गुरुवार, १२ ऑगस्ट, २०२१

खुदिराम बोस बलिदान दिवस

 *************************************

                    *११ ऑगस्ट*

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

*खुदिराम बोस बलिदान दिवस*

*************************************


जन्म - ३ डिसेंबर १८८९ (बंगाल)

स्मृती - ११ ऑगस्ट १९०८ (मुझफ्फरपुर)


भारतातील सर्वात तरुण वयाचा क्रांतिकारक म्हणून ओळखला जाणारा हा वीर वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी शहीद झाला. त्याचा जन्म बंगाल मधल्या मेदिनीपूर जिल्ह्यातल्या बहुवेनी या गावात ३ डिसेंबर १८८९ ला झाला.


त्याच्या लहानपणीच आई लक्ष्मीप्रियादेवी आणि वडील त्रैलोक्यनाथ यांचा मृत्यु झाल्याने त्याची मोठी बहीण अनुरूपादेवी आणि तिचे पती अमृतलाल यांनी त्यांचे पालनपोषण केले.


बंगाल प्रांताचे विभाजन करण्याचे ब्रिटिश सरकारने १९०३ साली निश्चित केले होते. त्या विरुद्ध सर्वसामान्य लोकांमध्ये नाराजीची तीव्र लाट पसरली. खुदीरामलाही बंगालच्या फाळणीचा निर्णय अन्यायकारक वाटला, देशासाठी काहीतरी करावे असे सारखे वाटू लागल्याने त्यांनी सशस्त्र क्रांतीचा मार्ग पत्करला. सरकारच्या विरूद्ध आंदोलने करणार्‍यांना पकडून कठोर शिक्षा देण्यात येऊ लागल्या. यात प्रमुख असणार्‍या न्यायाधीश किंग्ज फोर्ड ला मारूनच सरकारचा विरोध करण्याचे पक्के करण्यात आले. बंकिमचंद्र चॅटर्जी यांच्या आनंदमठ या कादंबरीतील वंदे मातरम या गीताने लोकांमध्ये नव संजीवनी पसरविली.


यातच खुदीरामने किंग्ज फोर्ड ला मारण्याची जबाबदारी स्वीकारली. ३० एप्रील १९०५ या दिवशी खुदीरामचा सहकारी प्रफुल्ल चक्रवर्ती याने किंग्ज फोर्ड याच्या गाडीवर एक बॉंब फेकला, परंतु तो चुकून दुसर्‍याच एका गाडीवर पडला. त्या गाडीतील दोन महिला ठार झाल्या, किंग्ज फोर्ड मात्र बचावला. या घटनेच्या दुसर्‍या दिवशी खुदीराम पकडले गेले तर प्रफुल्लने अटकेपूर्वीच आत्महत्या केली. खुदीराम यांच्यावर खटला भरण्यात आला. त्याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा शाबीत झाल्याने त्याला दि. ११ ऑगस्ट १९०५ या दिवशी फासावर जावे लागले. सशस्त्र क्रांतीत बॉंबचा उपयोग करणारे खुदीराम बोस हे पहिले क्रांतिकारक ठरले.

🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

संकलन -)गजानन गोपेवाड

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

********************************

प्रभात दर्शन

 🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

श्रावण मास,शुक्ल पक्ष, *चतुर्थी*,उ.फा.नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,वर्षा ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

गुरुवार, १२ आॕगष्ट २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                         *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

            *"हम माने या न माने किन्तु उत्तम जीवन हेतु सफलता का सूत्र यही है कि दूसरों पर ध्यान केंद्रित करके, अपनी महत्वाकांक्षाएं बढ़ाकर, स्वयं के लिए समस्याएं उत्पन्न करने से अधिक उचित है कि स्वयं पर ध्यान केंद्रित करके, उपलब्ध साधनों से ही जीवन को श्रेष्ठ व् सुंदर बनाया जाये।"*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

12 आँगष्ट विक्रम साराभाई जन्मदिवस

 ***********************************

*१२ ऑगस्ट - विक्रम साराभाई जन्मदिन*

***********************************

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

जन्म - १२ ऑगस्ट १९१९ (अमदाबाद)

स्मृती - ३० डिसेंबर १९७१ (कोवालम)


विक्रम अंबालाल साराभाई हे भारतीय भौतिकशास्त्रज्ञ व खगोलशास्त्रज्ञ होते. ते भारताच्या अंतराळ संशोधनाचे पितामह आणि भारताच्या अंतराळ युगाचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात.


विक्रम अंबालाल साराभाई यांचा जन्म अमदाबाद येथील एका संपन्न कुटूंबात १२ ऑगस्ट १९१९ ला झाला. त्यांचे वडील हे एक उद्योगपती होते. त्यांचे बऱ्याच राजकीय व्यक्तिंशी संबध असल्याने रवींद्रनाथ टागोर, जवाहरलाल नेहरू, सरोजिनी नायडू, महात्मा गांधी आदी लोकांचे त्यांच्या घरी जाणे-येणे होते. विक्रम साराभाई यांच्या आई सरलादेवी यांनी आपल्या ८ मुलांच्या शिक्षणासाठी स्वतःची मांटेसरी पद्धतीची शाळा काढली होती. या शाळेतच विक्रम साराभाईचे शिक्षण युरोपातून आलेल्या शिक्षकांद्वारे झाले. त्यांना लहानपणापासुनच गणित आणि भौतिकशास्त्र हे विषय विशेष आवडत होते.


आपले १२ वी पर्यंतचे शिक्षण आटपून १९३७ साली पुढील शिक्षणासाठी ते ब्रिटनमधील केंब्रिज विद्यापीठात शिकायला गेले. पण दुसरे महायुद्ध सुरु झाल्याने ते भारतात परत आले व त्यांनी बंगलोर मधील इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सायन्स मध्ये नोबेल पारितोषिक विजेते सर सी.व्ही. रामन यांच्या मार्गदर्शनाखाली वैश्विक किरणावर संशोधन केले. १९४२ साली त्यांनी भरतनाट्यम, कुचिपुडी या नृत्यकलेत पारंगत असलेल्या प्रसिद्ध नृत्यांगना मृणालिनी साराभाई यांच्याशी विवाह केला. त्यांना कार्तिकेय आणि मल्लिका ही दोन अपत्ये झाली.


१९४५ साली दुसरे महायुद्ध संपल्यावर विक्रम साराभाई ब्रिटनला गेले. १९४७ साली त्यानी ‘कास्मिक रे इंवेस्टिगेशन इन ट्रापिकल लैटीट्यूड्स’ वर संशोधन करून डॉक्टरेट मिळवली आणि त्याचवर्षी ते आपल्या मायदेशी परत आले. भारतात परत येउन त्यांनी ११ नोव्हेंबर १९४७ ला अहमदाबाद येथे भौतिकी संशोधन कार्यशाळा ची स्थापना केली. हे त्यांचे पहिले पाउल होते, पुढे जाऊन अवकाश संशोधनात विक्रम साराभाई यांनी भरीव कामगिरी केली. 


विक्रम साराभाई यांनी अहमदाबाद येथील भारतीय प्रबंध संस्था (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट) स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. १९७५ मध्ये जो पहिला अंतरिक्ष उपग्रह आर्यभट्ट अवकाशात सोडला गेला त्याची रचना विक्रम साराभाई यांच्या अहमदाबाद रिसर्च सेंटर मध्येच केली होती. आर्यभट्टच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर भारताने अनेक उपग्रह अवकाशात प्रक्षेपित केले. या यशामागे साराभाई यांचे अथक परिश्रम, दूरदृष्टी आणि खंबीर नेतृत्व ह्यांचा मोलाचा वाटा आहे.


विक्रम साराभाई यांनी जागतिक किर्ती असलेल्या अनेक सस्थांची सुरवात केली. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट (IIM) ही भारतातील सर्वोत्कृष्ट व्यवस्थापन शिक्षण संस्था डाॅ. साराभाई यांच्या प्रयत्नातुनच उभी राहिली. 


