गुरुवार, ३० सप्टेंबर, २०२१

प्रभात दर्शन


 🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

भाद्रपद मास,कृष्ण पक्ष, *नवमी*,पुनर्वसु नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,शरद ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

गुरुवार, ३० सप्टेंबर २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                        *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

         *"महत्त्वपूर्ण सफलताएँ न तो भाग्य से मिलती हैं और न सस्ती पगडंडियों के सहारे काल्पनिक उड़ानें भरने से मिलती हैं। उसके लिए योजनाबद्ध अनवरत पुरुषार्थ करना पड़ता है। योग्यता बढ़ाना, साधन जुटाना और बिना थके, बिना साहस खोये अनवरत श्रम करते रहना...., यह सूत्र ही सफलताओं के उद्गम स्रोत हैं।"*

 ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

गाथा बलिदानाची

 ➿➿➿➿➿➿➿➿➿➿

🇮🇳🇮🇳 *गाथा बलिदानाची* 🇮🇳🇮🇳

➿➿➿➿➿➿➿➿➿➿


            *रामानन्द चैटर्जी*

             (स्वतंत्रता सेनानी)                                                                        

           जन्म : २९ मई, १८६५

        (बांकुड़ा ज़िला, बंगाल)

     *मृत्यु : ३० सितंबर, १९४३* 

                (कोलकाता)

नागरिकता : भारतीय

प्रसिद्धि : स्वतंत्रता सेनानी


अन्य जानकारी : रामानन्द भारतीय राष्ट्रीय कांग्रेस के प्रबल समर्थक थे। कुछ वर्षां के पश्चात् उन्होंने कांग्रेस राष्ट्रवादी पार्टी और हिन्दू सभा का सहयोग दिया। रामानन्द सम्पादकीय विचार की स्वाधीनता के प्रबल समर्थक थे।


रामानन्द चैटर्जी  पत्रकारिता जगत के एक पुरोगामी शख्सियत थे। वे कोलकाता से प्रकाशित पत्रिका 'मॉडर्न रिव्यू' के संस्थापक, संपादक एवं मालिक थे। उन्हें "भारतीय पत्रकारिता का जनक" माना जाता है। पत्रकारिता के क्षेत्र में उन्होंने विशेष रूप से कार्य किया। इसके अतिरिक्त उन्होंने अध्यापक और प्राचार्य के पद पर काम किया था।


💁🏻‍♂️ *परिचय*

रामानन्द चैटर्जी का जन्म २९ मई, १८६५ को बांकुड़ा ज़िला, बंगाल में हुआ था। उन्होंने कलकत्ता और बांकुड़ा से अपनी शिक्षा-दीक्षा ग्रहण की। उन्होंने कलकत्ता विश्वविद्यालय से सन १८९० में अंग्रेज़ी में स्नात्तकोत्तर परीक्षा प्रथम श्रेणी में उत्तीण की थी। वे आचार्य जगदीश चन्द्र बोस तथा शिवनाथ शास्त्री से अत्यन्त प्रभावित थे। उनके सामने इंग्लैंड जाकर आगे अध्ययन करने का प्रस्ताव भी आया, पर रामानंद ने उसे स्वीकार नहीं किया। तब तक उन पर ब्रह्म समाज का प्रभाव पड़ चुका था।                                         📰✍️ *सम्पादन कार्य*

रामानन्द चैटर्जी पत्रकारिता जगत के पुरोगामी शख्सियत थे। उन्होंने प्रवासी, बंगाल भाषा, 'मॉडर्न रिव्यू' अंग्रेज़ी में तथा 'विशाल भारत' जैसी पत्रिकाएँ निकालीं। रामानंद चटर्जी ने प्रसिद्ध भारतीय मासिक पत्र 'मॉडर्न रिव्यु' का दिसंबर १९०६ में प्रकाशन आरंभ किया। १९०१ ई. में उन्होंने बांग्ला भाषा के पत्र 'प्रवासी' का संपादन किया। विद्यार्थी जीवन में ही उन्होंने 'द इंडियन मैसेंजर' के संपादन का काम अपने हाथ में ले लिया था और बांग्ला पत्र 'संजीवनी' में नियमित रूप से लिखा करते थे। उनका 'देशाश्रय' नाम के सामाजिक संगठन से संपर्क हुआ तो उसकी मुखपत्र 'दासी' का सम्पादन भी उन्होंने ही किया। उन्होंने बच्चों की पत्रिका 'मुकुल' और साहित्यिक पत्रिका 'प्रदीप' के संपादन में भी सहयोग दिया। इनके माध्यम से ही रामानंद का रबींद्रनाथ टैगोर से परिचय हुआ था। शीघ्र ही यह 'प्रवासी' नामक पत्रिका बंगला भाषा-भाषियों की अत्यंत प्रिय पत्रिका बन गई। यह अपने समय का अत्यंत प्रसिद्ध पत्र बन गया। उच्च कोटि के लेखक‍ इसमें अपनी रचनाएं भेजते थे। इसकी संपादकीय टिप्पणियां ज्ञानवर्धक और प्रेरक होती थीं।


⚛️ *प्रधानाचार्य का पद*

कुछ समय बाद रामानन्द चैटर्जी की कायस्थ पाठशाला, इलाहाबाद के प्रधानाचार्य के पद पर नियुक्ति हुई और वे कोलकाता से इलाहाबाद आ गए। इसी बीच जातीय भेदभाव के कारण उन्हें कायस्थ पाठशाला से त्यागपत्र देना पड़ा।


🛳️ *विदेश यात्रा*

रामानन्द चैटर्जी कुछ वर्ष बाद हिंदू महासभा के अध्यक्ष बने। पत्रकार के रूप में उनकी ख्याति के कारण राष्ट्र संघ ने अपनी कार्यवाही स्वयं देखने के लिए उन्हें जिनेवा आमंत्रित किया था। तभी उन्होंने यूरोप के विभिन्न देशों का भी भ्रमण किया। उन्हें रूस से भी निमंत्रण मिला था, पर वहां अभिव्यक्ति पर प्रतिबंधों को देखते हुए उन्होंने उसे स्वीकार नहीं किया। वे 'प्रवासी बंग साहित्य सम्मेलन' के संस्थापकों में से थे और उसके अध्यक्ष भी रहे।               

⚜️ *कांग्रेस समर्थक*

रामानन्द भारतीय राष्ट्रीय कांग्रेस के प्रबल समर्थक थे। कुछ वर्षों के पश्चात् उन्होंने कांग्रेस राष्ट्रवादी पार्टी और हिन्दू सभा का सहयोग दिया। रामानन्द सम्पादकीय विचार की स्वाधीनता के प्रबल समर्थक थे।


🪔 *मृत्यु*

रामानन्द चैटर्जी का निधन कोलकाता में ३० सितंबर, १९४३ को हो गया।


        🇮🇳 *वंदे मातरम्...!* 🇮🇳

              🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳

*🙏🌹🙏शुभ प्रभात🙏🌹🙏*

संकलन -)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा-

यवातमाळ ४४५२०६

सोमवार, २७ सप्टेंबर, २०२१

गाथा बलिदानाची

 ➿➿➿➿➿➿➿➿➿➿

🇮🇳🇮🇳 *गाथा बलिदानाची* 🇮🇳🇮🇳

➿➿➿➿➿➿➿➿➿➿


    👳🏻‍♂️  *शहिदे आझम भगतसिंग* 


     *जन्म :  २८ सप्टेंबर १९०७*

       *(ल्यालपूर,पंजाब,भारत)*


        *फाशी : २३ मार्च १९३१*

  *(लाहोर,पंजाब,ब्रिटिश भारत)*


*टोपणनाव : भागनवाला*

चळवळ: भारतीय स्वातंत्र्यलढा

संघटना: नौजवान भारत सभा,

            कीर्ती किसान पार्टी,

            हिंदुस्तान सोशालिस्ट     

            रिपब्लिकन असोसिएशन

पत्रकारिता/ लेखन: अकाली, 

              अनुवाद, 'मेरा आयरिश     

               स्वतंत्रता संग्राम'

धर्म: नास्तिक

प्रभाव: समाजवाद, कम्युनिस्ट

प्रभावित: चंद्रशेखर आझाद

वडील: सरदार किशनसिंग संधू

आई: विद्यावती


            भगतसिंग  एक भारतीय क्रांतिकारक होते. हिंदुस्थानातील ब्रिटिश साम्राज्याविरुद्धच्या लढ्यात त्यांनी केलेल्या दोन हिंसात्मक कार्यांमुळे वयाच्या २३ व्या वर्षी त्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली. आणि गीते मधला श्लोक उचलून हसत हसत फासावर चढले.

            डिसेंबर १९२८ मध्ये, भगत सिंग आणि त्यांचे सहकारी, शिवराम राजगुरू यांनी २१ वर्षीय ब्रिटिश पोलीस अधिकारी जॉन साँडर्सला लाहोर, ब्रिटिश भारत येथे गोळ्या घालून ठार मारले. जेम्स स्कॉट ह्यांना ठार मारण्याचा हेतू असताना चुकून साँडर्स बळी पडला. पोलीस अधीक्षक जेम्स स्कॉट याने हिंदुस्थानातील लोकप्रिय राष्ट्रवादी नेते लाला लजपत राय ह्यांच्यावर लाठी चार्जचा आदेश देऊन त्यांना जबर जखमी केले. त्यामुळे ते दोन आठवड्यांनंतर मरण पावले. 

             त्यांच्या मृत्यूचा बदला म्हणून भगतसिंगांनी स्कॉटला मारण्याचा बेत केला होता. त्याच्या या कटात चंद्रशेखर आझाद व राजगुरू सहभागी होते. त्यानंतर भगतसिंग व राजगुरू यांचा शोध घेत असल्याचे पाहून चंद्रशेखर आझाद ह्यांनी चानन सिंघ नावाच्या भारतीय पोलिस अधिकाऱ्याला मारले.


♦ *भगतसिंग यांचे सुरुवातीचे जीवन-*


            भगतसिंगचा जन्म १९०७ साली तत्कालीन पंजाब प्रांतातील ल्यालपूर जिल्ह्यातील बंगा गावात झाला. त्यांच्या आईचे नाव विद्यावती व वडिलांचे किशन सिंग होते. ज्यावेळेस त्याच्या वडिलांची व दोन काकांची तुरुंगातून सुटका झाली, त्याच सुमारास भगतसिंगांचा जन्म झाला. त्याच्या कुटुंबातील बरेच सदस्य भारतीय स्वातंत्र्यआंदोलनात सामील झाले होते, तर काही महाराजा रणजितसिंगाच्या सैन्यात होते. त्यांचे काही कुटुंबीय सामाजिक कार्यांमध्ये सक्रिय होते. त्यांचे आजोबा अर्जुनसिंग हे स्वामी दयानंद सरस्वतींच्या हिंदु सुधारणावादी चळवळीत असून आर्य समाजाचे सदस्य होते. त्यांचे वडील व काका हे करतार सिंग साराभा व हर दयाल ह्यांच्या गदर पार्टीचे सदस्य होते.

            त्यांच्या वयाच्या इतर शीख मुलांसारखा तो लाहोरच्या खालसा हायस्कूल येथे गेला नाही. त्याच्या आजोबांना त्या शाळेतील लोकांची ब्रिटिश सरकारप्रती असलेली निष्ठा मंजूर नव्हती. 

            बारा वर्षे वय असताना जालियनवाला बाग हत्याकांडाच्या नंतर भगतसिंगाने ती जागा पाहिली. १४ वर्षे वय असतांना गुरुद्वारा नानकाना साहेब येथे अनेक लोकांना ठार मारण्याविरुद्धच्या आंदोलनात ते सामील झाले. गांधीजींनी असहकार चळवळ बंद केल्यानंतर त्यांचा अहींसेच्या मार्गाबद्दल भ्रमनिरास झाला. त्यानंतर सिंग युवा क्रांतिकारी चळवळीमध्ये सामील झाला, व ब्रिटीश सरकारचा हिंसक मार्गाने पाडाव करण्यासाठीच्या विचाराचा समर्थक झाला.

