सोमवार, ५ जुलै, २०२१

आजचे शिवदिनविशेष

 🏰🏰आजचे शिवदिनविशेष🏰🏰

*****************************

          ५ जुलै इ.स.१६६७

*छत्रपती शिवरायांनी कोल्हापूर जिल्ह्यातील "मनोहरगड" जिंकला.*

🏰🏰🏰🏰🏰🏰🏰🏰🏰🏰🏰

   कोकण प्रदेशातील महत्वाच्या किल्ल्यांपैकी एक महत्वाचा किल्ला.दक्षिण कोकणातील अदिलशाहीशी लढण्यासाठी हा गड अतिशय महत्वाचा होता आणि महाराजांनी आजच्या दिवशी हा गड स्वराज्यात आणला होता जिंकला होता.

सध्याच्या कोल्हापुर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सिमेवर हा गड आहे. बरीच वर्षे शिवरायांनी अदिलशाहीशी या गडावरून झुंज दिली. १८४४ साली कोल्हापुरचे भोसले तसेच सावंतवाडीचे सावंत यांचे इंग्रजांविरूद्ध युद्ध याच गडावर झाले होते !!!

आजही गडावर मोठे वाड्यांचे अवशेष आहेत तसेच एक शिवकालीन तलाव आहे तीथं वर्षभर पाणी असते.. !!

शिवाजी महाराजांनी ब-याच वेळा या गडावर वास्तव्य केल्याच सांगीतलं जातं !

🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳

५ जुलै इ.स.१६७७

  दक्षिण दिग्विजय मोहीम

"छत्रपती शिवराय" दक्षिणेत पराक्रम गाजवत असतानाच दक्षिणेतील अनेक किल्ले,किंमती 

सामान स्वराज्यात येत होते.अशातच २६ जून १६७७ रोजी पळून गेलेला "शेरखान" आज महाराजांसमोर हजर झाला आणि त्याने शरणागती पत्करली.

🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳

        जय जगदंब जय जिजाऊ

       जय शिवराय जय शंभूराजे

              जय गडकोट

           !! हर हर महादेव !!

🏰🏰🏰🏰🏰🏰🏰🏰🏰🏰🏰

संकलन -)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

आदिती पंत जिवशास्त्रज्ञ

 *🧫🌊🧫आदिती पंत🧫🌊🧫*

🧫🧫🧫🧫🧫🧫🧫🧫🧫🧫🧫

*🧫जीवशास्त्रज्ञ,🌊 समुद्रशास्त्रज्ञ*

🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊

*जन्मदिन - ५ जुलै १९४३*

🧫🌊🧫🌊🧫🌊🧫🌊🧫🌊🧫

   भारताच्या दोन अंटार्क्टिक मोहिमांमध्ये सहभाग असलेल्या आणि आघाडीच्या सागरी विज्ञान संशोधक असलेल्या आदिती पंत यांचा जन्म नागपूरला झाला. साताऱ्याजवळील औंध संस्थानाचे अधिपती श्रीमंत बाळासाहेब पंत प्रतिनिधी हे त्यांचे आजोबा. आदिती पंत यांचे वडील बॅ. आप्पासाहेब पंत मुत्सद्दी होते. भारताचे राजदूत म्हणून अनेक देशांमध्ये त्यांनी कार्य आणि वास्तव्य केले होते. साहजिकच आदिती पंत यांना विविध ठिकाणी जाऊन शिक्षण पूर्ण करावे लागले. सुरुवातीला त्यांचे शालेय शिक्षण गोवन पब्लिक स्कूल, नैरोबी (केनिया) येथे झाले. त्यानंतर दिल्ली पब्लिक स्कूल आणि लोरेटो कॉन्व्हेंट स्कूल (दार्जिलिंग) येथे त्यांनी माध्यमिक शालेय शिक्षण पूर्ण केले. सीनियर केंब्रिज ही शालान्त परीक्षा त्यांनी १९५९ साली आंध्रप्रदेशमधील ऋषी व्हॅली स्कूलमधून दिली. नॉर्थ पॉइंट कॉलेज (कलकत्ता) मधून त्या इंटरसायन्स परीक्षा उत्तीर्ण झाल्या.


बी.एस्सी. पदवीपरीक्षेसाठी त्या पुण्याच्या वाडिया महाविद्यालयामध्ये दाखल झाल्या. १९६३ साली रसायन, वनस्पती, प्राणिशास्त्र हे विषय घेऊन त्या प्रथम श्रेणीमध्ये बी.एस्सी. पदवीपरीक्षा उत्तीर्ण झाल्या. १९६३-१९६५ या वर्षामध्ये नॉर्वेमधील ऑस्लो विद्यापीठात त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यासाठी त्यांनी वरवर परस्परविरोधी गणले गेलेले गणित आणि जीवशास्त्र हे विषय निवडले होते. या ठिकाणी त्यांना नॉर्वेजियन भाषा थोडीफार अवगत झाली. त्याच सुमारास त्यांना युनिव्हर्सिटी ऑफ हवाई (यू.एस.ए.) येथे संशोधन करण्यासाठी ईस्ट-वेस्ट सेंटर येथे एक शिष्यवृत्ती मिळाली. तेथील डिपार्टमेंट ऑफ मरीन बायॉलॉजीमध्ये प्रो. मॅक्सवेल दोटी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी १९६६-१९६९ दरम्यान कानेओहे या सागरी प्रदेशात संशोधन केले. ते अतिसूक्ष्म सागरी वनस्पतींशी संबंधित होते. या ठिकाणी त्यांना एम.एस. ही पदवी मिळाली. सागरी जीवांमधील प्रकाश संश्‍लेषणाच्या (फोटो सिंथेसिसच्या) प्रक्रियांविषयी त्यांनी सखोल अध्ययन केले.


पीएच.डी.चे संशोधन करण्यासाठी त्यांना १९६९ साली इंग्लंडमध्ये ‘एस.ई.आर.सी.’ शिष्यवृत्ती मिळाली. युनिव्हर्सिटी ऑफ लंडनमध्ये त्यांना प्रो. जी.ई. फॉग (एफ.आर.एस.) यांनी मार्गदर्शन केले. परदेशातील दोन्ही पदव्यांसाठी केलेले त्यांचे संशोधन सागरी सूक्ष्मजीव आणि सागरी वनस्पती यांच्यामधील प्रकाश संश्‍लेषणाच्या क्रिया-प्रक्रियांशी संबंधित होते. १९७२ साली पीएच.डी. मिळवल्यावर भारतात राहून संशोधन करण्याची त्यांची इच्छा होती. त्यानुसार,त्यांनी गोवा येथील राष्ट्रीय सागरी विज्ञान संस्थेमध्ये (नॅशलन इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्रफी, एन.आय.ओ.) ‘पूल ऑफिसर’ म्हणून कामाला सुरुवात केली. पृथ्वीवरील सर्वांत प्रचंड प्रमाणावर अव्याहतपणे चालू असलेल्या प्रकाश संश्‍लेषणाच्या मूलभूत क्रिया-प्रक्रियांबद्दल खूप कुतूहल असल्यामुळे, त्यांनी त्याच विषयावरील संशोधन चालू ठेवले. भारताच्या तिसऱ्या अंटार्क्टिक संशोधनाच्या मोहिमेत त्या विषयाचे संशोधन करायचे ठरले होते. साहजिकच त्यांची १९८३-१९८४च्या अंटार्क्टिक मोहिमेवर जाणाऱ्या संशोधकांच्या तुकडीमध्ये निवड झाली.


अंटार्क्टिकावर जाऊन संशोधन करण्यासाठी भारतीय संशोधकांमध्ये प्रथमच दोन महिलांचा समावेश करण्यात आला होता.दुसरी महिला संशोधक होती डॉ.सुदीप्ता सेनगुप्ता,डॉ. हर्ष गुप्ता यांच्याकडे मोहिमेचे नेतृत्व होते. त्या वर्षी ‘दक्षिण गंगोत्री’ हे उन्हाळी सागरी विज्ञान संशोधन केंद्र उभारले गेले होते.त्यामुळे त्यांना भरपूर अनुभव मिळाला. भारताच्या पाचव्या अंटार्क्टिक मोहिमेत त्यांना पुन्हा एकदा (१९८५-१९८६) सहभागी होण्याची संधी मिळाली. गोव्याच्या प्रयोगशाळेत त्यांनी पुढील चार ते पाच वर्षात त्यांचे काही जीवशास्त्रीय प्रकल्प पूर्ण केले.


१९९० साली पुण्याच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत (एन.सी.एल.) त्यांनी पुढील संशोधन करायचे ठरविले. क्षारयुक्त सागरी पाण्यातील काही सूक्ष्मजीव औद्योगिक दृष्टीने उपयुक्त जैविक पदार्थांची निर्मिती करतात.काही जीवाणूंच्या गुणधर्मांचा उपयोग आपल्याला करून घेता येतो.पंत यांनी हायड्रोकार्बनचे विघटन करू शकणाऱ्या नोकार्डिओपसिस वर्गीय सूक्ष्मजीवांवरील संशोधन केले. सागरी पाण्यात तेलवाहू जहाजांमुळे तेलाचे तवंग साचतात.तेलाचे हे जलप्रदूषण जर हायड्रोकार्बनचे विघटन करणाऱ्या जंतूंमार्फत कमी करता आले,तर सागरी जीवांची हानी कमी होऊ शकते आणि त्यामुळे पर्यावरणाची हानी कमी प्रमाणात होईल.अशा संशोधनामुळे बरीच मूलभूत माहिती मिळाली. एका अस्पर्जिलसवर्गीय बुरशीकडून पेक्टिन नामक कर्बोदकाचे विघटन होते; कारण ती बुरशी पॉलिगॅलॅक्टोयुरोनेस नावाचे विकर (एन्झाइम) जास्त प्रमाणात बनवते.यारोविया लिपोलिटिका नावाचा एक यीस्टचा प्रकार आहे. द्रवपदार्थाच्या पृष्ठभागाचे गुणधर्म बदलू शकणारी रसायने बनवण्याची क्षमता त्या यीस्टमध्ये आहे. बरेचसे सूक्ष्मजीव सागरी पाण्यातून विलग करण्यात आले आहेत. पंत यांनी प्रयोगशाळेत अशा उपयुक्त सूक्ष्मजीवांच्या गुणधर्मांचे संशोधन केलेले आहे.


