शनिवार, १७ जुलै, २०२१

प्रभात दर्शन

 🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

अषाढ़ मास,शुक्ल पक्ष, *पँचमी*,उ.फा.नक्षत्र,सूर्य उत्तरायण,ग्रीष्म ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

गुरुवार, १५ जुलै २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                        *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

        *"यदि हर कोई आप से प्रसन्न है, तो ये निश्चित है कि आपने जीवन में बहुत से समझौते किये हैं...। और यदि आप सबसे प्रसन्न हैं, तो ये निश्चित है कि आपने लोगों की बहुत सी त्रुटियों को अनदेखा किया है।"*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

प्रभात दर्शन

 🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

अषाढ़ मास,शुक्ल पक्ष, *चतुर्थी*,पू.फा.नक्षत्र,सूर्य उत्तरायण,ग्रीष्म ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

बुधवार, १४ जुलै २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                        *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


कोऽतिभारः समर्थानां, 

            किं दूरं व्यवसायिनाम्। 

को विदेशः सुविद्यानां, 

            कः परः प्रियवादिनाम्।।"


*भावार्थः- समर्थ व्यक्ति के लिए कोई कार्य कठिन नहीं है, व्यवसायी के लिए कोई स्थान दूर नहीं है, विद्वान के लिए कोई देश विदेश नहीं है, प्रियवादी के लिए कोई व्यक्ति पराया नहीं है।*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

जन संग्राम बातमी गजानन गोपेवाड यांची


 

गुरुवार, १५ जुलै, २०२१

विवीध फुलांचा अभ्यास


 


गजानन गोपेवाड बातमी

 *जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक मराठी शाळा मुडाणा राबवितेय नाविन्यपूर्ण उपक्रम*

°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°

मुडाणा  प्रतिनिधी 

सुरेश कड



______________________*जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक मराठी शाळा मुडाणा राबवितेय नाविन्यपूर्ण उपक्रम*

°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°

मुडाणा  प्रतिनिधी 

सुरेश कड



______________________

सविस्तर बातमी वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

👇👇👇👇👇👇👇👇 https://www.patrakarshakti.com/07/2021/news-post/16331

सविस्तर बातमी वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

👇👇👇👇👇👇👇👇 https://www.patrakarshakti.com/07/2021/news-post/16331

लोकसत्ता बातमी गजानन गोपेवाड

 




बुधवार, १४ जुलै, २०२१

लोकसत्ता संघर्ष गजानन गोपेवाड यांची बातमी

 जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक मराठी शाळा मुडाणा राबवितेय नाविन्यपूर्ण उपक्रम https://loksattasangharsh.com/?p=1149


गोपाल गणेश आगकर

 *✒️🗒️🗞️गोपाळ गणेश आगरकर*

*(जन्म : टेंभू-सातारा, १४ जुलै १८५६; मृत्यू : १७ जून १८९५)*

         हे महाराष्ट्रातील थोर समाज सुधारक होते.आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासात सामाजिक जागृतीत गो.ग.आगरकर यांचे योगदान मोलाचे आहे.त्यांनी समाज प्रबोधन करण्यासाठी सुधारक, केसरी,मराठा या वृत्तपत्रांचा आधार घेतला.सामाजिक समता,स्त्री-पुरुष समानता आणि विज्ञान‌- निष्ठा‌ ही त्यांची जीवनमूल्ये होती.मुलींनासुद्धा शिक्षण मिळायला पाहिजे असा लेख त्यांनी सुधारक या वृत्तपत्रात लिहिला.असा लेख लिहिण्याचे धारिष्ट्य त्यापूर्वी कोणाचे नव्हते. बुद्धिप्रामाण्य वादाचे पुरस्कार करून महाराष्ट्रामध्ये समाज सुधारणा घडून आणणे या उद्देशाने समाजसुधारणा करणाऱ्या समाजसुधारकांमध्ये गोपाळ गणेश आगरकर यांचे नाव प्राधान्याने घ्यावी लागते महाराष्ट्रातील समाज सुधारकांच्या मांदियाळीतील क्रांतीकारी समाजसुधारक म्हणून गोपाळ गणेश आगरकर हे महत्त्वपूर्ण ठरतात.


गोपाळ गणेश आगरकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आचार्य अत्रे यांनी पुण्यात इ.स. १९३४साली आगरकर हायस्कूल ही मुलींची शाळा स्थापन केली.