            ईटलीच्या जोसेफ मॅझिनीच्या 'यंग ईटाली' नावाच्या गटापासुन प्रेरीत होऊन भगतसिंगने मार्च १९२६ मध्ये 'नवजवान भारत सभा' स्थापित केली. तो हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लीकन संघाचा सदस्य झाला, ज्यामध्ये चंद्रशेखर आझाद, रामप्रसाद बिसमील, शहिद अशफाखल्ला खान सारखे दिग्गज होते. नंतर एक वर्षाने, व्यवस्था विवाह टाळण्यासाठी ते घर सोडुन कानपुरला निघुन गेले. एका पत्रात त्याने लिहीले 'माझ जिवन हे सर्वोत्क्रुष्ट कामासाठी मी समर्पीत केलय, जे की  देशाचे स्वतंत्र्य आहे. त्यामुळे, कोणताच आराम किंवा भौतीक सुख मला आमि़ष करु शकत नाही'.


♦ *भगतसिंगांचे वाचन-*

         भगतसिंगांचा व्यासंग दांडगा होता. क्रांतिसाहित्याने त्यांना जणू झपाटून टाकले होते. सचिंद्रनाथ संन्याल यांचे 'बंदी जीवन' हे त्यांना प्रभावित करणारे बहुधा पहिले पुस्तक असावे. ऑस्कर वाइल्डचे 'वीरा-दी निहिलिस्ट', क्रोपोटकिनचे 'मेमॉयर्स', मॅझिनी व गॅरिबाल्डी यांची चरित्रे, वॉल्टेर, रूसो व बकुनिनचे अनेक ग्रंथ त्यांनी वाचले होते. त्यांनी वाचलेल्या पुस्तकांची यादी फार मोठी होती. त्या यादीत विक्टर ह्युगोची 'ला मिझरेबल', हॉलकेनचे 'इटर्नल सिटी', अप्टन सिंक्लेअरची 'क्राय फॉर जस्टिस', रॉस्पिनची 'व्हॉट नेव्हर हॅपन्ड', गॉर्कीची 'मदर' ह्या कादंबर्‍याही होत्या. देशातील व परदेशातील अनेक देशभक्तांची चरित्रे व समाजक्रांतीचे अनेक ग्रंथ त्यांनी अभ्यासले होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे १८५७ चे स्वातंत्र्य समर हा सरकारने प्रकाशनाआधीच बंदी आणून जप्त केलेला ग्रंथ त्यांना शिरोधार्थ होता. युरोपातील मुद्रित आवृत्ती धडपडीने प्राप्त करून घेऊन त्यांनी त्याचे इथे प्रकाशन व वितरण केले. जर क्रांती व्ह्यायला हवी असेल तर समाजाची मानसिकता त्या दृष्टीने घडविली पाहिजे व तसे होण्यासाठी क्रांतिवाङ्मयाचा प्रसार अपरिहार्य़ आहे असे त्यांचे मत होते. त्यांनी सावरकरलिखित मॅझिनीचे चरित्र वाचले होते. त्यांनी फ्रेंच क्रांतिकारक व्हिलांत वाचला होता. साम्यवादी समाजरचना व शोषणमुक्त सक्षम समाज घडविण्यासाठी त्यांनी लेनिन, मार्क्स, टॉलस्टोय, गॉर्की, बकुनिन यांचे साहित्य अभ्यासले होते.


♦ *वक्ते, पत्रकार, अनुवादक आणि नाट्याभिनेते-*


भगतसिंग हे उत्तम वक्ते होते. १९२४-२५ च्या सुमारास बेळगाव येथे झालेल्या कॊंग्रेस अधिवेशनास ते 'अकाली' या पत्राचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. अधिवेशन संपल्यानंतर ते त्यांचे प्रेरणास्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीवर म्हणजे रायगडावर गेले. तेथे त्यांनी तेथील पवित्र माती आपल्या कपाळाला लावून स्वातंत्र्याच्या प्रतिज्ञेचा पुनरुच्चार केला. पत्रकार म्हणून त्यांनी 'वीर अर्जुन', 'प्रताप', इत्यादी दैनिकांत काम केले होते. पत्रकारिता करतानाच त्यांच्यातला लेखक जागा झाला. सोहनसिंग जोशी यांचे 'कीर्ती', कानपूरचे 'प्रभा', दिल्लीचे 'महारथी' नि अलाहाबादचे 'चॊंद' या नियतकालिकात ते लेखन करत असत. त्यांनी आयरिश क्रांतिकारक डॉन ब्रिन याच्या पुस्तकाचा अनुवाद 'मेरा आयरिश स्वतंत्रता संग्राम' बलवंतसिंग या नावाने केला. लाला लजपतराय यांच्या मृत्यूनंतर त्यांनी 'चॊंद' च्या फाशी विशेषांकात 'निर्भय', 'बलवंत', व 'ब्रिजेश' या नावे अनेक लेख लिहिले. महाविद्यालयीन जीवनात पंजाबातील हिंदी साहित्य संमेलनानिमित्त पारितोषिकासाठी विद्यार्थ्यांकडून मागवलेल्या निबंधात 'नॅशनल कॉलेज' तर्फे पाठविण्यात आलेला भगतसिंगांचा निबंध अव्वल ठरला होता. भगतसिंगांनी 'राणा प्रताप', 'दुर्दशा',' सम्राट चंद्रगुप्त' या नाटकांतून भूमिकाही केल्या होत्या; पुढे सरकारने या नाटकांवर बंदी घातली.


♦ *स्वातंत्र्यसंग्रामातील क्रांतिकार्य-*

            ९ सप्टेंबर १९२५ रोजी भगतसिंगांच्या पुढाकाराने व आग्रहाने क्रांतिकारकांच्या गुप्त संघटनेचे नाव 'हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन' असे ठेवण्यात आले. असोसिएशन हा भाग समाजप्रबोधन, माहितीपत्रके, साहित्य सामुग्रीची जमवाजमव, भूमिगतांना आश्रय देणे यासाठी तर 'आर्मी' हा भाग प्रत्यक्ष क्रांतिकार्यासाठी असे विभाजन केले गेले. हुतात्मा चंद्रशेखर आझाद हे मुख्य समन्वयक व सेनेचे 'मुख्य सेनापती' तर भगतसिंग यांच्यावर संघटनेचे समन्वयक व दोहोंचे सदस्य व नियंत्रक अशी कामगिरी सोपविली गेली. या संघटनेचे स्वप्न व एकमेव ध्येय म्हणजे सशस्त्र क्रांतीद्वारे इंग्रज सरकार उलथून टाकून भारतीय संघराज्याची स्थापना.

            भारत-पाकिस्तान सीमेवरील हुसेनवाला, जिल्हा फिरोजपूर,पंजाब नजीक उभारलेले भगतसिंग,राजगुरू आणि सुखदेव यांचे पुतळे

खून करून, दरोडे घालून वा चार इंग्रजांना ठार करून काही स्वातंत्र्य मिळणार नाही असा त्यांचा उपहास वा धिक्कार केला गेला तरी प्रत्यक्ष त्यांचे कार्य हे साक्षात राजसत्ता उलथून टाकण्यासाठी केलेले एक योजनाबद्ध स्वातंत्र्यसमर होते. याचा प्रत्यक्ष पुरावा म्हणजे अभियोगात सरकारने ठेवलेले  आरोपपत्र हॊय.


♦ *आरोपपत्र -*

            "वर निर्दिष्ट केलेल्या आरोपींनी ब्रिटिश हिंदुस्थानात लाहोर आणि इतर ठिकाणी निरनिराळ्या वेळी अन्य कित्येक सहकार्‍यांसह १९२४ सालापासून ते अटक होईपर्यंत राजाविरुद्ध सशस्त्र युद्ध करण्याचा, त्याचे हिंदुस्थानावरील सार्वभौमत्व हिरावून घेण्याचा आणि अवैध बळाचा वापर करून किंवा धाक दाखवून हिंदुस्थानात विधिवत स्थापित झालेले सरकार उलथून टाकण्याचा कट केला आणि त्या उद्दिष्टासाठी माणसे, शस्त्रे आणि दारुगोळा जमा केला व अन्य मार्गाने सिद्धता केली.

            हे उद्दिष्ट गुप्त ठेवले तर युद्ध करणे सोपे जाईल म्हणून ही उद्दिष्टे त्यांनी गुप्त ठेवली. त्यांनी व इतर आरोपींनी 'हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन' व 'हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मी' या संस्थांची स्थापना केली. हिंदुस्थानातील ब्रिटिश सरकार उलथून टाकून त्या ठिकाणी एका संयुक्त प्रजासत्ताक सरकाराची स्थापना करण्याच्या उद्देशाने ब्रिटिश हिंदुस्थानात लाहोर आणि इतर ठिकाणी बैठकी घेतल्या. आरोपींनी आपली उद्दिष्टे पुढील मार्गांनी साध्य करण्याचा प्रयत्‍न केला :-


१) बँका फोडण्यासाठी व आगगाड्या लुटण्यासाठी शस्त्रे, माणसे नि पैसा तसेच दारुगोळा जमवणे.


२) हत्या करण्यासाठी व सरकार उलथून पाडण्यासाठी शस्त्रे व बाँब व स्फोटके यांची निर्मिती करणे.


३) ब्रिटिश हिंदुस्थानात सरकारचे साहाय्यक वा पक्षपाती असणार्‍या पोलिस वा इतर अधिकार्‍यांचे आणि लोकांचे, कटाच्या उद्दिष्टांत खंड पाडणाऱ्र्‍या तसेच आपल्या संघटनेला अनिष्ट वाटणार्‍या लोकांचे वध करणे.


४) आगगाड्या उडविणे.


५) क्रांतिकारक आणि राजद्रोही वाङ्मयाची निर्मिती, प्रसार व संग्रह करणे.


६) तुरुंगांतून दंडितांची व इतरांची सुटका करणे.


७) कटात सहभागी होण्यासाठी सुशिक्षित तरुणांना चिथावणी देणे आणि,


८) हिंदुस्थानात क्रांती घडवून आणण्यात स्वारस्य असणार्‍या परदेशातील व्यक्तीकडून वर्गणीच्या रूपात पैसा गोळा करणे.


सदर आरोपपत्र वाचताच प्रत्येक भारतीयाची मान अभिमानाने उंचावेल, की स्वातंत्र्ययुद्धाचा असा महान उद्गाता आमच्या या देशात होऊन गेला.


♦ *भगतसिंगांचे विचार -*


            बालपण आजोबांच्या आर्यसमाजी संस्कारात घालवलेले व शालेय जीवनात रोज नित्य नेमाने सकाळ व सायंकाळ प्रार्थना करणारे व गायत्री मंत्रांचा जप करणारे भगतसिंग पुढे क्रांतिपर्वात पूर्णपणे निरीश्वरवादी झाले. यामुळे त्यांना 'आत्मप्रौढी व घमेंड यांची बाधा झाली आहे असेही उठवले गेले. मात्र ऑक्टोबर १९३० मध्ये त्यांनी लिहिलेले "मी निरीश्वरवादी का?" हे प्रकटन वाचल्यावर त्यांच्या महान व्यक्तिमत्त्वाची ओळख पटते.


