शनिवार, २० नोव्हेंबर, २०२१

शिकु_आनंदे_

 🇱 🇪 🇦 🇷 🇳 ---- 🇼 🇮 🇹 🇭------------ 🇫 🇺 🇳  


 *(_शिकू आनंदे_ ) 𝙣𝙤* 17


आजचा विषय:)- चित्रकला 

 *आज दिनांक*  

   20/11/2021


🇸 🇹 🇪 🇷 🇩 🇦 🇾  

*वार शनिवार* 


▶️ *उदिष्टे* ::तणावमूक्त शिक्षण, हसत खेळत शिक्षण, कृतीतून शिक्षण, आनंददायी शिक्षण, कला, कार्यानुभव, शारीरिक शिक्षण, व कोवीड 19 मधील मनावरील ताण कमी करण्यासाठी शिक्षण. आरोग्य सदृढ राहण्यासाठी. 

.....................................


✳️आमचे प्रेरणास्थान ✳️ 


 *मा. श्रीकृष्ण पांचाळ* 

मुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, यवतमाळ.


0===============0


💠आमचे प्रेरणास्थान 💠


 *मा रविंद्र रमतकर* (संचालक) 

प्रादेशिक विद्या प्राधिकरण, राज्य विज्ञान शिक्षण संस्था, नागपूर.  

←_←→_→←_←→_→


🔆आमचे मार्गदर्शक  🔆


मा .डॉ. *रेखा महाजन* 

प्राचार्या 🄳🄸🄴🅃यवतमाळ .

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,


🔰आमचे मार्गदर्शक🔰 


     *मा .प्रमोद सुर्यवंशी*

 (शिक्षणाधिकारी प्राथमिक)

जिल्हा परिषद, यवतमाळ.

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,


✳️आमचे मार्गदर्शक  ✳️

      मा .*किशोर रावते* 

गटशिक्षणाधिकारी, पं .स .महागांव .

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

https://youtu.be/zx6nrp4Z4lA

-------------------------------------

➡️व्हिडिओ लाईक करायला विसरू नका व काँमेंट पण करा. अजुनही माझ्या युटुब चँनेलला सबस्क्राईब केले नसले तर सबस्क्राईब करा व जास्तीत जास्तं विद्यार्थी पर्यंत पोहचवा धन्यवाद  🙏

.....................................



-------------------------------------


       ❇️निर्मिती ❇️

    *गजानन गोपेवाड* 

जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक मराठी (डिजिटल) शाळा मुडाणा पं स,महागांव

         जि .यवतमाळ .

::::::::::::~🆂🅷🅴🅰🆁 🆃🅾 🅰🅻🅻 🅶🆁🅾🆄🅿🆂

ओळख शास्त्रज्ञांची

 💠 🅢🅒🅘🅔🅝🅒🅔🅧🅟🅞💠


 आजचे शास्त्रज्ञ ):-  ओळख शास्त्रज्ञांची 


आज दिनांक )- 21/11/2021 वार रविवार 



𝑫𝒂𝒕𝒆::-21/11/2021

Sunday 

 

 सप्ताह क्रमांक 17


🔬उद्दिष्ट :

1) विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे.

2)  सृजनशील विकास. 

3)  गणित /विज्ञानाचा प्रसार व प्रचार.

4) स्पर्धा परिक्षा तयारी करून घेणे..🔬

-------------------------------------🔆 आमचे प्रेरणास्थान  🔆

मा *. श्रीकृष्ण पांचाळ* 

 _(मुख्यकार्यपालन अधिकारी )

जिल्हा परिषद, यवतमाळ_ 

------------------------------------

💠आमचे प्रेरणास्थान  💠

मा. *रविंद्र रमतकर* (संचालक) 

प्रादेशिक विद्या प्राधिकरण 

राज्य विज्ञान शिक्षण संस्था, नागपूर 

-------------------------------------

     ✳️आमचे मार्गदर्शक✳️


    मा. डॉ. *रेखा महाजन* 

           प्राचार्या 

DIET  यवतमाळ 

-------------------------------------

    🔰आमचे मार्गदर्शक 🔰


    मा. श्री. *प्रमोद सूर्यवंशी* 

शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जि. प. यवतमाळ 

-------------------------------------

जास्तीत जास्तं विद्यार्थी पर्यंत पोहचवण्यासाठी शेअर करा हि विनंती आहे. 

-------------------------------------

खालील निळ्या रंगाची लिंक टच करून शैक्षणिक व्हिडिओ बघु शकता. ⬇️

-------------------------------------

https://docs.google.com/forms/d/1ySnz0eQG26Yne5r2WfXlIPX7sHce-bJL6pVZzk4D0AA/edit

-------------------------------------


         🌷निर्मिती 🌷

          *गजानन गोपेवाड* 

~जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक डिजिटल शाळा मुडाणा. पं. स. महागांव. जि.              यवतमाळ~

      ( मो, 7378670283)

      

   🙏₮Ⱨ₳₦₭₴ 🙏

एडवीन हबल खगोल शास्त्रज्ञ

 *🔭🔭🔭एडवीन हबल🔭🔭🔭*

🔭🔭🔭🔭🔭🔭🔭🔭🔭🔭🔭

        *प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ*

🔭🔭🔭🔭🔭🔭🔭🔭🔭🔭🔭

*जन्मदिन - २० नोव्हेंबर १८८९*


हबल, एडविन पॉवेल : (२० नोव्हेंबर १८८९–२८ सप्टेंबर १९५३).  आकाशगंगेबाहेरील (गांगेय बाह्य) खगोलशास्त्राचे ते संस्थापक मानले जातात. त्यांनी दीर्घिकांचे (तारामंडलांचे) शोध लावले व त्यांचे वर्गीकरण केले. तसेच ते प्रसरणशील विश्व या विश्वाविषयीच्या प्रतिकृतीचा पहिला पुरावा देणारे खगोलशास्त्रज्ञ आहेत.


हबल यांचा जन्म मार्शफील्ड (मिसूरी, अमेरिका) येथे झाला. शालेय विद्यार्थी असताना ते हुशार होतेच, शिवाय त्यांना खेळांतही रस होता. मात्र, त्यांना शिकागो विद्यापीठातील ⇨ जॉर्ज एलरी हेल यांच्या प्रेरणेने खगोलशास्त्र विषयाची आवड निर्माण झाली. याच विद्यापीठात त्यांनी गणित व खगोलशास्त्र या विषयांतील पदवीपूर्व पदवी मिळविली (१९१०). तसेच तेथे ते उत्कृष्ट मुष्टियोद्धा म्हणूनही प्रसिद्ध होते. मात्र, पदवी संपादन केल्यानंतर त्यांनी खगोलशास्त्र व कसरतीचे खेळ यांतील लक्ष काढून घेतले आणि ऑक्सफर्ड विद्यापीठात र्‍होड्स स्कॉलर म्हणून कायद्याचे अध्ययन सुरू केले. कायद्याची बी.ए. पदवी १९१२ मध्ये मिळविल्यावर ते केंचुकी येथे १९१३ मध्ये वकिली करू लागले. तथापि, वर्षभरातच ते वकिली व्यवसायाला कंटाळले. अनेक विषयांत गती असलेल्या हबल यांनी अखेरीस खगोलशास्त्रात काम करण्यावर लक्ष केंद्रित करावयाचे ठरविले. ते शिकागो विद्यापीठ व त्याची विस्कॉन्सिन येथील यर्कीझ वेधशाळा येथे परत आले (१९१४). तेथे त्यांनी एडविन ब्रांट यांच्या मार्गदर्शनाखाली आकाशगंगेतील नवतारे आणि तेजस्वितेत बदल होणारे चल तारे यांचा अभ्यास केला [→नवतारा व अतिदीप्त नवतारा]. हबल यांनी खगोलशास्त्रातील पीएच्.डी. पदवी १९१७ मध्ये मिळविली. पहिल्या महायुद्धात भाग घेतल्यानंतर ते कॅलिफोर्नियातील पॅसाडीनालगत असलेल्या मौंट विल्सन वेधाशाळेत दाखल झाले (१९१९). तेथे त्यांनी आकाश-गंगेबाहेरच्या खगोलशास्त्रीय आविष्कारांशी निगडित संशोधन करण्यास सुरुवात केली.


आकाशगंगा या कोट्यवधी तारे असलेल्या दीर्घिकेत सूर्यही आहे. मात्र, आकाशात दिसणाऱ्या सर्व ⇨ अभ्रिका आकाशगंगेचा भाग नाहीत, हा शोध हबल यांनी मौंट विल्सन वेधशाळेतील निरीक्षणांद्वारे लावला (१९२२–२४). त्यांनी १,३०० खगोलीय क्षेत्रे निवडून शेकडो छायाचित्रे घेतली. विशिष्ट अभ्रिकांमध्ये १२ सेफीड चल तारे असल्याचे त्यांना आढळले [ सेफीड हा आवर्ती चल ताऱ्यांचा उपगट असून त्यांचा तेजस्वीपणा काळानुसार स्थिर राहत नाही आणि त्यांचा तेजस्वीपणातील बदलाचा आवर्तकाल त्यांच्या अंगभूत माध्य (सरासरी) तेजस्वीपणाशी निगडित असतो; → तारा].


हबल यांनी मौंट विल्सन वेधशाळेतील २५४ सेंमी. दूरदर्शकाद्वारे घेतलेल्या वेधांवरून व आढळलेल्या ताम्रच्युतींवरून पऱ्यायाने दूर जाण्याच्या गतीवरून अंतर, भासमान प्रत व निरपेक्ष प्रत यांच्यातील परस्परसंबंधाचा उपयोग केला आणि सेफीड तारे लाखो प्रकाशवर्षे अंतरावर म्हणजे आकाशगंगेच्या पलीकडचे असल्याचे निश्चित दाखविले. ज्या अभ्रिकांमध्ये हे सेफीड तारे आहेत त्या प्रत्यक्षात आकाशगंगेहून भिन्न अशा दीर्घिकाच असल्याचे त्यांनी दाखवून दिले. उदा., देवयानी अभ्रिकेतील एम-३१ ही दीर्घिका आकाशगंगेच्या फारच बाहेर म्हणजे साडेसात लक्ष प्रकाशवर्षे इतकी दूर आहे. उलट आकाशगंगेचा व्याप फक्त एक लक्ष प्रकाशवर्षे एवढा आहे . हा शोध त्यांनी १९२४ मध्ये घोषित केला.


आकाशगंगेबाहेरच्या या दीर्घिका शोधून काढल्यावर लवकरच हबल यांनी १९२६ मध्ये या दीर्घिकांचे त्यांच्या आकारानुसार वर्गीकरण करण्याचे आणि त्यांचे तारकीय घटक व त्यांच्या तेजस्वीपणाचे आकृतिबंध यांच्या समन्वेषणाचे कामही सुरू केले. त्यांनी दीर्घिकांचे विवृत्ताकार, साध्या चक्रभुजीय, दंडयुक्त चक्रभुजीय आणि रचनारहित हे चार प्रमुख वर्ग केले. दीर्घिकांचा अभ्यास करताना त्यांनी पुढील दुसरा लक्षणीय शोध १९२७ मध्ये लावला : या दीर्घिका उघडपणे आकाशगंगेपासून दूर जात आहेत आणि त्या जितक्या अधिक दूर असतात तितक्या अधिक वेगाने दूर जात आहेत. या शोधाचे असंख्य मतितार्थ (अटकळी वा अन्वय) होते. दीर्घकाळ विश्व स्थिर अवस्थेत असल्याचे मानले जात होते. या शोधामुळे विश्व प्रसरण पावत असल्याचे दिसून आले. त्यांनी १९२९ मध्ये दीर्घिकांची गती व त्यांचे अंतर यांचे गुणोत्तर हा स्थिरांक असेल अशा प्रकारे विश्व प्रसरण पावत असल्याचे शोधून काढले. या स्थिरांकाला त्यांच्या नावावरून हबल स्थिरांक हे नाव पडले.


विश्व प्रसरण पावत असल्याचे हबल यांचे मत बरोबर होते; मात्र त्यांनी गणिताने काढलेले हबल स्थिरांकाचे मूल्य बरोबर नव्हते. कारण त्यावरून आकाशगंगेची प्रणाली इतर सर्व दीर्घिकांपेक्षा अधिक मोठी आहे आणि पृथ्वीच्या अंदाजाने काढलेल्या वयापेक्षा संपूर्ण विश्व लहान आहे, असा चुकीचा अर्थ निघत होता. तथापि, नंतर वैज्ञानिकांनी त्यांचे निष्कर्ष पुन्हा तपासून पाहिले व त्यामुळे हबल यांच्या सिद्धांतांचा बचाव झाला. यामुळे विश्व १०–२० अब्ज वर्षे स्थिर त्वरेने प्रसरण पावत असल्याचे चित्र निर्माण झाले.


हबल यांनी दिलेली हॅली व्याख्याने (ऑक्सफर्ड विद्यापीठ, १९३४), सिलिमन व्याख्याने (येल विद्यापीठ, १९३५) आणि र्‍होड्स मेमोरियल व्याख्याने प्रसिद्ध आहेत. रेड शिफ्टस् इन द स्पेक्ट्रा ऑफ नेब्युली (१९३४) आणि द हबल अ‍ॅटलास (संपा. अ‍ॅलन रेक्स सँडेज, १९६१) ही त्यांची प्रसिद्ध पुस्तके आहेत. खगोलशास्त्रात त्यांनी केलेल्या कामगिरीमुळे त्यांना अनेक मानसन्मान व पुरस्कार मिळाले होते. उदा., अमेरिकेतील बर्नार्ड, ब्रूस व फ्रँक्लिन ही सुवर्ण पदके तसेच रॉयल अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे सुवर्ण पदक (१९४०) आणि ऑक्सफर्डच्या क्वीन्स कॉलेजचे फेलो. 

*शिवाय पृथ्वीभोवतीच्या कक्षेत स्थापित केलेल्या दूरदर्शकाला त्यांच्या सन्मानार्थ हबल अवकाश दूरदर्शक (हबल स्पेस टेलिस्कोप) हे नाव देण्यात आले.*


हबल यांचे सान मारीनो (कॅलिफोर्निया, अमेरिका) येथे निधन झाले.

