मंगळवार, १४ सप्टेंबर, २०२१

महालक्ष्मी

 *🌹👣 🌹श्रीमहालक्ष्मी 🌹👣🌹* 

*गौरी आवाहन / गौरी पुजन / गौरी विसर्जन* 


             👣 *गौरी आली घरा* 👣   


आली आली लक्ष्मी, 

आली तशी जाऊ नको बाळाला सांगते,धरला हात सोडू नको....

मला आहे हौस, चांदीच्या ताटाची

लक्ष्मीच्या नैवेद्याला मूद साखरभाताची.


श्री लक्ष्मीबाई आली सोन्याच्या👣 पावलांनी , ज्येष्ठेच्या घरी कनिष्ठा आली

मालकाच्या घरी लक्ष्मी आली.......


काल घरोघरी 👣 श्रीमहालक्ष्मीचे आगमन झाले॥


'गौरीपूजन वा महालक्ष्मी पूजन' हे हिंदू महिलांचे भाद्रपद महिन्यातील एक महत्त्वाचे व्रत आहे.

         गौरीपूजन हा महाराष्ट्रातल्या सणांपैकी एक महत्त्वाचा सणही आहे. यास महालक्ष्मीपूजन असेही म्हणतात.


👣  गौरी शब्दाचा अर्थ -) 

संस्कृत शब्दकोशातील अर्थानुसार 'गौरी' म्हणजे आठ वर्षाची, अनाघ्रात अशी पवित्र कन्या. तसेच गौरी म्हणजे पार्वती, पृथ्वी, वरुण पत्नी, तुळशीचे झाड, मल्लिका उर्फ जाईची वेल हेही अर्थ कोशात दिले आहेत.या आधारेच तेरड्याच्या फुलाचीही गौरी म्हणून पूजा केली जाते.

   गौरीला महालक्ष्मी म्हणतात व  तो सर्वार्थाने रुढ शब्द सबंध महाराष्ट्रात पूर्वापार वापरला जातो. लक्ष्मी ही विष्णूपत्नी तर महालक्ष्मी ही महादेव पत्नी पार्वती होय. जी जेष्ठा गौरी म्हणून संबोधली जाते.


👣 व्रताचे स्वरूप -)

भाद्रपद महिन्यात शुद्ध पक्षात अनुराधा नक्षत्रावर आपापल्या कुलाचाराप्रमाणे महालक्ष्मी/गौरीच्या प्रतिमा वा प्रतीके बसवितात. ज्येष्ठा नक्षत्रावर महालक्ष्मीची पूजा करतात व महानैवेद्य दाखवितात. तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रावर महालक्ष्मीचे विसर्जन करतात. गौरीलाच महालक्ष्मी म्हणतात आणि तिची ज्येष्ठा नक्षत्रावर पूजा होते म्हणून तिला ज्येष्ठा गौरी म्हणतात.


👣 आख्यायिका आणि इतिहास -)

     हिंदू देवताशास्त्रात तसेच समाजजीवनात गौरी हे शिवाच्या शक्तीचे आणि गणेशाच्या आईचे रूप मानले गेले आहे.

     अपराजितपृच्छा या ग्रंथामध्ये द्वादशगौरींचा उल्लेख येतो. अग्निपुराणामध्ये गौरी मूर्तीचे सामूहिक पूजन केले जाई असे सांगितले आहे. लातूर येथील नीलकंठेश्वर मंदिरात शिवाची आणि गौरीची एक सुंदर कोरीव प्रतिमा आहे. त्यांच्या पायाशी एक घोरपड दाखवली आहे. गौरीच्या डाव्या हातात बीजपूरक आहे, केसांवर फुलांची वेणी आहे.ही शिव परिवारातील देवता असून कनोज येथे हिचे मंदिर आहे.


एकदा असुरांच्या त्रासाला कंटाळून सर्व स्त्रिया महालक्ष्मी गौरीकडे गेल्या आणि त्यांनी आपले सौभाग्य अक्षय्य करण्याविषयी तिची प्रार्थना केली.त्याला अनुसरून गौरीने असुरांचा संहार केला व शरण आलेल्या स्त्रियांच्या पतींना व पृथ्वीवरील प्राण्यांना सुखी केले.महालक्ष्मीच्या कृपाप्रसादाने आपापल्या सौभाग्य प्राप्त झाले म्हणून तेव्हापासून सर्व स्त्रिया महालक्ष्मी गौरीची पूजा करू लागल्या.

  👣  गौरी पुजनचे वैज्ञानिक महत्त्व -)

महालक्ष्मीचा सण हा कुलाचार म्हणून सर्व जाती-जमातीतून श्रद्धापूर्वक पाळला जातो. शेती हा प्रमुख व्यवसाय असणाऱ्या घरांतून मात्र स्त्रिया धान्याची राशी मांडून पूजा करतात. लक्ष्मी वा गौरीच्या मांडणीत विविधता असली तरी मूळ हेतू धान्य लक्ष्मीच्या पूजेचा, भूमीच्या सुफलीकरणाचा आहे.


स्थळपरत्वे गौरींच्या पूजेंची पद्धत आणि परंपरा बदलल्या आहेत. काही कुटुंबात गौरींचे मुखवटे असतात, तर काही कुटुंबात परंपरेनुसार पाणवठ्यावर जाऊन पाच, सात किंवा अकरा खडे आणून त्यांची पूजा करतात. काही ठिकाणी पाच मडक्यांच्या उतरंडी करून त्यावर गौरीचे मुखवटे लावून त्या उतरंडींनाच साडी चोळी नेसवतात आणि त्यांची पूजा करतात. काही घरांत धान्यांची रास म्हणजेच गहू, तांदूळ ,ज्वारी, हरभरा, डाळ इत्यादींपैकी एकदोन धान्याचे ढीग करून त्यावर मुखवटे ठेवतात. बाजारात पत्र्याच्या, लोखंडी सळयांच्या किंवा सिमेंटचे कोथळे मिळतात. त्यावर मुखवटे ठेवतात आणि कोथळ्यांना साडी चोळी नेसवतात.सुपात धान्याची रास ठेवून त्यावर मुखवटा ठेवतात. किंवा गहू आणि तांदूळ यांनी भरलेल्या तांब्यांवर मुखवटे ठेवून पूजा करतात. तेरड्याचीही गौर असते. तेरड्याची रोपे मुळासकट आणतात. ही मुळे म्हणजेच गौरींची पावले, असा समज आहे. आधुनिक काळात गौरीपूजनाच्या व मांडणीच्या पद्धतीत व गौरीच्या रूपातही आधुनिकता दिसून येते. विविध रूपांत अनेक घरांत गौरी/महालक्ष्मी येतात. आगमनाच्या दिवशी संध्याकाळी किंवा पंचांगात शुभ वेळ बघून मुखवट्यांची आणि लक्ष्मींच्या हातांची पूजा होते. त्याच रात्री गौरी उभ्या केल्या जातात. या गौरी/महालक्ष्मी किंवा सखी-पार्वतींसह त्यांची मुलेही (एक मुलगा आणि एक मुलगी) मांडतात. कोणी धातूची लक्ष्मीची प्रतिमा करून पूजतात, कोणी मातीची बनवितात तर कोणी कागदावर देवीचे चित्र काढून त्याची पूजा करतात.