समाज हा प्रगत असावा; प्रत्येक घटना, समज वा परंपरा या विचाराच्या ऐरणीवर घासून त्या पटल्या तरच स्वीकाराव्या, उगाच अंधश्रद्धेपोटी वा कुणाच्या व्यक्तिपूजेखातर कसोटीवर न उतरवता कोणतीही गोष्ट स्वीकारू नये, समाज हा समभावी व शोषणमुक्त असावा, समाजरचनेत व देशाच्या रचनेत धर्म, जात हे आड येऊ नयेत, उगाच कुणाचे स्तोम माजवून जनतेने आपल्या बुद्धीचा कस न लावता दबावामुळे पटत नसले तरी कुणीतरी मोठे सांगत आहे म्हणून जे वास्तविक नाही वा ज्याला तात्त्विक पाया नाही असे काही स्वीकारू नये.

            समाजाची सर्वांगीण प्रगती व्हावी, पाप-पुण्य, स्वर्ग-नरक, जन्म-पुनर्जन्म, ८४ लक्ष फेरे व त्यातून मुक्ती, मृत्यूनंतरचे जीवन, वगरे तर्कशुद्ध नसलेल्या गोष्टींवर अंधविश्वास न ठेवणारा कणखर समाज निर्माण व्हावा यासाठीच त्यांचा हा प्रयत्‍न होता. कामगार हा राज्याचा मुख्य घटक असावा, त्याचे भांडवलदारांकडून शोषण होऊ नये व राज्यकारभारात त्याला स्थान असावे असे भगतसिंगांचे आग्रही प्रतिपादन होते. अत्यंत प्रतिकूल व कष्टसाध्य असे जीवन समोर असताना ज्याचा मृत्यूनंतर स्वर्गप्राप्तीवर वा या जन्मात सत्कार्य केले असता मोक्ष मिळतो वा या जन्मात केलेल्या कृत्याचे फळ म्हणून पुढील जन्म अत्यंत सुखाचा जातो या गोष्टींवर विश्वास आहे त्याला समोर असलेला मृत्यू पुढील प्राप्तीच्या ओढीने सुसह्य वाटू शकतो. मात्र ज्याचा या गोष्टींवर जराही विश्वास नाही परंतु जो मातृभूमीला परदास्यातून मुक्त करणे व समाजाला शोषणातून मुक्त करून मानाचे जीवन प्राप्त करून देणे हेच आपल्या आयुष्याचे प्रथम व अखेरचे ध्येय समजतो. त्याचे जीवन हे अधिक खडतर परंतु अर्थपूर्ण असते असा त्यांचा सिंद्धान्त होता. जगात जर सर्वांत भयानक पाप असेल तर ते गरिबी व सर्वांत मोठा शाप कोणता असेल तर तो दास्य हाच आहे. आणि या दास्याला ईश्वरी कोप मानून त्या दास्यातून मुक्त होण्यासाठी बलिदानाला सज्ज होण्याऐवजी ईश्वराची करुणा भाकणे हे मूर्खपणा व पळपुटेपणाचे लक्षण आहे; तसेच मुक्तीसाठी ठोस प्रयत्‍न न करता केवळ प्राक्तनाला दोष देणे हे भ्याडपणाचे लक्षण आहे असे त्यांनी प्रतिपादिले. सुमारे दहा पाने भरेल इतके मोठे हे प्रकटन अत्यंत प्रभावी व भारून टाकणारे आहे.

           हुतात्मा भगतसिंग यांच्या चरित्राचा अभ्यास केला असता आपल्याला समजते की त्यांनी केलेले बलिदान हे भावनेच्या आहारी जाऊन वा कसल्यातरी प्राप्तीसाठी केले नसून ते अत्यंत सुनियोजित, अत्यंत ध्येयबद्ध व प्रेरणादायक होते. आपण राहणार नाही, पण आपण लावलेल्या क्रांतिवृक्षाच्या सर्व फांद्या भले शत्रूने छाटून टाकल्या तरी पाळेमुळे घट्ट रुजून राहतील व हीच मुळे एक दिवस बंदिवासाच्या भिंती उन्मळून टाकतील हा त्यांचा दृढ विश्वास होता. त्यांना आदरांजली वाहताना कुसुमाग्रजांच्या खालील ओळी सार्थ वाटतात: 

*'जरी न गातील भाट डफावर तुझे यशोगान,* 

*सफल जाहले तुझेच हे रे, तुझेच बलिदान'*


भगत सिंग यांचे विचार खूप मोलाचे होते. ते म्हणत *"जिंदगी तो अपने दम पार जी जाती ही, दुसरो के कंधो पर तो सिर्फ जनाजे उठाये जाते है!"*


♦ *शहीद भगतसिंग आणि गांधीजी -*


            भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना जी फाशी झाली ती कायदेमंडळात बाँब फ़ेकला म्हणून नाही, तर सेंडर्सच्या हत्येच्या आरोपाखाली त्यांना फाशी देण्यात आली. ही हत्या १७ डिसेंबर, १९२८ रोजी झाली होती. त्यावर खटला चालवण्यात आला आणि त्याच्या अखेरीस २३ मार्च, १९३१ रोजी फासावर लटकविण्यात आले. .


महात्मा गांधींनी या संदर्भात लक्ष घालावे अशी त्यांना विनंती करण्यात आली. भगतसिंग व त्यांच्या सहकाऱ्यांची फाशीच्या शिक्षेतून सुटका व्हावी म्हणून १९ मार्च रोजी गांधींनी दिल्ली येथे व्हॉइसरॉय लॉर्ड आयर्विन यांची भेट घेतली. पण गांधींच्या रदबदलीचा काही उपयोग झाला नाही. परंतु या रदबदलीची बातमी पंजाबच्या तत्कालीन गव्हर्नरला मिळाली. ही रदबदली कदाचित यशस्वी होईल असे त्यांना वाटले. त्यामुळे २४ मार्च हा फाशीचा दिवस ठरला असूनही, आदल्या दिवशी रात्रीच लाहोरच्या तुरुंगात त्यांना फाशी देण्याचा कार्यक्रम उरकून घेण्यात आला. मुख्य म्हणजे २३ मार्च रोजीच गांधी यांनी आयर्विन यांना पत्र लिहून भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांची फाशीची शिक्षा रद्द करण्याविषयीचे कळकळीचे आवाहन केले. पण त्याचा काही परिणाम झाला नाही.


कालांतराने बीबीसीवर दिलेल्या मुलाखतीत आयर्विन यांनी आपल्या ताठरपणाचे समर्थन केले - "कायद्याची अंमलबजावणी करणे हे माझे कर्तव्य होते. मी भगतसिंगांसंबंधीचे कागदपत्र पाहिले व न्यायाची अंमलबजावणी करण्यात ढवळाढवळ न करण्याचे ठरवले."


भगतसिंगांचा मार्ग जरी गांधीजींना पसंत नव्हता तरी त्यांच्याबद्दल गांधीजींना प्रचंड आदर होता. त्यांच्या फाशीनंतर ’यंग इंडिया’मध्ये लेख लिहून गांधीजींनी त्यांच्या हौतात्म्याला आदरांजली वाहली.


♦ *भगतसिंगांचे नास्तिकत्व-*


            ब्रिटिशांच्या मनात धडकी भरवणारे शहीद भगतसिंग हे नास्तिक नसल्याचा खुलासा उच्च न्यायालयाच्या संग्रहालयात आयोजित एका प्रदर्शनात करण्यात आला आहे. कम्युनिझमवर निष्ठा असणारे भगतसिंह आस्तिक असल्याचे म्हटल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.

            भगतसिंग हे नास्तिक असल्याचा दावा अनेकांनी केला आहे. लाहोरच्या तुरुंगात असताना भगतसिंग यांनी या गीतेचे अध्ययन केले होते. नास्तिक माणसाला जगातील कुठल्याही धार्मिक पु्स्तकाचा अभयास करण्याचे स्वातंत्र्य आहे. शिवाय भगवद्गीता हे धार्मिक पुस्तक नाही.

          संग्रहालयाचे क्युरेटर नरुल हुड्डा यांनी हा दावा केला असून, २७ सप्टेंबर २००८ ते ३१ मार्च २००९ पर्यंत भरवण्यात आलेल्या या प्रदर्शनात भगतसिंग यांच्या जीवनावर आधारित अनेक ग्रंथ ठेवण्यात आले आहेत. यातच ८ एप्रिल १९२९मध्ये त्यांनी सेंट्रल असेंब्लीत फेकलेल्या बॉम्बच्या अवशेषांसह एक गीताही ठेवण्यात आली आहे.

       या गीतेवर भगतसिंग सेंट्रल तुरुंगात लाहोर असे लिहिण्यात आले आहे. परंतु भगतसिंग यांच्यावर अनेक पुस्तके लिहिलेल्या प्रोफेसर चमनलाल यांनी मात्र ते नास्तिक असल्याचा दावा केला आहे. आणि या दाव्यांत तथ्य आहे हे भगतसिंगांच्या "मी नास्तिक का झालो" या निबंधावरून स्पष्ट होते.

            शहीद भगतसिंगांचा "मी नास्तिक का झालो" हा निबंध प्रसिद्ध आहे. त्यामुळे भगतसिंग नास्तिकच होते यांत शंका नाही.

            या निबंधामुळे भगतसिंग  नास्तिक आहे कि नाही हा वाद बंद झाला. 


♦ *'मी नास्तिक कां झालो' - शहीद भगतसिंग (वय २३ वर्षे)*


"त्या दिवसापासून काही पोलीस अधिकारी मी नियमितपणे दोन वेळा देवाची प्रार्थना करावी म्हणून माझे मन वळवू लागले. मी तर नास्तिक होतो. फक्त शांततेच्या व आनंदाच्या काळातच मी नास्तिक असल्याची बढाई मारू शकतो, की अशा कठीण प्रसंगीदेखील मी माझ्या तत्त्वांना चिकटून राहू शकतो, याची माझ्यापुरती तरी मला कसोटी घ्यावयाची होती. बर्‍याच विचारान्ती मी निर्णय घेतला की देवावर विश्वास ठेवणे व त्याची प्रार्थना करणे हे माझ्याकडून होणार नाही. नाही, ते कधीही शक्य नाही. ती खरी कसोटीची वेळ होती आणि त्यातून मी यशस्वीपणे उत्तीर्ण होऊन बाहेर पडलो. इतर काही गोष्टींच्या बदल्यात स्वतःची मान वाचवण्याची इच्छा मी कोणच्याच क्षणी केली नाही. म्हणजे मी कट्टर नास्तिक होतो आणि आजपर्यंत नास्तिकच राहिलो आहे. त्या कसोटीला उतरणे ही साधी गोष्ट नव्हती.

          'श्रद्धा' संकटांची व कष्टांची तीव्रता कमी करते, किंबहूना या गोष्टी ती सुखावहसुद्धा करू शकते. देवावरच्या विश्वासात माणसाला सांत्वन व बळकट राहावे लागते. वादळ आणि तुफानांमध्ये फक्त स्वतःच्या पायावरच उभे राहणे हा काही पोरखेळ नाही. अशा कसोटीच्या क्षणी गर्व, जर असलाच तर पार वितळून जातो. माणूस इतर सर्वसाधारण माणसांच्या श्रद्घांना बेदरकारपणे धुत्कारू शकत नाही, आणि त्याने जर असे केलेच तर आपण असाच निष्कर्ष काढला पाहिजे की त्याच्याकडे केवळ पोकळ ऐट नव्हे तर याहून दुसरी अशी काही शक्ती असली पाहिजे. सध्या माझी स्थिती ही नेमकी अशीच आहे. न्यायालयाचा निकाल हा आधीपासूनच ठरलेला आहे. आठवड्याभरात जाहीर व्हायचा आहे. मी माझ्या ध्येयासाठी प्राणाचा त्याग करत आहे याखेरीज दुसरे कोणते सांत्वन माझ्याकरता असू शकते? 