🙏🙏🙏🙏 शुभ प्रभात🙏🙏🙏🙏

संकलन -)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

प्रभात दर्शन

 🌳⛳ *शुभ प्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

कार्तिक मास,कृष्ण पक्ष, *प्रथम*,रोहिणी नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,हेमन्त ऋतु,युगाब्द ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

शनिवार, २० नोव्हेंबर २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                         *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


अन्तर्गत मलो दुष्टस्

                   तीर्थ स्नान शतैरपि,

न शुद्ध यति यथा भाण्डं 

                   सुरया दाहितं च तत्॥


*भावार्थः- जिस प्रकार सुरापात्र को अग्नि में जलाने पर भी वह शुद्ध नहीं होता। इसी प्रकार जिस दुष्ट व्यक्ति के मन में मैल है, वह दुष्ट चाहे सैकड़ों तीर्थ - स्नान आदि कर ले, किन्तु वह कभी शुद्ध नहीं हो सकता।*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


शुक्रवार, १९ नोव्हेंबर, २०२१

रोपाची मुळे खालच्या दिशेने का वाढतात व खोड वरच्या बाजूला


══════════════════════

   *📒📒📒 @ संकलन @📒📒📒*

  *श्री. गजानन गोपेवाड *

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════   

📒 *रोपांची मुळं खालच्या दिशेनं, तर खोडं 

        वरच्या दिशेनं का वाढतात?* 

********************************

आयझॅक न्यूटन सफरचंदाच्या झाडाखाली बसला असताना त्याच्या डोक्यावर एक पिकलेलं फळ पडलं, अशी आख्यायिका आहे. डोक्याला आलेल्या झिणझिण्या थांबवता थांबवता न्यूटननं विचार करायला सुरुवात केली होती. त्यातूनच या विश्वात सर्वत्र गुरुत्वाकर्षणाचं बल कार्यरत असल्याची जाणीव झाली, त्या बलामुळंच मग, वर हवेत फेकलेली कोणतीही वस्तू परत जमिनीकडे ओढली जाते, हेही समजून आलं. याला अर्थात अपवाद आहेत. हलकी असलेली पाण्याची वाफ वरच्या दिशेनं उडून जाते. हेलियम किंवा हायड्रोजनसारख्या वायूनं भरलेला फुगाही वर वर उडत जातो; पण केवळ हलक्या असलेल्या वस्तूच अशा वर वर गुरुत्वाकर्षणाच्या बलावर मात करत वरच्या दिशेनं उडत जाताना दिसतात, खरोखरीच त्या वस्तू त्या बलावर मात करतात, की त्यांचं हे वरच्या दिशेनं उडणंही गुरुत्वाकर्षणाच्या बलाचीच किमया आहे?


पक्षी मात्र सहजगत्या आकाशात विहरताना दिसतात. त्यांना हे गुरुत्वाकर्षणाचं बल खालच्या दिशेनं ओढत नाही का? की आपले पंख फडफडवत त्या बलावर मात करण्याची किमया त्यांनी साध्य केली आहे? जेव्हा आपण विमानं तयार करायला लागलो आणि त्याच्यात बसून आकाशात झेप घ्यायला लागलो तेव्हा या प्रश्नाचं उत्तर मिळालं. त्या गुरुत्वाकर्षणाच्या बलाच्याच मदतीनं आकाशात उड्डाण कसं करायचं, हेही समजून आलं. तर मग जेव्हा जमिनीत पेरलेल्या बीजाला प्रथम मुळं आणि नंतर अंकुर फुटतात तेव्हा त्यांची वाढ एकमेकांच्या विरुद्ध दिशेनं कशी होते, याचाही विचार याच अनुषंगानं करायला हवा. मुळं जमिनीत खोलवर जाऊ पाहतात, तर अंकुर आणि त्यातून पुढं तयार होणारी खोडं मात्र वरच्या दिशेनंच वाटचाल करताना दिसतात. बीज पेरल्यानंतर त्याला पुरेसं पाणी मिळालं, त्याची वाढ होऊ लागली, की त्याला प्रथम मुळं फुटतात. त्या मुळांमध्ये असलेल्या संप्रेरकांच्या प्रभावापोटी ती गुरुत्वाकर्षणाच्या बलाचा वेध घेऊ लागतात. या गुणधर्माला जिओट्रॉपिझम असं म्हणतात. त्यामुळं मग ज्या दिशेनं गुरुत्वाकर्षणाची ओढ जाणवते त्या दिशेनं मुळं वाटचाल करू लागतात.


दुसऱ्या बाजूला असलेल्या अंकुरांमध्ये वेगळी संप्रेरकं कार्यरत असतात. ती प्रकाशाला प्रतिसाद देतात. साहजिकच ती इवलीशी रोपं ज्या दिशेला प्रकाश असतो त्या दिशेकडे झेपावतात. या गुणधर्माला फोटोट्रॉपिझम असं म्हणतात. त्यामुळे मग गुरुत्वाकर्षणाच्या ओढीकडे दुर्लक्ष करत वरच्या दिशेनं वाटचाल करणं त्या अंकुरांना आणि त्यांचीच वाढ होत उदयाला येणाऱ्या खोडांना शक्य होतं.


*-डॉ.बाळ फोंडके यांच्या 'का?' या पुस्तकातून*

═══════════════════════


धीयंत्र आणि क्लोनीमीटर


══════════════════

           *🤔 【 कुतूहल 】 🤔*  

______________________________

*🖥️✒️संकलन✒️💻*

_*श्री.गजानन गोपेवाड *_

~==========================~


*कुतूहल : धीयंत्र आणि क्लीनोमीटर*


भास्कराचार्यानी ‘सिद्धांत शिरोमणी’ या ग्रंथाच्या गोलाध्याय खंडात खगोलशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी वापरता येतील अशा काही यंत्रांचे वर्णन दिले आहे. त्यांतील एक उपकरण आहे यष्टियंत्र अथवा धीयंत्र. यष्टियंत्र म्हणजे एका लाकडी फलकावर बसवलेली घडय़ाळाच्या काटय़ाप्रमाणे गोल फिरू शकेल अशी एक यष्टी, म्हणजेच सरळ काठी. हे यंत्र झाड, देऊळ, टेकडी यांची उंची मोजण्यासाठी वापरले जाई. आपल्या डोळ्याच्या पातळीवर फलक ठेवून काठीचे टोक ज्या वस्तूची उंची मोजायची त्याच्या वरच्या टोकाकडे रोखून फलकावर एक रेषा काढली जाई आणि नंतर काठीचे टोक त्या वस्तूच्या तळाशी रोखून दुसरी रेषा काढली जाई. या रेषांचा वापर करून मिळणारे उन्नत आणि अवनत कोन तसेच ज्या, कोज्या (साइन कोसाइन) यांची त्रिकोणमितीय कोष्टके वापरून इच्छित वस्तूची उंची मोजता येई. मोजणाऱ्या व्यक्तीचे वस्तूपासूनचे प्रत्यक्ष अंतर मोजणे शक्य नसले, किंवा मध्ये अडथळे असले, तरीही त्रिकोणमितीची सूत्रे चातुर्याने वापरून उंची मिळवता येई. धी म्हणजे बुद्धी. बुद्धिचातुर्य वापरणारे यंत्र म्हणून भास्कराचार्यानी धीयंत्र हे नाव दिले आहे.


या यंत्राच्या धर्तीवर आणि त्यात वापरलेली गणिती तत्त्वे वापरून आजही शालेय गणित प्रयोगशाळेसाठी क्लीनोमीटर नावाचे उपकरण बनवले जाते. भूमितीसाठी वापरतो तो कोनमापक, त्याला जोडलेली एक नळी, दोरा आणि दोऱ्याला लावायला एक छोटे वजन यांची आकृतीत दाखवल्याप्रमाणे जोडणी करून विद्यार्थी स्वत: हे उपकरण सहज बनवू शकतात. नळीतून इमारतीचे वरचे टोक दिसेल अशाप्रकारे नळीचा कोन साधल्यावर कोनमापकाला लावलेला दोरा कोनमापकावरील ज्या संख्येवर असेल ती संख्या ९० मधून वजा केल्यावर इमारतीचा उन्नत कोन मिळू शकेल. शाळेच्या इमारतीची वा शाळेच्या मैदानातील एखाद्या उंच झाडाची उंची या उपकरणाने मोजण्याचा प्रयोग मुलांसाठी आनंददायी तर होतोच, पण त्यातून त्रिकोणमितीची ताकद समजते. एखाद्या वस्तूच्या वरील टोकाचा उन्नत कोन ४५ अंशाचा असेल अशा ठिकाणी उभे राहिले तर त्या वस्तूचे आपल्यापासूनचे अंतर आणि आपल्या डोळ्याच्या पातळीवरची झाडाची उंची सारखीच असणार कारण ४५, ४५, ९० अंशाचे कोन असणारा काटकोन त्रिकोण समद्विभुज असतो. त्यामुळे झाडाचे आपल्यापासूनचे अंतर मोजून त्यात आपल्या पायापासून डोळ्यापर्यंतची उंची मिळवली की झाडाची उंची मिळेल. इतर ठिकाणी उभे राहिल्यास उन्नत कोनाचे टँजण्ट गुणोत्तर गुणिले आपल्यापासूनचे झाडाचे अंतर अधिक पायापासून डोळ्यापर्यंतची उंची आपल्याला झाडाची उंची देईल. वेगवेगळ्या ठिकाणी उभे राहिल्यास उन्नत कोन, झाडापासूनचे अंतर हे घटक बदलतील, पण सूत्र वापरून येणारी उंची तीच राहील.


–प्रा. माणिक टेंबे

मराठी विज्ञान परिषद, मुंबई.

त्रिकोणमीतीचा प्रदीर्घ प्रवास


══════════════════

           *🤔 【 कुतूहल 】 🤔*  

______________________________

*🖥️✒️संकलन✒️💻*

_गजानन गोपेवाड 

~==========================~


*कुतूहल : त्रिकोणमितीचा प्रदीर्घ प्रवास*


त्रिकोणाचे कोन आणि बाजू यांच्या परस्परसंबंधातून जन्मलेल्या त्रिकोणमितीची पाळेमुळे सुमारे चार हजार वर्षांपूर्वीच्या इजिप्शियन, बॅबिलोनियन संस्कृतीत रुजली आहेत. इजिप्शियनांनी पिरॅमिड बांधताना समरूप त्रिकोण वापरले, तर बॅबिलोनियनांनी समरूप त्रिकोणांच्या बाजूंच्या गुणोत्तरांचा अभ्यास केला. सुमेरियनांनी वर्तुळाचे ३६० भाग करून कोनमापन केले, तर बॅबिलोनियनांनी ३० अंशांप्रमाणे १२ राशींमध्ये विभाजन केले. यामुळे ग्रहताऱ्यांचे उदयास्त, ग्रहगती, ग्रहणे यांच्या नोंदी ठेवता आल्या. भारतात खगोलगणित व शुल्बसूत्रे, चीनमधील शिलालेख, भांडी, गुहांच्या भिंती यांवरील तारकासमूहांच्या नोंदी, पायथागोरस प्रमेयाची युक्लिडची सिद्धता, आर्किमिडीजचा वर्तुळातील आंतरलिखित कोनांचा अभ्यास हेही महत्त्वाचे!


इतकी प्राचीन पार्श्वभूमी असली तरी त्रिकोणमितीचे जनकत्व ग्रीक खगोलशास्त्रज्ञ हिप्पार्कस (इ. स. पू. १८०-१२५) यांना दिले जाते. त्यांनी आधुनिक त्रिकोणमितीशी मिळतीजुळती कोष्टके तयार केली. गमतीची गोष्ट ही की, प्रतलीय त्रिकोणमितीच्या आधी गोलीय त्रिकोणमितीचा जन्म झाला होता. मेनलिअस हे तिचे अग्रदूत. हेरॉननी स्थापत्यशास्त्रात आणि सर्वेक्षणात त्रिकोणमितीचा वापर केला. टॉलेमींनी त्यांच्या जगप्रसिद्ध ‘अल्मागेस्ट’ ग्रंथात जीवांची (कॉर्ड्स) पाच दशांशांपर्यंत कोष्टके मांडली. भारतीय गणिती आर्यभट (इ.स.५वे शतक) यांनी अर्ध-जीवेत (हाफ-कॉर्ड) ‘ज्या’-‘कोज्या’ (साइन-कोसाइन) संबोध मांडला आणि पहिल्या चरणातील (क्वाड्रंट) ‘ज्या’ कोष्टक (आर-साइन टेबल) तयार केले. अल्-तुसी यांनी अल्ख्वारिझ्मींनी पुरस्कार केलेल्या गोलीय त्रिकोणमितीला आधुनिक रूपात मांडले. चांद्रमासाची सुरुवात जाणून घेण्यासाठी को-स्पर्श-ज्या कोष्टके १-९० अंशापर्यंत १ अंश अंतराने मांडली गेली.


पृथ्वी सूर्याभोवती ३६५.२५८८ दिवसांत फिरते असे भास्कराचार्यानी (इ. स. १२ वे शतक) शोधले आणि त्रिकोणमितीतील विस्तारसूत्रेही दिली. माधवाचार्यानी (इ. स. १४ वे शतक) त्रिकोणमितीय फलनांचे विश्लेषण करून त्रिकोणमितीय श्रेढीही (सीरिज) बनवल्या. पंधराव्या शतकात त्रिकोणमिती युरोपमध्ये पोहोचली. ‘न्यू थिअरीज ऑफ द प्लॅनेट्स’ हा ग्रंथ प्रकाशित झाल्यावर त्रिकोणमिती विज्ञान ज्योतिषशास्त्रापासून अलग झाले. कोपर्निकसनी सूर्याभोवताली पृथ्वीभ्रमणाच्या नोंदी केल्यानंतर पिटिकस यांचा ‘ट्रिगॉनॉमेट्रिया’ ग्रंथ प्रसिद्ध झाला (१५९५) आणि ‘ट्रिगॉनॉमेट्री’ हा शब्द रूढ झाला. [ग्रीक भाषेत ट्रिओ=तीन; गॉनिआ=कोन; मेट्रन=मापन]. ऱ्हेटिकसनी त्रिकोणमितीच्या सहाही फलनांची कोष्टके तयार केली. १७ व्या- १८ व्या शतकात वैश्लेषिक त्रिकोणमिती प्रगत करण्याचे श्रेय न्यूटन, स्टर्लिग, ग्रेगरी, मॅकलॉरिन, बेर्नुली, द म्वाव्हरव, ऑयलर यांना जाते. नित्य समीकरणे, लॉगरिथम, कल्पित संख्या, टेलर श्रेढी यांनी त्रिकोणमितीला आधुनिक साज दिला. थोडक्यात, त्रिकोणमितीचा इतिहास म्हणजे खगोलशास्त्र ते आधुनिक दृश्यधारण (व्हिज्युअल पर्सेप्शन) असे जगाच्या इतिहासाचे गणिती विश्वरूपदर्शन म्हटल्यास वावगे ठरू नये.