  👣 गौरी आवाहन (दिवस पहिला) -)

आपापल्या परंपरेप्रमाणे घराच्या उंबऱ्यातून आत आणताना, जिच्या हातात गौरी असतील त्या बाईचे पाय दुधाने व पाण्याने धुतात आणि त्यांवर कुंकवाचे स्वस्तिक काढतात. घराच्या दरवाज्यापासून ते जिथे गौरी बसवायच्या त्या जागेपर्यंत लक्ष्मीच्या पायांचे ठसे उमटवत उमटवत गौरींचे मुखवटे आणतात. त्यावेळी ताट चमच्याने किंवा घंटेने वाजवत आवाज केला जातो. यानंतर त्यांची स्थापना करण्यापूर्वी त्यांना घरातील समृद्धी, दुध-दुभत्याची जागा इ. गोष्टी दाखविण्याची प्रथा आहे. तेथे त्यांचे आशीर्वाद मिळून ऐश्वर्य नांदो अशी प्रार्थना करतात.काही ठिकाणी लोक तेरड्याची रोपे एकत्र बांधून त्यांची प्रतिमा बनवितात व तिच्यावर मातीचा मुखवटा चढवितात.नंतर त्या मूर्तीला साडी नेसवून दागदागिन्यांनी सजवितात.

     पहिल्या दिवशी संध्याकाळी गौरीला भाजी-भाकरीचा नैवैद्य दाखवण्याची पद्धत काही भागात विशेषत: पश्चिम महाराष्ट्रात आहे. या प्रथेला गौरी आवाहन करणे असे संबोधतात.


👣  गौरीपूजन (दिवस दुसरा) -)

      दुसऱ्या दिवशी म्हणजेच ज्येष्ठा नक्षत्रावर गौरींची पूजा होते. सकाळी गौरींची/महालक्ष्मीची पूजा-आरती करून केलेल्या फराळाचा (रव्याचा लाडू, बेसनलाडू, करंजी, चकली, शेव, गुळपापडीचा लाडू) नैवेद्य दाखवतात. नंतर संध्याकाळी आरती करतात. पुरणपोळी, ज्वारीच्या पिठाची आंबील, अंबाडीची भाजी, सोळा भाज्यांची एकत्र भाजी, दिवेफळ वगैरे पदार्थांचा नैवेद्यात समावेश असतो.

     नैवेद्यात शेंगदाणा आणि डाळीची चटणी, पंचामृत, पडवळ घालून केलेली ताकाची कढी, कटाची आमटी, वेगवेगळ्या प्रकारची भजी, पापड, लोणचे इत्यादी. केलेले सर्व पदार्थ केळीच्या पानावर ठेवतात.

      महाराष्ट्रात काही जागी याच सायंकाळी महिलांचा हळदीकुंकवाचा कार्यक्रम केला जातो. दर्शनाला आलेल्या महिला व मुलींचे आदरपूर्वक स्वागत करण्याची पद्धती प्रचलित आहे.


 👣 गौरी विसर्जन (दिवस तिसरा) -)

तिसऱ्या दिवशी म्हणजेच मूळ नक्षत्रावर गौरींचे/महालक्ष्मींचे विसर्जन करतात. त्या दिवशी सकाळी पोवत्याच्या/सुताच्या गाठी पाडतात. त्या सुतात हळदीकुंकू, सुकामेवा, बेलफळ, फुले, झेंडूची पाने, काशीफळाचे फूल, रेशमी धागा असे एक एक जिन्नस घालून गाठी पाडतात. यांमध्ये हळदीकुंकू, रेशमी सूत, झेंडूची पाने, काशीफळाचे फूल हे महत्त्वाच्या वस्तू असतात. नंतर गौरींची/ महालक्ष्मींची पूजा आणि आरती करतात. गोड शेवयाची खीर, उडीद डाळीचा भाजलेला पापड याचा नैवेद्य दाखवतात. या तिसऱ्या दिवशी गौरींच्या/ महालक्ष्मींच्या चेहऱ्यावर एक प्रकारची उदासीनता दिसून येते. गौरींची पूजा, आरती करून पुढील वर्षी येण्याचे आमंत्रण देऊन त्यांचा निरोप घेतला जातो, आणि त्यांचे विसर्जन केले जाते (धातूच्या किंवा कायम स्वरूपाच्या मूर्ती असतील तर त्यांचे विसर्जन करत नाहीत.) गौरींचे पाण्यात विसर्जन केल्यावर परत येताना थोडी वाळू घरी आणून ती सर्व घरभर व परसातल्या झाडांवर टाकतात. त्यायोगे घरात समृद्धी नांदते व झाडाझुडुपांचे कीटकांपासून संरक्षण होते अशी समजूत आहे.


👣 दोरकाची पूजा -)

या तिसऱ्या दिवशी महाराष्टातील ग्रामीण बहुजनसमाजात गौरींच्या पूजेबरोबरच सुताच्या गुंड्याला सोळा गाठी देऊन त्याचीही पूजा करतात. तो गुंडा मग हळदीने रंगवून त्यातला दोरा घरातल्या सुवासिनी आपल्या गळ्याभोवती बांधतात व नवीन पीक येईपर्यंत गळ्यात ठेवतात.आश्विन वद्य अष्टमीला तो गळ्यातून काढून त्याची पूजा करतात. या दोऱ्यालाच महालक्ष्मी समजतात.


👣 वेगवेगळ्या प्रांतानुसार पुजन -)

दक्षिण भारत-

भाद्रपद शुक्ल तृतीयेला गौरीचा सण सुरू होतो व तो बरेच दिवस चालतो. प्रत्येक गावात गौरीची एक पिठाची प्रतिमा करतात व तिला मखरात बसवून पूजतात. तिची रस्त्यातून मिरवणूकही काढतात.


कोकण -

महाराष्ट्रातील कोकण प्रांतातील कोळी समाजगटातील ,महिला या दिवशी तेरड्याची फांदी आणून तिला लक्ष्मीस्वरूप मानून तिची पूजा करतात. या दिवशी देवीला माशाचा नैवेद्य दाखविला जातो.