एखादा देवावर विश्वास ठेवणारा हिंदू आपण पुढच्या जन्मी राजा म्हणून जन्मावे अशी अपेक्षा करत असेल, एखादा मुसलमान किंवा ख्रिस्ती आपल्या हाल-अपेष्टांचे व त्यागाचे बक्षीस म्हणून स्वर्गात भोगायला मिळणार्‍या ऐश्वर्याची स्वप्ने पाहत असेल, पण मी कशाची अपेक्षा करावी? मला चांगली कल्पना आहे, की ज्या क्षणी माझ्या मानेभोवती फास आवळला जाईल आणि पायाखालची फळी खेचली जाईल तो शेवटचा क्षण असेल. तोच अंतिम क्षण असेल. मी, किंवा अगदी काटेकोर आध्यात्मिक भाषेप्रमाणे बोलायचे झाले तर माझा आत्मा याचा तेथेच अंत होईल. बस्स इतकेच.

           जर असे मानायचे धैर्य मला असेल तर कोणतेही भव्यदिव्य यश न मिळालेले, एक संघर्षाचे, थोड्याच दिवसांचे जीवन हेच खुद्द माझे बक्षीस आहे. याहून जास्त काही नाही. स्वार्थी हेतू न बाळगता, तसेच इहलोकी किंवा परलोकी फळाची अपेक्षा न ठेवता, अगदी निरिच्छपणे मी माझे आयुष्य स्वातंत्राच्या ध्येयासाठी वाहिले, कारण त्याहून वेगळे काही करणे मला जमलेच नसते.


♦ *संग्रहालय -*


अमृतसर ते चंदीगड महामार्गावर असलेले खटकरकलाँ येथे भगतसिंग यांचे वडिलोपार्जित घर आहे. तिथे हुतात्मा भगतसिंग स्मृति संग्रहालय आहे. संग्रहालय सोमवारी बंद असते. येथे अनेक दुर्मिळ फोटो आहेत. हुतात्मा भगतसिंग यांची स्वाक्षरी असलेली, त्यांना लाहोर तुरुंगात भेट दिली गेलेली भगवद्‌गीतेची प्रत येथे आहे.


♦ *दफनभूमीवरील स्मारक -*


           भारत - पाकिस्तान फाळणी नंतर भगतसिंगांची दफनभूमी असलेला हुसेनीवाला हा भाग पाकिस्तानात गेला होता.भारत सरकारने बदली जमीन देऊन तो मिळविला. तेथे १९६८ मध्ये सरकारतर्फे भव्य स्मारक उभारण्यात आले. त्या वेळी भगतसिंगांच्या वृद्ध माता विद्यावती तेथे उपस्थित होत्या.


♦ *पुस्तके-*


भगतसिंगांवर अनेक पुस्तके लिहिली गेली आहेत. त्यांतली काही निवडक पुस्तके :-


आम्ही कशासाठी लढत आहोत? (मूळ लेखक -भगतसिंग; अनुवाद : चित्रा बेडेकर)

भगतसिंग : निवडक भाषणे व लेखन, भगतसिंगांवरचे पोवाडे (नॅशनल बुक ट्रस्ट)

मार्टियर ॲज ब्राइड-ग्रूम (इंग्रजी, ईश्वरदयाल गौर)

विदाउट फिअर, द ट्रायल ऑफ भगतसिंग (इंग्रजी, कुलदीप नय्यर) (मराठी अनुवाद - शहीद भगतसिंग यांचा अखेरपर्यंतचा प्रवास - भगवान दातार)

शहीद भगत सिंह : समग्र वाङ्मय (संपादक - दत्ता देसाई)

सरदार भगतसिंग (संजय नहार)

मी नास्तिक आहे का ? (मूळ लेखक -भगतसिंग; अनुवाद : चित्रा बेडेकर)

         🇮🇳 *वंदे मातरम्* 🇮🇳

            🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳

🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

संकलन -)

गजानन गोपेवाड  

उमरखेड जिल्हा - यवतमाळ ४४५२०६

प्रभात दर्शन

 🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

भाद्रपद मास,कृष्ण पक्ष, *सप्तमी*,मृगशिरा नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,शरद ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

मंगलवार, २८ सप्टेंबर २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                        *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


यदि सन्तं सेवति यद्यसन्तं 

          तपस्विनं यदि वा स्तेनमेव।

वासो यथा रङ्गवशं प्रयाति 

          तथा स तेषां वशमभ्युपैति॥


*भावार्थः- वस्त्र को जिस रंग में रँगा जाए, उस पर वही रंग चढ़ जाता है। इसी प्रकार सज्जन के साथ रहने पर सज्जनता, पापी के साथ पाप तथा तपस्वी के साथ तपश्चर्या का रंग चढ़ ही जाता है।*


 ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

पाठदुखी वर काय उपचार घ्यावे


══════════════════════

   *📒📒📒 @ संकलन @📒📒📒*

  *श्री. गजानन गोपेवाड 

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════             

📕 *पाठदुखीवर काय उपचार घ्यावे?* 📕


पाठदुखीला अस्थिव्यंगोपचार तज्ज्ञाची रोजीरोटी असे गंमतीने म्हटले जाते! याचा अर्थ एवढाच की पाठदुखीवर उपचार घेत राहावे लागतात. शाहरूख खान, सचिन तेंडूलकर यांच्या पाठदुखीमुळे सर्वांना पाठदुखीविषयी जास्त माहिती झाली. पाठीच्या कण्याच्या दुखापतीमुळे वा आजारांमुळे पाठ दुखते. पाठीचे स्नायू दुखावले तरीही पाठ दुखते. विचित्र अवस्थांमध्ये अवघडलेल्या स्थितीत काम करणे, मणक्यांच्या हालचालींचा अभाव, मणक्यांच्या पृष्ठभागावर खडबडीतपणा येणे, दोन मणक्यांमधील कुर्चा सरकून मज्जारज्जूवर दाब येणे, तसेच मणक्यांमध्ये अतिरिक्त हाडाची वाढ होणे या सर्वांमुळे पाठ दुखू शकते. काही वेळा नसा दाबल्या गेल्याने मुंग्या येणे, बधीरपणा येणे अशी लक्षणेही दिसून येतात.


पाठदुखी झाल्यास वेदनाशामके घेणे हा वरवर सोपा पण तात्पुरता परिणाम करणारा उपाय होय. पाठदुखी टाळण्यासाठी उभे राहताना, बसताना, काम करताना शरीराची अवस्था सुयोग्य राहील हे पाहायला हवे. सामान्यत: दिवसभरात अनेकवेळा आपण समोर झुकतो किंवा वाकतो. त्यामुळे पाठ दुखायला लागते. अशावेळी पाठीच्या कण्याला विरुद्ध दिशेने ताण देणारी भुजंगासन, नौकासन अशी आसने नक्कीच फायदेशीर ठरतात. पाठीच्या कण्यासाठीचे अनेक व्यायाम आहेत. पाठ दुखत असताना हे व्यायाम करू नयेत. पाठीचे व्यायाम हा पाठदुखी टाळण्याचा प्रभावी व कायमस्वरूपी इलाज आहे. मणक्यात रचनात्मक बिघाड झाला असेल तर क्वचित पाठदुखी बरी करण्यासाठी शस्त्रक्रियाही करावी लागते.


*डाॅ.अंजली दिक्षित व डाॅ.जगन्नाथ दिक्षित*

*यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' पुस्तकातून*

═══════════════════════

 

रविवार, २६ सप्टेंबर, २०२१

राजाराम मोहनराँय

 *************************************

*२७ सप्टेंबर - राजाराम मोहन रॉय स्मृतिदिन*

************************************ 


 जन्म - २२ मे १७७२ (बंगाल) 

*मृत्यू - २७ सप्टेंबर १८३३* 


राजा राममोहन रॉय भारतीय समाजसुधार होते. त्यांचा जन्म बंगालमधील हुगळी गावातील ब्राह्मण कुटुंबात २२ मे १७७२ रोजी झाला. 


त्या काळात प्रशासनासाठी वापरली जाणारी भाषा पर्शियन व अमेरिका होती. त्यामुळे पर्शियन व अरेबिक शिकण्यासाठी त्यांना पाटणा येथे पाठविण्यात आले. त्यानंतर ते बौद्ध धर्माचा अभ्यास करण्यासाठी तिबेट व बनारसला गेले. पर्शियन व अरेबिक भाषेत त्यांनी वेदांत ग्रंथ हे पहिले पुस्तक लिहले. १८१५ मध्ये कोलकत्ता येथे परतल्यावर त्याचे बंगाली भाषेत रुपांतर केले. त्यांना "राजा" हि पदवी मुगल सम्राट अकबर (द्वितीय) याने बहाल केली. मुगल सम्राटचे राजदूत म्हणून ते इंग्लंडला गेले होते. भारतातून इंग्लंडला जाणारे ते पहिले भारतीय होते. 


राजा राममोहन रॉय यांना भारतात नव विचाराचे जनक म्हंटले जातात. त्यांनी सर्वप्रथम "ब्रह्मपत्रिका" नावाचे वृत्तपत्र सुरु केले. ते पहिले उच्चशिक्षित व्यक्ती होते. ते भारतातून इंग्लडला गेले. त्यांनी मूर्तीपूजेला, देवदेवतांच्या पूजेला विरोध केला. जीवसृष्टीचा निर्माता एकच आहे व तो निर्गुण, निराकार आहे, असे ते मानत होते. हिंदू धर्मातील कालबाह्य झालेल्या रूढी व परंपराना त्याचा विरोध होता. भारतातील समाजाला नवी दिशा देणे ही त्यांची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी १८३० साली ब्राम्हो समाजाची स्थापना केली. ख्रिश्चन धर्माचा आभ्यास केला. प्रथा, परंपराविरुद्ध लढा दिला. 


भारतातील धर्मव्यवस्था, अर्थव्यवस्था व शिक्षण व्यवस्था यासंदर्भात लेखन करण्यास सुरुवात केली. त्यासाठी काही वृतपत्रे तसेच सुधारणा चळवळ सुरु केली. त्यांना भारतीय सुधारणेचे जनक म्हटले जाते. त्यांनी ४ डिसेंबर १८२१ रोजी "संवाद कैमुदी" हे बंगाली भाषेतील तर १२ एप्रिल १८२२ रोजी "मिरात उल अखबार" हे पर्शियन व्रतपत्र सुरु केले. त्यांनी १८२८ साली प्रेसिदेन्शी कॉलेज सुरु केले. 


राजा राममोहन रॉय यांना नवनिर्मितीचा काळ आणि आधुनिक भारताचे वडील मानले जाते. भारतीय सामाजिक आणि धार्मिक धर्मातच त्यांचे विशिष्ट क्षेत्र आहे. सतीची चाल कायदेशीरपणे बंद करणारे व अनेक भाषांतून प्रावीण्य मिळविलेले थोर समाजसुधारक राजा राममोहन रॉय होय. राजा राम मोहन रॉय यांना परंपरांनी जखडलेला भारत आणि सर्व परंपरा झुगारून देणारा भारत यांच्या मधील पूल असं म्हटलं जातं. त्यांचे जीवन कार्य इतके प्रचंड आणि असाधारण आहे की त्याचा केवळ एकाच लेखात धावता आढावा घेणे देखील शक्य नाही. 

🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

*संकलन -)*गजानन गोपेवाड 


उमरखेड जिल्हा - यवतमाळ ४४५२०६

*************************************

प्रभात दर्शन

 🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

भाद्रपद मास,कृष्ण पक्ष, *षष्ठी*,रोहिणी नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,शरद ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

सोमवार, २७ सप्टेंबर २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                       *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

         *"जिस प्रकार पेट पर रोटी बाँध लेने से भूख नहीं मिट जाती, ठीक उसी प्रकार "लाख बार सोचना व्यर्थ है यदि एक बार भी कार्य न किया जाये। किसी भी निर्धारित लक्ष्य की प्राप्ति हेतु सतत प्रयास अनिवार्य है, मात्र लक्ष्य निर्धारित करने से कुछ नही होता।"*



~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

जगातील सर्वात श्रीमंत माणूस बील गेट्स

 *जगातला सर्वात श्रीमंत माणुस...!!!*


*जगातल्या सर्वात श्रीमंत बिल् गेट्सना कोणीतरी विचारलं," ह्या जगात तुमच्यापेक्षा कोण श्रीमंत आहे का...?*

*बिल् गेट्स म्हणाले, " हो एक व्यक्ती माझ्यापेक्षा श्रीमंत आहे.*

*समोरच्या व्यक्तीनं विचारलं," कोण...!!!*


*बिल् गेट्स म्हणाले,*

*" एकेकाळी मी प्रसिद्ध किंवा श्रीमंत नसताना, मी एकदा न्यूयॉर्क एअरपोर्टवर असताना सकाळी मला एक न्युजपेपर घ्यावासा वाटला म्हणून खिशात हात घातला तर खिशात एकही डाॅलर नसल्याचं जाणवलं सबब मी तो खरेदी करण्याचा विचार सोडुन दिला...!*

*व माझ्याकडं पैसे नसल्याचं सांगितलं.*

*समोरच्या त्या पेपर विकणा-या  मुलानं माझ्याकडं बघुन तो न्युजपेपर फुकट देण्याचं ठरवलं...!!!*


*तीन महिन्यानंतर योगायोगानं मी त्याच एअरपोर्टवर उतरलो असता मला पुन्हा न्युजपेपर घेण्याचा मोह झाला परंतु त्याही वेळी माझ्याकडे पैसे नसल्याने मी मोह आवरला.*

*पण यावेळीही त्याच मुलानं परत मला न्युजपेपर ऑफर केला...!*

*पण मी नम्रपणे नकार दिला, व सांगितलं मी नाही घेऊ शकत...!!!*


*यावर त्या मुलानं सांगितलं की तुम्ही हा न्यूज पेपर  घ्या कारण हा मी तुम्हाला माझ्या फायद्याच्या पैश्यातुन देत आहे, त्यानंतर मी तो घेतला...!!!*


*१९ वर्षानंतर मी जेव्हा जगातला श्रीमंत माणुस झाल्यानंतर मला त्या पेपर विकणा-या मुलाची आठवण झाली...*

*मी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली, तब्बल दीड महिन्याच्या तपासांती मला तो सापडला..!*


*मी त्याला विचारले," तु मला ओळखतोस का ?*

*तो म्हणाला," हो तुम्ही बिल् गेट्स आहात...!*

*मी म्हटलं, तुला आठवतंय का कि कधीकाळी तु मला न्यूजपेपर फ्री दिले होतेस...!*

*तो म्हणाला, "* *हो...दोनदा...!"*

*मी म्हणालो, " मला त्याची किंमत अदा करायची आहे. तुला तुझ्या आयुष्यात जी गोष्ट हवी असेल ती मला सांग...!*

*मी तुला हवी ती गोष्ट देऊ शकतो...!!!*


*यावर तो नम्रपणे म्हणाला, " सर पण तुम्हाला असं वाटत नाही का कि तुम्ही ती किंमत देऊ शकणार नाही...!"*

*मी विचारले," का...???*


*तो मुलगा म्हणाला, " मी जेव्हा तुम्हाला मदत केली तेव्हा मी गरीब होतो आणि आणि तुम्हाला माझ्या होणा-या फायद्यातुन करत होतो तर तुम्ही मला मदत अशावेळी करत आहात जेव्हा तुम्ही जगातले सर्वात श्रीमंत व्यक्ती आहात...! म्हणुन तुम्ही तुमच्या मदतीची तुलना माझ्या मदतीबरोबर करु शकत नाही...!!!*


*बिल गेट्सच्या नजरेत तो मुलगा जगातला सर्वात श्रीमंत माणसाहुन श्रीमंत आहे कारण कोणाची मदत करण्यासाठी त्यानं स्वतः श्रीमंत होण्याची वाट नव्हती बघितली...!!!*


*श्रीमंती पैश्यांची नसते तर मनाची असते कारण कोणाची मदत करण्यासाठी श्रीमंत मन असणं देखील आवश्यक आहे...!!!*

लेखन, गजानन गोपेवाड 

21 सप्टेंबर अंधश्रद्धा निर्मूलन दिन

 *अंधश्रद्धा निर्मूलन दिन*


*२१ सप्टेंबर हा दिवस जागतिक अंधश्रद्धा निर्मूलन दिवस म्हणून पाळला जातो.* महाराष्ट्र सरकारच्या माहिती व जनसंपर्क विभागाच्या वेबसाईटवर वर्षभरातील विविध तारखांचे दिनविशेष कोणते आहेत, याची माहिती दिली आहे. त्यामध्ये २१ सप्टेंबरला जागतिक अंधश्रद्धा निर्मूलन दिवस; याबरोबरच जागतिक ‘अल्झायमर डे’ अशीही नोंद आढळते. व्यक्तीची स्मरणशक्ती हळूहळू कमी होत जाणे, या रोगाला अल्झायमर म्हणतात. जागतिक अंधश्रद्धा निर्मूलनाच्या तारखेलाच हाही दिवस साजरा करण्यात यावा, याची मला थोडी गंमत आणि बरीचशी अन्वयार्थकता वाटली. कारण शेवटी अंधश्रद्धा म्हणजे तरी स्वत:ची विचारशक्ती कमी होत जाणेच असते.


२१ सप्टेंबर १९९५ ला अचानकपणे आपल्या देशात आणि त्यानंतर बघता-बघता भारतीय जगात ज्या-ज्या ठिकाणी आहेत, त्या-त्या सर्व ठिकाणी श्रीगणेशाने दूध प्राशनास सुरुवात केली. त्या जमान्यात मोबाईल फारसे नव्हतेच. तरीही ही बातमी ज्या वेगाने सर्व भारतभर आणि जगभर पसरली, ती बाब अचंबित करणारी आहे. असंख्य देवळांच्यासमोर भाविकांच्या रांगा लागल्या. गणेशाची मूर्ती जेथे उपलब्ध झाली नाही, तेथे लोकांनी अन्य देवदेवतांवर हा दुग्धप्राशनाचा प्रयोग केला आणि तोदेखील यशस्वी झाला, असा बोलबाला सगळीकडे पसरला. ही सर्व घटना भारताची प्रतिमा उंचवणारी तर नव्हतीच; उलट प्रश्नचिन्हांकित करणारी होती.


एखादी अंधश्रद्धा किती वेगाने जनमानसाचा ताबा घेऊ शकते, त्याचे हे भयचकित करणारे दर्शन होते. गणेश दूध पितो, हा चमत्कार निदान कुतूहल वाढवणारा होता आणि त्यातून काही भीतिदायक घडण्यासारखे नव्हते. पण अगदी अलिकडे यवतमाळ जिल्ह्यातील देवीच्या डोळ्यांतून पाणी येत आहे, ती रडत आहे, अशी अंधश्रद्धेची अफवा बघता-बघता पूर्ण विदर्भभर पसरली आणि त्यामुळे आपल्याला त्रास होऊ नये म्हणून रात्रभर गावेच्या गावे आणि नंतर शहरेच्या शहरे जागी राहिली. दुसऱ्या दिवशी देवीच्या डोळ्यांतून रक्त येत आहे, असा पुढचा टप्पा अफवेने गाठला. एक बरे झाले की, त्याचा प्रसार मर्यादित राहिला. गणपती दुग्धप्राशन आणि त्याचा प्रसार यामुळे अस्वस्थ झालेल्या महाराष्ट्रातील व भारतातील अनेक शास्त्रज्ञांनी व समाजधुरिणांनी त्यावेळचे पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांना पत्र लिहून या घटनेबाबत सखोल चौकशी करण्याची व अंधश्रद्धेचे असे सामूहिक प्रदर्शन पुन्हा देशात घडू नये, यासाठी काही उपाययोजना करण्याची विनंती केली. यातूनच अंधश्रद्धा निर्मूलन दिवसाचा जन्म झाला.


भारतीय घटनेत वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणे, हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य सांगितले आहे. १९८६ मध्ये आलेल्या नव्या शैक्षणिक धोरणात वैज्ञानिक मनोभावाची निर्मिती हा शिक्षणातील महत्त्वाचा गाभाघटक आहे. युतीचे सरकार महाराष्ट्रात असताना त्यांनी शालेय शिक्षणात मूल्यशिक्षणाचा समावेश केला. त्यात वैज्ञानिक दृष्टिकोन आहे आणि आजचे युग हे विज्ञानयुग आहे, असे आपण हरघडी अनुभवत असतो. आता वैज्ञानिक दृष्टिकोन याचा अर्थ कार्यकारणभाव तपासणे. थोडक्यात कार्यकारणभाव प्रभाव म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन आणि कार्यकारणभाव अभाव म्हणजे अंधश्रद्धांची निर्मिती. वैज्ञानिक दृष्टिकोन हा तंत्रज्ञानाच्या प्रगतीसाठी अत्यावश्यक आहे. म्हणून २८ फेब्रुवारी हा विज्ञानदिन म्हणून साजरा होतो. परंतु त्या वैज्ञानिक दृष्टिकोनाचे दुसरे महत्त्वाचे तेवढेच अंग आहे, ते म्हणजे अंधश्रद्धांचे निर्मूलन. त्यासाठी २१ सप्टेंबर हा अंधश्रद्धा निर्मूलन दिवस म्हणून पाळला जातो.


अंधश्रद्धांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यामध्ये केवळ कार्यकारणभावाचा अभाव नसतो, तर मानसिक गुलामीमुळे पावित्र्य अथवा मान्यता लाभलेल्या शोषणाचा प्रभाव असतो. शोषण वाईटच; परंतु त्यामुळे मानसिक गुलामी निर्माण होणे अधिक वाईट आणि त्याला पावित्र्य अथवा शास्त्र याचा दर्जा देणे तर मानवी प्रगतीला सर्वस्वी हानिकारक आहे. १५० कोटी किलोमीटरवर असलेला व बहुतांशी गॅसने बनलेला शनि पत्रिकेत वक्री आहे म्हणून लग्न मोडणे काय किंवा त्या ग्रहाची शांती करणे काय, दोन्ही तेवढेच हास्यास्पद आणि चुकीचे आहे. स्वत:चे घर सुरक्षित, सोयीचे, सुखकारक असावे, असे बांधावे असे प्रत्येकालाच वाटते. मात्र ते लाभावे म्हणून त्याच्या दारापासून ते पाण्याच्या टाकीपर्यंत दिशा ठरविणे वा तोडफोड करून ती बदलणे, हे अंधश्रद्धेला शरण गेलेल्या मानसिकतेचे दर्शन आहे. त्यामुळे माणूस पराधिन होतो, परतंत्र होतो, परलोकवादी होतो. अंधश्रद्धा निर्मूलनाचा दिवस साजरा करणे, याचा अर्थ त्या अंधश्रद्धांना झुगारून देऊन माणसाने स्वतंत्र, स्वाधीन व इहलोकवादी होणे. हीच मानसिकता समाजाला व राष्ट्राला पुढे नेऊ शकेल.

लेखन गजानन गोपेवाड 

शिक्षक

 *☄शिक्षक !*

      *हे वाचताना डोळे भरून येतील*

              *🔥कर्तव्य🔥*

       बाजारातल्या कोपऱ्यात बसून गजू आपलं नेहमीचं चपला-बुट शिवण्याचं काम करत होता.कुणाची तरी चाहूल लागली म्हणून त्याने आपली मान वर केली.

