बुधवार, १९ मे, २०२१

19 मे जमशेदजी टाटा पुण्यतिथी

 ========================

*🏗️🏭🌸जमशेदजी टाटा🌸🏭🏗️*

========================

🏭🏭🏭🏭🏭🏭🏭🏭🏭🏭🏭

*आधुनिक औद्योगिक भारताचे शिल्पकार व टाटा उद्योग समुहाचे संस्थापक जमशेदजी नसरवानजी टाटा यांचे निधन*

जन्म दि. -)   ०३ मार्च १८३९

मृत्यू दि. -)    १९  मे  १९०४

*जमशेदजी नसरवानजी टाटा (३ मार्च, इ.स. १८३९ - १९ मे, इ.स. १९०४) पारशी,भारतीय उद्योजक होते. टाटा समूह या भारतातल्या आघाडीच्या उद्योगसमूहाचे ते संस्थापक होते.*


त्यांचा जन्म गुजरातमध्ये नवसारी येथे झाला. त्यांना दोराबजी आणि रतनजी अशी दोन अपत्ये होती. जमशेदपूर येथील पोलाद कारखाना, मुंबईचे ताजमहाल हॉटेल, बंगळुरातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अशा अनेक संस्थांची स्थापना ही त्यांची महत्त्वाची कार्ये होत. त्यांनी नंतर टाटा समूह उद्योगाची स्थापना केली. टाटांना "भारतीय उद्योगाचे जनक" म्हणून ओळखले जाते. आज त्यांच्या योगदानामुळे भारतीय उद्योगास विदेशांत ओळख मिळाली. ज्यावेळी भारत आर्थिक संकटांशी झगडत होता त्या वेळी त्यांनी चपळतेने टाटा ग्रुप आणि कंपनीची मुहूर्तमेढ रोवली. त्यांचे असे मत होते की आम्ही सरळ कोणतेच मोठे काम करू शकत नाही, कोणतेही मोठे काम करण्यासाठी आधी छोटी-छोटी कामे करण्याची आवश्यकता असते.


*सुरुवातीचे जीवन*

जमशेदजी नसरवानजी टाटा यांचा जन्म ३ मार्च १८३९ रोजी दक्षिण गुजरातमधील नवसारी शहरात झाला. त्यांचे वडील नसरवानजी व आई जीवनबाई टाटा हे त्यांच्या पारशी कुटुंबातील पहिले व्यापारी होते. कुटुंबाची परंपरा तोडून त्यांनी मुंबईत निर्यात व्यापार संस्था सुरू केली. जमशेदजी टाटा १४ व्या वर्षी मुंबईत आपल्या वडिलांकडे आले. आणि त्यांनी एलफिन्स्टन महाविद्यालयातून आपले ग्रॅज्युएशन पूर्ण केले. तेथे ते कॉलेजातील एक हुशार विद्यार्थी म्हणून ओळखले जात होते. त्यांची बुद्धिमत्ता पाहून काॅलेजच्या प्रिन्सिपाॅलांनी त्यांची डिग्री समाप्त होईपर्यंतची पूर्ण फी परत केली. जमशेदजीनी १६ वर्षाचे असताना १० वर्षाच्या हीराबाई दबू हिच्याशी विवाह केला.


१८५८ मध्ये जमशेदजींनी महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली आणि आपल्या वडिलांच्या व्यवसायामध्ये प्रवेश घेतला. १८५७ सालचे भारतीय बंड ब्रिटिश शासनाने दडपून काढले होते. ब्रिटिश सरकारच्या विरुद्धचा विद्रोह त्यावेळी नवीनच होता. मात्र टाटांनी अशा परिस्थितीतही आपल्या व्यापारास शिखरावर घेऊन जाण्याचा निश्चय केला. आपल्या वडिलांच्या व्यवसायाच्या शाखा स्थापन करण्यासाठी टाटा यांनी इंग्लंड, अमेरिका, युरोप, चीन आणि जपान सारख्या परदेशांत अनेकदा प्रवास केला.


*व्यवसाय*

१८६८ पर्यंत टाटा आपल्या वडिलांच्या कंपनीत काम करत होते. त्यावर्षी त्यांनी एका स्वतंत्र कंपनीची स्थापना केली. १८९६ मध्ये चिंचपोकळी येथील एक दिवाळखोर तेल गिरणी विकत घेतली आणि तिची एका कापडाच्या गिरणीत रूपांतर केले. या गिरणीचे नाव त्यांनी अलेक्झांड्रा मिल असे ठेवले. पुढे दोन वर्षांनंतर नफा मिळवण्यासाठी ती मिल टाटांनी विकली आणि १८७४ मध्ये नागपूरला एका स्पिनिंग मिलची स्थापना केली, १ जानेवारी १८७७ रोजी त्यांनी एम्प्रेस मिलची स्थापना केली.


त्यांच्या जीवनात चार ध्येये होती. एक पोलाद कंपनी, एक जागतिक दर्जाची शिक्षण संस्था, एक अद्वितीय हॉटेल आणि एक हायड्रो-इलेक्ट्रिक वीजनिर्मिती कंपनी. ३ डिसेंबर १९०३ रोजी मुंबईतील कुलाबा वॉटरफ्रंट येथील ताजमहल हॉटेल चे उद्घाटन झाले. त्यावेळी भारतात स्वतःची वीज असणारे ते एकमेव हॉटेल होते.


*टाटा स्टील*

टाटा स्टील (पूर्वी टिस्को - टाटा आयर्न आणि स्टील कंपनी लिमिटेड) ही आशियातील पहिली आणि भारतातील सर्वात मोठी स्टील कंपनी आहे. तिच्या कोरस ग्रुपने दरवर्षी २,८ कोटी टन स्टीलचे उत्पादन केल्यानंतर ती जगातील पाचव्या क्रमांकाची स्टील कंपनी ठरली.


*टाटांनी स्थापन केलेल्या अन्य संस्था*

बंगलोरची इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स : विज्ञान आणि अभियांत्रिकी यांमधील संशोधन आणि शिक्षणासाठी प्रख्यात भारतीय संस्था.

टाटा हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर सप्लाय कंपनी (नवीन नाव - टाटा पॉवर कंपनी) : ८००० मेगावॅटपेक्षा जास्त क्षमतेच्या स्थापित क्षमतेची भारतातील सर्वात मोठी खाजगी वीज कंपनी.

व्यक्तिगत जीवन

टाटांनी हिराबाई दाबू यांच्याशी विवाह केला. त्यांची मुले दोराबजी टाटा आणि रतन टाटा यांना सुद्धा टाटा ग्रुपचे अध्यक्ष म्हणून यश मिळाले. टाटाची बहीण जेरबाईने मुंबईतील एका व्यापाऱ्याशी लग्न केले. त्यांचा मुलगा त्यांना शापुरजी सकलातवाला हे बिहार आणि ओरिसामध्ये टाटा ग्रुपचे कोळशाचा व लोखंडाचा व्यापार सांभाळत होते. नंतर ते टाटांचे मॅन्चेस्टर कार्यालय सांभाळण्यासाठी इंग्लंडला निघून गेले आणि नंतर ब्रिटिश संसदेचे सदस्य झाले.


*मृत्यू*

१९०० साली व्यवसाया निमित्त जर्मनी ला असताना ते खूप आजारी पडले. १९ मे १९०४ रोजी बॅड नौहैम या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला. त्यांना इंग्लंड मधील पारशी समाजाच्या ब्रूकवूड दफन भूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.


*वारसा*


झारखंडमधील साचि गावात टाटाचा लोखंड व पोलाद प्रकल्प उभारला गेला. गाव गावात वाढला आणि रेल्वे स्टेशनचे नाव टाटानगर असे ठेवले गेले. आता झारखंडमधील जमशेदपूर या नावाने ओळखले जाणारे हे एक मोठे शहर आहे.



*पुस्तके*

आर. एम. लाला (१ मे २००६). द लव ऑफ इंडिया: द लाइफ ॲंड टाइम्स ऑफ जमशेदजी टाटा पेंग्विन पुस्तकं

दीनशॉ एडुलजी वाका (१९१५). जे. एन. टाटाचे जीवन आणि जीवन कार्य:

टाटायन-गिरीश कुबेर. -टाटा उद्योगसमूहाची समग्र माहिती देणारे मराठीतील पुस्तक

*🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏*

संकलन-)

गजानन गोपेवाड  

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

बुधवार, १२ मे, २०२१

12 मे जागतिक परिचारिका दिन

 *🏴󠁧󠁢󠁥󠁮󠁧󠁿🏴󠁧󠁢󠁥󠁮󠁧󠁿🏴󠁧󠁢󠁥󠁮󠁧󠁿🏴󠁧󠁢󠁥󠁮󠁧󠁿१२ मे🏴󠁧󠁢󠁥󠁮󠁧󠁿🏴󠁧󠁢󠁥󠁮󠁧󠁿🏴󠁧󠁢󠁥󠁮󠁧󠁿🏴󠁧󠁢󠁥󠁮󠁧󠁿*

👩‍⚕️👩‍⚕️👩‍⚕️👩‍⚕️👩‍⚕️👩‍⚕️👩‍⚕️👩‍⚕️👩‍⚕️👩‍⚕️

*👩‍⚕️👩‍⚕️जागतिक परिचारिका दिन👩‍⚕️👩‍⚕️*

👩‍⚕️👩‍⚕️👩‍⚕️👩‍⚕️👩‍⚕️👩‍⚕️👩‍⚕️👩‍⚕️👩‍⚕️👩‍⚕️

१२ मे हा दिवस जागतिक परिचारिका दिन म्हणून पाळला जातो. इसवी सन १८५४ साली झालेल्या क्रिमियन युद्धातील जखमी सैनिकांना मलमपट्टी करीत हिंडणारी आद्य परिचारिका (नर्स) फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांचा हा जन्मदिवस आहे. फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांना आधुनिक शु्श्रूषा शास्त्राची संस्थापिका समजले जाते.

फ्लॉरेन्स नाइटिंगेल (१२ मे १८२० - १३ ऑगस्ट १९१०) या अग्रगण्य परिचारिका,लेखक व संख्याशास्त्रज्ञ होत्या. इ.स. १८५३ साली झालेल्या क्राइमियन युद्धादरम्यान जखमी सैनिकांची सुश्रुषा केल्याबद्दल त्यांना प्रसिद्धी मिळाली. त्यांना "लेडी विथ द लँप" ( The Lady with the Lamp ) असे म्हणत.

संकलन -)

गजानन गोपेवाड राज्य समन्वयक महाराष्ट्र 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

मंगळवार, ११ मे, २०२१

11 मे मास्टर अवध बिहारी गाथा बलिदानाची

 ➿➿➿➿➿➿➿➿➿➿

🇮🇳🇮🇳 *गाथा बलिदानाची* 🇮🇳🇮🇳

➿➿➿➿➿➿➿➿➿➿                         

   *मास्टर अवध बिहारी*

*(भारत के स्वतन्त्रता प्राप्ति संग्राम के क्रान्तिकारी सेनानी)*          

       *जन्म : १८६९ (दिल्ली)*

        *फांसी : ११ मई १९१५*

                        (अम्बाला)

नागरिकता : भारतीय

विशेष योगदान : अवध बिहारी ने वायसराय लार्ड हार्डिंग्ज पर बम प्रहार किया तथा लारेंस गार्डस बम कांड में भी मुख्य भूमिका निभाई।

                                                                      "मैं चाहता हूं भयंकर अशांति फैले, जिसमें यह विदेशी शासन और भारत की गुलामी भस्म हो जाए. क्रांति की आग से भारत कुंदन होकर निकले, हमारे जैसे हजार-दो हजार लोग नष्ट भी हो जाएंगे तो क्या.’’


मातृभूमि की सेवा के लिए व्यक्ति की शिक्षा, आर्थिक स्थिति या अवस्था कोई अर्थ नहीं रखती. दिल्लीवासी क्रांतिवीर अवधबिहारी ने केवल २५ वर्ष की अल्पायु में ही अपना शीश मां भारती के चरणों में समर्पित कर दिया.

अवधबिहारी का जन्म चांदनी चौक दिल्ली के मोहल्ले कच्चा कटरा में १४ नवम्बर सन १८८९ को हुआ था. इनके पिता श्री गोविन्दलाल श्रीवास्तव जल्दी ही स्वर्ग सिधार गये, अब परिवार में अवधबिहारी उनकी मां तथा एक बहिन रह गयी, निर्धनता के कारण प्रायः इन्हें भरपेट रोटी भी नहीं मिल पाती थी, पर अवधबिहारी बहुत मेधावी थे. गणित में सदा उनके सौ प्रतिशत नंबर आते थे. उन्होंने सब परीक्षाएं प्रथम श्रेणी और कक्षा में प्रथम आकर उत्तीर्ण कीं. छात्रवृत्ति और ट्यूशन के बल पर अवधबिहारी ने सेंट स्टीफेंस काॅलिज से १९०८ में प्रथम श्रेणी में स्वर्ण पदक लेकर बी.ए किया. काॅलिज के एक अंग्रेज अध्यापक ने इनकी प्रतिभा और कार्यक्षमता देखकर कहा था कि -

"ऐसे बुद्धिजीवी युवकों से अंग्रेजी शिक्षा और सभ्यता के प्रसार में बहुत सहायता मिल सकती है, पर उन्हें क्या पता था कि वह युवक आगे चलकर ब्रिटिश शासन की जड़ें हिलाने में ही लग जाएगा." 

दिल्ली में उनकी मित्रता मास्टर अमीरचंद आदि क्रांतिकारियों से हुई, जो बम-गोली के माध्यम से अंग्रेजों को देश से भगाना चाहते थे. मास्टर अमीरचन्द, लाला हनुमन्त सहाय, मास्टर अवध बिहारी, भाई बालमुकुन्द और बसन्त कुमार विश्वास द्वारा लार्ड हार्डिंग नामक ब्रिटिश वायसराय को जान से मार डालने की एक क्रान्तिकारी योजना बनाई. २३ दिसम्बर सन १९१२ को दिल्ली के चांदनी चौक स्थित पंजाब नेशनल बैंक की छत से वायसराय लार्ड हार्डिंग की शोभा यात्रा में इन्होंने एक भीषण बम फेंका. वायसराय हाथी पर बैठा था. निशाना चूक जाने से वह मरा तो नहीं, पर बम से उसके कंधे, दायें नितम्ब और गर्दन में भारी घाव हो गये. शासन ने इसकी जानकारी देने वाले को एक लाख रुपये के पुरस्कार की घोषणा की. शासन ने कुछ लोगों को पकड़ा, जिनमें से दीनानाथ के मुखबिर बन जाने से इस विस्फोट में शामिल सभी क्रांतिकारी पकड़े गये. न्यायालय में अवधबिहारी पर यह आरोप लगाया गया कि बम में प्रयुक्त टोपी उन्होंने ही बसंतकुमार के साथ मिलकर लगायी थी. उन दिनों देश में अनेक विस्फोट हुए थे, अवधबिहारी को उनमें भी शामिल दिखाया गया, सजा सुनाते हुए न्यायाधीश ने लिखा - 

"अवधबिहारी जैसा शिक्षित और मेधावी युवक किसी भी जाति का गौरव हो सकता है, यह साधारण व्यक्ति से हजार दर्जे ऊंचा है, इसे फांसी की सजा देते हुए हमें दुख हो रहा है."

११ मई सन १९१५ ई. इनकी फांसी की तिथि निर्धारित की गयी. फांसी से पूर्व इनकी अंतिम इच्छा पूछी गयी तो इन्होंने कहा कि -

"अंग्रेजी साम्राज्य का नाश हो."

जेल अधिकारी ने कहा कि जीवन की इस अंतिम वेला में तो शांति रखो,तो अवधबिहारी ने कहा -

‘‘कैसी शांति, मैं तो चाहता हूं भयंकर अशांति फैले, जिसमें यह विदेशी शासन और भारत की गुलामी भस्म हो जाए, क्रांति की आग से भारत कुंदन होकर निकले, हमारे जैसे हजार-दो हजार लोग नष्ट भी हो जाएंगे तो क्या."

यह कहकर उन्होंने फंदा गले में डाला और वन्दे मातरम् कहकर रस्सी पर झूल गये.

🇮🇳🇮🇳🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳🇮🇳🇮🇳

*🙏🙏विनम्र अभिवादन🙏🙏*

संकलन -)गजानन गोपेवाड राज्य समन्वयक महाराष्ट्र 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

11 मे महात्मा दिवस साजरा

 🎯 *11 मे- महात्मा दिन* 🎯


 *Whatever I have done for the Society,* 

 *It was My Duty -* 

 *Jotirao Fule,The Great* 


*छत्रपती शिवाजी महाराजांची रायगडावर प्रथम समाधी शोधून जगातली पहिली शिवजयंती साजरी करणारे* *आणि* 

 *विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे  गुरू* *राष्ट्रपिता, क्रांतीसूर्य* *,तात्यासाहेब जोतीराव फुले ह्यांनी .*उभी हयात सामाजिक प्रबोधन, सामाजिक परिवर्तन व समाजसेवेचे कार्य केले.*

*त्यासाठी त्यांचा भव्य सत्कार करण्यात यावा असे जनतेला वाटत होते.* *त्यांचे मित्र ,चाहते कामाला लागले.* *11मे,1888 ही तारीख निश्चित करण्यात आली.* *या समारंभासाठी अतिथी म्हणून बडोद्याचे राजे सयाजीराव गायकवाड यांना निमंत्रण देण्यात आले.* *त्यांनी असे सुचवले की जोतीराव फुले यांना भारताचे बुकर टी वॉशिंग्टन या पदवीने सन्मानीत करण्यात यावे.*

*11 मे,1888 चा दिवस उजाडला. मुंबईतील मांडवी येथे कोळीवाड्यात भव्य व दिव्य असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला .संपूर्ण परिसर रंगीबेरंगी पताका, गुढ्या-तोरणे उभारून सुशोभित करण्यात आला होता.* *समाजातील सर्व स्तरातील सामान्य जनता व सत्यशोधक कार्यकर्ते मंडळी हजर होती.*

*सत्यशोधक कामगार नेते नारायण मेघाजी लोखंडे, भाऊ लाड यांसारखे जोतीरावांचे अनुयायी हजर होते.*

*त्यांच्या असंख्य चाहत्यांनी सभागृहात दाटी केली होती. त्यांच्या चेहर्यावर जोतीरावां विषयी प्रेम ,कृतज्ञता ,आदर व अभिमान दिसत होता.* *सर्व वक्त्यांनी जोतीरावांच्या कार्यावर स्तुतीसुमने उधळली .त्यांना रावबहादुर वड्डेदार यांच्या हस्ते "महात्मा " हि उपाधी देण्यात आली.*

*सत्काराच्या उत्तराप्रित्यर्थ भाषण करताना जोतीराव म्हणाले, "मी जे काही केलं ते उपकाराच्या भावनेतून केलं नाही तर ते माझे कर्तव्य होते.* *माझ्या बांधवांसाठी मी झगडलो, लढलो. सत्यशोधक समाजाच्या कार्याचा घराघरातून प्रचार व्हावा .खेड्यापाड्यात सत्यशोधक विचार पसरावे.* 

 *हीच अपेक्षा मी आजच्या दिवसी करतो* ...

