शनिवार, ३० ऑक्टोबर, २०२१

डॉ. होमी जहांगीर भाभा

 *🔬🔬होमी जहांगीर भाभा🔬🔬*

💥💥💥💥💥💥💥💥💥💥

*भारतीय अणुभौतिकशास्त्रज्ञ*

💥💥💥💥💥💥💥💥💥💥

*जन्मदिन -३० ऑक्टोबर  इ.स. १९०९*


होमी भाभा (इ.स. १९०९ - इ.स. १९६६) भारतीय अणुभौतिकशास्त्रज्ञ होते. भारताच्या अणुऊर्जा विकासकार्यक्रमाचा पाया रचण्याच्या कामगिरीमुळे त्यांना भारताच्या अणुऊर्जा व अण्वस्त्र विकासकार्यक्रमाचे प्रणेता मानले जाते.

जीवन

भाभा यांचा जन्म सधन पारशी कुटुंबात झाला. वडील जहांगीर भाभा हे बॅरीस्टर होते. पुस्तकांची आवड असल्यामुळे घरातच खूप पुस्तके गोळा केली होती. त्यात विज्ञान विषयाचीही पुस्तके होती. होमी भाभा यांना या पुस्तकांमुळे विज्ञानात स्वाभाविकपणेच आवड निर्माण झाली. शिवाय त्यांना कवितेचा आणि चित्रकलेचा छंद होता. अतिशय सुंदर, देखणे व्यक्तीमत्त्व लाभालेले होमी भाभा उत्तम वक्ताही होते.

त्यांचे प्राथमिक ते पदवी पर्यंतचे शिक्षण मुंबई येथे झाले. होमी यांनी पुढे इंजिनियर व्हावे असे त्यांच्या वडिलांना वाटत होते. पण होमी यांनी वडिलांना आपल्याला गणित आणि भौतिक शास्त्रातच विशेष आवडतात असे ठामपणे सांगितले. वडिलांनी हो-ना करत गणिताचा सखोल अभ्यास करण्यास परवानगी दिली पण आधी प्रथम श्रेणीत इंजिनियरींगची पदवी प्राप्त करण्याची अट घालून दिली. वडिलांनी परवानगी दिल्यावर होमी भाभा केंब्रीज विद्यापिठातून इ.स. १९३० साली प्रथम श्रेणीत इंजिनियर झाले. तसेच पॉल डिरॅक यांच्या मार्गदर्शनाखाली गणिताचा अभ्यासही करीत राहिले. त्या काळात त्यांना शिष्यवृत्ती आणि अनेक बक्षीसेही मिळाली.

इ.स. १९४० साली भारतात परत आल्यावर काही काळ डॉ. भाभा यांनी भारतीय विज्ञान संस्था, बंगलोर येथे प्रोफेसर म्हणून काम केले. इ.स. १९४५ साली टाटा मूलभूत संशोधन संस्थेची स्थापना करण्यात मदत केली आणि आपले संशोधन कार्य संभाळून डॉ. भाभा टाटा मूलभूत संशोधन संस्थेचे संचालक झाले. भारताच्या स्वातंत्र्यानंतर इ.स. १९४८ साली त्यांच्या पुढाकाराने अणु उर्जा आयोगाची स्थापना करण्यात आली. याही संस्थेचे तेच संचालक म्हणून काम पाहू लागले. त्यांच्या अथक परिश्रमांमुळेच भारत देशात अणु भट्टी ची स्थापना होऊ शकली. अणुचा वापर शांततेच्या मार्गानेच व्हावा असे ठाम मत संयुक्त राष्ट्रच्या सभेत मांडणारे भाभा हे पहिले वैज्ञानिक. डॉ. भाभा यांनी पाया रचला म्हणूनच भारताने अनेक ठिकाणी अणु भट्या सुरू करून त्यांचा विज निर्मितीसाठी उपयोग केला तसेच १८ मे, इ.स. १९७४ या दिवशी भारताने पोखरण येथे पहिला अणुस्फोट घडवून आणला.

संयुक्त राष्ट्रच्या सभेला जातांना २४ जानेवारी, इ.स. १९६६ या दिवशी फ्रान्सच्या हद्दीत असतांना त्यांचे विमान अपघातात निधन झाले. त्यांच्या मृत्यु नंतर ट्रॉम्बे येथील अणु संशोधन केंद्राचे नाव बदलून भाभा अणु संशोधन केंद्र असे ठेवण्यात आले ,

*🙏🌞🙏 शुभ प्रभात🙏🌞🙏*

संकलन -)

गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा - यवतमाळ ४४५२०६


Good morning

 🌳⛳ *शुभ प्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

आश्विन मास,कृष्ण पक्ष, *नवमी*,अश्लेषा नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,शरद ऋतु, युगाब्द ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

शनिवार, ३० आॕक्टोबर २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                         *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


शास्त्राण्यधीत्यापि भवन्ति मूर्खाः,

           यस्तु क्रियावान् पुरुषः स विद्वान्।

सुचिन्तितं चौषधम् आतुराणां,

          न नाममात्रेण करोत्यरोगम्॥"


*भावार्थः- यदि ज्ञान को व्यवहार में नहीं लाया जाए तो शास्त्र पढ़ चुके लोग भी मूर्ख ही रह जाते हैं। जिस प्रकार औषधि का सेवन करके व्यक्ति रोगमुक्त होता है, केवल औषधि का नाम लेकर नही।*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


शुक्रवार, २९ ऑक्टोबर, २०२१

पुणे येथील रहिवासी

 नमस्ते मित्रांनो ,

प्रति,

 शिक्षण विभागातील सर्व अधिकारी ,

प्राथमिक / माध्यमिक / उच्च . माध्यमिक सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी*

       आपणास कळविण्यास आनंद होतो कि  शिक्षण विभागातील काम करणाऱ्या प्रत्येक अधिकारी /शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी यांना  पुण्यात आपल्या प्रशासकिय कामासाठी यावे लागते अशावेळी बऱ्याचवेळा मुक्काम करावा लागतो परंतु मुक्कामास स्वच्छ किफायतशीर किंमतीत सोय होत नसल्याने बऱ्याचजणांची गैरसोय होते त्यासाठी आपल्या सर्वांच्या सोयीकरता पुणे शहरात मध्यवर्ती ठिकाणी ( स्वारगेटपासून पाच मिनिटाच्या अंतरावर )मुक्कामाची  अगदी नाममात्र शुल्कात ( प्रत्येकी १०० रू . )सोय आपल्या *शिक्षक भवन* , *१९२ , नवी पेठ , गांजवे चौक , पत्रकार भवन, शेजारी , निवारा वृध्दाश्रमासमोर ,पुणे ३०  फोन नं. 02024537867* होते .


 *शिक्षक भवन वैशिष्टये :* 

१ ] *पुण्यात मध्यवर्ती ठिकाणी उत्तम निवास व्यवस्था .* 

 २ ) *प्रशस्त पार्किंग व्यवस्था .* 

३ ) *अंगोळीसाठी गरम पाणी* 

४ ) *केवळ ओळखपत्राच्या / मुख्याध्यापक पत्राच्या आधारे प्रवेश* 


५ ) *प्रतिदिन प्रतिव्यक्ती केवळ १०० रु. निवास व्यवस्था.* 


६ ) *वैद्यकिय कारणास्त कुटुंबासह निवास व्यवस्था .* 

तरी सर्व शिक्षण विभागातील काम करणाऱ्या प्रत्येक अधिकारी / कर्मचाऱ्याने एक वेळ आवश्य भेट दया .

  इतर संपर्क क्रमांक 

स्वप्निल कांबळे सकाळी १० ते ६ भ्रमणध्वनी  9579252295

 सतिश मेंगडे  संध्याकाळी ६ ते ११ 

 भ्रमणध्वनी 9096392517

रात्री विनय काका 8669226259

      


सहायक संचालक , ( विद्या शाखा )

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय , पुणे ०१ 


( *सदरची पोष्ट शिक्षण विभागातील प्रत्येक गटावर / प्रत्येक शिक्षक , कर्मचारी , अधिकारी यांचेपर्यंत पोहचवावी ही विनंती .* )

कंम्पुटर आणि माउस


════════════════════



🔅 *संकलन:*🔅


*श्री गजानन गोपेवाड 

═══════════════════ 

*

*Computer आणि mouse जोडी आहे  खास ! या उपकरणला उंदराच नाव पडलं तरी कसं?*




संगणकावर काम करण्यासाठी (Comuter must need Mouse) आपण सर्वजण माउसचा वापर करतो. बघायला गेलं तर माऊस शिवाय संगणकाचे काहीच काम होऊ शकत नाही. आपल्याला स्क्रीनवर काहीही हालचाल करायची किंवा आयकॉनवर क्लिक करायचे असेल तर आपल्याला 'माऊस' ची गरज लागते. पण आपल्या मनात एकदा तरी शंका आलीच असेल, की  या उपकरणाला उंदराचं नाव कसं काय बरं ठेवण्यात आलं असेल! बरीच नाव देण्यात आली असती, पण उंदराची उपमा देऊन याचं नामकरण 'Mouse' असं कुणी ठेवलं? चला जाणून घेऊया संगणकाच्या या माऊसबद्दल...



