सोमवार, ३ जानेवारी, २०२२

आपल्या ला भुख का लागते


══════════════════════

  @ संकलन @गजानन गोपेवाड 

  

══════════════════════

            🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════   

📙 *आपल्याला भूक का लागते ?* 📙 


आपलं शरीर सतत काम करत असतं. जेव्हा आपण विश्रांती घेत असतो किंवा झोपेत असतो तेव्हाही श्वसन, रक्ताभिसरण, हृदयाची धडधड यांसारख्या प्रक्रिया चालूच असतात. त्यामुळे शरीराला सतत ऊर्जेची गरज भासते. हिचा पुरवठा अखंड असण्यासाठी शरीराला वेळोवेळी पोषण मिळणं आवश्यक असतं. आपण जेव्हा अन्न खातो तेव्हा हे पोषण मिळतं. ते साठवूनही ठेवलं जातं. पण तो साठा संपला की परत पोषक पदार्थ शरीराला मिळण्याची गरज असते. याचीच जाणीव आपल्याला करून देण्यासाठी भुक लागण्याची भावना निर्माण होते.


आपल्या मेंदूमधील हायपोथॅलॅमस या अवयवामध्ये भुकेवर नियंत्रण ठेवणारं केंद्र असतं. त्याला संदेश मिळाला की ते कार्यरत होतं आणि भुकेची भावना जागृत करतं. त्या केंद्राला मिळणारे संदेश विविध प्रकारचे असतात. त्यातले काही शरीराच्या आतून उत्पन्न होतात. म्हणजेच ते अंतर्गत असतात, तर काही बाहेरून येणारे असतात.


शरीराला ऊर्जा मिळते ते ग्लुकोजच्या ज्वलनातून. त्यामुळे रक्तात ग्लुकोजचं प्रमाण एका निर्धारित पातळीवर नेहमी राहील याची व्यवस्था केलेली असते. ते जर त्या पातळीपेक्षा फारच चढलं तर ते आरोग्याला बाधक असल्यानं इन्सुलीन या संप्रेरकाचा  पाझर सुरू होतो. ते संप्रेरक ग्लुकोजची निर्धारित पातळी राखण्यात मदत करतं. जर ग्लुकोजची पातळी या निर्धारित प्रमाणापेक्षा फारच घसरली तर तो संदेश मिळून भुकेचं केंद्र जागृत होतं. त्यावेळी आपण पुरेसं अन्न पोटात टाकलं तर मग भुक मिटल्याची भावनाही याच केंद्रातून निर्माण केली जाते.

आपल्या पोटाचं आकारमानही विशिष्ट पातळीवर ठेवण्याची व्यवस्था केली जाते. तसंच ते काही विविक्षित प्रमाणात भरलेलं असेल हेही बघितलं जातं. पोट जर रिकामं झालं तर ते आकुंचन पावून त्याचं आकारमान घटतं. भुकेचं केंद्र जागृत करायला तोही एक संदेश पुरतो. अशा वेळी पाणी पिऊन आकारमान वाढवलं तरीही भुक भागल्याची भावना निर्माण होते.


आज जरी आपल्याला हवं तेव्हा अन्न उपलब्ध होत असलं तरी आदिमानवाच्या काळात जेव्हा रानावनात कंदमुळे गोळा करून किंवा शिकार करून मनुष्यप्राणी आपली पोषणाची गरज भागवत होता. तेव्हा अन्न केव्हा मिळेल याची शाश्वती नव्हती. त्यामुळे असं ते मिळालं की प्रत्यक्ष पोषणाची आवश्यकता असो-नसो, त्याच्या दर्शनाने किंवा गंधानंही भुकेची भावना चाळवली जात असे. उत्क्रांतीच्या ओघात हा गुणधर्म टिकून राहिला आहे. त्यामुळे स्वादिष्ट अन्न दिसलं किंवा त्याचा दरवळ नाकपुड्यांना चाळवून गेला म्हणजेही आपल्याला भूक लागते.


*-डाॅ.बाळ फोंडके यांच्या'का?'या पुस्तकातुन* 

═══════════════════════

कुतूहल


══════════════════

           *🤔 【 कुतूहल 】 🤔*  

______________________________

*🖥️✒️संकलन✒️💻*

गजानन गोपेवाड 

~==========================~


*कुतूहल : आणि जीवनाचे सूप तयार झाले!*


निसर्गात पहिल्या जीवाचा प्रवेश नेमका कसा झाला असेल बरे? ‘प्रारंभी पृथ्वीच्या वातावरणात प्राणवायूचे अस्तित्व नव्हते. म्हणूनच सेंद्रिय संयुगे तयार होण्यासाठी योग्य परिस्थिती होती. याच सेंद्रिय संयुगांनी जीवसृष्टीच्या उत्पत्तीला कच्चा माल पुरवला. ‘यावर कोणी तरी प्रयोग करायला हवा.’ हॅरॉल्ड युरे आपल्या भाषणात बोलत होते. स्टॅनले मिलर या विद्यार्थ्यांने ही कल्पना तात्काळ उचलून धरली. मिलरने आपल्या प्रयोगासाठी मिथेन, अमोनिया, बाष्प आणि हायड्रोजन यांचे मिश्रण वापरले. मिश्रणाला ऊर्जा पुरवण्यासाठी त्याने ‘स्पार्क डिस्चार्ज’चा उपयोग केला. दोन विद्युत अग्रांमध्ये थोडे अंतर ठेवून त्यांना प्रचंड विद्युत दाब दिला म्हणजे अग्रांमधील जागेत प्रकाशमय ठिणगी उमटते, त्याला स्पार्क डिस्चार्ज (विद्युतन्मोच) असे म्हणतात. हवा ही वस्तुत: विद्युत दुर्वाहक असली तरी प्रचंड विद्युत दाबाखाली हवेची विद्युत दुर्वाहकता नष्ट होते. पृथ्वीवरील प्रारंभीच्या वातावरणातील विद्युल्लतेचा चमचमाट म्हणजेच हा स्पार्क डिस्चार्ज. वायूच्या मिश्रणात स्पार्क डिस्चार्जद्वारा ऊर्जा प्रविष्ट केल्यानंतर पावसाचा आभास निर्माण करण्यासाठी ते मिश्रण एका थंड नळीतून जाऊ देण्यात आले. त्यामुळे पाण्याला उष्णता देऊन सागरातील पाण्याचे बाष्पीभवन होते तशी स्थिती निर्माण झाली. उष्णता पुरवण्याचा वेग, मिश्रणातील वायूंचे प्रमाण, तापमान, स्पार्क (ठिणगी) आणि थंडपणा या घटकात थोडे थोडे बदल करून मिलरने आपला प्रयोग सात दिवस चालू ठेवला. प्रयोग समाप्त झाला त्या वेळी उपकरणाच्या तळाशी ग्लायसिन आणि अ‍ॅनेलीन ही दोन अ‍ॅमिनो आम्ले साचलेली आढळली. अ‍ॅमिनो आम्ले जीवसृष्टीच्या धारणेचे मूळ घटक आहेत. आपल्या शरीरात एकूण २० उपयुक्त अ‍ॅमिनो आम्ले निसर्गाने वापरलेली आहेत. त्या उपकरणाच्या तळाशी युरिया, फॉर्मिक आम्ल, अ‍ॅसेटिक आम्ल आणि प्रॉपिऑनिक आम्ल असे सेंद्रिय रेणूदेखील तयार झालेले आढळून आले. हे सर्व रेणू जीवनिर्मितीसाठी आवश्यक आहेत. फॉर्मिक, अ‍ॅसेटिक आणि प्रॉपिऑनिक ही आम्ले स्निग्ध पदार्थाचे घटक आहेत. अ‍ॅमिनो आम्लशृंखलाच पुढे प्रथिने तयार करते. युरियामधील नत्र हे तर अनेक जैविक प्रक्रियांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.


या प्रयोगाचे निष्कर्ष प्रसिद्ध झाल्यावर विज्ञान जगतात कुतूहलाची एक लाट निर्माण झाली. प्रारंभीच्या काळात पृथ्वीवर मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेल्या साध्या रसायनांद्वारे जीवसृष्टी धारण करू शकेल अशी सेंद्रिय संयुगे निर्माण झाली. हीच संयुगे विविध प्रकारांनी सम्मीलित होऊन त्यामधून अत्यंत प्राथमिक स्तरावरील सूक्ष्म जीव निर्माण झाले. पुढे डार्विनच्या ‘नैसर्गिक निवड’ तत्त्वानुसार अधिक गुंतागुंतीची जीवसृष्टी विकसित होत गेली.



ब्रेल दिन 4 जानेवारी

 ➿➿➿➿➿➿➿➿➿➿

*➕➖➗✖️ लुई ब्रेल ✖️➗➖➕*

➿➿➿➿➿➿➿➿➿➿

*दृष्टिहीनांसाठी 'ब्रेल लिपी' तयार करणारा*


*जन्म -) ०४ जानेवारी १८०९*

   मृत्यू -) ०६ जानेवारी  १८५२


*आंतरराष्ट्रीय ब्रेल दिन*


      लुई ब्रेल हे फ्रेंच शास्त्रज्ञ, लेखक, शिक्षक होते. यांनी अंध व्यक्तींसाठी बोटांच्या सहय्याने वाचनाची पद्धत / लिपी विकसीत केली. लुई ब्रेल यांचा जन्म फ्रान्सच्या कुपव्रे नामक एका खेड्यात, गरीब आणि कष्टकरी कुटुंबात झाला. त्यांचे वडील सायमन-रेने ब्रेल हे एक जिनगर (घोड्याचे खोगीर, इ. कातडी माल तयार करणारे कारागीर) होते. तर आई मोनीक बॅरन ही एका शेतकर्‍याची मुलगी होती. दोन बहिणी आणि एका भावाच्या पाठीवर जन्मलेला लुई सगळ्यांचा लाडका होता. लुईच्या वडिलांची स्वतःची कार्यशाळा होती आणि ते दिवसभर आपल्या कार्यशाळेत कार्यमग्न असत.

लहानपणापासून लुई स्वावलंबी होता. त्याला पालकांकडून नेहमी प्रोत्साहन मिळत असे. स्पर्श आणि वासाच्या सहाय्याने छोटा लुई अनेक वस्तु सहज ओळखत असे आणि स्वतःची कामे स्वतःच करीत असे. १८१६ च्या सुमारास लुईच्या गावात ऍबे जाक पॅलुय नामक एक पाद्री आले. त्यांच्या मदतीने लुईचे शिक्षण सुरू झाले. सुरूवातीला त्यांनी लुईला वासाच्या आणि स्पर्शाच्या सहाय्याने वस्तु परिचय करून दिला, तसेच संगीत आणि बायबलचे शिक्षणही सुरू झाले. पुढे सुमारे एक वर्षाने लुईला त्याच्या गावातीलच सामान्य मुलांच्या शाळेत पाठविण्यात आले. अभ्यासात लुई हुशार होता, केवळ श्रवणाच्या जोरावर त्याने केलेली प्रगती पाहून अनेकांना आश्चर्य वाटे. या शाळेत लुई दोन वर्षे शिकला आणि त्यामुळे लुईला अनेक विषयात आवड निर्माण झाली.

