मंगळवार, १२ ऑक्टोबर, २०२१

आपण का हसतो


══════════════════════

   *📒📒📒 @ संकलन @📒📒📒*

  *श्री. गजानन गोपेवाड *

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════   

😀 *आपण का हसतो ?* 😀

**************************

हास्य ही एक निर्मळ आणि सार्वत्रिक भावना आहे. माणसामाणसांमधील संवादाचं ते एक महत्त्वाचं साधन आहे. अशा प्रकारच्या संवादासाठी लागणारी भाषा आपल्याला शिकावी लागते. मग ती मराठीसारखी मातृभाषा असो की इंग्रजीसारखी परकी भाषा असो. हास्य मात्र शिकावं लागत नाही. ते उपजतच प्रत्येकाच्या ठायी असतं. मूल साधारण साडेतीन-चार महिन्यांचं झालं की ते हसू लागतं. आपल्या आईबरोबर आणि इतर आप्तांबरोबर नातं प्रस्थापित करण्याचं शिशूचं ते एक साधन असतं. त्यामुळेच हास्य हे नेहमी उत्स्फूर्त असतं. म्हणजे तसं आपण ठरवून हसू शकतो पण ते हास्य निर्मळ नसतं किंवा इतरांशी नातं जोडणारं नसतं. अशा कृत्रिम हास्यापोटी नकारात्मक प्रतिसादच उत्पन्न होतो. उत्स्फूर्त हास्यापोटी सकारात्मक प्रतिसादच मिळतो. व्यक्ती-व्यक्तीतील सामाजिक दृढ व्हायला त्यामुळे मदत मिळते. हास्यातून आपण इतरांना एक सकारात्मक संदेश पाठवत असतो. त्यामुळेच माणूस एकटाच असताना सहसा हसताना आढळत नाही. एखादं विनोदी पुस्तक वाचत असताना किंवा एखाद्या विनोदी प्रसंगाची आठवण होऊन माणूस एकांतात हसेल. एरवी एकांतात तो जसा आपल्याशीच बोलत नाही तसाच तो आपल्याशी हसतही नाही.


हसताना आपल्या चेहऱ्याच्या स्नायूंची बरीच हालचाल होते. ते नवा आकृतिबंध धारण करतात. त्याला आवाजाचीही साथ मिळते पण हास्याच्या प्रकारानुसार शरीराच्या इतर अवयवांच्या स्नायूंचाही त्यात सहभाग असतो आणि या साऱ्याचं नियंत्रण मेंदूमधील निरनिराळ्या भागांकडून केलं जातं. सहसा आनंदाच्या भावनेला जागृत करणाऱ्या मेंदूमधील सगळ्या प्रक्रिया हास्याच्या वेळीही होत असतात. थोडक्यात, हास्यापोटी आनंदाच्या भावनेनं मन आणि शरीर उचंबळून येतं.


विनोदापोटी आपण हसतो, असा एक समज आहे. चांगल्या विनोदापोटी हास्य उमलत असलं तरी हास्य उमलण्यासाठी विनोदाची गरज असतेच असं नाही. अमेरिकेतील मेरीलँड विद्यापीठातील मज्जाशास्त्रज्ञ रॉबर्ट प्रोव्हाईन यांनी यासाठी एक सर्वेक्षणच केलं. तेव्हा अरे जॉन, होतास कुठं तू, ही पहा मेरी आली किंवा तुमच्याकडे एखादा रबरबँड मिळेल काय यांसारख्या साध्यासुध्या वाक्यांपोटीही हास्य उत्पन्न झाल्याचं त्यांना दिसून आलं. म्हणजेच त्या हास्याचा उगम विनोदात नसून ती एक उत्स्फूर्तपणे उमटलेली अभिव्यक्ती होती.


त्यामुळेच आपलं हास्य हा उत्क्रांतीचा वारसा आहे

की काय, अशी शंका काही मानववंशशास्त्रज्ञांना आली होती. तो आपला सांस्कृतिक उत्क्रांतीचा ठेवा आहे, असं महादेव आपटे यांचं मत आहे. पण मनुष्यप्राण्याशिवाय इतर प्राण्यांना हसता येत नाही. म्हणजे त्यांना गुदगुल्या केल्या तर त्याची प्रतिक्रिया उमटते; पण ती वेगळी असते. चिम्पांझीसारख्या मनुष्यप्राण्याच्या उत्क्रांतीच्या प्रवाहातल्या सर्वात जवळच्या नातेवाईक प्राण्याला गुदगुल्या केल्यास तो धाप लागल्यासारखा प्रतिसाद देतो. इतर काही

प्राण्यांच्या तोंडून अशा वेळी काही चीत्कारही उमटतात. त्याचंच रूपांतर हास्यात झालं असावं, असा एक अंदाज व्यक्त केला गेला आहे.


हास्यापोटी शरीरक्रियांमध्ये काही चांगले प्रतिसाद उमटतात आणि त्यांची आरोग्य राखण्यासाठी मदत होते.

त्यामुळंच लाफ्टर क्लब'सारखे काही उपक्रम चालू आहेत. लाफ्टर इज द बेस्ट मेडिसिन' म्हणतात ते यापोटीच. तरीही आपण का हसतो, हे एक गूढच राहिलं आहे. त्या प्रश्नाचं नेमकं उत्तर अजूनही मिळालेलं नाही.

 

*-डॉ.बाळ फोंडके यांच्या 'का?'या पुस्तकातून*

═══════════════════════


पृथ्वी स्वतःभोवती गिरकी का मारते


══════════════════════

   *📒📒📒 @ संकलन @📒📒📒*

  *श्री. गजानन गोपेवाड *

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════   

🌎 *पृथ्वी स्वतःभोवती गिरकी का मारते?* 

"""""""""""""""""""""""""""""""""""""


आपली पृथ्वीच नाही तर सगळे ग्रह अशी गिरकी घेत असतात. प्रत्येकाचा अशी एक प्रदक्षिणा करण्याचा 'वेग' वेगवेगळा असतो. ज्या प्रक्रियेतून ग्रहांचा जन्म होतो, त्याचाच हा परिणाम आहे. आकाशात इतस्तत: अनेक पदार्थ, वायू वेडेवाकडे पसरलेले असतात. त्यापैकी प्रत्येकाला इतर सर्वांच्या गुरुत्वाकर्षणाची ओढ जाणवत असते. कालांतराने त्या अोढीपायी त्यातले काही पदार्थ एकत्र येतात. त्यांचा जुडगा बनतो. साहजिकच त्याचं वस्तुमान जास्त असल्यामुळे त्यांची इतरांना वाटणारी ओढ जास्त होते. त्यामुळे पदार्थांचे आणखी काही कण त्याला येऊन चिकटतात. अशा साखळी पद्धतीने हळूहळू ग्रहाचा जन्म होतो. तो होत असताना त्या गुरुत्वाकर्षणाच्या सर्व बाजूंना सारख्याच वाटणाऱ्या ओढीपायी ते पदार्थ ओढले जात असताना त्यांना चक्राकार गती मिळते. तीच मग ते पदार्थ ज्याला चिकटतात त्या ग्रहांकुरालाही मिळते.

ग्रहांकुराच्या केंद्रस्थानात त्यातल्या पदार्थाची घनता साहजिकच जास्त असते. एखादा लाडू वळताना तो दाबला जात असतो. त्यामुळे त्याचा मध्यभाग जास्त घट्ट झालेला असतो तशातलाच हा प्रकार. त्यामुळं त्या ग्रहाच्या परिघावरच्या पृष्ठभागाला केंद्राच्या गुरुत्वाकर्षणाची जास्त ओढ वाटते. पण विखुरलेल्या पदार्थांपासून घन ग्रहाचा जन्म होताना त्याचा व्यास कमी होत जातो. त्यामुळे त्या वर्तुळाकार गतीचा वेगही वाढत जातो. कथक नृत्य करणारी नर्तकी जेव्हा गिरकी घ्यायला लागते तेव्हा त्या गिरकीची गती वाढवायची असेल तर ती आपले हात अंगासरशी ओढून घेते, म्हणजेच अंगाच्या गोलाचा व्यास कमी करते. तेच हा हात पसरलेले असले की त्या गिरकीचा वेगही कमी होतो. तशीच ग्रहाचीही अवस्था असते. त्याचा पसारा कमी होत जातो, तो अधिक घन बनतो तसा त्याचा वर्तुळाकार भ्रमणाचा वेगही वाढत जातो. त्यामुळे गिरकी घेणं हा प्रत्येक ग्रहाचा स्थायीभावच आहे. पृथ्वी ही त्याला अपवाद नाही.


मग चंद्र का गिरकी घेत नाही ? त्याचा एक भाग सतत आपल्या डोळ्यांसमोर राहतो ते का ? असे प्रश्न कोणीही विचारेल; पण चंद्र गिरकी घेत नाही हे म्हणणं चुकीचं आहे. चंद्राचा स्वतःभोवती गिरकी घेण्याचा वेग हा पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालण्याच्या वेगाइतकाच असल्यामुळे त्याचा एक चेहरा आपल्याला सतत दिसत असतो एवढंच. एरवी आकाशातला इतर कोणत्याही गोल गोलासारखा तोही स्वतःभोवती गिरकी घेतच असतो.


*डाॅ.अंजली दिक्षित व डाॅ.जगन्नाथ दिक्षित*

*यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' पुस्तकातून*


शिंका का येतात?


══════════════════════

   *📒📒📒 @ संकलन @📒📒📒*

  *श्री. गजानन गोपेवाड *

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════   

📙 *शिंका का येतात ?* 📙


हिवाळ्यात किंवा गार वाऱ्यात फिरून आल्यावर तुम्हाला फटाफट शिंका आल्या असतील. काहीतरी बोलायला तोंड उघडावे आणि तेवढ्यात शिंका येऊन बोलता येऊ नये, असेही कधी झाले असेल. सर्दी पडसे झाल्यावर शिंका येतात. विशेषत: वावड्यामुळे सर्दी आली असेल, तर शिंका जास्तच येतात. धुळीत गेल्यास, विशिष्ट फूल हुंगल्यास, किंवा अत्तराचा, उदबत्तीचा वास आल्यास वावडे असलेल्या लोकांना शिंका येतात आणि सर्दी होते. काय म्हणता तुम्हाला शिंका येत नाहीत ? मग एक काम करा. आजोबांच्या कोटाच्या खिशातली तपकिरीची डबी घ्या आणि एक चिमूटभर नाकात सोडा! काय आता आल्या का शिंका ? शिंका येणे शुभ की अशुभ ? काहीजण म्हणतात एक शिंक येणे वाईट, पण दोन शिंका येणे चांगले. अर्थात या सर्व अंधश्रद्धा बरं का ! पण शिंका का येतात, ते पाहू.