१९९० ते २००३ या काळात राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत संशोधन करीत असताना, त्यांनी सागरी पर्यावरणाशी संबंधित असलेल्या एका जागतिक प्रकल्पात सक्रिय भाग घेतलेला होता.सागरी सूक्ष्मजीवसृष्टी कार्बन-डाय-ऑक्साइडचा कसा, किती आणि केव्हा उपयोग करून जैवपदार्थाची निर्मिती करतात, यासंबंधीचे संशोधन त्यांनी केले. त्यासाठी त्यांना मुख्यत्वे अरबी सागरात प्रत्यक्ष जहाजावर जाऊन प्रयोग करावे लागले. प्रकाश संश्‍लेषण ही जीवसृष्टीतील एक खूप व्यापक जैवरासायनिक प्रक्रिया असल्यामुळे, निवडक जीवशास्त्रीय प्रयोग त्यांनी हिंदी महासागरात आणि बंगालच्या उपसागरात दीर्घकाळ (१९९३-१९९८) केले होते. काही सागरी एकपेशीय सूक्ष्मवनस्पती आणि विशिष्ट जीवाणू यांचा जीवनक्रम परस्परावलंबी असतो. पंत यांनी जीवसृष्टीतील अशा काही वनस्पती आणि जीवाणूंचे संशोधन केले होते. त्यांचे एकूण कार्य लक्षात घेऊन सरकारने त्यांना मानाचे ‘अंटार्क्टिक पारितोषिक’ प्रदान केले आहे.


पंत यांनी अनेक विद्याशाखांतर्गत विद्यार्थ्यांना पीएच.डी. पदवीसाठी मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या काही वैज्ञानिक निष्कर्षांवर आधारलेली एकस्वे (पेटंटस्) त्यांनी घेतली आहेत. तसेच, आघाडीवरील शास्त्रीय नियतकालिकांमध्ये त्यांनी सुमारे ५० शोधनिबंध प्रसिद्ध केले आहेत. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत जीवरसायनशास्त्र विभागातून २००० साली सेवानिवृत्त झाल्यावर, पुणे विद्यापीठातील वनस्पतिशास्त्र विभागात मानद शास्त्रज्ञ म्हणून त्यांनी संशोधन आणि अध्यापनाचे कार्य चालू ठेवले. संगीताचे सूर ऐकता ऐकता नानाविध विषयांवरील पुस्तकांचे सतत वाचन करणे,हा त्यांचा एक छंद आहे. अनेक क्षेत्रांत कार्य करणारे स्नेहांकित गोळा करून त्यांच्याशी संवाद साधणे,योगसाधना करणे त्यांना खूप आवडते.निसर्गाचा यथेच्छ आस्वाद घेण्यासाठी भटकंती करण्याची हौस त्यांनी दीर्घकाळ जोपासलेली आहे.

*🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏*

संकलन -)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

प्रभात दर्शन

 🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

जेष्ठ मास,कृष्ण पक्ष, *एकादशी*,भरणी नक्षत्र,सूर्य उत्तरायण,ग्रीष्म ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

सोमवार, ०५ जुलै २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                        *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

           *हम यह नहीं कह सकते कि हमारे पास समय नहीं है, क्योंकि हमको भी दिन में उतना ही समय (24 घंटे) मिलता है जितना समय महान एंव सफल लोगों को मिलता है।*

      *स्वयं के ऊपर विश्वास कीजिये, हम ईश्वर की सर्वोत्तम कृति हैं। विश्वास सफलता की एक सोपान है। विश्वास में वो शक्ति है, जिससे उजड़ी हुई दुनिया में प्रकाश लाया जा सकता है। विश्वास पत्थर को भगवान बना सकता है और अविश्वास भगवान के बनाए इंसान को भी पत्थर दिल बना सकता है।"*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


शनिवार, ३ जुलै, २०२१

4 जुलै स्वामी विवेकानंद पुण्यतिथीनिमाज्ढदिवसाच्या

 **********************************

*४ जुलै - स्वामी विवेकानंद पुण्यतिथी*

***********************************

🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

जन्म - १२ जानेवारी १८६३

स्मृती - ४ जुलै १९०२


स्वामी विवेकानंद यांची आज पुण्यतिथी.


स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव नरेंद्रनाथ. इंग्रजांचे वर्चस्व असतांना भारतभूमी व हिंदु धर्म यांच्या उद्धारासाठी अहर्निश चिंता वहाणारी आणि तन,मन,धन व प्राण याच उद्धारकार्यासाठी अर्पण करणारी काही नवरत्ने भारतात होऊन गेली.त्यांपैकी एक दैदिप्यमान रत्न म्हणजे स्वामी विवेकानंद.


धर्मप्रवर्तक, तत्त्वचिंतक, विचारवंत व वेदान्तमार्गी राष्ट्रसंत इत्यादी विविध नात्यांनी विवेकानंदांचे नाव सर्व जगात प्रसिद्ध आहे. ऐन तारुण्यात संन्यास श्रमाची दीक्षा घेऊन हिंदु धर्माचे प्रसारक बनलेल्या तेजस्वी व ध्येयवादी व्यक्तीमत्त्व म्हणजे स्वामी विवेकानंदआहे.त्यांच्या जयंतीच्या दिवशी 'आंतरराष्ट्रीय युवकदिन' साजरा करण्यात येतो.


स्वातंत्र्यानंतर भारतभूमी व हिंदु धर्म यांची झालेली दुरवस्था रोखण्यासाठी आजही स्वामी विवेकानंद यांच्या तेजस्वी विचारांची गरज आहे. गांधीजी म्हणत, विवेकानंद वाङ्‌मयाच्या वाचनाने माझ्या देशभक्तीत एक हजार पटीने वाढ झाली. नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणतात, आज स्वामी विवेकानंद असते, तर मी त्यांची गुरुस्थानी स्थापना केली असती. जवाहरलाल नेहरू म्हणतात की, विवेकानंद हे अध्यात्म आणि विज्ञान यांचा समन्वय करणारे महापुरुष होते.


वि.दा.सावरकर यांच्यापासून ते जमशेटजी टाटा यांच्यापर्यंत शेकडो महापुरुषांनी विवेकानंदांच्या जीवन व विचारातून प्रेरणा घेतली. योद्धा, संन्यासी आणि कोट्यवधी तरुणांचे स्फूर्तिस्थान म्हणजे स्वामी विवेकानंद.


सकारात्मक विचारांमध्ये प्रचंड सामर्थ्य असते. सकारात्मक विचारामुळे जीवनाचे नंदनवन होऊ शकते, परंतु केवळ सकारात्मक विचार उपयोगाचे नसून, माणसाला आपल्या ध्येयाची निश्चितीही करता आली पाहिजे. स्वामी विवेकानंद म्हणतात की, ‘‘एखादे ध्येय निश्चिीत केलेला मनुष्य शंभर चुका करीत असेल, तर ध्येय नसलेला मनुष्य दहा हजार चुका करतो.’’ तात्पर्य असे की, ध्येयामुळे आपल्या जीवनाला अर्थ प्राप्त होतो, परंतु असे असले, तरी ध्येयाची निवड देखील महत्त्वाची बाब असते.


स्वामी विवेकानंदांच्या जीवन वाङ्‌मयातून आपल्याला उच्च ध्येयमार्गासाठीची दिशा मिळते. प्राचीन भारत ग्रंथातून अभ्यासून न थांबता स्वामी विवेकानंदांनी संपूर्ण वर्तमान भारत पायी फिरून अनुभवला. शेवटी स्वामीजी देशाच्या दक्षिण टोकाला-कन्याकुमारी येथे आले. तिथल्या श्रीपाद शिलेवर की, जिथे देवी पार्वतीने कैलासातल्या शिवशंकरासाठी एका पायावर तपश्चेर्या केली होती, तिथे २५, २६ आणि २७ डिसेंबर १८९२ या तीन दिवस-रात्री त्यांनी ध्यान केलं.


हा पहिला सन्यासी होता की, ज्याने आपल्याला वैयक्तिक मोक्ष अथवा मुक्ती मिळावी म्हणून ध्यान साधना केली नाही. भारताला पुन्हा तिचं गतवैभव कसे मिळवता येईल हा त्यांच्या ध्यानाचा केंद्रबिंदू होता. एकेकाळी वैभवावर असलेल्या या देशाचे भग्नावशेष त्यांनी जागोजागी भ्रमणकाळात पाहिले होते. पाश्चात्य देशातील लोकांना जेव्हा कपडे घालण्याचीही बुद्धी नव्हती,तेव्हा या देशात एक प्रगल्भ संस्कृती नांदत होती, हेही त्यांना माहीत होते,परंतु आज मात्र भारत गुलामीत होता.


भारताचा स्वाभिमान ब्रिटिशांनी पायदळी तुडवला होता. दारिद्र्याने आणि लाचारीने कळस गाठला होता.जातीभेद स्पृशास्पृशतेसारख्या घातक रूढींनी उच्छाद मांडला होता.


स्वामी विवेकानंदांनी भारतीयांना भारताकडे भारतीय दृष्टिकोनातून पाहायची दृष्टी दिली.स्वामी विवेकानंद म्हणजे साक्षात घनिभूत देशभक्ती.त्यांचा युवा पिढीवर प्रगाढ विश्वाोस होता. भारताच्या पुनरुत्थानच्या कार्यासाठी युवकच पुढे येतील, असा त्यांना विश्वा्स होता.


देशभक्तीचे मूर्तीमंत प्रतीक असणारे स्वामी विवेकानंद केवळ भारतासाठीच प्रेरक आहेत असे मात्र बिलकुल नाही.संपूर्ण जगात सुख-शांती नांदण्यासाठी त्यांनी केलेले मार्गदर्शन लाखमोलाचे ठरले होते.म्हणूनच तर सार्या जगासाठी असा काय संदेश स्वामीजींनी दिला होता, तेही समजून घेतले पाहिजे.अन्यथा मोठा गोंधळ होईल.


