गुरुवार, ३ फेब्रुवारी, २०२२

नलिका विरहित ग्रंथी


══════════════════════
   *📒📒📒 @ संकलन @📒📒📒*
  *श्री.गजानन गोपेवाड 
══════════════════════
            🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎
══════════════════════   
📙 *नलिकाविरहित ग्रंथी* 📙 
***************************
आपल्या शरीरात दोन प्रकारच्या ग्रंथी असतात. बहि:स्रावी ग्रंथीमध्ये तयार झालेला स्राव नलिकेद्वारे बाहेर पाठवला जातो. उदारणार्थ लाळग्रंथीत तयार झालेली लाळ तोंडात येते. याउलट अंत:स्रावी ग्रंथीत तयार झालेला स्राव ग्रंथीमधीलच रक्तवाहिन्यांत शोषला जातो. रक्तामध्ये शरीरात विविध भागांकडे पाठवला जातो. अशा अंतस्रावांस संप्रेरक, 'हार्मोन' असे म्हणतात. अशा नलिकाविरहित ग्रंथींना 'एंडोक्राइन' ग्रंथी असे म्हटले जाते.
शरीरात घडणाऱ्या असंख्य चयापचयाच्या क्रिया व महत्त्वाचे जीवनव्यापार यांवरचे नियंत्रण या ग्रंथींद्वारे राखले जाते. प्रत्येक ग्रंथीमधील स्रावाचे कार्य एखाद्या विशिष्ट लक्ष्यावर काम करते. सर्वात जास्त परिणाम त्या लक्ष्यावर घडून येतो. नलिकाविरहित ग्रंथींच्या प्राकृत व विकृत अभ्यासाची अतिविशिष्ट अभ्यासशाखा मानली जाते (एंडोक्रायनाॅलॉजी ही सुपर स्पेशालिटी). डॉक्टर मंडळी त्यात प्रावीण्य मिळवून काम करतात.

अशा नलिकाविरहित ग्रंथी म्हणजे शीर्षस्थ ग्रंथी. (पिट्युटरी), कंठस्थ (थायरॉइड), उपकंठस्थ (पॅराथायरॉइड), मूत्रपिंडावरील (अॅड्रिनल), स्वादुपिंडातील (लँगरहॅन्स आयलेट) या ग्रंथी स्त्री व पुरुषांत सारख्याच असतात. पुरुषात वृषण (टेस्टीज) व स्त्रीमध्ये राज:पिंडे (ओव्हरीज) या वेगळ्या असतात. यांतील प्रत्येक ग्रंथीतून स्रवणाऱ्या स्रावाला बहुदा त्या ग्रंथीच्या नावाने ओळखले जाते. उदाहरणार्थ पिट्युटरी हार्मोन.

या ग्रंथीमधील सर्वात महत्त्वाची म्हणजे पिट्युटरी शीर्षस्थ ग्रंथी. अन्य सर्व ग्रंथींवर तर तिचे नियंत्रण असतेच, पण शरीरातील अत्यंत महत्त्वाच्या बाबी ती नियंत्रित करते. मूत्रपिंडाचे कार्य, हवेच्या तापमानाशी जोडून मुत्रनिर्मिती कमी वा जास्त राखणे व त्यानुसार शरीराला तहानेची जाणीव करून देणे हे काम तिच्याकडे आहे. स्नायूंवरचे नियंत्रण, विशेषत: गर्भाशयाचे स्नायू बाळाच्या जन्मासाठी कधी आकुंचित करायचे व आईचे दूध कधीपासून निर्माण करायला सुरुवात करायची, यांवरचे नियंत्रण ऑक्सिटोसीन व मॅमॅट्रोपिक हार्मोनने केले जाते. या सर्वांची निर्मिती शीर्षस्थ ग्रंथींच्या मागच्या भागातून होते. याशिवाय पुढील भागात अन्य ग्रंथींना उत्तेजक (ट्रोपिक) हार्मोनची निर्मिती केली जाते. थायरॉइडमधील स्रावांचे सतत नियंत्रण या हार्मोनने होत असते. नलिकाविरहित ग्रंथींचे नेतृत्वच शीर्षस्थ ग्रंथी करत असते. जेमतेम मोठ्या शेंगदाण्याएवढ्या असलेली ही ग्रंथी खरोखरीच जीवनाधार समजली जाते.

 थायरॉइड हार्मोन मुख्यतः आयोडिनयुक्त असते. खाण्यात, आहारात आयोडाइड्स कमी पडली तर हा स्राव कमी निर्माण होतो. शरीरातील चयापचयाची महत्त्वाची कार्ये व शरीराचे तापमान नियंत्रण आणि शक्तीसंपन्नता यांत ह्या हार्मोनचा महत्त्वाचा कार्यभाग असतो. गलगंड, मेंदूची अपूरी वाढ, मतिमंदत्व असे विकार होऊ नयेत, त्यांना प्रतिबंध करता यावा यासाठी मिठावाटे आयोडीनचा आवश्यक पुरवठा करावा, असे तज्ज्ञांना वाटते. रोज दोन चिमटी एवढेच मीठ आपण खात असल्याने नियंत्रित पुरवठा याद्वारे करणे शक्य होते. मिठाशिवाय जेवण, अळणी अन्नपदार्थ हा विचार आपल्या मनात तरी येतो का ? 
 
उपकंठस्थ वा पॅराथायरॉइड या कंठस्थ ग्रंथीमागे दोन छोट्या ग्रंथी असतात. कॅल्शिअम व फॉस्फरस या दोन्हींच्या चयापचयावर पॅराथाॅर्मोनचे नियंत्रण असते. हाडे, दात, शरीरातील सर्व स्रावांत या दोन्हींची गरज असते. त्यासाठी या ग्रंथीचे कार्य महत्त्वाचे ठरते.

मूत्रपिंडावरील अॅड्रिनल ग्रंथी मूत्रपिंडावर छोट्या टोपीप्रमाणे असतात. त्यांचा गाभा (मेड्युला) व बाह्यभाग (कॉर्टेक्स) हे दोन वेगवेगळ्या हार्मोन्सची निर्मिती करतात. जीवनावश्यक व हृदयासारख्या महत्त्वाच्या इंद्रियावर नियंत्रण ठेवणारी अॅड्रीनॅलिन व नाॅर-अॅड्रीनॅलिन ही दोन हार्मोन्स गाभ्यात तयार होतात. 'मारा किंवा मरा', अशा समयी या स्रावांचे कार्य अवघ्या शरीराला जाणवते. स्नायूंचा रक्तपुरवठा वाढवणे, हृदयाची गती वाढवणे, रक्तदाबावर नियंत्रण ठेवणे, यकृतातील साखरेची म्हणजे ग्लायकोजेनची ग्लुकोज शर्करा बनवणे व अनिच्छावर्ती स्नायू शिथिल करणे ही मुख्य कामे या दोन स्रावांमुळे होतात. अॅड्रिनल ग्रंथीच्या बाह्य भागातून काॅर्टिकोस्टिराॅईड नावाची हार्मोन्स निर्माण होतात. यांतील अल्डोस्टिराॅन हे द्रव्य शरीरातील सोडियम व पोटॅशियम या घटकांच्या चयापचयावर नियंत्रण ठेवते. मज्जातंतूंचे कार्य, हृदयाचे कार्य, स्नायूंचे कार्य यांसाठी या दोन्हींची गरज असते. स्टिरॉइडमधील अन्य द्रव्ये पिष्टमय पदार्थांच्या चयापचयावर नियंत्रण राखतात. त्यांचे कार्य रक्तातील शर्करा जरुरीप्रमाणे वाढविण्याचे असते. प्रथिने व स्निग्ध यांच्या साठ्यांवरही त्यांचे नियंत्रण राहते. याशिवाय शरीरात कोठेही दाह झाल्यास यांचा दाहशामक म्हणूनही उपयोग होतो. विशेषतः सांध्यांचा दाह असल्यास स्टिरॉइडचा तोंडावाटे वा त्याजागी इंजेक्शन देऊन उपयोग होतो. अॅड्रिनल ग्रंथीचे कार्य अत्यंत महत्त्वाचे असते.

स्वादुपिंडातील स्वादुरस पक्वाशयात नलिकेवाटे पोहोचवला जातो. मात्र लँगरहॅन्स आयलेट्स या पेशीसमूहातून इन्सुलिनची निर्मिती होऊन ती थेट रक्तात मिसळते. शक्ती व उष्णता उत्पन्न होण्यासाठी शरीरातील सर्व पेशीजालामध्ये प्राणवायूच्या साहाय्याने ग्लुकोज साखरेचे ज्वलन होते. यासाठी इन्सुलिनची मदत लागते. ती न मिळाल्यास रक्तातील साखरेच्या प्रमाणात वाढ होते. तसेच इन्शुलिनचे दुसरे कार्य म्हणजे रक्तातील जास्तीच्या साखरेचे रूपांतर ग्लायकोजेनमध्ये करून ती यकृतात साठवणे. या दोन्ही संदर्भात या ग्रंथीचे महत्त्व आहे.

लैंगिक ग्रंथी पुरुष व स्त्रीमध्ये प्रत्येकी दोन असून त्यांना वृषण व राज:पिंड असे म्हणतात. वयात आल्यावर पुंबीजे व स्त्रीबीजे यांची यथायोग्य वेळी निर्मिती हे त्यांचे एक कार्य. दुसऱ्या कार्यात स्रावनिर्मितीचा म्हणजे हार्मोनचा सहभाग असतो. पुरुषातील टेस्टोस्टेरॉन हार्मोनमुळे जननेंद्रियांची वाढ, दुय्यम लैंगिक लक्षणे म्हणजे दाढी मिशा उगवणे, आवाज फुटणे, स्नायूंचा भरदारपणा यात पूर्णता येते. स्त्रियांच्या राज:पिंडातून इस्ट्रोजन व प्रोजेस्टेरॉन हे दोन स्राव स्रवतात. त्यामुळे मासिक पाळी सुरू होते. स्तनांची व नितंबाची गोलाई वाढते, जननेंद्रियांचा आकार पुरेसा वाढतो. गर्भधारणा, गर्भाची वाढ, दूध पुरेसे येणे व गर्भधारणेच्या काळातील अन्य शारीरिक बदल यांवरही याच हार्मोन्सचे नियंत्रण राहते.

वयोमानानुसार लैंगिक ग्रंथींचे कार्य मंदावते. स्त्रियांमध्ये पन्नाशीनंतर, तर पुरुषात सत्तरीनंतर या ग्रंथी थकून जातात. त्याप्रमाणे स्त्रियांत रजोनिवृत्ती व पुरुषांत लैंगिक शैथल्य जाणवू लागते. मात्र जीवनाच्या अंतापर्यंत अन्य नलिकाविरहित ग्रंथी कार्यरत असतात. नलिकाविरहित ग्रंथींच्या कार्यकारणभावावर व त्यातील रोगांच्या उपचारांबद्दल आता खूपच प्रगती झाली असली, तरी प्रतिबंधक उपाय फारसे ज्ञात नाहीत.

'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*
═══════════════════════
 

दूरचित्रवाणी


══════════════════════

   @ संकलन @गजानन गोपेवाड 

══════════════════════

            🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════   

📙 *दूरचित्रवाणी (Television)* 📙

**********************************

दूरचित्रवाणीचे भारतात आगमन खूपच उशिरा झाले. केवळ दिल्लीपुरते 'दूरदर्शन' अनेक वर्षे वापरात होते. पण तेही 'दूरचित्रवाणी'च्या जागतिक वापरानंतर २० वर्षांनी १९५६ साली सुरू झाले. अन्य सर्व शहरात तर दूरदर्शनची सेवा १९७२ पासून मिळू लागली. आज बऱ्याच भागांत हे जाळे पसरले आहे व त्याने आता उपग्रहाद्वारे स्वतःचे हातपाय पक्के रोवायला सुरुवात केली आहे.


१९२६ साली जॉन बर्ड याने टेलिव्हिजन हा प्रकार शोधला. १९३६ साली लंडनमध्ये बीबीसीने त्याचे कार्यक्रम सुरू केले, तर पहिले रंगीत प्रक्षेपण १९५१ मध्ये अमेरिकेत झाले. खरे म्हणजे रेडिओ सिग्नल्सद्वारेच प्रकाशचित्रे पण पाठवता येतील, याचा अंदाज शास्त्रज्ञांना १९०० सालीच आला होता. कल्पना वास्तवात यायला हा काळ जावा लागला.


नेहमीच्या कॅमेऱ्यासारखा कॅमेरा. पण त्यात फिल्म न घालता प्रतिमा प्रकाशाला संवेदनक्षम अशा एका पृष्ठभागावर पडते. हा पृष्ठभाग वरपासून खालपर्यंत एका इलेक्ट्रॉन्सच्या झोताने न्याहाळला जातो. ही क्रिया होतानाच त्यातून ज्या रेडिओलहरी निर्माण होतात, त्यात जे बदल होतात, त्यासकट त्यांचे प्रक्षेपण केले जाते. याची पद्धत अल्ट्रा हाय फ्रिक्वेन्सी माॅड्युलेशन (UHF) या नावाने ओळखली जाते. या लहरी थेट सरळ प्रवास करतात. म्हणूनच टीव्हीचा अँटेना व प्रक्षेपण मनोरा हे समोरासमोर असून मध्ये अडथळा चालत नाही. अर्थातच मनोऱ्याची उंची खूपच उंच असावी लागते. मुंबईचा वरळीचा मनोरा तीनशे मीटर उंच आहे, तर पुण्याचा सिंहगडावरच आहे. जगातील सर्वात उंच मनोरा आहे ६२८ मीटर उंचीचा, फार्गो, नॉर्थ डकोटा येथे अमेरिकेत.


हे रेडिओ सिग्नल्स आपल्या घरातील अँटेना गोळा करतात. त्यांचे रूपांतर पिक्चर ट्युबमुळे पुन्हा इलेक्ट्रॉन झोतामध्ये होते. हा झोत फॉस्फरसचा थर दिलेल्या टीव्ही पडद्यावर आतून पडतो. ज्या ठिकाणी झोत पडेल तो भाग प्रकाशाने उजळून निघतो. ही क्रिया सतत झिगझॅग पद्धतीने चालू असते. त्यामुळे पडद्यावरील चित्र पूर्ण होऊन डोळ्यांना दिसते. पडद्यावरील चित्र हे आडव्या बारीकबारीक रेघांद्वारे आपल्यासमोर येते. प्रत्येक केंद्र स्वतःचे चित्र किती रेघांद्वारे प्रक्षेपित करायचे, ते ठरवते. अर्थात हा झाला त्याचा तांत्रिक भाग. तसेच दर सेकंदाला किती चित्रे प्रक्षेपित करायची, हेही प्रमाण एखाद्या चलतचित्राप्रमाणे ठरवले जाते. त्यामुळे समोरची स्थिर चित्रेच आपल्याला हालचाल करताना दिसू लागतात.


