकणांतून हेलियमचे अणू निर्माण झाले होते, हे गणित प्रथम १९४६ साली जॉर्ज गॅमी यांनी मांडले. आज विश्वात व आपल्या आकाशगंगेतील ग्रहांभोवती असलेल्या हेलियमचे प्रमाण २३ टक्के व अन्य मुलकणांचे ७७ टक्के (यात बव्हंशी हायड्रोजन) आढळते. यावरूनही महास्फोटाची कल्पना ग्राह्य मानावी लागते.


 महास्फोटानंतरच्या क्षणात प्रचंड प्रमाणात (रेडिएशन) होते व त्याचे तापमान अब्जाहून जास्त होते. प्रसरणामुळे थंडावत जाऊन आज त्याची ऊर्जा कमी झाली व तापमानही पुष्कळ कमी झाले असणारच, असा तर्क राल्फ अाल्फर व रॉबर्ट हर्मन या गॅमाँच्या सहकाऱ्यांनी १९४८ मध्ये मांडला होता. त्याची पुष्टी १९६५ मध्ये आर्नो पेंझियस व रॉबर्ट विल्सन या शास्त्रज्ञांना सापडलेल्या सूक्ष्म तरंगांच्या पार्श्वभूमीतून झाली, असा महास्फोट सिद्धांताच्या समर्थकांचा दावा आहे. या तरंगांचे तापमान शून्याखाली २७० अंश सेंटीग्रेड इतके कमी आहे.


*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*

🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎 ═════════════ 🌳 *बोन्साय* 🌳


═════════════

   @ संकलन @

  *श्री. गजानन गोपेवाड 

═════════════

            🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

═════════════

🌳 *बोन्साय* 🌳 

*****************

जपानी माणूस निसर्गप्रिय आहे. साराच निसर्ग घराच्या भिंतीत, आपल्या बागेत साठवता आला, तर या हट्टाने बोन्सायची निर्मिती जपानी कल्पकतेने केली गेली आहे. अनेक जातींची झाडे, वृक्ष, फळझाडे ही छोट्याशा कुंडीत लहान आकार कायम राखत विशिष्ट पद्धतीने जोपासायची, त्यांचे सर्व गुणधर्म मात्र कायम राखायचे अशा तंत्रातून निर्माण झालेल्या झाडाला 'बोन्साय' म्हणतात.


वडाचे झाड जेमतेम फूटभर उंचीचे, पण त्याच्या फांद्यांना पारंब्या फुटलेल्या, संत्र्याचे झाड वीतभर उंचीचे, पण त्याला लिंबासारख्या आकाराची संत्री लागलेली, तीही संत्र्याच्या चवीची... असा प्रकार बोन्साय पद्धतीत घडवला जातो.


अशा पद्धतीत विविध झाडे तयार करणे हे अत्यंत कौशल्याचे, चिकाटीचे व वनस्पतीशास्त्राची परिपूर्ण जाण असणारे काम आहे. झाडांना पुरेशी पोषण द्रव्ये देताना त्यांची वाढ मात्र कुंठीत ठेवायची, याचे तंत्र म्हणजे बोन्साय. केवळ वाढणार्‍या फांद्या छाटून बोन्साय कधीही तयार होत नाही. विशेषत: झाडाला आलेली फळे परिपूर्ण चवीची असणे हा त्यातील एक क्लिष्ट भाग ठरतो.


 बोन्साय तयार करण्याची पद्धत दिसायला साधीशीच आहे. प्रत्येक झाडाला दोन प्रकारची मुळे असतात. लांबवर जाणारी, खोल अन्नाच्या शोधात जमिनीत रोवणारी सोटमुळे व केशसंभासारखी तंतूमुळे. तंतूमुळे ही पाणी शोषून घेणे, जमिनीच्या आसपासची पृष्ठभागातील विविध रसायने गोळा करणे या कामात गुंतलेली असतात. त्यांचा झाडाला आधार देणे, वाढीला भक्कम पाठबळ देणे यात सहभाग नसतो. बोन्साय करताना मुख्य मुळे तारांनी बांधणे, वेळच्या वेळी त्यांना छाटणे, त्यांची वाढ न होऊ देणे यावर लक्ष्य केंद्रित केले जाते. ठराविक दिवसांनी ही प्रक्रिया करत राहिल्यास झाडाची वाढ खुंटते, पण झाडाचे मूळ स्वरूप कायम राहते. अर्थातच बोन्साय झाडांच्या कुंडय़ा यासाठी ठरावीक महिन्यांनी बदलत गेल्यावरच हे शक्य होते.


 बोन्सायचे कौतुक करणारी जशी मंडळी आहेत तशीच त्याला नावे ठेवणारी विरोधक मंडळीही आहेत. निसर्गाला स्वतःच्या मुठीत पकडण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे, असे विरोधकांचे मत पडते. याउलट साराच निसर्ग माझ्या दिवाणखान्यात मी कसा मांडला आहे, असे बोन्सायचे कौतुक करणारी मंडळी म्हणतात.


एखाद्या प्रसिद्ध नावाजलेल्या व्यक्तीच्या छायेत कायम दुय्यम भूमिकेत वावरणाऱ्या मंडळींना आपण बोलीभाषेत 'बोन्साय' म्हणूनच संबोधतो, ते का, हे आता कळले ना ?


*'सृष्टी विज्ञानगाथा' या 

बुधवार, १६ मार्च, २०२२

🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎 ════════════ 📙 *बिग बँग / महास्फोट


═══════════

   @ संकलन @

  *श्री. गजानन गोपेवाड 

═════════════

            🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

════════════  

📙 *बिग बँग / महास्फोट* 📙 

*******************


जॉर्ज एडवर्ड लेमेत्रे या बेल्जियन अॅस्ट्रोफिजिसिस्टकडे बिग बँग वा महास्फोटाची कल्पना मांडण्याचे पितृत्व जाते. १८९४ साली जन्मलेल्या या शास्त्रज्ञांनी १९२७ मध्ये ही कल्पना मांडली. या कल्पनेबद्दल विविध विचार त्यांनंतर तब्बल १० वर्षे मांडले जात होते.


'साऱ्या विश्वाची उत्पत्ती एका महास्फोटामध्ये अंदाजे वीस अब्ज वर्षांपूर्वी झाली असून सर्व विश्वात सध्या विखुरलेले मूलकण एका अंडाकृती आकारात होते. त्यांचा अचानक महाप्रचंड स्फोट झाला. या स्फोटामुळे एकत्र असलेले मूलकण विलक्षण वेगाने, विलक्षण तप्तावस्थेत चहूकडे भिरकावले गेले. जसजसा यानंतरचा काळ लोटत गेला, तसतसे हे मूलकण हळूहळू गार होत गेले. त्यातूनच प्रथम विविध तारकासमूह निर्माण होत गेले. आपली आकाशगंगा ही या अनेकांतील एक. त्यानंतर आजही विश्व पसरतच असून ही क्रिया अव्याहत चालू राहणार आहे.' महास्फोटाची कल्पना थोडक्यात अशी मांडली गेली.


ही कल्पना मांडली गेल्यानंतर त्यावर विविध मते मांडली जाणे ओघानेच आले. काहींना ही कल्पनाच पूर्णत: विसंगत वाटत होती, तर काहींच्या मते ठरावीक कालांतराने विश्व आकुंचन पावून पुन्हा एकदा महास्फोट होण्याची प्रक्रिया सतत चालू राहणार होती. याशिवाय विश्व हे उत्पत्तीनंतर पसरत नसून एका 'कायमस्थिती'त असल्याचीही एक उपपत्ती जोरदारपणे मांडली जात होती. निरीक्षणे व सिद्धांत या दोन्हींच्या आधारावर ही चर्चा तब्बल तीस वर्षे चालू होती.


 यानंतरच्या अवकाश निरीक्षण व रेडिओलहरींच्या ग्रहणानंतर विश्व अफाटपणे पसरत आहे, हे लक्षात येत आहे. डॉपलर इफेक्ट म्हणजे दृश्य प्रकाशाच्या वर्णपटातल्या रेषा लाल / निळ्या टोकाकडे सरकलेल्या दिसतात. याचाही पडताळा आता मिळत आहे. अनेक आकाशगंगा लालसर रंगाचा प्रकाशलहरींचे तरंग पाठवत असल्याने विश्व पसरतच आहे, याची खात्री पटत आहे.


 संपूर्ण विश्वात पसरलेल्या अणूंची एका घनमीटरमध्ये असलेली संख्या हाही एक अभ्यासाचा व निष्कर्षांचा भाग मानला गेला आहे. अलीकडेच झालेल्या एका निरीक्षणात ही घनता जेमतेम एक अणू एका घनमीटरमध्ये एवढीच आहे; पण याहून जास्त अदृश्य पदार्थ अस्तित्वात असावेत.


 महास्फोटानंतरच्या पहिल्या काही मिनिटांतच विश्वात पसरलेल्या मूलकणांतून हेलियमचे अणू निर्माण झाले होते, हे गणित प्रथम १९४६ साली जॉर्ज गॅमी यांनी मांडले. आज विश्वात व आपल्या आकाशगंगेतील ग्रहांभोवती असलेल्या हेलियमचे प्रमाण २३ टक्के व अन्य मुलकणांचे ७७ टक्के (यात बव्हंशी हायड्रोजन) आढळते. यावरूनही महास्फोटाची कल्पना ग्राह्य मानावी लागते.