खोकला आणि शिंका यात बरेच साधर्म्य आहे. आपल्या श्वसन नलिकेत काही त्रासदायक पदार्थ आला तर खोकला येतो. आपण खोकतो म्हणजे काय करतो ? सर्वात आधी आपण दीर्घ श्वास घेतो. त्यानंतर एपिग्लाॅटीस नावाचा पडदा श्वासनलिकेवर दाबला जातो. त्यानंतर आपण जोराने श्वास सोडतो. सहाजिकच खोकताना हवा दाबाखाली बाहेर पडते व श्वास नलिकेतील घाण, जिवाणू बेडक्याच्या रूपाने बाहेर टाकले जातात. आता शिंकेविषयी नाकातील हवा जाण्याच्या मार्गात जर काही अपायकारक, त्रासदायक असे पदार्थ आले तर शरीर खोकल्याप्रमाणेच प्रतिसाद देते. नाकातील ही संवेदना मेंदूपासून निघणाऱ्या पाचव्या नसेमार्फत मेंदुच्या मेड्युला या भागात जाते. येथील पेशींमध्ये संवेदनेचे विश्लेषण होऊन शिंक येण्याची प्रक्रिया होण्याचा आदेश दिला जातो. यात सुरुवातीचे दीर्घ श्वास, नंतर एपिग्लाॅटीसचे श्वासनलिकेवर येणे व नंतर जोरात उच्छवास हे खोकल्याप्रमाणेच असते, मात्र जोरात श्वास सोडताना पडजीभ खाली पडते व त्यामुळे हवा तोंडातून बाहेर न पडता नाकातून बाहेर पडते. नाकातील अपायकारक पदार्थ यामुळे बाहेर पडतो.


वावड्यामुळे वा जंतूसंसर्गामुळे नाकातील आवरण हुळहुळे होते व त्यामुळे वारंवार शिंका येतात. एव्हीलसारखी गोळी देऊन वावड्यामुळे येणाऱ्या शिंका कमी करता येतात. तसेच ज्या पदार्थांमध्ये आपल्याला वावडे आहे त्यापासून दूर राहून स्वतःचे संरक्षण करणे जास्त योग्य होय.


*- डॉ.बाळ फोंडके यांच्या 'का?' या पुस्तकातून*

═══════════════════════


तोंडाला दूर्गंधी का येते


══════════════════════

   *📒📒📒 @ संकलन @📒📒📒*

  *श्री. गजानन गोपेवाड *

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════   

📒 *तोंडाला दुर्गंधी का येते ?* 📒

*******************************


ही विकृती म्हणजे काही जिवाणूंची अवकृपा आहे. हवा नसतानाही ज्यांची वाढ होऊ शकते, अशा घ्या ऍनेरोबिक जातीच्या जीवाणूंच्या करणीपायी तोंडात काही सल्फरयुक्त संयुगांची निर्मिती होते. ही संयुगं सहजासहजी हवेत उडून जाऊ शकतात. म्हणजेच बाष्पनशील असतात. यातलं एक संयुग म्हणजे हायड्रोजन सल्फाईड हा वायू असतो. कुजक्या अंड्यांमधूनही हाच वायू बाहेर पडतो. तसंच मिथाईल मरकॅप्टन नावाचं दुसरं एक संयुगही या दुर्गंधीला कारणीभूत असतं.


 काही कारणांनी जेव्हा आपलं तोंड कोरडं पडतं तेव्हा अशा जीवाणूंच्या वाढीला पोषक वातावरण तयार होतं. त्यात अशा प्रसंगी तोंडातल्या लाळेच्या स्रावालाही आहोटी लागते. लाळ आपल्या जिभेवरचा, एकंदरीतच तोंडातला ओलावा राखण्यास मदत करते. शिवाय लाळेमधलं लायसोझाईम नावाचं विकर जीवाणूंना मारून टाकतं व त्यांच्या वाढीला त्यामुळे आळा बसतो; पण लाळेचा पाझर आटला की या दोन्ही प्रक्रिया व्यवस्थितरित्या पार पडत नाहीत. त्यामुळे या जीवाणूंचं फावतं. त्यांच्या करणीपायी तयार होणारी दुर्गंधीयुक्त रसायने तोंडात साचून राहतात.

आपल्या जीभेवरच्या वळकट्या, हिरड्यांच्या खालची जागा किंवा दातातल्या फटी या सहसा कोरड्या असतात. तसंच त्या थोड्याश्या अंधार्‍याही असतात. अशा जागी हे जिवाणु फोफावतात. त्यात जर दातांच्या फटीत अन्नाचे कण अडकून पडलेले असतील तर ते कुजतात. या जीवाणूंना ते पोषक ठरतात. त्यांच्या वाढीला मदतच करतात.


 आपल्या आहाराचीही कधी कधी या जीवाणूंच्या वाढीला मदत होते. आहारातील काही पदार्थांच्या सेवनामुळे या ऍनेरोबिक जीवाणूंच्या वाढीला आणि बाष्पनशील आणि दुर्गंधीयुक्त संयुगांच्या निर्मितीला हातभार लावला जातो. कॉफी हा असाच एक पदार्थ आहे. त्याच्या अतिसेवनामुळे त्यातील आम्लधर्मीय पदार्थ तोंडातील ओलावा कमी करण्यास कारणीभूत होतात. वातावरण मग या दुर्गंधीकारक जीवाणूंच्या वाढीस योग्य होतं. शर्करायुक्त पदार्थ किंवा चुइंगमसारख्या पदार्थांचं जेव्हा या जिवाणूंकरवी विघटन होतं तेव्हाही ही बाष्पनशील संयुगं निर्माण केली जातात. मसालेदार पदार्थ किंवा कांदे खाल्ल्यावर त्यांच्या पचनापोटी निर्माण होणारे वायू रक्तामध्ये शोषले जाऊन उच्छवासाच्या वेळी फुप्फुसातून बाहेर फेकले जातात. त्या वेळीही तोंडातून दुर्गंधी आल्यासारखी परिस्थिती निर्माण होते. अर्थात तो वास जरी काही जणांना सहन होत नसला तरी तो कुजक्या अंड्यासारखा नाक दाबून धरायला लावत नाही हे मात्र खरंच !

 

*-डॉ.बाळ फोंडके यांच्या 'का?'या पुस्तकातून*

═══════════════════════

  

कुतूहल गणित


══════════════════

           *🤔 【 कुतूहल 】 🤔*  

______________________________

*🖥️✒️संकलन✒️💻*

_*श्री.गजानन गोपेवाड *_

_*श्री.अण्णासाहेब पांडूरंग राठोड (बीड)_TSS*_

~==========================~


*कुतूहल : आव्हान गणित ऑलिम्पियाडचे!*


आंतरराष्ट्रीय स्तरावर गणित आणि विज्ञान विषयांत दरवर्षी घेतल्या जाणाऱ्या ऑलिम्पियाड स्पर्धा परीक्षा हे विद्यार्थ्यांसाठी मोठे बौद्धिक आव्हान समजले जाते. १९५९ मध्ये रोमानिया या पूर्व युरोपीय देशात भरलेल्या गणित ऑलिम्पियाडपासून या स्पर्धांना सुरुवात झाली. ऑलिम्पियाडपासून विद्यार्थ्यांना कारकीर्दीसाठी थेट लाभ होईलच असेल असे नाही, परंतु या आव्हानात्मक पण खेळीमेळीच्या स्पर्धांद्वारा जगातील प्रज्ञावंत विद्यार्थ्यांना एकमेकांना तसेच दिग्गज गणितींना भेटण्याची संधी मिळते; गणिताच्या प्रगत विद्याभ्यासाला वाहून घ्यावे अशी प्रेरणाही मिळते.


आरंभी मोजक्या देशांपुरत्या मर्यादित असलेल्या गणित ऑलिम्पियाडमध्ये आता शंभरहून अधिक देश भाग घेतात. प्रत्येक देशाला जास्तीत जास्त सहा स्पर्धक, एक अध्यापक नेता, एक उपनेता आणि एक किंवा अधिक निरीक्षक पाठवता येतात. या स्पर्धा परीक्षेत बारावीपर्यंतच्या अंकशास्त्र, बीजगणित आणि भूमिती यांतील खूप कठीण तसेच विद्यापीठीय गणितातही सहसा समाविष्ट नसलेल्या प्रक्षेपी व संमिश्र भूमिती, फलीय समीकरणे आणि चयनशास्त्र अशा गणिती शाखांतील समस्या समाविष्ट असतात. कलनशास्त्र (कॅल्क्युलस) मात्र नसते. यामागचे गृहीत हे की ज्या विद्यार्थ्यांची पायाभूत गणिती समज दांडगी असते त्यांना असे प्रश्न समजायला आणि सोडवायला अडचण येऊ नये. गणित ऑलिम्पियाडमध्ये स्पर्धकांना प्रत्येकी साडेचार तासांचे दोन पेपर सोडवायचे असतात. एका पेपरमध्ये तीन प्रश्न असतात. अनेक वेळा विजेते स्पर्धक सहाही प्रश्न वेळेत पूर्ण करतातच, शिवाय प्रत्येक प्रश्नात पैकीच्या पैकी गुण मिळवतात. विद्यापीठीय स्तरावर शिकवणाऱ्या एका प्राध्यापक मित्राच्या मते या प्रश्नांपैकी एकेक प्रश्न सोडवायलासुद्धा त्याला स्वत:ला एकेक दिवस पुरणार नाही. स्पर्धकांनी प्राप्त केलेल्या गुणांनुसार त्यांना सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदके मिळतात. आतापर्यंत चौदा वेळा चीनच्या विद्यार्थी चमूतील सहाच्या सहा स्पर्धकांनी सुवर्णपदके कमावली आहेत. त्यानंतर अमेरिका, दक्षिण कोरिया आणि रशिया असा क्रम लागतो. भारताचा क्रमांक बहुतेकदा २० ते ३० मध्ये असतो. गणित ऑलिम्पियाडमधील आपली कामगिरी सुधारण्याची जबाबदारी आपल्या निस्सीम गणितप्रेमी अध्यापकांनी, विद्यार्थ्यांनी उचलायला हवी.


