गुरुवार, १० जून, २०२१

विद्युत चुंबकीय शोध एँम्पीयर

 *⚡⚡⚡आंद्रे-मरी ॲंपियर⚡⚡⚡*

⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡

*विद्युत चुंबकीयत्वाचा शोध*

🧲🧲🧲🧲🧲🧲🧲🧲🧲🧲🧲

*स्मृतिदिन - १० जुन १८३६*


 जन्म -) २० जानेवारी १७७५ 

 मृत्यू  -)  १० जून  १८३६

   

      आंद्रे-मरी ॲंपियर हा फ्रांसचा भौतिकशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ होता.


  याने विद्युतचुंबकीयत्वाचा शोध लावला.सोलेनॉइडआणि इलेक्ट्रिकल टेलीग्राफ सारख्या असंख्य अनुप्रयोगांचे ते शोधक देखील आहेत. ॲंपियर हे फ्रेंच अकॅडमी ऑफ सायन्सेसचे सदस्य आणि इकोले पॉलीटेक्निक आणि कोलेज डे फ्रान्सचे प्रोफेसर होते. विद्युतप्रवाहाच्या एककाला याचे नाव (ॲंपियर) देण्यात आले आहे.


विद्युतप्रवाह तारेतून वाहत असताना तो मोजण्याचे माप म्हणजे अॅम्पिअर (Ampere) होय.हे मोजण्याच्या साधनाला अॅमिटर (Ammeter) असे म्हणतात.फ्रेंच शास्त्रज्ञ आंद्रे ऍम्पीअर याने वीजप्रवाह कसा मोजायचा,ते शोधून काढले. त्याच्याच नावाने हे मोजमाप मग प्रचलित झाले आहे.विद्युत प्रवाह वाहतो म्हणजे तारेतील इलेक्ट्रॉन एका दिशेने वाहत असतात.विजेचा दिवा लावला असताना त्याच्या तारेतून एका सेकंदाला तीन मिलियन मिलियन मिलियन इतके इलेक्ट्रॉन वाहतात.एक मिलियन म्हणजे एक दशलक्ष.आकडा बरोबर लिहिण्यासाठीसुद्धा मिनिटभर लागेल.मग हे सारे सोप्या शब्दात व्यक्त करण्यासाठी आपण विद्युतप्रवाह अँपिअरध्ये मोजतो.याचा उच्चार थोडक्यात अँप असाही करतात.एक अँपिअर म्हणजे दर सेकंदाला ६ मिलियन मिलियन मिलियन इलेक्ट्रॉनचा प्रवाह होय.

अॅमिटरने जेव्हा विद्युतप्रवाह मोजतात,तेव्हा हा अॅमिटर विजेच्या 'सर्किट'मध्ये जोडला जातो. त्यावरचा काटा किती वीजप्रवाह वापरला जात आहे,हे तात्काळ दर्शवतो.घरगुती वापरासाठी आपण अर्धा ते पाच अँपिअरचा वीजप्रवाह वापरत असतो.इस्त्री,विजेची शेगडी, पाणी तापवायचा गिझर यांन जास्त वीजप्रवाह लागतो.तर विजेचे दिवे,ट्यूबलाइट,पंखे यांना जेमतेम अर्धा ते एक अँपिअरचा प्रवाह लागतो.विजेचा प्रवाह जितका जास्त लागणार असेल तितकी विजेच्या तारांची जाडी वाढवावी लागते.एखाद्या कारखान्याच्या विजेच्या तारा घरातील तारांपेक्षा किती जाड असतात,ते लक्ष देऊन बघण्यासारखे असते.वीजप्रवाहाचा एक महत्त्वाचा गुणधर्म हा की त्यामुळे चुंबकसूची हलते म्हणजे चुंबक क्षेत्र निर्माण होते.दुसरा महत्त्वाचा गुणधर्म हा की वीजप्रवाहाने उष्णता निर्माण होते.जितका वीजप्रवाह जास्त तितकी त्याची उष्णता निर्माण करण्याची शक्ती वाढत जाते.वेल्डिंग मशीनमधील पन्नास ते तीनशे ॲम्पिअरचा प्रवाह धातु वितळवण्याइतकी सुद्धा उष्णता निर्माण करू शकतो.

संकलन -)

गजानन गोपेवाड राज्य समन्वयक महाराष्ट्र 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

प्रभात दर्शन

 🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

वैशाख मास,कृष्ण पक्ष, *अमावस्या*,रोहिणी नक्षत्र,सूर्य उत्तरायण,ग्रीष्म ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

गुरुवार, १० जून २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                         *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


श्लोकेन वा तदर्धेन

              तदर्धार्धाक्षरेण वा।

अबन्ध्यं दिवसं कुर्याद

              दान अध्ययन कर्मभिः॥


*भावार्थ:- एक भी दिन ऐसा व्यतीत नहीं होना चाहिए जिसमें एक श्लोक, आधा श्लोक, चौथाई श्लोक या श्लोक का केवल एक अक्षर भी नहीं सीखा गया हो तथा दान, अभ्यास या कोई पवित्र कार्य नहीं किया गया हो।"*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


आनंद प्राप्ती

 *आदर्श जीवन जगण्यासाठी*


☞ (०१) चूक झाली तर मान्य करा.

☞ (०२) समोरच्याचे मत विचारात घ्या.

☞ (०३) चांगल्या कामाची स्तुती करा.

☞ (०४) आभार मानायला विसरू नका.

☞ (०५) मी ऐवजी आपण शब्द प्रयोग करा.

☞ (०६) सतत हसतमुख रहा.

☞ (०७) दुसऱ्यातील चांगले गुण ओळखा.

☞ (०८) कुणाच्याही व्यंगावर हसु नका.

☞ (०९) स्वतःची कुवत व ताकद ओळखा.

☞ (१०) टिका तक्रार यात वेळ घालवु नका.

☞ (११) कृती पुर्व विचार करा.

☞ (१२) लोकांच्या खांद्यावर अपयश लादू नका.

☞ (१३) क्रोधावर नियंत्रण ठेवा.

☞ (१४) मैत्री भावना कायम मनी राहु द्या.

☞ (१५) नेहमी सत्याची कास धरा.

☞ (१६) इतरांना चांगली वागणूक द्या.

☞ (१७) विचार करून बोला.

☞ (१८) सुखाचा गुणाकार व दुखाचा भागाकार करा.

☞ (१९) वाहन चालवताना स्वतःची काळजी घ्या व फाजील आत्मविश्वास टाळा.

☞ (२०) कामापुर्ती मैत्री ठेउन खरी मैत्री गमाऊ नका.

कुटुंब  टिकवणे का महत्वाचे आहे ,,,,

आज परत एकदा नकळत

मुंगी तळ्यात पडली

स्वतःला वाचविण्यासाठी 

झाडाचं पान आणि कबुतराची

वाट पाहू लागली

 मीच का सतत हिला वाचवावे हा कबुतराचा अहंकार आड आला 

झाडावरच बसून 

असहाय मुंगीला मरताना पाहू लागला

 कबुतराने मदत करावी म्हणून मुंगी जिवाच्या आकांताने ओरडली

 कबुतर आपल्याच विचारात मश्गुल

 मुंगी असहायतेमुळे गतप्राण झाली

कबुतर आपल्याच गर्वात गढून गेलं

 पारधी येणार हेच विसरून गेलं

पारध्यानेही याच संधीचा फायदा घेतला कारण प्रत्येक वेळेला निशाना साधल्यावर मुंगी पायाला चावायची आणी निशाना चुकायचा म्हणुन मुंगीच्या अनुपस्थितीत डाव साधला

कबुतर आणि मुंगी दुर्दैवीपणाने गेले. 

【झाड मात्र त्या दिवशी खूप रडले.】

 *मुंगी, कबुतर मेल्याचं दुःख होतंच. पण त्याहूनही परोपकाराची भावना मेल्याचं होतं.*


_मित्रांनो कोणाला कोणाची कधीही गरज किंवा मदत लागते.

अहंकार नाशाकडे नेतो तर सेवा ही आनंदी जीवनाचे सार्थक ठरते.