फार काळपूर्वी संगणकाला लागणाऱ्या माऊस ( Computer's Mouse ) चे नाव वेगळे होते. 1960 च्या दशकात ( Douglas Engelbart) डग्लस कार्ल एंगेलबार्टने याचा शोध लावला होता. सर्वप्रथम ज्यावेळी ' माऊस 'चा शोध लागला त्यावेळेस त्या उपकरणाला पॉइंटर डिव्हाइस (Pointer Device) असे नाव देण्यात आले. हा माऊस त्यांनी लाकडापासून तयार केलेला होता. ज्याला मात्र 2 धातूची चाके होती. आणि काळात संगणकाचा आकार जवळपास खोलीएवढा होता.



संगणकाच्या या उपकरणला ' Mouse ' असे यावरून म्हंटले गेले. याचे कारण आळसे ज्यावेळेस माउस या उपकरणाला बनवण्यात आले, त्यावेळी त्या दिसणार्‍या उपकरणाचा आकार आणि शेप साधारण छोट्या दिसणार्‍या उंदरासारखा होता आता. आपण पाहिले असता, उंदीर कुठेही एखाद्या छोट्या जागेवर उंदीर जसा दडून राहतो तसा माउस बनवण्यात आला होता. म्हणून त्याला 'माउस' असे नाव देण्यात आले होते. याअगोदर 'mouse' ला कासवाचे 'turtle' असेही ठेवण्यात आले होते.


गुरुवार, २८ ऑक्टोबर, २०२१

पोपट नक्कल का करतो


══════════════════════

   *📒📒📒 @ संकलन @📒📒📒*

  *श्री. गजानन गोपेवाड *

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════   

🦜 *पोपट नक्कल का करतो?* 🦜

********************************

'पोपटपंछी चतुरकी जान, पढे पहाटे श्रीभगवान' असं आपण कितीही पोपटाचं कौतुक केलं, तरी पोपटपंची का केली जाते, याविषयीच्या आपल्या काही समजुती भ्रामकच आहेत. कारण आपल्या बोलांची सही सही नक्कल करण्यासाठी पोपटांच्या अंगी स्वरयंत्रच नसतं; पण त्यांची श्वासनलिका दुतोंडी असते. त्यामुळे तिच्यातून श्वास आत घेताना किंवा बाहेर सोडताना त्या नलिकेच्या स्वरूपात बदल करून पोपट आवाज काढू शकतात. थोडक्यात, ते शीळ घालत असतात. या शीळेचंच नियंत्रण करून ते निरनिराळे आवाज काढू शकतात. ऐकलेल्या आवाजाची नक्कल करण्याची क्षमता मुळातच पोपटांमध्ये असते. त्यामुळे रानावनात असताना ते इतर पक्ष्यांच्या आवाजाची नक्कलही करू शकतात. यात पोपटांच्या निरनिराळ्या जातींचा, तसंच त्यांच्या स्वतःच्या जातीचाही समावेश असतो. त्यामुळे मग कोणत्या पक्ष्याला साद घालून जवळ करायचं किंवा कोणाला किंवा डावलून दूर निघून जायचं, हे ठरवणं त्यांना शक्य होतं. आपल्याच जातीच्या दुसऱ्या पोपटाला साद घालून प्रतिसाद देत ते स्वतःच्या प्रदेशांचं रक्षणही करू शकतात. तसंच विणीच्या हंगामात आपला जोडीदार शोधण्यासाठीही त्यांना या क्षमतेची मदत होते.

जेव्हा असे पोपट घरात पाळले जातात तेव्हा ऐकलेल्या आवाजाची नक्कल करण्याच्या त्यांच्या अंगभूत क्षमतेपोटी मानवी आवाजाची नक्कल करणं त्यांना शक्य होतं. अर्थात, असं करताना ते शब्द मुळात मानवप्राण्याकडून काढले गेले आहेत, अशी मात्र त्याची समजूत नसते. तेराव्या शतकातल्या एका फारसी ग्रंथात, पोपटांना बोलायला कसं शिकवावं, हे सांगितलं आहे. त्यात असं म्हटलं आहे, की ज्या पोपटाला बोलायला शिकवायचं त्याच्यासमोर एक आरसा धरावा. त्या आरशाच्या आड मग त्याच्या मालकानं स्वतःला लपवावं. त्या पोपटाला त्यामुळे आपल्या मालकाचं दर्शन होत नाही. समोरच्या आरशात मात्र त्याला स्वतःचंच प्रतिबिंब दिसतं. त्यामुळं जेव्हा तो मालक काही शब्द उच्चारतो तेव्हा पोपटाला दुसरा एक आपल्यासारखा पक्षीच बोलत असल्याचं वाटून तो त्यांची नक्कल करण्याचा प्रयत्न करतो. त्यापोटीच काही शब्द असे पोपट तसेच्या तसे आपल्या गळ्यातून काढू शकतात. मानवीआवाजाची नक्कल करून आपलं मन रिझवण्याचं काम ते जरूर करतात; पण त्यापायी इतर पक्ष्यांची नक्कल करण्याची किमया ते हरवून बसल्याचं दिसून आलं आहे.

पोपटच फक्त असं करू शकतात, असं नाही. मैना पक्षीही अशी नक्कल करू शकतात. झालंच तर मॉकिंगबर्ड जातीचे इवलेसे पक्षी तर इतर कितीतरी पक्ष्यांची नक्कल करतात. तरीही पोपटांची बुद्धिमत्ता इतर पक्ष्यांच्या मानानं जास्त असल्याचा दावा काही मज्जाशास्त्रज्ञांनी केला आहे. त्यामुळेच काही पोपट केवळ शब्दच नव्हे, तर वाक्यंच्या वाक्य बोलू शकतात. एवढंच नाही, तर त्यांचा अर्थही त्यांना समजत असल्यासारखी त्यांची वागणूक असते.


*-डॉ.बाळ फोंडके यांच्या 'का?'या पुस्तकातून*


कुतुहल अल्गोरिदमचे विश्व


══════════════════

           *🤔 【 कुतूहल 】 🤔*  

______________________________

*🖥️✒️संकलन✒️💻*

_*श्री.गजानन गोपेवाड *_


~==========================~


*कुतूहल : अल्गोरिदमचे विश्व*


साधी बेरीज-वजाबाकी ते क्लिष्ट समीकरणे सोडवण्यासाठी आपण वेगवेगळ्या पद्धती शिकतो. मात्र संगणकाला त्यातील एकूण एक बारकावे स्पष्टपणे सांगणे आवश्यक असते. औपचारिक भाषेत त्या पद्धतीला, रीत म्हणजे ‘अल्गोरिदम’ म्हटले जाते. संगणकाच्या संदर्भात प्रोग्रामिंग अल्गोरिदम म्हणजे प्रश्नाची उकल करण्यासाठी प्रत्येक पायरीवर काय प्रक्रिया करायची हे सविस्तरपणे सांगणे. त्याप्रमाणे दिलेल्या निविष्टीवर (इनपुट) प्रक्रिया करून संगणक निष्पत्ती (आऊटपुट) देतो. अल्गोरिदमची मुख्य वैशिष्टय़े अशी: प्रत्येक पायरी आणि प्रक्रिया नि:संदिग्ध असते, प्रत्येक पायरी पारदर्शक व तर्कशास्त्राधारित असते, प्रत्येक पायरीवर एकमेव उत्तर मिळते, सान्त (फायनाइट) वेळा प्रक्रिया केल्यावर अल्गोरिदम थांबतो, अल्गोरिदम दिलेल्या प्रकारच्या कितीही मोठय़ा प्रमाणातील आधारसामग्रीवर वापरता येतो, आणि तो कुठल्याही एका विशिष्ट संगणकीय भाषेवर अवलंबून नसतो.


