सोमवार, १५ नोव्हेंबर, २०२१

चेहर्‍यावर सुरकत्या का पडतात


══════════════════════

   *📒📒📒 @ संकलन @📒📒📒*

  *श्री. गजानन गोपेवाड 

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════   

📙 *म्हाताऱ्या लोकांच्या चेहऱ्यावर सुरकुत्या का पडतात ?* 📙 


वृद्धावस्था आली की माणसात अनेक बदल होतात. डोक्यावरचे केस गळायला लागतात व टक्कल पडते. तोंडातील दात हलायला लागतात व नंतर तोंडाचे बोळके होते. बोटांना कंप सुटतो, दृष्टी अधू होते, उत्साह कमी होतो. अशा या बदलांमुळे व्यक्ती चिडचिडी होते. त्यात भर म्हणजे विस्मरणही व्हायला लागते. त्यामुळे वृद्धत्व म्हणजे एक रोग असे वाटायला लागते.


चेहऱ्यावर सुरकुत्या का पडतात, याविषयी माहिती घेऊ. त्वचेखाली स्नायूंच्या आकुंचन व प्रसरणाच्या दिशेने काटकोनात त्वचेची हालचाल होत असल्याने त्वचेच्या वारंवार घड्या पडतात. व तेथे नंतर सुरकुत्या पडतात. चेहऱ्याच्या त्वचेखाली इतर शरीराच्या त्वचेखाली असणारा जाडसर थर (deep fascia) नसतो व स्नायू व त्वचेचे थर एकमेकांत जखडलेले असतात. त्यामुळेही त्वचेवर जास्त ताण येतो व सुरकुत्या पडतात.


 दुसरे म्हणजे त्वचेखालील मेद पदार्थांचे प्रमाण कमी होते. साहजिकच त्वचा सैल व ढिली होते. तिसरे म्हणजे स्नायूंमधील ताण वयोमानानुसार कमी होतो. त्यामुळे त्वचेमध्ये खोवले जाणारे स्नायू शिथिल होतात व त्वचाही सैल होते. सर्व इंद्रियांवर त्वचेची जीवनशक्ती कमी झालेली असते. त्यामुळे या त्वचेची लवचिकता कमी होऊन ती सैल पडते. या सर्व गोष्टींमुळे सैल पडलेल्या त्वचेवर सुरकुत्या पडतात. तोंडातील दात पडल्याने जबड्याच्या हाडाची झीज झाल्याने चेहऱ्याचा आकारही बदलतो व त्वचा आणखीनच सैल होते. परिणामी वृद्ध व्यक्तींच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात. सुरकुत्या सर्व शरीरावर पडतात परंतु चेहऱ्यावर ती बाब जास्त प्रकर्षाने जाणवते.

 

*डाॅ. अंजली दिक्षित व डाॅ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन* 


गाथा बलिदानाची जननायक बिरसा मुंडा

 ➿➿➿➿➿➿➿➿➿

  🇮🇳🇮🇳 *गाथा बलिदानाची* 🇮🇳🇮🇳

➿➿➿➿➿➿➿➿➿                                                  

  🏹 *जननायक बिरसा मुंडा* 🏹


     *जन्म : १५ नोव्हेंबर १८७५*

            *(उलिहातू - झारखंड)*


 *वीरमरण : ९ जून १९००*

                    *(रांची तुरुंग)*

                     (वय - २४ वर्षे)


               सन १७८९ मध्य कंपनी सरकाने १२५०० चौ. मैल क्षेत्राचा छोटा नागपूर विभाग आपल्या अधिपत्याखाली आणला. हा सारा डोंगराळ प्रदेश. त्यातले प्रमुख रहिवासी कोल जमातीचे आदिवासी. ते सारे शेती करीत व जंगलावर निर्भर राहात. त्यांच्या प्रत्येक गावच्या प्रमुखाला मुंडा असे म्हणत. या भागातील शेतीवरील व इतर कारांच्या वसुलीसाठी इंग्रजांनी  परप्रांतातील ठेकेदार आणले होते आणि मोगली सत्तेच्या करांच्या दुपटी-तिपटीने या लोकांवर कर लादले होते. हे ठेकेदार मनमानीपणे जादा कर वसूल करीत व ज्यांना कर भरता येत नसत, त्यांच्या जमिनी बळकावीत. त्यामुळे ते बड़े जमीनदार बनले होते. त्यामुळे हजारो आदिवासी भूमिहीन बनले व नगण्य मजुरीवर त्या जमिनदारांच्या जमिनीत मजुरी करू लागले. त्यामुळे ते अन्नाला मोताद झाले. शिवाय जमीनदारांना पालीतून वाहून नेणे, त्यांची सर्वतोपरी विनामूल्य सेवा करणे, त्यांचे चैनबाजीचे सर्व प्रकारचे खर्च भागविणे या आदिवासींना सक्तीचे होऊन बसले. त्यांच्या पूर्वापार न्यायपंचायतीची व्यवस्था इंग्रजांनी मोडून काढली व आपली न्यायदान पध्दती सुरू  केली . त्यासाठी वकील आले. मुकादम्यांचा खर्च लोकांना पेलवेनासा झाला. त्यामुळे हे लोक त्रस्त झाले व कंगाल बनले. तशात या भागात ख्रिस्ती मिशनरी आले. त्यांनी प्रलोभने दाखवून या लोकांना ख्रिस्ती बनविण्याचा सपाटा सुरू केला. जो कोणी ख्रिस्ती होई,  त्याला करात सूट मिळे व त्यांची जमीनही जप्त होत नसे. त्यामुळे हे हजारो आदिवासी ख्रिस्ती बनले. त्यांचा मूळचा धर्म बुडाला. परिणामतः अनेक आदिवासी बंडखोर बनले व त्यांनी राज अधिकान्यांशी, ठेकेदारांशी, नव्या जमीनदारांशी, ख्रिस्ती मिशन-यांशी अनेक वेळा लढे दिले. पण ते इंग्रजांच्या आधुनिक शस्त्र बळामुळे निष्प्रभ ठरले. हे लढे एकोणीसाव्या शतकाच्या अखेरपर्यंत चालूच राहिले. शेवटचा सर्वात मोठा लढा दिला बिरसा मुंडाने.