 महास्फोटानंतरच्या क्षणात प्रचंड प्रमाणात (रेडिएशन) होते व त्याचे तापमान अब्जाहून जास्त होते. प्रसरणामुळे थंडावत जाऊन आज त्याची ऊर्जा कमी झाली व तापमानही पुष्कळ कमी झाले असणारच, असा तर्क राल्फ अाल्फर व रॉबर्ट हर्मन या गॅमाँच्या सहकाऱ्यांनी १९४८ मध्ये मांडला होता. त्याची पुष्टी १९६५ मध्ये आर्नो पेंझियस व रॉबर्ट विल्सन या शास्त्रज्ञांना सापडलेल्या सूक्ष्म तरंगांच्या पार्श्वभूमीतून झाली, असा महास्फोट सिद्धांताच्या समर्थकांचा दावा आहे. या तरंगांचे तापमान शून्याखाली २७० अंश सेंटीग्रेड इतके कमी आहे.


*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*

═════════════

गेऑर्ग झिमॉन ओम* *जर्मन भौतिकशास्त्रज्ञ, गणितज्ञ* *जन्मदिन - मार्च १६, इ.स. १७८९*

 *गेऑर्ग झिमॉन ओम*


*जर्मन भौतिकशास्त्रज्ञ, गणितज्ञ*


*जन्मदिन - मार्च १६, इ.स. १७८९*


गेऑर्ग झिमॉन ओम[१] (: जॉर्ज सायमन ओह्म ; जर्मन: Georg Simon Ohm) (मार्च १६, इ.स. १७८९ - जुलै ६, इ.स. १८५४) हा बव्हेरियन-जर्मन भौतिकशास्त्रज्ञ, गणितज्ञ होता. याने शाळेत शिक्षकी पेशा करताना अलेस्सांद्रो व्होल्टा या इटालियन आविष्कारकाने बनवलेल्या विद्युतरासायनिक घटावर अधिक संशोधन करण्यास आरंभ केला. या संशोधनातून घडवलेल्या स्वनिर्मित उपकरणाद्वारे याने संवाहकाच्या दोन टोकांतील विभवांतर आणि संवाहकातून वाहणारी विद्युतधारा यांच्यामधील परस्परसंबंध सिद्ध केला. हा संबंध "ओमचा नियम" म्हणून प्रसिद्ध आहे.

ओमचा नियम

संवाहकाच्या दोन टोकांत वाहणारी विद्युतधारा, त्या दोन टोकांमधील विभवांतराच्या समानुपाती असते.

संकलन )- गजानन गोपेवाड 



🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎 ═══════════ 📙 *मध*


═════════════

   @ संकलन @

  गजानन गोपेवाड 

═════════════

            🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

═══════════ 

📙 *मध* 

**************

मधाचा वापर कित्येक शतके केला जात आहे. गोडासाठी, औषधासाठी मध वापरला जातो. मध मधमाशा बनवतात, साठवतात त्या मुख्यत: त्यांच्या लहानग्यांसाठी. कडाक्याच्या थंडीत जेव्हा फुलेच नसतात, तेव्हा त्यांना मधाचा उपयोग होतो. खरे म्हणजे मध ही मधमाशांनी स्वतःकरता अडचणीच्या काळात वापरण्यासाठी निर्मिलेली वस्तू आहे. पण अन्य अनेक प्राणी त्याचा स्वतःकरता हुशारीने वापर करतात.


 मध तयार कसा होतो, ते बघणे फार गमतीचे आहे. आपली कल्पना अशी असते की, मध फुलात असतो व तो गोळा करण्याचे काम फक्त मधमाशा करतात. फुलात जो मध असतो, त्याला टिकाऊ स्वरूप नसते. त्यात पाणी भरपूर असते. त्यातील साखरेचे स्वरूप वेगवेगळे असते. म्हणजे प्रत्येक फुलातील मधाची चव सातत्याने तीच असेल असे नव्हे. असा हा फुलातील मध (Nectar) मधमाशी गोळा करते. तेथून ही मधमाशी पोळ्याकडे परतते. येथे पोळ्यातील कामकरी माशी येणाऱ्या माशीच्या स्वागताला बाहेर डोकावते. तिच्याकडून आणलेला मध स्वतःच्या तोंडात घेते. मध साठवण्याची एक वेगळी छोटीशी ग्रंथी तिच्या शरीरात असते. मधाचे पोट असेच म्हणा ना. या पोटात मध गेला की त्याचे एका वितंचकाकडून पचन सुरू होते. अल्पकाळात पचन झालेल्या मधामध्ये असलेल्या विविध साखरेपासून फक्त एक प्रकारची साखर तयार झालेली असते. यापुढचे काम तसे किरकोळ असते. मधाच्या पोटातून हा मधाचा थेंब जिभेवर आणून त्याला हवेवर वाळवायचा म्हणजे नको असलेले पाणी हवेत जिरून जाते. ही क्रिया पोळ्याच्या अंगभूत उष्णतेमुळे झटकन पार पडते. आता आपल्याला ज्ञात असलेला घट्ट मद्य तयार झालेला असतो. पोळ्याच्या षटकोनी रचनेतील एका कोनाड्यात मग या मधाची साठवण होते. कोनाडा भरला गेला की, त्याला हलकेच पातळसर मेणाचे सील केले जाते. हे मेण मधमाशीच्या अंगातून स्रवते. त्यामुळे हा तयार मध टिकण्याचा, वाहून जाण्याचा, वाळवण्याचा प्रश्न उद्भवतच नाही. ज्याप्रमाणे कोनाडे भरत जातील, त्याप्रमाणे पोळ्याचा आकार वाढू लागतो. एखाद्या वसंत ऋतूत मध्यम आकाराचे पोळे सहज पंधरा ते वीस किलो इतका मध साठवू शकते. मधाचा बाजारभाव बघितला, तर या मधमाश्यांनी केलेल्या अफाट मेहनतीची कल्पना येईल.


 असा हा तयार मध ज्या जंगलात असेल, तेथील फुलांच्या जातीप्रमाणे विशिष्ट चव व गंधांचा बनतो. जांभूळ, कारवी, मोह, आंबा यांपासून मिळालेला मध खास चवीचा असतो. जाणकार त्यातील फरक सहज सांगू शकतात. अस्वले, माकडे, पांडा यांना मध आवडतो. पोळ्यावर हल्ला करून त्यातील मध खाणेही त्यांना जमते. याउलट तरस, कोल्हा, खारी पोळे चुकूनमाकून खाली जमिनीवर पडले तरच त्याचा फडशा पाडतात. मधाच्या जोडीला पूर्ण पोळ्याचाही पोटभरीसारखा उपयोग हे प्राणी करतात. माणूस प्रथम मधमाशा हाकलतो वा मारतो, मग मध काढतो व शेवटी त्या पोळ्यातून मेणही काढून घेतो.


 मधमाशापालन करणारे ठरावीक काळाने फक्त पोळे काढून त्यातील मध सेंट्रीफ्युगल पद्धतीने फिरवून काढून घेतात. कोरड्या झालेल्या पोळ्यात साखरेची पेरणी करून पोळे जागेवर ठेवले जाते. मधमाशा उपाशी राहू नयेत, म्हणून साखरेची गरज असते.


 मध घातलेला चहा छान लागतो. पोळीवर मध तर उत्तमच लागतो. मधाचा उपयोग औषध घेण्यासाठी अनुपान म्हणून म्हणजे औषधी गोळीचा परिणाम जास्त चांगला व्हावा म्हणूनही केला जातो. आयुर्वेदीय औषधी देण्यासाठी वैद्य नेहमीच मधाचा वापर सांगतात.


 मधुमेह नसेल, तर एक चमचा मध व एक चमचा लोणी रोज सकाळी घेतल्यास तब्येत उत्तम राखली जाते, असाही एक समज आहे. दोन्ही पोषक द्रव्ये लक्षात घेतली तर नक्कीच त्यात तथ्य असावे.


*'सृष्टी विज्ञानगाथा' या 

गाथा बलिदानाची* 🇮🇳🇮🇳 ➿➿➿➿➿➿➿➿➿➿ *विठ्ठल सखाराम पागे* (स्वातंत्र्य सैनिक व रोजगार हमी योजनेचे जनक) गाथा बलिदानाची* 🇮🇳🇮🇳 ➿➿➿➿➿➿➿➿➿➿ *विठ्ठल सखाराम पागे* (स्वातंत्र्य सैनिक व रोजगार हमी योजनेचे जनक)

 ➿➿➿➿➿➿➿➿➿➿

*🇮🇳🇮🇳गाथा बलिदानाची* 🇮🇳🇮🇳

➿➿➿➿➿➿➿➿➿➿ 

            *विठ्ठल सखाराम पागे*                                                                  (स्वातंत्र्य सैनिक व रोजगार हमी योजनेचे जनक)                        

          

         *जन्म : २१ जुलै १९१०*

         (वाळवा, सांगली, महाराष्ट्र)

          *मृत्यू : १६ मार्च १९९०*


 शिक्षण : B.A.LLB                                                   


      ग्रामीण भागातील ‘रोजगार निर्मिती’ या क्षेत्रात देशातील इतर राज्यांना आदर्शकृत ठरलेल्या महाराष्ट्राच्या रोजगार हमी योजनेचे जनक आणि महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापतिपद अठरा वर्षे सांभाळणारे ज्येष्ठ गांधीवादी नेते, स्वातंत्र्यसैनिक, तत्त्वचिंतक विठ्ठल सखाराम तथा वि. स. पागे यांचा १६ मार्च हा स्मृतिदिन. श्री पागे यांच्या अभ्यासू व्यक्तिमत्त्वाला अनेक पैलू होते.