दोन वर्षांपूर्वी जपानचे पंतप्रधान भारतात आले होते.भारताने गेल्या दहा हजार वर्षांत कोणत्याही देशावर आक्रमण केले नाही.कारण दुसर्यांना पायदळी तुडविणे हा भारताचा स्वभाव नाही,परंतु जगाला शांतीचा आणि शाश्वत मार्ग दाखवायचा असेल,तर भारताने बलशाली झालेच पाहिजे.त्याला पर्याय नाही. भारताला बलशाली करण्याच्या कार्यात आपला खारीचा वाटा उचलणे हेच आपल्यासमोरचे सर्वोच्च ध्येय असू शकते.


तुम्ही विद्यार्थी असा की शिक्षक, शिपाई असा की अधिकारी,शेतकरी असा की सैनिक, तुम्ही कोणीही असा,आपले सर्वोच्च ध्येय भारत पुनरुत्थानाच्या कार्यात योगदान देणे हेच असू द्या.


स्वामी विवेकानंदांच्या शब्दांत सांगायचे तर आगामी काळात हे राष्ट्र हेच तुमचे दैवत असू द्या. एकदा ध्येय ठरले की,कार्य करण्याची दिशा आपोआप गवसून जाईल.


संघटित कार्य करण्याचा मंत्र स्वामीजींनी दिला आहे. संघटित कार्यात सहभागी झाल्याने आपल्या व्यक्तिमत्त्व विकासाचा वेग वाढतो. विवेकानंदांच्या शब्दांत, करावयास लागा म्हणजे कळून येईल की, तुमच्यात किती प्रचंड सामर्थ्य आहे. व्यक्तिमत्त्व विकासाची प्रक्रिया ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. यासाठी शक्तीदायी विचारांची सोबत आवश्यक असते.


मा.स्वामी विवेकानंद यांचे ४ जुलै १९०२ रोजी निधन झाले.


मा.स्वामी विवेकानंद यांना आदरांजली....!

🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏

*********************************

🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

संकलन -)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा-४४५२०६



प्रभात दर्शन

 🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

जेष्ठ मास,कृष्ण पक्ष, *दशमी*,अश्विनी नक्षत्र,सूर्य उत्तरायण,ग्रीष्म ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

रविवार, ०४ जुलाई २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                        *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*धन धान्य प्रयोगेषु* 

          *विद्या सङ्ग्रहेषु च,* 

*आहारे व्यवहारे च* 

         *त्यक्त लज्जः सुखी भवेत्॥*


भावार्थ :- *धन और अनाज के लेन-देन,विद्या प्राप्त करते समय,भोजन तथा आपसी व्यवहार में... लज़्ज़ा न करने वाला सदैव सुखी रहता है।।*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


गाथा बलिदानाची संत शिरोमणी नामदेव महाराज

 ➿➿➿➿➿➿➿➿➿➿

🇮🇳🇮🇳 *गाथा बलिदानाची* 🇮🇳🇮🇳

➿➿➿➿➿➿➿➿➿➿                                              

🚩🚩🚩🚩👳‍♀️🚩🚩🚩🚩

    *संत शिरोमणी नामदेव महाराज*                                                           

       (नामदेव दामाशेटी रेळेकर) 

   *जन्म : २६ ऑक्टोबर १२७०*   

(नरसी नामदेव,हिंगोली,महाराष्ट्र) *संजीवन समाधी : ३ जुलै १३५०*                                       वडील : दामाशेटी                                               आई : गोणाई                                       

पत्नी : राजाई                                                        अपत्ये :  नारा,विठा,गोंदा,महादा हे त्यांचे चार पुत्र व एक मुलगी लिंबाई                                                                                  मोठी बहीण : आऊबाई  आध्यात्मिक गुरु :  विसोबा खेचर                                                                               हे महाराष्ट्रातील वारकरी संतकवी होते. त्यांचे आडनाव रेळेकर असे होते.ते मराठी भाषांमधील सर्वाधिक जुन्या काळातील कवींपैकी एक होते.त्यांनी व्रज भाषांमध्येही काव्ये रचली. शिखांच्या गुरू ग्रंथसाहिबातहिले चरित्रकार, आत्मचरित्रकार आणि ‘कीर्तना’च्या माध्यमातून भागवत धर्म पंजाबपर्यंत नेणारे आद्य प्रचारक होते. त्यामुळे पंजाबी मंडळी तसेच संबंधित मंडळी आज त्यांच्या जन्मस्थानाचा,नरसी नामदेव या गावाचा विकास करण्यासाठी धडपडत आहेत.नरसी नामदेव हे गांव महाराष्ट्रातील मराठवाडा मधील हिंगोली जिल्ह्यातील असून तेथील संत नामदेव महाराज यांच्या मंदिराचा जीर्णोद्धार २०१९ ला झाला.


भक्तशिरोमणी संत नामदेव हे संत ज्ञानेश्वरांच्या कालखंडात होऊन गेले .वारकरी संप्रदायाचे प्रचारक नामदेव महाराज नामवेदाचे व नामविद्येचे आद्य प्रणेते असलेले महाराष्ट्रातील हे एक थोर संत होत. आपल्या कीर्तनकलेमुळे प्रत्यक्ष पांडुरंगाला डोलायला लावणारी अशी त्यांची कीर्ती होती. संत नामदेव प्रत्यक्ष श्रीविठ्ठलाच्या निकटवर्ती असलेला सखा होता, असे मानले जाते. संत नामदेव हे वारकरी संप्रदायाचे महान प्रचारक असून भारतभर त्यांनी त्या बाबतीत भावनिक एकात्मता साधली. भागवत धर्माची पताका पंजाबपर्यंत घेऊन जाण्याचे कार्य त्यांनी स्वकर्तृत्वाने केले.


दामाशेटी हे संत नामदेवांचे वडील व गोणाई त्यांची माता होती. दामाशेटींचा व्यवसाय कपडे शिवणे हा होता. म्हणजे ते शिंपी होते. यांच्या अगोदरच्या सातव्या पिढीतील पुरुष यदुशेट हे सात्त्विक प्रवृत्तीचे भगवद्भक्त होते. सध्याच्या हिंगोली जिल्ह्यातील नरसी-बामणी (नरसी नामदेव) हे संत नामदेवांचे जन्म गाव होय. नामदेवांचा जन्म प्रभव नाम संवत्सरात, शके ११९२ (इ.स.१२७०) मध्ये कार्तिक शुद्ध एकादशीस, रोहिणी नक्षत्रास, रविवारी झाला. संत नामदेवांना ८० वर्षांचे आयुष्य लाभले. त्यांचे बालपण हे पंढरपुरात गेले. त्यांनी लहानपणापासूनच श्रीविठ्ठलाची अनन्यसाधारण भक्ती केली.


संत गोरा कुंभार यांच्याकडे, तेरढोकी येथे निवृत्तीनाथ,ज्ञानेश्वर महाराज, सोपानदेव,मुक्ताबाई,संत नामदेव,चोखामेळा,विसोबा खेचर आदी संतांचा मेळा जमला होता. याच प्रसंगी संत ज्ञानेश्वरांच्या विनंतीवरून गोरोबाकाकांनी उपस्थितांच्या आध्यात्मिक तयारीविषयी आपले मतप्रदर्शन केले होते.या प्रसंगानंतरच संत नामदेवांना विसोबा खेचर हे आध्यात्मिक गुरू म्हणून लाभले.


पत्‍नी राजाई, मोठी बहीण आऊबाई; नारा,विठा,गोंदा, महादा हे त्यांचे चार पुत्र व एक मुलगी लिंबाई असा संत नामदेवांचा परिवार होता. त्यांच्या कुटुंबात एकूण पंधरा माणसे होती. स्वतःला ‘नामयाची दासी’ असे म्हणणार्‍या संत जनाबाई या त्यांच्या परिवारातील एक सदस्य होत्या.


संत नामदेवाची अभंगगाथा (सुमारे २५०० अभंग) प्रसिद्ध आहे. त्यांनी हिंदी भाषेत काही अभंग रचना (सुमारे १२५ पदे) केली. त्यातील सुमारे बासष्ट अभंग (नामदेवजीकी मुखबानी) शीख पंथाच्या गुरुग्रंथ साहेबमध्ये गुरुमुखी लिपीत घेतलेले आहेत. संत नामदेवांनी आदि,समाधी व तीर्थावळी किंवा तीर्थावली या गाथंतील तीन अध्यायांतून संत ज्ञानेश्वरांचे चरित्र सांगितले आहे.


कीर्तनांत अनेक चांगल्या ग्रंथांचा उल्लेख असे.यावरून ते बहुश्रुत व अभ्यासू असल्याचे लक्षात येते. ‘नामदेव कीर्तन करी,पुढे देव नाचे पांडुरंग’- अशी त्यांची योग्यता होती. ’नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी’ हे त्यांच्या आयुष्याचे ध्येय होते.


भागवत धर्माचे एक आद्य प्रचारक म्हणून संत नामदेवांनी संत ज्ञानेश्वरांच्या संजीवन समाधीनंतर सुमारे ५० वर्षे भागवतधर्माचा प्रचार केला. प्रतिकूल परिस्थितीमध्ये महाराष्ट्राची भावनिक एकात्मता जपण्याचे अवघड काम त्यांनी केले. पंजाबमधील शीख बांधवांना ते आपले वाटतात. शीख बांधव ‘नामदेव बाबा’ म्हणून त्यांचे गुणगान गातात. पंजाबातील ‘शबदकीर्तन’ व महाराष्ट्रातील ‘वारकरी कीर्तन’ यांत विलक्षण साम्य आहे. घुमान (पंजाब) येथे शीख बांधवांनी त्यांचे मंदिर उभारले आहे. बहोरदास, लढ्विष्णुस्वामी, केशव कलाधारी हे त्यांचे पंजाबी शिष्य होत. राजस्थानातील शीख बांधवांनीही नामदेवाची मंदिरे उभारलेली आहेत. `संत शिरोमणी' असे यथार्थ संबोधन त्यांच्याबद्दल वापरले जाते.


भगवद्भक्तांच्या व साधु-संतांच्या चरण धुळीचा स्पर्श व्हावा म्हणून पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराच्या महाद्वारी ‘पायरीचा दगड’ होण्यात त्यांनी धन्यता मानली. संत नामदेव हे आषाढ वद्य त्रयोदशी, शके १२७२ मध्ये (शनिवारी, दि. ३ जुलै, १३५० रोजी) पंढरपूर येथे पांडुरंगचरणी विलीन झाले. नक्की दिनांकाविषयी एकवाक्यता दिसून येत नाही. कालनिर्णय या दिनदर्शिकेत पुण्यतिथी दिनांक २४ जुलै असा दिलेला आढळतो. संत नामदेव हे कीर्तने करत करत भारतभर फिरले.


