सोमवार, १६ ऑगस्ट, २०२१

ध्यान साधना

 **************

एक महिला रोज मंदिर जाती थी ! एक दिन उस महिला ने पुजारी से कहा अब मैं मंदिर नही आया करूँगी !


इस पर पुजारी ने पूछा -- क्यों ?


तब महिला बोली -- मैं देखती हूँ लोग मंदिर परिसर में अपने फोन से अपने व्यापार की बात करते हैं ! कुछ ने तो मंदिर को ही गपशप करने का स्थान चुन रखा है ! कुछ पूजा कम पाखंड,दिखावा ज्यादा करते हैं !


इस पर पुजारी कुछ देर तक चुप रहे फिर कहा -- सही है ! परंतु अपना अंतिम निर्णय लेने से पहले क्या आप मेरे कहने से कुछ कर सकती हैं !


महिला बोली -आप बताइए क्या करना है ?


पुजारी ने कहा -- एक गिलास पानी भर लीजिए और 2 बार मंदिर परिसर के अंदर परिक्रमा लगाइए । शर्त ये है कि गिलास का पानी गिरना नहीं चाहिये !


महिला बोली -- मैं ऐसा कर सकती हूँ !


फिर थोड़ी ही देर में उस महिला ने ऐसा ही कर दिखाया ! उसके बाद मंदिर के पुजारी ने महिला से 3 सवाल पूछे -


1.क्या आपने किसी को फोन पर बात करते देखा?


2.क्या आपने किसी को मंदिर में गपशप करते देखा?


3.क्या किसी को पाखंड करते देखा?


महिला बोली -- नहीं मैंने कुछ भी नहीं देखा !


फिर पुजारी बोले --- जब आप परिक्रमा लगा रही थीं तो आपका पूरा ध्यान गिलास पर था कि इसमें से पानी न गिर जाए इसलिए आपको कुछ दिखाई नहीं दिया|


 अब जब भी आप मंदिर आयें तो अपना ध्यान सिर्फ़ परम पिता परमात्मा में ही लगाना फिर आपको कुछ दिखाई नहीं देगा| सिर्फ भगवान ही सर्वत्र दिखाई देगें|


      '' जाकी रही भावना जैसी ..

        प्रभु मूरत देखी तिन तैसी|''


जीवन मे दुःखो के लिए कौन जिम्मेदार है ?


 👉🏻ना भगवान,

 👉🏻ना गृह-नक्षत्र,

 👉🏻ना भाग्य,

 👉🏻ना रिश्तेदार,

 👉🏻ना पडोसी,

 👉🏻ना सरकार,


जिम्मेदार आप स्वयं है|


1.आपका सिरदर्द आपके फालतू विचार का परिणाम है। 

2.पेटदर्द गलत खाने का परिणाम। 

3.आपका कर्ज जरुरत से ज्यादा खर्चे का परिणाम। 

4.आपका दुर्बल/मोटा/बीमार शरीर गलत भोजन शैली का परिणाम। 

5.आपके कोर्ट केस आपके अहंकार का परिणाम। 

6.आपके फालतू विवाद ज्यादा व व्यर्थ बोलने का परिणाम, उपरोक्त कारणों के अलावा सैंकड़ों और कारण भी हैं। बेवजह दूसरों पर दोषारोपण करते रहते हैं ईसमें ईश्वर दोषी नहीं है।अगर हम इन कारणों पर बारीकी से विचार करें तो पायेंगे कि मुसीबतों की वजह कहीं न कहीं हमारी मूर्खता ही है। 

आपका जीवन प्रकाशमय और सुंदर हो। 

गजानन गोपेवाड 



 🌿🌹🙏🌹🌿

मुलांना समजून घेताना

 अभ्यास करत नाही म्हणून आई मुलीला रागवली. मायलेकीच्या भांडणात अवघ्या पंधरा वर्षाच्या मुलीने चिडून रागाच्या भरात आपल्या आईचा गळा आवळून खून केला. डॉक्टर होण्यासाठी सतत अभ्यास कर म्हणून आई दटावते. या कारणाने मुलीने आपल्या जन्मदात्या आईचा जीव घेतला. या घटना पाहून वाटते “कसला हा राग आहे?” नवी मुंबईत घडलेली ही घटना अतिशय धक्कादायक आणि चिंताजनक अशीच म्हणावी लागेल.अल्पवयीन शालेय मुले हिंसक व रागीट बनताहेत. यात दोष कुणाचा पालकांचा, मुलांचा की शिक्षण व्यवस्थेचा ? सामाजिक बांधिलकी म्हणून यावर गांभीर्याने विचार व्हायला हवा.

कोरोना महामारीमुळे शिक्षणक्षेत्रासमोर अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. शाळा बंद पण ऑनलाइन शिक्षण चालू आहे. मुले घरात बसूनच मोबाइल, लॅपटॉप या उपलब्ध साहित्याच्या माध्यमातून ऑनलाइन शिक्षण घेत आहेत. कधी रेंज नसणे, कधी रिचार्ज संपणे, कधी वीज नसणे अशा अनेक अडचणी आहेत. शाळा बंद असल्याने दीड वर्षापासून मुले घरात बंदिस्त आहेत. पूर्वीसारखे मुक्तपणे वावरणे, फिरणे ,मित्रांबरोबर खेळणे, मित्रमैत्रिणींना भेटणे अशा अनेक गोष्टीवर बंधने आहेत. पालकही आर्थिक तसेच कौटुंबिक समस्या असल्याने ब-याच कुटुंबातील वातावरण फारसे चांगले नाही. ही सगळी परिस्थिती मुलांचे मानसिक संतुलन बिघडविणारी आहे. अशा वेळी कुटुंबात वादविवाद टाळायला हवा.
मुलांचे मानसिक स्वास्थ्य चांगले राहावे याकडे पालकांनी लक्ष देणे गरजेचे आहे. भीतीच्या, दडपणाच्या वातावरणात राहून मुलांच्या एकलकोंडेपणात वाढ झाली आहे. मित्रांशी प्रत्यक्ष संवाद कमी झाला आहे. घराबाहेर अजूनही कोरोनाचे संकट असल्याने मुलांच्या शारीरिक हलचाली मंदावल्या आहेत. अशा अनेक गोष्टींचा नकारात्मक परिणाम मुलांवर होत आहे. त्यामुळे मुलांचा चिडचिडेपणा, रागीटपणा व भांडखोरपणा वाढत आहे. त्यातून अशा भयंकर घटना घडून येत आहेत. भावनांवर नियंत्रण कसे मिळवावे ? रागाला आवर कसा घालावा? वादविवादाच्या वेळी संयम कसा ठेवावा? हे सगळ्याच मुलांना जमत नाही. खरंतर कोरोना महामारीमुळे निर्माण झालेली परिस्थिती सगळ्यांची परीक्षा घेणारी आहे. कोरोनापासून आपण सुरक्षित कसे राहू याची प्रत्येकाला चिंता आहे.
शिक्षणात नवा प्रयोग चालू आहे, तो म्हणजे ऑनलाइन शिक्षण. शिक्षण थांबू नये यासाठी स्वीकारलेला हा पर्याय आहे. तो सगळ्यांना आवडेल असे नाही. तो योग्य की अयोग्य? हे येणारा काळच ठरवेल. ऑनलाइन शिक्षण शंभर टक्के समाधान करु शकत नाही. ते मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवत आहे, हे ही काय थोडेके नव्हे.कोरोनाचे समाजातील प्रत्येक घटकावर चांगले वाईट परिणाम होत आहेत. माझ्या पाल्याचे शिक्षण चालू राहिले पाहिजे. त्याने शिक्षण घेऊन चांगला डॉक्टर, इंजिनियर बनले पाहिजे असे पालकांचे स्वप्न असते. यासाठी पालक प्रयत्न करत असतात. साहजिकच कुटुंबाचे स्वप्न पूर्ण करण्याची अपेक्षा मुलांकडून ठेवली जाते. त्यांनी सतत अभ्यास करावा. याकडे पालक बारकाईने लक्ष ठेवतात. त्यांना सूचना देतात. अशा वेळी मुलांच्या मनाचा विचार केला जात नाही आणि त्यामुळे मुलांना याचा प्रचंड राग येतो.
किशोरवयीन मुलांच्या शरीरात पंधराव्या सोळाव्या वर्षी हार्मोन्समुळे शारीरिक बदल घडून येतात. त्यांना स्व ची जाणीव व्हायला लागते. याच वयात मुले रागीट व चिडखोर बनतात. मोठ्या माणसांनी सांगितलेल्या गोष्टी स्वीकारण्याची त्यांची तयारी नसते. स्वतःच्या मनाप्रमाणे वागण्याकडे त्यांचा कल असतो. अशा वेळी पालक म्हणून आपली जबाबदारी वाढते. मुलांशी प्रेमाने संवाद साधला पाहिजे. त्यांच्या अडचणी जाणून घ्यायला हव्यात. सर्वात महत्त्वाचे त्यांना समजून घेतले पाहिजे. प्रत्येकवेळी रागवून चिडून उपयोग होत नसतो. त्यांना ताण येईल ,दडपण येईल असे वातावरण घरात असता कामा नये. आनंददायी आणि भयमुक्त वातावरणात मुलांची मानसिकता चांगली राहते. संयम ठेवून अडचणीच्या प्रसंगावर कशी मात करावी हे मुलांना शिकविणे आवश्यक आहे. यासाठी ध्यान, प्राणायाम यांचा चांगला उपयोग होतो. आज शिक्षणात कमालीची जीवघेणी स्पर्धा निर्माण झाली आहे. माझ्या पाल्याला प्रवेश कुठे मिळेल ? त्याच्या करिअरचे काय होईल ? असे असंख्य प्रश्न पालकांना सतावत असतात. मुलांनी सतत अभ्यास करावा अशी पालकांची इच्छा असते. ती पूर्ण करण्यास टाळाटाळ झाली की पालक मुलांना ओरडतात, रागवितात. मुलांना संगोपन करताना त्यांच्या भावना ,विचार ,त्यांची मतेही विचारात घेतली जावीत. त्यांना व्यक्ती होण्याची संधी देणे आवश्यक आहे.
मुलांची बुद्धिमत्ता ,क्षमता आणि कुवत पाहूनच आपण त्याला पुढे जाण्यास मार्गदर्शन करायला हवे.तरच पाल्य आणि पालक यांच्यामधील नाते हे मैत्रीचे,मायेचे राहू शकेल.

लेख, गजानन गोपेवाड 

16 आँगष्ट अटलबिहारी वाजपेयी यांचा आज स्मृतिदिन

 *************************************

*१६ ऑगस्ट - मा.अटल बिहारी वाजपेयी यांचा स्मृतिदिन*

*************************************


जन्म - २५ डिसेंबर १९२४ (ग्वालीयर)

स्मृती - १६ ऑगस्ट २०१८ (दिल्ली)


*कवी मनाचा प्रखर राष्ट्रवादी* अशीच प्रतिमा असलेले मा. अटल बिहारी वाजपेयी यांचा आज स्मृतिदिन.


अटलबिहारी वाजपेयी यांनी कानपूर मधून राज्यशास्त्रात एम.ए.ची पदवी मिळविल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्णवेळ कार्यकर्ता झाले.त्यांनी राष्ट्रधर्म, वीर अर्जुन आणि पांचजन्य या नियतकालिकांत पत्रकारिता केली. भारताच्या स्वातंत्र्यसंग्रमाताही ते सहभागी झाले. त्यांची राजकीय कारकीर्द म. गांधींच्या ‘चले जाव’ चळवळीपासून सुरु झाली. 


स्वातंत्र्यानंतर १९५१ मध्ये स्थापन झालेल्या ‘भारतीय जनसंघ’ या पक्षाच्या उभारणीत त्यांचा मोलाचा वाट होता. पक्षाचे संस्थापक नेते डॉ. शायामाप्रसाद मुखर्जी यांचे अटलबिहारी वाजपेयी विश्वासू सहकारी होते. वाजपेयी १९५७ साली प्रथमच संसदेत लोकसभेत निवडून आले. त्यानंतर तब्बल नऊ वेळा ते लोकसभेत निवडून गेले आहेत. पक्षाध्यक्ष पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्या दुर्देवी मृत्यूनंतर पक्षाची धुरा वाजपेयींच्या खांद्यावर आली. ते १९६८ मध्ये प्रथमच पक्षाध्यक्ष झाले. पंतप्रधान इंदिरा गांधींनी १९७५ साली भारतावर लादलेल्या देशांतर्गत आणीबाणीमध्ये त्यांना दोन वर्षे कारावासात काढावी लागली. 