वकील, समाजसेवक, राजकारणी, लोकप्रतिनिधी, चिंतक, अर्थव्यवस्थेचे अभ्यासक आणि विश्लेषण करून उपाय सुचविणारे प्रशासक अशी त्यांची अनेक रूपे होती. त्याशिवाय संत वाङ्मयाचा आणि संस्कृताचा गाढा अभ्यास हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वेगळेच वैशिष्टय़ होते. अठरा वर्षे विधान परिषदेचे सभापतिपद सांभाळणे आणि तेही कोणत्याही अपवादाचा किंवा प्रवादाचा विषय न होता सांभाळणे ही कामगिरी फार थोडय़ा लोकांना जमू शकते. विशेषत: वै. पागे यांच्या कारकीर्दीत अनेक मातब्बर नेते सभागृहाचे सदस्य होते. विधिमंडळाच्या कामकाजाच्या नियमांचा अतिशय सूक्ष्म अभ्यास करून सरकारला कचाटय़ात पकडणारे जागरूक नेते विरोधी पक्षांमध्ये होते. अशावेळी कै. पागे अतिशय शांतपणे, कायदे आणि नियमांचा अर्थ लावून सुस्पष्ट निर्णय देत, की तो आपोआपच सर्वाना मान्य ठरत असे. परंतु त्यांच्या विधिमंडळातील कारकीर्दीपेक्षाही त्यांची आठवण महाराष्ट्राला व देशाला राहील ती ‘रोजगार हमी योजने’चे जनक म्हणूनच.

‘रोजगार हमी योजनेचा’ कायदा तयार करून सरकारला सादर करून त्यांची अंमलबजावणी करायला लावणे. तिच्या प्रगतीचा आढावा घेणे आणि कालानुरूप तिच्यात बदल सुचविणे ही सारी कामे कै. पागे यांनी केली. एखाद्या राज्याच्या विकासकार्यात इतक्या महत्त्वाच्या प्रश्नासाठी एखाद्या नेत्याने एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर कार्य केल्याचे दुसरे उदाहरण क्वचितच असेल. अकुशल ग्रामीण बेरोजगारांना स्वत:च्या परिसरामध्ये रोजगार प्राप्त करून देणारी ही योजना कोटय़वधी बेरोजगारांना अक्षरश: वरदानच ठरली आहे. या योजनेमुळे शहरांकडे जाणाऱ्या लोंढय़ांचे स्थलांतराचे प्रमाण नि:संशयपणे कमी झाले आहे. १९६९ साली कै. श्री. पागे यांच्या सांगली जिल्ह्य़ातील विसापूर गावी सदर योजना प्रथम सुरू झाली व नंतर व्यापक प्रमाणावर राबविण्यात आली.

सदर योजनेचा गौरव संयुक्त राष्ट्रसंघात करण्यात आला आहे. काही मागास आफ्रिकन देशांमध्ये ही योजना संयुक्त राष्ट्रसंघातर्फे राबविण्यात येत आहे. पंतप्रधान मनमोहनसिंग यांना त्यांची उपयुक्तता पटली व सदर योजनेबाबत कायदा संसदेमध्ये संमत करून त्यांची देशभर तातडीने अंमलबजावणी करण्यात आली आहे. सदर योजनेमध्ये ग्रामीण बेरोजगारी हटविण्याची क्षमता असल्याने दरवर्षी अंदाजपत्रकामध्ये वाढीव तरतूद भारत सरकारतर्फे करण्यात येत आहे.

महाराष्ट्राला आणि देशाला दिशा दाखविणारे कै. श्री. पागे हे अभ्यासू चिंतक होते. विधिमंडळाबद्दल त्यांनी काही विचार व्यक्त केले आहेत. शैक्षणिक, सांस्कृतिक, समाजकल्याण विषयक बाबी संबंधीची विधेयके विधान परिषदेत मांडून विधानसभेच्या कामाचा व्याप कमी करता येईल असे त्यांनी सुचविले होते.

अध्यात्म, संतवाङमय आणि संसदी परंपरा हे त्यांचे जिव्हाळ्याचे विषय होते. त्यावर बोलताना वि. स. पागे रंगून जात असत. त्यांच्या निवेदनात रसाळपण तर असेच पण या विषयांचा गाढ अभ्यासही जाणवत असे. संस्कृत भाषेचा त्यांचा व्यासंगही दांडगा होता. त्याचे प्रत्यंतर त्यांच्या भाषणांमधून सतत जाणवत असे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाप्रमाणे त्यांच्या भाषेलाही संस्कृतच्या सहवासामुळे एक अभिजात भारदस्तपणा प्राप्त झालेला होता.

कै. वि. स. पागे हे उत्तम दर्जाचे कवी. नाटककार होते. १९३२-३३ च्या सुमारास त्यांनी ‘वीर मोहन’ नावाचे नाटक लिहिले होते. ‘निवडणुकीचा नारळ’ नावाची नाटिका लिहिली होती. त्याचप्रमाणे ‘पहाटेची नौबत’ आणि ‘अमरपक्षी’ या नावाचे त्यांचे दोन काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले आहेत.

‘तुका म्हणे जाऊ वैकुंठा चालत’ हे त्यांनी लिहिलेले सुंदर संगीत नाटक, ज्येष्ठ अभिनेते दिग्दर्शक कै. श्री. दाजी भाटवडेकर हे या नाटकाचे दिग्दर्शक होते. तसेच संत तुकारामांची प्रमुख भूमिकाही त्यांनीच साकारली होती. सामान्यातून साधुत्वापर्यंतचा संत तुकारामांचा प्रवास सदर नाटकामध्ये सादर केला आहे.

खऱ्या अर्थाने विवेकानंदांच्या कर्मयोग, भक्तियोग आणि ज्ञानयोग यांचा त्रिवेणी संगम जीवनात असलेल्या कै. वि. स. पागे यांची स्मृती जतन करण्यासाठी, त्यांच्या व्यापक व व्यासंगी विचारांचा अभ्यास होण्यासाठी शासनाकडून समाजातील विचारवंतांच्या, अभ्यासकांचा सहकार्यातून योग्य ते स्मारक व्हावे ही अपेक्षा.

                                                                                                                                  🇮🇳🇮🇳🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳🇮🇳🇮🇳    

🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

 संकलन -)गजानन गोपेवाड  

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

सुप्राभात दर्शन

 🌳⛳ *शुभ प्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

फाल्गुन मास,शुक्ल पक्ष,*त्रियोदशी*,मघा नक्षत्र,सूर्य उत्तरायण,बसन्त ऋतु,युगाब्द ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

बुधवार, १६ मार्च २०२२.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                        *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


       *"हम कितने ही अच्छे शब्द या बातें पढ़ लें या बोल लें, किन्तु वो तब तक हमारा भला नहीं करेंगे, जब तक हम उन्हें उपयोग में नहीं लाते।"*

 ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

मंगळवार, १५ मार्च, २०२२

ज्ञान-विज्ञान* 🌎 ═════════════ 📙 *बर्फ*


════════════

    @ संकलन @

  *श्री. गजानन गोपेवाड 

═════════════

            🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

═════════════   

📙 *बर्फ* 

**************

बर्फाची गंमत भारतीयांना विसाव्या शतकात सहज समजू लागली. त्याआधी देवदर्शनाला हिमालयात जाणाऱ्यांनाच बर्फ ज्ञात होता. एकोणीसाव्या शतकात मोठाच आटापिटा करून बोट भरून बंदिस्त अवस्थेत बर्फ युरोपातून प्रथम आयात केला गेला. त्या नाविन्याचे वर्णन आजही इतिहासात कुठे कुठे वाचायला मिळते. येथे पोहोचेपर्यंत त्यातील फक्त एक तृतीयांश बर्फ मूळ स्वरूपात शिल्लक होता. आज मात्र सहजगत्या बर्फ व बर्फाचे पदार्थ कोणालाही खायला वा हाताळायला मिळतात. बर्फाची इतकी सवय झाली आहे की, उन्हाळ्यात सरबतात बर्फ नसला तर ते पिववत नाही, अशी आपली स्थिती झाली आहे.


शुद्ध पाणी शून्य डिग्री सेंटीग्रेडला पूर्णपणे गोठते. या घन पदार्थाला आपण 'बर्फ' म्हणतो. पाणी गोठताना आकाराने प्रसरण पावते. त्यामुळे बर्फाचा आकार नेहमीच्या मूळ पाण्याच्या आकारमानापेक्षा मोठा राहतो. बर्फ नेहमीच पाण्यावर तरंगतो, त्याचेही कारण हेच. याचा फार मोठा फायदा निसर्गतः सजीवांना झाला आहे. पृथ्वीवर गोड्या पाण्याचा साठा फारच मर्यादित आहे. त्यातील जवळजवळ दहा टक्के पाणी हे फक्त बर्फाच्या स्वरूपात आहे. हे जर उपलब्ध नसते तर बर्फाळ प्रदेशात मानवच काय पण अन्य कोणाही सजीव प्राण्यांची वस्ती शक्यच झाली नसती. आर्क्टिक प्रदेशात अनेक ठिकाणी समुद्राच्या खार्‍या पाण्याने वेढलेला भाग असून नद्या, तळी, सरोवरे यांचा फारसा मागमूस नसूनही वस्ती आहे; याचे कारण बर्फ पाण्यावर तरंगते व हे बर्फरुप पाणी सहज वापरता येते.


 बर्फाचे जगभर व्यापारी उत्पादन केले जाते. फ्रिझरमध्ये पाण्याचे तापमान कमी केले जाऊन बर्फ बनवतात. या बर्फाचा वापर मुख्यतः सर्व प्रकारचे मांस, मासे, भाजीपाला, दूध असे नाशवंत पदार्थ टिकवण्यासाठी केला जातो. पूर्णतः एअरकंडिशन शीत खोली बांधणे फार खर्चाचे काम असल्याने बर्फाच्या लाद्या वापरून हा सर्व माल हाताळला जातो. समुद्रावर गेलेला मोठा ट्रॉलर दुसऱ्या दिवसांपासून मासेमारी करत, गोळा करत पाचव्या दिवशी परततो. त्यानंतर हा माल म्हणजे मासे गावोगावी जातात. थेट सातव्या दिवशी ते लोकांच्या हातात पडून मग वापरले जातात, ते या बर्फाच्या लाद्यांमुळेच. बर्फाचा सरसकट वापर व उपलब्धी ही नाशवंत माल टिकवणारे वरदानच आहे.