प्रोग्रामिंग अल्गोरिदम्स पुढील प्रक्रिया प्रामुख्याने करतात, विल्हेवारी लावणे (सॉर्टिग), शोध घेणे (सर्चिग), संकीर्णीकरण करणे (हॅशिंग), गतिमान प्रायोजन (डायनॅमिक प्रोग्रामिंग), अक्षर वा अंकमालिका समुचितपणे खंडित करणे (स्ट्रिंग पार्सिग). विल्हेवारी लावण्यासाठी ‘बबल सॉर्टिग’ अशी खास रीतही उपलब्ध आहे. संगणकावर अल्गोरिदम कसा कार्यान्वित करावा यासाठी सोबतच्या आकृतीत दाखवल्याप्रमाणे प्रवाह किंवा प्रक्रियादर्शक तक्ता (फ्लोचार्ट) प्रथम तयार केला जातो. हा तक्ता प्रमाणित (स्टॅण्डर्ड) आकृत्या वापरतो जसे की, वर्तुळ म्हणजे प्रारंभ किंवा समाप्ती, आयत म्हणजे प्रक्रियेचे वर्णन, समभुज चौकोन (रॉम्भस) म्हणजे प्रश्न इत्यादी. त्या सर्वातील संबंध बाणांनी जोडून विशद केले जातात. नंतर या तक्त्यातील प्रत्येक प्रक्रियेला अनुरूप सूचना, निवडलेल्या संगणक भाषेच्या ओळींमध्ये (कोडिंग लाइन्स) लिहून संपूर्ण आज्ञावली (प्रोग्राम) काटेकोरपणे तयार होते.


‘अधाशी’ (ग्रीडी) अल्गोरिदम हा आणखी एक महत्त्वाचा प्रकार आहे. यात अधिक पुढचा विचार न करता लगेच जी गोष्ट इष्टतम असेल, ती केली जाते. अर्थातच सदर रीत दर वेळी यशस्वी ठरत नाही, पण सहसा वाईट निष्कर्षही देत नाही. कित्येकदा अल्गोरिदमच्या काही पायऱ्यांत सर्व शक्यता तपासणे बराच वेळ घेऊ शकते, तरी त्या सर्व न तपासता यादृच्छिक निवड (रॅण्डम सिलेक्शन) अनेक वेळा करून निर्णय घेण्याची पद्धत वापरली जाते. याला ‘माँटे कार्लो’ अल्गोरिदम असे नाव आहे. प्रत्यक्षात अनेक प्रश्नांसाठी ही रीत प्रभावी ठरते, असा अनुभव आहे.


संगणकशास्त्रात अल्गोरिदमबाबत मोठय़ा प्रमाणात संशोधन होत आहे. उदा. त्यात अल्गोरिदमची संरचना आणि तिची कार्यक्षमता अभ्यासली जाते. तसेच उद्भवणारे संभाव्य स्थूलांकन दोष (राऊंडिंग एरर) संख्यात्मक विश्लेषण (न्यूमरिकल अ‍ॅनेलेसिस) या गणिती शाखेमार्फत तपासले जातात.


–डॉ. विवेक पाटकर

मराठी विज्ञान परिषद, मुंबई.

Written By_लोकसत्ता टीम

संकेतस्थळ : www.mavipa.org      

ईमेल : office@mavipamumbai.org


कुतूहल ऐकावे ते नवलच चित्रलेखा


══════════════════

           *🤔 【 कुतूहल 】 🤔*  

______________________________

*🖥️✒️संकलन✒️💻*

__

_*श्री गजानन गोपेवाड *_

~==========================~


*कुतूहल : चित्रालेखाचे भौमितिक रूपांतर*


संगणकाच्या साहाय्याने चित्रालेख (ग्राफिक्स) गतिक (डायनॅमिक) करण्यासाठी सारणी बीजगणिताचा (मॅट्रिक्स अलजिब्रा) प्रामुख्याने उपयोग होतो. चित्रांचा आकार-प्रकार, रूप, स्थान व दिशानिदेशन (ओरिएन्टेशन) बदलताना मूलत: भौमितिक रूपांतरण केले जाते. उदाहरण म्हणून त्रिकोण या द्विमितीय आकृतीचे स्थानांतरण (ट्रान्सलेशन), परिवलन (रोटेशन), परावर्तन (रिफ्लेक्शन), आकारमान रूपांतरण (स्केलिंग) व वितलीयकरण (स्क्यू) सारणीच्या नियमांनुसार कसे होईल ते पाहू. सोबत दिलेल्या आकृतीत अबक त्रिकोणाचे ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ शिरोबिंदू आहेत. ‘अ’चे मूळ निर्देशांक (क्ष, य) तर रूपांतरित निर्देशांक अ’(क्ष’, य’) होतील. त्याचप्रमाणे आकृतीतील इतर बिंदूंचे रूपांतर होईल. सारणीतील घटक रूपांतरणाचे सहगुणक दर्शवतात. आकृतीचे ‘स्थानांतरण’ करताना (आकृती १), प्रत्येक बिंदू ठरावीक ‘ड’ अंतराने पूर्वनिर्धारित दिशेने सरकवला जातो.‘परिवलन’ करताना (आकृती २) आकृती धन ड० कोनातून फिरवण्यात येते. आकृतीचे परावर्तन (आकृती ३) केल्यावर प्रतिबिंबित चित्र अशा प्रकारे दिसेल. आकृती ठरावीक ‘ड’ पटीने लहान किंवा मोठी करणे म्हणजेच ‘आकारमान रूपांतरण’ (आकृती ४) होय. आकृती भूपृष्ठाला समांतर किंवा लंबरेषेत, ‘ड’ घटकाने ओढून तिरकस केल्यास ‘वितलीयकरण’ (आकृती ५) होईल. अशाप्रकारे त्रिमितीय चित्रांचेही रूपांतरण केले जाते. संगणकामध्ये चित्र-रूपात साठवलेला डेटा, सारणी बीजगणिताच्या नियमांनुसार सहजतेने हाताळण्यासाठी; चित्राच्या दृश्य रूपाबरोबरच भौमितिक माहिती असणे आवश्यक ठरते. संगणकीय चित्र, निर्देशक प्रणालीत (को-ऑर्डिनेट सिस्टीम) रूपांतरित करताना भौमितिक सिद्धांतांचा वापर होतो. त्यामुळेच स्थिरचित्रांबरोबरच प्रगत आणि संमिश्र चित्रालेख, संगणकीय सरूपीकरण (सिम्युलेशन) आणि चित्रे गतिमान करण्यासाठी चेतनीकरण (अ‍ॅनिमेशन) करणे सुलभ 

पोलीओ लस संशोधक जोनास साँल्क

 *🔬🔬जोनास सॉल्क🔬🔬*

💉💉💉💉💉💉💉💉💉💉💉

*पोलिओ लस संशोधक*

🔬🔬🔬🔬🔬🔬🔬🔬🔬🔬

*जन्मदिन - २८ ऑक्टोबर १९१४*


जोनास सॉल्क एक अमेरिकी चिकित्सा शोधकर्ता और विषाणुशास्त्री थे, जिन्हें पोलियो के पहले सुरक्षित और प्रभावी टीके के विकास के लिए जाना जाता है। रूसी यहूदी अप्रवासी की संतान जोनास का जन्म न्यूयॉर्क शहर में हुआ था। माता-पिता ने हालांकि औपचारिक शिक्षा प्राप्त नहीं की थी, लेकिन वे अपने बच्चों को सफल देखने चाहते थे। न्यूयॉर्क विश्वविद्यालय में मेडिकल स्कूल में पढ़ते हुए उन्होंने एक चिकित्सक बनने की बजाए चिकित्सा अनुसंधान की ओर कदम बढ़ा कर अपने लिए अलग राह चुनी।


पोलियो अथवा पोलियोमायलिटिस हा एक विषाणू मुळे बालकांना होणारा आणि अपंग करणारा संसर्गजन्य रोग आहे. पोलियोमायलिटिस या शब्दाची व्युत्पत्ती ग्रीक भाषेमधील पोलियो म्हणजे ग्रे अथवा भुरा, मायलॉन म्हणजे मज्जारज्जू, तर आयटिस म्हणजे सूज या शब्दांपासून झाली आहे. पोलियोच्या उपसर्गाच्या ९०% घटनांमध्ये काहीच लक्षणे आढळून येत नाहीत, परंतु विषाणूनी रक्तप्रवाहामध्ये प्रवेश केल्यास पोलियो रुग्णांमध्ये बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारची लक्षणे दिसून येतात. १% पेक्षा कमी रुग्णांच्याबाबतीत हा विषाणू मध्यवर्ती मज्जासंस्थे मध्ये प्रवेश करतो व शरीरातील स्नायूंच्या हालचालीस कारणीभूत असणाऱ्या 'गतिप्रेरक न्यूरॉनना' अपाय करतो. याचे पर्यवसान स्नायू दुर्बल होण्यामध्ये व शेवटी पक्षाघातामध्ये होते.