*आरंभीचा काळ*

आगरकरांचा जन्म सातारा जिल्ह्यातील टेंभू या खेड्यात,एका गरीब देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण कुटुंबात झाला.घरच्या गरिबीमुळे शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी त्यांना अनेक मार्ग चोखाळावे लागले.कधी मामलेदार कचेरीत उमेदवारी करून, कधी माधुकरी मागून तर कधी कंपाउंडरचे काम करून त्यांनी आपले मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षणासाठी ते कर्‍हाड, अकोला, रत्नागिरी येथे गेले. १८७५ साली ते मॅट्रिक झाले व महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी पुण्याला आले. पुण्यात त्यांनी डेक्कन कॉलेजला प्रवेश घेतला.वर्तमानपत्रात लिखाण करणे,वक्तृत्व स्पर्धा,निबंध स्पर्धा यांत भाग घेऊन बक्षिसे जिंकणे,शिष्यवृत्ती मिळवणे अशा प्रकारे त्यांची गुजराण चालत असे. गोपाळ गणेश आगरकर व लोकमान्य टिळक यांची ओळख १८७९मध्ये एम. ए. करतांना झाली. त्यांनी एकत्रच शिक्षण घेतले होते. त्यांनीच त्यावेळेस केसरी वृत्तपत्र सुरु करायचे ठरवले होते.त्यात लोकमान्य टिळक,गोपाळ गणेश आगरकर,व विष्णुशास्त्री चिपळूणकर या तिघांचा पुढाकार होता.



*कारकीर्द*

आगरकर हे बाळ गंगाधर टिळकांनी सुरू केलेल्या केसरी वृत्तपत्राचे पहिले संपादक (१८८०-१८८१) होते.


पुण्यात महाविद्यालयीन शिक्षण घेत असतांना ते व लोकमान्य टिळक एकत्र आले. तोपर्यंत स्वदेशसेवेची प्रेरणा दोघांच्याही मनात जागी झाली होती. दिनांक १ जानेवारी, १८८० रोजी विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी ‘न्यू इंग्लिश स्कूल’ ची स्थापना केली. आगरकर १८८१ मध्ये एम. ए. झाल्यावर चिपळूणकरांना जाऊन मिळाले. आगरकर व टिळक यांनी १८८१ मध्ये इंग्रजीतून ‘मराठा’, तर मराठीतून ‘केसरी’ अशी दोन वृत्तपत्रे चालू केली. केसरीचे संपादकत्व आगरकरांनी स्वीकारले.


पुढे लोकमान्य टिळक व आगरकर यांनी २४ ऑक्टोबर १८८४ ला डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली व त्या अंतर्गत १८८५ साली फर्ग्युसन कॉलेजची स्थापना झाली. आगरकर याच कॉलेजात शिकवू लागले, पुढे ते फर्ग्युसनचे प्राचार्यही झाले


*उल्लेखनीय कार्य*

१८८४ साली बाळ गंगाधर टिळक, विष्णुशास्त्री चिपळूणकर आणि आगरकरांनी पुण्यात ‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी’ स्थापली.१८८८ साली त्यांनी ‘सुधारक’ हे वृत्तपत्र सुरू केले.


गोपाळ गणेश आगरकर हे, भौतिकता – ऐहिकता, बुद्धिप्रामाण्य, व्यक्तिस्वातंत्र्य या आधुनिक तत्त्वांना प्रमाण मानून जिवाच्या कराराने समाज सुधारणांचा पाठपुरावा करणारे समाजप्रबोधक होते. महाराष्ट्रातील समाज परिवर्तनाच्या प्रक्रियेला विवेकाचे, बुद्धिप्रामाण्याचे व व्यक्तिस्वातंत्र्याचे अधिष्ठान देऊन,परिवर्तनाचे विज्ञाननिष्ठ तत्त्वज्ञान निर्माण करण्याचे श्रेय गोपाळ आगरकरांकडे जाते.



राजकीय स्वातंत्र्याआधी समाजसुधारणा महत्त्वाची आहे. बालविवाह, अस्पृश्यता यांसारख्या समाजातील अनिष्ट रूढी आधी नष्ट केल्या पाहिजेत अशा विचारांचे ते होते. समाजसुधारणा विरुद्ध राजकीय स्वातंत्र्य याच वादातून १८८७ च्या ऑक्टोबरमध्ये त्यांनी केसरीचे संपादकत्व सोडले. १८८८ साली त्यांनी ‘सुधारक (वृत्तपत्र)’ हे वृत्तपत्र सुरू केले. व्यक्तिस्वातंत्र्य, बुद्धिवाद, भौतिकता या मूल्यांचा प्रचार त्यांनी सुधारकमधून केला, तसेच जातिव्यवस्था, चातुर्वर्ण्य, बालविवाह, ग्रंथप्रामाण्य- धर्मप्रामाण्य, केशवपन इत्यादी अन्यायकारक परंपरांना त्यांनी विरोध केला. अंधश्रद्धा, पाखंडीपणा यांच्यावर प्रहार केले. सुधारक हे इंग्रजी व मराठी या दोन्ही भाषांतून प्रकाशित केले जात होते. इंग्रजी सुधारकची जबाबदारी काही काळ नामदार गोखले यांनी सांभाळली होती.