➿➿➿➿➿➿➿➿➿➿

 *🙏🌹जय श्री महालक्ष्मी🌹🙏*

➿➿➿➿➿➿➿➿➿➿

संकलन -)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा - यवतमाळ ४४५२०६

प्रभात दर्शन

 🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

भाद्रपद मास,शुक्ल पक्ष, *अष्टमी*,ज्ये/मूळ नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,वर्षा ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

मंगळवार, १४ सप्टेंबर २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                        *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

           *"जो बीत गया सो गया। जो आने वाला है, वह भविष्य के गर्भ में है। वर्तमान हमारे हाथ में है। हम चाहें तो उसका सदुपयोग करके समाज, राष्ट्र कल्याण के लिए अपना कुछ योगदान करके इस नश्वर जीवन में से कुछ अनश्वर लाभ प्राप्त कर सकते हैं।"*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

रविवार, १२ सप्टेंबर, २०२१

ध्यान साधना

 *लक्ष्मी*


*पण काहीही म्हणा*

 *ज्या ज्या घरात सगळ्या सुना , मुलं , जावा , नातवंडं एकत्र येतात*

*सर्वजण मिळून कामं करतात*

*तिथं खरंच प्रसन्न वाटतं , करमतं !*

*दोन तीन दिवस अगदी मजेत जातात !*


*मित्र हो ,*

*हे करमणं , मजा वाटणं , प्रसन्न वाटणं म्हणजेच आपल्याकडे लक्ष्मी आलेली असते !*


*ती येते , रहाते , जेवते* *आणि जातांना म्हणते* 

*खुशाल रहा असंच मिळून मिसळून रहात जा !*


*कुणी आणि का लावलं असेल आपल्या मागे हे सगळं ?*

*शास्त्रीयदृष्ट्या असेल का काही अर्थ या सणसमारंभाना ?*

*थोडा विचार केला , चिंतन केलं*

*तर आपल्याला कळेल..........*


*या सणाच्या निमित्ताने आपलं घर भरून जातं* 

*आपुलकीला उधाण येतं* 

*माणसं एकत्र येतात ,भेटतात , बोलतात* 

*आणि पुन्हा आपापल्या गावी पोट भरण्यासाठी निघून जातात ......!* 


*बैठकीत झालेली माणसांची गर्दी* 

*आणि दारा समोर झालेली पादत्राणांची , पाऊलांची दाटी हीच खरी लक्ष्मी .......!*


*चार दिवस सर्व कुटुंबाचं एका छता खाली येणं*

*गुण्यागोविंदाने रहाणं*

*आणि सुखदुःखाच्या गप्पा गोष्टी करणं ...... हीच खरी लक्ष्मी !*


*पोरांनी आई म्हणून मारलेली प्रेमळ हाक*

*दिरानी वहिनींकडे हक्काने मागीतलेला कपभर चहा* 

*तुम्ही राहूद्या मी करते असा एका जावेने दुसऱ्या जावेला केलेला प्रेमळ हट्ट*

*हीच खरी लक्ष्मी ....!*


*मित्रहो त्यामुळे पूर्वजांना नाव ठेऊ नका* 

*ते आर्थिकदृष्ट्या गरीब होते पण मनाने श्रीमंत होते* 

*सुशिक्षित नसतीलही पण नम्र होते* 

*एखाद्या वेळेस रागवत असतील पण डुख धरत नव्हते* 

*ते फॉरेन रिटर्न नव्हते परंतू एखाद्या वादाच्या प्रसंगी नेमकं कुठून आणि कोणी माघार घ्यायची हे त्यांना चांगलं कळत होतं*

 

*योग्य वेळी योग्य वागणं आणि घर नावाच्या मंदिराच्या भिंतीला तडे न जाऊ देणं ...... हीच खरी लक्ष्मी !*


*मला मला करण्यापेक्षा* 

*तू घे , तू घे चा आग्रह करणे* 

*आधी काहीतरी खाऊन घ्या आणि नंतर काम करा* 

*अशी  जेष्ठांनी केलेली मायेची सूचना*

*घर , कुटुंब आणि नातं टिकण्यासाठी केलेला प्रत्येक सदस्याचा त्याग* 


*....हीच खरी लक्ष्मी ....*

जतींद्रनाथ दास

 *************************************

*१३ सप्टेंबर - क्रांतिकारक जतींद्रनाथ दास स्मृतिदिन*

*************************************

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  जन्म - २७ ऑक्टोबर १९०४ 

             (कलकत्ता)

*स्मृती - १३ सप्टेंबर १९२९* 

               (लाहोर)


जतींद्रनाथ दास एक भारतीय क्रांतिकारी होते.लाहोर कटातील आरोपी म्हणून शिक्षा भोगत असताना तुरुंगातील जुलुमाचा निषेध म्हणून केलेल्या उपोषणात ६१व्या दिवशी १३ सप्टेंबर १९२९ रोजी त्यांचा मृत्यू झाला.


१३ सप्टेंबर १९२९ मध्ये दुपारी १ वाजता जतींद्रनाथ दास या क्रांतीकारकाने ६१ दिवसांचा उपवास करून आपले प्राण सोडले. ते सुभाषचंद्र बोस यांचा उजवा हात मानले जायचे. 


त्या काळी जतींद्रनाथांनी ३ वेळा तुरुंगवास भोगला. सुटून आल्यावर त्यांनी ‘दक्षिण कलकत्ता तरुण समिती’ काढली. परिणामतः बेंगाल ऑर्डिनन्स दंडविधानान्वये जतींद्रनाथांना परत कारागृहात डांबण्यात आले. 


कारागृहातील छळाचा निषेध म्हणून त्यांनी ३३ दिवस अन्न त्याग केला आणि त्यांची सुटका झाली; पण परत लाहोर कटात गोवून त्यांना तुरुंगात डांबले. त्या वेळी राजकीय बंदींना मिळणार्‍या निकृष्टतम वागणुकीचा निषेध म्हणून त्यांनी उपवास चालू केला.


त्यांनी बलपूर्वक देण्यात आलेले अन्न नाकारले. त्यामुळे सात-आठ जण त्यांच्या छातीवर बसले. आधुनिक वैद्यांनी नाकात नळी घातली. जतीनदास खोकले. त्यामुळे दूध फुफ्फूसात जाऊन ती बिघडली. त्यामुळे आधुनिक वैद्यांना पुन्हा बलपूर्वक घशात दूध वगैरे दवडणे अशक्य झाले. 


दिवसेंदिवस जतीन अशक्त होत चालले होते. हात हलवेना. पापणी हलवेना. इंग्रज शासनाने त्याला बाहेर रुग्णालयात नेऊन कोणाचा तरी खोटा जामीन देऊन सोडण्याचे ठरवले; पण जतीनदास यांनी खूण करून त्यास नकार दिला आणि त्याच्या खोलीतील अन्य क्रांतीकारकांनी ‘आमच्या मुडद्यावरून त्यांना न्यावे लागेल’, असे पोलिसांना ठणकावले. या झटापटीतच जतींद्रनाथाचे हृदय थांबेल, अशी भीती अधिकार्‍यांना वाटली आणि ते गेले. 


*भारतमातेचा त्यागी सुपुत्र...! दुसर्‍यांना नीट जगता यावे म्हणून मरणारा...! राजकीय बंदीचे हाल बंद व्हावेत म्हणून अग्निदिव्य करणारा जतीन...! त्याची स्मृती भारतियांना अखंड स्फूर्ती देत राहील.* 


आपल्या राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या होमकुडांत अशा नरश्रेष्ठांच्या आहुती पडलेल्या आहेत. हे सर्वांनीच विशेषत: तरुणांनी लक्षात घेण्यासारखा हा दिवस आहे.’

🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

संकलन -)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

************************************

प्रभात दर्शन

 🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

भाद्रपद मास,शुक्ल पक्ष, *सप्तमी*,अनुराधा नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,वर्षा ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

सोमवार, १३ सप्टेंबर २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                         *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

         *"समस्या व्यक्तिगत हो, पारिवारिक अथवा सामाजिक... समस्या के बारे में सोचने से बहाने अथवा तनाव मिलता है, जबकि समाधान के बारे में सोचने पर मार्ग मिलता है।*

       *स्मरण रहे... जीवन सदैव सरल नहीं होता, अपितु स्वयं को ही देश, काल, परिस्थिति अनुसार मजबूत बनाना पड़ता है।"*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

शनिवार, ११ सप्टेंबर, २०२१

ऊत्तम नेमाजी सावंत

 ************************************

*१२ सप्टेंबर - उत्तम नेमबाज तेजस्विनी सावंत जन्मदिन*

************************************

🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹

*जन्म - १२ सप्टेंबर १९८०*   

               (कोल्हापूर)


तेजस्विनी सावंत ही जागतिक विजेतेपद मिळवणारी महाराष्ट्रातल्या कोल्हापूर शहरातली एक भारतीय महिला नेमबाज आहे.तिचे वडील भारताच्या नौदलात अधिकारी होते.


इस्लामाबादमध्ये २००४ साली झालेल्या ९ व्या दक्षिण आशिया क्रीडा महासंघ खेळांत तेजस्विनीने भारताचे प्रतिनिधित्व केले आणि भारताला सुवर्णपदक मिळवून दिले.


त्यानंतर राष्ट्रीय विजेतेपद स्पर्धेत आशियाई खेळातील सुवर्णपदक विजेती अंजली वेदपाठक भागवत आणि जागतिक विक्रमाची नोंद असलेली सुमा शिरूर यांना मागे टाकत तिने पाच सुवर्णपदके, सहा रजतपदके आणि पाच कांस्यपदकांची कमाई केली.


२००६च्या मेलबोर्न राष्ट्रकुल खेळांत महिलांच्या १० मीटर एअर रायफल सिंगल्स आणि महिलांच्या १० मीटर एअर रायफल दुहेरी प्रकारात अवनीत कौर सिद्धूसोबत तिने सुवर्णपदकांची कमाई केली.


जर्मनीत म्युनिख येथे २००९ साली झालेल्या आयएसएसएफ विश्वकरंडक स्पर्धेत ५० मीटर रायफल-थ्री पोझिशन्स प्रकारात तेजस्विनीने कांस्यपदक पटकावले. त्यानंतर म्युनिख मध्येच ५० मीटर रायफलप्रोन इव्हेंटमध्ये तिने ८ ऑगस्ट २०१० रोजी जागतिक विजेतेपद प्राप्त केले. ५० मीटर रायफलप्रोन प्रकारात जागतिक विक्रमाची बरोबरी करीत विजेतेपद मिळवणारी तेजस्विनी ही पहिली भारतीय महिला नेमबाज आहे. 


ऑ्लिंपिक आणि विश्वचषक स्पर्धेत पदक मिळवणे हे तेजस्विनीचे स्वप्न आहे. सध्या भारतीय ज्युनिअर नेमबाजी संघात तेजस्विनीचा समावेश झाला होता.

********************************* 

🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

संकलन -) गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

प्रभात दर्शन

 🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

भाद्रपद मास,शुक्ल पक्ष, *षष्ठी*,विशाखा नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,वर्षा ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

रविवार, १२ सप्टेंबर २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                         *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

         *"चरण उनके पूजे जाते हैं, जिनके आचरण पूजने योग्य होते हैं। आप अपने मधुर स्वभाव, वैभव-धन-सम्पदा, बहुमूल्य कपड़ों आदि से किसी को कुछ समय के लिए ही प्रभावित कर सकते हैं किन्तु किसी को आजीवन अपना बनाये रखने के लिए आपका वास्तविक उच्च आचरण और आत्मीय व्यवहार अति आवश्यक है"*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

चित्रकार गोपाळ दामोधर

 ************************************

*११ सप्टेंबर - चित्रकार गोपाळ दामोदर देऊसकर यांचा जन्मदिन*

************************************


*जन्म - ११ सप्टेंबर १९११* 

              (अहमदनगर)

 स्मृती - ८ फेब्रुवारी १९९४

👨‍🎨👨‍🎨👨‍🎨👨‍🎨👨‍🎨👨‍🎨👨‍🎨👨‍🎨👨‍🎨👨‍🎨👨‍🎨

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार गोपाळ दामोदर देऊसकर यांचा आज जन्मदिन.


गोपाळराव देऊसकर यांनी १९२७-३६ दरम्यान मुंबईच्या जे.जे. स्कूल ऑफ आर्ट या संस्थेत त्यांनी चित्रकलेचे प्रशिक्षण घेतले. पुढे निजामाने खास शिष्यवृत्ती देऊन चित्रकलेच्या प्रगत अभ्यासाकरता त्यांना युरोपात पाठवले. १९३४, १९३६, १९३८ साली लंडन मधील चित्रप्रदर्शनांत त्यांची चित्रे मांडण्यात आली होती. 


भारतात परतल्यावर त्यांना जे.जे. स्कूल ऑफ आर्ट संस्थेच्या डेप्युटी डायरेक्टर पदावर नेमले गेले. त्यांच्या चित्रकौशल्यामुळे बाँबे आर्ट सोसायटीने त्यांना सुवर्णपदक देऊन गौरवले. बालगंधर्व रंगमंदिरांतली दोन्ही तैलचित्र गोपाळराव देऊसकर यांनी काढलेली आहेत, एक स्त्रीवेषातलं बालगंधर्व आणि दुसरं पुरुष वेषातलं बालगंधर्व. 


बालगंधर्वांची ही अप्रतिम तैलचित्रे कलाकृती म्हणून फारच वरच्या दर्जाची, कलाकाराच्या प्रतिभेच्या दर्जाइतकीच. सुप्रसिद्ध चित्रकार आणि लेखक सुहास बहुळकर यांनी *'चित्रकार गोपाळ देऊसकर कलावंत आणि माणूस‘* हे गोपाळ देऊसकर यांच्या वर पुस्तक लिहिलेले आहे. 


मा.गोपाळ दामोदर देऊसकर यांचे ८ फेब्रुवारी १९९४ रोजी निधन झाले. 


मा.गोपाळ दामोदर देऊसकर यांना आदरांजली !

********************************* 

🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

संकलन -)गजानन गोपेवाड  

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

शुक्रवार, १० सप्टेंबर, २०२१

जगात भुते असतात का?