               बिरसा मुंडा यांचा जन्म उलिहातू या गावी १५ नोव्हेंबर १८७५ रोजी झाला. त्याच्या बापाचे नाव सुगना मुंडा. त्यालाही आपल्या सगळ्या कुटुंबियांसह ख्रिस्ती धमांचा स्वीकार करावा लागला होता. त्यामुळेच बिरसाचे प्राथमिक शिक्षण बुर्जू येथील जर्मन मिशनच्या शाळेत सुरू झाले. त्यानंतर तो पुढील शिक्षणासाठी चाईबासा येथील लूथरन मिशनच्या शाळेत दाखल झाला. तेथेच त्याला ख्रिस्ती मिशन-यांच्या कारवाया समजून आल्या. त्यामुळे त्याच्या मनात इंग्रज सरकारविषयी अत्यंत तिरस्कार निर्माण झाला. नंतर त्याने आपल्या सर्व कुटुंबियांसह त्या अन्यायी लोकांच्या ख्रिस्ती धर्माचा त्याग केला. पुढे तो तोडन ठाण्याअंतर्गत गोडबेडा येथील आनंद पांडे या गुरुंच्या संपर्कात आला. त्यांनी त्याला रामायण - महाभारतातील कथा शिकविल्या व आयुर्वेदाचेही ज्ञान दिले. त्यांच्यासमोर त्याने आपल्या धरतीला इंग्रजांच्या  जुलमी शासनाच्या जाचातून मुक्त करण्याची घोर प्रतिज्ञा केली. बिरसाच्या मनावर हिंदू धर्मातील आदर्श तत्वांचा प्रभाव पडला व  वैष्णव बनला. त्याने शिकार करणे सोडून दिले. आपल्या लोकांच्या मनात नैतिक गुण विकसित करण्यासाठी  त्याने गावोगावी दौरे सुरु केले. 

           बिरसाचे व्यक्तिमत्व अत्यंत प्रभावी होते.  गोरापान,  अत्यंत तेजस्वी,  उंच तगडा, प्रसन्नमुख, डोक्याला फेटा, पायात खडावा असे त्याचे रूप सर्वांनाच आकर्षित करुन घ्यायचे. त्यामुळे त्याच्या समाजाचे लोक भराभर  त्याचे अनुयायी बनले. त्यांना तर तो'धरतीचा देवच'  वाटायचा. तो सुध्दा लोकांना सांगायचा, " देवपुरूष सिंगबोसाने मला स्वप्नात दर्शन देऊन दिव्य शक्ती दिली आहे. त्या शक्तीच्या बळावर मी आपल्या धरतीला  या इंग्रजांच्या व जमीनदारांच्या जुलमी शासनातून मुक्त करणार आहे. तेव्हा लोकांचा त्याच्यावर जागा त्याच्यावर दृढ विश्वास बसला. बिरसालाही वाटायचे,

 " मी माझ्या समाजाचा उदारकर्ता म्हणून जन्मास आलो आहे. त्याचे अनुयायी हजारोच्या संख्येने वाढू लागले. त्यांच्यामधून त्याने शेकडो चांगले लढवय्ये निवडून आपले सैन्य सज्ज केले. गया मुंडा या आपल्या जिवलग मित्राला त्याने आपला सेनापती म्हणून नियुक्त केले.

          सर्वांनी आपल्या समाजावर इंग्रज अधिका-यांकडून,  ख्रिस्ती मिशन-यांकडून, जमीनदारांकडून व ठेकेदाराकडून होत असलेल्या अन्यायाविरुद्ध मरेपर्यंत लढा देण्याची प्रतिज्ञा केली व  स्वराज्य स्थापन करण्याचे ठरविले. इंग्रज सरकारला त्यांच्या हालचालीचा सुगावा लागलाच होता. २४ जेगिस्ट १८९५ रोजी रांची जिल्ह्याच्या इंग्रज पोलिस इंस्पेक्टरने अनेक शिपायांसह रात्री बिरसाच्या घरावर छापा टाकून  झोपेत असतानाच त्याला आणि त्याच्या काही साथीदारांना अटक केली. बिरसा दोन वर्षांची  सक्तमजुरीची शिक्षा व ५० रु. दंड केला व त्याच्या साथीदाराला प्रत्येकी २०/२० रु. दंड केला.

            कैदेतून सुटून आल्यानंतर बिरसाने नव्या जोमाने संघर्ष सुरू केला. इंग्रजांच्या अनेक ठाण्यांवर त्याने हल्ले केले.  पराक्रमाची शर्थ केली.  पण इंग्रजांच्या  बंदूकांपुढे त्यांची परंपरागत हत्यारे निष्प्रभ ठरली.  शेकडो कोल जवान मृत्युमुखी पडले. एका लढाईत सेनापती गया मुंडा ठार झाला. बिरसाचा मुक्काम घनदाट जंगलातील टेकड्यांवर गुप्त ठिकाणी असे. त्यामुळे तो इंग्रजांच्या हाती लागणे अशक्यप्राय होते .

परतु घरभेद्यांकडून इंग्रजांना त्याचा सुगावा लागताच त्याला घेरून पकडण्यात आले. त्याच्याबरोबर त्याचे ८० अनुयायीसुद्धा जेरबंद झाले. तेव्हा रांचीच्या इंग्रज जिल्हाधिका-याने बिरसाला जमीनदारी देण्याची लालूच दाखवून त्याने आपला उद्योग सोडून द्यावा, असे सांगितले.  पण बिरसाने ते धुडकावले. अखेर तुरुंगात त्याचे फार हाल करण्यात आले आणि विष देऊन मारण्यात आले. बिरसा पटकीमुळे मेला, असे इंग्रज सरकारने खोटेच जाहीर केले. त्याच्या अनुयायांनाही जबर शिक्षा ठोठावण्यात आल्या व बिरसाने छोटा नागपूरमध्ये स्वातंत्र्यासाठी आरंभिलेला लढा चिरडून टाकण्यात आला.

                       अशारीतीने कोल समाजाचा हा  'धरतीचा देव ' बिरसा मुंडा जानेवारी १९०० मध्ये त्या धरतीच्या कुशीतच विसावले.

             बिरसा मुंडा हे आदिवासी क्रांतिकारक होते. बिरसा मुंडा यांना *जननायक* हा किताब लोकांनी बहाल केला. आदिवासी जननायक बिरसा मुंडा यांचे चित्र भारतीय संसदेच्या मध्य कक्षासमोर लावले आहे. ते एकटेच क्रांतिकारक आहेत ज्यांना हा सन्मान मिळाला आहे. त्यांच्या सन्मानार्थ भारत सरकारने डाक तिकीट जारी केले असून झारखंड मधील रांची येथे स्मारक बांधण्यात आलेले आहे.