*सर्वांशी प्रेमाने वागा व सर्वांकडून प्रेम मिळवा...🤝🏻*

*हा जन्म पुन्हा नाही...😊* 

विनाकारण कोणाला त्रास देऊ नका .आज वेळ व आपला रुबाब आहे म्हणून कोणाचे नुकसान होईल असे वागू नका आपल्या सत्तेचा गैरवापर करू नका🙏🙏

कृपया वेळ काढून नक्की वाचा.

 *निसर्गाने* आपल्या शरीराची रचनाच अशी केलेली आहे की ....


👉 आपण स्वतःची पाठही थोपटू शकत नाही आणि 

👉 स्वतःला लाथही मारू शकत नाही.

म्हणूनच.. माणसाच्या जीवनात

*"हितचिंतकांची"* आणि

*"निंदकांची"* आवश्यकता आहे....


आयुष्यात असे लोक जोडा,

जे वेळ येईल तेव्हा तुमची *सावली* अन् वेळेला तुमचा *आरसा* बनतील,........


कारण आरसा कधी खोटे बोलत नाही आणि सावली कधी साथ सोडत नाही.


🐾

👄बोलायच्या आधी….❕

👂ऐकायला शिका............❗

🎁खर्च करायच्या आधी….❕

💰कमवायला शिका.......❗

📝लिहायच्या आधी ……❕

😇 विचार करायला शिका....❗

हार मानण्याआधी.....❕

👉 प्रयत्न करायला शिका

आणि मरायच्या आधी .....❗

👉 जगायला शिका......❕


 👉 जीवनात एवढ्याही चुका करू नका,

कि पेन्सिलच्या अगोदर रबर संपून जाईल 

आणि .... रबराला एवढाही वापरू नका, कि जीवनाच्या अगोदर कागद फाटून जाईल.


🌞 जीवन जगताना संगत ही खुप महत्वाची आहे.....

     

आपलं "वय" व "पैसा" यांच्यावर कधीच गर्व करू नये, कारण ज्या गोष्टी "मोजल्या" जातात त्या नक्कीच संपत असतात ...


*" मृत्यु नंतरचं हेच कटु सत्य"*


1:-"पत्नी " दरवाजा पर्यंत

2:-"समाज" स्मशाना पर्यंत

3:-"पुत्र" अग्निदाना पर्यंत


      फक्त आणी फक्त  

              *"कर्म"*

        शेवट l पर्यंत


जिच्या उदरात जन्म होतो ती *माता,*

आणि जिच्या उदरात अस्त होतो ती *माती.*

यातील वेलांटीचा फरक

म्हणजेच माणसाचे जीवन......


*नक्की वाचा*


*जन्म* : दूस-याने दिला ...

*नाव* : दूस-याने ठेवलं ...

*शिक्षण* : दूस-यांनी दिलं ...

*रोजगार* : दूस-यांनीे दिला ...

*इज़्ज़त* : दूस-यांनी दिली ...

*पहीली आणि शेवटची आंघोळ सुद्धा* :  दुसरेच घालणार ...

*मरणानंतर संपत्ति* : दूसरेच वाटुन घेणार ...

*आणि स्मशानभूमीत*: दूसरेच घेऊन जाणार...


तरी देखील संपुर्ण आयुष्यभर माणसाला कोणत्या गोष्टीचा *गर्व* असतो... हे सांगणं मात्र कठीणच !!!

 *दु:ख* इतकं नशीबवान आहे की ज्याला प्राप्त करून लोक...

आपल्या माणसांना *आठवतात*.


*धन* इतकं दुर्दैवी आहे की

ज्याला मिळवून लोक नेहमी...

आपल्या माणसांना *विसरतात*.


किती विचित्र आहे ना...??


माणसाच्या शरीरात ७०% पाणी आहे, 

पण जखम झाली की रक्त येतं....

आणि

माणसाचे हृदय रक्ताचे बनलेले असून 

हृदय दुःखावलं की डोळ्यातून पाणी येतं.                            

चांगले मॅसेज नेहमी जास्तीत जास्त शेयर करा..

मनाला खुप वेगळा *आनंद* मिळेल.


💫💫 *खुपच सुंदर लेख आहे त्यामुळे मी तो तुमच्यापर्यंत पाठवला तुम्हीही इतर ग्रुप वर send करा* 💫💫

*

🙏🙏 आपलाच शुभचिंक गजानन गोपेवाड राज्य समन्वयक महाराष्ट्र 🙏🙏



बुधवार, ९ जून, २०२१

जखमेतील विष तोंडाने सोषन केले तर विष ऊतरते का


══════════════════════

  संकलन गजानन गोपेवाड 

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════

📕 *जखमेतील विष तोंडाने शोषून घेतले, तर विष उतरते का ?* 📕


अनेक चित्रपटात तुम्ही असे दृश्य बघितले असेल. विष शोषण्याचे 'पवित्र' काम कधी नायक, तर कधी नायिका करते एवढाच काय तो फरक ! चित्रपटातील अशी दृश्ये पाहून खरोखरच कोणी असे करायचा प्रयत्न केला, तर काय होईल बरे?


सापाच्या विषाचा प्रभाव कमी करण्यासाठी शरीरातील त्याचे प्रमाण जमेल त्या प्रकारे कमी करणे हिताचे ठरते. यात हात व पायाला हृदयाच्या बाजूला आवळपट्टी बांधणे, व्यक्तीस हालचाल करू न देणे, दंशाच्या जानी निर्जंतुक केलेल्या ब्लेडने छेद घेऊन तेथील रक्त काढणे व जखम साफ करणे अशा उपायांचा समावेश होतो. विष यांत्रिक पंपाच्या साहाय्याने शोषून घेता येते किंवा तोंडात जखम वा व्रण नसतील, तर तोंडानेही शोषून घेता येते, पण शोषून घेतल्याने केवळ २०% इतकेच विष शरीराच्या बाहेर येते. ते सुद्धा सर्पदंशानंतर ३० मिनिटांत विष शोषून घेतले तरच! शोषून घेण्यापूर्वी सर्पदंशाच्या जागी ब्लेडने छेद देणे अत्यंत आवश्यक असते. नुसत्या सर्पदंशाच्या जखमेतून विष तोंडाने शोषून घेता येत नाही. शरीराच्या ज्या भागावर आवळपट्टी बांधता येत नाही, तेथील विष काढून टाकण्यासाठी जखमेवर छेद घेऊन शोषण्याचा उपयोग होतो.


विष शोषून घेणाऱ्या व्यक्तीने त्याच्या तोंडाला जखम झालेली नाही, याची खात्री करून घ्यावी; नाहीतर त्याला विषबाधा होऊ शकेल. साप चावल्यानंतर सर्वोत्तम उपाय म्हणजे सर्पासाठीचे प्रतिविष देणे. बाकीचे उपाय करण्यात जास्त वेळ न दवडता तात्काळ अशा रुग्णाला दवाखान्यात न्यायला हवे.


एव्हाना तुमच्या लक्षात आले असेलच की, साप चावल्यानंतर आवळपट्टी बांधावी, जखमेवर शक्य असल्यास ब्लेडने छेद देऊन काही रक्त काढून टाकावे आणि रुग्णाला तात्काळ दवाखान्यात न्यावे. नायकांसारखे विष शोषून घेण्याचा पराक्रम अगदीच आवश्यकता असल्याशिवाय करू नये हेच बरे!

 

*डॉ. जगन्नाथ दीक्षित*

*डाॅ. अंजली दीक्षित*

यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज'या पुस्तकातून


स्त्रोत- विज्ञान व दिनविशेष फेसबुक पेज

═════════════

रेल्वे इंजिन चा जनक जाँर्ज स्टिफेनसन

 *🚂🚂🚂जार्ज स्टीफेन्सन🚂🚂🚂*

🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂

             *रेल्वे इंजिनचे जनक*

🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂

      *जन्मदिन - ९ जुन १७८१*


       जॉर्ज स्टीफेन्सन यांचा जन्म ९ जून,१७८१ रोजी बब्रिटनमध्ये विलेम शहरात झाला होता.

जॉर्ज स्टीफनसन  मेकॅनिकल अभियंता होता जो स्टीम लोकोमोटिव्हज शोधण्यासाठी ओळखला जात होता.त्याच्या शोधामुळे औद्योगिक क्रांतीसाठी आवश्यक असलेल्या वस्तू आणि प्रवाशांची वाहतूक संपूर्ण ठिकाणी झाली. त्याच्या शोधामुळे युरोपमध्ये एक चांगला बदल घडून आला.