══════════════════════

   *📒📒📒 @ संकलन @📒📒📒*

  *श्री. गजानन गोपेवाड 

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════             

📕 *जगात भुते असतात का ?* 📕


लहानपणापासून तुम्हाला भुताखेतांची भीती दाखवली गेली असेल. अंधार, बागूलबुवा, तसेच भुते यांच्याबद्दल कोणत्याही लहान मुलाला भीती वाटतेच. ज्ञानाच्या कक्षा विस्तारतात, तसे भीती कमी होत जाते. खरेच का जगात भुते असतात? या प्रश्नाच्या दोन्ही बाजूंनी अत्यंत निर्धारपूर्वक बोलणारे अनेक जण भेटतील. देव आहे किंवा नाही, पुनर्जन्म आहे किंवा नाही; तसाच हाही एक वादाचा, तर कधी वितंडवादाचा मुद्दा होऊ शकतो. माहिती नसलेल्या गोष्टींबद्दल गूढतेचे वलय निर्माण होतेच. त्यामुळेच सर्वांनाच भुतांच्या गोष्टीत कमालीचे स्वारस्य असते.


भुते माणसाच्या मनात असतात, असे म्हणतात व ते खरे आहे. माणसाच्या मानसिक दौर्बल्याचा एक आविष्कार म्हणजे भुते होत. भुताचे अस्तित्व शास्त्राने अमान्य केले आहे. भूतं आहे हे कोणालाही सिद्ध करता आलेले नाही. भुताने झपाटणे, भूतबाधा आदी गोष्टी हे मनोविकार असल्याचे सिद्ध झाले आहे. बऱ्याचदा एखाद्या व्यक्तीला भूतबाधा झाली आहे, असे ठरवून मांत्रिकाकडे तिला नेण्यात येते. तेथे भूत उत्तरवण्याच्या नावाखाली त्या व्यक्तीचा शारीरिक छळ केला जातो. कधीकधी ती व्यक्ती मृत्युमुखीही पडते.असे होणे हे सुसंस्कृत समाजासाठी एक लांछनच होय.


*डाॅ.अंजली दिक्षित व डाॅ.जगन्नाथ दिक्षित*

*यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' पुस्तकातून*

═══════════════════════

साप खाला तर माणुस मरतो का?


══════════════════════

   *📒📒📒 @ संकलन @📒📒📒*

  *श्री. गजानन गोपेवाड 

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════             

📕 *साप खाल्ला तर माणूस मरतो का ?* 📕 


काय घाबरलात ना? पण घाबरू नका! काही वर्षानी का होईना, भारतातही हॉटेलात शिरल्यावर मेनूकार्डात चिकन, मटणाच्या बरोबर सापाचे मांस, कबाब इत्यादी पदार्थ नक्कीच लिहिलेले आढळतील. आजही चिनी उपहारगृहात सापाचे पदार्थ तुम्हाला खायला मिळतील. हळूहळू अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होणारच आहे. त्यामुळे मनुष्य साप, उंदीर, बेडूक अशा अनेक प्राण्यांना फस्त करत सुटेल. अर्थात सध्याही जगाच्या काही भागात हे प्राणी खाल्ले जातात. तुम्हाला प्रश्न पडला असेल की, साप हा भयंकर विषारी असतो; मग तो खाल्ल्यास मृत्यू येणार नाही का ?

साप खाल्ल्यावर माणूस मरत नाही, त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे सापाचे विष फक्त त्याच्या दातांजवळील ग्रंथीतच असते. ते सर्व शरीरभर पसरलेले नसते. त्यामुळे साप खाल्ला तरी कोणी मरणार नाही. दुसरी व अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, सापाचे विष जर खाल्ले तरी काहीही दुष्परिणाम होणार नाही. सापाचे विष म्हणजे एक प्रकारचे प्रथिनच असते. जठरातील आम्ल व इतर विकरांमुळे या प्रथिनांचे पचन होऊन जाईल. कोणतेही दुष्परिणाम होणार नाहीत.


साप चावल्यानंतर एकतर हे विष रक्तातून शरीरभर पसरते किंवा स्नायूतून चेतातंतूमध्ये व तेथून मेंदूपर्यंत पोहोचते. यामुळे सर्पविषबाधेची लक्षणे ही प्रामुख्याने रक्ताभिसरण संस्था किंवा मज्जासंस्था यांच्याशी निगडित असतात. या दोन्ही कारणांमुळे आपल्या लक्षात येईल की, साप खाल्ला तरी माणूस मरत नाही.


*डाॅ.अंजली दिक्षित व डाॅ.जगन्नाथ दिक्षित*

*यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' पुस्तकातून*

═══════════════════════

अश्रु व घाम खारट का असतात


══════════════════════

   *📒📒📒 @ संकलन @📒📒📒*

  *श्री. गजानन गोपेवाड 

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════             

📕 *अश्रू व घाम खारट का लागतात ?* 📕


घाम वा अश्रू खारट लागतात, याचा अनुभव तुम्हाला आलाच असेल. खूप रडल्यानंतर डोळ्यांतून काही अश्रू अश्रूपिंडातून नाकाच्या पोकळीत व तेथून घशात येतात. खारट चव लागते. घामातील मिठाची कल्पना तुम्हाला उन्हाळ्यांत येईल. उन्हाळ्यांत खूप घाम येतो. घामाने कपडे ओलेचिंब होतात. वाळल्यानंतर कपड्यावर घामाचे क्षारयुक्त डाग पडतात. कधी कपड्यांवर हात फिरवल्यास क्षाराचा थर लागतो.


शरीरातील पाणी व क्षार यांचा समतोल राखण्यासाठी घामाचा उपयोग होतो. डोळ्यांतील आवरण, नेत्रपटल हे भाग कोरडे होऊ नयेत; धूळ वगैरे गेल्यास ती वाहून डोळे स्वच्छ व्हावे, यासाठी अश्रू खूप उपयोगी ठरतात. अश्रु व घाम या दोहोंमध्ये सोडियम क्लोराईड हा क्षार असल्याने (मीठ म्हणजे सोडियम क्लोराईडच) ते खारट लागतात. हगवणीवर घरगुती उपाय म्हणून मीठ, साखर व पाणी यांचे द्रावण तयार करून ते पाजायला सांगतात. या द्रावणाची चव अश्रूंच्या इतकी खारट लागावी, असे सांगण्यात येते.


*डाॅ.अंजली दिक्षित व डाॅ.जगन्नाथ दिक्षित*

*यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' पुस्तकातून*

═══════════════════════

प्रभात दर्शन

 🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

भाद्रपद मास,शुक्ल पक्ष, *पँचमी*,स्वाति नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,वर्षा ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

शनिवार, ११ सप्टेंबर २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                        *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

         *"प्रत्युत्तर नहीं देने का अर्थ यह कदापि नहीं कि हमें यह सब कुछ स्वीकार्य है, बल्कि इसका उत्तम अर्थ यह कि हम इससे ऊपर उठ जाना ही अधिक श्रेष्ठ समझते है। कभी-कभी कुछ नहीं कहना भी बहुत कुछ बोल देता है।*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

बुधवार, ८ सप्टेंबर, २०२१

अमुल चे संस्थापक व्हर्गीस

 ************************************

*९ सप्टेंबर - 'अमूल'चे संस्थापक व्हर्गिस कुरियन यांचा स्मृतिदिन*

************************************


जन्म - २६ नोव्हेंबर १९२१ 

                 (केरळ)

*स्मृती - ९ सप्टेंबर २०१२*    

                 *(गुजरात)*


त्यांना दुध बिलकुल आवडत नव्हते, पण त्यांनी दूध उद्योगात 'अमूल' क्रांती घडविली अश्या व्हर्गिस कुरियन यांचे आज पुण्यस्मरण.