 पाणी गोठताना प्रसरण पावते, याचे काही फायदे, तर काही तोटे आहेत. फायदे म्हणजे गोठवलेले बर्फ पाण्यावर तरंगत राहते. या संपर्कात आलेले पाणी, प्रथम चार डिग्री सेंटिग्रेड तापमान आल्यावर जड होते. हे जड पाणी तळाला जाते. खालचे हलके पाणी वर येते. बर्फ पाण्यापेक्षा हलका असल्याने तो पाण्यावर तरंगतो. म्हणून जीवसृष्टी अस्तित्वात आहे. कारण बर्फ जड असता, तर हिवाळ्यात तयार झालेला बर्फ समुद्राच्या तळाशी जाऊन बसला असता. उन्हाळ्यात तो काही पूर्णपणे वितळला नसता; कारण सूर्याची उष्णता समुद्राच्या तळापर्यंत पुरेशी पोहोचत नाही. पुन्हा हिवाळ्यात गोठलेले बर्फ तळाशी गेले असते. असे होता होता सारे महासागर हिवाळ्यात वरपासून खालपर्यंत बर्फाचे, तर उन्हाळ्यात वरवरचा बर्फ वितळून उथळ तळी झाली असती. अशा परिस्थितीत जीवसृष्टी तगणार कशी ?


हे चित्र जरा तपशिलाने पाहण्यासारखे आहे. ऑक्सिजनचा एक अणू आणि हायड्रोजनचे दोन अणू मिळून पाण्याचा एक रेणू तयार होतो. हायड्रोजनचे इलेक्ट्रॉन बहुधा ऑक्सिजनच्याच जवळपास असतात. म्हणून ऑक्सिजनजवळ ऋणभार, तर त्या दोन पायांच्या व धनभार तयार होतो. म्हणूनच मीठ विरघळते, तेव्हा धनविद्युतभार असलेला सोडियम आणि ऋणविद्युतभारीय क्लोरिन पाण्याच्या रेणूच्या दोन वेगवेगळ्या जागी चिकटतात. या गुणधर्मामुळेच पाणी हे एक उत्तम द्रावक झाले आहे. पाणी गोठते, तेव्हा पाण्याचे रेणू एकमेकांत घट्ट बसू शकत नाहीत; कारण सजातीय विद्युतभार एकमेकांना दूर ढकलतात. म्हणून त्यांची पिंजऱ्यासारखी पोकळ रचना तयार होते आणि ती पाण्याहून हलकी असते.


 बर्फ पाण्याहून जड करायचा असेल, तर हे सारे गुणधर्म बदलावे लागतील. मग पाणी उत्तम द्रावक राहणार नाही आणि शरीरात विरघळलेले सर्व पदार्थ 'साका' होऊन खाली बसतील आणि क्षणार्धात जीवसृष्टी खलास होईल.


 पाणी बर्फ होताना प्रसरण पावण्याचा फार मोठा तोटा म्हणजे सर्व प्रकारचे पाणी वाहून नेणारे पाइप हिवाळ्यात तडकून फुटण्याची शक्यता निर्माण होते. यासाठी काळजी म्हणून, पाइप जमिनीत खोल घातले जातात. तरीही ही तक्रार अनेक ठिकाणी उद्भवतेच. इंजिने गार राखण्यासाठी मोटार, ट्रक व अन्य वाहनांत पाणी वापरले जाते, तेही गोठते. यासाठी अलीकडे पाणी गोठू नये म्हणून अॅण्टीफ्रिज मिक्श्चर वापरले जाते. याचा वापर केल्यास पाण्याचा गोठणबिंदू खूपच खाली म्हणजे उणे बत्तीस डिग्री सेंटीग्रेड इतका उतरतो. मानवी प्रयत्नांनी, संशोधनाने या गोष्टीवर मात करायचा प्रयत्न सतत चालू असला, तरीही बर्फाने उद्भवणाऱ्या आणखी एका तोट्याच्या बाबतीत वा धोक्याच्या बाबतीत मानवी प्रयत्न अपुरेच पडतात. डोंगराच्या कड्यांना असलेल्या फटींतून आत जिरलेले पाणी गोठते व त्यामुळे अनेकदा कडे कोसळणे, दरडी कोसळणे हे अगदी अनपेक्षितरित्या घडते.


 डोंगरउतारावरचे स्केटिंग, बर्फाच्या मैदानावर हॉकी वा अन्य कसरती खेळ हा बर्फाचा एक गमतीदार गुण वापरून खेळले जातात. अर्थात या गुणांची जाणीव आपल्याला नंतर झाली. दाब दिल्यावर बर्फ वितळतो. स्केटचा दाब पडल्यावर तयार होणाऱ्या पातळ पाण्याच्या थरावरून स्केट वेगाने पुढे सरकते. काही सेकंदांतच मागे पुन्हा पाण्याचा बर्फ तयार होतो. अवजड सामान लादलेली स्लेड किंवा बर्फावरील ढकलगाडी मोजकेच कुत्रे मजेत ओढू शकतात. या गुणामुळेच.


 भारतात बर्फ नैसर्गिकरीत्या अचानक पहावयाला मिळतो, ते गारांच्या स्वरूपात. पावसाचे गोठलेले थेंब वजनाने गारांच्या स्वरूपात पृथ्वीवर पडतात. गारांचा पाऊस असे 'बर्फरूप' आपल्याला दाखवतो. बर्फामध्ये गाडले गेलेले प्राणी, मानव, अवशेष, अन्नपदार्थ अनेक वर्षांपर्यंत जसेच्या तसे उत्तम राहू शकतात. नुकताच एक आदिमानवी देह बर्फात गाडला गेलेला सापडला. त्याचे सर्व अवयव अगदी नुकताच मृत्यू झाल्याप्रमाणे सापडले, हे आश्चर्यकारकच होते. 


बर्फाळ प्रदेशाचे गूढरम्य आकर्षण मानवाला कायमच वाटत आले आहे.  बर्फाने अनेकांना जीवानिशी गिळले असले, तरीही गिर्यारोहणाच्या छंदात कसलाही खंड पडेल असे वाटत नाही.


*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*

═════════════

🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎 ═════════════ 📙 *कॅक्टस म्हणजे काय ?* 📙


═══════════

    @ संकलन @

  *श्री. गजानन गोपेवाड 

════════════

            🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

═════════════  

📙 *कॅक्टस म्हणजे काय ?* 📙

*******************

 कॅक्टस म्हटले की, एखाद्या शोभिवंत बाल्कनीमधील कुंड्या आठवू लागतात. छोटी मोठी काटेरी झाडे व त्यांचे विविध आकार डोळ्यांसमोर उभे राहतात. याउलट फड्या निवडुंग किंवा कोरफड म्हटले की, ओसाड भागात फोफावणारी काटेरी झाडे समोर येतात. शेताच्या बांधावर गुरे अात येऊ नयेत म्हणून निवडुंगाचे फड उभे केलेले असतात. वर्षाकाठी क्वचित लाल बोंडे धरून फुलणारा निवडुंग लक्ष वेधून घेतो. अन्यथा त्याच्याकडे कोणाचे लक्षही जात नाही.


भर उन्हाळ्यात सारी सभोवतालची झाडे वाळकी, करपून गेलेली दिसत असतानाही निवडुंग किसा हिरवागार राहतो, याकडे कधी तुमचे लक्ष्य केले आहे काय ? तीच गोष्ट कोरफडीची. तशीच गोष्ट कॅक्ट्स जातीचा इतर झाडांची असते. पाणी मिळो वा न मिळो, ती आपली हिरवीगारच असतात.


कॅक्टस हा वनस्पतीप्रकार खास करून कमी पाण्याच्या प्रदेशात, ओसाडी भागात वा वाळवंटी क्षेत्रात वाढणार आहे. जेमतेम आठ दहा इंच पाऊस जेथे पडतो तेथेही कॅक्टस वाढतात, स्थिरावतात, पसरतातही. अन्य कित्येक वनस्पतींना हा पाऊस पुरेसा नसतो. पण कॅक्टस जातीची व्यवस्था हे जेमतेम मिळणारे पावसाचे पाणी वर्षभरच काय, पण दोन दोन वर्षे पुरवून वापरते. तिची रचनाच तशी आहे. सर्व कॅक्ट्स गोलाकार आकारात वाढतात किंवा त्यांच्यावर उभट रेषा वा खोलगट चिरा असतात. पाने असा प्रकार नसून संपूर्ण आकारच पानासारखा हिरवा दिसतो. यावरच भरपूर काटे असतात. सहसा या काटय़ांमुळे जनावरच काय पण माणूसही त्यांना हात लावायला जात नाही. त्यांचे नैसर्गिक संरक्षण हेच कारण मुळात वाढीचे प्रमाण तसे कमीच असते.


मुख्य गोलाकार भागाचा छेद घेतला, तर मध्यभागी असलेला गोलाकार मगज पाण्याने भरून साठविल्याचे दिसते. वर्षात जेव्हा केव्हा पाऊस पडेल, तेव्हा मिळणारा जमिनीतील ओलावा शोषून ही वनस्पती हा साठा भरून ठेवून जपून वापरते; मग भले वर्षभर पाऊस न का पडो. पाने नसल्याने बाष्पीभवनाने पाणी उडून जाण्याचे प्रमाण कमी होते. याच कारणाने अगदी उन्हाळ्यातही या वनस्पती हिरव्यागारच आढळतात. पण दृष्टीला न जाणवणारा एक फरक मात्र झालेला असतो. त्यांची 'जाडी' कमी झालेली असून त्या 'वाळलेल्या' असतात.