जॉर्ज स्टीफनसन या ब्रिटिश इंजिनियरचा जन्म सन १७८१ मध्ये एका निरक्षर कुटुंबात झाला. त्याला लहानपणी शाळेत जायची संधी मिळाली नाही. 

वयाच्या अठराव्या वर्षी तो कोळशाच्या खाणीत मजूर म्हणून नोकरीला लागला. त्यानंतर त्याने रात्रीच्या शाळेत जाऊन शिक्षण घेतले, तसेच स्वतःच्या हुषारीने खाणींमधील सर्व यंत्रे कशी चालतात हे उत्तमरीत्या समजून घेऊन तो त्यांची दुरुस्ती करण्यात प्रवीण झाला आणि मालकांच्या मर्जीतला झाला. त्याला नवीन कामे करण्याची संधी मिळाली. त्या काळात नव्याने निघालेल्या वाफेच्या इंजिनांवरून प्रेरणा घेऊन त्याने सन १८१४ मध्ये प्रथम एका कोळशाच्या खाणीसाठी एक इंजिन तयार केले. त्यानंतर त्याने अनेक सुधारणा करून एकाहून एक वरचढ अशी नवनवी इंजिने तयार केली.  सन १८२५ मध्ये त्याने तयार केलेल्या लोकोमोशन नावाच्या इंजिनावर चालणारी जगातली पहिली सार्वजनिक रेल्वे सेवा सुरू झाली.  त्यानंतर त्याने सन १८३० मध्ये रॉकेट नावाचे इंजिन तयार केले, स्वतःची कंपनी सुरू केली आणि रेल्वे इंजिने पुरवायला तसेच रेल्वे लाइनी बांधायला सुरुवात केली. लवकरच इंग्लंडशिवाय युरोप आणि अमेरिकेतसुद्धा स्टीफनसनची इंजिने धावायला लागली.


यावरून असे दिसते की एकोणीसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातले अनेक इंजिनियर वाफेवर चालणारे फिरते इंजिन तयार करण्याचा प्रयत्न करीत होते. रुळावरून चालणाऱ्या पण घोडे जुंपलेल्या गाड्या त्याच्याही आधीच सुरू झाल्या होत्या, पण त्या मुख्य करून खाणींमध्ये किंवा कारखान्यांमधले जड सामान वहाणाऱ्या मालगाड्या होत्या. घोड्यांच्या जागी वाफेवर चालणारे स्वयंचलित इंजिन लावले तर ते जास्त शक्तीशाली असेल, अधिक काम करेल आणि फायद्याचे ठरेल या विचाराने हे सगळे प्रयत्न चालले होते आणि त्यांना थोडे थोडे यश येतही होते.  जॉर्ज स्टीफनसन याने या इंजिनांमध्ये चांगले क्रांतिकारक बदल घडवून आणले. ती इंजिने आकाराने सुटसुटीत झाली, ती सुरळीत, सुरक्षित आणि खात्रीपूर्वक काम करायला लागली. त्यामुळे प्रवाशांना घेऊन जाणारी सार्वजनिक रेल्वे वाहतूक सुरू करणे शक्य झाले. पहिल्या अशा सेवेचे यश पाहून इंग्लंडमध्ये देशभर रेल्वे कंपन्या निघाल्या आणि पुढे लवकरच रेल्वेचे जाळे जगभर पसरले.  यामुळे जॉर्ज स्टीफनसन इतक्या मोठ्या प्रकाशझोतात आला की त्यानेच रेल्वे इंजिनाचा शोध लावला असे म्हणून त्याचेच नाव घेतले जाऊ लागले आणि आजही त्यालाच रेल्वेचा जनक मानले जाते.

*====================*

संकलन-)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

प्रभात दर्शन


 🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

वैशाख मास,कृष्ण पक्ष, *चतुर्दशी*,कृतिका नक्षत्र,सूर्य उत्तरायण,ग्रीष्म ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

बुधवार, ०९ जून २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                         *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


महाजनस्य संसर्गः 

                कस्य नोन्नतिकारकः।

पद्मपत्रस्थितं तोयं 

                धत्ते मुक्ताफलश्रियम्॥


*भावार्थ:- महान व्यक्तियों की संगति किसे उन्नति प्रदान नहीं करती? अर्थात जिस प्रकार कमल के फूल पर पड़ी पानी की बूंद भी मोती के समान दिखने लगती है, उसी प्रकार सज्जन व विद्वान व्यक्तियों की संगति से सर्वांगीण उन्नति होती है।*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

मंगळवार, ८ जून, २०२१

चेहर्‍यावर सुरकत्या का पडतात


═════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════

📙 *म्हाताऱ्या लोकांच्या चेहऱ्यावर सुरकुत्या का पडतात ?* 📙 


वृद्धावस्था आली की माणसात अनेक बदल होतात. डोक्यावरचे केस गळायला लागतात व टक्कल पडते. तोंडातील दात हलायला लागतात व नंतर तोंडाचे बोळके होते. बोटांना कंप सुटतो, दृष्टी अधू होते, उत्साह कमी होतो. अशा या बदलांमुळे व्यक्ती चिडचिडी होते. त्यात भर म्हणजे विस्मरणही व्हायला लागते. त्यामुळे वृद्धत्व म्हणजे एक रोग असे वाटायला लागते.


चेहऱ्यावर सुरकुत्या का पडतात, याविषयी माहिती घेऊ. त्वचेखाली स्नायूंच्या आकुंचन व प्रसरणाच्या दिशेने काटकोनात त्वचेची हालचाल होत असल्याने त्वचेच्या वारंवार घड्या पडतात. व तेथे नंतर सुरकुत्या पडतात. चेहऱ्याच्या त्वचेखाली इतर शरीराच्या त्वचेखाली असणारा जाडसर थर (deep fascia) नसतो व स्नायू व त्वचेचे थर एकमेकांत जखडलेले असतात. त्यामुळेही त्वचेवर जास्त ताण येतो व सुरकुत्या पडतात.


 दुसरे म्हणजे त्वचेखालील मेद पदार्थांचे प्रमाण कमी होते. साहजिकच त्वचा सैल व ढिली होते. तिसरे म्हणजे स्नायूंमधील ताण वयोमानानुसार कमी होतो. त्यामुळे त्वचेमध्ये खोवले जाणारे स्नायू शिथिल होतात व त्वचाही सैल होते. सर्व इंद्रियांवर त्वचेची जीवनशक्ती कमी झालेली असते. त्यामुळे या त्वचेची लवचिकता कमी होऊन ती सैल पडते. या सर्व गोष्टींमुळे सैल पडलेल्या त्वचेवर सुरकुत्या पडतात. तोंडातील दात पडल्याने जबड्याच्या हाडाची झीज झाल्याने चेहऱ्याचा आकारही बदलतो व त्वचा आणखीनच सैल होते. परिणामी वृद्ध व्यक्तींच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात. सुरकुत्या सर्व शरीरावर पडतात परंतु चेहऱ्यावर ती बाब जास्त प्रकर्षाने जाणवते.

 

*डॉ. जगन्नाथ दीक्षित*

*डाॅ. अंजली दीक्षित*

यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज'या पुस्तकातून


स्त्रोत- विज्ञान व दिनविशेष फेसबुक पेज

संकलन गजानन गोपेवाड 


▬▬▬▬▬❚❂❚❂❚❚❂❚❂❚▬▬▬▬▬


इंटरनेटचे जनक टिम बर्नर्स ली

 *📡📡📡टिम बर्नर्स ली📡📡📡*

📡📡📡📡📡📡📡📡📡📡📡

*इंटरनेटचे जनक*

*विश्व व्यापी वेब (www) चे अविष्कारक*

📡📡📡📡📡📡📡📡📡📡📡

*जन्म: ८ जून, १९५५*


सर टीम बर्नर्स ली (जन्म: ८ जून १९५५-हयात) हे जागतिक माहितीजालाचे जनक आहेत. य़ुरोपीयन नाभिकीय सन्शोधन संस्थेत (सर्न) असताना त्यानी २५ डिसेम्बर १९९० रोजी क्लायन्ट सर्वर संवादाचा (जागतिक माहितीजालाच्या सुरळीत कार्यासाठी आवश्यक असणारा घटक) प्रयोग यशस्वी करून दाखविला. ते सध्या वर्ल्ड वाईड वेब कोन्सोर्टियमचे निर्देशक आणि एम आय टी संगणकशास्त्र आणि कृत्रिम बुद्धीमत्ता प्रयोगशाळेत ३ कौम संस्थापक प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.