भौतिकशास्त्रातील संशोधनासाठी प्रसिद्ध असलेल्या राष्ट्रीय भौतिकी प्रयोगशाळा (PRL) देखिल डाॅ. साराभाई यांनीच सुरू केली. अहमदाबाद येथे वस्त्रोद्योग निर्मितीस चालना देणारे अहमदाबाद टेक्स्टाईल इंडस्ट्रीयल रिसर्च असोसिएशन (ATIRA) या संस्थेची उभारणी त्यांनी केली. पर्यावरण क्षेत्रात कार्यरत असलेली सेंटर फॅार इन्व्हीरॅान्मेंटल प्लॅनिंग ॲन्ड टेक्नॅालॅाजी (CEPT) ही संस्था देखिल त्यांनी उभारली.


३० डिसेंबर १९७१ साली केरळ राज्यातील कोवालम येथे रात्री झोपेतच ह्रदयविकाराच्या झटक्याने विक्रम साराभाई यांचे निधन झाले.

🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

संकलन -)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

*************************************

कर्माचा सिध्दांत लेखन गजानन गोपेवाड

 #कर्माचा_सिद्धांत


कोणाची ही हाय लावून घेऊ नये, त्याचे भयंकर परीणाम भोगावे लागतात.


काही लोकांना नाही पटणार हा विषय, 

पण ज्यांनी  अनेकांचा तळतळाट घेतलाय आणि त्याचे भोग ते भोगत असतात, त्यांना नक्कीच पटेल, ....


अनेकांनी अनेक कारणांनी तळतळाट दिलेला असतो, ...


जसे की शारीरिक, मानसिक, आर्थिक,.....

अपमानास्पद वागणूक,...

कोणांचे मन दुखावले असू शकते....,कोणावर अन्याय केला गेलेला असतो, .....

कोणाची सामाजिक बदनामी केलेली असते,.....

छळ केलेला असेल, शारीरिक दुखापत केलेली असेल, .......

किंवा प्रेमात गैरफायदा घेतला गेलेला असेल, ......

त्रासाचे कुठलेही कारण असो...


वरील गोष्टींचा समोरच्या व्यक्तीला प्रचंड त्रास होत असतो, तो खूप दु:खी होतो ,त्याचे मनोबल कमकुवत होत असते,  पर्यायाने तो व्यक्ती डिप्रेशन मध्ये देखील जाऊ शकतो, 

जाणुन-बुजून त्रास देणाऱ्या व्यक्तीला हे समजत नसेल कां? 


 पर्यायाने ज्या व्यक्तीला त्रास झालेला असतो त्या व्यक्तीकडुन चमत्कार होत नाही,किंवा  देव देखील शाप देत नाही, पण त्या दुखावलेल्या व्यक्तीकडून  अतिशय तेजस्वी नकारात्मक उर्जा शक्ती निघते व समोरच्या व्यक्तीमधे शोषली जाते,मग समोरच्या व्यक्तीला हाय लागते त्यालाच तळटळाट असं म्हटलं जातं.,


मग ज्याने कोणी त्रास दिलेला असतो त्याचेही कार्य यशस्वी होत नाही, किंबहुना झाले तरी फार काळ टिकत नाही,  सतत अपयश येणे, घरात आजारपण येणे, अशा काहीही घटना घडू शकतात,....


आपण किती खरे आहोत व किती खोटारडे आहोत हे जगात फक्त दोनच व्यक्तिंना माहित असते,एक म्हणजे 


"आंतरात्मा"


दुसरा 


"परमात्मा"


समोरच्याचे मन दुखावले जाणे म्हणजेच पाप लागणे. त्याची परत फेड याच जन्मात करावी लागते. 


 तुम्ही भगवंतावर विश्वास ठेवा अगर नका ठेऊ  तुम्ही अस्तिक असा किंवा नास्तिक,


 चांगल्या वाईट गोष्टींचा हिशोब सव्याज परत करावाच लागतो,


मी  एका पुस्तकात वाचले होते,


राजा धृतराष्ट्राचे शंभरच्या शंभर पुत्र युद्धात मारले गेले,

तेव्हा त्याने श्रीकृष्णाला विचारले की असं का व्हावं?

माझ्या सबंध जीवनात मी असे कोणतेही महान पातक केलेलं नाही,

की ज्याच्या परिणाम स्वरूप सर्वच्या सर्वच पुत्रांचा मृत्यु  आपल्या डोळ्यांसमोर पाहून त्याचे दु:ख सोसणे माझ्या नशिबी  यावे? 


तेंव्हा भगवान श्रीकृष्णाने धृतराष्ट्र राजाला आपले पुर्व जन्म पाहाण्याची दिव्य दृष्टि दिली, 


धृतराष्ट्र राजाने दिव्य दृष्टिद्वारे पाहिले की साधारण पन्नास जन्मापुर्वी  तो एक पारधी होता, आणि पक्षी पकडण्यासाठी त्याने एका वृक्षाला आग लावली होती. आग लागताच बरेचसे पक्षी उडून गेले  मात्र आगीची झळ लागल्याने त्यातील कित्येक आंधळे झाले तर पक्षांची शंभरएक लाहान पिल्ले  उडू न शकल्याने आगीत होरपळून मृत्युमुखी पडली, धृतराष्ट्र राजाची त्या वेळची ती क्रिया होती. त्याच्या कर्माचे फळ कित्येक जन्मानंतर धृतराष्ट्र राजाचे शंभर पुत्र युद्धात मारले गेले तेव्हाच ते पूर्ण झाले. 


कर्म हे फल देऊनच शांत होते,


प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टींचा हिशोब हा होतोच, 

हा प्रत्येकाच्या कर्माचा सिद्धांतच आहे. 

चांगले कर्म चांगले फळ देऊनच शांत होते, वाईट कर्म वाईट फळ देऊनच शांत होते.  फक्त वेळ आणि काळ पुढे मागे होऊ शकतो,

हाच कर्माचा सिद्धांत आहे,


आता आपण ठरवायचे आहे आपले कर्म कसे हवे, 


"जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर॥ 


क्षणिक सुखासाठी अपुल्या, कुणी होतो नितीभ्रष्ट".

संकलन) :-गजानन गोपेवाड 

     🙏धन्यवाद 🙏

सोमवार, ९ ऑगस्ट, २०२१

सिफीलस हा रोग कसा होतो


══════════════════════

   *📒📒📒 @ संकलन @📒📒📒*

  *श्री. गजानन गोपेवाड 

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════

📕 *सिफीलीस हा रोग कसा होतो? त्यावर उपाय काय ?* 📕


सिफीलीस हा एक लिंगसांसर्गिक रोग आहे. ट्रेपोनेमा पॅलीडम नावाच्या जिवाणूंमुळे हा रोग होतो.

झालेल्या व्यक्तीबरोबर शरीरसंबंध ठेवल्यास १० दिवसांनंतर केव्हाही याची लक्षणे दिसायला लागतात. या रोगाचे मुख्य लक्षण म्हणजे पुरुषामध्ये शिश्नावर किंवा त्यावरच्या त्वचेखाली आणि स्त्रियांमध्ये योनिमार्गात किंवा गर्भाशयाच्या तोंडावर पुळी तयार होते. ही फुटून नंतर व्रण तयार होतो. हा व्रण वेदनारहित असतो

 त्यानंतर जांघेत एका वा दोन्ही बाजूच्या रसग्रंथी सुजतात. मात्र वेदना होत नाही.