–नीलिमा मोकाशी

मराठी विज्ञान 

चंद्राला कला का पडतात?


══════════════════════

   *📒📒📒 @ संकलन @📒📒📒*

  *श्री. गजानन गोपेवाड *

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════   

🌖🌙 *चंद्राला कला का पडतात?* 

**********************************

चंद्र जसा पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालतो तसाच तो स्वतःभोवतीही गिरकी घेतो, पृथ्वीही स्वतःभोवती गिरकी घेता घेता सूर्याभवतीही प्रदक्षिणा घालत असते, त्यामुळे चंद्र, पृथ्वी आणि सूर्य यांच्या एकमेकांच्या तुलनेत असलेल्या स्थानामध्ये सतत फरक पडत असतो. त्याशिवाय चंद्र आणि पृथ्वी यांच्या परिभ्रमणांमध्येही काही मूलभूत फरक आहेत. पृथ्वीच्या स्वतःभोवतीच्या आणि सूर्याभोवतीच्या या अशा दोन परिभ्रमणांच्या कालावधीत खूपच फरक आहे. स्वतःभोवती एक गिरकी घ्यायला पृथ्वीला २४ तास लागतात; पण सूर्याभोवतीच्या प्रदक्षिणेला तब्बल एक वर्ष लागतो. चंद्राच्या बाबतीत मात्र त्याच्या दोन्ही परिभ्रमणांचा कालावधी सारखाच आहे -२९ दिवस. त्यामुळे चंद्राची एकच बाजू नेहमी पृथ्वीकडे तोंड करून असते, त्याच्या पृष्ठभागाचा अर्धाच भाग त्यामुळे केव्हाही सूर्याकडे असतो. तोच भाग प्रकाशमान होतो. चंद्राच्या या आगळ्यावेगळ्या परिभ्रमणामुळे त्याचा सूर्यप्रकाशाने उजळलेला भाग नेहमीच संपूर्णपणे पृथ्वीवरून दिसत नाही. केवळ पौर्णिमेच्या दिवशीच पृथ्वीकडे तोंड करून असणारा त्याचा भाग संपूर्णपणे उजळलेला असतो, अर्थातच त्या दिवशी संपूर्ण चंद्रच प्रकाशमान असल्यासारखा आपल्याला दिसतो. जसजसा तो आपली जागा बदलत पृथ्वीभोवती फिरु लागतो तसतसा त्याच्या पृथ्वीकडे तोंड करून असणाऱ्या भागापैकी काही भागच सूर्याच्या प्रकाशाने उजळुन निघतो. उतरलेला उजळलेला भाग पृथ्वीकडे तोंड करून नसल्यामुळे आपल्या नजरेला पडत नाही. साहजिकच त्या उजळ भागाचा काही अंशच आपल्या नजरेला पडतो. त्यानुसार या पूर्ण वर्तुळापासून तो कमी कमी होत जातो. 


अमावास्येच्या दिवशी त्याचा उजळ भाग पृथ्वीच्या विरुद्ध दिशेकडे असल्यानं आपल्याला अजिबात दिसत नाही. साहजिकच त्या दिवशी चंद्र आपल्याला दिसतच नाही. पूर्णचंद्र ते संपूर्ण काळोख या दोन टोकांच्या अवस्थांमधल्या स्थितींना आपण चंद्राच्या कला म्हणतो. त्याच आपल्याला दिसत राहतात. अष्टमीच्या दिवशी या दोन टोकांच्या स्थितींमधली नेमकी अर्धी स्थिती असते. त्या दिवशी आपल्याला अर्धचंद्रच दिसतो. बाकीच्या दिवशी त्यापेक्षा कमी किंवा जास्त असलेल्या चंद्राच्या कोरी दिसतात.


*-डॉ.बाळ फोंडके यांच्या 'का?' या पुस्तकातून*

═════════════

नखे कापतांना वेदना का होत नाही


══════════════════════

   *📒📒📒 @ संकलन @📒📒📒*

  *श्री. गजानन गोपेवाड *

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════   

📒 *नखं कापताना वेदना का होत नाहीत?* 

**********************************

सुई-दोरा घेऊन आपण सदऱ्याचं किंवा ब्लाऊजचं तुटलेलं बटण शिवत असतो. साधी सरळ सरावातली प्रक्रिया. त्यामुळे काही वेळा आपण आपली नजर त्या बटणावरून हलवत दुसरीकडे कुठंतरी पाहतो. हात मात्र शिवण्याची ती प्रक्रिया इमानेइतबारे पार पाडत असतात; पण आपलं लक्ष आता दुसरीकडे वेधलं गेल्यानं सुई कापडात शिरण्याऐवजी आपल्या बोटात शिरू पाहते. ती टोचताक्षणीच आपण ऊऽई करत किंचाळतो. कारण तेवढ्याशा त्या टोचण्यानंही आपल्याला वेदना होतात. कळ येते. मग अख्खं नख कापताना किंवा डोक्यावरचे केस कापून घेताना आपल्याला वेदना का होत नाहीत? एवढंच काय, पण डोक्याचं साफ मुंडण करून चमनगोटा करून घेतानाही आपल्याला वेदना होत नाहीत. दाढी करतानाही ती गुळगुळीत व्हावी म्हणून आपण गालावरचे केस जवळजवळ मुळापासून छाटून टाकत असतो आणि तरीही वेदना होत नाहीत. असं का, हा प्रश्न त्या टोचणाऱ्या सुईसारखा टोचत राहतो ना त्याचं उत्तर मिळवण्याआधी आपल्याला वेदना का होतात हे पाहिलं पाहिजे. शरीरातल्या जिवंत पेशींशी मज्जातंतू जोडलेले असतात. त्या पेशींची मोडतोड झाली, त्यांना इजा झाली की या मज्जातंतूंची टोकं चाळवली जातात. त्यांच्यामधून विद्युत्रासायनिक संदेश मेंदूपर्यंत पोहोचतो आणि वेदनेची जाणीव आपल्याला होते. जर हे मज्जातंतू चाळवलेच गेले नाहीत तर वेदना होणारच नाही. नखं आणि केस या मृतपेशी असतात. त्यामुळे त्यांच्याशी मज्जातंतू जोडलेले नसतात. साहजिकच नखं कापताना किंवा केस कापून घेताना वेदना जाणवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही; परंतु केसांची वाढ ज्या फॉलिकलमधून होते त्या जिवंत पेशी असतात. केस कापण्याऐवजी ते उपटले तर या पेशींना धक्का पोहोचतो. त्यांच्याशी जोडलेल्या मज्जातंतूंना त्याचा प्रभाव जाणवतो व आपल्याला वेदना होतात. नखांच्या बाबतीतही हीच परिस्थिती असते. नखं जर मृत पेशींची बनलेली असतात तर मग त्यांची वाढ कशी होते? हा प्रश्न आपल्याला पडायला हवा. प्रत्यक्षात नखांच्या मुळाशी असलेल्या पेशींची वाढ होते व नखांच्या मुळाशी एक नवी प्रत तयार होते. ती वरच्या मृत पेशींना वरच्या दिशेनं ढकलते. नखं वाढतात. कालांतरानं या नव्या प्रतीतल्या पेशीही मृत होतात आणि त्यांच्या मुळाशी एक नवी प्रत तयार होते. त्यामुळे नखांची वाढ होत असली किंवा केसांचीही, तरी त्या मृत पेशी असल्यानं त्यांची कापाकाप होताना अजिबात वेदना होत नाहीत. दाढीच्या बाबतीतही ही स्थिती असते. कितीही गुळगुळीत दाढी केली तरी ती करताना त्या केसांच्या फॉलिकलना धक्का पोहोचत नाही; पण इलेक्ट्रीक शेव्हरनं दाढी करताना काही वेळा त्यात अडकलेला दाढीचा केस ओढला जातो, उपटला जातो आणि वेदना होतात. गुळगुळीत दाढी करणारी ब्लेड जरा जोरानं ओढली जाऊन खालच्या कातडीला कापते. वाहणाऱ्या रक्ताबरोबर वेदनांचा प्रवाहही सुरू होतो.


*-डॉ.बाळ फोंडके यांच्या 

गुरुवार, १८ नोव्हेंबर, २०२१

गाथा बलिदानाची झाशीची राणी लक्ष्मीबाई

 ➿➿➿➿➿➿➿➿➿➿

             *गाथा बलिदानाची*

➿➿➿➿➿➿➿➿➿➿

           *🚩राणी लक्ष्मीबाई🚩*

*१८५७ च्या स्वातंत्र्य उठावातील वीरांगना, झाशीची राणी*


    *जन्म : १९ नोव्हेंबर १८३५*

               (काशी, भारत)


   *वीरमरण : १८ जून  १८५८*

            (ग्वालियर, मध्य प्रदेश)


टोपणनाव : मनू

चळवळ : १८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध

प्रमुख स्मारके : ग्वाल्हेर

धर्म : हिंदू

वडील : मोरोपंत तांबे

आई : भागीरथीबाई तांबे

पती : गंगाधरराव नेवाळकर

अपत्ये : दामोदर (दत्तकपुत्र)


लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवाळकर, म्हणजेच झाशीची राणी लक्ष्मीबाई,  या एकोणिसाव्या शतकातील झाशी राज्याच्या राणी होत्या; हिंदुस्थानात इ.स. १८५७च्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीविरुद्ध झालेल्या स्वातंत्र्य उठावातील या एक अग्रणी सेनानी होत्या. त्यांच्या शौर्याने त्यांना ‘क्रांतिकारकांची स्फूर्तिदेवता’ म्हणून जनमानसात अढळ स्थान प्राप्त झाले आहे.


👧🏻 *बालपण*


लक्ष्मीबाईंचे मूळ नाव मनिकर्णिका होते. त्यांचे वडील मोरोपंत तांबे हे पुण्याच्या पेशव्यांच्या आश्रयाला होते. तांबे कुटुंब मूळचे सातारा जिल्ह्यातील धावडशी गावचे होते. लक्ष्मीबाईंचा जन्म भागीरथी बाई यांच्या पोटी उत्तर प्रदेशातील काशी येथे झाला होता.


👸🏻 *व्यक्तिमत्त्व*


धोरणी, चतुर, युद्धशास्त्रनिपुण, शूर आणि थोर कर्तृत्व व नेतृत्व असणाऱ्या राणी लक्ष्मीबाई जन्मतः कोणत्याही राजघराण्यातील नसल्या तरी राजघराण्याशी संबंधित व्यक्तींमध्ये वावरलेल्या, वाढलेल्या होत्या. अश्वपरीक्षेचे सर्व मापदंड माहीत असणाऱ्या लक्ष्मीबाई घोडेस्वारी करण्यातही वाकबगार होत्या. त्या काळी पूर्ण हिंदुस्थानात श्रीमंत धोंडोपंत बाजीराव पेशवे व नानासाहेब पेशवे आणि जयाजी शिंदे व लक्ष्मीबाई या तिघांशिवाय कोणीही अचूक अश्वपरीक्षा करणारा नव्हता. अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असणाऱ्या राणी लक्ष्मीबाईंनी युद्धशास्त्रातही प्रावीण्य मिळविले. बाजीरावांच्या पदरी बाळंभट देवधर नावाचे उत्तम कसरतपटू आणि कुस्तीगीर होते. त्यांनीच मल्लविद्येत पारंगत होण्यासाठी मल्लखांब नावाचा कसरतीचा वेगळा प्रकार शोधून काढला. मनाची एकाग्रता, विलक्षण चपळता, शरीराचा तोल सांभाळण्याचे पूर्ण कौशल्य, काटकपणा आणि चतुरस्र भान वृद्धिंगत करणाऱ्या मल्लखांब विद्येतही राणी लक्ष्मीबाई तरबेज झाल्या.


लक्ष्मीबाईंचे वैशिष्ट्य म्हणजे पुरुषप्रधान संस्कृती असणाऱ्या समाजाने एका विधवा राणीला दुर्लक्षित करू नये म्हणून त्यांनी धोरणीपणाने पुरुषी पोषाखात वावरण्याचे ठरवले.


इ.स. १८४२ मध्ये त्यांचा विवाह झाशी संस्थानाचे राजे गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी झाला. तेव्हा त्यांचे नाव बदलून लक्ष्मी असे ठेवण्यात आले. लग्नानंतर झाशीच्या प्रजाजनांत राणीबद्दल विशेष प्रेम निर्माण झाले.


दरबाराचे कामकाज राणीने पाहणे गंगाधररावांस पसंत नसल्याने मिळालेल्या वेळेचा उपयोग लक्ष्मीबाईंनी स्वत्व जपण्यासाठी केला. त्यांनी आपला रोजचा व्यायाम, कसरत, घोडेस्वारी, तलवारबाजी नियमित सुरू ठेवली.


गंगाधरराव नेवाळकर व लक्ष्मीबाई यांना मुलगा झाला परंतु तीन महिन्याचा असताना तो मृत्यू पावला. मुलाच्या रूपाने वारस मिळाल्याच्या आनंदात असणारे गंगाधररावही या गोष्टीने दुःखी झाले. त्यांनी वासुदेवराव नेवाळकर यांच्या मुलाला दत्तक घेऊन त्याचे दामोदर असे नाव ठेवले. इ.स. १८५३ मध्ये गंगाधररावांचे निधन झाले.