"अरे ही चप्पल शिवायची आहे"

     समोरची व्यक्ती त्याला ओळखीची वाटली.

"तुम्ही गायकवाड सर ना?"

त्याने विचारलं.

"हो.तू?"

      "मी गजानन.गजानन लोखंडे.झेड.पी.च्या शाळेत दहावी ब च्या वर्गात होतो बघा.तुम्ही आम्हांला इंग्रजी आणि इतिहास शिकवायचे."

      "बरोबर.पण तुझा चेहरा ओळखू येत नाहीये" गायकवाड सर त्याला निरखत म्हणाले.

      "असू द्या सर.मी कुणी हुशार विद्यार्थी नव्हतो की तुमच्या लक्षात राहीन"

"पण तू हा व्यवसाय का.....?"

       "सर हा आमचा पिढीजात व्यवसाय!आजोबा,वडील दोघंही हेच करायचे.दहावी सुटलो.तेव्हापासून वडिलांची तब्येत ठीक नाहीये.त्यामुळे शिक्षण सोडून गेली तीन वर्षे हेच करतोय."

"काय झालं वडिलांना?

       "सतत दारु पिऊन त्यांचं लिव्हर खराब झालंय.त्यामुळे ते नेहमी आजारीच असतात"

"ओह!आणि तुझे भाऊ?"

"दोन भाऊ आणि एक बहीण तिघंही लहान आहेत.शिकताहेत.आई अशिक्षित."

      "अच्छा" गायकवाड सर विचारात गढून गेले.गजूनं त्यांची चप्पल शिवून दिल्यावर तो नाही नाही म्हणत असतांनाही त्याच्या हातात दहा रुपये कोंबून निघून गेले.

      काही दिवसांनी ते परत आले.गजूला म्हणाले "अरे माझ्या मापाचा एक बुट तयार करुन देशील?"

       गजू तयार झाला.त्याने माप घेऊन दोन दिवसात तयार बुट करुन दिला.सरांना तो आवडला.त्यांनी गजू नाही म्हणत असतानाही पाचशे रुपये दिले.गजूला खुप आनंद झाला.इतके पैसे त्याला आजपर्यंत मिळाले नव्हते.


       आता त्याच्याकडे नियमितपणे चपला बुट बनवण्यासाठी ग्राहक येऊ लागले.सगळे गायकवाड सरांनी पाठवलंय असं सांगायचे.

        काही दिवसांनी सर आले.गजू त्यांना ग्राहक पाठविल्याबद्दल धन्यवाद देऊ लागला.त्यांनी त्याला थांबवलं. म्हणाले "गजू तुझ्या हातात कला आहे.तू असं का करत नाहीस इथंच एक टपरी टाकून त्यात वेगवेगळ्या साईजचे डझनभर चपलाबुट ठेवले तर गिर्हाईकांना थांबावं लागणार नाही"

       " सर कल्पना चांगली आहे पण त्याला दहा पंधरा हजार लागतील.तेवढे पैसे नाहीयेत माझ्याजवळ"

"हरकत नाही.मी देतो तुला.पण मला तू ते सहा महिन्यात परत करायचे.चालेल?"

        गजू तयार झाला.आठवड्यातच तो बसायचा तिथं टपरी उभी राहीली.महिन्याभरातच गजूचे पंधरा हजार वसूल होऊन दहा हजार नफाही हातात पडला. गायकवाड सर आल्यावर त्याने त्यांना पंधरा हजार दिले.त्यांनी ते त्याला परत केले.

      "मी तुला सहा महिन्यांची मुदत दिली होती.सहा महिन्यानंतरच मला परत कर.तोपर्यंत तुझा धंदा वाढवण्यासाठी त्याचा उपयोग कर."


         गजूचा आता उत्साह वाढला.त्याने जास्त माल ठेवायला सुरवात केली.उत्तम दर्जा आणि कमी किमतीमुळे त्याच्या टपरीवर खुप गर्दी व्हायला लागली.आता त्याला वेळ पुरेनासा झाला.

       सहा महिन्यांनी सर आले.गजूच्या चेहऱ्यावर आनंद आणि आत्मविश्वास फुलून आला होता.

      "सर खुप चांगलं चाललंय.पण आता पुढं काय करायचं"

      "गजू आता चांगल्या मार्केटमध्ये दुकान भाड्याने घ्यायचं.तिथे हे सगळं शिफ्ट करायचं.मी पाहून ठेवलंय दुकान.अगदी मोक्याच्या ठिकाणी आहे.आणि हो!स्माँल स्केल इंडस्ट्रीसाठी जे कर्ज मिळतं ते तुला मिळवून देतो.एम.आय.डी.सी.मध्ये फँक्टरी टाकून दे"

      "काय?फँक्टरी?"गजू थरारला"सर मला जमेल का?"

        "सगळं जमेल.मी आहे ना"सर त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले.

      गजूने खाली वाकून त्यांचे पाय धरले.

"सर खुप करताय माझ्यासाठी"

       "अरे ते माझं कर्तव्यच आहे"त्याला उठवत ते म्हणाले"माझे बाकीचे विद्यार्थी परदेशात नोकऱ्या करताहेत.कोणी इथे मोठे अधिकारी आहेत.तूच एकटा मागे रहावा हे मला कसं पटावं?"गजूच्या डोळ्यात पाणी आलं.


       दोन वर्षात गजू खुप पुढे गेला.फँक्टरी वाढली.एकाची तीन दुकानं झाली.गजूचा गजानन शेठ झाला.झोपडपट्टीतून तो थ्री बी.एच.के.फ्लँटमध्ये रहायला गेला.भाऊबहीणी चांगल्या शाळाकाँलेजमध्ये जाऊ लागले.दरम्यान त्याचे वडील वारले.वडील गेल्यावर एका वर्षाने त्याचं लग्न झालं.मुलगी पसंत करायला तो गायकवाड सरांनाच घेऊन गेला होता.काही दिवसांनी त्याची आई वारली.

      इकडे गायकवाड सरांना निव्रुत्त होऊन पाच वर्षे झाली होती.सर आता थंकले होते.त्यांच्या मुलाने इंग्लंड मध्येच स्थायिक होण्याचा निर्णय घेतला होता.मुलगी अगोदरच आँस्ट्रेलियात स्थायिक होती.त्यामुळे सर दुःखी होते.त्यात त्यांच्या पत्नीची तब्येतही आजकाल ठीक नसायची.


        एक दिवस सरांची पत्नी गेल्याचा संदेश गजूला मिळाला.सर्व कामं सोडून तो त्यांच्या घरी धावला.सरांची मुलगा,मुलगी वेळेवर पोहचू शकले नाहीत.ते येण्या अगोदरच अंत्यविधी पार पाडावा लागला.पण गजूने सरांना कोणतीच कमतरता तर जाणवू दिली नाहीच शिवाय तेराव्या दिवसापर्यंतचा सगळा खर्चही त्यानेच केला.

      सगळं आटोपल्यावर सरांच्या मुलाने त्यांना इंग्लंडला चलायचा खुप आग्रह केला पण सरांनी मायदेश सोडायला साफ नकार दिला.सगळे निघून गेल्यावर सरांचं एकाकीपण सुरु झालं ते गजूला बघवत नव्हतं पण त्याचाही नाईलाज होता.


       एक दिवस बायकोला घेऊन तो सरांच्या घरी पोहचला.त्याला पाहून सरांना आश्चर्य वाटलं.

" सर तुमचे माझ्यावर खुप उपकार आहेत.आज मला अजून एक मदत कराल.?"

" अरे आता तुला मदतीची काय गरज?तू आता खुप मोठा झालाय.बरं ठिक आहे सांग तुला काय मदत हवी आहे?"

"सर माझे वडील व्हाल?"

सर स्तब्ध झाले.मग म्हणाले"अरे वेड्या मी तर तुला कधीचंच आपला मुलगा मानलंय"

     "तर मग मला मुलाचं कर्तव्य करु द्या.मी तुम्हाला माझ्या घरी न्यायला आलोय.तुमचं उरलेलं आयुष्य तिथंच काढावं अशी माझी तुम्हाला विनंती आहे"गजू हात जोडत म्हणाला.

"अरे पण तुझ्या बायकोला विचारलं का?"

"सर तिला विचारुनच मी हा निर्णय घेतलाय.तिलाही वडील नाहीयेत.तुमच्यासारखे सासरे वडील म्हणून मिळाले तर तिलाही हवेच आहेत.शिवाय पुढे मुलं झाल्यावर त्यांनाही आजोबा हवेतच की!"

"बघ बुवा.म्हातारपण फार वाईट असतं.मी आजारी पडलो तर तुलाच सर्व करावं लागेल.

"मुलगा म्हंटलं की ते सगळं करणं आलंच.सर तो सारासार विचार करुनच मी आलोय"

       सर विचारात पडले.मग म्हणाले "ठीक आहे येतो मी पण माझी एक अट आहे.मला तू सर म्हणायचं नाही"

       "मी माझ्या वडीलांना अण्णा म्हणायचो तुम्हालाही तेच म्हणेन"

सर मोकळेपणाने हसले.

"अजून एक अट.तुझ्यासारखे अनेक गजू आहेत ज्यांना मदतीची गरज आहे.त्यांना गजानन शेठ व्हायला मला मदत करायची"

😥गजूला गहिवरुन आलं .त्यानं सरांना मिठी मारली.दोघंही बराच वेळपर्यंत रडत होते.


 *🔥सत्य घटनेवर आधारीत...🔥*

                संकलीत.गजानन गोपेवाड 

 शिक्षक हा असाच असायला हवा 

कथा स्त्रीप्रधान

 एका राजाने,

एक सर्व्हे करायचा विचार केला .

आपल्या राज्यातील घर गृहस्थी नक्की कोण चालवतं 

बायको की 

स्वतः नवरा,,,,,??

🤷🏻‍♂🤷🏻‍♂


त्यासाठी त्याने ईनाम जाहीर केलं, ज्याचं घर नवऱ्याच्या इशाऱ्यावर चालतं त्याला एक उत्तम उमदा घोडा🐴 बक्षीस देण्यात येईल,


आणि 


ज्यांचं घर बायकोच्या इशाऱ्यावर चालतं त्याला एक सफरचंद मिळेल,,🍎


त्यानंतर राजवाड्यात रांग वाढत गेली होती.


प्रत्येक जण येत होता आणि गुपचूप दिलेलं बक्षीस सफरचंद घेऊन जात होता. 


मात्र इकडे राजाला चिंता लागून राहिली होती काय ही आपल्या राज्याची दशा इतका मोठा महापराक्रमी मी माझ्या राज्यातील लोक हे असे 😏❓😡 बायकोच्या इशाऱ्यावर घर चालवतात? 🤔🤔🤔


इतक्यात एक पिळदार शरीराचा उंच, धिप्पाड, लांब लांब मिशा असणारा एक पहिलवान दरबारात आला आणि म्हणाला महाराज मला द्या घोडा, माझ्या घरात माझाच हुकूम चालतो. 


हे ऐकून राजा खूप खुश झाला, 

जा तुला हवा तो, आवडेल तो, घोडा खुशाल घेऊन जा. 


राजा मनोमन खुश झाला साला एक तरी गब्रू जवान मिळाला आपल्या राज्यात ज्याच्या इशाऱ्यावर त्याचं घर चालतं. 

😀😀 


इकडे तो पिळदार पैलवान काळा घोडा घेऊन गेला आणि,,,

थोड्याच वेळात घोडा घेऊन परत आला🤔


राजा:- काय पैलवान काय झालं परत का आलात❓

पैलवान :- माझी बायको म्हणाली काळा रंग अशुभ असतो आणि सफेद हा शांतीच प्रतीक असतो तुम्ही सफेद घोडा आणा. 😭😭😭 


हे ऐकून राजाला खूप राग आला तो म्हणाला ते समोर सफरचंद ठेवलंय ते गुपचूप उचल आणि चल पळ. 😡😡


अशा पद्धतीत दिवस संपला, 

दरबार रिकामा झाला. 