उपचार न झाले तरी हा व्रण महिन्याभरात दुरुस्त होतो. या व्रणाला हात लावल्यास व नंतर हात डेटॉलने स्वच्छ न केल्यास स्पर्श करणाऱ्याला हा रोग होऊ शकतो. गरमी व सिफीलीसच्या दुसऱ्या अवस्थेत अंगावर न खाजणारे चट्टे येतात. शरीरात ठिकठिकाणी अवधाण येते, तोंडात व्रण येतात. तिसऱ्या अवस्थेत मेंदू, हृदय व हाडे यांवर या रोगाचा परिणाम दिसून येतो. हृदयाच्या झडपा निकामी होतात, महारोहिणीला कुमार देतो व ती कमकुवत होते. तसेच मेंदू व मज्जासंस्था खराब होतात. स्त्रिला सिफीलीस झाला असेल, तर वारंवार गर्भपात होतात व मूल जन्माला आलेच, तर त्यात व्यंगे असतात.


सिफीलीसच्या निदानासाठी प्राथमिक अवस्थेमध्ये जंतूंचा शोध घेता येतो. त्यानंतर मात्र VORL या तपासणीने शरीराने या जंतूंच्या विरोधात तयार केलेल्या प्रतिद्रव्यांची मोजणी केली जाते व रोगाचे निदान केले जाते.

या आजारावर पेनिसिलीनची इंजेक्शने फारच उपयुक्त ठरतात. दररोज एक असे १० ते १५ दिवस

पेलिसिलोनची इंजेक्शने वा एकच मोठा डोस दिल्यास रोग बरा होतो. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे  सिफीलीस असेल, तर पत्नीलाही उपचार द्यावे लागतात. दुसरे म्हणजे सिफीलीसवर इतर कोणतेही उपचार करू नयेत. काही समाजात असे गैरसमज आहेत की, कुमारिकांशी वा प्राण्यांशी शरीरसंबंध ठेवल्याने हा रोग बरा होतो. ही गोष्ट अत्यंत चुकीची आहे. उलट त्यामुळे रोगप्रसार आणि विकृती निर्माण होतात. गुंतागुंतीचे संसर्ग होऊन मृत्यू येतो.


नैतिकता ठेवून वर्तन करणाऱ्याला सिफीलीससारखा रोग होणारच नाही. त्यामुळे केवळ एकमेकांशीच प्रामाणिकपणे शरीरसंबंध ठेवणाऱ्या पती-पत्नींना हा रोग कधीच होऊ शकणार नाही.


*डाॅ.अंजली दिक्षित व डाॅ.जगन्नाथ दिक्षित*

*यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' पुस्तकातून*


9 आँगष्ट जागतिक आदिवासी दिवस

 ********************************

     *९ ऑगस्ट - क्रांती दिन*

********************************


घटना : ९ ऑगस्ट १९४२


मुंबईत भऱलेल्या कॉंग्रेस अधिवेशनात महात्मा गांधींनी ‍केलेली 'छोडो भारत'ची गर्जना ‍आणि दिलेला ''करेंगे या मरेंगे'' हा मंत्र नऊ ऑगस्टच्या दिवशी संपूर्ण देशात पसरला होता. त्यामुळे यादिवशी क्रांतीची ज्योतच जणू पेटली. देशभरात ब्रिटिश सत्तेला हाकलून लावण्यासाठी आंदोलनांना सुरवात झाली. प्रत्येकाला जे योग्य वाटेल ते तो करत होता. ब्रिटिश सत्ता पार हादरून गेली होती. हे रोखायचे कसे असा प्रश्न पडला होता. त्याची पूर्वसूचना आदल्या रात्रीच्या भाषणातच मिळाल्याने ब्रिटिशांनी पहाटे पाच वाजताच मुंबईत बिर्ला हाऊस मधून गांधीजी आणि त्यांच्या कुटुंबीयांना ताब्यात घेतले. यावेळी गांधीजींनी जनतेला संदेश दिला, ''आता प्रत्येकजणच पुढारी होईल.''


ब्रिटिशांनी काँग्रेसच्या सर्व नेतेमंडळींना अधिवेशनाच्या जागीच अटक केली होती. त्यांना सर्वांना पुण्यात हलविण्यात आले. चिंचवड स्टेशनवर गाडी थांबवून महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी, महादेवभाई देसाई आणि मीराबेन या चौघांना खाली उतरवून त्यांची रवानगी गुप्त ठिकाणी करण्यात आली. बाकीच्यांना पुढे नेण्यात आले. सरकारने गुप्तता पाळली तरी बातमी फुटलीच. गांधीजींना पुण्यात आगाखान पॅलेसमध्ये आणि नेहरू, पटेल, आझाद या मंडळींना अहमदनगरच्या किल्यात ठेवण्यात आल्याचे समजले.


नेत्यांची धरपकड झाल्याने आंदोलन लोकांच्या ताब्यात गेले. देशभर जागोजागी हरताळ, मिरवणुका, मोर्चे यांना ऊत आला. सरकारने लोकांना एकत्र जमण्यास बंदी घातली. पण लोक आता आदेश मानायला तयार नव्हते. पोलिसांच्या लाठीहल्ल्याला, गोळीबाराला जुमानत नव्हते. जाळपोळ, पोलिसांचे खून, टेलिफोन व तारा कापणे असे प्रकार सुरू झाले.


जणू लोकांनी ब्रिटिश सत्तेविरूद्ध युद्ध पुकारले होते. संपूर्ण देश पेटला होता. दंगल, जाळपोळ, गोळीबार, रेल्वेचे अपघात, सरकारी कार्यालयांना आगी लावणे, सरकारी खजिन्यांची लुटालूट असे प्रकार सुरू होते. सरकार दडपशाही करून पाहिजे त्याला विनाचौकशी अटक करत होती. सारा देश गोंधळलेल्या अस्थिर परिस्थितीत सापडला होता.


सरकारने या सर्व प्रकाराला गांधीजींना जबाबदार ठरवले. गांधीजींना याचा इन्कार करून याच्या निषेधार्थ २१ दिवसांचे उपोषणही केले. पण जगभरातील परिस्थितीही बदलत होती. युद्धाचे पारडे दोस्त राष्ट्रांच्या बाजूने झुकत होते. अमेरिका नावाची सत्ता उदयास येत होती. तिने युद्धाचे पुढारीपण घेतले होते. या साऱ्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर क्रांती संग्रामाची तीव्रता ओसरली.

********************************

संकलन -)गजानन गोपेवाड

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६


प्रभात दर्शन

 🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

श्रावण मास,शुक्ल पक्ष, *प्रथमा*,अश्लेषा नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,वर्षा ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

सोमवार, ०९ आॕगष्ट २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                         *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

        *"रिश्ते और मित्र बनाना इतना ही सरल है, जैसे मिटटी से, मिट्टी के ऊपर, मिट्टी लिखना.... किन्तु रिश्ते और मित्रता निभाना इतना ही कठिन है, जैसे पानी से, पानी के ऊपर, पानी लिखना।"*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

शनिवार, ७ ऑगस्ट, २०२१

 *👨‍🔬👨‍🔬👨‍🔬विष्णू गणेश भिडे👨‍🔬👨‍🔬👨‍🔬*

👨‍🔬👨‍🔬👨‍🔬👨‍🔬👨‍🔬👨‍🔬👨‍🔬👨‍🔬👨‍🔬👨‍🔬👨‍🔬

*भौतिकशास्त्रज्ञ, विज्ञानप्रसारक*

🗻🌋🗻🌋🗻🌋🗻🌋🗻🌋🗻

*जन्मदिन - ८ आॅगस्ट १९२५*


घनस्थिती भौतिकी आणि सौरऊर्जा या क्षेत्रांतील तज्ज्ञ म्हणून मान्यता पावलेले डॉ. विष्णू गणेश भिडे यांचा जन्म दर्यापूर येथे झाला. नागपूर विद्यापीठाची भौतिक- शास्त्रातील एम.एस्सी. पदवी त्यांनी प्रथम क्रमांकाने, अनेक बक्षिसे आणि शिष्यवृत्त्यांसह पटकावली आणि लगेच तेथेच ते व्याख्याते म्हणन रुजू झाले. त्यांच्या ‘इलेक्ट्रिकल डिस्चार्जेस’ या विषयावरील प्रबंधास नागपूर विद्यापीठाने १९५३ साली डॉक्टरेट दिली. ‘ऑप्टिकल अ‍ॅण्ड इंटर फेरोमेटिक स्टडीज ऑफ सम आस्पेक्ट्स ऑफ क्रिस्टल ग्रोथ’ या विषयावरील त्यांच्या प्रबंधावर लंडन विद्यापीठाची डॉक्टरेट त्यांनी १९५६ साली मिळवली. पुढे मुंबईच्या इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये प्राध्यापक व नंतर विभागप्रमुख या नात्याने ते काम पाहू लागले.


इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमीचे फेलो, इंडियन फिजिक्स असोसिएशनचे उपाध्यक्ष, १९७१ साली बंगळुरू येथील इंडियन सायन्स काँग्रेसच्या भौतिकशास्त्र विभागाचे अध्यक्ष अशी अनेक मानाची पदे त्यांनी भूषवली आहेत.


१९६६ साली ते दिल्लीच्या नॅशनल फिजिकल लॅबोरेटरीत उपसंचालक या नात्याने काम पाहू लागले. मध्ये काही वर्षे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या शास्त्रीय सल्लागार समितीचे सचिव म्हणून त्यांनी जबाबदारी स्वीकारली होती. घनस्थिती भौतिकीच्या क्रिस्टल ग्रेथ, फेरो इलेक्ट्रिसिटी, फेरोमॅग्नेटिझम, लिक्विड क्रिस्टल, मॉसबॉअर आणि एक्स-रे स्पेक्ट्रोस्कोपी वगैरे बऱ्याच शाखांत त्यांनी संशोधन केलेले आहे.


शंभरहून अधिक संशोधनपर निबंध आणि अर्धे शतक पीएच.डी. विद्यार्थी त्यांच्या कर्तृत्वाची ग्वाही देत आहेत. इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, अमेरिका, झेकोस्लोव्हाकिया, रशिया, इस्रायल, जपान इत्यादी प्रगत देशांनीही त्यांना वेळोवेळी सन्मानाने बोलावून त्यांच्या ज्ञानाचा लाभ घेतलेला आहे. कित्येक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील वैज्ञानिक संस्थांचे ते पदाधिकारी हेाते. १९७४ साली ते सौरऊर्जेसंबंधी एका राष्ट्रीय समितीचे कार्याध्यक्ष होते. त्या अधिकारात त्यांनी युनोला भेट दिली. ‘यू.एन. इंडस्ट्रियल डेव्हलपमेन्ट ऑर्गनायझेशन’ या संस्थेचेही ते उपाध्यक्ष होते. सौरऊर्जेवर एक उत्तम गट त्यांनी तयार केला आहे. या सौरऊर्जेचा खेड्यांच्या विकासासाठी कसा उपयोग करता येईल, यासंबंधीचे संशोधन त्यांनी चालू केले. पुणे विद्यापीठामध्ये ऊर्जा विभाग स्थापन करण्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारली. या विभागाच्या भरभराटीत त्यांचे योगदान अतिशय महत्त्वाचे आहे. पुणे विद्यापीठात आल्यानंतर त्यांच्या कारकिर्दीत चांगले निर्णय घेतले गेले.


प्रा. वि.ग. भिडे यांनी आपल्या प्रावीण्याचा ठसा सर्वत्र उमटविला. पुणे विद्यापीठातील अनेक तरुण संशोधकांना त्यांनी प्रोत्साहन दिले. त्यानंतर प्रा. वि.ग. भिडे यांना पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदी आरूढ होण्याची संधी मिळाली. या संधीचा त्यांनी पुरेपूर फायदा करून घेतला. पुणे विद्यापीठाचा विकास घडवून आणण्यासाठी त्यांनी अनेक नवीन योजना अमलात आणल्या. संशोधनाला चालना मिळावी, यासाठी त्यांनी ‘आयुका’ (इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अ‍ॅस्टॉनॉमी अ‍ॅण्ड अ‍ॅस्टॉफिजिक्स), तसेच एन.सी.आर.ए. (नॅशनल सेंटर फॉर रेडिओ अ‍ॅस्ट्रॉनॉमी) यांसारख्या संस्था पुणे विद्यापीठाच्या आवारात आणण्यासाठी पुढाकार घेतला. पुणे विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून त्यांनी तीन वर्षे काम केले. त्यांच्या कुलगुरुपदाच्या कारकिर्दीमध्ये अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रश्‍न खूप मोठ्या प्रमाणात चर्चिले गेले. सरकारी महाविद्यालये व नवीन सरकारमान्य खाजगी महाविद्यालये यांच्यामध्ये असणारा दुरावा प्रा. वि.ग. भिडे यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाचा वापर करून खूप मोठ्या प्रमाणात कमी केला.


कुलगुरू पदावरून निवृत्त झाल्यानंतर प्रा. वि.ग. भिडे यांनी २००० साली इंडियन सायन्स काँग्रेसचे अधिवेशन, पुणे विद्यापीठात भरले. त्या अधिवेशनात मुलांच्या कार्यक्रमाची संपूर्ण जबाबदारी प्रा. सी.एन. राव यांनी प्रा. वि.ग. भिडे यांच्यावर टाकली होती. त्यांनी आपल्या कार्याची दिशा ही विज्ञान प्रसार व विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण करण्याकडे वळविली. या कार्यात त्यांनी स्वत:ला पूर्णपणे झोकून दिले. विज्ञान शोधिका स्थापन करण्याची त्यांची कल्पना ही अभिनव अशीच होती. शालेय व महाविद्यालय स्तरावर विद्यार्थ्यांना विज्ञान हे अत्यंत अयोग्य पद्धतीने शिकवले जाते, याची त्यांना खंत होती. प्रयोगाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विज्ञान शिकता यावे, यासाठी प्रयोगशाळा स्थापन करण्याचा त्यांनी संकल्प केला. ‘भारतीय विज्ञान भवन’ या संस्थेच्या सहकार्याने त्यांनी हा उपक्रम प्राथमिक स्तरावर सुरू केला. प्रा. वि.ग. भिडे यांना मानणारे शिक्षक, प्राध्यापक, तसेच विज्ञानाची आवड असणाऱ्या व्यक्ती यामध्ये सामील झाल्या. अगदी कमी आर्थिक मदतीत उपक्रम कसे राबवावेत, याची प्रा. वि.ग. भिडे यांना चांगलीच कल्पना होती. किंबहुना त्यांचे याबाबतचे वर्तन हे आदर्श होते.


प्रा. वि.ग. भिडे यांच्यासाठी काम करताना कोणीही कधीही पैशाची मागणी करीत नसे. प्रा. वि.ग. भिडे यांचा शब्द खाली पडू द्यायचा नाही, हेच धोरण त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीमध्ये होते. विज्ञान शोधिका त्यांनी अशा प्रकारे चालवून तिचा विकास केला. या प्रयोगासाठी त्यांनी महाराष्ट्र सरकारकडून विनामूल्य जागा मिळविली. याच जागेवर आज विज्ञान शोधिकेची भव्य वास्तू उभी आहे.