🌀 *संत नामदेवांसंबंधी आख्यायिका*

नामदेव महाराज खूप लहान असताना, त्यांच्या वडिलांनी त्यांना सांगितले `आज देवाला प्रसाद तू दाखव. त्या दिवशी नामदेवांनी नुसता नेवैद्य दाखविला नाही तर देवापुढे वाट बघत बसले की केव्हा हा खाईल. त्या अत्यंत निरागस अपेक्षेला मान देऊन प्रत्यक्ष विठ्ठल त्यांच्यासमोर प्रकट झाले व नामदेवांनी दिलेला प्रसाद त्यांनी भक्षण केला.

कुत्र्याने चपाती पळवली त्याला ती कोरडी खाऊ लागू नये म्हणून संत नामदेव महाराज, तुपाची वाटी घेऊन त्याच्यामागे लागले.

एकदा महाशिवरात्रीच्या निमित्ताने संत नामदेव औंढा येथे नागनाथाच्या दर्शनासाठी गेले असता मंदिरात भजन/कीर्तन न करण्यास पुजाऱ्यांनी त्यांना विनवले. त्यांच्या विनंतीस मान ठेवून, नामदेव मंदिराच्या मागील बाजूस बसून दर्शनासाठी नागनाथाची आळवणी करू लागले. नामदेवाची भक्ती बघून त्यांना दर्शन देण्यासाठी देवाने पूर्वाभिमुख असलेले मंदिर फिरवून पश्चिमाभिमुख केले, ते आजतागायत तसेच आहे.

 📚 *संत नामदेवांचे साहित्य आणि नामदेवांसंबंधी लिहिले गेलेले साहित्य*

घास घेई पांडुरंगा (कादंबरी, लेखक -रवींद्र भट)

चिरंतनाचा ज्ञानदीप : संत नामदेव (सुभाष कि. देशपांडे)

आद्य मराठी आत्मचरित्रकार-संत नामदेव (डॉ.सौ. सुहासिनी इर्लेकर)

नामदेव गाथा (संपादक : नाना महाराज साखरे)

नामदेव गाथा (संपादक: ह.श्री. शेणोलीकर)

संत नामदेव-तुकारामांचे सांस्कृतिक संचित (डॉ. श्रीपाल सबनीस)

नामदेवांची गाथा (महाराष्ट्र सरकारचे प्रकाशन -एकूण २३३७ अभंग)

संत नामदेव गाथा (कानडे / नगरकर)

श्री नामदेव : चरित्र, काव्य आणि कार्य (महाराष्ट्र सरकारचे प्रकाशन)

श्री नामदेव चरित्र (वि.स. सुखटणकर गुरुजी-आळंदी)

श्री संत नामदेव महाराज चरित्र (प्रा. डॉ. बाळकृष्ण लळीत)

श्री नामदेव चरित्र ग्रंथ तत्त्वज्ञान (शंकर वामन दांडेकर)

श्री नामदेव चरित्र (वि.ग. कानिटकर) (सरकारी प्रकाशन)

संत नामदेव (बालवाङ्‌मय, रवींद्र भट)

संत नामदेव चरित्र (बालवाङ्‌मय, शैलजा वसेकर)

संत नामदेवांचे कवित्व आणि संतत्व (डॉ. श्रीपाल सबनीस)

संत शिरोमणी बाबा नामदेव (दीपक बिचे)

🗽 *नामदेवांची स्मारके*

▪️महाराष्ट्रातील शिंप्यांच्या एका पोटजातीला नामदेव शिंपी म्हणतात.

▪️पुण्यात महर्षीनगर येथील एका शाळेला संत नामदेव शाळा असे नाव दिले आहे.

▪️पुणे विद्यापीठात एक संत नामदेव अध्यासन आहे, आणि संत नामदेव सभागृह आहे.

▪️पंजाबमधील घुमान येथे बाबा नामदेव नावाचे एक पदवी महाविद्यालय आहे. (स्थापना १७-७-२०१६). घुमान गावी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले होते.

▪️हिंगोली जिल्ह्यातील नरसी नामदेव या गावी त्यांचे एक मोठे स्मारक आहे.  

*🚩🚩राम कृष्ण हरी....🚩🚩*

*🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏*                                                                  

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

संकलन -)

गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा-यवतमाळ ४४५२०६

प्रभात दर्शन

 🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

जेष्ठ मास,कृष्ण पक्ष, *नवमी*,रेवती नक्षत्र,सूर्य उत्तरायण,ग्रीष्म ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

शनिवार, ०३ जुलाई २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                         *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

          *"जब तक हम अपनी समस्याओं एंव कठिनाइयों के लिए दूसरों को दोष देते रहेंगे, तब तक हम अपनी समस्याओं एंव कठिनाइयों को समाप्त नही कर सकते।*

          *इस संसार में असंभव कुछ भी नहीं। हम वो सब कर सकते है, जो हम सोच सकते है और हम वो सब सोच सकते है, जो आज तक किसी ने नहीं सोचा है।"*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


शुक्रवार, २ जुलै, २०२१

विजेचा शाँक लागल्यानंतर काय होते

संकलन गजानन गोपेवाड 

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════

📕 *विजेचा शॉक बसल्यास काय होते ?* 📕


लहान मुले फार उद्योगी असतात. त्यांच्या काहीतरी कारवाया चालू असतात. विजेच्या उपकरणांशी खेळणे तर मुलांना फारच आवडते. इकडचा बल्ब काढून दुसरीकडे लाव, असली काही कामे करायला मुले नेहमीच तयार असतीत. कधी कधी मात्र या गोष्टी अंगलटीस येतात. जुनाट वायरवर ओले कपडे वाळत घालणे, प्लगमध्ये खिळा घालणे, बल्व होल्डरमध्ये बोट घालणे इत्यादीमुळे विजेचा शॉक बसतो. विजेचा शॉक बसला नाही, असा माणूस सापडणे अवघडच आहे. पाणी तापवण्यासाठी बऱ्याच घरात वापरल्या जाणाऱ्या इमर्शन रॉडचे बटण चालू असताना पाण्यात हात घातला तरी शॉक बसतो.


विजेचा शॉक हा तसा आपल्याला बारीकसा वा दोन मिनिटे झिणझिण्या आणणारा अपघात वाटला, तरी प्रत्यक्षात मात्र तो जीवघेणा असा गंभीर अपघात ठरू शकतो. आकाशात चमकणारी वीज कोणाच्या अंगावर पडली, तर ती व्यक्ती वाचत नाही. तिचा जळून अगदी कोळसा होऊन जातो. घरगुती विजेमुळे मात्र कमी-अधिक शक्तीचे धक्के बसू शकतात. डीसी बीज ही एसी पेक्षा जास्त घातक असते. महाराष्ट्रात जवळपास सगळीकड ची बीज एसी आहे. आकाशातून पडणारी वीज मात्र डीसी प्रमाणे कार्य करते.


विद्युत धक्क्याचे व शॉकचे दोन प्रकारे परिणाम होतात. एक म्हणजे भाजणे व दुसरे म्हणजे मज्जासंस्था स्नायू व हृदय यांच्यावर विद्युतप्रवाहाचा परिणाम होणे. विद्युतधक्क्यामुळे हृदयाची गती अनियमित होण्याची किंवा हृदय बंद पडण्याची शक्यता असते. शॉकमुळे स्नायू अचानक आकुंचन पावतात व त्यामुळे दूर फेकले जाणे, खाली पडणे अशा मोठ्या हालचाली होऊ शकतात. विजेचा शॉक खूप मोठा असेल, तर बेशुद्धी येते किंवा मृत्यूही ओढवतो. बीज आणि विकास यांची सांगड आहे, हे आपण औद्योगिक क्रांतीपासून अनुभवतोय. पण बीज आणि विनाश यांच्या परस्परसंबंधाची जाणीव आपल्याला अपघातातून अधूनमधून होत असते. बीज है दुधारी शस्त्र आहे. त्यामुळे त्याचा वापर करताना नीट काळजी घेणे अगत्याचे आहे, अन्यथा जीवावर बेतू शकते.


*डॉ. जगन्नाथ दीक्षित*

*डाॅ. अंजली दीक्षित*

यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज'या पुस्तकातून


स्त्रोत- विज्ञान व दिनविशेष फेसबुक पेज

═══════════════════════


 

लावा बेसाल्ट दगडि खांब

 *वणी जवळ खोद्कामात आढळले लावा बेसाल्ट दगडी खांब* 

६ कोटी वर्षादरम्यानचे दुर्मिळ कोलमनार बेसाल्ट 

        आज दिनांक १ जुलै रोजी मी (रवींद्र खराबे) व मा.जयंत कर्णिक असे आम्ही दोघे वणी शिबला पांढरकवडा ह्या मार्गावरील पार्डी ह्या गावाजवळ खोदकामात आढळलेले दगडी खांब प्रत्यक्ष पहावयास गेलो. तेव्हा योगायोगाने चंद्रपूर येथील भूगर्भशास्त्रज्ञ मा. सुरेश चोपणे हे सुद्धा तेथे उपस्थित होते. तेव्हा त्यांनी या दगडांबाबत खालील प्रमाणे सविस्तर माहिती दिली.

ही कोणत्याही  ऐतिहासिक काळातील मानव निर्मित वस्तू नसून ६ कोटी वर्षापूर्वी महाराष्ट्रात प्रचंड ज्वालामुखीचा उद्रेक झाला त्यातील लाव्हारसातून तयार झालेले कॉलमनार बेसाल्ट (Columnar Basalt) नावाचे दुर्मिळ नैसर्गिक खडक आहेत. लाव्हारस अचानक पाण्याच्या संपर्कात येवून थंड झाल्याने आकुंचन पावून षटकोनी आकाराचे खांब तयार होतात.