आणीबाणीनंतर आपल्या सहकाऱ्यांसह, संपूर्ण पक्षच वाजपेयी यांनी १९७७ साली जनता पार्टीत विलीन केला. पण त्यानंतर अवघ्या काही महिन्यातच १९८० मध्ये वाजपेयी यांनी मुंबईत नव्या भारतीय जनता पार्टीची घोषणा केली. जनता पार्टीच्या मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखालील जनतापार्टीच्या सरकारमध्ये वाजपेयी परराष्ट्रमंत्री होते. ते १९९६ साली प्रथमच पंतप्रधान बनले. परंतु तेरा दिवसात हे सरकार कोसळले. त्यानंतर १९९८ साली लोकसभा निवडणुकीनंतर भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरल्याने वाजपेयी पुन्हा एकदा पंतप्रधान बनले. हेच सरकार तेरा महिनेच टिकले. पण याच काळात भारताने अणुस्फोट घडून आणला. आणि आपले सामाजिक नि वैज्ञानिक श्रेष्ठत्व सिद्ध केले. त्याचप्रमाणे वाजपेयी यांच्या सरकारने पारंपारिक शत्रू असलेल्या पाकिस्तानाशी शांतता समझोता करण्याचा प्रयत्न केला. कारगिलचे युद्ध ही घटनासुद्धा याच काळातील. 


वाजपेयी १९९९ मध्ये तिसऱ्या वेळी पंतप्रधान झाले. हे मंत्रिमंडळ पूर्ण पाच वर्ष टिकले. विविध विकास कामे करून देखील नंतर च्या लोकसभा निवडणुकांत भाजपा सत्तेवर येऊ शकत नाही. त्यानंतर २००५ साली वाजपेयी यांनी राजकारणातून निवृत्ती जाहीर केली.  


वाजपेयी यांच्या कुशल नेतृत्वाखालील भारताने हलाहल देखील पचविले. आणि भारताची तसेच भाजपचीही प्रतिष्ठा उंचावली.अटल बिहारी वाजपेयी ज्येष्ठ राजकीय नेते आणि भारताचे पहिलेच बिगर काँग्रेसी पंतप्रधान आहेत. एवढेच नव्हे तर १९९६ ते २००४ या आठ वर्षाच्या कालखंडात वाजपेयी यांनी तीन वेळा भारताचे पंतप्रधानपद भूषविले. 


वाजपेयी यांची आजवर सुमारे ४० पुस्तके प्रकाशित झाली असून पद्मविभूषण आणि उत्कृष्ट संसदपटू सारखे विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले.


*मा.अटल बिहारी वाजपेयी यांना आदरांजली...!*

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

संकलन -)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

**********************************

प्रभात दर्शन

 🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

श्रावण मास,शुक्ल पक्ष, *८/९*,अनुराधा नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,वर्षा ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

सोमवार, १६ आॕगष्ट २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                        *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

         *"लोग हमारे बारे में अगर नकारात्मक बातें करते हैं, तो सम्भवतः दो ही मुख्य कारण हो सकते हैं... पहला यह कि हमारे अंदर ही त्रुटि अर्थात दोष हैं, जिसको आत्मचिंतन करके हमें अवश्य दूर करना चाहियें। दूसरा यह कि हम उनसे किसी न किसी रूप में श्रेष्ठ हैं, जिस कारण से लोग हमसे ईर्ष्या रखते हैं। किन्तु हम स्वयं को सही रखते हुए अपना कार्य करते रहें। लोगों की अधिक चिंता न करें, क्योंकि बहुत से लोग तो भगवान से भी दुखी हैं।"*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

रविवार, १५ ऑगस्ट, २०२१

डोक्यात केस नसलेले गोल चटे कशामुळे येतात


══════════════════════

 @ संकलन 

  गजानन गोपेवाड 

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════

📕 *डोक्यात केस नसलेले गोल चट्टे कशामुळे येतात ?* 📕


काहीजणांच्या डोक्यात केस नसलेले चट्टे दिसतात. बरेच जण समजतात की, उंदीर चावल्यामुळे असे चट्टे येतात व पुन्हा तेथे केस येत नाहीत. डोक्याचे केस जाण्याची अनेक कारणे आहेत. डोक्याच्या त्वचेला जंतूसंसर्ग झाला असेल, दाह असेल तरी केस गळतात. याखेरीज टिनीया कॅपिटीससारख्या रोगातही केस गळतात. डोक्यात केस नसलेले गोल चट्टे असण्याचे मुख्य कारण म्हणजे, कारण माहीत नसलेला अॅलापेशिया एरॅटा हा रोग. ३० टक्के रुग्णांमध्ये आनुवंशिक कारणे सापडतात. यात डोक्यात दोन वा तीन केस नसलेले चट्टे असतात पण डोक्याची त्वचा मात्र निरोगी असते. या चट्ट्यांवर केस नसले तरी ६ ते १२ महिन्यानंतर परत केस उगवतात. त्यामुळे काळजी करण्याचे कारण नसते. त्वचेच्या जिवाणू वा बुरशी संसर्गामुळे केस जात असतील, तर मात्र त्यावर योग्य ते उपाय करावे लागतात. म्हणजे केस गळायचे थांबतात.


*डाॅ.अंजली दिक्षित व डाॅ.जगन्नाथ दिक्षित*

*यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' पुस्तकातून*

═══════════════════════

  

Good morning 👶

 🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

श्रावण मास,शुक्ल पक्ष, *सप्तमी*,विशाखा नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,वर्षा ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

रविवार, १५ आॕगष्ट २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                        *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

          *"सिंह किसी भी चट्टान पर बैठ जाए तो वह चट्टान भी सिंहासन बन जाती है। इसीलिए श्रेष्ठ यही है कि सिंहासन का मोह ना रखते हुए, स्वयं सिंह बनो... ततपश्चात आप जहां पर भी बैठेंगे, वही सिंहासन बन जाएगा...*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

*🇮🇳७४ वा स्वातंत्र्य दिन चिरायु होवो..*

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

15 August indipedent day

 *********************************

  *१५ ऑगस्ट - भारतीय स्वातंत्र्य दिन*

**********************************

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

*माझ्या सर्व भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा....!*


  स्वातंत्र्य दिवस हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस.ब्रिटिश साम्राज्यापासून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरात बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो.


जुलमी ब्रिटिश राजवटीमधून मातृभूमीला स्वतंत्र करण्यासाठी जीवाचे रान करून आपले आयुष्य वेचणाऱ्या स्वातंत्र्य वीरांना सलाम करण्याचा हा दिवस आहे.


स्वातंत्र्यासाठीचे प्रत्येकाचे मार्ग वेगवेगळे होते तरी त्यामागचे ध्येय एकच होते आणि ते म्हणजे भारताचे स्वातंत्र्य!  


इतके खडतर प्रयत्न करून हे स्वातंत्र्य मिळाले आहे. देशाची ही अखंडता व सार्वभौमत्व टिकविण्यासाठी आपली एकता कायम अशीच ठेऊया. 


भारतीय स्वातंत्र्य दिन चिरायू होवो !


Happy Independence Day


*इतिहास :*


इ.स. १७७० पासून भारतावर इंग्रजांचे राज्य होते. १९व्या शतकापासूनच सर्व राजांना इंग्रजांनी आपल्या सैन्यबळावर ताब्यात ठेवले होते. १८५७ च्या स्वातंत्र्य समरानंतर ब्रिटिशांनी त्यांची व्यवस्था अजूनच शिस्तीची केली. १८८५ साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. २०व्या शतकात महात्मा गांधी ह्यांनी अहिंसेच्या मार्गाने 'चले जाओ' आंदोलन व अशी अनेक आंदोलने केली. गांधींनी सविनय कायदेभंग चळवळीचे नेतृत्व केले. १९२९ साली लाहोर च्या सत्रात काँग्रेसने 'संपूर्ण स्वराज्या'ची घोषणा केली. त्यावेळी त्यांनी २६ जानेवारी ही तारीख भारताचा स्वातंत्र्यदिन म्हणून घोषणा करायची योजना केली. १९३० साली काँग्रेसने निवडणुका जिंकल्या. त्यानंतर संपूर्ण स्वराज्यासाठी सर्व नेत्यांनी असहकार आंदोलन केले. १९४० साली मुस्लिम कार्यकर्ते हे मुख्य प्रवाहापासून वेगळे झाले व त्यांनी 'ऑल इंडिया मुस्लिम लीग'ची स्थापना केली.


दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटिशांना लक्षात आले की, आपल्याला भारतावरचे राज्य व युद्ध हे सांभाळता येणार नाही आहे. तसेच दुसऱ्या बाजूला भारतीय क्रांतिकारकांचा जोर वाढत होता. ही गोष्ट कळल्यानंतर ब्रिटनच्या पंतप्रधानांनी जून १९४७ पर्यंत भारत पूर्णपणे स्वतंत्र करण्याची हमी दिली. अखेर १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. पण त्यावेळी भारताचे पाकिस्तान आणि भारत असे दोन तुकडेही पडले. पाकिस्तानी भागात राहणाऱ्या अनेक पंजाब्यांना व सिंधीना त्यांचे घरदार, पैसा सोडून यावे लागले. अनेक लोक ह्यामध्ये मारलेही गेले. पुढे ह्या विभाजनामुळे काश्मीरचा प्रश्नही पुढे आला.


*स्वतंत्र भारत :*


स्वतंत्र भारत २६ जानेवारी १९५० रोजी प्रजासत्ताक झाला. भारताची राज्यघटना तयार करण्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकर ह्यांचा मोलाचा वाटा होता. प्रजासत्ताक भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू व पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद होते. रवींद्रनाथ टागोर ह्यांनी लिहिलेले 'जन गण मन' हे भारताचे राष्ट्रगीत तर बंकिमचंद्र चट्टोपाध्याय ह्यांनी लिहिलेले 'वन्दे मातरम्' हे राष्ट्रीय गीत म्हणून ठरवले गेले.


*स्वातंत्र्य दिनाचा उत्सव :*


भारतात सर्व ठिकाणी स्वातंत्र्य दिनाची सार्वजनिक सुट्टी दिली जाते. सर्व शाळा, महाविद्यालये, कार्यालयांमध्ये ध्वजारोहण व ध्वजवंदन असते. भारताचे पंतप्रधान हे दरवर्षी भाषण देतात. या दिवशी लाल किल्ला येथे भारताचे पंतप्रधान ध्वजारोहण करतात. त्यादिवशी बहुतांश रेडिओ केंद्रावर तसेच दूरदर्शनवर देशभक्तिपर गाणी, कार्यक्रम, चित्रपट लागतात.

*🇮🇳Happy Independence Day🇮🇳*

संकलन -)gajanan gopewad 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

********************************

15आँगष्ट राष्ट्रीय उत्सव

 #स्वातंत्र्य_म्हणजे_काय?


"स्व" व "तंत्र" या दोन शब्दांपासुन "स्वतंत्र" किंवा "स्वातंत्र्य" हे भाषिक व्याकरणात्मक शब्द तयार होतात.जे भावनावाचक आहेत."स्वत:च्या तंत्राने वागणे जगणे अाहार विहार विचार करणे म्हणजे स्वातंत्र्य." असा ढोबळमानाने अर्थ घेतला जातो.


"स्वांतत्र्य म्हणजे बंधनांचा अभाव."


"ज्यामुळे इतरांना इजा पोहोचत नाही असे काहीही करण्याचे सामर्थ्य म्हणजे स्वातंत्र्य."

—फ्रेच राज्यक्रांतीच्या 'मानवी हक्कांचा जाहिरनामा'


"लोकांना स्वत:चा अधिकाधिक विकास साध्य करण्याची संधी प्राप्त करुन देणारे वातावरण असणे म्हणजे स्वातंत्र्य होय."

—प्रा.हेराॅल्ड लास्की


"मानशिक स्वातंत्र्य हेच खरे स्वातंत्र्य!"

—डाॅ.बाबासाहेब आंबेडकर


"Liberty" या इंग्रजी शब्दाचा मराठी अर्थ "स्वातंत्र्य" आहे.

मुळात "Liber" हा शब्द लॅटिन असुन यापासुन "Liberty" हा शब्द जागतिक मान्यता प्राप्त इंग्रजी शब्दरुप आहे.तर "Liber" या शब्दाचा अर्थ "मुक्ती सुटका सोडवणुक" असा नामवाचक आहे.तसेच "Liberty" या भाववाचक शब्दाचा अर्थ "बंधनापासुन मुक्ती" असा होतो.


चेंबर्सच्या शब्दकोशात स्वातंत्र्य या शब्दाचे संज्ञावाचक व संकल्पनात्मक अनेक अर्थ आहेत."बंधन गुलामगिरी जुलूमशाहीचा अभाव स्वत:च्या इच्छेनूसार कार्यरत राहणे कर्म करणे किंवा नैसर्गिक हक्कांचा अमर्याद उपभोग घेणे" असे ते अर्थ आहेत.