कार्यमग्न राहणे हे प्रा. वि.ग. भिडे यांचे वैशिष्ट्य होते. निवृत्तीनंतर त्यांच्या कामाचा झपाटा अधिकच वाढला, असे म्हटले तर ते वावगे ठरू नये. या काळात त्यांनी महाराष्ट्रात व नागपूरमध्ये ठिकठिकाणी अनेक व्याख्याने दिली. यांतून त्यांनी ‘बाल विज्ञान चळवळी’ची कल्पना पुढे मांडली. महाराष्ट्रात विज्ञान प्रसार करणाऱ्या अनेक संस्था आहेत. परंतु या संस्था स्थानिक पातळीवर त्यांच्या गुणवत्तेप्रमाणे कार्य करतात. या सर्व संस्थांना एकत्रित करून चळवळ निर्माण करावी, असे प्रा. वि.ग. भिडे यांना वाटले. त्यांनी या सर्व संस्थांना एकत्र आणले आणि ‘बाल विज्ञान चळवळी’ची स्थापना केली. या चळवळीच्या माध्यमातून त्यांनी अनेक कार्यक्रमांची आखणी केली व ते त्यांनी यशस्वीपणे राबविले.डॉ.अब्दुल कलाम यांनी या कार्यात सहभाग घेतला.


प्रा. वि.ग. भिडे यांच्या या महत्त्वपूर्ण कार्यात प्रा. यशपाल, डॉ. बालसुब्रमण्यम,डॉ.जयंत नारळीकर,डॉ.विजय भटकर,डॉ. अशोक कोळस्कर,डॉ.पंडित विद्यासागर या आणि अशा अनेक गणमान्य व्यक्तींनी सहभाग घेतला.विद्यार्थ्यांसाठी विज्ञानावरील उत्कृष्ट पुस्तके आणावीत,असा त्यांचा मानस होता. त्यातून विज्ञान शोधिका अंतर्गत पुस्तकांची निर्मिती केली गेली. या प्रयोगात अनेक दर्जेदार पुस्तकांची निर्मिती झाली. काही कारणांमुळे ही योजना पुढे चालू राहिली नाही, तरी दर्जेदार पुस्तकांच्या निर्मितीचा वस्तुपाठ यामधून घातला गेला.

🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

संकलन -)गजानन गोपेवाड

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

प्रभात दर्शन

 🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

आषाढ मास,कृष्ण पक्ष, *अमावस्या*,पुष्य नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,वर्षा ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

रविवार, ०८ आॕगष्ट २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                         *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

        *"अधिक मीठा बोलने वाला कभी-कभी हानिकारक हो सकता है, सचेत रहें। नीम की तरह कड़वा ज्ञान देने वाला ही अधिकांशतः सच्चा मित्र होता है। विज्ञान एवं आयुर्वेद के अनुसार भी यही शास्वत सत्य है कि नीम परम् औषधि है और नीम में कीड़े नहीं पड़ते। किन्तु मिठाई में कीड़े के साथ बीमारी भी होती है।"*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

शुक्रवार, ६ ऑगस्ट, २०२१

गाथा बलिदानाची गुरूदेव रवींद्रनाथ टागोर

 ➿➿➿➿➿➿➿➿➿➿

*🇮🇳🇮🇳गाथा बलिदानाची🇮🇳🇮🇳*

➿➿➿➿➿➿➿➿➿➿


*🇮🇳🇮🇳रवींद्रनाथ टागोर🇮🇳🇮🇳*


 जन्म   -) ७ मे १८६१

 मृत्यू    -)  ७ ऑगस्ट १९४१


      जगप्रसिद्ध भारतीय कवी, कलावंत, शिक्षणतज्ज्ञ आणि तत्त्वचिंतक. रवींद्रनाथांचा जन्म कलकत्ता येथे पिरालीनामक ब्राह्मणांच्या ठाकूर उपनावाच्या कुटूंबात झाला. त्यांचे वडील देवेंद्रनाथ (१८१७–१९०५) आणि आई शारदादेवी (१८२६/२७–१८७५). त्यांच्या एकूण पंधरा अपत्यांपैकी रवींद्रनाथ चौदावे. ठाकूर कुटुंबाचे मूळ आडनाव कुशारी. वर्धमान जिल्ह्यातील ‘कुश’ हे त्यांचे मूळ गाव. तेथून यशोहर गावी स्थलांतर. जातिबहिष्कारामुळे आपले यशोहर (जेसोर) गाव सोडून महेश्वर व शुकदेव हे त्यांचे पूर्वज कलकत्त्याच्या दक्षिणेला गोविंदपूर गावी स्थायिक झाले. पुढे पंचानन कुशारी ह्या पूर्वजाने ईस्ट इंडिया कंपनीच्या कामाचे ठेके घ्यायला सुरुवात केली. त्या काळी ब्राह्मणेतर लोक ब्राह्मणांना ‘ठाकूर मोशाय’ अशा बहुमानार्थी नावाने संबोधीत. इंग्रज कप्तानांनी ‘ठाकूर’ चा ‘टागोर’ असा उच्चार केला. ईस्ट इंडिया कंपनीच्या बरोबर टागोर कुटुंबाचीही भरभराट झाली. इंग्रज व्यापारी, राज्यकर्ते आणि ज्ञानोपासक ह्यांच्यात वावर असणाऱ्‍या नव्या सरंजामदारांत टागोर घराण्याचाही अंतर्भाव झाला. त्यांपैकीच राजा राममोहन रॉय (१७७२–१८३३) यांनी बंगालच्या सामाजिक प्रबोधनाची चळवळ सुरू केली. त्यांच्या भूमिकेशी रवींद्रनाथांचे आजोबा द्वारकानाथ एकरूप झाले. सार्वजनिक कार्याला त्यांनी केवळ आर्थिकच नव्हे, तर स्वतः उत्तम कायदेपटू आणि व्यासंगी असल्यामुळे वैचारिक परिवर्तनाच्या कार्यातही भाग घेऊन साहाय्य केले. त्यांचे ज्येष्ठ पुत्र देवेंद्रनाथ हे रवींद्रनाथांचे तीर्थरूप. बंगाली ब्राह्मसमाजाच्या स्थापनेत आणि प्रसारात त्यांचा फार मोठा वाटा आहे. ब्राह्मसमाजाचे अनुयायी त्यांचा महर्षी देवेंद्रनाथ असा उल्लेख करीत. सर्व प्रकारच्या ऐहिक सुखसंपत्तीची अनुकूलता असूनही उपनिषदांतील तत्त्वज्ञानाच्या गाढ व्यासंगामुळे आणि जन्मजात ईशप्रेमामुळे देवेंद्रनाथांच्या अंगी विरक्ती बाणलेली होती.