पुढे पाद्री पॅलुय यांनी अनेक प्रयत्न करून पॅरीस येथील अंध मुलांच्या शाळेत (इन्स्टिट्युशन रोयाल्स देस जून्स ऍव्युग्लेस) लुईला प्रवेश मिळवून दिला. अंध मुलांसाठीच्या या जगातील पहिल्या शाळेत प्रवेश घेणारा लुई सगळ्यात लहान वयाचा विद्यार्थी होता. इतिहास, भूगोल, गणित, फ्रेंच, ग्रीक, संगीत असे अनेक विषय लुई या शाळेत सहजपणे शिकला, त्याने अनेक बक्षिसेही मिळविली. सहा वर्षात लुईने शाळेतील अभ्यासक्रम पूर्ण केला आणि तो त्याच शाळेत स्वयंसेवक, शिक्षक म्हणून काम करू लागला.

🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

संकलन -)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

Good morning

 🌳⛳ *शुभ प्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

पौष मास,शुक्ल पक्ष,*द्वितीया*,उ.षा.नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,शिशिर ऋतु,युगाब्द ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

मंगलवार, ०४ जानेवारी २०२२.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                         *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

सत्येन रक्ष्यते धर्मो

                   विद्या योगेन रक्ष्यते,

मृजया रक्ष्यते पात्रं 

                   कुलं शीलेन रक्ष्यते।


*भावार्थः- सत्य के पालन से धर्म की रक्षा होती है। सदा अभ्यास करने से विद्या की रक्षा होती है। मार्जन के द्वारा पात्र की रक्षा होती है और शील से कुल की रक्षा होती है।*

 ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

गाथा बलिदानाची सावित्रीबाई फुले

 ➿➿➿➿➿➿➿➿➿➿

*📚📚📚गाथा बलिदानाची📚📚📚*

➿➿➿➿➿➿➿➿➿➿

        

                *आद्यशिक्षिका*

      *ज्ञानज्योती, क्रांतिज्योती*

                    *ज्ञानाई*

   *सावित्रीबाई ज्योतीराव फुले*


   *जन्म : ३ जानेवारी १८३१*

       (नायगाव,सातारा,महाराष्ट्र)


       *मृत्यू : १० मार्च १८९७*

  (पुणे, सातारा जिल्हा, महाराष्ट्र)


चळवळ : मुलींची पहिली शाळा 

              सुरु करणे

संघटना : सत्यशोधक समाज

पुरस्कार : क्रांतीज्योती

प्रमुख स्मारके : जन्मभूमी नायगाव

धर्म : हिंदू

वडील : खंडोजी नेवसे(पाटील)

आई : सत्यवती नेवसे

पती : जोतीराव फुले

अपत्ये : यशवंत फुले


सावित्रीबाई जोतीराव फुले ह्या भारतीय शिक्षिका,कवयित्री व समाजसुधारक होत्या.फुले यांनी आशिया खंडातील पहिली मुलींची शाळा सुरू केली. महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या आरंभिक टप्प्यात त्यांचे पती जोतीराव फुले यांच्यासह त्यांनी मोठी कामगिरी बजावली. आपल्या नायगाव या गावावर त्यांनी एक प्रसिद्ध कविता लिहिली आहे. त्यांनी स्त्री व शूद्रांमधे शिक्षणाचा प्रसार केला असून त्या भारतातील पहिल्या मुख्याध्यापिका होत्या. त्यांनी विधवांचे होणारे केशवपन थांबवण्यासाठी पुण्यात न्हाव्यांचा संप घडवून आणला. त्यांचा मृत्यु प्लेग या आजाराने झाला.


💁‍♀ *चरित्र*


सावित्रीबाईंच्या आईचे नाव सत्यवती तर गावचे पाटील असणाऱ्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील होते. इ.स. १८४० साली जोतीराव फुले यांचेशी सावित्रीबाईंचा विवाह झाला. लग्नाच्या वेळी सावित्रीबाईंचे वय नऊ, तर जोतीरावांचे वय तेरा वर्षांचे होते. सावित्रीबाईचे सासरे गोविंदराव फुले हे मुळचे फुरसुंगीचे गोरे, परंतु पेशव्यांनी त्यांना पुण्यातील फुलबागेची जमीन बक्षीस दिली म्हणून ते पुण्याला येऊन राहिले व फुलांच्या व्यवसायावरून त्यांना "फुले" हे आडनाव मिळाले.


सावित्रीबाईंचे पती जोतीराव यांना लहानपणापासूनच मातृप्रेम लाभले नाही. त्यांची मावस बहीण सगुणाऊ यांनीच त्यांचा सांभाळ केला होता. सगुणाऊ एका इंग्रज अधिकाऱ्याच्या मुलाच्या दाई म्हणून काम करायच्या. त्यांना इंग्रजी कळायचे व बोलताही यायचे. त्यांनी आपल्या या ज्ञानाचा उपयोग जोतीरावांना प्रेरित करण्यासाठी केला. जोतीरावही शिक्षणाकडे आकर्षित झाले. सावित्रीबाईंना ख्रिश्चन मिशनऱ्यांनी लग्नापूर्वी दिलेले एक पुस्तक त्या सासरी घेऊन आल्या होत्या. त्यावरून जोतीरावांनाही एक नवा मार्ग सापडला. त्यांनी स्वतः शिकून सावित्रीबाईंना शिकवले. सगुणाऊ तर सोबत होतीच. दोघींनी रीतसर शिक्षण घेतले.


१ मे, इ.स. १८४७ रोजी सावित्रीबाईंनी सगुणाऊला मागासांच्या वस्तीत एक शाळा काढून दिली. ही त्यांची पहिली शाळा. गुणाऊंना त्या शाळेत बोलाविण्यात आले. सगुणाऊ तेथे आनंदाने व उत्साहाने शिकवू लागल्या. पुढे ही पहिली शाळा मध्येच बंद पडली. १ जानेवारी, इ.स. १८४८ रोजी "भिडेवाड्यात" जोतीराव आणि सावित्रीबाईंनी मुलींची शाळा काढली. साऱ्या कर्मठ समाजाच्या विरोधाला न जुमानता विवाहानंतर शिक्षण घेतले आणि शिक्षक, मुख्याध्यापक बनून शिक्षण दिले. केवळ चार वर्षांत १८ शाळा उघडल्या आणि चालवल्या. तत्कालीन ब्रिटिश भारतातली एतद्देशीय व्यक्तीने काढलेली ही पहिलीच मुलींची शाळा ठरली.


(यापूर्वी मिशनऱ्यांनी आणि अन्य लोकांनी काढलेल्या १४-१५ शाळा उत्तर भारतात होत्या.) या शाळेत सावित्रीबाई मुख्याध्यापिका म्हणून काम पाहू लागल्या. त्या काळात पुण्यातील अन्य भागांतही २-३ मुलींच्या शाळा त्यांनी सुरू केल्या व काही काळ चालवल्या. मुंबईतल्या गिरगावातही त्याच सुमारास स्टूडन्ट्स लिटररी ॲन्ड सायंटिफिक सोसायटीने ’कमळाबाई हायस्कूल’ नावाची मुलींसाठीची शाळा सुरू केली, ती शाळा २०१६ सालीही चालू आहे. (मिशनरी नसलेले पिअरी चरण सरकार यांनी मुलींसाठी पहिली शाळा बारासात टाऊन येथे १८४७ मध्ये काढली. शाळेसाठी नवीन कृष्ण मित्र आणि काली कृष्ण मित्र या दोन भावांनी आर्थिक मदत केली. ही शाळा कालीकृष्ण हायस्कूल या नावाने चालू आहे. मुंबईत पारशी लोकांनी १८४९ मध्ये मुले आणि मुलींसाठी पहिली सहशिक्षण शाळा काढली, पण काही दिवसातच या शाळेच्या मुलांसाठी आणि मुलींसाठी अशा दोन शाखा झाल्या.)


सावित्रीबाईंच्या शाळेत सुरुवातीला शाळेत सहा मुली होत्या, पण १८४८ साल संपेपर्यंत ही संख्या ४०-४५ पर्यंत जाऊन पोहोचली. या यशस्वी शाळेचे स्वागत सनातनी उच्च वर्णीयांनी "धर्म बुडाला.... जग बुडणार.... कली आला...." असे सांगून केले. सनातन्यांनी विरोध केला. अंगावर शेण फेकले. काही उन्मत्तांनी तर अंगावर हात टाकण्याची भाषा केली. पण अनेक संघर्ष करत हा सावित्रीबाईंचा शिक्षणप्रसाराचा उपक्रम चालूच राहिला. त्यासाठी त्यांना घर सोडावे लागले. सगुणाऊ सोडून गेली. अनेक आघात होऊनही सावित्रीबाई डगमगल्या नाहीत.


शिक्षणाच्या प्रसारासाठी अन्य सामाजिक क्षेत्रांतही काम करणे गरजेचे आहे, स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे हे सावित्रीबाईंनी ओळखले. काही क्रूर रूढींनाही त्यांनी आळा घातला. बाल-जरठ विवाहप्रथेमुळे अनेक मुली वयाच्या बारा-तेराव्या वर्षी विधवा व्हायच्या. ब्राह्मण समाजात विधवा पुनर्विवाह अजिबात मान्य नव्हता. पतीच्या निधनानंतर अशा विधवांना सती जावे लागे किंवा मग त्यांचे केशवपन करून कुरूप बनविले जाई. विरोधाचा अधिकार नसलेल्या या विधवा मग कुणातरी नराधमाच्या शिकार बनत. गरोदर विधवा म्हणून समाज छळ करणार, जन्माला येणाऱ्या मुलाला यातनांशिवाय काहीच मिळणार नाही अशा विचारांनी या विधवा आत्महत्या करत किंवा भ्रूणहत्या करत.


जोतिरावांनी या समस्येवर उपाय म्हणून बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले. सावित्रीबाईंनी ते समर्थपणे चालवले. फसलेल्या वा बलात्काराने गरोदर राहिलेल्या विधवांचे त्या बाळंतपण करत. या बालहत्या प्रतिबंधक गृहातील सर्व अनाथ बालकांना सावित्रीबाई आपलीच मुले मानत. याच ठिकाणी जन्मलेल्या काशीबाई या ब्राह्मण विधवेचे मूल त्यांनी दत्तक घेतले. त्याचे नाव यशवंत ठेवले.


