गुरुवार, १९ ऑगस्ट, २०२१

विमान संशोधन राईट बंधु यांचा जन्मदिवस

 *************************************

🛬🛫🛬🛫🛬🛫🛬🛫🛬🛫🛬

*१९ ऑगस्ट - विमान संशोधक राईट बंन्धू मे से एक ऑर्विल राईट का जन्मदिन*

*************************************

✈️✈️✈️✈️✈️✈️✈️✈️✈️✈️✈️

*विल्बर राईट* 

जन्म -) १६ एप्रिल १८६७


मृत्यू -) ३० मे १९१२

🛩️🛩️🛩️🛩️🛩️🛩️🛩️🛩️🛩️🛩️🛩️

*ऑर्विल राईट* 


  *जन्म -) १९ आॕगस्ट १८७१*


  मृत्यू -) ३० जानेवारी १९४८


ऑर्विल राईट और विल्बर राईट को राईट बंधू कहा जाता है जो सयुंक्त राज्य अमेरिका के रहने वाले थे। इन्हें हवाई जहाज का अविष्कारक कहा जाता है। राईट बंधुओ ने १७ दिसम्बर १९०३ को हवा में भारी विमान को कुछ समय तक उड़ाकर इतिहास रचा दिया।


विल्बर राईट का जन्म १६ अप्रैल १८६७ और ऑर्विल राईट का १९ अगस्त १८७१ को डॉयटन मे हुआ।


इनके पिता बिशप मिल्टन राईट इनके लिए तरह तरह के खिलौने लाते थे। एक बार वे मशीनी हेलीकाप्टर लेकर आये, जिसे देखकर राईट बन्धु बहुत प्रभावित हुए। कुछ समय ऑर्विल ने पतंग बनाने का काम किया और उडन मशीन बनाने के बारे में सोचने लगे। उन्होंने अपना एक अख़बार निकाला और इसी दौरान ऑर्विल ने अपनी डिजाईन की एक प्रिंटिंग प्रेस बना डाली।


सन १८९२ में अमेरिका में साइकिल बहुत लोकप्रिय थी। राईट बन्धु स्वयं अच्छे चालक और मैकेनिक भि थे। उन्होंने साइकिल के धंधे में हाथ आजमाने की सोची और आर्डर पर खुद साइकिल बनाकर बेचने लगे। उनकी साइकिल ब्रैंड 'वैन क्लीव', 'राईट स्पेशल' और 'सेंट क्लेयर' नाम से खूब बिकी और सपने साकार करने के लिए उन्होंने पर्याप्त धन इकठ्ठा कर लिया।


इसके बाद वे पक्षी उड़ान, ग्लाइडिंग इत्यादि पर अध्ययन करने लगे। उन्होंने हवाई जहाज के कई डिजाईन भी बनाये। १७ दिसम्बर १९०३ को ऑर्विल ठीक १० बजकर ३५ मिनट पर सुबह अपने बनाये वायुयान में सवार हुए। उन्होंने १२ सैकंड तक उसे उड़ाया और १२० फीट की दूरी तय की। उसी दिन चौथी टेस्ट लाइट में विल्बर ५९ सैकंड तक हवा में रहे और उन्होंने ८५२ फीट की दूरी तय की।


राईट बंधुओ ने अपने प्रयोग जारी रखे और राईट कम्पनी की स्थापना की। ३० मई १९१२ को विल्बर की मृत्यु हो गई। अपनी विरासत को आगे बढाते हुए ऑर्विल ने उड़ान व्यवसाय लगा दिए। १९१६ में उन्होंने अपनी राईट कम्पनी बेच दी और स्वयं को वायुयान से जुड़े अविष्कारों में लगा दिया, जिनसे उन्हें पहचान मिली थी। उन्होंने एक एयरोनाटिक लैब भी स्थापित की। ऑर्विल राईट National Advisory Committee for aeronautics के संस्थापक सदस्य थे। उन्होंने २८ साल तक वहा नौकरी की। सन १९५८ में NACA का नाम बदलकर NASA (National Aeronautics and Space Agency) कर दिया गया।


वैज्ञानिकी के क्षेत्र में उल्लेखनीय कार्य के लिए ऑरविल को अनेक पुरुस्कार मिले। प्रथम डेनिएल गुगेनहेम मेडल उन्हें ०८ अप्रैल १९३० को दिया गया। राईट बंधुओ को वैज्ञानिक जगत सदा उनका आभारी रहेगा। वे डॉयटन, ओहियो के जिस घर में रहे उसका डिजाईन भी दोनों भाइयो ने मिलकर तैयार किया था, लेकिन दुर्भाग्य से उसके पूरा होने से पहले ही विल्बर की मृत्यु हो गयी। इसी घर में ३० जनवरी १९४८ को ऑर्विल राईट ने अंतिम सांस ली।

🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

संकलन -)

गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

**********************

गाथा बलिदानाची

 ➿➿➿➿➿➿➿➿➿➿

*🇮🇳🇮🇳गाथा बलिदानाची🇮🇳🇮🇳*

➿➿➿➿➿➿➿➿➿➿

           *डाॕ. शंकर दयाळ शर्मा*


      (भारताचे नववे राष्ट्रपती)

            *कार्य काल*

२५ जुलै १९९२–२५ जुलै १९९७


पूर्ववर्ती : रामस्वामी वेंकटरमण

उत्तरावर्ती : कोच्चेरी रामण 

                  नारायणन


*जन्म :-)  १९ आॕगष्ट १९१८*

        (भोपाल, मध्यप्रदेश, भारत)


*मृत्यु :-)  २६ दिसंबर १९९९*

           (नई दिल्ली, भारत)


राजनितिक पार्टी : भारतीय राष्ट्रीय कांग्रेस

वडिल : खुशीलाल शर्मा

आई : सुभद्रा शर्मा

पत्नी : विमला शर्मा

धर्म : हिन्दू


डाॕ. शंकर दयाळ शर्मा यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून ३ एप्रिल १९८६ रोजी पदग्रहण केले. डॉ.शंकर दयाळ शर्मा यांचा जन्म दि. १९ ऑगस्ट १९१८ रोजी भोपाळ येथे श्री. खुशीलाल शर्मा आणि श्रीमती सुभद्रा शर्मा यांच्या पोटी झाला.दि. ०७ मे १९५० रोजी श्रीमती विमला शर्मा (विमलाजी) यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यांना दोन मुले व दोन मुली अशी अपत्य प्राप्ती झाली. एका मुलीचा १९८५ मध्ये मृत्यू झाला.

          डॉ.शंकर दयाळ शर्मा यांनी सेंट जॉर्ज कॉलेज, आग्रा, अलाहाबाद विद्यापीठ, लखनऊ विद्यापीठ, फिट्झविल्यम कॉलेज, केंब्रिज विद्यापीठ, हार्वर्ड लॉ स्कूल, झ्यूरीच विद्यापीठ, पॅरिस विद्यापीठ, लंडन विद्यापीठ आणि लिंकन इन ( कायदा विद्यालय ) येथे शिक्षण घेतले.

           त्यांनी इंग्रजी वाङमय, हिंदी आणि संस्कृत या विषयांमध्ये एम.ए. ची पदवी घेतली आणि विद्यापीठातून पहिले आले. त्यांनी आपली एल.एल.एम. ची पदवी लखनऊ विद्यापीठातून मिळविली आणि पुन्हा एकदा विद्यापीठातून पहिले आले. त्यांनी पी.एच.डी. केंब्रिज विद्यापीठातून केली आणि लंडन विद्यापीठाकडून त्यांना   "लोकप्रशासनातील पदविकेद्वारे सन्मानित करण्यात आले. डॉ.शर्मा यांनी नऊ वर्षे लखनऊ विद्यापीठात आणि नंतर केंब्रिज विद्यापीठात ( १९४६ ते १९४७) कायदा हा विषय शिकवला लिंकन इन मधून (कायदा विद्यालयातून) त्यांनी बार-अक्ट-लॉ (बॅरिस्टरची पदवी घेतली) नंतर ते हार्वर्ड लॉ स्कूलचे ( १९४७ -१९४८) सन्मान्य सदस्य बनले.

                       डॉ.शर्मा यांना सामाजिक सेवेसाठी लखनऊ विद्यापीठाने `चक्रवर्ती सुवर्ण पदक` देऊन सन्मानित केले होते. विक्रम विद्यापीठ आणि भोपाळ विद्यापीठ या दोन्ही विद्यापीठांनी त्यांना एल.एल.डी (सन्मान्य कारणाने) ही पदवी प्रदान केली. ते सागर विद्यापीठाचे प्रतिकुलपती  (१९५६-५९) देखील होते.


💎 *विशेष आवडीची क्षेत्रे*


          परराष्ट्र व्यवहार; ग्रामीण विकास; विधि; तत्त्वज्ञान, धर्म व शिक्षण यांचा तौलनिक अभ्यास. 


🏊🏻 *क्रीडा*


                    डॉ.शर्मा त्यांच्या महाविद्यालयीन आणि विद्यापीठीय कारकीर्दी दरम्यान, त्यांनी व्यायामाचे खेळ, नौकानयन आणि पोहणे या क्रीडा प्रकारांत उत्कृष्ट कामगिरी करून, क्रीडापटू म्हणून विशेष प्राविण्यही प्राप्त केले.


🎸 *आवडता विरंगुळा व मनोरंजन*

                राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय हितसंबंधांवरील विविध विषयांवर वाचन करणे आणि लिहिणे आणि भाषा, इतिहास, कला व संस्कृती, तौलनिक, धर्म, तत्त्वज्ञान, काव्य, वाङमय आणि भारतीय शास्त्रीय संगीत व पाश्चिमात्य संगीत यांचा अभ्यास.


*कारकीर्द*


          डॉ.शर्मा यांनी १९४० मध्ये लखनऊ येथे आपल्या वकिलीच्या व्यवसायास सुरूवात केली. मुरब्बी स्वातंत्र्य सैनिक असलेल्या डॉ.शर्मा यांनी स्वातंत्र्य संग्राम, भोपाळ मधील विलिनीकरण चळवळ आणि त्यानंतर १९७८ मध्ये कारावास भोगला. ते भूतपूर्व भोपाळ राज्याचे मुख्यमंत्री (एप्रिल १९५२ ते नोव्हेंबर १९५६) होते. मध्य प्रदेश सरकार मध्ये कॅबिनेट दर्जाचे मंत्री म्हणून त्यांनी शिक्षण, विधि, सार्वजनिक बांधकाम, उद्योग आणि वाणिज्य, राष्ट्रीय संसाधने आणि स्वतंत्र महसूल या विभागांचा कार्यभार सांभाळला (१९५०-१९६७) आणि त्यानंतर ते केंद्रीय दूरसंचार मंत्री (१० ऑक्टोबर १९७४ ते २४ मार्च १९७७) होते. ते, आंध्र प्रदेशाचे (२९ ऑगस्ट १९८४ ते २५ डिसेंबर १९८५) आणि पंजाबचे राज्यपाल (२६ नोव्हेंबर १९८५ ते २ एप्रिल १९८६) होते.


💁‍♂ *सार्वजनिक आयुष्य*


             डॉ.शर्मा, भोपाळ काँग्रेस समितीचे (१९५०-१९५२) अध्यक्ष; ३२ वर्षांपेक्षा जास्त काळ अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सदस्य (१९५२-१९८४); मध्य प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष (१९६७-१९६८); जवळपास २० वर्षे काँग्रेस कार्यकारी समितीचे सदस्य; भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सरचिटणीस (१९६८-१९७२) आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष (१९७२-१९७४) होते. कायदेमंडळाचा सभासद आणि संसदपटू म्हणून त्यांना ३० वर्षांहून अधिक काळ एवढा प्रदीर्घ अनुभव आहे. ते राज्य विधानमंडळाचे सदस्य (१९५२-१९७१)होते आणि त्यानंतर संसदेचे सदस्य (पाचवी लोकसभा : १९७१-१९७७ आणि सातवी लोकसभा: जानेवारी १९८० ते ऑगस्ट १९८४) होते.


*वाङमयीन आणि पत्रकारीय कर्तृत्वावर दृष्टिक्षेप*


*(अ) प्रकाशने*

१.  परराष्ट्र व्यवहारांकडे बघण्याचा  

        काँग्रेसचा दृष्टिकोन

२.  क्रांती दृष्ट

३.  इंडो - रशियन संबंध 

४.  कायद्याचे राज्य आणि 

       पोलिसांची भूमिका


*(ब) संपादकीय कामगिरी*

१. लखनऊ विधि पत्रिका 

                 (१९४१-१९४३)

२. लाईट अन्ड लर्निंग  

                  (१९४२-१९४३)

३.  ईल्म - ओ - नूर (ऊर्दू)

४.  ज्योति (हिंदी)

५.  समाजवादी भारत  

                    (१९७१-१९७४)


*(क) लेख*

                  त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये मोठ्या प्रमाणावर लेख लिहिले आहेत.


*(ङ) भाषणे*

मद्रास विद्यापीठासह इतर अनेक विद्यापीठांत त्यांनी दीक्षांत भाषणे केली आहेत, तसेच राष्ट्रीय पोलीस अकादमी, हैद्राबाद येथे दुसरे सरदार पटेल स्मृती वार्षिक व्याख्यान दिले आहे.


 ✈  *विदेश प्रवास*

ते जगभरात खूप फिरले आहेत आणि अनेक देशांना त्यांनी भेटी दिल्या आहेत. त्यात पुढील देशांचा समावेश आहे - अफगाणिस्तान, ऑस्ट्रीया, बांग्लादेश, बेल्जियम, बल्गेरिया, कॅनडा, चीन, डेन्मार्क, इजिप्त, फेडरल रिपब्लिक ऑफ जर्मनी, फिनलँड,फान्स,ग्रीस,हाँगकाँग, हॉलंड,हंगेरी,इराक,इटली, जपान,केनिया,कोरीआ,कुवेत, लक्झेंबर्ग,मलेशिया,मॉरिशस, नॉर्वे, पाकिस्तान,सिंगापूर, दक्षिण येमेन,स्वीडन,स्विझर्लंड,थायलंड, इंग्लंड,अमेरिका,रशिया.


*कायमचा पत्ता*

ई २/६६, अरेरा कॉलनी, भोपाळ, मध्य प्रदेश.


*स्वातंत्र्य वेदीवर आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या सर्व ज्ञात-अज्ञात हुतात्म्यांना विनम्र अभिवादन* 

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

संकलन -)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

प्रभात दर्शन

 🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

श्रावण मास,शुक्ल पक्ष, *द्वादशी*,पू.षा.नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,वर्षा ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

गुरुवार, १९ आॕगष्ट २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                      *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


दानं भोगो नाश: तिस्त्रो 

             गतयो भवन्ति वित्तस्य।

यो न ददाति न भुङ्क्ते 

             तस्य तॄतीया गतिर्भवति॥


भावार्थः - *"धन की तीन गति बताई गई हैं. .. दान, उपभोग तथा नाश... जो व्यक्ति दान नहीं करता एवं न ही स्वयं उसका उपभोग करता है, उसका धन नष्ट हो ही जाता है।*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

बुधवार, १८ ऑगस्ट, २०२१

ध्यान साधना

 *कशी येते मॅच्युरिटी ?*


*"परिपक्व व्यक्तिमत्व"*


*१) माणूस जेव्हा दुसऱ्यांना बदलण्याऐवजी स्वतःमध्ये बदल घडवायला सुरुवात करतो तेव्हा त्याच्याकडे मॅच्युरिटी येते.*


*२) माणूस जेव्हा जास्त बोलण्याऐवजी समोरच्याचे ऐकून घ्यायला शिकतो तेव्हा त्याच्याकडे मॅच्युरिटी येते.*


*३) माणूस त्याच्या समोरचे लोक जसे आहेत तसे त्यांना स्वीकारायला सुरुवात करतो तेव्हा त्याच्याकडे मॅच्युरिटी येते.*


*४) प्रत्येक माणसाचा एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा स्वतःचा असा विशिष्ट दृष्टिकोन असतो हे समजायला लागते तेव्हा माणसाकडे मॅच्युरिटी येते.*


*५) प्रत्येकवेळी आपणच शहाणे असल्याचा आविर्भाव आणणे माणूस जेव्हा बंद करतो तेव्हा त्याच्याकडे मॅच्युरिटी येते.*


*६) माणूस काळानुसार बदल स्विकारुन पुढे जाण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याच्याकडे मॅच्युरिटी येते.*


*७) माणूस आपल्याजवळ जे आहे त्यात आनंद मानून तक्रारी करणे बंद करतो तेव्हा त्याच्याकडे मॅच्युरिटी येते.*


*८) माणूस जेव्हा जबाबदाऱ्या घ्यायला आणि चुकांमधून पुढे जायला शिकतो, तसेच आपल्या चुकांचे खापर इतरांवर फोडणे बंद करतो तेव्हा त्याच्याकडे मॅच्युरिटी येते.*


*९) माणूस इतरांवर जळण्याऐवजी स्वतःमध्ये आनंद शोधण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याच्याकडे मॅच्युरिटी येते.*


*१०) माणूस इतरांची स्वतःसोबत तुलना बंद करतो तेव्हा त्याच्याकडे मॅच्युरिटी येते.*


*११) माणूस रागावर नियंत्रण ठेवून समजूतदारीने वागण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याच्याकडे मॅच्युरिटी येते.*


*१२) माणूस निर्णय घेतल्यानंतर चंचलपणे न वागता घेतलेल्या निर्णयाच्या बाजूने उभे राहायला शिकतो तेव्हा त्याच्याकडे मॅच्युरिटी येते.*


*परिपक्व असणे म्हणजेच प्रत्येक प्रसंगात समजूतदारीने निर्णय घेणे*


*आयुष्य खुप सुंदर आहे. तुम्हीही आनंदात जगा व दुसऱ्यालाही आनंदात जगु द्या. सर्वानी आनंदात राहा  आपला समाजातील माणसांवर जिव्हाळा कायम राहो.