रवींद्रनाथांचे बंधू द्विजेंद्रनाथ (१८४०–१९२६) हे कवी आणि तत्त्वचिंतक; सत्येंद्रनाथ (१८४२–१९२३) हे पहिले भारतीय आय्. सी. एस्. अधिकारी व व्यासंगी लेखक; ज्योतिरिंद्रनाथ (१८४९–१९२५) हे नाटककार, संगीतरचनाकार व भाषांतरकार; भगिनी स्वर्णकुमारी (१८५५–१९३२) ह्या कादंबरीकर्त्या. जोडासाँको भागातील वाड्यात पहिल्या मजल्यावरच्या आपल्या खिडकीतून बाहेरची निसर्गशोभा पाहत बसणे, हा रवींद्रनाथांचा बालपणीचा विरंगुळा होता. ‘जॉल पॉडे पाता नॉडे’ (पाणी पडे-पान झुले) ह्या लहानशा ओळीतल्या छंदाने व यमकाने त्यांच्या बालमनात शब्दांचे नृत्य सुरू झाले. घरात काव्य, शास्त्र, विनोद, नाट्य, संगीत यांचे अप्रत्यक्ष संस्कार घडत होते. त्यामुळे पाठशाळेतील आनंदशून्य शिक्षण त्यांना रुचेना. १८७४ साली कलकत्त्याच्या सेंट झेवियर्स स्कूलमधील परीक्षा ते उत्तीर्ण झाले नाहीत. त्यानंतर त्यांचे शिक्षण त्यांचे बंधू हेमेंद्रनाथ (१८४४–८४), द्विजेंद्रनाथ आणि ज्योतिरिंद्रनाथ यांच्या देखरेखीखाली मातृभाषेतून सुरू झाले. रवींद्रनाथांना निसर्गतः लाभलेल्या रूपसौंदर्याइतकीच मधुर आवाजाचीही उपजत देणगी होती. ‘मला कधी गाता येत नव्हते असे आठवत नाही’, असे त्यांनी म्हटले आहे. आदी ब्राह्म समाजाचे गायक विष्णुचंद्र चक्रवर्ती (१८०४–१९००) हे त्यांचे पहिले गायनगुरू. यदुभट्ट यांच्याहीपाशी त्यांचे संगीतशिक्षण झाले. मात्र संगीताच्या कुठल्याही विशिष्ट प्रणालीत त्यांनी स्वतःला बांधून घेतले नाही. त्यामुळे नंतरच्या काळात त्यांनी रचलेल्या शेकडो गीतांत चालींची विविधता आढळून येते. तिचे मूळ ह्या चोहोकडून मिळवलेल्या गाण्यांत आहे. जे संगीतात तेच साहित्यात. ज्येष्ठ बंधूंच्या ग्रंथसंग्रहातील थोर लेखकांचे ग्रंथ, अबोधबंधु, वंगदर्शन यांसारखी नियतकालिके, बालवयात वाचीत असताना नोकरचाकरांच्या सहवासात चाणक्य श्लोक, कृत्तिवासाचे रामायण, महाभारातांतील कथा, विद्यापती, चंडिदास यांची काव्ये यांचेही श्रवण चालत असे. लहानपणी त्यांना इंग्रजी शिकवायला येणाऱ्‍या अघोरबाबू नावाच्या शिक्षकामुळे साहित्याइतकीच रवींद्रनाथांना विज्ञानाचीही गोडी उत्पन्न झाली आणि ती आयुष्याच्या अखेरीपर्यत टिकली.


बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील बोलपूरजवळ एक विस्तीर्ण माळ रायपूरच्या जमीनदाराकडून देवेंद्रनाथांनी विकत घेऊन तेथे एक कुटिर बांधले. पुढे त्याचीच दुमजली इमारत केली. तिचे नाव ‘शांतिनिकेतन’. जवळच असलेल्या सप्तपर्णीच्या विशाल वृक्षाखाली महर्षी देवेंद्रनाथ ध्यानाला बसत. रवींद्रनाथांचा संस्कृत, इंग्रजी भाषांचा अभ्यास स्वतः देवेंद्रनाथांनी इथल्या वास्तव्यात करून घेतला. ज्योतिर्विद्येची त्यांना गोडी लावली. रवींद्रनाथांचे काव्यलेखन बालवयातच सुरू झाले होते.तत्त्वबोधिनी पत्रिका नावाच्या नियतकालिकात त्यांची ‘अभिलाष’ ही कविता प्रसिद्ध झाली. त्या वेळी ते बारा वर्षाचे होते. देशप्रेम, सामाजिक सुधारणांचा प्रचार यासाठी टागोर कुटुंबियांच्या साहाय्याने नवगोपाळ मित्र, राजनारायण बसू वगैरे समाजसुधारक कलकत्त्यात ‘हिंदु मॅला’ नावाने एक उत्सव साजरा करीत. त्याच्या नवव्या अधिवेशनात रवींद्रनाथांनी वयाच्या चौदाव्य वर्षी (१८७४) देशप्रेमाने प्रेरित होऊन लिहिलेली ‘हिंदु मॅलाय उपहार’ ही कविता वाचली. ह्याच सुमाराला त्यांच्या मातोश्रीचे निधन झाले. नंतर बंधू ज्योतिरिंद्रनाथ आणि वहिनी कादंबरी देवी यांचे छत्र त्यांना लाभले.


बंगालमध्ये ब्रिटिश विरोधी चळवळींनी जोर धरला होता. अशा वेळी इटालियन देशभक्त मॅझिनी याच्या ‘कार्बोनारी’ सारख्या क्रांतिकारकांच्या ‘संजीवनी सभा’ नावाच्या गुप्त मंडळात ते दाखल झाले. राजनारायण बसू ह्या मंडलाचे सूत्रचालक होते. हे मंडळ फार काळ टिकले नाही. इथून पुढे रवींद्रनाथांच्या लेखनाने खूप वेग घेतला. १८७६ सालापासून ज्ञानांकुर ओ प्रतिबिंबह्या नियतकालिकातून त्यांच्या कथा, कविता, निबंध तसेच भाषांतरित लेख प्रसिद्ध होऊ लागले. आठ सर्गांचे बनफूल(१८८०) हे खंडकाव्यही याच काळातले. वैष्णव संत कवींच्या धर्तीवर ‘भानुसिंह’ ह्या टोपणनावाने ब्रजबुलीत त्यांनी गीत लिहिली. मात्र कुमारवयातील आपल्या या साहित्यरचनेतील अपरिपक्वतेची रवींद्रनाथांना जाणीव होती. भारती ह्या टागोर कुटुंबातर्फे प्रसिद्ध होणाऱ्‍या मासिकातून १८७३ नंतर त्यांनी पुष्कळ लेखन केले. १४ ते १६ वर्षे वयातील त्यांच्या कविता त्यानंतर बऱ्‍याच वर्षांनी शैशव-संगीत (१८८४) ह्या नावाच्या संग्रहात प्रसिद्ध झाल्या. भारतीतून प्रसिद्ध झालेल्या साहित्यातकविकाहिनी नावाचे काव्य-नाट्य होते. १८७८ साली ते ग्रंथरूपाने छापून प्रसिद्ध झाले. रवींद्रनाथांचा हा पहिला मुद्रित ग्रंथ. याच सुमाराला त्यांचे बंधू सत्येंद्रनाथ यांनी रवींद्रनाथांना बॅरिस्टर होण्यासाठी इंग्लंडला पाठवायचे ठरविले. विलायती रीतिरिवाज आणि इंग्रजी भाषेतील संभाषणात अधिक सफाई येण्यासाठी त्यांनी रवींद्रनाथांना अहमदाबादेतील आपल्या प्रासादतुल्य सरकारी बंगल्यात मुक्कामासाठी आणले. वाचन, लेखन, गीतरचना, त्या गीतांना चाली देणे ह्या कार्यासाठी रवींद्रनाथांनी येथील निवांततेचा उपयोग करून घेतला. ‘क्षुधित पाषाण’ ह्या त्यांच्या सुप्रसिद्ध कथेचे बीज ह्या ऐतिहासिक वास्तूवरून त्यांच्या मनात रुजले. उत्तम इंग्रजी ग्रंथांचे अध्ययन आणि कालिदासाच्या काव्याचा त्यांचा अभ्यास येथेच झाला.