 *जोतीराव फुले यांना मिळालेली महात्मा* ही *पदवी कोणत्या* *शासनाने दिली नाही तर* 

 *जोतीराव फुले यांना महात्मा ही पदवी* *लोकांनी दिली होती. महात्मा* *हा विशाल अंतःकरणाचा* *धनी असतो, त्याचे* *हृदय करुणा आणि मैत्री यांनी* *भरलेले असते.* 


 *सध्या लाॅकडाऊनमधे सुद्धा महाराष्ट्रभर अनेक* *ठिकाणी लोकं* " *सत्यशोधक पद्धतीने विवाह* " *करत आहेत, हा तात्यासाहेब* *म.फुलेंच्या सत्यशोधक* *विचारांचा विजय आहे* , *प्रभाव आहे .* 


 *संत तुकाराम महाराज म्हणतात ** *जे का रंजले गांजले* । *त्यासी म्हणे जो आपुले* ।। *तोचि साधू ओळखावा* *देव तेथेचि जाणावा** ।।

 *हा अभंग म. जोतीराव फुलेंना तंतोतंत* *लागू होतो .* 

  

 *सत्याचा पालनवाला ।* 

 *हा धन्य जोतिबा झाला ।।* 

 *पतितांचा पालनवाला ।* 

 *हा धन्य महात्मा झाला* ।।


🌹 *सत्य हीच निती* ।

 *बाकिची कुनिती जोती म्हणे*  ।। 🌹

 *जे सत्य आहे, सत्यावर आधारित आहे* *तीच खरी निती* *होय.* 

 *बाकिची अनिती होय, पाखंड होय* , *थोतांड व कपट-कारस्थान होय -  हा तात्यासाहेब* *म.जोतिराव फुलेंनी* *अखंडातून दिलेला सत्यशोधक* *विचार, संदेश आजही* *तेवढाच प्रासंगिक आहे* ...

संकलन गजानन गोपेवाड राज्य समन्वयक महाराष्ट्र 

🙏🙏🙏

🌹🌹🌹

रविवार, ९ मे, २०२१

10 मे जगदिश खेबुडकर जयंती

 🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼

*🎶🎶जगदीश खेबुडकर🎶🎶*

🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼

जन्म नाव -)  जगदीश खेबुडकर

🎵🎵🎵🎵🎵🎵🎵🎵🎵🎵🎵

*जन्म  -) १० मे  इ.स. १९३२*

      (खेबवडे,हळदी,जिल्हा-कोल्हापूर,महाराष्ट्र,भारत)

*मृत्यू -) ०३ मे  इ.स. २०११*

    (कोल्हापूर,महाराष्ट्र,भारत)

राष्ट्रीयत्व -) भारतीय


कार्यक्षेत्र -) गीतकार,कविता,साहित्य,चित्रपट


भाषा -)    मराठी


साहित्य प्रकार -)गीतरचना,प्रसिद्ध साहित्यकृती

पिंजरा या मराठी चित्रपटातील गीते


अपत्ये -) अभंग, मुक्तछंद ही मुले, कविता पडळकर, अंगाई महाजनी या मुली


*पुरस्कार* -) महाराष्ट्र राज्य शासनाच्यावतीने ११ वेळा सन्मानित


*जीवन-*


खेबुडकरांचा जन्म १० मे, इ.स. १९३२ रोजी कोल्हापूर - राधानगरी रस्त्यावरील खेबवडे, हळदी या गावी झाला. वडिलांच्या शिक्षकाच्या नोकरीमुळे त्यांच्या सतत बदल्या होत. त्यामुळे खेबुडकरांचे प्राथमिक शिक्षण वेगवेगळ्या ठिकाणी झाले. वयाच्या १६ व्या वर्षी मानवते तू विधवा झालीस.. हे खेबुडकरांचे पहिले दीर्घकाव्य लिहिले गेले असे मानले जाते. महात्मा गांधींच्या खुनानंतर जेव्हा त्यांचे घर जाळले गेले. त्या घराच्या राखेचा ढिगारा पाहून हे काव्य त्यांना सुचले. त्यानंतरच त्यांचा कवी आणि गीतकार म्हणून प्रवास सुरू झाला. लोकसंगीत, पोवाडा, अभंग, ओवी अशा विविध काव्य प्रकारांमध्ये त्यांनी रचना केल्या. जगदीश खेबूडकर हे पेशाने शिक्षक होते.


*जगदिश खेबुडकर यांनी आपल्या कारकीर्दीत तीन हजार पाचशे कविता आणि अडीच हजारांपेक्षा अधिक गीते लिहिली.* सुधीर फडके, पं. भीमसेन जोशी, वसंतराव देशपांडे, प्रभाकर कारेकर यांच्यापासून ते अलीकडच्या सोनू निगमपर्यंत सर्वच नामांकित गायकांनी त्यांची गीते गायली आहेत. संत एकनाथांच्या रचनांचा त्यांच्यावर प्रभाव होता. भा. रा. तांबे, कुसुमाग्रज, बा. भ. बोरकर, बा. सी. मर्ढेकर या थोर कवींचा प्रभाव आपल्यावर असल्याचे खेबुडकर मानत असत. साधे सोपे परंतु अर्थगर्भ व नादमयी शब्द हे त्यांच्या गाण्याचे वैशिष्ट्य आहे. जेव्हा त्यांच्या शेवटच्या काळात त्यांना आधार रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते त्यावेळी उपचार घेतानाही त्यांचे गीत-लेखनाचे कार्य सुरूच होते.


*कारकीर्द-*

त्यांचे पहिले गीत इ.स. १९५६ रोजी आकाशवाणीवर प्रसारित झाले. इ.स. १९६० मध्ये त्यांचे पहिले चित्रगीत आणि पहिली लावणी मला हो म्हणत्यात लवंगी मिरची प्रदर्शित झाली. ’रंगल्या रात्री अशा’ या चित्रपटाची गीते लिहिण्याची ही संधी त्यांना वसंत पवार, संगीतकार यांनी दिली होती. ‘साधी माणसं’, ‘आम्ही जातो आमच्या गावा’,‘कुंकवाचा करंडा’ आदी चित्रपटांसाठीची त्यांची गीते अतिशय गाजली. साडेतीन शक्तिपीठांचे वर्णन करणारे 'दुर्गा आली घरा' हे सर्वात मोठं १६ मिनिटे कालावधीचे गाणे खेबुडकर यांनी लिहिले आहे.


त्यांनी सुमारे ३२५ मराठी चित्रपटांसाठी गीते लिहिली. २५ पटकथा, संवाद , ५० लघुकथा, पाच नाटके, चार दूरदर्शन मालिका , चार टेलिफिल्म , पाच मालिका गीते इतकी साहित्य संपदा त्यांनी निर्माण केली आहे. त्यांची सांगीतिक कारकीर्द पाच दशकांइतकी मोठी होती. ग.दि.माडगुळकरांनंतर इतका मोठा गीतकार झालेला नव्हता.


त्यांच्या कारकीर्दीत भालजीं पेंढारकर ते यशवंत भालकर असे विविध ३६ दिग्दर्शक, वसंत पवार ते शशांक पोवार असे ४४ संगीतकार आणि सुधीर फडके ते अजित कडकडे अशा ३४ गायकांसमवेत खेबुडकर यांनी काम केले.


*संस्था-*

इ.स. १९७४ साली त्यांनी स्वरमंडळ ही पहिली नाट्यसंस्था स्थापन केली. स्वरमंडळसंस्थेमार्फत रामदर्शन हा रामायणावरील वेगळा प्रयोग त्यांनी सादर केला होता. त्यानंतर इ.स. १९८० मध्ये रंगतरंग व इ.स. १९८२ मध्ये रसिक कला केंद्राची स्थापना केली. रंगतरंग संस्थेद्वारे गावरान मेवा हा कार्यक्रम त्यांनी बसविला होता. त्याचे सुमारे दोन हजारांपेक्षा जास्त कार्यक्रम झाले. इ.स. १९८६ मध्ये नाट्यकलेच्या सेवेसाठी "नाट्यछंद' आणि इ.स. १९८६ मध्ये अभंग थिएटर्सची स्थापना केली.


*पुरस्कार*

जगदीश खेबुडकर यांना ६०हून अधिक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.


राज्य शासनाच्यावतीने ११ वेळा सन्मानित (त्यातला एक -) सवाल माझा ऐका इ.स. १९६४ साठी)

* गदिमा पुरस्कार

* कोल्हापूरभूषण पुरस्कार

* फाय फाउंडेशन पुरस्कार

* साहित्य सम्राट पुरस्कार

* रसरंग फाळके पुरस्कार

* व्ही.शांताराम स्मृति जीवनगौरव पुरस्कार

* शिवाजी सावंत पुरस्कार 

* बालगंधर्व स्मारक समितीचा बालगंधर्व पुरस्कार

* जीवनगौरव पुरस्कार

* शाहू पुरस्कार

* करवीर भूषण

* दूरदर्शन जीवनगौरव

* कुसुमाग्रज साहित्य पुरस्कार

* शरद क्रीडा आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानातर्फे दिलेला राम कदम कलागौरव पुरस्कार (२००६)

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

संकलन -)

गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

9 महाराणा प्रताप जयंती

 *🚩🚩🚩शत्-शत् नमन🚩🚩🚩*

 *🚩🚩🚩९ मई/जन्म जयंती,🚩🚩🚩*

*🚩🚩कर्मवीर महाराणा प्रताप।🚩🚩*

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

“बलिदान केवल बलिदान”- चित्‍तौड़ की स्‍वतंत्रता देवी बलिदान चाहती है। बादल उमड़े थे, बिजलियां कड़की थीं और घोर अंधकार छा गया था। अपवित्रता पवित्रता पर कब्‍जा करना चाहती थी और अनाचार आचार और व्‍यवहार की ईंट से ईंट बजा देने वाला था। हृदय कांप उठे थे, अशांति की लहरें बड़े जोरों से शांति के किले के कँगूरों को एक-एक करके ढा रही थीं। सूर्यदेव भी अपने वंशजों को सदा के लिये अंधकार में छोड़ देने के लिये तैयार थे और चित्‍तौड़ की दीवारें भी ऊँचा सिर रखते हुए नीची नजर कर चुकी थीं। बेढब बाजी लगी थी। पद्ममिनी का दाँव था। पाँसे उलटे पड़ रहे थे। लेकिन रुख बदला, किसी की दया या कृपा से नहीं और किसी की कमजोरी या नीचता से भी नहीं। रक्‍त की वर्षा हो गयी, रक्‍त की प्‍यासी भूमि की प्‍यास मिट गयी। चित्‍तौड़ की देवियों को राख का ढेर होते देख कर चित्‍तौड़ की स्‍वतंत्रता देवी के हृदय का ताप मिट गया।


फिर वही दृश्‍य और फिर वही कार्य। समय के पहिये घूमे और चित्‍तौड़ की स्‍वतंत्रता देवी ने, दया से या निर्दयता से, फिर अपना खप्‍पर हाथ में ले लिया। वीरों ने फिर उसे अपने अमूल्‍य खून से भर दिया। लेकिन जयमल और उसके वीर साथियों का रक्‍त उसकी प्‍यास को न बुझा सका। चित्‍तौड़ की देवियों ने अपने कोमल शरीरों को उसके लिये अग्नि के सुपुर्द किया। लेकिन उन्‍हें मुट्ठी-भर ही खाक में पलट जाते हुए देख कर उसके हृदय की जलन और बढ़ी, और इतनी बढ़ी कि वह स्‍वयं चित्‍तौड़ से आगे बढ़ गयी। चित्‍तौड़ खाली हुआ। अकबर का झंडा उस पर फहराने लगा। चित्‍तौड़ के दरोदीवार ने आँसू बहाये। हाथ उठा कर उन्‍होंने अपने कुल-संरक्षक सूर्य और गंभीर आकाश की दुहाइयाँ दीं, लेकिन सूर्य से न किसी अग्नि की चिनगारी ने गिर कर इस्‍लामी झंडे को जला दिया और न आकाश की गंभीरता ही ने उसकी दासता की मात्रा को कम किया। चित्‍तौड़ की स्वतंत्रता देवी चाहती है, “बलिदान”!


“उदयसिंह! आगे बढ़ और अपने प्राण उसकी पवित्र वेदी पर कुर्बान कर। लेकिन अरे! यह क्‍या? देवी की प्रति‍ष्‍ठा करने के लिये उठ कर आगे बढ़ने के बजाय तू पीठ दे कर भागता है! याद रख, तेरी इस भीरुता का फल अच्‍छा न होगा और आने वाली संतानें बड़ी ही शर्म से तेरा नाम लेंगी। सचमुच वह दिन चित्‍तौड़ के लिये बड़ा ही आभागा था, जिस दिन पन्‍ना ने तेरे लिये अपने बच्‍चे के हृदय में कटारी घुसने दी। हत्‍यारे का शिकार तो तुझी को होना था, जिससे फिर चित्‍तौड़ की लाज का शिकार तू इस निर्लज्‍जता के साथ न करने पाता। चित्‍तौड़ ने स्‍वतंत्रता के दिन भोगे थे और अब कालचक्र तेरी आड़ ले कर उसे परतंत्रता की सुनहरी जंजीर से जकड़ने के लिये आगे बढ़ा है। हे भीरु और पतित आत्‍मा! चल, आगे बढ़ और दूसरे के लिये स्‍थान छोड़! ईश्‍वर के लिये नहीं, देश और जाति के लिये नहीं। जिन्‍होंने तेरे पूर्वजों की आन-बान कायम रखने के लिये रणकुंड में अपनी आहुति दे दी थी, बल्कि अपनी ही आत्‍मा की शांति के लिये। जा, इस संसार से उठ जा और उस महापुरुष के लिये स्‍थान खाली कर, जिसके और राणा संग्रामसिंह के बीच में, यदि तूने जन्‍म लेने का कष्‍ट न उठाया होता, तो चित्‍तौड़ को अपनी स्‍वाधीनता शत्रुओं के हाथ मिट्ठी के मोल न देनी पड़ती”।


“आओ प्रताप, आओ, लेकिन पहले परीक्षा दो। स्वतंत्रता देवी के पवित्र मंदिर में उनके लिये स्‍थान नहीं, जिनके हृदय का स्‍थान छोटा है। कैसे परीक्षा दोगे? अपने सिर को कटा कर नहीं, बल्कि अपने सिर को अपने धड़ पर कायम रख कर, बराबर उसके काटे जाने का कष्‍ट सहते हुए, महलों ही को छोड़ कर नहीं, लेकिन इस भीष्‍म शपथ को ले कर कि जब तक चित्‍तौड़ स्‍वाधीन नहीं होता, जब तक उसकी दीवारें सिर उठा कर संसार के साथ नजर न मिला सकें, जब तक उन वीर पुरुषों और वीर स्त्रियों की आत्‍मायें, जिनके खून से चित्‍तौड़ की भूमि सिंची हुई है, अपने मनोवांछित कामों को पूरा होते देख कर प्रसन्‍न न हो जायें, तब तक फूस पर सोयेंगें, पत्‍तों पर खायेंगे और शारीरिक सुखों का स्‍वप्‍नों में भी खयाल न करेंगे।" तपस्‍या का यही अंत नहीं। जो सिर स्‍वतंत्रता देवी के सामने झुकाए याद रखो, उसे अधिकार नहीं कि संसार की किसी शक्ति के सामने झुके। तलवार की धार पर चलना है, लेकिन याद रखो, तुम्‍हारे मुँह से उफ् भी निकली, और तुम गये। ऐसे जाओगे कि कहीं भी पता न लगेगा और अपने साथ ही कितनी ही आशाओं और देश के कितने ही शुभ गुणों को लेते जाओगे।"


अच्‍छा आदर-सत्‍कार पाने पर विभीषण मानसिंह चित्‍तौड़ के कुमार से बोला- “राणा जी के सिर में जो दर्द है, उसकी दवा ले कर शीघ्र ही लौटूँगा”. वि‍भीषण-चिकित्‍सक मानसिंह शीघ्र ही लौटा। हल्‍दीघाटी के मैदान ने इस सुयोग्‍य चिकित्‍सक का आव्‍हान किया।  प्रताप भी अपनी कठिनाइयों का पहला पाठ पढ़ने के लिये इस रणक्षेत्र की ओर आगे बढ़ा। २२००० साथी, लेकिन अंत में ८००० ही बचे, शेष सब प्रताप को गुरु-दक्षिणा में देने पड़े। घमासान युद्ध! प्राणों का बाजार पूरा गरम! भीषणता और उसका सच्‍चा महत्‍व उसी समय समझ सकते हो, जब एक किसान की कुटी की शांति और सौम्‍यता से इस दृश्‍य की तुलना करो। मनुष्‍य की पाशविक शक्ति का पूरा नमूना, लेकिन साथ ही संसार के उज्‍जवल गुणों का पूरा खजाना। सैनिक मरते हुए एक पर एक गिर रहे हैं। ढाल-लेकिन अंत में कोमल शरीर ही ढाल का काम देते हैं। तलवार-मनुष्‍य के रक्‍त की तरलता देख कर उसका पानी और भी तरल हो जाता है। बर्छियाँ-जरा-सा भी अन्‍याय नहीं करतीं। इस यज्ञ-कुंड में, प्रताप, तुम अपनी जान की बार-बार आहुति दे रहे हो। लेकिन तुम इस तरह से छुटकारा नहीं पा सकते, तुम्‍हें संसार में रह कर संसार से संग्राम करना है। मानसिंह, लेकिन वह विभीषण के हवाले कर प्रताप के सामने न आ सका। ओह! सलीम बच्‍चा है, छोड़ो प्रताप, उसे छोड़ो। आह, अब तुम बेतरह घिर गये। तुम अकेले और ये इस्‍लामी सिपाही सैकड़ों! तुम्‍हारा मुकुट इस समय तुम्‍हारा शत्रु हो गया है, फेंक दो उसे। लेकिन कितने मारोगे? एक, दो, तीन। अरे, वे आते ही जाते हैं, अब भी फेंक दो, फेंको भी देश और जाति को, नहीं संसार को तुम्‍हारी जान तुम्‍हारे सोने के तुच्‍छ मुकुट से ज्यादा प्‍यारी है। नहीं फेंकोगे? अच्‍छा राजपूत वीरो, आगे बढ़ो! देखो, तुम्‍हारा अधिपति मुफ्त ही में जा रहा है। बढ़ो आगे, बचाओ, बचाओ। हाँ, सदरी के झाला! तुम, हाँ बढ़ो, बढ़ो बसठी के झाला के सिर पर मुकुट है। मुगल तलवारें झाला पर पड़ने लगीं। प्रताप को उन्‍होंने छोड़ दिया। एक जान के बदले दूसरी जान। झाला ने अपनी जान दे कर अधिक कीमती जान बचा ली। रक्‍त-नदी बह उठी। लेकिन, चित्‍तौड़ की स्‍वतंत्रता देवी की प्‍यास न बुझी। अभी तो परीक्षा आरंभ ही हुई है। प्रताप, एक किले के बाद दूसरा किला दो। अब किले नहीं रहे तो जाओ, पहाड़ियों और जंगलों की खाक छानो। ऐं, रसद बंद हो गयी, तो क्‍या हर्ज? पत्‍ते कहीं नहीं गये, जंगल का साया और कोदों का कोई हाथ न पकड़ लेगा। आज यहाँ, तो कल वहाँ, घास की रोटियाँ खाते ही मुगल आ पहुँचे। लड़ते-भिड़ते निकल चलो। सोने का बिछौना नहीं, कोई हर्ज नहीं। बड़ों के लिये पत्‍थर की चट्टानों और बच्‍चों के लिये बाँस के पालने ही सही। अँधेरी रातें, धधकती दुपहरिया, कड़ाके का जाड़ा, वर्षा की रिमझिम, आत्‍मा की आग और परमात्‍मा की उदासीनता। साथियों का मरते जाना और सैनिकों का कम होते जाना, कठिन तपस्‍या और कठोर व्रत। आराधना और स्‍वतंत्रता देवी की पूरी पक्‍की आराधना। चंचलता फटकने न पावे और अकर्मण्‍यता पास न आने पावे। एक दिन नहीं और दो दिन भी नहीं, एक साथ पच्चीस वर्ष तक।


यह कैसी चीत्‍कार? चित्‍तौड़ की राजकुमारी के हाथ से एक वन-बिलाव घास-पात की रोटी छीन ले गया। राजकुमारी चीख उठी। बिलाव के डर से नहीं, भूख के डर से। राजकुमारी और रोटी के लिये तरसे, लेकिन प्रताप, यह क्‍या? तुम्‍हारी आत्‍मा काँप उठी? लड़की की वेदना देख कर और परिवार के कष्‍टों से क्‍या अब स्‍वतंत्रता देवी को अंतिम नमस्कार करना चाहते हो? शांत हो और जरा विचारो। देखो, वह तुम्‍हारे शत्रु, नहीं, स्‍वतंत्रता के शत्रु अपने खेमों में घी के दीप जला रहे हैं। क्‍यों? तुम्‍हारी हिम्‍मत टूटती हुई देख कर। इन दीपकों के घी और बत्‍ती के साथ, सच बताओ, तुम्‍हारा हृदय जला कि नहीं? हाँ, जला और अब उस जले पर नमक छिड़कने की जरूरत नही।


हो चुका। बस, चित्‍तौड़ की पवित्र भूमि, तुझे नमस्‍कार है। तुझे छोड़ता हूँ। लेकिन स्‍वतंत्रता की देवी का पल्‍ला नहीं छोड़ता। जो था, सो सब इस देवी को अर्पण हो चुका। शरीर में जो हड्डियाँ बाकी हैं, वे भी उसके अर्पण हो चुकी हैं। जननी जन्‍मभूमि! अंतिम दर्शन है। ले, आज्ञा दे!