सर्व वाळवंटीत भागात, ओसाड प्रदेशात या कॅक्ट्सचेच राज्य असते. जोडीला तुरळक खुरटी गवतही आढळतात, पण ती मात्र वाळून जातात. कॅक्ट्सची जात सहसा सहा सात फुटांपेक्षा जास्त उंच नसते. पण काही भागात आढळणारी सॅग्वारा (Saguara Cactus) ही जात मात्र चक्क साठ-एक फूट उंचीपर्यंत वाढते.


कॅक्टसचे आणखी एक वैशिष्टय़. एखादा तुकडा कडून मातीत रोवा. त्याला काही दिवसांतच मुळे फुटून तो रुजू लागतो. एखादा तुकडा काढून तसाच कोरडा कागदात गुंडाळून आठ दिवसांनी पुन्हा जमिनीत लावा, तोही न कुरकुरता रुजून जातो. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत तग कसा धरावा, हे कॅक्टसकडून शिकण्याजोगे आहे की नाही ?


*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*


ज्ञान-विज्ञान* 🌎 ═════════════ 📙 *कार्बनचक्र म्हणजे काय ?* 📙


═════════════

   @ संकलन @

  *श्री. गजानन गोपेवाड 

═════════════

            🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

═════════════ 

📙 *कार्बनचक्र म्हणजे काय ?* 📙 

*******************

पृथ्वीवरील प्रत्येक सजीवामध्ये कार्बनचे अस्तित्व आहे. मात्र वातावरणातील कार्बन डायऑक्साइड वायूचे प्रमाण अत्यल्प आहे. प्राणवायूशिवाय कोणताच सजीव जगात नाही, हे आपल्याला माहीत आहेच. हवेतील प्राणवायू कायम राखण्याचे महत्त्वाचे काम वनस्पती करत असतात. हे काम जर झाले नसते, तर वातावरणातील प्राणवायू कधीच संपला असता. रात्रंदिवस वनस्पती हे जे काम करत असतात, त्यातून कार्बनचक्र अव्याहत चालू राहते. क्लोरोफिल या हिरव्या द्रव्याचा या प्रक्रियेत महत्त्वाचा भाग असतो. बहुतांश वनस्पती क्लोरोफिलचा वापर करून स्वतःचे अन्न तयार करतात. जमिनीतून मिळवलेले पाणी व अन्य अनेक रसायने यांचा यासाठी वापर होतो. मुख्यत: शर्करा तयार करताना वनस्पती सूर्यप्रकाशाचा दिवसा उपयोग करून घेतात. या क्रियेत वनस्पती हवेतील कार्बन डायऑक्साइड शोषून घेतात. ही क्रिया पुढील प्रमाणे होते -

Energy + 6H2O ⬆ 6CO2 »» C6H12O6 + 6O2 ⬆


 यातून ग्लुकोज तयार होऊन तिचा वनस्पती वापर करतात व हवेमध्ये ऑक्सिजन बाहेर टाकला जातो. 

रात्रीच्या वेळी मात्र सूर्यप्रकाशाचा अभाव असल्याने ही क्रिया घडत नाही. फक्त वनस्पतींचे श्वसन चालू राहते. त्यात प्राणवायू आत घेतला जाऊन कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो. वनस्पतींच्या वाढीसाठी लागणारा कार्बन प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारेच मिळवला जातो. वनस्पतींच्या फांद्या, खोड, पाने बनवण्यात कार्बनचा मोठा वाटा असतो.

वनस्पतीचे आयुष्य संपल्यावर शिल्लक राहतो, तो कार्बनचाच मोठा भाग असतो. मात्र हवेतील प्राणवायूचे प्रमाण कायम राखण्यात या सार्‍या प्रक्रियेचा मोठा वाटा असतो.


*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*

═════════════

बुधवार, ९ मार्च, २०२२

प्रभात दर्शन

 🌳⛳ *शुभ प्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

फाल्गुन मास,शुक्ल पक्ष,*अष्टमी*,कृतिका नक्षत्र,सूर्य उत्तरायण,बसन्त ऋतु,युगाब्द ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

मंगलवार, १० मार्च २०२२.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                         *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


दानं भोगं नाशस्तिस्रोत

                गतयो भवन्ति वित्तसय,

यो न ददाति न भुड़:क्ते

                तस्ये तृतिया गतिर्भवति।


*अर्थ- धन की संभव नियति तीन प्रकार की होती है- दान, भोग और नाश। जो ना दान करता है और ना ही स्वयं उसका उपयोग करता है उसके धन की तीसरी गति होती है अर्थात उस धन का नाश होना है।*

 ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

गाथा बलिदानाची* 🇮🇳🇮🇳 ➿➿➿➿➿➿➿ *सीताराम पटवर्धन ऊर्फ आप्पासाहेब पटवर्धन*

 ➿➿➿➿➿➿➿

*🇮🇳🇮🇳गाथा बलिदानाची* 🇮🇳🇮🇳

➿➿➿➿➿➿➿


*सीताराम पटवर्धन ऊर्फ आप्पासाहेब पटवर्धन*

                                                                          *जन्म :  ४ नोव्हेंबर १८९४*

          (आगरगुळे-रत्नागिरी)                                                               *मृत्यू : १० मार्च १९७१*


     आप्पासाहेब पटवर्धन यांचे प्राथमिक शिक्षण रत्नागिरीत झाले. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते पुण्यात आले. मुंबई विद्यापीठातून तत्त्वज्ञान विषयात एम.ए. केल्यावर त्यांनी फर्ग्युसन कॉलेजात १९१७-१८ या काळात एक वर्ष प्राध्यापकी केली. तत्पूर्वी मुंबईत सन १९१६ मध्ये झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनाच्या वेळी आप्पासाहेबांना गांधीचे पहिल्यांदा दर्शन झाले होते. २१ वर्षांचे आप्पासाहेब गांधींचे विचार ऐकून इतके भारावून गेले की त्यांनी नोकरी सोडली आणि ते पूर्णकाळ समाजकार्य करण्यासाठी गांधींच्या आश्रमात दाखल झाले, आणि गांधीजींंचा पत्रव्यवहार सांभाळू लागले. याच काळात गांधींनी १९१९ साली सुरू केलेल्या 'यंग इंडिया' या साप्ताहिकाची, साबरमती आश्रमात चालू असलेल्या राष्ट्रीय शाळेत शिकवण्याची आणि शाळेच्या मुख्याध्यापकाच्या कामाची जबाबदारी आप्पासाहेब पटवर्धनांनी स्वीकारली.


अप्पासाहेब हे भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत सुमारे साडेतीन वर्षें तुरुंगात होते. तुरुंगात भंगीकाम करण्यास मिळावे म्हणून त्यांनी केलेला सत्याग्रह गाजला.


पुढे आप्पा कोकणात आले. तेथे त्यांनी त्यांनी ‘कुणबी सेवा संघ’ काढला. ते ‘चरखा संघा’ चे तर अध्यक्षच झाले होते. त्यांनी रत्नागिरीत सूतकताई व ग्रामोद्योग प्रसाराचे बहुमोल काम केले. त्यांनीच जिल्ह्यात काँग्रेसची मुहूर्तमेढ रोवली. ते जिल्हा काँग्रसचे अध्यक्षही होते. दक्षिण रत्नागिरी जिल्ह्यातील कणकवली शहरात आप्पासाहेब पटवर्धनांनी ‘गोपुरी आश्रम’ सुरू केला.


🔹 *गोपुरी संडास*

                            कणकवलीत 'गोपुरी आश्रम' चालवत असताना मानवी विष्‍ठेपासून सेंद्रिय खत तयार करणे हे काम त्यांनी सुरू केले. त्‍यांनी दोन्ही बाजूस दोन बादल्या बांधलेली एक कावड तयार केली होती. ती कावड खांद्यावर ठेवून ते कणकवली गावात जात. तेथे टोपल्यांच्‍या संडासांतील मानवी विष्‍ठा कावडीच्या बादल्यांत भरून गोपुरी आश्रमात आणत व त्यापासून खत बनवीत. या खताला त्यांनी सोनखत असे नाव दिले. अनेक वर्षे त्यांनी मानवी मैल्यापासून खत बनविण्याचेच कार्य केले. हे खत आश्रमातील भात, भाजीपाला व फळझाडे यांना दिले जाई, त्यामुळे पिकांचे उत्पादन वाढले. या संडासाच्या टाकीत साठलेल्या एका कुटुंबाच्या मलापासून वर्षांला साधारण १६०० रु. किंमतीच्या खताची निर्मिती होते.


मानवी विष्ठेपासून बनवलेल्या खताला आजही सोनखत म्हणतात.


मानवी विष्ठा जमा करण्यासाठी आप्पासाहेबांनी शास्त्रीय पद्धतीने जे संडास बांधले त्यांना गोपुरी संडास म्हणतात. त्यासाठी त्यांनी ३ फूट x ३ फूट x ३ फूट आकाराच्या दोन टाक्या बांधल्या. या टाक्या एकमेकांपासून अगदी थोड्या अंतरावर होत्या. दोन टाक्यांच्या वरच्या बाजूस मधोमध शौचविधी करण्यास दीड फूट लांब व नऊ इंच रुंद अशी पोकळ जागा, वर झाकण आणि त्यावर पायटे बसवले होते. शौचविधी झाल्यानंतर त्यावर माती टाकण्यात येई. असे केल्यानंतर सहा महिन्यांत त्यातून सेंद्रिय खत तयार होई. एक टाकी भरली, की दुसऱ्या टाकीचा उपयोग केला जाई.