सत्येंद्रनाथांनी त्यानंतर इंग्रजी रीतिरिवाजाच्या अभ्यासासाठी त्यांची सोय मुंबईला डॉ. आत्माराम पांडुरंग तर्खड यांच्या बंगल्यात सधन, सुशिक्षित आणि पाश्चात्त्य धाटणीची रहाणी असलेल्या कुटुंबात केली. तत्कालीन बंगालमधील श्रीमंत घराण्यातील स्त्रिया अंतःपुरातच असत. स्त्रियांच्या बाबतीत पुरुषातही एक प्रकारचा संकोच असे. तर्खडांच्या घरातील मोकळ्या वातावरणाने आणि विशेषतः डॉ. तर्खड यांची कन्या अन्नपूर्णा (आन्ना) हिच्या सहवासाने रवींद्रनाथांचा हा बुजरेपणा गेला. ह्या स्नेहबंधनातून निर्माण झालेली अनेक गीते शैशष–संगीत ह्या संग्रहात आहेत. १८७८ साली ⇨ सत्येंद्रनाथ टागोरांच्या बरोबर रवींद्रनाथ इंग्लंडला गेले. तेथे लंडन युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये हेन्री मॉर्ली यांच्यापाशी त्यांनी इंग्रजी साहित्याचा अभ्यास केला. तेथून भारतीमध्ये त्यांची ‘यूरोपयात्री कोनो वंगीय तरुणेर पत्र’ ह्या शीर्षकाखाली यूरोपीय जीवन आणि संस्कृतीसंबंधीची पत्रे प्रसिद्ध होऊ लागली. इंग्लंडमधील समाजजीवनासंबंधी त्यांत प्रतिकूल टीका असल्यामुळे इंग्रज धार्जिण्या उच्चभ्रू बंगाली समाजाचा त्यांच्यावर रोष झाला. १८८० साली त्यांना परत बोलावून घेण्याचे हेही एक कारण असावे असे म्हणतात. मात्र इंग्लंडमधील वास्तव्यात तेथील स्त्रीवर्गाला मिळणाऱ्‍या सामाजिक व्यवहारातील स्वातंत्र्याचा त्यांच्या मनावर अनुकूल परिणाम झाला. यूरोप प्रवासातील पत्रे १८८१ साली युरोप प्रवासीर पत्र नावाने प्रसिद्ध झाली. बंगालीच्या लोकव्यवहारातील (चलित) भाषेतील हा पहिला ग्रंथ मानला जातो. त्यानंतरच्या काळात रवींद्रनाथांनी बंगाली ग्रांथिक (साधू) भाषेला सहज भाषेचे वळण देण्यात फार मोठे यश मिळविले. इंग्लंडमधून रवींद्रनाथ कोणतीही शैक्षणिक पदवी न मिळवता परतले. मात्र तिथल्या वास्तव्यात चौतीस प्रवेशांचे व चार हजार ओळींचे भग्नहृदय (१८८१) हे अपुरे नाट्य-काव्य त्यांनी लिहिले. भारतात आल्यावर ते पुरे केले. पौगंडावस्थेतील बुजऱ्‍या रवींद्रनाथांचे, पाश्चात्त्य जगातील गतिशीलता, स्वतंत्रता यांसारख्या सद्‌गुणांच्या प्रभावामुळे एका धीट, स्पष्टवक्त्या तरुणात रूपांतर झाले होते. १८८१ साली त्यांनी वाल्मिकी प्रतिभा ही पहिली संगीतिका लिहून तिचा जोडासाँको येथील टागोर वाड्यात पहिला प्रयोग केला. त्या संगीतिकेतील गीतांत भारतीय मार्गी व देशी संगीताप्रमाणे यूरोपीय ललित संगीताचाही वापर केला होता. जे सूर भावनेच्या अभिव्यक्तीला अधिक परिणामकारक वाटतील, त्यांचा गीतगायनात मुक्तपणाने उपयोग करण्याच्या ह्या प्रवृत्तीतूनच ⇨ रवींद्रसंगीत निर्माण झाले.


रवींद्रनाथांची साहित्य, संगीत, कलासाधना उत्साहाने चालू असताना त्यांना पुन्हा एकदा इंग्लंडला पाठवून बॅरिस्टर करण्याचा कुटुंबातील वडील मंडळींनी प्रयत्न केला; परंतु विलायतेच्या बोटीत चढण्यापूर्वी मद्रास बंदरातूनच ते परतले आणि कलकत्त्याला आपले बंधू ज्योतिरिंद्रनाथ आणि वहिनी कादंबरी देवी यांच्या बिऱ्‍हाडी राहू लागले. येथे त्यांच्या कलासाधनेला अधिक पोषक वातावरण लाभून त्यांच्या निर्मितिक्षम प्रतिभेचे उन्मेश जोमाने प्रकट होऊ लागले. स्पेन्सरच्या ‘द ऑरिजिन अँड फंक्शन ऑफ म्यूझिक’ ह्या निबंधाने प्रभावित होऊन त्यांनी ‘संगीताची उत्पत्ती आणि उपयोगिता’ ह्या विषयावरचा निबंध लिहिला. भारतीय संगीतातील रागप्रधान संगीत भावनाशून्य झाल्याची चिंता त्यात व्यक्त झाली आहे. त्या विवेचनात त्यांचा ओढा गीतगायनाकडे अधिक असला, तरी त्यानंतर तीस वर्षांनी त्यांनी स्वरप्रधान संगीताचे ऐश्वर्य व स्वयंसिद्ध स्थान मान्य केले. त्या काळी त्यांच्या काव्यरचनेचा मूलस्त्रोत संगीत हाच होता. त्यांच्या तत्कालीन काव्यसंग्रहांची नावेदेखील संध्या संगीत(१८८२), प्रभात संगीत (१८८२), शैशवसंगीत, छबि ओ गान (१८८४), कडि ओ कोमल (१८८६, म. शी. तीव्र आणि कोमल) अशी संगीताशी नाती सांगणारी आहेत. बंधू ज्योतिरिंद्रनाथांच्या बंगल्यात रहात असताना आलेल्या साक्षात्कारासारख्या एका विलक्षण अनुभवातून त्यांची ‘निर्झरेर स्वप्नभंग’ ही अप्रतिम कविता निर्माण झाली. जीवनस्मृति(१९१२) ह्या ग्रंथात त्या अनुभूतीचे सविस्तर वर्णन त्यांनी केले आहे. इथून पुढे त्यांच्या काव्यजीवनातील विषादपर्व संपून आनंदपर्व सुरू झाले.


सत्येंद्रनाथांबरोबर काही काळ कारवारलाही ते राहिले. तिथल्या निसर्गरम्य आणि शांत वातावरणात त्यांच्या प्रतिमेला खूप बहर आला. प्रकृतीर प्रतिशोध (१८८४) ही नाटिका त्यांनी येथील मुक्कामात लिहिली. १८८३ साली कारवारहून कलकत्त्याला परतल्यानंतर, महर्षी देवेंद्रनाथांच्या जमीनदारीची व्यवस्था पाहणाऱ्‍या कारकुनांपैकी वेणीमाधव रायचौधुरी ह्या सामान्य परिस्थितीतील पिराली ब्राह्मण गृहस्थाची मुलगी भवतारिणी (जन्म १८७३) हिच्याशी त्यांचा विवाह झाला. नूतन वधूचे नाव ‘मृणालिनी’ असे ठेवण्यात आले. देवेंद्रनाथांनी तिच्या शिक्षणाची व्यवस्था लॉरेटा हाऊस ह्या विद्यालयात केली. मृणालिनी देवींनी रवींद्रनाथांच्या जीवनात एक अत्यंत कर्तव्यपरायण गृहिणी होऊन त्यांच्या संसाराचा भार वाहिला. १८८४ साली ज्योतिरिंद्रनाथांच्या पत्‍नी कादंबरी देवी यांनी आत्महत्या केली. रवींद्रनाथांच्या मनावर ह्या घटनेचा फार मोठा आघात झाला. रवींद्रांच्या तरुण काळात झालेले हे दुःख त्यांच्या आयुष्याच्या अखेरपर्यंत त्यांना जाणवत राहिले होते; पण त्यांनी आपल्या जीवनात कुठलीही अवस्था अखेरची मानली नाही. म्हणून ह्या मृत्युशोकानेही त्यांना आपल्या कर्तव्यापासून परावृत्त केले नाही. त्याच वर्षी ते आदी ब्राह्म समाजाचे कार्यवाह झाले आणि ज्येष्ठ बंगाली कादंबरीकार बंकिमचंद्र चतर्जी यांच्याशी हिंदू धर्मातील आदर्शांबद्दल त्यांचा जाहीर वादविवाद झाला.