संकलन,,,,,गजानन गोपेवाड *


मीठा जहर म्हणजे काय?


══════════════════════

   *📒📒📒 @ संकलन @📒📒📒*

  *श्री. गजानन गोपेवाड 

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════

📕 *'मीठा जहर' म्हणजे काय ?* 📕 


गोड बोलून विश्वासघात करणे, म्हणजे काय हे तुम्हाला माहीत आहे. अशीच एक वनस्पती आहे. जिचे मूळ गोड लागते, पण खाल्ल्यास प्राणावर बेतते. या विषाला त्यामुळेच 'मीठा जहर' असे म्हणतात. अॅकोनिटम नॅपेल्स नावाचे हे झाड हिमालयाच्या प्रदेशात आढळून येते. तसे या झाडाचे सर्वच भाग विषारी असतात; परंतु मूळ जास्त विषारी असते. मुळात अॅकोनिटीन हा अत्यंत विषारी असा घटक असतो. हे एक शोभेचे झाड आहे.


पानात वा इतर पदार्थात मिसळून हे विष खायला देतात. यामुळे ओठ, घसा, जीभ बधिर होणे, लाळ सुटणे, पोटात दुखणे, उलट्या होणे, खूप घाम येणे, चक्कर येणे, दृष्टी व वाचा यावर दुष्परिणाम होणे, हातापायातील त्राण जाणे इत्यादी लक्षणे दिसू येतात. अखेर हृदयाच्या स्नायूवर परिणाम होऊन किंवा श्वसन थांबून मृत्यू होतो. १ ग्रॅम वजनाइतके मूळ वा २५० मि.ग्रॅ. इतके अॅकोनाईट खाल्ल्यास सुमारे सहा तासात मृत्यू होतो.


वन्य प्राण्यांना मारण्यासाठी बाणाला लावायच्या विषात याचा उपयोग केला जातो. तसेच खून करण्यासाठी गुन्हेगार याचा वापर करतात. स्वस्त व सहजगत्या उपलब्ध असल्याने विषप्रयोगासाठी याचा जास्त वापर केलाजातो.


पोटात गेलेले विष टॅनिक अॅसिडचे द्रावण प्यायला देऊन वा पोटॅशियम परमॅगनेटचे द्रावण प्यायला देऊन पोटाच्या बाहेर काढतात. हृदय व श्वसनसंस्था यांचे कार्य सुरळीत चालावे, यासाठी उपचार करावे लागतात. कृत्रिम श्वसन यंत्र व प्राणवायूचा पुरवठा यांचाही उपयोग करतात. असे आहे हे 'मीठा जहर'; चवीला गोड, पण भयंकर.


*डाॅ.अंजली दिक्षित व डाॅ.जगन्नाथ दिक्षित*

*यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' पुस्तकातून*

═══════════════════════

18 आँ श्रीमंत बाजीराव पेशवे जयंती

 *श्रीमंत बाजीराव पेशवे जयंती*

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

______________🌹_______________

*जन्म   :  इ.स. १८ ऑगस्ट १७००*    

 *मृत्यू   :  इ.स. २८ एप्रिल १७४०*


         बाळाजी विश्वनाथ भट यांचा बाजीराव हा मोठा मुलगा. तर चिमाजी आप्पा धाकटा. आईचे नाव राधाबाई. बाजीरावांचे मूळ नाव विसाजी. मात्र, बाजीराव बल्लाळ व थोरला बाजीराव या नावानेही प्रसिद्ध होते. वयाच्या तेराव्या काशीबाई नावाच्या मुलीशी त्यांचा विवाह झाला (१७१३). बाजीरावांना चार मुलगे झाले. त्यांपैकी नानासाहेब व रघुनाथराव हे पुढे प्रसिद्धीस आले. दुसरी पत्नी मस्तानीस समशेर बहाद्दूर नावाचा मुलगा झाला.समशेर बहाद्दूर पुढे पानिपतच्या लढाईत (१७६१) ठार झाला.आपल्या अवघ्या २० वर्षांच्या कारकीर्दीत बाजीरावांनी ४० महत्त्वाच्या लढाया केल्या.  त्यात 

माळवा (डिसेंबर १७२३),

धर (१७२४), 

औरंगाबाद (१७२४), 

पालखेड (फेब्रुवारी १७२८),

अहमदाबाद (१७३१) 

उदयपुर (१७३६), 

फिरोजाबाद (१७३७),

दिल्ली (१७३७), 

भोपाळ (१७३८), 

वसईची लढाई (मे १७३९) या  मोठ्या लढायांचा समावेश आहे आणि विशेष म्हणजे सर्व लढायांमध्ये ते अजिंक्य ठरले.


             बाजीरावांना हरवणं त्याच्या काळातल्या शत्रूंनाही जमलं नाही.  मराठेशाहीला नर्मदेच्या पलिकडे मराठी घोडदळ नेणारा हा पहिलाच सेनापती. चारशे वर्षांच्या यवनी अंमलानंतर दक्षिणेतून जाऊन दिल्ली काबीज करणारा बाजीराव हा पहिलाच.  दिल्लीपर्यंत धडका मारून मराठ्यांचा दरारा निर्माण केलेला होता. भीमथडीची तट्टे नर्मदेपार नेल्यामुळे उत्तरेकडचे काबुली घोडे दक्षिणेत येण्याचे बंद झाले.  बाजीरांवानी उत्तरेत घुसून गुजरात, माळवा, बुंदेलखंड जिंकून नर्मदा आणि विंध्य पर्वत यातील सर्व महत्त्वाचे व्यापारी मार्ग आपल्या ताब्यात घेतले. भविष्यात महाराष्ट्रावर परकीय संकट कोसळू नये म्हणून महाराष्ट्राच्या बाहेर आपली सत्ता असायला हवी हे जाणून बाजीरावाने उत्तरेत शिंदे, होळकर, बांडे, पवार हे मराठा सरदार उभे केले. त्यामुळे ग्वाल्हेर, इंदौर, देवास आदी संस्थानं पुढे आली.


             बाजीरावांची देशभर मोठी दहशत होती. १७३९ मध्ये इराणचा बादशाह नादिरशाह याने दिल्लीवर आक्रमण केलं तेव्हा बाजीराव दिल्लीकडे निघाला. ‘बाजीराव निघालाय’ या एवढ्या बातमीनेच नादिरशाह याने दिल्ली सोडली आणि तो परतला.  पराक्रमासाठी आणि विजयासाठी ‘बाजी’ हा शब्दप्रयोग तेव्हापासून रुढ झाला असावा.   बाजीरावाने शनिवारवाडा बांधला आणि साताºयाच्या राजगादी इतकेच महत्त्व पुण्याला मिळवून दिले.


*॥ श्रीशाहूनरपति हर्षनिधान बाजीराव बल्लाळ मुख्यप्रधान॥*


अशी बाजीरावांची मुद्रा होती.


            *कुशल सेनापती*


         बाजीरावाच्या युद्धकौशल्याची जाणीव आपल्याकडे नाही. पण अमेरिकन लष्कर आजही ती जाणीव ठेवून आहे. लष्करी डावपेच आणि रणनीतीच्या अभ्यासक्रमात आजही बाजीरावाने निजाम-उल-मुल्क याच्याविरुद्धची  १७२८ मध्ये पालखेड इथे केलेली लढाई अमेरिकन सैनिकांना शिकवली जाते. त्यासाठी पालखेडचं कायमस्वरूपी मॉडेलच तयार केलं गेलेलं आहे. बाजीरावाने निजामाला पूर्ण पराभव करण्यासाठी त्याला पालखेडच्या कात्रीत कसं पकडलं याचा ‘स्ट्रॅटेजिक वॉरफेअर’च्या अभ्यासाचा भाग म्हणून आजही सांगितलं जातं. बाजीराव शत्रूला स्वत:च्या स्थळी आणून मात देत असे. मैदानात अनुकूल परिस्थिती नसेल तर वाट पाहून कसलेल्या शिकाºयाप्रमाणे हमला करायचा. कदाचित पुढील काळात या युद्धतंत्राचा विसर पडल्यामुळे ‘पानिपता’सारखा प्रसंग ओढावला.  बाजीराव हे मोठे युद्धनीतीज्ञ होते.  म्हणूनच ते अजेय राहिले. त्यांच्या कारकीर्दीतली एकही लढाई ते हरले नाही. म्हणून त्यांची तुलना नेपोलियनसारख्या युद्धनिपुण सेनापतीशी केली जाते. युद्धनीतीतील बारकावे, गनिमी कावे, शत्रूला आपल्या सोयीच्या व मोक्याच्या ठिकाणी आणून हरविणे, त्यासाठी दबा धरून बसणे, सक्षम गुप्तचर यंत्रणा वापरणे आदी तंत्र छत्रपती शिवाजीमहाराजांसारखेच वापरले असल्याचे दिसून येते. बाजीराव पराक्रमात शिवाजी महाराजांच्या बरोबरीचा होता की नाही याबाबत नक्कीच वाद नाही. शिवाजीमहाराजांच्या युद्धतंत्राचा ठसा बाजीरावांवर नक्कीच पडलेला होता.


             घोडदळ ही बाजीरावांची सर्वात मोठी ताकद होती. बाजीरावाने पायदळ आणि तोफखाना बाळगणेच सोडले होते. त्या काळाच्या लढाईचा मुख्य केंद्रबिंदू म्हणजे सशक्त घोडदळ. बाजीराव घोड्यावर लहानाचा मोठा झाला असे म्हटले तरी ते वावगे ठरणार नाही.  सहा फुट उंची असलेले बाजीराव हे उत्तम सेनापती होते.  बुद्धी आणि शक्तीचा अद्वितीय संगम म्हणजे बाजीराव. घोड्यावरच्या बांधलेल्या  पिशवीत भाजलेले चणे घेऊन ते खात खात दौड करीत, सैनिकांसह प्रवास करी. त्यांच्यासोबतच राही. त्यांच्याबरोबर जेवण करत असे. त्याच्या फौजा ७५ किलोमीटर प्रतीदिन या वेगाने जायच्या. घोड्यावर मोजकीच शिधा व शस्त्र असल्याने मराठा सैन्याची गतिमानता जास्त होती. सैन्याचा अंतर कापण्यासाठीचा हा वेग त्या काळातला सर्वोत्तम वेग होता.  त्या काळात मुघल सैन्य दिवसाला ५ ते ६ मैल या वेगाने प्रवास करत असत. शत्रूला सुगावा लागायच्या आतच हल्ला झालेला असायचा. बाजीरावांची गुप्तचर यंत्रणा ही त्याची दुसरी मोठी बाजू. शत्रुच्या हालचालींबाबतची क्षणाक्षणांची माहिती त्यांना मिळायची. मार्गात येणाºया नद्या, नद्यांचे चढ, उतार, पर्वत, घाट या सगळ्यांची अचूक माहिती असायची.


*रावेरखेडी :*


            *२८ एप्रिल १७४० ला (वैशाख शुद्ध त्रयोदशी १६६२) मध्य प्रदेशातील नर्मदेकिनारी असलेल्या रावेरखेडी येथे ज्वर आल्याने बाजीरावांचे निधन झाले.*  बाजीरावांना केवळ ४० वर्षांचे आयुष्य मिळाल. तिथे पुढे नर्मदातटावर नानासाहेबांनी ग्वाल्हेर संस्थानच्या देखरेखीखाली बाजीरावांची समाधी बांधली. उत्तरेत जाण्यासाठी नर्मदा नदी ओलांडावी लागे.  हे मोठे सैनिकी ठिकाण होते. नर्मदेच्या तटाजवळ असलेली ही समाधी महेश्वर धरण प्रकल्पामुळे पाण्याखाली जाणार असल्याचे मध्यंतरी वाचण्यात आले. रावेरखेडी हे बुडित क्षेत्रात येत असून समाधीसह इतर अनेक भाग पाण्याखाली जाणार आहे.  महाराष्ट्रापासून एवढ्या लांब ठिकाणी त्याकाळात घोडेस्वारी करत बाजीराव कसे गेले असतील याचं आश्चर्य वाटते. घोडेस्वारीचं त्याचं कौशल्य अफाट असावं.


आपल्या घरातील व जातीपंथातील लोकांशी मानसिक युद्ध खेळून हरलेला? तरीही जिंकलेला हा ‘राऊ’ रावेरखेडीस चिरविश्रांती घेत खरा यौद्धाच ठरला. बाजीराव पेशव्यांचा हा इतिहास दैदिप्यमान आणि गौरवशाली आहे. हा इतिहास आपण दुर्लक्षित केला नाही तर चिरंतन टिकणारा आहे.

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

संकलन -)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६


नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आज स्मृतिदिन

 *नेताजी सुभाषचंद्र बोस*

     *जन्म : २३ जानेवारी १८९७*

        (कटक,ओडिशा,भारत)


*अपघाती निधन :१८ ऑगस्ट १९४५*

                         (वय ४८)

                     ( तैहोको, तैवान)


टोपणनाव : नेताजी

चळवळ : भारतीय स्वातंत्र्यलढा

संघटना :

              अखिल भारतीय काँग्रेस 

              फॉरवर्ड ब्लॉक 

              आझाद हिंद फौज


प्रमुख स्मारके : पोर्ट ब्लेर येथील 

                       स्मारक

धर्म : हिंदू

पत्नी : एमिली शेंकल

अपत्ये : अनिता बोस फफ

आवाहन : तुम मुझे खून दो,

               मै तुम्हे आझादी दूँगा !


                   हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक अग्रेसर नेते होते. हे नेताजी या नावाने ओळखले जातात. दुसरे महायुद्ध सुरू असताना इंग्रजांशी लढण्यासाठी त्यांनी जपानच्या मदतीने आझाद हिंद फौज स्थापन केली होती. त्यांनी दिलेला *जय हिन्द* चा नारा हा आज *भारताचा राष्ट्रीय नारा* बनला आहे.

              १९४४ मध्ये अमेरिकन पत्रकार लुई फिशर ह्यांच्याशी चर्चा करताना महात्मा गांधींनी नेताजींचा देशभक्तांचा देशभक्त असा उल्लेख केला होता.

             नेताजींचे योगदान व प्रभाव इतका मोठा होता की काही जाणकार असे मानतात की जर त्यावेळी नेताजी भारतात उपस्थित असते तर कदाचित भारताची फाळणी न होता भारत एकसंध राष्ट्र म्हणून टिकून राहिला असता. स्वतः गांधींजी देखील असेच मानत होते.


👨‍👩‍👧 *जन्म व कौटुंबिक जीवन*


               सुभाषचंद्र बोस यांचा जन्म जानेवारी २३, १८९७ रोजी ओडिशा मधील कटक शहरात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जानकीनाथ आणि आईचे नाव प्रभावती होते.

             जानकीनाथ बोस हे कटक शहरातील नामवंत वकील होते. आधी ते सरकारी वकील म्हणून काम करत होते पण नंतर त्यांनी आपली स्वतः ची वकिली सुरू केली होती. कटक महापालिकेत ते काही काळ काम करत होते तसेच बंगालचे विधानसभेचे सदस्य ही होते. इंग्रज सरकार ने त्यांना रायबहाद्दर हा किताब दिला होता.

          प्रभावती देवींच्या वडिलांचे नाव गंगानारायण दत्त होते. दत्त घराणे हे कोलकात्त्यातील एक श्रीमंत घराणे होते.

       प्रभावती व जानकीनाथ बोस ह्यांना एकूण १४ मुले होती. त्यात ६ मुली व ८ मुलगे होते. सुभाषचंद्र त्यांचे नववे अपत्य व पाचवे पुत्र होते.

            आपल्या सर्व भावांपैकी सुभाषना शरदचंद्र अधिक प्रिय होते. शरदबाबू हे प्रभावती व जानकीनाथ ह्यांचे दुसरे पुत्र होते. सुभाष त्यांना मेजदा म्हणत असत. शरदबाबूंच्या पत्नीचे नाव विभावती होते.