वर्गीज कुरियन यांचा जन्म ब्रिटिश भारतातील (वर्तमान केरळ राज्यातील) कोझिकोड गावात २६ नोव्हेंबर १९२१ रोजी झाला.


वर्गीज कुरियन १९४० साली मद्रास येथील लायोला कॉलेज येथून पदवीधर झाले. त्यानंतर त्यांनी मद्रास विद्यापीठातून बी.ई. (यंत्र अभियांत्रिकी) ही पदवी मिळवली. त्यापुढे वर्गीज कुरियन यांनी टाटा स्टील टेक्निकल इन्स्टिट्यूट, जमशेदपूर येथूनही पदवी प्राप्त केली. उच्च शिक्षणासाठी व्हर्गिस कुरियन सरकारी शिष्यवृत्ती मिळवून अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठात दाखल झाले. तेथे ते विशेष गुणवत्ता श्रेणीत उत्तीर्ण होत एम.एस्‌सी. (यंत्र अभियांत्रिकी) झाले.


ते म्हणत  दूध मला आवडत नाही आणि त्यामुळे ते मी पीत नाही, इतक्या प्रामाणिकपणे कुरियन आपले मत नोंदवीत. पण म्हणून दूध पूर्णान्नाच्या जवळ जाणारे आहे, हे ते नाकारत नसत.


दुधाला भारतीय संस्कृतीत, समाजजीवनात विलक्षण महत्त्व आहे आणि त्यास योग्य बाजारपेठ मिळवून दिली तर देशातील कोटय़वधी ग्रामीण महिलांना स्थिर रोजगाराचे कायमस्वरूपी माध्यम उपलब्ध होईल याची डोळस जाण त्यांना होती. भारतात कितीही औद्योगिक प्रगती झाली तरी देशात रोजगाराचे मुख्य साधन हे कृषीविषयक उद्योग हेच असणार आहेत आणि १८ ते ५५ या वयोगटात असणाऱ्या कोटय़वधी महिलांना दुग्धजन्य पदार्थाचा व्यवसाय हा उपजीविकेचा स्वयंपूर्ण मार्ग असणार आहे, असा त्यांचा सिद्धांत होता. याच डोळस अभ्यासाने कुरियन यांना आयुष्यभराचे श्रेयस आणि प्रेयस मिळवून दिले. 


केरळातल्या आताच्या कोझिकोड येथे अल्पसंख्य अशा सीरियन ख्रिश्चन कुरियन कुटुंबात जन्माला आलेल्या व्हर्गिस याने देश स्वतंत्रही झाला नव्हता तेव्हा एक स्वप्न पाहिले व पुढे आयुष्यभर त्या स्वप्नाच्या परिपूर्तीचा ध्यास घेतला. त्यातूनच आकाराला आली अशिक्षित, मातृभाषेतच शिकलेला, उच्चशिक्षणापासून दुरावलेला भारत काय करू शकतो याची एक अद्वितीय अमूल प्रेमकहाणी; जिने पुढे शहरांपुरतेच मिरवणाऱ्या, उगाचच आंग्लाळलेल्या इंडियालाही झाकोळून टाकले. (अक्षय मोरे पाटील यांचे ब्लॉग मधून)


एका सकाळी फेरफटका मारताना शीतगृहात त्यांना एक कामगार दुधाचे कॅन उघडून दूध पिताना दिसला. दूध त्याच्या दाढीवरून ओघळत होते. डॉ. कुरियन दिसताच तो दचकला आणि अडखळत 'नाही, मी दूध पीत नाही' असे म्हणाला. 


डॉ. कुरियन काहीही न बोलता मान फिरवून झर्रकन निघून गेले. दुसऱ्या दिवशी त्यांनी सर्व कर्मचाऱ्यांना दररोज अर्धा लिटर दूध देण्यात यावे, असा आदेश दिला. जो कर्मचारी भुकेल्या पोटी एवढे दूध हाताळतो, त्याचा या दुधावर पहिला हक्क आहे व तो नाकारून चालणार नाही, असा डॉ. कुरियन यांनी विचार केला.

*🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏*

संकलन -)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

**********************************

प्रभात दर्शन

 🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

भाद्रपद मास,शुक्ल पक्ष, *तृतीय*,हस्त नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,वर्षा ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

गुरुवार, ०९ सप्टेंबर २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                       *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

          *"उत्तम से उत्तम सद्गुणों का संग्रह ही सच्ची कमाई है। संसार का प्रत्येक प्राणी किसी न किसी सद्गुण से संपन्न है, परन्तु आत्म गौरव का गुण मनुष्यों के लिए प्रभु की सबसे बड़ी देन है। इस गुण से विभूषित प्रत्येक प्राणी को संसार के समस्त जीवों को अपनी आत्मा की भाँति ही देखना चाहिए। सदैव उसकी ऐसी धारणा रहे कि उसके मन, वचन एवं कर्म किसी से भी जगत् के किसी जीव को कष्ट न हो।"*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

बहिरे मुल मुकेहि असतात काय


══════════════════════

   *📒📒📒 @ संकलन @📒📒📒*

  *श्री. गजानन गोपेवाड 

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════

📕 *बहिरे मूल मुकेही असते का?* 📕


बहिरेपणा म्हणजे कमी अधिक प्रमाणात ऐकू न येणे, हे तुम्हाला माहीत असेलच. आपल्या कानाचे बाह्यकर्ण, मध्यकर्ण आणि अंतर्कर्ण असे तीन भाग असतात. या तीन भागांपैकी एकात जरी दोष असला, तरी बहिरेपणा येऊ शकतो. याखेरीज मेंदूपासून निघणारी आठवी नस किंवा मेंदूचा ध्वनिज्ञानकेंद्राचा भाग यांपैकी कोठेही दोष असेल, तरीही ऐकू येत नाही.


काही मुले जन्मताच मूकबधिर असतात. म्हणजे त्यांना ऐकूही येत नाही व बोलताही येत नाही. ही एक जन्मजात अशी बरी न होणारी व्याधी आहे. ऐकणे आणि बोलणे यांचा जवळचा संबंध आहे. आपण बोलायला कसे शिकतो, ते आता पाहू, लहान बाळाला आवाज आल्यास ते तिकडे वळून पाहायला लागते. येणारा आवाज आणि त्यासोबत होणाऱ्या तोंडाच्या, ओठांच्या हालचाली यावर बालकाचे बारीक लक्ष असते! आपले अनुकरण करतच ते पहिल्यांदा "बाऽऽऽवा", "ताऽऽता" असे शब्द बोलते. ऐकू न आल्यास साहजिकच त्याला बोलता येत नाही. दुसरे महत्त्वाचे म्हणजे ऐकू न आल्याने सभोवतालच्या परिस्थितीचे त्याला पुरेसे आकलनही होत नाही. त्यामुळे मुलाला भोवतालच्या गोष्टींबाबत रस वाटत नाही व त्याचा एकूणच विकास नीट होत नाही. यावरून बहिरे मूल बऱ्याचदा मुके असल्याचे तुम्हाला आढळेल किंबहुना बहिरे

असल्यानेच ते मुकेही असते.


