मंगळवार, १५ फेब्रुवारी, २०२२

ज्ञान विज्ञान जीभ


══════════════════════

   * @ संकलन @*

  गजानन गोपेवाड

══════════════════════

            🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════   

               *👅 जीभ 👅*


जीभ हा पृष्ठवंशीय प्राण्यांच्या शरीराच्या तोंडामधला लालसर गुलाबी रंगाचा एक अवयव आहे. हा अवयव पूर्णपणे स्नायूंचा बनलेला असतो. बहुतेक सर्व पृष्ठवंशीय प्राण्यामध्ये जीभ अन्न गिळण्यासाठी, चवीच्या जाणीवेसाठी मदत करते. जीभ, दात, ओठ, कंठ, टाळू व घसा यांच्या साहाय्याने मनुष्य निरनिराळे आवाज (ध्वनी) काढू शकतो. मानवी जिभेची सरासरी लांबी सुमारे १० सें.मी. असते. रोगनिदान करण्यासाठी जिभेचा रंग , स्वरूप आणि ओलसरपणा याबाबी लक्षात घेण्यात येतात.


जिभेद्वारे अन्न तोंडात फिरवून दाताखाली आणले जाते आणि अन्नाचे गोळ्यात रूपांतर केले जाते. दातामध्ये , गालफडामध्ये साचलेले अन्न जिभेने काढून तोंड स्वच्छ ठेवले जाते. जिभेमुळे अन्न घशात ढकलले जाते. अन्न गिळताना जीभ टाळूवर दाबली जाते आणि आतील बाजूना पसरते. परिणामी तोंडातील अन्न बाहेर न पडता घशाकडे सरकवले जाते. अन्य सस्तन प्राण्यापैकी कुत्रा, मांजर, जिभेने अंग साफ करतात. त्यामूळे अंगावरील तेल आणि परजीवी दूर होतात. कुत्र्याची जीभ त्याच्या शरीराचे तापमान कमी करण्यासाठी उपयोगी पडते. सरडगुहि (शॅमेलिऑन), बेडूक, खवल्या मांजर इत्यादी प्राणी जिभेने अन्न तोंडात घेतात. साप जीभ बाहेर काढून भक्ष्याचे गंधकण गोळा करतो. गंधकणांच्या ज्ञानावरून त्याला भक्ष्य पकडणे सोपे जाते. सुतार पक्ष्याची जीभ अतिशय संवेदी असते. जिभेच्या सहाय्याने तो झाडाच्या सालीखालील कीटक गोळा करतो. व्हेल, आणि मुशी यासारख्या काहीं प्राण्यांची जीभ अचल असते. जिभेवर ठरावीक ठिकाणी विशिष्ट चवीची जाणीव होते असे एकेकाळी समजले जात होते. प्रत्यक्षात जीभेवर असलेल्या रुचिकलिकामध्ये सर्व चवी ओळखल्या जातात. पदार्थ पाण्यामध्येविद्राव्य असल्यास चव लगेच समजते.


*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*

═══════════════════════

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Featured Post

व्यायाम व योगा अवश्य करावा*

*व्यायाम व योगा अवश्य करावा*  *व्यायाम व योगा करण्याचे दहा फायदे:-*  1) व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते: व्यायाम करणारी...