🎓 *शिक्षण व विद्यार्थी जीवन*


लहानपणी, सुभाष कटक मध्ये रॅवेन्शॉ कॉलिजिएट हायस्कूल नामक शाळेत शिकत होते. ह्या शाळेत त्यांच्या एका शिक्षकाचे नाव वेणीमाधव दास होते. वेणीमाधव दास आपल्या विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीचे स्फुल्लिंग जागवत. त्यांनी सुभाषमधली सुप्त देशभक्ती जागृत केली.

                वयाच्या १५ व्या वर्षी, सुभाष गुरूच्या शोधात हिमालयात गेले हाते. गुरूचा हा शोध असफल राहिला. त्यानंतर स्वामी विवेकानंदांचे साहित्य वाचून, सुभाष त्यांचे शिष्य बनले.

             महाविद्यालयात शिकत असताना, अन्यायाविरूद्ध लढण्याची त्यांची प्रवृत्ति दिसून येत असे. कोलकात्त्यातील प्रेसिडेंसी महाविद्यालयात इंग्रज प्राध्यापक ओटेन हे भारतीय विद्यार्थ्यांशी उर्मटपणे वागत असत. म्हणून सुभाषने महाविद्यालयात संप पुकारला होता.

               १९२१ साली इंग्लंडला जाऊन, सुभाष भारतीय नागरी सेवेच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले. परंतु इंग्रज सरकारची चाकरी करण्यास नकार देऊन त्यांनी राजीनामा दिला व ते मायदेशी परतले.


🇮🇳 *स्वातंत्र्यलढ्यात प्रवेश व कार्य*

          १९३९च्या अखिल भारतीय काँग्रेस अधिवेशनासाठी उपस्थित बोस.छायाचित्र:टोनी मित्रा

कोलकात्त्यातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, देशबंधू चित्तरंजन दास ह्यांच्या कार्याने प्रभावित झालेल्या सुभाषची, दासबाबूंबरोबर काम करण्याची इच्छा होती. इंग्लंडहून त्यांनी दासबाबूंना पत्र लिहून, त्यांच्याबरोबर काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती.

           रविंद्रनाथ ठाकूर ह्यांच्या सल्ल्यानुसार भारतात परतल्यानंतर ते सर्वप्रथम मुंबईला जाऊन महात्मा गांधींना भेटले. मुंबईत गांधींजी मणिभवन नामक वास्तु मध्ये वास्तव्य करत. तेथे जुलै २०, १९२१ रोजी महात्मा गांधी आणि सुभाषचंद्र बोस सर्वप्रथम एकमेकांना भेटले.

               गांधींजीनी देखिल कोलकत्याला जाऊन दास बाबूंबरोबर काम करण्याचा सल्ला दिला. मग सुभाषबाबू कोलकात्त्याला आले व दासबाबूंना भेटले. दासबाबूंना त्यांना पाहून फार आनंद झाला. त्याकाळी, गांधींजीनी इंग्रज सरकारच्या विरोधात असहकार आंदोलन चालवले होते. दासबाबू बंगालमध्ये ह्या आंदोलनाचे नेतृत्व करत होते. त्यांच्याबरोबर सुभाषबाबू ह्या आंदोलनात सहभागी झाले.

            १९२२ साली दासबाबूंनी काँग्रेस अंतर्गत स्वराज पक्षाची स्थापना केली. विधानसभेच्या आतून इंग्रज सरकारला विरोध करण्यासाठी, कोलकाता महापालिकेची निवडणूक, स्वराज पक्षाने लढवून, जिंकली. स्वतः दासबाबू कोलकात्त्याचे महापौर झाले. त्यांनी सुभाषबाबूंना महापालिकेचे प्रमुख कार्यकारी अधिकारी बनवले. सुभाषबाबूंनी आपल्या कार्यकाळात महापालिकेची काम करण्याची पद्धतच बदलून टाकली. कोलकात्त्यातील रस्त्यांची इंग्रज नावे बदलून, त्यांना भारतीय नावे दिली गेली. स्वातंत्र्यलढ्यात प्राणार्पण केलेल्या क्रांतिकारकांच्या कुटुंबीयांना महापालिकेत नोकरी मिळू लागली.

              लवकरच, सुभाषबाबू देशातील एक अग्रेसर युवा नेता म्हणून ओळखले जाऊ लागले. पंडित जवाहरलाल नेहरूंसह, सुभाषबाबूंनी काँग्रेस अंतर्गत इंडिपेंडन्स लिगची स्थापना केली. १९२८ साली जेव्हा सायमन कमिशन भारतात आले, तेव्हा काँग्रेसने त्याला काळे झेंडे दाखवले होते. कोलकात्त्यात सुभाषबाबूंनी ह्या आंदोलनाचे नेतृत्व केले. सायमन कमिशनला उत्तर देण्यासाठी, काँग्रेसने भारताच्या भावी घटनेचा आराखडा तयार करण्यासाठी आठ सदस्यांची समिती नेमली. पंडित मोतीलाल नेहरू ह्या समितीचे अध्यक्ष होते तर सुभाषबाबू त्याचे एक सदस्य. ह्या समितीने नेहरू रिपोर्ट सादर केला.

               १९२८ साली काँग्रेसचे वार्षिक अधिवेशन पंडित मोतीलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली कोलकात्त्यात झाले. ह्या अधिवेशनात सुभाषबाबूंनी खाकी गणवेश घालून, पंडित मोतीलाल नेहरूंना लष्करी पद्धतीने सलामी दिली. गांधींजी त्याकाळी पूर्ण स्वराजच्या भूमिकेशी सहमत नव्हते. ह्या अधिवेशनात त्यांनी इंग्रज सरकारकडून वसाहतीचे स्वराज्य मागण्यासाठी ठराव मांडला होता. मात्र, सुभाषबाबू व पंडित जवाहरलाल नेहरू ह्यांना, पूर्ण स्वराजच्या भूमिकेशी तडजोड मान्य नव्हती. अखेर वसाहतीचे स्वराज्याची मागणी मान्य करण्यासाठी इंग्रज सरकारला एक वर्षाची मुदत देण्याचे ठरले. जर एका वर्षात इंग्रज सरकारने ही मागणी मान्य केली नाही, तर काँग्रेस पूर्ण स्वराजची मागणी करेल असे ठरले. इंग्रज सरकारने ही मागणी मान्य केली नाही. त्यामुळे, १९३० साली काँग्रेसचे वार्षिक अधिवेशन पंडित जवाहरलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली लाहोरला झाले, तेव्हा असे ठरवले गेले की जानेवारी २६ हा दिवस स्वातंत्र्यदिन म्हणून पाळला जाईल.

            जानेवारी २६, १९३१ च्या दिवशी, कोलकात्त्यात सुभाषबाबू तिरंगी ध्वज फडकावत एका विराट मोर्चाचे नेतृत्व करत होते. तेव्हा पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्यात ते जखमी झाले. सुभाषबाबू तुरूंगात असताना, गांधींजीनी इंग्रज सरकारबरोबर तह केला व सर्व कैद्यांची सुटका करण्यात आली. परंतु सरदार भगतसिंग आदि क्रांतिकारकांची सुटका करण्यास इंग्रज सरकारने नकार दिला. भगतसिंगांची फाशी रद्ध करावी ही मागणी गांधींजीनी इंग्रज सरकारकडे केली. सुभाषबाबूंची इच्छा होती, की ह्याबाबतीत इंग्रज सरकार जर दाद देत नसेल, तर गांधींजीनी सरकारबरोबर केलेला करार मोडावा. पण आपल्या बाजूने दिलेला शब्द मोडणे गांधींजीना मान्य नव्हते. इंग्रज सरकारने आपली भूमिका सोडली नाही व भगतसिंग आणि त्यांच्या साथीदारांना फाशी देण्यात आले. भगतसिंगांना वाचवू न शकल्यामुळे सुभाषबाबू, गांधींजी व काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर फार नाराज झाले.


🏛 *कारावास*

आपल्या सार्वजनिक जीवनात सुभाषबाबूंना एकूण अकरा वेळा कारावास भोगावा लागला. सर्वप्रथम १९२१ साली त्यांना सहा महिन्यांचा कारावास भोगावा लागला.

         १९२५ साली गोपीनाथ साहा नामक एक क्रांतिकारी, कोलकात्त्याचे पोलिस अधीक्षक चार्लस टेगार्ट ह्यांना मारण्याच्या प्रयत्‍नांत होता. पण त्याने चुकून अर्नेस्ट डे नामक एका व्यापारी इसमाला मारले. ह्यासाठी त्याला फाशीची शिक्षा सुनावली गेली. गोपीनाथ फाशी गेल्यावर सुभाषबाबू जाहीरपणे जोरात रडले. त्यांनी गोपीनाथचा पार्थिव देह मागून घेऊन त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. ह्यावरून इंग्रज सरकारने अर्थ लावला की सुभाषबाबू ज्वलंत क्रांतिकारकांशी संबंध तर ठेवतातच, परंतु तेच ह्या क्रांतिकारकांचे स्फूर्तिस्थान आहेत. ह्या कारणास्तव इंग्रज सरकारने सुभाषबाबूंना अटक केली व कोणताही खटला न चालवताच, त्यांना अनिश्चित कालखंडासाठी म्यानमारच्या मंडाले कारागृहात बंदिस्त करून टाकले.

                  नोव्हेंबर ५, १९२५ च्या दिवशी, देशबंधू चित्तरंजन दासांचे कोलकाता येथे देहावसान झाले. सुभाषबाबूंनी त्यांच्या मृत्यूची बातमी मंडालेच्या कारागृहात रेडियोवर ऐकली.

                 मंडाले कारागृहातील वास्तव्यात सुभाषबाबूंची तब्येत बिघडली. त्यांना क्षयरोगाने ग्रासले. परंतु इंग्रज सरकारने तरीही त्यांची सुटका करण्यास नकार दिला. सरकारने त्यांची सुटका करण्यासाठी अट घातली की त्यांनी औषधोपारासाठी युरोपला जावे. पण औषधोपचारानंतर ते भारतात कधी परत येऊ शकतात हे सरकारने स्पष्ट केले नाही. त्यामुळे सुभाषबाबूंनी सरकारची अट मानली नाही. अखेर परिस्थिती इतकी कठीण झाली की कदाचित तुरूंगातच सुभाषबाबूंचा मृत्यू ओढवेल असे वाटू लागले. इंग्रज सरकारला हा धोकाही पत्कारायचा नव्हता. त्यामुळे सरकारने अखेर त्यांची सुटका केली. मग सुभाषबाबू औषधोपारासाठी डलहौसी येथे जाऊन राहिले.

          १९३० साली सुभाषबाबू कारावासात असताना त्यांची कोलकात्त्याच्या महापौरपदी निवड झाली. त्यामुळे सरकारला त्यांची सुटका करणे भाग पडले.

              १९३२ साली सुभाषबाबू पुन्हा कारावासात होते. ह्या वेळेस त्यांना अलमोडा येथील तुरुंगात ठेवले होते. अलमोडा तुरुंगात त्यांची तब्येत पुन्हा बिघडली. वैद्यकीय सल्ल्यानुसार सुभाषबाबू ह्यावेळी औषधोपारासाठी युरोपला जायला तयार झाले.


🗽  *युरोपातील वास्तव्य*


१९३३ पासून १९३६ पर्यंत सुभाषबाबूंचे युरोप मध्ये वास्तव्य होते.

          युरोप मधील वास्तव्यात सुभाषबाबूंनी आपल्या तब्येतीची काळजी घेतानाच, आपले कार्यही सुरूच ठेवले. त्यांनी इटली चे नेते मुसोलिनी ह्यांची अनेकदा भेट घेतली. मुसोलिनीने त्यांना, भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात सर्वतोपरी सहकार्य करण्याचे वचन दिले. आयर्लंड चे नेते डी व्हॅलेरा सुभाषबाबूंचे चांगले मित्र बनले.

                सुभाषबाबू युरोप मध्ये असताना, पंडित जवाहरलाल नेहरूंच्या पत्‍नी कमला नेहरू ह्यांचे ऑस्ट्रियामध्ये निधन झाले. सुभाषबाबूंनी तिथे जाऊन पंडित जवाहरलाल नेहरूंचे सांत्वन केले.

              पुढे सुभाषबाबू युरोप मध्ये विठ्ठलभाई पटेल ह्यांना भेटले. विठ्ठलभाई पटेल ह्यांच्यासह सुभाषबाबूंनी पटेल-बोस जाहीरनामा प्रसिद्ध केला, ज्यामध्ये त्या दोघांनी गांधीजींच्या नेतृत्वावर कडाडून टीका केली. त्यानंतर विठ्ठलभाई पटेल आजारी पडले, तेव्हा सुभाषबाबूंनी त्यांची खूप सेवा केली. पण विठ्ठलभाई पटेलांचे निधन झाले.

               विठ्ठलभाई पटेलांनी आपले मृत्युपत्र बनवून आपली करोडोंची संपत्ती सुभाषबाबूंच्या नावे केली. पण त्यांच्या निधनानंतर, त्यांचे बंधू सरदार वल्लभभाई पटेलांनी हे मृत्युपत्र स्वीकारले नाही व त्यावर न्यायालयात खटला चालवला. हा खटला जिंकून, सरदार वल्लभभाई पटेलांनी ती सर्व संपत्ती, गांधीजींच्या हरिजन सेवा कार्याला भेट म्हणून देऊन टाकली.

         १९३४ साली सुभाषबाबूंना त्यांचे वडील मृत्युशय्येवर असल्याची बातमी मिळाली. त्यामुळे ते विमानाने कराची मार्गे कोलकात्त्याला परतले. कराचीला पोचल्यावरच त्यांना कळले की त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. कोलकात्त्याला पोचताच, इंग्रज सरकारने त्यांना अटक केली व काही दिवस तुरूंगात ठेवून, पुन्हा युरोपला धाडले.


📿 *हरीपुरा काँग्रेसचे अध्यक्षपद*


१९३८ साली काँग्रेसचे वार्षिक अधिवेशन हरिपुरा येथे झाले. ह्या अधिवेशनासाठी गांधीजींनी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून सुभाषबाबूंची निवड केली. हे काँग्रेसचे ५१वे अधिवेशन होते. त्यामुळे काँग्रेस अध्यक्ष असलेल्या सुभाषबाबूंचे स्वागत ५१ बैलांनी खेचलेल्या रथातून केले गेले.

                   ह्या अधिवेशनात सुभाषबाबूंचे अध्यक्षीय भाषण फारच प्रभावी झाले. कोणत्याही भारतीय राजकीय व्यक्तीने क्वचितच इतके प्रभावी भाषण कधी केले असेल.

             आपल्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत सुभाषबाबूंनी योजना आयोग स्थापना केला. पंडित जवाहरलाल नेहरू त्याचे अध्यक्ष होते. सुभाषबाबूंनी बेंगलोर येथे प्रसिद्ध वैज्ञानिक सर विश्वेश्वरैय्या ह्यांच्या अध्यक्षतेखाली एक विज्ञान परिषदही भरवली.

           १९३७ मध्ये जपानने चीनवर आक्रमण केले. तेव्हा सुभाषबाबूंच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसने चिनी जनतेला साहाय्य करण्यासाठी, डॉ द्वारकानाथ कोटणीस ह्यांच्या नेतृत्वाखाली वैद्यकीय पथक पाठवण्याचा निर्णय घेतला. पुढे जेव्हा सुभाषबाबूंनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात जपानची मदत मागितली, तेव्हा त्यांना जपानचे हस्तक व फॅसिस्ट म्हटले गेले. पण वरील घटनेवरून हे सिद्ध होते की सुभाषबाबू न जपानचे हस्तक होते, न ही फॅसिस्ट विचारसरणीशी सहमत होते.


🥊 *काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा*

          १९३८ साली गांधीजींनी काँग्रेस अध्यक्षपदासाठी सुभाषबाबूंची निवड केली असली, तरी गांधीजींना सुभाषबाबूंची कार्यपद्धती पसंत नव्हती. ह्याच सुमारास युरोपात द्वितीय महायुद्धाची छाया पसरली होती. सुभाषबाबूंची इच्छा होती की इंग्लंडच्या कठीण परिस्थितीचा लाभ उठवून, भारताचा स्वातंत्र्यलढा अधिक तीव्र केला जावा. त्यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत ह्या दिशेने पावले टाकण्यास सुरूवातही केली होती. गांधीजी ह्या विचारसरणीशी सहमत नव्हते.