केशवपन बंद करण्यासाठी नाभिक समाजातील लोकांचे प्रबोधन करणे व त्यांचा संप घडवून आणणे, पुनर्विवाहाचा कायदा व्हावा यासाठी प्रयत्न करणे अशी अनेक कामे सावित्रीबाईंनी कल्पकतेने पार पाडली. सत्यशोधक समाजाच्या कार्यातही सावित्रीबाईंचा मोठा सहभाग असे. महात्मा फुले यांच्या निधनानंतर (इ.स. १८९०) सावित्रीबाईंनी सत्यशोधक समाजाच्या कार्याची धुरा वाहिली. आपल्या विचारांचा प्रसार त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून केला. ‘काव्यफुले’ व ‘बावनकशी सुबोध रत्नाकर’ हे काव्यसंग्रह त्यांनी लिहिले. पुढील काळात त्यांची भाषणेही प्रकाशित करण्यात आली.


इ.स. १८९६ सालातल्या दुष्काळात सावित्रीबाईंनी समाजाला सत्कार्याचा आदर्श घालून दिला. पोटासाठी शरीरविक्रय करणाऱ्या बाया-बापड्यांना दुष्टांच्या तावडीतून सोडवून त्यांनी त्यांना सत्यशोधक कुटुंबांत आश्रयास पाठविले. त्यांच्या कार्याला हातभार म्हणून पंडिता रमाबाई, गायकवाड सरकार अशा लोकांनी मदतीचा हात पुढे केला.


इ.स. १८९६-९७ सालांदरम्यान पुणे परिसरात प्लेगच्या साथीने धुमाकूळ घातला. हा जीवघेणा आजार अनेकांचे जीव घेऊ लागला. हा रोग संसर्गजन्य आहे हे कळल्यावर ब्रिटिश शासनाने जबरदस्तीने संभाव्य रुग्णांना वेगळे काढून स्थानांतरित करण्याचा खबरदारीचा उपाय योजला. यातून उद्भवणारे हाल ओळखून सावित्रीबाईंनी प्लेगपीडितांसाठी पुण्याजवळ वसलेल्या ससाणे यांच्या माळावर दवाखाना सुरू केला. त्या रोग्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना आधार देऊ लागल्या. प्लेगच्या रोग्यांची सेवा करताना सावित्रीबाईंनाही प्लेग झाला. त्यातून १० मार्च, इ.स. १८९७ रोजी त्यांचे निधन झाले.


सावित्रीबाईनी जोतिबांच्या सर्व कार्यात हिरीरीने भाग घेतला स्त्रियांनी शिकावे हे त्यांचे ब्रीद वाक्य होते. अनाथांना आश्रय मिळवा हेही त्याचे कार्यक्षेत्र होते. सामजिक कार्यात त्यांचा पुढाकार असे. त्यामुळेच १८७६–७७ च्या दुष्काळात त्यांनी खूप कष्ट केले. पुढे १८९७ मध्ये प्लेगची भयंकर साथ आली असताना त्यांनी आपल्या स्वतः च्या प्रकृतीचीही पर्वा न करता प्लेगची लागण झालेल्यांसाठी काम केले. दुर्दैवाने त्या स्वतःच प्लेगच्या भीषण रोगाच्या बळी ठरल्या. प्लेग मुळेच त्यांचे निधन झाले.


🎖 *सत्कारी*


पुणे येथील हे शिक्षण कार्य पाहून १८५२ मध्ये ईस्ट इंडिया कंपनी सरकारने फुले पतिपत्‍नींचा मेजर कॅन्डी यांच्या हस्ते जाहीर सत्कार केला आणि शाळांना सरकारी अनुदानही देऊ केले. त्यानंतरही सावित्रीबाई फुल्यांनी, भारतातल्या त्या पहिल्या शिक्षिकेने आपले शिक्षण देण्याचे व्रत चालूच ठेवले. त्यांनी ’गृहिणी’ नावाच्या मासिकात काही लेखही लिहिले आहेत. *सावित्रीबाईंच्या सामजिक कार्याबद्दल कृतज्ञता म्हणून १९९५ पासुन ३ जानेवारी हा सावित्रीबाईचा जन्मदिन हा “बालिकादिन ” म्हणून साजरा केला जातो.*

 

🌐 *गूगल डूडल*


३ जानेवारी, २०१७ रोजी सावित्रीबाई फुले यांच्या १८६ व्या जन्मदिनानिमीत्त त्यांचे गूगल डूडल प्रसिद्ध करुन गूगलने त्यांना अभिवादन केले.


📺 *दूरदर्शन मालिका*


सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर दूरदर्शनच्या ’किसान’ वाहिनीवर २८ सप्टेंबर २०१५ पासून सोमवार ते शुक्रवार या काळात सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावरील का हिंदी मालिदाखविली जात आहे.


📙 *सावित्रीबाईंची प्रकाशित पुस्तके*


काव्यफुले (काव्यसंग्रह)

सावित्रीबाईंची गाणी (१८९१)

सुबोध रत्नाकर

बाव नकशी


📚 *सावित्रीबाई फुले यांच्यावरचे प्रकाशित साहित्य, कार्यक्रम वगैरे*


Savitribai - Journey of a Trailblazer (Publisher : Azim Premji University)

'हाँ मैं सावित्रीबाई फुले' (हिंदी), (प्रकाशक : अझीम प्रेमजी विद्यापीठ)

सावित्रीबाई फुले (लेखक : अभय सदावर्ते)

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले (लेखिका उषा पोळ-खंदारे)

Savitribai Phule (इंग्रजी, N. K. Ghorpde)

कर्मयोगिनी सावित्रीबाई फुले (लेखिका डाॅ. किरण नागतोडे)

सावित्रीबाईचा संघर्ष (के.डी. खुर्द)

थोर समाजसेविका सावित्रीबाई फुले (केतन भानारकर)

पुण्यश्लोक सावित्रीबाई फुले (गौरी पाटील)

युगस्त्री सावित्रीबाई फुले (विठ्ठल लांजेवार)

सावित्रीबाई फुले (लेखक : जी.ए. उगले)

सावित्रीबाई फुले (लेखक : डी.बी. पाटील )

जोतिकांता सावित्री (दा.स. गजघाटे)

सावित्रीबाई फुले (प्रा. झुंबरलाल कांबळे)

Shayera.Savitri Bai Phule (in urdu) Author Dr. Nasreen Ramzan Sayyed

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले (लेखक : ना.ग. पवार)

सावित्रीबाई फुले : अष्टपैलू व्यक्तिमत्त्व (लेखक : ना.ग. पवार)

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले (लेखक : नागेश सुरवसे)

स्त्री महात्मा सावित्रीबाई फुले (नाना ढाकुलकर)

मी जोतीबांची सावित्री (नारायण अतिवाडकर)

सावित्रीबाई फुले (लेखिका : निशा डंके)

सावित्रीबाई फुले (लेखिका : प्रतिमा इंगोले )

सावित्रीबाई फुले (प्रमिला मोडक)

थोर समाजसेविका सावित्रीबाई फुले (प्रेमा गोरे)

साध्वी सावित्रीबाई फुले (लेखिका : फुलवंता झोडगे). - चिनार प्रकाशन

सावित्रीबाई फुले चरित्र (बा.गं. पवार)

तेजाचा वारसा सावित्रीबाई फुले (लेखिका : प्रा. मंगला गोखले)

क्रांतिज्योती सावित्रीबाई जोतीराव फुले (डाॅ. मा.गो. माळी) - मॅजेस्टिक प्रकाशन

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले (डाॅ. मा.गो. माळी) - स्नेहवर्धन प्रकाशन

सावित्रीबाई फुले - श्रद्धा (लेखक : मोहम्मद शाकीर)

सावित्रीबाई फुले (लीला शाह)

ज्ञान ज्योती माई सावित्री फुले (लेखिका : विजया इंगोले)

त्या होत्या म्हणून (लेखिका : डॉ. विजया वाड)

Savitribai Phule (इंग्रजी, विठ्ठलराय भट)

युगस्त्री : सावित्रीबाई फुले (विठ्ठल लांजेवार)

सावित्रीबाई जोतिबा फुले : जीवनकार्य (शांता रानडे)

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले (लेखिका : शैलजा मोलक)

साध्वी सावित्रीबाई फुले (सविता कुलकर्णी) - भारतीय विचार साधना प्रकाशन

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले (सौ. सुधा पेठे)

'व्हय मी सावित्रीबाई फुले' (नाटक) (एकपात्री प्रयोगकर्ती आद्य अभिनेत्री : सुषमा देशपांडे) (अन्य सादरकर्त्या - डॉ. वैशाली झगडे)

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले (विद्याविकास) (लेखक : ज्ञानेश्वर धानोरकर)


🏵 *सावित्रीबाई संमेलन/अभ्यासकेंद्र/पुरस्कार*


सावित्रीबाई फुले यांच्या नावाने एक सावित्रीबाई फुले साहित्य संमेलन भरते. याशिवाय, द्वितीय ज्योती-सावित्री साहित्य संमेलन या नावाचे पहिले राज्यस्तरीय संमेलनही नागपूर येथे २-३ जानेवारी २०१२ या तारखांना भरले होते.


*पुणे विद्यापीठाच्या नावाचा विस्तार करून ते ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ’ असे करण्यात आले आहे.*


*पुणे विद्यापीठात ‘क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्त्री अभ्यास केंद्र' या नावाचे एक अभ्यासकेंद्र आहे.*


🏆 *सावित्रीबाई फुले यांच्या नावाने काही संस्थांनी पुरस्कार ठेवले आहेत. ते असे :-*


▪कविवर्य नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने देण्यात येणारा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय पुरस्कार.