आगरकर व्यक्तिवादाचे पुरस्कर्ते होते. बुद्धीला जी गोष्ट पटेल ती बोलणे व शक्य तितकी आचरणात आणणे, मग त्याला इतरत्र पूज्य ग्रंथात वा लोकरूढीत आधार असो वा नसो, हे आगरकरांचे महत्त्वाचे तत्त्व होते. स्त्रियांच्या अगदी पेहेरावाविषयीही त्यांनी आधुनिक विचार समाजासमोर मांडले होते. राजकीय व सामाजिक बाबतीत समता, संमती व स्वातंत्र्य हे घटक महत्त्वाचे आहेत; मनुष्यकृत विषमता शक्य तितकी कमी असावी; सर्वांस सारखे, निदान होईल तितके सारखे सुख मिळण्याची व्यवस्था होत जाणे म्हणजे सुधारक होत जाणे – अशी त्यांची सुटसुटीत विचारसरणी होती. ‘विचारकलह हा समाजस्वास्थ्याला आवश्यक आहे,’ असे त्यांचे मत होते. त्यांच्या या विचारसरणीमुळे त्यांना टोकाचा विरोध झाला. सनातनी लोकांनी त्यांच्या जिवंतपणीच त्यांची प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढली होती. पण तरीही निग्रहाने आणि निश्चयाने त्यांनी आपल्या विचारांचा पाठपुरावा केला.


वयाच्या अवघ्या एकोणचाळीसाव्या वर्षी त्यांचे निधन झाले


*पत्रकारिता*

१८८१ मध्ये ‘केसरी’ हे वृत्तपत्र सुरू केले. याचे प्रथम संपादक म्हणून आगरकरांनी १८८८ पर्यंत काम केले. आगरकर हे बुद्धिवादी होते. त्यांनी प्रारंभीच्या काळात जनतेच्या विचार परिवर्तनाविषयक लिखाणांवर भर दिला. समाज सुधारणांच्या मूलगामी विचारांतून सामाजिक सुधारणा वेग धरू शकतील याबाबत त्यांनी जागरूकतेने सामाजिक सुधारणांवर आग्रही राहून ‘केसरी’त लिखाण केले. त्याचबरोबर राजकीय स्वातंत्र्याचाही पुरस्कार केला. आगरकरांचा सडेतोडपणा, वैविध्य यामुळे ‘केसरी’ची लोकप्रियता वाढली खरी; परंतु पुढे टिळक व आगरकरांत वैचारिक मतभेद वाढत गेल्यामुळे १८९० पासुन ‘केसरी’चे काम लोकमान्य टिळक पाहू लागले.


आगरकरांनी पुण्यातच सुधारक वृत्तपत्र सुरू केले.सुधारक मधून आगरकरांनी व्यक्तिस्वातंत्र्य, अनिष्ट धार्मिक रूढींचा निषेध, शिक्षणाचे महत्त्व इ. मुद्यांचा प्रसार केला.तत्कालीन समाजाच्या विरोधात जाताना आगरकरांना प्रचंड मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागला.

=========================

*🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏*

संकलन -)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

प्रभात दर्शन

 🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

अषाढ़ मास,शुक्ल पक्ष, *चतुर्थी*,पू.फा.नक्षत्र,सूर्य उत्तरायण,ग्रीष्म ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

बुधवार, १४ जुलै २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                        *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


कोऽतिभारः समर्थानां, 

            किं दूरं व्यवसायिनाम्। 

को विदेशः सुविद्यानां, 

            कः परः प्रियवादिनाम्।।"


*भावार्थः- समर्थ व्यक्ति के लिए कोई कार्य कठिन नहीं है, व्यवसायी के लिए कोई स्थान दूर नहीं है, विद्वान के लिए कोई देश विदेश नहीं है, प्रियवादी के लिए कोई व्यक्ति पराया नहीं है।*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

मंगळवार, १३ जुलै, २०२१

बातमी

 *🔰अग्निपंख शैक्षणिक समुहातर्फे होळी साधेपणाने साजरी करण्याचे आवाहन*


         👇

 *◼️यवतमाळ ll* https://chandrapursaptarang.in/news/13368

एक आठवण शिवरायांची

 *🚩एक आठवण शिवरायांची🚩*

********************************

     *१३ जुलै इ.स.१६६०*

*बाजीप्रभू देशपांडे बलिदान दिन*

********************************


स्मृतिदिन - १३ जुलै १६६०


पावनखिंड ! लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे !


किल्ले पन्हाळगड १२ जुलै १६६०, आषाढ पौर्णिमा. गुरुवार रात्री १० वाजायच्या आसपास ठरल्याप्रमाणे शिवाजी महाराजांच्या संगे हिरडस मावळांतील सहाशे मावळे आणि सोबत बाजीप्रभू आणि फुलाजीप्रभू देशपांडे ठरलेल्या मार्गाने सिद्दी जौहरच्या वेढ्यातून निसटण्यासाठी पन्हाळ्याहून हेरांनी शोधलेल्या मार्गाने निघाले. अंधारलेल्या मार्गाने हेर पुढे आणि त्या मागोमाग सर्व.सोबत एक पालखी होतीच.


ऐन वेढ्यात शिरताच सर्वाँचेच काळीज धडधडू लागले. वेढ्याची हद्द संपली अन पालखी झपाट्याने पुढे पुढे धावत होती.


अन् घात झाला ! जौहरच्या हेरांनी पाहिलेच !


पण मावळ्यांनी राजांची पालखी जोरात पळवायला सुरवात केली. काही अतंर पळाल्यावर मावळे थांबले. रिकामी पालखी पुढे आली. महाराजांप्रमाणेच पोशाख केलेला एक मावळा पुढे आला. त्या मर्द मावळ्याचे नाव 'शिवा काशिद' हा जातीने न्हावी होता.


नवी पालखी सरळ मार्गाने विशाळगडाकडे निघाली आणि खुद्द शिवाजी महाराजांची पालखी निवडक मावळ्यांसह आडरानात घूसली.


"शिवाजी भाग गया" ही बातमी सिद्दी जौहरच्या छावणीत धडकली. अन राजांचा पाठलाग सूरु झाला. विशालगडाकडे मसूदची फौज निघाली. बराच पाठलाग केल्यावर पंधरा वीस मावळे एक पालखी पळवीत असताना दिसले. पालखी अडवली गेली. पालखीत शिवाजीराजे सापडले.


मसूदला आनंद झाला. मसूद आनंदाने पालखीसह जौहरच्या छावणीत पोहोचला. पालखीतून राजे उतरले. जौहर निरखून राजांना पाहू लागला. अन् त्याची खात्री झाली, हा शिवाजी नाही.


राजांची चौकशी केल्यावर कळलं हा शिवाजी महाराजांसारखाच दिसणारा दुसराच 'शिवा' नावाचा न्हावी आहे.


चिडून संतापून मसूद पुन्हा राजांच्या पाठलागावर निघाला. एवढ्या वेळात महाराज बरेच दूर गेले होते. पहाट झाली होती.


आषाढ वद्य प्रतिपदा उगवली. दि. १३ जुलै १६६०. अजून पाच कोस जायचे होते. मावळे पालखी पळवायची शिकस्त करत होतेच. मावळे, बाजीप्रभू आणि महाराज गजापूरच्या खिंडीत पोहचले. आणि आलाच मसूद. आता क्षणभरही थांबणे घातक होते.


बाजींनी राजांना कळवळून विनविले, "तुम्ही थांबू नका. गनीम जवळ येतोय. मी इथे खिंडीत थांबतो. एकालाही खिंड चढू देणार नाही. तुम्ही जा ! गडावर जाताच तोफांचे आवाज करा ! तोंपावेतो गनिमाला येऊ देत नाही !"


'लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे' हि म्हण बहुधा तेव्हाच बनली असावी. निम्मे मावळे घेऊन राजे विशाळगडाकडे निघाले. खिंडीत बाजींसोबत मावळ्यांनी मसूदच्या फौजेला रोखले.


पन्हाळ्याहून निघून सात प्रहर म्हणजे २१ तास झाले होते. बाजींनी शौर्याने खिंड लढवित ठेवली. महाराजांनी विशाळगडाखालील जसवंत सिंह आणि सुर्यराव यांचा प्रतिकार मोडीत विशाळगडावर धाव घेतली.


घोडखिंडीत बाजीप्रभू , फूलाजीप्रभू आणि मावळे तोफांच्या आवाजाची वाट पाहत होते. एवढ्यात...


तोफांचा आवाज कडाडला. तीन तोफांचे आवाज झाले. एवढ्यांत घात झाला. बाजींवर शत्रूचा घाव पडला. घळकन् रक्ताचा लोंढा फुटला. बाजींची मुर्ती कोसळली


गजापूरची खिंड पावन झाली ! पावनखिंड !!