             १९३९ मध्ये जेव्हा नवीन काँग्रेस अध्यक्ष निवडण्याची वेळ आली, तेव्हा सुभाषबाबूंना अध्यक्षपदावर कुणी अशी व्यक्ती हवी होती, जी ह्या बाबतीत कोणत्याही दबावासमोर झुकणार नाही. अशी कोणती दुसरी व्यक्ती समोर न आल्यामुळे, सुभाषबाबू स्वतः पुन्हा काँग्रेस अध्यक्ष बनू इच्छीत होते. पण गांधीजी आता ते नको होते. गांधीजीनी अध्यक्षपदासाठी पट्टाभि सितारमैय्या ह्यांची निवड केली. कविवर्य रवींद्रनाथ ठाकूर ह्यांनी गांधीजींना पत्र लिहून सुभाषबाबूंनाच पुन्हा अध्यक्ष बनवण्याची विनंती केली. प्रफुल्लचंद्र राय, मेघनाद साहा सारखे वैज्ञानिकही पुन्हा सुभाषबाबूंनाच अध्यक्ष करावे ह्या मताचे होते. पण गांधीजींनी ह्या प्रश्नावर कुणाचेच म्हणणे ऐकले नाही. शेवटपर्यंत तडजोड न होऊ शकल्यामुळे, अनेक वर्षांनंतर, काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवली गेली.

          सर्वजण समजत होते की जेव्हा स्वतः महात्मा गांधीनी पट्टाभि सितारामैय्या ह्यांना साथ दिली आहे, तेव्हा तेच ही निवडणूक आरामात जिंकणार. पण घडले वेगळेच. सुभाषबाबूंना निवडणुकीत १५८० मते मिळाली तर पट्टाभी सितारमैय्यांना १३७७ मते मिळाली. गांधीजींनी विरोध करूनही सुभाषबाबूंनी २०३ मतांनी ही निवडणूक जिंकली.

      पण निवडणुकीच्या निकालाने पेच मिटला नाही. पट्टाभि सितारामैय्यांची हार ही आपली स्वतःची हार मानून, गांधीजींनी आपल्या साथीदारांना असे सांगितले की त्यांना जर सुभाषबाबूंची कार्यपद्धती मान्य नसेल, तर ते काँग्रेसमधून बाहेर पडू शकतात. ह्यानंतर काँग्रेस कार्यकारिणीच्या १४ पैकी १२ सदस्यांनी राजीनामा दिला. पंडित जवाहरलाल नेहरू तटस्थ राहिले व एकटे शरदबाबू सुभाषबाबूंच्या बाजूने उभे राहिले.

          १९३९ सालचे वार्षिक काँग्रेस अधिवेशन त्रिपुरी येथे झाले. ह्या अधिवेशनाच्या वेळी सुभाषबाबू तापाने इतके आजारी होते, की त्यांना स्ट्रेचरवर पडून अधिवेशनाला उपस्थित रहावे लागले. गांधीजी ह्या अधिवेशनाला उपस्थित राहिले नाहीत. गांधीजींच्या साथीदारांनी सुभाषबाबूंशी बिलकुल सहकार्य केले नाही.

                 अधिवेशनानंतरही सुभाषबाबूंनी तडजोडीसाठी खूप प्रयत्‍न केले. पण गांधीजी व त्यांच्या साथीदारांनी त्यांचे काही चालू दिले नाही. शेवटी परिस्थिती अशी बनली की सुभाषबाबू काही कामच करू शकत नव्हते. अखेर, एप्रिल २९, १९३९ रोजी सुभाषबाबूंनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.


🎓 *फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना*


मे ३, १९३९ रोजी, सुभाषबाबूंनी काँग्रेस अंतर्गत फॉरवर्ड ब्लॉक नामक आपल्या पक्षाची स्थापना केली. काही दिवसांनंतर, सुभाषबाबूंना काँग्रेस मधून काढून टाकण्यात आले. पुढे फॉरवर्ड ब्लॉक हा एक स्वतंत्र पक्ष बनला.

                  दुसरे महायुद्ध सुरू होण्यापूर्वीच, फॉरवर्ड ब्लॉकने भारताचा स्वातंत्र्यलढा अधिक तीव्र करण्यासाठी, जनजागृती सुरू केली. त्यामुळे इंग्रज सरकारने सुभाषबाबू सहित फॉरवर्ड ब्लॉकच्या सर्व मुख्य नेत्यांना कैद केले. दुसरे महायुद्ध सुरू असताना तुरूंगात निष्क्रिय राहणे सुभाषबाबूंना शक्य नव्हते. सरकारला आपली सुटका करण्यास भाग पाडण्यासाठी, सुभाषबाबूंनी तुरूंगात आमरण उपोषण सुरू केले. तेव्हा सरकारने त्यांची सुटका केली. पण इंग्रज सरकार युद्धकाळात सुभाषबाबूंना मोकळे ठेवू इच्छीत नव्हते. त्यामुळे सरकारने त्यांना त्यांच्याच घरात नजरकैदेत ठेवले.


🏃🏽 *नजरकैदेतून पलायन*


नजरकैदेतून निसटण्यासाठी सुभाषबाबूंनी एक योजना बनवली. जानेवारी १६, १९४१ रोजी पठाणी वेशभूषेत, महमद झियाउद्दीन असे नाव धारण करून, ते पोलिसांची नजर चुकवून, घरातून निसटले. शरदबाबूंचा प्रथम पुत्र शिशिर ह्याने आपल्या गाडीतून त्यांना कोलकात्त्यापासून दूर, गोमोह येथे पोचवले. गोमोह रेल्वे स्थानकावर फ्रंटियर मेल पकडून ते पेशावरला पोचले. पेशावर येथे त्यांना फॉरवर्ड ब्लॉक मधील एक सहकारी, मिया अकबर शहा भेटले. मिया अकबर शहांनी त्यांची ओळख, कीर्ती किसान पार्टीच्या भगतराम तलवारशी करून दिली. भगतराम तलवारच्या सोबतीने, सुभाषबाबू पेशावरहून अफगाणिस्तानची राजधानी काबूलच्या दिशेने निघाले. ह्या प्रवासात भगतराम तलवार, रहमतखान नामक पठाण बनले होते व सुभाषबाबू त्यांचे मुके-बहिरे काका बनले होते. हा संपूर्ण प्रवास त्या दोघांनी डोंगरातून पायी चालत पूर्ण केला.

              काबूलमध्ये उत्तमचंद मल्होत्रा नावाचा एक भारतीय व्यापारी राहत होता. सुभाषबाबूंनी दोन महिने त्यांच्या घरी वास्तव्य केले. तिथे त्यांनी प्रथम रशियन वकिलातीत प्रवेश मिळवण्याचा प्रयत्‍न केला. त्यात यश न आल्यामुळे, त्यांनी जर्मन व इटालियन वकिलातीत प्रवेश मिळवण्याचा प्रयत्‍न केला. इटालियन वकिलातीत त्यांच्या प्रयत्‍नांना यश आले. जर्मन व इटालियन वकिलातींनी त्यांना मदत केली. अखेर ओर्लांदो मात्सुता नामक इटालियन व्यक्ती बनून, सुभाषबाबू काबूलहून रेल्वेने प्रवास करत, रशियाची राजधानी मॉस्को मार्गे जर्मनीची राजधानी बर्लिन येथे पोचले.


👬 *नाझी जर्मनीतील वास्तव्य आणि हिटलरची भेट*


बर्लिन येथे सुभाषबाबू सर्वप्रथम रिबेनट्रोप आदि जर्मनीच्या अन्य नेत्यांना भेटले. त्यांनी जर्मनीत भारतीय स्वातंत्र्य संघटना व आझाद हिंद रेडियो ह्या दोन्हींची स्थापना केली. ह्याच दरम्यान सुभाषबाबू, नेताजी ह्या नावाने ओळखले जाऊ लागले. जर्मन सरकारचे एक मंत्री ॲडम फॉन ट्रॉट सुभाषबाबूंचे फार चांगले मित्र बनले.

             अखेर मार्च २९, १९४२ रोजी, सुभाषबाबू जर्मनीचे सर्वोच्च नेते ॲडॉल्फ हिटलर ह्यांना भेटले. पण अ‍ॅडॉल्फ हिटलर ह्यांना भारताच्या विषयात फारसा रस नव्हता. त्यांनी सुभाषबाबूंना सहकार्याचे कोणतेही स्पष्ट वचन दिले नाही.

           काही वर्षांपूर्वी अ‍ॅडॉल्फ हिटलर ह्यांना माइन काम्फ नामक आपले आत्मचरित्र लिहीले होते. ह्या पुस्तकात त्यांनी भारत व भारतीयांविषयी अनुदार उद्गार काढले होते. ह्या विषयावर सुभाषबाबूंनी अ‍ॅडॉल्फ हिटलर ह्यांच्याकडे आपली नाराजी व्यक्त केली. अ‍ॅडॉल्फ हिटलर ह्यांनी आपल्या कृत्याबद्दल माफी मागितली व आपल्या आत्मचरित्राच्या पुढील आवृत्तीतून ते सर्व परिच्छेद गाळण्याचे वचन दिले.

               शेवटी, सुभाषबाबूंना समजले की अ‍ॅडॉल्फ हिटलर व जर्मनी ह्यांच्याकडून त्यांना फार काही मिळण्यासारखे नाही. त्यामुळे मार्च ८, १९४३ रोजी, जर्मनीतील कील बंदरात, ते अबीद हसन सफरानी नामक साथीदारासह, एका जर्मन पाणबुडीत बसून, पूर्व आशियाच्या दिशेने निघाले. ह्या जर्मन पाणबुडीतून त्यांनी हिंदी महासागरातील मादागास्करचा किनारा गाठला. तिथे त्या दोघांनी भयंकर समुद्रातून रबराच्या होडीने वाट काढत, जपानी पाणबुडी गाठली. द्वितीय महायुद्धाच्या काळात, कोणत्याही दोन देशांच्या नौसेनेच्या पाणबुड्यांच्या दरम्यान झालेली, नागरिकांची ही एकमात्र अदलाबदल. ही जपानी पाणबुडी मग त्यांना इंडोनेशियातील पादांग बंदरात घेऊन आली.


💎 *पूर्व आशियातील वास्तव्य*


पूर्व आशियात पोचल्यावर वयोवृद्ध क्रांतिकारी रासबिहारी बोस ह्यांनी सिंगापूर येथील फेरर पार्कमध्ये भारतीय स्वातंत्र्य परिषदेचे नेतृत्व सुभाषबाबूंकडे सोपवले.

             नेताजींच्या व्यक्तिमत्वाने प्रभावित होऊन, जपानचे पंतप्रधान जनरल हिदेकी तोजो ह्यांनी त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. काही दिवसांनंतर, नेताजींनी जपानची संसद डायट समोर भाषण केले.

              ऑक्टोबर २१, १९४३ रोजी, नेताजींनी सिंगापुरात अर्जी-हुकुमत-ए-आझाद-हिंदची (स्वाधीन भारताचे अंतरिम सरकार) स्थापना केली. ते स्वतः ह्या सरकारचे राष्ट्रपति, पंतप्रधान व युद्धमंत्री बनले. ह्या सरकारला एकूण नऊ देशांनी मान्यता दिली. नेताजी आझाद हिंद फौजेचे सरसेनापतीही बनले.

              आझाद हिंद फौजेत जपानी लष्कराने इंग्रजांच्या फौजेतून पकडलेल्या भारतीय युद्धबंद्यांना भरती केले गेले. आझाद हिंद फौजेत स्त्रियांसाठी झाँसी की रानी रेजिमेंटही बनवली गेली.

             पूर्व आशियात नेताजींनी अनेक भाषणे करून तेथील स्थायिक भारतीय लोकांना आझाद हिंद फौजेत भरती होण्याचे तसेच त्यांना आर्थिक मदत करण्याची आवाहने केली. ही आवाहने करताना त्यांनी तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आजादी दूँगा असा नारा दिला.

               द्वितीय महायुद्धाच्या काळात, आझाद हिंद फौजेने जपानी लष्कराच्या साथीने भारतावर आक्रमण केले. आपल्या फौजेला प्रेरणा देण्यासाठी नेताजींनी चलो दिल्ली अशी हाक दिली. दोन्ही फौजांनी इंग्रजांकडून अंदमान आणि निकोबार बेटे जिंकली. ही बेटे अर्जी-हुकुमत-ए-आझाद-हिंदच्या अनुशासनाखाली राहिली. नेताजींनी ह्या बेटांचे शहीद आणि स्वराज बेटे असे नामकरण केले. दोन्ही फौजांनी मिळून इंफाळवर व कोहिमावर आक्रमण केले. पण नंतर इंग्रजांनी बाजी मारली व दोन्ही फौजांना माघार घ्यावी लागली.

            आझाद हिंद फौज माघार घेत असताना, जपानी लष्कराने नेताजींना पळून जाण्यासाठी व्यवस्था केली. पण नेताजींनी झाँसी की रानी रेजिमेंटच्या मुलींच्या साथीने शेकडो मैल चालत जाणे पसंत केले. अशा प्रकारे नेताजींनी नेतृत्वाचा एक आदर्शच समोर ठेवला.

          जुलै ६, १९४४ रोजी आझाद हिंद रेडियो वरचे आपले भाषण नेताजींनी गांधीजींना उद्देशून केले. ह्या भाषणाच्या माध्यामातून नेताजींनी गांधीजींना, जपानकडून मदत मागण्याचे आपले कारण व अर्जी-हुकुमत-ए-आजाद-हिंद तथा आझाद हिंद फौज ह्यांची स्थापना करण्यामागचे उद्दिष्ट स्पष्ट केले. ह्या भाषणात, नेताजींनी गांधीजींचा राष्ट्रपिता असा उल्लेख करत, आपल्या युद्धासाठी त्यांचा आशीर्वाद मागितला. अशा प्रकारे, नेताजींनी गांधीजींना सर्वप्रथम राष्ट्रपिता असे संबोधले.


⌛ *बेपत्ता होणे व मृत्यूची बातमी*


दुसर्‍या जागतिक महायुद्धातील जपानच्या पराभवानंतर, नेताजींना नवा रस्ता शोधणे जरूरी होते. त्यांनी रशियाकडून मदत मागायचे ठरवले होते.

            ऑगस्ट १८, १९४५ रोजी नेताजी विमानातून मांचुरियाच्या दिशेने जात होते. ह्या प्रवासादरम्यान ते बेपत्ता झाले. ह्या दिवसानंतर ते कधी कुणाला दिसलेच नाहीत.

            ऑगस्ट २३, १९४५ रोजी जपानच्या दोमेई वृत्त संस्थेने जगाला कळवले की, ऑगस्ट १८ रोजी नेताजींचे विमान तैवानच्या भूमीवर अपघातग्रस्त झाले होते व त्या दुर्घटनेत खूपच भाजलेल्या नेताजींचे इस्पितळात निधन झाले.

               अपघातग्रस्त विमानात नेताजी सुभाषचंद्रांसह त्यांचे सहकारी कर्नल हबिबूर रहमान होते. त्यांनी नेताजींना वाचवण्यासाठी प्रयत्‍नांची शर्थ केली, परंतु त्यांना यश आले नाही. मग नेताजींच्या अस्थी जपानची राजधानी टोकियो येथील रेनकोजी नामक बौद्ध मंदिरात ठेवल्या गेल्या.

               स्वातंत्र्यानंतर, भारत सरकारने ह्या घटनेची चौकशी करण्यासाठी, १९५६ आणि १९७७ मध्ये दोन वेळा एकेका आयोगाची नियुक्ती केली. दोन्ही वेळा हाच निष्कर्ष निघाला की नेताजींचा त्या विमान अपघातातच मृत्यू ओढवला होता. या आयोगाने तैवानच्या सरकारशी संपर्क साधून माहिती मिळवण्याचा प्रयत्‍न केला नव्हता.

                  १९९९ साली मनोज कुमार मुखर्जी ह्यांच्या नेतृत्वाखाली तिसरा आयोग नेमला गेला. २००५ साली तैवान सरकारने मुखर्जी आयोगाला असे कळवले की १९४५ साली तैवानच्या भूमीवर कोणतेही विमान अपघातग्रस्त झालेच नव्हते. २००५ मध्ये मुखर्जी आयोगाने भारत सरकारला आपला अहवाल सादर केला. आयोगाने आपल्या अहवालात असे लिहिले की नेताजींचा मृत्यू त्या विमान अपघातात घडल्याचा कोणताही पुरावा उपलब्ध नाही. परंतु भारत सरकारने मुखर्जी आयोगाचा हा अहवाल नामंजूर केला.

             ऑगस्ट १८, १९४५ च्या दिवशी नेताजी सुभाषचंद्र कसे व कुठे बेपत्ता झाले तसेच त्यांचे पुढे नक्की काय झाले, हे भारताच्या इतिहासातील सर्वांत मोठे अनुत्तरित रहस्य बनले आहे.

        सुभाषचंद्र बोसांशी संबंधित शेकडो फायली भारत सरकारकडे होत्या.२०१५ सालच्या शेवटी त्यांतल्या बर्‍याच फायली सरकारने लोकांना बघण्यासाठी खुल्या केल्या आहेत.