टिम बरनर्स् ली का जन्म ८ जून, १९५५ को इंगलैंड में हुआ था। माता पिता दोनो गणितज्ञ थे। कहा जाता है कि उन्होने टिम को गणित हर जगह, यहां तक कि खाने की मेज पर भी बतायी।

टिम ने अपनी उच्च शिक्षा क्वीनस् कॉलेज, ऑक्सफ़ोर्ड विश्वविद्यालय से पूरी की। विश्वविद्यालय में उन्हें अपने मित्र के साथ हैकिंग करते हुऐ पकड़ लिया गया था। इसलिये उन्हें विश्वविद्यालय कंप्यूटर का प्रयोग करने से मना कर दिया गया। १९७६ में, उन्होने विश्विद्यालय से भौतिक शास्त्र में डिग्री प्राप्त की।

वेब तकनीक - अविष्कार

सर्न (en:CERN) यूरोपियन देशों की नाभकीय प्रयोगशाला है। टिम १९८४ से वहीं फेलो के रूप में काम करने लग गये। वहां हर तरह के कंप्यूटर थे जिन पर अलग अलग के फॉरमैट पर सूचना रखी जाती थी। टिम का मुख्य काम था कि वे सूचनाये एक कंप्यूटर से दूसरे पर आसानी से जा सकें। उन्हे लगा कि क्या कोई तरीका हो सकता है कि इन सब सुचनाओं को इस तरह से पिरोया जाय कि ऐसा लगे कि वे एक जगह ही हैं। बस इसी का हल सोचते सोचते, उन्होने वेब तकनीक का अविष्कार किया और दुनिया का पहला वेब पेज ६ अगस्त १९९१ को सर्न में बना। निहःसन्देह यह तकनीक, २१ वीं शताब्दी की सबसे लोकप्रिय संपर्क साधन है।

टिम ने इस तकनीक का आविष्कार किया जब वे सर्न में काम कर रहे थे और यह सर्न की बौद्घिक संपदा थी। ३० अप्रैल १९९३ को, टिम के कहने पर सर्न ने इस तकनीक को मुक्त कर दिया। अब इसे दुनिया के लिए न केवल मुफ्त, पर मुक्त रूप से उपलब्ध है। इसके लिए किसी को, कोई भी फीस नहीं देनी पड़ती है। यह निर्णय न केवल महत्वपूर्ण था पर इंटरनेट के शुरवाती दौर के निर्णयो के अनुरूप था जो हर तकनीक को मुफ्त व मुक्त रूप से उपलब्ध कराने के लिये कटिबद्ध थे।

टिम, बाद में अमेरिका चले गये। १९९४ में उन्होने, मैसाचुसेटस् इंस्टिट्युट ऑफ टेकनॉलोजी में विश्व व्यापी वेब संघ (W3C) की स्थापना की। यह वेब के मानकीकरण में कार्यरत है।

सम्मान

टिम बरनर्स् ली को, २००१ में, रॉयल सोसायटी का सदस्य बनाया गया। २००४ में नाईटहुड की उपाधि दी गयी थी। १३ जून २००७ को, ऑर्डर ऑफ मेरिट, इंगलैंड के सबसे महत्वपूर्ण सम्मान से सम्मानित किया गया। यह सम्मान महारानी द्वारा कला, विज्ञान के क्षेत्र में महत्वपूर्ण योगदान के लिये दिया जाता है। इसी लिये टाइम पत्रिका ने उन्हें, २० वीं शताब्दी के १०० महान वैज्ञानिकों और विचारकों में चुना है।


संकलन -)गजानन गोपेवाड

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

प्रभात दर्शन

 🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

वैशाख मास,कृष्ण पक्ष, *त्रियोदशी*,भरणी नक्षत्र,सूर्य उत्तरायण,ग्रीष्म ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

मंगलवार, ०८ जून २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                        *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


          *"ऐसे विश्वासों और सिद्धान्तों को अपनाइये जिनसे लोक कल्याण की दिशा में प्रगति होती हो। उन विश्वासों और सिद्धान्तों को हृदय के भीतरी कोने में गहराई तक उतार लीजिए। इतनी दृढ़ता से जमा लीजिए कि भ्रष्टाचार और प्रलोभन सामने उपस्थित होने पर भी आप उन पर दृढ़ रहें, परीक्षा देने एवं त्याग करने का अवसर आवे तब भी विचलित न हों। वे विश्वास श्रद्धास्पद होने चाहिए, प्राणों से अधिक प्यारे होने चाहिए।"*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~गजानन गोपेवाड 



ब्रह्मानंद म्हणजे काय?

 *" ब्रम्हानंद "* म्हणजे काय।


▪बाप  होण्यापेक्षाही... 

आजोबा/आजी  होण्याचा 

 *आनंद!*


▪नातवंडाच्या  कृपेने  अंगावरील  कपडे 

ओले  झाल्याचा 

 *वत्सल  आनंद* !


आणि


▪त्यांनी  केलेले  हट्ट  पुरविण्याचा  

*गोड  आनंद!*


▪सूनेने, न  मागता  आणून  दिलेल्या  चहाचा 

व  औषध  घेतले  का..? 

या  प्रेमळ  चौकशीचा  

*सात्त्विक आनंद!*


▪वाढदिवसाला,  मुलाने  दिलेल्या  शालीचा....

 *ऊबदार  आनंद* 


▪आपण  कुटुंबाला  हवे  आहोत......

या  भावनेचा  

 *सुप्त  आनंद* 


▪दुपारी  जेवणानंतर  पेपर  वाचता वाचता  

लागलेली  डुलकी ...

 *परमानंद. !*


▪रात्रीची निरव शांतता..

आराम खुर्चीवर डोळे मिटून

पहुडलेल्या क्षणी..

आपली आवडती गझल..

रेडिओने गुणगुणावी...

*स्वर्गीय आनंद!*


▪एखादा लेख किंवा कविता 

आपण पोस्ट करावी..

मित्रांनी त्याला भरभरुन 

दाद द्यावी...

*साहित्यानंद!*


▪मन अशांत असतांना....

देवघरातल्या भजनामुळे

निर्माण होणारा..

*कैवल्यानंद!*


 ▪भेटलेल्या  जुन्या  सवंगड्यांच्या भेटीमुळे होणारा... 

 *अपार  आनंद* 


▪नकारात्मक  विचार  सोडून  दिले  की  मिळणारा.... 

*निर्भेळ  "आनंद"!*


आणि  या  *सर्व  आनंदाची  बेरीज*  *करुन,* ती  मनाच्या  कप्प्यात  साठविली  की, पडल्यापडल्या  लागलेली  *शांत*  *झोप*  म्हणजेच... 