फुलाजी प्रभू आणि बाजी प्रभूंना । 

तसा चित्तीं ध्यातो शिवा काशिदांना ॥

*🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏*

********************************

संकलन-)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६


प्रभात दर्शन

 🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

अषाढ़ मास,शुक्ल पक्ष, *तृतीय*,मघा नक्षत्र,सूर्य उत्तरायण,ग्रीष्म ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

मंगलवार, १३ जुलै २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                       *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


दानं पूजा तपश्र्चौव 

              तीर्थसेवा श्रुतं तथा,

सर्वमेव वृथा तस्य 

              यस्य शुध्दं न मानसम्।।


*भावार्थः- यदि व्यक्ति का मन शुद्ध नही है, तो दान, पूजा, तपस्या, तीर्थ, सेवा, कथा सुनना, सब व्यर्थ है।।*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

सोमवार, १२ जुलै, २०२१

औषध जेवना आधी घ्यावी की जेवणानंतर

 संकलन:) गजानन गोपेवाड 


══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════

 *औषधे जेवणापूर्वी घ्यावी की जेवणानंतर ?*


जेवल्यानंतरच औषधे घ्यावी, असा एक समज समाजात आढळून येतो. गोळ्या गरम पडतात, उष्ण असतात आणि त्यामुळे त्यांचे दुष्परिणाम टाळण्यासाठी जेवण करून मगच औषध घ्यावे; असेही काही जणांना वाटत असते. औषधे केव्हा घेणे जास्त योग्य ते आता पाहू. एक मात्र नक्की की आजारी पडल्याखेरीज औषधे कधीही घेऊ नयेत! कारण आजकाल काही लोक स्वतःच स्वतःचे डॉक्टर बनतात आणि टिव्हीवरच्या जाहिराती पाहून तापाच्या स्मरणशक्ती वाढवण्याच्या किंवा शक्ती वाढवण्याच्या गोळ्या घेतात. अर्थात याचे दुष्परिणाम त्यांना भोगावे लागतात.


काही औषधे उपाशीपोटी म्हणजे जेवणाच्या तासभर अगोदर घेतली, तर त्याचे रक्तात शोषण चांगले होते आणि त्यांचा परिणामही चांग घडून येतो. अशा औषधांमध्ये पेनिसिलीन, अॅम्पीसिलीन, रिफॅम्पीसीन, टेट्रासायक्लीन या जंतूनाशकांचा समावेश होतो. टेट्रासायक्लीन घेण्यापूर्वी किंवा घेतल्यानंतर तासभर तरी दूध पिऊ नये. अॅस्पीरिन, लोहयुक्त गोळ्या-औषधे, जीवनसत्त्वे, एरिथ्रोमायसीन, पॅराअमायनो सॅलीसिलीक अॅसीड आदी औषधे मात्र जेवणानंतर किंवा जेवताना घ्यावीत. औषधांमुळे जठराच्या आवरणावर दाह निर्माण होऊन आम्लनिर्मिती वाढते. त्यामुळे मळमळ, उलट्या आदी त्रास होण्याची शक्यता असते. जेल्यूसीलसारख्या गोळ्या पोट रिकामे असताना घेतल्यास त्यांचा चांगला परिणाम दिसून येतो.


औषधांबाबत एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी. प्रत्येक औषध प्रत्येक माणसाप्रमाणेच वेगळे असते. त्यामुळे ते केव्हा, कसे घ्यायचे याची डॉक्टरांकडून माहिती घ्यावी आणि मगच त्यांचा उपयोग करावा. कारण एक लक्षात ठेवा की, औषध आणि विष यांच्यात फक्त देणाऱ्याच्या हेतूचाच फरक असतो!


*डॉ. जगन्नाथ दीक्षित*

*डाॅ. अंजली दीक्षित*

यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज'या पुस्तकातून


स्त्रोत- विज्ञान व दिनविशेष फेसबुक पेज

═══════════════════════

एनिमा म्हणजे काय


══════════════════════

   *📒📒📒 @ संकलन @📒📒📒*

  गजानन गोपेवाड 

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════

📕 *'एनिमा म्हणजे काय ?* 


शौचास होत नसेल, तर कधी रुग्णास शस्त्रक्रियेपूर्वी पोट साफ होण्यासाठी गुदद्वाराच्या मार्गाने काही औषधी मोठ्या आतड्यात सोडतात, यास 'एनिमा' असे म्हणतात. जेवणात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश नसल्यास व आहार समतोल नसल्यास बद्धकोष्ठाचा त्रास होतो. कधी कधी मळाचे खडेही तयार होतात. लहान मुलांना संडास होत नसेल, तर कागदाची पुंगळी करून त्याला सावण लावून ती गुदद्वारात सारल्यास संडास होते किंवा गोडेतेल सोडल्यासही मळाचे खडे सुटतात व न दुखता संडास होते. संडास होत नसल्यास पोटातून औषध घेण्यापेक्षा गुदद्वारातून उपचार करणे सोयीचे ठरते. 