🏅 *भारतरत्‍न पुरस्कार*


१९९२ साली नेताजी सुभाषचंद्र बोस यांना मरणोपरान्त भारतरत्‍न प्रदान करण्यात आले होते. परंतु सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या एका जनहितयाचिकेचा आधार घेऊन नेताजींना दिलेला हा पुरस्कार परत काढून घेण्यात आला. त्या याचिकेत नेताजींच्या मृत्यूचा कुठलाही पुरावा उपलब्ध नसल्याने त्यांना मरणोपरान्त ‘भारतरत्‍न’ पुरस्कार देणे अवैध आहे असा युक्तिवाद करण्यात आलेला होता. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने नेताजींना देण्यात आलेला हा पुरस्कार परत घेण्यात आला. इतिहासातली ही दिलेला भारतरत्‍न पुरस्कार परत घेण्याची एकमेव घटना आहे.


*सुभाषचंद्र बोस व आझाद हिंद सेना यांच्या बद्दल महत्वाचे मुद्दे*


सुभाषचंद्र बोस यांचा जन्म २३ जानेवारी १८९७, बंगाल प्रांतात झाला.

सुभाषबाबू १९२० मध्ये आय.सी.आय. परीक्षा उत्तीर्ण झाले.

सुभाषबाबू १९३८ हरीपुर व १९३९ त्रिपुरा काँग्रेसचे अध्यक्ष होते.

नेताजींनी १९४० मध्ये ‘फॉरवर्ड ब्लॉक’ या पक्षाची स्थापना केली.

डिसेंबर १९४० मध्ये सुभाष बाबूंना नजरकैदेत ठेवण्यात आले.

जानेवारी १९४१ मध्ये सुभाषबाबूंनी इंग्रजांच्या कैदेतून पलायन केले व पेशावर मास्कोमार्गे त्यांनी जर्मनी गाठली.

नजर कैदेतून सुटल्यावर नेताजींनी झियाउद्दीन हे नाव धारण केले होते.

नेताजींनी २१ ऑक्टोबर १९४३ रोजी सिंगापूर येथे ‘स्वतंत्र हिंदूस्थानचे हंगामी सरकार’ स्थापन केले.

सिंगापूर येथे रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली होती. त्याचे सेनापतीपद (नेतृत्व) नेताजीकडे आले.

आझाद हिंद सेनेच्या गांधी ब्रिगेड, आझाद ब्रिगेड, नेहरू ब्रिगेड, सुभाष ब्रिगेड अशा ब्रिगेड होत्या.

सुभाष ब्रिगेडचे नेतृत्व लेफ्टनंट कर्नल शाहनवाज खान यांच्याकडे सोपविण्यात आले होते.

आझाद हिंद सेनेने बंगालच्या उपसागरातील ‘अंदमान व निकोबार’ ही बेटे जिंकून घेतली व त्यांचे नामकरण अनुक्रमे ‘शहीद व स्वराज्य’ असे केले.

आझाद हिंद सेनेने १८ मार्च १९४४ रोजी भारतभूमीवर प्रवेश केला व माऊडॉक येथे त्यांनी भारताचा तिरंगा फडकावला.

१८ ऑगस्ट १९४५ रोजी विमान अपघातात तैपेई विमानतळाजवळ नेताजींचे निधन झाल्याचे मानण्यात येते.


📕 *चरित्रे*


अनेक लेखकांनी मराठीत नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे चरित्र लिहिले आहे. त्यांतली काही चरित्रे ही :-


गरुडझेप (कादंबरी, वि.स. वाळिंबे)

जयहिंद आझाद हिंद (कादंबरी, वि.स. वाळिंबे)

नेताजी (वि.स. वाळिंबे)

नेताजी सुभाष (मूळ इंग्रजी Subhash - a Polytical Biography, लेखक : सीतांशू दास; मराठी अनुवाद : श्रीराम ग. पचिंद्रे)

नेताजींचे सीमोल्लंघन (एस.एम. जोशी)

नेताजी सुभाषचंद्र बोस (रमेश मुधोळकर)

No Secrets (अनुज धर)

महानायक (कादंबरी, लेखक : विश्वास पाटील)


📚 *नेताजींवरील अन्य पुस्तके*


नेताजींची सुवचने आणि संदेश (य.ना. वालावलकर)

नेहरू व बोस (मूळ इंग्रजी लेखक - रुद्रांग्शू मुखर्जी; मराठी अनुवाद - अवधूत डोंगरे)

🇮🇳🇮🇳🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳🇮🇳🇮🇳


*स्वातंत्र्य वेदीवर आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या सर्व ज्ञात-अज्ञात हुतात्म्यांना विनम्र अभिवादन* 

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

संकलन) ::गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा-) यवतमाळ ४४५२०६


प्रभात दर्शन

 🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

श्रावण मास,शुक्ल पक्ष, *एकादशी*,मूल नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,वर्षा ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

बुधवार, १८ आॕगष्ट २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                        *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

        *"राष्ट्र के लिए जीना, राष्ट्र के लिए मरने से अधिक कठिन है। जहाँ देश के लिए जीने की बात होती है, वहां अपने घर में गरीबी को आमंत्रण देना पड़ता है, सुख- वैभव भूलना पड़ता है, दरिद्रता को अंगीकार करना होता है। इन सभी बातों से निराश न होकर केवल राष्ट्र के लिए ही जीना है, ऐसा सोचने वालों से ही राष्ट्र की प्रगति सम्भव है।"*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

सोमवार, १६ ऑगस्ट, २०२१

ध्यान साधना संमोहन शक्ती


══════════════════════

 @ संकलन @

  *श्री. गजानन गोपेवाड 

══════════════════════

‌📕 *संमोहित झालेली व्यक्ती, संमोहन करणाऱ्या व्यक्तीच्या सर्वच आज्ञा ऐकते का ?* 📕


शाळेमध्ये कोणीतरी तुमच्यासमोर संमोहनाचा प्रयोग करून दाखवला असेल. चारपाच मुलांना बोलावून त्यांना संमोहित केले असेल. संमोहित केल्यानंतर त्यांना गाणी म्हणायला व नाचायला लावले असेल. एवढेच काय, उकडत असताना "काय थंडी आहे बुवा” असे म्हणायला लावून त्यांना कुडकुडायलाही लावले असेल. तुमची अगदी हसताहसता पुरेवाट झाली असेल. गंमतीचा कळस म्हणजे प्रयोग करणारा संमोहित माणसाला सांगतो की, “तुझ्यासमोर अमिताभ बच्चन बसलेला आहे (प्रत्यक्षात तेथे एखादा टेबल असतो!) तेव्हा त्याची मुलाखत घे;" आणि ती व्यक्ती खोट्या अमिताभची मुलाखतही घेते.


वरील उदाहरणांमुळे तुम्हाला अशी भीती वाटणे रास्त आहे की, तुम्हाला कोणी संमोहित केले तर ती व्यक्ती सांगेल ते तुम्ही कराल. चोरी कर म्हटले की चोरी करावी लागेल वगैरे. सात वर्तमानपत्रात येणाऱ्या बातम्या, ज्यात एक बाई साधुच्या मागे निघून गेली, अशा प्रकारेच काही लिहिलेले असते, त्यांचाही हातभार लागतो; पण हे खरे असते काय ?


संमोहनाचा महत्त्वाचा भाग म्हणजे तुमची इच्छा नसल्यास कोणीही तुम्हाला संमोहित करू शकत नाही. कारण तुम्ही संमोहन करणारा काय म्हणतोय, काय करतोय यावर लक्ष केंद्रितच केले नाही तर तुम्ही संमोहित होणार नाही. दुसरे महत्त्वाचे म्हणजे संमोहनावस्थेतदेखील माणूस त्याच्या सद्सद्विवेक बुद्धीला पटणार नाहीत, अशा गोष्टी कधीही करणार नाही. सुशील अशा सज्जन स्त्रीला अंगावरचे कपडे उतरवायला कोणी भाग पाडू शकणार नाही व सज्जन मुलाला कोणी चोरी करायला लावू शकणार नाही. त्यामुळे संमोहन करणाऱ्याला घाबरण्याचे कारण नाही. मजा म्हणून त्याचा आनंद घ्यायला काहीच हरकत नाही.




═══════════════════════

  

ध्यान साधना,,,, मुर्खपणा

 *मुर्खपणा*


माझ्या मुलीचे लग्न होते आणि मी काही दिवस सुट्टी घेऊन लग्नाच्या तयारीत व्यस्त होतो. त्या दिवशी प्रवासातून घरी आलो तर पत्नी ने माझ्या हाती एक पाकीट दिलं. पाकीट अनोळखी होतं पण पाठविणाऱ्याचे नाव पाहून मला आश्चर्यमिश्रित उत्सुकता लागली. ‘अमर विश्वास’, एक असे नाव, ज्याला भेटून काही वर्षे उलटली होती. मी पाकीट उघडले तर त्यात एक लाख डाॅलर चा चेक आणि एक पत्र होतं. इतकी मोठी रक्कम, ती ही माझ्या नावावर? मी घाईत पत्र उघडले आणि एका दमात पुर्ण वाचून काढले. पत्र एखाद्या परी कथेसारखं मला अचंभित करुन गेले. लिहिले होते :


'आदरणीय सर, मी एक छोटीशी भेंट आपल्याला देत आहे. आपल्या उपकारांचे ओझे मी कधी उतारू शकेल असे मला वाटत नाही. ही भेट मी माझ्या न बघीतलेल्या बहिणीसाठी आहे. घरी सर्वांना माझा नमस्कार.

आपला,

अमर.


माझ्या डोळ्यांसमोर खुप वर्षांपुर्वीच्या घटना एकाद्या चित्रपटासारख्या सरकू लागल्या. एक दिवस मी गावात फिरत एका पुस्तकांच्या दुकानात आपली आवडती मासिकं चाळत होतो. माझे लक्ष बाहेर पुस्तकांच्या एका छोट्या ढिगाऱ्याजवळ उभ्या असलेल्या मुलावर पडली. तो पुस्तकांच्या दुकानात घुसणाऱ्या प्रत्त्येक व्यक्तिला काही विनंती करत होता व काही प्रतिसाद न मिळाल्यावर परत आपल्या जागी जाऊन उभा रहात होता.

मी बराच वेळ मुकाट्याने हे दृश्य बघत राहिलो. पहिल्या नजरेत हे फुटपाथवर दुकान लावणाऱ्या विक्रेत्यांसारखे वाटत होते, परंतु त्या मुलाच्या चेहऱ्यावरची निराशा सामान्य वाटत नव्हती. प्रत्त्येक वेळी तो नव्याने प्रयत्न करायचा, परत तीच निराशा. बऱ्याच वेळ त्याला बघीतल्यावर मी आपली उत्सुकता थांबवू शकलो नाही आणि त्या मुलाजवळ जाऊन उभा राहिलो. तो मुलगा काही साधी विज्ञानाची पुस्तकें विकत होता. मला बघून त्याच्यात परत आशा संचारली आणि उत्साहाने त्याने मला पुस्तकं दाखवायला सुरुवात केली. मी त्या मुलाला लक्षपूर्वक बघीतले. स्वच्छ, चेहऱ्यावर आत्मविश्वास पण कपडे अगदीच साधारण. थंडीचे दिवस होते व तो केवळ एक हलकेसे स्वेटर घातलेला होता. पुस्तकं माझ्या काहीच कामाची नव्हती तरी मी जसे काही सम्मोहीत होऊन त्याला विचारले... 

‘बेटा, ही सारी पुस्तकं केवढ्याची आहेत?’

‘तुम्ही किती देऊ शकता, सर?’

‘अरे, तु काही तरी किंमत ठरवली असशीलच ना.’

‘आपण जे द्याल ते,’ मुलगा थोडा निराश होऊन बोलला.

‘तुला किती पाहिजेत?’ तो मुलगा समजून चुकला की मला काही पुस्तकं घ्यायची नाहीत व मी त्याच्यासोबत टाईम पास करीत आहे.

‘पाच हजार रुपये,’ तो मुलगा वाकडं तोंड करून बोलला.

‘या पुस्तकांचे कोणीही पाचशे पण दिले तरी जास्त होतील,’ मला त्याला दुःखी करायचे नव्हते तरी माझ्या तोंडून सहज निघून गेले.

आता त्या मुलाचा चेहरा पहाण्यासारखा झाला होता. जशी की कुणी खूप सारी उदासी त्याच्या चेहऱ्यावर ओतून दिली आहे. मला माझ्या बोलण्याचा खुप पश्र्चाताप झाला. मी त्याच्या खांद्यावर हात ठेवला व त्याला धीर देत विचारले, ‘बघ बाळ, मला तु पुस्तके विकणारा वाटत नाहीस, काय कारण आहे. स्पष्ट सांग की तुझी काय गरज आहे?’

त्या मुलाच्या मनाचा धीर सुटला. बहुतेक बऱ्याच वेळचा नैराश्याचा चढ-उतार आता त्याच्या सहनशिलतेच्या पलीकडे गेला होता.

‘सर, माझी बारावी झालेली आहे. माझे वडील एका छोट्या हाॅटेलात काम करतात. माझी वैद्यकीय शिक्षणासाठी निवड झालेली आहे. आता मला प्रवेश घेण्यासाठी पैशाची गरज आहे. माझे वडील काही पैसे देण्यास तयार आहेत, बाकी अजून पैशांची व्यवस्था करणे त्यांना शक्य नाही.' मुलाने एका दमात इंग्रजीत हे सर्व सांगितले.

‘तुझे नाव काय आहे ?’ मी मंत्रमुग्ध होऊन विचारले.

‘अमर विश्वास.’

‘तु विश्वास आहेस आणि मन छोटं करतोस? किती पैसे पाहिजेत?’

‘पाच हजार,’ या वेळी त्याच्या स्वरात करुणा होती.

‘जर मी हे पैसे तुला दिलेत तर परत करू शकशील का? या पुस्तकाची तर इतकी किंमत नाही,’ या वेळी मी थोडं हसून विचारले.

‘सर, तुम्हीच तर म्हणालात की मी विश्वास आहे. तुम्ही माझ्यावर विश्वास करू शकता. मी गेल्या चार दिवसांपासून येथे येत आहे, तुम्ही पहिल्या व्यक्ती आहात ज्याने एवढे तरी विचारले. जर पैशांची व्यवस्था होऊ नाही शकली तर मी ही आपल्याला एखाद्या हाॅटेलात कप-बशा धूतांना दिसेल,’ त्याच्या स्वरात आपले भविष्य बुडण्याची शंका होती.

त्याच्या स्वरात असे काय होते माहीत नाही, जे माझ्या अंतःकरणात त्याला मदत करण्याची भावना उपजू लागली. मेंदू त्याला एक धोकेबाज पेक्षा जास्त काही मानण्यास तयार नव्हता, परंतू हृदय हा विचार स्विकारत नव्हते.

शेवटी हृदय जिंकले. मी पर्स मधून पाच हजार रूपये काढले, ज्यांना मी शेयर मार्केट मध्ये लावण्याचा विचार करीत होतो, त्याच्या हातात दिले. तसे एवढे रूपये माझ्यासाठी ही महत्त्वाचे होते, परंतू न जाने कोणत्या मोहाने माझ्याकडून ते पैसे काढून घेतले.

‘बघ बाळा, तुझ्या बोलण्यात, तुझ्या इच्छाशक्ती मध्ये किती दम आहे हे मला माहीत नाही, परंतू माझे मन म्हणते की तुला मदत केली पाहिजे, त्यामुळे करतो आहे. तुझ्यापेक्षा चार-पाच वर्षांनी लहान मुलगी मिनी आहे मला. तिला काही खेळणं घेऊन दिले असे समजेल,’ मी अमर कडे पैसे देत म्हणालो.

अमर स्तब्ध होता. त्याला बहुतेक विश्वास बसत नव्हता. त्याच्या डोळ्यात अश्रू आले. त्याने माझ्या पायांना स्पर्श केला तर त्याच्या डोळ्यातून निघालेल्या दोन थेंबांनी पायांचे चुंबन घेतले.

‘ही पुस्तकं मी तुमच्या गाडीत ठेवून देवू ?’

‘काही गरज नाही. यांना तु तुझ्या जवळच ठेव. हे माझे कार्ड आहे, केव्हाही कधी गरज पडली तर मला सांग.’

तो पुतळ्यासारखा उभा होता. मी त्याच्या खांद्यावर थोपटले, कार चालू करून निघालो.


ती घटना माझ्या डोळ्यांसमोर फिरत होती आणि मी खेळलेल्या जुगारा विषयी विचार करत होतो, ज्यात अनिश्चितताच ज्यास्त होती. कोनी दूसरा ऐकेल तर मला एक "भावुक मूर्ख व्यक्ती'' पेक्षा जास्त समजला नसता. म्हणून ही घटना कुणाला न सांगण्याचा मी निर्णय घेतला. दिवस पुढे सरकत गेले. अमर ने आपल्या मेडिकल मधील प्रवेशाची माहीती पत्र पाठवून दिली होतीच. मला आपल्या मुर्खपणात माणूसकी दिसली. एक गुप्त शक्ति किंवा माझ्यात बसलेल्या माणसाने मला प्रेरित केले की मी हजार दोन हजार रुपये त्याच्या पत्त्यावर पुन्हा पाठवून देऊ. भावना जिंकल्या आणि मी पुन्हा आपला मुर्खपणा गिरवला. दिवस पुढे सरकत गेले. त्याचे संक्षिप्त पत्र यायचे ज्यात चार ओळी लिहिलेल्या असायच्या. दोन माझ्यासाठी, एक आपल्या अभ्यासाविषयी, आणि एक मिनी साठी, जिला तो आपली बहीन म्हणत होता. मी आपली मुर्खता गिरवायचो व विसरून जायचो. मी कधी त्याच्याकडे जाऊन आपल्या पैशांचा विनियोग बरोबर होतोय का हे बघण्याचा प्रयत्न ही केला नाही, तो ही कधी माझ्या घरी आला नाही.