   

                🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳

🌹🙏 *विनम्र अभिवादन*🙏🌹

संकलन -)

गजानन गोपेवाड  

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

➖➖➖➖➖➖➖➖➖


शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुण्यतिथी

 ➿➿➿➿➿➿➿➿➿➿

🚩 *_शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे_*🚩

➿➿➿➿➿➿➿➿➿➿

*आज दि.१६ नोव्हेंबर २०२१ रोजी _शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे_ १०० व्या वर्षी निधन झाले.*

🚩🖋️🖌️🚩🖋️🖌️🚩🖋️🖌️🚩🖋️🖌️

पद्मविभूषण व महाराष्ट्र भूषण  पुरस्कार प्राप्त आदरणीय श्री.बळवंत मोरेश्वर उपाख्य बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने आपण सर्वच एका शतायुषी शिव ऋषीला मुकलो आहोत. तरुण वयापासूनच देशभक्तीचा वसा त्यांना संघ शाखेतून प्राप्त झाला. तो ध्यास मनात ठेवून ध्येय प्राप्ती करिता तत्व रूप आदर्श पुरुष म्हणून छत्रपती श्रीमंत शिवाजी महाराज यांची भक्ती त्यांनी जीवनभर निष्ठेने चालवली. दादरा नगर हवेली च्या मुक्तिसंग्रामात सैनिक म्हणून तेहि लढले होते. शिवाजी महाराजांची कथा आपल्या वक्तृत्वाच्या बळावर त्यांनी घराघरात पोहोचवली. त्यासाठी जीवनभर असंख्य परिश्रम केले. अत्यंत कठीण परिस्थितीतून केलेल्या या वाटचालीतुनच "जाणता राजा" सारख्या भव्य व प्रेरक नाट्य शिल्पाची निर्मिती त्यांनी केली. त्या देशभक्त व परिश्रमी शिवशाहीर यांना आज शेवटचा मानाचा मुजरा.... 

*बाबासाहेब पुरंदरे यांचा अल्पपरिचय.*

जन्म.२९ जुलै १९२२ पुण्याजवळच्या सासवड गावी.

अलीकडेच बाबासाहेब पुरंदरे यांनी शंभरी पर्दापण केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून अनेक राजकीय नेत्यांनी बाबासाहेब पुरंदरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.  ‘शिवशाहीर’ हा शब्द उच्चारताच डोळ्यासमोर उभे राहतात ते अटकर कोट-जाकिटातले, हिमसफेद दाढी आणि मानेवर रुळणाऱ्या पांढऱ्याशुभ्र जटा सांभाळत हजारोंच्या जनसमुदायाला शिवचरित्राची मोहिनी घालणारे श्रीमंत बळवंत मोरेश्वर तथा बाबासाहेब पुरंदरे. ‘शिवाजी महाराज’ हा सप्ताक्षरी मंत्र शिवशाहिरांनी आयुष्यभर जपला आणि या मंत्राच्या साह्याने

 ‘वन्ही तो चेतवावा । चेतविता चेततो ।’ 

या समर्थ वचनाला साक्षी ठेवत मराठी मनाची मरगळ दूर केली.  बाबासाहेब पुरंदरे यांचं मूळ नाव बळवंत मोरेश्वर पुरंदरे असं होते. 

त्यांचे मूळ गाव पुणे जिल्ह्यातील सासवड. पण तरुणपणापासूनच ते पुण्यातच स्थायिक झाले. पुण्यातल्या भारत इतिहास संशोधक मंडळासोबत त्यांनी इतिहास संशोधक म्हणून काम सुरु केलं. या ठिकाणीच इतिहाससंशोधक ग.ह. खरे हे बाबासाहेबांना गुरुस्थानी लाभले व इतिहास संशोधक म्हणून त्यांची वाटचाल सुरू झाली. बाबासाहेब पुरंदरे यांनी महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचा आणि मराठा साम्राज्य आणि शिवकालीन ऐतिहासिक दस्तऐवजांचा सखोल अभ्यास केला. त्यांच्या लेखनातून व व्याख्यानांतून शिवकाळ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचला. पुरंदऱ्यांची दौलत, पुरंदऱ्यांची नौबत, गड-किल्ल्यांची ऐतिहासिक माहिती देणारे साहित्य (गडसंच), शेलारखिंड, व राजा शिवछत्रपती हे बाबासाहेबांचे आजवर प्रकाशित झालेले साहित्य होय. शिवचरित्र हे घरोघरी पोहोचावे हे ध्येय ठेवून बाबासाहेबांनीअथक संशोधनातून व परिश्रमांतून राजा शिवछत्रपती हा ग्रंथ साकार केला.  ‘राजा शिवछत्रपती’ या ग्रंथाच्या १८ आवृत्त्या प्रकाशित झाल्या असून, काही कादंबऱ्या तसेच किल्ल्यांचे वर्णन करणारी पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. फुलवंती व जाणता राजा ही नाटके त्यांनी लिहिली, दिग्दर्शित केली. जाणता राजा या महानाट्याचे गेल्या २७ वर्षांत १२५० हून अधिक प्रयोग झाले आहेत. पहिला प्रयोग १४ एप्रिल १९८४ रोजी झाला होता. या प्रयोगांच्या उत्पन्नातून बाबासाहेबांनी अनेक संस्थांना लाखो रुपयांची मदत केली आहे हे नाटक ५ अन्य भाषांत भाषांतरित केले गेले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावरील सर्वात मोठे असे महानाटय़ असून याशिवाय हत्ती, घोडे, उंट, बैलगाडय़ांचा या महानाटय़ात समावेश असतो.२०१५ सालापर्यंत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर बारा हजाराहून अधिक व्याख्याने दिली होती. जाणता राजा या महानाट्याचे अमेरिका, लंडनसह भारतात महाराष्ट्र, गुजरात, कनार्टक, मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ, गोवा या राज्यांतील अनेक शहरात प्रयोग झाले आहेत. इतिहासाचा ध्यास घेतलेले बाबासाहेब हे तरुणपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जवळून संपर्कात होते. त्या काळातच ते आचार्य अत्रे यांच्या वृत्तपत्रात लेखन करीत. शिवाय आपले मेहूणे श्री. ग. माजगावकर यांच्याबरोबर ते ‘माणूस’ मध्येही काम करत होते. ज्येष्ठ इतिहासकार व कादंबरीकार गो. नी. दांडेकरांशी पुढे त्यांची भेट झाली. बाबासाहेब-गोनीदा ही जोडी म्हणजे शिवचरित्राचा वारसा आजच्या पिढीपर्यंत पोहोचवणारे दूतच झाले. ते नेहमी गडांवर एकत्र भटकंती करीत. महाराष्ट्रातील एकही असा किल्ला नाही, जिथे बाबासाहेब पोहोचले नाहीत आणि एकही असे सरदार घराणे नाही, ज्यांच्याशी त्यांचा संपर्क झालेला नाही! शिवचरित्र अभ्यासणारे अनेक अभ्यासक असतात परंतु शिवचरित्र अनुभवणारे, अक्षरश: जगणारे बाबासाहेब एकच! स्वातंत्र्यानंतर लढल्या गेलेल्या दादरा नगर हवेली मुक्ती संग्रामात बाबासाहेबांनी सुधीर फडके यांच्याबरोबर हिरिरीने सहभागी होते. आचार्य अत्रे, गो. नी. दांडेकर, पु.ल. देशपांडे, अटलबिहारी वाजपेयी, मंगेशकर कुटुंबीय, ठाकरे कुटुंबीय यांसारख्या दिग्गजांचा सहवास त्यांना लाभला. या सर्वांच्या माध्यमातून,सहकार्यातून त्यांनी शिवचरित्रप्रसारासाठी अनेक उपक्रम चालवले.महाराष्ट्रात, भारतात आणि परदेशातही त्यांच्या व्याख्यानांतून, जाणता राजा या महानाट्यातून आजही शिवचरित्र जिवंत होते. ’शिवचरित्र हे व्यक्तिचारित्र्य निर्मितीचा अभ्यासक्रम आहे’ हे त्यांनी आपल्या व्याख्यानांमधून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातील अनेक पैलू उलगडून दाखवत पटवून दिले. बाबासाहेब पुरंदरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