एनिमामध्ये पाव लिटर, अर्धा लिटर साबणाचे पाणी रबरी नळीच्या साहाय्याने व्यक्तीच्या गुदद्वारातून आत सोडतात. नंतर मळाचे खडे सुटून संडास होते. विष्ठा गोळा करण्यासाठी भांड्याची सोयसुद्धा असते. आयुर्वेद चिकित्सापद्धतीमध्ये गुदद्वारावाटे औषधी प्रविष्ट करून चिकित्सा केली जाते. हथा चिकित्सेस बस्ती चिकित्सा म्हणतात. मळास बाहेर काढणे याशिवाय इतर अनेक व्याधींची चिकित्सा, औषधी काढे व तेल गुदद्वारावाटे देऊन केली जाते. एनिमाचा वापर वारंवार करण्यापेक्षा आहारात योग्य ते बदल घडवून आणणेच आरोग्यपूर्ण जीवनाच्या दृष्टीने चांगले.


*डॉ. जगन्नाथ दीक्षित*

*डाॅ. अंजली दीक्षित*

यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज'या पुस्तकातून


स्त्रोत- विज्ञान व दिनविशेष फेसबुक पेज

═══════════════════════

  

सुक्ष्म दर्शक यंत्र कसे कार्य करते


══════════════════════

   *📒📒📒 @ संकलन @📒📒📒*

गजानन गोपेवाड 

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════

🔬 *सूक्ष्मदर्शक यंत्र कसे कार्य करते ?* 🔬 


जीवशास्त्राचे प्रयोग दाखवताना तुम्हाला सरांनी सूक्ष्मदर्शक यंत्र दाखवले असेलच. सूक्ष्मदर्शक यंत्रातून पहिल्यावर पेशी किंवा इतर सूक्ष्म जीव कित्येक पटीने मोठे असलेले आपल्याला दिसतात. हे कसे होते ते आता पाहू. साधे काचेचे भिंग घ्या. त्या भिंगातून वर्तमानपत्रातील अक्षरांकडे पाहा. अक्षरे मोठी झालेली दिसतात. सूक्ष्मदर्शक यंत्र याच तत्त्वावर काम करते. सूक्ष्मदर्शक यंत्रांमध्ये भिंगे अशा प्रकारे बसवलेली असतात की त्यांच्या एकत्रित परिणामांमुळे आपल्याला वस्तू हजारो पट मोठ्या दिसतात.

पेशी, सूक्ष्म जीवजंतू आपल्याला नुसत्या डोळ्यांनी दिसू शकत नाहीत. कारण त्यांचे मोजमाप १ मी.मी. च्या हजाराव्या भागाच्या प्रमाणात केले जाते. विषाणू तर याहूनही लहान असतात. त्यामुळे हजारो पट मोठे केल्यानंतरच हे जीव वा पेशी आपल्याला दिसू शकतात. पेशी व सूक्ष्म जीवजंतुच्या परीक्षणामुळे रोगाची अवस्था समजते आणि व्यक्ती रोगी आहे का ते कळते. रोग बरा होतो आहे काय तेही समजते. क्षयरोग, हिवताप, कुष्ठरोग, कॉलरा, हगवण आदी रोगांमध्ये तसेच रक्तक्षय, रक्ताचा कर्करोग, इतर कर्करोग यातदेखील सूक्ष्मदर्शकद्वारे केलेल्या तपासणीमुळे रोगाचे निदान होते व उपचार करण्यास मदत होते.


असे हे सूक्ष्मदर्शक यंत्र म्हणजे सूक्ष्म जीवांच्या अजब गुहेत प्रवेश करण्यासाठी मानवाला लाभलेला जादूचा दिवाच बनले आहे.


*डॉ. जगन्नाथ दीक्षित*

*डाॅ. अंजली दीक्षित*

यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज'या पुस्तकातून


स्त्रोत- विज्ञान व दिनविशेष फेसबुक पेज

═══════════════════════

भक्ती म्हणजे काय?