▪पिंपरी-चिंचवड महापालिकेचा सामाजिक कार्यासाठीचा 'सावित्रीबाई फुले पुरस्कार'. हा पुरस्कार २०११-१२ सालापासून दरवर्षी, महिला-बालकल्याण क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या एका समाजसेविकेस दिला जातो. ५००१ रुपये रोख, व सन्मानपत्र, शाल व श्रिफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

▪महाराष्ट्र सरकारचा सावित्रीबाई फुले पुरस्कार

▪चिंचवडगाव येथील महात्मा फुले मंडळाचे क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले पुरस्कार

▪महात्मा फुले प्रतिभा संशोधन अकादमी (पुणे) तर्फे सावित्रीबाई तेजस कला राष्ट्रीय पुरस्कार

▪क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले 'आदर्श माता' पुरस्कार

▪क्रांतिज्योती सावित्रीबाई आदर्श शिक्षिका पुरस्कार

▪मध्य प्रदेश सरकारचा उत्तम शिक्षिकेसाठीचा एक लाख रुपयांचा वार्षिक सावित्रीबाई पुरस्कार (२०१२ सालापासून)

▪सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या वतीने विविध क्षेत्रात काम करणाऱ्या स्त्रियांना दिले जाणारे स्त्रीरत्‍न पुरस्कार : आदर्श माता रत्‍न, उद्योग रत्‍न, कला रत्‍न, क्रीडा रत्‍न, जिद्द रत्‍न, पत्रकारिता रत्‍न, प्रशासकीय रत्‍न, वीरपत्‍नी रत्‍न, शिक्षण रत्‍न

▪मराठी पत्रकार परिषदेचा सावित्रीबाई फुले पुरस्कार

▪महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचा सर्वोत्कृष्ट नर्सला देण्यात येणारा सावित्रीबाई फुले पुरस्कार

▪महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सासवडचे शाखेतर्फे सामाजिक / शैक्षणिक कामासाठीचा सावित्रीबाई पुरस्कार

▪माझी मैत्रीण ट्रस्टतर्फे देण्यात येणारा सावित्रीबाई फुले पुरस्कार : २११६ साली हा पुरस्कार सहेली संस्थेच्या तेजस्वी सेवेकरी यांना देण्यात आला.

▪युनाइटेड ओबीसी फोरमचा सावित्रीवाई फुले वैचारिक वाङ्मय पुरस्कार.

▪वसईच्या लोकमत सखी मंच आणि प्रगत सामाजिक शिक्षण संस्था यांच्यातर्फे देण्यात येत असलेला सावित्रीबाई फुले पुरस्कार

▪सावित्रीवाई फुले यांच्या नावाची दत्तक-पालक योजना आहे.

🇮🇳🇮🇳🇮🇳 *जयहिंद*🇮🇳🇮🇳🇮🇳

🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

संकलन-)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६


प्रभात दर्शन

 🌳⛳ *शुभ प्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

पौष मास,शुक्ल पक्ष,*प्रथमा*,पू.षा.नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,शिशिर ऋतु,युगाब्द ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

सोमवार, ०३ जानेवारी २०२२.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                         *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

         *"हमारे जीवन में गीता, रामायण एवं अन्य धार्मिक ग्रन्थों के साथ-साथ महान पुरुषों के द्वारा समय समय पर कहे गए बहुमूल्य सन्देश का भी अत्यंत महत्व है, हम सभी का यह नैतिक और सामाजिक दायित्व है कि जीवन में सकारात्मक परिवर्तन के लिए इन सन्देशों को अपनायें एवं आगे बढ़ाएं।"*

 ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

शनिवार, १ जानेवारी, २०२२

गाथा बलिदानाची विष्णू पिंगळे

 ➿➿➿➿➿➿➿➿➿➿

*🇮🇳🇮🇳गाथा बलिदानाची🇮🇳🇮🇳*

➿➿➿➿➿➿➿➿➿➿

   

*क्रांतिरत्न विष्णु गणेश पिंगळे*


     *जन्म : ०२ जानेवारी १८८८*

[तळेगाव (ढमढेरे) महाराष्ट्र,भारत]


   *फाशी : १६ नोव्हेंबर १९१५*

    (लाहोर कारागृह,पाकिस्तान)


स्वा. सावरकरांच्या ‘अभिनव भारत’ या संघटनेद्वारा पसरलेली क्रांतीची ज्वाळा ते काळ्या पाण्यावर गेले तरी विझली नाही. त्यांच्या पासून स्फूर्ती घेतलेले हिंदुस्थानचे युवक चारी खंडात पसरले आणि पहिलं महायुद्ध सुरु होताच त्यांनी सशस्त्र क्रांतीनं हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी निकराचा प्रयत्न केला तो गदर उत्थान म्हणून इतिहासात प्रसिद्ध झाला. गदर चळवळीतील एक महत्वाचं नाव म्हणजे क्रांतिरत्न विष्णु गणेश पिंगळे ! 


पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे या गावच्या गरीब घरात २ जानेवारी १८८८ मध्ये विष्णू गणेश पिंगळे यांचा जन्म झाला. तीन भाऊ आणि चार बहिणींनंतरचं हे शेंडेफळ. चाकोरीपेक्षा काहीतरी वेगळं करण्याच्या स्वभावामुळे ते कोल्हापूरच्या ‘समर्थ विद्यालयात’ दाखल झाले. नंतर ते विद्यालय तळेगाव दाभाडे इथं सुरु झालं, तिथं ते आले. राष्ट्रीय वृत्तीची जोपासना करणारं हे विद्यालय ब्रिटीशांच्या रोषाला बळी पडून १९१० मध्ये बंद झालं. मग त्यांनी काही काळ मुंबईत नोकरी केली, नंतर स्वदेशी चळवळीला हातभार लावण्यासाठी त्यांनी लातूर जवळ हातमाग टाकले. मग मेकॅनीकल इंजिनियर किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअर बनण्याचं स्वप्न उराशी बाळगून, घरी काहीही न सांगता ते १९११ मध्ये थेट अमेरिकेत पोहोचले.  शैक्षणिक खर्च भागवण्यासाठी तिथे त्यांनी अपार कष्ट केले. ते अमेरिकेत असल्याची वार्ता कित्येक महिन्यांनी त्यांच्या घरच्यांपर्यंत पोहोचली. सावरकरांचे अभिनव भारत मधील निकटचे सहकारी लाला हरदयाळ यांनी अमेरिकेत गदर चळवळ सुरु केली होती. १९१४ ला महायुद्ध सुरु होताच, हिंदुस्तानात जाऊन क्रांती करण्याची हीच योग्य संधी आहे असा प्रचार त्यांनी गदर पत्रातून सुरु केला आणि विष्णु गणेश पिंगळे आपल्या कष्टसाध्य सुंदर भविष्यावर अक्षरश: लाथ मारून गदर मध्ये सामिल झाले आणि हिंदी सैन्य स्वातंत्र्यासाठी क्रांतिकार्याकडे वळवण्याच्या विभागाचे प्रमुख झाले.


सप्टेंबर १९१४ मध्ये ‘कोमा गाटा मारू’ हे जहाज शेकडो शिख क्रांतिकारकांना घेऊन हिंदुस्थानात पोहोचलं. त्यानंतर अनेक शीख वेगवेगळ्या जहाजातून परतत राहिले. नोव्हेंबर मध्ये पिंगळे गुप्तपणे हिंदुस्तानात परतले ते ही शांघाय सारख्या काही ठिकाणी जहाल भाषणं करतच. मराठी, हिंदी, उर्दू, इंग्रजी, बंगाली, पंजाबी भाषेवर प्रभुत्व असलेले पिंगळे पंजाब, बंगाल मध्ये वेश, नावं बदलून क्रांतिकारकांच्या  भेटी घेत, गदरचा प्रचार करीत राहिले. हिंदू, शीख, मुसलमान एकत्र आले. रासबिहारी बोस, सचिंद्रनाथ यांच्या सहाय्यानं पिंगळे यांनी उठावाची योजना आखली होती. सबंध पंजाब, बंगालपासून ते सिंगापूरपर्यंत क्रांतीची बीजं पेरली गेली होती. शस्त्र, बॉंबगोळे जमवले गेले होते. गनिमी काव्यानं ब्रिटीश सरकारला नामोहरम करण्याची ती  योजना प्रत्यक्षात आली असती तर लाहोरपासून सिंगापूरपर्यंत १८५७ सारखी पण एक यशस्वी उठावणी झाली असती. पण याही वेळी फितुरी झाली आणि बाजी पलटली. मीरत इथल्या लष्करी छावणीत फितुरीनं विष्णु गणेश पिंगळे पकडले गेले, कट उधळला गेला. त्यावेळी त्यांच्याकडे बॉम्ब आणि काही ज्वालाग्राही पदार्थ सापडले. या चळवळीतील ८१ आरोपींपैकी ७ जणांची फाशीची शिक्षा कायम झाली. ते होते विष्णु गणेश पिंगळे, कर्तारसिंग सराबा, सरदार बक्षिससिंग, सरदार जगनसिंग, सरदार सुरायणसिंग, सरदार ईश्वरसिंग आणि सरदार हरनामसिंग. त्यांना १६ नोव्हेंबर १९१५ ला फाशी देण्यात आलं. ( Who’s who of Indian Martyrs या शासकीय ग्रंथानुसार हा दिनांक दिला आहे) हे सर्वजण खरोखरच हसत हसत, वंदे मातरम् च्या जयघोषात फासावर गेले. फाशीची शिक्षा ऐकल्यावरचे विष्णु गणेश पिंगळे यांचे शब्द होते ‘so that’s’ all’. त्यांना शेवटची इच्छा विचारली असता त्यांनी, हातकड्या काढून, दोन्ही हात जोडून प्रार्थना करू देण्यास सांगितले. प्रत्यक्ष मृत्यू समोर उभा ठाकला असता पिंगळे यांचे शब्द होते, *“हे परमेश्वरा, ज्या पवित्र कार्यासाठी आम्ही प्राणांचे बलिदान देत आहोत ते कार्य तू पूर्ण कर”*. विष्णू गणेश पिंगळे यांचं धैर्य, मोडेन पण वाकणार नाही ही त्यांची वृत्ती याचं क्लिव्हलंड या अधिकाऱ्यालाही कौतुक वाटलं होतं. या सर्वच  क्रांतिकारकांच्या कुटुंबियाचं आयुष्यही त्यांच्याबरोबरच पणाला लागत असे. विष्णू गणेश पिंगळे यांच्या नातेवाईकांचे भोगही चुकले नाहीत. वयाच्या अवघ्या सत्ताविसाव्या वर्षी या भारतभूमीच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या विष्णू गणेश पिंगळे, त्यांचे सहकारी आणि त्यांचे कुटुंबिय या साऱ्यांचं हे स्मरण !!