            यवतमाळ जिल्ह्यातील वणी परिसर हा जसा ऐतिहासिक दृष्ट्‍या प्राचीन आहे तसा तो भौगोलिक दृष्ट्‍यासुध्दा अतिप्राचीन आहे. ह्याच परिसरात २०० कोटी वर्षाची स्ट्रोमेटोलाईटची आणि पूर्वी पांढरकवडा जवळ आणि मारेगाव  तालुक्यात  ६ कोटी वर्षाची शंख-शिंपल्यांची जीवाश्मे मी (सुरेश चोपने) शोधली होती. झरी तालुक्यातील आता प्रकाशात आलेल्या ह्या अश्म खांबाची माहिती ५ वर्षापासून मला(सुरेश चोपने) होती. ७ कोटी वर्षापूर्वी पर्यंत विदर्भात समुद्र होता. परंतु ६ कोटी वर्षादरम्यान उत्तर क्रीटाशिअस ( late cretaceous) काळात पृथ्वीवर भौगोलिक घडामोडी घडल्या आणि आजच्या पश्चिम घाटातून भेगी उद्रेकाद्वारे तप्त लावारस यवतमाळ जिल्हा आणि मध्य विदर्भापर्यंत वाहत आला. ह्या उद्रेकातून तयार झालेल्या दगडी थरांना दक्खनचे पठार (Deccan Trap) या नावाने ओळखले जाते. हा लाव्हारस  मध्य भारतात पाच लाख स्क्वेअर किलोमीटर परिसरात पसरलेला असून पश्चीमेकडे याची जाडी तब्बल ६६०० फुट आहे.  

     भारतात कर्नाटकात सेंट मेरी बेट हे अश्याच कॉलमनार बेसाल्ट साठी पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे .  महाराष्ट्रांत मुंबई, कोल्हापूर, नांदेड येथे हे खडक आढळले असून आता त्यात यवतमाळ जिल्ह्याचे नाव समाविष्ट झाले आहे.विदर्भ प्रदेशात ह्या खडकाची जाडी कमी आहे त्यामुळे गेल्या हजारो वर्षापासून भूक्षरण होऊन प्राचीन खडक उघडे पडत असून त्यामुळे अनेक नव्या जीवाश्माचे संशोधन होऊ शकेल. वणी परिसरात  तेव्हा तप्त लाव्हारस वाहत (Flood Basalt) आला तेव्हा येथील नद्यात तो पडून अचानक थंड झाला त्यामुळे तो आकुंचन पावून त्याने  षटकोनी आकार घेतला आणि असे दगडी खांब तयार झाले,त्यांना कॉलमनार बेसाल्ट असे म्हणतात. इतर ठिकाणी तशी स्थिती नसल्याने तेथे तसे होऊ शकले नाही.अनेक ठिकाणी षटकोनी खांबांऐवजी पंचकोनी किंवा सप्तकोनी खांब सुध्दा आढळतात .हे खांब अगदी मानवाने ऐतिहासिक काळात मंदिरांच्या बांधकामासाठी तयार केले होते तसेच दिसतात.

      यवतमाळ जिल्ह्यात ६ कोटी वर्षापूर्वी डायनोसोर सारखे विशाल जीव आणि प्राणी वास करीत होते. घनदाट जंगले होती,परंतु महाराष्ट्रातील ह्या मोठ्या ज्वालामुखी उद्रेकामुळे सर्व जंगले ,जीव जंतू जळून राख झाले.जवळ जवळ ३०,००० वर्षे अधून मधून लाव्हारस वाहत येत असे.पुढे हा प्रलय थांबला आणि नव्याने सजीव सृष्टी निर्माण झाली. त्या काळात मानव नावाचा कुठलाही  प्राणी  विकसित झाला नव्हता. मानवाचा विकास केवळ ५० लाख वर्षानंतर झाला.   

    हे खडक भौगोलिक दृष्ट्या अतिशय महत्वाचे असून त्यांचे संरक्षण होणे व तो संपूर्ण परिसर सुशोभित होणे गरजेचे आहे असे ते म्हणाले.






शिंका का? येतात


══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════

 📙 *शिंका का येतात ?* 

 

हिवाळ्यात किंवा गार वाऱ्यात फिरून आल्यावर तुम्हाला फटाफट शिंका आल्या असतील. काहीतरी बोलायला तोंड उघडावे आणि तेवढ्यात शिंका येऊन बोलता येऊ नये, असेही कधी झाले असेल. सर्दी पडसे झाल्यावर शिंका येतात. विशेषत: वावड्यामुळे सर्दी आली असेल, तर शिंका जास्तच येतात. धुळीत गेल्यास, विशिष्ट फूल हुंगल्यास, किंवा अत्तराचा, उदबत्तीचा वास आल्यास वावडे असलेल्या लोकांना शिंका येतात आणि सर्दी होते. काय म्हणता तुम्हाला शिंका येत नाहीत ? मग एक काम करा.


 आजोबांच्या कोटाच्या खिशातली तपकिरीची डबी घ्या आणि एक चिमूटभर नाकात सोडा! काय आता आल्या का शिंका ? शिंका येणे शुभ की अशुभ ? काहीजण म्हणतात एक शिंक येणे वाईट, पण दोन शिंका येणे चांगले. अर्थात या सर्व अंधश्रद्धा बरं का ! पण शिंका का येतात, ते पाहू.

खोकला आणि शिंका यात बरेच साधर्म्य आहे. आपल्या श्वसन नलिकेत काही त्रासदायक पदार्थ आला तर खोकला येतो. आपण खोकतो म्हणजे काय करतो ? सर्वात आधी आपण दीर्घ श्वास घेतो. त्यानंतर एपिग्लाॅटीस नावाचा पडदा श्वासनलिकेवर दाबला जातो. त्यानंतर आपण जोराने श्वास सोडतो. सहाजिकच खोकताना हवा दाबाखाली बाहेर पडते व श्वास नलिकेतील घाण, जिवाणू बेडक्याच्या रूपाने बाहेर टाकले जातात. आता शिंकेविषयी नाकातील हवा जाण्याच्या मार्गात जर काही अपायकारक, त्रासदायक असे पदार्थ आले तर शरीर खोकल्याप्रमाणेच प्रतिसाद देते. नाकातील ही संवेदना मेंदूपासून निघणाऱ्या पाचव्या नसेमार्फत मेंदुच्या मेड्युला या भागात जाते. येथील पेशींमध्ये संवेदनेचे विश्लेषण होऊन शिंक येण्याची प्रक्रिया होण्याचा आदेश दिला जातो. यात सुरुवातीचे दीर्घ श्वास, नंतर एपिग्लाॅटीसचे श्वासनलिकेवर येणे व नंतर जोरात उच्छवास हे खोकल्याप्रमाणेच असते, मात्र जोरात श्वास सोडताना पडजीभ खाली पडते व त्यामुळे हवा तोंडातून बाहेर न पडता नाकातून बाहेर पडते. नाकातील अपायकारक पदार्थ यामुळे बाहेर पडतो.


वावड्यामुळे वा जंतूसंसर्गामुळे नाकातील आवरण हुळहुळे होते व त्यामुळे वारंवार शिंका येतात. एव्हीलसारखी गोळी देऊन वावड्यामुळे येणाऱ्या शिंका कमी करता येतात. तसेच ज्या पदार्थांमध्ये आपल्याला वावडे आहे त्यापासून दूर राहून स्वतःचे संरक्षण करणे जास्त योग्य होय.


*डॉ. जगन्नाथ दीक्षित*

*डाॅ. अंजली दीक्षित*

यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज'या पुस्तकातून

संकलन, गजानन गोपेवाड


 

गुरुवार, १ जुलै, २०२१

संगणक शास्त्रज्ञ डगलस एंगलबर्ट

 *🖱️🖱️डगलस एंगलबर्ट🖱️🖱️*

🖱️🖱️🖱️🖱️🖱️🖱️🖱️🖱️🖱️🖱️

*🖱️संगणक माउस चे संशोधक🖱️*

🖱️🖱️🖱️🖱️🖱️🖱️🖱️🖱️🖱️🖱️

*स्मृतिदिन - २ जुलै २०१३*

🖱️🖱️🖱️🖱️🖱️🖱️🖱️🖱️🖱️🖱️

कॉम्पुटर माउस चे शोधक डगलस एंगलबर्ट यांचा आज स्मृतिदिन.


सगळ्याच माणसांना स्वप्न पडतात. पण जी माणसं स्वप्न पाहतात, ती स्वप्न प्रत्यक्षात आणण्याचा ध्यास घेतात आणि त्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आयुष्य वाहून घेतात. त्यांच्यामुळे प्रगतीचे नवे क्षितीज गाठले जाते, असीम शक्यतांचा एक नवा अवकाश खुला होतो. 


आपल्या टेबलावरील संगणकाच्या मॉनिटरशी आपल्या हाताची आणि परिणामी मनाची, मेंदूची, विचारांची नाळ जुळवणारे जे ‘माउस’ नावाचे उपकरण आज आपल्या सवयीचे, परिचयाचे झाले आहे 

त्या माउसचा १९६३ मध्ये शोध लावणारा डगलस एंगेलबर्ट असाच स्वप्ने प्रत्यक्षात आणू पाहणारा द्रष्टा संशोधक होता. 


डगलसचा जन्म अमेरिकेतील ओरेगन मधील पोर्टलॅड येथे झाला. वडील कार्ल लुईस एंगेल्बर्ट रेडिओ मॅकेनिक तर आई ग्लेडिस गृहिणी होती. ओरेगन स्टेट युनिव्हसिटीतून विद्युत अभियंत्रिकीची पदवी डगलसने मिळवली. दुसर्‍या महायुध्दाच्या काळात रडार टेक्निशियन म्हणून त्यांनी काम केले होते. त्यानंतर नासामध्ये विद्युत अभियंता म्हणून काम करत होता पण लवकरच त्याने ही नोकरी सोडली आणि डॉक्टरेट मिळविण्यासाठी बर्कले येथील कॅलिफोर्निया विश्‍वविद्यालयात प्रवेश केला.