प्रताप, आगे मत बढ़ो। तुम्‍हारी सच्‍ची माता तुम्‍हें बुला रही है। हरिश्‍चंद्र अपनी दासता के कर्तव्‍य में, जब हद से ज्‍़यादा आगे बढ़ गये थे, तब कहते हैं कि निराकर प्रभु ने आ कर उनका हाथ पकड़ा था। मेवाड़ की भूमि भी तेरा पैर पकड़ रही है। देख, उसका एक सपूत आगे बढ़ता है। भामाशाह तेरे पैर थामता है। देश को मत छोड़, वह तुझे छोड़ने के लिये तैयार नहीं। भाग्‍य भी अभी तक तुझे छोड़े था, लेकिन अब वह प्रार्थना करता है, उसे मत छोड़। ले धन! पच्चीस हजार आदमी इस धन से बारह वर्ष तक खा सकेंगे। तेरी साहस और तेरी दृढ़ता और उदारता के सामने उसका आसन डोल उठा है। देख, इस समय उसके हाथ में खप्‍पर नहीं, उसके हृदय में जलन नहीं, शांति से वह मुस्‍करा रही है, उसके हाथों में माला है और देख, वह तेरे गले में गिरती है।


महान् पुरुष, निस्‍संदेह महान्, पुरुष. भारतीय इतिहास के किसी खून में इतनी चमक है? स्‍वतंत्रता के लिये किसी ने इतनी कठिन परीक्षा दी? जननी जन्‍मभूमि के लिये किसने इतनी तपस्‍या की? देशभक्‍त, लेकिन देश पर अहसान जताने वाला नहीं, पूरा राजा, लेकिन स्‍वेच्‍छाचारी नहीं. उसकी उदारता और दृढ़ता का सिक्‍का शत्रुओं तक ने माना। शत्रु से मिले भाई शक्तिसिंह पर उसकी दृढ़ता का जादू चल गया। अकबर का दरबारी पृथ्‍वीराज उसकी कीर्ति गाता था। भील उसके इशारे के बंदे थे। भामाशाह ने उसके पैरों पर सब कुछ रख दिया। विभीषण मानसिंह उससे नजर नहीं मिला सकता था। अकबर उसका लोहा मानता था। खानखाना उसकी तारीफ में पद्य रचना करना अपना पुण्‍य कार्य समझता था। जानवर भी उसे प्‍यार करते थे और घोड़े चेतक ने उसके ऊपर अपनी जान न्योछावर कर दी थी। स्‍वतंत्रता देवी का वह प्‍यारा था और वह उसे प्‍यारी थी। चित्‍तौड़ का वह दुलारा था और चित्‍तौड़ की भूमि उसे दुलारी थी। उदार इतना कि बेगमें पकड़ी गयीं और शान-सहित वापस भेज दी गयीं। सेनापति फरीद खाँ ने कसम खायी कि प्रताप के खून से मेरी तलवार नहायेगी। प्रताप ने सेनापति को पकड़ कर छोड़ दिया।


अंतिम काल। जान नहीं निकलती। लेकिन, राणाजी, क्‍यों? मुझे विश्‍वास नहीं कि मेरे बाद चित्‍तौड़ की स्‍वाधनीता कायम रह सके। क्‍यों...? राजकुमार अमरसिंह इतना दृढ़ नहीं। राजकुमार दृढ़ न सही, मेवाड़ के वे सरदार राणाजी की कसम खाते हैं कि हम अपने खून से स्‍वतंत्रता के उस बीज को, जो तूने बोया, सींचेंगे शांति और उसकी आत्‍मा शरीर से बाहर हो कर स्‍वतंत्रता देवी की पवित्र गोद में जा विराजी। प्रताप! हमारे देश का प्रताप! हमारी जाति का प्रताप! दृढ़ता और उदारता का प्रताप! तू नहीं है, केवल तेरा यश और कीर्ति है। जब तक यह देश है, और जब तक संसार में दृढ़ता, उदारता, स्‍वतंत्रता और तपस्‍या का आदर है, तब तक हम क्षुद्र प्राणी ही नहीं, सारा संसार तुझे आदर की दृष्टि से देखेगा। संसार के किसी भी देश में तू होता, तो तेरी पूजा होती और तेरे नाम पर लोग अपने को न्‍योछावर करते। अमेरिका में होता तो वाशिंगटन और अब्राहम लिंकन से तेरी किसी तरह कम पूजा न होती। इंग्‍लैंड में होता तो वेलिंगटन और नेल्‍सन को तेरे सामने सिर झुकाना पड़ता। स्‍कॉटलैंड में बलस और रॉबर्ट ब्रूस तेरे साथी होते। फ्रांस में जोन ऑफ आर्क तेरे टक्‍कर की गिनी जाती और इटली तुझे मैजिनी के मुकाबले में रखती। लेकिन हाँ! हम भारतीय निर्बल आत्‍माओं के पास है ही क्‍या, जिससे हम तेरी पूजा करें और तेरे नाम की पवित्रता का अनुभव करें! एक भारतीय युवक, आँखों में आँसू भरे हुए, अपने हृदय को दबाता हुआ लज्‍जा के साथ तेरी कीर्ति गा नहीं-रो नहीं, कह-भर लेने के सिवा और कर ही क्‍या सकता है?

*🌹🌹विनम्र अभिवादन🌹🌹*

संकलन -)

आशिष अ

गजानन गोपेवाड राज्य समन्वयक महाराष्ट्र 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६



शुक्रवार, ७ मे, २०२१

8 मे रेडक्रॉस दिवस

 🏴󠁧󠁢󠁥󠁮󠁧󠁿🏴󠁧󠁢󠁥󠁮󠁧󠁿🏴󠁧󠁢󠁥󠁮󠁧󠁿🏴󠁧󠁢󠁥󠁮󠁧󠁿🏴󠁧󠁢󠁥󠁮󠁧󠁿🏴󠁧󠁢󠁥󠁮󠁧󠁿🏴󠁧󠁢󠁥󠁮󠁧󠁿🏴󠁧󠁢󠁥󠁮󠁧󠁿🏴󠁧󠁢󠁥󠁮󠁧󠁿🏴󠁧󠁢󠁥󠁮󠁧󠁿🏴󠁧󠁢󠁥󠁮󠁧󠁿

*🏴󠁧󠁢󠁥󠁮󠁧󠁿🏴󠁧󠁢󠁥󠁮󠁧󠁿८ मे जागतिक रेडक्रॉस दिन🏴󠁧󠁢󠁥󠁮󠁧󠁿🏴󠁧󠁢󠁥󠁮󠁧󠁿*

🏴󠁧󠁢󠁥󠁮󠁧󠁿🏴󠁧󠁢󠁥󠁮󠁧󠁿🏴󠁧󠁢󠁥󠁮󠁧󠁿🏴󠁧󠁢󠁥󠁮󠁧󠁿🏴󠁧󠁢󠁥󠁮󠁧󠁿🏴󠁧󠁢󠁥󠁮󠁧󠁿🏴󠁧󠁢󠁥󠁮󠁧󠁿🏴󠁧󠁢󠁥󠁮󠁧󠁿🏴󠁧󠁢󠁥󠁮󠁧󠁿🏴󠁧󠁢󠁥󠁮󠁧󠁿🏴󠁧󠁢󠁥󠁮󠁧󠁿

    *"हेनरी डय़ुनॉट रेडक्रॉसचे संस्थापक होय. त्यांचा जन्म स्वित्झर्लडमधील जिनिव्हा येथे ८ मे १८२८ रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांचा जन्मदिवस🏴󠁧󠁢󠁥󠁮󠁧󠁿 ‘रेडक्रॉस दिन’ म्हणून जगभर साजरा केला जातो."*

१८५९ साली नेपोलिनच्या युद्धाच्या वेळी उत्तर इटलीमध्ये हेनरी डय़ुनॉट यांनी अनेक जखमी माणसे पाहिली.स्थानिक लोकांची मदत घेऊन त्यांनी जखमींची शुश्रूषा केली.मेमरी ऑफ सेलफरिनो या पुस्तकामध्ये याचा अनुभव त्यांनी कथित केला आहे. १८६३ साली जिनिव्हातील उत्साही सामाजिक र्कायकर्ते एकत्र येऊन पाचजणांची समिती स्थापन केली त्या समितीचे प्रमुख हेनरी डय़ुनॉट होते.या समितीने आंतरराष्ट्रीय रेडक्रॉसची स्थापना केली. डय़ुनॉटनी अनेक वर्षे त्याचे चिटणीसपद भूषविले.१८६४ मध्ये १६ राष्ट्रांचे प्रतिनिधी पहिल्या रेडक्रॉस परिषदेस उपस्थित होते आणि त्यांनी ऐतिहासिक पहिल्या जिनिव्हा करारावर सह्या केल. आंतरराष्ट्रीय क्षेत्रात रेडक्रॉसची कार्यप्रणाली सदर करारावर आधारली आहे. पक्ष, वंश, धर्म यांचा विचार न करता मानवी दु:खाचा परिहार करण्याकरिता रेडक्रॉस चळवळ एक स्वयंप्रेरित आंतरराष्ट्रीय संघटना म्हणून उदयास आली. आज जगातील प्रत्येक देश या आंतरराष्ट्रीय संघटनेशी संलग्न आहेत आणि या संघटनेचे बोधचिन्ह मानवी अनुकंपेचे प्रतीक म्हणून ओळखले जाते.

रेडक्रॉस ही आंतरराष्ट्रीय संस्था खालील तत्त्वानुसार काम करते-


मानवता- आंतरराष्ट्रीय आणि आंतरदेशीय क्षेत्रात रेडक्रॉस संघटना मानवी दु:खांना आळा घालण्यात आणि शक्य असेल तेवढा परिहार करण्यात प्रयत्नशील असते.


निष्पक्षपातीपणा- राष्ट्रीयत्व, वंश, धर्म, वर्ग किंवा राजकीय मते यांच्या आधारे भेदभाव करत नाही.


तटस्थपणा- युध्द काळात रेडक्रॉस कोणत्याही एका पक्षाची बाजू घेत नाही.


स्वतंत्र- रेडक्रॉस एक स्वतंत्र संघटना आहे.


ऐच्छिक सेवा- रेडक्रॉस एक ऐच्छिक दु:ख परिहार करणारी संघटना आहे.


एकता- प्रत्येक देशात एकच रेडक्रॉस संघटना असली पाहिजे या संघटनेत सर्वाना प्रवेश असला पाहिजे.


विश्वात्मकता - रेडक्रॉस ही जागतिक संघटना आहे. तिच्यामध्ये सर्व रेडक्रॉस संस्थांना समान मानले जाते आणि संघटनेची कर्तव्ये पार पाडण्याची त्यांच्यावर समान जबाबदारी आहे.

रेडक्रॉसचे बोधचिन्ह म्हणजे रेडक्रॉस चळवळ आणि सैनिकी, वैद्यकीय सेवा यामध्ये मुख्यत्वे सशस्त्र लढाया आणि नैसर्गिक संकटाच्यावेळी मानवतावादी कार्य करण्याच्या लोकांचे प्रतीक हो. वैद्यकीय सेवा करणार्‍या लोकांचे ते बोधचिन्ह नाही.

*🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏*

संकलन -)

गजानन गोपेवाड राज्य समन्वयक महाराष्ट्र राज्य 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

गुरुवार, ६ मे, २०२१

शशिकुमार चित्रे खगोलशास्त्र जयंती

 *🔭🔭🔭शशिकुमार चित्रे🔭🔭🔭*

🔭🔭🔭🔭🔭🔭🔭🔭🔭🔭🔭

*☄️☄️☄️खगोलशास्त्रज्ञ☄️☄️☄️*

🌕🌕🌕🌕🌕🌕🌕🌕🌕🌕🌕

*जन्मदिन - ७ मे १९३६*

🔭🔭🔭🔭🔭🔭🔭🔭🔭🔭🔭

डॉ. शशिकुमार मधुसूदन चित्रे (जन्म : ७ मे इ‌.स. १९३६) हे एक मराठी खगोलभौतिकशास्त्रज्ञ आहेत. ते केंब्रिज, प्रिन्स्टन, कोलंबिया, ॲम्स्टरडॅम, व्हर्जिनिया, लंडन आदी विद्यापीठांमध्ये अतिथी व्याख्याते असून, रॉयल ॲस्ट्रॉनॉमी सोसायटी, इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल युनियन यांसह खगोलभौतिकी क्षेत्रातील बऱ्याच प्रतिष्ठित संस्थांचे फेलो आहेत.


१९५६ मध्ये मुंबईतील एलफिन्स्टन कॉलेजमधून गणितात पदवी घेतल्यानंतर शशिकुमार चित्रे यांना त्याच वर्षी ड्यूक ऑफ एडिंबरो पाठ्यवृत्ती मिळाली. त्यानंतर ते गणितातील उच्च शिक्षणासाठी केंब्रिज सोसायटी ऑफ बॉम्बेचे स्कॉलर म्हणून पीटरहाऊस, केंब्रिजला गेले. १९५९ मध्ये त्यांनी केंब्रिज विद्यापीठामधून पदवी घेतली. त्यानंतर चर्चिल कॉलेजमध्ये गुलबेनकिअन संशोधन पाठ्यवृत्तीवर काम केल्यानंतर १९६३ मध्ये त्यांनी केंब्रिजच्याच उपयोजित गणित व सैद्धान्तिक पदार्थविज्ञान विभागामधून पीएच.डी पूर्ण केले.


अध्यापन

१९६३ ते १९६६ या काळात चित्रे यांनी त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ लीड्समध्ये उपयोजित गणिताचे अध्यापन केले. त्या काळात डॉ. चित्रे यांच्या हाताखाली पीएच.डी.चे अनेक विद्यार्थी तयार झाले.


संशोधन

१९६७ ते २००१ या काळात मुंबईच्या टाटा मूलभूत संशोधन संस्थेमध्ये व्याख्याते असल्याने डॉ. चित्रे यांचे नाव टीआयएफआरशी जोडलेले आहे. निवृत्तीनंतर तॆ मुंबई विद्यापीठातील मौलिक विज्ञान प्रकर्ष केंद्राच्या विद्वत सभेचे अध्यक्ष म्हणून काम करीत आहेत.


डॉ. शशिकुमार मधुसूदन चित्रे यांनी भारतातच राहून खगोलभौतिकशास्त्रात संशोधन करण्याचा वसा घेतला आहे. सौरभौतिकशास्त्र, भौतिकशास्त्र, खगोलभौतिकशास्त्र हे त्यांच्या संशोधनाचे विषय आहेत. सूर्यावरील काळे डाग, त्यावरील चुंबकीय बदल, सौरवादळांच्या प्रक्रिया, कृष्णविवरे अशा विविध विषयांवर त्यांनी संशोधन केले आहे.


डॉ. शशिकुमार चित्रे यांना मिळालेले पुरस्कार

विज्ञान क्षेत्रातील विविध सन्मान

पद्मभूषण पुरस्कार (२०१२)

कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा गोदावरी गौरव पुरस्कार (२०१६)

🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

संकलन -)

गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा-यवतमाळ ४४५२०६

 Thanks 

बुधवार, ५ मे, २०२१

राज श्रीछत्रपती शाहु महाराज पुण्यतिथी

 ➿➿➿➿➿➿➿➿➿➿

🇮🇳🇮🇳 *गाथा बलिदानाची* 🇮🇳🇮🇳

 ➿➿➿➿➿➿➿➿➿➿                           

            

      *राजर्षी शाहू महाराज*

   *जन्म : २६ जून १८७४*

(लक्ष्मी-विलास राजवाडा,कागल)

         *मृत्यू : ६ मे १९२२*

                  (मुंबई)

          *अधिकारकाळ*

     इ.स. १८८४ - इ.स. १९२२

          *अधिकारारोहण*

       ०२ एप्रिल इ.स. १८९४

राज्यव्याप्ती : कोल्हापूर जिल्हा

राजधानी : कोल्हापूर

पूर्ण नाव : छत्रपती शाहू महाराज भोसले

पूर्वाधिकारी : छत्रपती शिवाजी महाराज (चौथे शिवाजी)

राजाराम ३

उत्तराधिकारी : छत्रपती राजाराम भोसले

वडील : आबासाहेब घाटगे

आई : राधाबाई

पत्नी : महाराणी लक्ष्मीबाई भोसले

राजघराणे : भोसले

राजब्रीदवाक्य :जय भवानी

शाहू महाराज भोसले  छत्रपती शाहू महाराज, राजर्षी शाहू महाराज, कोल्हापूरचे शाहू व चौथे शाहू नावाने प्रसिद्ध, हे कोल्हापूर राज्याचे इ.स. १८८४-१९२२ दरम्यान छत्रपती व समाजसुधारक होते. ब्रिटिश राजसत्तेच्या काळामध्ये सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी व बहुजन समाजाच्या एकूणच सामाजिक उन्नतीसाठी या काळामध्ये शाहू राजांनी अथक प्रयत्न केले, सामाजिक परिवर्तनाला गती प्राप्त करून दिली सनातनी वर्गाच्या विरोधाला न जुमानता त्यांनी दलित (अस्पृश्य) व मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.

💁‍♂️ *जीवन*

शाहू महाराजांचा जन्म २६ जून इ.स. १८७४ रोजी कागल येथील घाटगे घराण्यात झाला. त्यांचे मूळ नाव यशवंत, त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव (आप्पासाहेब) तर आईचे नाव राधाबाई होते. कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्‍नी आनंदीबाई यांनी १७ मार्च १८८४ रोजी यशवंतरावांना दत्तक घेतले, व 'शाहू' हे नाव ठेवले. सन१८८९ ते १८९३ या चार वर्षांच्या कालखंडात धारवाड येथे शाहू महाराजांचा शैक्षणिक आणि शारीरिक विकास झाला. शिक्षण चालू असतानाच १ एप्रिल १८९१ रोजी बडोद्याच्या गुणाजीराव खानविलकर यांच्या लक्ष्मीबाई या मुलीशी शाहू विवाहबद्ध झाले. या वेळी त्यांचे वय १७ वर्षांचे होते आणि लक्ष्मीबाई वय १२ वर्षांहून कमी होते. २ एप्रिल १८९४ रोजी त्यांचा राज्यारोहण समारंभ झाला. राज्याभिषेक झाल्यानंतर इ.स. १९२२ सालापर्यंत म्हणजे २८ वर्षे ते कोल्हापूर संस्थानाचे राजे होते. मुंबई येथे ६ मे १९२२ रोजी त्यांचे निधन झाले.