♻ *चर्मोद्योग*

                      महारांनी मेलेल्या पशूची कातडी सोडवणे बंद केले, तेव्हा अप्पासाहेब पटवर्धनांनी मेलेल्या जनावरांची कातडी सोलणे, खतासाठी मांस आणि हाडे मिळवणे आदी कामांसाठी अनेक चर्मालये काढली. चर्मालयांत भाई सुखी, बाबा फारक, बाळूदादा पानवलकर, शामराव जोशी, बांदेकर, रमाकांत आर्तेकर हे त्यांचे पहिल्यापासूनचे सोबती होते. यांत अनेक ब्राह्मण सहकारी होते. हे सगळे स्वातंत्र्यसैनिक होते.


आप्पांचे अनुयायी रमाकांत आर्ते आणि पुष्पलता रमाकांत आर्ते यांनी देवरुखमध्ये चर्मकाम करण्याचे कार्य नेटाने चालवले आहे. (सन २००९ ची बातमी). या दांपत्याचे चिरंजीव युयुत्सु आर्ते व मिहीर आर्ते हे दोघेही उच्चशिक्षित तरुण आप्पांच्या व आपल्या आई-वडिलांच्या सामाजिक कार्यात मुख्य सहभागी आहेत.


आर्ते कुटुंबीय गेली कित्येक दशके देवरुखमध्ये चांभारकामाचे प्रशिक्षण देण्याचे कार्य करतात. वर्षांत ३५ ते ४० विद्यार्थी प्रशिक्षण घेतात.


⚛ *आप्पासाहेब पटवर्धनांचे अन्य यशस्वी उद्योग*                   

              आप्पांनी त्याकाळात सोलर, कुकर, पवनचक्की, गोबरगॅस प्लँट असे अपारंपरिक ऊर्जास्रोताचे यशस्वी प्रयोग केले. त्यांवर त्यांनी पुस्तकेही लिहिली.

ग्रामपंचायत राज ही संकल्पना अस्तित्वात यायच्या पूर्वी ग्रामपंचायतीच्याच धर्तीचे काम आप्पांनी गोपुरीत सुरू केले. त्यानुसार रस्ते, विहिरी, जलसंधारण, प्राथमिक शिक्षण आदी कामे होऊ लागली.  

🇮🇳🇮🇳🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳🇮🇳🇮🇳

🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

संकलन -) गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा - यवतमाळ ४४५२०६

🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎 ═════════════ 📙 *कुष्ठरोग म्हणजे काय ?*


════════════

   * @ संकलन @*

  *श्री. गजानन गोपेवाड 

═════════════

            🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

═════════════  

📙 *कुष्ठरोग म्हणजे काय ?* 

*******************

कुष्ठरोग हा एक संसर्गजन्य आजार आहे. यावर प्रतिबंधक लस तयार झाली आहे, पण ती अद्याप प्रयोगावस्थेत आहे. याखेरीज तिचा वापर कसा करावा, याविषयी शास्त्रज्ञ व डॉक्टर यांच्यामध्येच अजून एकमत नाही. मात्र विविध प्रकारच्या औषधांचा वापर करून कुष्ठरोग निर्मूलन आता आवाक्यात आले आहे. असे जागतिक आरोग्य संघटनेला वाटते. दर दहा हजार व्यक्तींमागे एक रुग्ण असे प्रमाण सध्या भारतात आढळते. 


अगदी प्रारंभिक अवस्थेतील रोगाचे निदान करून त्यावर औषधांचा उपयोग केल्यास कुष्ठरोग पूर्णपणे बरा करता येतो. कुष्ठरोग काटकीसारख्या दिसणाऱ्या सूक्ष्मजंतूंमुळे होतो. त्यांची कृत्रिम वाढ करणे  शक्य झालेले नाही. या रोगाचे जंतू मानवी शरीरात जेव्हा प्रवेश करतात, तेव्हा त्यांचा पेशीजालाशी संघर्ष होतो. एका प्रकारात या संघर्षात जंतू व पेशीजाल या दोन्हींचा नाश घडतो. या प्रकाराला 'नॉन लेप्रोमॅटस' किंवा 'असंसर्गिक' समजतात. म्हणजे रोगाचे परिणाम जरी शरीरावर दिसत असले, तरी त्यात जंतू नसल्याने ही व्यक्ती संसर्ग देऊ शकत नाही. दुसऱ्या प्रकारात मात्र जंतूंची अनिर्बंध वाढ होत राहते. तेथे रुग्णाची प्रतिकारशक्ती कमी असते. मात्र जंतुंची संख्या वाढत गेल्यामुळे सर्व शरीरभर रोग पसरत राहतो. प्राथमिक अवस्थेत पेशीजाल फारसे नष्ट होत नाही. विकोपाला गेल्यावर मात्र ढोबळ चिन्हे दिसून येतात. हा प्रकार सांसर्गिक असतो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुष्ठरोग अत्यंत मंदगतीने वाढणारा आजार आहे. सुरुवातीची लक्षणे व प्रगत अवस्थेतील चिन्हे यात फारच फरक आहे. समाजासमोर प्रगत अवस्थाच येत असल्याने या रुग्णांबद्दल एक प्रचंड भीती व तिरस्कार अनेक शतके समाजात घट्ट गैरसमजुती निर्माण करत आहे. शारीरिक विद्रुपता व त्यापासून होणारे सामाजिक व आर्थिक परिणाम टाळण्यासाठी रोगाची सुरुवातीची लक्षणे ओळखून इलाज सुरू करणे महत्त्वाचे ठरते. 


शरीराच्या कोणत्याही भागावर त्वचेच्या रंगापेक्षा वेगळ्या रंगाचा लालसर चट्टा व डाग दिसून या रोगाची सुरुवात होते. कोडाप्रमाणे हे डाग पांढरे नसतात. अतिगडद त्वचेवरील डाग लक्षात यायला वेळही लागतो. मात्र महत्त्वाची गोष्ट म्हणजे या जागीच्या त्वचेचे स्पर्श, उष्णता व वेदना या तिन्हींचे ज्ञान गेलेले असते. अशा जागीची त्वचा किंचित खरवडून तिची सूक्ष्मदर्शक यंत्राखाली तपासणी करतात. त्यात रोगाचे जंतू असतील, तर तो सांसर्गिक प्रकार ठरवला जातो. जंतू नसतील, तो असांसर्गिक असतो. भारतातील सुमारे ८० टक्के रूग्ण असांसर्गिक प्रकारात असतात. जेमतेम २० टक्के रुग्णांचाच इतरांना संसर्ग होऊ शकतो.

मुख्य गोष्ट म्हणजे दोन्ही प्रकारच्या रुग्णांना एक ते दोन वर्षे औषधयोजनेची गरज असते. अन्यथा अतिसंथपणे वाढणाऱ्या या रोगाचे चट्टे अनेक ठिकाणी दिसू लागतात.


 हातापायांची बोटे वाकडी होणे, क्षते पडणे, जखमा चिघळणे हे मुख्यतः संवेदना नष्ट झाल्याने वाढत जाते. रोगाचा उद्भव झाल्याने चेहऱ्यावरच्या गाठी, कानाच्या पाळ्यांवर व नाकावर येणारी विद्रुपता, भुवयांचे केस जाणे यांमुळे प्रगत अवस्थेतील रुग्ण हा समाजातून बाहेर फेकला जायला सुरुवात होते. पण ही अवस्था न आलेली किमान ९० टक्के कुष्ठरोगी समाजातच वावरत असतात.


 त्यांच्यामुळे होणारा संसर्ग टाळण्यासाठी त्यांच्यावर निदान व उपचार करणे हाच एकमेव प्रतिबंधाचा उपाय राहतो. कुष्ठरोग हाही एक जंतुजन्य रोग असून तो पूर्ण बरा होऊ शकतो, ही महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायलाच हवी.


*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*

═════════════

🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎 ═════════════ 🛰 *कृत्रिम उपग्रह व त्याचा मागोवा सेकंदगणिक*


═════════════

   @ संकलन @

  गजानन गोपेवाड 

═════════════

            🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

═════════════ 

🛰 *कृत्रिम उपग्रह व त्याचा मागोवा सेकंदगणिक* 

************************************

रॉकेट्सचा जनक गोडार्ड याने पहिले रॉकेट आकाशात सोडले, तेव्हा ते कसेकसे जाते आहे, कुठे पडणार आहे, याचा मागोवा चक्क दुर्बिणीतून घेतला गेला होता. त्यातही दिवसाउजेडी दोन उंच गेलेले रॉकेट शोधणे कठीण पडत होते.


१९५७ साली पहिला उपग्रह अवकाशात गेला; पण ज्यावेळी त्याची कक्षा पृथ्वीच्या दुसऱ्या बाजुस जाई, तेव्हा त्याच्याशी संपर्क तुटत असे. १९६० साली यावर तोडगा म्हणून अमेरिका व रशिया या दोघांनीही आपापल्या मित्र राष्ट्रांतून संदेशग्रहणकेंद्रे उभारली. या विविध केंद्रांतून या उपग्रहांवर लक्ष ठेवणे त्यामुळे शक्य होऊ लागले. पण कसे ? त्रिवेंद्रमहून दिल्लीला जाणारी गाडी सुरुवातीला पुण्यापर्यंत पोहोचेपर्यंत एक केंद्र लक्ष ठेवेल, तर त्यानंतर गुजरातेतील एखादे केंद्र लक्ष देईल, तर राजस्थानमध्ये शिरल्यावर तिसरेच केंद्र यावर लक्ष केंद्रित करेल. या पद्धतीत जाशी रिले शर्यत असते, तसे लक्ष ठेवले जाई. काही दिवस तर असंख्य हौशी ज्योतिर्विद मंडळींनी या नोंदी करायला खूपच मदत केली.