भारतीय विद्यार्थ्यांसाठी सर्व विज्ञान आणि गणित ऑलिम्पियाड स्पर्धा परीक्षांसाठी होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र, मुंबई हे एकमेव अधिकृत समन्वयन केंद्र असून ते पाच टप्प्यांत निवड आणि प्रशिक्षण करते. गणित ऑलिम्पियाडमध्ये यश मिळवणारे कित्येक विद्यार्थी पुढे नामांकित गणित संशोधक होतात असे आढळते. उदाहरणार्थ, ऑस्ट्रेलियाचे टेरेन्स ताओ, इराणच्या मरिअम मिर्झाखानी, व्हिएतनामचे एन्जो बाओ चाऊ, मूळचे महाराष्ट्रीय आणि अमेरिकास्थित सैद्धांतिक संगणकशास्त्रज्ञ सुभाष खोत. ऑलिम्पियाडमध्ये मुलींचा सहभाग वाढवण्यासाठी स्वतंत्र युरोपीय गल्र्स गणित ऑलिम्पियाड ही स्पर्धा सुरू झाली आहे.


–प्रा. हेमचंद्र प्रधान

मराठी विज्ञान परिषद, मुंबई.

Written By_लोकसत्ता टीम

संकेतस्थळ : www.mavipa.org      

ईमेल : office@mavipamumbai.org


झाडाची पाने का गळतात


══════════════════════

   *📒📒📒 @ संकलन @📒📒📒*

  *श्री. गजानन गोपेवाड *

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════   

🍂 *झाडांची पानं का गळून पडतात ?* 🍂 


निसर्ग मोठा काटकसरी आहे; आणि त्याचं नियोजनही बंदिस्त असतं. झाडांच्या पानांचं एक काम जसं प्रकाशसंश्लेषणाचं असतं तसंच ते झाडातलं अतिरिक्त पाणी बाहेर टाकून देण्याचं असतं. एक प्रकारे झाडांचा हा उच्छ्वासच असतो. जमिनीतीलं पाणी मू़ळं शोषून घेतात. त्याचा जो काही वापर आवश्यक असतो तो होत होत ते पाणी पानांपर्यंत पोहोचतं. तिथं त्याचा संयोग हवेतल्या कार्बनडायआॅक्साइडशी होतो. सूर्यप्रकाशापासून मिळणाऱ्या ऊर्जेच्या मदतीनं या संयोगातून कर्बोदकं म्हणजेच पिष्टमय पदार्थ निर्माण होऊन ते झाडांमध्ये साठवले जातात. उरलेलं पाणी मग पानाकडून बाष्पाच्या रूपात हवेत सोडलं जातं. मात्र, हिवाळा आला की सूर्यप्रकाशही कमी होतो आणि जमिनीमधून शोषल्या जाणाऱ्या पाण्याच्या मात्रेतही घट होते. सहाजिकच उपलब्ध पाण्याच्या बचतीला महत्त्व येतं. त्यामुळं मग पावलांकडून ते हवेत टाकलं जाणार नाही, याची व्यवस्था करावी लागते. पानांवर सोपवलेल्या दोन्ही कामांमध्ये आता मंदी आल्यामुळे पानांची तेवढीशी आवश्यकता आता उरत नाही. तेव्हा ती गळून पडणंच सोयीचं ठरतं. शिवाय काही काळ सतत काम करत राहिल्यामुळं पानंही 'म्हातारी' झाल्यासारखी होतात. सहाजिकच ती काढून टाकून त्यांची जागा नवी कोरी पानं घेतील अशी व्यवस्था करावी लागते. त्यासाठी मग अशी अवस्था होण्यापूर्वीच पानाच्या देठाच्या मुळाशी मऊशार पेशींची गर्दी होते. त्यातून एक विशिष्ट विकर पाझरायला लागतं. ते त्या देठाच्या खुडण्याला मदत करतं आणि पान हळुवारपणे अलगद गळून पडतं.


वर्षाचे सहा सात महिने सतत काम करताना काही विषमय पदार्थही पानांमध्ये साचून राहतात. पानं गळून पडल्यानं या घातक पदार्थांचा निचरा व्हायलाही मदत होते; पण अशा प्रकारे सर्वच झाडांची पाने गळून पडत नाहीत. सदाहरित झाडांची अशी विशिष्ट ऋतूमध्येच पानगळ होत नाही. उलट त्यांच्या पानांचं नवीनीकरण सततच होत असतं. त्यामुळं वर्षभर सर्वच ऋतूंमध्ये ती हिरव्यागार पानांनी बहरलेली दिसतात.

 

*-डॉ.बाळ फोंडके यांच्या 'का?'या पुस्तकातून*

═══════════════════════

गणित आँलिम्पीयाडचा उत्सव


══════════════════

           *🤔 【 कुतूहल 】 🤔*  

______________________________

*🖥️✒️संकलन✒️💻*

_*श्री.गजानन गोपेवाड *_

_*श्री.अण्णासाहेब पांडूरंग राठोड (बीड)_TSS*_

~==========================~


*कुतूहल : गणित ऑलिम्पियाडचा उत्सव*


इंटरनॅशनल मॅथेमॅटिकल ऑलिम्पियाड (आय.एम.ओ.) ही केवळ एक स्पर्धा नाही तर दर वर्षी जुलै महिन्यात ११ दिवस चालणारा तो एक उत्सवच असतो. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी प्रश्ननिवडीची परंपरागत प्रक्रिया अतिशय रंजक आहे. ऑलिम्पियाडच्या सुमारे दोन महिने आधी सर्व देशांमधून प्रश्न मागवले जातात. या प्रश्नांमधून आयोजनकर्त्यां देशातील एक समिती सुमारे ३० ते ४० ‘शॉर्टलिस्टेड’ म्हणजे ‘निवडक’ प्रश्न निवडून त्यांची एक पुस्तिका बनवते. प्रत्येक देशाचे नेतृत्व करणाऱ्या नेत्यांना आगमनाच्या पहिल्याच दिवशी एका दूरच्या ठिकाणी नेऊन ठेवले जाते आणि त्यांच्याकडे निवडक प्रश्न व त्यांची उत्तरे असलेली पुस्तिका सोपवली जाते. याचे कारण काय? तर, गोपनीयता! काही कायमचे पदाधिकारी आणि हे सर्व नेते यांच्या पंच समितीत चर्चा, मतदान अशा पद्धतीने शॉर्टलिस्टेड प्रश्नांपैकी ६ प्रश्नांची प्रश्नपत्रिका निवडली जाते. बीजगणित, भूमिती, फलांची (फंक्शनल) समीकरणे आणि काही कोडय़ांसारखे प्रश्न अशी साधारण विभागणी असते. प्रश्नांच्या अचूक शब्दरचनेबद्दल व अनेक प्रमुख भाषांमधील भाषांतराबद्दल बराच खल होतो व अंतिम स्वरूप ठरते. इंग्रजी, फ्रेंच व रशियन या ऑलिम्पियाडच्या अधिकृत भाषा समजल्या जातात. मागणी केली तर इतर भाषांमध्ये प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिली जाते. 


ऑलिम्पियाड प्रश्नांबद्दल एक अट अशी आहे की त्यातील प्रत्येक प्रश्न संपूर्णपणे नवीन हवा. तो त्याआधी संपूर्ण जगातील कोणत्याही स्पर्धेत कधीही विचारलेला असता कामा नये. अर्थातच तो कोणत्याही पुस्तकात किंवा अन्य स्वरूपात प्रकाशित झालेला असता कामा नये. ही अट पूर्ण करणे फार कठीण आहे. कारण आजपर्यंतच्या लक्षावधी प्रश्नांत नसलेला प्रश्न कसा काढणार? एखादा प्रश्न नक्की नवीन आहे हे कसे ठरवायचे? यासाठी पंच समितीतील शंभरएक सदस्यांच्या ज्ञानावर विसंबून राहिले जाते. त्यांपैकी कोणीही तो प्रश्न आधी पाहिलेला नसेल तर तो नवीन समजला जातो. अशा पद्धतीने प्रश्नपत्रिका तयार करण्याचे काम झाल्यानंतर ऑलिम्पियाडच्या मुख्य ठिकाणी स्पर्धेचा दिमाखदार उद्घाटन सोहळा प्रशस्त सभागृहात आयोजित केला जातो. सोहळ्याचे खास आकर्षण म्हणजे स्पर्धकांचे संचलन. हे क्रीडा ऑलिम्पिकसारखेच असते. फरक इतकाच की ते एखाद्या बंदिस्त सभागृहात रंगमंचावर सादर होते. प्रत्येक देशाचे नाव पुकारल्यानंतर त्या देशाचा संघ आपल्या स्वयंसेवकाबरोबर मोठय़ा दिमाखात रंगमंचावर येऊन प्रेक्षकांना अभिवादन करतो व पुढे जातो. संघाबरोबर त्या देशाचा झेंडा असतो. तसेच स्पर्धकांचा पोशाखही एकसारखा, गणवेशासारखा असतो. नंतर कसरती, जादूचे प्रयोग इत्यादी करमणुकीचे कार्यक्रम होतात. त्यानंतरच्या दिवशी मुख्य परीक्षेला सुरुवात होते.


–डॉ. रवींद्र बापट

मराठी विज्ञान परिषद, मुंबई.