काही वर्षांपर्यंत हा दिनक्रम चालू राहिला. एक दिवस त्याचे पत्र आले की तो उच्च शिक्षणासाठी आॅस्ट्रेलिया ला जात आहे. शिष्यवृत्तीं विषयी ही लिहिले होते व एक ओळ मिनी साठी पण लिहायला तो विसरला नव्हता. मला आपल्या माझ्या मचर्खपणा वर दुसऱ्यांदा गर्व झाला, त्या पत्राचा खरेपणा जाणून न घेता. दिवस पंख लागल्यासारखे उडत राहीले. अमर नी आपल्या लग्नाचे निमंत्रण पाठविले. तो बहुतेक आॅस्ट्रेलिया मध्येच स्थायीक होण्याच्या विचारात होता.

मिनी चे ही शिक्षण पुर्ण झाले होते. एका प्रतिष्ठित परिवारात तिचे लग्न ठरले. आता मला मिनी चे लग्न मुलाच्या घराण्यास शोभेल असे करायचे होते. सरकारी नोकरीतला का एक मोठा अधिकारी कागदी सिंहच असतो. लग्नाच्या तयारी साठी खुपशा पैशांची व्यवस्था… डोक्यातील विचार… आणि आता तो चेक? मी परत आपल्या दुनियेत व वापस आलो. मनात परत अमर ची आठवण काढली आणि मिनी च्यख लग्नाची पत्रिका अमर ला ही पाठवून दिली.

लग्नाची गडबड चालली होती. मी आणि माझी पत्नी तयारीत व्यस्त होतो आणि मिनी आपल्या मैत्रीणींमध्ये. एक मोठी गाडी दरवाज्यात येऊन थांबली. एका प्रतिष्ठित दिसणाऱ्या व्यक्तीसाठी ड्रायवर ने गाड़ी चे दार उघडले, तर त्या व्यक्ती च्या सोबत लहान मुलाला कडेवर घेऊन त्याची पत्नीही गाड़ीतून उतरली. मी आपल्या दरवाजा वर जाऊन उभा राहिलो तर त्या व्यक्तीला आधी कुठेतरी बघीतल्या सारखे वाटले. त्याने येऊन माझी पत्नी व माझ्या पाया पडला.

‘‘सर, मी अमर…’’ तो मोठ्या श्रद्धेने बोलला.


माझी पत्नी आश्र्चर्य चकित होऊन उभी होती. मी मोठ्या अभिमानाने त्याला आलिंगन दिले. त्याचा मुलगा माझ्या पत्नीच्या कडेवर आरामात बसला होता. मिनी अजूनही संशयाने बघत होती. अमर खुप भेटवस्तू सोबत घेऊन आला होता. मिनीला त्याने मोठ्या प्रेमाने आलिंगन दिले. मिनी ला भाऊ मिळाल्याने ती खुप खुश होती. अमर लग्नात मोठ्या भावाच्या प्रत्त्येक परंपरा निभावण्यात व्यस्त होता. त्याने माझ्यावर कोणतीही मोठी जबाबदारी येऊ दिली नाही की मला एकही पैसा खर्च करु दिला नाही. त्याचे भारत प्रवासाचे दिवस पंख लागल्या सारखे उडून गेले. या वेळी जेव्हा अमर आॅस्ट्रेलिया ला परत चालला होता तेव्हा विमानतळावर त्याला निरोप देताना फक्त माझेच नाही तर माझी पत्नी, मिनी सर्वांचे डोळे पाणावले होते. विमान ऊंचच ऊंच आकाशाला स्पर्श करण्यासाठी निघाले आणि त्यासोबतच माझा विश्वासही आकाशाला स्पर्श करीत होता. मला आपल्या मुर्खपणावर परत एकदा गर्व झाला आणि विचार करीत होतो की या विनाशी सृष्टी ला चालवणारा कोणी भगवान नाहीं, आमचा विश्वासच आहे....


*आत्ता  आपल्या कडे कितीका पैसे असेनात पण आपल्या  अडचणीच्या वेळी आपल्याला  हात दिला..साथ दिली ..* *सावरले...ते विसरु नका... पैसे परत देता येतीलही पण ती वेळ परत देता येणार नाही.....गजानन गोपेवाड *


ध्यान साधना

 खूप छान माहिती आहे संपुर्ण वाचा👌


 1. घशात अन्न अडकणे

 2. मान दुखणे

 3. पायात गोळे येणे

 4. पायला मुंग्या येणे.

 विशेषत: ज्येष्ठ नागरिकांसाठी खाली दिलेले सोपे उपाय डॉक्टरांकडे जाण्यापूर्वी  मदतीचे ठरू शकतात.

समस्या व‌ उपाय

 *१. घशात अन्न‌ अडकणे*

 आपल्याला फक्त "हात वर करणे" आवश्यक आहे.

 हात डोक्यापेक्षा वर सरळ ताणल्यास , आपल्या घश्यात अडकलेले अन्न आपसुक खाली जाण्यास मदत होईल.

 *२. मान दुखी*

 कधीकधी आपण मानेच्या दुखण्यासह सकाळी उठतो. याला चुकीची उशी वापरणे हे एक कारण असू शकते. अशा परिस्थितीत आपण फक्त आपले पाय उचलून जर बोट ओढून आपले पाय एका घड्याळाच्या दिशेने किंवा घड्याळाच्या विरूद्ध‌ दिशेने हलवले तर आराम मिळू शकेल

 *३. पायात गोळे येणे*

 जेव्हा आपल्या डाव्या पायाला गोळे अथवा‌ पेटके आले असतील तर आपला उजवा हात उंच करा, जेव्हा आपल्या उजव्या पायात पेटके आले असतील तर आपला डावा हात उंच करा. तुम्हाला त्वरित बरे वाटेल.

 *४. पायाला मुंग्या येणे*

  जेव्हा डावा पायास मुंग्या येत असतील तेव्हा आपल्या सर्व सामर्थ्याने आपला उजवा हात गोलाकार फिरवा, जेव्हा उजवा पाय मुंग्या येत असेल, तेव्हा आपल्या सर्व सामर्थ्याने आपला डावा हात गोलाकार फिरवा. याने‌ लगेच फायदा होईल.

 फक्त ही माहिती जतन करू नका.

.. 🚶🏾‍♀️🚶🏾‍♂️🏃🏾‍♀️🏃🏾‍♂️👩🏾‍🦯🧑🏾‍🦯🚶🏾‍♀️🚶🏾‍♂️🏃🏾‍♀️🏃🏾‍♂️

*चालणे म्हणजे दुसरे हदय*

आपल्या पायाच्या पोटरीच्या स्नायूंना जर आपले "दुसरे हृदय" म्हटले तर ती अतिशयोक्ती नक्कीच होणार नाही.

सर्वाँना हृदयाचे कार्य काय असते ते ठाउक असेलच.

हृदय म्हणजे शरीरातील एक पंप आहे. हा पंप रक्ताला पुढे पुढे ढकलत राहतो आणि त्यामुळे रक्त शरीरात धमण्या आणि नीला याच्यातून गोल गोल फिरत राहते, ते एका ठिकाणी साचून राहातं नाही.

पण शरीरात आणखीही एक पंप कार्यरत असतो.

होय. खर आहे.

*आपले पोटरीचे स्नायू हेच आपले दुसरे हृदय आहे.*

हृदयाचे काम काय तर रक्त वाहिन्यांच्या जाळ्यातून सतत वाहते ठेवणे. यालाच रक्ताभिसरण असे म्हणतात.

रक्त असे गोल गोल सतत वाहत ठेवणे अत्यंत जरुरी आहे. तसे न झाल्यास आणि जर रक्त एकाच ठिकाणी साचून राहिले, तर शरीरातील अवयवांना रक्त पुरवठा होणार नाही आणि रक्ताच्या गुठळ्या बनून त्या प्राणघातक ठरू शकतात. हृदयाला शरीरात रक्त फिरते ठेवण्यास पायाच्या पोटरीचे स्नायू मदत करतात. जेव्हा आपण चालतो किंवा धावतो त्यावेळी पोटरीचे स्नायू आकुंचन पावतात आणि स्नायूतील रक्तवाहिन्यांमध्ये असलेले रक्त हृदयाच्या दिशेने ढकलून दिले जाते. निसर्गाने आपल्या शरीराची रचनाच तशी केलेली आहे.

पायाच्या पोटरी मधील रक्त वाहिन्या ( नीला ) या एका प्रकारे रक्ताचा साठा करण्याचे काम करतात.

त्यांना " मसल विनस सायनस असे" म्हणतात.

ज्यावेळी पायाचे स्नायू आकुंचन पावतात त्यावेळी पायात साठलेले रक्त नीलांमधून वर, म्हणजे हृदयाच्या दिशेने ढकलले जाते. या पायांच्या रक्त वाहिन्या मध्ये विशेष प्रकारच्या झडपा असतात. या झडपा रक्त वाहण्याची दिशा ठरवितात. या झडपा, रक्ताला पायाकडून हृदयाकडे जाऊ देतात, परंतु हृदया कडून पायाकडे जाऊ देत नाहीत. आपण उभे असताना गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावा मुळे रक्त हे खालच्या दिशेनेच जाण्याचा प्रयत्न करणार हे साहजिकच आहे. या झडपा, गुरुत्वाकर्षणामुळे  रक्त पायात साचू देत नाहीत आणि रक्ताला हृदयाच्या दिशेने जाण्यास भाग पाडतात. आपण जेव्हा चालतो किंवा धावतो त्यावेळी पोटरीचे स्नायू आकुंचन पावतात व हृदयास रक्ताभिसरण करण्यास मदत करतात.

घोट्याखालचा जो पाय असतो त्यात देखिल काही प्रमाणात रक्ताचा साठा केला जातो.

आपण ज्यावेळी चालतो, त्यावेळी सर्वप्रथम तळपा यातील स्नायू आकुंचन पावल्याने तेथील रक्त वर हृदयाच्या दिशेने ढकलले जाते, नंतर जेव्हा पोटरीचे स्नायू आकुंचन पावतात त्यावेळी सर्व रक्त गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेने आणखी  पुढे ढकलले जाते आणि हृदयापर्यत पोहोचते.

रक्त वाहिण्यातील झडपा रक्ताला खाली येण्यापासून रोकतात. 

आपण एकाच ठिकाणी खूप वेळ स्तब्ध बसून राहिलो ( विमानात, कारमध्ये, खुर्चीत   बरेच तास ) तर पोटरीचे स्नायू आकुंचन पावू शकत नाहीत. रक्त पायातच साचून राहते आणि रक्ताच्या गुठळ्या ( DVT, deep vein thrombosis ) होण्याची शक्यता वाढते. म्हणून चालणे व पळणे किती महत्त्वाचे आहे ते कळते. 

एखादा रुग्ण खूप दिवस अंथरुणात खिळून राहिला तर त्याला DVT होऊ शकते.

याचा अर्थ त्याच्या पायाच्या रक्त वाहिन्या मध्ये रक्ताच्या गाठी होतात. त्यामुळे पायाच्या पोटऱ्या दुखतात, तसेच सूज देखिल येते. अश्या प्रकारच्या रक्ताच्या गाठी पायातून निसटून फफुसात जाऊन फसू शकतात ज्याने जीवाला धोका उद्भवू शकतो.

जर पोटरितील झडपा कोणत्याही कारणाने खराब झाल्या तरी देखील पाय दुखू शकतात. झडपा खराब झाल्या की रक्त पायात साचून राहते. पाय जड होणे, थकवा, पाय ठसठसणे,

घोट्यात सूज, फुगलेल्या पायाच्या नसा, पायात अचानक चमक येवून दुखणे,

खाज येणे, चमडीचा रंग बदलणे, पायात बरी न होणारी जखम होणे, इत्यादी त्रास होऊ शकतो.

*थोडक्यात - चालत रहा,* शक्य असल्यास धावत रहा.

निरोगी आणि सुदृढ रहा.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*👩🏾‍🦯🏃🏻‍♂️चाला आरोग्यासाठी.* 🚶🏾‍♀️🏃🏻‍♂️

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

       जर तुम्ही रोज पहाटे चालत असाल तर तुम्हाला जे फायदे सकाळी मिळतात ते पहाटे मिळणार नाहीत.

जर आपण योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने चाललात तर तुम्हाला आरोग्यदायी असे अनेक फायदे मिळतील...

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

    ...होय सकाळी कोवळे ऊन येत असताना सहा/ साडेसहाच्या दरम्यान जर तुम्ही कोवळ्या उन्हामध्ये चालायला सुरुवात कराल तर तुम्हाला भरपूर फायदे मिळू शकतात.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*सकाळी चालणे आवश्यक का आहे?*

      जेव्हा तुम्ही सकाळी चालायला जाता तेव्हा कोवळे ऊन जर असेल तर तुम्हाला विटामिन डी भरपूर प्रमाणात मिळेल,

त्यामुळे शरिरातील विटामिन डी ची कमतरता भरून निघेल.

दररोज सकाळी चालण्यामुळे तुम्हाला ऑक्सिजन भरपूर प्रमाणात मिळेल.

अंधारात ऑक्सीजन कमी उपलब्ध असल्यामुळे तो कमी मिळतो, कारण रात्री झाडे कार्बन डायऑक्साइड सोडतात.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

आपल्या हाडांना मजबूत करण्यासाठी कॅल्शियम सोबतच विटामिन डी खूप आवश्यक असते, जर तुम्ही योग्य प्रमाणात कोवळे ऊन तुम्हाला मिळाले तर शरीरात कॅल्शियम चा उपयोग योग्य पद्धतीने होऊ शकतो.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*स्ट्रेस / तणाव मुक्ती साठी उपयोगी.*

        मानसिक ताणतणाव असणाऱ्या व्यक्तींना सकाळच्या कोवळ्या उन्हात फिरणे अत्यंत उपयुक्त आहे, किबहुना आवश्यकचं आहे , यामुळे सकाळचे सकाळी चालण्याने मिळणारे सर्व फायदे डिप्रेशन कमी करण्यासाठी उपयोगी उपयुक्त आहेत. त्याचबरोबर तुम्ही जर डायबिटीक आहात तर त्या व्यक्तीने कोवळ्या उन्हामध्ये जर फिरले तर डायबेटिस, ब्लडप्रेशर आणि हृदयरोग त्याचबरोबर मानसिक ताणतणाव दूर राहण्यास मदत होते.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*सकाळीच का चालायचे?*

      सकाळी हवेमध्ये प्रदूषण कमी असते, वातावरणात शांतता असते, स्फूर्ती प्रदान करणारे असते, त्याचबरोबर शरीरास व्यायाम होतो. ज्याचा फायदा तुमची ऑक्सिजन लेवल वाढण्यासाठी होतो  यामुळे तुमची फुप्फुसाची कार्यक्षमता वाढते आणि  प्रतिकारशक्तीही  वाढते, फक्त चालताना एकमेकांशी गप्पा मारू नयेत हे महत्त्वाचे.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*चालण्याचे सर्वसाधारण फायदे.*

१) त्वचा चमकदार होते, 

२) हृदयाचा स्वास्थ्य चांगले राहते, 

३) मधुमेह नियंत्रणात राहतो, 

४) वजन कमी करण्यासाठी उपयुक्त, 

५) मेंदूची कार्यक्षमता वाढते, 

६) झोप चांगली लागते, 

७) प्रतिकारशक्ती वाढते, 

८) कोलेस्ट्रॉल कमी होते, 

९) कॅन्सर चे पेशंटना उपयोगी, 

१०) मेंदूची कार्यक्षमता वाढते, 

११) प्रतिकारशक्ती वाढते, 

१२) हृदयाची कार्यक्षमता वाढते, 

१३) थकवा दूर होतो, 

१४) शरीरात स्फूर्ती येते, 

१५) कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत, 

१६) चरबीच्या गाठी कमी होण्यास मदत होते.

१७) सर्व प्रकारच्या

 *आजारांपासून मुक्त राहण्यासाठी उपयुक्त.*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

           एकूणच तुमच्या संपूर्ण शारीरिक स्वास्थ्यासाठी दररोज सकाळी कमीतकमी (45 मिनिटे 90 मिनिटे) चालणे आवश्यक आहे....