या तुलनेत आजची परिस्थिती विश्वासच बसणार नाही अशी आहे. उड्डाणाचे सुरुवातीचे अर्धे मिनिट व प्रत्यक्ष वातावरणामध्ये शिरताना म्हणजे अवकाशयान उतरताना चार मिनिटे सोडली, तर सतत मुख्य केंद्राशी थेट संपर्क असतो; मग अवकाशयान चंद्रावर असो, किंवा मंगळाच्या जवळ किंवा ग्रहमालेच्या पलीकडे चाललेले असो ! व्हाॅयेजर दोनचे उड्डाण २० ऑगस्ट १९७७ ला झाले. आज जवळपास ८००० दशलक्ष किलोमीटर प्रवास करून सूर्यमालेबाहेरील अवकाशात त्याने प्रवास सुरू केला आहे, पण त्याचे संदेश सतत ग्रहण केले जात आहेत. अजून कमीत कमी २५ वर्षे त्याचे संदेश आपल्याला मिळणार आहेत. एवढी प्रचंड झेप संदेशवहनात घेणे शक्य झाले आहे, ते विविध ठिकाणी, विविध कक्षांत, विविध उंचीवर काम करणाऱ्या उपग्रहांमुळेच.


या उपग्रहांतील सध्या वापरला जाणारा प्रमुख उपग्रह म्हणजे TDRSS किंवा 'ट्रॅकिंग अँड डाटा रिले सिस्टीम सॅटेलाईट' होय. या उपग्रहातून अवकाशयानाकडे सतत संदेश पाठवणे, येणारे संदेश ग्रहण करून कंट्रोल टॉवरकडे पाठवणे एकाच वेळी केले जात असते. अमेरिकेतील ह्युस्टन व रशियातील कॅलिनीग्राद या मॉस्कोजवळील भागात प्रमुख नियंत्रणकेंद्रे काम करतात. त्यांना मिशन कंट्रोल्स असे म्हटले जाते. भारतातील असे केंद्र हसन येथे आहे.


अवाढव्य हॉलमध्ये असंख्य कॉम्प्युटरच्या जंगलात चोवीस तास काम करणारे हे शास्त्रज्ञ अक्षरश: दर सेकंदागणिक आवकाशातील प्रत्येक यानाचा मागोवा घेत असतात. येणाऱ्या माहितीचा ओघ साठवून तिचे विश्लेषण करणे हे काम इतरत्र चालूच असते.


असे सांगितले जाते की जमा केलेली माहिती इतकी प्रचंड असते की, अवकाशयान परतल्यावर तब्बल दोन दोन वर्षे त्यावर अनेकांना काम करावे लागते.

पृथ्वीभोवती कृत्रिम उपग्रहांची सध्या गर्दी झाली आहे. त्यांची संख्या नक्की करणे कठीण व्हावे, इतकी ती मोठी आहे. पण पहिला उपग्रह 'स्फुटनिक' १९५७ साली सोडला गेला. त्याआधी मात्र पृथ्वीला एकच उपग्रह होता, तो म्हणजे चंद्र. स्पुटनिक हा रशियाने सोडलेला पहिला कृत्रिम उपग्रह.


यानंतर झपाट्याने प्रगती होत गेली. १९६२ साली 'टेलस्टार' या उपग्रहाने अटलांटिक सागरावरून पलीकडे टीव्हीची चित्र पोहोचवली. यानंतर उपग्रहांचा दळणवळणासाठी सर्रास उपयोग सुरू झाला. भारतात सर्वत्र दूरचित्रवाणीचे जाळे पोहोचवण्याचे काम इन्सॅटच्या मालिकेने केले आहे. ते जगभर हे काम 'जिओस्टेशनरी उपग्रह' करतात. या प्रकारचे उपग्रह ३६,०००० किलोमीटर उंचीवरून पृथ्वीभोवती भ्रमण करतात. त्यांचा पृथ्वीला प्रदक्षिणा घालण्याचा काळ व पृथ्वीचा स्वतःभोवती फिरण्याचा काळ सारखाच असतो, त्यामुळे हे या उंचीवर एकाच ठिकाणी असल्याप्रमाणे दिसतात. याचाच फायदा घेऊन या उपग्रहाच्या कक्षेतील सर्व शहरांकडे एका ठिकाणाहून पाठवलेले संदेश प्रक्षेपित केले जातात.


उपग्रहांचा वापर दळणवळणाप्रमाणेच हेरगिरीसाठीही केला जातो. उपग्रहावरून घेतलेल्या फोटोमध्ये शंभर बाय शंभर मीटरमध्ये होणारे पृथ्वीवरील बदल स्पष्टपणे नोंदले जातात. स्वाभाविकच मोठी बांधकामे, अण्वस्त्रांच्या हालचाली, तटबंदी यांची पूर्ण नोंद करता येते; तीसुद्धा शत्रूच्या नकळत.


उपग्रहांतर्फे पीक पाहणी, जंगल पाहणी, भूप्रदेश आराखडे तयार करणे ही कामे सहजगत्या पार पडतात. इन्फ्रारेड पाहणीमुळे आणखीही खूप गोष्टींचा खुलासा होतो. पिकांवर पडणार्‍या किडी, जमिनीखालील पाणी व प्रवाह यांचा सुद्धा खुलासा होऊ शकतो.


उपग्रहांची निर्मिती ही तशी सहजशक्य असलेली गोष्ट झाली आहे, पण उपग्रह अवकाशात पाठवणे ही मात्र आजही मोजक्या राष्ट्रांचीच अखत्यारी आहे. काही हजार किलोंचे वजन अवकाशात पाठवण्याजोगे क्षेपणास्त्र तयार करणे ही त्यातील गोम आहे.


उपग्रहांना मिळणारी ऊर्जा सौरऊर्जाच असते. उपग्रह अवकाशात स्थिर झाल्यावर त्याचे पंख उघडतात, या पंखांवर सौरऊर्जा ग्रहण करून वीज देणारे घटक असतात. अनेकदा हे पंख उघडण्यातच अपयश येते. हीच फार मोठी अडचण ठरून ऊर्जेविना उपग्रहाचे काम बंद पडते, पण सहज पंख उघडले, तर उपग्रह अनेक वर्षांपर्यंत बिनतक्रार काम देत राहतो.


उपग्रहांचा मोठा फार मोठा उपयोग हवामान अंदाज व्यक्त करण्यासाठी झालेला आहे. जगभरचे ढगांचे फोटो, हवेतील दाबातील फरक उपग्रहांद्वारे झटकन समजतात. व त्यावरून धोक्याचा इशारे देता येतात. भारतीय दूरचित्रवाणीच्या विविध वाहिन्यांवर याच छायाचित्रांच्या सहाय्याने रोज रात्री हवामानखाते अंदाज व्यक्त करत असते.


उपग्रहाच्या काम करणाऱ्या दुर्बिणी हा एक वेगळाच विषय आहे. गरजेप्रमाणे विविध पद्धतींने काम करणाऱ्या दुर्बिणी आजवर अवकाशात पाठवल्या गेल्या आहेत.

उपग्रहांमार्फत काम करणाऱ्या काही प्रसिद्ध दुर्बिणी पुढील प्रमाणे :

क्ष किरण : उहुरू (१९७२)

 आइन्स्टाइन (१९७८)

 रोसॅट (१९८८)

 अतिनिल : कोपर्निकस (१९७३)

 अधोरक्त : आयरॅस (१९८३)

 दृष्यप्रकाश : हिप्पोर्कास (१९८९) 

 हबल (१९९०)

 जेम्स वेब (आगामी टेलिस्कोप)


*'सृष्टी विज्ञानगाथा' 

रविवार, ६ मार्च, २०२२

🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎 ═════════════ 📙 *क्लोरीन म्हणजे काय


═════════════

   @ संकलन @

  *श्री. गजानन गोपेवाड 

═════════════

            🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

═════════════

📙 *क्लोरीन म्हणजे काय ?* 📙

*******************

खाण्याचे मीठ व पिण्याच्या पाण्याची शुद्धता या दोन महत्वाच्या गोष्टी क्लोरीनमुळेच शक्य झाल्या आहेत. क्लोरीन हा वायू स्वरूपात मिळवला व साठवला जातो. मात्र नैसर्गिकरित्या क्लोरीन आढळत नाही. सोडियम बरोबर त्याचे संयुग पटकन बनते. त्यालाच आपण मीठ म्हणतो. ‍१७७४ साली शील यांनी त्याचा शोध लावला. फिकट हिरव्या रंगावरून ग्रीक भाषेतील क्लोराॅस या शब्दावरून त्याचे नाव पडले आहे. क्लोरीन हा वायू मुख्यतः पाणी शुद्ध करण्याच्या ब्लिचिंग पावडरमध्ये वापरला जातो. त्याच्यामुळे पाण्यातील जंतू मरतात व मुक्त झालेला क्लोरिन हवेत मिसळतो. अगदी सहज पूर्ण झालेल्या या प्रक्रियेमुळेच आपण मोठ्या प्रमाणावर पाण्याचे शुद्धीकरण करून गावे, शहरे, महानगरे यांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करू शकतो.