Written By_लोकसत्ता टीम

संकेतस्थळ : www.mavipa.org      

ईमेल : 

गाथा बलिदानाची

 ➿➿➿➿➿➿➿➿➿➿

🇮🇳🇮🇳 *गाथा बलिदानाची* 🇮🇳🇮🇳

➿➿➿➿➿➿➿➿➿➿


         *डाॕ.राममनोहर लोहिया*


            जन्म : २३ मार्च १९१०


      *मृत्यू : १२ ऑक्टोबर १९६७*


 भारतातील समाजवादी चळवळीतील एक अग्रगण्य नेते आणि विचारवंत. त्यांचा जन्म उत्तर प्रदेशातील फैजाबाद जिल्ह्यातील अकबरपूर या गावी हिरालाल व चंद्रीबाई (चंदाबाई) या दांपत्याच्या पोटी झाला. चंद्रीबाई रोममनोहर लहान असतानाच वारली. तेव्हा आजी व चुलतीने त्यांचा सांभाळ केला. वडील हिरालाल हे व्यापर करीत असत. ते काँग्रेसचे कार्यकर्ते होते. अकबरपूर जवळील टंडन पाठशाळा व विश्वेश्वरनाथ हायस्कूल यांमधून राममनोहरांनी सुरुवातीचे शिक्षण घेतले. वडील व्यवसाया निमित्त मुंबईला राहू लागले, तेव्हा तेथूनच राममनोहर मुंबई विद्यापीठाची मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाले (१९२५). त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते प्रथम बनारस हिंदू विश्वविद्यालयात दाखल झाले; पण ते सोडून त्यांनी कलकत्त्याच्या विद्यासागर महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि कलकत्ता विद्यापीठाची बी.ए. ही पदवी संपादन केली (१९२९). उच्च शिक्षणासाठी निधी जमा करून ते प्रथम इंग्लंडला  गेले; पण नंतर त्यांनी बर्लिन विद्यापीठात संशोधन करून अर्थशास्त्र विषयात सॉल्ट अँड सिव्हिल डिस्ओबीडिअन्स या विषयात पीएच्.डी. ही पदवी मिळविली (१९३२).


विद्यार्थिदशेतच १९२६ च्या गौहाती काँग्रेस अधिवेशनास ते उपस्थित होते. त्यावेळी त्यांचा सुभाषचंद्र बोस आणि नेहरूंशी सहवास घडला आणि ते राष्ट्रीय चळवळीकडे आकृष्ट झाले; तथापि जर्मनीहून परतल्यानंतर (१९३३) त्यांनी सुरुवातीस बनारस विद्यापीठात अध्यापकाच्या नोकरीसाठी पयत्न केला आणि नाखुषीने रामेश्वरदास बिर्लांच्या स्वीय साहाय्यकाचे काही महिने काम पतकरले. जेव्हा काँग्रेसमध्ये काँग्रेस समाजवादी पक्ष स्थापन झाला (१९३४), तेव्हा त्यांनी राजकीय कार्याला वाहून घेतले. त्यांची कार्यकरिणीवर निवड झाली तसेच काँग्रेस सोशॅलिस्ट या नवीन साप्ताहिकाच्या संपादकत्वाची जबाबदारी त्यांच्यावर टाकण्यात आली. लखनौच्या अखिल भारतीय काँग्रेस अधिवेशनात नेहरूंनी काँग्रेसच्या परराष्ट्र विभागाचे त्यांना सचिव नेमून आणखी एक जबाबदारी सोपविली (१९३६-३८). त्यांनी आपले वास्तव्य कलकत्त्याहून अलाहाबादला हलविले. दुसऱ्या महायुद्धात त्यांनी प्रखर युद्धविरोधी आणि साम्राज्यशाही विरोधी भूमिका घेतली. त्यामुळे त्यांना अटक झाली १९३९; पण न्यायालयात त्यांची सुटका करण्यात आली. त्यांना स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळात एकोणीस वेळा तुरुंगावास घडला. तुरुंगात त्यांचा छळही करण्यात आला. अमेरिका, ग्रेट ब्रिटन, म्यानमार (ब्रह्यदेश), गोवा येथेही त्यांना विविध कारणांसाठी कारावासात डांबण्यात आले.


१९४२ च्या छोडो भारत आंदोलनात भूमिगत राहून त्यांनी अच्युतराव पटवर्धन व जयप्रकाश नारायण यांच्या बरोबरीने चळवळीचे नेतृत्व केले. याच सुमारास जयप्रकाशांबरोबर ‘आझाद दस्तसाठी’ काही महिने ते नेपाळात गेले. तेथून आल्यावर २० मे १९४४ रोजी त्यांना अटक होऊन प्रथम लाहोर व नंतर आग्रा येथे तुरुंगात ठेवण्यात आले. लाहोरच्या तुरुंगात त्यांचा अनन्वित छळ करण्यात आला. पुढे ११ एप्रिल १९४६ रोजी त्यांची सुटका झाली. भारताच्या फाळणीला त्यांचा तीव्र विरोध होता, तरीसुद्धा १९४७ च्या हिंदु-मुस्लिम दंगलीत त्यांनी म. गांधीबरोबर शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले. काँग्रेस अध्यक्षांसह कोणीही पदाधिकाऱ्यांनी स्वतंत्र भारताचे पंतप्रधान होऊ नये, अशी त्यांची धारण होती. अखेर काँग्रेसमधील समाजवादी विचारसरणीच्या गटाला घेऊन ते बाहेर पडले (१९४८). त्यांनी स्वतंत्र समाजवादी पक्षाचे नेतृत्व केले. हा समाजवादी पक्ष कृषक मजदूर प्रजा पक्षात विलीन करण्यात आला आणि त्याचे नाव प्रजा सोशॅलिस्ट पक्ष असे ठेवण्यात आले (१९५२). त्याचे ते महासचिव झाले; तथापि त्यातही त्यांचे मतभेद होऊन त्यांनी हैदराबाद येथे समाजवादी पक्ष स्थापन केल्याचे जाहीर केले (१९५५). ते या पक्षाचे अध्यक्ष व मॅन्काइंड या नियतकालिकाचे संपादक झाले (१९५६). पुढे हाही पक्ष पुन्हा प्रजासमाजवादी पक्षात विलीन होऊन (७ जून १९६४) त्याचे संयुक्त समाजवादी पक्ष असे नामांतर झाले. तत्पूर्वी १९६३ मध्ये ते फरूखाबाद मतदार संघातून लोकसभेवर निवडून आले. अखेरपर्यंत ते लोकसभेचे सदस्य होते.


दुसऱ्या महायुद्धाच्या काळापासूनच ते नेहरूंचे टीकाकार बनले होते. अखेरपर्यंत संसदेतील एक प्रमुख विरोधी नेते म्हणूनच त्यांनी नावलौकिक मिळविला. स्वातंत्र्योत्तर काळातील त्यांचे राजकीय जीवनही संघर्षपूर्ण होते. शेतकऱ्यांच्या चळवळी, आंग्रेजी हटाव आंदोलन, जाती तोडो आंदोलन, गोवा मुक्ती चळवळ, हिंदी राष्ट्रभाषेचा पुरस्कार, नेपाळमधील स्वातंत्र्य संघर्ष अशा अनेक चळवळीचे त्यांनी नेतृत्व केले; तथापि आपल्या राजकीय जीवनात त्यांनी काँग्रेस वा कम्युनिस्ट यांबरोबर कधीच तडजोडीची भाषा वापरली नाही. लोहियांनी अनेक देशांचा या ना त्या निमित्ताने प्रवास केला. त्यात अमेरिका, जपान, श्रीलंका, इंडोनेशिया तसेच अनेक यूरोपीय व आफ्रिकी देशांचा सदिच्छा दौरा होता. १९५१ मध्ये फ्रँकफुर्ट (जर्मनी) येथील पहिल्या आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदेस ते उपस्थित होते. याशिवाय त्यांनी १९५३ च्या रंगून येथील आशियाई समाजवादी परिषदेचे आयोजन केले होते; पण त्या परिषदेस ते उपस्थित राहू शकले नाहीत. ते इंग्रजी, हिंदी या भाषांशिवाय फ्रेंच, जर्मन या परकीय भाषा आणि उर्दू-बंगाली या भारतीय भाषाही उत्तम प्रकारे बोलत. त्यांना कला-साहित्याची चांगली जाण होती. त्यांचे व्यक्तिमत्त्व चतुरस्र होते. आयुष्यभर त्यांनी अन्याय व भ्रष्टाचार यांविरुद्ध प्रखर लढा दिला. संसदीय लोकशाहीतील एक जबरदस्त विरोधी नेता म्हणून त्यांचे नाव आदराने घेतले जाते. ३० सप्टेंबर १९६७ रोजी दिल्लीच्या विलिंग्डन नर्सिंग होम रुग्णालयात अष्ठीला ग्रंथीची शस्त्रक्रिया त्यांच्यावर करण्यात आली. त्यांनतर काही दिवसांतच त्यांचे देहावसन झाले. ते अखेरपर्यंत अविवाहित राहिले.


लोहियावाद: आपल्या बहुरंगी आणि विविधतापूर्ण सार्वजनिक जीवनात त्यांनी त्रिपदरी कार्यावर भर दिला. निवडणुकांद्वारे सत्तापालट घडवून आणण्यासाठी राजकीय कार्य, सत्याग्रह व संघर्षाद्वारे परिवर्तनासाठी लढा, आणि रचनात्मक कार्य, असा त्यांचा कार्यक्रम होता. मतपेटी, तुरुंग आणि फावडे या प्रतीकांच्या स्वरूपात त्यांनी ही त्रिसूत्री मांडली. विद्यार्थिदशेतच त्यांच्यावर समाजवादी विचारांचा प्रभाव पडला होता. त्यांचे विचार त्यांच्या अनुयायांमध्ये ‘लोहियावाद’ म्हणून ओळखले जातात. त्याचे प्रमुख घटक असे :

लोकांचा शासनांत अधिकाधिक सहभाग असावा, यासाठी सत्तेचे विकेंद्रीकरण करून केंद्र, राज्य, जिल्हा आणि गाव या चार पातळ्यांवरील शासनयंत्रणांना स्वतंत्र अधिकार असावेत. यालाच त्यांनी ‘चौखंबा राज्य’ हे नाव दिले.

आर्थिक क्षेत्रात त्यांनी माफक यांत्रिकीकरणाचा पुरस्कार केला. यंत्र हे शोषणाचे साधन न बनता दारिद्र्य निवारणाचे साधन बनावे. माणूस यंत्रामुळे आळशी, परावलंबी आणि एकाकी बनू नये, या म. गांधींच्या विचारांचा स्वातंत्र्य चळवळीच्या काळातच त्यांच्यावर प्रभाव पडला होता. त्यामुळे लघुउद्योग, त्यांना उपयुक्त अशी यंत्रसामग्री आणि स्वावलंबन यांवर त्यांनी भर दिला. या घोरणालाच त्यांनी ‘अल्पप्रमाण यंत्र’ असे म्हटले. औद्योगिक केंद्रीकरण, मोठे उद्योग आणि यांत्रिकीकरणावरील भर कमी केला पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता.