मानवाच्या बुध्दीविकासासाठी संगणक कसा उपयुक्‍त ठरू शकतो हा विचार त्यांना स्टॅनफोर्ड शोध संस्थेत घेवून गेला. स्टॅनफोर्ड मध्ये डगने आपली स्वतःची प्रयोगशाळा सुरु केली. इथे त्याच्या संशोधनाने एआरपीएनेटच्या विकासात सहयोग दिला यातूनच पुढे इंटरनेटचा जन्म झाला. १९६८ मध्ये सॅनफ्रान्सिको येथे त्याने माउस पहिल्यांदा सार्वजनिकरित्या दाखविला. याचवेळी त्याने पहिल्या व्हिडीओ टेली कॉन्फ्ररन्सचे देखील प्रदर्शन केले होते.३० जानेवारी १९८३ मध्ये हे संशोधन त्याने ४० हजार अमेरिकन डॉलर मध्ये अ‍ॅपलला विकले.


त्याच्या अवघ्या कारकीर्दीत माउसचा शोध हे एक मानाचे पान होते हे खरे, पण संगणकीय क्रांतीशी वा आज आपल्या टेबलवर, खिशात वा बॅगेत मावणाऱ्या संगणकीय अवताराशी निगडित जे काही शोध होते, संगणकाच्या उपयोगाच्या शक्यतांची जी काही पडताळणी होती ती या द्रष्टय़ाने पाहिलेल्या स्वप्नांमुळे, संशोधनामुळे शक्य झाली होती. त्या अर्थाने त्याच्या कारकीर्दीत अशी अनेक मानाची पाने लिहिली गेली. तरीही वापरणाऱ्या व्यक्तीची आणि त्याच्या वर्कस्टेशनची अर्थात संगणकाची वैयक्तिक नाळ जुळवणाऱ्या उपकरणाचा ‘माउस’चा आद्य अवतार जगासमोर आणणारा संशोधक म्हणूनच तो ओळखला जात होता.


प्रत्यक्षात डगलसने पाहिलेले स्वप्न वेगळेच होते. त्याला संगणकांच्या मदतीने मानवी बुद्धीच्या कक्षा विस्तारायच्या होत्या आणि एकूणच समाजाच्या बुद्धय़ांकात वाढ करायची होती. संगणकाच्या वैयक्तिक उपयोगापेक्षा संगणकाच्या माध्यमातून परस्पर संवाद आणि सहकार्यातून संगणकीय शक्यतांचा अवकाश आणखी विस्तारता येईल अशी त्याची धारणा होती. सॅन फ्रान्सिस्को येथे १९६८ मध्ये झालेल्या एका संगणक विषयक परिषदेत त्याने या शक्यता आणि संगणकीय उपयोगांविषयी जे काही महासादरीकरण केले त्यात आजघडीला आपल्या अंगवळणी पडलेल्या फाईल शेअरिंग, हायपरटेक्स्ट, एकाच वेळी अनेक विंडो सुरू करणे, मजकुराची दुरुस्ती आदी अनेक संगणकीय करामतीची, तंत्रांची बीजे होती.


तत्कालीन अवजड, बोजड, अस्ताव्यस्त पसरलेल्या आणि पंचकार्डाच्या मदतीने चालवल्या जाणाऱ्या पहिल्या पिढीतील संगणकाचे सुटसुटीत रूप डगच्या या सादरीकरणातूनच पुढे आले असे म्हटले तरी हरकत नाही. संगणकीय क्रांती या दिशेने झुकल्यामुळे मुळात डगलसला या सादरीकरणातून जे अभिप्रेत होते ते मागे पडले आणि फक्त ‘माउस’चे श्रेयच काय ते त्याच्या नावावर जमा झाले. तरीही आपण जे काही आज आपल्या संगणकांच्या मदतीने करू शकतो, इंटरनेट पाहतो, माहिती शेअर करतो हे सारे डगलसच्या द्रष्टेपणामुळेच शक्य झाले आहे, हे संगणक वापरणाऱ्या कुणालाही त्याच्या मेमरीतून डीलिट करता येणार नाही.


मूळ जर्मन असणार्‍या डगलसने बेलार्ड हिच्याशी विवाह केला होता. ४७ वर्षांच्या वैवाहिक आयुष्यात या दांम्पत्याला चार अपत्ये झालीत. बेलार्डच्या मृत्यूनंतर २६ जानेवारी २००८ ला त्यांना करेन हिच्याशी पुर्नविवाह केला. त्यादरम्यान २००७ ला डगलसला अल्जाएमर झाल्याचे कळले होते. 


यकृताच्या आजाराने २ जुलै २०१३ ला डगलसचे निधन झाले. डगलसला त्याच्या आयुष्यात संशोधनाबद्दल नॅशनल मेडल फॉर टेक्नॉलॉजी, लेमेलसन एमआयटी पुरस्कार, टर्निंग पुरस्कार (१९९७), लोवेलास पदक, नोर्बेट विनर अ‍ॅवार्ड फॉर सोशल अ‍ॅण्ड प्रोफेशनल रिस्पॉसिबिलिटी, संगणक क्षेत्रातील संशोधनाबद्दल फेलो अ‍ॅवार्ड मिळाले आहेत.

🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

संकलन -)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

प्रभात दर्शन

 🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

जेष्ठा मास,कृष्ण पक्ष, *अष्टमी*,रेवती नक्षत्र,सूर्य उत्तरायण,ग्रीष्म ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

शुक्रवार, ०२ जुलाई २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                         *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


अद्भिर्गात्राणि शुद्ध्यन्ति

               मनः सत्येन शुध्यति,

विद्यातपोभ्यां भूतात्मा

              बुद्धिर्ज्ञानेन शुद्ध्यति।


*भावार्थ-- शरीर की शुद्धि जल से होती है। मन की शुद्धि सत्य भाषण से होती है। जीवात्मा की शुद्धि का साधन विद्या और तप हैं। और बुद्धि की स्वच्छता ज्ञानार्जन से होती है।*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


मंगळवार, २९ जून, २०२१

आपण झोपतो म्हणजे काय

 📙 *आपण झोपतो म्हणजे काय ?* 📙 


झोप झाल्यावर माणूस ताजातवाना होतो. रोज आपण दिवसभराच्या परिश्रमानंतर झोपी जातो व सकाळी उठून परत कामाला लागतो. 

झोप न मिळाल्यास काय होते हे तुम्ही आहे अनुभवले असेल. आपण चिडचिडे होतो, कामात लक्ष लागत नाही, डुलक्या येतात, कधी कधी चक्कर येते यावरून झोप घेणे ही अपरिहार्य गोष्ट आहे हे आपल्या लक्षात येईल. लहान मुले १६ ते १८ तास झोपतात या काळात अपचयाचा दर कमी असतो व मुलांची वाढ होते. हळूहळू झोप कमी होते. तरुण व्यक्तींना सात ते आठ तास झोप आवश्यक असते. वृद्धावस्थेत मात्र पाच ते सहा तास झोपही पुरते. सहसा दुपारी झोपू नये.

नुसते पडून राहणे म्हणजे झोप नव्हे हे तुम्हाला माहित आहे. झोपेचे इलेक्ट्रो एनकेफॅलोग्रॅम वा मेंदूच्या कार्याच्या आलेखाद्वारे विश्लेषण केले तर असे लक्षात येते की या काळात मेंदूच्या येणाऱ्या लहरी कमी होतात; पण त्यांची उंची वाढते. नंतरच्या अवस्थेत डोळ्यांच्या जलद हालचाली होतात व मेंदूतून येणाऱ्या लहरींची संख्या वाढते. या लहरींची उंची कमी असते. झोपेच्या एका चक्रात डोळ्यांची जलद हालचाल न होणारी झोप व डोळ्यांची जलद हालचाल होणारी झोप अशा दोन अवस्था असतात. एकदा प्रौढ माणूस झोपल्यावर अशी चार ते पाच चक्र त्यात असतात. या प्रत्येक चक्राचा कालावधी दीड तासांचा असतो. झोप ही लंबमज्जेतील चेतातंतूंवर अवलंबून असते. त्यामुळे या भागाला इजा झाल्यास वा त्यावर परिणाम झाल्यास खूप झोप येते वा येतच नाही. हे जरी खरे असले तरी सामान्यतः जास्त झोप हा सवयीचा परिणाम असतो. त्यामुळे योग्य सवय लागल्यास झोप कमी होते. 

झोप ही जीवनासाठी आवश्यक असते कारण या काळात शरीराला विश्रांती मिळते. श्वसन व रक्ताभिसरणाचे कार्य मंदावते.  अशी ही झोप जास्त झाली तर मात्र झोपाळूपणाचा आरोप येतो आणि खूप कमी झाली तरी चिंता वाटते.


*डाॅ. अंजली दिक्षित व डाॅ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन* 


संकलन गजानन गोपेवाड 


तारुण्यात पिटिका का येतात


══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════

📙 *तारुण्य पीटिका (पुळ्या) का येतात ?* 


'तारूण्य पिटीका' या नावावरून आपल्याला लक्षात येईल की त्यांचा तारुण्याशी संबंध आहे. १४-१५ वर्षांच्या मुला मुलींना तारुण्यपीटिका येतात. काही जणांना त्या कायम होतच राहतात. तारुण्यपीटिका म्हणजेच त्वचेवर येणारे फोड. ते चेहऱ्यावर वा शरीरावर इतरत्र कुठेही येऊ शकतात. त्वचेत काही तैलग्रंथी असतात. त्यातील स्त्रावामुळे त्वचा स्निग्ध राहते. त्यांची रंध्रे बंद झाल्यास त्यातील स्त्राव गोळा होतो व फोड येतात. नंतर जंतुसंसर्गही होतो. या फोडांना तारुण्यपीटिका असे म्हणतात.

 

तारूण्य पिटीका येण्याची अनेक कारणे आहेत. पौगंडावस्थेमध्ये शरीरातील संप्रेरकांच्या (हार्मोन्सच्या) प्रमाणात होणारे बदल, त्वचेची नीट निगा न राखणे, दीर्घ मुदतीचे आजार, कुपोषण, आहारात मेदयुक्त पदार्थांचा जास्त समावेश, बद्धकोष्ठ, तसेच मानसिक ताणतणाव अशा अनेक कारणांमुळे तारूण्य पिटीका होतात.