 *"ब्रह्मानंद" !!!*

गजानन गोपेवाड 


    🌹🌹🙏🌹🌹

सोमवार, ७ जून, २०२१

झाडे कविता

 *इवलंसं रोपटं मी*

*तू म्हणालास तर मरून जाईन,*


*ओंजळभर पाणी दे मला*

*आयुष्यभर तुझ्या कामी येईन,*


*दिलं जीवदान मला तर*

*तुला जगायला प्राणवायू देईन,*


*जगवलंस मला तर* 

*तुझ्या देवांसाठी फुलं देईन,*


*फुलवलंस मला तर*

*तुझ्या मुलांसाठी फळं देईन.*


*तळपत्या उन्हामध्ये* 

*तुझ्या कुटुंबाला सावली देईन,*


*तुझ्या सानुल्यांना खेळावया*

*माझ्या खांद्यावर झोका देईन,*


*तुझ्या आवडत्या पाखरांना*

*मायेचा मी खोपा देईन,*


*कधी पडला आजारी तर* 

*तुझ्या औषधाला कामी येईन,*


*झालो बेईमान जरी मी* 

*शेवटी तुझ्या सरणाला कामी येईन.*

        

             *🌿एक रोपटं🌿*


 *🌴🌴झाडे लावा झाडे जगवा*🌴🌴


अँलन ट्युरींग संगणक जनक

 *🖥️🖥️🖥️अॅलन ट्युरिंग🖥️🖥️🖥️*

🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️

*🖥️🖥️आधुनिक संगणकाचा जनक🖥️🖥️*

🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️

*स्मृतिदिन - ७ जुन १९५४*

⌨️🖱️⌨️🖱️⌨️🖱️⌨️🖱️⌨️🖱️⌨️

  आज आपण संगणक शास्त्राचा वापर करून जी काही तंत्रज्ञानामध्ये प्रगती करत आहोत,त्याचे सर्व श्रेय अॅलन ट्युरिंगकडे जाते.आधीच्या काळी, संगणक हा फक्त त्यामध्ये फिड करण्यात आलेल्या गोष्टी करण्यापुरताच मर्यादित होता. त्यासाठीदेखील खूप कष्ट घ्यावे लागत.‘त्या’ काळात अतिशय अशक्यप्राय समजली जाणारी गोष्ट म्हणजे मशीनला विचार करायला लावून,तिच्याकडून एखादे काम करवून घेणे.आणि यात अॅलन यशस्वी झाला होता. अॅलन ट्युरिंगच्या कामाचा,प्रोग्रामिंग भाषा तयार करण्यामध्ये मोठा प्रभाव आहे. एवढेच नव्हे तर आज ‘मानवनिर्मित बुद्धिमत्ता’ (Artificial Intelligence) ही जी संगणकीय शास्त्राची एक शाखा आहे, तिचादेखील अॅलन ट्युरिंगच जनक आहे.गूगलची ‘सेल्फ-ड्रायव्हिंग कार’, मायक्रोसॉफ्टचे ‘कोर्टाना’ (Cortana) आणि अॅपलची‘सिरी’ (Siri) हे वैयक्तिक सहाय्यक (PA) अॅप्, Cleverbot, … हे सर्व याच शाखेचे उपयोजनं आहेत.


अॅलन ट्युरिंगला लहानपासुनच गणित व विज्ञानाकडे नैसर्गिक ओढ होती आणि ‘शेर्बोर्ने पब्लिक स्कूल’मध्ये शिक्षकांचा भर हा साहित्यावर होता.अॅलन ट्युरिंगची गणित आणि विज्ञानाविषयी असलेली आवड हि अभ्यासाच्या बाहेरील होती.

तेव्हा तेथील शिक्षकांनी अॅलनच्या आईला बोलावून, *‘त्याला जर वैज्ञानिक क्षेत्रात कारकीर्द करायची असेल तर तो येथे त्याचा वेळ वाया घालवत आहे.’* असे स्पष्टपणे सांगितले होते.

लहानपणीच ‘कॅल्क्युलस’ (गणिताचा एक प्रकार) न शिकताच तो गणितातील अतिशय कठीण

प्रश्न सोडवत असे.वयाच्या १६व्या वर्षी,त्याची आईन्स्टाईनच्या कामाशी ओळख झाली.तेव्हा आईनस्टाईनच्या सर्व कामाचा स्वतःच अभ्यास करून, त्याने त्याच्या नोट्सदेखील बनवल्या होत्या. 


त्याने लिहिलेल्या प्रबंधाने संपूर्ण तंत्रज्ञान पूर्णपणे बदलणार होते. या प्रबंधामुळेच एक नवीन प्रकारच्या मशीन जन्मास आल्या, त्यांना आपण ‘ट्युरिंग मशीन’ (Turing Machine)

म्हणतो. हि एक काल्पनिक/थेरॉटिकल संगणकीय मशीन आहे कि ज्यामध्ये आधीपासूनच काही नियम सेट केलेले असतात, आणि त्या नियमांनुसार मशीनला दिलेल्या इनपुट पासून एक आउटपुट मिळते.थोडक्यात ‘ट्युरिंग मशीन’ हि एक अशी मशीन आहे ज्यामध्ये आधीपासूनच लॉजिक सेट केलेले असते आणि त्याचा वापर करून डेटा वाचू/लिहू शकतो.


संकलन -)

गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

प्रभात दर्शन

 🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

वैशाख मास,कृष्ण पक्ष, *द्वादशी*,भरणी नक्षत्र,सूर्य उत्तरायण,ग्रीष्म ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

सोमवार, ०७ जून २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                        *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

        *"आर्थिक युद्ध का एक सूत्र है कि किसी राष्ट्र को नष्ट करने का सुनिश्चित तरीका है कि उसकी मुद्रा को खोटा कर देना। और यह भी उतना ही सत्य है कि किसी राष्ट्र की संस्कृति और पहचान को नष्ट करने का सुनिश्चित तरीका है कि उसकी भाषा को ही हीन बना दिया जाए।*

     *यदि विचार भाषा को भ्रष्ट करते है तो भाषा भी विचारों को भ्रष्ट कर सकती है।"*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


बाळ का रडते

 ▬▬▬▬▬❚❂❚

═════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════

📕 *बाळ का रडते ?* 📕


बाळाचे रडणे ऐकले की आपल्याला कसेसेच होते. लागलीच, ते का बरे रडत असेल याचा शोध सुरू होतो. ताईपासून माईपर्यंत आणि दाजीपासून आजीपर्यंत सारेच आपापल्या परीने उपाय सुचवायला लागतात. बाळाला बोलता येत नसल्याने तर हा प्रयत्न जास्तच गंभीर होतो. बाळाची आई नवखी असेल, तर मग विचरायलाच नको, तिची अगदी त्रेधातिरपीट उडून जाते. कधी दूध पाजल्यावर, कधी कडेवर घेतल्यावर, तर कधी थोपटल्यावर ते शांत होते व 'बघ मी सांगत होतो की नाही, असे अभिमानाचे उद्गारही ऐकायला मिळतात. गंमत म्हणजे हे उपाय मूल दुसऱ्यांदा रडल्यावरही वापरले जातात व त्याचा काही उपयोग होत नाही. यावरून एक लक्षात येईल की, मूल रडण्याची अनेक कारणे आहेत व सर्व प्रकारचे रडणे थांबवण्यासाठी कोणताही एकमेव असा रामबाण उपाय अस्तित्वात नाही.


रडणे ही एक नैसर्गिक क्रिया असून तिचा उपयोग लक्ष वेधून घेण्यासाठी, तक्रार करण्यासाठी, निषेध नोंदवण्यासाठी वा प्रतिकार करण्यासाठी होऊ शकतो. मूल रडण्याची विविध कारणे आहेत. यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे भूक लागणे. उपाशी असलेले मूल रडते व दूध मिळताच गप्प बसते. चड्डीत शी वा शू केल्याने ओलेपणा जाणवतो व त्यामुळेही मूल रडते. अशा वेळी मुलाला कोरडे केल्यास ते रडायचे थांबते. वयाचदा माता दूध पाजल्यावर बाळाच्या पोटातील ढेकर काढत नाहीत. त्यामुळे पोटात हवा धरून बाळाचे पोट दुखते व ते रडते. यासाठी दूध पाजल्यावर बाळाला खांद्यावर घेऊन हलके हलके थोपटावे, म्हणजे ढेकर बाहेर पडेल. कधी कधी आजारामुळे वाळाला वेदना होतात व ते रडते. अशा वेळी त्या त्या आजारावर उपचार करणे अगत्याचे ठरते. खूप घट्ट कपडे घातल्याने बाळाला त्रास होतो व ते रडते.


९५ टक्के वेळा वाळ रडण्याचे कारण हे सामान्य स्वरूपाचे असते. त्यामुळे घाबरून जायचे कारण नाही. रडण्यासोबत धाप लागत असेल, खोकला असेल, खूप ताप असेल, खूप संडास उलट्या होत असतील तर मात्र तज्ज्ञांचा सल्ला घेणे अगत्याचे ठरेल. एक महत्त्वाची गोष्ट मूल रडण्याचे आणखी एक कारण म्हणजे त्याला जवळ घेऊन प्रेम द्यावे, ही त्याची अपेक्षा असते. साहजिकच आईचा नुसता उबदार स्पर्श झाला, तरी ते रडायचे थांवते!