🇮🇳🇮🇳🇮🇳 *जयहिंद*🇮🇳🇮🇳🇮🇳

🙏🙏🌞 शुभ प्रभात🌞🙏🙏

संकलन -) गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

जेष्ठ शास्त्रज्ञ वसंत गोवारीकर स्मृतिदिन

 ➿➿➿➿➿➿➿➿➿➿

*ज्येष्ठ शास्त्रज्ञ  वसंत गोवारीकर*

➿➿➿➿➿➿➿➿➿➿


  *जन्म -) १९३३*


*स्मृतिदिन - २ जानेवारी २०१५*


अवकाश संशोधन, हवामान शास्त्र आणि लोकसंख्या क्षेत्रातील त्यांचे संशोधन अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जाते. डॉ. वसंत रणछोडदास गोवारीकर यांचा जन्म १९३३ साली कोल्हापूरला झाला. कोल्हापूरला एमएस्सी करून त्यांनी लंडनच्या बìमगहॅम विद्यापीठातून पीएचडीची पदवी प्राप्त करून घेतली. त्यानंतर त्यांनी ब्रिटनच्या एटॉमिक एनर्जी व एव्हिएशनमध्ये काम केले. या वेळी भारताच्या अवकाश संशोधनशास्त्राचे प्रमुख डॉ. विक्रम साराभाई यांनी त्यांना भारतीय अवकाश संशोधन कार्यक्रमासाठी भारतात बोलावून घेतले. १९६७ साली ते थुम्बा येथे रुजू झाले. अग्निबाणांसाठी लागणारे घन इंधन बनवण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. त्यासाठी त्यांनी प्रॉपेलंट इंधन कॉम्प्लेक्स, अमोनियम परक्लोरेट प्लान्ट अशी युनिट्स स्थापन केली. सॉलिड प्रॉपेलंट स्पेस बूस्टर प्लान्ट हे जगातले सर्वात मोठे युनिट त्यांनी स्थापन केले. त्यांनी बनवलेले एचटीपीबी हे घन इंधन विकसित करून आता ३० वष्रे झाली तरी आजही ते जगातले अद्ययावत असे इंधन आहे. १९७९ साली डॉ. वसंत गोवारीकर हे विक्रम साराभाई अवकाश केंद्राचे संचालक झाले. १९८७ ते १९९३ या कालावधीत गोवारीकर भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याचे सचिव आणि पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार होते. त्यांनी हवामानाचा अचूक अंदाज घेण्यासाठी मॉडेलही त्यांनी तयार केले. नंतर या मॉडेलला गोवारीकर मॉडेल म्हणून नाव देण्यात आले.

🙏🌞🙏शुभ प्रभात🙏🌞🙏

संकलन -)गजानन गोपेवाड  

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

प्रभात दर्शन

 🌳⛳ *शुभ प्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

पौष मास,कृष्ण पक्ष, *चतुर्दशी*,मूल नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,शिशिर ऋतु,युगाब्द ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

रविवार, ०२ जानेवारी २०२२.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                         *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


साधू ऐसा चाहिये, 

                      जैसा सूप सुभाय,

सार सार को गहि रहे, 

                      थोथा देय उडाय।


*भावार्थः- साधू अथार्त सज्जन मनुष्य का स्वभाव छाज की तरह होना चाहिये। जो श्रेष्ठ तत्वों अथार्त ज्ञान को ग्रहण करते हैं और निरर्थक बातों का त्याग कर देते हैं।*

 ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

गुरुवार, ३० डिसेंबर, २०२१

पृथ्वी स्वतःभोवती गिरकी का मारते


══════════════════════

   *@ संकलन @*

  *श्री. गजानन गोपेवाड 

══════════════════════

            🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════   

🌎 *पृथ्वी स्वतःभोवती गिरकी का मारते?* 

"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""

आपली पृथ्वीच नाही तर सगळे ग्रह अशी गिरकी घेत असतात. प्रत्येकाचा अशी एक प्रदक्षिणा करण्याचा 'वेग' वेगवेगळा असतो. ज्या प्रक्रियेतून ग्रहांचा जन्म होतो, त्याचाच हा परिणाम आहे. आकाशात इतस्तत: अनेक पदार्थ, वायू वेडेवाकडे पसरलेले असतात. त्यापैकी प्रत्येकाला इतर सर्वांच्या गुरुत्वाकर्षणाची ओढ जाणवत असते. कालांतराने त्या अोढीपायी त्यातले काही पदार्थ एकत्र येतात. त्यांचा जुडगा बनतो. साहजिकच त्याचं वस्तुमान जास्त असल्यामुळे त्यांची इतरांना वाटणारी ओढ जास्त होते. त्यामुळे पदार्थांचे आणखी काही कण त्याला येऊन चिकटतात. अशा साखळी पद्धतीने हळूहळू ग्रहाचा जन्म होतो. तो होत असताना त्या गुरुत्वाकर्षणाच्या सर्व बाजूंना सारख्याच वाटणाऱ्या ओढीपायी ते पदार्थ ओढले जात असताना त्यांना चक्राकार गती मिळते. तीच मग ते पदार्थ ज्याला चिकटतात त्या ग्रहांकुरालाही मिळते.


ग्रहांकुराच्या केंद्रस्थानात त्यातल्या पदार्थाची घनता साहजिकच जास्त असते. एखादा लाडू वळताना तो दाबला जात असतो. त्यामुळे त्याचा मध्यभाग जास्त घट्ट झालेला असतो तशातलाच हा प्रकार. त्यामुळं त्या ग्रहाच्या परिघावरच्या पृष्ठभागाला केंद्राच्या गुरुत्वाकर्षणाची जास्त ओढ वाटते. पण विखुरलेल्या पदार्थांपासून घन ग्रहाचा जन्म होताना त्याचा व्यास कमी होत जातो. त्यामुळे त्या वर्तुळाकार गतीचा वेगही वाढत जातो. कथक नृत्य करणारी नर्तकी जेव्हा गिरकी घ्यायला लागते तेव्हा त्या गिरकीची गती वाढवायची असेल तर ती आपले हात अंगासरशी ओढून घेते, म्हणजेच अंगाच्या गोलाचा व्यास कमी करते. तेच हा हात पसरलेले असले की त्या गिरकीचा वेगही कमी होतो. तशीच ग्रहाचीही अवस्था असते. त्याचा पसारा कमी होत जातो, तो अधिक घन बनतो तसा त्याचा वर्तुळाकार भ्रमणाचा वेगही वाढत जातो. त्यामुळे गिरकी घेणं हा प्रत्येक ग्रहाचा स्थायीभावच आहे. पृथ्वी ही त्याला अपवाद नाही.


मग चंद्र का गिरकी घेत नाही ? त्याचा एक भाग सतत आपल्या डोळ्यांसमोर राहतो ते का ? असे प्रश्न कोणीही विचारेल; पण चंद्र गिरकी घेत नाही हे म्हणणं चुकीचं आहे. चंद्राचा स्वतःभोवती गिरकी घेण्याचा वेग हा पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालण्याच्या वेगाइतकाच असल्यामुळे त्याचा एक चेहरा आपल्याला सतत दिसत असतो एवढंच. एरवी आकाशातला इतर कोणत्याही गोल गोलासारखा तोही स्वतःभोवती गिरकी घेतच असतो.


*-डाॅ.बाळ फोंडके यांच्या'का?'या पुस्तकातुन* 


राँबर्ट बायल रसायनशास्त्रज्ञ स्मृतिदिन

 *⚗️⚗️⚗️⚗️रॉबर्ट बॉयल⚗️⚗️⚗️⚗️*

*🧪⚗️🧪रसायनशास्त्रज्ञ🧪⚗️🧪*

⚗️⚗️⚗️⚗️⚗️⚗️⚗️⚗️⚗️⚗️⚗️

*स्मृतिदिन - ३१ डिसेंबर १६९१*


रॉबर्ट बॉइलचा जन्म २५ जानेवारी १६२७ रोजी आयर्लंडमध्ये झाला. त्याचे वडील रिचर्ड बॉइल मोठे जमीनदार होते. रॉबर्ट बॉइलने लहानपणीच लॅटिन, ग्रीक आणि फ्रेंच भाषा आत्मसात केल्या.


त्याची आई तो नऊ वर्षांचा असतानाच मृत्यू पावली. त्यानंतर पुढील शिक्षण त्याने इंग्लंड व इटली येथे घेतले. सन १६४३ मध्ये त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला. त्यांनी रॉबर्टसाठी मोठी इस्टेट मागे ठेवली होती.


रॉबर्टने स्वत:ला शास्त्रीय संशोधनात वाहून घ्यायचे ठरविले. त्याने हवेच्या गुणधर्मांचा अभ्यास करून अनेक प्रयोग केले. ‘स्थिर तापमानात वायूचे आकारमान व दाब हे व्यस्त अनुपाती असतात.


याचे त्याने प्रतिपादन केले. हाच, पुढे बॉइलचा सिद्धांत म्हणून प्रसिद्ध झाला. ध्वनीच्या संक्रमणातील हवेचा सहभाग, गोठणाऱ्या पाण्याचे प्रसरणात्मक बल, विशिष्ट गुरुत्व, अपवर्तन इत्यादी भौतिकशास्त्रातील अनेक गोष्टींबद्दल जरी रॉबर्टने संशोधन केले असले तरी रसायनशास्त्रात त्याला विशेष रस होता.


संयुगे आणि मिश्रणामधील फरक, त्यांचे पृथक्करण, ज्वलनक्रिया आणि श्वसनक्रिया यांचा त्याने अभ्यास केला होता. जीवशास्त्रात प्राण्यांचे विच्छेदन वगैरे करावे लागे, म्हणून त्याचा जीव जीवशास्त्रात मात्र कधीच रमला नाही.