🎠 *झाशी संस्थान खालसा*


ईस्ट इंडिया कंपनीद्वारे ब्रिटिश सरकार झाशी संस्थान खालसा करणार नाही असे पूर्वीपासून झाशीच्या ब्रिटिशांशी असणाऱ्या मैत्रीपूर्ण संबंधांवरून राणी लक्ष्मीबाईंना वाटत होते. त्यासाठी लक्ष्मीबाई स्वतः ईस्ट इंडिया कंपनीशी पत्रव्यवहार करत होत्या. या पत्रव्यवहारातून त्यांनी कंपनी सरकारचा अन्याय, बेकायदेशीरपणा आणि खोडसाळपणा उघड केला. एका पत्रात त्यांनी झाशी संस्थान खालसा केले, तर पूर्ण हिंदुस्थानातील लोकांना हळहळ वाटेल. परिणामी हिंदुस्थानातील लोकांना ब्रिटिशांबद्दल भरवसा, विश्वास वाटेल का?, अशी शंका व्यक्त करून कंपनीला एक प्रकारचे आव्हान दिले. कंपनी सरकारच्या बेजबाबदार अनैतिक कृत्यांनी व कंपनीच्या अधिकाराला आव्हान देण्याचे धारिष्ट्य करणाऱ्या राणी लक्ष्मीबाई या देशातील पहिल्या काही व्यक्तींमधील एक होत्या.

परंतु हिंदुस्थानातील संस्थाने खालसा करण्याचा निर्णय गव्हर्नर जनरल डलहौसीने घेतलेलाच असल्याने झाशी संस्थानही खालसा करण्यात आले. १३ मार्च, इ.स. १८५४ रोजी झाशीच्या जनतेला उद्देशून जाहीरनामा काढण्यात आला. त्यानुसार दत्तक विधान नामंजूर करून झांशी संस्थान ब्रिटिश सरकारांत विलीन करण्यात आले. त्या वेळीच स्वाभिमानी राणीने माझी झाशी देणार नाही असे स्फूर्तिदायक उद्गार काढले.

झाशी खालसा झाल्यावर लक्ष्मीबाईंना किल्ला सोडून शहरातील राजवाड्यात राहायला यावे लागले. राणी लक्ष्मीबाईंना पदच्युत झाल्याचा अपमान सहन करीत काही काळ शांत बसावे लागले होते.


🏇 *इ.स. १८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध*


इ.स. १८५७ चा उठाव हा संपूर्ण हिंदुस्थानात झाला. त्याप्रमाणे ५ जून, १८५७ ला झाशीतही शिपायांचा उद्रेक झाला. केवळ ३५ शिपायांनी इंग्रजांना पळवून लावले. या परिस्थितीत इंग्रजांच्या परवानगीची वाट न पाहता राणी लक्ष्मीबाई किल्ल्यावर राहण्यास गेल्या. पुढे २२ जुलै, इ.स. १८५७ ला ब्रिटिशांनी राणींना झाशीची अधिकारसूत्रे हाती घेण्यास सांगितले. राणी पुन्हा राज्यकर्त्या झाल्या होत्या, परंतु अतिशय बिकट परिस्थितीत त्यांच्या हाती राज्यकारभार आला होता. मनुष्यबळ नव्हते आणि खजिनाही रिकामाच होता. प्रजेच्या मनात असुरक्षित भविष्याबद्दल भीती होती. परंतु तरीही लक्ष्मीबाईंनी खंबीरपणाने परिस्थिती हाताळली. जुन्या विश्र्वासातील लोकांना परत बोलावून त्यांना काही अधिकाराची पदे दिली. दिवाण लक्ष्मणरावांना प्रधानमंत्री, तर प्रत्यक्ष वडिलांना - मारोपंत तांब्यांना - खजिनदार केले. लक्ष्मणरावांचा भाऊ, मुलगा तसेच मुन्सफ, भोलानाथ, आणि नामांकित गोलंदाज खुदाबक्ष यांना फौजेचे व शस्त्रास्त्रांच्या जोडणीचे काम दिले. बंडखोर ठाकुरांना धोरणीपणाने आपल्या बाजूस वळविले; राज्याच्या सल्लागार मंडळात सामील करून घेतले. ब्रिटिशांनी निकामी केलेल्या २२ तोफा पुन्हा सुरू करून तोफगोळ्यांची निर्मितीही सुरू केली. इंग्रजांविरुद्ध बंड करणाऱ्या विद्रोही शिपायांना आपल्या सैन्यात सामील करून घेतले. परकीयांविरुद्ध लढण्याची तयारी करीत असतानाच राणींनी प्रजेचा स्वाभिमान, निष्ठा वाढवण्याचा व आनंद जपण्याचा प्रयत्न केला. दानशूर, श्रद्धाळू व दयाळू लक्ष्मीबाईंनी थंडीत कुडकुडणाऱ्या हजार-दीड हजार गरिबांना, साधू-संन्याशांना उबदार कपड्यांचे वाटप केले. स्वतःबरोबर प्रजेच्या श्रद्धा जपणाऱ्या राणीने गोवध बंदी केली. त्यांनी किल्ल्यावर रंगपंचमीसारखा सण साजरा करून स्त्रियांसाठी हळदी-कुंकवाचे कार्यक्रम केले.


अशा प्रकारे प्रशासन, सैन्य व कल्याणकारी कामे यांची चोख व्यवस्था लावून स्वराज्य असल्याचा विश्र्वास राणी लक्ष्मीबाईंनी जनतेत निर्माण केला. प्रजेला मुक्त मनाने आपल्या आवडीच्या गोष्टी करण्यासाठी, त्यांच्या कलेची जोपासना करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यांनी झाशीमध्ये मराठी नाटकांचे प्रयोग घडवून आणले. मराठी भाषिकांसाठी रासक्रीडा, चित्रलेखा, बाणासूर इ. नाटके योजली. स्वतःही नाटकांचा आनंद घेतला. एक स्थिर, सुरक्षित, समृद्ध व सुसंस्कृत राज्य घडवण्याचा प्रयत्न राणी लक्ष्मीबाईंनी केला. यामुळे राणी आणि झाशीतील प्रजा यांच्यातील नाते दृढ झाले.


दरम्यान २१ मार्च, इ.स. १८५८ ला सकाळीच सर ह्यू रोज आपल्या फौजेसह झाशीजवळ आला. त्याने राणीस नि:शस्त्र भेटीस यावे किंवा युद्धास तयार राहावे असे कळविले. ब्रिटिशांनी केलेल्या विश्र्वासघातामुळे, अन्यायामुळे ‘भारतात विदेशी शासन नकोच’ अशा ठाम मताच्या राणींनी भेटीस जाण्याचे नाकारले. त्याच वेळी तात्या टोपे यांच्याशी संधान बांधून एका बाजूने इंग्रजांवर हल्ला करण्यास सुचविले.


उत्तम प्रतीचा सेनानी आणि कर्तबगार राजकारणी असणाऱ्या ह्यू रोजने झाशीच्या किल्ल्यावर मारा करण्यासाठी आजुबाजूच्या टेकड्यांवर कब्जा मिळविला. त्या टेकड्यांवर तोफा चढवल्या. २-३ दिवस झाशीची बाजू अभेद्य होती. घनगर्ज भवानीशंकर, कडक बिजली या तोफा आपल्या नावाप्रमाणे कार्यरत होत्या. घौसखान याने तर तोफेमधून असा मारा केला, की त्यामुळे दोन शिवमंदिरे वाचली. या गोष्टीसाठी आजही झाशीतील लोक त्याला धन्यवाद देतात. युद्धाच्या ९ व्या दिवशी इंग्रजांनी पश्चिमेकडील तोफ बंद पाडून त्या बाजूच्या तटाला खिंडारे पाडली. ही खिंडारे बुजवण्यासाठी रातोरात काम केले गेले. त्या वेळी चुना, दगड, विटा यांची ने-आण करण्याचे काम स्त्रियांनी केले होते हे विशेष.


शेवटी ब्रिटिशांना फितुरांनीच साथ दिली. झांशीमधील शंकर किल्ल्यावरील मोठ्या विहिरीतून संपूर्ण झांशीला पाणी पुरवठा व्हायचा, ती विहीर आणि जिथे दारुगोळा तयार व्हायचा, तो कारखाना, ही दोन ठिकाणे इंग्रजांनी उद्ध्वस्त केली. अशा स्थितीत राणींची आशा पेशव्यांकडून येणाऱ्या मदतीवर होती. त्याप्रमाणे ३१ मार्चला तात्या टोपेंचे सैन्य आले. परंतु इंग्रजांपुढे त्यांचा टिकाव लागला नाही.


राणी लक्ष्मीबाईंनी सर्व फौजेला धीर देताना स्वतःच्या बळावरच लढण्याचे आवाहन केले. एवढेच नाही तर ‘रणांगणात तुम्हाला मृत्यू आला, तर तुमच्या विधवांच्या निर्वाहाची व्यवस्था मी करेन’ असे आश्वासन दिले. राणीचे डावे-उजवे हात असणारे खुदाबक्ष आणि घौसखान इंग्रजांच्या गोळीबारात मृत्युमुखी पडल्यावर मात्र बिकट परिस्थिती निर्माण झाली. ब्रिटिश सैन्य शिड्या लावून शहरात उतरले. शांत, सुंदर शहराची होणारी वाताहत पाहून राणी संतापल्या आणि त्यांनी प्रत्यक्ष रणांगणात उतरण्याचा निर्णय घेतला व तो अंमलात आणला. संतापलेल्या राणीची तलवार अशी तळपत होती, की समोर येणारा गोरा शिपाई गारदच होत होता. त्यांचे धैर्य, शौर्य, आवेश पाहून ह्यू रोजही थबकला. तरीही एका अनुभवी सरदाराने पुढचा धोका लक्षात घेऊन लक्ष्मीबाईंना परत किल्ल्यावर नेले. सर्व फौजी अधिकाऱ्यांशी लक्ष्मीबाईंनी चर्चा केली आणि निर्णयानुसार रातोरात त्यांनी झाशी सोडले. सतत ११ दिवस राणींनी ब्रिटिशांना झुलवत ठेवले. लढाईचा साक्षीदार ह्यूज रोजनेही म्हटले की ‘राणी लक्ष्मीबाई सर्वोत्कृष्ट सैनिक आणि सर्वाधिक हिंमतवान व्यक्ती होती.’


या पराभवानंतर राणी पेशव्यांबरोबर ग्वाल्हेरला गेली. तेथेही स्वस्थ न बसता लक्ष्मीबाईंनी आपल्या सैन्याची कवायत नियमित चालू ठेवली. सैन्यांमध्ये फिरून, सैनिकांची चौकशी करीत, इंग्रजांना रोखण्यासाठी कशा प्रकारे मोर्चे बांधणी करावी याविषयी त्यांनी चर्चा केली. याच वेळी १८ जून इ.स. १८५८ रोजी सकाळीच ब्रिटिश अधिकारी स्मिथ सैन्यासह ग्वाल्हेरच्या अगदी जवळ येऊन पोहोचला. त्याने त्वरित हल्ला चढवला. लक्ष्मीबाईंनी रणांगणात धाव घेतली. लक्ष्मीबाई तलवारीचे सपसप वार करीत समोर येणाऱ्या ब्रिटिश सैन्याला कापून काढत होत्या. आवेगाने, विजेसारख्या तळपणाऱ्या राणींकडे पाहून त्यांचे सैन्यही त्वेषाने लढले. इंग्रज अधिकारी स्मिथचे सैन्य मागे हटणारच होते, त्याच वेळी नव्या दमाची एक फौज बाजूच्या टेकडीवरून चालून आली. दोन्हीकडून आलेल्या सैन्यासमोर राणींचा निभाव लागला नाही. परिस्थिती ओळखून त्या काही स्वारांनिशी बाहेर पडल्या. थोडे पुढे जाताच एका ओढ्यापाशी त्यांचा घोडा अडला. नेहमीचा घोडा शेवटच्या लढाईत त्यांच्याबरोबर नव्हता. काही केल्या घोडा ओढा ओलांडत नव्हता. तिथे इंग्रजांशी लढत असताना राणी लक्ष्मीबाई रक्‍तबंबाळ होऊन घोड्यावरून खाली कोसळल्या. त्यांचा डाव्या कुशीतही तलवार घुसली, परंतु पुरुषी वेशात असलेल्या राणी लक्ष्मीबाई यांना इंग्रज ओळखू शकले नाहीत. ते पुढे निघून गेले. घायाळ झालेल्या राणी लक्ष्मीबाई यांना त्यांच्या सेवकाने एका मठात आणले. परंतु त्यांची उपचार करण्याची इच्छा नव्हती. आपला देह क्रूर इंग्रजांच्या हाती लागू नये अशी त्यांची इच्छा होती. म्हणून त्या सेवकाने त्यांना मुखाग्नी दिला. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी वयाच्या तेविसाव्या वर्षी मरण स्वीकारले आणि अशाप्रकारे एका शूर राणीला रणांगणात वीरमरण आले.


🔮 *विशेष*


ब्रिटिशांनी राणी लक्ष्मीबाईचा उल्लेख `’हिंदुस्थानची जोन ऑफ आर्क' असा केला. क्रांतिकारकांची स्फूर्तिदेवता ठरलेल्या या राणीवर अनेक काव्ये, पोवाडे रचले गेले. राणी लक्ष्मीबाईंचे विचार आजच्या काळातही खूप प्रेरणादायी आहेत. राणी लक्ष्मीबाईंच्या ग्वाल्हेर येथील समाधीस्थानावर इ.स. १९६२ मध्ये त्यांचा अश्वारूढ पुतळा स्थापन करण्यात आला. ते समाधीस्थान पाहिल्यानंतर कविवर्य भा. रा. तांबे यांनी पुढील यथार्थ ओळी सुचल्या.  रे हिंद बांधवा, थांब या स्थळी। अश्रू दोन ढाळी।।

ती पराक्रमाची ज्योत मावळे । इथे झांशिवाली।।


खूब लड़ी मर्दानी वो तो झाँसी वाली रानी थी। 

..कवयित्री : सुभद्रा कुमारी चौहान


🎞📽📚 *झाशीच्या राणीवर लिहिली गेलेली ऐतिहासिक पुस्तके, कादंबऱ्या, काव्ये, चरित्रे, चित्रपट, नाटक*


The Queen of Jhansi (मूळ इंग्रजी. लेखिका महाश्वेता देवी) हिंदी भाषांतर : सागरी सेनगुप्ता व मंदिरा सेनगुप्ता

खूब लड़ी मर्दानी : झांसी की रानी (हिंदी दूरचित्रवाणी मालिका, २०१९; प्रमुख भूमिका - अनुष्का सेन, विकास माणकताला)

झाशी : १८५७ - लेखक अविनाश वासुदेव पुराणिक

*झाँसी की रानी : दूरचित्रवाणीवरील मालिका. हिचे १८-८-२००९ ते १९-६-२०११ या काळात ४८० भाग (एपिसोड्‌स) प्रसारित झाले होते.*

झाशीची रणचंडी : कादंबरी : लेखक पोपटराव भसे

झाशीची राणी लक्ष्मीबाई : लेखक दा.वि. कुलकर्णी

झाशीची राणी लक्ष्मीबाई : लेखक वि.श्री. जोशी

झाशीची राणी लक्ष्मीबाई’ : लेखक म.स. भावे

झाशीची राणी लक्ष्मीबाई : लेखिका प्रतिभा रानडे

झाशीची राणी लक्ष्मीबाई : लेखक वृंदावनलाल वर्मा

झाशीची वाघीण : लेखक भास्कर महाजन

झाशी राणी लक्ष्मीबाई : हिंदी पु्स्तक. लेखक : रामप्रसाद एन.एस.