*डॉ. जगन्नाथ दीक्षित*

*डाॅ. अंजली दीक्षित*

यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज'या पुस्तकातून


स्त्रोत- विज्ञान व दिनविशेष फेसबुक पेज

═════════════

संकलन गजानन गोपेवाड 

शनिवार, ५ जून, २०२१

डोके मोठी असणारी माणसे बुद्धिवान असतात का?


               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════

📕 *डोके मोठे असणारी मुले जास्त बुद्धिमान असतात का ?* 📕


'उंच वाढला एरंड, तरी का होईल तो इक्षुदंड' ही म्हण आपल्या परिचयाची आहे. डोक्याची/आकार मोठा असला, तर साहजिकच त्या प्रमाणात मेंदूचा आकारही मोठा असेल. आपल्या बुद्धिमत्तेचा आधार म्हणजे मेंदू त्यामुळे बऱ्याच लोकांना असे वाटण्याची शक्यता आहे की, डोके मोठे असेल तर त्या मुलाला बुद्धीही जास्त असेल; पण खरेच असे असते का ? तुमच्या वर्गात पहिल्या पाचात येणाऱ्या मुलांची डोकी व सर्वात कमी गुण घेणाऱ्या मुलांची डोकी गंमत म्हणून पाहा.


मेंदूचे वजन मानवाच्या बाबतीत ठरावीकच असते. व्यक्ती व्यक्तीत थोडाफार फरक असतो; पण मेंदूचे भाग, त्याची कार्य करण्याची क्षमता, स्मरणशक्ती यांत गुणात्मकदृष्ट्या फरक नसतो. अनुभव, वाचन, पाठांतर, पंचज्ञानेंद्रियांतून प्राप्त केलेली माहिती, या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे बुद्धिमत्ता मेंदूच्या रिकाम्या पोटी विविध मार्गाने तुम्ही जेवढी ज्ञानसंपत्ती आणून टाकाल तेवढे तुम्ही बुद्धिमान ! जन्मताच कोणी बुद्धिमान नसतो. ज्ञान प्राप्त केल्यानंतरच माणूस बुद्धिमान होतो. मेंदूच्या पेशी, त्यातील गोष्टी लक्षात ठेवायची क्षमता, तुम्हाला बुद्धिमान बनायला मदत


करायला नेहमीच तयार असतात. गरज फक्त तुमच्या प्रयत्नांचीच असते. असे म्हणतात की, जगातील अत्यंत विद्वान, ज्ञानी व्यक्ती त्यांच्या मेंदूच्या केवळ २ टक्के क्षमतेचा वापर करतात. त्यामुळे लक्षात ठेवा, तुम्हीही खूप बुद्धिमान बनू शकता; फक्त अभ्यास करण्याची परिश्रम करण्याची तयारी पाहिजे. मेंदूच्या नुसत्या आकारावरच माणसाची बुद्धिमत्ता मुळीच अवलंबून नसते.


*डॉ. जगन्नाथ दीक्षित*

*डाॅ. अंजली दीक्षित*

यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज'या पुस्तकातून


स्त्रोत- विज्ञान व दिनविशेष फेसबुक पेज

संकलन ::गजानन गोपेवाड राज्य समन्वयक महाराष्ट्र राज्य 

बंदुकिची गोळी लागल्याने माणुस का मरतो

 ▬▬▬▬▬❚❂❚❂❚❚❂❚❂❚▬▬▬▬▬

    

▬▬▬▬▬❚❂❚❂❚❚❂❚❂❚▬▬▬▬▬

 संकलन @गजानन गोपेवाड राज्य समन्वयक महाराष्ट्र राज्य 

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════

*बंदुकीची गोळी लागल्यास माणूस का मरतो?* 


हा प्रश्न तसा सोपा आहे. डोक्याला वा छातीवर गोळी मारल्यास मेंदूला इजा होऊन वा हृदयाला इजा होऊन व्यक्ती मरू शकते. शरीरातील महत्त्वाच्या इंद्रियांना गोळी लागल्यास माणूस मरेल, हे स्वाभाविक आहे; पण हातात, पायात, खांद्यात वा इतरत्र बंदुकीतील गोळी लागल्यास रक्तस्त्राव वगळता इतर कारणांनी माणूस मरतो का, ते पाहू.


बंदुकीच्या गोळीमध्ये दोन प्रकारची रसायने वापरली जातात. गावठी बंदुकीच्या गोळीत वापरल्या जाणाऱ्याा रसायानात कोळसा, सल्फर, पोटॅशियम नायट्रेट हे पदार्थ असतात. पेटल्यानंतर स्फोट होऊन या पावडरचे रूपांतर वायुत होते. यामुळे शरीरातील स्नायू जळतात वा भाजले जातात. अत्याधुनिक बंदुकीमध्ये वापरल्या जाणाऱ्या पावडरीत नायट्रोसेल्यूलोज व कधी नायट्रोग्लिसरीनही असते. या १ ग्रॅम पावडरमुळे स्फोट होऊन ९०० मि.ली. वायू तयार होतो व शरीराचा बराच भाग जळतो. ही पावडर धातूच्या काडतुसात भरलेली असते. गोळीचा वेग, त्यातील विषारी पावडर पेटून निर्माण होणारा वायू व शरीर पोळण्याची क्षमता, तसेच महत्त्वाच्या अवयवांना होणारी इजा इत्यादीमुळे व्यक्तीचा मृत्यू होतो.


कधी कधी हृदयविकाराच्या झटक्याने, रक्तपुरवठा खंडित झाल्याने, कधी पोटातील आवरणात जंतूसंसर्ग झाल्याने (पोटाला गोळी लागल्यास), तर कधी न्यूमोनिया होऊन (डोक्याला गोळी लागून व्यक्ती खूप काळ बेशुद्ध राहिल्यास) व्यक्ती मरण पावते.


*डॉ. जगन्नाथ दीक्षित*

*डाॅ. अंजली दीक्षित*

यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज'या पुस्तकातून


स्त्रोत- विज्ञान व दिनविशेष फेसबुक पेज

═════════════

5 जून जागतिक वसुंधरा दिन

 🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳

 ⛈️🌨️⛈️🌨️ *५ जून*⛈️🌨️⛈️🌨️🌧️


*🍃🌳जागतिक पर्यावरण दिवस🌴🍃*

🌊🌫️💨🌦️🌧️💦⛈️🌩️🌨️🌈🌪️

पर्यावरणाचे आपल्याभोवती असणे आपण गृहीत धरून, गेली काही दशके, त्यातील विविध घटकांची हानी करत आलो आहोत. परंतु, पर्यावरणाचा समतोल ढासळण्याचे परिणाम दैनंदिन जीवनातही जगभर दिसू लागल्याने याबाबत जागृती करण्याची गरज उत्पन्न झाली.

१९७२ साली युनोच्या  सर्वसाधारण सभेने, मानव व पर्यावरण याविषयी आयोजित केलेल्या परिषदेत, पर्यावरण दिन साजरा करण्याचे ठरविले. संयुक्त राष्ट्रसंघाच्या पर्यावरणविषयक कार्यक्रमातून पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासाठी राजकीय, औद्योगिक तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या पातळीवर कृतिशील सहभाग मिळविण्याचे उद्दिष्ट ठेवले गेले. त्यानुसार शाश्वत विकासावर भर देण्यात येत आहे.


पर्यावरण संरक्षणाचे स्थान आणि त्यांच्या संवर्धनाची गरज लक्षात घेऊन  सहभागी देशांमध्ये विविध प्रकल्प राबविले जात आहेत. कारण निसर्गातील सजीवांच्या अनेक अन्नसाखळ्या तुटण्याच्या स्थितीला पोहोचल्या आहेत. अनेक सजीव पृथ्वीवरून कायमचे नष्ट झाले आहेत व होत आहेत. प्रदूषण वाढत आहे. हवामान बदलत आहे. आणि या सर्व स्थितीला आधुनिक मानवाची बेफिकीर जीवनशैली कारणीभूत आहे! २०५० मध्ये जगाची लोकसंख्या तब्बल ९.६ अब्ज असण्याची शक्यता आहे. चंगळवाद भागवण्यासाठी मानवाने निसर्गाला ओरबाडणे असेच चालू ठेवले तर त्यावेळी पृथ्वीवर जगणेच मुश्किल होईल असा इशारा पर्यावरणतज्ज्ञांनी दिला आहे!