🙏🌞🙏 शुभ प्रभात🙏🌞🙏

संकलन -)

गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

प्रभात दर्शन

 🌳⛳ *शुभ प्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

मार्गशीष मास,कृष्ण पक्ष, *द्वादशी*,अनुराधा नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,शिशिर ऋतु,युगाब्द ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

शुक्रवार, ३१ डिसेंबर २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                         *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

        *जिस प्रकार कमरे में प्रकाश करते ही अँधेरा स्वयं लुप्त हो जाता है। वैसे ही यथार्थ बोध प्राप्त करो- अज्ञान, काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार स्वयं ही पलायन कर जायेंगे और आपको सत्य ईश्वर के दर्शन स्वतः होने लगेंगे। अंधकार का आवरण हटाओ, ईश्वर के प्रकाश से आप प्रकाशित हो जायेंगे।*

 ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

बुधवार, २९ डिसेंबर, २०२१

प्रभात दर्शन

 🌳⛳ *शुभ प्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

मार्गशीष मास,कृष्ण पक्ष, *दशमी*,स्वाति नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,शिशिर ऋतु,युगाब्द ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

बुधवार, २९ डिसेंबर २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                         *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


गते शोको न कर्तव्यो 

                  भविष्यं नैव चिन्तयेत्

वर्तमानेन  कालेन 

                  वर्तयन्ति विचक्षणाः।


*भावार्थ -  बीते हुए समय का शोक नहीं करना चाहिए और भविष्य के लिए चिंतित नहीं होना चाहिए। बुद्धिमान मनुष्य तो वर्तमान मे ही कार्य करते हैं, क्योंकि भविष्य सदा वर्तमान के गर्भ से ही निकलता है।*

 ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

मधमाशी चावल्यावर काय होते

 📙 *मधमाशी चावल्यावर काय होतं ?* 📙


डासांचा चावा असं म्हटलं जातं, पण मधमाशीचा असतो तो डंख. याचं कारण म्हणजे जेव्हा मधमाशी डसते तेव्हा ती एक विष आपल्या शरीरात सोडत असते. सहसा मधुपर्काच्या शोधात असलेली मधमाशी डंख करत नाही; पण ती तुडवली गेली आणि एखाद्या व्यक्तीपासून तिच्या पोळ्याला धोका आहे असं तिला जाणवलं तर मात्र त्वेषानं तुटून पडते. तरीही मधमाशी एकदाच डंख करू शकते, कारण डंख करण्यासाठी तिच्या अंगी जो एक सुईसारखा अवयव असतो, याला स्टिंग असंच म्हणतात, तो तुटून आपल्या शरीरातच अडकून पडतो. खरंतर ही सुई साधी नसते. या सुईच्या दोन्ही बाजूला तिला जोडलेले दोन काटेरी पट्टे असतात. ते वर खाली होऊ शकतात. यातला एक पट्टा आपल्या कातडीत शिरून तिथे अडकून पडतो. त्यामुळे तो आणखी आत ओढला जाऊन सुईला आपल्याबरोबर ओढून नेतो. त्याबरोबर आता दुसऱ्या बाजूचा काटेरी पट्टा आपली हालचाल करू लागतो. असं करत ते सुईला कातडी पार करून आपल्या मांसल स्नायूपर्यंत पोचवतात. त्यावेळीच ते विष शरीरात सोडलं जातं. हे सारं सव्यापसव्य करताना त्या काटेरी दातांसकट ती सुई मांसल भागात चांगलीच रुतून बसते. त्यामुळे ती परत बाहेर काढली जाऊ शकत नाही. पण माशी तसा प्रयत्न करते तेव्हा ती सुई तुटते. ती सुई माशीच्या पोटाला जोडलेली असल्यामुळे त्या ओढाताणीत तो पोटाचा भागही तुटून पडतो. ते सहन न होऊन माशी मरून पडते. 


विषाबरोबरच माशी एक गंधयुक्त रसायन, याला फेरोमोन म्हणतात, तिथं आणि हवेत पसरवते. त्याच्या अोढीनं इतर माशाही तिथं आकर्षित होतात. अशा वेळी मग एकाऐवजी अनेक माशांचा डंख पचवावा लागतो. सहसा या विषाचा फारसा परिणाम होत नाही. मात्र जळजळ आणि खाज येऊ लागते. काही जणांना या विषाची अॅलर्जी असते. त्यांना मात्र सावधगिरी बाळगावी लागते. तातडीने उपचार करून घेणं योग्य ठरतं. अन्यथा या अॅलर्जीची प्रतिक्रिया तीव्र होऊन ती घातकही ठरू शकते. या विषात मेलिटिनबरोबरच हिस्टमिनही असल्यामुळे सहसा हिस्टीमिनला नाकाम करणारी उपाययोजना केली जाते.


उतारवयातल्या व्यक्तीला किंवा लहान मुलांना जर अनेक मधमाशांचा डंख झाला तर मात्र काही वेळा स्नायूंना इजा होऊ शकते. तसंच मूत्रपिंडांच्या कामातही बाधा आणली जाऊ शकते. तोंडात किंवा गळ्याजवळ डंख झाला तर त्यापायी श्वासनलिकेचं नियंत्रण करणारे स्नायू बाधित होतात व श्वासोच्छ्वासाला अडथळा होऊ शकतो. परंतु अशी परिस्थिती क्वचितच उद्भवते.धन्यवाद🙏

विक्रम साराभाई स्मृतीदिन 30 डिसेंबर

 *विक्रम साराभाई*


*भारतीय भौतिकशास्त्रज्ञ व खगोलशास्त्रज्ञ*


*स्मृतिदिन - ३० डिसेंबर, १९७१*


विक्रम अंबालाल साराभाई (गुजराती: વિક્રમ અંબાલાલ સારાભાઇ) (१२ ऑगस्ट, इ.स. १९१९ - ३० डिसेंबर, इ.स. १९७१) हे भारतीय भौतिकशास्त्रज्ञ व खगोलशास्त्रज्ञ होते. ते भारताच्या अंतराळ संशोधनाचे पितामह आणि भारताच्या अंतराळ युगाचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात.

१९४५ साली दुसरे महायुद्ध संपल्यावर विक्रम साराभाई ब्रिटनला गेले. १९४७ साली त्यानी ‘कास्मिक रे इंवेस्टिगेशन इन ट्रापिकल लैटीट्यूड्स’ वर संशोधन करून डॉक्टरेट मिळवली आणि त्याचवर्षी ते आपल्या मायदेशी परत आले. भारतात परत येउन त्यांनी नोव्हेंबर ११ १९४७ला अहमदाबाद येथे भौतिकी संशोधन कार्यशाळा ची स्थापना केली. हे त्यांचे पहिले पाउल होते, पुढे जाऊन अवकाश संशोधनात विक्रम साराभाई यांनी भरीव कामगिरी केली. विक्रम साराभाई यांनी अहमदाबाद येथील भारतीय प्रबंध संस्था (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट) स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. १९७५ मध्ये जो पहिला अंतरिक्ष उपग्रह आर्यभट्ट अवकाशात सोडला गेला त्याची रचना विक्रम साराभाई यांच्या अहमदाबाद रिसर्च सेंटर मध्येच केली होती. आर्यभट्टच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर भारताने अनेक उपग्रह अवकाशात प्रक्षेपित केले. या यशामागे साराभाई यांचे अथक परिश्रम, दूरदृष्टी आणि खंबीर नेतृत्व ह्यांचा *विक्रम साराभाई*


*भारतीय भौतिकशास्त्रज्ञ व खगोलशास्त्रज्ञ*


*स्मृतिदिन - ३० डिसेंबर, १९७१*


विक्रम अंबालाल साराभाई (गुजराती: વિક્રમ અંબાલાલ સારાભાઇ) (१२ ऑगस्ट, इ.स. १९१९ - ३० डिसेंबर, इ.स. १९७१) हे भारतीय भौतिकशास्त्रज्ञ व खगोलशास्त्रज्ञ होते. ते भारताच्या अंतराळ संशोधनाचे पितामह आणि भारताच्या अंतराळ युगाचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात.

१९४५ साली दुसरे महायुद्ध संपल्यावर विक्रम साराभाई ब्रिटनला गेले. १९४७ साली त्यानी ‘कास्मिक रे इंवेस्टिगेशन इन ट्रापिकल लैटीट्यूड्स’ वर संशोधन करून डॉक्टरेट मिळवली आणि त्याचवर्षी ते आपल्या मायदेशी परत आले. भारतात परत येउन त्यांनी नोव्हेंबर ११ १९४७ला अहमदाबाद येथे भौतिकी संशोधन कार्यशाळा ची स्थापना केली. हे त्यांचे पहिले पाउल होते, पुढे जाऊन अवकाश संशोधनात विक्रम साराभाई यांनी भरीव कामगिरी केली. विक्रम साराभाई यांनी अहमदाबाद येथील भारतीय प्रबंध संस्था (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट) स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. १९७५ मध्ये जो पहिला अंतरिक्ष उपग्रह आर्यभट्ट अवकाशात सोडला गेला त्याची रचना विक्रम साराभाई यांच्या अहमदाबाद रिसर्च सेंटर मध्येच केली होती. आर्यभट्टच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर भारताने अनेक उपग्रह अवकाशात प्रक्षेपित केले. या यशामागे साराभाई यांचे अथक परिश्रम, दूरदृष्टी आणि खंबीर नेतृत्व ह्यांचा मोलाचा  वाटा आहे.🙏

उंचीवर हवा थंड का असते


══════════════════════

   @ संकलन @गजानन गोपेवाड 

  

══════════════════════

            🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════   

🌥 *उंचावरची हवा थंड का असते ?* 🌥


आपण सहसा पाहतो, की थंड हवेच्या ठिकाणाची उंची समुद्रसपाटीपासून जास्त असते. जसजशी ही उंची वाढते तसतसं तिथलं हवामानही त्याच्याजवळच, पण कमी उंचीवर असलेल्या ठिकाणाहून अधिक थंड होतं. आपल्या ओळखीच्या महाबळेश्वरचंच उदाहरण घ्या ना. सहय़ाद्रीच्या माथ्यावर ते वसलेलं आहे. त्याच डोंगरकड्याच्या पायथ्याशी असलेल्या वाईपासून त्याचं अंतर केवळ काही किलोमीटरचंच असेल; पण वाईचं तापमान उष्ण, तर महाबळेश्वरचं थंड असतं. सगळीकडेच आपल्याला असा अनुभव येतो. साहजिकच उंचावरची हवा थंड का असते, असा सवाल मनात उभा राहतो.


त्याचं उत्तर दोन्ही ठिकाणच्या हवेच्या गुणधर्मात दडलेलं आहे. कोणत्याही वायूवर असणारा दाब आणि त्याचं तापमान त्याचं सरळ नातं असतं. वायूवरचा दाब जास्त असेल तर त्याचं तापमानही वाढीव असतं. उलटपक्षी जर तो दाब कमी असेल तर तापमानही घटलेलं असतं. सायकलच्या चाकात जेव्हा हवा भरण्यासाठी आपण पंपातला दाब वाढवतो तेव्हा त्या हवेचं तापमान वाढत जातं. ती तापलेली असते. परिणामी, तो पंपही तापतो; पण त्याच टायरमधून आपण हवा सोडून तिला दाब कमी केला की त्याचं तापमान उतरतं.


रेफ्रिजरेटरमध्ये वायूच्या याच गुणधर्माचा वापर केलेला असतो. त्या यंत्रांमध्ये फ्रिऑन नावाचा वायू भरलेला असतो. जेव्हा तो रेफ्रिजरेटरच्या बाहेर असतो तेव्हा त्याच्यावर दाब देऊन त्याच्यातील उष्णता का काढून टाकली जाते. तो जेव्हा रेफ्रिजरेटरच्या आत असतो तेव्हा त्याच्यावरचा दाब कमी करत तो थंड केला जातो. त्यामुळे आतली उष्णता त्याच्याकरवी शोषली जाते व ती बाहेर का टाकली जाते. 