१९८२ सालच्या एशियाडपासून रंगीत दूरचित्रवाणी 'दूरदर्शन' मार्फत भारतात आली. मूळ रंगा तीन. लाल, निळा, हिरवा यांचा वापर करून सर्व रंग बनतात, हे तत्त्व रंगीत टीव्ही वापरतो. पिक्चर ट्यूबमधून तीन प्रकारचे इलेक्ट्रॉन झोत पडद्यावर टाकले जातात. यांच्या मिश्रणातून आपल्याला परीपूर्ण रंगीत चित्र दिसू लागते. यात सर्व रंगांचे सुखद मिश्रण असते. नको असलेले रंगझोत टाळण्यासाठी पडद्यामागे एका विशिष्ट प्रकारची जाळी (shadow grid) असते. त्यामुळे नेमक्या जागी नेमका रंग हे मिश्रण साधले जाते. रंगीत प्रक्षेपणाच्या कॅमेऱ्यातून केलेले चित्रण कृष्णधवल टीव्हीवरही कृष्णधवल रंगात पाहता येते.

दूरचित्रवाणीचा कॅमेरा हा चित्रण करताना त्यामागे बसवलेल्या छोट्या टीव्हीवर प्रत्यक्ष चित्रण कसे दिसेल, याचे स्वरुप जसेच्या तसे दाखवत असतो. त्यामुळे कॅमेरामन झटपट बदल करू शकतात. तसेच एका प्रसंगाचे चित्रण दोन वा अधिकही कॅमेरे करतात. त्यांतील नेमक्या कोणत्या चित्राचे प्रक्षेपण करायचे, ते संकलक ठरवतो. त्याच्यासमोर या सर्वांचे प्रक्षेपण एकाच ओळीत लावलेल्या पडद्यांवर दिसत असते. त्यामुळेच कधी जवळून, कधी वरून, कधी संपूर्ण दृश्याचे असे चित्रण आपण बघू शकतो.


 टीव्ही पडदा खूप मोठा करून एखाद्या ऑलिम्पिक स्टेडियममध्ये लावणे हे आता नवीन नाही. ऑलिम्पिक स्टेडियममधील प्रत्येक कार्यक्रम तेथील लोक प्रत्यक्ष व मोठ्या पडद्यावर ब्लोअप केलेला असाही बघू शकतात. पिक्चर ट्यूब व तिच्यामधून होणाऱ्या पडद्यावरच्या इलेक्ट्रॉन माऱ्यामुळे टीव्हीची जाडी वाढते. भिंतींवर तसबिरीप्रमाणे टांगता येणारा टीव्ही बनवायला त्यामुळे सतत अडचणी येत होत्या. पण आता जेमतेम तीन इंच जाडीचा तसबिरीसारखा टीव्हीपण वापरात आला आहे. स्टँडवरचा वा टिपाॅयवरचा टीव्ही आता भिंतीवरही जाऊ शकेल. फ्लॅट स्क्रीन, २१ इंच ते ७२ इंच या दरम्यानचे अनेक आकारांतील पडदे असलेले टीव्ही आता उपलब्ध आहेत. थेट एलसीडी प्रोजेक्टरचा वापर करून घरातील भिंतीवरही आपण चित्र पाहू शकतो. 

 

 टीव्ही सुरू करणे, बंद करणे, कार्यक्रम संपल्यावर आपोआप बंद होणे व जागेवरूनच या गोष्टी घडवणे हेही रिमोट कंट्रोलमुळे शक्य झाले आहे. इन्फ्रारेड किरणांद्वारे टीव्हीच्या नियंत्रकाला दिलेल्या सूचना पाळल्या जाऊन या गोष्टी घडतात.

 

 टीव्ही हे करमणुकीचे माध्यम आहेच; पण खरे म्हणजे उत्कृष्ट शैक्षणिक व लोकजागृतीचे माध्यम आहे. सध्या विविध प्रकारच्या वाहिन्यांवरील विशिष्ट प्रकारचे कार्यक्रम देत आहेत. वार्तांकन, क्रीडा, करमणूक, सिनेमा, कार्टून, विनोदी, विज्ञान, प्राणीजगत अशा विविध कार्यक्रमांतून प्रेक्षक निवड करू शकतात. तेही त्यांच्या स्वतःच्या भाषेतून.

 

'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*

═══════════════════════

  

नायट्रोजन काय आहे आणि त्याचे महत्त्व


══════════════════════

   @ संकलन @गजानन गोपेवाड 

══════════════════════

            🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════   

*📙नायट्रोजन काय आहे?त्याचे महत्व काय?* 

************************************

१७७२ साली रुदरफोर्डने या वायूचा शोध लावला. रंगहीन, वासहीन व उदासीन असा हा वायू आपल्या पृथ्वीच्या वातावरणातील हवेचा ७८ टक्के भाग व्यापतो. गमतीची गोष्ट म्हणजे उदासीन असलेला हा वायू त्याच्या संयुक्त स्वरूपात मात्र सारेच व्यापून टाकतो. सजीवांच्या पेशीची निर्मिती असो, वनस्पतींना आवश्यक घटक असोत, खते असोत वा स्फोटके असोत, त्यात नायट्रोजन हा अत्यावश्यक घटक बनतो. आपल्या शरीरातील पेशीच्या द्रवात म्हणजे प्रोटोप्लाझममध्ये विविध घटकांसमवेत १६ टक्के नायट्रोजनचा समावेश असतो. मात्र वातावरणातील नायट्रोजनचा वापर कसा करायचा हा प्रश्न अनेक वर्षे शास्त्रज्ञांना सतावत होता. याचे उत्तर जर्मन रसायनशास्त्रज्ञ फ्रिट्झ हाबर यांनी शोधून काढले. अतिउच्च दाबाखाली म्हणजे वातावरणापेक्षा पाचशे ते हजार पटींनी जास्त दाबाखाली नायट्रोजन व हायड्रोजनचे मिश्रण पाचशे डिग्री सेंटिग्रेडपर्यंत तापवायचे. या प्रक्रियेत लोखंडाचा उत्प्रेरक (कॅटॅलिस्ट) म्हणून वापर करून अमोनियाची निर्मिती त्यांनी शक्य करून दाखवली. दुसऱ्या पद्धतीत विद्युतअार्कचा वापर करून ३००० सेंटीग्रेड तापमानाला हवेतील नायट्रोजन व प्राणवायू यांचा संयोग होतो व त्यापासून नायट्रिक ऑक्साईड बनते. याचा वापर करून नायट्रिक अॅसिड व नायट्रेट्स बनवली जातात. नैसर्गिक सोडियम नायट्रेटचे साठे किती पुरतील, ही काळजी आता कोणाला सतावत नाही. या पद्धतीमुळे वातावरणातील नायट्रोजन वायूचा नेमका उपयोग काय व कसा हे कळेपर्यंत विसावे शतक उजाडावे लागेल. अन्यथा हवेमधील फार मोठा घटकवायू एवढीच त्याची ओळख होती.


नैसर्गिकरीत्या नायट्रोजनची संयुगे प्रचंड प्रमाणात बनत असतात. वनस्पती, प्राणी, सर्व सजीव यांच्या शरीरातील त्यांची संयुगे त्यांच्या पश्चात विविध जंतूंंमुळे विघटित होतात. अमोनियाचे क्षार या स्वरूपात ती मातीत मिसळली जातात. हवेतील व जमिनीतील प्राणवायूशी त्यांचा संयोग होऊन त्यापासून नैसर्गिकरीत्या सोडियम नायट्रेटचे साठे बनू लागतात. चिलीमध्ये असे साठे मोठ्या प्रमाणात आहेत. याशिवाय वाटण्यासारख्या वनस्पतींच्या मुळाशी गाठींच्या स्वरुपात नायट्रोजनची नैसर्गिक संयुगे बनतात. हवेतील नायट्रोजनचा वापर त्या वनस्पती करतात. जमिनीचा कस नैसर्गिकरित्या वाढवण्यासाठी त्यांची लागवड करून त्या नांगरटीमध्ये गाडण्याची पूर्वापार पद्धत यामुळेच रूढ झाली आहे. कृत्रिम खते व त्यांचा वापर यातून नायट्रोजन, पोटॅशियम व फाॅस्फेटचा मारा केला जातो. त्याऐवजी ही पद्धत कमी खर्चाची असते. विजांचा कडकडाट होतो, तेव्हाही काही प्रमाणात वातावरणातील नायट्रोजन व प्राणवायू संयोग पावतात व ही संयुगे जमिनीत मूरतात. नायट्रोजनचे नैसर्गिक चक्र खूपच प्रभावी आहे. पण मानवी गरजांनुसार शेतीउत्पादन काही पटींनी वाढावायला ते कमी पडते, असे वाटल्याने अमोनियाची गरज प्रमाणाबाहेर वाढली आहे.


'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*

मंगळवार, १ फेब्रुवारी, २०२२

२ फेब्रुवारी* 🏝🏝🏝🏝🏝🏝🏝🏝🏝🏝🏝 *जागतिक पाणथळ भुमी दिन*

 🏄‍♂🏄‍♀🏄‍♂🏄‍♀🏄‍♂🏄‍♀🏄‍♂🏄‍♀🏄‍♂🏄‍♀🏄‍♂   

                   *२ फेब्रुवारी*

🏝🏝🏝🏝🏝🏝🏝🏝🏝🏝🏝

*जागतिक पाणथळ भुमी दिन*

🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊

इराणमधील कॅस्पियन या समुद्राच्या किना-यावरील ‘ रामसर ‘ या शहरी ‘ पाणथळ प्रदेशाचे महत्त्व ‘ या विषयावर परिषद आयोजित करण्यात आली होती. पाणथळ प्रदेशांना मानवी जीवनात असलेले स्थान सर्वांना समजावे या हेतूने दर वर्षी २ फेब्रुवारीचा दिवस *‘ वेटलँड्स डे ’* साजरा केला जावा असा निर्णय या परिषदेत घेतला गेला. असा पहिला दिवस १९९७ साली साजरा झाला.


पाणथळ प्रदेश म्हणजे काय

नदी, तलाव, सागरी किनारे अशा ठिकाणी उथळ पाण्याने झाकलेल्या व अनेकविध प्रकारच्या गवतांनी आणि झुडपांनी भरलेल्या पाणथळ जमिनी आपल्याला आढळतात. यामध्ये कृत्रिम तलाव व कालवे, मिठागरे, सांडपाण्याचे तलाव, मत्सशेती तलाव, शेततळी, भाताची खाचरे अशा मानवनिर्मित स्थळांचाही समावेश होतो.


बहुउपयोगी पाणथळ प्रदेश

सध्या आपण भूगर्भातील पाण्याचा भरपूर वापर करतो. या पाण्याचे पुनर्भरण करण्याचे काम असे प्रदेश करतात. अनेकदा आपण प्रदूषित पाणी व इतर हानिकारक द्रव्ये अशा प्रदेशात फेकतो खरे; परंतु पाणथळ जागी वाढणा-या वनस्पतीच या घटकांना गाळण्याचे काम करून पाणी शुद्ध करतात. उदा. कोलकात्यातून बाहेर टाकल्या जाणा-या घाण पाण्याचा  काही भाग शुध्द करण्यासाठी जवळच्या पाणथळ प्रदेशाचा वापर केला जातो. भातखाचरे आणि मत्सबीज – उत्पादनासाठी बनवलेली तळी हे देखील पाणथळ प्रदेशच असल्याने त्यांमधून जगभरातील ३ अब्ज लोकांना दररोजचे अन्न ( भात आणि मासे) मिळते. सागरी किनारपट्टीवर असलेल्या अशा गवतयुक्त पाणथळ प्रदेशांमुळे लाटांनी होणारी किना-यांची धूप थांबवली जाऊन वादळांपासून होणारे नुकसानही घटते. शिवाय समुद्राचे आक्रमण थोपवून किनारी जमीन अतिक्षारयुक्त (निरुपयोगी खारपड) होण्याची क्रियाही तेथील ‘मॅनग्रुव’ (खारफुटी) प्रकारच्या झुडपांमुळे कमी होते. नदीला पूर आल्यास किंवा अतिवृष्टी झाल्यासही हे जास्तीचे पाणी किनारी पाणथळ प्रदेशात मुरते व मानवी वस्ती जलमय होण्याच्या संभाव्य धोक्याचे प्रमाण कमी होते. महाराष्ट्राचा विचार केल्यास असे दिसते की इथले महत्त्वाचे पाणथळ प्रदेश हे दख्खनच्या पठारावरील नद्या- उपनद्या, धरणांमागील जलाशय आणि पाझर तलावांच्या आसपासच्या परिसंस्था आहेत. यामुळे भूजलाचे पुनर्भरण आणि पाझर यात मोलाची मदत होते.


पक्षी आणि पाणथळ प्रदेश

बगळे, बदके, करकोचे, खंड्या तसेच शिकारी प्रजातींच्या व इतरही अनेक पक्ष्यांना पाणथळ प्रदेशांतूनच अधिवास मिळतो. ‘प्लवर’ सारख्या विशिष्ट प्रजातींची घरटी पाणथळ प्रदेशांत आढळतात. करकोचे, शराटी (इबिस), चमचा, रोहित (फ्लेमिंगो) हे पक्षीही पाणथळ जागीच येतात. अगदी सायबेरियासारख्या प्रदेशांतूनही क्रेन आणि बदके इथे येतात. कारण इथे त्यांना अन्न मिळते. हे पक्षी या प्रदेशातील अन्नसाखळीतला एक महत्त्वाचा दुवा असत्तात.


आपण काय करू शकतो

दुर्दैवाने आज पाणथळ प्रदेशांकडे ‘वाया गेलेली जमीन’ म्हणूनच पाहिले जाते, पण जैविक आणि पर्यावरणीय साखळीतील त्यांचे महत्त्वाचे स्थान लक्षात घेऊन ते जतन करून, तिथला कचरा इ. दूर करून त्यांचा सजगतेने वापर करणे गरजेचे आहे. प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून वैयक्तिक पातळीवर सुध्दा पाणथळ प्रदेश वाचविण्याचा प्रयत्न केला तरी या दिशेने एक ठोस पाऊल उचलले जाऊ शकते. आपल्या प्रत्येकाच्या खारीच्या वाटयाने पृथ्वीवरची ही महत्त्वाची समस्या काही प्रमाणात कमी होऊ शकते आणि पर्यावरणाची बूज राखली जाऊ शकते.