समाजशास्र व मानवी जीवनाचा नैसर्गिक संबंध असल्यामुळे समाजशास्रीयदृष्टीनेही स्वातंत्र्य या बाबद अभ्यास केला गेला आहे.समाजशास्रानेही या संकल्पनेला विविध अंगाने माप लावले आहे."व्यक्तीने किंवा व्यक्तीसमुहाने स्वत्वाचा पुरस्कार करणे किंवा स्वाभिमान मानने होय" किंवा "मानवी विकासासाठी विकासात्मक वातावरण" असा अर्थ व्याख्या समाजशास्रीय आहेत.


थोडक्यात सांगायचे म्हणजे "पावसाने झोडपले आणि राजाने मारले तर दाद न्याय कुणाकडे मागायचा? यासारख्या भावनात्मक प्रश्नातुन या स्वातंत्र्याचा जन्म होतो.तसेच विदेशी ब्राम्हणी वैदिक सनातनी हिंदु धर्मातील ग्रंथात अस सांगितल गेल आहे की "न स्री स्वातंत्र्यमर्हति".

म्हणजे स्री ही मानवी प्राणी असुनही सर्व प्रकारे गुलाम दास आहे.ती भारतीय ब्राम्हणी समाज व्यवस्थेत आधी पुरुषाची गुलाम नंतर परिवरातील वरिष्ठांची वर्णाची जातीची गुलाम आहे.असा या संस्कृत श्लोकाच्या वेच्याचा अर्थ आहे.पण या बंधनातुन तिने बंधन मुक्त होवुन इतरांनाही बंधन मुक्तीच दर्शन घडवणे म्हणजेच स्वातंत्र्य होय.


पण भारतीय विदेशी ब्राम्हणी समाजव्यवस्थेत गुलामी व स्वातंत्र्य हि जगातील गुलामी व स्वातंत्र्या पेक्षा खुप भयानक व वेगळ्या स्वरुपाचे आहेत.जगातील गुलामी हि वांशिक शारिरीक व वर्णात्मक आहे.पण भारतीय गुलामी हि "मानशिक" आहे.तेच तिच मुळ आहे.म्हणजेच भारतीय गुलामीचा आधार हा मुख्यात: मानशिक आहे.त्यामुळे नुसत स्वातंत्र्य काहीच कामाच नाही.


म्हणुन भारतीय ब्राम्हणी समाज व्यवस्थेतुन बहुजन समाजाला स्वातंत्र्य मिळवायच असेल तर प्रथम मानशिक स्वातंत्र्य मिळवणे आवश्यक आहे.तरच भारतीय बहुजन खर्या अर्थाने स्वतंत्र होईल.


पण तरीही भारतीय संविधानातुन डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी ते स्वातंत्र्य मिळवुन देण्याची कायदेशिर व न्यायालयीन पुर्तता करुन ठेवली आहे.त्यांनी सांगितलेल्या मार्गाचा अवलंब केला तरच भारतीय मुलनिवासी बहुजन समाज विदेशी ब्राम्हणांच्या गुलामीतुन स्वतंत्र झाल्याशिवाय राहणार नाही.


मग मुलनिवासी बहुजनांनो वरील कोणत स्वातंत्र्य भोगत आहात तुम्ही?तर तुम्ही ब्राम्हणी व्यवस्थेतेचे "मानशिक गुलाम" आहात.त्यामुळे तुम्ही याच पारतंत्र्यात जगत आहात.तुम्हाला जेव्हा "मानशिक स्वातंत्र्य" मिळेल तेव्हाच तुम्ही खर्या अर्थाने स्वतंत्र असताल ब्राम्हणांच्या गुलामीतुन.तेव्हाच तुम्हाला नैसर्गिक नागरी राजकिय सामाजिक आर्थिक व राष्र्टिय स्वातंत्र्य मिळेल.



जय मुलनिवासी

गजानन गोपेवाड 

शुक्रवार, १३ ऑगस्ट, २०२१

प्रवास अखंड भारत

*🇮🇳 "प्रवास अखंड भारताचा" 🇮🇳*



*भाग १ : "अखंड भारत"*


 अखंड भारत हा भारतीयांसाठी हळवा विषय आहे. ज्या ज्या वेळी अखंड भारताविषयी आपण वाचतो, ऐकतो, पाहतो, त्यावेळी भारताच्या सीमा, वैभव, समृद्धी पाहून आम्हा भारतीयांचा ऊर अभिमानाने भरून येतो.


अखंड भारताच्या भौगोलिक सीमेत *अफगाणिस्तान पाकिस्तान, बांगलादेश, ब्रह्मदेश, भूतान, नेपाळ, इंडोनेशिया, थायलँड, जावा, सुमात्रा, मलेशिया, व्हिएतनाम, इ.* देशांचा समावेश होता. या देशांमध्ये भारतीय संस्कृतीच्या खाणाखुणा अजून सुद्धा आपल्याला दिसतात. उदाहरण द्यायचे झाल्यास बँकाॕक (थायलंड) येथील एका विमानतळाचे नाव *सुवर्णभूमी* असे आहे. अफगाणिस्तानातील  बुद्ध मूर्तींची विटंबना तालिबान्यांनी काही वर्षांपूर्वी केलेली आपण जाणतोच. तत्कालीन अखंड भारताचे क्षेत्रफळ जवळपास ७८ लाख वर्ग कि.मी. एवढे होते. आज खंडित होऊन जवळपास ते ३३ लाख वर्ग कि.मी. एवढा राहिले आहे. अखंड भारताच्या सीमेचा उल्लेख विष्णूपुराणात सुद्धा सापडतो. 


राजकीय व्यवस्था तसेच व्यवस्थापनाच्या दृष्टीने अखंड भारत १६ जनपदांमध्ये विभागलेला होता. वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळे राजे होते. काही साम्राज्ये खूप मोठी, तर काही अगदी छोटे होती. खूप मोठे साम्राज्य असलेला  राजा, हे राजांचे राजा. त्यांना सम्राट म्हटलं जायचे.


अखंड भारतातील राजांमध्ये आपापसात लढाया व्हायच्या का? तर त्याचे उत्तर "होय" असे देता येईल. स्वतःचे क्षेत्र वाढविण्याच्या दृष्टीने राजे लढायांचा मार्ग सुद्धा अवलंबित. ज्यामुळे  नवीन राज्ये, साम्राज्ये निर्माण व्हायची, त्यांच्या सीमा वाढायच्या, कमी व्हायच्या, तसेच नष्ट व्हायच्या. परंतु अखंड भारताच्या सीमेला धक्का सुद्धा लागायचा नाही. ह्याचे महत्वाचे कारण म्हणजे त्या काळात एक व्यवस्था होती. *अखंड भारताच्या सीमेचे रक्षण* करण्याची जबाबदारी ही सीमांत प्रदेशातील राज्यांवर असायची. बाह्य क्षेत्रातून आक्रमण व्हायचे, तेव्हा तिचे संरक्षण करण्याची जबाबदारी सर्वांवरती असायची. सीमांत प्रदेशातील राजांना सर्वजण सहाय्य करायचे. ह्या व्यवस्थेच्या कारणाने भारताच्या सीमा सुरक्षित राहिल्या होत्या.


अखंड भारतात *"राष्ट्र"* ही संकल्पना होती का ? तर काहीजण होती, तर काहीजण नव्हती असे म्हणतात. परंतु राष्ट्राची सर्वप्रथम संकल्पना ही *विष्णुगुप्त (चाणक्य)* यांनी मांडली असे म्हणतात. "राष्ट्रापेक्षा मोठे कोणीही नाही."  *"राष्ट्र प्रथम"* ही संकल्पना आर्य चाणक्याची.


अखंड भारतात वेगवेगळे राजे होते, सम्राट होते. त्यांच्या आपापसात लढाया व्हायच्या. तरीही भारत अखंड राहिला. कारण येथील सर्वांची धर्म, संस्कृती एक होती. त्याचबरोबर येथे ज्ञाननिर्मिती सुद्धा व्हायची. *गुरुकुल पद्धती* सोबतच मोठमोठी विद्यापीठे त्याकाळी प्रसिद्ध होती. ज्यात *नालंदा, तक्षशिला* यांचा समावेश होता. ज्यांचा भर धर्म, संस्कृती, ज्ञाननिर्मिती, राष्ट्रभावना, मातृभूमी प्रेम यावर होता. गुरुकुल तसेच विद्यापीठाच्या प्रभावामुळे तसेच इथे शिकलेल्या ज्ञानामुळे *माॕ भारतीचे रक्षण करणे* आपले कर्तव्य आहे, याची जाणीव तत्कालीन अखंड भारतातील जनमानसांत होती.

*#प्रवास_अखंड_भारताचा*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~


*🔸 "प्रवास अखंड भारताचा6" 🔸*

       *भाग २: पहिले आक्रमण*


अखंड भारतावर बाह्य आक्रमणे पुष्कळ झाली, परंतु दखल घेण्याजोगे जे आक्रमण झाले ते सिकंदरचे. इ. पू. ३०० च्या आसपास संपूर्ण विश्व जिंकण्याच्या उद्देशाने *सिकंदर* निघाला होता. या अनुषंगाने सिकंदरचे भारताच्या सीमेवर आक्रमण सुरु झाले. सीमांत प्रदेशातील राजे सिकंदरशी लढत होते. सिकंदरची ताकद खूप जास्त होती. तत्कालीन व्यवस्थेनुसार या आक्रमणाला तोंड देण्यासाठी सीमांत प्रदेशातील राजांना इतर राजे आणि सम्राट यांनी  मदत करणे अपेक्षित होते, परंतु तसे झाले नाही. बहुतांशी सम्राट तटस्थ राहिले. *गांधार नरेश अंभी* सिकंदरला मिळाला. या कारणाने अंभी हा पहिला गद्दार ठरतो.


तत्कालीन अखंड भारतात *मगध* हे साम्राज्य सर्वात मोठे आणि प्रबळ होते, परंतु मगध सम्राट धनानंद तटस्थ राहिला. त्या कारणाने सिकंदरने भारताचा बराचसा भूभाग जिंकून घेतला. बऱ्याच सम्राटांची उदासीनता पाहून तत्कालीन *विद्यापीठे* पुढे सरसावली. विद्यापीठातील शिक्षक संकटाशी सामना करण्यासाठी, तसेच राष्ट्रीय भावना जागृत करण्यासाठी प्रयत्न करत होते. त्यात प्रामुख्याने नाव घ्यावे लागेल ते *आचार्य विष्णुगुप्त* यांचे, ज्यांना आर्य चाणक्य म्हणून देखील ओळखले जाते.


राष्ट्राची संकल्पना मांडणाऱ्या चाणक्यांनी, *"राजा म्हणजे राष्ट्र नाही आणि राष्ट्र म्हणजे राजा नाही." "राष्ट्र प्रथम"* सिद्धांताची आठवण तत्कालीन राजांना करून देण्यास सुरुवात केली. राष्ट्रावर आलेल्या संकटाशी लढण्यासाठी त्यांनी मगधनरेश धनानंदाला त्याच्या कर्तव्याची आठवण करून दिली. परंतु मगधनरेश धनानंदाने त्यांचे न ऐकता, त्यांचा अपमान करून त्यांना राज्यसभेतून हाकलून दिले. त्यानंतर *आचार्य चाणक्य* यांनी चंद्रगुप्ताच्या सहाय्याने धनानंदाचा पाडाव केला व सिकंदरने जिंकलेला भूभागसुद्धा जिंकून घेऊन एकछत्री अंमल भारतावर निर्माण केला.


त्यानंतर युनानी आणि फारसी आक्रमणे होत राहिली. त्यांनी भूभाग जिंकले, संपत्ती लुटली, परंतु आक्रांतांनी आपली संस्कृती, धर्म येथे वाढवायचा प्रयत्न केला नाही. जे इथे राहिले, त्यांनी येथील *धर्म-संस्कृतीशी जुळवून घेतले.* ते इथे एकरूप झाले. या कारणाने या काळातील आक्रमणांचा अखंड भारतावर फारसा फरक पडला नाही. तसेच येथील संस्कृती अबाधित राहिली.