हवा ही अशीच निरनिराळ्या वायूंची बनलेली असते, त्यामुळे तिच्या ठायीही वायूंचा हाच गुणधर्म प्रस्थापित होतो. उंचावरची हवा विरळ असते, त्यामुळे तिथला हवेचा दाबही कमी असतो. लडाखसारख्या अतिशय उंचीवरच्या ठिकाणी गेल्यावर लवकर थकवा येतो, याचं कारणही हेच आहे. तिथली हवा इतकी विरळ आणि त्यातलं ऑक्सिजनचं प्रमाण इतकं कमी असतं की आपल्या नेहमीच्या श्वासोच्छवासातून हवा तितका ऑक्सिजन आपल्याला मिळत नाही. इतक्या विरळ हवेचा दाबही साहजिकच कमी असतो. त्यापायी त्या हवेचं तापमानही घसरतं. अशा ठिकाणच्या जवळच, पण समुद्रसपाटीपासून फारश्या उंचीवर नसलेल्या ठिकाणची हवा विरळ नसते. ती तुलनेने दाट असते. त्यामुळे तिचा दाबही जास्त असतो. साहजिकच त्या हवेचं तापमानही जास्त असतं. उंचावरच्या ठिकाणाइतकं थंड नसतं. 


*-डाॅ.बाळ फोंडके यांच्या'का?'या पुस्तकातुन* 


मंगळवार, २८ डिसेंबर, २०२१

स्त्रीयांना दाढी का नसते


══════════════════════

    @ संकलन @

  गजानन गोपेवाड 

══════════════════════

            🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════   

📙 *स्त्रियांना दाढी का नसते ?* 📙 


प्राचीन इजिप्तमध्ये हातशेपसुत नावाची एक राणी होती. ती हनुवटीवर एक खोटी दाढी लावून वावरत असे. आपलं स्त्रीत्व लपवण्यासाठी तिनं हा खटाटोप केला होता. कारण राजगादीवर पुरुष वारसांनीच बसावं, असा प्रघात होता. त्यामुळे तिच्या गादिवरच्या हक्काला सहजासहजी मान्यता मिळणार नव्हती. तेव्हा आपणही पुरुष आहोत असं दाखवण्यासाठी तीनं या खोट्या दाढिचा आधार घेतला होता. तसा तिनं करावं याचं राजकीय कारण जरी स्पष्ट झालं असलं तरी तिला किंवा एकंदरीतच स्त्रियांना दाढी का नसते, हा प्रश्न उरतोच. 


पुरुषांनाही दाढी वयात आल्यानंतरच येते. त्यामुळे या नैसर्गिक आविष्कारात वयात येताना सर्वांच्याच शरीरात जो संप्रेरकांच्या पाझराचा खेळ सुरू होतो त्याचा सहभाग असावा, हे निश्चित. जेव्हा मूल जन्माला येतं तेव्हा त्याच्या अंगावर लव असते. काहींच्या अंगावर तशी ती जास्तच असते. अशा केसाळ मुलाच्या अंगावरची लव घालवण्यासाठी आई आणि दाई त्याला अंघोळ घालताना हळदीचा लेप चोळत असतात. वास्तविक त्याची काहीच गरज नसते. कारण मूल मोठं होत जातं तशी ही लव हळूहळू नाहीशी होत जाते.


तिच्यात मोठा फरक होतो तो ते मूल वयात येताना. त्या वेळी त्या मुलाच्या लिंगानुसार वेगवेगळ्या लैंगिक संप्रेरकांचा पाझर मोठ्या प्रमाणावर सुरू होतो. मुलींच्या शरीरात स्त्रैण संप्रेरकांचा स्त्राव सुरू होतो. त्यांच्या प्रभावाखाली शारीरिक तसंच शरीरक्रियाविषयक गुणधर्मांमध्ये मोठे बदल घडून येतात. स्त्रियांच्या शरीराला गोलाई येते. स्तनांची वाढ होऊ लागते. जननेंद्रियांचीही वाढ होते. मासिक पाळी सुरू होते. या सर्वांबरोबरच अंगावरची लव कमी कमी होऊ लागते आणि डोक्यावरच्या केसांची वाढ सुरू होते. चेहऱ्यावरच्या केसांच्या वाढीलाही विरोध होतो. त्यांची वाढ दाबली जाते. अर्थात काहीजणींच्या बाबतीत ही प्रक्रिया संपूर्णपणे सुरळीत पार पडत नाही. त्यामुळे काही मुलींच्या हनुवटीवर थोडेफार केस दिसू लागतात; पण त्यांचा बंदोबस्त करणं सहज शक्य असतं. 

मुलांच्या शरीरात याच वेळी पुरुषी संप्रेरकांच्या स्त्रावाला सुरुवात होते. त्यांच्या प्रभावापोटी त्यांच्याही शारीरिक आणि शरीरक्रियाविषयक गुणधर्मांमध्ये बदल होतात.


 जननेंद्रियांची वाढ होते. छाती रुंदावते, भरदार होऊ लागते. उंचीतही वाढ होते. आवाज फुटतो. त्याचबरोबर मिसरूडं आणि दाढीही फुटते. कारण त्या संप्रेरकांच्या स्त्रावापोटी अंगावरची लव केसांमध्ये बदलते. चेहऱ्यावरच्या केसांचीही वाढ होऊ लागते. डोक्यावरच्या केसांची वाढ मात्र मंदावते. ती अति मंदावली तर मग टक्कलही पडतं. त्या मंदावण्याच्या वेगावर टक्कल केव्हा पडेल हे ठरतं. काही जणांना लहान वयातच ते पडतं, तर काही जण सत्तरीतही केसांचा फुगा पाडू शकतात.


स्त्री आणि पुरुष यांच्या शारीरिक आणि शरीरक्रियाविषयक गुणधर्मांमध्ये निसर्गानं जे काही फरक केले आहेत त्यांच्या परिपाकापोटी स्त्रियांना दाढी येत नाही, तर पुरुषांनाच टक्कल पडतं.


*-डाॅ.बाळ फोंडके यांच्या'का?'या पुस्तकातुन* 


फुले रंगबिरंगी का असतात


══════════════════════

  @ संकलन गजानन गोपेवाड 

  

══════════════════════

            🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════   

🌺 *फुलं रंगीबेरंगी का असतात ?* 

➖➖➖➖➖➖➖➖➖

अनेक झाडांची फुलं तर्‍हेतर्‍हेचे मनोहारी रंग धारण करतात. ते रंग बघायलाही आपल्याला आवडतं. अशा रंगेबिरंगी फुलांनी नटलेली आपली बाग सुंदर दिसते. कित्येक फुलांना अतिशय चांगला सुगंधही असतो. तोही आपला आनंद द्विगुणित करतो. तरीही आपल्या आनंदासाठी फुलांना रंग आणि सुगंध असतो, असं आपल्याला म्हणता येईल का ? कारण जिथं मानववस्ती नाही अशा ठिकाणच्या झाडांनाही रंगेबेरंगी व सुगंधी फुलं असतात. रानावनात वाढणाऱ्या झाडांची शोभाही अशा फुलांनी बहरून येते. याचा अर्थ निसर्गानं दुसऱ्याच कोणत्या तरी कारणांसाठी रंग आणि गंध बहाल केला असणार.


ती कारणं समजून घेण्यासाठी फुलांचं मुख्य निसर्गदत्त काम काय असतं, याचा विचार करायला हवा. प्रत्येक सजीवाच्या अंगी आपलं पुनरुत्पादन करण्याची यंत्रणा असते. पुनरुत्पादनाशिवाय तो सजीव तगून राहू शकत नाही. एवढेच काय पण पुनरुत्पादनाच्या प्रक्रियेशिवाय नवनव्या प्रजातींचा उगमही अशक्य झाला असता. त्यामुळे प्रत्येक सजीव पुनरुत्पादनाला अतिशय महत्त्व देतो. वनस्पतींच्या पुनरुत्पादनात फुलं कळीची भूमिका बजावतात.


फुलांच्या अंतर्गत रचनेकडे लक्ष दिल्यास त्यातील दोन अवयव आपलं लक्ष वेधून घेतात. स्टॅमेन किंवा पुबीजांडातून पुंकेसर बाहेर पडतात. ते पिस्टिल किंवा स्त्रीबीजांडातील स्त्रीकेसरांवर पडले की त्यांच्या समागमातून पुढील पिढीची नांदी म्हटली जाते. पुंकेसर आणि स्त्रीकेसर यांचं मिलन होणं त्या वनस्पतीच्या पुनरुत्पादनासाठी आवश्यक असतं. कित्येक फुलांमध्ये हे मीलन स्वयंपूर्णरित्या होत असलं, तरी बहुतांश वनस्पतींच्या फुलांमध्ये या प्रक्रियेसाठी दुसर्‍या कोणीतरी मध्यस्थाच्या मदतीची आवश्यकता भासते. वारा ही कामगिरी पार पाडत असला तरी तो पूर्णांशाने हे काम करू शकत नाही. त्यासाठी मग पक्षी किंवा मधमाश्यांसारख्या कीटकांची गरज भासते. ते काम करावं म्हणून मग पक्षी आणि मधमाशा यांना उद्युक्त करणं जरुरीचं असतं. त्यांना काहीतरी मधाचं बोट लावल्याशिवाय ते तरी या कामगिरीसाठी का तयार व्हावेत ? मधमाशांना तर अक्षरश: मधाचं बोट लावलं जातं. फुलांमध्ये असलेला मधुरस शोषून घेऊन मधमाशा त्याचं मधात रूपांतर करतात. तरीही आपल्याकडे अशा मधुरसाचे कोण आहेत, हे मधमाश्यांना कळावं कसं ? त्यांना आपल्याकडे आकर्षित करून घेण्यासाठी मग ही फुलं रंगीबेरंगी परिवेष धारण करतात. 

त्यातही मध्यस्थ कोण आहे यावर फुलांचा रंग निर्धारित केला जातो. मधमाशांना निळा रंग आवडतो, तर हमिंगबर्डसारख्या पक्ष्यांना लाल, गुलाबी किंवा जांभळ्या रंगांचं आकर्षण असतं. फुलपाखरं पिवळ्या, नारिंगी रंगांकडे ओढली जातात. 


काही फुलं दिवसाउजेडी फुलत असली तरी काही सूर्यास्तानंतरच फुलतात. त्या वेळी मग त्यांचा रंग पक्षांना वा कीटकांना दिसावा कसा ? त्यासाठी मग रंगांशिवाय या फुलांना सुगंधही दिला जातो. त्याच्या दरवळापायी मग हे फलनाला मदत करणारे मध्यस्थ त्याच्याकडे खेचून आणले जातात. त्यांना मधुरस मिळता मिळता त्यांच्याकडून पुंकेसराचा शिडकावा स्त्रीकेसरांवर होतो. पुनरुत्पादनाच्या प्रक्रियेला चालना मिळते.