माहिती स्रोत: वनविभाग महाराष्ट्र शासन, वनदर्शिका २०१६


मागच्याच आठवड्यात नांदुरमारमेश्वर या विभागाला 'रामसर' चा दर्जा दिला गेला.

🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

संकलन -)

गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा - यवतमाळ ४४५२०६

डाॕ.कल्पना चावला👩‍🚀 👩‍🚀* 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

 *👩‍🚀  👩‍🚀  डाॕ.कल्पना चावला👩‍🚀  👩‍🚀*

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

🚀🚀🚀🚀🚀🚀🚀🚀🚀🚀🚀

         *प्रसिद्ध महिला अंतराळवीर*

🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇

      *१ फेब्रुवारी  इ.स. २००३*

👩‍🚀👩‍🚀👩‍🚀👩‍🚀👩‍🚀👩‍🚀👩‍🚀👩‍🚀👩‍🚀👩‍🚀👩‍🚀

*आज दिनांक १ फेब्रुवारी रोजी डॉ कल्पना चावला यांचा स्मृति दिन*   असून १९ वर्षांपूर्वी त्यांच्या कोलंबिया या यानाला पृथ्वीवर परत येत असताना अपघात होऊन दुर्दैवी मृत्यु झाला. त्यांच्यासोबत सहा अंतराळवीरांचे चमू देखील होते. त्यांचा देखील या अपघातात दुर्दैवी अंत झाला. कल्पना चावला ह्या जन्माने भारतीय असलेल्या प्रथम महिला आणि राकेश शर्मा यांच्यानंतर अंतराळात गेलेल्या दूस-या भारतीय व्यक्ति होत्या. त्यांचा जन्म १९६१ मध्ये हरियानामधील करनाल येथे झाला.कल्पना चावला यांच्या वडिलांचे नाव बनारसी लाल तर आईचे नाव संयोगिता चावला. त्यांच्या वडलांचे औद्योगिक वस्तु निर्मितीचा व्यवसाय होता आणि आई घर सांभाळायची. त्यांच्या आईला आपल्याला मुलगा व्हावा अशी इच्छा होती पण त्यांना कुठे ठावूक होते कि आपली मुलगी संपूर्ण जगात नाव कमावेल! त्यांचे शिक्षण टागोर विद्यालय येथून झाले. १९८२ साली त्या अमेरिकेत गेल्या. १९८४ साली त्यांनी टेक्सास विद्यापीठातून एरोस्पेस इंजीनिरिंग ची मास्टर ऑफ़ सायन्स ही पदवी मिळविलि. त्यांना अन्तराळविर होण्याच्या स्वप्नाने असे पछाडले होते की त्या वेळेस झालेल्या च्यालेंजर यान अपघाताची चर्चा देखिल त्यांना त्यांच्या ध्येयापासून विचलित करू शकली नाही. त्यांनी १९८६ मध्ये दूसरी मास्टर पदवी आणि १९८८ मध्ये कोलेराडो मधून एरोस्पेस मध्ये डॉक्टरेट मिलविलि. १९८८ मध्ये त्यांनी नासातील एम्स रिसर्च सेंटर ओवरसेट मेथड्सच्या उपाध्यक्षा म्हणून काम पाहिले. तेथे त्यांनी कोम्प्यूटेशनल फ्लूइड डायनामिक्स मध्ये जागेवरच उभे उड्डाण, कमी अंतरात उड्डाण आणि जमिनीवर उतरणे या विषयांवर संशोधन केले.   त्यानंतर त्यांना ग्लाइडर्स, सीप्लेन्स तसेच एक किंवा अनेक इंजिन असलेली विमाने यांच्या व्यवसायिक वैमानिकांना प्रशिक्षण देण्याचा परवाना मिळाला.१९९१ मध्ये त्यांना अमेरिकेचे नागरिकत्व मिळाल्यानंतर त्यांनी नासामध्ये अॅस्ट्रॉनॉट कॉर्प्स होण्यासाठी अर्ज केला. त्यांना मार्च १९९५ साली तेथे प्रवेश मिळाला. त्यांनंतर त्यांची १९९६ मध्ये पहिल्या उड्डानासाठी निवड झाली.  यानात शून्य गुरुत्त्वकर्षणाच्या अवस्थेत असताना  त्या म्हणाल्या "तुमचे अस्तित्व हे तुमच्या हुशारीमुळे असते". त्यांनी अंतराळात १०.६७ दशलक्ष किमि प्रवास केला हे अंतर २५२ वेळा पृथ्वीला प्रदक्षिणा घालण्याएवढे होते.त्यांची पाहिली अंतराळ मोहीम १९ नोव्हेंबर १९९७ रोजी चालु झाली. त्या ६ अंतराळविरांच्या चमुचा एक भाग होत्या.व  हा चमु कोलंबिया स्पेस शटल एस.टी.एस ८७ चे चालन करत होता.  त्यांच्या पहिल्या मोहिमेत त्या ३७२ तास अंतराळात होत्या. एस.टी.एस-८७ मोहिमेदरम्यान त्यांच्यावर नादुरुस्त असलेला स्पार्टन उपग्रह विंस्टन स्कॉट आणि तकाओं दोई यांच्याबरोबर स्पेसवॉक करुन तो दुरुस्त करने ही जबाबदारी होती. या मोहिमेनंतर त्यांना अंतराळ स्थानकावर काम करायचे होते.चावला यांना २००० साली त्यांच्या दुसऱ्या उड्डानासाठी एस.टी.एस १०७ च्या चमु साठी देखिल निवडण्यात आले होते. परंतु ही मोहीम वारंवार आलेल्या तांत्रिक अडचणींमुळे लांबलि जात होती. १६ जानेवारी २००३ रोजी चावला दुर्दैवी एस. टी. एस.१०७ मोहिमेवर जाण्यासाठी कोलंबिया अंतराळ मोहिमेवर आल्या.  चावला यांना सूक्ष्म गुरुत्वाकर्षणात प्रयोग करणे ज्यामध्ये ते आणि त्यांच्या चमूला जवळ जवळ ८० प्रयोग करावयाचे असून त्यात पृथ्वी आणि अंतराळ विज्ञान, अद्ययावत तंत्रज्ञान निर्मिति, अंतराळविरांचे आरोग्य आणि सुरक्षितता या विषयांचा समावेश होता.चावला यांचा मृत्यु १ फेब्रुवारी २००३ रोजी अंतराळ यान कोलंबियाच्या टेक्सास येथे पृथ्वीच्या वातावरणात पुनरप्रवेश आणि करताना जमिनीवर उतरताना  अपघातात झाला. त्यांच्यासोबत असलेल्या सर्व चमूचा त्यात दुर्दैवी अंत झाला.त्यांना मरणोत्तर  कांग्रेशनल स्पेस चे सन्मान पदक, नासा स्पेस फ्लाइट चे पदक तसेच नासा विशेष सेवा पदक बहाल करण्यात आले. कल्पना चावला यांच्या नावाने आय.एस.यू. शिष्यवृत्ति फंड हा इंटरनॅशनल स्पेस यूनिवर्सिटी (आय.एस.यू.) द्वारा आंतरराष्ट्रीय अंतराळ शिक्षण कार्यक्रमामध्ये भाग घेतलेल्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी २०१० साली सुरु करण्यात आला आहे.  द कल्पना चावला मेमोरियल स्कोलरशिप प्रोग्राम भारतीय विद्यार्थी संघटना, टेक्सास विद्यापीठ, अल पासो यांनी २००५ पासून गुणवंत पदवीधर विद्यार्थ्यांसाठी सुरु केला आहे.'द कल्पना चावला आउटस्टैंडिंग रीसेंट अलुम्नी अवार्ड' हा कोलाराडो विद्यापीठाने जो १९८३ पासून दिला जातो त्याचे नामकरण डॉ चावला यांच्या नावाने केले.  करनाल मध्ये चावला यांच्या जन्मगावि ३० हजार शालेय मुले आणि नागरिक यांनी हातात हात धरून ३६:४किमी लांब मानवी साखळी केलि होती. ही साखळी कल्पना चावला यांच्या नावाने शाहरामध्ये सरकारी मेडिकल कॉलेज व्हावे याच्या समर्थनासाठी होती. 'कल्पना चावला मेडिकल कॉलेज निर्माण कमिटी' यात वेगवेगळ्या संस्थांचे  स्वयंसेवक आणि कार्यकर्ते तसेच चौतीस शाळांमधील विद्यार्थी यांचा समावेश होता.१८ नोव्हेंबर २०१३ रोजी राज्य सरकारने पायाभरणी करतानाचा दगड त्यांच्या स्मृति निमित्त रोवण्यात आला.त्यांच्या स्मरणार्थ ५१८२६ या अशनिला त्यांचे नाव देण्यात आले.५ फेब्रुवारी २००३ मध्ये भारताच्या पंतप्रधानांनी हवामान विषयीच्या उपग्रहाला कल्पना-१ हे नाव दिले. त्यानंतर सोडलेल्या उपग्रहाला कल्पना-२ हे नाव देण्यात आले. हरियाणा सरकारने कल्पना चावला यांच्या नावाने ज्योतिसार,कुरुक्षेत्र येथे प्लेनेटेरियम सुरु केले.नासाने त्यांनी बनविलेल्या सुपर कंप्यूटरला कल्पना चावला यांचे नाव दिले.कल्पना चावला त्यांच्या मित्र आणि सहकर्मी यांच्यात के.सी नावाने प्रसिद्ध होत्या. त्यांची आई सांगते कल्पना हि एक वेगळीच मुलगी होती. ती स्व:ताचे केस स्वतःच कापत असे, तीला कधी इस्त्री केलेले कपडे लागत नसत,तिने कराटेचे प्रशिक्षण घेतले होते. त्या पंजाब इंजिनियरिंग कॉलेज मधे अव्वल होत्या त्यांना त्याच कॉलेज ने नोकरी सूध्धा देवू केली होती. त्यांचे भाऊ संजय चावला म्हणतात कि, "माझी बहिण मरण पावलेली नाही तर ती अमर झाली आहे. ती एक आकाशातील कायमचा तारा झालेली आहे आणि तिच्या हक्काच्या जागेवर म्हणजेच आकाशात कायमची राहणार आहे"  त्या या शतकातील काही आदर्शांपैकी एक आहेत त्या सदैव आपल्या नावाशी जणू प्रामाणिकच राहिल्या. त्या आपल्याला त्यांचे धैर्य, जिद्द, चिकाटि, त्यांनी केलेले बलिदान आणि देशाला मिळवून दिलेला अभिमान यासाठी नेहमीच आठवणीत राहतील.


डॉ.कल्पना चावला यांच्यापासून प्रेरणा घेऊन २०१३ मध्ये आपल्या नाशिक मध्ये सुद्धा काही खगोलप्रेमी तरुणांनी एकत्र येवून 'कल्पना युथ फाउंडेशन' या नावाची संस्था सुरु केली. या संस्थेचा उद्देश विद्यार्थी,पालक आणि शिक्षक यांच्यामध्ये अंतराळ विज्ञानाविषयी गोडी निर्माण करणे. नवीन अंतराळ मोहिमांबद्दल माहिती देणे, शाळा कॉलेजेस यांमधून व्याख्यान आणि प्रस्तुतीकरण करणे. विद्यार्थ्यांच्या विविध प्रकल्पांना मार्गदर्शन करणे. दुर्बीण बनविणे, विविध स्पेस क्राफ्टची मॉडेल्स बनविणे, अंतराळ विज्ञानासंबंधीच्या विषयांवर निबंध स्पर्धा आणि पोस्टर स्पर्धा घेणे, पॉवर पॉइंट स्पर्धा घेणे, आकाशदर्शन करवून मुलांमध्ये आणि पालकांमध्ये अकाशाबद्दल कुतूहल तयार करणे अशी विविध कामे करते.    

   युनोच्या आशिया पॅसिफिकच्या अंतराळ शिक्षणाच्या राजदूत अपूर्वा जाखडी ह्या या संस्थेच्या मुख्य सल्लागार असून प्रोफेसर जयदीप शाह, प्रोफेसर भूषण उगले, पवन कदम, हेमंत आढाव, सुशांत राजोळे, दिपक तरवडे, दिपक सोनवणे, धनंजय लाखी, केतकी हे काम बघतात. तसेच संस्थेची www.kalpanayf.org या नावाने वेबसाईट देखील आहे. तसेच फेसबुकवर देखील 'कल्पना वाय एफ' या नावाने पेज देखील आहे.                          

🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

संकलन -)

गजानन गोपेवाड  

उमरखेड जिल्हा - यवतमाळ ४४५२०६

शनिवार, २९ जानेवारी, २०२२

प्रभात दर्शन

 🌳⛳ *शुभ प्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

पौष मास,कृष्ण पक्ष,*द्वादशी*,मूल नक्षत्र,सूर्य उत्तरायण,शिशिर ऋतु,युगाब्द ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

शनिवार, २९ जानेवारी २०२२.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                        *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


       “हिन्दुत्व यह एक जीवन प्रणाली है, विचारों का केवल ढांचा मात्र नही है। वह गति है एक स्थिति नहीं। वह प्रक्रिया है परिणाम नहीं। वह एक विकासशील परम्परा है सीमित साक्षात्कार नहीं। आस्तिक और नास्तिक तथा परमात्मा और अज्ञेयवादी ये सभी हिन्दू जीवन पध्दति को स्वीकार कर सकते है।”

                - डॉ. राधाकृष्णन्

 ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

जेम्स ऑगस्टस हिकी याने २९ जानेवारी इ.स. १७८०

 ✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️

             *२९ जानेवारी १७८०*

✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️  

    

 जेम्स ऑगस्टस हिकी याने २९ जानेवारी  इ.स. १७८० रोजी कोलकाता येथे कलकत्ता जनरल अ‍ॅडव्हर्टायझर (इंग्लिश: Calcutta General Advertiser) या नावाने साप्ताहिक वृत्तपत्र सुरु केले. हेच वृत्तपत्र हिकीज बेंगाल गॅझेट (इंग्लिश: Hickey's Bengal Gazette) या नावाने ओळखले जात असे. या वृत्तपत्रानेच भारतीय पत्रकारितेस आरंभ झाला असे मानले जाते.

जेम्स ऑगस्टस हिकी यांनी कलकत्ता जनरल अ‍ॅडव्हर्टायझर या नावाने एक साप्ताहिक सुरू केले. पुढे याचे वर्तमानपत्रात रुपांतर झाले.

२३ मार्च इ.स. १७८२ रोजी या वृत्तपत्राचे प्रकाशन बंद पडले.

✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️

संकलन -)गजानन गोपेवाड  

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

राजा रामण्णा भारतीय भौतिकशास्त्र

 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

                  *राजा रामण्णा*

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

         *भारतीय भौतिकशास्त्रज्ञ*

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

*जन्मदिन - २८ जानेवारी इ.स. १९२५*


रामण्णा, राजा : (२८ जानेवारी १९२५–). भारतीय शास्त्रज्ञ. भारतीय अणुऊर्जा आयोगाचे चौथे अध्यक्ष. भारतामध्ये अणुकेंद्रीय तंत्रविद्येचा विकास करण्यात महत्त्वाचे कार्य.

 

रामण्णा यांचा जन्म म्हैसूर येथे आणि प्राथमिक शिक्षण बंगलोर येथे झाले.त्यांनी मद्रास विद्यापीठाची बी. एस्सी. व लंडन विद्यापीठाची पीएच्.डी या पदव्या मिळविल्या. १९४९ साली ते टाटा इन्स्टिटयूट ऑफ राजा रामण्णाफंडामेंटल रिसर्च, मुंबई येथे रुजू झाले. १९५३ साली ते भाभा अणुसंशोधन केंद्र (पूर्वीचे अणुऊर्जा आस्थापना) येथे अणुकेंद्रीय भौतिकी विभागाचे प्रमुख झाले. जून १९७२ पासून जून १९७८ पर्यंत ते भाभा अणुसंशोधन केंद्राचे संचालक आणि अणुऊर्जा आयोगाच्या संशोधन व विकास विभागाचे सदस्य होते. जुलै १९७८ मध्ये ते केंद्रीय संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार आणि संरक्षण संशोधन व विकास संघटनेचे महासंचालक आणि भारत सरकारच्या संरक्षण संशोधन खात्याचे सचिव झाले. जानेवारी १९८१ मध्ये ते पुन्हा भाभा अणुसंशोधन केंद्राचे संचालक, भारत सरकारच्या अणुऊर्जा खात्याचे सचिव आणि अणुऊर्जा आयोगाच्या संशोधन व विकास विभागाचे सदस्य झाले.सप्टेंबर १९८३ – फेब्रुवारी १९८७ या काळात ते अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष होते.

 

रामण्णा यांचे संशोधन कार्य अणुकेंद्रीय विक्रिया व न्यूट्रॉन ऊष्मीकरण आविष्कार, विशेषतः स्पंदित न्यूट्रॉन तंत्राचा विकास या विषयांत आहे. त्यांनी अणुकेंद्रीय भंजन (अणुकेंद्राचे तुकडे होण्याविषयीच्या) भौतिकीचा विविध दृष्टिकोनांतून अभ्यास केला आणि एका नवीन भंजन सिद्धांताचे प्रतिपादन केले.अप्सरा, सायरस व पूर्णिमा या संशोधन विक्रियकांचा, कलकत्ता येथील चल ऊर्जा सायस्लोट्रॉन या ⇨ कणवेगवर्धकाचा तसेच कल्पकम येथील शीघ्र प्रजनक चाचणी विक्रियकाचा [ ⟶ अणुकेंद्रीय अभियांत्रिकी] आराखडा तयार करणे, प्रतिष्ठापना करणे व कार्यान्वित करणे या सर्व बाबतींत रामण्णा यांनी मोलाचे सहकार्य केले आहे. १९७४ साली पोखरण येथे शांततेकरिता अणुकेंद्रीय चाचणी घडवून आणणाऱ्या शास्त्रज्ञांच्या गटाचे ते प्रमुख होते.

 

अणुऊर्जेचे शांततामय उपयोग या विषयावरील संयुक्त राष्ट्रांच्या पातळीवर घेण्यात आलेल्या अनेक आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांनी भाग घेतला आणि अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महत्वाच्या समित्यांवर अध्यक्ष म्हणून काम केले.१९६१ साली ते नॉर्वे देशाच्या ‘नोरा’ या नवीन अणुकेंद्रीय विक्रियाकाच्या व्यवस्थापकीय समितीचे अध्यक्ष होते. इंटरनॅशनल अ‍ॅटॉमिक एनर्जी एजन्सीच्या महासंचालकांच्या वैज्ञानिक सल्लागार समितीचे ते सदस्य आहेत. १९८६ साली ते इंटरनॅशनल अ‍ॅटॉमिक एनर्जी एजन्सीच्या व्हिएन्ना येथे झालेल्या तिसाव्या सर्वसाधारण परिषदेचे अध्यक्ष होते.

 

रामण्णा इंडियन फिजिक्स अ‍ॅसोसिएशनचे अध्यक्ष, भारतीय विज्ञान परिषदेच्या सुवर्ण महोत्सवी अधिवेशनात भौतिकी विभागाचे अध्यक्ष, इंडियन नॅशनल सायन्स अ‍ॅकॅडेमीचे अध्यक्ष (१९७६) व इंडियन अ‍ॅकॅडेमी ऑफ सायन्सेस या संस्थेचे उपाध्यक्ष होते. त्यांना पद्मश्री (१९६८), पद्मभूषण (१९७३) व पद्मविभूषण (१९७५) हे किताब तसेच शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार (१९६३),मध्यप्रदेश सरकारच्या पंडित जवाहरलाल नेहरू पुरस्कार (१९८३), इंडियन नॅशनल सायन्स अ‍ॅकॅडेमीचे मेघनाद साहा पदक (१९८४), ओम प्रकाश भसीन पुरस्कार (१९८५), इंडियन फिजिक्स अ‍ॅसोसिएशनचा आर्. डी. बिर्ला पुरस्कार(१९८५) आणि अनेक विद्यापीठांच्या सन्माननीय डॉक्टरेट पदव्या हे बहुमान मिळाले.

🙏🙏🙏शुभ सकाळ🙏🙏🙏

संकलन -)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा - यवतमाळ ४४५२०६

गुरुवार, २७ जानेवारी, २०२२

नैसर्गिक हाड़ोजन

 *📱तंत्रस्नेही शिक्षक समूह महाराष्ट्र📱*

══════════════════

           *🤔 【 कुतूहल 】 🤔*  

______________________________

*🖥️✒️संकलन✒️💻*

_*श्री गजनन गोपेवाड 

~==========================~


*कुतूहल : नैसर्गिक हायड्रोजन*


मानवी समाजाची ऊर्जेची गरज दिवसेंदिवस वाढतच आहे. खाणीतून कोळसा आणि तेल काढून ही गरज भागविली जात आहे. परंतु हे स्रोत मर्यादित आहेत. याहीपेक्षा मोठा प्रश्न आहे प्रदूषणाचा. खनिज इंधनाच्या ज्वलनाने हरितगृह वायू तयार होतात. या वायूमुळे पृथ्वीचे तापमान वाढत चालले आहे, म्हणून हरितगृह वायू निर्माण न करणाऱ्या या इंधनाचा शोध सुरू झाला. यात अर्थातच पसंती मिळाली ती हायड्रोजनला. हा वायू असा आहे की त्याचे संपूर्ण ज्वलन होऊन चांगली उष्णता मिळते. या वायूच्या ज्वलनाने कोणत्याही प्रदूषकाची निर्मिती होत नाही. या सगळय़ा चांगल्या गोष्टी असल्या तरी मोठय़ा प्रमाणावर हे इंधन मिळविणे हे जिकिरीचे तसेच खर्चाचे काम आहे. पाण्याचे पृथक्करण करून किंवा मिथेन वायूचे विघटन करून हा वायू मिळवतात. या दोन्ही प्रक्रिया करायला ऊर्जा लागते. हायड्रोजन वायूचा मोठा साठा सापडल्याशिवाय या समस्येवर तोडगा काढता येणार नाही.


अलीकडे केलेल्या काही खोदकामातून असे लक्षात आले की पृथ्वीच्या पोटात जसा नैसर्गिक वायूचा साठा आहे तसाच नैसर्गिक हायड्रोजनचादेखील साठा आहे. माली बेटावर विहीर खोदत असताना ही बाब लक्षात आली. विहिरीला पाणी लागले नाही, परंतु एक वायू मात्र बाहेर पडू लागला. या वायूचा अभ्यास केल्यावर तो ९६ टक्के शुद्ध हायड्रोजन असल्याचे लक्षात आले. तेथे हायड्रोजन वापरून वीजनिर्मिती करणारे केंद्र उभारण्यात आले. ते मागील पाच वर्षे अविरत चालू आहे. भूगर्भात हायड्रोजन वायूचा साठा असण्याची शक्यता लक्षात आल्यानंतर असे साठे आणखी कोठे आहेत याचा शोध घेणे सुरू झाले. काही ठिकाणी जमिनीवर साठे आहेत. परंतु मोठे साठे समुद्रात असल्याचे लक्षात आले. तेथील हायड्रोजन कसा मिळवायचा या विवंचनेत सध्या तंत्रज्ञ आहेत.


हायड्रोजन हे अतिशय क्रियाशील मूलद्रव्य आहे. तो स्वतंत्र स्वरूपात भूगर्भात कसा काय आढळतो, हा वैज्ञानिकांना पडलेला एक महत्त्वाचा प्रश्न आहे. यांची दोन कारणे संभवतात. एक तर धातू क्षारांची पाण्याबरोबर अभिक्रिया होते, यात तयार झालेला हायड्रोजन दगडाच्या फटीत जमा होऊन राहतो. दुसरे कारण म्हणजे किरणोत्सारी पदार्थाचे विघटन. या विघटनानंतर हायड्रोजन वायू निर्माण होतो व दगडात साठून राहतो. पृथ्वीच्या पोटातील हायड्रोजनचे हे साठे आपली स्वच्छ इंधनाची गरज पूर्ण करतील हे चित्र खरोखरच आशादायी आहे.


– डॉ. सुधाकर आगरकर

मराठी विज्ञान परिषद, मुंबई.

Written By_लोकसत्ता टीम

संकेतस्थळ : www.mavipa.org      

ईमेल : office@mavipamumbai.org

~==========================~

ज्ञान विज्ञान दाताचे प्रकार


══════════════════════

    @ संकलन @

  *श्री. गजानन गोपेवाड 

══════════════════════

            🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════   

📙 *दात आणि त्यांचे प्रकार* 📙 

******************************

दात आहेत म्हणूनच चणे खाता येतात. दातांशिवाय जीवन कठीण असते. मानवाने कवळी शोधून काढली आहे किंवा अन्नपदार्थात बदल करून शिजवून तो खाऊ शकतो. पण अन्य प्राणी मात्र दात अधू झाल्यास, पडल्यास जिवालाच मुकतात. कारण एकच उपासमार.


दातांची ठेवण व शास्त्रीय माहिती अगदी पहिलीपासूनच दिली जाते. त्यातील काही मोजके उल्लेख म्हणजे दाताचा वरचा पांढरा भाग एनॅमल म्हणजे कवच हा शरीरातील सर्वात कठीण भाग असतो. यापेक्षा कठीण शरीरात अन्य काही नाही. त्याच्या आतील भाग म्हणजे हाडासारखाच डेटिंगचा भाग. हाही कठीणच असतो, पण त्यामध्येच रक्तवाहिन्यांचे जाळे व मज्जातंतू येऊन पोहोचतात. डेन्टिन जबडय़ाच्या हाडात खोलवर सिमेंटने पक्के बसलेले असते. दाताचा वर दिसणारा भाग हा जेमतेम असतो. हिरड्यांनी व हाडांनी झाकलेला भाग खाली खोलवर असतो.

दातांचा कवचाचा भाग कितीही कठीण असला तरीही त्यावर खाण्यातील पदार्थातून तयार होणाऱ्या अाम्ल पदार्थांचा परिणाम होतोच. साखर, तोंडात अडकून राहिलेले पिष्टमय पदार्थ यांवर लाळेचा परिणाम होऊन हे कवच हळूहळू खराब होते व तेथे दात किडू लागतो. हीच कीड पुढे खोलवर जाऊन डेन्टिनपर्यंत व नंतर दाताच्या मुळापर्यंत पोहचते. दाताला ठणका लागणे, गार गरम गोड पदार्थ न खाता येणे हे याच वेळी सुरू होते. दातांतील कीड काढून त्या जागी चांदी भरणे हे दंतवैद्य करतात व त्यामुळे दात काढून टाकावे लागणे वाचू शकते. दात दुखू लागण्याचा यात हे सर्व करणे योग्य ठरते.


माणसाला जन्मतः दात नसतात. पण सहाव्या महिन्यापासून दुधाचे म्हणजे पडणारे दात येऊ लागतात. सहाव्या वर्षांपर्यंत एकूण वीस दात आलेले असतात. प्रत्येक जबड्याचे दोन सारखे भाग केले तर दोन दाढा, एक सुळा व दोन पुढचे दात अशी पाचांची विभागणी होते. हे दात वयाच्या सात ते अकरा यादरम्यान पडून मग प्रत्येक बाजूला आठ दात अशी बत्तीशी पूर्ण होते. यामध्ये दोन दाढा, दोन उपदाढा, एक सुळा व दोन पुढचे दात अशी विभागणी होते. तिसरी दाढ अक्कल दाढ मात्र थोड्या सावकाशीने म्हणजे सोळा ते वीस वर्षादरम्यान उगवते. 

वेडेवाकडे दात नीट करणे, कृत्रिम दात बसविणे, खराब दात नीट करून पुन्हा बसवणे, दातात चांदी भरणे, कवळी बनवणे यांसारखी अनेक प्रकारची उपचारपद्धती सध्या दंतवैद्य वापरतात. दात व हिरड्या यांच्या रोगामुळे संपूर्ण पचनसंस्थाच बिघडून आरोग्य कायमचे बिघडू शकते. यासाठी आवश्यक तेव्हा दातांवर उपचार करणे रास्त ठरते. दात दुखत असल्यास उपचार सगळेच करतात पण फक्त हे पुरेसे नसते. किडलेल्या दातांवरील उपचार पद्धतीत आता अनेक पद्धती वापरल्या जातात. दातांच्या मुळापर्यंत गेलेली कीड काढून ती पोकळी चांदीने भरली जाते. मोडक्या दातांवर टोपी (कॅप) बसवुन तो नव्यासारखा बनवला जातो. एक वा अनेक दातांच्या जागी हाडामध्ये स्क्रूचा आधार बसवुन त्यावर कृत्रिम दात बसवला जातो. याला 'इम्प्लांट पद्धती' असे म्हणतात. या पद्धतीत कवळीऐवजी कृत्रिम दातांची पक्की व्यवस्थित व्यवस्था केली जाते. दंतोपचारात आता विविध शाखांचा विस्तार झाला आहे.

मानवी दातांची ठेवण, जबड्यातून कृत्रिम दात यांचा शोध घेऊन अनेक गूढ गुपितेही उलगडली आहेत. मृतांची ओळख पटवणे, गुन्हेगार ओळखणे यांसाठी याचा उपयोग झाला आहे.