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*चालणे सुरू करताना काय आहे आवश्यक*

१) एक जोडी स्पोर्ट्स शूज,

२) शॉर्ट किंवा लेगिन्स, 

३) शॉर्ट टी-शर्ट, 

४) महिलांसाठी स्पोर्ट्स ब्रा हेअर बँड , 

५) स्पोर्ट्स वॉटर बॉटल 

आणि 

६) तुमचा उत्साह...

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

🚶🏾‍♀️🏃🏾‍♂️ *चाला आरोग्यासाठी....*🚶🏾‍♂️🏃🏾‍♀️

*( सुबह की हवा ; सव्वा लाख की दवा...)*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*पायी चालण्याचे हे फायदे वाचून व्हाल थक्क!* 

अनेकजण सांगतात की, पायी चालल्याचे अनेक फायदे आहेत. अनेकजण चालण्याचे फायदे माहीत असूनही चालणे टाळतात. पण आजच्या लाइफस्टाइलमध्ये चालणे फारच गरजेचे झाले आहे. नुकत्याच करण्यात आलेल्या एका अभ्यासातून समोर आले आहे की, वेगात चालण्याने डिप्रेशनपासून मुक्ती मिळते.  वेगात चालण्याने रुग्णालयात अॅडमिट होण्याची आणि तिथे जास्त काळ राहावं लागण्याची भीती कमी होते. 

 हळू चालणा-यांच्या तुलनेत वेगाने चालणा-यांची तीन वर्षात रुग्णालयात अॅडमिट होण्याची 37 टक्के शक्यता कमी आढळली आहे. 

चालणे वयोवृद्धांमध्ये अधिक लोकप्रिय आहे. तरुणांनी पण याचा फायदा घ्यावा. हा व्यायाम एकही पैसा खर्च न करता आणि कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय केला जाऊ शकतो. 

*वेगाने चालण्याचे फायदे -*

*1)* आठवड्यातून 2 तास चालण्याने ब्रेन स्ट्रोक शक्यता 30 टक्के कमी होते. 

*2)* रोज 30 ते 60 मिनिटे पायी चालण्याने हार्ट अटॅकची शक्यता कमी असते.

*3)* रोज 30 ते 40 मिनिटे पायी चालल्याने मधुमेहाचा धोका 29 टक्के कमी होतो.

*4)* दिवसातून 30 मिनिटे पायी चालल्याने डिप्रेशनची शक्यता 36 टक्के कमी असते.

*5)* रोज कमीत कमी १ तास पायी चालल्याने जाडेपणा कमी होतो.

*6)* सकाळी चालण्यामुळे सकाळच्या वातावरणातील शुद्ध ऑक्सिजनचा शरीराला पुरवठा होतो.

*7)* हाडांच्या मजबुतीसाठी आवश्यक असलेले डी जीवनसत्त्व सकाळच्या कोवळ्या उन्हातून मिळते.

*8)*  चालण्यामुळे एकाच वेळी शारीरिक व मानसिक व्यायामही होतो.

*9)* सतत काम करून तन-मनाला आलेला थकवाही चालण्यामुळे दूर होतो.

*10)*  चालण्यामुळे तणाव आणि चिडचिडपणा दूर होण्यास मदत

*11)* चालण्यामुळे झोपही चांगली लागते.

*12)* मन एकाग्रतेसाठी व चिंतनासाठीही चालणे फायदेशीर ठरते.

*13)*  वजन कमी करायचे असल्यास हा व्यायामप्रकार उत्तम

*14)*  चालण्यामुळे शरीरातील जास्तीचे उष्मांक जाळते

*15)* चालण्यामुळे शरीरातील चरबीचे प्रमाण कमी करते.

*16)*  दररोज एक तास चालल्यास संधिवाताचा त्रास कमी होऊ शकतो, असं संशोधनातून समोर आलंय.

*17)*  चालण्यामुळे पचनक्रिया सुधारते, मलबद्धतेसारखे, पचनाचे विकार कमी होतात.

*18)*  झपझप चालण्यामुळे हृदयाची गती वाढतो.

*19)* नियमित चालण्याची सवय असणारयांमध्ये ह्रदयविकाराने मृत्यू येण्याचे प्रमाण ५० टक्के पेक्षा कमी असते.

*20)* नियमित चालण्याने फुप्फुसाची कार्यक्षमता वाढते.

*21)* नियमित चालण्यामुळे पाठीचे दुखणे, हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, श्वासाच्या त्रासावर नियंत्रण मिळवता येते.

*22)*  नियमित चालण्यामुळे चयापचय संस्था सुधारते. अंतस्त्रावी ग्रंथीचे कार्य सुधारते.

*23)*  हाडांची मजबुतीही चालण्यामुळे वाढते.

*24)*  नियमित चालण्यामुळे कंबर, मांड्या, पायाचे स्नायू मजबूत होतात.

*25)*  मोतीबिंदूची शक्यता कमी होते.

*26)* नियमित चालण्यामुळे काही विशिष्ट प्रकारच्या कॅन्सर पासून बचाव होतो.

*27)*  नियमित चालण्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी उपयोग.

*28)*  चालण्यातून नैराश्याची पातळी खाली येण्यास मदत तर होते

*29)*  दररोज ३० मिनिटे नियमित चालण्यामुळे सरासरी आयुष्य ३ वर्षांनी वाढते. 

*30)* नियमित चालणे ही दीर्घायुष्याची गुरुकिल्ली आहे.

संकलन,,, गजानन गोपेवाड


 

स्वतंत्र दिन व प्रजासत्ताक दिन यामधील नेमका फरक

 *एक माहिती, जी आपल्याला कायम माहित असावी*



*स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन यामध्ये का फरक आहे?* 🤔


*१५ ऑगस्ट (१९४७)* : स्वातंत्र्य दिन - 

या दिवशी देशाला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळाले, देश परकीय राजवटीपासून मुक्त झाला.


*२६ जानेवारी (१९५०)* : प्रजासत्ताक दिन -

 या दिवशी देशाची राज्यघटना अस्तित्वात आली, लोकाधिकार लागू झाले.



१५ ऑगस्ट अर्थात देशाच्या स्वातंत्र्यदिनी ध्वज वेगळ्या पद्धतीने फडकावला जातो. तर २६ जानेवारीला वेगळ्या पद्धतीने फडकावला जातो. यात नेमका फरक काय आहे?


*पहिला फरक – ध्वज फडकावणारी व्यक्ती*


यातला पहिला फरक म्हणजे १५ ऑगस्टला म्हणजेच स्वातंत्र्यदिनी देशाचे पंतप्रधान लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकावतात. तर २६ जानेवारीला देशाचे राष्ट्रपती राजपथावर ध्वज फडकावतात. याचं कारण म्हणजे १५ ऑगस्ट १९४७ रोजी देश स्वतंत्र झाला, तेव्हा राष्ट्रपती हे पद अस्तित्वात आलेलं नव्हतं. कारण तेव्हा देश प्रजासत्ताक नव्हता. राज्यघटनाच अस्तित्वात नव्हती. त्यामुळे त्या दिवशी पंतप्रधान राष्ट्रध्वज फडकावतात. तर २६ जानेवारी १९५० रोजी देशानं राज्यघटनेचा स्वीकार केला, देश प्रजासत्ताक झाला आणि राष्ट्रपती हे घटनात्मक पद अस्तित्वात आलं. त्यामुळे या दिवशी राष्ट्रपती राजपथावर ध्वज फडकावतात.


*दुसरा फरक – राष्ट्रध्वजाची जागा*


दुसरा फरक म्हणजे १५ ऑगस्टला ध्वज दांडीला खाली बांधलेला असतो. पंतप्रधान तो दोरीच्या सहाय्याने वर चढवतात आणि नंतर फडकावतात. स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या अनेक स्वातंत्र्यसेनानींच्या यशाचं द्योतक म्हणून या दिवशी ध्वज खालून वर चढवला जातो. त्याउलट २६ जानेवारी रोजी ध्वज दांडीच्या वरच्या टोकाला बांधलेला असतो. राष्ट्रपती दोरी खेचून तिथेच ध्वज फडकावतात. कारण या दिवशी देश आधीपासूनच स्वतंत्र होता आणि प्रजासत्ताक झाला.


*तिसरा फरक – ध्वज फडकावण्याचं ठिकाण*


तिसरा फरक म्हणजे १५ ऑगस्टला पंतप्रधान लाल किल्ल्यावरून राष्ट्रध्वज फडकावतात. देशाचे कार्यकारी प्रमुख म्हणून लाल किल्ल्यावरूनच ते देशाला उद्देशून भाषण करतात. तर २६ ऑगस्टला राष्ट्रपती राजपथावर राष्ट्रध्वज फडकावतात. देशाचे घटनात्मक प्रमुख म्हणून राजपथावरील पथसंचलनाला उपस्थिती लावतात


- संकलित,गजानन गोपेवाड 

ध्यान साधना

 *परीक्षेतील एक प्रश्न असा होता की, पुढील वाक्याचा भावार्थ लिहा :*  *बँकांमध्ये कोट्यवधी रुपयांचे घोटाळे झालेत... पण दोरीला बांधलेला पेन मात्र तसाच राहिला... एका प्रतिभावंत विद्यार्थ्याने लिहिलेला अर्थ (उत्तर) खालील-प्रमाणे आहे... लक्ष्मीला लोक चोरून नेऊ शकतात... पण सरस्वतीला नाही... म्हणूनच आपण आपल्या मुलांना सुशिक्षित करायचं असतं, धनवंत नव्हे..."फणसाची चव आणि रूप यातला फरक खाणाऱ्यालाच कळतो"... "माणसाची पारख ही रूपावरून करू नका... खरा महत्त्वाचा असतो, तो त्याचा स्वभाव"...!जेव्हा अंडे बाहेरील ताकदीमुळे फुटते; तेव्हा एक जीवन संपते... पण तेच अंडे आतील ताकदीमुळे फुटते; तेव्हा एक जीवन सुरू होते... आतून मिळालेली ताकद सदैव जीवन घडवतेच... स्वत:वरील विश्वास कधीही कमी होऊ देऊ नका..सूर्योदय हे केवळ एक औचित्य असते... खरं तर दिवस हा आपल्या सुंदर विचारांनी सुरू होतो... जीवन मोजकेच असते... ते हसत हसत जगायचे असते... जुळलेले नाते कधी तोडायचे नसते... सुख दु:खाने भरलेले हे आयुष्य असते... कुठे काही हरवते, तर कुठे काही सापडते... त्यातूनच सापडलेले जपायचे असते...जर तुम्ही पाहिलेली स्वप्नं पूर्ण होत नसतील, तर तुमच्या कामाची पद्धत बदला... तुमचे तत्त्व नाही... कारण झाडं नेहमी आपली पानं बदलतात, मूळ नाही.....*गजानन गोपेवाड 

🙏🌹 *सुप्रभात* 🌹🙏



ध्यान साधना

 **************

एक महिला रोज मंदिर जाती थी ! एक दिन उस महिला ने पुजारी से कहा अब मैं मंदिर नही आया करूँगी !


इस पर पुजारी ने पूछा -- क्यों ?


तब महिला बोली -- मैं देखती हूँ लोग मंदिर परिसर में अपने फोन से अपने व्यापार की बात करते हैं ! कुछ ने तो मंदिर को ही गपशप करने का स्थान चुन रखा है ! कुछ पूजा कम पाखंड,दिखावा ज्यादा करते हैं !


इस पर पुजारी कुछ देर तक चुप रहे फिर कहा -- सही है ! परंतु अपना अंतिम निर्णय लेने से पहले क्या आप मेरे कहने से कुछ कर सकती हैं !


महिला बोली -आप बताइए क्या करना है ?


पुजारी ने कहा -- एक गिलास पानी भर लीजिए और 2 बार मंदिर परिसर के अंदर परिक्रमा लगाइए । शर्त ये है कि गिलास का पानी गिरना नहीं चाहिये !


महिला बोली -- मैं ऐसा कर सकती हूँ !


फिर थोड़ी ही देर में उस महिला ने ऐसा ही कर दिखाया ! उसके बाद मंदिर के पुजारी ने महिला से 3 सवाल पूछे -


1.क्या आपने किसी को फोन पर बात करते देखा?


2.क्या आपने किसी को मंदिर में गपशप करते देखा?


3.क्या किसी को पाखंड करते देखा?


महिला बोली -- नहीं मैंने कुछ भी नहीं देखा !


फिर पुजारी बोले --- जब आप परिक्रमा लगा रही थीं तो आपका पूरा ध्यान गिलास पर था कि इसमें से पानी न गिर जाए इसलिए आपको कुछ दिखाई नहीं दिया|


 अब जब भी आप मंदिर आयें तो अपना ध्यान सिर्फ़ परम पिता परमात्मा में ही लगाना फिर आपको कुछ दिखाई नहीं देगा| सिर्फ भगवान ही सर्वत्र दिखाई देगें|


      '' जाकी रही भावना जैसी ..

        प्रभु मूरत देखी तिन तैसी|''


जीवन मे दुःखो के लिए कौन जिम्मेदार है ?


 👉🏻ना भगवान,

 👉🏻ना गृह-नक्षत्र,

 👉🏻ना भाग्य,

 👉🏻ना रिश्तेदार,

 👉🏻ना पडोसी,

 👉🏻ना सरकार,


जिम्मेदार आप स्वयं है|


1.आपका सिरदर्द आपके फालतू विचार का परिणाम है। 

2.पेटदर्द गलत खाने का परिणाम। 

3.आपका कर्ज जरुरत से ज्यादा खर्चे का परिणाम। 

4.आपका दुर्बल/मोटा/बीमार शरीर गलत भोजन शैली का परिणाम। 

5.आपके कोर्ट केस आपके अहंकार का परिणाम। 

6.आपके फालतू विवाद ज्यादा व व्यर्थ बोलने का परिणाम, उपरोक्त कारणों के अलावा सैंकड़ों और कारण भी हैं। बेवजह दूसरों पर दोषारोपण करते रहते हैं ईसमें ईश्वर दोषी नहीं है।अगर हम इन कारणों पर बारीकी से विचार करें तो पायेंगे कि मुसीबतों की वजह कहीं न कहीं हमारी मूर्खता ही है। 

आपका जीवन प्रकाशमय और सुंदर हो। 

गजानन गोपेवाड 



 🌿🌹🙏🌹🌿

मुलांना समजून घेताना

 अभ्यास करत नाही म्हणून आई मुलीला रागवली. मायलेकीच्या भांडणात अवघ्या पंधरा वर्षाच्या मुलीने चिडून रागाच्या भरात आपल्या आईचा गळा आवळून खून केला. डॉक्टर होण्यासाठी सतत अभ्यास कर म्हणून आई दटावते. या कारणाने मुलीने आपल्या जन्मदात्या आईचा जीव घेतला. या घटना पाहून वाटते “कसला हा राग आहे?” नवी मुंबईत घडलेली ही घटना अतिशय धक्कादायक आणि चिंताजनक अशीच म्हणावी लागेल.अल्पवयीन शालेय मुले हिंसक व रागीट बनताहेत. यात दोष कुणाचा पालकांचा, मुलांचा की शिक्षण व्यवस्थेचा ? सामाजिक बांधिलकी म्हणून यावर गांभीर्याने विचार व्हायला हवा.