लहान बाळाने आवाजाला प्रतिसाद दिला नाही, तर तात्काळ त्याच्या कानांची तपासणी करून घ्यावी. बहिरेपणाचे निदान झाल्यास बोलण्यासाठीचे विशेष प्रशिक्षण मुलाला द्यावे लागते. अर्थात असे शिक्षण देणाऱ्या संस्था संख्येने फार कमी आहेत. मात्र असे शिक्षण दिल्यास मूकबधिर मुले काही प्रमाणात स्वावलंबी बनू शकतात.


*डाॅ.अंजली दिक्षित व डाॅ.जगन्नाथ दिक्षित*

*यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' पुस्तकातून*


मंगळवार, ७ सप्टेंबर, २०२१

टाँवर आँफ सायलेन्स


══════════════════════

   *📒📒📒 @ संकलन @📒📒📒*

  *श्री.गजानन गोपेवाड 

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════

📕 *'टॉवर ऑफ सायलेन्स म्हणजे काय ?*


माणूस मेल्यानंतर त्याचे काय करायचे, हे त्याच्या धर्मानुसार वा मृत्यूपूर्वी त्याने काही इच्छा (उदा. देहदान) लिहून ठेवली असेल तर त्यावर ठरते. हिंदूंमध्ये मृतदेहाला अग्नी देतात. मुस्लीम आणि ख्रिश्चन लोक मात्र मृतदेह पुरतात मृतदेहाला अग्नी देण्यासाठी पूर्वापार चालत आलेल्या प्रथेप्रमाणे लाकडांचा वापर करून चिता तयार केली जाते. आजकाल विद्युतदाहिन्यांमध्येही मृतदेहाला अग्नी देतात. अर्थात ही सोय फक्त मोठ्या शहरांमध्येच उपलब्ध आहे. तुम्हाला वाटेल, ही काय भलतीच चर्चा सुरू केली आहे! पण 'टॉवर ऑफ सायलेन्स' म्हणजे काय, हे सांगण्यासाठी ही पार्श्वभूमी आवश्यक आहे. पारशी लोक 'टॉवर ऑफ सायलेन्स'मध्ये मृतदेहावर अंत्यसंस्कार करतात किंवा मृतदेह ठेवतात. हा टॉवर एखाद्या टेकडीवर बांधलेला असतो. या टॉवरच्या तळाशी सुमारे ३०० फूट परिघाचा एक गोलाकार ओटा असतो. या ओट्याच्या मध्यभागी सुमारे १५० फूट परिघाची गोलाकार विहीर असते. गोलाकार ओट्यावर मृतदेह ठेवला जातो. १५ ते ३० मिनिटांत गिधाडे गोळा होऊन त्या मृतदेहावरचे सर्व मांस खाऊन त्याचे रूपांतर हाडांच्या सापळ्यात करतात. हवा व तपमान यांच्यामुळे हाडे वाळल्यावर ती ओट्याच्या आतील भागातील विहिरीत टाकली जातात. तेथे विघटन होऊन त्यांचा भुगा होतो. भिंतीमध्ये असलेल्या छिद्रांतून पावसाचे पाणी विहिरीत येते व हाडांचा भुगा या पाण्याबरोबर वाहून जातो व मातीत मिसळला जातो.


"अशा प्रकारे मृतदेहाची चांगल्या रितीने विल्हेवाट लावली जाते. ही पद्धत कमी खर्चाची, कमी वेळ लागणारी आहेच; पण यात भुकेल्या गिधाडांना अन्नही मिळते. मृतदेह जाळल्यामुळे होणारा धूर, प्रदूषण हे त्रासही वाचतात. मुख्य म्हणजे मृत्यूबद्दलची अनावश्यक व क्लेषदायी भावनिकताही यात नसते.


*डाॅ.अंजली दिक्षित व डाॅ.जगन्नाथ दिक्षित*

*यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' 

फिगर प्रिंट म्हणजे काय


══════════════════════

   *📒📒📒 @ संकलन @📒📒📒*

  *श्री. गजानन गोपेवाड 

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════             

📕 *फिंगर प्रिंट्स म्हणजे काय ?* 📕


अनेक वेळा तुम्ही फिंगर प्रिंटबद्दल ऐकले असेल. एखाद्या हिंदी चित्रपटात खून करून पळालेल्या वा खून केल्याचा संशय असलेल्या व्यक्तीच्या हाताच्या बोटांचे ठसे बुद्धिमान पोलिस इन्स्पेक्टर कोणत्या तरी निमित्ताने (जसे त्याचा पाणी प्यायलेला ग्लास मिळवून वगैरे!) घेतानाही तुम्ही पाहिले असेल. त्याच्या हुशारीला दादही दिली असेल. हाताच्या बोटांच्या ठशांचा खरेच काही उपयोग होतो का, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. आधी हे लक्षात घेऊ की, बोटांच्या शेवटच्या पेरावर असलेल्या उंचवटे व खोलगट भागांवर हे फिंगर प्रिंट अवलंबून असतात. तुमची बोटे स्वच्छ धुवा. नंतर एखादे भिंग घेऊन त्याखाली बोटे बघा. तुम्हाला असे दिसेल की, वोटांवर चित्रात दाखवल्याप्रमाणे आकार दिसतील. यांना अनुक्रमे आर्च (पद्म), लुप (शंख), व्हर्ल (चक्र) व काम्पोझिट (संमिश्र) आकार असे म्हणतात. बाह्यत्वचा व अंत: त्वचेवर असणाऱ्या उंचवटे व खोलगट भागांवर हे आकार अवलंबून असतात. हे जन्मल्यापासून दिसून येतात व आयुष्यभर बदलत नाहीत. त्वचा जर नष्ट झाली तर मात्र तेही नष्ट होतात. शंख, चक्र, पद्म व संमिश्र आकार यांच्या विविध रचना तयार होतात. दोन व्यक्तींचे फिंगर प्रिंटसारखे असणे केवळ अशक्यच असते. दोन व्यक्तींचे फिंगर प्रिंट्स सारखे


असण्याची शक्यता एकास चौसष्ट हजार दशलक्ष इतकी कमी असते. म्हणजे जगाच्या लोकसंख्येच्या तिसपट लोकसंख्येतच दोन व्यक्तींचे फिंगर प्रिंट्स सारखे असू शकतात. या वैशिष्ट्यामुळे गुन्हेगार पकडण्यासाठी ठशांचा खूप उपयोग होतो. कोणत्याही वयात ते बदलत नाहीत. हाताच्या बोटाची त्वचा शाबूत असलेल्या मृतदेहाचेही फिंगर प्रिंट्स घेता येतात. त्यामुळे व्यक्तीची खात्रीशीरपणे ओळखत पटवता येते. एवढेच नाही तर, सांकेतिक भाषेत त्यांची माहिती एका ठिकाणाहून दुसरीकडे पाठवता येते. साहजिकच त्यामुळे बँकेतून पैसे काढताना निरक्षर व्यक्तीच्या अंगठ्याचा ठसा घेतात. नोकरीत कायम झालेल्या व्यक्तीच्या सर्व बोटांचे ठसे घेऊन ठेवतात. चोर पकडल्यावर पोलिसही त्याच्या बोटांचे ठसे घेऊन ठेवतात. ओळख पटविण्यासाठी त्याचा पुढे उपयोग करतात. फिंगर प्रिंट्सच्या आधारे अनेक गुन्ह्यातील खरा गुन्हेगार पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.