दातांचा वापर जितका करावा, तितकी त्यांची ताकद टिकते, ही एक विशेष गोष्ट आहे. दातांवरील कवच, दातांचा रक्तपुरवठा, हिरड्या यांना दातांच्या वापरातूनच पक्केपणा मिळत असतो. यामुळेच केवळ शिजवलेले अन्न व फळांचे रस घेण्यामुळे दात कमकुवत होऊ शकतात. कच्ची फळे, भाज्या, कोशिंबिरी व भरपूर चावावे लागणारे, चोथा असलेले पदार्थ खाल्ल्यास दात पक्के राहण्यास मदत होते. अर्थात दातांनी अतिकडक पदार्थ खाण्याचा अट्टाहास करून फायदा होतो, असा मात्र याचा अर्थ नाही.

शुभ्र, दाणेदार, सलग दंतपंक्ती असल्या तर ती व्यक्ती चारचौघांत नक्कीच उठून दिसते. केवळ चेहऱ्याचे सौंदर्य यासाठी असावे लागते, असे नव्हे. मुळचे दात कसे आहेत, ही बाब अलहिदा, पण दातांची निगा राखून आरोग्य मिळवणे हे तर सर्वांच्याच हाती आहे.


'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*

═══════════════════════

बुधवार, २६ जानेवारी, २०२२

गाथा बलिदानाची*

 🤺⚔🇬🇧👸🏻🇬🇧⚔🤺

➿➿➿➿➿➿➿➿➿➿

               *गाथा बलिदानाची*

➿➿➿➿➿➿➿➿➿➿

       🏇🤺🇮🇳🙅‍♂🇮🇳🏇🤺

     *

🤺⚔🇬🇧👸🏻🇬🇧⚔🤺

➿➿➿➿➿➿➿➿➿➿

               *गाथा बलिदानाची*

➿➿➿➿➿➿➿➿➿➿

       🏇🤺🇮🇳🙅‍♂🇮🇳🏇🤺

     *ठाकुर कुशलसिंह चंपावत*


           १८५७ चे स्वातंत्र्य युध्द १० मे १८५७ पासून सुरु झाले व ५ /६ दिवसातच दिल्ली क्रांतिकारकांच्या ताब्यात आली. त्यांनी बहाद्दुरशहा जफरच्या नेतृत्वाखाली हे युद्ध सुरू ठेवले. त्या काळात इंग्रजांना आपल्या देशातुन हाकलून लावणे, ही साधी गोष्ट नव्हती. भरपूर मनुष्यबळ , पुष्कळशी संपत्ती व पुरेपूर शस्त्रसाठा  त्यासाठी अत्यावश्यक होता. पण बहाद्दूरशहाजवळ ना मनुष्यबळ होते, ना धन होते, ना शस्त्रसाठा होता. इंग्रजांच्या पलटणीतले बंडखोर सैनिक दिल्लीत हजारोंच्या संख्येने आले होते, येत होती. त्याच्या पोटापाण्याची व्यवस्था लावण्याची जबाबदारी बादशहावरच होती. म्हणून बहाद्दुरशाह जफरने दिल्लीच्या तख्ताचे पूर्वीचे राजनिष्ठ व संबंधित अशा जयपूर , जोधपुर , बीकानेर  अलवार राजांना पत्रे लिहिली, त्यात त्याने त्या राजांना आवाहन केले की , " माझी अशी उत्कट अभिलाषा आहे की , इंग्रजांच्या दास्याच्या शृंखला तोडून छिन्नभिन्न  करुन टाकाव्या, कोणत्या का उपायाने होईना , पण संपूर्ण हिंदुस्थानला इंग्रजांच्या दास्यातून मुक्त कारावे अशी माझी तिव्र ईच्छा आहे.  परंतु स्वातंत्र्य प्राप्तीच्या या उद्दिष्टासाठी लढले  जाणारे हे क्रांतियुध्द तेव्हाच सफल होईल, जेव्हारणशूर व्यक्ती रणभूमीवर उतरुन या महान आंदोलनाचे संचालन करील.राष्ट्रातील विभिन्न शक्तींना एका सुत्रात बांधील आणि या संपूर्ण अभियानाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेईल. "इंग्रजांना आपल्या देशातून घालवून दिल्यावर मला या देशावर राज्य करण्याची , सत्ताधीश होण्याची मुळीच इच्छा नाही. जर सारे राजे या स्वातंत्र्ययुद्धात सामील होऊन लढतील , तर मी स्वेच्छेने प्रसन्न मनाने माझे सर्व अधिकार व सत्ता तुम्ही निवडलेल्या राजमंडळाच्या हाती सुपूर्द करीन व त्यातच मला आनंद मिळेल ."

       परंतु दुर्देव असे की ते सारे राजपूत राजे महाराजे आपल्या स्वाभिमानी व पराक्रमी जातीची आन विसरले आणि लाचार होऊन इंग्रजांचे साहाय्य कर्ते बनले. तरीही त्यांच्या सैन्यात आणि इंग्रजांच्या देशी पलटणीतील सैन्यात आपल्या पूर्वजांची परंपरा चालविणारे हजारो राजपूत वीर होते , त्यांनी निष्ठेने क्रांतिकारकांना साथ दिली.

       २१ ऑगस्ट १८५७ रोजी जोधपूर राज्यातील एरिनपूरा छावणीतील देशी सैनिकांनी विद्रोहाची ज्वाला प्रज्ज्वलित केली.  त्या सैनिकात बहुसंख्य  राजपूत सैनिक होते . "चलो दिल्ली - मारो फिरंगी" अशा घोषणा देत सैन्य दिल्लीकडे निघाले. त्यांचा पहिला पडाव मारवाडमधील आहुजा नगरीजवळ पडला.  तेथिल ठाकूर कुशलासिंह चंपावत या राजाने त्या सैनिकांचे नेतृत्व स्विकारले. आसोप, गुलर आणिआलनियावास येथले ठाकूरही आपल्या सैन्यांसह त्यांना येऊन मिळाले. तेव्हा त्या सैनिकांची संख्या सहा हजारापर्यंत झाली होती.

         

       अजमेरचा चीफ कमिशनर पेट्रीक लाॕरेन्स याने या सैन्याच्या प्रतिकारासाठी जोधपूरच्या राजपूत राजाला सैन्य पाठविण्यास सांगितले. जोधपूरचा राजा तख्तसिंह याने आपला किल्लेदार ओनाडासिंह पवार याच्या नेतृत्वाखाली दहा हजार सैन्य व बारा तोफा त्यासाठी पाठविल्या . ज्याच्या पूर्वजांनी वर्षानुवर्ष दिल्लीच्या तख्ताची सेवा केली. त्या तख्ताच्या संरक्षणासाठी जोधपूरच्या राजाने सैन्य व रसद न पाठविता तीच मदत त्या तख्ताच्या विनाशासाठी परक्या इंग्रजांच्या सहायार्थ मात्र सैन्य व रसद पाठवावी, केवढा हा दैवदुर्विलास ! जोधपूरच्या राजाचे सैन्य क्रांतिकारकांच्या सैन्याच्या दीड पटीपेक्षा माठे असले तरी क्रांतिकारकांच्या सैन्याने जोधपूरच्या सैन्याची धूळधाण उडवून दिली व त्याच्या सर्व तोफा सुद्धाआपल्या ताब्यात घेतल्या. जोधपूरचा किल्लेदार ओनाडासिंह व त्याचे काही सैन्याधिकारी आपल्या शेकडो सैन्यासह या युद्धात ठार झाले . नंतर चीफ कमीशनर पेट्रीक लॉरेन्स व जोधपूरचा पोलिटिकल एजंट आपले सैन्य घेऊन त्या क्रांतिकारकांचा प्रतिकार करण्यासाठी आहुवा येथे आले. १८ डिसेंबर १८५७ रोजी दोन्ही सैन्यात तुंबळ युद्ध झाले. त्या युद्धात इंग्रजांचा पराभव झाला . त्यात मेसन ठार झाला. शेकडो सैनिक ठार झाले व पेट्रीक लॉरेन्सही जीव घेऊन पळून गेला.

  

 गव्हर्नर जनरल लॉर्ड कॅनिंगला जेव्हा हे वृत समजले तेव्हा त्याने २० जानेवारी १८५७ रोजी पालनपूर व नसिराबाद येथील छावण्यातून मोठे सैन्य आहवा येथे पाठवून दिले. त्या सैन्यापुढे क्रांतिकारकाच्या सैन्याचा टिकाव लागला नाही. कुशलसिंह चंपावतसह क्रांतिकारकाचे अनेक नेते पकडले गेले. त्यांना बंदीवासाच्या काठोर शिक्षा देण्यात आल्या.


जवळच्या कोटा येथील छावणीतही बातमी पोचली. त्या छावणीतील देशी सैन्याने १५ ऑक्टोबर १८५७ रोजी उठाव केला . त्या सैनिकांनी कोटाचा रेसिडेंट बर्टन आणि काही इंग्रज अधिका-यांना ठार केले. त्यांनी कोटा राज्याचा खजिना, शस्त्रभंडार य धान्यसाठा आपल्या ताब्यात घेतला. कोटाचे रावरामसिंह यांना नजरकैदेत ठेवून दिले आणि राज्याचा बहुतेक भाग आपल्या ताब्यात घेतला. सहा महिने कोटा राज्य स्वातंत्र्याचा उपभोग घेत होते.

  अहुवा येथील क्रांतिकारकांच्या सैन्याचा पराभव केल्यानंतर इंग्रजांचे सैन्य कोटा येथे आले. त्यांनी कोटा येथील विद्रोही सैन्यावर जबरदस्त हल्ला केला. त्या मोठ्या सैन्यापुढे कोटाच्या क्रांतिकारी सैन्याचा टिकाव लागला नाही. अनेक क्रांतिकारी सैनिक या युद्धात कामास आले. त्या क्रांतिकारी सैन्याच्या दोन्ही नेत्यांना जयदयाल आणि महाराव खानाला कैद केले व नंतर त्यांना फासावर चढविण्यात आले. विशेष हे की , पालनपूर व नसिराबाद छावणीतील गोऱ्या सैनिकांबरोबर देशी सैनिकांनी आपल्या देशातील क्रांतिकारी सैन्याचा पराभव करून इंग्रजांना साह्य केले . याला आपल्या देशाचे दुर्दैव आन विसरले आणि लाचार होऊन इंग्रजांचे साहाय्य कर्ते बनले. तरीही त्यांच्या सैन्यात आणि इंग्रजांच्या देशी पलटणीतील सैन्यात आपल्या पूर्वजांची परंपरा चालविणारे हजारो राजपूत वीर होते , त्यांनी निष्ठेने क्रांतिकारकांना साथ दिली.

       २१ ऑगस्ट १८५७ रोजी जोधपूर राज्यातील एरिनपूरा छावणीतील देशी सैनिकांनी विद्रोहाची ज्वाला प्रज्ज्वलित केली.  त्या सैनिकात बहुसंख्य  राजपूत सैनिक होते . "चलो दिल्ली - मारो फिरंगी" अशा घोषणा देत सैन्य दिल्लीकडे निघाले. त्यांचा पहिला पडाव मारवाडमधील आहुजा नगरीजवळ पडला.  तेथिल ठाकूर कुशलासिंह चंपावत या राजाने त्या सैनिकांचे नेतृत्व स्विकारले. आसोप, गुलर आणिआलनियावास येथले ठाकूरही आपल्या सैन्यांसह त्यांना येऊन मिळाले. तेव्हा त्या सैनिकांची संख्या सहा हजारापर्यंत झाली होती.

         

       अजमेरचा चीफ कमिशनर पेट्रीक लाॕरेन्स याने या सैन्याच्या प्रतिकारासाठी जोधपूरच्या राजपूत राजाला सैन्य पाठविण्यास सांगितले. जोधपूरचा राजा तख्तसिंह याने आपला किल्लेदार ओनाडासिंह पवार याच्या नेतृत्वाखाली दहा हजार सैन्य व बारा तोफा त्यासाठी पाठविल्या . ज्याच्या पूर्वजांनी वर्षानुवर्ष दिल्लीच्या तख्ताची सेवा केली. त्या तख्ताच्या संरक्षणासाठी जोधपूरच्या राजाने सैन्य व रसद न पाठविता तीच मदत त्या तख्ताच्या विनाशासाठी परक्या इंग्रजांच्या सहायार्थ मात्र सैन्य व रसद पाठवावी, केवढा हा दैवदुर्विलास ! जोधपूरच्या राजाचे सैन्य क्रांतिकारकांच्या सैन्याच्या दीड पटीपेक्षा माठे असले तरी क्रांतिकारकांच्या सैन्याने जोधपूरच्या सैन्याची धूळधाण उडवून दिली व त्याच्या सर्व तोफा सुद्धाआपल्या ताब्यात घेतल्या. जोधपूरचा किल्लेदार ओनाडासिंह व त्याचे काही सैन्याधिकारी आपल्या शेकडो सैन्यासह या युद्धात ठार झाले . नंतर चीफ कमीशनर पेट्रीक लॉरेन्स व जोधपूरचा पोलिटिकल एजंट आपले सैन्य घेऊन त्या क्रांतिकारकांचा प्रतिकार करण्यासाठी आहुवा येथे आले. १८ डिसेंबर १८५७ रोजी दोन्ही सैन्यात तुंबळ युद्ध झाले. त्या युद्धात इंग्रजांचा पराभव झाला . त्यात मेसन ठार झाला. शेकडो सैनिक ठार झाले व पेट्रीक लॉरेन्सही जीव घेऊन पळून गेला.

  

 गव्हर्नर जनरल लॉर्ड कॅनिंगला जेव्हा हे वृत समजले तेव्हा त्याने २० जानेवारी १८५७ रोजी पालनपूर व नसिराबाद येथील छावण्यातून मोठे सैन्य आहवा येथे पाठवून दिले. त्या सैन्यापुढे क्रांतिकारकाच्या सैन्याचा टिकाव लागला नाही. कुशलसिंह चंपावतसह क्रांतिकारकाचे अनेक नेते पकडले गेले. त्यांना बंदीवासाच्या काठोर शिक्षा देण्यात आल्या.


जवळच्या कोटा येथील छावणीतही बातमी पोचली. त्या छावणीतील देशी सैन्याने १५ ऑक्टोबर १८५७ रोजी उठाव केला . त्या सैनिकांनी कोटाचा रेसिडेंट बर्टन आणि काही इंग्रज अधिका-यांना ठार केले. त्यांनी कोटा राज्याचा खजिना, शस्त्रभंडार य धान्यसाठा आपल्या ताब्यात घेतला. कोटाचे रावरामसिंह यांना नजरकैदेत ठेवून दिले आणि राज्याचा बहुतेक भाग आपल्या ताब्यात घेतला. सहा महिने कोटा राज्य स्वातंत्र्याचा उपभोग घेत होते.