हजारो वर्षे पोलियो सक्रिय परंतु स्थिर अवस्थेत अस्तित्वात होता. १८८० नंतर पोलियोच्या साथींचे युरोपामध्ये मोठे उद्रेक होऊ लागले आणि नंतर लगेचच अमेरिकेतपोलियोच्या साथीचा प्रसार झाला. १९१० पर्यंत जगात पोलियोचा खूपच प्रसार झाला होता, आणि त्याच्या साथींचा उद्रेक ही अगदी नेहेमीची घटना होऊ लागली. या साथींमुळे हजारो मुले आणि प्रौढ व्यक्ती अपंग झाल्या, व यामुळे पोलियोवर उपायकारक लस शोधण्यासाठी 'महाशर्यत' सुरू होण्यास जोर मिळाला. 


पोलियोच्या लसी विकसित करण्याचे श्रेय जोनस सॉल्क (१९५२) व अल्बर्ट सेबिन (१९६२) यांच्याकडे जाते. यांच्या प्रयत्नांमुळे पोलियोच्या रुग्णांची संख्या प्रतिवर्षी अनेक लाखांवरून काही हजारांवर आली आहे. जागतिक आरोग्य संघटना (WHO), युनिसेफ व रोटरी इंटरनॅशनल या संस्थांच्या पोलियो निर्मूलनाच्या प्रकल्पांमुळे पोलियोचे जगातून लवकरच संपूर्ण उच्चाटन होईल अशी आशा निर्माण झाली आहे.


२००० मध्ये प्रशांत महासागराच्या पश्चिमेकडील चीन आणि ऑस्ट्रेलिया मिळून इतर ३६ देशांमध्ये पोलियोचे निर्मूनल झाले. २००२मध्ये युरोप पोलियोमुक्त जाहीर करण्यात आला. आता (२००६ नंतर) पोलियोच्या साथींचे उद्रेक फक्त भारत, पाकिस्तान, नायजेरिया, व अफगाणिस्तान या चार देशांमध्येच आढळून येत होते. (मार्च २७,२०१४ ला) जागतिक आरोग्य संघटना (WHO) द्वारे भारत देशाला १०० प्रतिशत पोलियोमुक्त जाहीर करण्यात आले. भारतात सरकारने (१९९५) साली सुरू करण्यात आलेल्या पल्स पोलियो योजने मुळे भारत देश पूर्णपणे पोलियोमुक्त झाला.

*🙏🌞🙏शुभ प्रभात🙏🌞🙏*

संकलन -)

गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

प्रभात दर्शन

 🌳⛳ *शुभ प्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

अश्विन मास,कृष्ण पक्ष, *सप्तमी*,पुनर्वसु नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,शरद ऋतु,युगाब्द ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

गुरुवार, २८ आॕक्टोबर २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                        *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


अस्थिरं जीवितं लोके 

                 अस्थिरे धनयौवने,

अस्थिरा: पुत्रदाराश्र्च 

                धर्मकीर्तिद्वयं स्थिरम्।।


*भावार्थः- इस जगत में जीवन सदा नहीं रहने वाला है, धन और यौवन भी सदा नहीं रहने वाले हैं, पुत्र और स्त्री भी सदा नहीं रहने वाले हैं। केवल धर्म और कीर्ति ही सदा-सदा के लिए रहते हैं।*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


बुधवार, २७ ऑक्टोबर, २०२१

भालचंद्र निळकंठ पुरंदरे वैद्यकतज्ञ

 *👨‍⚕️👨‍⚕️भालचंद्र नीळकंठ पुरंदरे👨‍⚕️👨‍⚕️*

➿➿➿➿➿➿➿➿➿➿

*👨‍⚕️👨‍⚕️👨‍⚕️वैद्यकतज्ञ👨‍⚕️👨‍⚕️👨‍⚕️*

👨‍⚕️👨‍⚕️👨‍⚕️👨‍⚕️👨‍⚕️👨‍⚕️👨‍⚕️👨‍⚕️👨‍⚕️👨‍⚕️

*जन्मदिन - २७ ऑक्टोबर १९११*

➿➿➿➿➿➿➿➿➿➿

डॉ. भालचंद्र नीळकंठ पुरंदरे यांचा जन्म मुंबईत झाला. त्यांचे वडील डॉ. नीळकंठ अनंत पुरंदरे प्रसिद्ध स्त्री-रोगतज्ज्ञ होते व त्यांचे गिरगाव चौपाटीला स्वत:चे रुग्णालय होते. डॉ. भालचंद्र पुरंदरे यांना वैद्यकीय शिक्षणाचे बाळकडू घरातच मिळाले होते. साहजिकच, त्यांचा कल प्रसूती व स्त्री-रोगविज्ञानाकडे होता. त्यांचे इंटरसायन्सपर्यंतचे शिक्षण मुंबईच्या विल्सन महाविद्यालयामध्ये झाले. इंटरसायन्सला उत्तम गुण मिळवून मुंबईच्या जी.एस. वैद्यकीय महाविद्यालयामधून ते एम.बी.बी.एस. झाले. हुशार विद्यार्थ्यांत त्यांची गणना असल्यामुळे त्यांना बऱ्याच शिष्यवृत्त्याही मिळाल्या होत्या. १९३७ साली त्यांना प्रसूतिविज्ञान व स्त्री-रोगविज्ञान या विषयांत एम.डी. पदवी मिळाली. १९३९ साली इंग्लंडमधील एडिंबरा येथील रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्सची एफ.आर.सी.एस. पदवी मिळाली. मुंबईत परत आल्यावर कॉलेज ऑफ फिजिशियन्स व सर्जन यांची अभिछात्रवृत्ती मिळवून ते एफ.सी.पी.एस. झाले. मुंबईतील के.ई.एम. रुग्णालयात १९४१ ते १९४५ स्त्री-रोगशास्त्र व प्रसूतिशास्त्र या विभागात साहाय्यक सन्माननीय विशेषज्ञ म्हणून त्यांनी काम केले. १९५७ साली त्यांनी त्याच विभागाचे प्रमुख म्हणून काम केले.


त्यांच्याच प्रयत्नामुळे प्रसूतिविद्या व कुटुंबनियोजन या विषयाच्या संशोधनाकरिता खास संशोधन केंद्र के.ई.एम.मध्ये स्थापन झाले. डॉ. पुरंदरे त्याचे संचालक होते. त्या केंद्राला त्यांच्या वडिलांचे, डॉ. नीळकंठ अनंत पुरंदरे यांचे नाव दिले गेले. १९६९ साली निवृत्त होईपर्यंत ते विभागप्रमुख व संशोधन केंद्र संचालक होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जननमार्गासंबंधी अनुप्रयुक्त जीवविज्ञानाच्या एम.डी. व पीएच.डी. या पदव्युत्तर परीक्षांच्या अभ्यासाची सोय करण्यात आली. ते वाडिया रुग्णालयाचे प्रमुख अधिकारी होते. याशिवाय बॉम्बे रुग्णालय व पश्चिम रेल्वेचे जगजीवनराम रुग्णालय यांचे सन्माननीय विशेषज्ञही होते.


त्यांचे विशेष संशोधन म्हणजे गर्भाच्या खांद्याच्या (अ‍ॅण्टिरियर शोल्डर) हालचालीवरून प्रसूतीच्या प्रगतीचा अंदाज घेणे. गर्भाशयाच्या स्खलनाची शस्त्रक्रिया त्यांनी सुधारली. पोटाच्या पुढच्या भागातील स्नायूच्या आवरणाचा (अ‍ॅपोन्युरोसिस) दोरीसारखा उपयोग करून, गर्भाशय या दोरीने वर उचलून पोटाच्या पुढच्या भागाला बांधून ठेवायचे म्हणजे ते खाली घसरणार नाही, असे शस्त्रक्रियेचे स्वरूप असे. या शस्त्रक्रियेनंतर जर स्त्रीला मूल हवे असेल, तर ते होऊ शकेल. प्रसूतीच्या वेळी जर काही कारणास्तव प्रसूती नैसर्गिकरीत्या होत नसेल, तर बाळाच्या डोक्याला इजा न होता प्रसूती होऊ शकेल.


कुटुंबनियोजनाची शस्त्रक्रिया योनिमार्गे करण्याची पद्धत त्यांनी सुरू केली. या पद्धतीत फॅलोपियन बीजवाहिनी योनिमार्गे छोट्या छिद्रातून काढायची व ती दुमडून, तिला टाके मारून पुन: पोटात ठेवायची. या पद्धतीमुळे स्त्रीचे रुग्णालयातील वास्तव्य कमी झाले व नंतर मूल हवे असल्यास ते टाके काढून बीजवाहिनी मोकळ्या करू शकतात. याला ‘पुरंदरे तंत्र’ म्हणतात.