झाशी संस्थानच्या महाराणी लक्ष्मीबाई साहेब ह्यांचे चरित्र : लेखक दत्तात्रेय बळवंत पारसनीस

मर्दानी : झाशीची राणी लक्ष्मीबाई हिच्या जीवनावरील कादंबरी, लेखक : विद्याधर गोखले

मर्दानी रणरागिणी ... : आत्मकथा स्वरूपातील ललित पुस्तक, लेखिका मंदा खापरे

मनकर्णिका - दि क्वीन ऑफ झाशी (हिंदी चित्रपट, २०१७, दिग्दर्शक - केतन मेहता). या चित्रपटात अतुल कुलकर्णी यांनी तात्या टोपेंचे काम केले आहे.

स्वोर्ड्‌स ॲन्ड स्केप्टर्स (हाॅलिवूडचा इंग्रजी चित्रपट, २०१८) (लक्ष्मीबाईंच्या भूमिकेत, इंडो-अमेरिकन अभिनेत्री देविका भिसे) (हा चित्रपट मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तीन भाषांमध्ये निघाला आहे.)

वीज म्हणाली धरतीला (नाटक : लेखक वि.वा. शिरवाडकर)

वीरांगना लक्ष्मीबाई : हिंदी पुस्तक. लेखक : रामाश्रय सविता

समरसौदामिनी : झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनावरील हृदयद्रावक कादंबरी, लेखक भा.द. खेर

सोहराब मोदी यांनी इ.स. १९५६ मध्ये 'झाँसी की रानी' नावाचा भव्य हिंदी चित्रपट काढला होता. त्यात झाशीच्या राणीचे काम मोदी यांची पत्‍नी मेहताब हिने केले होते. हा भारतात बनलेला पहिला रंगीत (टेक्निकलर) चित्रपट होता.


🗽 *लक्ष्मीबाईंचे पुतळे*


ग्वाल्हेर येथील समाधीस्थानावर

नवी दिल्ली येथे 'रानी झांसी रोड आणि देशबंधु गुप्ता मार्ग' यांनी बनलेल्या चौकात.

पुण्यात संभाजी उद्यानाजवळ (जंगली महाराज रोड)

लक्ष्मीबाईंचे नाव दिलेल्या संस्था संपादन करा

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा, पिरंगुट (पुणे)

रानी लक्ष्मीबाई शाळा-समूह (लखनौ)

लक्ष्मीबाई राष्ट्रीय शारीरिक शिक्षण विद्यापीठ (ग्वाल्हेर)

महाराणी लक्ष्मीबाई वैद्यकीय महाविद्यालय (झांशी)

राणी लक्ष्मीबाई मध्यवर्ती शेतकी विद्यापीठ (झांशी)

राणी लक्ष्मीबाई राष्ट्रीय उद्यान (अंदमान-निकोबार)

सुभाष चंद्र बोसांच्या इंडियन नॅशनल आर्मीमध्ये राणी लक्ष्मीबाईंच्या नावाची एक रेजिमेन्ट होती.

१९५७ साली भारत सरकारने छापून प्रसिद्ध केलेल्या दोन पोस्टाच्या तिकिटांवर राणी लक्ष्मीबाईची छबी होती.


🎖 *राणी लक्ष्मीबाईच्या नावाचे पुरस्कार*


उत्तर प्रदेश सरकारचा रानी लक्ष्मीबाई पुरस्कार (कुस्तीविद्येत प्रवीण असलेल्या साक्षी मलिक यांना हा पुरस्कार मिळाला आहे.)

भारत सरकारचा राणी लक्ष्मीबाई स्त्री-शक्ती पुरस्कार 

मध्यप्रदेश सरकार वीरता दाखविणाऱ्या स्त्रीला ’वीरांगना लक्ष्मीबाई राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करते. माउंट एव्हरेस्टवर यशस्वी चढाई करणाऱ्या बच्छेंद्री पाल यांना हा पुरस्कार मिळाला होता. (इ.स. २०१३)

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

➿➿🙏🌞 शुभ प्रभात🙏🌞➿➿

संकलन -)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा - यवतमाळ ४४५२०६


प्रभात दर्शन

 🌳⛳ *शुभ प्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

कार्तिक मास,शुक्ल पक्ष, *पूर्णिमा*,कृतिका नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,हेमन्त ऋतु,युगाब्द ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

शुक्रवार, १९ नोव्हेंबर २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~🕉

                        *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


        *रिश्तों और सम्बंधों के समाप्त अथवा धुंधले होने का एक प्रमुख कारण यह भी है कि सामान्यतः हमारे मन में यही विचार आता है कि अमुक व्यक्ति हमें स्मरण नही करता तो हम ही क्यों करें।*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


बुधवार, १७ नोव्हेंबर, २०२१

गाथा बलिदानाची

 ➿➿➿➿➿➿➿➿➿➿

🇮🇳🇮🇳 *गाथा बलिदानाची* 🇮🇳🇮🇳                                                    

➿➿➿➿➿➿➿➿➿➿

💥💥🏅🎖️🇮🇳👨‍✈️🇮🇳🎖️🏅💥💥       

       

         *मेजर शैतान सिंह भाटी*

(भारतीय सेना अधिकारी एवं परमवीर चक्र से सम्मानित)

      *जन्म : १ दिसम्बर १९२४*

(जोधपुर, राजस्थान, ब्रिटिश भारत)

     *देहांत : १८ नवम्बर १९६२* (उम्र ३७)

(रेज़ांग ला, जम्मू और कश्मीर, भारत)

निष्ठा : भारत

सेवा/शाखा :  भारतीय सेना

सेवा वर्ष : १९४९-१९६२

उपाधि : मेजर

सेवा संख्यांक : IC-६४००

दस्ता : कुमाऊं रेजिमेंट

युद्ध/झड़पें : भारत-चीन युद्ध

सम्मान :  परम वीर चक्र

                मेजर शैतान सिंह भाटी भारतीय सेना के एक अधिकारी थे। इन्हें वर्ष १९६३ में मरणोपरांत परमवीर चक्र का सम्मान दिया गया। इनका निधन १९६२ के भारत-चीन युद्ध में हुआ था, इन्होंने अपने वतन के लिए काफी संघर्ष किया लेकिन अंत में शहीद हो गये तथा भारत देश का नाम रौशन कर गये। मेजर सिंह स्नातक स्तर की पढ़ाई पूरी करने पर सिंह जोधपुर राज्य बलों में शामिल हुए। जोधपुर की रियासत का भारत में विलय हो जाने के बाद उन्हें कुमाऊं रेजिमेंट में स्थानांतरित कर दिया गया। उन्होंने नागा हिल्स ऑपरेशन तथा १९६१ में गोवा के भारत में विलय में हिस्सा लिया था।                                                              १९६२ में भारत-चीन युद्ध के दौरान, कुमाऊं रेजिमेंट की १३ वीं बटालियन को चुशूल सेक्टर में तैनात किया गया था। सिंह की कमान के तहत सी कंपनी रेज़ांग ला में एक पोस्ट पर थी। १८ नवंबर १९६२ की सुबह चीनी सेना ने हमला कर दिया। सामने से कई असफल हमलों के बाद चीनी सेना ने पीछे से हमला कर किया। भारतीयों ने आखिरी दौर तक लड़ा परन्तु अंततः चीनी हावी हो गए। युद्ध के दौरान सिंह लगातार पोस्टों के बीच सामंजस्य तथा पुनर्गठन बना कर लगातार जवानों का हौसला बढ़ाते रहे। चूँकि वह एक पोस्ट से दूसरी पोस्ट पर बिना किसी सुरक्षा के जा रहे थे अतः वह गंभीर रूप से घायल हो गए और वीर गति को प्राप्त हो गए। उनके इन वीरता भरे देश प्रेम को सम्मान देते हुए भारत सरकार ने वर्ष १९६३ में उन्हें परमवीर चक्र से सम्मानित किया।


💁🏻‍♂️ *प्रारंभिक जीवन*

शैतान सिंह भाटी का जन्म 1 दिसम्बर १९२४ को राजस्थान के जोधपुर जिले के बंसार गांव के एक राजपूत परिवार में हुआ था। उनके पिता लेफ्टिनेंट कर्नल हेम सिंह थे जिन्होंने प्रथम विश्व युद्ध के दौरान फ्रांस में भारतीय सेना के साथ सेवा की और ब्रिटिश सरकार द्वारा ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर (ओबीई) से सम्मानित किए गए थे l


सिंह ने जोधपुर के राजपूत हाई स्कूल में अपनी मैट्रिक तक की पढाई की । स्कूल में वह एक फुटबॉल खिलाड़ी के रूप में अपने कौशल के लिए जाने जाते थे। १९४३ में स्कूल की पढ़ाई पूरी करने के बाद सिंह जसवंत कॉलेज गए और उन्होंने १९४७ में स्नातक किया। १ अगस्त १९४९ को वह एक अधिकारी के रूप में जोधपुर राज्य बलों में शामिल हो गए।


👨‍✈️ *सैन्य जीवन*

जोधपुर की रियासत का भारत में विलय हो जाने के बाद उन्हें कुमाऊं रेजिमेंट में स्थानांतरित कर दिया गया। उन्होंने नागा हिल्स ऑपरेशन तथा १९६१ में गोवा के भारत में विलय में हिस्सा लिया था। उन्हें ११ जून १९६२ को उन्हें मेजर पद के लिए पदोन्नत किया गया था।


🔥 *भारत-चीन युद्ध*

हिमालय क्षेत्र में विवादित सीमाओं पर लंबे समय से भारत और चीन के बीच असहमति थी। विवादित क्षेत्र में बढ़ते चीनी घुसपैठ का सामना करने के लिए, भारत के प्रधान मंत्री जवाहरलाल नेहरू ने उनसे निपटने के लिए रणनीतियों के बारे में पूछा। हालांकि, भारतीय सेना द्वारा प्रस्तुत प्रस्ताव को खारिज कर दिया गया था। इसके बजाय उन्होंने "फॉरवर्ड पॉलिसी" नामक एक नौकरशाह द्वारा प्रस्तावित एक योजना को मंजूरी दी जिसमे चीनी सीमा के क्षेत्र में कई छोटी-छोटी पोस्टों की स्थापना के लिए कहा गया था। चीनी घुसपैठ के खिलाफ सार्वजनिक आलोचना में गंभीर वृद्धि के कारण नेहरू ने सेना की सलाह के खिलाफ "फॉरवर्ड पॉलिसी" को लागू कर दिया। चीन को भौगोलिक लाभ प्राप्त था और यह सेना के लिए चिंता का विषय था। अतिरिक्त चीनी हमले के समय कई छोटी-छोटी पोस्टों को बनाए रखना असंगत था। इस पर नेहरू ने यह मान लिया था कि चीनी हमला नहीं करेंगे। लेकिन चीन ने चीन-भारत युद्ध की शुरुआत कर दी।


💥 *रेज़ांग ला का युद्ध*

युद्ध के दौरान कुमाऊं रेजिमेंट की १३ वीं बटालियन को चूसुल सेक्टर में तैनात किया गया था। समुद्र तल से ५,००० मीटर (१६,००० फीट) की ऊंचाई पर, सिंह की कमान में सी कंपनी रेज़ांग ला में एक स्थान पर थी, और इस क्षेत्र को पांच प्लाटून पोस्टों द्वारा बचाव किया जा रहा था। १८ नवंबर १९६२ की सुबह चीनी सेना ने हमला कर दिया पर भारतीयों ने आक्रामक तरीके से तैयारी की थी क्योंकि उन्होंने चीनी सेना को सुबह ५ बजे के मंद प्रकाश में आगे बढ़ते हुए देखा था। जैसे ही भारतीयों ने दुश्मन को पहचाना, उन पर लाइट मशीन गन, राइफल्स, मोर्टार और ग्रेनेड से हमला कर दिया और कई चीनी सैनिक मार गिराए।


५:४० बजे चीनी सेना ने पुनः मोर्टार से हमले करने शुरू कर दिए और लगभग ३५० चीनी सैनिकों ने आगे बढ़ना शुरू किया। चीनी सेना द्वारा सामने से किए गए हमले असफल होने के बाद लगभग चार सौ चीनी सैनिकों ने पीछे से हमला किया। साथ ही ८ वीं प्लाटून पर मशीन गन और मोर्टार से पोस्ट के तार बाड़ के पीछे से हमला किया गया और ७ वीं प्लाटून पर १२० चीनी सैनिकों ने पीछे से हमला किया। भारतीयों ने ३ इंच (७६ मिमी) मोर्टार के गोले से मुकाबला किया और कई चीनी सैनिकों को मार दिया। जैसे ही आखिरी २० जीवित लोग बचे, भारतीयों ने अपनी खाइयों से बाहर निकल कर चीनी सैनिकों के साथ हाथ से हाथ से लड़ने लड़ने लग गए। हालांकि प्लाटून जल्द ही चीन के अतिरिक्त सैनिकों के आगमन से घेर ली गई और आखिरकार ७ वीं और ८ वीं प्लाटून में से कोई जीवित नहीं बचा।


युद्ध के दौरान मेजर सिंह भाटी लगातार पोस्टों के बीच सामंजस्य तथा पुनर्गठन बना कर लगातार जवानों का हौसला बढ़ाते रहे। चूँकि वह एक पोस्ट से दूसरी पोस्ट पर बिना किसी सुरक्षा के जा रहे थे अतः वह गंभीर रूप से घायल हो गए और वीर गति को प्राप्त हो गए। इस युद्ध में भारत के १२३ में से १०९ सैनिक शहीद हुए थे। वीरगति को प्राप्त होने के बाद इनके पार्थिव शरीर को जोधपुर लाया गया था और सैन्य सम्मान के साथ अंतिम संस्कार किया गया।