पण राजा विचार करत तिथेच बसला होता. 


तितक्यात घरी गेलेला प्रधानजी परत आला आणि राजाला म्हणाला राजे साहेब एक सुचवू का?? 


तुम्ही जे बक्षीस ठेवलं आहे त्या ऐवजी थोडं वेगळं म्हणजे एक मण गहू किंवा किंवा सोन्याची मुद्रा असं काही बक्षीस ठेवलं असतंत तर पहिलवान परत आला नसता आणि तुम्ही पण खुश राहिला असतात. 😒


राजा : प्रधानजी अहो मी देखील असंच काहीसं बक्षीस ठेवणार होतो. परंतु राणी सरकारांनी सांगितलं घोडाच बक्षीस म्हणून ठेवा. मग काय ठेवलं तेच बक्षीस!! 😔😔


प्रधानजी:- 🧐🧐

*महाराज एक सफरचंद तुमच्यासाठी कापू* ❓🤪🤪


राजा सुध्दा त्याच्या हसण्यात सामील झाला आणि म्हणाला पण प्रधानजी हे तर उद्या दरबारात देखील विचारु शकला असतात. तुम्ही इतक्या उशिरा परत का आलात विचारायला❓


प्रधानजी:- काय सांगू राजे साहेब बायकोचा हुकूम. 😏😔😡 ती म्हणाली आताच्या आता जा आणि या नक्की विचारून म्हणून..... 


राजा:- त्याच बोलणं थांबवत राजा म्हणाला, *प्रधानजी तुम्ही तुमचं सफरचंद स्वतः घेऊन जाताय की टोपली घरी पाठवू😂❓*


*Moral Of The Story...*


*समाज कितीही समाज पुरुष प्रधान असेल पण होतं तेच जे बायकोच्या मर्जीचं असेल*


*संसार स्त्री प्रधान आहे, पुरुष प्रधान वगैरे अफवा आणि अंधविश्वास आहे. या अशा अफवांवर विश्वास ठेवू नका..!!*😂😂😂 मी पण माझं सफरचंद घेऊन आलो...........


*तर मग मित्रांनो तुमचं सफरचंद इथेच खाणार की घरी घेवुन जाणार❓

😁😂लेखन गजानन गोपेवाड 

काय? कसे व कधी खायचे

 कुठलेही मेसेजेस फॉरवर्ड करण्यापेक्षा हा मेसेजेस केला तर जनजागृती आणि एखाद्याला फायदा नक्कीच होईल.


मित्रांनो 

कॅन्सर होतो तरी कशामुळे

आणि त्यावर उपाय काय?


माधव आचार्यने पाठवलेला महत्त्वाचा लेख.-२


१) रात्री उशिरा जेवणं करण्याच्या सवयीमुळे 

पोटाचा कॅन्सर होऊ शकतो.


२) आठवड्यात चार पेक्षा जास्त अंडी खाऊ नयेत.


३) चिकन खाताना कोंबडी चा पार्श्वभाग खाणे टाळावे.


४) जेवणानंतर फळं खाणं टाळावं.. 

जेवायच्या आधी खाल्लेली चालेल.


५) मासिकपाळी च्या वेळी चहा पिणे टाळावे.


६) थोडेसे सोयामिल्क साखर अंडं न टाकता घ्यावें.


७) अनुशापोटी टमाटे खाऊ नयेत.


८) रोज सकाळी उठून एक ग्लास पाणी प्यावे. 

ब्लॅडर स्टोन होत नाहीत.


९) झोपण्यापूर्वी ३ तास आधी जेवावे


१०) दारुमुळे डायबिटीस हायपर टेन्शन मध्ये वाढ होते 

म्हणून थोडीच दारु प्यावी. अथवा बंद ची करावी.


११) अतिशय गरम पोस्ट खाऊ नयेत.


१२) झोपताना जवळ मोबाईल ठेवू नये.


१३) ब्लॅडर कॅन्सर टाळण्यासाठी दिवसातून 

किमान १० ग्लास पाणी प्यावे.


१४) दिवसा जास्त तर रात्री कमी पाणी प्यावे.


१५) इन्सोमॅनिया आणि गॅस प्रॉब्लेम टाळण्यासाठी 

दिवसातून २ पेक्षा जास्त कॉफी पिऊ नये


१६) तेलकट कमी खावे.कारण असे जेवण पचण्यासाठी 

५ ते ७ तास लागतात. आणि त्यामुळे थकवा येऊ शकतो.


१७) सायंकाळी ५ नंतर कमी खावे.


१८) केळी, द्राक्षे, स्पिनीच,भोपळा,पिच 

अशाप्रकारची सहा फळे खावीत.


१९) कमी झोप ही आपल्या मेंदूस अपायकारक असते 

म्हणून किमानपक्षी दिवसात आठ तास तरी झोप घ्यावी.

सुंदर स्वास्थ्यासाठी दुपारी १ तास वामकुक्षी करावी.


२०) टमाटे वाफवून शिजवून खावेत.कच्चे टमाटे खाऊ नयेत.


२१) गरम लिंबूपाणी


गरम लिंबूपाण्यामुळे दिर्घायुष्य लाभते.

कॅन्सरच्यापेशी नष्ट होतात.

रोज गरम लिंबूपाणी प्यावे.

थंड लिंबूपाण्यात फक्त व्हिटॅमिन सी असते. 

कॅन्सर नष्ट करण्याची क्षमता नसते.

हे संशोधनातून स्पष्ट झाले आहे.


गरम लिंबूपाणी हे कॅन्सर वरचा रामबाण उपाय ठरले आहे.

कारण ते फक्त कॅन्सरच्यापेशीच नष्ट करते.बाकी पेशींना अपाय पोहचवत नाही. आणि 


लिंबातील सायट्रिक ऍसिड, पॉलिफिनॉल 

उच्च रक्तदाब कमी करते.

मुख्य रक्तवाहिन्यातील रक्तप्रवाह सुरळीतपणे चालतो. 

आणि रक्ताच्या गुठळ्या कमी करतो.


डॉ.गुरुप्रसाद रेड्डी बी.व्ही.,

ओश स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी ऑफ मॉस्को, रशिया                              [] ‪+91 94057 29311‬:             सीताफळाचे पान मीठाच्या पाण्याने धुऊन चघळा शुगर जाते

[] ‪+91 94057 29311‬: तुप कोमट करुन नाकात थेंब टाका घोरन बंद

[] ‪+91 94057 29311‬: अपचन मुखदुर्गंधी जाते १ आंब्याचे पान खा ३ महीने

[] ‪+91 94057 29311‬: थाॅयराईड नारळाची मुळी मीठाचा पाणयाने धुऊन रात्रभर पाण्यात ठेवाते दुसर्यादीवशी उकळुन प्या

[] ‪+91 94057 29311‬: तीळ रोज खा १ महीना हाड मजबुत

[] ‪+91 94057 29311‬: पेरुच पान खा विस्मरन होत नाही दात दुखत नाही स्मरणशक्ती वाढते

[] ‪+91 94057 29311‬: लींबु सेंदवमिठ टाकुन खा मुळव्याध जाते

[] ‪+91 94057 29311‬: गाजराचा रस सलग १५ दीवस घ्या कोणताहीकॅंसर होत नाही

[] ‪+91 94057 29311‬: *कर्करोग.......(कॅन्सर)*



प्रिय मित्रानो

_*हा संदेश भारतातील 125 कोटी  जनतेपर्यंत पोहोचवा आणि उर्वरित ईतरांपर्यंतही पोहचवा.*_


*'कर्क्यूमिनॉइड्स'* एक प्रमाणित औषध आहे


 

सर्वांना जागरुक करा.

याने कदाचित एखाद्या गरजुस मदत होईल

आपण सर्व  शक्य जितके करू शकता तितके फॉरवर्ड करा,

त्यासाठी आपणास नक्की कोणताही खर्च येणार नाही.                       

 👉एक दुर्मिळ व अत्यंत गरजेची मिळालेली माहिती जनसामांन्यापर्यंत पोहचविण्यासाठी धन्यवाद ..!                  👏👏👏👏🙏गजानन गोपेवाड 

शनिवार, २५ सप्टेंबर, २०२१

आजचा अभ्यास

 8️⃣  *आजचा अभ्यास* 

*26 सप्टेंबर*

*इयत्ता आठवी* 

https://bit.ly/3sOt00R

🟣 *Learning With Smartness*🟣

ईश्वर चंद्र विद्या सागर

 *************************************

*२६ सप्टेंबर - ईश्वरचंद्र विद्यासागर जन्मदिन*

*************************************


*जन्म - २६ सप्टेंबर १८२०*

      स्मृती - २९ जुलै १८९१


प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ आणि समाजसुधारक ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा आज जन्मदिन.


त्यांनी स्त्री शिक्षणाला चालना दिली आणि विधवा विवाहाच्या विरोधात आवाज उठवला. 


१८३९ मध्ये त्यांनी कायद्याचा अभ्यास केला. १८४१ मध्ये वयाच्या २१ व्या वर्षी ते फोर्ट विलियम कॉलेज मध्ये संस्कृत विभाग प्रमुख म्हणून रुजू झाले. 


स्थानिक भाषा आणि मुलींच्या शिक्षणासाठी ईश्वरचंद्र यांनी शाळांची एक साखळी उघडली आणि कोलकात्यात मेट्रोपॉलिटन कॉलेजची स्थापना केली.


*त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे विधवा पुर्नविवाहाचा कायदा १८५६ मध्ये संमत झाला.*


*🙏🙏विनम्र अभिवादन..🙏🙏*

🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

संकलन -)

गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा - यवतमाळ ४४५२०६

*************************************

सुखी व्हायचंय?मग चांगला विचार करा

 सुखी व्हायचंय ? मग चांगला विचार करा 

थॉमस अल्वा एडिसन यांचा बहुतेक वेळ प्रयोग शाळेत व्यतीत व्हायचा ,त्यांच्याप्रयोग शाळेत संशोधनाच्या वस्तू असत .एके दिवशी त्यांच्या प्रयोग शाळेला आग लागली .त्यांची कित्येक वर्षाची संशोधनाची  मेहनत जळून राख झाली .हे दृश्य ते डोळ्यानी पाहत होते ,परंतु आश्चर्य म्हणजे इतक्या कठीणप्रसंगी देखील एडिसन  निराश झाले नाहीत .आपल्या मुलाला जवळ बोलावून ते म्हणाले  "जा "तुझ्या आईला येथे बोलावून आण ,कितीही पैसे खर्च केले तरी पुन्हा तिला असे दृश्य पाहता येणार नाही ,त्यांची पत्नी घटनास्थळी पोहोचली तेंव्हा एडिसन तिला म्हणाले ,बघ परमेश्वराने आपल्या सर्व चुका  जाळून टाकल्या ,आता मला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करण्याची संधी मिळाली आहे .तेंव्हा मी तिचा पुरेपुर फायदा घेईन .एडिसनने एवढ्या मोठ्या दुर्घटनेनंतर निराश न होता आशावादी दृष्टीकोनठेवून  अनेक महत्वाचे शोध लावले  आहेत .