  अहुवा येथील क्रांतिकारकांच्या सैन्याचा पराभव केल्यानंतर इंग्रजांचे सैन्य कोटा येथे आले. त्यांनी कोटा येथील विद्रोही सैन्यावर जबरदस्त हल्ला केला. त्या मोठ्या सैन्यापुढे कोटाच्या क्रांतिकारी सैन्याचा टिकाव लागला नाही. अनेक क्रांतिकारी सैनिक या युद्धात कामास आले. त्या क्रांतिकारी सैन्याच्या दोन्ही नेत्यांना जयदयाल आणि महाराव खानाला कैद केले व नंतर त्यांना फासावर चढविण्यात आले. विशेष हे की , पालनपूर व नसिराबाद छावणीतील गोऱ्या सैनिकांबरोबर देशी सैनिकांनी आपल्या देशातील क्रांतिकारी सैन्याचा पराभव करून इंग्रजांना साह्य केले . याला आपल्या देशाचे दुर्दैव म्हणावे लागेल.

🇮🇳🇮🇳🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳🇮🇳🇮🇳

🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

संकलन -)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा - यवतमाळ ४४५२०६

मंगळवार, २५ जानेवारी, २०२२

प्रभात दर्शन

 🌳⛳ *शुभ प्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

पौष मास,कृष्ण पक्ष,*नवमी*,स्वाति नक्षत्र,सूर्य उत्तरायण,शिशिर ऋतु,युगाब्द ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

बुधवार, २६ जानेवारी २०२२.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                        *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


     *“जब कोई मनुष्य अपने पूर्वजों के बारे में लज्जित होने लगे, तब समझ लेना चाहिये कि उसका अंत हो गया।  मैं यद्यपि हिन्दू जाति का नगण्यघटक हूं किन्तू मुझे अपनी जाति पर गर्व है, अपने पूर्वजों पर गर्व है। मैं स्वयं को हिन्दू कहने में गर्व अनुभव करता हूं।”*


                     *स्वामी विवेकानंद*

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

*गीता से ज्ञान मिला,रामायण से राम🚩...!!*

*भाग्य से हिंदू धर्म मिला,किस्मत से जन्म हिंदुस्थान मे मिला..!* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*गणतंत्र दिवस की हार्दिक बधाई*

गाथा बलिदानाची भारतीय प्रजासत्ताक दिन

 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

➿➿➿➿➿➿➿➿➿➿

           *गाथा बलिदानाची*

➿➿➿➿➿➿➿➿➿➿

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

                 📙📘📗

      *भारतीय प्रजासत्ताक दिन*

                 📙📘📗


 *प्रजासत्ताक दिन चिरायू होवो !!*

              🇮🇳🇮🇳🇮🇳


         भारतीय प्रजासत्ताक दिवस हा भारताच्या प्रजासत्ताकात दरवर्षी २६ जानेवारी रोजी पाळला जाणारा राष्ट्रीय दिन आहे. याला गणराज्य दिन असेही म्हटले जाते. भारताचे संविधान संविधान समितीने २६ नोव्हेंबर, इ.स. १९४९ रोजी स्वीकारले व २६ जानेवारी इ.स. १९५० रोजी पासून भारतीय संविधान अंमलात आले. जवाहरलाल नेहरू यांनी २६ जानेवारी इ.स. १९३० रोजी लाहोर अधिवेशनात तिरंगा फडकावून पूर्ण स्वराज्याची (स्वातंत्र्याची) घोषणा केली होती. त्याची आठवण म्हणून २६ जानेवारी हा दिवस राज्यघटना अंमलात आणण्यासाठी निवडण्यात आला. या दिवशी देशभरात भारताच्या राष्ट्रध्वजाचे आरोहण होऊन त्याला वंदना दिली जाते. भारताचे राष्ट्रगीत म्हटले जाते आणि आदर व्यक्त केला जातो.


🏇 *इतिहास*


भारताला  ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा स्वातंत्र्य लढा आणि त्यातील महात्मा गांधी यांच्या अहिंसा पद्धतीचा मोठा सहभाग आहे. तेव्हा स्वतंत्र भारताला स्वतःचे संविधान नव्हते. भारताचे मात्र कायदे हे भारतीय राज्यशासनाच्या १९३५ सालच्या कायद्यावर (कलमावर) आधारित होते.


२८ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र भारताचे संविधानन तयार करण्यासाठी मसूदा समिती स्थापना केली गेली. या समितीने संविधानाचा मसुदा तयार करून तो सभेपुढे ४ नोव्हेंबर १९४७ रोजी सादर केला. या सभेने सार्वजनिक चर्चेसाठी सभागृहात हा प्रस्ताव १६६ दिवसांसाठी खुला केला आणि २ वर्ष,११ महिने आणि १८ दिवसाच्या कालावधी नंतर समितीने हा मसुदा अंतिम केला. बरेचसे विचार विमर्श आणि सुधारणा केल्यानंतर समितीच्या ३०८ सद्स्यांनी दोन हस्तलिखित प्रती (हिंदी आणि इंग्रजी) २४ जानेवारी १९५० रोजी स्वाक्षरांकित केल्या. दोन दिवसानंतर हे भारताचे संविधान संपूर्ण राष्ट्रासाठी लागू करण्यात आले. भारताच्या संविधानाच्या निमित्ताने भारताचा प्रजासत्ताक दिन हा साजरा करण्यात येऊ लागला.


🇮🇳 *उत्सव*


दर वर्षी २६ जानेवारी रोजी भारताच्या राजधानीत, म्हणजे नवी दिल्ली येथे, एक मोठे आहात संचलन आयोजित केले जाते. हे संचलन रायसीना हिलपासून राष्ट्रपती भवनापर्यंत राजपथ मार्गाद्वारे जाते. संचलनाच्या अगोदर अनाम सैनिकांसाठी बनवले गेलेले स्मारक, अमर जवान ज्योती, येथे भारताचे पंतप्रधान पुष्पचक्र अर्पण करतात. भारतासाठी आपले प्राण अर्पण करणार्‍या वीर सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यात येते. त्यानंतर पंतप्रधान राजपथाच्या मुख्य मंचावर जातात व आलेल्या पाहुण्यांना भेटतात. तितक्यात प्रमुख पाहुण्यांसोबत राष्ट्रपतींचे आगमन होते. राष्ट्रगीत सुरु होताच राष्ट्रपती ध्वजारोहण करतात व २१ तोफांची सलामी दिली जाते. त्यानंतर देशासाठी शौर्य गाजवलेल्या सैनिकांना राष्ट्रपतींच्या हस्ते अशोक चक्र आणि कीर्ती चक्र, हे मुख्य पुरस्कार देण्यात येतात. राष्ट्रीय शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेली देशातील शूर बालके सजवलेल्या हत्तीवरून किंवा वाहनावरून या संचलनात सहभागी होतात.प्रमुख पाहुणे म्हणून परराष्ट्रीय राष्ट्राध्यक्षांना निमंत्रण दिले जाते.


भारतीय फौजांचे (नौदल, पायदल, वायुसेना) वेगवेगळे सेनाविभाग, घोडदळ, पायदळ, तोफखाना आणि इतर अद्ययावत शस्त्रे/ क्षेपणास्त्रे (जसे पृथ्वी, अग्नी), रणगाडे समवेत संचलन करतात. भारताचे राष्ट्रपती या फौजांची मानवंदना स्वीकारतात. या संचलनाच्या सादरीकरणाची पूर्वतयारी विशेष काळजीपूर्वक आणि शिस्तीने केली जाते इतके या संचलनाचे महत्व आहे. नवी दिल्ली येथे होणार्‍या संचलनाप्रमाणेच भारतातील सर्व राज्यांतही एकेक संचलन होते. प्रत्येक राज्यात त्या त्या राज्याचे राज्यपाल फौजांची मानवंदना स्वीकारतात.


सन २०१९ मध्ये, गुगल ने खास प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आपल्या वेबसाईटच्या भारतीय आवृत्तीवर डुडल दर्शवले.


⛱ *राष्ट्रीय सुट्टी*


२६ जानेवारी, इ.स. १९५० रोजी नव्याने स्वातंत्र्य मिळालेल्या भारत देशाने संविधान अंमलात आणून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती. प्रजासत्ताक दिवस भारतातील तीन राष्ट्रीय सुट्ट्यांपैकी एक आहे. (इतर दोनः स्वातंत्र्य दिन (१५ ऑगस्ट) व गांधी जयंती (२ ऑक्टोबर). ह्या दिवशी भारताची राजधानी, नवी दिल्ली येथे एक मोठी परेड (संचलन) राजपथ मार्गावरून निघते.


🚚 *चित्ररथ*


या संचलनाबरोबरच भारतातील विविध संस्कृतींची झलक प्रस्तुत केली जाते. त्यासाठी भारतातील राज्यांनी आपापल्या राज्याचे चित्ररथ पाठविलेले असतात. त्यांमध्ये महाराष्ट्राचा चित्ररथही असतो. या चित्ररथांच्या सादरीकरणाची विशेष पूर्वतयारी सर्व राज्यांचे कलाकार काही दिवस आधी करतात. या चित्ररथ सादरीकरणाला विशेष पारितोषिकही दिले जात असल्याने प्रत्येक राज्य आपापल्या संस्कृतीचे दर्शन अधिक चांगल्या पद्धतीने चित्ररथात दिसून येईल यासाठी प्रयत्न करते.


🏃‍♂ *शालेय संचलन प्रजासत्ताक दिन*


भारतातील सर्व शाळा आणि महाविद्यालये तसेच शासकीय संस्था, खाजगी संस्था, ग्रामपंचायती अशा विविध ठिकाणी २६ जानेवारी रोजी ध्वजवंदन केले जाते आणि भारतीय संविधानाप्रती आदर व्यक्त केला जातो.


🏃‍♂ *विशेष संचलन*


स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ.राजेंद्र प्रसाद यांच्या उपस्थितीत १९५० साली राजधानी दिल्ली येथे राजपथावर पहिले संचलन आयोजित करण्यात आले. भारताच्या विविधतेतून एकता या वैशिष्ट्याला ही मानवंदना होती. २०१६ साली ६७ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या शिष्ट समितीतर्फे मरीन द्राइव्ह येथेही एक संचलन आयोजित करण्यात आले.


🌹 *संदेश व शुभेच्छापत्रे*


प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी देशभक्तीपर गीतांच्या ओळी, तिरंंगा ध्वज आदि संंकल्पनांचा कल्पक वापर करून परस्परांना शुभेच्छा दिल्या जातात. देशाभिमान मनात टिकून राहण्यासाठी भारतीय नागरिक अशा शुभेच्छा एकमेकांना देऊन परस्परांमधले ऐक्य टिकवून ठेवण्याचे आवाहनही करतात.


🤴 *प्रमुख अतिथी*


सन १९५० पासून भारत देश प्रजासत्ताक दिनानिमित्त दुसर्‍या देशाच्या राष्ट्रप्रमुखाला भारतात आमंत्रित करतो.


*वर्ष /    प्रमुख अतिथी   /      देश*


१९५० - राष्ट्रपती सुकर्णो -  इंडोनेशिया


१९५१ ----

१९५२ ----

१९५३ ----


१९५४ - राजा जिग्मे दोर्जी वांग्चुक - भूतान


१९५५ - गव्हर्नर जनरल मलिक घुलाम मुहम्मद - पाकिस्तान


१९५६ ----

१९५७ ----

१९५८ ----

१९५९ ----


१९६० - राष्ट्रपती क्लिमेंट वोरोशिलोव्ह - सोव्हियेत संघ


१९६१ - राणी एलिझाबेथ दुसरी - युनायटेड किंग्डम


१९६२ –  -----


१९६३ - राजा नोरोडोम सिहांनौक - कंबोडिया


१९६४ -----


१९६५ - खाद्य व शेतीमंत्री राणा अब्दूल हमिद - पाकिस्तान


१९६६ -------

१९६७ -------


१९६८ - पंतप्रधान अलेक्सेइ कोसिजिन - सोव्हियेत संघ

राष्ट्रपती जोसेफ ब्रोझ टिटो -  युगोस्लाव्हिया


१९६९ - पंतप्रधान टोडोर झिव्हकोव्ह -  बल्गेरिया


१९७० ------


१९७१ - राष्ट्रपती ज्युलिअस न्यरेरे -  टांझानिया


१९७२ - पंतप्रधान शिवसागर रामगुलाम - मॉरिशस


१९७३ - राष्ट्रपती मोबुटु सेसे सेको -  झैर


१९७४ - राष्ट्रपती जोसेफ ब्रोझ टिटो -  युगोस्लाव्हिया

पंतप्रधान सिरिमावो भंडारनायके -  श्रीलंका


१९७५ - राष्ट्रपती केनेथ काँडा - झांबिया


१९७६ - पंतप्रधान जाक शिराक - फ्रान्स


१९७७ - प्रथम सचिव एडवर्ड जिरिएक - पोलंड


१९७८ - राष्ट्रपती पॅट्रिक हिलेरि - आयर्लंड


१९७९ - पंतप्रधान माल्कम फ्रेझर -  ऑस्ट्रेलिया


१९८० - राष्ट्रपती व्हॅलेरी जिस्कॅर देस्तें - फ्रान्स


१९८१ - राष्ट्रपती होजे लोपेझ पोर्तियो - मेक्सिको


१९८२- राजा हुआन कार्लोस पहिला -  स्पेन


१९८३ - राष्ट्रपती शेहु शगारी -नायजेरिया


१९८४ - राजा जिग्मे सिंग्ये वांग्चुक - भूतान


१९८५ - राष्ट्रपती राउल अल्फोन्सिन - आर्जेन्टिना


१९८६ - पंतप्रधान आंद्रिआस पापेन्द्रु - ग्रीस


१९८७ - राष्ट्रपती ॲलन गार्शिया - पेरू


१९८८ - राष्ट्रपती जूनिअस रिचर्ड जयवर्धने - श्रीलंका


१९८९ - जनरल सेक्रेट्री ङुयेन वॅन लिन्ह - व्हियेतनाम


१९९० - पंतप्रधान अनिरुद्ध जगन्नाथ - मॉरिशस


१९९१ - राष्ट्रपती मॉमून अब्दुल गय्यूम - मालदीव


१९९२ - राष्ट्रपती मारिओ सोआरेस - पोर्तुगाल


१९९३ - पंतप्रधान जॉन मेजर - युनायटेड किंग्डम


१९९४ - पंतप्रधान कोह चोक थोंग - सिंगापूर


१९९५ - राष्ट्रपती नेल्सन मंडेला -दक्षिण आफ्रिका


१९९६ - राष्ट्रपती डॉ. फर्नान्डो हेनरिके कार्दोसो - ब्राझील


१९९७ - पंतप्रधान बसदेव पांडे -  त्रिनिदाद आणि टोबॅगो


१९९८ - राष्ट्रपती जॅक शिराक - फ्रान्स


१९९९ - राजा वीरेंद्र वीर विक्रम शाह देव - नेपाळ


२००० - राष्ट्रपती ओलुसेगुन ओबासान्जो - नायजेरिया


२००१ - राष्ट्रपती अब्देलअझीझ बुटेफ्लिका - अल्जीरिया


२००२ - राष्ट्रपती कस्साम उतीम - मॉरिशस


२००३ - राष्ट्रपती मोहम्मद खातामी - इराण


२००४ - राष्ट्रपती लुईझ इनाचियो लुला दा सिल्व्हा - ब्राझील


२००५ - राजा जिग्मे सिंग्ये वांग्चुक - भूतान


२००६ - अब्दुल्ला बिन अब्देलअझीझ अल-सौद - सौदी अरेबिया


२००७ - राष्ट्रपती व्लादिमिर पुतिन - रशिया


२००८ - राष्ट्रपती निकोला सार्कोझी - फ्रान्स


२००९ - राष्ट्रपती नुरसुल्तान नझरबायेव - कझाकस्तान


२०१० - राष्ट्रपती ली म्युंग बाक -  दक्षिण कोरिया


२०११ - राष्ट्रपती सुसिलो बांबांग युधोयोनो -  इंडोनेशिया


२०१२ - पंतप्रधान यिंगलक शिनावत -  थायलंड

२०१५ - राष्ट्रपती बराक ओबामा - अमेरिका


२०१६ - राष्ट्रपती फ्रान्स्वॉ ओलांद - फ्रान्स


२०१७ - राजपुत्र शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान - संयुक्त अरब अमिराती