५ जून १९७२ रोजी पर्यावरणाचा नाश रोखण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघातर्फे एक आंतरराष्ट्रीय परिषद भरली होती. भारतासह एकूण १३० देशांचे प्रतिनिधी या परिषदेला हजर होते. परिषदेत पर्यावरणविषयक जाहीरनामा काढण्यात आला. पर्यावरण रक्षण ही मानवाची जबाबदारी आहे, हे मान्य करून शालेय अभ्यासक्रमात पर्यावरण शिक्षण हा विषय समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला. तेव्हापासून संयुक्त राष्ट्रसंघाच्या वतीने सर्व देश दर वर्षी ५ जून हा दिवस 'जागतिक पर्यावरण दिवस' म्हणून साजरा करू लागले.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार पर्यावरण शिक्षणाचा आराखडा १८ डिसेंबर २००३ ला तयार करण्यात आला. आपल्याकडे पर्यावरण हा विषय पाचवी ते नववीपर्यंतच्या वर्गात शिकवला जाऊ लागला. दरवर्षी ५ जून हा दिवस पर्यावरण दिवस म्हणून साजरा होऊ लागला. परंतु प्रत्यक्षात हा विषय कृतीमध्ये उतरविला गेला नाही.


आपण ज्या पृथ्वीवर राहतो, तिच्यावर जी प्राकृतिक परिस्थिती आहे, त्या परिस्थितीला 'पर्यावरण' असे म्हणतात. मानवाकडून कळत-न-कळत आणि प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे केल्या जाणाऱ्या अयोग्य कृतीमुळे नैसर्गिक परिस्थितीमध्ये जो बिघाड निर्माण केला जातो, त्याला 'प्रदूषण' म्हणतात. पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी भारताच्या घटनेमध्ये सुमारे दोनशे कायदेही समाविष्ट करण्यात आले परंतु त्यांची अंमलबजावणी पाहिजे तशी झाली नाही. वन्यजीवन संरक्षक कायदा १९७२मध्ये करण्यात आला. पाण्याचा प्रदूषण नियंत्रणाचा कायदा १९७४ मध्ये करण्यात आला. जंगलाच्या संवर्धनाचा कायदा १९८० मध्ये करण्यात आला. हवा प्रदूषण नियंत्रण कायदा १९८१ मध्ये करण्यात आला. पर्यावरण संरक्षणाचा कायदा १९८२मध्ये करण्यात आला. हे सर्व उत्तम कायदे कागदावरच राहिले आहेत. वर्षभरात हे कायदे मोडणाऱ्या किती लोकांवर कोणती कारवाई झाली, याची माहिती लोकांपर्यंत पोचणे अत्यंत गरजेचे आहे.


सामाजिक हिताच्या दृष्टिकोनातून पर्यावरण समस्यांकडे अधिक जागरुकपणे पाहणे आणि या चळवळीत सर्वांना सामील करून घेऊन आपले भविष्य सुरक्षित व समृद्ध करण्याचा प्रयत्न करणे या हेतूने हा दिवस दरवर्षी साजरा केला जात असतो. पर्यावरणाचे रक्षण करणे ही एक सवयच झाली पाहिजे. यासाठी समाज प्रबोधन सातत्याने केले जाण्याची जरूरी आहे. समाज प्रबोधन केले की काही उद्दीष्टे साध्य होतात, याची दोन उदाहरणे सहजपणे सांगता येतील. दिवाळीसारख्या प्रकाशाच्या उत्सवात फटाके लावले तर ध्वनिप्रदूषण व वायूप्रदूषण कसे होते, हे जेव्हा शाळाशाळांमधून विद्यार्थ्यांना पटवून दिले गेले तेव्हा मागील चार वर्षांपासून फटाक्यांचे प्रमाण खूपच कमी झालेले दिसून आले. एक वर्षी पाण्याचा मोठा दुष्काळ पडला होता.त्यावेळी 'सुकी होळी खेळा' हा संदेश लोकांना दिला गेला तेव्हा लोकांनी तसे करून दाखविले.


ठाणे शहरात रस्तारूंदीकरण, पूल बांधणीसाठी बरेच वृक्ष तोडले जात आहेत. मी जेव्हा निरीक्षण केले तेव्हा लक्षात आले की अगोदर काहीतरी करून हे हिरवेगार वृक्ष सुकवले जातात. मग तोडले जातात. काहीवेळा अगोदर फांद्या तोडल्या जातात मग मुळासकट वृक्षच नाहिसा केला जातो. ही गोष्ट इतक्या बेमालूम पद्धतीने केली जाते की जनसामान्यांच्या ती लक्षातही येत नाही. वृक्षांची संख्या कमी झाली त्यामुळे चिमण्या, कावळे इत्यादी पक्ष्यांची संख्याही कमी झाली आहे. ठाणे हे तलावांचे शहर म्हणून ओळखले जाते. परंतु आज या तलावांची स्थिती पाहिली की खूप दु:ख होते.


भूप्रदूषण,वायुप्रदूषण,जलप्रदूषण आणि ध्वनिप्रदूषण होणार नाही यासाठी सर्वांनी विशेष लक्ष देण्याची गरज आहे. आपण निसर्गाला जपले तरच निसर्ग आपणास जपणार आहे. ही पृथ्वी जशी माणसांची आहे तशीच ती वृक्ष,पशु,पक्षी इत्यादींचीही आहे. प्राचीन कालीही आपल्या भारतातील ऋषी-मुनींनी पर्यावरणाचे महत्त्व सांगितले होते. संत तुकारामांनी 'वृक्षवल्ली आम्हां सोयरे वनचरे' या शब्दांत मानवाचे निसर्गाशी असलेले दृढ नाते सांगितले होते. ज्यादिवशी पुस्तकात असलेल्या पर्यावरणासंबंधीच्या या गोष्टी आपण कृतीमध्ये उतरवू,त्याच दिवशी आपणास पर्यावरण दिन साजरा केल्याचे समाधान मिळू शकेल.


संकलन -) 

गजानन गोपेवाड राज्य समन्वयक महाराष्ट्र 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६


प्रभात दर्शन

 🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

वैशाख मास,कृष्ण पक्ष, *एकादशी*,रेवती नक्षत्र,सूर्य उत्तरायण,ग्रीष्म ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

शनिवार, ०५ जून २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                        *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

         *मानव जीवन में ना तो  समस्याएं कभी खत्म हो सकती हैं और ना ही संघर्ष। समस्या में ही समाधान छिपा होता है। समस्या से भागना, उसका सामना ना करना.. यह सबसे बड़ी समस्या है। छोटी- छोटी समस्याएं ही एक दिन बड़ी बन जाती हैं।*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


शुक्रवार, ४ जून, २०२१

मनुष्य मृत्यू नंतर पाण्यात



══════════════════════

   *📒📒📒 @ संकलन श्री.गजानन गोपेवाड 

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════

📕 *बुडून मेलेला माणूस व मेल्यानंतर पाण्यात फेकलेला माणूस 'यांच्यात काही फरक आढळून येतो का ?* 📕


माणूस बुडून मेला काय किंवा मेल्यावर त्याला पाण्यात टाकले काय, दोन्ही सारखेच; असे कोणालाही वाटेल. काही गुन्हेगारांनाही तसेच वाटते! त्यामुळे एखाद्या व्यक्तीचा गळा दाबून खून करून मग ते त्या व्यक्तीला नदीत ढकलून देतात. पोलिस तपासात ते, त्या व्यक्तीने पाण्यात उडी घेऊन आत्महत्या केली असा बचाव करतात; पण हुशार तपासणी अधिकारी डॉक्टरांच्या मदतीने त्यांचा खोटेपणा उघडकीस आणतात. ते कसे ते आता पाहू


जिवंत माणसाला पाण्यात टाकले, तर त्याचे श्वसनाचे प्रयत्न पाण्यात बुडाला तरीही अखेरच्या क्षणापर्यंत चालू राहतात. त्यामुळे या प्रयत्नात त्याच्या फुफ्फुसात पाणी व पाण्यातील काही घटकही जातात. हृदयाचे कार्य चालू असल्याने 'डायअॅटम'सारख्या अल्गी फुफ्फुसातून मेंदू, अस्थिमज्जा अशा शरीराच्या इतर भागातही पोचतात. मृत व्यक्तीला पाण्यात टाकल्यास ती श्वसनाचा प्रयत्न करणे शक्य नसते. साहजिकच तिच्या फुफ्फुसात पाणी, डायअॅटम जात नाहीत व तेथून रक्ताभिसरण चालू नसल्याने इतर अवयवांतही जात नाहीत.