🔸 *कार्य*

शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षणप्रसार करण्यावर विशेष भर दिला. त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली. अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी इ.स. १९१९ साली सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत बंद केली. जातिभेद दूर करण्यासाठी त्यांनी आपल्या राज्यात आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. इ.स. १९१७ साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवाविवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली. बहुजन समाजाला राजकीय निर्णयप्रक्रियेत सामावून घेण्यासाठी त्यांनी इ.स. १९१६ साली निपाणी येथे ‘डेक्कन रयत असोसिएशन’ ही संस्था स्थापली. वेदोक्त मंत्र म्हणण्याच्या अधिकारावरून झालेले वेदोक्त प्रकरण शाहू महाराजांच्याच काळात झाले.


त्यांचे शिक्षण ब्रिटिश अधिकारी फ्रेजर यांच्या हाताखाली झाले. पुढील शिक्षण राजकोटच्या राजकुमार कॉलेज मध्ये व धारवाड येथे झाले. अभ्यास व् शैक्षणिक सहलीद्वारे मिळालेले व्यवहारज्ञान यामुळे शाहूराजे यांचे व्यक्तिमत्व विकसित झाले होते. १८९६ चा दुष्काळ व नंतर आलेली प्लेगची साथ या काळात त्यांची कसोटी लागली आणि त्याला ते पूर्णपणे उतरले. दुष्काळी कामे, तगाईवाटप, स्वस्त धान्यदुकाने, निराधार आश्रमाची स्थापना हे कार्य पाहता 'असा राजा होणे नाही' असेच प्रजेला वाटते.


‘शाहू छत्रपती स्पिनिंग अँड वीव्हिंग मिल’, शाहुपुरी व्यापारपेठ, शेतकऱ्यांची सहकारी संस्था, शेतकी तंत्रज्ञानाच्या संशोधनासाठी ‘किंग एडवर्ड अ‍ॅग्रिकल्चरल इन्स्टिट्यूट’ इत्यादी संस्था कोल्हापुरात स्थापण्यात त्यांचा प्रमुख वाटा होता. राधानगरी धरणाची उभारणी, शेतकऱ्यांना कर्जे उपलब्ध करून देणे अशा उपक्रमांतूनही त्यांनी कृषिविकासाकडे लक्ष पुरवले.


त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या शिक्षणासाठी, तसेच मूकनायक वृत्तपत्रासाठीही सहकार्य केले होते. त्यांनी चित्रकार आबालाल रहिमान यांच्यासारख्या कलावंतांना राजाश्रय देऊन प्रोत्साहन दिले. शाहू महाराजांना 'राजर्षी' ही उपाधी कानपूरच्या कुर्मी क्षत्रिय समाजाने दिली.


स्वातंत्र्यापूर्वी कैक वर्षे आधी समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता, सर्व घटकांना विकासाची समान संधी ही तत्त्वे शाहू महाराजांनी करवीर संस्थानात अमलात आणली. म्हणूनच त्यांचा देशभरात 'महाराजांचे महाराज' असा गौरव होतो. रयत प्रजा व उपेक्षित समाजाला त्यांचे हक्क व न्याय मिळवून देण्याचे कार्य शाहूंनी केले आपल्या संपूर्ण जीवन कार्यामध्ये त्यांनी समाजातील बहुजन समाजाला त्यांचे न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी आपल्या अधिकाराचा पूर्णपणे वापर केला म्हणूनच ते लोककल्याणकारी राज्यकर्ते ठरले. त्यांच्या कार्याचा गौरव समकालीन लेखकांनी व इतिहासकारांनी केलेला आहे


महाराजांनी सुमारे २८ वर्षे राज्यकारभार केला. शाहू राजांना बहुजनांच्या शिक्षणाविषयी तळमळ होती. म्हणून कोल्हापूर संस्थानात सक्तीच्या मोफत शिक्षणाचा कायदा केला. तसेच ५०० ते १००० लोकवस्तीच्या गावांमध्ये शाळा काढल्या. जे पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवणार नाहीत त्या पालकांना प्रतिमहिना १ रू. दंड आकरण्याची कायदेशीर तरतूद केली. त्यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. अस्पृश्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करण्याच्या उद्देशाने शाहू महाराजांनी अस्पृश्यांना स्वावलंबी बनवण्याचे ठरवले. त्यासाठी अस्पृश्यांना स्वतंत्र व्यवसाय करण्यास प्रोत्साहन दिले, दुकाने हॉटेल्स काढण्यासाठी प्रोत्साहन दिले, तसेच आर्थिक मदत देखील देऊ केली. अस्पृश्यांना शिवण यंत्रे देऊन स्वतंत्र व्यवसाय करण्यास प्रोत्साहन दिले राजवाड्यातील कपडे त्यांच्याकडून शिवून घेण्यास सुरुवात केली गंगाधर कांबळे या व्यक्तीला कोल्हापुरात मध्य वस्तीत चहाचे दुकान काढून दिले अस्पृश्यांना समाजात प्रतिष्ठा प्राप्त व्हावी म्हणून त्यांनी महार पैलवानांना पैलवान चांभार यांना सरदार अभंग यांना पंडित अशा पदव्या दिल्या अस्पृश्य सुशिक्षित तरुणांची तलाठी म्हणून नेमणूक केली.


अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत १९१९ मध्ये बंद केली. गावच्या पाटलाने कारभार चांगला चालवावा यासाठी शिक्षण देणाऱ्या पाटील शाळा, प्रत्यक्ष व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या, तंत्रे व कौशल्ये शिकवणाऱ्या शाळा असेही उपक्रम त्यांनी राबवले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा व कार्याचा वारसा समर्थपणे चालवणारा राजा म्हणून आपली ओळख निर्माण केली. सामाजिक बंधुभाव, समता, दलित व उपेक्षित बांधवांचा उध्दार, शिक्षण, शेती, उद्योगधंदे, कला, क्रिडा व आरोग्य इत्यादी महत्वपूर्ण क्षेत्रामध्ये अद्वितीय स्वरूपाचे कार्य केले.


मागासलेल्या लोकांना प्रगतीच्या प्रवाहात आणावयाचे असेल तर त्यांच्यासाठी राखीव जागांची तरतूद केली पाहिजे. हा व्यापक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून ६ जुलै १९०२ रोजी कोल्हापूर संस्थानात मागास जातींना ५० टक्के जागा राखीव राहतील अशी घोषणा केली व तिची त्वरित अंमलबजावणी करुन संबंधत अधिकाऱ्याकडून अहवाल मागविले. शाहूंच्या या निर्णयाला तेंव्हा अनेक उच्चवर्णीय पुढाऱ्यांनी विरोध केला. त्या काळात अस्पृश्य मानल्या गेलेल्या जातीच्या लोकांसाठी नोकरीमध्ये राखीव जागांची तरतूद करून सरकारी नोकऱ्या मिळवून दिल्या. शाळा, दवाखाने, पाणवठे, सार्वजनिक विहिरी, सार्वजनिक इमारती इत्यादी ठिकाणी (तत्कालीन) अस्पृश्यांना समानतेने वागवावे असा आदेश त्यांनी कोल्हापूर संस्थानात काढला. १९१७ साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवाविवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली. तसेच त्यांनी देवदासी प्रथा बंद करण्यासाठीही कायद्याची निर्मिती केली. बहुजन समाजाला राजकीय निर्णयप्रक्रियेत सामावून घेण्यासाठी त्यांनी इ.स. १९१६ साली निपाणी येथे 'डेक्कन रयत असोसिएशन' ही संस्था स्थापली.


त्याकाळी धर्माच्या नावाखाली देवांना मुले-मुली वाहण्याची विचित्र पद्धत भारतात चालू होती. परंतु राजांनी आपल्या संस्थानात जोगत्या-मुरळी प्रतिबंधक कायदा करुन ही पद्धत बंद पाडली. जातिभेदाचे प्रस्थ नष्ट व्हावे म्हणून आपल्या संस्थानात आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाहास कायदेशर मान्यता दिली. तसा कायदा पारित केला आणि याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना आपल्या चूलत बहीणीचे लग्न धनगर समाजातील यशवंतराव होळकर यांच्याशी लावून दिले. एवढेच नव्हे तर संस्थानात जवळजवळ १०० मराठा धनगर विवाह घडवून आणले. अशा अनेक कार्याच्या माध्यमातून त्यांनी स्त्रियांना सन्मानाची वागणूक व दर्जा मिळवून दिला.


तत्कालीन परिस्थितीमध्ये जातिव्यवस्थेची शिकार झालेल्या अनेक जमाती त्या काळात चोऱ्या, दरोडे अशा चुकीच्या मार्गांचा अवलंब करत होत्या. सनातनी वर्णव्यवस्थेने त्यांना उपेक्षित ठेवून शिक्षण, सत्ता व संपत्तीचा अधिकार नाकारला, त्यामुळे त्यांचे जीवन नैराश्यमय झाले. त्याचाच परिणाम म्हणून त्यांनी चोऱ्या, दरोड्यांचा मार्ग अवलंबला. त्यामुळे ब्रिटिश सरकारने या जमातीवर गुन्हेगारीचा शिक्का मारला. त्यांना रोज गावकामगाराकडे हजेरी लावावी लागत असे. शाहू राजांना या लोकांविषयी कणव होती. कारण ते खऱ्या अर्थाने वंचितांचे राजे होते. त्यामुळे शाहूंनी हजेरी पद्धत बंद केली. या जाती जमातींच्या लोकांना एकत्रित करून गुन्हेगारीपासून त्यांना परावृत्त केले. त्यांना संस्थानात नोकऱ्या दिल्या. त्यांच्यातून पहारेकरी, रखवालदार, रथाचे सारथी निर्माण केले. त्यांना घरे बांधून दिली. वणवण भटकणाऱ्या लोकांच्या राहण्याची सोय झाली. पोटापाण्याची सोय झाली. त्यामुळे गुन्हेगार म्हणून शिक्का बसलेल्या लोकांना माणूस म्हणून समाजात सन्मानाने वावरता येऊ लागले.


गुन्हेगारांना शासन करणारा सत्ताधीश सर्वत्र पहायला मिळेल. मात्र त्यांना प्रेमाने, मायेने आपलेसे करुन समाजात सामाजिक दर्जा देणारा व त्यांच्यात स्वाभिमान निर्माण करणारा राजा विरळाच. वेदोक्त मंत्र म्हणण्याच्या अधिकारावरून झालेला वेदोक्त संघर्ष राजर्षी शाहूंच्याच काळात झाला. हे महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनातील वादळच होते. या प्रकरणामुळे सत्यशोधक चळवळ आणखी प्रेरित झाली. बहुजन, अस्पृश्य समाजाचा सर्वांगीण विकास साधण्याचे कार्य करताना त्यांनी एका अर्थाने महात्मा फुले यांचीच परंपरा पुढे चालवली. त्यांनी सत्यशोधक चळवळीला प्रत्यक्ष सहकार्य केले. कोल्हापूर संस्थानांमध्ये सत्यशोधक चळवळीचा प्रसार आणि प्रचार करण्याचे ही महत्त्वाची जबाबदारी राजर्षी शाहू महाराजांनी पार पडली त्यांच्या नेतृत्वाखालीच संपूर्ण कोल्हापूर संस्थानांमध्ये सत्यशोधक चळवळ उभी राहिली आणि ती नेटाने पुढे नेण्याची कामगिरी देखील पार पाडली गेली. पुढे या चळवळीचा प्रसार आणि प्रचार करण्याची महत्त्वाची जबाबदारी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी पार पाडली यासाठी त्यांनी शिक्षणातून बहुजन समाजाचा सर्वांगीण विकास हे सूत्र अंगिकारलेे. दलित पीडित उपेक्षित समाजाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला यामागे खरी प्रेरणा ही राजर्षी शाहू, महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची होती. बाबासाहेब आंबेडकरांना माणगावच्या परिषदेमध्ये "दलितांचा नेता" व "भारतीय अग्रणी नेता" म्हणून घोषित केले. यापुढील काळामध्ये बाबासाहेबांनी दलित उपेक्षित समाजाचे नेतृत्व करावं असं आवाहनही महाराजांनी केलं. शाहू यांनी सर्व उपेक्षित समाजातील व अस्पृश्य वर्गातील लोकांना आपल्या संस्थानामध्ये आरक्षणाद्वारे नोकऱ्या देण्याचा प्रयत्न केला यादृष्टीने संपूर्ण भारतामध्ये आरक्षणाचे जनक म्हणून त्यांचा गौरव केला जातो. सामाजिक न्यायाची भूमिका घेऊन शाहूराजांनी सामाजिक समतेसाठी प्रयत्न केले.


शाहूंनी कोल्हापूर संस्थानात संगीत, चित्रपट, चित्रकला, लोककला आणि कुस्ती या क्षेत्रांतील कलावंतांना राजाश्रय देऊन त्यांना प्रोत्साहन देण्याचे महत्कार्य केले.


महाराजानी कोल्हापूर, बेळगाव या भागातील स्वातंत्र्यवीराना वेळोवेळी आर्थिक व इतर मदत केली. शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संबंध चांगले होते. डॉ. बाबासाहेबांनी ‘मूकनायक’ हे साप्ताहिक ३१ जानेवारी १९२० ला प्रथम प्रकाशित केले. परंतु आर्थिक अडचणीमुळे पुढे ते बंद पडले. परंतु हे राजर्षी शाहू महाराजांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तत्काळ आर्थिक मदत केली.


💎 *जातिभेदाविरुद्ध लढा*

राजर्षी शाहू महाराजांचे मूळ नाव यशवंतराव होते. त्यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील घाटगे घराण्यात झाला. महाराजानी सुमारे २८ वर्षे राज्यकारभार केला. त्यांनी आपल्या राज्यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली. अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची दुष्ट पद्धत १९१९ मध्ये बंद केली. गावच्या पाटलाने कारभार चांगला चालवावा यासाठी शिक्षण देणार्‍या पाटील शाळा, प्रत्यक्ष व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या, तंत्रे व कौशल्ये शिकवणाऱ्या शाळा, बहुजन विद्यार्थ्यांंसाठी वैदिक पाठशाळा, संस्कृत भाषेच्या विकासासाठी संस्कृत शाळा असेही उपक्रम त्यांनी राबवले.


📖 *शैक्षणिक कार्य*

शाहू महाराजांनी खालील शाळा सुरू केल्या. 

१. प्राथमिक शाळा २. माध्यमिक शाळा ३. पुरोहित शाळा ४. युवराज/ सरदार शाळा ५. पाटील शाळा ६. उद्योग शाळा ७. संस्कृत शाळा ८. सत्यशोधक शाळा ९. सैनिक शाळा १०. बालवीर शाळा ११. डोंबारी मुलांची शाळा १२. कला शाळा 


🏤 *शैक्षणिक वसतिगृहे*

शाहू महाराजांनी सुरू केलेली शैक्षणिक वसतिगृहे खालीलप्रमाणे आहेत.


१. व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग हाऊस (१९०१) 

२. दिगंबर जैन बोर्डिंग (१९०१) 

३. वीरशैव लिंगायत विद्यार्थी वसतिगृह (१९०६)

 ४. मुस्लीम बोर्डिंग (१९०६) 

५. मिस क्लार्क होस्टेल (१९०८) 

६. दैवज्ञ शिक्षण समाज बोर्डिंग (१९०८) 

७. श्री नामदेव बोर्डिंग (१९०८) 

८. पांचाळ ब्राह्मण वसतिगृह (१९१२) 

९. श्रीमती सरस्वतीबाई गौड सारस्वत ब्राह्मण विद्यार्थी वसतिगृह (१९१५) 

१०. इंडियन ख्रिश्चन होस्टेल (१९१५) 

११. कायस्थ प्रभू विद्यार्थी वसतिगृह (१९१५) 

१२.आर्यसमाज गुरूकुल (१९१८)

१३. वैश्य बोर्डिंग (१९१८)

१४. ढोर चांभार बोर्डिंग (१९१९) 

१५. शिवाजी वैदिक विद्यालय वसतिरगृह (१९२०) 

१६. श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस (१९२०) 

१७. इंडियन ख्रिश्चन होस्टेल (१९२१) 

१८. नाभिक विद्यार्थी वसतिगृह (१९२१) 

१९. सोमवंशीय आर्यक्षत्रिय बोर्डिंग (१९२०) 

२०. श्री देवांग बोर्डिंग (१९२०) 

२१. उदाजी मराठा वसतिगृह, नाशिक (१९२०) 

२२. चौथे शिवाजी महाराज मराठा वसतिगृह, अहमदनगर (१९२०) 

२३. वंजारी समाज वसतिगृह, नाशिक (१९२०) 

२४. श्री शाहू छत्रपती बोर्डिंग, नाशिक (१९१९) 

२५. चोखामेळा वसतिगृह, नागपूर (१९२०) 

२६. छत्रपती ताराबाई मराठा बोर्डिंग, पुणे (१९२०)


वेदोक्त मंत्र म्हणण्याच्या अधिकारावरून झालेला वेदोक्त संघर्ष राजर्षी शाहूंच्याच काळात झाला. हे महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनातील वादळच होते. या प्रकरणामुळे सत्यशोधक चळवळ आणखी प्रखर झाली. बहुजन, अस्पृश्य समाजाचा सर्वांगीण विकास साधण्याचे कार्य करताना त्यांनी एका अर्थाने महात्मा फुले यांचीच परंपरा पुढे चालवली. त्यांनी सत्यशोधक चळवळीला प्रत्यक्ष सहकार्य केले.


🔮 *इतर कार्ये*

शाहू छत्रपती स्पिनिंग ॲन्ड विव्हिंग मिल’ची स्थापना, शाहुपुरी व्यापारपेठेची स्थापना, गुळाच्या बाजारपेठेची निर्मिती, शेतकऱ्यांच्या सहकारी संस्थांची स्थापना, शेतकऱ्यांना कर्जे उपलब्ध करून देणे असे उपक्रम त्यांनी आपल्या संस्थानात राबविले, कमालीचे यशस्वी केले. शेती, उद्योग, सहकार या क्षेत्रांत राजर्षींनी नवनवे प्रयोग केले. शेतीच्या आधुनिकीकरणासाठी त्यांनी संशोधनाला पाठिंबा दिला, नगदी पिके व तंत्रज्ञानाचा वापर वाढण्यासाठी त्यांनी ‘किंग एडवर्ड ॲग्रिकल्चरल इन्स्टिट्यूट’ स्थापन केली. राजांनी त्याकाळी पाण्याचे महत्त्व लक्षात घेऊन भविष्यात रयतेला दुष्काळाला सामोरे जावे लागणार नाही यासाठी राधानगरी नावाचे धरण बांधले. 


🤹‍♂️🎭 *कलेला आश्रय*

राजर्षी शाहूंनी कोल्हापूर संस्थानात संगीत, चित्रपट, चित्रकला, लोककला आणि कुस्ती या क्षेत्रांतील कलावंतांना राजाश्रय देऊन त्यांना प्रोत्साहन देण्याचे महत्त्वाचे कार्य केले.


🇮🇳 *स्वातंत्रलढ्यातील योगदान*

महाराजांनी कोल्हापूर, बेळगाव या भागातील स्वातंत्र्यवीराना वेळोवेळी आर्थिक व इतर मदत केली. शाहू महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संबंध सर्वश्रृत आहे. डॉ. बाबासाहेबांनी ‘मूकनायक’ हे साप्ताहिक ३१ जानेवारी १९२० ला प्रथम प्रकाशित केले. परंतु आर्थिक अडचणीमुळे पुढे ते बंद पडले. परंतु हे राजर्षी शाहू महाराजांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तात्काळ २५०० रुपयांची भरघोस मदत केली.


🙋🏻‍♂️ *पारंपिरिक जातिभेदाला विरोध*

शाहू महाराजानी समतेवर आधारीत राज्य निर्माण केले. त्यामुळे जातीयवादी समाजकंटक लोकानी महाराजाना ठार मारण्याचे प्रयत्न केले. एकदा मारेकरी पाठवून आणि एकदा बाँब फेक करून महाराजांना दगा करायचा प्रयत्न केला गेला. पण जनतेचे प्रेम आणि दुवा यांच्या पुण्याईने महाराज सुखरूप राहिले. महाराजाना बदनाम करायचेही अनेक प्रयत्न झाले. पण शत्रूंचे सारे प्रयत्न विफल ठरले.