➿➿➿➿➿➿➿➿➿➿

संकलन -)गजानन गोपेवाड  

उमरखेड जिल्हा - यवतमाळ ४४५२०६


प्रभात दर्शन

 🌳⛳ *शुभ प्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

कार्तिक मास,शुक्ल पक्ष, *द्वादशी*,उ.भा.नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,हेमन्त ऋतु,युगाब्द ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

सोमवार, १५ नोव्हेंबर २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                        *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


स्वगृहे पूज्यते मूर्खः 

                 स्वग्रामे पूज्यते प्रभुः,

स्वदेशे पूज्यते राजा 

                 विद्वान्सर्वत्र पूज्यते॥ 


*भावार्थः- मूर्ख की अपने घर में पूजा होती है. मुखिया की अपने गाँव में पूजा होती है. राजा की अपने देश में पूजा होती है. लेकिन विद्वान की हर जगह पूजा होती है।*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


रविवार, १४ नोव्हेंबर, २०२१

ओळख शास्त्रज्ञांची

 https://docs.google.com/forms/d/1ySnz0eQG26Yne5r2WfXlIPX7sHce-bJL6pVZzk4D0AA/edit

14/11/2021सायन्स एका अपो

 💠 🅢🅒🅘🅔🅝🅒🅔 🅔🅧🅟🅞💠


 आजचे शास्त्रज्ञ ):-  विजय भाटकर 


आज दिनांक )- 14/11/2021 वार रविवार 



𝑫𝒂𝒕𝒆::-14/11/2021

Sunday 

 

 सप्ताह क्रमांक 16


🔬उद्दिष्ट :

1) विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे.

2)  सृजनशील विकास. 

3)  गणित /विज्ञानाचा प्रसार व प्रचार.

4) स्पर्धा परिक्षा तयारी करून घेणे..🔬

-------------------------------------🔆 आमचे प्रेरणास्थान  🔆

मा *. श्रीकृष्ण पांचाळ* 

 _(मुख्यकार्यपालन अधिकारी )

जिल्हा परिषद, यवतमाळ_ 

------------------------------------

💠आमचे प्रेरणास्थान  💠

मा. *रविंद्र रमतकर* (संचालक) 

प्रादेशिक विद्या प्राधिकरण 

राज्य विज्ञान शिक्षण संस्था, नागपूर 

-------------------------------------

     ✳️आमचे मार्गदर्शक✳️


    मा. डॉ. *रेखा महाजन* 

           प्राचार्या 

DIET  यवतमाळ 

-------------------------------------

    🔰आमचे मार्गदर्शक 🔰


    मा. श्री. *प्रमोद सूर्यवंशी* 

शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जि. प. यवतमाळ 

-------------------------------------

जास्तीत जास्तं विद्यार्थी पर्यंत पोहचवण्यासाठी शेअर करा हि विनंती आहे. 

-------------------------------------

खालील निळ्या रंगाची लिंक टच करून शैक्षणिक व्हिडिओ बघु शकता. ⬇️

-------------------------------------

https://docs.google.com/forms/d/1WfDXeeMOT1SXOuqHr6-Trz60OE23cgKmjJbeOzxNAQ0/edit

-------------------------------------


         🌷निर्मिती 🌷

          *गजानन गोपेवाड* 

~जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक डिजिटल शाळा मुडाणा. पं. स. महागांव. जि.              यवतमाळ~

      ( मो, 7378670283)

      

   🙏₮Ⱨ₳₦₭₴ 🙏

गुरुवार, ११ नोव्हेंबर, २०२१

डॉ. सलीम अली पक्षीशास्त्रज्ञ

 *🦚🦚🦚डाॅ. सलिम अली🦚🦚🦚*

🦅🦉🦇🦆🦃🦚🦜🦢🦩🕊️🐥

*🦜🦩🦢🕊️पक्षीशास्त्रज्ञ🕊️🦢🦩🦜*

🦅🦉🦇🦆🦃🦚🦜🦢🦩🕊️🐥

*जन्मदिन - १२ नोव्हेंबर १९०४*      


डॉ सलिम अली  (सलिम मोईझुद्दीन अली)

     जन्म १२ नोव्हेंबर १८९६

      मृत्यू - २७ जुलै १९८७    भारतातील आद्य पक्षिशास्त्रज्ञ  तसेच भारताचे आद्य पर्यावरणवादी होते. सलिम अली यांनी ब्रिटिश राजमधील काळात भारतातील पक्ष्यांचा मोठ्या प्रमाणावर अभ्यास केला. पक्ष्यांचा आढळ, त्यांच्या सवयी, विविध प्रकारच्या जाती, जातींमधील विविधता यांचा बारकाईने अभ्यास केला. त्यांच्या                                                                                                                                                                                                    सवयी, विविध प्रकारच्या जाती, जातींमधील विविधता यांचा बारकाईने अभ्यास केला. त्यांच्या ह्या कार्याने भारतात *हौशी पक्षीनिरिक्षक* बनण्याची परंपरा चालू झाली. *भारतात पक्षी निरिक्षक सलिम अली यांना आद्य गुरु मानतात*.