गर्भाशय काही कारणास्तव काढावे लागले, तर डॉ.पुरंदरेंनी ते योनिमार्गे काढण्याची पद्धती चालू केली. यामध्ये कमीतकमी रक्तस्त्राव होतो व पोटावर एरवी होणारा व्रणही होत नाही. या शस्त्रक्रियेसाठी लागणारी उपकरणे त्यांनी स्वत:च तयार केली. ती सर्व त्यांच्याच नावाने प्रसिद्ध आहेत.


डॉ. पुरंदरेंनी कुटुंबनियोजनासाठी विशेष कामगिरी बजावली आहे. गर्भपातविषयक कायद्यासंबंधी नेमलेल्या ‘शांतिलाल शाह समिती’चे ते सभासद होते. डॉ.पुरंदरेंच्या कार्याबद्दल त्यांना ‘पद्मभूषण’ पुरस्कार देण्यात आला. डॉ. पुरंदरेंना अनेक मानसन्मान मिळाले. त्यांतील काही मानसन्मान : अधिष्ठाता- वैद्यकीय विद्याशाखा, मुंबई विद्यापीठ, अध्यक्ष- कॉलेज ऑफ फिजिशियन्स अ‍ॅण्ड सर्जन्स, मुंबई, सन्मान्य सदस्य- एडिंबरो ऑब्स्टेटिक्स सोसायटी, अध्यक्ष- इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ गायनॅकोलॉजी अ‍ॅण्ड ऑब्स्टेटिक्स, सन्मान्य सदस्य- इंडियन अकॅडमी ऑफ मेडिकल सायन्सेस, अध्यक्ष- इंडियन अकॅडमी ऑफ सायटॉलॉजिस्ट. स्त्री-रोगविज्ञान व प्रसूतिविद्या या विषयांवर त्यांचे बरेच संशोधन असून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय वैद्यकीय नियतकालिकांतून त्यांचे संशोधनपर लेख प्रसिद्ध झालेले आहेत. ते सहलेखक असलेल्या पुस्तकाच्या दहा आवृत्त्या निघाल्या आहेत. त्यांना संगीतात खूप रस होता व ते उत्तम तबलावादक होते. त्यांचे आत्मचरित्रही प्रकाशित झाले आहे.

 डॉ. अरूण मांडे  / डॉ. शशिकांत प्रधान

🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

संकलन -गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा - यवतमाळ ४४५२०६

प्रभात दर्शन

 🌳⛳ *शुभ प्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

आश्विन मास,कृष्ण पक्ष, *षष्ठी*,आद्रा नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,शरद ऋतु,युगाब्द ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

बुधवार, २७ आॕक्टोबर २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                         *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


          *लोगों से प्रेम करना, उनकी सेवा करना, उन्हें सशक्त बनाना और उन्हें प्रोत्साहित करने का नाम ही जीवन है। जीवन में आनन्द को कर्तव्य बनाने की अपेक्षा कर्तव्य को आनन्द बनाना अधिक महत्त्वपूर्ण हैं। यह शास्वत सत्य है कि साझा की गई प्रसन्नता दुगनी हो जाती है एवं साझा किया गया दुख आधा हो जाता है।*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


मंगळवार, २६ ऑक्टोबर, २०२१

कापलेले सफरचंद तपकीरी का पडत


══════════════════════

   *📒📒📒 @ संकलन *

  *श्री. गजानन गोपेवाड *

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════   

🍎 *कापलेलं सफरचंद तपकिरी का होतं?* 

**********************************

सफरचंदासारख्या फळांमध्ये लोहाचं प्रमाण जास्त असतं. लोखंडाचा हवेतल्या ऑक्सिजनशी संपर्क आला, की त्याचं लोखंडाच्या ऑक्साईडमध्ये रूपांतर होतं. म्हणजेच त्याला गंज चढतो. त्या गंजाचा तपकिरी रंग मग त्या कापलेल्या सफरचंदाच्या पृष्ठभागावर उतरतो, असं आपल्याला गितलं जातं; पण ते अर्धवटच खरं आहे. प्रत्यक्षात होणाऱ्या प्रक्रिया अधिक गुंतागुंतीच्या आहेत. हा तपकिरी रंगाचा डाग केवळ सफरचंदावरच पडतो असे नाही. पेअरवरही तो पडतो. बटाट्यावरही पडतो. तरीही तसा तो पडण्याचं कारण काय, हा प्रश्न उरतोच, सफरचंद जेव्हा आपण कापतो तेव्हा एक तर त्याचा अंतरंगावरचा पृष्ठभाग आपण उघडा करतो. त्याचा हवेशी संपर्क येऊ देतो. तसंच त्या पृष्ठभागावरच्या उतींना आणि त्यांचे घटक असणाऱ्या पेशींनाही काही इजा करतो. त्यामुळे त्या इजा झालेल्या पेशींमध्ये ऑक्सिजनचा शिरकाव होतो. या फळांमध्ये पॉलिफेनॉल ऑक्सिडेज नावाचं एक विकर असतं. जेव्हा पेशीमधलं ऑक्सिजनचं प्रमाण वाढतं तेव्हा फळात मुळातच असलेल्या फेनॉलच्या संयुगांचं ओक्विनोन नावाच्या संयुगांमध्ये रूपांतर होतं. ही संयुगं रंगहीन असतात; पण तपकिरी रंगाच्या रसायनांची ती पूर्वसूरी असतात. म्हणजेच त्यांची प्रथिनांचे घटक असणाऱ्या अमिनो आम्लांशी प्रक्रिया झाली, की त्यातून तपकिरी रंगाची रसायनं तयार होतात. काही वेळा या ओक्विनोनच्या साखळ्या तयार होऊन त्यापासून बहुवारिक संयुगं तयार होतात. त्यांचाही रंग तपकिरी असतो.


सर्वच जातींच्या सफरचंदांमध्ये पॉलिफेनॉल ऑक्सिडेज हे विकर असत; पण त्याचं प्रमाण वेगवेगळं असू शकतं. तसंच त्याचा प्रभाव ज्यांच्यावर पडायचा ती फेनॉलची संयुगंही वेगवेगळ्या प्रमाणात उपस्थित असतात. त्या दोन्हींच्या प्रमाणावर त्यांच्यामध्ये होणारी प्रक्रिया किती जोमदार आहे व तिच्यातून तयार होणाऱ्या ओक्विनोनचं प्रमाण किती असेल हे ठरतं. त्यामुळे काही जातींची सफरचंदं चटकन तपकिरी होताना दिसतात, तर काही त्या मानानं संथ गतीनं आणि कमी प्रमाणात तो रंग धारण करताना दिसतात. या प्रक्रियेतल्या दोन घटकांचं प्रमाण कमी-जास्त करणं तर शक्य नसतं; पण त्यांच्यामध्ये होणारी प्रक्रिया सहजासहजी होणार नाही, तिच्यामध्ये बाधा येईल अशी व्यवस्था करणं शक्य असतं. कापलेल्या फळांवर साखरेचा किंवा तिच्या पाकाचा लेप दिला तर हवेतल्या ऑक्सिजनचा पेशींमध्ये होणारा शिरकाव आपण टाळू शकतो. निदान त्याचं प्रमाण कमी करू शकतो. लिंबाच्या किंवा अननसाच्या रसामध्ये अॅन्टिऑक्सिडन्ट पदार्थ जास्त प्रमाणात असतात. तेही हवेतल्या ऑक्सिजनच्या शिरकावात अडथळा निर्माण करू शकतात. शिवाय ते दोन्ही पदार्थ आम्लधर्मी असल्यामुळं त्या विकराच्या प्रभावाला रोखू शकतात. तसं केल्यास कापलेल्या सफरचंदाचं 'गंजणं' आपण काही प्रमाणात कमी करू शकतो.