📚 *शाहूंवरील प्रकाशित साहित्य*

'छत्रपती शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर : समग्र पत्रव्यवहार' (संपादन : डॉ. संभाजी बिरांजे प्रकाशन; विनिमय पब्लिकेशन, विक्रोळी, प. मुंबई; ८३ पृष्ठ)

राजर्षी शाहू छत्रपती : अ सोशली रिव्होल्युशनरी किंग (संपादक : डॉ. जयसिंग पवार आणि डॉ. अरुण साधू)

शाहू महाराजांची चरित्रे लेखक : माधवराव बागल, पी.बी. साळुंखे, धनंजय कीर, कृ .गो. सूर्यवंशी, डॉ. अप्पासाहेब पवार, जयसिंगराव पवार (यांनी २००१ साली एकत्रितपणे लिहिलेल्या चरित्राची २०१३सालची ३री आवृत्ती ही ३ खंडी आणि १२०० पानी आहे.).

बी.ए. लठ्ठे यांनी १९२६मध्ये शाहूंचे इंग्रजीतील पहिले चरित्र लिहिले. त्याचे मराठी भाषांतरही प्रकाशित करण्यात आले.

राजर्षी शाहू छत्रपती (लेखक : प्रा. डॉ. रमेश जाधव; नॅशनल बुक ट्रस्टने हे पुस्तक १८ भारतीय भाषांत प्रकाशित केले आहे.)

राजर्षी शाहू छत्रपती : जीवन व शिक्षणकार्य (लेखक: प्राचार्य रा. तु. भगत)

कोल्हापूरचे शाहू छत्रपति : चरित्र व कार्य (लेखक : एकनाथ केशव घोरपडे)

राजर्षी शाहू छत्रपती (खंड काव्यानुवाद, लक्ष्मीनारायण बोल्ली)

छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचे चरित्र (तेलुगू, लेखक - लक्ष्मीनारायण बोल्ली)

राजर्षी शाहू महाराज यांची सामाजिक विचारधारा व कार्य (लेखक : रा.ना. चव्हाण)

राजर्षी शाहू कार्य व काळ (लेखक - रा.ना. चव्हाण)

समाज क्रांतिकारक राजर्षी शाहू महाराज- (लेखिका - डॉ. सुवर्णा नाईक-निंबाळकर)

शाहू (लेखक: श्रीराम ग. पचिंद्रे; ही राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनावरील पहिली आणि एकमेव कादंबरी आहे.)

‘प्रत्यंचा : जो लढे दीन के हेत,’ (शाहू महाराजांवरील हिंदी कादंबरी; लेखक - संजीव)

लोकराजा राजर्षी शाहू महाराज (लेखक: सुभाष वैरागकर)

🎞️📺 *चित्रपट व दूरचित्रवाणी मालिका*

'लोकराजा राजर्षी शाहू' - दूरचित्रवाणी मालिका

राजर्षी शाहू महाराज व महाराणी ताराराणी यांच्या जीवनावर एक चित्रपट आहे. (निर्माते नितीन देसाई)

📜 *पुरस्कार*

शाहू महाराजांच्या नावाने अनेक पुरस्कार जाहीर होतात. अशा काही पुरस्कारांची नावे आणि ते मिळालेल्या व्यक्तींची नावे. :-

राजर्षी शाहू छत्रपती मेमोरिअल ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारा शाहू पुरस्कार ज्येष्ठ समीक्षक आणि सामाजिक कार्यकत्या प्रा. पुष्पा भावे यांना (२६ जून २०१८)

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू जयंतीनिमित्त ६ जिल्हा परिषद सदस्य, ३ पंचायत समिती सदस्य व १५ कर्मचाऱ्यांना राजर्षी शाहू पुरस्कार मिळाला (२६ जून २०१८)

राजर्षी शाहू छत्रपती मेमोरिअल ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारा शाहू पुरस्कार डॉ. रघुनाथ माशेलकर यांना (२६ जून २०१७)

🗽 *सन्मान*

शाहू महाराजांचा २६ जून हा जन्मदिवस महाराष्ट्रात ‘सामाजिक न्याय दिवस’ म्हणून पाळला जातो. यादिवशी सार्वजनिक कार्यक्रम होतात. कोल्हापूरच्या राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टतर्फे 'राजर्षी पुरस्कार' रोख एक लाख रुपये आणि सन्मानचिन्ह या,  स्वरुपात दिला जातो.


🇮🇳🇮🇳🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳🇮🇳🇮🇳

*🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏*

संकलन -)

गजानन गोपेवाड राज्य समन्वयक महाराष्ट्र राज्य 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

सोमवार, ३ मे, २०२१

3 मे पहिला मराठी चित्रपट प्रदर्शित झाला, दादासाहेब फाळके

 📽️📽️📽️📽️📽️📽️📽️📽️📽️📽️📽️

*राजा हरिश्र्चंद्र हा पहिला भारतीय मूक चित्रपट ०३ मे १९१३ रोजी मुंबई येथील कॉरोनेशन चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.*

📽️📽️📽️📽️📽️📽️📽️📽️📽️📽️📽️


*धुंडिराज गोविंद फाळके ऊर्फ दादासाहेब फाळके*

        भारतीय चित्रपटाचे जनक 

A FATHER OF INDIAN CINEMA


        हे चित्रपटनिर्मिती करणारे महाराष्ट्रातील व भारतातील पहिली व्यक्ती होते आणि यासाठीच त्यांना भारतीय चित्रपटांचा जनक मानले जाते . १९१३ साली त्यांनी निर्माण केलेला राजा हरिश्चंद्र हा मूक चित्रपट मराठी व भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील आद्य चित्रपट होय. १९३७ पर्यंतच्या आपल्या १९ वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी ९५ चित्रपटांची व २६ लघुपटांची निर्मिती केली


जन्म-)धुंडिराज गोविंद फाळके

              ३० एप्रिल १८७०

               ब्रिटिश भारत

        त्र्यंबकेश्वर,महाराष्ट्र,भारत

मृत्यू -)

              १६ फेब्रुवारी १९४४ 

                   ब्रिटिश भारत

            नाशिक,महाराष्ट्र,भारत

राष्ट्रीयत्व-)     भारत भारतीय

कार्यक्षेत्र-)    दिग्दर्शक, निर्माता

कारकीर्दीचा काळ-)    १९१३

भाषा -)         मराठी

प्रमुख चित्रपट-)      राजा हरिश्चंद्र

वडील -)       दाजीशास्ञी

आई  -)         द्वारकाबाई


टिपा -)भारतीय चित्रपटकला वैभवाप्रत नेली


*भारतीय अभिनेत्यांना त्यांच्या जन्मभरच्या चित्रपटविषयक योगदानाबद्दल भारतीय चित्रसृष्टीतील दादासाहेब फाळके पुरस्कार हा सर्वांत मोठा पुरस्कार दिला जातो.*


*जीवन*

दादासाहेब फाळके यांचा जन्म नाशकाहून तीस किलोमीटर अंतरावर असणाऱ्या त्र्यंबकेश्वर येथे झाला. त्यांचे वडील प्रसिद्ध संस्कृत तज्ञ होते.


इ.स. १८८५ साली त्यांनी सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट, मुंबई येथे प्रवेश घेतला. इ.स. १८९० साली जे. जे. तून उत्तीर्ण झाल्यावर ते कला भवन, बडोदा येथे शिल्पकला, तंत्रज्ञान, रेखाटन, चित्रकला, छायाचित्रणकला इत्यादी गोष्टी शिकले.


त्यांनी गोध्रा येथे छायाचित्रकार म्हणून व्यवसाय सुरू केला. परंतु, गोध्रा येथे झालेल्या ब्युबॉनिक प्लेगाच्या उद्रेकात त्यांची प्रथम पत्नी आणि मूल दगावल्यावर त्यांना ते गाव सोडावे लागले. लवकरच, त्यांची ल्युमिएर बंधूंनी नेमलेल्या ४० 'जादूगारां'पैकी एकाशी, जर्मन कार्ल हर्ट्‌झ याच्याशी ओळख झाली. त्यानंतर त्यांना 'भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण संस्थे'साठी ड्राफ्ट्समन म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यांच्या धडपड्या स्वभावामुळे लवकरच ते नोकरीच्या बंधनांना कंटाळले व त्यांनी छपाईचा व्यवसाय सुरू केला. शिळाप्रेस छपाईच्या तंत्रात ते वाकबगार होते. त्यांनी राजा रविवर्मांसोबत काम केले. पुढे त्यांनी स्वतःचा छापखाना काढला, तसेच छपाईची नवी तंत्रे आणि यंत्रे अभ्यासायला जर्मनीची वारी केली.


छपाई व्यवसायात त्यांच्या सहकाऱ्यांशी त्यांचे विवाद झाले आणि फाळकेंनी छपाईच्या व्यवसायास कायमचा रामराम ठोकला. पुढे "लाईफ ऑफ ख्रिस्त" (Life of Christ) हा मूकपट पाहिल्यानंतर त्यांनी आपले लक्ष हलत्या चित्रांच्या व्यवसायाकडे वळवले व १९१२ साली त्यांनी राजा हरिश्चंद्र हा पहिला मूकपट काढला. तो ३ मे १९१३ या दिवशी मुंबईच्या कॉरोनेशन चित्रपटगृहात प्रेक्षकांना पहिल्यांदा दाखवण्यात आला.


*सरस्वतीबाई धुंडिराज फाळके*

सरस्वतीबाई या दादासाहेब फाळके यांच्या पत्नी. दादासाहेबांचा पहिला चित्रपट बनवण्यात त्यांचा मोलाचा सहभाग होता. चित्रपटाच्या निर्मितीखर्चासाठी सरस्वतीबाईंनी आपले सोन्याचे दागिने विकले. त्या फिल्म डेव्हलपिंग, मिक्सिंग आणि फिल्मवर रसायनांचा उपयोग शिकल्या. त्या फिल्मचे परफोरेटिंग (फिल्मवर दोन्ही कडांना भोके पाडणे), एडिटिंग (फिल्मचे तुकडे जोडणे) करीत. शूटिंगच्या वेळी कॅमेरा असिस्टंट, स्पाॅट बाॅय, सूर्याच्या उन्हासाठी रिफ्लेक्टर धरून उभे राहणे आदी कामे करीत. त्या फिल्म निर्मितीसाठी कामावर ठेवलेल्या लोकांच्या राहण्याची, आरामाची सोय करणे, आणि त्यावरही ६०-७० लोकांचा स्वयंपाक करीत व त्यांचे कपडेही धुवीत.


रात्री सर्व झोपल्यावर सरस्वतीबाई फिल्मच्या कथानकावर ब्रेनस्टाॅर्मिंग (अडचणी दूर करण्यासाठी गटचर्चा करणे) करीत.


सरस्वतीबाईं फाळके यांना राजा हरिश्चंद्र या पहिल्या चित्रपटासाठी तारामतीची भूमिका करण्यासाठी विचारले होते. पण मग कामांचे काय या विचाराने त्यांनी नकार सांगितला.


सरस्वतीबाईंनी जर मदत केली नसती तर भारतातला पहिला चित्रपट बनणे अशक्यप्राय होते.


सरस्वतीबाई फाळके यांच्या नावाचा एक पुरस्कारही आहे.


 *चित्रपट*


राजा हरिश्चंद्र (इ.स. १९१३)

मोहिनी भस्मासूर (इ.स. १९१३)

सावित्री सत्यवान (इ.स. १९१४)

श्रीकृष्णजन्म (इ.स. १९१८)

कालिया मर्दन (इ.स. १९१९)

सेतुबंधन (इ.स. १९३२)

गंगावतरण (इ.स. १९३७)

सन्मान संपादन करा

मुंबईतील फिल्मसिटीला दादासाहेब फाळके चित्रनगरी म्हणतात.


*दादासाहेब फाळके पुरस्कार मिळालेले अभिनेते आणि आणि पुरस्काराचे वर्ष (प्रत्यक्ष पुरस्कार नंतरच्या वर्षी प्रदान झाला)*

* अमिताभ बच्चन (इ.स. २०१८)

* अशोककुमार (१९८८)

* दिलीपकुमार (१९९४)

* देव आनंद (२००२)

* देविकाराणी (१९६९)

* पृथ्वीराज कपूर (१९७१)

* प्राण (२०१२)

* मनोजकुमार (२०१५)

* राज कपूर (१९८७)

* रूबी मेयेर्स

* विनोद खन्ना (२०१७)

* शशी कपूर (२०१४)

* सुलोचना (१९७३)

* सोहराब मोदी (इ.स. १९७९)

*दादासाहेब फाळके यांच्यावरील पुस्तके*

दादासाहेब फाळके (इसाक मुजावर)

दादासाहेब फाळके : काळ आणि कर्तृत्व (जया दडकर)

ध्येयस्थ श्वास - दादासाहेब फाळके (लेखिका - ज्योती निसळ)

भारतीय चरित्रमाला : दादासाहेब फाळके (बापू वाटवे)

भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके (रमेश सहस्रबुद्धे)

-----------------------------------------------------

संकलन -)

गजानन गोपेवाड राज्य समन्वयक महाराष्ट्र 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६



रविवार, २ मे, २०२१

1 मे हिटलर स्मृती दिवस

 *हिटलर आणि ग्लोबल्सनीती*


       जर्मनीचा हुकूमशहा एडाल्फ हिटलर याचा 30 एप्रिल 1945 आणि ग्लोबल्स चा 1 मे 1945 मृत्यूदिन! दोघानीही एक दिवसाच्या फरकाने आत्महत्या केली.हिटलरने केलेल्या जर्मनीतील 70 लाख निरपराध ज्यूंचा नरसंहारात हिटलर एवढाच त्याचा सहकारी गोबल्स हासुद्धा जबाबदार होता.ग्लोबल्स हा हिटलरच्या प्रचार-प्रसार तंत्राचा जनक.ग्लोबल्सच्या प्रचार-प्रसार तंत्रामुळेच हिटलर सत्तेवर आला.ग्लोबल्स हा *'डेर अग्रोफ'* या वृत्तपत्राचा संस्थापक व सम्पादक होता.हिटलरने त्याला आपल्या नाझी पक्षाचा प्रचार-प्रसारक सोबत युद्धमंत्री,जर्मनीचा एक दिवसाचा चॉन्सलर सुद्धा बनवले होते.ज्यूवर होणारे अत्याचार,छळछावण्या आणि एकंदर त्यांच्याविरुद्धचा हिटलरचा-ग्लोबल्सचा द्वेष उघड होता.तसेच ते ज्यूना जर्मनीतील इतर लोकांच्या तुलनेत तुच्छ समजायचे.जर्मनीला लागलेली उतरती कळा ही ज्यूमुळेच लागली असे ते लोकांत प्रचार करायचे. पहिल्या महायुद्धात झालेली पिछेहाट ही ज्यूमुळेच झाली.असाही ते प्रचार करायचे.*प्रपोगंडा व सेन्सरशीप* ही दोन साधन वापरून या दोघानी आपल्या नाझी पक्षाच्या साह्याने लोकांचे ब्रेन वॉश केले.सभांमधून ते "आम्हीच जर्मनीच वैभव वापस आनु शकतो"असा प्रचार

करायचे.त्यामुळेच त्यांना सत्ताही प्राप्त झाली.1934 ला हिटलर सत्तेवर आल्यावर हिटलरने ग्लोबल्स ला "Ministry of Enlightenment and propaganda" चा कारभार दिला.त्यामधून त्यानी नाझीविचारांच्या कला साहित्य मनोरंजन(चित्रपट)ला परवानगी दिली.नाझी विचारांना सोडून त्यांनी कोणत्याच विचारांना मान्यता दिली नाही.त्यांनी ज्यू धर्मसमर्थक तसेच 2500 समाजवादी,शांततावादी,

साम्यवादी विचारांची जवळपास 2000 पुस्तकांची होळी केली.

आर्यनवंश हा सर्वात शुद्ध आहे.ज्यू अशुद्ध आहेत.त्यामुळे ते राष्ट्रद्रोही आहेत अशा संदेशाचा मारा जर्मन लोकांवर केला.त्यांनी ज्यू पत्रकांवर बंदि घातली.प्रत्येक बातमी वृत्तपत्रात नाझी अधिकार्यांची मान्यता दिल्यानंतरच ती छापली जायची.1939 पर्यंत जर्मनीत असलेल्या वृत्तपत्रांपैकी जवळपास 70% वर्तमानपत्र ही नाझीच्याच मालकीची होती.हल्लीचे सोशल मीडिया,टीव्ही चॅनल त्यावेळेस उपलब्ध नव्हते.अत्यल्प दरात प्रत्येकाला रेडिओ उपलब्ध होईल याची काळजी त्यांनी घेतली.त्यावेळी अंदाजे 95 लाख रेडिओ जर्मन लोकांना स्वस्त दरात विकण्यात आले होते. रेडिओवर हिटलर व ग्लोबल्स ची भाषणे जर्मन लोक घराघरात,रस्त्यावर,शैक्षणिक संस्थात,बगिच्यात,बार-रेस्टॉरंटमध्ये लाऊडस्पीकर लावून ऐकायचे.नाझी विचार ऐकण्यासाठी हिटलरच्या वाढदिवशी सम्पूर्ण जर्मनीत मोठमोठे कार्यक्रम आयोजित केले जायचे.1936 ला बर्लिनमध्ये आलम्पिक स्पर्धा आयोजीत करण्यात आली होती.या आलम्पिकमध्ये हॉकी खेळात जर्मनला भारताकडून फार मोठा पराभव पत्करावा लागला होता.जर्मन फायनलमध्ये भारताविरुद्ध फार मोठया फरकाने म्हणजे 8-1 नी हरली.ही मॅच पाहण्यासाठी स्वतः हिटलर हजर होता.हा पराभव हिटलर पचवू शकला नाही.फायनलमध्ये भारतीय हॉकीचा जादूगार मेजर ध्यानचंद यांनी ऐनवेळी तीन शानदार गोल करून भारताला विजयी केले होते.मेजर ध्यानचंदच्या खेळावर हिटलर इतका प्रभावित झाला की त्यांनी मेजर ध्यानचंद ला जवळ बोलावून," ध्यानचंद नी जर्मनीचे नागरिकत्व स्विकारावे"बदल्यात त्याला जर्मन फौजमध्ये मोठे पद पण बहाल करण्यात येईल.अशी ऑफर सुद्धा देण्यात आली.परंतु मेजर ध्यानचंद च्या स्वदेशप्रेम समोर ती ऑफर कुचकामी ठरली आणि त्यानी हिटलरला स्पष्ट शब्दात सांगितले की,"माझ्या मनगटात जोपर्यंत ताकत आहे तोपर्यंत मी माझ्या देशाकडूनच खेळत राहीन".त्यावेळी हे देशप्रेम जगाणी पाहिलं होतं.यातच हिटलरची हार झाली होती.

     या आलम्पिकमधून हिटलर-ग्लोबल्सनी प्रसार माध्यमातून जर्मन सरकार लष्कर सैन्य कस यशस्वी आहे हे दाखविण्याचा प्रयत्न केला गेला होता.*आर्ट गैलरीच्या माध्यमातून 6500 चित्र काढण्याचा आदेश देण्यात आले.त्यात आर्यन वंशाच्या विर योध्यांची ,सैनिकांची चित्रे काढण्यास प्रोत्साहन दिले जाऊ लागले.जर्मन सैनिक तसेच लष्कर किती शक्तिशाली आहे हे दाखविणाऱ्या कलाकारांना विशेष प्रोत्साहन दिले जाऊ लागले.हिटलरला स्थापत्य कलेत विशेष रस होता.आपण अशा वस्तूंची निर्मिती करायची कि ज्यातून जर्मन साम्राज्याची शक्ती आणि समृद्धी दिसुन येईल.