 २०१८ - नाॕगेन झाॕन फुक 


२०१९ - क्रिल राम पोसा


२०२० -जेर बोलसोनारो


२०२१ - COVID -19 मुळे अतिथी बोलविले नाही...

*सर्व भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!!*

🇮🇳🇮🇳🇮🇳 *जयहिंद*  🇮🇳🇮🇳🇮🇳

संकलन -)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा - यवतमाळ ४४५२०६

निशाचर प्राणी कसे जगतात


══════════════════════

   @ संकलन 

  *श्री. गजानन गोपेवाड 

══════════════════════

            🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════   

📙 *निशाचर प्राणी कसे जगतात ?* 📙 

************************************

दिवसा दडुन विश्रांती घेणारे व रात्रीच्या वेळीच क्षुधाशमनाला बाहेर पडणारे प्राणी म्हणजे निशाचर प्राणी. यांची रात्रिचर्या हा एक जीवनाचा भागच असतो. त्यांची शरीररचनाही त्याला सोयीची असते. प्रकाशाशिवाय वावरता यायला मुख्यत: अन्य इंद्रियांचा सुलभ वापर आवश्यक असतो. नाकाने अगदी सूक्ष्मा गंधही ओळखणे, कानाला अतिदूरवरचे व जमिनीतून मिळणाऱ्या हादर्‍यातुन संदेश मिळणे किंवा तीक्ष्ण स्पर्शज्ञान असणे हे या प्राण्यांच्या बाबतीत विशेष आवश्यक ठरते.


स्वतःचा जीव अन्य आक्रमकांपासून वाचवणे व निसर्गाचा समतोल राखणे या दृष्टीने ही रचना निसर्गानेच केली असावी. एखाद्या परिसरात सारे काही बारा तास चिडीचूप असावे, यापेक्षा रोज दिवसा काही प्राणी, तर रात्री निशाचर निसर्गात राबता ठेवतात. यामुळे पाणी, अन्न, वावरायला जागा या उपलब्धी आपोआपच दुभागल्या जाऊन सोयीच्या होतात.


अनेक प्राण्यांना दिवसाचे चौदा तास झोप लागते; पण ही झोप फार सावध असते. जराशीही चाहूल लागली तरी कुत्रा व मांजर जसे कान टवकारते, तसाच हा प्रकार असतो. त्यामुळे ही झोपेची वेळ कधीची हा प्रश्न निशाचर प्राणी सहज सोडवतात. रात्रीचे आठ ते दहा तास त्यांचे उद्योग सलग चालतात.


अनेक कीटक, सरपटणारे प्राणी, छोटे सस्तन प्राणी, अपृष्ठवंशीय प्राणी यांचा निशाचरांत समावेश होतो. पक्षी मात्र सहसा रात्री उडत नाहीत. खोल पाण्यातील मासे त्यांच्या हालचाली सोयीने करतच राहतात; पण सर्वसाधारण जलचर मात्र विश्रांती घेतात.


घुबडे, वटवाघळे त्यांच्या चित्कारातुन मिळणाऱ्या परतीच्या संदेशातून सहजगत्या माहिती मिळवुन वावरतात. बिळात वास्तव्य करणारे प्राणी जमिनीतील ध्वनीच्या कंपनांद्वारे हालचाली करतात. काही प्राण्यांना असलेल्या लांबलचक मिशाही त्यांना उपयोगी पडतात. एखाद्या जागी आपला डोक्याचा शिरकाव होईल वा नाही, याचा नेमका अंदाज मिशांवरून त्यांना सहज येतो.


निशाचर प्राण्यांमुळे जंगल कधी झोपले आहे, असे होतच नाही. भक्त ही हालचाल खजबज, खुसपूस, चित्कार या स्वरूपातच जाणवते.


'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*

═══════════════════════

  

गाथा बलिदानाची येसाजी कंक

 ➿➿➿➿➿➿➿➿➿➿

                *गाथा बलिदानाची*

➿➿➿➿➿➿➿➿➿➿

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

       *शिवरायांचे शूर शिलेदार*   

               *येसाजी कंक*

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

   जे स्वराज्य द्रोही होते ते हत्तीच्या पायाखाली गेले तर काही स्वामिनिष्ठ होते त्यांनी हत्तीलाही नमवल अशाच एका रणझुंझार मावळ्याची कथा.


    १६७६ साली राज्याभिषेकानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिणेकडे कूच केली मोगल शाही संपवण्यासाठी. त्यांनी गोवळकोंड्याच्या कुतुबशहा शी हात मिळवणी केली गोवळकोंड्या त महाराज्यांच जंगी स्वागत झालं. मुगल शाही आदिलशाही निजामशाही अश्या साऱ्या शह्यांच्या उरावर उभ राहून स्वराज्य निर्माण करणारा जाणता राजा आलाय म्हणून लोकांनी खूप गर्दी केली. महाराजांसोबत सरनोबत हंबीरराव मोहिते,सूर्याजी मालुसरे,येसाजी कंक इत्यादी निवडक मावळे होते या सगळ्यांनी महालात प्रवेश केला.


गोवळकोंड्याचा कुतुबशहा महाराजांना म्हणतोय महाराज आपकी फौज देखकरं हमे बडी खुशी हु ई लेकीन ताजू ब की बात ये हे की आपकी फौज मे हमने हाथी नही देखा. यावर महाराज उत्तरले आमच्या कडे पन्नास हजार हत्ती आहेत म्हणजे आमचा एक एक मावळा हत्तीच्या ताकतीचं आहे. यावर कुतुबशहा म्हणतोय हत्तीच्या ताकतीचां माणूस कस शक्य आणि असेल एका दा असा मावळा तर काय तो माझ्या हत्तिशी झुंज देईल. महाराज म्हणतायत का नाही यातील कोणताही मावळा निवडा तो तुमच्या हत्तीशी झुंज देईल.


कुतुबशहा न प्रत्येक मावळ्यावर कुंचीतसी नजर फिरवली व येसाजी कडे बोट दाखवत विचारलं. क्या ये सिपाई लढेगा हाथी से महाराजांनी मोठ्या आत्मविश्वासानं उत्तर दिलं का नाही माझा हा मावळा तुमच्या उन्मत्त हत्तीला च काय इंद्राच्या ऐरावतालही लोळण घालायला भाग पाडेल. मग युद्धाचा दिवस ठरला किल्ल्याच्या मागच्या बाजूला असलेल्या मोकळ्या पटांगणात गोलाकार मैदान बनवण्यात आले महराज आणि कुतुबशहा साठी बाजूला शामियाना उभारण्यात आला. येसाजी ने महाराजांना झुकून मुजरा केला आणि नंग्या तलवारी निशी मैदानात उतरला. हत्तीला ही साखदंडांतून मोकळ करून मैदानात आणण्यात आले.


युद्धाला सुरुवात झाली येसाजिला पाहून हत्ती चवताळून येसाजिच्या अंगावर धावून गेला. येसाजी न डाव्या अंगाला उडी मारून हत्तीला हुलकावणी दिली. हत्ती आपला वेग रोखू न शकल्या मूळे तसाच पुढे गेला. हत्ती आता चवतळला होता. दोन अडीच तास झुंज चालू होती. कधी येसाजी पुढे तर कधी येसाजी हत्तीच्या मागे. आता हत्ती बेभान झाला होता. त्याने येसाजीला आपल्या सोंडत पकडलं. लोकांना वाटल आता संपला येसाजी, पण येसाजी न हत्तीच्या सोंडवर तलवारीने असा घाव केला की जखमी झालेला हत्ती वेड्यासारखा पळत सुटला तो पुन्हा आलाच नाही.


कुतुबशहा च्या हट्टपायी एका हत्तीचा जीव गेला होता.


पण महाराजांचा एक एक मावळा हा हत्तीच्या ताकतीचां असतो हे सिद्ध झालं.


कुतुबशहा न येसाजीला आपल्या गळ्यातील हार भेट देऊ केला पण येसाजीन तो हार न घेता आमचं कौतुक करायला आमचा राजा समर्थ हाय माझा हा पराक्रम माझ्या राज्याच्या चरणी अर्पण करतो अस सांगितलं.


💎 *धोरण*


पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यात असलेल्या भाटघर धरणाला आता येसाजी कंक जलसागर म्हणतात.


🎞 *चित्रपट*


शिवाजी महाराजांचे शूर सरदार येसाजी कंक यांनी फत्ते केलेल्या एका कामगिरीवर 'फत्तेशिकस्त' हा चित्रपट आधारित आहे.


     🚩 *हर हर महादेव...!* 🚩

🇮🇳🇮🇳🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳🇮🇳🇮🇳

🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

संकलन-) गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा - यवतमाळ ४४५२०६

25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस

 *🇮🇳🇮🇳 राष्ट्रीय मतदार दिन  🇮🇳🇮🇳*

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

                *विशेष माहिती*

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

     राजकीय प्रक्रियेत अधिक तरुण मतदारांना भाग घेण्यास प्रोत्साहित करण्यासाठी,सरकारने दरवर्षी २५ जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला. या उपक्रमामुळे युवकांना राजकीय मतदान सशक्तीकरण, मतदान करून अभिमानाची भावना तसेच मतदानाचा हक्क वापरण्यास प्रेरणा मिळेल अशी अपेक्षा आहे.


२५ जानेवारी २०११ रोजी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत कायदा करून मंत्रालयाच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली.


१८ वर्ष वय झालेल्या नवीन मतदारांना राजकीय क्षेत्रात आणि मतदानाचा हक्क मिळवण्यात कमी रस असल्याचे दिसून आले. त्यामुळेच मतदानाच्या नोंदींमध्ये नामांकन मिळण्यास सुद्धा त्यांची इच्छा नाही असा निष्कर्ष लागला. काही राज्यात त्यांच्या नोंदणीचे प्रमाण २० ते २५ टक्के इतके कमी असल्याची माहिती समोर आली.


या समस्येस प्रभावीपणे हाताळण्यासाठी, निवडणूक आयोगाने देशभरातील ८.५ लाख मतदान केंद्रामध्ये दरवर्षी १ जानेवारीला १८ वर्षे वयाच्या सर्व पात्र मतदारांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक उपक्रम राबवण्यात येतात. अशा पात्र मतदारांना वेळेवर नामांकन केल्यास, त्यांचे निवडणूक छायाचित्र ओळखपत्र (ईपीआयसी) प्रत्येक वर्षी २५ जानेवारी रोजी दिले जाते.

✔️✔️✔️✔️✔️✔️✔️✔️✔️✔️

संकलन -)गजानन गोपेवाड  

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६


रविवार, २३ जानेवारी, २०२२

नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आज जयंती

 *🙏🙏🙏शत्-शत् नमन🙏🙏🙏*

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

 *२३ जनवरी/जन्म-तिथि,*

 *नेताजी सुभाषचंन्द्र बोस*

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

स्वतन्त्रता आन्दोलन के दिनों में जिनकी एक पुकार पर हजारों महिलाओं ने अपने कीमती गहने अर्पित कर दिये, जिनके आह्नान पर हजारों युवक और युवतियाँ आजाद हिन्द फौज में भर्ती हो गये, उन नेताजी सुभाषचन्द्र बोस का जन्म उड़ीसा की राजधानी कटक के एक मध्यमवर्गीय परिवार में २३ जनवरी,१८९७ को हुआ था।


सुभाष के अंग्रेजभक्त पिता रायबहादुर जानकीनाथ चाहते थे कि वह अंग्रेजी आचार-विचार और शिक्षा को अपनाएँ। विदेश में जाकर पढ़ें तथा आई.सी.एस. बनकर अपने कुल का नाम रोशन करें, पर सुभाष की माता श्रीमती प्रभावती हिन्दुत्व और देश से प्रेम करने वाली महिला थीं। वे उन्हें १८५७ के संग्राम तथा विवेकानन्द जैसे महापुरुषों की कहानियाँ सुनाती थीं। इससे सुभाष के मन में भी देश के लिए कुछ करने की भावना प्रबल हो उठी।


सुभाष ने कटक और कोलकाता से विभिन्न परीक्षाएँ उत्तीर्ण कीं। फिर पिताजी के आग्रह पर वे आई.सी.एस की पढ़ाई करने के लिए इंग्लैंड चले गये। अपनी योग्यता और परिश्रम से उन्होंने लिखित परीक्षा में पूरे विश्वविद्यालय में चतुर्थ स्थान प्राप्त किया, पर उनके मन में ब्रिटिश शासन की सेवा करने की इच्छा नहीं थी। वे अध्यापक या पत्रकार बनना चाहते थे। बंगाल के स्वतन्त्रता सेनानी देशबन्धु चितरंजन दास से उनका पत्र-व्यवहार होता रहता था। उनके आग्रह पर वे भारत आकर कांग्रेस में शामिल हो गये।