 *भक्ती म्हणजे*


किती साधी सोपी सरळ

  व्याख्या आहे पहा➖


भक्ती जेंव्हा *"अन्नात"* शिरते तेंव्हा तीला *"प्रसाद"*

म्हणतात

आणि भक्ती जेंव्हा *"भुकेत"* शिरते तेंव्हा तीला *"उपवास"* असे म्हणतात


भक्ती जेंव्हा पाण्यात शिरते तेंव्हा तीला *"तीर्थ"* म्हणतात

आणि भक्ती जेंव्हा *"प्रवासाला"* निघते तेंव्हा तीला *"यात्रा"* असे म्हणतात


भक्ती जर का *"संगीतात"* शिरली तर तीला  *"भजन / कीर्तन"* म्हणतात

आणि हीच भक्ती जर का   लोकसंगीतात  शिरली तर तीला  *"भारूड"* असे म्हणतात


भक्ती जेंव्हा *"माणसात"* प्रकटते तेंव्हा *"माणूसकी"* निर्माण

होत

आणि हीच भक्ती जर *"घरात"* शिरली तर त्या घराचे *"मंदिर"* होते 


भक्ती जर का शांतपणे *"मनाच्या गाभाऱ्यात"* शिरली तर त्याला *"ध्यान"* म्हणतात

 आणि भक्ती जर का *"कृतीत"* उतरली तर तिला *"सेवा"* असे म्हणतात

11 जुलै प्रभात दर्शन

 🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🌻🦢🛕🦢🌹🦚🦋

अषाढ़ मास,शुक्ल पक्ष, *प्रथम*,पुष्य नक्षत्र,सूर्य उत्तरायण,ग्रीष्म ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

रविवार - ११ जुलै  २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                         *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

          *वर्षा के समय सारे पक्षी आश्रय की तलाश करते है किन्तु बाज़ बादलों के ऊपर उड़कर वर्षा की ही उपेक्षा कर देता है। समस्याए सबकी सामान्यतः एक जैसी ही है, लेकिन हमारा दृष्टिकोण ही इनमें भेद उतपन्न करता है।*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


11 जुलै जागतिक लोकसंख्या दिवस

 ********************************

*११ जुलै - जागतिक लोकसंख्या दिवस*

********************************


आज ११ जुलै..! 

जागतिक लोकसंख्या दिवस !


झपाट्याने वाढणार्‍या लोकसंख्येमुळे अन्न,वस्त्र,निवारा,दारिद्रय़,बेकारी आणि रोगराई असे अनेक प्रश्न उद्भवू लागले आहेत. महत्त्वाचे म्हणजे देशाच्या प्रगतीला लोकसंख्या ही बाब अडसर ठरत आहे. ही लोकसंख्या आटोक्यात आणण्यासाठी शासनस्तरावर सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. आज जागतिक लोकसंख्या दिनाच्या दिवशी हेच संकल्प करणे उचित ठरेल.


जगातील वाढत्या लोकसंख्येच्या समस्यांविषयी लोकांच्या मनात जागरुकता निर्माण  करण्यासाठी दरवर्षी ११ जुलैला जागतिक लोकसंख्या दिन साजरा केला जातो. लोकसंख्या वाढीचे दुष्परिणाम सर्वत्र जाणवत आहेत. याविषयी जनजागृतीची गरज निर्माण झाली आहे.


लोकसंख्या ही समस्या उग्र रुप धारण करीत असल्याने विकासकामांना खीळ बसत आहे. लोकांना मूलभूत गरजा देतानाही कसरत करावी लागत आहे. मुलगाच हवा यासाठी तीन-चार अपत्यांना जन्म दिला जातो. अशिक्षित महिला असलेल्या कुटुंबात लोकसंख्या वाढीची बीजे दिसून येतात. हे सर्वे क्षणात दिसून आले आहे. यासाठी हे रोखणे गरजेचे आहे.


आज वाढत्या लोकसंख्येमुळे एकीकडे गाडी,बंगला अशी एैशोआरामाची जीवनपध्दती तर दुसरीकडे दारिद्रय़,एक वेळची भूक भागविण्याची धडपड,असे आजचे चित्र दिसते.ही स्थिती बदलण्यासाठी लोकसंख्या नियंत्रण हाच एकमेव उपाय आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.


१९५० साली जगाची लोकसंख्या २५० कोटी होती. ११ जुलै १९७८ साली युगोस्लाव्हिया येथे मुलाचा जन्म होऊन जगाची लोकसंख्या ५०० कोटी झाली.तेव्हापासून ११ जुलै हा दिवस 'जागतिक लोकसंख्या दिन' म्हणून पाळता जातो. जॉन ग्रँट यांना लोकसंख्याशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाते.तर जनगणनेचा जनक म्हणून सर डेजिल इबेटसन यांना ओळखले जाते.