*-डाॅ.बाळ फोंडके यांच्या'का?'या पुस्तकातुन* 


शुक्रवार, २४ डिसेंबर, २०२१

पाण्यातील पेन्सील मोडल्यासारखी का दिसतात


══════════════════════

    @ संकलन @

  *श्री. गजानन गोपेवाड 

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════   

📒 *पाण्यात ठेवलेली पेन्सिल मोडल्यासारखी का दिसते ?* 

***********************************

कोणतीही वस्तू आपल्याला दिसते कशी ? म्हणजे तशी ती आपण डोळ्यांनीच पाहतो ; पण डोळ्यांमध्ये तरी तिची प्रतिमा उमटते कशी ? आपल्याला अंधारात कोणतीही वस्तू दिसत नाही. अगदी आपल्या हाताचं बोटही दिसत नाही. म्हणजेच कोणतीही वस्तू पाहण्यासाठी आपल्याला प्रकाशाची गरज भासते. दिव्यासारख्या वस्तूला स्वतःचा प्रकाश असतो. आकाशातल्या ताऱ्यांनाही; पण इतर कोणतीही वस्तू आपल्याला दिसण्यासाठी अशा दुसऱ्याकडून आलेला प्रकाश त्या वस्तूवरुन परावर्तित होऊन तो आपल्या डोळ्यांपर्यंत पोहोचण्याची आवश्यकता असते.


 प्रकाश नेहमी सरळ रेषेत प्रवास करतो. त्यामुळे त्या वस्तूवरून परावर्तित झालेल्या प्रकाशाचे किरण असेच शहाण्यासारखे सरळ रेषेत प्रवास करत आपल्या डोळ्यांपर्यंत पोहोचतात आणि त्यांची नीटस स्वच्छ प्रतिमा डोळ्यांच्या पडद्यांवर उमटते. जोवर प्रकाश एकाच माध्यमातून प्रवास करत असतो तोवर हा सरळ रेषेतला प्रवास कोणताही अडथळा न येता पार पडतो. जर माध्यम बदललं तर मात्र परिस्थिती वेगळी होते. याचं कारण प्रकाशाचा वेग निरनिराळ्या माध्यमांमध्ये निरनिराळा असतो. निर्वात पोकळीत तो सर्वात जास्त म्हणजे सेकंदाला तीन लाख किलोमीटर एवढा असतो. हवेत त्यापेक्षा थोडा कमी असतो. पाणी किंवा काच यांसारख्या घन माध्यमांमध्ये तो आणखी कमी होतो. रिकाम्या रस्त्यावरून आपण सुसाट धावू शकतो; पण त्याच रस्त्यावर माणसांची गर्दी असली तर सहाजिकच आपला वेग कमी होतो. प्रकाशाची गती ही वेगळी नसते.

 

त्यामुळेच एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात प्रवेश करताना या वेगातील फरकामुळे प्रकाशकिरण वाकतात. ज्या माध्यमात वेग कमी असतो त्या माध्यमाच्या दिशेनं ते वाकतात. समजा तुम्ही विशिष्ट वेगानं डांबरी रस्त्यावरून सायकल चालवत आहात. मध्येच बाजूच्या गवताळ भागात जर सायकलचं चाक गेलं तर सायकल त्या बाजूला वळते. कारण डांबरी रस्त्यापेक्षा गवताळ भागातून जाताना चाकाच्या गतीला विरोध होतो आणि वेग कमी होतो. प्रकाशकिरणही वाकतात ते यामुळेच.


 आता एखाद्या पेल्यात ठेवलेल्या पाण्यात आपण एखादी पेन्सिल ठेवतो तेव्हा ती जर संपूर्णपणे त्या पाण्यात बुडालेली असेल तर ती एकसंधच दिसते. कारण तिच्यावरून परावर्तित झालेले किरण संपूर्णपणे एकाच माध्यमातून प्रवास करत असतात. जेव्हा असे किरण पाण्याबाहेर येऊन हवेतून प्रवास करू लागतात तेव्हा सर्वच किरण एकसाथ वाकतात. त्यामुळे परत पेन्सिल एकसंधच दिसते.

 

जेव्हा पेन्सिलीचा काही भाग पाण्यात असतो आणि काही पाण्याबाहेर असतो तेव्हा तिच्या वरचा म्हणजे हवेत असलेल्या भागावरून परावर्तीत होणारे प्रकाशाचे किरण केवळ हवेतूनच प्रवास करत आपल्यापर्यंत पोहोचतात. ते एका रेषेत प्रवास करतात; पण पाण्यात असलेल्या भागावरून निघालेले किरण काही अंतर पाण्यातून प्रवास करतात आणि मग पाण्याच्या पृष्ठभागाच्या बाहेर पडून ते हवेतून प्रवास करू लागतात. त्या वेळी त्या दोन भागांमधल्या वेगातल्या फरकामुळे त्यांची दिशा बदलते. आपल्या डोळ्यांना ते हवेतून येणाऱ्या किरणांपेक्षा वेगळ्या दिशेने येत असल्यासारखे दिसतात. या दोन दिशांमधल्या फरकामुळे पेन्सिलीच्या दोन भागांमध्ये काही कोन असल्याचा भास आपल्याला होतो. म्हणूनच पाण्याच्या पृष्ठभागाजवळ ती वाकल्यासारखी किंवा मोडल्यासारखी दिसते. प्रकाशाच्या या आविष्काराला प्रकाशाचे अपवर्तन असे म्हणतात. या म अपवर्तनापोटीच बिचार्‍या पेन्सिलीवर मोडण्याची पाळी येते.


*-डाॅ.बाळ फोंडके यांच्या'का?'या पुस्तकातुन* 

बुधवार, २२ डिसेंबर, २०२१

उत्तर धृव व दक्षिण धृव


══════════════════════

   @ संकलन 

  *श्री. गजानन गोपेवाड 

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════   

📒 *उत्तर ध्रुवापेक्षा दक्षिण ध्रुव जास्त थंड का आहे ?* 

***********************************

प्रथम खरोखरच दक्षिण ध्रुव उत्तर  ध्रुवापेक्षा जास्त थंडं आहे का, याचा विचार करूया. १९५७ पासून दक्षिण ध्रुवावरच्या दैनंदिन तापमानाच्या नोंदी ठेवावयास सुरुवात झाली. त्यावरून स्पष्ट झालं आहे की ऑगस्ट महिना हा तिथला सर्वात थंड महिना असतो. त्या महिन्यातलं गेल्या ५० वर्षांमधील सरासरी तापमान उणे ६० अंश राहिलं आहे. उलट जानेवारी महिना सर्वात 'गरम' असतो. त्यावेळचं सरासरी तापमान उणे १८ अंश असतं.

 

उत्तर ध्रुवावरच्या तापमानाच्या नोंदी ठेवायला अलीकडेच म्हणजे २००३ सालापासून सुरुवात झाली. तेव्हा गेल्या पाच सहा वर्षांमधल्या तापमानाच्याच नोंदी उपलब्ध आहेत. तरीही त्यावरून असं दिसतं की तिथलं सर्वात कमी सरासरी तापमान उणे ४० अंशांइतकंच असतं. तर सर्वात जास्त सरासरी तापमान शून्य अंशापर्यंत चढतं. तेव्हा दक्षिण ध्रुव हा उत्तर ध्रुवापेक्षा जास्त थंड आहे हे आता पुराव्यानिशी सिद्ध झालं आहे.

 

 कोणत्याही ठिकाणचं तापमान हे अनेक घटकांवर अवलंबून असतं. त्यातला सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे त्या ठिकाणी पडणाऱ्या सूर्यप्रकाशातून मिळणारी उष्णता. विषुववृत्तावर पडणारे सूर्याचे किरण सरळ उभे म्हणजे जवळजवळ ९० अंशांचा कोन करून पडतात. त्यामुळे त्या प्रदेशातील कोणत्याही ठिकाणाला मिळणारी सूर्याची उष्णता सर्वात जास्त असते. तेव्हा तिथलं तापमान सर्वात जास्त असायला हवं; पण विषुववृत्तावरची एखादी जागा समुद्रसपाटीपासून उंचावर असेल तर तिथलं तापमानही घसरतं. शिवाय अशी जागा समुद्रकिनाऱ्यापासून अात किती दूरवर आहे, तिथलं वातावरण किती कोरडं आहे वगैरे अनेक बाबींवर तिथलं तापमान अवलंबून असतं.

 

 उत्तर आणि दक्षिण ध्रुवांवर पडणारे सूर्याचे किरण सरळ पडत नाहीत. तिथल्या आकाशात सूर्य जास्तीत जास्त २३ अंशांपर्यंतच चढतो. अशा आडव्या पडणाऱ्या किरणांपासून त्या प्रदेशाला मिळणारी सूर्याची उष्णताही कमी असते. त्यामुळे तिथलं सरासरी तापमान नेहमी फारच कमी असतं. अगदी कडक उन्हाळ्यातही ते शून्य अंशाखालीच राहतं. शिवाय तिथं सहा महिने दिवस आणि सहा महिने रात्र असते. त्यामुळेही तिथलं तापमान फारसं चढत नाही.

 

 उत्तर आणि दक्षिण ध्रुव यांच्यामध्ये इतर काही मूलभूत फरक आहेत. दक्षिण ध्रुव अंटार्क्टिक खंडावर वसलेला आहे. म्हणजेच त्याच्या पायाखाली जमीन आहे. शिवाय त्या जमिनीवर जवळजवळ ) ९००० फूट उंचीचे बर्फाचे थर जमलेले आहेत. म्हणजेच दक्षिण ध्रुवाची समुद्रसपाटी पासूनची उंची तेवढी आहे. सहाजिकच तिथलं तापमान समुद्रसपाटीवर असणार्‍या उत्तर ध्रुवापेक्षा कमी असतं. शिवाय उत्तर ध्रुवांभोवती पसरलेल्या अंटार्क्टिक महासागरामुळे सूर्याची उष्णता जास्त प्रमाणात शोषली जाऊन तापमान वाढायला मदत होते.

 

*-डाॅ.बाळ फोंडके यांच्या'का?'या पुस्तकातुन* 


Featured Post

व्यायाम व योगा अवश्य करावा*

*व्यायाम व योगा अवश्य करावा*  *व्यायाम व योगा करण्याचे दहा फायदे:-*  1) व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते: व्यायाम करणारी...