*डाॅ.अंजली दिक्षित व डाॅ.जगन्नाथ दिक्षित*

*यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' पुस्तकातून*

═══════════════════════

त्से माशी म्हणजे काय


══════════════════════

   *📒📒📒 @ संकलन @📒📒📒*

  *श्री. गजानन गोपेवाड 

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════             

📕 *त्से त्से माशी म्हणजे काय ?* 📕


तुम्ही म्हणाल काय बुवा हे नाव! त्से त्से माशी ही घरात नेहमी दिसणाऱ्या माशीसारखीच एक प्रकारची माशी आहे. त्से त्से माशी व घरातील माशी ह्यांच्यात बरेच साम्य आहे. त्से त्से माशी अर्धा इंच लांब असते व तिचा रंग पिवळसर किंवा गडद तपकिरी असतो. कात्रीच्या पात्यांसारखे पंख असलेल्या या माशीची सोंड खूप तीक्ष्ण व मजबूत असते. या सोंडेनेच ही माशी चावते व त्वचेला छिद्र पाडून रक्त प्राशन करते. आपल्या सुदैवाने ही खतरनाक माशी आफ्रिका खंडात आढळते. आपल्याकडे ती दिसून येत नाही. त्से त्से माशी सुमारे १०० दिवस जगते. ती अंडी न घालता सरळ अळ्यांनाच जन्म देते. त्से त्से माशा माणसांना, पक्ष्यांना किंवा प्राण्यांनाही चावतात. या माशा प्रामुख्याने दिवसाच चावे घेतात. या माशांमुळे 'स्लिपींग सिकनेस' ह्या रोगाचा प्रसार होतो. 'ट्रिपॅनोसोमा ब्रूसी' नावाचे या रोगाचे जंतू त्से से माशीमुळे निरोगी माणसाच्या शरीरात प्रवेश करतात. अशा व्यक्तीला सुरुवातीला ताप येतो. तापासोबत शरीरातील लसिकाग्रंथी मोठ्या होतात, सूजतात. कालांतराने मेंदूवर परिणाम होतो. हा रोग झालेली व्यक्ती अशक्त होत जाते व वर्ष-दीड वर्षात मरण पावते. ह्या गंभीर रोगाचे त्यामुळेच दूरगामी, सामाजिक व आर्थिक परिणाम होतात. " चेहेऱ्यावरची माशीदेखील उडत नाही!" असे आपण गमतीने म्हणतो. पण जर देश आफ्रिकेतला असेल आणि माशी 'त्से त्से' असेल तर मात्र खैर नाही. कारण अशी माशी आपल्या प्राणावरच बेतू शकते. त्से त्से माशा राहतात ती झाडेझुडपे नष्ट करून व डी.डी. टी., डायएल्ड्रीनसारख्या कीटकनाशकांचा वापर करून या माशीचा बीमोड करता येतो.


*डाॅ.अंजली दिक्षित व डाॅ.जगन्नाथ दिक्षित*

*यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' पुस्तकातून*

═══════════════════════

आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन

 ************************************

*८ सप्टेंबर - आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन*

************************************

📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚

🖋️📖🖋️📖🖋️📖🖋️📖🖋️📖🖋️

आज आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन !


केवळ शिक्षण देणे म्हणजे साक्षरता नव्हे, तर मानवी प्रगतीच्या वाट्यात अडथळा बनण्याचा, गरिबीला नष्ट करण्याचा तो एक वैशिष्ट्यपूर्ण आणि शक्तीशाली मार्ग आहे. जीवनातील आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि समाज बदलवण्यासाठी साक्षरता हे एक परिणामकारक साधन आहे.


राष्ट्रकुलाच्या 'युनेस्को' या संघटनेने १९६५ साली जागतिक पातळीवर साक्षरता दिन साजरा करण्याची घोषणा केली व त्याच्या पुढच्या वर्षापासून ८ सप्टेंबरला जगभर ती प्रथा रुढ झाली. 


४२ वर्षांपूर्वी 'युनेस्को' ने सुरु केलेल्या जागतिक साक्षरता दिनाला अजूनही प्रचंड प्रतिसाद मिळतोय. भारतात सुद्धा या अभियानाचे चांगले फलित दिसून आले असून, एका आकडेवारीनुसार १९४७ साली भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारताचा साक्षरता दर हा १२ % इतकाच होता. मात्र बदलत्या काळाबरोबर आपला साक्षरता दर ७४ ते ८० % पर्यंत वाढल्याचे दिसून आले आहे. आंतरराष्ट्रीय साक्षरतेच्या तुलनेत ही वाढ पुरेशी नाही. 


युनेस्कोच्या व्याख्येनुसार साक्षरता म्हणजे माणसाला दैनिक जीवनाशी निगडित बाबीविषयी लिहिता वाचता येणे, मानवी जीवनातील घडामोडींचे विश्लेषण करता येणे व वैयक्तिक स्वातंत्र्य अबाधित ठेवून स्वत:च्या व समाजाच्या प्रगतीस हातभार लावणे.


आंतरराष्ट्रीय  साक्षरता दिनाच्या आपल्या सर्वाना शुभेच्छा !

**********************************

🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

संकलन -)गजानन गोपेवाड  

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

प्रभात दर्शन

 🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

भाद्रपद मास,शुक्ल पक्ष, *१/२*,उ.फा.नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,वर्षा ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

बुधवार, ०८ सप्टेंबर २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                         *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

        *"अपने साथ हुए प्रत्येक बुरे व्यवहार पर प्रतिक्रिया व्यक्त करने में आपकी जो ऊर्जा व्यय होती है, वह आपको रिक्त कर देती है और आपको दूसरी अच्छी चीजों को देखने से रोकती है। इसलिए बुद्धिमता भिड़ जाने की अपेक्षा अलग हट जाने में ही है।*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Featured Post

व्यायाम व योगा अवश्य करावा*

*व्यायाम व योगा अवश्य करावा*  *व्यायाम व योगा करण्याचे दहा फायदे:-*  1) व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते: व्यायाम करणारी...