चंद्रगुप्ताने साम्राज्याचा पुष्कळ विस्तार केला. तसेच संस्कृतीचीसुद्धा त्याच्या काळात भरभराट झाली. या काळात *बौद्ध धर्म* तसेच *जैन धर्म* यांचा प्रभाव वाढायला लागला. चंद्रगुप्ताने आपल्या उत्तरकाळात राज्याची जबाबदारी आपला मुलगा बिंदुसार याच्यावर सोपवून जैन धर्म स्वीकारला व तो जैन मुनी झाला.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


संकलन -)गजानन गोपेवाड उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

14 आँगष्ट कुस्तीगीर खाशाबा जाधव स्मृतिदिन

 ************************************

*१४ ऑगस्ट - कुस्तीगीर खाशाबा जाधव स्मृतिदिन*

************************************

🤼‍♂️🤼‍♂️🤼‍♂️🤼‍♂️🤼‍♂️🤼‍♂️🤼‍♂️🤼‍♂️🤼‍♂️🤼‍♂️🤼‍♂️

जन्म - १५ जानेवारी १९२६ (सातारा)

स्मृती - १४ ऑगस्ट १९८४


खाशाबा जाधव हे ऑलिंपिक पदक विजेते मराठी,भारतीय कुस्तीगीर होते.१९५२ सालातल्या ऑलिंपिकमध्ये त्यांनी जिंकलेले फ्रीस्टाइल कुस्तीतले कांस्यपदक हे भारतासाठी स्वातंत्र्योत्तर काळातले पहिले वैयक्तिक पदक होते.


जाधवांनी १९४८ सालातील लंडन उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये फ्लायवेट वजनगटातील कुस्तीत सहावा क्रमांक मिळवला.१९५२ सालातील हेलसिंकी उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये ५२ किलोग्रॅम वजनगटात फ्रीस्टाइल प्रकारांतर्गत कांस्यपदक जिंकले.


खाशाबा जाधव यांचा जन्म १५ जानेवारी १९२६ रोजी महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यामध्ये कराड तालुक्यातील गोळेश्वर खेड्यातील एका महार कुटूंबात झाला. त्यांची कुस्ती खेळात ख्याति होती. भारत देशातील ते ऑलिंपिक मध्ये पदक जिंकणारे पहिले खेळाडू होते. 


सन १९०० मध्ये नॉर्मन प्रीतचंद यांनी वैयक्तिक खेळात दोन सिल्वर पदंके जिंकली होती. त्यानंतर ऑलिंपिक मध्ये पदक जिंकणारे खाशाबा जाधव हे एकमेव खेळाडू होते. हा एकमेव ऑलिंपिक पदक विजेता होता की त्याला भारत सरकारने पद्म अवॉर्ड दिला नाही. तो स्वतःच्या हिमतीवर तयार झाला. याची दुरवस्था पाहून रीस गार्डनर या ब्रिटिश कोचने त्याला १९४८ चे ऑलिंपिक पूर्वी मार्गदर्शन केले.

🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

संकलन -)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

************************************

प्रभात दर्शन

 🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

श्रावण मास,शुक्ल पक्ष, *षष्ठी*,चित्रा नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,वर्षा ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

शनिवार, १४ आॕगष्ट २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                         *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

         *अच्छे व्यक़्ति अवश्य बनें, किन्तु इसे सिद्ध करने में अपना बहुमूल्य समय नष्ट न करें*

       *बात छोटी सी है, किन्तु अर्थ बहुत बड़ा है। एक बार विचार अवश्य करें कि हम स्वयं को श्रेष्ठ दिखाने में कितनी ऊर्जा का क्षय करते हैं*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

भारतीय स्वातंत्र्य 75 सिहावलोकन

 *भारतीय स्वातंत्र्याची पंचाहत्तरी : सिंहावलोकन*


         *- इ. झेड. खोब्रागडे, भाप्रसे (नि.)*

 

     भारतीय स्वातंत्र्याचा  अमृत महोत्सव आता साजरा होऊ लागला आहे. महाराष्ट्र काँग्रेसने  दि. 1ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2021 या काळात "व्यर्थ न हो बलिदान" कार्यक्रम सुरू केल्याचे मीडियात दिसले.  करायलाही पाहिजे. कारण देशाला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त होणेसाठी, राजकीय  स्वातंत्र्याची चळवळ काँग्रेसने चालविली होती. इतिहासाची उजळणी होणे आवश्यकच आहे. 15 ऑगस्ट 1947 ला देश स्वतंत्र झाला. त्यापूर्वीच 1946 मध्ये कॅबिनेट मिशनच्या योजनेनुसार स्वतंत्र भारताचे स्वतंत्र संविधान  निर्माण करण्यासाठी संविधान सभा गठीत करण्यात आली. संविधान सभेत काँग्रेसचे प्राबल्य होते.  संविधान निर्माण कार्याचा प्रारंभ दि. 9 डिसेंबर 1946 ला सुरू झाला.  देशाची फाळणी होऊन ऑगस्ट 1947 मध्ये  भारत व पाकिस्तान हे दोन स्वतंत्र राष्ट्र अस्तित्वात आले. भारताला राजकीय स्वातंत्र्य मिळाले. संविधान प्रारूप समितीचे अध्यक्षपद  संविधान सभेने एकमताने डॉ. बी. आर. आंबेडकर यांना  दिले. संविधान तयार  होऊन ते 26 नोव्हेंबर 1949 ला भारताच्या लोकांनी स्वतःप्रत अर्पण केले.  भारताच्या लोकांनी भारत देश सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष,  लोकशाही गणराज्य  घडविण्याचा  संकल्पपूर्वक निर्धार केला. नागरिकांना सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, नागरिकांना समान वागणूक, समान दर्जा  व समान संधी  तसेच विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासनाचे स्वातंत्र्य दिले.   व्यक्तीची प्रतिष्ठा, राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्प पूर्वक निर्धार केला. संविधानाची प्रास्ताविका (Preamble) वाचले तर आपले लक्षात येईल.  संविधान निर्माण करण्यात अतुलनीय  योगदानासाठी, डॉ. बी. आर. आंबेडकर यांचा संविधान सभेने संविधानाचे शिल्पकार म्हणून गौरव केला.  संविधान निर्मितीचा इतिहास समजून घेण्याची गरज आहे. 


2.    दि.  26 जानेवारी 1950 ला देश प्रजासत्ताक झाला. त्यावेळचे पुढारी यांनी देशभक्तीचा परिचय देत, भारताच्या विकासाचे पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्याचे दृष्टीने विकासाचे नियोजन करीत  विकास  कामे  सुरू केलीत. या 75 वर्षात  बरीच प्रगती झाली, देश विकसित होत आहे. महासत्ता होण्याचे, आत्मनिर्भर होण्याच्या वाटेवर आहे.  कोणीही म्हणणार नाही की मागील 70-75 वर्षात काहीच झाले नाही. बरेच काही झाले आहे. मात्र, शोषित वंचितांच्या जीवनात फार फरक पडला नाही. आजही मूलभूत गरजा व मूलभूत सुविधांपासून दुर्बल घटक वंचित आहे. लोकहिताच्या चांगल्या राज्यकारभारासाठी  संविधानिक तत्वे-मूल्ये समजून घेऊन त्यानुसार काम करण्याकडे दुर्लक्ष होऊ लागले. आजचे चित्र काय सांगते ? संविधान  व कायदे राबविण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे त्यांच्या  स्वार्थीपणामुळे, सत्ता व संपत्तीच्या लालसेपोटी तसेच नागरिकांच्या अलिप्ततेमुळे आणि उदासीनतेमुळे अनेक गंभीर  समस्या निर्माण झाल्या आहेत, असे बोलले जाते. मागील दोन दशकात काही  राज्यकर्ते, सनदी अधिकारी इत्यादींनी बराच गोंधळ घालण्यास सुरुवात केली आहे. जवळपास सगळ्याच राजकीय पक्षाच्या नेत्यांची शक्ती व वेळ एकमेकांचे उणेदुणे काढण्यावर खर्च होत आहे. सत्ताधारी आणि विरोधक पक्षनेते यांच्यात आरोप प्रत्यारोपांचे स्वरूप हे मुख्यतः भ्रष्टाचाराचे व नाकर्तेणाचे असतात. तसेच  शब्द खालच्या पातळीवरील वापरले जातात. संविधानाच्या प्रास्ताविकेतील "व्यक्तीची प्रतिष्ठा" या तत्वाचा विसर लोकप्रतिनिधींना पडलेला दिसतो. ज्यांनी आदर्श वर्तन करून आदर्श घालून द्यायला पाहिजे त्यांचेकडून  समाजात दुफळी, भांडण,  द्वेष,  जातीयता, धर्मांधता, असहिष्णुता, इत्यादी निर्माण करण्याचा  प्रयत्न होत आहे. विचार स्वातंत्र्य, अभिव्यक्ती वर अवाजवी निर्बंध घातले जात आहेत.  शब्द जपून वापरले पाहिजे ह्याचे भान नेते मंडळी विसरत चालले आहेत. स्वातंत्र्य मिळविण्यासाठी लढणाऱ्या नेत्यांचा जयजयकार केला जातो मात्र त्यांचा त्याग, चारित्र्य,  वर्तन, देशाप्रती समर्पण ह्याचा सोयीस्कर विसर पडतो आहे. यामुळे अनेक समस्या व प्रश्न निर्माण झाले आहेत. सर्वसामान्यांचे, शोषित -वंचितांचे प्रश्न दुर्लक्षित  राहीले आहेत. बोलायचं खूप, घोषणा मोठ्या आणि काम मात्र छोटं. त्यामुळे, वंचित  समाजघटक अन्याय-अत्याचारापासून संरक्षण मिळावे, सामाजिक आर्थिक न्याय व्हावा यासाठी संघर्ष करतो आहे. मीडिया मध्ये मात्र राजकाय घटनांचीच चर्चा अधिक होत असते. सामाजिक, आर्थिक व  शैक्षणिक प्रश्नांना दुय्यम स्थान मिळत असल्याचे चित्र  दिसत आहे.


3.   सर्वांना माहीत आहे की,   स्वातंत्र्याच्या राजकीय चळवळीचे  नेतृत्व काँग्रेस व अर्थातच महात्मा गांधी यांचेकडे होते.  त्याच काळात, डॉ. बी. आर. आंबेडकर हे   सामाजिक स्वातंत्र्याच्या चळवळीचे नेतृत्व करीत होते. ब्रिटिश सरकारच्या साऊथबेरो कमिशन, सायमन कमिशन, गोलमेज परिषद, पुणे करार, संविधान निर्मिती इत्यादी ऐतिहासिक घटनांवरून ते प्रकर्षाने दिसून येते. सामाजिक व आर्थिक स्वातंत्र्याशिवाय  माणसाला  न्याय मिळणार नाही आणि   इतर प्रगत समाजासोबत येण्याची संधी सुद्धा नाही.  नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचे रक्षण करण्याची जबाबदारी कार्यकारी यंत्रणा व न्यायालयावर  सोपविण्यात आली. सर्वांना समान संधी देतांना जे सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास आहेत, त्यांना संविधानाने विशेष संधीचे तत्व लागू केले. 


4.    भारताला स्वातंत्र्य मिळालेच पाहिजे, ब्रिटिशांच्या गुलामीतून मुक्त झालो पाहिजे ही भूमिका डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वेळोवेळी घेतली. डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, "प्रत्येकाने स्वजनासोबतच देशाविषयीची जबाबदारी पार पाडली पाहिजे. देशास सर्वोच्च स्थान आहे. भारत स्वतंत्र झाला पाहीजे अशी आमची इच्छा व प्रयत्न आहे.  त्रिमंत्री योजनेत आमची उपेक्षा केली गेली असली तरी देशाला स्वातंत्र्य मिळविण्याच्या मार्गात अडचणी निर्माण करायच्या नाहीत ही जाणीव ठेवूनच मी वागत आलो आहे. भारताला स्वातंत्र्य संपादन अधिक सुलभतेने करता आले पाहिजे याच भावनेने व जाणिवेने मी आतापर्यंत बरीच भाषणे केली आहेत". हे बाबासाहेबांचे स्वातंत्र्य प्राप्तीसाठीचे योगदान आहे. बालपणापासून बाबासाहेब यांचे वाट्याला  आलेले कटू अनुभव बोलके आहेत. शिक्षणासाठी  भोगलेले अपमानित जीवन व त्रास, भारतातील जातीव्यवस्था, अस्पृश्यता, अधिकार वंचितता, शोषण, माणूस म्हणून प्रतिष्ठा नाही, गुलामी, असहायता , अमानवीय वागणूक हे सगळं त्यांनी अनुभवलं. म्हणूनच, राजकीय स्वातंत्र्यासोबत  सामाजिक व आर्थिक  स्वातंत्र्याची चळवळ  भक्कमपणे व यशस्वीपणे चालविली आणि  परिवर्तन घडवून आणले. ब्रिटिशांशी व  स्वकीयांशी सतत संघर्ष केला. इतिहास साक्षी आहे.   म्हणूनच, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे या देशाचे महानायक, युगपुरुष ठरलेत. ज्ञान, चारित्र्य, त्याग,  कर्तृत्व, स्वाभिमान, देशप्रेम इत्यादी मुळे जागतिक नेते म्हणून त्यांचा गौरव होतो आहे. भारतीय  स्वातंत्र्यांचे  75 वर्ष साजरे करताना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे  स्वातंत्र्य चळवळीतील योगदानाची व संविधानिक नैतिक मूल्यांची, सोबतच त्यांचे जीवन व कार्याची चर्चा होणे आवश्यक आहे. 