कोरोना महामारीमुळे शिक्षणक्षेत्रासमोर अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. शाळा बंद पण ऑनलाइन शिक्षण चालू आहे. मुले घरात बसूनच मोबाइल, लॅपटॉप या उपलब्ध साहित्याच्या माध्यमातून ऑनलाइन शिक्षण घेत आहेत. कधी रेंज नसणे, कधी रिचार्ज संपणे, कधी वीज नसणे अशा अनेक अडचणी आहेत. शाळा बंद असल्याने दीड वर्षापासून मुले घरात बंदिस्त आहेत. पूर्वीसारखे मुक्तपणे वावरणे, फिरणे ,मित्रांबरोबर खेळणे, मित्रमैत्रिणींना भेटणे अशा अनेक गोष्टीवर बंधने आहेत. पालकही आर्थिक तसेच कौटुंबिक समस्या असल्याने ब-याच कुटुंबातील वातावरण फारसे चांगले नाही. ही सगळी परिस्थिती मुलांचे मानसिक संतुलन बिघडविणारी आहे. अशा वेळी कुटुंबात वादविवाद टाळायला हवा.
मुलांचे मानसिक स्वास्थ्य चांगले राहावे याकडे पालकांनी लक्ष देणे गरजेचे आहे. भीतीच्या, दडपणाच्या वातावरणात राहून मुलांच्या एकलकोंडेपणात वाढ झाली आहे. मित्रांशी प्रत्यक्ष संवाद कमी झाला आहे. घराबाहेर अजूनही कोरोनाचे संकट असल्याने मुलांच्या शारीरिक हलचाली मंदावल्या आहेत. अशा अनेक गोष्टींचा नकारात्मक परिणाम मुलांवर होत आहे. त्यामुळे मुलांचा चिडचिडेपणा, रागीटपणा व भांडखोरपणा वाढत आहे. त्यातून अशा भयंकर घटना घडून येत आहेत. भावनांवर नियंत्रण कसे मिळवावे ? रागाला आवर कसा घालावा? वादविवादाच्या वेळी संयम कसा ठेवावा? हे सगळ्याच मुलांना जमत नाही. खरंतर कोरोना महामारीमुळे निर्माण झालेली परिस्थिती सगळ्यांची परीक्षा घेणारी आहे. कोरोनापासून आपण सुरक्षित कसे राहू याची प्रत्येकाला चिंता आहे.
शिक्षणात नवा प्रयोग चालू आहे, तो म्हणजे ऑनलाइन शिक्षण. शिक्षण थांबू नये यासाठी स्वीकारलेला हा पर्याय आहे. तो सगळ्यांना आवडेल असे नाही. तो योग्य की अयोग्य? हे येणारा काळच ठरवेल. ऑनलाइन शिक्षण शंभर टक्के समाधान करु शकत नाही. ते मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवत आहे, हे ही काय थोडेके नव्हे.कोरोनाचे समाजातील प्रत्येक घटकावर चांगले वाईट परिणाम होत आहेत. माझ्या पाल्याचे शिक्षण चालू राहिले पाहिजे. त्याने शिक्षण घेऊन चांगला डॉक्टर, इंजिनियर बनले पाहिजे असे पालकांचे स्वप्न असते. यासाठी पालक प्रयत्न करत असतात. साहजिकच कुटुंबाचे स्वप्न पूर्ण करण्याची अपेक्षा मुलांकडून ठेवली जाते. त्यांनी सतत अभ्यास करावा. याकडे पालक बारकाईने लक्ष ठेवतात. त्यांना सूचना देतात. अशा वेळी मुलांच्या मनाचा विचार केला जात नाही आणि त्यामुळे मुलांना याचा प्रचंड राग येतो.
किशोरवयीन मुलांच्या शरीरात पंधराव्या सोळाव्या वर्षी हार्मोन्समुळे शारीरिक बदल घडून येतात. त्यांना स्व ची जाणीव व्हायला लागते. याच वयात मुले रागीट व चिडखोर बनतात. मोठ्या माणसांनी सांगितलेल्या गोष्टी स्वीकारण्याची त्यांची तयारी नसते. स्वतःच्या मनाप्रमाणे वागण्याकडे त्यांचा कल असतो. अशा वेळी पालक म्हणून आपली जबाबदारी वाढते. मुलांशी प्रेमाने संवाद साधला पाहिजे. त्यांच्या अडचणी जाणून घ्यायला हव्यात. सर्वात महत्त्वाचे त्यांना समजून घेतले पाहिजे. प्रत्येकवेळी रागवून चिडून उपयोग होत नसतो. त्यांना ताण येईल ,दडपण येईल असे वातावरण घरात असता कामा नये. आनंददायी आणि भयमुक्त वातावरणात मुलांची मानसिकता चांगली राहते. संयम ठेवून अडचणीच्या प्रसंगावर कशी मात करावी हे मुलांना शिकविणे आवश्यक आहे. यासाठी ध्यान, प्राणायाम यांचा चांगला उपयोग होतो. आज शिक्षणात कमालीची जीवघेणी स्पर्धा निर्माण झाली आहे. माझ्या पाल्याला प्रवेश कुठे मिळेल ? त्याच्या करिअरचे काय होईल ? असे असंख्य प्रश्न पालकांना सतावत असतात. मुलांनी सतत अभ्यास करावा अशी पालकांची इच्छा असते. ती पूर्ण करण्यास टाळाटाळ झाली की पालक मुलांना ओरडतात, रागवितात. मुलांना संगोपन करताना त्यांच्या भावना ,विचार ,त्यांची मतेही विचारात घेतली जावीत. त्यांना व्यक्ती होण्याची संधी देणे आवश्यक आहे.
मुलांची बुद्धिमत्ता ,क्षमता आणि कुवत पाहूनच आपण त्याला पुढे जाण्यास मार्गदर्शन करायला हवे.तरच पाल्य आणि पालक यांच्यामधील नाते हे मैत्रीचे,मायेचे राहू शकेल.

लेख, गजानन गोपेवाड 

16 आँगष्ट अटलबिहारी वाजपेयी यांचा आज स्मृतिदिन

 *************************************

*१६ ऑगस्ट - मा.अटल बिहारी वाजपेयी यांचा स्मृतिदिन*

*************************************


जन्म - २५ डिसेंबर १९२४ (ग्वालीयर)

स्मृती - १६ ऑगस्ट २०१८ (दिल्ली)


*कवी मनाचा प्रखर राष्ट्रवादी* अशीच प्रतिमा असलेले मा. अटल बिहारी वाजपेयी यांचा आज स्मृतिदिन.


अटलबिहारी वाजपेयी यांनी कानपूर मधून राज्यशास्त्रात एम.ए.ची पदवी मिळविल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्णवेळ कार्यकर्ता झाले.त्यांनी राष्ट्रधर्म, वीर अर्जुन आणि पांचजन्य या नियतकालिकांत पत्रकारिता केली. भारताच्या स्वातंत्र्यसंग्रमाताही ते सहभागी झाले. त्यांची राजकीय कारकीर्द म. गांधींच्या ‘चले जाव’ चळवळीपासून सुरु झाली. 


स्वातंत्र्यानंतर १९५१ मध्ये स्थापन झालेल्या ‘भारतीय जनसंघ’ या पक्षाच्या उभारणीत त्यांचा मोलाचा वाट होता. पक्षाचे संस्थापक नेते डॉ. शायामाप्रसाद मुखर्जी यांचे अटलबिहारी वाजपेयी विश्वासू सहकारी होते. वाजपेयी १९५७ साली प्रथमच संसदेत लोकसभेत निवडून आले. त्यानंतर तब्बल नऊ वेळा ते लोकसभेत निवडून गेले आहेत. पक्षाध्यक्ष पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्या दुर्देवी मृत्यूनंतर पक्षाची धुरा वाजपेयींच्या खांद्यावर आली. ते १९६८ मध्ये प्रथमच पक्षाध्यक्ष झाले. पंतप्रधान इंदिरा गांधींनी १९७५ साली भारतावर लादलेल्या देशांतर्गत आणीबाणीमध्ये त्यांना दोन वर्षे कारावासात काढावी लागली. 


आणीबाणीनंतर आपल्या सहकाऱ्यांसह, संपूर्ण पक्षच वाजपेयी यांनी १९७७ साली जनता पार्टीत विलीन केला. पण त्यानंतर अवघ्या काही महिन्यातच १९८० मध्ये वाजपेयी यांनी मुंबईत नव्या भारतीय जनता पार्टीची घोषणा केली. जनता पार्टीच्या मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखालील जनतापार्टीच्या सरकारमध्ये वाजपेयी परराष्ट्रमंत्री होते. ते १९९६ साली प्रथमच पंतप्रधान बनले. परंतु तेरा दिवसात हे सरकार कोसळले. त्यानंतर १९९८ साली लोकसभा निवडणुकीनंतर भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरल्याने वाजपेयी पुन्हा एकदा पंतप्रधान बनले. हेच सरकार तेरा महिनेच टिकले. पण याच काळात भारताने अणुस्फोट घडून आणला. आणि आपले सामाजिक नि वैज्ञानिक श्रेष्ठत्व सिद्ध केले. त्याचप्रमाणे वाजपेयी यांच्या सरकारने पारंपारिक शत्रू असलेल्या पाकिस्तानाशी शांतता समझोता करण्याचा प्रयत्न केला. कारगिलचे युद्ध ही घटनासुद्धा याच काळातील. 


वाजपेयी १९९९ मध्ये तिसऱ्या वेळी पंतप्रधान झाले. हे मंत्रिमंडळ पूर्ण पाच वर्ष टिकले. विविध विकास कामे करून देखील नंतर च्या लोकसभा निवडणुकांत भाजपा सत्तेवर येऊ शकत नाही. त्यानंतर २००५ साली वाजपेयी यांनी राजकारणातून निवृत्ती जाहीर केली.  


वाजपेयी यांच्या कुशल नेतृत्वाखालील भारताने हलाहल देखील पचविले. आणि भारताची तसेच भाजपचीही प्रतिष्ठा उंचावली.अटल बिहारी वाजपेयी ज्येष्ठ राजकीय नेते आणि भारताचे पहिलेच बिगर काँग्रेसी पंतप्रधान आहेत. एवढेच नव्हे तर १९९६ ते २००४ या आठ वर्षाच्या कालखंडात वाजपेयी यांनी तीन वेळा भारताचे पंतप्रधानपद भूषविले. 


वाजपेयी यांची आजवर सुमारे ४० पुस्तके प्रकाशित झाली असून पद्मविभूषण आणि उत्कृष्ट संसदपटू सारखे विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले.


*मा.अटल बिहारी वाजपेयी यांना आदरांजली...!*

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

संकलन -)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

**********************************

प्रभात दर्शन

 🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

श्रावण मास,शुक्ल पक्ष, *८/९*,अनुराधा नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,वर्षा ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

सोमवार, १६ आॕगष्ट २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                        *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

         *"लोग हमारे बारे में अगर नकारात्मक बातें करते हैं, तो सम्भवतः दो ही मुख्य कारण हो सकते हैं... पहला यह कि हमारे अंदर ही त्रुटि अर्थात दोष हैं, जिसको आत्मचिंतन करके हमें अवश्य दूर करना चाहियें। दूसरा यह कि हम उनसे किसी न किसी रूप में श्रेष्ठ हैं, जिस कारण से लोग हमसे ईर्ष्या रखते हैं। किन्तु हम स्वयं को सही रखते हुए अपना कार्य करते रहें। लोगों की अधिक चिंता न करें, क्योंकि बहुत से लोग तो भगवान से भी दुखी हैं।"*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

रविवार, १५ ऑगस्ट, २०२१

डोक्यात केस नसलेले गोल चटे कशामुळे येतात


══════════════════════

 @ संकलन 

  गजानन गोपेवाड 

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════

📕 *डोक्यात केस नसलेले गोल चट्टे कशामुळे येतात ?* 📕


काहीजणांच्या डोक्यात केस नसलेले चट्टे दिसतात. बरेच जण समजतात की, उंदीर चावल्यामुळे असे चट्टे येतात व पुन्हा तेथे केस येत नाहीत. डोक्याचे केस जाण्याची अनेक कारणे आहेत. डोक्याच्या त्वचेला जंतूसंसर्ग झाला असेल, दाह असेल तरी केस गळतात. याखेरीज टिनीया कॅपिटीससारख्या रोगातही केस गळतात. डोक्यात केस नसलेले गोल चट्टे असण्याचे मुख्य कारण म्हणजे, कारण माहीत नसलेला अॅलापेशिया एरॅटा हा रोग. ३० टक्के रुग्णांमध्ये आनुवंशिक कारणे सापडतात. यात डोक्यात दोन वा तीन केस नसलेले चट्टे असतात पण डोक्याची त्वचा मात्र निरोगी असते. या चट्ट्यांवर केस नसले तरी ६ ते १२ महिन्यानंतर परत केस उगवतात. त्यामुळे काळजी करण्याचे कारण नसते. त्वचेच्या जिवाणू वा बुरशी संसर्गामुळे केस जात असतील, तर मात्र त्यावर योग्य ते उपाय करावे लागतात. म्हणजे केस गळायचे थांबतात.


*डाॅ.अंजली दिक्षित व डाॅ.जगन्नाथ दिक्षित*

*यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' पुस्तकातून*

═══════════════════════

  

Good morning 👶

 🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

श्रावण मास,शुक्ल पक्ष, *सप्तमी*,विशाखा नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,वर्षा ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

रविवार, १५ आॕगष्ट २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                        *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

          *"सिंह किसी भी चट्टान पर बैठ जाए तो वह चट्टान भी सिंहासन बन जाती है। इसीलिए श्रेष्ठ यही है कि सिंहासन का मोह ना रखते हुए, स्वयं सिंह बनो... ततपश्चात आप जहां पर भी बैठेंगे, वही सिंहासन बन जाएगा...*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

*🇮🇳७४ वा स्वातंत्र्य दिन चिरायु होवो..*

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

15 August indipedent day

 *********************************

  *१५ ऑगस्ट - भारतीय स्वातंत्र्य दिन*

**********************************

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

*माझ्या सर्व भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा....!*


  स्वातंत्र्य दिवस हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस.ब्रिटिश साम्राज्यापासून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरात बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो.


जुलमी ब्रिटिश राजवटीमधून मातृभूमीला स्वतंत्र करण्यासाठी जीवाचे रान करून आपले आयुष्य वेचणाऱ्या स्वातंत्र्य वीरांना सलाम करण्याचा हा दिवस आहे.


स्वातंत्र्यासाठीचे प्रत्येकाचे मार्ग वेगवेगळे होते तरी त्यामागचे ध्येय एकच होते आणि ते म्हणजे भारताचे स्वातंत्र्य!  


इतके खडतर प्रयत्न करून हे स्वातंत्र्य मिळाले आहे. देशाची ही अखंडता व सार्वभौमत्व टिकविण्यासाठी आपली एकता कायम अशीच ठेऊया. 


भारतीय स्वातंत्र्य दिन चिरायू होवो !


Happy Independence Day


*इतिहास :*


इ.स. १७७० पासून भारतावर इंग्रजांचे राज्य होते. १९व्या शतकापासूनच सर्व राजांना इंग्रजांनी आपल्या सैन्यबळावर ताब्यात ठेवले होते. १८५७ च्या स्वातंत्र्य समरानंतर ब्रिटिशांनी त्यांची व्यवस्था अजूनच शिस्तीची केली. १८८५ साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. २०व्या शतकात महात्मा गांधी ह्यांनी अहिंसेच्या मार्गाने 'चले जाओ' आंदोलन व अशी अनेक आंदोलने केली. गांधींनी सविनय कायदेभंग चळवळीचे नेतृत्व केले. १९२९ साली लाहोर च्या सत्रात काँग्रेसने 'संपूर्ण स्वराज्या'ची घोषणा केली. त्यावेळी त्यांनी २६ जानेवारी ही तारीख भारताचा स्वातंत्र्यदिन म्हणून घोषणा करायची योजना केली. १९३० साली काँग्रेसने निवडणुका जिंकल्या. त्यानंतर संपूर्ण स्वराज्यासाठी सर्व नेत्यांनी असहकार आंदोलन केले. १९४० साली मुस्लिम कार्यकर्ते हे मुख्य प्रवाहापासून वेगळे झाले व त्यांनी 'ऑल इंडिया मुस्लिम लीग'ची स्थापना केली.


दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटिशांना लक्षात आले की, आपल्याला भारतावरचे राज्य व युद्ध हे सांभाळता येणार नाही आहे. तसेच दुसऱ्या बाजूला भारतीय क्रांतिकारकांचा जोर वाढत होता. ही गोष्ट कळल्यानंतर ब्रिटनच्या पंतप्रधानांनी जून १९४७ पर्यंत भारत पूर्णपणे स्वतंत्र करण्याची हमी दिली. अखेर १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. पण त्यावेळी भारताचे पाकिस्तान आणि भारत असे दोन तुकडेही पडले. पाकिस्तानी भागात राहणाऱ्या अनेक पंजाब्यांना व सिंधीना त्यांचे घरदार, पैसा सोडून यावे लागले. अनेक लोक ह्यामध्ये मारलेही गेले. पुढे ह्या विभाजनामुळे काश्मीरचा प्रश्नही पुढे आला.


*स्वतंत्र भारत :*


स्वतंत्र भारत २६ जानेवारी १९५० रोजी प्रजासत्ताक झाला. भारताची राज्यघटना तयार करण्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकर ह्यांचा मोलाचा वाटा होता. प्रजासत्ताक भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू व पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद होते. रवींद्रनाथ टागोर ह्यांनी लिहिलेले 'जन गण मन' हे भारताचे राष्ट्रगीत तर बंकिमचंद्र चट्टोपाध्याय ह्यांनी लिहिलेले 'वन्दे मातरम्' हे राष्ट्रीय गीत म्हणून ठरवले गेले.


*स्वातंत्र्य दिनाचा उत्सव :*


भारतात सर्व ठिकाणी स्वातंत्र्य दिनाची सार्वजनिक सुट्टी दिली जाते. सर्व शाळा, महाविद्यालये, कार्यालयांमध्ये ध्वजारोहण व ध्वजवंदन असते. भारताचे पंतप्रधान हे दरवर्षी भाषण देतात. या दिवशी लाल किल्ला येथे भारताचे पंतप्रधान ध्वजारोहण करतात. त्यादिवशी बहुतांश रेडिओ केंद्रावर तसेच दूरदर्शनवर देशभक्तिपर गाणी, कार्यक्रम, चित्रपट लागतात.

*🇮🇳Happy Independence Day🇮🇳*

संकलन -)gajanan gopewad 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

********************************

Featured Post

व्यायाम व योगा अवश्य करावा*

*व्यायाम व योगा अवश्य करावा*  *व्यायाम व योगा करण्याचे दहा फायदे:-*  1) व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते: व्यायाम करणारी...