🎖️ *सम्मान*

मेजर शैतान सिंह भाटी के वीरता भरे देश प्रेम को सम्मान देते हुए भारत सरकार ने वर्ष १९६३ में उन्हें मरणोपरांत परमवीर चक्र से सम्मानित किया जो १८ नवम्बर १९६२ से प्रभावी हुआ।

 🇮🇳🇮🇳🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳🇮🇳🇮🇳

🙏🌹 *विनम्र अभिवादन*🌹🙏

संकलन -)

गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

Good morning

 🌳⛳ *शुभ प्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

कार्तिक मास,शुक्ल पक्ष, *चतुर्दशी*,भरणी नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,हेमन्त ऋतु,युगाब्द ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

गुरुवार, १८ नोव्हेंबर २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                         *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


क्रोधो हर्षश्च दर्पश्च ह्रीः 

                  स्तम्भो मान्य मानिता,

यमर्थान् नापकर्षन्ति 

                  स वै पण्डित उच्यते।।


*भावार्थः- जो व्यक्ति क्रोध, अहंकार, दुष्कर्म, अति-उत्साह, स्वार्थ, उद्दंडता इत्यादि दुर्गुणों की और आकर्षित नहीं होते, वे ही वास्तव में बुद्धिमान एवं परमज्ञानी हैं।*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


गाथा बलिदानाची पंजाब केशरी लाला लजपतराय

 ➿➿➿➿➿➿➿➿➿➿

*🇮🇳🇮🇳गाथा बलिदानाची🇮🇳🇮🇳*

➿➿➿➿➿➿➿➿➿➿


               *पंजाब केसरी*

          *लाला लजपत राय*


      जन्म : २८ जानेवारी १८३६

   (धुडीके, पंजाब, ब्रिटिश भारत)


      *मृत्यू : १७ नोव्हेंबर १९२९*

      (लाहोर, पंजाब, ब्रिटिश भारत)


चळवळ : भारतीय स्वातंत्र्यलढा

संघटना : अखिल भारतीय काँग्रेस, 

           हिंदू महासभा,आर्य समाज

धर्म : जैन


वडील : मुन्शी राधा कृष्ण अग्रवाल


आई : गुलाबदेवी अग्रवाल


पत्नी : राधादेवी अग्रवाल

लाला लजपत राय, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि बिपिनचंद्र पाल या त्रयीला *लाल-बाल-पाल* म्हणतात.


लाला लजपत राय  हे पंजाबी, भारतीय राजकारणी व लेखक होते. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले. ते जहाल मतवादी नेते होते.त्यांना पंजाब केसरी असे म्हणतात.त्यांनी पंजाब नॅशनल बँकेची स्थापना केली.


💁‍♂ *सुरुवातीचे जीवन*


लाला लजपतराय राय यांचे वडील मुन्शी राधा कृष्ण अग्रवाल सरकारी शाळेत उर्दू आणि पर्शियनचे शिक्षक होते. त्यांच्या आईचे नाव गुलाबदेवी अग्रवाल होते. १८४९ मध्ये लाला लजपत रायांचा विवाह राधा देवींशी झाला.


१८७० च्या दशकाच्या उत्तरार्धात त्यांच्या वडलांची बदली रेवरी येथे झाली. तेथील सरकारी उच्च माध्यमिक शाळेत लजपत रायांचे सुरुवातीचे शिक्षण झाले.

सुरुवातीच्या आयुष्यात राय यांचे उदारमतवादी विचार आणि हिंदुत्वावरील त्यांचा विश्वास त्यांचे वडील आणि अतिशय धार्मिक आई यांच्यामुळे तयार झाला. १८८० मध्ये, लजपत रायांनी कायद्याचा अभ्यास करण्यासाठी लाहोर येथील सरकारी महाविद्यालयात प्रवेश घेतला. येथेच ते देशभक्त आणि भविष्यातील स्वातंत्र्यसैनिक लाला हंस राज आणि पंडित गुरु दत्त यांच्या संपर्कात आले.लाहोर मध्ये शिकत असताना स्वामी दयानंद सरस्वतींच्या हिंदू सुधारणा चळवळीचा प्रभाव त्यांच्यावर पडला आणि ते आर्यसमाजाचे सदस्य बनले. तसेच लाहोर स्थित आर्य गॅझेटचे संस्थापक, संपादक बनले.

हिंदुत्वावरील वाढत्या विश्वासामुळे ते हिंदू महासभेत सामील झाले. त्यामुळे त्यांना नौजवान भारत सभेच्या टीकेला सामोरे जावे लागले. कारण ही महासभा धर्मनिरपेक्ष नव्हती. भारतीय उपखंडातील हिंदू जीवनपद्धतीवर लक्ष केंद्रित केल्यामुळे पुढे भारतीय स्वातंत्र्यासाठीच्या यशस्वी आंदोलनासाठी त्यांनी शांततामय मार्गाने चळवळी  केल्या.१८८४ मध्ये त्यांच्या वडिलांची बदली रोहटक येथे झाली आणि लाहोर येथील अभ्यास संपवून राय सुद्धा त्यांच्या बरोबर आले. १८८६ मध्ये ते वडलांच्या बदलीबरोबर हिस्सारला आले आणि तेथे त्यांनी वकिलीचा व्यवसाय सुरू केला. बाबू चूडामणींसह राय हिस्सारच्या बार कौन्सिलचे संस्थापक सदस्य बनले.

लहानपणापासूनच देशसेवा करण्याची राय यांची तीव्र इच्छा होती. त्यामुळे देशाची पारतंत्र्यातून सुटका करण्याची त्यांनी शपथ घेतली. त्याच वर्षी त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची हिस्सार जिल्हा शाखा स्थापन केली. तसेच बाबू चूडामणी, चंदूलाल तयाल, हरीलाल तयाल आणि बालमुकुंद तयाल हे तयाल बंधू, डॉ. रामजी लाल हुडा, डॉ.धनी राम, आर्य सामाजी पंडित मुरारी लाल, शेठ छाजू राम जाट आणि देव राज संधीर यांच्याबरोबर आर्य समाजाची स्थापना सुद्धा केली. काँग्रेसच्या अलाहाबाद येथील वार्षिक अधिवेशनात हिसार जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी त्यांची १८८८ आणि १८८९ मध्ये निवड झाली. १८९२ मध्ये काहोर उच्च न्यायालयात वकिली करण्यासाठी ते लाहोर येथे गेले.स्वातंत्र्य मिळवण्यासाठी भारताच्या राजकीय धोरणाला आकार देण्यासाठी ते पत्रकारिता सुद्धा करत. त्यांनी द ट्रिब्युन सहित अनेक वृत्तपत्रांमध्ये नियमितपणे लेखन केले.

१८८६ मध्ये त्यांनी महात्मा हंसराज यांना दयानंद अंग्लो-वैदिक स्कूल,लाहोरची स्थापना करण्यास मदत केली. भारताच्या १९४७ साली झालेल्या फाळणीनंतर या विद्यालयाचे रुपांतर इस्लामिया कॉलेज, लाहोर मध्ये झाले.

१९१४ मध्ये स्वातंत्र्यलढ्यात योगदान देण्यासाठी लजपत रायांनी वकीलीला रामराम ठोकला. १९१४ मध्ये ते ब्रिटनला गेले आणि नंतर १९९७ मध्ये अमेरिकेला गेले. ऑक्टोबर १९१७ मध्ये त्यांनी न्यूयॉर्क मध्ये भारतीय होम रूल लीगची स्थापना केली. ते १९२७ ते १९३० पर्यंत अमेरिकेत होते.


⚜ *राष्ट्रवाद*


भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सहभागी झाल्यानंतर आणि पंजाबमधील राजकीय निदर्शनामध्ये भाग घेतल्यानंतर, मे १९०७ मध्ये कोणताही खटला न चालवता लाल लजपत रायांची मंडाले, ब्रह्मदेशात  रवानगी करण्यात आली. पण त्यांना अटक करून ठेवण्यासाठी पुरेसा पुरावा नाही, असे लॉर्ड मिंटो यांनी ठरवल्याने नोव्हेंबरमध्ये त्यांना परत जाण्याची परवानगी देण्यात आली.

१९२० साली कोलकाता येथे भरलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या खास अधिवेशनात ते अध्यक्ष म्हणून निवडून आले. १९२१ मध्ये त्यांनी लोक सेवक मंडळ या ‘ना नफा’ तत्वावरील कल्याणकारी संघटनेची स्थापना लाहोर येथे केली. फाळणीनंतर या संस्थेचे कार्यालय दिल्ली येथे हलवण्यात आले. भारतभरात या संस्थेच्या अनेक शाखा आहेत.


♨ *सायमन कमिशनच्या विरुद्ध निदर्शने*


१९२८ मध्ये भारतातील राजकीय परिस्थितीबद्दल अहवाल देण्यासाठी सर जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली ब्रिटीश सरकारने एका आयोगाची स्थापना केली. भारतातील राजकीय पक्षांनी या आयोगावर बहिष्कार घातला, कारण या आयोगाच्या सदस्यांमध्ये एकही भारतीयाचा समावेश नव्हता. या आयोगाविरुद्ध भारतभर निदर्शने झाली. ३० ऑक्टोबर १९२८ रोजी जेव्हा या आयोगाने लाहोरला भेट दिली, तेव्हा त्याविरुद्ध मूक निदर्शनांचे नेतृत्व लाला लजपत रायांनी केले. पोलिस अधीक्षक जेम्स स्कॉट यांनी या निदर्शकांवर लाठी हल्ला करण्याचे आदेश दिले.जखमी होऊन सुद्धा लाला लजपत रायांनी या जमावासमोर भाषण केले."आज मी ज्या लाठ्या खाल्ल्या, त्या म्हणजे ब्रिटीश सरकारच्या भारतातील राजवटीच्या शवपेटिकेवरील शेवटचे खिळे ठरतील, असे मी जाहीर करतो." हे त्यांचे यावेळचे उद्गार होते.


⌛ *मृत्यू*


निदर्शनांच्या वेळेला झालेल्या लाठी हल्ल्यातून लाला लजपत राय पूर्णपणे बरे झाले नाहीत आणि हृदय विकाराच्या धक्क्याने १७ नोव्हेंबर १९२८ रोजी त्यांचे निधन झाले. स्कॉटच्या लाठीमारामुळे लालाजींचा मृत्यू ओढवला, असे डॉक्टरांचे म्हणणे होते. पण जेव्हा हा मुद्दा ब्रिटनच्या संसदेत उपठीत करण्यात आला तेव्हा, यात आपली काहीही भूमिका नव्हती, असे ब्रिटीश सरकारने जाहीर केले. या घटनेचा सूड घेण्याचे भगतसिंग यांनी ठरवले.

पण ऐनवेळी स्कॉटला ओळखण्यात चूक झाल्यामुळे भगतसिंगांना सॉन्डर्स या सहाय्यक पोलिस अधीक्षकावर गोळ्या झाडण्याचा इशारा करण्यात आला. १७ डिसेंबर १९२८ रोजी लाहोर मधील जिल्हा पोलिस मुख्यालयातून बाहेर पडणाऱ्या सॉन्डर्सवर राजगुरू आणि भगतसिंग यांनी गोळ्या झाडल्या. या दोघांचा पाठलाग करणारा चनन सिंग नावाचा हेड कॉन्स्टेबल चंद्रशेखर आझाद यांनी केलेल्या गोळीबारात जखमी झाला.  


📝 *लाला लजपत रायांनी लिहिलेली पुस्तके*


यंग इंडिया 

द कलेक्टेड वर्क्स ऑफ लाला लजपत राय.

लाला लजपत राय रायटिंग अँड स्पीचेस, मॅझिनी, गॅरीबाल्डी, शिवाजी महाराज यांची उर्दू भाषेत लिहिलेली संक्षिप्त चरित्रे,

श्रीकृष्ण आणि त्याची शिकवण

🇮🇳🇮🇳🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳🇮🇳🇮🇳

संकलन -)

गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६


प्रभात दर्शन

 🌳⛳ *शुभ प्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

कार्तिक मास,शुक्ल पक्ष, *त्रियोदशी*,अश्विनी नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,हेमन्त ऋतु,युगाब्द ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

बुधवार, १७ नोव्हेंबर २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                         *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

          *"क्रोध से आवेश पैदा होता है। आवेश से बुद्धि भ्रष्ट होती है। जब बुद्धि भ्रष्ट होती है तब नकारात्मक परिवेश उत्पन्न होता है जब नकारात्मक परिवेश उत्पन्न होता है तब सभी तर्क नष्ट हो जाते है। जब तर्क नष्ट होते है तब व्यक्ति का पतन होना निश्चित हो  जाता है। अतः सहज रहे व क्रोध से बचे।"*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


मंगळवार, १६ नोव्हेंबर, २०२१

पोपट नक्कल का करतो


══════════════════════

   *📒📒📒 @ संकलन @📒📒📒*

  *श्री. गजानन गोपेवाड 

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════   

🦜 *पोपट नक्कल का करतो?* 🦜

********************************

'पोपटपंछी चतुरकी जान, पढे पहाटे श्रीभगवान' असं आपण कितीही पोपटाचं कौतुक केलं, तरी पोपटपंची का केली जाते, याविषयीच्या आपल्या काही समजुती भ्रामकच आहेत. कारण आपल्या बोलांची सही सही नक्कल करण्यासाठी पोपटांच्या अंगी स्वरयंत्रच नसतं; पण त्यांची श्वासनलिका दुतोंडी असते. त्यामुळे तिच्यातून श्वास आत घेताना किंवा बाहेर सोडताना त्या नलिकेच्या स्वरूपात बदल करून पोपट आवाज काढू शकतात. थोडक्यात, ते शीळ घालत असतात. या शीळेचंच नियंत्रण करून ते निरनिराळे आवाज काढू शकतात. ऐकलेल्या आवाजाची नक्कल करण्याची क्षमता मुळातच पोपटांमध्ये असते. त्यामुळे रानावनात असताना ते इतर पक्ष्यांच्या आवाजाची नक्कलही करू शकतात. यात पोपटांच्या निरनिराळ्या जातींचा, तसंच त्यांच्या स्वतःच्या जातीचाही समावेश असतो. त्यामुळे मग कोणत्या पक्ष्याला साद घालून जवळ करायचं किंवा कोणाला किंवा डावलून दूर निघून जायचं, हे ठरवणं त्यांना शक्य होतं. आपल्याच जातीच्या दुसऱ्या पोपटाला साद घालून प्रतिसाद देत ते स्वतःच्या प्रदेशांचं रक्षणही करू शकतात. तसंच विणीच्या हंगामात आपला जोडीदार शोधण्यासाठीही त्यांना या क्षमतेची मदत होते.