5.      स्त्रियांना राजकीय स्वातंत्र्य मिळाले. कोणताही संघर्ष न करता मताधिकार मिळाला.  मात्र, स्त्रियांच्या सामाजिक व आर्थिक स्वातंत्र्याचा प्रश्न अजूनही  आहेच. जातीयतेमुळे, धार्मिकतेमुळे आंतरजातीय विवाहास विरोध होतोच आहे. जीवनाचा जोडीदार निवडण्याचे स्वातंत्र्य मुलींना मिळत नाही. खरं तर, हे सामाजिक स्वातंत्र्य आहे, ते मिळालेच पाहिजे. परंतु यासाठी प्रोत्साहन तर नाहीच उलट विरोध होतो. अशा विवाहित जोडप्यांना खूप त्रास सहन करावा लागतो, जीवही घेतला जातो. पुरुषसत्ताक पद्धत्तीचे वर्चस्व आजही आहे. स्त्रीला घरच्या निर्णयात अजूनही पुरेशे स्वातंत्र्य मिळत नाही.  घरघुती हिंसाचार थांबविण्यासाठी 2005 मध्ये कायदा करावा लागला. कशाचे लक्षण आहे हे? सामाजिक-आर्थिक गुलामीत आजही मोठा वर्ग आहे.  समानतेच्या अधिकारापासून वंचित आहे. संविधानाने दिलेल्या सामाजिक स्वातंत्र्यापासून वंचित आहे. राजकीय स्वातंत्र्य जरी लाभले तरी सामाजिक व आर्थिक स्वातंत्र्य प्राप्तीसाठी लढण्याची गरज आहे.


6.       स्वातंत्र्य मिळाल्यानंतर  देशाच्या विकासाचे नियोजन आणि अंमलबजावणी संविधानाच्या प्रास्ताविकेतील मूल्ये लक्षात घेऊन सुरू झाली.  या 75 वर्षातील प्रगतीचे, कामकाजाचे निरपेक्ष मूल्यमापन केले तर लक्षात येईल की, अलीकडच्या काळात राजकारणाचे गुन्हेगारीकरण झपाट्याने होत आहे. संसदेत, विधिमंडळात  गंभीर गुन्हे असलेल्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकानांही प्रवेश  मिळू लागला आहे. सर्वच राजकीय पक्ष कमी-अधिक प्रमाणात, सत्ता-संपत्तीच्या प्राप्तीसाठी  अनेक भ्रष्ट, पैसेवाले-धनिक, भांडवलदार तसेच  गुन्हेगार -गुंड प्रवृत्तीच्या लोकांना  निवडणूकीत उभे करतात. सर्वच प्रकारच्या बळाचा वापर करून  निवडणूक जिंकतात, काही मंत्री सुद्धा होतात.  ज्यांना जेल मध्ये असायला पाहिजे ते लोकप्रतिनिधी व मंत्री झाले तर देशाचे भले कसे होणार?  कायद्यांचे राज्य (Rule of Law) कसा प्रस्थापित होईल? अशाच्या संरक्षणासाठी पोलीस  असतात. गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकप्रतिनिधी-मंत्र्यास सर म्हणावे लागते,  सॅल्युट करावे लागते. पोलिस सर्वसामान्यांचे मित्र नाही होऊ शकले.  सिव्हिल सेवेतील बरेचसे अधिकारी - कर्मचारी हतबल होताना आपण पाहतो.  भ्रष्टाचार फोफावण्याचे हे एक प्रमुख कारण आहे.  हे  थांबविता येणे शक्य आहे.  सर्व राजकीय पक्षांनी निर्णय करायचा व निवडणूक कायद्यात अपेक्षित दुरुस्ती करायची जेणेकरून भ्रष्टाचारी, गुन्हेगारी व्यक्ती लोकप्रतिनिधी होणार नाही.  संविधानिक नीतिमत्ता पाळावी लागेल. मात्र, राजकीय पक्ष हे करणार नाहीत. 


7.         काही अपवाद सोडले तर पूर्वी जे  सामान्य किंवा प्रतिकूल आर्थिक परिस्थितीत जीवन जगत होते ते राजकारणात आल्यावर, नेते झाले की,  अल्पकाळातच श्रीमंत झालेत, पॉवरफुल झालेत. भ्रष्टाचारी कृत्य केल्याशिवाय एवढी संपत्ती खरंच येईल का? सत्ता-संपत्तीसाठी काहीपणच्या वृत्ती व कृती मुळे संविधानिक व्यवस्था बिघडविण्यासाठी हेच नेते कारणीभूत ठरतात. असे म्हणतात, Power corrupts and absolute power corrupts absolulately. सत्तेचे केंद्रीकरण मंत्रालयात झाले  आणि अनियंत्रितपणे सत्तेचा वापर सुरू झाला. राजकारणाचे गुन्हेगारीकरण तर मोठ्या प्रमाणात झालेच, सोबतच सिव्हिल सर्विसेसचे ही राजकीयकरण मोठ्या प्रमाणात  होऊ लागले आहे. बदल्या, पदोन्नती,  लाभाची पदे, सेवानिवृत्तीनंतर सुद्धा पदे या लालसेपोटी मोठ-मोठे अधिकारी जे UPSC /MPSC च्या स्पर्धा परीक्षेतून मोठ्या मेहनतीने प्रशासनात आलेत ते लाचार  होऊ लागलेत, राजकीय नेते, लोकप्रतिनिधी, मंत्री यांच्यासमोर शरणागती पत्करु लागलेत.  होयबा, येस्स सर, सांगकामे झाले. यामुळे भ्रष्टाचार, भाईभतीजावाद, जातीयवाद इत्यादी नवनवीन रुपात उफाळून येऊ लागला. प्रशासकीय सुधारणा, सिव्हिल सर्विस रिफॉर्मच्या अहवालात या बाबींचा उल्लेख केला गेला आहे. 


8.         जर  विभागाचा मंत्री, सचिव, जिल्ह्याचे कलेक्टर, सीईओ, पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्त, म्युनिसिपल आयुक्त, विभागीय आयुक्त आणि राज्यस्तरीय विभागाचे आयुक्त, संचालक आणि विभाग प्रमुख-कार्यालय प्रमुख, एसडीओ, तहसीलदार, बीडीओ, ठाणेदार आपले कर्तव्य  आणि  संविधानिक जबाबदारी  इमाने इतबारे -नीटपणे  वेळेत पार पाडू लागले तर भ्रष्टाचाराला   नक्कीच आळा आणता येतो. मी प्रशासकीय सेवेत आलो 1982-83 ला, तेव्हा वाटायचे हे सर्व अधिकारी चुकीचे वर्तन करूच शकत नाही. कारण त्या त्या स्तरावर ते सरकार आहेत आणि सरकार अन्यायकारी कसे असू शकते?  काही वर्षांनी कळायला लागले की यापैकी काही इमानदार तर काही भ्रष्टाचारी आहेत.  माझ्या पाहण्यात  भ्रष्टाचारी  संख्येने कमी आहेत पण व्यवस्था बिघडविण्यास पुरेसे आहेत. सनदी अधिकारी भ्रष्टाचारी वर्तन करू शकतात यावर विश्वास बसत नाही. कारण हे तर देशसेवेसाठी प्रशासनात आलेत. परंतु, वास्तव हे आहे की  अनेक सनदी अधिकारी  आजही ब्रिटिश काळातील अधिकाऱ्यांसारखे जुलमी वर्तन करतात. हे सारे संविधानिक संस्था प्रभावहीन व खिळखिळ्या करण्यात,  देश बिघडविण्याचे कामात  भूमिका बजावत आहेत. नकारात्मकता बाळगणारे,   तटस्थ असणारे, निष्क्रिय राहणारे सुद्धा तेवढेच  जबाबदार  आहेत.  मंत्रालयात, विभागाचे मंत्री व सचिव यांचेकडे सर्व सत्ता एकवटली आहे.  कोणाला कुठे नेमायचे, कोणाला  संरक्षण द्यायचे,  कोणाला अडचणीत आणायचे हे मंत्रालयात ठरते.  ह्या सर्व गोष्टींची परिणीती म्हणजे  सामाजिक आर्थिक न्यायाचे तत्व  प्रथम प्राध्यान्य क्रमवारीत  कधीच आले नाही. राजकीय नेते, नौकरशाही, ठेकेदार, दलाल आणि गुन्हेगार यांची अभद्र युती शासन प्रशासनात  प्रभावी ठरत आहे. शासन - प्रशासनाचा  सामान्य माणसाशी नियमित संवाद नाही, कार्यालयात  सन्मान मिळत नाही. 


9.         सेवेत असताना वर्तनुकीच्या नियमाचे बंधन सांगून चूप राहणारे  सनदी अधिकारी आणि न्यायाधीश सेवानिवृत्तीनंतर मात्र  लोकशाही व्यवस्थेच्या वाईट कारभाराबाबत, भ्रष्टाचाराबाबत बोलू लागतात, चिंता व्यक्त करतात. पदांवर असताना जे अधिकारी चांगले घडावे, साफ व स्वच्छ पद्धतीने काम व्हावे, भ्रष्टाचार  व शोषण थांबावे, शोषित वंचितांना न्याय मिळावा यासाठी प्रामाणिकपणे, संविधानाचा उद्देश लक्षात ठेवून काम करतात, त्यांना त्रास सहन करावा लागतो, ते व्यवस्थेचे बळी ठरतात. माझा वैयक्तिक अनुभव असून  मी लिहिलेल्या "आणखी, एक पाऊल" आणि "प्रशासनातले समाजशास्त्र" या पुस्तकात  काही अनुभव लिहिले आहे. हे मान्य करावेच लागेल की समतेसाठी, न्यायासाठी,  सामाजिक प्रतिनिधित्वाची संधी संविधानात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आली.  सामाजिक-आर्थिक स्वातंत्र्य मिळाले. चिंता ह्या गोष्टीची वाटते की संविधानाने दिलेली  सामाजिक प्रतिनिधित्वाची संधी घेऊन  लोकप्रतिनिधी झालेले आणि  प्रशासनात आलेले- शासनकर्ती जमात शोषणकर्ती झाली तर कसे होईल ? संविधानाचा पराभव आणि संविधानाला धोका यांच्यामुळेही आहे हे ही समजून घेऊन, त्यावर उपाय शोधण्याची गरज आहे. 


10.         स्वातंत्र्य प्राप्तीसाठी अनेकांनी बलिदान दिले, शहिद झालेत. इतिहास आपलेसमोर आहे. देशभक्ती- देशप्रेम हाच जजबा होता. आता, त्याची जागा  सत्ता संपत्ती  घेवू लागली आहे आहे.  ऑल इंडिया सर्विस -IAS/IPS चे अधिकारी हे निस्पृहपणे देश घडविण्याचे काम करतील असा दृढ विश्वास सरदार वल्लभभाई पटेल यांना होता. म्हणूनच त्यांनी  संविधान सभेत यासाठी आग्रह धरला होता. या सेवेतील अधिकारी यांना संविधानिक संरक्षण देण्यात आले, सोयी-सुविधा, सन्मान, सामाजिक प्रतिष्ठा व ओळख मिळाली. तेव्हा, किती अधिकारी सचोटी-इमानदारी,  कर्तव्यनिष्ठ,  स्वाभिमानी आणि कमकुवत समाजघटकांसाठी तळमळीने काम करणारे आहेत, ह्याचे सोशल ऑडिट झाले पाहिजे. लॉबी, गट-तट  करणे IAS/IPS यांना शोभत नाही. किती सनदी अधिकारी यांचा पाठीचा कणा ताठ आहे ? कशासाठी लाचारी व हुजरेगिरी ? कशाची कमी आहे? सरकार सगळंच तर देते, बंगला, गाडी ,सुविधा, चांगला पगार सुद्धा.  तरीपण भ्रष्ट्राचार ? भ्रष्टाचार मुक्त कार्यालय असे अभियान सरकारने राबवावे. शासकीय काम होण्यास विलंब लागणार नाही. वर्षानुवर्षे  केसेस चालू राहतात, निर्णय होत नाही, यात सुधारणा होईल.  प्रतिष्ठित व प्रभावशाली यांच्यासाठी लोकशाहीच्या संस्था जसे तत्परतेने काम करतात तसे सामान्य माणसासाठी - मागासवर्गासाठी का करीत नाही?  जोपर्यंत या देशातील कायदेमंडळ, कार्यापालिका, न्यायपालिका मधील लोक  संविधान व कायद्यास  एकनिष्ठ होऊन, कोणत्याही प्रकारच्या, कोणाच्याही दबावास बळी न पडता, आपली जबाबदारी पूर्ण क्षमतेने पार पाडणार नाहीत तोपर्यंत  राजकिय लोकशाहीचे  सामाजिक  व आर्थिक लोकशाहीत रूपांतर होणार नाही.  मीडियाचे काम ही याच दिशेने झाले पाहिजे. 