*-डॉ.बाळ फोंडके यांच्या 'का?'या पुस्तकातून*


स्टेनलेस स्टील ला गंज का चढत नाही


══════════════════════

   *📒📒📒 @ संकलन @📒📒📒*गजानन गोपेवाड *

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════   

📒 *स्टेनलेस स्टीलला गंज का चढत नाही ?* 

**********************************

साध्या पोलादाला गंज चढतो. तो त्या धातूला कुरतडत राहतो. कालांतरानं त्याचा भुगाच करतो. हे असं का होत ? हवेतल्या किंवा पाण्यातल्या ऑक्सिजनशी त्याची जी रासायनिक प्रक्रिया होते त्यातून तयार होणारी संयुगं साध्या लोखंडावर किंवा पोलादावर गंजाची पुटं चढायला कारणीभूत असतात. ही संयुगं पोलादाच्या पृष्ठभागावर एक परत तयार करतात. ही आयर्न ऑक्साईड किंवा हायड्रॉक्साईडची पुटं अस्थिर असतात. हवेतल्या, पाण्यातल्या ऑक्सिजनशी त्यांचा सतत संपर्क येतच राहतो. एवढंच काय, पण या पुटांमधून शिरकाव करून घेत पुढं पुढं जात त्यांच्या खालच्या पोलादाशीही तो संधान साधतो. आणखी संयुगं तयार करतो. त्यामुळे इतर काही उपाययोजना केली नाही तर मग या पुटांची जाडी वाढत राहते. डोळ्यांना सहज दिसेल इतकी ती वाढते. यालाच आपण गंज म्हणतो. त्यातील संयुगांच्या तपकिरी रंगामुळं तर ती अधिकच सहजपणे दिसून येतात.

त्यांना प्रतिबंध करण्यासाठी पोलादात क्रोमियम, सिलिकॉन, मँगेनीज, कार्बन हे धातू मिसळून त्यापासून मिश्रधातू तयार करण्यात येतो. यालाच स्टेनलेस स्टील म्हणतात. काही स्टेनलेस स्टीलमध्ये निकेल किंवा मॉलिब्डेनम हे धातूही मिसळलेले असतात. जेव्हा असं स्टेनलेस स्टील हवेतल्या किंवा पाण्यातल्या ऑक्सिजनच्या संपर्कात येतं तेव्हा त्याची प्रक्रिया त्या मिश्रधातूतल्या लोखंडाशी होण्याआधी क्रोमियम किंवा निकेल यांसारख्या धातूंबरोबर होते. त्यांच्या संयुगामुळंही गंजाची एक रेण्वीय जाडीची परत तयार होते पण ती स्थिर असते. तिच्यामधून शिरकाव करून घेत खालच्या लोहाशी प्रक्रिया करणं ऑक्सिजनला शक्य होत नाही. त्यामुळे लोहाची संयुगं तयार होत नाहीत. एवढंच नाही, तर जे काही थोडंफार क्रोमियम किंवा निकेल उरलं असेल त्याच्याशीही ऑक्सिजन प्रक्रिया करू शकत नाही. त्यामुळे जे काही गंजाचं अतिशय पातळ पुट तयार झालं असेल, त्याची जाडीही वाढत नाही. ते अतिशय पातळ म्हणजे केवळ एका रेणूच्या जाडीएवढंच असल्यामुळं आणि त्याचा रंगही तपकिरी नसल्यामुळं डोळ्यांना ते दिसत नाही. म्हणजे स्टेनलेस स्टीललाही गंज चढतो पण तो अतिशय मामुली स्वरूपातला असल्यामुळं आणि त्याची वाढ होत नसल्यामुळं त्या धातूचं नुकसान मर्यादित राहतं. सतत वाढत जाऊन ते मूळ धातूला कुरतडत खाऊन टाकत नाही.

या सर्वात कळीची भूमिका बजावली जाते ती क्रोमियमकडून. त्यामुळेच इतर धातू असोत-नसोत, स्टेनलेस स्टीलमध्ये क्रोमियमचा समावेश निश्चित असतो. किंबहुना, किमान दहा टक्के क्रोमियमचा अंतर्भाव केलेला असल्याशिवाय अशा धातूला स्टेनलेस स्टील असल्याचं प्रमाणपत्र दिलं जात नाही.


*-डॉ.बाळ फोंडके यांच्या 'का?'या पुस्तकातून*

═══════════════════════

नद्या वळणाकार का घेतात


══════════════════════

   *📒📒📒 @ संकलन @📒📒📒*

  *श्री.गजानन गोपेवाड *

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════   

📒 *नद्या नागमोडी वळणका घेतात ?* 📒

***********************************

नद्यांचा उगम डोंगरराजीमध्ये म्हणजेच उंचावर होतो. तिथून त्या उताराकडे वाहत जातात. जोवर हा उतार असतो तोवर त्यातील उंचवटे आणि सखल भाग यांच्या साथीनं त्या वाह । राहतात; पण जेव्हा त्या सपाट प्रदेशातून वाहू लागतात तेव्हा त्यांचा प्रवाह निर्धारित करणारे दुसरेच घटक प्रबळ होतात. यातल्या दोन प्रमुख घटकांचा प्रभाव प्रवाहाचं स्वरूप निश्चित करण्यात होतो. नद्याच्या वाहण्यामुळं पाण्याचं काठावरच्या तशाच तळाशी असलेल्या मातीशी घर्षण होतं. त्यामुळे मग त्या मातीची धूप होते. उलट काठावरचा गाळ नद्यांच्या तळाशी साचून राहतो. नदीचा प्रवाह जरी सलग भासला तरी सर्वच पाणी एकाच वेगानं वाहत नसतं. याला परत तळामध्ये तसंच काठावरच्या प्रदेशातील उंचवटे आणि सखल भाग कारणीभूत असतात. ज्या बाजूचा प्रवाह वेगानं वाहतो त्या बाजूकडची धूप होण्याचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे तो भाग अधिक खोल बनतो. त्या बाजूच्या पाण्याला अधिक वेग येतो. त्यापायी धूप आणखीच वाढते. उलट ज्या बाजूच्या प्रवाहाचा वेग कमी असतो त्या बाजूकडे गाळ साचून राहण्याचं प्रमाण वाढीस लागतं. त्या बाजूचा तळ उथळ होतो. प्रवाहाच्या वेगाला अधिक अटकाव होतो. तो आणखी कमी होतो. जास्त गाळ साचून राहू लागतो. अशा रीतीनं नदीच्या तळाचा उतार वाढला, की ज्या बाजूला जास्त उतार आहे त्या बाजूला प्रवाह वळतो.


 सायकलीवरून जाताना जर गुळगुळीत रस्त्याच्या बाजूला असलेल्या गवताळ भागात पुढचं चाक गेलं तर त्याचा वेग कमी होतो. सायकल त्या बाजूला झुकते, म्हणजेच दोन चाकांच्या वेगात फरक पडला, की सरळ वाट सायकल सोडून देते. तशातलीच नदीच्या प्रवाहाची गत होते. फरक इतकाच, की ज्या बाजूच्या प्रवाहाची गती जास्त झालेली असते त्या बाजूकडे प्रवाह झुकतो. कारण आता उतार त्या दिशेला वाढलेला असतो. तसा तो प्रवाह झुकला की विरुद्ध बाजूच्या पाण्याला तेवढ्याच वेळात जास्त अंतर काटावं लागतं. त्याचा वेग वाढतो. त्यापायी होणारी धूप वाढते. तशी ती वाढली की आता उताराची दिशाही बदलते. त्यामुळे मग प्रवाह विरुद्ध बाजूला झुकतो. वळण विरुद्ध बाजूकडे झुकतं. ज्या प्रदेशातून अशा वेळी नदी वाहत असते त्या प्रदेशात नैसर्गिक उतार नसल्यामुळे प्रवाहापोटी उद्भवणाऱ्या चढाव- उतारांमधील सततच्या दिशाबदलाची संगत करत नदी वाहत राहते. साहजिकच तिचा प्रवाह नागमोडी वळणं घेत राहतो.


*-डॉ.बाळ फोंडके यांच्या 'का?'या पुस्तकातून*

═══════════════════════


सोमवार, २५ ऑक्टोबर, २०२१

धरणातील पहिला विद्युत जनित्र सुरू

 *💥🌊२६ आॕक्टोबर १९३६🌊💥*

🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊

*हूव्हर धरण मधील पहीला जलविद्युत जनित्र कार्यरत झाला*

🌊💥🌊💥🌊💥🌊💥🌊💥🌊

हूवर धरण (इंग्लिश: Hoover Dam) हे अमेरिकेच्या नेव्हाडा व अ‍ॅरिझोना राज्यांच्या सीमेवरून वाहणार्‍या कॉलोराडो नदीवरील एक धरण आहे. १९३६ साली बांधून पूर्ण केलेले हूवर धरण ३७९ मी लांब व २२१.४ मी उंच आहे.

नैऋत्य अमेरिकेतील दुष्काळी व वाळवंटी भागांत पाणी तसेच जलविद्युत निर्मितीसाठी हे धरण बांधले गेले. ह्या धरणामधून २०८० मेगावॉट विजनिर्मिती व ११,००० घनमीटर प्रतिसेकंद जलप्रवाह होऊ शकतो. लास व्हेगास शहराच्या ४० किमी आग्नेयेला असलेले हूवर धरण ह्या भागातील एक लोकप्रिय पर्यटक आकर्षण आहे.