  देशात ‘अच्छे दिन’ आणण्यासाठी प्रथम लोकसंख्या वाढ आटोक्यात आणणे आवश्क आहे. लोकसंख्या वाढीचा सर्व बाबींवर परिणाम होत असून यामुळे विकासास खीळ बसते. लोकसंखवाढीमुळे सर्वाना मूलभूत गरजा पुरविणेही अवघड बनले आहे. 


देशात १३५ कोटी लोकसंख्या वास्तव करते.आज जगात भारत हा लोकसंख्येबाबात अव्वल क्रमांकावर आहे.चीनला देखील भारत मागे टाकण्याच्या दृष्टीने मार्गक्रमण करीत आहे.मात्र ही बाब खूप चिंताजनक आहे.ही लोकसंख्या वाढ आटोक्यात आणण्यासाठी सर्वाचा सहभाग आवश्यक आहे. त्याशिवाय चांगले दिवस येणार नाहीत.

*🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏*

******************************

संकलन -)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

प्रभात दर्शन

 🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

अषाढ़ मास,शुक्ल पक्ष, *द्वितीय*,अश्लेषा नक्षत्र,सूर्य उत्तरायण,ग्रीष्म ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

सोमवार, १२ जुलै २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                         *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

        *"विपत्ति काल में ईश्वर को दोष नही देना चाहिए, अपितु यह समझना चाहिए कि यह कर्मो का फल है। हम जैसा कर्म करते है, वही हमें भोगना पडता है। उसमें ईश्वर हस्तक्षेप नहीं करता। किन्तु उसके स्मरण से दुःख का अनुभव कम अवश्य हो जाता है। कष्ट देकर वह हमारे धैर्य की परीक्षा लेता है। साथ ही परम-प्रभु हमें सचेत करता है कि शुभ कर्म करो ।"*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*श्री जगन्नाथ जी रथ यात्रा*



एक आठवण शिवरायांची 12 जुलै1660 वीर शिवा काशीद

 *🚩एक आठवण शिवरायांची🚩*

*१२  जुलै इ.स.१६६०* 

*"वीर शिवा काशिद बलिदान दिन"* 

पन्हाळगडाला "सिद्दी मसूद" याने घातलेल्या वेढ्यातून निसटण्यासाठी "शिवा काशिद" नावाचा मावळा हा छत्रपती शिवरायांचा पेहराव करून पालखीतून निघाला.पण तो पकडला गेला आणि ठार झाला. नावाने "शिवा काशिद" असणारा हा मावळा मरताना "शिवाजी राजा" म्हणून मारला गेला.

यासारखं मोठ भाग्य ते काय!

धन्य तो *"वीर शिवा काशिद".*

१२ जुलै १६६० ची रात्र होती. 

दोन पालख्या तयार केल्या. शिवा काशीद निर्धाराने एका पालखीत आणि शिवराय दुसऱ्या पालखीत बसले. शिवरायांची पालखी अडचणीच्या वाटेने निघाली आणि शिवा काशीदची पालखी पन्हाळगडाच्या मुख्य दाराने निघाली.

शिवराय निसटले,अशी ओरड होताच जौहरच्या सैनिकांनी रातोरात शोधाशोध सुरू केली. त्यांना एक पालखी पळविताना दिसली. त्या पालखीला पकडले व पडदा बाजूला केला..शिवा काशीद हा हुबेहुब शिवरायासारखा दिसत होता. त्यामुळे सिद्दि जोहरला वाटले कि हाच शिवाजी ! म्हणुन त्याने व त्याच्या सरदारांनी शिवा काशीदला पकडले व हे शिवराय नाहीत असे कळताच जोहर म्हणतो कसा ‘शिवा काशीद आता तु मरणाला तयार हो’.ते ऐकुन शिवा काशीद म्हणाला ‘शिवाजीराजे आता सुखरुप् वेढयातुन सुटले असतील.आता मी सुखाने मरण्यास तयार आहे’.तसेच शिवरायासाठी हजारदा मरण्यास मी सुखाने तयार आहे’. हे ऐकुन जोहरने त्याचे शिर कापुन टाकले आत शिवा काशीद पालखीचा गोंडा धरून रुबाबात बसलेला. मात्र, ते शिवराय नसून शिवा काशीद आहे हे लक्षात येताच सिद्दी जौहरने शिवा काशीदच्या छातीत समशेर खुपसली. स्वराज्यासाठी शिवा काशीद यांनी असे अतुलनीय बलिदान केले. वीर शिवाजी काशीद यांना त्रिवार मानाचा मुजरा...

*********************************

संकलन -)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

Featured Post

व्यायाम व योगा अवश्य करावा*

*व्यायाम व योगा अवश्य करावा*  *व्यायाम व योगा करण्याचे दहा फायदे:-*  1) व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते: व्यायाम करणारी...