11.         भारत हा आमचा देश आहे. आम्ही भारतीय नागरिक आहोत. संविधानाने ही ओळख दिली आहे.  लोक सार्वभौम आहेत. लोकांनीच निवडून दिलेले राज्यकर्ते झालेत. आमच्यातीलच  काही समाजसेवेने-देशसेवेने प्रभावित होऊन सनदी अधिकारी झालेत. आमच्यातील काही न्यायाधीश झालेत. संविधानाने दिलेल्या संधीमुळे हे शक्य झाले आहे .भविष्यातही होत राहतील कारण ही संविधानाची व्यवस्था आहे.  तेव्हा, संविधानानुसारच काम हाच निर्धार पूर्णत्वास नेला पाहिजे. देश हितास सर्वोच्च स्थान न दिल्यास व त्यासाठी नीटपणे कार्य न केल्यास  देश पुन्हा पारतंत्र्यात जाऊ शकतो असा इशारा  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दि. 25 नोव्हेंबर1949 च्या, संविधान सभेतील भाषणात दिला आहे.  भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव - 75 वी साजरी करताना, महात्मा गांधी, पंडित नेहरू, सरदार पटेल, मौलाना आजाद इत्यादी नेत्यांचे स्मरण व गुणगान करित असताना, वर उपस्थित केलेल्या वास्तवाकडे दुर्लक्ष होऊ नये हीच अपेक्षा.  लोकशाही बळकट व समृद्ध करणे, शोषण मुक्त,  भ्रष्ट्राचार मुक्त, जातियता मुक्त भारत देश,  विकसित समृद्ध व सामर्थ्यशाली देश घडविणे आपले सर्वांचे, नागरिक म्हणून कर्तव्य आहे.  देशाला स्वातंत्र्य मिळावे आणि मिळालेले स्वातंत्र्य टिकून राहावे  म्हणून देशासाठी   बलिदान दिलेल्या, शहिद झालेल्या सर्वांनाच ही आदरांजली ठरेल.  ज्यांनी ही जी दुरावस्था निर्माण केली आहे त्यांनीच  ती नीट करावी  म्हणजे "बलिदान व्यर्थ जाणार नाही".  1857 चा जसा उठाव झाला होता तसा  उठाव संविधानिक मार्गाचा अवलंब करून शोषकर्त्यांविरुद्ध होण्याची गरज आहे. स्वातंत्र्य टिकविण्यासाठी सरकारच्या अन्याय-अत्याचाराविरुद्ध नागरिकांना बोलावे लागेल, लढावे लागेल. आवाज करावा लागेल. 


12.        सामाजिक स्वातंत्र्य प्राप्तीसाठी, बंधनातून मुक्तता, गुलामीतून मुक्तता, जातीयवादातून मुक्तता, अनिष्ट रूढी परंपरेतून मुक्तता,अंधश्रद्धेतून मुक्तता मिळणे आणि मिळवून घेणे आवश्यक आहे. संविधानाने सहा फ्रीडम दिले आहेत. तेव्हा, जात, धर्म, वंश, लिंग, भाषा, प्रांत असा कोणताही भेदभाव न करता हे स्वातंत्र्य विधायकपणे उपभोगता आले पाहिजे. तरच व्यक्तीचा विकास व प्रगती होईल. स्त्री स्वातंत्र्यासाठी खूप काम करण्याची गरज आहे. व्यक्तीचा आत्मसन्मान, प्रतिष्ठा, खूप महत्वाचे आहे.   देशाला संपूर्ण स्वातंत्र्य मिळावे यासाठी ज्यांनी आंदोलने केलीत, जेलमध्ये गेले, बलिदान दिले, शहिद झालेत, त्यांना आपला भारत सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणतंत्र भारत,  विकसित, शक्तिशाली, समृद्ध भारत घडवायचे होते. हेच आपले ध्येय आहे.


13.         अनुभव असा आहे की प्रत्येक क्षेत्रात-प्रशासनात सत्यासाठी, न्यायासाठी, समतेसाठी लढणारे लढवय्ये  आजही आहेत. संसदीय लोकशाही  व्यवस्थेतील राज्यकर्ते- सत्ताधाऱ्यांनो,  तुम्ही त्यांना लढू द्या, साथ द्या, नाउमेद करू नका. त्यांना मोकळीक द्या, हस्तक्षेप करू नका, सन्मान करा.  चांगले करताना  काही चुकलेच तर समजून घ्या, माफ करा, मनोधैर्य वाढवा म्हणजे  चांगलेच करून दाखवतील. कारण ते वैयक्तिक स्वार्थात  गुरफटले नाहीत. सत्ता -संपत्तीचा  मोह नाही तर समाजहितासाठी, व्यक्तीचे कल्याणासाठीचा त्यांना ध्यास आहे, त्यासाठी त्यांची धडपड व प्रयत्न आहे. अशाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा. जे वाईट हेतूने स्वतःच्या स्वार्थासाठी  पदाचा व अधिकाराचा दुरुपयोग करतात त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे परंतु  अपवाद वगळता असे होताना दिसत नाही. जिल्ह्याचे अधिकारी  महिन्यातून 8-10 दिवस तरी दौऱ्यावर गेले पाहिजे,  गावागावात गेले पाहिजे , विकास कामांची तपासणी केली पाहिजे, लोकांशी बोलले पाहिजे.  असे पुन्हा आदेश सरकारने जारी करावे.  पूर्वी होते. दौऱ्या बाबत वरिष्ठ विचारायचे.  प्रलंबित कामांचा आढावा होत असे. संवाद व्हायचा.  हे सगळं शक्य आहे. आम्ही प्रशासनात असताना हे केले आहे.  आता, व्हिसी वर सगळं चाललं आहे. आपत्ती विषयक परीस्थिती वगळता,   नियमितपणे गावात जाणारे  सनदी अधिकारी किती आहेत?  मागासवर्गीयांच्या वस्तीला भेट देऊन त्या लोकांशी संवाद साधणारे अधिकारी किती आहेत?  संवाद कमी झाला आणि प्रश्नांचे गांभीर्य हरपले. अनास्था निर्माण झाली. म्हणूनच Good  Governance दिसत नाही.  फक्त बोलून होणार नाही, करून दाखवावे लागेल.


14.         हे ही मान्य केले पाहिजे की सगळंच चांगलं नसलं तरी सगळंच वाईट नाही. आजची स्थिती  प्रतिकूल व गंभीर आहे हे  माहीत असूनही, देशभक्तीची प्रबळ भावना असणारे ,  संविधानाने दिलेल्या संधीचा उपयोग समाजसेवा आणि देशसेवा घडावी यासाठी  निस्पृहपणे, स्वाभिमानाने, हिंमतीने  कार्य  करीत आहेत. अशा सर्व  सनदी अधिकारी- कर्मचारी,  न्यायाधीश, नेते व नागरिक यांचे  या निमित्त्य मनापासून अभिनंदन आहे.


(Note: Malice to None)


*स्वातंत्र्य दिनाच्या  देशवासियांना शुभेच्छा !!!*


संकलन,,,,, गजानन गोपेवाड 

13 आँगष्ट राजमाता आहिल्या बाई होळकर यांची आज स्मृतिदिन

 ***********************************

*१३ ऑगस्ट - राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मृतिदिन*

***********************************

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

जन्म - ३१ मे १७२५ (चौंडी,नगर जिल्हा)

मृत्यू - १३ ऑगस्ट १७९५ (इंदूर)


पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा आज स्मृतिदिन.


मराठय़ांच्या इतिहासात अनेक पराक्रमी सरदार होऊन गेले. त्यामधील होळकर घराण्यातील अहिल्यादेवींचे नाव आजही अनेकांच्या तोंडावर आहे. अहिल्यादेवींना ‘पुण्यश्लोक’ असेही म्हणतात. कारण त्यांनी केलेले सामाजिक कार्य आजही अनेकांसाठी आदर्शवत असेच ठरले आहे.


राजे-रजवाड्यांचे इतिहास जगभर घडले आहेत. पुरुष-प्रधान व्यवस्थांत केवळ भारतातच नव्हे तर जगभर स्त्रीयांचे दमनच झाले असल्याचे आपल्याला दिसते. जगात राण्या-महाराण्या झाल्या असल्या तरी त्या शेवटी कर्तुत्वाने म्हणा कि कोणा महाराजाची पत्नी होती म्हणुन म्हणा प्रसिद्ध आहेत पण त्या इतिहासावर स्वत:चा असा स्वतंत्र ठसा उमटवू शकलेल्या नाहीत. यच्चयावत जगात अपवाद असणारी एकमेव महाराणी म्हणजे अहिल्यादेवी होळकर. यात कसलीही अतिशयोक्ती नाही. 


होळकर घराण्याचा कट्टर शत्रू माल्कम आपल्या मध्यप्रदेशातील आठवणींत म्हणतो, "सर्व प्रकारच्या मर्यादा पेशव्यांपासून ते हिंदू सनातन्यांनी घातलेल्या असुनही अहिल्यादेवींनी ज्या पद्धतीने २८ वर्ष प्रजेच्या हिताचे उत्कृष्ठ प्रशासन केले त्याला जगात तोड सापडनार नाही. माळव्यातीलच नव्हे तर जिथे तिचा प्रत्यक्ष कारभारही नव्हता अशा हिंदुस्थानातील सर्वच प्रजा तिला दैवी अवतार मानते. याचे कारण म्हनजे अहिल्यादेवींची प्रजानिष्ठा, आत्मशुद्धता आणि सर्व कल्याणासाठीची अविरत धडपड होय!" 


प्रख्यात इंग्रजी कवयत्री जोआना बेलीने तर अहिल्यादेवींवर नितांत सुंदर कविताच लिहिली. एक लक्षात घ्यायला हवे कि एकोणिसाव्या शतकात युरोपात स्त्रीमुक्तीची जी चळवळ सुरु झाली तिला अहिल्यादेवींपासून प्रेरणा मिळाली. याचा आम्हाला अभिमान वाटायला हवा.


मल्हारराव होळकर हे रत्नपारखी. मल्हाररावांची गाठ पोरसवदा अहिल्यादेवींशी पडली. त्यांच्या उत्तम संस्काराकडे बघून त्यांनी आपला पुत्र खंडेरावासाठी तिचा हात नि:संकोचपणे मागितला. खंडेराव होळकरांशी अहिल्यादेवींचा विवाह झाला. सासरा बनलेल्या मल्हाररावांनी आपल्या सुनेला हौसेने लिहा-वाचायला शिकवले. खंडेराव हे मल्हाररावांचे म्हनजेच मराठ्यांचे दिल्ली दरबारातील राजकीय मुत्सद्देगिरीला सांभाळत राज्यकारभारही पहात असत. मोहिमांतही भाग घेत. कुंभेरीच्या वेढ्याच्या बिकट प्रसंगी खंडेरावांचा तोफेचा गोळा लागुन मृत्यु झाला. अहिल्यादेवींनी तत्कालीन समाजव्यवस्थेला अनुसरुन सती जायची तयारी केली. त्या प्रसंगी मल्हाररावांनी जो विलाप केला तो वाचुन कोणाही सहृदय माणसाच्या डोळ्यांत पाणी आल्यावाचुन राहणार नाही. अहिल्यादेवींनी सती जायचा विचार रद्द केला.


अहिल्यादेवींची राजकीय कारकीर्द तेंव्हापासुनच सुरु झाली. खंडेरावाची जागा अहिल्यादेवींनी घेतली. मल्हारराव देशभर मोहिमांत व्यस्त असत. सासरा-सुनेतील पत्रव्यवहार हा अहिल्यादेवींच्या राजकीय विचारीकतेचा उत्कृष्ठ नमुना होय. अहिल्यादेवींना मल्हारराव तोफा-दारुगोळ्याची मागणी ते ज्या मार्गाने ते मोहिम चालवणार आहेत त्याच्या रक्षणाच्या सुचना अहिल्यादेवींना जसे देतांना दिसतात तसेच अहिल्यादेवी आपल्या सासऱ्याला सल्ले देतांनाही दिसतात. सासरा सुनेचे ऐकेल हा तो काळ नव्हता, आताही फारसा नाही. परंतू मल्हाररावांसारखा मुत्सद्दी अहिल्यादेवींचे सल्ले अंमलात आणत होता यावरुनच अहिल्यादेवींची योग्यता लक्षात येते.