वीज निर्मिती करणाऱ्या करणाऱ्या यंत्राला जनित्र असे म्हणतात. यात अनेक प्रकार असतात. पाण्यापासून वीज निर्मिती करणाऱ्या यंत्राला जल विद्युत जनित्र. असे जनित्र वैतरणा येथील जल विद्युत प्रकल्पात आहे. असे तर कोळश्याच्या उष्णतेपासून वीज निर्मिती करणाऱ्या यंत्राला औष्णिक जनित्र असे म्हणतात. असे जनित्र एकलहरा, चंद्रपूर येथील औष्णिक वीज प्रकल्पां मध्ये आहे.

इतिहास

विद्युत जनित्राचा शोध मायकेल फॅरेडे या शास्त्रज्ञाने लावला.

🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

संकलन -)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

प्रभात दर्शन

 🌳⛳ *शुभ प्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

अश्विन मास,कृष्ण पक्ष, *पँचमी*,आद्रा नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,शरद ऋतु,युगाब्द ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

मंगलवार, २६ आॕक्टोबर २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                         *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

           *भाषा हमारे सोचने के तरीके को स्वरूप प्रदान करती है और निर्धारित करती है कि हम क्या-क्या सोच सकते हैं । भाषा एक नगर है, जिसके निर्माण के लिए प्रत्ये़क व्यक्ति एक-एक पत्थर लाता है।*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


गुरुवार, २१ ऑक्टोबर, २०२१

पोलिस स्मृतिदिन

 ➿➿➿➿➿➿➿➿➿➿

*🇮🇳👮‍♂️पोलिस स्मृती दिन👮‍♂️🇮🇳*

➿➿➿➿➿➿➿➿➿➿

   आज भारतीय शहीद पोलीस स्मृती दिन आहे. दरवर्षी २१ ऑक्टोबर हा दिवस पोलिस स्मृती दिन म्हणून पाळण्यात येणार आहे. या दिवशी शहीद पोलिस जवानांना श्रद्धांजली अर्पण केली जाते.

     २१ ऑक्टोबर १९५९ रोजी लडाख येथे चीनच्या सैनिकासोबत लढतांना केंद्रीय राखीव दलाच्या दहा जवानांनी प्राणाची आहुती दिली होती.


देशासाठी आपले कर्तव्य बजावताना आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शूर पोलिसांचे स्मरण ठेवण्यासाठी आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी २१ ऑक्टोबर रोजी पोलिस स्मृतिदिन साजरा केला जातो.


२१ ऑक्टोबर १९५९ रोजी लडाख येथे चीनच्या सैनिकासोबत लढतांना केंद्रीय राखीव दलाच्या दहा जवानांनी प्राणाची आहुती दिली होती. त्यानंतरपासून २१ ऑक्टोबर हा पोलिस हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जातो. वर्षभरात जे जवान देशात आणि राज्यात शहीद झाले अशा जवानांना या २१ ऑक्टोबर रोजी श्रद्धांजली वाहिली जाते. जिल्ह्याच्या मुख्यालयामध्ये या निमित्ताने शहीद पोलिसांना अभिवादन करण्यात येते. यासोबतच विविध उपक्रमाचे आयोजनही करण्यात येते.


२०१८ मध्ये, पोलिस स्मृतिदिनानिमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीमध्ये पहिल्याच राष्ट्रीय पोलिस स्मारकाचे उद्घाटन केले. त्यांनी पोलिस दलांना आणि त्यांच्या कुटुंबियांना अभिवादन केले आणि देशातील लोकांना पोलिस म्यूझियम भेट देण्याचे आवाहन केले. आज राष्ट्रीय पोलिस मेमोरियलने १९४७ नंतरपासून आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या सर्व केंद्रीय आणि राज्य पोलिस दलाच्या ३४,८४४ पोलिस कर्मचाऱ्यांचे स्मरण केले.


महाराष्ट्र पोलिसांकडून अभिवादन

आपले कर्तव्य पार पाडत असताना देशासाठी प्राण गमावलेल्या हुतात्म्यांना पोलीस स्मृतिदिनानिमित्त महाराष्ट्र पोलीस दलाच्या वतीने आदरांजली वाहण्यात येते.

 'हे राष्ट्र त्यांचे बलिदान कधीच विसरणार नाही.'  

शहिद पोलिस जवानांना भावपुर्ण अभिवादन.....

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६


प्रभात दर्शन

 🌳⛳ *शुभ प्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

कार्तिक मास,कृष्ण पक्ष, *प्रथम*,अश्विनी नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,शरद ऋतु,युगाब्द ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

गुरुवार, २१ आॕक्टोबर २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                        *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


          *"संतुष्ट जीवन, सफल जीवन से सदैव श्रेष्ठ होता है क्योंकि सफलता का मापदण्ड सदैव दूसरों के द्वारा आंकलित एवं दूसरों पर ही निर्भर होता है जबकि संतुष्टि स्वयं के मन और मस्तिष्क द्वारा निर्धारित होती है"*


*गौधन, गजधन, बाजधन*

               *और रतन धन खान,*

*जब आवे सन्तोष धन,*

              *सब धन धूरी समान*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


बुधवार, २० ऑक्टोबर, २०२१

शरदिनी अरूण डहाणूकर वैद्यकशास्त्र

 *शरदिनी अरुण डहाणूकर*


*वैद्यकशास्त्रज्ञ*


*जन्मदिन - १७ ऑक्टोबर १९४५*


        गोव्यात जन्मलेल्या शरदिनी पै-धुंगट यांचे शालेय शिक्षण मुंबई येथील सेंट कोलंबा विद्यालयात झाले. १९६२ साली माध्यमिक शालान्त परीक्षेत त्या जगन्नाथ शंकरशेट शिष्यवृत्तीच्या मानकरी होत्या. एल्फिन्स्टन महाविद्यालयात इंटर सायन्सपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर शरदिनी डहाणूकरांनी सेठ जी.एस. वैद्यकीय महाविद्यालय आणि के.ई.एम. रुग्णालयातून एम.डी. व पीएच.डी. (औषधविज्ञानशास्त्र) या अत्युच्च पदव्या प्राप्त केल्या. त्यानंतर त्याच संस्थेत औषधविज्ञानशास्त्र विभागात तीस वर्षे अध्यापन व संशोधन केले. १९९५ साली त्यांनी विभागप्रमुख म्हणून सूत्रे हाती घेतली. विभागामध्ये मूलगामी बदल घडवून आणून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर  या विभागाला महत्त्व प्राप्त करून दिले. २००१ साली टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय व बाई यमुनाबाई एल. नायर रुग्णालयाच्या अधिष्ठात्री म्हणून त्यांची निवड झाली. त्याच पदावर कार्यरत असताना त्यांचे अकाली निधन झाले.


आधुनिक वैद्यकशास्त्राच्या पदवीधर असलेल्या डॉ.डहाणूकरांची आयुर्वेदाशी तोंडओळख झाली, ती वैद्य वेणीमाधवशास्त्री जोशी यांच्यामुळे. पुढे स्वत:च्या कुटुंबीयांवर उपचार करताना त्यांना आधुनिक वैद्यकाच्या त्रुटी प्रकर्षाने जाणवल्या, तसेच आयुर्वेद उपचारपद्धतीचे उत्तम अनुभव आले. त्यामुळे त्या आधुनिक चिकित्सक वृत्तीने आयुर्वेदशास्त्राचा वेध घेऊ लागल्या. त्यासाठी त्यांनी वैद्य वेणीमाधवशास्त्री यांच्याकडे आयुर्वेदाचा सखोल अभ्यास केला. त्यांच्याबरोबर झालेल्या विचारमंथनातून त्यांना आयुर्वेदाच्या बलस्थानांची जाणीव होऊ लागली. ही बलस्थाने प्राय: आयुर्वेदाची मूलतत्त्वे व संकल्पना आहेत हे लक्षात येताच त्यांनी ती आधुनिक विज्ञानाची परिभाषा वापरून सर्वमान्य शास्त्रीय कसोट्यांवर त्यांची चिकित्सा करून दाखवण्याचे प्रयत्न सुरू केले. आयुर्वेदाला पुरावाधिष्ठित शास्त्र म्हणून स्वदेशी व परदेशी मान्यता मिळवून देणे हेच त्यांनी आपले जीवितकार्य मानले.