क्लोरिनचे अनेक औद्योगिक उपयोगही आहेत. क्लोरीनचा गैरवापर करून पहिल्या महायुद्धात शत्रूच्या सैनिकांवर त्या वायूचा मारा केला गेला होता. फुप्फुसदाहाने त्यांचा त्यात मृत्यू ओढवला. कोणत्याही जिवंत प्राण्यांसाठी क्लोरीन हा अतिशय घातक वायू आहे. मात्र संयुग स्वरूपातील त्याची उपयुक्तता वादातीत ठरावी. माणसाच्या खाण्यातील एक अत्यावश्यक घटक म्हणजे मीठ. शरीरातील सोडीयमचा साठा अनेक शरीरातील क्रियांना मदत करतो. असा हा घटक म्हणजे सोडियम व क्लोरीनचे संयुग होय. भूल देण्यासाठी कित्येक दशके वापरले गेलेले क्लोरोफार्म हे द्रव्यही क्लोरीनचेच संयुग. क्लोरिनमुळे अनेक पदार्थांचे ऑक्सिडेशन होते. त्यामुळे अनेक रंग, डाग यांचा रंगीतपणा जातो. कपड्यांना नवीन रंग देण्यापूर्वी, कपडे स्वच्छ करण्यासाठी ब्लिचिंग पद्धतीच्या प्रक्रियेत याचा वापर केला जातो. हायड्रोक्लोरिक अॅसिड मध्ये क्लोरिन असतो व विद्राव्य म्हणून त्याचा वापर अनेक उद्योगांत केला जातो. कार्बनबरोबरचे त्याचे संयुग कार्बनटेट्राक्लोराईड एक उत्तम विद्राव्य आहे. त्याचा वापर आग विझवण्यासाठी केला जातो.


क्लोरीनची निर्मिती इलेक्ट्रोलायसिस पद्धतीने केली जाते. समुद्राचे पाणी किंवा पोटॅशियमबरोबरची त्याची निसर्गात सापडणारी संयुगे यांचा वापर त्यासाठी केला जातो. एका परीने या वायूचा शोध हा मानवी प्रगतीला लागलेला मोठा हातभारच आहे, यात शंका नाही. 

 

*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*

═════════════

गाथा बलिदानाची* 🇮🇳🇮🇳 ➿➿➿➿➿➿➿➿➿➿ *भारतरत्न* *👳🏻‍♂️👳🏻‍♂️गोविंद बल्लभ पंत

 ➿➿➿➿➿➿➿➿➿➿

🇮🇳🇮🇳 *गाथा बलिदानाची* 🇮🇳🇮🇳

➿➿➿➿➿➿➿➿➿➿


                   *भारतरत्न*

*👳🏻‍♂️👳🏻‍♂️गोविंद बल्लभ पंत👳🏻‍♂️👳🏻‍♂️*


(भारतीय राजनेता,स्वतंत्रता सेनानी)


     *जन्म : १० सितम्बर १८८७*

        (अल्मोड़ा, उत्तराखंड)


       *मृत्यु : ७ मार्च,१९६१*


अभिभावक : श्री मनोरथ पंत

पति/पत्नी : श्रीमती गंगा देवी

नागरिकता : भारतीय

पार्टी : कांग्रेस

पद : उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री और भारत के गृहमंत्री

*कार्य काल मुख्यमंत्री*

 १५ अगस्त १९४७ से २७ मई १९५४

*गृहमंत्री-* १९५५ - १९६१


शिक्षा : वकालत

विद्यालय : 'म्योर सेण्ट्रल कॉलेज', इलाहाबाद

भाषा : अंग्रेज़ी, संस्कृत

जेल यात्रा : सन १९२१,१९३०, १९३२ और १९३४ के स्वतंत्रता संग्रामों में लगभग ७ वर्ष जेलों में रहे।

पुरस्कार-उपाधि : भारत रत्न

रचनाएँ : वरमाला, 'राजमुकुट' और 'अंगूर की बेटी'

अन्य जानकारी : गोविन्द बल्लभ पंत का मुक़दमा लड़ने का ढंग निराला था, जो मुवक़्क़िल अपने मुक़दमों के बारे में सही जानकारी नहीं देते थे, पंत जी उनका मुक़दमा नहीं लेते थे। काशीपुर में एक बार वे धोती, कुर्ता तथा गाँधी टोपी पहनकर कोर्ट चले गये। वहां अंग्रेज़ मजिस्ट्रेट ने आपत्ति की


पंडित गोविन्द बल्लभ पन्त या जी. बी. पन्त  प्रसिद्ध स्वतन्त्रता सेनानी और वरिष्ठ भारतीय राजनेता थे। वे उत्तर प्रदेश राज्य के प्रथम मुख्य मन्त्री और भारत के चौथे गृहमंत्री थे। सन १९५७ में उन्हें भारतरत्न से सम्मानित किया गया। गृहमंत्री के रूप में उनका मुख्य योगदान भारत को भाषा के अनुसार राज्यों में विभक्त करना तथा हिन्दी को भारत की राजभाषा के रूप में प्रतिष्ठित करना था।


💁‍♂️ *प्रारम्भिक जीवन*


इनका जन्म १० सितम्बर १८८७ को अल्मोड़ा जिले के श्यामली पर्वतीय क्षेत्र स्थित गाँव खूंट में महाराष्ट्रीय मूल के एक कऱ्हाड़े ब्राह्मण कुटुंब में हुआ। इनकी माँ का नाम गोविन्दी बाई और पिता का नाम मनोरथ पन्त था। बचपन में ही पिता की मृत्यु हो जाने के कारण उनकी परवरिश उनके नाना श्री बद्री दत्त जोशी ने की। १९०५ में उन्होंने अल्मोड़ा छोड़ दिया और इलाहाबाद चले गये। म्योर सेन्ट्रल कॉलेज में वे गणित, साहित्य और राजनीति विषयों के अच्छे विद्यार्थियों में सबसे तेज थे। अध्ययन के साथ-साथ वे कांग्रेस के स्वयंसेवक का कार्य भी करते थे। १९०७ में बी.ए.और १९०९ में कानून की डिग्री सर्वोच्च अंकों के साथ हासिल की। इसके उपलक्ष्य में उन्हें कॉलेज की ओर से "लैम्सडेन अवार्ड" दिया गया।


१९१० में उन्होंने अल्मोड़ा आकर वकालत शूरू कर दी। वकालत के सिलसिले में वे पहले रानीखेत गये फिर काशीपुर में जाकर प्रेम सभा नाम से एक संस्था का गठन किया जिसका उद्देश्य शिक्षा और साहित्य के प्रति जनता में जागरुकता उत्पन्न करना था। इस संस्था का कार्य इतना व्यापक था कि ब्रिटिश स्कूलों ने काशीपुर से अपना बोरिया बिस्तर बाँधने में ही खैरियत समझी।


🇮🇳 *स्वतन्त्रता संघर्ष में*


दिसम्बर १९२१ में वे गान्धी जी के आह्वान पर असहयोग आन्दोलन के रास्ते खुली राजनीति में उतर आये।


९ अगस्त १९२५ को काकोरी काण्ड करके उत्तर प्रदेश के कुछ नवयुवकों ने सरकारी खजाना लूट लिया तो उनके मुकदमें की पैरवी के लिये अन्य वकीलों के साथ पन्त जी ने जी-जान से सहयोग किया। उस समय वे नैनीताल से स्वराज पार्टी के टिकट पर लेजिस्लेटिव कौन्सिल के सदस्य भी थे। १९२७ में राम प्रसाद 'बिस्मिल' व उनके तीन अन्य साथियों को फाँसी के फन्दे से बचाने के लिये उन्होंने पण्डित मदन मोहन मालवीय के साथ वायसराय को पत्र भी लिखा किन्तु गान्धी जी का समर्थन न मिल पाने से वे उस मिशन में कामयाब न हो सके। १९२८ के साइमन कमीशन के बहिष्कार और १९३० के नमक सत्याग्रह में भी उन्होंने भाग लिया और मई १९३० में देहरादून जेल की हवा भी खायी।


🇮🇳 *मुख्यमन्त्री कार्यकाल*


१७ जुलाई १९३७ से लेकर २ नवम्बर १९३९ तक वे ब्रिटिश भारत में संयुक्त प्रान्त अथवा यू.पी. के पहले मुख्य मन्त्री बने। इसके बाद दोबारा उन्हें यही दायित्व फिर सौंपा गया और वे १ अप्रैल १९४६ से १५ अगस्त १९४७ तक संयुक्त प्रान्त (यू.पी.) के मुख्य मन्त्री रहे। जब भारतवर्ष का अपना संविधान बन गया और संयुक्त प्रान्त का नाम बदल कर उत्तर प्रदेश रखा गया तो फिर से तीसरी बार उन्हें ही इस पद के लिये सर्व सम्मति से उपयुक्त पाया गया। इस प्रकार स्वतन्त्र भारत के नवनामित राज्य के भी वे २६ जनवरी १९५० से लेकर २७ दिसम्बर १९५४ तक मुख्य मन्त्री रहे।


🇮🇳 *गृह मंत्री कार्यकाल*


सरदार पटेल की मृत्यु के बाद उन्हें गृह मंत्रालय, भारत सरकार के प्रमुख का दायित्व दिया गया। भारत के गृह मंत्री रूप में उनका कार्यकाल सन १९५५ से लेकर १९६१ में उनकी मृत्यु होने तक रहा।


🕯️ *मृत्यु*


७ मार्च १९६१ को हृदयाघात से जूझते हुए उनकी मृत्यु हो गयी। उस समय वे भारत सरकार में केन्द्रीय गृह मन्त्री थे।


🗽 *स्मारक और संस्थान*


गोविन्द बल्लभ पन्त कृषि एवं प्रौद्योगिक विश्वविद्यालय, पंतनगर, उत्तराखण्ड

गोविन्द बल्लभ पन्त अभियान्त्रिकी महाविद्यालय, पौड़ी गढ़वाल, उत्तराखण्ड

गोविन्द बल्लभ पंत सागर, सोनभद्र, उत्तर प्रदेश

पं. गोविन्द गोविन्द बल्लभ पंत इण्टर कॉलेज काशीपुर ऊधमसिंह नगर (उत्तराखंड)

🇮🇳🇮🇳🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳🇮🇳🇮🇳

🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

संकलन -)

गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

Featured Post

व्यायाम व योगा अवश्य करावा*

*व्यायाम व योगा अवश्य करावा*  *व्यायाम व योगा करण्याचे दहा फायदे:-*  1) व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते: व्यायाम करणारी...