 

 साहजिकच तारुण्यपीटिका उपचारासाठी वरील कारणांवर आधारित अनंत उपाय उपलब्ध आहेत. पण एक लक्षात ठेवायला हवे ते म्हणजे शारीरिक अनारोग्याचे व एक वरवरचे लक्षण म्हणजे तारूण्य पिटीका. निरोगी, सुदृढ, मानसिक व शारीरिक दृष्ट्या व्यक्तीला त्याचा त्रास होत नाही. चिंता करण्याने तारुण्यपीटिका अधिकच वाढतात. शारीरिक स्वच्छता, समतोल आहार, जेवणाच्या वेळा, विश्रांती, झोपेच्या वेळा यात नियमितपणा व्यायाम आदी आरोग्यपूर्ण सवयीचा अंगीकार केल्यास या त्रासापासून आपली मुक्तता होऊ शकेल.


*डॉ. जगन्नाथ दीक्षित*

*डाॅ. अंजली दीक्षित*

यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज'या पुस्तकातून


स्त्रोत- विज्ञान व दिनविशेष फेसबुक पेज

संकलन, गजानन गोपेवाड 

═══════════════════════


  

अल्बर्ट आईनस्टाईन यांनी सापेक्षता वाद सिध्दांत मांडला

 *३० जुन १९०५*


*अल्बर्ट आइनस्टाइन यांनी त्यांचा क्रांतिकारक सापेक्षतावादाचा सिद्धांत मांडला.*


सापेक्षतावादाचा विशेष सिद्धान्त जून ३०, इ.स. १९०५ रोजी प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ अ‍ॅल्बर्ट आइन्स्टाइन यांनी मांडला. त्या सिद्धान्तामध्ये त्यांनी दाखवून दिले की सर आयझॅक न्यूटन यांनी सांगितलेल्या गतीच्या नियमांनुसार विद्युत-चुंबकीय लहरींची (यामध्ये प्रकाशकिरणांचादेखील समावेश होतो) वागणूक स्पष्ट करता येत नाही आणि विशिष्ट परिस्थितीमध्ये सिद्धान्त कोलमडून पडतो. त्या परिस्थितीचे विश्लेषण, स्पष्टीकरण आणि अनुमान आइन्स्टाइन यांनी सापेक्षतावादाच्या विशेष सिद्धान्तात केले. त्यानंतर काही वर्षांनंतर त्यांनी याच सिद्धान्तामध्ये गुरुत्वाकर्षण बलाचासमावेश करून सापेक्षतावादाचा सामान्य सिद्धान्तसांगितला. त्यामुळे केवळ सापेक्षतावादाचा सिद्धान्त असे म्हणणे बरोबर नाही तर सापेक्षतावादाचा सामान्य सिद्धान्त किंवा सापेक्षतावादाचा विशेष सिद्धान्त अधिक योग्य आहे. या दोन्ही सिद्धान्तांनुसार विद्युत-चुंबकीय लहरींचा वेग सापेक्ष परिस्थितीमध्ये नेहमी स्थिर असतो आणि निरीक्षकाच्या वेगावर आणि स्थळावर अवलंबून नसतो. थोडक्यात (न्यूटनच्या गतीच्या नियमांनुसार) संदर्भाची निरपेक्ष चौकट (Frame of Reference (इंग्रजी आवृत्ती)) ही निरीक्षकाकडे न राहता सापेक्षतेच्या सिद्धान्तानुसार प्रकाशाचा निर्वात क्षेत्रातील वेग हाच ती निरपेक्ष चौकट बनला. *E=mc^2*

========================

संकलन -)

गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

प्रभात दर्शन

 🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

जेष्ठा मास,कृष्ण पक्ष, *पँचमी*,शतभिषा नक्षत्र,सूर्य उत्तरायण,ग्रीष्म ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

मंगलवार, २९ जून २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                        *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


       "पूर्णतः निःस्वार्थ रहो, स्थिर रहो और कार्य करो। एक महत्वपूर्ण बात यह कि सबके सेवक बनो और दूसरों पर शासन करने का तनिक भी यत्न न करो, क्योंकि इससे ईर्ष्या उतपन्न होगी और इससे हर चीज नष्ट हो जायेगी। आगे बढ़ो, तुमने बहुत अच्छा कार्य किया है। हमे अन्य की सहायता की प्रतीक्षा किये बिना, अपने भीतर से ही सहायता लेनी चाहिए।  आत्मविश्वासी, सच्चे, कर्तव्यनिष्ठ एवं सहनशील बनो। 

फिर देखो ! एक समृद्ध, शक्तिशाली भारत आपके सामने है।


                *-स्वामी विवेकानंद*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


सोमवार, २८ जून, २०२१

डॉ, कमला माधव सोहिनी भारतातील पहिल्या महिला शास्त्रज्ञ

 *डाॅ. कमला माधव सोहोनी*

👩‍🔬👩‍🔬👩‍🔬👩‍🔬👩‍🔬👩‍🔬👩‍🔬👩‍🔬👩‍🔬👩‍🔬

*भारतातील पहिल्या महिला शास्त्रज्ञ*

👩‍🔬👩‍🔬👩‍🔬👩‍🔬👩‍🔬👩‍🔬👩‍🔬👩‍🔬👩‍🔬👩‍🔬

*स्मृतिदिन - २८ जुन १९९८*

👩‍🔬👩‍🔬👩‍🔬👩‍🔬👩‍🔬👩‍🔬👩‍🔬👩‍🔬👩‍🔬👩‍🔬

       डॉ.कमला माधव सोहोनी यांचा जन्म बंगळुरूला झाला. योगायोग म्हणजे याच वर्षी त्यांचे वडील नारायण भागवत यांनी बंगळुरूच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधून रसायनशास्त्र घेऊन एम. एस्सी. केली होती.  नुकत्याच सुरू झालेल्या या इन्स्टिट्यूटमधील पहिल्याच तुकडीत नारायणरावांनी प्रवेश मिळवला होता आणि एम. एस्सी. मिळवली. १९१९ साली पत्नीच्या निधनानंतर मुलांसह ते मुंबईत आले. त्यांच्या कन्या दुर्गाबाई भागवत या प्रसिद्ध मराठी लेखिका म्हणून नावाजल्या, तर कमला सोहोनी यांनी रसायनशास्त्रातील शास्त्रज्ञ म्हणून नाव कमावले. कमला मुंबईच्या सेंट झेवियर्स महाविद्यालयातून रसायनशास्त्र आणि भौतिकी विषय घेऊन बी.एस्सी. झाल्या आणि मुंबई विद्यापीठातून पहिल्या वर्गात, पहिल्या आल्या. त्यांना ‘सत्यवती लल्लुभाई सामळदास शिष्यवृत्ती’ आणि जुन्या मुंबई प्रांताची टेक्निकल रिसर्च स्कॉलरशिप मिळाली.  


त्यानंतर त्यांनी वडिलांसारखेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधून एम. एस्सी. करण्यासाठी अर्ज टाकला, पण त्यांना प्रवेश नाकारला गेला. याविषयी शहानिशा करण्यास वडिलांनी कमलाबरोबर बंगळुरूला जाऊन इ़न्स्टिट्यूटच्या संचालकांची - नोबल पारितोषिक विजेते डॉ. सी. व्ही. रमण यांची भेट घेतली.  त्यांनी  ‘‘ती मुलगी आहे म्हणून आम्ही प्रवेश नाकारला,’’ असे सांगितले.  तेव्हा कमलाने उत्तर दिले की, ‘‘तुम्ही मला प्रवेश नाकारून माझ्यावर आणि माझ्यानंतर येणार्‍या मुलींवर अन्याय करीत आहात.  मी मुंबईला परत जाणार नाही. येथेच तुमच्या दारापुढे बसून सत्याग्रह करीन’’. हे ऐकून डॉ. रमण चमकले पण म्हणाले की, ‘‘मी तुला प्रवेश देईन पण एका अटीवर; वर्षभर तात्पुरता प्रवेश देऊन काम ठीक असेल तरच प्रवेश पक्का करीन, नाहीतर तुला काढून टाकीन.’’ कमलाने ते मान्य केले आणि वर्षभर श्रीनिवासय्यांच्या हाताखाली उत्तम काम करून डॉ. रमणकडून वाहवा मिळवली. कडधान्ये, दूध यांतील प्रथिने वेगळी करून त्यांचे अमिनो आम्लात पृथक्करण यावर त्यांनी संशोधन केले आणि त्या कामावर १९३६ साली त्यांनी एम. एस्सी. मिळवली.


त्यानंतर वर्षभर त्या हाफकिन इन्स्टिट्यूटमध्ये होत्या. त्या वेळी त्यांना मुंबई विद्यापीठाच्या दोन शिष्यवृत्त्या-‘सर मंगळदास नथुभाई’ आणि ‘स्प्रिंगर रिसर्च स्कॉलरशिप’- मिळाल्या. त्याआधारे केंब्रिज विद्यापीठात दाखल होऊन त्यांनी १९३९ साली पीएच.डी. मिळवली. त्यांनी वनस्पतीतील सायटोक्रोमचे अस्तित्व शोधून मूलभूत संशोधन केले.  त्याबद्दल नोबल पुरस्कार विजेते डॉ. सुब्रमण्यम चंद्रशेखर यांनी पण त्यांच्या कामाची वाखाणणी केली.


१९३९ साली दिल्लीच्या लेडी हार्डिंग्ज महाविद्यालयात त्या जीवरसायनशास्त्र शिकवत होत्या. डॉ. सुशिला नायर यांनी डॉ. कमलांच्या हाताखाली ‘रक्तातील कोलेस्टेरॉल व निरनिराळ्या दुखण्यांत त्याचा होणारा प्रभाव’ यावर संशोधन केले. डॉ. सुशिला नायर यांनी नंतर म. गांधींबरोबर काम केले आणि त्या स्वतंत्र भारताच्या आरोग्यमंत्री झाल्या. १९४२ साली डॉ. कमला कुन्नूर येथील पोषण संशोधन प्रयोगशाळेच्या उपसंचालक झाल्या. येथे त्यांनी जीवनसत्त्वावर संशोधन केले. 


