सोमवार, २१ फेब्रुवारी, २०२२

गाथा बलिदानाची 🚩🚩* ➿➿➿➿➿➿➿➿➿➿ 🚩 *राजे शिवछत्रपती*

 ➿➿➿➿➿➿➿➿➿➿

*🚩🚩 गाथा बलिदानाची 🚩🚩*

➿➿➿➿➿➿➿➿➿➿


   🚩 *राजे शिवछत्रपती* 🏇🚩

          

  *छत्रपती शिवाजी राजे भोसले*

  *जन्म : १९ फेब्रुवारी १६३०*

  *मृत्यू  : ३ एप्रिल १६८०*

  *राजधानी - रायगड*


🚩🏇🚩🤺🚩🏇🚩🤺🚩

*१९ फेब्रुवारी १६३०*

समस्त शिवभक्तांच्या दैवताचा जन्मदिन.

श्री शिवछत्रपती महाराज जन्मदिवस

किल्ले शिवनेरी, जुन्नर- जिल्हा -पुणे, महाराष्ट्र.

(तिथी प्रमाणे - फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१).

शहाजीराजे भोसले यांच्या पत्नी राजमाता जिजाऊ

यांच्या पोटी पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात वसलेल्या शिवनेरी या

डोंगरी किल्ल्यावर

*इ.स. १९ फेब्रुवारी १६३० मध्ये "शिवाजीराजे"*

यांचा जन्म झाला.

*सह्याद्रीचा सिंह जन्मला आई जिजाऊ पोटी..!*

*हर हर महादेवाची घुमली गर्जना गड किल्याच्या ओठी..!*

रायगडावर तुम्ही ऊभारली

...शिवराष्ट्राची गुढी!

राजे तुम्ही नसता तर

सडली असती हिंदुची मढी!

तुम्हा मुळे तर आम्ही

पाहतो देवळाचे कळस,

तुम्ही नसता तर नसती

दिसली अंगनात तुळस!

      गडावरील शिवाईदेवीच्या मंदिरातील शिवाई देवीच्या

नावावरून मुलाचे नाव ठेवले "शिवाजी"

         *"प्रौढ प्रताप पुरंदर"*

      *"महापराक्रमी रणधुरंदर"*

        *"क्षत्रिय कुलावतंस्"*

          *"सिंहासनाधीश्वर"*

          *"महाराजाधिराज"*

              *"महाराज"*

               *"श्रीमंत"*

                 *"श्री"*

                 *"श्री"*

                 *"श्री"*

              *"छत्रपती"*

              *"शिवाजी"*

              *"महाराज"* 

                 *"की"*

                 *"जय"*

*🚩!! जय भवानी ~ जय शिवाजी !!🚩*

      "इतिहासाच्या पानावर 

                    रयतेच्या मनावर 

       मातीच्या कणावर आणि

                  विश्वासाच्या प्रमाणावर 

राज्य करणारा राजा म्हणजे 

*राजा शिवछत्रपती..*


*ताठ होतील माना...*

*उंच होतील नजरा...*

*बहुजनाच्या राजाला माझा मानाचा मुजरा !*

 🚩🚩🚩🚩 🏇🤺🏇🚩🚩🚩🚩

🌿-----१६ व्या शतकात राजमाता राष्ट्रमाता  जिजाऊ च्या पोटी एक बाळ जन्माला आले व त्याचे संगोपन व शिक्षण स्वतःहा राजमाता जिजाऊ च्या तालिमात झाले, परकीय आक्रमण व स्व बंडाळी व रुडी परंपरा आणि अंदरश्रद्धा ने होरपळून गेलेल्या राज्यात एक पराक्रमी बाळ वाढू लागले वयाच्या १४ व्या  वर्षी मूठभर मावळे हाताशी घेऊन स्वराज्य संकल्पना शाहजी राजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली मांडली होती आई जिजाऊ च्या प्रशिक्षणातून ती मिळत गेली व प्रत्येक्षात उतरवण्यात माझा राजा यशस्वी झाला!