         नाझी पक्ष सत्तेवर येण्यापूर्वी सामान्य जर्मन नागरिक  व ज्यूलोकांमध्ये सलोख्याचे सम्बन्ध होते.पण नाझी सरकार सत्तेवर आल्यावर मात्र जर्मन नागरिक ज्यू लोकांकडे संशयाने बघू लागले.जर आपण ज्यूशी सम्बन्ध ठेवले तर आपण अडचणीत येऊ अशी भीती जर्मन आर्यन वंशाचा लोकांमध्ये बळावल्यामुळे त्यांनी आपली नाती ज्यू पासून तोडली.

       हिटलरप्रति असलेल्या श्रद्धेमुळे ग्लोबल्स हिटलरचा अत्यन्त विश्वासू बनला.1944 ला दुसऱ्या महायुद्धाच्यावेळी त्याला हिटलरने युद्धमंत्री बनविले.जर्मन युद्ध हरणार हे समजल्यावरही ग्लोबल्सनी हिटलरला साथ दिली.रशियाच्या फौजा जर्मनीत घुसल्यावर हिटलरने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला.त्यापूर्वी हिटलरने ग्लोबल्सला जर्मनीचा चॉन्सलर म्हणून घोषित केले. आणि हिटलरने आत्महत्या केली.तो दिवस होता 30 एप्रिल 1945.आणि एक दिवसासाठी चॉन्सलर बनलेल्या ग्लोबल्सनी सुद्धा आत्महत्या केली. तो दिवस होता 1मे 1945. 

   हिटलरसोबत ग्लोबल्सच्या मृत्यूला 75 वर्ष लोटलीत.पण ग्लोबल्सनीती हा शब्दप्रयोग नेहमी ऐकायला मिळतो. एखादा राजकीय नेता खोटा प्रचार करायला निघाला की लोक म्हणतात हा नेता ग्लोबल्स प्रचारतंत्र वापरतोय.कारण सोपं आहे आणि सिद्धही झालेलं आहे,

*-एकच गोष्ट वारंवार सांगितल्याने असत्यदेखील सत्य वाटायला लागतं.आणि  हेच ग्लोबल्स नीतीचा सार होय.*

संकलन गजानन गोपेवाड 

एक महान चित्रकार व संशोधक लेखन गजानन गोपेवाड

 *🖌️🖌️🖌️लिओनार्दो दा विंची🖌️🖌️🖌️*

👨‍🎨👨‍🎨👨‍🎨👨‍🎨👨‍🎨👨‍🎨👨‍🎨👨‍🎨👨‍🎨👨‍🎨👨‍🎨

*एक महान चित्रकार व संशोधक*

 🖌️🖌️🖌️🖌️🖌️🖌️🖌️🖌️🖌️🖌️

*स्मृतिदिन - २ मे १५१९*

👨‍🎨👨‍🎨👨‍🎨👨‍🎨👨‍🎨👨‍🎨👨‍🎨👨‍🎨👨‍🎨👨‍🎨👨‍🎨

लिओनार्दो हा १५ व्या शतकात रेनेसान्स काळात झालेला एक महान चित्रकार व संशोधक होता. कलेच्या इतिहासात त्याने संशोधक वृत्तीने दिलेल्या अमूल्य योगदानामुळे त्याचे नाव नेहमीच अग्रस्थानी राहिले आहे. लिओनार्दोने अनेक क्षेत्रांत योगदान दिले असले, तरी इतिहासात त्याचे नाव चित्रकार म्हणून ठळकपणे दिसते. मोनालिसा,द लास्ट सपर,मॅडोना ऑफ द रॉक्स ही त्याची काही जगप्रसिद्ध चित्रे आहेत. चित्रांवरून त्याचे तत्कालीन चर्च या धर्मसंस्थेसोबत असलेले मतभेद, उलट अक्षरे काढून लिहिण्याची सवय,नव्याने सापडलेल्या त्याच्या नोंदवह्यांतील आश्चर्यकारक माहिती व कित्येक विचारवंतांनी त्याचा अभ्यास करून मांडलेली मते, यांवरून लिओनार्डो विसाव्या शतकापासून काहीसा गूढतेच्या वातावरणात आला आहे. त्यातच त्याच्या विविध चित्रांचा अभ्यास वेगवेगळ्या दृष्टिकोनांतून सुरू झाला. तत्कालीन सामाजिक, राजकीय व धार्मिक परिस्थितीचा अभ्यास केलेले विचारवंत त्याच्या चित्रांवरून वेगवेगळ्या संदेशांच्या कल्पना करतात. डॅन ब्राउन या लेखकाने नुकतीच 'दा व्हिंची कोड' या काल्पनिक कादंबरीत लिओनार्दोची वेगळीच गूढ भूमिका मांडली.

बालपण

लिओनार्दो त्याच्या आईवडिलांचे अनौरस अपत्य होता. जन्मानंतर त्याचा सांभाळ ५ वर्षे आईनेच केला. त्यानंतर मात्र त्याच्या वडिलांनी त्याचा सांभाळ करायची तयारी दर्शविली व याचवेळी त्याच्या आईचेही लग्न ठरले. अशात लिओनार्दो त्याच्या वडिलांकडे फ्लॉरेन्सला आला. त्याचे वडिल सधन होते. लिओनार्दोच्या शिक्षणाकडे , देखभालीकडे त्यांनी योग्य लक्ष पुरवले. त्याची कलेतील आवड लक्षात घेऊन त्याला वेरोशिओ या प्रसिद्ध् चित्रकाराकडे शिक्षणासाठी पाठवले.चित्रकला, शिल्पकला अशा शास्त्रांचा अभ्यास त्याने वेरोशिओ कडे केला.याचवेळी त्याने स्वत: हुन इतर शाखांचाही अभ्यास चालु ठेवला.

*🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏*

संकलन -)

गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

मराठी बाराखडी गजानन गोपेवाड

 *❤️ किती सुंदर बाराखडी  💚*

*प्रत्येकाने अंगीकारावी अशी 👉*

*अ* : अशुद्ध अंतकरण शुद्ध असावे.

*आ*: आत्मा कुणाचाही दुखवू नये.

*इ* : इच्छाशक्ती प्रबळ असावी.

*ई* : इमानदारीने काम करावे.

*उ*: उपकार कुणाचाही घेऊ नये.

*ऊ* : ऊठसूट कुणाकडे धावू नये.

*ए* : ऐतखाऊ बनून जगू नये.

*ऐ* : ऐकावे जनाचे करावे ज्ञानाचे.

*ओ* : ओझे कुणावरही होऊ नये.

*औ* : औकात कृतीतून सिद्ध करावी.

*अं* : अंदाजे तर्क - वितर्क करु नये.

*अ:* : अ:! वा शब्द बोलावेत.

*क* : कपट मनी कधी नसावे.

*ख* : खरं तेच आपलं म्हणावं.

*ग* : गर्व,अहंकार करु नये.

*घ* : घमेंड कशाचीही करु नये.

*च* : चमचेगिरी करु नये.

*छ* : छळ कुणाचाही करु नये.

*ज* : जपून जपून शब्द वापरावेत.

*झ* : झऱ्यासारखं निर्मळ असावं.

*ट* : टणक असावे पोलादासारखे.

*ठ* : ठकास नेहमी महाठक असावे.

*ड* : डर मनात बाळगू नये.

*ढ* : ढगांसारखंच प्रेम बरसावं.

*ण* : ण...ऐकणाऱ्यांस शिकवू नये.

*त* : तक्रार करुनी जगू नये.

*थ* : थंडपणा कामात असू नये.

*द* : दगडासारखा निर्दयी असू नये.

*ध* : धनांत लालच असू नये.

*न* : नम्रशब्दातून मन जिंकावे.

*प* : पटकन हो - नाही म्हणू नये.

*फ* : फजिती कुणाची करु नये.

*ब* : बडबडीपेक्षा कृती करावी.

*भ* : भय मनात बाळगू नये.

*म* : मजबुरीचा फायदा घेऊ नये.

*य* : यशासाठी मनी तळमळ असावी.

*र* : रंग सरडयासम बदलू नये.

*ल* : लबाड संगत करु नये.

*व* : वजन कृतीतून सिद्ध करावे.

*श* : शहाणपणाने जीवन जगावे.

*ष* : षडयंत्र कधी रचू नये.

*स* : सहनशक्ती अंगी असावी.

*ह* : हसून उपहास करु नये.

*ळ* : लबाळपणाने जगू नये.

*क्ष* : क्षमा, मन-हृदयातून करावी.

*ज्ञ* : ज्ञान परिसाला अखंड स्मरावे.

गजानन गोपेवाड राज्य समन्वयक महाराष्ट्र राज्य 

👏🌹

2 मे पाऊसाचा अंदाज वर्तवला जाणारे पक्षी

 पशुपक्षांकडून मिळणारे पावसाचे पूर्वसंकेत


 - संकलन 

गजानन गोपेवाड 

राज्य समन्वयक महाराष्ट्र राज्य 


1. चातक पक्षी -


पावसाळा जवळ आल्याचे संकेत आफ्रिकेतून आलेले चातक पक्षी सर्वप्रथम देतात. पाऊस अगदी वेळेवर येणार असेल तर चातक पक्ष्यांचे आगमन लवकर होते. जर त्यांचे आगमन लांबले तर पाऊसही लांबणार, ही काळ्या दगडावरची रेघ. त्यासाठी कोणत्याही भविष्यवेत्त्याची गरज नाही. चातक पक्षी ‘पिऊ.. पिऊ’ या त्यांच्या सांकेतिक आवाजात ओरडू लागले की पहिल्या पावसाचे दिवस जवळ आले हे हमखास समजावे.


2. पावशा पक्षी -


चातक पक्ष्याप्रमाणेच सृष्टीतील बदलांचे पूर्वसंकेत देणाऱ्या आश्चर्यकारक घटनांचा पावशा पक्षी हा आणखी एक महत्त्वाचा दूत! ‘पेर्ते व्हा’ असे सांगणारा पावशा ओरडू लागला की जुन्या काळी शेतकरी मशागतीची कामे सुरू करत.


3. तित्तीर पक्षी -


माळरानावर, शेतांवर काळ्या-पांढऱ्या, अंगावर ठिपके असलेल्या तित्तीर पक्ष्यांचे थवे ‘कोडय़ान केको.. कोडय़ान केको..’ अशा सांकेतिक स्वरात ओरडू लागले की आता लवकरच पाऊस येणार असे खुशाल समजावे. जंगलातील माळरानांत या पक्ष्यांचे अस्तित्व फारसे आढळून येत नाही. परंतु मानवी वस्त्यांशेजारच्या माळरानांवर तित्तीरांचा गडबडगुंडा सुरू झाला की ते हमखास पावसाचे लक्षण समजले जाते.


4. कावळा -


कावळ्याने मे महिन्याच्या काळात बाभुळ, सावर अशा काटेरी झाडांवर घरटे केले तर पाऊस कमी पडतो आणि आंबा, करंज या वृक्षांवर केले तर त्या वर्षी पाऊस चांगला येतो, हा जंगलातला अनुभव आहे. कावळ्याने झाडाच्या पूर्व दिशेने घरटे केले तर पाऊस चांगला पडणार. पश्चिमेला केले तर पाऊस सरासरीएवढा पडणार. दक्षिण-उत्तरेला केले तर पाऊस अत्यंत कमी पडणार. आणि झाडाच्या शिखरावर केले तर अवर्षणपर्वाची ती नांदी होय. सहसा कावळा झाडाच्या शिखरावर घरटे करीत नाही. आणि केले तर ती अत्यंत दुर्मीळ घटना असते. यातून दुष्काळाचे अगदी डोळस संकेत मिळू शकतात.


यापेक्षाही मनोरंजक बाब म्हणजे कावळिणीने अंडी किती घातली, यावरूनही जुन्या काळात पावसाचा अंदाज बांधला जात असे. तिने सुमारे चार अंडी दिली तर पाऊस चांगला पडतो. दोन अंडी दिली तर कमी पाऊस. एकच अंडे दिले तर अतिशय कमी. आणि जमिनीवर अंडी दिली तर अभूतपूर्व दुष्काळाचे आगमन ठरलेले.


5. वादळी पक्षी -


पाऊस येण्याअगोदर वादळी पक्षी किनाऱ्याच्या दिशेने येऊ लागतात. त्यामुळे पाऊस पडणार याचे संकेत ओळखून समुद्रावर उपजीविका करणारे मच्छिमार आपल्या बोटी, जहाजे, पडाव समुद्रात नेत नाहीत. अशावेळी केव्हाही पाऊस कोसळण्याची शक्यता असते. वादळी पाखरू किनाऱ्याच्या दिशेने आले की वादळवारा त्याच्यापाठोपाठ येत आहे याचे संकेत कोळ्यांना मिळतात. एक प्रकारे ती धोक्याची पूर्वसूचनाच असते. त्याचा अर्थ हमखास पाऊस पडणार किंवा सुमद्रात वादळ येणार.


6. मासे -


पहाडी, डोंगरी भागातील माशांच्या अंडय़ांतील पिल्ले मोठी होऊन जेव्हा समुद्राच्या दिशेने पोहू लागतात, तेव्हा तो काळ पाऊस संपण्याचा… उत्तरा नक्षत्राचा असतो. त्यामुळे पाऊस केव्हा पडणार आणि केव्हा संपणार, याची सुस्पष्ट चाहूल माशांच्या या जीवनचक्रातून मिळते.


7. खेकडे  -


तांबूस रंगाचे खेकडे हजारोंच्या संख्येने समुद्राच्या दिशेने जाताना दिसतात. तुम्ही त्यांच्या मार्गाचे निरीक्षण केले असता अशा अनेक अभूतपूर्व घटना पाहावयास मिळतात. समुद्राच्या दिशेने जाणाऱ्या खेकडय़ांवरून शेतकऱ्याला पावसाचे संकेत मिळतात. हा खेकडय़ांच्या स्थलांतरणाचा कालखंड आहे. भरधाव वाहनांखाली असे हजारो खेकडे दरवर्षी समुद्राकडील प्रवासादरम्यान चिरडले जातात. परंतु त्यांची समुद्री धाव कशासाठी असते, याचा कोणी विचारही करीत नाही.


8. हरीण -


पाऊस येणार नसेल तर विणीच्या काळातही हरिणी पिल्लांना जन्म देत नाहीत. 


9. वाघिण -


आम्ही पाहिलेली ही वाघीण गर्भवती होती. तिला पिल्ले होणार होती. परंतु या वाघिणीने डायसकोरियाचे कंद खाऊन गर्भपात करवून घेतला. हे कंद खाऊन आदिवासी स्त्रियादेखील गर्भपात करवून घेतात. या वाघिणीचे सृष्टीज्ञान अक्षरश: तोंडात बोटे घालायला लावणारे होते. यंदा पाऊस येणार नाही, त्यामुळे जंगलात गवत राहणार नाही. गवत नाही म्हणजे तृणभक्षी प्राणीदेखील राहणार नाहीत. परिणामी आपल्या पिलांना भक्ष्य मिळणार नाही. त्यांची उपासमार होईल… याची पूर्वकल्पना आल्यानेच तिने गर्भपात करवून घेतला होता. वाघिणीच्या गर्भपातानंतर त्या वर्षी अभूतपूर्व दुष्काळ पडल्याचा अनुभव आम्ही घेतला आहे.


10. वाळवी -


जंगलात हमखास झाडे पोखरणाऱ्या वाळवी/ उधईला कधी पंख फुटत नाहीत. परंतु पावसाळ्यापूर्वी वारुळातून उधईचे थवेच्या थवे हजारोंच्या संख्येने एका झपाटय़ात बाहेर पडू लागले की पावसाचे लवकर आगमन होते. पावसाळ्यापूर्वी प्रजननासाठी वाळवीचे पंख फुटलेले थवे उडून एकमेकांशी समागम करतात. त्यातून त्यांच्या नंतरच्या पिढय़ा तयार होतात. त्या जंगलात वारुळे तयार करतात.


11. काळ्या मुंग्यां -


हजारोंच्या संख्येने काळ्या मुंग्या त्यांची पांढरी अंडी तोंडात धरून सुरक्षित जागी नेऊ लागल्यास पाऊस नक्की पडणार, हे समजावे. अत्यंत पुरातन काळापासून काळ्या मुंग्यांच्या हालचालींवरून पावसाचे अंदाज बांधले जात आहेत.


बिळांमध्ये दडून राहणारे सरपटणारे जीव बिळाच्या बाहेर पडू लागले की ती हमखास पावसाची चाहूल समजावी. या प्राण्यांना पाऊस येणार असल्याचे अगोदरच कळलेले असते. त्यामुळे बिळात पाणी शिरण्यापूर्वीच स्वत:च्या बचावासाठी ते उंच जागांचा आश्रय शोधू लागतात. पावसाळ्यापूर्वी सापदेखील मोठय़ा प्रमाणात बिळाच्या बाहेर पडू लागतात.


मराठवाडय़ात प्रचंड संख्येने आढळणाऱ्या गोडंबा- म्हणजे बिब्याच्या झाडाला बहर येणे हे दुष्काळाचे संकेत आहेत.


 खैर आणि शमीच्या वृक्षांना फुलोरा आल्यास त्या वर्षी पाऊस कमी पडतो.


कवठाला आलेला फुलांचा बहर वादळवाऱ्याचे संकेत देतो.


बिचुलचा बहर आणि कुटजाचा बहर तर अतिवृष्टीचेच हाकारे देतो.


आपण वेली पाहतो. या वेलींचे तंतू अगदी काटकोनात, सरळ रेषेत उभे राहताना दिसू लागले तर ते चांगल्या पावसाचे लक्षण समजावे.

शुक्रवार, ३० एप्रिल, २०२१

1 मे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आपणास हार्दिक शुभेच्छा देत आहे व कामगार दिनाचे औचित्य साधून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व जनतेस हार्दिक शुभेच्छा देत आहे गजानन गोपेवाड राज्य समन्वयक महाराष्ट्र राज्य

 ➿➿➿➿➿➿➿➿➿➿ 

 🇮🇳🇮🇳 *गाथा बलिदानाची*🇮🇳🇮🇳

➿➿➿➿➿➿➿➿➿➿                                   

       *१ मे - महाराष्ट्र दिन*                                                                                                                                   

    *"कणखर देशा,पवित्र देशा,प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा"*…… 

   दिल्लीचे तख्त राखणाऱ्या आपल्या महाराष्ट्र राज्याचा वाढदिवस म्हणजे ६० वर्षापूर्वी  १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मित्ती झाली.मागील ६० वर्षात महाराष्ट्र राज्याने प्रगतीची घोडदौड अशी केली आहे कि आज महाराष्ट्र राज्य देशात सर्वाधिक आघाडीचे राज्य आहे. कला, साहित्य, क्रीडा, व्यापार उद्योग, शिक्षण,आरोग्य सुविधा आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे कृषी क्षेत्रासह अनेक क्षेत्रात महाराष्ट राज्य आघाडीवर असल्याचे चित्र आपणास पाहायला मिळत.महाराष्ट राज्य आणि त्यासंबाधित अनेक पैलूचा आपण आढावा घेणार आहोतच पण त्याआधी आपणा  सर्वाना १ मे  म्हणजेच महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन यांच्या मनःपूर्वक शुभेच्छा...


१ मे म्हणजे हक्काची सुट्टी…। या दिवशी काय असते? असा प्रश्न विचारला तर पटकन उत्तर द्यायला अनेक जान सरसावतील आणि या दिवशी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली, या दिवशी कामगार दिन साजरा केला जातो असा सांगतील. पण, १ मे रोजी महारष्ट्र कामगार दिन का साजरा केला जातो? हे जाणून घेणे आवश्यक  आहे .