लोहिया हे स्त्रियांच्या समस्यांची जाणीव असलेले एक विचारवंत होते. त्यांनी स्त्री-पुरुष समानतेचा तसेच आंतरजातीय विवाह, कुटुंब नियोजन आणि हुंडाबंदी इ. प्रागतिक विचारांचा हिरिरीने पुरस्कार केला. जातिसंस्था हा समाजवादाच्या मार्गातील मुख्य अडसर आहे, हे लक्षात घेऊन या सामाजिक अन्यायाविरुद्ध त्यांनी प्रखर संघर्ष उभा केला आणि अनुसूचित जातिजमातींची आघाडी उभारण्याचा प्रयत्न केला. जातीवर आधारित राजकारणाला मूलगामी परिवर्तनाचे परिमाण लोहियांनी दिले.

स्वातंत्र्योत्तर काळातील इंग्रजी भाषेच्या वर्चस्वाचे ते कट्टर विरोधक होते. इंग्रजी भाषेचा अनुनय हे गुलामी मनोवृत्तीचे लक्षण असल्याची त्यांनी टीका केली. म्हणून राष्ट्रभाषा व भारतीय भाषा यांचा आग्रह त्यांनी सातत्याने धरला; परंतु पुढे इंग्रजी विरोधी आंदोलनातून दक्षिणेत हिंदी विरोधाचे आंदोलन उद्भवले.

१९६२ नंतरच्या काळात लोहियांनी काँग्रेसला सत्ताभ्रष्ठ करणे, हे मुख्य उद्दिष्ट मानले आणि काँग्रेस विरोधात डाव्या व उजव्या सर्वांनी एक व्हावे, यासाठी अथक प्रयत्न केले. ‘काँग्रेस हटाव’ आंदोलन आणि सर्व काँग्रेस विरोधकांची आघाडी करण्याचे हे प्रयत्न हा भारतीय राजकारणातील एक महत्त्वाचा टप्पा असून या धोरणाचा १९६७ नंतरच्या भारतीय राजकारणावर फार मोठा ठसा उमटलेला दिसतो.

लोहियांनी आपले विचार व्याख्याने, स्फुटलेख व ग्रंथांद्वारे मांडले. त्यांचे सर्वच लेखन विचारप्रवर्तक असून त्यांच्या काही ग्रंथांचा मराठीत अनुवाद झाला आहे. काहींच्या आवृत्त्याही निघाल्या आहेत. त्यांच्या इंग्रजी-हिंदी प्रमुख व मान्यवर ग्रंथांपैकी मिस्टरी ऑफ सर स्टॅफर्ड क्रिप्स (१९४२), ॲस्पेक्टस ऑफ सोशॅलिस्ट पॉलिसी (१९५२), व्हिल ऑफ हिस्टरी (१९५५), विल-पॉवर अँड आदर रायटिंग्ज (१९५६), गिल्टी मेन ऑफ इंडियाज् पार्टिशन (१९६०), मार्क्स, गांधी अँड सोशॅलिझम (१९६२), इंडिया, चायना अँड नॉर्दर्न फ्राँटिअर्स (१९६३), द कास्ट सिस्टीम (१९६४), इंटरव्हल ड्यूअरिंग पॉलिटिक्स (१९६५), फ्रॅग्मेन्ट्स ऑफ वर्ल्ड माइंड (१९६६), वाल्मीकी और वसिष्ठ, क्रांती के लिए संघटन इ. ग्रंथ प्रसिद्ध आहेत. नियतंकालाकांतून प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या बहुविध स्फुटलेखांची मराठी भाषांतरे श्रीमती इंदुमती  केळकर व श्रीपाद केळकर यांनी अन्तहीन यात्रा, ललित लेणी (१९६९), दोन हत्यारे सत्ताधाऱ्यांची : भाषा आणि जाति (१९७१) या शीर्षकांनी प्रसिद्ध केली आहेत. अलीकडे त्यांचे आणखी काही स्फुटलेख समता आणि समृद्धी (१९७७), भारतीय शिल्प (१९८१), मार्क्सवाद-समाजवाद (१०८१), अल्प प्रमाणयंत्र (१९८४), नर-नारी 

(१९८४), शेती-शेतकरी-भूसेना (१९८४), जातिप्रथेचा तुरुंग (१९८४) इ. मथळ्यांनी मराठीत प्रसिद्ध झाले आहेत.


लोहियांनी समाजवादी चळवळीचे नेतृत्व केले, पण मूलतः त्यांची  धारणा उदारमतवादी होती. त्यांनी मार्क्सवाद अथवा गांधीवाद पूर्णांशाने कधीच स्वीकारला नाही. भारतीय समस्यांच्या संदर्भात स्वदेशी समाजवाद विकसित केला पाहिजे, अशी त्यांची मूलगामी भूमिका होती.

🇮🇳🇮🇳🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳🇮🇳🇮🇳

*🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏*

संकलन -)

गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

प्रभात दर्शन

 🌳⛳ *शुभप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

अश्विन मास,शुक्ल पक्ष, *सप्तमी*,मूल नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,शरद ऋतु,युगाब्द ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

मंगलवार, १२ आॕक्टोबर २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                        *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


         *"काम के समान कोई रोग नहीं, मोह के समान कोई शत्रु नहीं है, क्रोध के समान कोई आग नहीं है तथा आत्मज्ञान से बड़ा कोई सुख नहीं है।”*

 ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


सोमवार, ११ ऑक्टोबर, २०२१

जागतिक मानसिक आरोग्य दिन

 ************************************

*१० ऑक्टोबर - जागतिक मानसिक आरोग्य दिन*

************************************


आज जागतिक मानसिक आरोग्य दिन.


मानसिक आजारातून पुन्हा लोकांना आपल्या पायांवर खंबीरपणे उभे राहता यावे यासाठी 'वर्ल्ड फेडरेशन फॉर मेंटल हेल्थ' ही संस्था काम करते. याच संस्थेने १९९२ मध्ये जागतिक मानसिक स्वास्थ्य दिनाची (World Mental Health Day) सुरवात केली. 


अंपगत्व येण्यासाठी मानसिक आजार हे प्रमुख कारण असल्याचे ही संस्था सांगते. मानसिक आजाराविषयी जागरूकता निर्माण व्हावी यासाठी ही संस्था मोठ्या प्रमाणात काम करते आणि यासाठीच दरवर्षी १० ऑक्टोबरला मनासिक स्वास्थ्य दिन साजरा केला जातो. 


हा दिवस साजरा करण्याचे अजून एक मुख्य कारण म्हणजे कोणत्याही वयातील व्यक्तीला हा आजार होण्यापूर्वीच त्याला याबाबत माहिती असणे गरजेचे आहे.

🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

संकलन -)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा - यवतमाळ ४४५२०६

************************************

आंतरराष्ट्रीय मुलगी दिवस

 *११ ऑक्टोबर*


*‘आंतरराष्ट्रीय मुलगी दिन'*


आज ११ ऑक्टोबर हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय मुलगी दिन’ म्हणून साजरा करण्याची सूचना संयुक्त राष्ट्रसंघाने (यूनो) केली आहे. महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने त्याची दखल घेऊन ‘मुलगी दिना’चे कार्यक्रम आयोजित करण्याचे निर्देश राज्यातील सर्व शाळांना दिले आहेत. सर्व शाळांमध्ये मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व पटवून देणारे कार्यक्रम आज होत आहेत. ‘यूनो’कडून आलेले शिक्षण अधिकारविषयक राष्ट्रगानही शाळांमध्ये दाखविले जाणार आहे. नाशिक जिल्ह्यातील ३,५०० शाळा या उपक्रमात सहभागी होणार आहेत. पालक, शाळा समिती पदाधिकारी, शिक्षकांना यावेळी आवर्जून हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. उपक्रम सरकारी असला तरी मुलींच्या सबलीकरणाच्या दृष्टीने तो अतिशय चांगला आहे. या उपक्रमाचे सर्वांनीच कौतुक, स्वागत केले पाहिजे. चांगल्या उपक्रमांना विरोध होणारच, पण त्या विरोधाला न जुमानता, त्याकडे दुर्लक्ष करून जाणकार नागरिक उपक्रमात सहभागी होऊन तो नक्कीच यशस्वी करतील यात शंकाच नाही. दहावी, बारावी परीक्षांमध्ये मुलांपेक्षा मुलीच अव्वल असल्याचे दरवर्षीचे निकाल सांगतात. अभियांत्रिकी, वैद्यकीय, कृषी आदी सर्वच शैक्षणिक शाखांमध्येही मुलींचाच बोलबाला आहे. मिळालेल्या संधीचा त्या पुरेपूर लाभ उठवून पालकांचे स्वप्न साकारत आहेत. हल्ली खेड्यापाड्यांतील मुलीही तालुक्याच्या ठिकाणी एसटीचा प्रवास करून शिक्षणासाठी जाताना दिसतात. अर्थात प्रगतीच्या विस्तीर्ण आकाशात चमकण्याचे भाग्य सर्वच मुलींच्या नशिबी नाही, हे वास्तव नाकारता येणार नाही. शिक्षणाला पारख्या झालेल्या मुलींचे प्रमाण आजही मोठे आहे. ग्रामीण भागांत गोरगरिबांच्या लेकी शाळेत दिसत असल्या तरी त्यांच्या शिक्षणाकडे वा आरोग्याकडे लक्ष पुरवायला पालकांना वेळ नसतो. इतर मुली शाळेत जातात म्हणून त्यांच्यासोबत आपलीही लेक पाठवायची, एवढेच त्यांना ठाऊक असते. तिने शाळेत गेलेच पाहिजे, शिक्षण घेतलेच पाहिजे, असा त्यांचा आग्रह असतो असे नाही. त्यामुळेच कधी लहान भावंडांना सांभाळण्यासाठी, घरकामासाठी त्यांना घरी ठेवून घेतले जाते. पुरोगामी राज्य म्हणून गणल्या जाणार्‍या महाराष्ट्रात स्त्री भ्रूणहत्येचे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. मुलीचा गर्भ काढून टाकण्याची अमानुष प्रवृत्ती वाढीस लागली आहे. आधुनिक तंत्रांचा गैरवापर त्यासाठी सर्रास होत आहे. बीडमधील डॉ. मुंडे दांपत्याने गर्भातच कोवळ्या कळ्यांचा गळाघोट करून त्यावर पैसे कमावण्याचे सोनोग्राफीचे दुकान थाटले होते. अशा प्रकारांतूनच मुलींंचे लोकसंख्येतील दरहजारी जन्मप्रमाण घटत आहे. मुलींचा जन्मदर वाढावा म्हणून सरकारी पातळीवर विविध उपक्रम राबविले जात आहेत. ‘लेक वाचवा’ अभियान त्यापैकीच एक! विविध व्यासपीठांवरून स्त्री भू्रणहत्या रोखण्यासाठी समाजप्रबोधन केले जात आहे, ही चांगली बाब असली तरी अशा विचारांचा अंगिकार करण्याकडे अजूनही समाजाचा तेवढा कल दिसून येत नाही. प्रगत राज्यांतील काही जातींमध्ये तर जन्माआधीच मुलीचा गळा घोटला जातो. खाप पंचायतीसारख्या कुप्रथा मुलींच्या मुळावर आल्या आहेत. मुलाच्या विवाहासाठी गरीब कुटुंबांतील, जातीतील मुली विकत घेण्यासारखे वेगवेगळे मार्ग अवलंबले जात आहेत. मुलींच्या घटत्या संख्येचा प्रश्‍न भयानक स्वरुप धारण करू लागला आहे. यातून अनेक सामाजिक प्रश्‍न निर्माण होत आहेत. २०११ च्या जनगणनेत ते आणखी घटल्याचे दिसून आले आहे. गेल्या २० वर्षांत देशात सव्वा कोटीच्यावर स्त्रीभ्रूण हत्या झाल्याचे सांगितले जाते. २०११च्या जनगणनेतील आकडेवारी धक्कादायक आहे. राज्यात १९९१ साली दर हजार पुरुषांमागे ९३४ स्त्रिया असे प्रमाण होते. ते २००१ मध्ये ९१२ झाले. २००९ मध्ये ते ९०९ होते तर २०११ मध्ये हाच आकडा ८८३ वर घसरला. ही आकडेवारी स्त्री-पुरुष समतोल धोक्यात आल्याची निदर्शक आहे. १९९१ मध्ये ० ते ६ वर्षाच्या हजार मुलांमागे मुलींचे प्रमाण ९४६ होते. २००१ मध्ये ते ९२७ वर आले. राज्यातील ३८ तालुक्यांमध्ये मुलींचे प्रमाण ११ टक्क्यांनी घटल्याचे आकडे बोलके आहेत. राज्याच्या आरोग्य सेवा विभागाच्या आकडेवारीनुसार ० ते ६ वयाच्या मुलींचे प्रमाण शहरी भागात झपाट्याने घटत आहे. आदिवासी व मागासबहुल जिल्ह्यांत मुलींचा जन्मदर त्यापेक्षा जास्त आहे. मुंबईसारख्या शहरात मुलींचे प्रमाण दर हजार मुलांमागे ९२७ आहे. नाशकात ते ९२० इतके आहे. गर्भजल परीक्षणविरोधी कायदा कठोर असला तरीही सोनोग्राफी सेंटर्सवर मोठ्या प्रमाणात गर्भजल निदान होत असल्याच्या तक्रारी नेहमीच येतात. मुलींच्या घटत्या जन्मदराबाबत जागतिक आरोग्य संघटनेनेही तीव्र चिंता व्यक्त केली आहे. महिला दिन, मातृत्व दिन दरवर्षी साजरे होतात. ते साजरे होताना किती स्त्रिया मुलीच्या जन्माबाबत आनंद व्यक्त करतात? घराण्यासाठी ‘वंशाचा दिवा हवा’ म्हणून सासूच्या भूमिकेत आग्रह धरणारी आणि सुनेला गर्भपातासाठी प्रवृत्त करणारी स्त्रीच असते. देशात सध्या सर्वत्र नवरात्रोत्सव साजरा होत आहे. देवीच्या रुपाने शक्तीची पूजा केली जात आहे. अनेक वेळा स्त्रियांचा मानसन्मान केला जातो. मात्र हल्ली स्त्रियांवर होणारे बलात्कार, अत्याचार, छळाच्या घटना वाढल्या आहेत. त्या पाहता या समाजाला अशी कोणती कीड लागली आहे, असा प्रश्‍न पडतो. हल्ली स्त्रियाच स्त्रियांच्या वैरी होत असल्याची उदाहरणे पाहावयास मिळत आहेत, ही दुर्दैवी बाब आहे. आजारी आईच्या सेवेसाठी गौरी त्रिवेदी यांनी सनदी अधिकारीपदाची नोकरी सोडली. गुजरातमधून पहिली आयएएस अधिकारी होण्याचा मान त्यांनी मिळविला होता. आई-वडिलांप्रती मुलींना अधिक माया असते असे म्हटले जाते, याचे हे ठळक उदाहरण होय. मुला-मुलींमधील तुलनात्मक प्रमाण दिवसेंदिवस घसरत आहे, ही चिंतेची बाब आहे. ती लक्षात घेता सुजाण नागरिक या प्रश्‍नाकडे निश्‍चितच गांभीर्याने पाहतील.


🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

➿➿➿➿➿➿➿➿➿➿

संकलन -)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

प्रभात दर्शन

 🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

अश्विन मास,शुक्ल पक्ष, *षष्ठी*,ज्येष्ठा नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,शरद ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

सोमवार, ११ आॕक्टोबर २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                        *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

          *"समय और परिस्थिति पर कभी किसी का वश नही रहा है, ये कभी भी बदल सकते है। इसलिए जब समय एवं परिस्थिति आपके अनुकूल हो तो कभी किसी का अपमान मत करो, कभी किसी को कम मत आंको। तुम महाशक्तिशाली एवं समृद्ध हो सकते हो, पर समय तुमसे कहीं अधिक शक्तिशाली है, समय ने बड़े बड़े सम्राटों को भी मिट्टी में मिलाया है। अतः सहज, सरल एवं सुलभ रहें। इसी में जीवन वास्तविक आनंद है।*

 ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


शुक्रवार, ८ ऑक्टोबर, २०२१

शिंका का? येतात


══════════════════════

   *📒📒📒 @ संकलन @📒📒📒*

  *श्री. गजानन गोपेवाड 

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════   

📙 *शिंका का येतात ?* 📙


हिवाळ्यात किंवा गार वाऱ्यात फिरून आल्यावर तुम्हाला फटाफट शिंका आल्या असतील. काहीतरी बोलायला तोंड उघडावे आणि तेवढ्यात शिंका येऊन बोलता येऊ नये, असेही कधी झाले असेल. सर्दी पडसे झाल्यावर शिंका येतात. विशेषत: वावड्यामुळे सर्दी आली असेल, तर शिंका जास्तच येतात. धुळीत गेल्यास, विशिष्ट फूल हुंगल्यास, किंवा अत्तराचा, उदबत्तीचा वास आल्यास वावडे असलेल्या लोकांना शिंका येतात आणि सर्दी होते. काय म्हणता तुम्हाला शिंका येत नाहीत ? मग एक काम करा. आजोबांच्या कोटाच्या खिशातली तपकिरीची डबी घ्या आणि एक चिमूटभर नाकात सोडा! काय आता आल्या का शिंका ? शिंका येणे शुभ की अशुभ ? काहीजण म्हणतात एक शिंक येणे वाईट, पण दोन शिंका येणे चांगले. अर्थात या सर्व अंधश्रद्धा बरं का ! पण शिंका का येतात, ते पाहू.

खोकला आणि शिंका यात बरेच साधर्म्य आहे. आपल्या श्वसन नलिकेत काही त्रासदायक पदार्थ आला तर खोकला येतो. आपण खोकतो म्हणजे काय करतो ? सर्वात आधी आपण दीर्घ श्वास घेतो. त्यानंतर एपिग्लाॅटीस नावाचा पडदा श्वासनलिकेवर दाबला जातो. त्यानंतर आपण जोराने श्वास सोडतो. सहाजिकच खोकताना हवा दाबाखाली बाहेर पडते व श्वास नलिकेतील घाण, जिवाणू बेडक्याच्या रूपाने बाहेर टाकले जातात. आता शिंकेविषयी नाकातील हवा जाण्याच्या मार्गात जर काही अपायकारक, त्रासदायक असे पदार्थ आले तर शरीर खोकल्याप्रमाणेच प्रतिसाद देते. नाकातील ही संवेदना मेंदूपासून निघणाऱ्या पाचव्या नसेमार्फत मेंदुच्या मेड्युला या भागात जाते. येथील पेशींमध्ये संवेदनेचे विश्लेषण होऊन शिंक येण्याची प्रक्रिया होण्याचा आदेश दिला जातो. यात सुरुवातीचे दीर्घ श्वास, नंतर एपिग्लाॅटीसचे श्वासनलिकेवर येणे व नंतर जोरात उच्छवास हे खोकल्याप्रमाणेच असते, मात्र जोरात श्वास सोडताना पडजीभ खाली पडते व त्यामुळे हवा तोंडातून बाहेर न पडता नाकातून बाहेर पडते. नाकातील अपायकारक पदार्थ यामुळे बाहेर पडतो.


वावड्यामुळे वा जंतूसंसर्गामुळे नाकातील आवरण हुळहुळे होते व त्यामुळे वारंवार शिंका येतात. एव्हीलसारखी गोळी देऊन वावड्यामुळे येणाऱ्या शिंका कमी करता येतात. तसेच ज्या पदार्थांमध्ये आपल्याला वावडे आहे त्यापासून दूर राहून स्वतःचे संरक्षण करणे जास्त योग्य होय.


*- डॉ.बाळ फोंडके यांच्या 'का?' या पुस्तकातून*

गुरुवार, ७ ऑक्टोबर, २०२१

जागतिक सेरेब्रल पाल्सी दिवस

 *********************************

*७ ऑक्टोबर - जागतिक सेरेब्रल पाल्सी दिवस*

*********************************


*आज जागतिक सेरेब्रल पाल्सी दिवस..!*


गर्भधारणेच्या कालावधीत आईला काही इन्फेक्शन झाल्यास, रक्तदाब, मधुमेह असल्यास, श्वास घेण्यास किंवा थायरॉईड ग्रंथीचा त्रास असल्यास, वेळे आधीच प्रसूती झाल्यास, फार कमी वजनाचे बाळ असल्यास व इतरही काही कारणांमुळे जन्माला येणारे बाळ हे ‘सेरेब्रल पाल्सी’ (गतीमंद) राहू शकते.