जेव्हा असे पोपट घरात पाळले जातात तेव्हा ऐकलेल्या आवाजाची नक्कल करण्याच्या त्यांच्या अंगभूत क्षमतेपोटी मानवी आवाजाची नक्कल करणं त्यांना शक्य होतं. अर्थात, असं करताना ते शब्द मुळात मानवप्राण्याकडून काढले गेले आहेत, अशी मात्र त्याची समजूत नसते. तेराव्या शतकातल्या एका फारसी ग्रंथात, पोपटांना बोलायला कसं शिकवावं, हे सांगितलं आहे. त्यात असं म्हटलं आहे, की ज्या पोपटाला बोलायला शिकवायचं त्याच्यासमोर एक आरसा धरावा. त्या आरशाच्या आड मग त्याच्या मालकानं स्वतःला लपवावं. त्या पोपटाला त्यामुळे आपल्या मालकाचं दर्शन होत नाही. समोरच्या आरशात मात्र त्याला स्वतःचंच प्रतिबिंब दिसतं. त्यामुळं जेव्हा तो मालक काही शब्द उच्चारतो तेव्हा पोपटाला दुसरा एक आपल्यासारखा पक्षीच बोलत असल्याचं वाटून तो त्यांची नक्कल करण्याचा प्रयत्न करतो. त्यापोटीच काही शब्द असे पोपट तसेच्या तसे आपल्या गळ्यातून काढू शकतात. मानवीआवाजाची नक्कल करून आपलं मन रिझवण्याचं काम ते जरूर करतात; पण त्यापायी इतर पक्ष्यांची नक्कल करण्याची किमया ते हरवून बसल्याचं दिसून आलं आहे.

पोपटच फक्त असं करू शकतात, असं नाही. मैना पक्षीही अशी नक्कल करू शकतात. झालंच तर मॉकिंगबर्ड जातीचे इवलेसे पक्षी तर इतर कितीतरी पक्ष्यांची नक्कल करतात. तरीही पोपटांची बुद्धिमत्ता इतर पक्ष्यांच्या मानानं जास्त असल्याचा दावा काही मज्जाशास्त्रज्ञांनी केला आहे. त्यामुळेच काही पोपट केवळ शब्दच नव्हे, तर वाक्यंच्या वाक्य बोलू शकतात. एवढंच नाही, तर त्यांचा अर्थही त्यांना समजत असल्यासारखी त्यांची वागणूक असते.


*डाॅ. अंजली दिक्षित व डाॅ. जगन्नाथ दिक्षित यांच्या 


पोपट का नक्कल का करतो


══════════════════════

   *📒📒📒 @ संकलन @📒📒📒*

  *श्री.गजानन गोपेवाड 

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════   

🦜 *पोपट नक्कल का करतो?* 🦜

********************************

'पोपटपंछी चतुरकी जान, पढे पहाटे श्रीभगवान' असं आपण कितीही पोपटाचं कौतुक केलं, तरी पोपटपंची का केली जाते, याविषयीच्या आपल्या काही समजुती भ्रामकच आहेत. कारण आपल्या बोलांची सही सही नक्कल करण्यासाठी पोपटांच्या अंगी स्वरयंत्रच नसतं; पण त्यांची श्वासनलिका दुतोंडी असते. त्यामुळे तिच्यातून श्वास आत घेताना किंवा बाहेर सोडताना त्या नलिकेच्या स्वरूपात बदल करून पोपट आवाज काढू शकतात. थोडक्यात, ते शीळ घालत असतात. या शीळेचंच नियंत्रण करून ते निरनिराळे आवाज काढू शकतात. ऐकलेल्या आवाजाची नक्कल करण्याची क्षमता मुळातच पोपटांमध्ये असते. त्यामुळे रानावनात असताना ते इतर पक्ष्यांच्या आवाजाची नक्कलही करू शकतात. यात पोपटांच्या निरनिराळ्या जातींचा, तसंच त्यांच्या स्वतःच्या जातीचाही समावेश असतो. त्यामुळे मग कोणत्या पक्ष्याला साद घालून जवळ करायचं किंवा कोणाला किंवा डावलून दूर निघून जायचं, हे ठरवणं त्यांना शक्य होतं. आपल्याच जातीच्या दुसऱ्या पोपटाला साद घालून प्रतिसाद देत ते स्वतःच्या प्रदेशांचं रक्षणही करू शकतात. तसंच विणीच्या हंगामात आपला जोडीदार शोधण्यासाठीही त्यांना या क्षमतेची मदत होते.

जेव्हा असे पोपट घरात पाळले जातात तेव्हा ऐकलेल्या आवाजाची नक्कल करण्याच्या त्यांच्या अंगभूत क्षमतेपोटी मानवी आवाजाची नक्कल करणं त्यांना शक्य होतं. अर्थात, असं करताना ते शब्द मुळात मानवप्राण्याकडून काढले गेले आहेत, अशी मात्र त्याची समजूत नसते. तेराव्या शतकातल्या एका फारसी ग्रंथात, पोपटांना बोलायला कसं शिकवावं, हे सांगितलं आहे. त्यात असं म्हटलं आहे, की ज्या पोपटाला बोलायला शिकवायचं त्याच्यासमोर एक आरसा धरावा. त्या आरशाच्या आड मग त्याच्या मालकानं स्वतःला लपवावं. त्या पोपटाला त्यामुळे आपल्या मालकाचं दर्शन होत नाही. समोरच्या आरशात मात्र त्याला स्वतःचंच प्रतिबिंब दिसतं. त्यामुळं जेव्हा तो मालक काही शब्द उच्चारतो तेव्हा पोपटाला दुसरा एक आपल्यासारखा पक्षीच बोलत असल्याचं वाटून तो त्यांची नक्कल करण्याचा प्रयत्न करतो. त्यापोटीच काही शब्द असे पोपट तसेच्या तसे आपल्या गळ्यातून काढू शकतात. मानवीआवाजाची नक्कल करून आपलं मन रिझवण्याचं काम ते जरूर करतात; पण त्यापायी इतर पक्ष्यांची नक्कल करण्याची किमया ते हरवून बसल्याचं दिसून आलं आहे.

पोपटच फक्त असं करू शकतात, असं नाही. मैना पक्षीही अशी नक्कल करू शकतात. झालंच तर मॉकिंगबर्ड जातीचे इवलेसे पक्षी तर इतर कितीतरी पक्ष्यांची नक्कल करतात. तरीही पोपटांची बुद्धिमत्ता इतर पक्ष्यांच्या मानानं जास्त असल्याचा दावा काही मज्जाशास्त्रज्ञांनी केला आहे. त्यामुळेच काही पोपट केवळ शब्दच नव्हे, तर वाक्यंच्या वाक्य बोलू शकतात. एवढंच नाही, तर त्यांचा अर्थही त्यांना समजत असल्यासारखी त्यांची वागणूक असते.


*डाॅ. अंजली दिक्षित व डाॅ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन* 


═════════════

सोमवार, १५ नोव्हेंबर, २०२१

चेहर्‍यावर सुरकत्या का पडतात


══════════════════════

   *📒📒📒 @ संकलन @📒📒📒*

  *श्री. गजानन गोपेवाड 

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════   

📙 *म्हाताऱ्या लोकांच्या चेहऱ्यावर सुरकुत्या का पडतात ?* 📙 


वृद्धावस्था आली की माणसात अनेक बदल होतात. डोक्यावरचे केस गळायला लागतात व टक्कल पडते. तोंडातील दात हलायला लागतात व नंतर तोंडाचे बोळके होते. बोटांना कंप सुटतो, दृष्टी अधू होते, उत्साह कमी होतो. अशा या बदलांमुळे व्यक्ती चिडचिडी होते. त्यात भर म्हणजे विस्मरणही व्हायला लागते. त्यामुळे वृद्धत्व म्हणजे एक रोग असे वाटायला लागते.


चेहऱ्यावर सुरकुत्या का पडतात, याविषयी माहिती घेऊ. त्वचेखाली स्नायूंच्या आकुंचन व प्रसरणाच्या दिशेने काटकोनात त्वचेची हालचाल होत असल्याने त्वचेच्या वारंवार घड्या पडतात. व तेथे नंतर सुरकुत्या पडतात. चेहऱ्याच्या त्वचेखाली इतर शरीराच्या त्वचेखाली असणारा जाडसर थर (deep fascia) नसतो व स्नायू व त्वचेचे थर एकमेकांत जखडलेले असतात. त्यामुळेही त्वचेवर जास्त ताण येतो व सुरकुत्या पडतात.


 दुसरे म्हणजे त्वचेखालील मेद पदार्थांचे प्रमाण कमी होते. साहजिकच त्वचा सैल व ढिली होते. तिसरे म्हणजे स्नायूंमधील ताण वयोमानानुसार कमी होतो. त्यामुळे त्वचेमध्ये खोवले जाणारे स्नायू शिथिल होतात व त्वचाही सैल होते. सर्व इंद्रियांवर त्वचेची जीवनशक्ती कमी झालेली असते. त्यामुळे या त्वचेची लवचिकता कमी होऊन ती सैल पडते. या सर्व गोष्टींमुळे सैल पडलेल्या त्वचेवर सुरकुत्या पडतात. तोंडातील दात पडल्याने जबड्याच्या हाडाची झीज झाल्याने चेहऱ्याचा आकारही बदलतो व त्वचा आणखीनच सैल होते. परिणामी वृद्ध व्यक्तींच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात. सुरकुत्या सर्व शरीरावर पडतात परंतु चेहऱ्यावर ती बाब जास्त प्रकर्षाने जाणवते.

 

*डाॅ. अंजली दिक्षित व डाॅ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन* 


गाथा बलिदानाची जननायक बिरसा मुंडा

 ➿➿➿➿➿➿➿➿➿

  🇮🇳🇮🇳 *गाथा बलिदानाची* 🇮🇳🇮🇳

➿➿➿➿➿➿➿➿➿                                                  

  🏹 *जननायक बिरसा मुंडा* 🏹


     *जन्म : १५ नोव्हेंबर १८७५*

            *(उलिहातू - झारखंड)*


 *वीरमरण : ९ जून १९००*

                    *(रांची तुरुंग)*

                     (वय - २४ वर्षे)


               सन १७८९ मध्य कंपनी सरकाने १२५०० चौ. मैल क्षेत्राचा छोटा नागपूर विभाग आपल्या अधिपत्याखाली आणला. हा सारा डोंगराळ प्रदेश. त्यातले प्रमुख रहिवासी कोल जमातीचे आदिवासी. ते सारे शेती करीत व जंगलावर निर्भर राहात. त्यांच्या प्रत्येक गावच्या प्रमुखाला मुंडा असे म्हणत. या भागातील शेतीवरील व इतर कारांच्या वसुलीसाठी इंग्रजांनी  परप्रांतातील ठेकेदार आणले होते आणि मोगली सत्तेच्या करांच्या दुपटी-तिपटीने या लोकांवर कर लादले होते. हे ठेकेदार मनमानीपणे जादा कर वसूल करीत व ज्यांना कर भरता येत नसत, त्यांच्या जमिनी बळकावीत. त्यामुळे ते बड़े जमीनदार बनले होते. त्यामुळे हजारो आदिवासी भूमिहीन बनले व नगण्य मजुरीवर त्या जमिनदारांच्या जमिनीत मजुरी करू लागले. त्यामुळे ते अन्नाला मोताद झाले. शिवाय जमीनदारांना पालीतून वाहून नेणे, त्यांची सर्वतोपरी विनामूल्य सेवा करणे, त्यांचे चैनबाजीचे सर्व प्रकारचे खर्च भागविणे या आदिवासींना सक्तीचे होऊन बसले. त्यांच्या पूर्वापार न्यायपंचायतीची व्यवस्था इंग्रजांनी मोडून काढली व आपली न्यायदान पध्दती सुरू  केली . त्यासाठी वकील आले. मुकादम्यांचा खर्च लोकांना पेलवेनासा झाला. त्यामुळे हे लोक त्रस्त झाले व कंगाल बनले. तशात या भागात ख्रिस्ती मिशनरी आले. त्यांनी प्रलोभने दाखवून या लोकांना ख्रिस्ती बनविण्याचा सपाटा सुरू केला. जो कोणी ख्रिस्ती होई,  त्याला करात सूट मिळे व त्यांची जमीनही जप्त होत नसे. त्यामुळे हे हजारो आदिवासी ख्रिस्ती बनले. त्यांचा मूळचा धर्म बुडाला. परिणामतः अनेक आदिवासी बंडखोर बनले व त्यांनी राज अधिकान्यांशी, ठेकेदारांशी, नव्या जमीनदारांशी, ख्रिस्ती मिशन-यांशी अनेक वेळा लढे दिले. पण ते इंग्रजांच्या आधुनिक शस्त्र बळामुळे निष्प्रभ ठरले. हे लढे एकोणीसाव्या शतकाच्या अखेरपर्यंत चालूच राहिले. शेवटचा सर्वात मोठा लढा दिला बिरसा मुंडाने.