१७६६ साली मल्हाररावांचा वृद्धापकाळाने मृत्यु झाला. दरम्यानच्या काळात अहिल्यादेवींनी स्त्रीयांना लष्करी प्रशिक्षण देणारे विद्यालय सुरू केले होते. घोडेस्वारी ते शस्त्रास्त्र प्रशिक्षण या विद्यालयात दिले जात असे. तत्कालीन स्थितीत ही एक जागतीक क्रांतिकारी घटना होती. घराबाहेर पडायला जेथे बंदी तेथे महिला शस्त्रचालक बनणार ही कल्पनाही त्या काळात कोणी करु शकत नव्हते. स्वत: अहिल्यादेवी उत्कृष्ठ योद्धा होत्या. महिला अबला नाहीत हे त्यांनी स्वकर्तुत्वातून सिद्ध केले असले तरी सर्व महिला शक्तीवर त्यांचा विश्वास होता. त्यांची स्वत:ची ५०० महिला सैन्याची पलटन उभी होती. अहिल्यादेवींचे प्रशासन हे ब्रिटिशांनाही आदर्शभुत ठरले. 


सर्व देशात जेंव्हा दांडगाईचे राज्य होते, कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नव्हता त्या काळात अत्यंत सुरळीत चालणारे एकमेव राज्य म्हणजे माळवा होते. सर जदुनाथ सरकार म्हणतात, "सर्व मुळ कागदपत्रे व पत्रव्यवहार पाहिल्यानंतर माझी अशी खात्री बनली आहे कि अहिल्यादेवींखेरीज महादजी शिंदे उत्तरेत कसलेही स्थान निर्माण करु शकले नसते, एवढ्या उच्च दर्जाची राजकीय धोरण असलेली ही महिला होती." 


अहिल्यादेवींनी शेतसारा असो कि शेतीसाठीचे पाणी वाटप, यासाठी नुसते बंधारे घालुन दिले नाही तर एक उत्कृष्ठ प्रशासकीय व्यवस्था घालुन दिली. राज्यात तीर्थयात्री येत. भिल्लादि समुदाय उपजिविकेसाठी नाईलाजाने वाटमा-या करत. अहिल्यादेवींनी त्यांना शिक्षा देण्यापेक्षा विधायक मार्ग निवडला. त्यांच्या गुन्ह्यांमागील कारण शोधले आणि "भिल्लाडी" ही अभिनव पद्धत सुरु केली. या पद्धतीत यात्रेकरुंना संरक्षण देण्याचे काम भिल्लांवरच सोपवले आणि यात्रेकरुंकडुन त्यासाठीचा कर घ्यायची अनुमती दिली. यामुळे यात्रेकरुही निर्धास्त झाले व भिल्लांनाही उपजिविकेचे साधन मिळाले. हा क्रांतीकारी निर्णय फक्त प्रजाहितदक्ष व्यक्तीच घेवू शकत होती. आणि तो अहिल्यादेवींनी घेतला. जगातील हे पुन्हा पहिले उदाहरण आहे.


हैदराबादचा निजाम म्हणतो, "Definitely no woman and no ruler is like Ahilyabai Holkar." अहिल्यादेवींबद्दल लिहावे तेवढे कमीच असते. त्या महान शिवभक्त होत्या. पण धर्माच्या पलीकडेही मानवी जग असते याचे भान त्यांना होते. मोरोपंत (केकावलीप्रसिद्ध) ते अनंत फंदी यासारख्यांच्या जीवनात एका शब्दाने बदल घडवून आणण्याचे नैतीक सामर्थ्य त्यांच्यात होते. स्त्रीयांना शक्ती द्यायची तर त्यांना शस्त्रही चालवता आले पाहिजे असा क्रांतिकारी विचार करणाऱ्या त्या पहिल्या पुरोगामी महिला होत्या. स्वत: त्या लिहा-वाचायला शिकलेल्या होत्याच, सर्व स्त्रीयांनाही लिहा-वाचायला यायला हवे हा त्यांचा हट्ट होता. पुढे क्रांतिज्योति सावित्रीबाइंनी त्यांची परंपरा अविच्छिन्न ठरवली.


उत्कृष्ठ नागरी व लश्करी प्रशासक, नैतीकतेची आदर्श बिंदू, देशव्यापक विचार करत प्रत्यक्ष कृती करणारी, तुलनेने अल्प भुभाग स्वत:चा असुनही, एकमेव शासिका, विस्कळीत झालेल्या, अवमानित झालेल्या हिंदू धर्मात पुन्हा प्राण ओतणारी दुर्गा म्हणुन अहिल्यादेवींचे भारतीय इतिहासातील स्थान एकमेवद्वितीय महिला म्हणुन कायमच राहील.


पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या चरणी विनम्र अभिवादन.....!

🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

संकलन -)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

**********************************

प्रभात दर्शन

 🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

श्रावण मास,शुक्ल पक्ष, *पँचमी*,हस्त नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,वर्षा ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

शुक्रवार, १३ आॕगष्ट २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                        *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


उत्सवे व्यसने चैव

             दुर्भिक्षे राष्ट्र विप्लवे।

राजद्वारे श्मशाने च

            यतिष्ठति स वान्धवः।।


*भावार्थः- सच्चा मित्र वही होता है, जो अच्छे समय, बुरे समय, सूखा, दंगा, युद्ध, राजा के दरबार में और मृत्यु के बाद भी साथ खड़ा हो ।*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🐍🐍🐍श्री नाग पँचमी🐍🐍🐍*

गुरुवार, १२ ऑगस्ट, २०२१

गालफुगी कशामुळे होतो


══════════════════════

    @ संकलन @गजानन गोपेवाड 


══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════

📕 *गालफुगी कशामुळे होते ?* 📕


तुमच्या एखाद्या मित्राचा वा तुमचा गाल अचानक सुजला असेल. शाळेत यायची तुम्हाला लाजही वाटली असेल, कारण हनुमानासारखे गाल फुगलेले असतील. याला गालफुगी असे म्हणतात; पण ती का होते ते आपण पाहू.

गालपुगी अर्थात मम्स हा एक रोग असून तो मिक्झो या विषाणूमुळे होतो. हा विषाणू लाळ तयार करणाऱ्या गालातील ग्रंथीवर आक्रमण करतो. मज्जासंस्थेवरही आक्रमण करू शकतो. यात गालावर सूज, तोंड उघडायला त्रास, वेदना, कानात दुखणे, ताप अशी लक्षणे बघावयास मिळतात. हा रोग ५ ते १५ वर्षांपर्यंतच्या मुलांमध्ये होतो. तसा हा रोग आपोआप ८-१० दिवसांत बरा होतो. त्यामुळे तापासारख्या लक्षणासाठी औषध देता येते. या विषाणूंना मारण्यासाठी विशिष्ट औषध नाही. या आजारात फारशा गंभीर गुंतागुंती होत नाहीत, त्यामुळे काळजी करण्याचे कारण नसते..


हा रोग होऊ नये, यासाठी एक ते दीड वर्षांच्या मुलांना प्रतिबंधक लस देता येते. गालफुगी हा एक सौम्य प्रकारचा विषाणूजन्य रोग आहे. त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही. तो आपोआप बरा होतो. गालफुगी झालेल्या मुलामुळे दुसऱ्यांना संसर्ग होऊ नये व गुंतागंती होऊ नयेत म्हणून मुलाला शाळेत न पाठवणेच योग्य. श्वासांद्वारे हा रोग पसरतो. गाल सुजण्याआधी ४ ते ६ दिवस व नंतर आठ दिवस रुग्णापासून हा रोग दुसऱ्याला होऊ शकतो.


*डाॅ.अंजली दिक्षित व डाॅ.जगन्नाथ दिक्षित*

*यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' पुस्तकातून*

═══════════════════════

खुदिराम बोस बलिदान दिवस

 *************************************

                    *११ ऑगस्ट*

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

*खुदिराम बोस बलिदान दिवस*

*************************************


जन्म - ३ डिसेंबर १८८९ (बंगाल)

स्मृती - ११ ऑगस्ट १९०८ (मुझफ्फरपुर)


भारतातील सर्वात तरुण वयाचा क्रांतिकारक म्हणून ओळखला जाणारा हा वीर वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी शहीद झाला. त्याचा जन्म बंगाल मधल्या मेदिनीपूर जिल्ह्यातल्या बहुवेनी या गावात ३ डिसेंबर १८८९ ला झाला.


त्याच्या लहानपणीच आई लक्ष्मीप्रियादेवी आणि वडील त्रैलोक्यनाथ यांचा मृत्यु झाल्याने त्याची मोठी बहीण अनुरूपादेवी आणि तिचे पती अमृतलाल यांनी त्यांचे पालनपोषण केले.


बंगाल प्रांताचे विभाजन करण्याचे ब्रिटिश सरकारने १९०३ साली निश्चित केले होते. त्या विरुद्ध सर्वसामान्य लोकांमध्ये नाराजीची तीव्र लाट पसरली. खुदीरामलाही बंगालच्या फाळणीचा निर्णय अन्यायकारक वाटला, देशासाठी काहीतरी करावे असे सारखे वाटू लागल्याने त्यांनी सशस्त्र क्रांतीचा मार्ग पत्करला. सरकारच्या विरूद्ध आंदोलने करणार्‍यांना पकडून कठोर शिक्षा देण्यात येऊ लागल्या. यात प्रमुख असणार्‍या न्यायाधीश किंग्ज फोर्ड ला मारूनच सरकारचा विरोध करण्याचे पक्के करण्यात आले. बंकिमचंद्र चॅटर्जी यांच्या आनंदमठ या कादंबरीतील वंदे मातरम या गीताने लोकांमध्ये नव संजीवनी पसरविली.


यातच खुदीरामने किंग्ज फोर्ड ला मारण्याची जबाबदारी स्वीकारली. ३० एप्रील १९०५ या दिवशी खुदीरामचा सहकारी प्रफुल्ल चक्रवर्ती याने किंग्ज फोर्ड याच्या गाडीवर एक बॉंब फेकला, परंतु तो चुकून दुसर्‍याच एका गाडीवर पडला. त्या गाडीतील दोन महिला ठार झाल्या, किंग्ज फोर्ड मात्र बचावला. या घटनेच्या दुसर्‍या दिवशी खुदीराम पकडले गेले तर प्रफुल्लने अटकेपूर्वीच आत्महत्या केली. खुदीराम यांच्यावर खटला भरण्यात आला. त्याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा शाबीत झाल्याने त्याला दि. ११ ऑगस्ट १९०५ या दिवशी फासावर जावे लागले. सशस्त्र क्रांतीत बॉंबचा उपयोग करणारे खुदीराम बोस हे पहिले क्रांतिकारक ठरले.

🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

संकलन -)गजानन गोपेवाड

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

********************************

प्रभात दर्शन

 🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

श्रावण मास,शुक्ल पक्ष, *चतुर्थी*,उ.फा.नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,वर्षा ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

गुरुवार, १२ आॕगष्ट २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                         *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

            *"हम माने या न माने किन्तु उत्तम जीवन हेतु सफलता का सूत्र यही है कि दूसरों पर ध्यान केंद्रित करके, अपनी महत्वाकांक्षाएं बढ़ाकर, स्वयं के लिए समस्याएं उत्पन्न करने से अधिक उचित है कि स्वयं पर ध्यान केंद्रित करके, उपलब्ध साधनों से ही जीवन को श्रेष्ठ व् सुंदर बनाया जाये।"*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

12 आँगष्ट विक्रम साराभाई जन्मदिवस

 ***********************************

*१२ ऑगस्ट - विक्रम साराभाई जन्मदिन*

***********************************

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

जन्म - १२ ऑगस्ट १९१९ (अमदाबाद)

स्मृती - ३० डिसेंबर १९७१ (कोवालम)


विक्रम अंबालाल साराभाई हे भारतीय भौतिकशास्त्रज्ञ व खगोलशास्त्रज्ञ होते. ते भारताच्या अंतराळ संशोधनाचे पितामह आणि भारताच्या अंतराळ युगाचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात.


विक्रम अंबालाल साराभाई यांचा जन्म अमदाबाद येथील एका संपन्न कुटूंबात १२ ऑगस्ट १९१९ ला झाला. त्यांचे वडील हे एक उद्योगपती होते. त्यांचे बऱ्याच राजकीय व्यक्तिंशी संबध असल्याने रवींद्रनाथ टागोर, जवाहरलाल नेहरू, सरोजिनी नायडू, महात्मा गांधी आदी लोकांचे त्यांच्या घरी जाणे-येणे होते. विक्रम साराभाई यांच्या आई सरलादेवी यांनी आपल्या ८ मुलांच्या शिक्षणासाठी स्वतःची मांटेसरी पद्धतीची शाळा काढली होती. या शाळेतच विक्रम साराभाईचे शिक्षण युरोपातून आलेल्या शिक्षकांद्वारे झाले. त्यांना लहानपणापासुनच गणित आणि भौतिकशास्त्र हे विषय विशेष आवडत होते.