भारतात प्रत्येक एक हजार मुलांपैकी तिघांना सेरेब्रल पाल्सी असल्याचे आढळते. महाराष्ट्रात हे प्रमाण जास्त असून सेंटर फॉर डिसीज कंट्रोलच्या अभ्यासा नुसार ३२३ मुलांपैकी एकात हा आजार आढळतो. 

🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

संकलन -)

गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

*********************************

प्रभात दर्शन

 🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

अश्विन मास,शुक्ल पक्ष, *प्रथम*,चित्रा नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,शरद ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

गुरुवार, ०७ आॕक्टोबर २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                        *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


*या देवी सर्वभूतेषु* 

               *शक्ति रूपेण संस्थिता,*

*नमस्तस्यै नमस्तस्यै* 

               *नमस्तस्यै नमो नम:।।*


भावार्थः- *हे माँ ! आप सर्वत्र विराजमान हैं, शक्ति का रूप हैं, माँ अम्बे, आपको मेरा बार-बार प्रणाम है।*

 ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*शारदीय नवराञी आरंभ*

*छञधारी श्री अग्रसेन जयंती*


बुधवार, ६ ऑक्टोबर, २०२१

पृथ्वी स्वताभोवती का फिरते


══════════════════════

   *📒📒📒 @ संकलन @📒📒📒*

  *श्री. गजानन गोपेवाड 

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════   

🌎 *पृथ्वी स्वतःभोवती गिरकी का मारते?* 

"""""""""""""""""""""""""""""""""""""


आपली पृथ्वीच नाही तर सगळे ग्रह अशी गिरकी घेत असतात. प्रत्येकाचा अशी एक प्रदक्षिणा करण्याचा 'वेग' वेगवेगळा असतो. ज्या प्रक्रियेतून ग्रहांचा जन्म होतो, त्याचाच हा परिणाम आहे. आकाशात इतस्तत: अनेक पदार्थ, वायू वेडेवाकडे पसरलेले असतात. त्यापैकी प्रत्येकाला इतर सर्वांच्या गुरुत्वाकर्षणाची ओढ जाणवत असते. कालांतराने त्या अोढीपायी त्यातले काही पदार्थ एकत्र येतात. त्यांचा जुडगा बनतो. साहजिकच त्याचं वस्तुमान जास्त असल्यामुळे त्यांची इतरांना वाटणारी ओढ जास्त होते. त्यामुळे पदार्थांचे आणखी काही कण त्याला येऊन चिकटतात. अशा साखळी पद्धतीने हळूहळू ग्रहाचा जन्म होतो. तो होत असताना त्या गुरुत्वाकर्षणाच्या सर्व बाजूंना सारख्याच वाटणाऱ्या ओढीपायी ते पदार्थ ओढले जात असताना त्यांना चक्राकार गती मिळते. तीच मग ते पदार्थ ज्याला चिकटतात त्या ग्रहांकुरालाही मिळते.

ग्रहांकुराच्या केंद्रस्थानात त्यातल्या पदार्थाची घनता साहजिकच जास्त असते. एखादा लाडू वळताना तो दाबला जात असतो. त्यामुळे त्याचा मध्यभाग जास्त घट्ट झालेला असतो तशातलाच हा प्रकार. त्यामुळं त्या ग्रहाच्या परिघावरच्या पृष्ठभागाला केंद्राच्या गुरुत्वाकर्षणाची जास्त ओढ वाटते. पण विखुरलेल्या पदार्थांपासून घन ग्रहाचा जन्म होताना त्याचा व्यास कमी होत जातो. त्यामुळे त्या वर्तुळाकार गतीचा वेगही वाढत जातो. कथक नृत्य करणारी नर्तकी जेव्हा गिरकी घ्यायला लागते तेव्हा त्या गिरकीची गती वाढवायची असेल तर ती आपले हात अंगासरशी ओढून घेते, म्हणजेच अंगाच्या गोलाचा व्यास कमी करते. तेच हा हात पसरलेले असले की त्या गिरकीचा वेगही कमी होतो. तशीच ग्रहाचीही अवस्था असते. त्याचा पसारा कमी होत जातो, तो अधिक घन बनतो तसा त्याचा वर्तुळाकार भ्रमणाचा वेगही वाढत जातो. त्यामुळे गिरकी घेणं हा प्रत्येक ग्रहाचा स्थायीभावच आहे. पृथ्वी ही त्याला अपवाद नाही.


मग चंद्र का गिरकी घेत नाही ? त्याचा एक भाग सतत आपल्या डोळ्यांसमोर राहतो ते का ? असे प्रश्न कोणीही विचारेल; पण चंद्र गिरकी घेत नाही हे म्हणणं चुकीचं आहे. चंद्राचा स्वतःभोवती गिरकी घेण्याचा वेग हा पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालण्याच्या वेगाइतकाच असल्यामुळे त्याचा एक चेहरा आपल्याला सतत दिसत असतो एवढंच. एरवी आकाशातला इतर कोणत्याही गोल गोलासारखा तोही स्वतःभोवती गिरकी घेतच असतो.


*डाॅ.अंजली दिक्षित व डाॅ.जगन्नाथ दिक्षित*

*यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' पुस्तकातून*

═══════════════════════

मंगळवार, ५ ऑक्टोबर, २०२१

ऐपल संस्थापक स्मृतिदिन

 ********************************

*५ ऑक्टोबर - अॕपलचे संस्थापक स्टीव्ह जॉब्स यांचा स्मृतिदिन*

********************************


जन्म - २४ फेब्रुवारी १९५५ (अमेरिका)

स्मृती - ५ ऑक्टोबर २०११


अॕपलचा संस्थापक सदस्य, माजी अध्यक्ष स्टीव्ह जॉब्स यांचा आज स्मृतिदिन.


सिरीयाचा मुस्लिम विद्यार्थी अब्दुल फतेह जॉन जंदाली व जोआन शिबिल यांनी विवाहाआधी जन्मलेले मूल अनाथालयाला दिले होते. त्यासाठी त्यांची एकच अट होती. त्यांचे मूल दत्तक घेणारे कुटुंब हे सुशिक्षित असले पाहिजे. कॅलिफोर्नियातील पॉल व क्लरा जॉब्स या आर्मिनियन कुटुंबाने त्यांचे मूल दत्तक घेण्याचा प्रस्ताव मान्य केला. जॉन-जोआन यांचे मूल त्यांना दत्तक देण्यात आले. त्या मुलाला स्टिव्हन पॉल जॉब्स असे नाव मिळाले. 


जॉब्स यांचे कुटुंब मजुरी करणारे आहे हे समजल्या नंतर त्यांची आई जोआनने स्टीव्हला दत्तक देण्यास आक्षेप घेतला. सहा  महिन्यांच्या चर्चेनंतर जोआन दत्तक करारावर स्वाक्षरी केली. या ओढाताणीचा स्टीव्ह याच्या मनावर गंभीर परिणाम झाला. कुणालाच न आवडणारा मी एकमेव मुलगा आहे, असे त्याचे मत बनले होते. हायस्कूलमध्ये असताना स्टीव्हला ह्यूलेट पॅकर्डच्या कारखान्यात काम करण्याची संधी मिळाली. येथेच त्याची स्टीव्ह व्होज्नियाक सोबत ओळख झाली. 


जॉब्स आणि रीड कॉलेज मधील त्यांचा मित्र स्टीव्ह व्होज्नियाकने शिक्षण अर्ध्यावरच सोडले होते. १९७१ मध्ये त्यांची पहिल्यांदा भेट झाली तेव्हा जॉब्स १६, तर व्होज्नियाक २१ वर्षांचा होता. तंत्रज्ञानाची आवड असलेल्या व्होज्नियाकने पहिल्या व्हिडिओ गेमचा टेलिटाईप व नंतर मायक्रोप्रोसेसर बनविला होता. मात्र, त्या वेळी हा गेम विकावा कसा, अशी अडचण होती. ७०च्या दशकात कॉम्प्युटर क्षेत्रात नवनवे प्रयोग व नवनिर्मिती होत होती. नेमकी हीच नस पकडत जॉब्स यांनी १९७६ मध्ये व्होज्नियाकवर कॉम्प्युटर निर्मितीची जबाबदार सोपवीत स्वत: मार्केटिंगमध्ये लक्ष घातले. अशा रितीने अॕपलची सुरुवात झाली. त्यांना ५० कॉम्प्युटर्सची पहिली ऑर्डरही मिळाली खरी, मात्र हे संगणक वेगवेगळ्या सुट्या भागांत न देता पूर्णपणे एका मशिनीच्या स्वरुपात मिळावे, अशी अट होती. आजचे वर्तमान आणि उद्याच्या भविष्याचा अचूक वेध घेत त्यांनी वयाच्या २१ व्या वर्षीच कॉम्प्युटरच्या व्यवसायात शिरकाव केला.


तंत्रशिक्षणाची पदवी नसल्याने त्यांनी या क्षेत्रातील तरबेज सहकार्याने निवडले. बाजारपेठेच्या गरजेची नस पकडत जॉब्स यांनी एकापेक्षा एक अत्याधुनिक व सरस उत्पादने धूमधडाक्यात उतरवली. प्रख्यात कॉप्युटर कंपनी आयबीएमने पर्सनल कॉम्प्युटर आणण्याच्या चार वर्षे आर्धीच त्यांनी आपला अॕपल-१ हा पीसी लाँच केला. अॕपलच्या सहकाऱ्या सोबत मतभेद झाल्याने आपलीच कंपनी सोडली. 