आपल्या आत्मचरित्रात डॉ. अली आपण पक्षीनिरिक्षणास कसे वळलो याचे वर्णन करतात. जुन्या मुंबईच्या खेतवाडी मध्ये मुस्लिम कुटुंबात अली यांचा जन्म झाला. लहानपणी भेटवस्तू म्हणून दिलेल्या छ-याच्या बंदूकीने लहान पक्षी टिपायचे हा त्यांचा छंद होता. एके दिवशी टिपलेल्या चिमण्यांमध्ये त्यांना वेगळी चिमणी मिळाली. हिच्या गळ्यापाशी पिवळा ठिपका होता. नेहेमी पेक्षा वेगळा दिसल्याने त्यांची उत्सुकता चाळवली व त्यांच्या मामांकडे हा पक्षी कोणता याची विचारणी केली. मामांनी सरळ त्याला बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीच्या 

( *BNHS* ) 

संचालकाकडे घेउन गेले. तेथे संचालकांनी लहान अलीला हा कोणता पक्षी आहे हे सविस्तर सांगितले. तसेच भुसा भरलेल्या पक्ष्यांचा संग्रह दाखवला. भारावलेल्या लहान सलिम अलींना पक्ष्यांची जी भुरळ पडली ती कायमचीच.

यानंतरच्या काळात सलिम अलींचा पक्षिछंद त्यांची टिपणे व नोंदी करणे यात मर्यादीत राहिला. शालेय शिक्षणानंतर त्यांना प्राणी शास्त्रात पदवी घ्यायची होती परंतु शास्त्रातील अनेक अवघड विषयांमुळे माघार घ्यावी लागली. दरम्यान ते ब्रम्हदेशातील आपल्या बंधूंच्या धंद्याला मदत म्हणून रंगूनला गेले. तेथे धंद्यात मदतीसोबत ब्रम्हदेशातील जंगले फिरुन पक्ष्यांना टिपून नोंदी ठेवायचा छंद चालू ठेवला. १९१८ मध्ये त्यांचा *तेहमिना यांच्यांशी विवाह झाला.  एका यशस्वी पुरुषामागे पत्नीचा हात असतो ही म्हण सलिम अलींच्या बाबतीत तंतोतंत लागू होते. १९२४ मध्ये रंगून मधील धंद्यात अपयश आल्यानंतर अली भारतात परत आले. दरम्यान तेहमिना यांनी सलिम अलींचा पक्ष्यांबद्दलचा कल जाणून घेतला होता व त्यांना अशी नोकरी करण्यास प्रोत्साहन दिले ज्यात त्यांचा छंद जोपासला जाईल. परंतु सलिम अलींचे शिक्षण अशी नोकरी मिळवण्यास एकदम जुजबी होते. जवळच्या ओळखीने त्यांना बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीमध्ये गाईड लेक्चररची नोकरी मिळाली परंतु अलींना ते पुरेसे नव्हते. त्यावेळेस भारतात *पक्षीशास्त्र* (ornithology) हा विषय अस्तित्वातच नव्हता. यासाठी त्यांनी जर्मनीमध्ये जाऊन पक्षीशास्त्रावर प्रशिक्षण घेतले व काही काळ इंग्लंडमध्ये काम केले.

भारतात आल्यानंतर या विषयात नोकरी मिळणे कठीण काम होते. सलीम अली अजूनही हौशी पक्षी निरिक्षकांमध्येच गणले जात. आर्थिक परिस्थिती खालावल्याने त्यांनी आपल्या पत्नीच्या मदतीने अलिबागजवळ किहीम येथे आपला मुक्काम हलवला. या मुक्कामात त्यांनी सुगरण पक्ष्याच्या वर्तनावर अतिशय बारकाईने अभ्यास केला व त्यावर *BNHS* च्या जर्नलमध्ये प्रदीर्घ शोधनिबंध लिहीला. या निंबधाने त्यांना पक्षीशास्त्रज्ञ म्हणून नावलौकिक मिळवून दिला. तसेच केवळ टिपून भुसा भरुन संग्रहालयात ठेवण्यापुरते पक्षीशास्त्र नाही हे त्यांनी जगाला दाखवून दिले व एकूणच पक्षीशास्त्राला वेगळी दिशा दिली.

या नंतर १९३० च्या सुरुवातीला सलीम अलींना ब्रिटीश सरकार तसेच विविध संस्थाने पुरस्कृत पक्षी मोहिमांवर बोलवणे येऊ लागली. अलींनी या मोहिमांवर आपण नोंदी तसेच पक्ष्यांचा जीवनशैलींवर अभ्यास करणार असल्याचे स्पष्ट केले, केवळ पक्षी टिपून नोंदी ठेवण्यात आपल्याला रस नाही ते काम कोणीही स्थानिक कामगार करु शकेल असे स्पष्ट केले.

आता अली सर्वमान्य पक्षी शास्त्रज्ञ झाल्यामुळे तत्कालिन ब्रिटिश अधिका-यांनी मंजूरी दिली व सलीम अलींचे खरेखुरे पक्ष्यांचे काम सुरु झाले. या नंतरच्या काळात भारताच्या मोठ्या भूभागावर त्यांनी पक्षी निरिक्षण मोहिमा आखल्या. वायव्य सरहद्दीपासून ते केरळच्या जंगलांपर्यंत तसेच कच्छच्या दलदली पासून पुर्वेकडे सिक्कीम व अरुणाचलपर्यंत त्यांनी पक्ष्यांच्या नोंदी केल्या. त्यांचे वर्तन, हवामानानुसार होणारे त्यांचे बदल, स्थलांतराच्या सवयी, विणीचे हंगाम यावर मोठ्या प्रमाणावर माहिती गोळा केली.

सुरुवातीला या कामी त्यांची पत्नी तेहमीनाने खूप मदत केली. त्याच सलीम अलींच्या मोहिमांचे प्रोजेक्ट मॅनेजमेंट बघत. १९३९ मध्ये तेहमिनांचा मृत्यु झाल्यानंतर अली खुपच व्यथित झाले व त्यांच्या आयुष्यात खुप मोठी पोकळी निर्माण झाली. परंतु त्यातून सावरुन पुन्हा लग्न न करता त्यांनी आपले आयुष्य संपूर्णपणे पक्ष्यांना वाहून देण्याचे ठरवले. आपला मुक्काम मुंबईला बहिणीच्या घरी हलवला व तेथूनच आपले उर्वरित आयुष्य घालवून भारतीय पक्षीशास्त्रासाठी अजरामर ठेवा निर्माण केला.