खर पहिला गेला तर १ मे  हा दिवस आंतरराष्ट्रीय  कामगार दिन! इतिहासाची उजळणी केल्यावर आपल्या असं लक्ष्यात येत कि औद्योगिक क्रांतीनंतर जगभरातून मुख्यतः पाश्चिमात्य जगतात रोजगार मोठ्या प्रमाणावर उपलब्ध  होऊ लागले . कामगारांकडे काम होतं, मात्र त्यांची पिळवणूक सुरु होती. कोणत्याही हक्कापासून वंचित असलेल्या कामगारांना १२ तास १४ तास काम कराव लागत असे . याविरोधात कामगार एकजूट झाले आणी त्यांनी उठाव केला. जगभरात याचे तीव्र पडसाद  उमटू लागले. अखेर कामगाराची कामाची वेळ ८ तास निश्चित करण्यात आली. यानंतर कामगारांच्या हक्कासंदर्भात दोन अंतराष्ट्रीय परिषदा झाल्या. नंतर १ मे १८११ पासून कामगार दिन साजरा केला जाऊ लागला. महाराष्ट्रात साजरा होणाऱ्या कामगार दिनाला संयुक्त महाराष्टाच्या चळवळीचा संदर्भ आहे, संयुक्त महारष्ट्रचा लढा वेगवेगळ्या स्तरावर लढला  गेला. या लढ्यात  कामगारांनी घेतलेली  अत्यंत महात्वाची होती. त्याच्या सहभागामुळेच हा लढा खर्या अर्थाने रस्त्या रस्त्यात लढला गेला, याच कारणामुळे १ मे १९६० रोजी मराठी भाषिकासाठी स्वतंत्र महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर त्याच दिवशी महाराष्ट दिन बरोबरच कामगार दिन हि मोठ्या उत्साहात साजरा केला जाऊ लागला.


आता यानंतर आपण संयुक्त महाराष्ट्रचा लढा आणि  त्यानंतरचा महाराष्ट्र यावर नजर टाकूया…मराठी  भाषिकासाठी महाराष्ट्र राज्याची निर्मिती व्हावी हि संकल्पना दस्तुरखुद्द लोकमान्य टिळक यांनी १९०६ साली मांडली होती. १९१९ साली कॉग्रेसंच्या जाहीरनाम्यात लोकमान्य टिळक याच्या अध्यातेखाली या संदर्भातील ठराव नमूद करण्यात आला होता. पण असं असलं तरी कालांतराने महाराष्ट्र् राज्याची वेगळी निर्मिती व्हावी याला कॉग्रेसंमधूनच विरोध होत गेला. कधी बॉम्बें  हे व्दिभाषिक राज्य व्हावं, तर कधी विदर्भ वेगळा राज्य व्हाव अशा नानाविध सूचना पुढे येऊ लागल्या. दरम्यान चलेजाव आंदोलनान जोर धरला होता तर दुसरीकडे दुसर  महायुद्ध जोरात सुरु होत, हि परिस्थीती लक्षात घेऊन संयुक्त  महाराष्ट्र चळवळीत सहभागी असलेल्या कार्यकत्यांनी  जरा सबुरीन घेत थोडीशी माघार घेतली होती. १३ एप्रिल १९४७ रोजी झालेल्या अकोला करार अंतर्गत असा ठराव करण्यात आला की महाराष्ट्र एकीकरण परिषद महा विदर्भा, मराठवाडा, बॉम्बे आणि उर्वरित महाराष्ट्र याच्या एकत्रीकरणासह संयुक्त  महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी कार्यरत राहील.काही महिन्यातच भारत स्वतंत्र झाला. अखंड भारत देश हि संकल्पाना अस्तित्वात आली. संस्थाने खालसा करण्यात आली १९५३ साली तेलगु भाषिकांसाठी आंध्र प्रदेश राज्याची निर्मिती करण्यात आली. संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीकडे मात्र दुर्लक्ष होत गेले. १९५५ च्या दरम्यान डाव्या पक्षांनी बॉम्बे बंद चा इशारा दिला, त्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. २० मार्च १९५५ रोजी गिरगाव  इथं काढण्यात आलेला मोर्चा रोखण्याचे आदेश  मोरारजी देसाई यांनी दिले. २१ नोव्हेंबर १९५५ रोजी डाव्या पक्षांनी काढलेल्या मोर्चावर हुतात्मा चौक इथं  मोरारजी देसाई सरकारने अमानुष लाठीचार्ज केला. एवढ्यावर न थांबता मोर्चा वर गोळीबार कारण्यात  आला. यात शेकडो जन जखमी झाले तर १०५ जनाचे प्राण गेले.


या घटनेनंतर संयुक्त महाराष्ट्राचं  आंदोलन अधिक तीव्र झाला. ६ फेब्रुवारी  १९५६ रोजी केशवराव  जेधे यांच्या  अध्यक्षतेखाली  पुण्यात संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन करण्यात आली. यामध्ये   आचार्य अत्रे, प्रबोधनकर ठाकरे, सेनापती बापट,शाहीर अमर शेख अशा एका पेक्षा एक मातब्बर मंडळींचा   समावेश होता. यानंतरच्या काळात  आचार्य अत्रे यांनी मराठा मधून नेहरू आणि कॉंग्रेस सरकारच्या धोरणावर शब्दाच्या रुपात घणाघाती हल्ला करायला सुरुवात केली . शाहीर अमर शेखांसह अनेक शाहिरांच्या पोवाड्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हे आंदोलन पोहचवलं आणि डाव्या पक्षांच्या, कामगार संघटनांच्या साथीन एक मोठी चळवळ उभी राहिली. पण, सरकार मात्र मानायला तयार नव्हतं. नेहरू सरकारच्या दुटप्पीपणाच्या धोरणाला विरोध करत तत्कालीन केंद्रीय अर्थमंत्री सी. डी. देशमुख यांनी तत्काळ आपल्या पदाचा राजीनामा दिला. जनतेचं उत्स्फूर्त आंदोलन आणि राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन अखेर २१ एप्रिल १९६० रोजी लोकसभेत संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीला मान्यता देण्यात आली आणि १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती होऊन, मुंबई (बॉम्बे) महाराष्ट्राची राजधानी म्हणून घोषित करण्यात आली. अशा रीतीने महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली.                                            🌐 *1 मे - महाराष्ट्र दिन*

                                                   1 मे हा महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिन. याच दिवशी 1960 साली तत्कालिन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. पंडितजींनी यशवंतराव चव्हाण यांच्या हाती महाराष्ट्राचा मंगलकलश दिला आणि नव्या महाराष्ट्राच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपविली. तसा महाराष्ट्राचा ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक वारसा फार मोठा आहे. राष्ट्रीय सभेच्या स्थापनेपासून देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत आणि त्यानंतरही देशाच्या प्रत्येक विधायक उपक्रमात महाराष्ट्राने हिरीरीने सहभाग घेतला आहे. प्राचीन संस्कृतीचा वारसा सांभाळतानाच देशाच्या विकासातही योगदान दिले आहे. महाराष्ट्राचा धार्मिक सुधारणांचा, सामाजिक सुधारणांचा इतिहास प्रेरणादायी आहे. राज्याचे विविधांगी भावविश्व् थक्क करणारे आहे.


महात्मा गांधीजींनी महाराष्ट्र म्हणजे कार्यकर्त्यांचे मोहोळ अशा शब्दांत महाराष्ट्राची प्रशंसा केली. ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या महान कवयित्री महादेवी वर्मांनी महाराष्ट्र हा भारताच्या सिंहद्वाराचा प्रहरी आहे, अशा शब्दात गौरव केला. महाराष्ट्र ही संत-महंत, ऋषि-मुनींची जशी भूमी आहे तशीच शूरवीरांचीही आहे. या भूमीला पराक्रमाची, त्यागाची, देशप्रेमाची परंपरा लाभली आहे. छत्रपती शिवरायांनी सर्वधर्मसमभावाचे पालन केले. हिंदवी स्वराज्य, रयतेचे राज्य स्थापन केले. छत्रपती शिवरायांपासून प्रेरणा घेऊन महाराष्ट्रातील क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके, उमाजी नाईक, गोपाळ कृष्ण गोखले, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, राजगुरु, नाना पाटील यासारख्या अनेक देशभक्तांनी इंग्रजांविरुध्द लढा उभारला. अतोनात कष्ट, यातना सहन केल्या. त्यासाठी प्राणांचीही पर्वा केली नाही.


संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वार, संत मुक्ताबाई, संत नामदेव, संत तुकाराम, समर्थ रामदास, संत गोरा कुंभार, संत सावतामाळी, संत नरहरी सोनार, सेना महाराज, संत जनाबाई, संत चोखामेळा, संत कान्होपात्रा, संत एकनाथ, संत गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज अशा संतांच्या मांदियाळीने महाराष्ट्र मनाचे संवर्धन, पोषण करण्याचा प्रयत्न केला. सामाजिक विचार रुजविण्याचा प्रयत्न केला. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महर्षी अण्णासाहेब कर्वे, कर्मवीर शिंदे, कर्मवीर भाऊराव पाटील यासारख्या समाजसुधारकांनी समाज प्रबोधनासाठी अपार कष्ट घेतले.


देशाच्या स्वातंत्र्याचे स्वप्न पहात असतांनाच द्विभाषिक राज्याचे एक शक्तीशाली राज्य व्हावे यासाठी लोकनेते, बुध्दीवादी, लेखक, पत्रकार यांनी मराठी भाषिक प्रदेशएकत्र आणण्याची कल्पना मांडली. एस.एम.जोशी, आचार्य प्र.के.अत्रे, कॉ.श्रीपाद अमृत डांगे, सेनापती बापट, प्रबोधनकार ठाकरे यांच्यासह अनेक जण नवमहाराष्ट्रासाठी एक झाले आणि संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकार केले.


महाराष्ट्राच्या मातीचे गुणवर्णन अनेक प्रतिभावंतांनी, इतिहासकारांनी करुन ठेवले आहे. महाराष्ट्राचे महात्म्य वर्णन करतांना राम गणेश गडकरी ऊर्फ गोविंदाग्रज यांनी मंगल देशा ! पवित्र देशा ! महाराष्ट्र देशा। प्रणाम घ्यावा माझा हा, श्री महाराष्ट्र देशा॥ राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा । नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याहि देशा ॥॥ अशा शैलीदार ओळी वापरल्या आहेत. श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांनीही बहु असोत सुंदर संपन्न की महा, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा हे महाराष्ट्र गीत लिहून महाराष्ट्राच्या व्यक्तिमत्वाचा वेध घेतला आहे. वि.वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांनी 'माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, हिच्या संगाने जागल्या द-याखो-यातील शिळा अशा शब्दांत स्वाभिमान जागवला आहे. वसंत बापटांनीही भव्य हिमालय तुमचा अमुचा, केवळ माझा सह्यकडा, गौरीशंकर उभ्या जगाचा, मनांत पूजिन रायगडा म्हणत महाराष्ट्रप्रेम व्यक्त केले आहे. विदर्भ, कुंतल, अश्मक, लाट, अपरान्त अशा विविध नावांनी एकवटलेला मरहट्ट देश म्हणजेच महाराष्ट्र होय. श्री चक्रधर स्वामी तसेच महानुभव कवींनी महाराष्ट्राचे विस्तृत वर्णन केले आहे. समर्थ रामदास स्वामींनी मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा हे प्रेरणादायी सूत्र मांडले. संत ज्ञानेश्वररांनी माझा मऱ्हाटाचि बोल कवतुके। परी अमृतातेंहि पैजा जिंके। ऐसी अक्षरेरसिकें । मेळवीन॥ अशा शब्दांत मराठीचे माधुर्य मांडले आहे. मा.त्र्यं.पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन यांनी मराठी असे आमुची मायबोली म्हणत भाषेची थोरवी वर्णिली आहे. गं.रा.मोगरे यांनी माता तशी स्वभाषा, सेवाया होय आपणा उचित। किंबहुना मातेहुनि अधिक हिची योग्यता असे खचित॥॥ म्हणून भाषेचा गौरव केला आहे. ना.के.बेहेरे यांनी भाषा आमुची छान। मराठी। भाषा आमुची छान॥ भाषा भिन्ना देशदेशच्या सर्वांची परि खाण॥ म्हणून मराठीचे श्रेष्ठत्व सांगितले. संत एकनाथ महाराजांनी संस्कृत वाणी देवे केली। तरी प्राकृत काय चोरापासोनि झाली ? ॥ असा परखड प्रश्न विचारला आहे. ख्रिस्तदास स्टीफन यांनी जैसी हरळां (खडा) माजि रत्नकिळा। कि रत्ना माजि हिरानिळा। तैसी भासां माजि चोखाळ। भासा मराठी॥ या शब्दांत मराठी भाषेविषयी अभिमान व्यक्त केला आहे. ना.गो.नांदापूरकर यांनी माझी मराठी असे मायभाषा हिच्या कीर्तिचे तेज लोकी चढे, गोडी न राहे सुधेमाजि आता, पळाली सुधा स्वर्गलोकांकडे अशा रसदार शब्दांत मराठीचा गोडवा गायिला आहे.


महाराष्ट्राने आतापर्यंत साहित्य, कला, शिक्षण, क्रीडा, संस्कृती, नाट्य, चित्रपट, संगीत, सहकार, कृषी, उद्योग, संगणक, विज्ञान अशा विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली आहे. आपल्या पूर्वजांनी दिलेल्या योगदानाची जाणीव ठेवत वैभवशाली इतिहास जपत प्रगतीची नवनवी शिखरे पादाक्रांत करण्याचा निर्धारआपण करावयास हवा.                                                    🏵️ २१ नोव्हेंबर इ.स.१९५६ दिवशी फ्लोरा फाउंटनच्या परिसरात तणावाचे वातावरण होते कारण राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्याचे नाकारले त्यामुळे मराठी माणसे चिडली होती. सर्वत्र छोट्यामोठ्या सभांमधून या निर्णयाचा निषेध होत होता. या संगठनामुळे कामगारांचा एक विशाल मोर्चा सरकारचा निषेध करण्यासाठी फ्लोरा फाऊंटनासमोरील चौकात येण्याचे नियोजन झाले.


त्यानंतर प्रचंड जनसमुदाय एका बाजूने चर्चगेट स्थानकाकडून व दुसऱ्या बाजूने बोरीबंदरकडून गगनभेदी घोषणा देत, फ्लोरा फाउंटनकडे जमला. मोर्चा पोलिसी ताकद वापरून उधळून लावण्यासाठी लाठीचार्ज करण्यात आला. मात्र अढळ सत्याग्रहीं मुळे पोलिसांचे हे प्रयत्न अयशस्वी झाले आणि पोलिसांना गोळीबाराचा आदेश मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्याद्वारे देण्यात आला. गोळीबार झाला आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०६ आंदोलक हुतात्मे झाले.


या हुतात्म्यांच्या बलिदानामुळे व मराठी माणसाच्या आंदोलनामुळे सरकारने नमते घेऊन १ मे, इ.स. १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना केली. त्यानंतर इ.स. १९६५ मध्ये त्या जागी हुतात्मा स्मारकाची उभारणी करण्यात आली.

🇮🇳🇮🇳🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳🇮🇳🇮🇳

*🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏*

संकलन -)

गजानन गोपेवाड राज्य समन्वयक महाराष्ट्र राज्य 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६



गुरुवार, २९ एप्रिल, २०२१

29 एप्रिल मराठी शास्त्रज्ञ शंकर भिसे जयंती

 *🇮🇳🇮🇳शंकर आबाजी भिसे🇮🇳🇮🇳*

👨‍🔬👨‍🔬👨‍🔬👨‍🔬👨‍🔬👨‍🔬👨‍🔬👨‍🔬👨‍🔬👨‍🔬👨‍🔬

*एक मराठी शास्त्रज्ञ व संशोधक*

🚋🚋🚋🚋🚋🚋🚋🚋🚋🚋

*जन्मदिन - २९ एप्रिल १८६७*


     डॉ. शंकर आबाजी भिसे (इंग्लिश: Shankar Aabaji Bhise) (जन्म मुंबई, २९ एप्रिल १८६७; मृत्यू : ७ एप्रिल १९३५) हे एक मराठी शास्त्रज्ञ व संशोधक होते. त्यांना भारताचे एडिसन असे म्हटले जाते. 


संशोधन आणि आविष्कार

त्याच सुमाराला म्हणजे साधारण १८९७मध्ये ' इन्व्हेन्टर रिव्ह्यू ॲन्ड सायंटिफिक रेकॉर्ड' नामक मासिकाने 'स्वयंमापन यंत्र' करण्याची एक स्पर्धा जाहीर केली होती. स्वयंमापन यंत्र म्हणजे साखर, पीठ इत्यादी वस्तूंचे गिऱ्हाइकाला हवे तेवढे वजन करुन देणारे यंत्र. शंकररावांनी अशा यंत्राचा आराखडा करून मासिकाकडे पाठवला. त्यावेळी शंकररावांच्या त्या यंत्राला प्रथम क्रमांक मिळाला. शंकर आबाजी भिसे यांच्या संशोधक कारकिर्दीची ही सुरुवात होती.


पुढील आयुष्यात शंकर आबाजी भिसे यांनी दोनशेच्यावर निरनिराळे शोध लावले आणि त्यांतील ४०हून अधिक आविष्कारांची पेटंटे घतली.


१९०० साली मद्रास येथे भरलेल्या 'इंडियन इंडस्ट्रियल काँग्रेस'चे ते अध्यक्ष होते. त्या काली प्रचलित असलेल्या लायनो, मोनो, स्ट्रिंजरटाइप, विक्स आणि त्या काळच्या इतर मुद्रण यंत्रांच्या रचना आणि त्यांच्या वापराच्या कमाल कार्यमर्यादा यांचा अभ्यास करून शंकरराव भिसे यांनी ’भिसोटाइप’ हे छापण्यासाठीचे खिळे पाडण्यासाठी आणि नंतर ते जुळवण्यासाठीचे यंत्र शोधले आणि त्याचे पहिले तात्पुरते पेटंट इंग्लंडमध्ये, २ डिसेंबर १९०१ रोजी घेतले. नंतर भिसे यांनी अमेरिका, जर्मनी, फ्रान्स आदी देशांतही 'भिसोटाइप’ची पेटंटे घेतली. या यंत्राच्या उत्पादनासाठी आणि एकूण भारताच्या वैज्ञानिक प्रगतीसठी त्यांनी रतन टाटा यांच्या भागीदारीत ’टाटा-भिसे इन्व्हेन्शन सिंडिकेट’ या कंपनीची लंडन येथे स्थापना केली, पण १९१५साली ही कंपनी बंद पडली. . १९१६साली भिसे अमेरिकेला गेले. तिथे त्यांनी युनिव्हर्सल टाइप मशीन या कंपनीच्या विनंतीनुसार ’आयडियल टाइप कास्टर’ या यंत्राचा आविष्कार केला, व अमेरिकेत त्याचे पेटंट घेतले. १९२० साली त्यांनी 'अमेरिकन भिसे आयडियल टाइप कास्टर कॉर्पोरेशन'ची स्थापना करून १९२१साली पहिले यंत्र विक्रीस आणले. याशिवाय अशी अनेक मुद्रण यंत्रांचे आराखडे, डॉ. भिसे यांनी बनविले. त्यांच्या टाइप कास्टिंगच्या शोधाचा अमेरिकेच्या तत्कालीन पाठ्यपुस्तकात समावेश करण्यात आला होता. १९२७ मध्ये न्यूयॉर्क विद्यापीठाने शंकररावांना डी.एस्‌सी. ही पदवी दिली.


भिसे यांनी काचेचा कारखाना काढला. १८९० मध्ये उत्तर हिंदुस्थानात जाऊन आग्रा लेदर फॅक्टरी काढली. भिसे यांनी सामाजिक कार्य देखील केले. धी सायंटिफिक क्लबची स्थापना केली. दादाभाई नौरोजींच्या सहाय्याने भिसे यांनी १९०१ साली ‘पेटंट सिंडिकेट’ नावाची कंपनी काढली.