कांग्रेस में उन दिनों गांधी जी और नेहरू की तूती बोल रही थी। उनके निर्देश पर सुभाष बाबू ने अनेक आन्दोलनों में भाग लिया और १२ बार जेल-यात्रा की। १९३८ में गुजरात के हरिपुरा में हुए राष्ट्रीय अधिवेशन में वे कांग्रेस के अध्यक्ष बनाये गये, पर फिर उनके गांधी जी से कुछ मतभेद हो गये। गांधी जी चाहते थे कि प्रेम और अहिंसा से आजादी का आन्दोलन चलाया जाये, पर सुभाष बाबू उग्र साधनों को अपनाना चाहते थे। कांग्रेस के अधिकांश लोग सुभाष बाबू का समर्थन करते थे। युवक वर्ग तो उनका दीवाना ही था।


सुभाष बाबू ने अगले साल मध्य प्रदेश के त्रिपुरी में हुए अधिवेशन में फिर से अध्यक्ष बनना चाहा, पर गांधी जी ने पट्टाभि सीतारमैया को खड़ा कर दिया। सुभाष बाबू भारी बहुमत से चुनाव जीत गये। इससे गांधी जी के दिल को बहुत चोट लगी। आगे चलकर सुभाष बाबू ने जो भी कार्यक्रम हाथ में लेना चाहा, गांधी जी और नेहरू के गुट ने उसमें सहयोग नहीं दिया। इससे खिन्न होकर सुभाष बाबू ने अध्यक्ष पद के साथ ही कांग्रेस भी छोड़ दी। 


अब उन्होंने *‘फारवर्ड ब्लाक’* की स्थापना की। कुछ ही समय में कांग्रेस की चमक इसके आगे फीकी पड़ गयी। इस पर अंग्रेज शासन ने सुभाष बाबू को पहले जेल में और फिर घर में नजरबन्द कर दिया,पर सुभाष बाबू वहाँ से निकल भागे। उन दिनों द्वितीय विश्व युद्ध के बादल मंडरा रहे थे। सुभाष बाबू ने अंग्रेजों के विरोधी देशों के सहयोग से भारत की स्वतन्त्रता का प्रयास किया। उन्होंने आजाद हिन्द फौज के सेनापति पद से *जय हिन्द, चलो दिल्ली* तथा *तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूँगा* का नारा दिया, पर दुर्भाग्य से उनका यह प्रयास सफल नहीं हो पाया।


सुभाष बाबू का अन्त कैसे, कब और कहाँ हुआ, यह रहस्य ही है। कहा जाता है कि १८ अगस्त,१९४५ को जापान में हुई एक विमान दुर्घटना में उनका देहान्त हो गया। यद्यपि अधिकांश तथ्य इसे झूठ सिद्ध करते हैं, पर उनकी मृत्यु के रहस्य से पूरा पर्दा उठना अभी बाकी है।

....................................

⬇⬇

संकलन -)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा - यवतमाळ

४४५२०६

गुरुवार, २० जानेवारी, २०२२

*ज्ञान चंद्र घोष*

 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

                    *ज्ञान चंद्र घोष*

👨‍🔬👨‍🔬👨‍🔬👨‍🔬👨‍🔬👨‍🔬👨‍🔬👨‍🔬👨‍🔬👨‍🔬👨‍🔬

*भारत के प्रसिद्ध वैज्ञानिकों में से एक*

👨‍🔬👨‍🔬👨‍🔬👨‍🔬👨‍🔬👨‍🔬👨‍🔬👨‍🔬👨‍🔬👨‍🔬👨‍🔬

*स्मृतिदिन - २१ जनवरी १९५९*


  ज्ञान चंद्र घोष (अंग्रेज़ी: Dhan Chandra Ghosh, 

जन्म- १४ सितम्बर, १८९४ ई., पुरुलिया, पश्चिम बंगाल;

मृत्यु- २१ जनवरी, १९५९ ई.) भारत के प्रसिद्ध वैज्ञानिकों में से एक थे। ये अनेक वैज्ञानिक संस्थाओं के संस्थापक और सदस्य रहे थे। घोष के अनुसंधान कार्यों से ही उनका यश विज्ञान जगत् में फैला था। ज्ञान चंद्र घोष द्वारा स्थापित *'तनुता का सिद्धांत', 'घोष का तनुता सिद्धांत'* के नाम से सुप्रसिद्ध है, यद्यपि इसमें पीछे बहुत कुछ परिवर्तन करना पड़ा।


जन्म तथा शिक्षा

ज्ञान चंद्र घोष का जन्म १४ सितम्बर, १८९४ को पश्चिम बंगाल के पुरुलिया नामक स्थान पर हुआ था। गिरिडीह से प्रवेश परीक्षा में उत्तीर्ण होकर 'कलकत्ता' (वर्तमान कोलकाता) के प्रेसिडेंसी कॉलेज से १९१५ ई. में एम.एस.सी. परीक्षा में इन्होंने प्रथम श्रेणी में प्रथम स्थान प्राप्त किया था। इसके बाद ज्ञान चंद्र घोष 'कोलकाता विश्वविद्यालय' के 'विज्ञान कॉलेज' में प्राध्यापक नियुक्त हुए। १९१८ ई. में डी.एस.सी. की उपाधि प्राप्त की।


विदेश गमन

वर्ष १९१९ में ज्ञान चंद्र घोष यूरोप गए, जहाँ इंग्लैंड के प्रोफ़ेसर डोनान और जर्मनी के डॉ. नर्न्स्ट और हेवर के अधीन कार्य किया। १९२१ ई. में यूरोप से लौटने पर 'ढाका विश्वविद्यालय' में प्रोफ़ेसर नियुक्त हुए। १९३९ में ढाका से 'इंडियन इंस्टिट्यूट ऑफ़ सायंस' के डाइरेक्टर होकर ज्ञान चंद्र घोष बंगलोर गए।

🙏🙏🙏शुभ सकाळ🙏🙏🙏

संकलन -)गजानन गोपेवाड 


उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

आंद्रे-मरी अँपियर

 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

*आंद्रे-मरी अँपियर*

➕➗➖➕➗➖➕➗➖➕➖

*फ्रांसचा भौतिकशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ*

🔢🔢🔢🔢🔢🔢🔢🔢🔢🔢🔢

*जन्मदिन - २० जानेवारी  १७७५*


आंद्रे मारी अ‍ॅम्पिअर हे फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ व गणितज्ञ होते. त्यांचा जन्म फ्रान्समधील पॉलिमियालिऑन येथे झाला. विद्युतगतिकीशास्त्र (इलेक्ट्रोडायनॅमिक्स) या भौतिकी शाखेचा पाया घालणारे संशोधक म्हणून ते ओळखले जातात.


अ‍ॅम्पिअर अतिशय हुशार व कुशाग्र बुद्धीचे होते. लहानपणीच त्यांनी प्रगत गणिताचा अभ्यास करून त्या वेळेपर्यंत सिद्ध झालेले सर्व गणित आणि विज्ञान आत्मसात केले होते. लॅटिन भाषा व निसर्गशास्त्रही ते शिकले होते. त्यांच्या वाचनात अनेक विषयांचा समावेश असे.


इसवी सन १७९९ मध्ये अ‍ॅम्पिअर यांनी गणिताचे शिक्षक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. १८०९ साली ते न्यू एकोल पॉलिटेक्निकमध्ये गणिताच्या प्राध्यापकपदी रुजू झाले. ते विलक्षण प्रतिभावान होते. अगदी झपाटल्यासारखे एखाद्या कल्पनेच्या मागे लागून प्रयोग करीत.


हॅन्स ओरस्टेड या डॅनिश शास्त्रज्ञाने तारेतून वाहणाऱ्या विद्युतप्रवाहामुळे तारेभोवती चुंबकक्षेत्र निर्माण होते असा निष्कर्ष प्रयोग करून काढला होता. अ‍ॅम्पिअरना हे समजताच त्यांनीही विद्युतप्रवाह आणि चुंबकत्व यांच्यातील संबंध दर्शविण्यासाठी प्रयोग केले, भौतिकीय सिद्धांत मांडले, गणितीय स्पष्टीकरण दिले. विद्युतप्रवाह वाहून नेणाऱ्या दोन सरळ, लांब, समांतर तारांमध्ये प्रवाहामुळे निर्माण होणाऱ्या बलासंबंधी नियम मांडला. जर दोन्ही समांतर तारांतील विद्युतप्रवाह एकाच दिशेने वाहत असेल तर त्यात आकर्षण निर्माण होते व विरुद्ध दिशेने वाहिल्यास प्रतिसारण निर्माण होते, असे अ‍ॅम्पिअरना आढळले. सर्व आविष्कारासंबंधी यथार्थ सिद्धांत व निष्कर्ष मोठय़ा प्रबंधाद्वारे फ्रान्सच्या अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेसमध्ये सादर केले. अ‍ॅम्पिअर यांनी विद्युतप्रवाह मोजण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या उपकरणाला गॅल्व्हानोमीटर असे नाव दिले.


कॉलेज डी फ्रान्समध्ये १८२४ साली अ‍ॅम्पिअर प्रायोगिक भौतिकशास्त्राच्या प्रतिष्ठेच्या अध्यक्षपदावर निवडून आले. तसेच १८२७ मध्ये त्यांना रॉयल सोसायटीचे विदेशी सदस्यत्व प्राप्त झाले. १८२८ मध्ये त्यांची रॉयल स्वीडिश अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेसचे परदेशी सभासद म्हणून निवड झाली. आंशिक अवकल समीकरणासंबंधीही (पार्शल डिफरन्शिअल इक्वेशन्स) त्यांनी संशोधन केले आहे. विद्युतशास्त्रातील महत्त्वाच्या संशोधनाच्या सन्मानार्थ विद्युतप्रवाहाच्या एककाला अ‍ॅम्पिअर हे त्यांचे नाव देण्यात आले आहे.

🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

संकलन-)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

बुधवार, १९ जानेवारी, २०२२

*कुतूहल* 🤔 🎯 *कीटकांमार्फत रोगोपचार*

 *🔭मराठी विज्ञान परिषदेचे🔬*


      🤔 *कुतूहल* 🤔


🎯 *कीटकांमार्फत रोगोपचार*


रोगराईशी सामना करण्यासाठी मानवाला कोण खटपट करावी लागते. त्या प्रयत्नांत मधमाश्या, माशांच्या अळ्या आणि प्लाझमोडीयम वाहून नेणारे डास अशा कीटकांचा वापर करून रोगोपचार करण्याचे तंत्र काही ठिकाणी विकसित झाले आहे. विलायती औषधांपेक्षा अशा पारंपरिक औषधांचा वापर मुख्यत्वे आदिवासी समाजात होतो.


मधमाशीच्या विषाचा उपयोग दाहनाशक, संधिवातावर रामबाण, एकाधिक स्क्लेरोसिस, जुनाट दुखणी, चेतासंस्थेचे विकार, दमा आणि विविध त्वचारोगांवर होतो. हे विष मधमाशीचा डंख मारून शरीरात घातले जाते, किंवा इंजेक्शनद्वारे शरीरात टोचले जाते. हा उपचार योग्य माहीतगार व्यक्तीच्या उपस्थितीमध्येच केला जातो, अन्यथा मधमाशीच्या चाव्यामुळे काही व्यक्तींना अ‍ॅलर्जीचा तीव्र झटका येऊ शकतो. मधमाशीच्या विषामध्ये अनेक प्रथिने आणि पेप्टाइड्स असून त्यात मेलीटीन नावाचे महत्त्वाचे क्रियाशील संयुग असते. 

रेशीम

फोनिशिया सेरीकॅटा  नावाच्या माशीच्या अळ्या चिघळलेल्या जखमा साफ करण्यासाठी वापरल्या जातात. जखमेच्या खालच्या चांगल्या ऊतींना हानी न पोहोचवता नेक्रोटीक ऊती काढून टाकायचे काम बिनबोभाटपणे या अळ्या करतात. याला ‘मॅगॉट डीब्रिजमेंट थेरपी’ असे म्हणतात. या अळ्या पुवाळलेल्या जखमा, सेल्युलाटीस, गांग्रीन, मॅस्टिडॉयटिस ऑस्टिओमायलेटीस, अल्सर्स, अशा विविध व्याधींवर गुणकारी असतात. या अळ्यांच्या कामगिरीमुळे अवयवच्छेदन करून शरीराचे भाग काढून टाकायची गरज भासत नाही. ही उपचार पद्धती सोळाव्या शतकापासून वापरात आहे. परंतु त्याचे पुनरुज्जीवन विसाव्या शतकात पुन्हा झाले होते. मात्र प्रतिजैविकांचा शोध लागल्यावर जास्त आधुनिक वैद्यकीय उपचार पद्धतीने या पद्धतीला मागे सारले.


अ‍ॅमेझॉनच्या आर्मी मुंग्या आणि आफ्रिकेच्या कार्पेंटर मुंग्या यांचा वापर शस्त्रक्रियेनंतरच्या जखमा शिवण्यासाठी केला जात असे. या मुंग्यांचे मॅन्डिबल हे मुखावयव एकमेकांत अडकल्यानंतर इतके घट्ट बंद होतात की मुंग्यांची मुंडकी धडापासून वेगळी केली तरी ती पकड सुटत नाही. आधुनिक शस्त्रक्रिया विशारद असे अघोरी उपाय करत नसले तरी स्थानिक आदिवासी त्यांच्या जखमा बांधून घेण्यासाठी याच मुंग्यांचा वापर करतात.


ज्यावेळी आधुनिक उपचार पद्धतीची वानवा होती तेव्हा ‘सिफीलीस’ सारख्या गुप्तरोगाला आळा घालण्यासाठी शरीराचे तापमान ४० अंश सेल्सिअसच्या वर नेण्याची पद्धत होती. यासाठी हिवताप निर्माण करणाऱ्या प्लाझमोडीयमची कमी क्षमतेची लागण अशा रुग्णाला केली जात असे आणि त्यासाठी त्याला डासांच्या चाव्याला सामोरे जावे लागत असे. या डासांत असणाऱ्या प्लाझमोडीयममुळे त्या रुग्णाचे तापमान वाढून सिफीलीस जिवाणू नष्ट होतात असे समजले जात असे.


–  मराठी विज्ञान परिषद


office@mavipamumbai.org

➖➖➖➖➖➖➖

संकलन) :-गजानन गोपेवाड 

Featured Post

व्यायाम व योगा अवश्य करावा*

*व्यायाम व योगा अवश्य करावा*  *व्यायाम व योगा करण्याचे दहा फायदे:-*  1) व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते: व्यायाम करणारी...