*सलीम अलींचे पक्षी शास्त्रज्ञ म्हणून मोठेपण कशात आहे तर त्यांनी प्रकाशित केलेली पुस्तके.*

भारतभर फिरुन त्यांनी जी तपशीलवार माहिती गोळा केली होती, त्यांचे त्यांनी केवळ रेकॉर्डसमध्ये स्थान न ठेवता ती माहिती सर्व सामान्यांना वापरता येईल अश्या शैलित पुस्तके लिहिली.

सुरुवातीच्या काळात त्यांचे लिखाण सुधारण्यातही त्यांना तेहमिनांनी मदत केली.

१९४३ मध्ये लिहिलेले द बुक ऑफ इंडियन बर्डस हे आजही पक्षी ओळखण्यासाठी पहिल्या पसंतीचे आहे. आज हे पुस्तक १३व्या आवृतीत असून पुस्तकातील मुख्यत्वे पक्ष्यांची चित्रे बदलण्यात आली आहेत. या वरुन त्यांनी केलेल्या सूक्ष्म निरिक्षणांची अचूकता लक्षात येते.

त्यांनी लिहीलेल्या *हँडबुक ऑफ इंडिया अँन्ड पाकिस्तान व पिक्टोरियल गाईड या दहा खंडीय पुस्तकाने त्यांना खर्या अर्थाने अजरामर केले.* डॉ सिडने डिलन रिप्ली यांच्या साथीत त्यांनी अपार परिश्रम घेउन भारतीय पक्ष्यांच्या १२०० जाती, २१०० उपजातींच्या नोंदी, सवयी, शास्त्रशुद्ध सर्वांगीण माहिती चित्रांसहीत एकाच ठिकाणी उपलब्ध केली.

१९५० व ६० च्या दशकात जेव्हा भारतात *पर्यावरण* हा शब्द अस्तित्वातच नव्हता त्यावेळेस भरतपूरच्या केवलदेव घाना राष्ट्रीय उद्यान तसेच केरळमधील सायलंट व्हॅली राष्ट्रीय उद्यानात तत्कालिन होणारे पर्यावरणास हानीकारक प्रकल्पांना विरोध दर्शावला. त्यांनी केलेल्या शास्त्रीय वादावर सरकारने नमते घेऊन इंदिरा गांधी सरकारने हे प्रकल्प स्थगित केले. तसेच अंततः त्यांना राष्ट्रीय उद्यानांचा दर्जा देऊन कायमचे संरक्षित केले. तसेच अनेक दुर्मिळ प्राणी व पक यांबाबत आपल्या पुस्तकांद्वारे, संस्थेद्वारेशिष्यांमार्फत सरकार तसेच सामान्य नागरिकात केलेले प्रबोधन भारतात पर्यावरचळवळीचा पाया ठरले. त्यामुळेच भारतातील आद्य पर्यावरणवाद्यांमध्ये डॉ अली यांचा समावेश होतो..!

🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

संकलन -)गजानन गोपेवाड  

उमरखेड जिल्हा - यवतमाळ ४४५२०६



प्रभात दर्शन

 🌳⛳ *शुभ प्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

कार्तिक मास,शुक्ल पक्ष, *नवमी*,धनिष्ठा नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,हेमन्त ऋतु,युगाब्द ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

शुक्रवार, १२ नोव्हेंबर २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                         *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


मृगा मृगैः संगमुपव्रजन्ति 

              गावश्च गोभिस्तुरगास्तुरंगैः,

मूर्खाश्च मूर्खैः सुधयः सुधीभिः

              समानशीलव्यसनेषु सख्यं॥


*भावार्थ - मृगों के साथ मृग, गायों के साथ गाय, घोड़ों के साथ घोड़े, मूर्खों के साथ मुर्ख और बुद्धिमानों के साथ बुद्धिमान रहते हैं। अर्थात समान आचरण और आदतों वालों में ही मित्रता सहज होती है।"*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


बुधवार, १० नोव्हेंबर, २०२१

10 शिवप्रताप दिवस

 

*संकटात संधी शोधली !आणि....अफजलखानाचा वध झाला.*

10 नोव्हेंबर  1659
आज या प्रसंगाला 362 वर्षे  झाले तरी या प्रसंगाची उत्सुकता  आजही कायम आहे.
छत्रपती  शिवाजी महाराजांनी स्वराज्याची  मुर्हतमेढ रोवल्यानंतर पहिले मोठे संकट आले ते म्हणजे  अफजलखानाचे ! अफजलखान  हा विजापूर दरबारातील मातब्बर सरदार ... त्यांची दहशत मोठी होती.  दख्खनच्या पठारावरील सर्वात मोठा योध्दा , ज्याला सिलोनचा [श्रीलंका] अधिपती घाबरत असे. तो स्वतःला  बुतशिकन आणि  कुफ्रशिकन  म्हणजे  मूर्ती  आणि  मूर्तिपूजेचा विध्वंस करणारा असे स्वतःला म्हणवून घेत असे. विजापूर दरबाराने शिवरायांच्या स्वराज्याला पायबंद घालण्यासाठी अफजलखानाला ३५००० हजारांची फौज देऊन महाराष्ट्रात  पाठवले.याबाबत आदिलशाही दरबारातील समकालीन इतिहासकार  नेरुल्ला आपल्या  "तारीखे अली " पुस्तकात  स्पष्ट  म्हणतो की , खानाला निरोप  देताना आदिलशाहने  स्पष्ट  सांगितले  होते की,  शिवरायांशी तह न करता ," त्यांच्या जीवनरुपी धान्याच्या राशीवर मृत्यूरुपी अग्नीचा वर्षाव करणे. " यावरुन खानाचा हेतू शिवरायांना  ठार मारण्याचाच होता हे स्पष्ट  होते. शिवराय त्यावेळी राजगडावर होते.*जिहादी आतंकवाद असा संपवा*


मंगळवार, ९ नोव्हेंबर, २०२१

शिवप्रताप दिवस

 शिवप्रताप दिन...गाथा शौर्याची...

१० नोव्हेंबर...शिवप्रताप दिन..!!

संकटाच संधीत रूपांतर करून ऊत्कर्ष कसा साधायचा याचा मुलमंत्र शिवरायांनी दिला...

अशा या विश्ववंद्य छत्रपती शिवरायांना शिवप्रताप दिनी मानाचा मुजरा ...!!

अफजलखानाविरूद्धच्या प्रतापगड रणसंग्रामात तलवार गाजवणाऱ्या दहा शिवराजरक्षक योद्ध्यांचा गौरव करताना कवी परमानंद आपल्या शिवभारतपुराणात लिहीतात...