१९८६ मध्ये स्टीव्हने नवा प्रयोग करण्याचे ठरवले आणि फिल्म निर्देशक जॉर्ज लुकास यांच्यासह १० मिलियन डॉलरची भागीदारी असणारी एक कंपनी स्थापन केली. तिला नाव देण्यात आले पिक्सार. येथे अॕनिमेशन फिल्म बनवण्यात आल्या. फाइंडिंग निमो सारख्या फिल्मने मोठे यश मिळाल्यावर त्याने ही कंपनी बाजारात आणण्याचे ठरवले. यासाठी वॉल्ट डिझ्नी सोबत करारही करण्यात आला होता. १९९७ मध्ये तोट्यात चालत असलेल्या अॕपलच्या सल्लागार पदावर ते परतले. २००७ मध्ये अॕपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी बनले. यानंतर त्यांनी बाजारात आयपॉड, आयफोन अणि आयपॅड सादर केला. त्यांच्या या नेतृत्व व दूरदर्शीपणास जगभराने सलाम ठोकला. 


२००१ साली अॕपलने ५ गिबाबाईट क्षमतेचा पहिला आयपॉड लाँच केला. हा सर्वांत लहान म्युझिक प्लेअर होता. यात एक हजार गाणे स्टोअर करता येतील, असे कंपनीने सांगितले होते. अॕपलच्या मार्केटिंगने सोनी वॉकमनला कडवे आव्हानच दिले नाही तर बाजारपेठेतून जवळपास बाहेरच रवानगी केली.


अॅपल कंपनीच्या घडामोडींवर पुस्तक लिहिणाऱ्या जिम कार्लटन यांनी अॕपल हे नाव कसे निवडण्यात आले या मागिल कहाणी सांगितली आहे. बिटल्स अॕपल रेकॉर्ड या कंपनीच्या लोगोमधून हे नाव घेण्यात आले आहे. स्टीव्हला हा त्या कंपनीचा हिरवेगार अॕपल असलेला लोगो फार आवडायचा म्हणून त्याने कंपनीचे नाव अॕपल ठरवले आणि लोगो म्हणून एक तुकडा तोडलेले अॕपल निवडण्यात आले. यामुळे या दोन कंपन्यांमध्ये कायद्याची लढाई रंगली.


२००७  वर्षात आयफोन लाँचही केला. टचस्क्रीन आणि सोप्या इंटरफेसमुळे हा मोबाईल अपेक्षेपेक्षा अधिक लोकप्रिय झाला. वर्षभरातच कंपनीने आयफोन थ्रीजीही सादर केला. याच्या वेगवान डाटा ट्रान्स्फरने मोबाईल वेड्यांना आणखीच वेड लावले. २०१० साली आलेला पहिला टॅब्लेट पीसीने पुन्हा जगभरातील गॅजेटप्रेमींना वेड लावले. हा टॅब्लेट हातोहात विकला गेला. टचपॅड तंत्रज्ञानावर आधारलेल्या या अतिशय छोट्या कॉम्प्युटरने अनेक उणीवा असतानाही इंटरफेस, वेगवान प्रोसेसर आणि चित्राच्या स्पष्ट गुणवत्तेमुळे लोकप्रिय झाला. नंतर आयपॅड थ्रीजी आणि आयपॅड-२ मध्ये अनेक उणीवा दुरुस्त करण्यात आल्या. 


जॉब्स अनेक वर्षांपासून अन्नाशयाच्या कॅन्सरशी झुंज देत होते. या मृत्यूची चाहूल त्यांन आधीच लागली असावी. अॕपलचे सहसंस्थापक वॉल्टर आयजॅक्सन यांचे स्टीव्ह जॉब्स यांच्यावरील पुस्तक लिहिले आहे. 


स्टीव्ह जॉब्स यांचे निधन ५ ऑक्टोबर २०११ रोजी झाले.

🙏🙏शुभ प्रभात...🙏🙏


*************************************

संकलन -)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

प्रभात दर्शन

 🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

भाद्रपद मास,कृष्ण पक्ष, *चतुर्दशी*,उ.फा.नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,शरद ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

मंगलवार, ०५ आॕक्टोबर २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                        *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


        *"दूसरों की प्रशंसा करने वाला मनुष्य बड़ी सोच और उत्तम हृदय वाला होता है। हीन भावना, अहंकार और ईर्ष्या से ग्रसित मनुष्य दूसरों की प्रशंसा करने में स्वयं को तुच्छ अनुभव करता है।*

          *स्मरण रहे कि कई बार किसी की प्रशंसा में बोले गए शब्द अमुक के लिए मरुस्थल में एक बूँद की तरह सहायक सिद्ध हो सकते हैं, किसी कार्य के लिए की गयी प्रशंसा उसे और अधिक उत्तम कार्य के लिए प्रेरित कर सकती है।"*

 ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


सोमवार, ४ ऑक्टोबर, २०२१

कान का? खाजतात


══════════════════════

   *📒📒📒 @ संकलन @📒📒📒*

  *श्री. गजानन गोपेवाड 

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════             

📕 *कान का खाजतात ?* 


सार्वजनिक ठिकाणी कानात बोट घालून कान गदागदा हलवणारे किंवा कानात काड्या घालून तल्लीन कान कोरणारे महाभाग तुम्ही पाहिले असतील. कान कोरडा पडला २ थोडीफार खाज येऊ शकते. ही खाज आपोआपच कमी होते; परंतु कानाच्या रोगांमध्ये मात्र खाज सारखीच येत राहते व उपचार केल्याशिवाय कमी होत नाही. पावसाळ्यात, दमट वातावरणात किंवा पोहणाऱ्या व्यक्तींमध्ये कर्णपथात (Auditory canal) बुरशीचा संसर्ग होऊ शकतो. अॅस्परजीलस, नायगर व कँडीडा अल्बीकन्स या बुरशींमुळे होणाऱ्या संसर्गात कान खाजतात व बहिरेपणाही येतो. कानाची तपासणी केल्यास कर्णपथात काळपट वा विटकरी काळपट रंगाची घाण जमा झालेली दिसते. ओल्या वर्तमानपत्राच्या बोळ्यासारखा रंग त्या घाणीला येतो.


कानातील घाण वारंवार काढून टाकणे, पुसून घेणे, सॅलीसिलिक अॅसिड कर्णपथात लावणे, निस्टॅटीनसारखे बुरशीनाशक वापरणे अशा विविध उपायांनी हा रोग पूर्णपणे आटोक्यात येतो. कानावर अॅलर्जीमुळे किंवा जंतूसंसर्गामुळे फोड आले, तरीही कान सुरुवातीच्या काळात अथवा फोड फुटून खपली येण्याच्या काळात खाजतात. यावर अॅलर्जी व जंतुसंसर्गावरील उपचार करावे लागतात.


*डाॅ.अंजली दिक्षित व डाॅ.जगन्नाथ दिक्षित*

*यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' पुस्तकातून*

═══════════════════════

  

स्वामी रामानंद तीर्थ जयंती

 *************************************

*३ ऑक्टोबर - स्वामी रामानंद तीर्थ जन्मदिन*

*************************************


   *जन्म - ३ ऑक्टोबर १९०३* 

                  (विजापूर)

     स्मृती - २२ जानेवारी १९७२ 

                  (हैद्राबाद)


*हैदराबाद मुक्तिसंग्रामातिल मराठवाड्यासाठी योगदान देणारे नेतृत्व !*


स्वामी रामानंद तीर्थ (ऊर्फ व्यंकटेश भगवानराव खेडगीकर हे संन्यासी व हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे नेतृत्व करणारे चळवळकर्ते होते. रामानंद तीर्थ यांचा जन्म विजापूर जिल्ह्यातील सिंदगी या ठिकाणी झाला. त्यांचे शिक्षण सोलापूर येथील सरकारी शाळेत झाले. 


उस्मानाबाद जिल्ह्यातील हिप्परगा या गावी गुरुकुलात ते कार्यरत होते. १९३० मध्ये स्वामी नारायण तीर्थ यांनी रामानंदांना दीक्षा दिली व ते स्वामी रामानंद तीर्थ झाले. अंबेजोगाई या ठिकाणी त्यांनी योगेश्वरी नूतन विद्यालयाचे नूतनीकरण केले.


हैदराबाद येथील निजामाचा सेनापती कासीम रझवी याच्या ‘रझाकार’ या संघटनेने मराठवाडा जनतेवर अत्याचार सुरू केले होते. याचा विरोध करणे आवश्यक झाले होते. यासाठी काम करणाऱ्या महाराष्ट्र परिषदेचे चिटणीस म्हणून स्वामी काम पाहत होते. यासाठीची चळवळ अनेक वर्षे चालली होती. २७ ऑक्टोबर १९३८ रोजी स्वामी रामानंद सत्याग्रहा साठी कार्यकर्त्यांसह हैदराबाद शहरातील राजमार्गावर आले. त्यांना अटक झाली होती. ते सुमारे चार महिने कारावासात होते. सुटका होताच स्वामीजींनी भूमिगतपणे काम केले.


‘हैदराबाद संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करून लोकशाही मान्य करा व संस्थानाचे स्वतंत्र अस्तित्व संपवा’ अशी हाक रामानंद तीर्थ यांनी सरकार आणि जनतेला दिली. याचा परिणाम होऊन लोक या संग्रामात सामील झाले. मुक्तिसंग्रामात आपल्या विचारांचा प्रसार करण्यासाठी त्यांनी ’व्हिजन’ हे साप्ताहिक चालवले होते. यामार्फत ते भारतीय स्वातंत्र्याच्या विचारांचा प्रचार करत. 


माणिकराव पहाडे, शंकरभाई पटेल, बाबासाहेब परांजपे. गोविंदभाई श्रॉफ हे तरुण स्वातंत्र्यसैनिक होते. हैदराबाद मुक्तिसंग्राम चळवळीत स्वामी रामानंद तीर्थ यांचे ते प्रमुख समर्थक होते.


तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी सशस्त्र पोलीस कारवाई करून निजामाला शरण आणले. हैदराबाद संस्थान १७ सप्टेंबर १९४८ रोजी भारतात विलीन झाले.


लोकसभेच्या लागोपाठच्या दोन निवडणुकात गुलबर्गा व औरंगाबाद येथून रामानंद तीर्थ हे निवडून गेले होते. 


१९७२ साली त्यांचे हैदराबाद येथे निधन झाले.

🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

*संकलन* -) गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा - यवतमाळ ४४५२०६

*************************************

Featured Post

व्यायाम व योगा अवश्य करावा*

*व्यायाम व योगा अवश्य करावा*  *व्यायाम व योगा करण्याचे दहा फायदे:-*  1) व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते: व्यायाम करणारी...