गजानन गोपेवाड 

प्रभात दर्शन

 🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

भाद्रपद मास,कृष्ण पक्ष, *पँचमी*,कृतिका नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,शरद ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

रविवार, २६ सप्टेंबर २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                        *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

         *"भव्य निवास, बहुमूल्य वस्त्र, बड़े वाहन, रत्न आभूषण, समृद्ध परिवार, भोग विलासयुक्त जीवन जीने में कोई दोष नही है। लेकिन सदैव स्मरण भी रहे कि जीवन में आवश्यकताएं सहज पूरी हो सकती हैं, किन्तु इच्छाएं और तृष्णाएं कभी पूर्ण नही होती। इन्हें जितना पूर्ण करो, ये और अधिक बढ़ती हैं और पूर्ण न होने पर हताशा और कुंठा बढ़ती है।"*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


शुक्रवार, २४ सप्टेंबर, २०२१

अंतराळ संशोधन सतीश धवन

 *************************************

*२५ सप्टेंबर - अंतराळ संशोधक सतीश धवन जन्मदिन*

*************************************


*जन्म - २५ सप्टेंबर १९२०* 

                  (श्रीनगर)

  मृत्यू - ३ जानेवारी २००२


    सतिश धवन यांचे भारताच्या अंतराळ संशोधन कार्यक्रमच्या वाटचालीत महत्वाचे योगदान होते. ते भारताच्या अंतराळ संशोधन कार्यक्रमाचे जनक विक्रम साराभाई  यांच्या नंतर ISRO (Indian Space Research Organisation) चे १९७२ साली अध्यक्ष झाले. 


धवन यांना भारतातील प्रायोगिक fluid dynamics च्या संशोधनाचे जनक मानले जाते. त्यांचा जन्म श्रीनगरमधे झाला आणि शिक्षण भारत तसेच अमेरिकेत झाले.


त्यांनी ग्रामीण शिक्षण, Remote Sensing तसेच Satellite Communication च्या क्षेत्रात मुलभूत संशोधन केले. त्यांच्या प्रयत्नांनी भारत INSAT - दूरसंचार उपग्रह, IRS - दूरसंवेद उपग्रह आणि PSLV - Polar Satellite Lanch Vehicle यासारखे प्रकल्प यशस्वी करू शकला.


त्यांच्या स्मरणार्थ श्रीहरीकोटा येथील उपग्रह प्रक्षेपण स्थळाचे सतीश धवन अंतराळ केंद्र असे नामकरण करण्यात आले.


त्यांच्या कार्यास विनम्र अभिवादन....!

🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

संकलन -)

गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

*************************************

प्रभात दर्शन

 🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

भाद्रपद मास,कृष्ण पक्ष, *चतुर्थी*,भरणी नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,शरद ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

शनिवार, २५ सप्टेंबर २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                        *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

         *"भव्य, विशाल एवं विलासिता से पूर्ण भवन बनाने में थोडा ही समय लगता है, किन्तु संस्कारित घर (परिवार), सच्चे मित्र और विश्वास बनाने बहुत अधिक समय लगता है।  महत्वपूर्ण बात यह है कि आपका भवन आपके जीवन में सहायक नही अपितु संस्कारित परिवार, मित्र आपके पग-पग पर सहायक स्तम्भ है और यही आपकी वास्तविक सम्पदा है।"*

 ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


गुरुवार, २३ सप्टेंबर, २०२१

बोट मोडतांना आवाज का ऐकू येतो


══════════════════════

   *📒📒📒 @ संकलन @📒📒📒*

  *श्री. गजानन गोपेवाड 

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════             

📙 *बोटं मोडताना आवाज का येतो ?* 📙


एखाद्यावर राग काढायचा असला, की त्याच्या नावानं बोटं मोडली जातात. त्या प्रत्येक वेळी आवाज का येत नाही हे नाही सांगता यायचं; पण बोटांमध्ये तणाव निर्माण झाला असला तरी तो मोकळा करण्यासाठी आपण बोटात ताणतो त्यावेळी मात्र हमखास कडकड असा आवाज येतो. कोणाच्या बाबतीत मोठ्यानं येतो, कोणाच्या बाबतीत ऐकू येईल न येईल असा येतो; पण येतो खरा. 


वास्तविक असा आवाज केवळ बोटांच्या बाबतीतच येतो असं नाही. कोणत्याही हाडांच्या सांध्याच्या बाबतीतही तो येत असतो. सांध्याच्या ठिकाणी दोन हाडं एकमेकांशी जोडलेली असतात; पण या सांध्यांची हालचाल होते तेव्हा ही हाडं निरनिराळ्या कोनांमधून फिरतात. ते सहजसाध्य व्हावं म्हणून जिथं ही हाडं जोडलेली असतात तिथे एक स्नायूंचा जाडसर थर असतो, अस्तरासारखा. तो नसला तर ती हाडं एकमेकांवर घासून त्यांची झीज होईल. शिवाय त्यांची मोडतोडही होण्याची शक्यता असते. तरीही ते थर एकमेकांवर घासतात ते घर्षणापायी उष्णता निर्माण होतेच. आपले तळवे आपण एकमेकांवर घासले तर ते गरम होतात. त्याचं कारणही हेच.


या उष्णतेचा त्या थरांवर अनिष्ट परिणाम होतोच. त्यांची हालचालही मोकळी होत नाही. तशी ती व्हावी म्हणून तिथं एक प्रकारचं वंगण असतं. एक तेलासारखा पातळ स्निग्ध पदार्थ असतो. त्या वंगणात ऑक्सिजन, कार्बन डायॉक्साइड, नायट्रोजन यांसारखे वायू विरघळलेल्या स्थितीत असतात.


बराच वेळ वापर झाला की ते सांधे थकल्यासारखे होतात. त्यांची मोकळी हालचाल होत नाही. कारण त्या हालचालीला मदत करणारे स्नायू जखडल्यासारखे होतात. त्या स्थितीत ते जरा ताणले तर सैलावतात. त्यांची परत मोकळी हालचाल होऊ शकते. पण तसे ते ताणले की त्या वंगणाच्या पिशव्याही फुगल्यासारख्या होतात. त्यांच्यामध्ये विरघळलेल्या स्थितीत असलेले वायू मोकळे होऊन त्यांचे बुडबुडे तयार होतात. ते फुटतात आणि त्यांचाच तो आवाज होतो. किती वेगानं हे बुडबुडे तयार होऊन फुटतात तसंच किती बुडबुडे तयार होतात, त्यावर किती मोठा आवाज होणार हे अवलंबून असतं. 


कोणत्याही सांध्याच्या वंगणाच्या बाबतीत हीच परिस्थिती असते; पण बोटांच्या सांध्यामध्ये बुडबुडे लवकर तयार होतात आणि पटकन फुटतातही. त्यामुळे त्यांचा आवाजही सहजगत्या होतो. शिवाय बोटांना तीन पेरं असतात. त्या तिन्ही पेरांची स्वतंत्र हालचाल होऊ शकते. म्हणजेच प्रत्येक बोटाला एकूण तीन सांधे असतात. ते जवळजवळही असतात. आपण जेव्हा बोटं ताणतो तेव्हा ते सगळेच सांधे ताणले जातात. सर्व ठिकाणच्या वंगणातल्या वायुंचे बुडबुडे तयार होऊन ते फुटतात. त्यामुळे बोटं ताणल्यानं नेहमीच कडकड असा आवाज होतो.


*डाॅ.अंजली दिक्षित व डाॅ.जगन्नाथ दिक्षित*

*यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' पुस्तकातून*

═══════════════════════

भारतीय महिला क्रांतिकारक भिकाजी रूत्सम

 *************************************

*२४ सप्टेंबर - भारतीय क्रांतिकारक महिला भिकाजी रुस्तुम कामा जन्मदिन*

*************************************


 *जन्म - २४ सप्टेंबर १८६१*

    स्मृती - १३ ऑगस्ट १९३६


मादाम भिकाजी रुस्तम कामा या भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील प्रमुख महिला नेत्या होत्या. त्या फ्रेंच नागरिक होत्या.


मादाम कामा यांचा जन्म २४ सप्टेंबर १८६१ रोजी मुंबईतल्या एका पारशी कुटुंबात झाला. त्यांचे माहेरचे नाव भिकाई सोराब पटेल असे होते. भिकाईजींचे वडील प्रसिद्ध व्यापारी होते. मादाम कामा यांचे शिक्षण इंग्रजीतून झाल्याने, इंग्रजीवर त्यांचे चांगले प्रभुत्व होते. रूस्तम के.आर. कामा यांच्याशी त्यांनी विवाह केला. रुस्तम कामा हे सामाजिक कार्यकर्ते व वकील होते.


दादाभाई नौरोजी यांच्या सचिव म्हणून मादाम कामा यांनी काम केले. त्यांनी युरोपात युवकांना एकत्र करून भारताला स्वांतत्र्य मिळविण्यासाठी प्रयत्‍न करण्यास प्रवृत्त केले. त्या युवकांना ब्रिटिश सरकारच्या बातम्या वेळोवेळी देत असत. मादाम कामांनी लंडनमध्ये पुस्तक प्रकाशन सुरू केले. त्या विशेषेकरून देशभक्तिपर लिखाण असलेल्या पुस्तकांचे प्रकाशन करीत. 


सावरकरांचे '१८५७ चा स्वांतत्र्य लढा' हे पुस्तक प्रकाशित करण्यासाठी मादाम कामांनी त्यांना मदत केली. त्या स्वांतत्र्य मिळविण्यासाठी झटणार्‍या क्रांतिकारकांना आर्थिक मदतीसह अन्य प्रकारची मदत करत. २२ ऑगस्ट १९०७ साली जर्मनीतल्या श्टुटगार्ट येथे आंतरराष्ट्रीय साम्यवादी परिषद भरली होती. या परिषदेसाठी विविध देशांचे हजारावर प्रतिनिधी आले होते. त्या परिषदेत मादाम कामांनी साडी नेसून व भारतीय झेंडा घेऊन या परिषदेतील सदस्यांना भारताबद्दल माहिती दिली.


जर्मनीत श्टुटगार्ट येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी मादाम कामा यांच्यावर टाकण्यात आली होती. तिथे कुणाच्याही विरोधाला न जुमानता त्यांनी भारताचा पहिला झेंडा फडकविला.


त्यात हिरवा, पिवळा व लाल रंगांचे पट्टे होते. लाल रंग हा शक्तीचे प्रतिनिधित्व करतो पिवळा विजयाचे, तर हिरवा रंग धीटपणा व उत्साहीपणाचे प्रतीक आहे, असे त्यांनी सांगितले. झेंड्यावरील ८ कमळाची फुले तत्कालीन भारताच्या ८ राज्यांची प्रतीके होती. 'वन्दे मातरम्' हे देवनागरी अक्षरांमध्ये झेंडयाच्या मध्यात लिहिलेले होते. झेंड्यावर काढलेले सूर्य आणि चंद्र हे हिंदू-मुस्लिम विश्वास दर्शवणारे चिन्ह होते. 


मादाम कामांनी श्टुटगार्ट येथे झेंडा फडकवल्यानंतर दरम्यानच्या काळात पहिल्या महायुद्धाची ठिणगी पडली आणि मादाम कामा यांना फ्रान्समध्ये स्थानबद्ध करण्यात आले. साधारण १९३५ सालापर्यंत त्या तिथेच होत्या. त्यानंतर त्यांना भारतात परतण्याची परवानगी मिळाली आणि वयाच्या ७४ व्या वर्षी त्या परत मायदेशी आल्या. 


१३ ऑगस्ट १९३६ या दिवशी एका पारशी धर्मादाय रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली.


मुंबईतील ओव्हल मैदानाजवळच्या एका हमरस्त्याला ‘मादाम कामा’ यांचे नाव .

🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

संकलन -)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

*************************************

Featured Post

व्यायाम व योगा अवश्य करावा*

*व्यायाम व योगा अवश्य करावा*  *व्यायाम व योगा करण्याचे दहा फायदे:-*  1) व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते: व्यायाम करणारी...