तदा संभः कावुकीयःकाट्कश्वेंगालसंभवः ।

कुंडजिच्च यशोजिच्च द्वाविमौ कंकवंशजौ ।।

गोकपाटान्वयः कृष्णः शूरजित् कांटकोपि~च ।

तथैव माहिलो जीवो विश्वजिच्च मुरूंबकः ।।

संभः करवरस्तद्वदिभरामोपि बर्बरः ।

एते दश महावीराः शिवराजाभिरक्षिण ।।

कृतश्वेडारवाः कोषनिष्कासितमहासयः ।

प्रत्यगृह्रन्त तांस्तत्न पवनानिव पर्वताः ।।

अर्थात :

संभाजी कावजी, काताजी इंगळे, कोंडाजी व येसाजी हे दोन कंक, कृष्णाजी गायकवाड, सुरजी कांटके, त्याचप्रमाणे जिवा महाला, विसाजी मुरंबक, संभाजी करवर व इभ्राहम शिद्दी(बर्बर) अशा ह्या शिवराजरक्षक दहा वीरांनी गर्जना करून, म्यानातून प्रचंड तलवार उपसून, पर्वतांनी जसे वायूस आडवावे तसा त्यांना (खानाच्या योद्ध्यांस) विरोध केला..

प्रतापगडच्या रणसंग्रामात शिवरायांचे रक्षण करणाऱ्या ह्या महान समशेरबहद्दरांना मानाचा मुजरा....

जय जिजाऊ ...जय शिवराय..!!

⛳⛳⛳⛳

――――――――――――

#शिवप्रतापदिन #_10_नोव्हेंबर

#शिवप्रतापदिन...


प्रभात दर्शन

 🌳⛳ *शुभ प्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

कार्तिक मास,शुक्ल पक्ष, *षष्ठी*,उ.षा.नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,हेमन्त ऋतु,युगाब्द ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

बुधवार, १० नोव्हेंबर २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                         *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


        *"एक मुर्ख व्यक्ति को समझाना सरल है, एक बुद्धिमान व्यक्ति को समझाना उससे भी सरल है, लेकिन एक अधूरे ज्ञान से भरे व्यक्ति को भगवान ब्रह्मा भी नहीं समझा सकते, क्यूंकि अधूरा ज्ञान मनुष्य को घमंडी और तर्क के प्रति अँधा बना देता है।"*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


ध्यान साधना

 *राग काटकसरीने कसा वापराल ?* 

*रागातल्या ऊर्जेचा सकारात्मक वापर कसा करावा ?*


मी चुकतोय.... हे कळणे म्हणजे आपोआपच पुढची चूक टाळणे.


*मी तर म्हणेन, दाग अच्छे है*, च्या धर्तीवर राग चांगला असतो, असे म्हणणे योग्य ठरेल.


*उदा*. आपल्याला कचर्‍याचा राग येतो, म्हणून तर आपण स्वच्छता ठेवतो, आपल्याला गरिबीचा तिटकारा असतो म्हणून आपण रोज कामावर जातो, लोकांनी केलेल्या अपमानाचा आपल्याला राग येतो म्हणून तर, इच्छा असो वा नसो, आपण आपलं काम चोखपणे पार पाडतो!


*राग ही एक उर्जा आहे, आपल्यालाही राग येतो आणि असामान्य लोकांनाही राग येतो, पण ते लोक आपल्या रागातून निर्माण झालेल्या उर्जा व्यर्थ घालवत नाहीत, तिचा सकारात्मक वापर करुन विश्व बदलून टाकतात.*


*मार्टीन ल्युथर किंगला* राग आला आणि त्याने अमेरीकाच बदलून टाकली.


*नेल्सन मंडेलाला* कृष्णवर्णीयांवर होणार्‍या अन्यायाची चीड आली आणि त्याने अफ्रिका हादरुन टाकली.


 *शिवाजी महाराजांनी* केलं, *आंबेडकरांनी* तेच केलं. त्यांनी आपला राग एकदाच व्यक्त होवून शांत होऊ दिला नाही, तो निखारा त्यांनी आपल्या हृदयात सतत पेटता ठेवला, आणि शेवटच्या श्वासापर्यंत त्यातून मिळलेलं इंधन आपल्या स्वप्नपूर्तीसाठी वापरलं!..


ते जे करु शकतात ते आपणही करु शकतो की!


*फालतू गोष्टींवर रागराग करुन आपली बहुमूल्य उर्जा वाया घालवण्यापेक्षा तिचं रुपांतर तीव्र इच्छाशक्तीमध्ये करायला शिकणं, हीच खरी आनंदाची आणि यशाची गुरुकिल्ली आहे.*


जिथं राग येतो अशा परिस्थितीला हाताळण्यासाठी काही टिप्स देत आहे.


१) *स्विकार करा.*

समजा, तुम्ही कॉम्पुटरवर खूप महत्वाचं काम करत आहात, आणि लाईटस गेले, आता तुम्ही चिडचिड करुन काही फायदा आहे का? शिव्या देऊन, डोकं खराब केल्याने फायदा काहीच होणार नाही, झालं तर नुकसानच होईल, म्हणुन ‘लाईट गेली’, याचा स्विकार करा, आणि दुसरे एखादे काम शोधा, त्यात रममाण व्हा!, त्याचा आनंद घ्या!


असचं समजा, तुम्ही ट्रॅफीक जॅममध्ये अडकला आहात, मग आता किरकिर करुन कर्कश हॉर्न वाजवुन, आजुबाजूच्यांशी भांडून काय साध्य होणारे? त्यापेक्षा कारमध्ये मस्त गाणे लावा, आणि आनंद घ्या!


२) *स्वतःला दररोज सुधारा. सिद्ध करा.*

कोणी तुमची चुक नसताना अपमान केला, फसवले किंवा भांडले तर त्यावर जास्त विचार करुन वेळ वाया घालवणं, म्हणजे मुर्खपणा आहे, नको त्या आठवणी कुरवाळत बसायचे नसते, त्या विसरायच्या असतात पण त्यातून कमवलेला अनुभव, मिळालेला धडा मात्र आयुष्यभर आपोआप लक्षात ठेवायचा.


३) *चुप्प बसा. विसरा.*

कधी कधी आपल्याला दुखावणारे आपलेच लोक असतात, अशा लोकांना जबर प्रत्युत्तर देऊन आपणच घायाळ होतो, अशा जखमा होतात, ज्या भरण्यासाठी आयुष्य जावे लागते. म्हणून अशा वेळी मौन पाळणे सोयीस्कर ठरते.