त्यामुळे फुफ्फुसाच्या अवस्थेवर व इतर काही बाबींवरून व्यक्ती पाण्यात बुडून मेली आहे वा नाही हे ओळखता येते. पाण्यात बुडून मेलेल्या व्यक्तीच्या उत्तरीय तपासणीत असे दिसून येते की, प्रेताच्या नाकातोंडातून कितीही पुसला तरी सारखा व भरपूर असा फेस येत राहतो. दुसरे म्हणजे शेवटच्या धडपडीत बुडणारी व्यक्ती पाण्यातच सापडू शकेल अशी वस्तू हातात घट्ट धरते व ती वस्तू तपासणीत सापडते. श्वासमार्गातही विशिष्ट असा फेस असतो. फुफ्फुसांचे आकारमान वाढते व ती सुजलेली दिसतात. तसेच मेंदू व अस्थिमज्जा या भागात डायॲटम सापडतात. महत्त्वाचे म्हणजे खून करून पाण्यात फेकलेल्या व्यक्तीमध्ये उपरोक्त लक्षणाचा अभाव असून ज्या कारणाने खून झाला असेल (जसे गोळी घालून, गळा दावून, फासावर लटकवून, विष देऊन) या कारणाचे पुरावेही सापडतात. एकूण काय, प्रेतही गुन्हेगाराविरुद्ध साक्ष देते!


*डॉ. जगन्नाथ दीक्षित*

*डाॅ. अंजली दीक्षित*

यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज'या पुस्तकातून


स्त्रोत- विज्ञान व दिनविशेष फेसबुक पेज

═════════════

▬▬▬▬▬❚❂❚❂❚❚❂❚❂❚▬▬▬▬▬


4 जुन पुरूषोत्तम गोपाल पोषणशास्त्रज्ञ

 *🌱🌱पुरुषोत्तम गोपाळ तुळपुळे🌱🌱*

🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱

*जन्मदिन - ४ जुन १९२३*

🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱

*पोषणशास्त्रज्ञ*

🔬🔬🔬🔬🔬🔬🔬🔬🔬🔬🔬

डॉ. पुरुषोत्तम गोपाळ तुळपुळे यांचा जन्म पुण्यात झाला.त्यांचे शालेय शिक्षण श्री गोपाळ हायस्कूल,पुणे येथे झाले,तर त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण नवरोज वाडिया महाविद्यालय, पुणे येथे घेतले.१९४७ साली ते मुंबई विद्यापीठातून एम.एस्सी. झाले.त्याच वर्षी त्यांना संशोधन शिष्यवृत्ती मिळून ते पोषण संशोधन प्रयोगशाळा, कुन्नूर (आता राष्ट्रीय पोषण संस्था, हैदराबाद) येथे रुजू झाले. त्या वेळचे संस्थेचे संचालक डॉ.वि.ना.पटवर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली *‘जीवनसत्त्व ब६ आणि आवश्यक मेदाम्ले यांचे परस्पर संबंध’* या विषयावर संशोधन करून त्यांनी जीवरसायनशास्त्रात १९५१ साली पीएच.डी.ची पदवी मिळवली. या संशोधनात त्यांनी ‘फ्रेनोडर्मा किंवा बेडकाची कातडी हा त्वचेचा विकार आवश्यक मेदाम्लांच्या कमतरतेमुळे होतो’, हे सिद्ध केले. पीएच.डी.पश्चात संशोधनासाठी त्यांना अमेरिकेतील विस्कॉन्सिन विद्यापीठाने फुलब्राइट शिष्यवृत्ती दिली. त्यानंतर त्यांनी भारतात परत येऊन राष्ट्रीय पोषण संस्थेत अन्न-विष विज्ञानातील संशोधनाला वाहून घेतले.


डॉ. तुळपुळे यांचे मूलभूत शास्त्रीय ज्ञानात आणि कृषीविषयक, तसेच मानवाच्या प्रकृतीच्या दृष्टीने महत्त्वाचे काम कवकविष (अफ्लॉटॉक्सीन) या बुरशीच्या विषाबद्दलचे आहे.  कृषिउत्पन्न, मुख्यत्वे मका आणि भुईमूग यांचा साठा करताना बाष्प जास्त प्रमाणात राहिले, तर ‘अ‍ॅस्पर्शिलस फ्लॅवस’ या विषारी कवकाची त्यावर वाढ होते व अफ्लॉटॉक्सीन निर्माण होते. त्याच्या प्रतिबंधाकरिता काय उपाय योजावेत हे डॉ. तुळपुळेंच्या संशोधनाने दाखवून दिले. या विषामुळे यकृताचा कर्करोग होतो हे त्यांनी माकडांवर प्रदीर्घ प्रयोग करून दाखवून दिले. राजस्थानात टोळीने राहणाऱ्या जमातीत दिसून येणारे यकृताचे विकार (सिऱ्हॉसिस) अफ्लॉटॉक्सीनमुळे होतात हे त्यांच्या संशोधनाने सिद्ध झाले.


ते १९७१ साली सहायक निर्देशक आणि अन्न, तसेच औषध विषशास्त्राचे प्रमुख झाले. १९८० साली ते राष्ट्रीय पोषण संस्थेचे (जी इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्चच्या (आय.सी.एम.आर.) अखत्यारीत आहे) संचालक झाले आणि १९८३ साली निवृत्त झाले. त्यांच्या ३०-३५ वर्षांच्या प्रदीर्घ संशोधनकार्यात डॉ. तुळपुळे यांनी आहार व पोषणशास्त्राच्या विविध क्षेत्रांत मूलभूत संशोधन केले असून त्यांचे ऐंशीहून अधिक लेख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय उच्च दर्जाच्या वैज्ञानिक नियतकालिकांतून प्रसिद्ध झालेले आहेत. 


त्यांचे खास संशोधन क्षेत्र अन्नविषविज्ञान होते आणि कवकविषासंबंधीचे संशोधन त्यांनी देशात सुरू केले. त्यांनी ‘कवकविषाचे हिंदुस्थानातील आरोग्याला धोके’ ही पुस्तिका प्रसिद्ध केली.  त्यांनी बऱ्याच विद्यार्थ्यांना पीएच.डी.च्या संशोधनाकरिता मार्गदर्शन केले. जागतिक आरोग्य संघटना, अन्नविषयक संघटना, आहार परिमाणित मध्यवर्ती समिती अशा विविध जागतिक संस्थांमधून डॉ. तुळपुळे यांनी महत्त्वाचे कार्य केले. डॉ. तुळपुळे यांनी भारतीय पोषण मंडळात सचिव, खजिनदार आणि नंतर उपाध्यक्ष ही वेगवेगळी पदे सांभाळली. ते १९८१ साली भरलेल्या मराठी विज्ञान परिषदेच्या वार्षिक संमेलनाचे अध्यक्ष होते. डॉ. तुळपुळे यांनी त्यांच्या कारकिर्दीत राष्ट्रीय पोषण संस्थेच्या कार्याला नवीन दिशा दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली बऱ्याच संस्थांबरोबर सहकार्याच्या योजना सुरू झाल्या.त्यांच्या अखत्यारीत त्यांनी सरकारला,तसेच काही आंतरराष्ट्रीय कार्यालयांना सल्ला दिला.

— डॉ.तरला नांदेडकर


संकलन -)

गजानन गोपेवाड राज्य समन्वयक महाराष्ट्र राज्य 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

Featured Post

व्यायाम व योगा अवश्य करावा*

*व्यायाम व योगा अवश्य करावा*  *व्यायाम व योगा करण्याचे दहा फायदे:-*  1) व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते: व्यायाम करणारी...