सप्टेंबर, १९४५ साली त्यांचा विवाह डॉ. माधव सोहोनी यांच्याशी झाला आणि त्या मुंबईत स्थायिक झाल्या. त्या वेळचे मुंबई नगरपालिकेचे आयुक्त बलसारा होते. त्यांनी डॉ. कमला सोहोनींना मुंबई नगरपालिकेत पब्लिक अ‍ॅनॅलिस्टचे काम दिले.  येथे दोन वर्षांनी त्यांनी मुंबईच्या रॉयल इ़न्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये जीवरसायनशास्त्र विभाग सुरू केला आणि त्याच्या त्या विभागप्रमुख झाल्या. त्यांच्या हाताखाली १० पीएच.डी. चे विद्यार्थी संशोधन करीत होते. तसेच, डॉ. मगर हे व्याख्यातेही डॉ. कमलांना संशोधन आणि प्रयोगशाळा सुसज्ज करण्यास मदत करायचे. या दोघांनी ‘नीरा’ या भारतीय पेयाची पौष्टिकता आणि कडधान्यातील ‘टिप्सिन इनहिबिटर्स’ यांवर संशोधन केले.


डॉ. कमलांना हाफकिन संस्थेच्या पुनर्रचना समितीवर नेमेले गेले आणि त्यांनी संशोधन आणि उत्पादन विभाग वेगवेगळे करण्याचा सल्ला १९६० साली दिला आणि त्याप्रमाणे आजही हे दोन विभाग वेगळे आहेत.  बडोद्यात महाराज सयाजीराव विद्यापीठात जीवशास्त्राचा विभाग सुरू करण्यास त्यांनी मदत केली. त्या इतर अनेक विद्यापीठांच्या समित्यांवर सल्लागारम्हणून होत्या. 


भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ.राजेंद्रप्रसाद यांच्या सांगण्यावरून त्यांनी ताड, माड, शिंदी आणि खजूर या चार प्रकारच्या पाम वृक्षांतील नीरेचे संशोधन केले आणि त्यांच्या या संशोधनाचा गौरव १९६० साली डॉ. राजेंद्रप्रसादांच्या हस्ते, सर्वोत्कृष्ट संशोधनाचे पदक देऊन केला गेला.


१९४२-१९४३ साली आरे कॉलनीची स्थापना झाली.  पूर्वी आरेचे दूध काचेच्या बाटलीतून सील करून वितरित व्हायचे. दिनकर देसाई शिक्षणमंत्री असताना, आरेच्या सीलबंद बाटलीतील दुधात अळ्या सापडल्या आणि त्याचे पर्यवसान शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीत झाले. श्री देसाईंनी हे कोडे उलगडण्याकरिता डॉ. कमला सोहोनींना पाचारण केले. त्यांनी सर्व निरीक्षणांती निष्कर्ष काढला, की ग्राहकांनी परत केलेल्या रिकाम्या बाटल्या न धुतल्यामुळे त्यांत माशा, किडे अंडी घालतात ते दिसत नाही. अशा बाटल्यांत दूध भरल्यामुळे अंड्यांतून बाहेर आलेल्या अळ्या दुधात सापडल्या. त्यामुळे रिकाम्या बाटल्या स्वच्छ धुवून देणे ही अट ग्राहकाला घातली गेली.


डॉ. कमला सोहोनी १९६५ ते १९६९ या चार वर्षांसाठी भारतीय विज्ञान संस्थेच्या (इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स) संचालिका होत्या. या संस्थेच्या त्या पहिल्या महिला संचालिका होत्या. त्यांनी तडफदारपणे काम केले आणि योग्य निर्णय घेतले. १९६९ साली त्या निवृत्त झाल्या. 


त्यानंतर कमला सोहोनी जवळजवळ २७ वर्षे ग्रहक चळवळीतर्फे भेसळ प्रतिबंधाचे काम पाहिले. विद्युत उपकरणांवर भारतीय मानकाचा शिक्का असायला हवा, याचा त्यांनी आगह धरला. १९७४ साली मराठी विज्ञान परिषदेतर्फे तळेगावला त्यांचा सत्कार करण्यात आला.


*🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏*

संकलन -)

गजानन गोपेवाड 

उमरखेड उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

प्रभात दर्शन

 🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

जेष्ठा मास,कृष्ण पक्ष, *चतुर्थी*,घनिष्ठा नक्षत्र,सूर्य उत्तरायण,ग्रीष्म ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

सोमवार  २८ जून २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                        *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

        *"जिस प्रकार हमारे द्वारा बोये बबूल के वृक्ष पर कभी आम नहीं लग सकता, ठीक इसी प्रकार हम समाज को जो भी देते हैं, वही हमें वापिस मिलता है। अगर हम समाज के लिए कुछ अच्छा नहीं कर सकते तो हमे भी समाज से कोई अपेक्षा नहीं रखनी चाहिए"*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


वेदना का होतात

 संकलन गजानन गोपेवाड 


══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════

📙 *वेदना का होते ?* 📙


पोळले की आपल्याला चटका बसतो. सरांनी हातावर छडी मारली तर दुखते. कान पिळला तरी दुखते. कधीकधी पोट दुखते. कधी डोके दुखते. तर कधी मान मुरगळते. इंजेक्शन देताना सुई टोचल्यावर दुखते, तसेच काटा मोडल्यास टाचेतही दुखते. जखम झाल्यावर दुखते, तसेच खूप दाब पडल्यासही दुखते. आपल्या दैनंदिन आयुष्यात असे वेदनेचे प्रसंग वारंवार येत असतात.


 शरीराच्या प्रत्येक भागात मज्जातंतूंचे जाळे असते. त्वचा असो वा जठर, आतडे असे अवयव असो किंवा रक्तवाहिन्या, हृदय असो. या सगळ्यांमध्ये मज्जातंतू असतात. या मज्जातंतूंमधून तापमान, दाब, ताण इत्यादींपासून निर्माण होणार्‍या अप्रिय संवेदना (ज्याला आपण वेदना म्हणतो. .) मेंदूपर्यंत पोहोचवल्या जातात. मेंदूमध्ये या संवेदनांचे विश्लेषण होते व स्नायूंना, अवयवांना काय करावयाचे यासंबंधी आदेश दिले जातात. त्यामुळेच आपण चटका बसल्यावर हात विस्तवापासून दूर नेतो, हातावर दाब देणारी वस्तू बाजूला ठेवतो किंवा वेदना निर्माण करणाऱ्या वस्तूंपासून दूर जातो. याचाच अर्थ वेदना होणे ही शरीराची संरक्षण करण्यासाठीची एक यंत्रणा आहे.


 मज्जातंतू असल्यानेच आपल्याला वेदना समजते. कुष्ठरोग्यांच्या मज्जातंतूवर विपरीत परिणाम होऊन ते नष्ट झाल्याने त्याला संवेदना नसतात. त्यामुळे हाताचे बोट कापले गेले व जळाले तरी त्याला कळत नाही व शारीरिक विकृती निर्माण होतात. जठर, आतडे, फुप्फुस इत्यादी इंद्रियांमध्ये वेदनेचा संबंध जखमेपेक्षा कानाशी जास्त असतो. ताणले गेल्यावर या इंद्रियात वेदना होते.

 

 प्रोस्टाग्लॅंडसारखी काही द्रवे देखील वेदना होण्यास कारणीभूत असतात. हृदयाला गरजेपेक्षा कमी प्रमाणात रक्तपुरवठा झाला की छातीत दुखते. याचे कारण म्हणजे हृदयाच्या स्नायूंच्या पेशींना पुरेशा प्रमाणात प्राणवायू मिळत नाही. वेदना होण्याचे हेही महत्त्वाचे कारण होय. जंतू संसर्गात मार लागल्यास निर्माण होणाऱ्या दाबामुळे ही सूज येते व वेदना होते.

 

 वेदना कमी होणे हे साधारणत: रोग बरा होत असल्याचे लक्षण समजतात. पण एक लक्षात ठेवायला हवे वेदना हा रोग नाही ते एक लक्षण आहे. रोग बरा करणे हे उपचाराचे मुख्य ध्येय असते. रोग बरा झाला की लक्षणे आपोआपच कमी होतात. अशी आहेत 'व्यथा' वेदनांची.

 

*डॉ. जगन्नाथ दीक्षित*

*डाॅ. अंजली दीक्षित*

यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज'या पुस्तकातून


स्त्रोत- विज्ञान व दिनविशेष फेसबुक पेज

═══════════════════════


रविवार, २७ जून, २०२१

बंकिमचंद्र चँटर्जी जन्मदिन

 ********************************

*२७ जून - बंकिमचंद्र चटर्जी जन्मदिन*

********************************


जन्म - २७ जून १८३८

मृत्यू - ८ एप्रिल १८९४


बंकिमचंद्र चटर्जी हे बंगाल साहित्याचे एक महान कवि आणि कादंबरीकार असण्याबरोबरच एक प्रसिद्ध पत्रकार देखील होते. 


बंकिमचंद्र चटर्जींनी आधुनिक साहित्याची सुरवात बंगाली भाषेतच केली नाही तर त्या बंगाली भाषेतील साहित्याला विशिष्ट दर्जा मिळावा याकरता त्यांनी त्या साहित्याला उंच ठिकाणी नेण्याचं महत्वपूर्ण काम केलं आहे.


बंकिमचंद्र चटर्जी हे भारतीय प्रजासत्ताकाचे राष्ट्रगान ठरलेल्या "वंदे मातरम्" या गीताचे रचनाकार होते. १८७६ साली त्यांच्या 'आनंदमठ' या कादंबरीमध्ये त्यांनी हे गीत लिहिले. 


'आनंदमठ' ही कादंबरी १८८२ साली प्रकाशित झाली आणि लवकरच हे गीत भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे प्रेरणागीत बनले.


*कादंबऱ्या* :

दुर्गेशनंदिनी, कपालकुंडला, मृणालिनी, विषवृक्ष, इंदिरा, युगलांगुरीय, चंद्ररशेखर, राधारानी, रजनी, कृष्णकान्तेर उइल, राजसिंह, आनंदमठ, देवी चौधुरानी, सीताराम.


*निबंध* :

लोकरहस्य, विज्ञान रहस्य, कमलाकान्तेर दप्तर, विविध समालोचना, साम्य, कृष्णचरित्र, विविध प्रबंध (१ ला खंड, २रा खंड), धर्मतत्त्व अनुशीलन.


*पत्रकारिता :*

वंगदर्शन पत्रिका


********************************

Featured Post

व्यायाम व योगा अवश्य करावा*

*व्यायाम व योगा अवश्य करावा*  *व्यायाम व योगा करण्याचे दहा फायदे:-*  1) व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते: व्यायाम करणारी...