               बिरसा मुंडा यांचा जन्म उलिहातू या गावी १५ नोव्हेंबर १८७५ रोजी झाला. त्याच्या बापाचे नाव सुगना मुंडा. त्यालाही आपल्या सगळ्या कुटुंबियांसह ख्रिस्ती धमांचा स्वीकार करावा लागला होता. त्यामुळेच बिरसाचे प्राथमिक शिक्षण बुर्जू येथील जर्मन मिशनच्या शाळेत सुरू झाले. त्यानंतर तो पुढील शिक्षणासाठी चाईबासा येथील लूथरन मिशनच्या शाळेत दाखल झाला. तेथेच त्याला ख्रिस्ती मिशन-यांच्या कारवाया समजून आल्या. त्यामुळे त्याच्या मनात इंग्रज सरकारविषयी अत्यंत तिरस्कार निर्माण झाला. नंतर त्याने आपल्या सर्व कुटुंबियांसह त्या अन्यायी लोकांच्या ख्रिस्ती धर्माचा त्याग केला. पुढे तो तोडन ठाण्याअंतर्गत गोडबेडा येथील आनंद पांडे या गुरुंच्या संपर्कात आला. त्यांनी त्याला रामायण - महाभारतातील कथा शिकविल्या व आयुर्वेदाचेही ज्ञान दिले. त्यांच्यासमोर त्याने आपल्या धरतीला इंग्रजांच्या  जुलमी शासनाच्या जाचातून मुक्त करण्याची घोर प्रतिज्ञा केली. बिरसाच्या मनावर हिंदू धर्मातील आदर्श तत्वांचा प्रभाव पडला व  वैष्णव बनला. त्याने शिकार करणे सोडून दिले. आपल्या लोकांच्या मनात नैतिक गुण विकसित करण्यासाठी  त्याने गावोगावी दौरे सुरु केले. 

           बिरसाचे व्यक्तिमत्व अत्यंत प्रभावी होते.  गोरापान,  अत्यंत तेजस्वी,  उंच तगडा, प्रसन्नमुख, डोक्याला फेटा, पायात खडावा असे त्याचे रूप सर्वांनाच आकर्षित करुन घ्यायचे. त्यामुळे त्याच्या समाजाचे लोक भराभर  त्याचे अनुयायी बनले. त्यांना तर तो'धरतीचा देवच'  वाटायचा. तो सुध्दा लोकांना सांगायचा, " देवपुरूष सिंगबोसाने मला स्वप्नात दर्शन देऊन दिव्य शक्ती दिली आहे. त्या शक्तीच्या बळावर मी आपल्या धरतीला  या इंग्रजांच्या व जमीनदारांच्या जुलमी शासनातून मुक्त करणार आहे. तेव्हा लोकांचा त्याच्यावर जागा त्याच्यावर दृढ विश्वास बसला. बिरसालाही वाटायचे,

 " मी माझ्या समाजाचा उदारकर्ता म्हणून जन्मास आलो आहे. त्याचे अनुयायी हजारोच्या संख्येने वाढू लागले. त्यांच्यामधून त्याने शेकडो चांगले लढवय्ये निवडून आपले सैन्य सज्ज केले. गया मुंडा या आपल्या जिवलग मित्राला त्याने आपला सेनापती म्हणून नियुक्त केले.

          सर्वांनी आपल्या समाजावर इंग्रज अधिका-यांकडून,  ख्रिस्ती मिशन-यांकडून, जमीनदारांकडून व ठेकेदाराकडून होत असलेल्या अन्यायाविरुद्ध मरेपर्यंत लढा देण्याची प्रतिज्ञा केली व  स्वराज्य स्थापन करण्याचे ठरविले. इंग्रज सरकारला त्यांच्या हालचालीचा सुगावा लागलाच होता. २४ जेगिस्ट १८९५ रोजी रांची जिल्ह्याच्या इंग्रज पोलिस इंस्पेक्टरने अनेक शिपायांसह रात्री बिरसाच्या घरावर छापा टाकून  झोपेत असतानाच त्याला आणि त्याच्या काही साथीदारांना अटक केली. बिरसा दोन वर्षांची  सक्तमजुरीची शिक्षा व ५० रु. दंड केला व त्याच्या साथीदाराला प्रत्येकी २०/२० रु. दंड केला.

            कैदेतून सुटून आल्यानंतर बिरसाने नव्या जोमाने संघर्ष सुरू केला. इंग्रजांच्या अनेक ठाण्यांवर त्याने हल्ले केले.  पराक्रमाची शर्थ केली.  पण इंग्रजांच्या  बंदूकांपुढे त्यांची परंपरागत हत्यारे निष्प्रभ ठरली.  शेकडो कोल जवान मृत्युमुखी पडले. एका लढाईत सेनापती गया मुंडा ठार झाला. बिरसाचा मुक्काम घनदाट जंगलातील टेकड्यांवर गुप्त ठिकाणी असे. त्यामुळे तो इंग्रजांच्या हाती लागणे अशक्यप्राय होते .

परतु घरभेद्यांकडून इंग्रजांना त्याचा सुगावा लागताच त्याला घेरून पकडण्यात आले. त्याच्याबरोबर त्याचे ८० अनुयायीसुद्धा जेरबंद झाले. तेव्हा रांचीच्या इंग्रज जिल्हाधिका-याने बिरसाला जमीनदारी देण्याची लालूच दाखवून त्याने आपला उद्योग सोडून द्यावा, असे सांगितले.  पण बिरसाने ते धुडकावले. अखेर तुरुंगात त्याचे फार हाल करण्यात आले आणि विष देऊन मारण्यात आले. बिरसा पटकीमुळे मेला, असे इंग्रज सरकारने खोटेच जाहीर केले. त्याच्या अनुयायांनाही जबर शिक्षा ठोठावण्यात आल्या व बिरसाने छोटा नागपूरमध्ये स्वातंत्र्यासाठी आरंभिलेला लढा चिरडून टाकण्यात आला.

                       अशारीतीने कोल समाजाचा हा  'धरतीचा देव ' बिरसा मुंडा जानेवारी १९०० मध्ये त्या धरतीच्या कुशीतच विसावले.

             बिरसा मुंडा हे आदिवासी क्रांतिकारक होते. बिरसा मुंडा यांना *जननायक* हा किताब लोकांनी बहाल केला. आदिवासी जननायक बिरसा मुंडा यांचे चित्र भारतीय संसदेच्या मध्य कक्षासमोर लावले आहे. ते एकटेच क्रांतिकारक आहेत ज्यांना हा सन्मान मिळाला आहे. त्यांच्या सन्मानार्थ भारत सरकारने डाक तिकीट जारी केले असून झारखंड मधील रांची येथे स्मारक बांधण्यात आलेले आहे.

   

                🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳

🌹🙏 *विनम्र अभिवादन*🙏🌹

संकलन -)

गजानन गोपेवाड  

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

➖➖➖➖➖➖➖➖➖


शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुण्यतिथी

 ➿➿➿➿➿➿➿➿➿➿

🚩 *_शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे_*🚩

➿➿➿➿➿➿➿➿➿➿

*आज दि.१६ नोव्हेंबर २०२१ रोजी _शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे_ १०० व्या वर्षी निधन झाले.*

🚩🖋️🖌️🚩🖋️🖌️🚩🖋️🖌️🚩🖋️🖌️

पद्मविभूषण व महाराष्ट्र भूषण  पुरस्कार प्राप्त आदरणीय श्री.बळवंत मोरेश्वर उपाख्य बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने आपण सर्वच एका शतायुषी शिव ऋषीला मुकलो आहोत. तरुण वयापासूनच देशभक्तीचा वसा त्यांना संघ शाखेतून प्राप्त झाला. तो ध्यास मनात ठेवून ध्येय प्राप्ती करिता तत्व रूप आदर्श पुरुष म्हणून छत्रपती श्रीमंत शिवाजी महाराज यांची भक्ती त्यांनी जीवनभर निष्ठेने चालवली. दादरा नगर हवेली च्या मुक्तिसंग्रामात सैनिक म्हणून तेहि लढले होते. शिवाजी महाराजांची कथा आपल्या वक्तृत्वाच्या बळावर त्यांनी घराघरात पोहोचवली. त्यासाठी जीवनभर असंख्य परिश्रम केले. अत्यंत कठीण परिस्थितीतून केलेल्या या वाटचालीतुनच "जाणता राजा" सारख्या भव्य व प्रेरक नाट्य शिल्पाची निर्मिती त्यांनी केली. त्या देशभक्त व परिश्रमी शिवशाहीर यांना आज शेवटचा मानाचा मुजरा.... 

*बाबासाहेब पुरंदरे यांचा अल्पपरिचय.*

जन्म.२९ जुलै १९२२ पुण्याजवळच्या सासवड गावी.

अलीकडेच बाबासाहेब पुरंदरे यांनी शंभरी पर्दापण केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून अनेक राजकीय नेत्यांनी बाबासाहेब पुरंदरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.  ‘शिवशाहीर’ हा शब्द उच्चारताच डोळ्यासमोर उभे राहतात ते अटकर कोट-जाकिटातले, हिमसफेद दाढी आणि मानेवर रुळणाऱ्या पांढऱ्याशुभ्र जटा सांभाळत हजारोंच्या जनसमुदायाला शिवचरित्राची मोहिनी घालणारे श्रीमंत बळवंत मोरेश्वर तथा बाबासाहेब पुरंदरे. ‘शिवाजी महाराज’ हा सप्ताक्षरी मंत्र शिवशाहिरांनी आयुष्यभर जपला आणि या मंत्राच्या साह्याने

 ‘वन्ही तो चेतवावा । चेतविता चेततो ।’ 

या समर्थ वचनाला साक्षी ठेवत मराठी मनाची मरगळ दूर केली.  बाबासाहेब पुरंदरे यांचं मूळ नाव बळवंत मोरेश्वर पुरंदरे असं होते. 

त्यांचे मूळ गाव पुणे जिल्ह्यातील सासवड. पण तरुणपणापासूनच ते पुण्यातच स्थायिक झाले. पुण्यातल्या भारत इतिहास संशोधक मंडळासोबत त्यांनी इतिहास संशोधक म्हणून काम सुरु केलं. या ठिकाणीच इतिहाससंशोधक ग.ह. खरे हे बाबासाहेबांना गुरुस्थानी लाभले व इतिहास संशोधक म्हणून त्यांची वाटचाल सुरू झाली. बाबासाहेब पुरंदरे यांनी महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचा आणि मराठा साम्राज्य आणि शिवकालीन ऐतिहासिक दस्तऐवजांचा सखोल अभ्यास केला. त्यांच्या लेखनातून व व्याख्यानांतून शिवकाळ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचला. पुरंदऱ्यांची दौलत, पुरंदऱ्यांची नौबत, गड-किल्ल्यांची ऐतिहासिक माहिती देणारे साहित्य (गडसंच), शेलारखिंड, व राजा शिवछत्रपती हे बाबासाहेबांचे आजवर प्रकाशित झालेले साहित्य होय. शिवचरित्र हे घरोघरी पोहोचावे हे ध्येय ठेवून बाबासाहेबांनीअथक संशोधनातून व परिश्रमांतून राजा शिवछत्रपती हा ग्रंथ साकार केला.  ‘राजा शिवछत्रपती’ या ग्रंथाच्या १८ आवृत्त्या प्रकाशित झाल्या असून, काही कादंबऱ्या तसेच किल्ल्यांचे वर्णन करणारी पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. फुलवंती व जाणता राजा ही नाटके त्यांनी लिहिली, दिग्दर्शित केली. जाणता राजा या महानाट्याचे गेल्या २७ वर्षांत १२५० हून अधिक प्रयोग झाले आहेत. पहिला प्रयोग १४ एप्रिल १९८४ रोजी झाला होता. या प्रयोगांच्या उत्पन्नातून बाबासाहेबांनी अनेक संस्थांना लाखो रुपयांची मदत केली आहे हे नाटक ५ अन्य भाषांत भाषांतरित केले गेले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावरील सर्वात मोठे असे महानाटय़ असून याशिवाय हत्ती, घोडे, उंट, बैलगाडय़ांचा या महानाटय़ात समावेश असतो.२०१५ सालापर्यंत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर बारा हजाराहून अधिक व्याख्याने दिली होती. जाणता राजा या महानाट्याचे अमेरिका, लंडनसह भारतात महाराष्ट्र, गुजरात, कनार्टक, मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ, गोवा या राज्यांतील अनेक शहरात प्रयोग झाले आहेत. इतिहासाचा ध्यास घेतलेले बाबासाहेब हे तरुणपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जवळून संपर्कात होते. त्या काळातच ते आचार्य अत्रे यांच्या वृत्तपत्रात लेखन करीत. शिवाय आपले मेहूणे श्री. ग. माजगावकर यांच्याबरोबर ते ‘माणूस’ मध्येही काम करत होते. ज्येष्ठ इतिहासकार व कादंबरीकार गो. नी. दांडेकरांशी पुढे त्यांची भेट झाली. बाबासाहेब-गोनीदा ही जोडी म्हणजे शिवचरित्राचा वारसा आजच्या पिढीपर्यंत पोहोचवणारे दूतच झाले. ते नेहमी गडांवर एकत्र भटकंती करीत. महाराष्ट्रातील एकही असा किल्ला नाही, जिथे बाबासाहेब पोहोचले नाहीत आणि एकही असे सरदार घराणे नाही, ज्यांच्याशी त्यांचा संपर्क झालेला नाही! शिवचरित्र अभ्यासणारे अनेक अभ्यासक असतात परंतु शिवचरित्र अनुभवणारे, अक्षरश: जगणारे बाबासाहेब एकच! स्वातंत्र्यानंतर लढल्या गेलेल्या दादरा नगर हवेली मुक्ती संग्रामात बाबासाहेबांनी सुधीर फडके यांच्याबरोबर हिरिरीने सहभागी होते. आचार्य अत्रे, गो. नी. दांडेकर, पु.ल. देशपांडे, अटलबिहारी वाजपेयी, मंगेशकर कुटुंबीय, ठाकरे कुटुंबीय यांसारख्या दिग्गजांचा सहवास त्यांना लाभला. या सर्वांच्या माध्यमातून,सहकार्यातून त्यांनी शिवचरित्रप्रसारासाठी अनेक उपक्रम चालवले.महाराष्ट्रात, भारतात आणि परदेशातही त्यांच्या व्याख्यानांतून, जाणता राजा या महानाट्यातून आजही शिवचरित्र जिवंत होते. ’शिवचरित्र हे व्यक्तिचारित्र्य निर्मितीचा अभ्यासक्रम आहे’ हे त्यांनी आपल्या व्याख्यानांमधून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातील अनेक पैलू उलगडून दाखवत पटवून दिले. बाबासाहेब पुरंदरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

➿➿➿➿➿➿➿➿➿➿

संकलन -)गजानन गोपेवाड  

उमरखेड जिल्हा - यवतमाळ ४४५२०६


Featured Post

व्यायाम व योगा अवश्य करावा*

*व्यायाम व योगा अवश्य करावा*  *व्यायाम व योगा करण्याचे दहा फायदे:-*  1) व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते: व्यायाम करणारी...