त्यांच्या संशोधनाचे वेगळेपण म्हणजे आपल्या पूर्वसुरींप्रमाणे आयुर्वेदातील औषधी वनस्पतींच्या अर्काचे पृथक्करण करत एकाच घटकावर लक्ष केंद्रित न करता, त्यांनी आयुर्वेदीय संस्कार झालेली औषधे, आयुर्वेदिक तत्त्वे वापरून प्रयोगात वापरली. अशा अनेक सम्यक औषधींचे गुणधर्म त्यांनी आयुर्वेदात मांडलेल्या गुणधर्मांशी पडताळून पाहिले. उदाहरणार्थ, दम्यासाठी पिंपळी किंवा यकृतविकारासाठी कात. हे प्रयोग करताना त्यांनी आयुर्वेदातील ‘रसायन’ संकल्पनेवर अधिक भर देऊन रसायन द्रव्यौषधी या प्रामुख्याने रोगप्रतिकारक शक्तींचे संवर्धन करून मेंदू-प्रतिकारशक्ती-अवयवकार्य त्या साखळीद्वारे वेगवेगळ्या अवयवांना व शरीरसंस्थांना बळ प्राप्त करून देतात असा सिद्धान्त प्रथमच मांडला. त्यासाठी गुळवेल, आवळा, हिरडा, पिंपळी, अश्वगंधा, शतावरी अशा सहा रसायनांना निवडून त्यांचे पेशी व विविध प्राण्यांवर होणारे परिणाम शोधले. या प्रयोगाच्या निष्कर्षांनुसार गुळवेल या औषधीची त्यांनी निवड केली. त्यापुढची पायरी म्हणजे रुग्णांवर गुळवेलीची चाचणी करणे. जठरांत्र शल्यचिकित्सक डॉ. रवी बापट यांच्या सहकार्याने त्यांनी अवरोधक काविळीचे रुग्ण, उरोऔषधतज्ज्ञ डॉ. महाशूर यांच्यासोबत क्षयरोगी व कर्करोगतज्ज्ञ डॉ. राजन बडवे यांच्या सहकार्याने कर्कविरोधी औषधे घेणारे रुग्ण यांच्यावर गुळवेलीच्या चाचण्या घेतल्या. या सर्व संशोधनाचा परिपाक म्हणजे गुळवेल ही एक उत्कृष्ट प्रतिकारशक्तिसंवर्धक (इम्युनोस्टिम्युलेटर) आहे हे सिद्ध झाले.


अत्यंत प्रतिष्ठित अशा आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये आयुर्वेद व त्यातील वनस्पतींच्या गुणधर्मांबद्दल झालेल्या संशोधनास प्रसिद्धी मिळाली. या संशोधनास अगुस्तीनी त्रापानी हा इटलीचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार, पुण्याच्या भारतीय चिकित्सा संस्थानचे सुवर्णपदक, भारतीय चिकित्सा राष्ट्रीय अकादमीची फेलोशिप व इतर अगणित पुरस्कार मिळून त्यांची यथोचित दखल घेतली गेली. मुख्य म्हणजे या संशोधनानंतर आधुनिक वैद्यकातील औषधांचे उत्पादन करणाऱ्या कंपनीने प्रथमच गुळवेल हे आयुर्वेदिक औषध जनसामान्यांसाठी उपलब्ध करून दिले.


डॉ. डहाणूकरांचे आयुर्वेदविषयक कार्य हे केवळ वनस्पतींच्या गुणधर्मांच्या शोधाबद्दल मर्यादित राहिले नाही. आयुर्वेदातील अनेक संकल्पनांचा उदा. प्रकृती, आम, भस्मनिर्मिती, पंचकर्म, स्वस्थवृत्त इत्यादींचा त्यांनी शास्त्रीय संशोधनाची जोड देऊन पाठपुरावा केला. त्यावर त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये सत्तरहून अधिक लेख लिहिले. प्रोफेसर वॅगनर या वनौषधितज्ज्ञाने प्रसिद्ध केलेल्या पुस्तकात त्यांनी ‘आयुर्वेदीय रोगप्रतिकारसंवर्धक’ असा लेख लिहून आयुर्वेदातील प्रतिकारशक्तीबद्दलच्या संकल्पना व भारतातील अनेक संशोधकांनी त्यासंबंधी केलेले संशोधन याला जगप्रसिद्धी मिळवून दिली. अनेक आधुनिक विज्ञानांच्या संशोधकांना आयुर्वेदासंबंधी संशोधन करण्यास प्रेरित केले. अनेक विद्यार्थ्यांना आपल्या भाषणांतून व लिखाणांतून आयुर्वेदाची तोंडओळख करून दिली. आयुर्वेद रिव्हिझिटेड व आयुर्वेद अनरॅव्हल्ड ही शास्त्रीय परिभाषेतील, तर जनसामान्यांवर स्वत:चे आरोग्यरक्षण स्वत: आयुर्वेदिक तत्त्वे समजावून घेऊन करावे म्हणून लिहिलेली सोप्या, सुगम भाषेतील वर्तमानपत्रीय सदरे व स्वास्थ्यवृत्त, तसेच ‘ए ड्रग इज बॉर्न’ ही पुस्तके त्याला साक्ष आहेत.


संशोधनात पुढील पिढीचे सातत्य कायम टिकावे म्हणून त्यांनी भारतातील पहिले आयुर्वेद संशोधन केंद्र, सेठ जी.एस. वैद्यकीय महाविद्यालयासारख्या संस्थेत, १९८९ साली सुरू केले व नायर रुग्णालयात अधिष्ठात्रीचा पदभार स्वीकारताना आपल्या शिष्येकडे (डॉ. निर्मला रेगे) सुपूर्द केले. तसेच नायर या महापालिकेच्या रुग्णालयात आणखी एक आयुर्वेद संशोधन केंद्र सुरू केले, ज्याचे काम त्यांची शिष्या डॉ. ऊर्मिला थत्ते बघत आहेत.


आयुर्वेदाला अशास्त्रीय ठरवल्याबद्दल लंडनमध्ये लॉर्ड वॉल्टन यांच्या सिलेक्ट कमिटीपुढे आपले संशोधन मांडून कमिटीला आपला निर्णय बदलायला लावून डॉ.डहाणूकरांनी सर्व भारतीयांवर न फेडता येणारे उपकार करून ठेवले आहेत.


त्यांच्यातील संशोधकवृत्तीचा शोध घेतला, तर त्याचा उगम त्यांच्याकडे वारसाहक्काने आलेल्या निसर्गप्रेमात, त्या प्रेमाची जोपासना करणाऱ्या त्यांच्या आई-वडिलांत व घरच्या सुजाण, संपन्न व अनुकुल वातावरणात दिसून येतो. निसर्ग, फुले, वृक्ष, पशुपक्षी, माणसे, खाद्यपदार्थ, देशविदेशांतील स्थळे यांना बघण्याची नजर, समजून घेण्याची संवेदना आणि शब्दरूप देण्याची शब्दकळा त्यांना अवगत होती. त्यांच्या लालित्यपूर्ण लिखाणाचा प्रत्यय ‘हिरवाई’, ‘फुलवा’, ‘वृक्षगान’, ‘मनस्मरणीचे मणी’, ‘पांचाळीची थाळी’, ‘सगेसोबती’, ‘नक्षत्रवृक्ष’, अशा अनेक पुस्तकांतून येतो. ही पुस्तके आजही शालेय मुलांपासून थोर समीक्षकांपर्यंत सर्वांनाच भावतात. त्यांपैकी काही पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट साहित्याचे पुरस्कारही मिळाले आहेत.


उत्कृष्ट शिक्षक, दूरदृष्टी असणारी व्यवस्थापक, आदरणीय औषधविज्ञानशास्त्रज्ञ, चिकित्सक संशोधक, सर्वमान्य साहित्यिक, आतिथ्यशील गृहिणी आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे चराचरांमध्ये विलक्षण रस असलेली विलक्षण बुद्धीची व्यक्ती म्हणून त्यांची पुढील पिढ्यांना ओळख राहील.

                      —डॉ. रवी बापट

🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

संकलन -)

गजानन गोपेवाड  

उमरखेड जिल्हा - यवतमाळ ४४५२०६

प्रभात दर्शन

 *🌄🌅भोर सुहानी🌅🌄*


*जीवन में केवल दो ही वास्तविक धन है...*


            *समय और सांसे*

 *और दोनों ही निश्चित और सीमित हैं...*


         *समझदारी से खर्च करें*

  *बाकी सब धूल है या तो आपकी भूल है !!*


    *🌹मंगलमय सु प्रभात🌹*

           


 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

Featured Post

व्यायाम व योगा अवश्य करावा*

*व्यायाम व योगा अवश्य करावा*  *व्यायाम व योगा करण्याचे दहा फायदे:-*  1) व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते: व्यायाम करणारी...