सौरऊर्जेवर चालणाऱ्या मोटारी तयार करण्याची मूळ कल्पना डॉ. शंकर आबाजी भिसे यांची होती.


१९१० मध्ये भिसे आजारी पडले. त्यावेळी त्यांना देण्यात आलेले एक भारतीय औषध त्यांना फार गुणकारी वाटले. त्या औषधाचे त्यांनी रासायनिक पृथक्करण करून घेतले. त्यात आयोडीन असल्याचे कळताच भिसे यांनी १९१४ साली एक नवीनच औषध तयार करून त्याला ’बेसलीन’ हे नाव दिले. हे औषध बाह्योपचारासाठी उपयुक्त ठरले. अमेरिकेच्या लष्कराने या औषधाचा पहिल्या महायुद्धात पुरेपूर उपयोग केला. याच औषधावर संशोधन करून आयोडीन हा घटक असलेले पण पोटात घेता येण्यासारखे एक औषध, भिसे यांनी बनवले. आणि त्याच्या उत्पादनासाठी न्यूयॉर्क येथे कंपनी स्थापन केली. १९२७मध्ये या औषधाच्या उत्पादनाचे आणि वितरणाचे हक्क भिसे यांनी शेफलीन या कंपनीला विकले. या औषधाला शंकर आबाजी भिसे यांनी ’ॲटोमिडीन’ (ॲटॉमिक आयोडीन) हे नाव दिले होते. हे औषध बऱ्याच रोगांवर गुणकारी आहे.


*भिसे यांनी आविष्कार केलेली यंत्रे*

मुंबई उपनगरीय रेल्वेत गर्दीमुळे अपघात होतात. डब्यात लोंबकळणारे प्रवासी खाली पडतात व मरतात. त्यामुळे स्वयंचलित दरवाजे लावण्याची घोषणा रेल्वेमंत्र्यांनी २०१६साली केली, पण आगगाडीच्या स्वयंचलित दरवाजाचा शोध डॉ. भिसे यांनी १८९८ मध्ये लावला होता. त्या काळात आजच्यासारखी गर्दी नव्हती, पण पुण्याहून मुंबईस येत असताना कल्याण स्टेशनवर उतरताना एका प्रवाशाची बोटे दरवाजात चिरडली. त्यामुळे रेल्वेवर टीका झाली. अशा प्रकारचा अपघात टळावा म्हणून डॉ. भिसे यांनी असा शोध लावला की, प्रवाशाने गाडीच्या दरवाजात मुद्दाम बोट घातले वा कोणी निष्काळजीपणे दरवाजा लावला तरीही प्रवाशास इजा होणार नाही. या शोधाचे पेटंट भिसे यांनी घेतले नाही. मुंबईतील प्रदर्शनात त्यांनी या स्वयंचलित दरवाजाचे नमुने ठेवले व त्यास बक्षीस मिळाले. आज आपल्याला जे हवे आहे ते डॉ. भिसे यांनी १८९८ मध्येच निर्माण केले.

स्वयंचलित वस्तूंचे वजन करणारे यंत्र. स्पर्धेसाठी बनविलेले यंत्र. यासाठी त्यांना पहिले बक्षिस मिळाले.

स्वयंचलित आगामी स्थानदर्शक यंत्र - त्यांच्या या यंत्रामुळे रेल्वे प्रवाशांना पुढच्या स्टेशनचे नाव आधीच कळणार होते. पण एका भारतीयाने शोध लावल्याने ब्रिटिश रेल्वे कंपनीने हे यंत्र वापरण्यास नकार दिला.

आज आपण प्रत्येक रेल्वे प्लॅटफॉर्मवर ‘इंडिकेटर’ बोर्ड पाहतो. त्या इंडिकेटर बोर्डाचे निर्माते डॉ. भिसे आहेत.

भिसे मुद्रण यंत्र - हे मुद्रणशास्त्रात मैलाचा दगड ठरले. या यंत्राचे पहिले ’गुणित मातृका’ नावाचे मॉडेल मिनिटाला १२०० अक्षरे छापी. हे यंत्र १९१६मध्ये विक्रीला आले.

मिनिटाला २४०० टाइप(खिळे) पाडणारे आणखी एक यंत्र भिसे यांनी बनवले होते.

त्यांनी पगड्या तयार करण्याचे यंत्र बनवले. पिठाच्या चक्क्या बनवल्या. सायकल जागच्या जागी उभे करणारे स्वयंचलित यंत्र, १९०६ साली तारेने दूरवर फोटो पाठविण्याची युक्ती त्यांनी शोधून काढली.

डॉ. भिसे यांनी ‘टिंगी’नावाच्या अजब अशा छोट्या यंत्राचा शोध लावला. टिंगीमुळे अंगरख्याची परीटघडी न बिघडवता बटणे बसविता येत असत.

सौर ऊर्जेवर चालणार्‍या मोटारीचा शोध १९१८ सालीच लावून ते मोकळे झाले.

समुद्राच्या तळाशी भरपूर प्रकाश देणारा दिवा.

वातावरणातील विविध वायू वेगळे करणारे यंत्र.

एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी विजेच्या साहाय्याने छायाचित्रे पाठविणारे यंत्र.

धुण्यासाठी ' रोला ' नावाचा रासायनिक पदार्थ.

जखमांवर लावण्यासाठी ’बेसलीन’ आणि पाण्यात विरघळणारे पोटात घेण्यासाठी ’ॲटोमिडीन’ (आण्विक आयोडीन) - या आविष्काराने भिसे यांना जगभर कीर्ती मिळवून दिली.

बॉडी मसाजरचा शोध त्यांनी त्या काळात लावला. डोके दुखू लागल्यास शिरा चेपणारे हे यंत्र होते. त्यांनी ‘चटण्या’ वगैरे वाटणारे ‘मिक्सर’ बनवले.


एडिसन

भिसे हे खर्‍या अर्थाने आपले ‘एडिसन’ होते, पण स्वातंत्र्यानंतर हा एडिसन उपेक्षित राहिला. भिसे यांचा सन्मान म्हणून त्यांच्यावर एक टपाल तिकीट काढावे यासाठी दिलीप प्रभाकर गडकरी व पार्ल्याचे रघुनाथ पी. मेढेकर २०१० सालापासून प्रयत्न करीत आहेत. भिसे यांच्या संशोधन कार्याबाबत सर्व माहिती व पुरावे सादर करूनही त्यांचे पोस्टाचे तिकीट निघू शकले नाही व ही मागणी फेटाळण्यात आली.


कारकीर्द

शंकररावांचे वडील धुळ्याला मॅजिस्ट्रेट होते. तिथल्या शाळेत शंकररावांचे प्राथमिक शिक्षण झाले. मुलाची यंत्राची आवड पाहून वडिलांना फार आनंद होत असे. त्यामुळे उत्तेजनार्थ त्यांनी शंकररावांना महिना ३० रुपये पगारावर अकाउन्टन्ट जनरलच्या ऑफिसमध्ये कारकून म्हणून चिकटवले.


गौरव

जागतिक दर्जाच्या 'हू’ ज 'हू' या संदर्भग्रंथात भारताचे एडिसन असे म्हणून शंकर आबाजी भिसे यांना गौरवण्यात आले आहे. खऱ्या थॉमस अल्व्हा एडिसननेही भिसे नामक भारतीय एडिसनची २३ डिसेंबर १९३० रोजी न्यू जर्सी येथे भेट घेतली होती. २९ एप्रिल१९२७ रोजी, म्हणजे भिसे यांच्या साठाव्या वाढदिवसाच्या दिवशी अमेरिकन वैज्ञानिकांच्या उपस्थितीत ’अमेरिकेतील भारताचे पहिले शास्त्रज्ञ’ म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला. मात्र त्यापूर्वीच म्हणजे १९०८ सालापासूनच अमेरिकन वृत्तपत्रे भिसे यांचा भारताचे एडिसन म्हणून उल्लेख करीत होती.

🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

संकलन-)

गजानन गोपेवाड 

7378670283

उमरखेड जिल्हा-यवतमाळ ४४५२०६

आँक्सीजन चे शोध कर्ता जोसेफ


 ➿➿➿➿➿➿➿➿➿➿

*💨💨जोज़ेफ़ प्रीस्टलि💨💨*

➿➿➿➿➿➿➿➿➿➿

 (Priestley, Joseph; सन् १७३३ - १८०४) 

     १८वीं शती के जगत्प्रसिद्ध, अंग्रेज रसायनज्ञ थे,जिन्होंने ऑक्सीजन की खोज की थी।



जोस्फ प्रिस्टले

*परिचय*


जोजेफ प्रिस्टले का जन्म लीड्ज़ के समीप फील्डहेड में हुआ था। बाल्यकाल में स्वास्थ्य अनुकूल न होने के कारण बहुत दिनों तक इनका अध्ययन बदं रहा और ये इधर उधर व्यापार संबंधी काम करते रहे। बाद को डॉ॰ डॉडरिज (Doddridge) द्वारा डेवेट्री में स्थापित एक अकादमी में इन्होंने धर्मशिक्षा प्राप्त की। प्रीस्टलि ने रूढ़िगत परंपराओं के प्रति आस्था प्रकट न की और अपने निजी ढंग पर प्रत्यक्ष और परोक्ष के प्रश्नों पर विचार करना प्रारंभ किया। १७५५ ई. में ये सफक (Suffolk) के एक छोटे से समुदाय के नीडैम मार्केट में पादरी हो गए। यहाँ इन्होंने एक पुस्तक 'दी स्क्रिपचर डॉक्ट्रिन ऑव रेमिशन' लिखी, जिसमें ईसा की मृत्यु और पाप संबंधी प्रचलित विचारों का विरोध किया गया था। १७५८ ई. में इन्हांने नीडैम अकादमी छोड़ दी और नैटविच चले गए। १७६१ ई. में ये बैरिगटन की एक अकादमी में भाषाओं के अध्यापक हो गए। यहीं प्रिस्टलि का साहित्यिक जीवन आरंभ हुआ। इनका लंदन आना जाना लगा रहता था, जिससे प्रिस्टलि का परिचय फ्रैंकलिन से हो गया। फ्रैंकलिन ने जो सामग्री इन्हें प्रदान की, उसके आधार पर प्रीस्टलि ने १७६७ ई. में विद्युत् संबंधी पुस्तक 'हिस्ट्री ऐंड प्रेजेंट स्टेट ऑव इलेक्ट्रिसिटी' लिखी। इसके बाद ही इनकी प्रकाश संबंधी पुस्तक 'विज़्हन, लाइट ऐंड कलर्स' (दृष्टि, प्रकाश और रंग) प्रकाशित हुई। १७६२ ई. में इन्होंने भाषा और सर्वमान्य व्याकरण के सिद्धांत पर एक पुस्तक लिखी।


१७६४ ई. में इन्हें एल-एल.डी. की उपाधि एडिनबरा से मिली और १७६६ ई. में ये रॉयल सोसायटी के फेलो निर्वाचित हुए। इगले वर्ष ये लीड्ज़ में एक गिरजा के पादरी हो गए। यहाँ इनके घर के निकट शराब बनाने का एक छोटा कारखाना प्रारंभ हुआ। प्रीस्टलि ने इस कारखाने में रुचि लेना प्रारंभ किया, जिसके कारण इनका ध्यान रसायन विज्ञान की ओर आकर्षित हुआ। पर प्रमुख वृत्ति अभी साहित्यिक ही थी। १७७३ ई. में ये लार्ड शेलबर्न के साहित्यिक सहायक नियुक्त हुए और यूरोप की यात्रा की। 'मैटर और स्पिरिट' (प्रकृति और पुरुष) पर एक ग्रंथ लिखा, जिसमें प्रकृति में चेतनता और आत्मा में जड़ता, इस प्रकार विरोधी भावों का समन्वय करना चाहा। ये विज्ञान की सत्यता की अपेक्षा बाइबिल की सत्यता में अधिक आस्था रखते थे। बाद को लार्ड शेलबर्न का साथ इन्होंने छोड़ दिया और बर्मिघम के गिरजे के पादरी बने। यहाँ इन्होंने ईसा मसीह से संबधित विवादास्पद विचारों पर एक पुस्तक लिखी, जिसका नाम 'हिस्ट्री ऑव अर्ली ओपिनियन्स कन्सर्निग जीसस क्राइस्ट' है। बर्क की एक पुस्तक 'रिफ्लेक्शन्स ऑन फ्रेंच रेवोल्यूशन' का प्रीस्टलि ने उत्तर लिखा, जिसके परिणामस्वरूप इन्हें फ्रेंच रिपब्लिक का नागरिक बना लिया गया। इस नागरिकता के कारण इनके नगर के लोग बिगड़ उठे, उन्होंने इनका घर लूट लिया और इनकी पुस्तकें तथा पांडुलिपियाँ जला दीं। इसी समय इनके एक बहनोई की मृत्यु हुई और इन्हें उसकी १०,००० पाउंउ की संपत्ति मिल गई। इनके स्वतंत्र विचारों ने इन्हें कहीं चैन से टिकने न दिया। विरुद्ध लोकमत से तंग आकर ये १७९४ ई. में अमरीका चले गए, जहाँ इनका अच्छा स्वगत हुआ। पेनसिलवेनिया के फिलाडेल्फिया नगर में ६ फ़रवरी १८०४ ई. को इनकी मृत्यु हो गई।


प्रीस्टलि ने गैसों पर बहुत काम किया। ये सब प्रयोग इन्होंने अवकाश के समय में किए थे। १७७४ ई. में इन्होंने छह खंडों में 'ऑबज़र्वेशन्स ऑन डिफ़रेंट काइंड्स ऑव एयर', अर्थात् विभिन्न प्रकार की हवाओं संबंधी परीक्षण विषयक पुस्तक प्रकाशित की। इन्होंने अपने प्रयोगों के उपकरणों की स्वयं खोज की। प्रीस्टलि ने नई गैसों की भी खोज की और इनमें से जो गैसें पानी में बहुत विलेय थीं, (जैसे अमोनिया और सल्फर डाइऑक्साइड), उन्हें पारे के ऊपर इकट्ठा करने की विधि बताई। ऑक्सिजन की खोज इन्होंने १७७४ ई. में की। लगभग इन्हीं दिनों शीले (Scheele) ने भी स्वतंत्र रूप से यह गैस स्वीडन में तैयार की थी। प्रीस्टलि ने पारे के ऑक्साइड पर सूर्य की किरणें १२ इंच व्यास के लेंस द्वारा केंद्रित की। ऐसा करने पर उन्होंने देशा कि एक गैस आसानी से निकल रही है। यह गैस पानी में नहीं घुलती थी और इसमें मोमबत्ती जोरों से जलती थी। इन्होंने इस गैस के भीतर साँस की खींची और साँस लेने में उन्हें सुविधा प्रतीत हुई। इस प्रकार प्रीस्टलि ने ऑक्सिजन की खोज कर डाली। प्रीस्टलि ने नाइट्रिक ऑक्साइड, नाइट्रस ऑक्साइड, सलफ्यूरस अम्ल, कार्बोनिक ऑक्साइड, हाइड्रोक्लोरिक अम्ल और अमोनिया आदि गैसों पर महत्वपूर्ण कार्य किया।

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

संकलन -)

गजानन गोपेवाड  

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

मिरगी का? येते.

 ▬▬▬▬▬❚❂❚❂❚❚❂❚❂❚▬▬▬▬▬

     *📱अग्निपंख फाउंडेशन ऊमरखेड यवतमाळ 📱*

▬▬▬▬▬❚❂❚❂❚❚❂❚❂❚▬▬▬▬▬


══════════════════════

   *📒📒📒 @ संकलन @📒📒📒*

  *श्री. गजानन गोपेवाड 

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

═══════════════════════

📕 *मिरगी वा फेफरे का होते?* 

********************************

निरोगी माणसाला अचानक झटका येणे, क्वचित बेशुद्धी येणे, हा मिरगी वा फेफऱ्याचा परिणाम असतो. फेफरे अनेक प्रकारचे असते. एखाद्या अवयवापुरता झटका येण्यापासून सर्व शरीराला आकडी येणे, बेशुद्ध पड़णे असे अनेक प्रकार दिसून येतात. यालाच इंग्रजीत 'एपीलेप्सी' असे म्हणतात. अँड माल वा मोठे फेफरे या प्रकारात सर्व शरीराला झटका येतो, तोंडाला फेस येतो, शुद्ध हरपते व तेवढ्यापुरती स्मरणशक्ती जाते. काही प्रकारच्या फेफर्‍यात काही काळ शुद्ध हरपते, झटके येत नाहीत. पेटीट माल वा लहान फेफरे या प्रकारात स्मरणशक्ती शाबून राहते, शुद्धही हरपत नाही. फक्त एखाद्या भागापुरताच झटका येतो.


मेंदूतल्या विशिष्ट भागातील विद्युतप्रवाहामध्ये अचानक विघाड झाल्यास फेफरे होते, हे वैद्यकशास्त्राला ज्ञात आहे. पण ते का होते, ते मात्र खात्रीने सांगता येत नाही. मिरगीच्या कारणात अनुवंशिकता, जन्माच्या वेळी डोक्याला झालेली इजा, मेंदूतील वा डोक्यातील गाठ, रक्तप्रवाहात बिघाड इत्यादींचा समावेश होतो. खूप तापात, मधुमेहासारख्या रोगात व रक्तातील कॅल्शियमचे प्रमाण कमी झाले, तरीही झटके येतात; पण मिरगीचे झटके बऱ्याच वेळा येतात. तसेच त्यासोबत वर सांगितलेले (मधुमेह बगैरे) आजार असतील असे नाही. मिरगीचे निदान व उपचार तज्ज्ञांकडूनच करून घ्यावे. गार्डीनल, डायलॅटीन, टेग्रेटॉल यांसारख्या परिणामकारक औषधांचा वापर करून मिरगी हा रोग नियंत्रणात ठेवता येतो. पाच वर्षांत जर व्यक्तीला एकदाही झटके आले नाही, तर तज्ज्ञांच्या सल्ल्याने उपचार थांबवता येतात.


अशा रुग्णांच्या नातेवाईकांनी झटका आलेल्या व्यक्तीची नीट काळजी घ्यावी. जीभ चावली जाऊ नये यासाठी दातांमध्ये लाकडी पट्टी वा कपडा ठेवावा. अशा व्यक्तीने मशिनवर काम करू नये, वाहन चालवू नये. तसेच पोहणे, आगीजवळ काम करणे अशा गोष्टी कदापिही करू नयेत. रुग्णाच्या जवळ त्याचे नाव, पत्ता, घेत असलेले उपचार आदी माहिती असलेले कार्ड नेहमी ठेवावे; म्हणजे अपघाताच्या वेळी वा आकस्मिकपणे काही झाल्यास त्या माहितीचा उपयोग होईल.


*डॉ. जगन्नाथ दीक्षित*

*डाॅ. अंजली दीक्षित*

यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून

मनोविकास प्रकाशन


स्त्रोत- विज्ञान व दिनविशेष फेसबुक पेज

═══════════════════════

  *📱गजानन गोपेवाड राज्य समन्वयक महाराष्ट्र राज्य 📱*

▬▬▬▬▬❚❂❚❂❚❚❂❚❂❚▬▬▬▬▬

═══════════════════════


═══════════════════════

बुधवार, २८ एप्रिल, २०२१

पवित्र रमजान महिना लेख गजानन गोपेवाड

 *मानवतेचा संदेश देणारा – रमजान महिना*

✍️लेखन, गजानन गोपेवाड 



👇👇👇👇👇👇👇👇 https://www.patrakarshakti.com/04/2021/news-post/13814

Featured Post

व्यायाम व योगा अवश्य करावा*

*व्यायाम व योगा अवश्य करावा*  *व्यायाम व योगा करण्याचे दहा फायदे:-*  1) व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते: व्यायाम करणारी...