आईवडील, भाऊ बहीण, बायकोमुले, जिवलग मित्र, जवळचे नातेवाईक, कर्मचारी, सहकारी, भागीदार, ग्राहक यांच्याशी लढाई करुन आपण जिंकलो तरी त्या युद्धात आपलेचं लोक हरलेले असतात, आपल्या शब्दांनी रक्तबंबाळ झालेले असतात.


अशा विजयश्रीचा आनंद साजरा तरी कसा करावा?


म्हणून काही ठिकाणी गप्प राहणं, तिथून निघून जाणं आणि मौन पाळणं, श्रेष्ठ असतं!


४) *आभार मानून आनंदी व्हा!*

ज्या व्यक्तिचा राग येतोय, त्याच्यात काही चांगले गुणसुद्धा आहेत, त्याने कधी तुम्हाला मदत सुद्धा केलीय, ते आठवून त्याचे आभार माना. राग पळून जाईल.


५) *हसा!*

कितीही वाईट परिस्थीती असो, त्याकडे पाहून हसा, विनोद करा, खळखळून हसा, मजा घ्या, दुःखाची तिव्रता नाहिशी होईल!


*ठरवा रागाचा वापर कशासाठी करायचा.*


*आपला प्रत्येक दिवस आनंदात जावो हीच सदिच्छा*

10 नोव्हेंबर जागतिक विज्ञान दिवस

 *🔭🔬१० नोव्हेंबर 🔬🔭*

🔬⚗️🔭🔬⚗️🔭🔬⚗️🔭🔬

*जागतिक विज्ञान दिवस*

🔬⚗️🔭🔬⚗️🔭🔬⚗️🔭🔬

१० नोव्हेंबर, या दिवशी जगातील शांतता आणि विकास या विषयावर जागतिक विज्ञान दिन साजरा केला जातो.हा दिवस समाजात विज्ञानाची महत्त्वपूर्ण भूमिका आणि उदयोन्मुख वैज्ञानिक समस्यांवर सार्वजनिक चर्चा करण्याची गरज ह्यावर भर देतो.


ह्या दिवसाचा हेतू नागरिकांना विज्ञान मध्ये विकासाविषयी माहिती दिली असल्याचे सुनिश्चित करण्याचा आहे. हा दृष्टिकोन वाढवण्यासाठी वैज्ञानिक भूमिका बजावतात ती भूमिका लोकांसमोर आणायला हा दिवस साजरा केला जातो.


*शांती आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिन उद्देश*


• शांततापूर्ण आणि टिकाऊ समाजासाठी विज्ञानाच्या भूमिकेवर जन जागरूकता बळकट करणे

• देशांमधील सामायिक विज्ञानांसाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय एकता वाढवणे

• समाजाच्या फायद्यासाठी विज्ञान वापरण्यासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बांधिलकीचे नूतनीकरण करणे

• विज्ञानासमोर आलेल्या आव्हानांवर लक्ष केंद्रित करणे आणि वैज्ञानिक प्रयत्नांना आधार देणे


या दिनाची सुरुवात

१९९९ साली यूनेस्को आणि बुडापेस्टमधील आंतरराष्ट्रीय परिषदेच्या विज्ञान संघटनेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विज्ञान परिषदेच्या पाठोपाठ शांती व विकासासाठी जागतिक विज्ञान दिवस तयार करण्यात आला.

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

संकलन -)

गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा - यवतमाळ ४४५२०६


सोमवार, ८ नोव्हेंबर, २०२१

अध्यात्म ध्यान साधना

प्रसिद्ध खगोल, रसायनशास्त्रज्ञ कार्ल सेगन

 



*🎇🌠🎆कार्ल सेगन🎆🌠🎇*

⚗️⚗️⚗️⚗️⚗️⚗️⚗️⚗️⚗️⚗️

*प्रसिद्ध खगोलशास्त्री और खगोल रसायनशास्त्री*

🔬🔬🔬🔬🔬🔬🔬🔬🔬🔬

*जन्मदिन - ९ नवम्बर १९३४*

 🔭🔭🔭🔭🔭🔭🔭🔭🔭🔭

कार्ल सेगन -)

      *०९ नवम्बर १९३४*

        २० दिसम्बर १९९६

प्रसिद्ध खगोलशास्त्री और खगोल रसायनशास्त्री थे जिन्होंने खगोल शास्त्र, खगोल भौतिकी और खगोल रसायनशास्त्र को लोकप्रिय बनाया। इन्होंने पृथ्वी से इतर ब्रह्माण्ड में जीवन की खोज करने के लिए सेटी नामक संस्था की स्थापना भी की।

इन्होंने अनेक विज्ञान संबंधी पुस्तकें भी लिखी हैं। ये १९८० के बहुदर्शित टेलिविजन कार्यक्रम कॉसमॉस: ए पर्सनल वॉयेज (ब्रह्माण्ड: एक निजी यात्रा) के प्रस्तुतकर्ता भी थे। इन्होंने इस कार्यक्रम पर आधारित कॉसमॉस नामक पुस्तक भी लिखी। अपने जीवनकाल में सेगन ने ६०० से भी अधिक वैज्ञानिक शोधपत्र और लोकप्रिय लेख लिखे और २० से अधिक पुस्तकें लिखी। अपनी कृतियों में ये अकसर मानवता, वैज्ञानिक पद्धति और संशयी अनुसंधान पर जोर देते थे।


🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

संकलन -)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६


प्रभात दर्शन

 🌳⛳ *शुभ प्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

कार्तिक मास,शुक्ल पक्ष, *पँचमी*,पू.षा. नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,हेमन्त ऋतु,युगाब्द ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

मंगलवार, ०९ नोव्हेंबर २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                        *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


        *"हमारा सामना निरन्तर बडे-बडे अवसरों से होता रहता है, जो चालाकी पूर्वक असाध्य लगने वाली विकट समस्याओं के वेष में छिपे रहते हैं। स्मरण रहे कि संकट के समय ही नायक बनाये जाते हैं, किन्तु जो प्रमादी है, वह सुयोग गँवा देता है।*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfdrBZzyvJLva78wmk4hHZ9HOFNerBXH4Zum6x4DRwOfxzrLQ/viewform

 https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfdrBZzyvJLva78wmk4hHZ9HOFNerBXH4Zum6x4DRwOfxzrLQ/viewform

 



 

प्रश्न मंजुषा निर्मिती गजानन गोपेवाड

 https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfdrBZzyvJLva78wmk4hHZ9HOFNerBXH4Zum6x4DRwOfxzrLQ/viewform

Featured Post

व्यायाम व योगा अवश्य करावा*

*व्यायाम व योगा अवश्य करावा*  *व्यायाम व योगा करण्याचे दहा फायदे:-*  1) व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते: व्यायाम करणारी...