हिंदवी साम्राज्याचे संस्थापक आणि एक आदर्श शासनकर्ता म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजीराजे भोसले एक सर्वसमावेशक , सहिष्णू राजा म्हणून महाराष्ट्रात आणि इतरत्रही  वंदिले जातात. शत्रुविरुध्द लढण्याकरीता  महाराष्ट्रातील डोंगरद-यांमध्ये  अनुकूल असलेली गनिमी काव्याची पध्दत वापरून त्यांनी तत्कालीन विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही आणि बलाढ्य मुघल साम्राज्यशाही यांच्याशी लढा दिला, आणि मराठी साम्राज्याचे बीजारोपण केले. आदिलशाही, निजामशाही आणि मुघल साम्राज्य बलाढ्य असली तरी महाराष्ट्रात त्यांची सगळी भिस्त  स्थानिक सरदारांवर आणि किल्लेदारांवर होती.  ते सरदार/किल्लेदार  जनतेवर अन्याय-अत्याचार  करत असत. शिवाजीमहाराजांनी त्या अन्याय-अत्याचारातून जनतेची सुटका केली, आणि उत्तम शासनाचे एक उदाहरण भावी राज्यकर्त्यांसमोर ठेवले.

छत्रपतींच्या व्यक्तीमत्वाचा व कारकीर्दीचा आढावा घेतल्यास... शौर्य, पराक्रम, शारीरिक सक्षमता, ध्येयवाद, कुशल संघटन , कडक व नियोजनबध्द प्रशासन, मुत्सद्दीपणा, धाडस, द्रष्टेपणा... असे उच्चकोटीचे गुण महाराजांच्या व्यक्तीमत्वात एकवटलेले दिसतात.


*छत्रपती शिवाजी महाराजांनी.....*


🚩 बालपणी, तरुणपणी शारीरिक सामर्थ्य वाढविण्यासाठी स्वतः कष्ट घेतले.


🚩 पराक्रमासाठी शस्त्रांचा अभ्यास केला.


🚩 महाराष्ट्रातल्या १८ पगड जातीच्या सर्व मावळयांच्या सोबतीने धर्मनिरपेक्ष स्वराज्याची ज्यांनी स्थापना केली, 


🚩 साध्या-भोळ्या मावळयांचा संघटन करुन त्यांच्यामध्ये निष्ठा व ध्येयवाद जागृत केला.


🚩 स्वतः शपथ घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या  कार्यात स्वतःला घट्टपणे बांधून घेतले.


🚩 महत्त्वाचे गड-किल्ले जिंकले व नविन निर्माण केले.


🚩 योग्य त्यावेळी आक्रमण किंवा गरज पडेल त्यावेळी तह हे सूत्र कमालीच्या हुशारीने वापरुन अनेक शत्रुंना  नामोहरम केलेच, तसेच  फितुरी, दगाबाजी, स्वराज्यांतर्गत कलहाचाही सामना केला.


🚩 आक्रमणाच्या वेळी गनिमी कावा तंत्राचा चातुर्याने वापर केला.


🚩 सामान्य रयतेची व्यवस्था, लढवय्या शूर सरदारांची व्यवस्था, धार्मिक स्थानांची व्यवस्था ... अशा अनेक व्यवस्था लावुन दिल्या.


🚩 सर्वात महत्त्वाचे म्हणजे छत्रपतींनी अष्टप्रधान मंडळाची स्थापना करुन हिंदवी स्वराज्याच्या राज्यकारभाराची परिपूर्ण व्यवस्था निर्माण केली.


🚩 राजभाषा विकसित करण्याचा गांभिर्यपूर्वक प्रयत्न केला, विविध कलांना राजाश्रय दिला.


🚩तसेच खचलेल्या, पिचलेल्या रयतेच्या मनामध्ये स्वाभिमानाचा, पराक्रमाचा, स्वराज्य निष्ठेचा हुंकार जागृत केला.


🚩 सतीप्रथेला विरोध केला.


🚩 स्त्रियांना मान- सन्मान-प्रतिष्ठा देऊन त्यांचा आदर केला.


*या सर्व गोष्टी त्यांनी साध्य केल्या अवघ्या ५० वर्षाच्या आयुष्यात  !!*


सतराव्या शतकात जागृत झालेला तो स्वाभिमान, ती स्वराज्यनिष्ठा आजही महाराष्ट्राला  प्रेरणा देते.


🚩 *स्वराज्य व्हावे हिच श्रींची इच्छा* 🚩


🚩🚩🚩🙏🚩🕉🚩🙏🚩🚩🚩


*🚩 तमाम भारतीय जनतेला शिवजयंतीच्या मंगलमय शुभेच्छा !!🚩*


🚩🚩 *हर हर...महादेव* 🚩🚩


🇮🇳🇮🇳🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳🇮🇳🇮🇳

🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

 संकलन -)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा - यवतमाळ ४४५२०६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Featured Post

व्यायाम व योगा अवश्य करावा*

*व्यायाम व योगा अवश्य करावा*  *व्यायाम व योगा करण्याचे दहा फायदे:-*  1) व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते: व्यायाम करणारी...