आपले १२ वी पर्यंतचे शिक्षण आटपून १९३७ साली पुढील शिक्षणासाठी ते ब्रिटनमधील केंब्रिज विद्यापीठात शिकायला गेले. पण दुसरे महायुद्ध सुरु झाल्याने ते भारतात परत आले व त्यांनी बंगलोर मधील इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सायन्स मध्ये नोबेल पारितोषिक विजेते सर सी.व्ही. रामन यांच्या मार्गदर्शनाखाली वैश्विक किरणावर संशोधन केले. १९४२ साली त्यांनी भरतनाट्यम, कुचिपुडी या नृत्यकलेत पारंगत असलेल्या प्रसिद्ध नृत्यांगना मृणालिनी साराभाई यांच्याशी विवाह केला. त्यांना कार्तिकेय आणि मल्लिका ही दोन अपत्ये झाली.


१९४५ साली दुसरे महायुद्ध संपल्यावर विक्रम साराभाई ब्रिटनला गेले. १९४७ साली त्यानी ‘कास्मिक रे इंवेस्टिगेशन इन ट्रापिकल लैटीट्यूड्स’ वर संशोधन करून डॉक्टरेट मिळवली आणि त्याचवर्षी ते आपल्या मायदेशी परत आले. भारतात परत येउन त्यांनी ११ नोव्हेंबर १९४७ ला अहमदाबाद येथे भौतिकी संशोधन कार्यशाळा ची स्थापना केली. हे त्यांचे पहिले पाउल होते, पुढे जाऊन अवकाश संशोधनात विक्रम साराभाई यांनी भरीव कामगिरी केली. 


विक्रम साराभाई यांनी अहमदाबाद येथील भारतीय प्रबंध संस्था (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट) स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. १९७५ मध्ये जो पहिला अंतरिक्ष उपग्रह आर्यभट्ट अवकाशात सोडला गेला त्याची रचना विक्रम साराभाई यांच्या अहमदाबाद रिसर्च सेंटर मध्येच केली होती. आर्यभट्टच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर भारताने अनेक उपग्रह अवकाशात प्रक्षेपित केले. या यशामागे साराभाई यांचे अथक परिश्रम, दूरदृष्टी आणि खंबीर नेतृत्व ह्यांचा मोलाचा वाटा आहे.


विक्रम साराभाई यांनी जागतिक किर्ती असलेल्या अनेक सस्थांची सुरवात केली. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट (IIM) ही भारतातील सर्वोत्कृष्ट व्यवस्थापन शिक्षण संस्था डाॅ. साराभाई यांच्या प्रयत्नातुनच उभी राहिली. 


भौतिकशास्त्रातील संशोधनासाठी प्रसिद्ध असलेल्या राष्ट्रीय भौतिकी प्रयोगशाळा (PRL) देखिल डाॅ. साराभाई यांनीच सुरू केली. अहमदाबाद येथे वस्त्रोद्योग निर्मितीस चालना देणारे अहमदाबाद टेक्स्टाईल इंडस्ट्रीयल रिसर्च असोसिएशन (ATIRA) या संस्थेची उभारणी त्यांनी केली. पर्यावरण क्षेत्रात कार्यरत असलेली सेंटर फॅार इन्व्हीरॅान्मेंटल प्लॅनिंग ॲन्ड टेक्नॅालॅाजी (CEPT) ही संस्था देखिल त्यांनी उभारली.


३० डिसेंबर १९७१ साली केरळ राज्यातील कोवालम येथे रात्री झोपेतच ह्रदयविकाराच्या झटक्याने विक्रम साराभाई यांचे निधन झाले.

🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

संकलन -)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

*************************************

कर्माचा सिध्दांत लेखन गजानन गोपेवाड

 #कर्माचा_सिद्धांत


कोणाची ही हाय लावून घेऊ नये, त्याचे भयंकर परीणाम भोगावे लागतात.


काही लोकांना नाही पटणार हा विषय, 

पण ज्यांनी  अनेकांचा तळतळाट घेतलाय आणि त्याचे भोग ते भोगत असतात, त्यांना नक्कीच पटेल, ....


अनेकांनी अनेक कारणांनी तळतळाट दिलेला असतो, ...


जसे की शारीरिक, मानसिक, आर्थिक,.....

अपमानास्पद वागणूक,...

कोणांचे मन दुखावले असू शकते....,कोणावर अन्याय केला गेलेला असतो, .....

कोणाची सामाजिक बदनामी केलेली असते,.....

छळ केलेला असेल, शारीरिक दुखापत केलेली असेल, .......

किंवा प्रेमात गैरफायदा घेतला गेलेला असेल, ......

त्रासाचे कुठलेही कारण असो...


वरील गोष्टींचा समोरच्या व्यक्तीला प्रचंड त्रास होत असतो, तो खूप दु:खी होतो ,त्याचे मनोबल कमकुवत होत असते,  पर्यायाने तो व्यक्ती डिप्रेशन मध्ये देखील जाऊ शकतो, 

जाणुन-बुजून त्रास देणाऱ्या व्यक्तीला हे समजत नसेल कां? 


 पर्यायाने ज्या व्यक्तीला त्रास झालेला असतो त्या व्यक्तीकडुन चमत्कार होत नाही,किंवा  देव देखील शाप देत नाही, पण त्या दुखावलेल्या व्यक्तीकडून  अतिशय तेजस्वी नकारात्मक उर्जा शक्ती निघते व समोरच्या व्यक्तीमधे शोषली जाते,मग समोरच्या व्यक्तीला हाय लागते त्यालाच तळटळाट असं म्हटलं जातं.,


मग ज्याने कोणी त्रास दिलेला असतो त्याचेही कार्य यशस्वी होत नाही, किंबहुना झाले तरी फार काळ टिकत नाही,  सतत अपयश येणे, घरात आजारपण येणे, अशा काहीही घटना घडू शकतात,....


आपण किती खरे आहोत व किती खोटारडे आहोत हे जगात फक्त दोनच व्यक्तिंना माहित असते,एक म्हणजे 


"आंतरात्मा"


दुसरा 


"परमात्मा"


समोरच्याचे मन दुखावले जाणे म्हणजेच पाप लागणे. त्याची परत फेड याच जन्मात करावी लागते. 


 तुम्ही भगवंतावर विश्वास ठेवा अगर नका ठेऊ  तुम्ही अस्तिक असा किंवा नास्तिक,


 चांगल्या वाईट गोष्टींचा हिशोब सव्याज परत करावाच लागतो,


मी  एका पुस्तकात वाचले होते,


राजा धृतराष्ट्राचे शंभरच्या शंभर पुत्र युद्धात मारले गेले,

तेव्हा त्याने श्रीकृष्णाला विचारले की असं का व्हावं?

माझ्या सबंध जीवनात मी असे कोणतेही महान पातक केलेलं नाही,

की ज्याच्या परिणाम स्वरूप सर्वच्या सर्वच पुत्रांचा मृत्यु  आपल्या डोळ्यांसमोर पाहून त्याचे दु:ख सोसणे माझ्या नशिबी  यावे? 


तेंव्हा भगवान श्रीकृष्णाने धृतराष्ट्र राजाला आपले पुर्व जन्म पाहाण्याची दिव्य दृष्टि दिली, 


धृतराष्ट्र राजाने दिव्य दृष्टिद्वारे पाहिले की साधारण पन्नास जन्मापुर्वी  तो एक पारधी होता, आणि पक्षी पकडण्यासाठी त्याने एका वृक्षाला आग लावली होती. आग लागताच बरेचसे पक्षी उडून गेले  मात्र आगीची झळ लागल्याने त्यातील कित्येक आंधळे झाले तर पक्षांची शंभरएक लाहान पिल्ले  उडू न शकल्याने आगीत होरपळून मृत्युमुखी पडली, धृतराष्ट्र राजाची त्या वेळची ती क्रिया होती. त्याच्या कर्माचे फळ कित्येक जन्मानंतर धृतराष्ट्र राजाचे शंभर पुत्र युद्धात मारले गेले तेव्हाच ते पूर्ण झाले. 


कर्म हे फल देऊनच शांत होते,


प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टींचा हिशोब हा होतोच, 

हा प्रत्येकाच्या कर्माचा सिद्धांतच आहे. 

चांगले कर्म चांगले फळ देऊनच शांत होते, वाईट कर्म वाईट फळ देऊनच शांत होते.  फक्त वेळ आणि काळ पुढे मागे होऊ शकतो,

हाच कर्माचा सिद्धांत आहे,


आता आपण ठरवायचे आहे आपले कर्म कसे हवे, 


"जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर॥ 


क्षणिक सुखासाठी अपुल्या, कुणी होतो नितीभ्रष्ट".

संकलन) :-गजानन गोपेवाड 

     🙏धन्यवाद 🙏

सोमवार, ९ ऑगस्ट, २०२१

सिफीलस हा रोग कसा होतो


══════════════════════

   *📒📒📒 @ संकलन @📒📒📒*

  *श्री. गजानन गोपेवाड 

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════

📕 *सिफीलीस हा रोग कसा होतो? त्यावर उपाय काय ?* 📕


सिफीलीस हा एक लिंगसांसर्गिक रोग आहे. ट्रेपोनेमा पॅलीडम नावाच्या जिवाणूंमुळे हा रोग होतो.

झालेल्या व्यक्तीबरोबर शरीरसंबंध ठेवल्यास १० दिवसांनंतर केव्हाही याची लक्षणे दिसायला लागतात. या रोगाचे मुख्य लक्षण म्हणजे पुरुषामध्ये शिश्नावर किंवा त्यावरच्या त्वचेखाली आणि स्त्रियांमध्ये योनिमार्गात किंवा गर्भाशयाच्या तोंडावर पुळी तयार होते. ही फुटून नंतर व्रण तयार होतो. हा व्रण वेदनारहित असतो

 त्यानंतर जांघेत एका वा दोन्ही बाजूच्या रसग्रंथी सुजतात. मात्र वेदना होत नाही.

उपचार न झाले तरी हा व्रण महिन्याभरात दुरुस्त होतो. या व्रणाला हात लावल्यास व नंतर हात डेटॉलने स्वच्छ न केल्यास स्पर्श करणाऱ्याला हा रोग होऊ शकतो. गरमी व सिफीलीसच्या दुसऱ्या अवस्थेत अंगावर न खाजणारे चट्टे येतात. शरीरात ठिकठिकाणी अवधाण येते, तोंडात व्रण येतात. तिसऱ्या अवस्थेत मेंदू, हृदय व हाडे यांवर या रोगाचा परिणाम दिसून येतो. हृदयाच्या झडपा निकामी होतात, महारोहिणीला कुमार देतो व ती कमकुवत होते. तसेच मेंदू व मज्जासंस्था खराब होतात. स्त्रिला सिफीलीस झाला असेल, तर वारंवार गर्भपात होतात व मूल जन्माला आलेच, तर त्यात व्यंगे असतात.


सिफीलीसच्या निदानासाठी प्राथमिक अवस्थेमध्ये जंतूंचा शोध घेता येतो. त्यानंतर मात्र VORL या तपासणीने शरीराने या जंतूंच्या विरोधात तयार केलेल्या प्रतिद्रव्यांची मोजणी केली जाते व रोगाचे निदान केले जाते.

या आजारावर पेनिसिलीनची इंजेक्शने फारच उपयुक्त ठरतात. दररोज एक असे १० ते १५ दिवस

पेलिसिलोनची इंजेक्शने वा एकच मोठा डोस दिल्यास रोग बरा होतो. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे  सिफीलीस असेल, तर पत्नीलाही उपचार द्यावे लागतात. दुसरे म्हणजे सिफीलीसवर इतर कोणतेही उपचार करू नयेत. काही समाजात असे गैरसमज आहेत की, कुमारिकांशी वा प्राण्यांशी शरीरसंबंध ठेवल्याने हा रोग बरा होतो. ही गोष्ट अत्यंत चुकीची आहे. उलट त्यामुळे रोगप्रसार आणि विकृती निर्माण होतात. गुंतागुंतीचे संसर्ग होऊन मृत्यू येतो.


नैतिकता ठेवून वर्तन करणाऱ्याला सिफीलीससारखा रोग होणारच नाही. त्यामुळे केवळ एकमेकांशीच प्रामाणिकपणे शरीरसंबंध ठेवणाऱ्या पती-पत्नींना हा रोग कधीच होऊ शकणार नाही.


*डाॅ.अंजली दिक्षित व डाॅ.जगन्नाथ दिक्षित*

*यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' पुस्तकातून*


Featured Post

व्यायाम व योगा अवश्य करावा*

*व्यायाम व योगा अवश्य करावा*  *व्यायाम व योगा करण्याचे दहा फायदे:-*  1) व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते: व्यायाम करणारी...