१८८५ साली ठाकूर परिवारातर्फे निघणाऱ्‍या बालक ह्या मासिकाच्या संपादिका ज्ञानदानंदिनी देवी (सत्येंद्रनाथांच्या पत्नी) यांना त्यांनी संपादनात साहाय्य करायला सुरुवात केली. त्याच वर्षी रविच्छाया हा त्यांचा गीतसंग्रह प्रसिद्ध झाला. १८८६ साली त्यांची ज्येष्ठकन्या माधुरीलता (बेला) हिचा जन्म झाला. डिसेंबर महिन्यात कलकत्त्याला राष्ट्रीय सभेचे दुसरे अधिवेशन भरले. ह्या प्रसंगी ‘आमरा मिले छि आज मायेर डाके’ (आईच्या हाकेच्या आज आपण जमलो आहोत) ह्या त्यांच्या कवितेच्या गायनाने अधिवेशनाला जमलेले प्रतिनिधी अत्यंत प्रभावित झाले होते. त्यांचा कडि ओ कोमल हा संग्रहही याच काळातील. आदी ब्राह्म समाजाच्या कार्यातही त्यांनी उत्साहाने भाग घेऊन समाजाच्या माघोत्सवासाठी धर्मसाधकाच्या अंतरातील व्याकुळ भाव व्यक्त करणारी सव्वीस नवीन गाणी रचून त्यांना चाली दिल्या होत्या.


ह्या वर्षीच्या इतर रचनांमध्ये धार्मिक आणि सामाजिक कालबाह्य आचार विचारांचा पाठपुरावा करणाऱ्‍याचे विडंबन करणाऱ्‍या काही विनोदी नाटिका लिहून त्यांनी विरोधकांचा रोषही ओढवून घेतला. साहित्यदृष्ट्या ह्या नाटिकांना विशेष महत्त्व नसले, तरी तरुण रवींद्रनाथांची धर्मसुधारणेच्या बाबतची तडफ यांतून प्रत्ययाला येते. १८८७ ते १८९० ह्या काळातील मानसी (१८९०) हा काव्यसंग्रह, मायार खेला (१८८८) ही संगीतिका आणि राजा ओ रानी (१८८९) हे नाटक अशासारखी रचना पाहिल्यानंतर त्यांच्या साहित्यनिर्मितीत एक निराळे परिवर्तन आढळते.


ही कलासाधना चालू असताना सामाजिक परिवर्तनासाठी बंगालमध्ये चालू असलेल्या चळवळीशी त्यांनी संबंध ठेवला होता. १८८८ साली त्यांचे ज्येष्ठ पुत्र रथींद्रनाथ यांचा जन्म झाला. १८८९ साली सोलापुरातील आपले बंधू सत्येंद्रनाथ यांच्या घराचा मुक्काम आटोपून परतताना त्यांनी पुण्याला पंडिता रमाबाईंचे व्याख्यान ऐकले. पुराणमतवादी लोकांनी आरडाओरडा करून ते व्याख्यान बंद पाडलेले पाहून ते अत्यंत व्यथित झाले. त्यांनी स्त्री स्वातंत्र्यासंबंधीच्या विचारांना चालना देणारा लेख लिहिला. नंतरच्या काळात स्त्रियांच्या आर्थिक स्वातंत्र्याचाही त्यांनी पुरस्कार केला. नव-वंग-आंदोलनावरही एक निबंध याच सुमाराला लिहिला आणि लॉर्ड क्रॉस ह्याच्या भारतविरोधी धोरणाचा समाचार घेतला. १८९० साली इंग्लंडचा तीन महिन्याचा दौरा आटपून ते परतले. याच वर्षी जोडासाँको येथील वाड्यात त्यांनी लिहिलेल्या विसर्जन (१८९०) नाटकाचा प्रयोग झाला. त्यातील रघुपतीची भूमिका त्यांनी स्वतः केली होती. देवेंद्रनाथांनी उत्तर बंगालमधील तीन परगण्यांत पसरलेल्या जमीनदारीची व्यवस्था आता त्यांच्यावर सोपवली. जमिनदारीची कामे पाहताना रवींद्रनाथांनी रयतेच्या हिताची नवीन कामे सुरू केली. १८९० ते १९०० अशी दहा वर्षे त्यांनी ग्रामीण विभागात काढली. १८९१ साली शिलाइदह ह्या गावी त्यांची दुसरी कन्या रेणुका हिचा जन्म झाला. जमिनदारीच व्यवस्था पाहण्याच्या कामामुळे बंगालच्या ग्रामीण जीवनाशी त्यांचा खूप जवळून परिचय झाला. त्या अनुभवातूनच त्यांच्या उत्कृष्ट कथांचा जन्म झाला. हितवादी नावाच्या साप्ताहिकातून त्या दर आठवड्याला प्रसिद्ध होत गेल्या. १८९१ साली त्यांनी साधना मासिक सुरू करून आपला पुतण्या सुधींद्रनाथ याला संपादक नेमले. त्यातूनशोनार तरी (१८९४), पंचभूतेर डायरी (पंचभूत–१८९७) यांसारखे त्यांचे लेखन प्रसिद्ध झाले, १८९४ साली त्यांनी संपादनाची सूत्रे स्वतःकडे घेतली आणि ती १८९५ साली ते मासिक बंद पडेपर्यंत सांभाळली. आपली पुतणी इंदिरा देवी हिला लिहिलेली आणि त्यानंतर छिन्नपत्र (१९१२) या नावाने संगृहित झालेली त्यांची अप्रतिम पत्रे ह्याच मासिकातून प्रथम प्रसिद्ध झाली.


मीरा हिचा १८९३ साली आणि कनिष्ठ पुत्र शमींद्र याचा १८९४ साली जन्म झाला. १८९३ साली बंकिमचंद्र चतर्जींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका जाहीर सभेत ‘राष्ट्रीय विकासाचा मूलभूत पाया ग्रामीण विकास हा आहे’ हा विचार त्यांनी ‘इंग्रज ओ भारतवासी’ ह्या आपल्या लिखित भाषणातून मांडला. मातृभाषेतून शिक्षण, स्वावलंबन आणि स्वाभिमान हा स्वदेशी चळवळीचा कणा आहे, हा विचार त्यांनी या प्रसंगी सांगितला. कथा ओ काहिनी (१९०८) मध्ये भारतीय इतिहासातील वीरकथा त्यांनी कवितेत गुंफल्या. बंगाली ‘शब्द व छंद’ ह्या संबंधातील त्यांचे बहुमोल लेखनही ह्याच काळातील आहे. १८९६ च्या डिसेंबर महिन्यात कलकत्त्याच्या काँग्रेसच्या अधिवेशनात बंकिमचंद्राच्या ‘वंदेमातरम्’ ह्या गीताला रवींद्रनाथांनी चाल दिली व ते गीत स्वतः म्हटले. राष्ट्रीयसभेत ‘वंदेमातरम्’ गायिले जाण्याचा हा पहिला प्रसंग. पुढल्याच वर्षी नटोर येथे काँग्रेसचे प्रादेशिक अधिवेशन भरले असताना रवींद्रनाथांनी बंगालीतून भाषण करून प्रतिनिधींना आश्चर्याचा धक्का दिला.


मुक्त वातावरणात, निसर्गसान्निध्यात आणि गुरुजनांबरोबर राहून उपनिषदांच्या काळात जसे शिक्षण चालत असे, त्या पद्धतीचा प्रयोग करण्याच्या विचारातून महर्षी देवेंद्रनाथांनी बोलपूरजवळ बांधलेल्या ‘शांतिनिकेतन’ बंगल्यात १९०१ साली त्यांनी आश्रमशाळेची स्थापना केली. ती इमारत व सारी जमीन महर्षींनी एक विश्वस्त निधी स्थापून शाळेला देऊन टाकली. नैवेद्य(१९०२) ह्या कविता संग्रहातील त्यांच्या कवितांतून हा मुक्त मनाने सारे जीवन समजून घेण्याचा ध्येयवाद प्रकट झाला आहे (‘चित्त जेथा भयशून्य उच्च जेथा शिर’ ही सुप्रसिद्ध प्रार्थना ह्याच संग्रहात प्रसिद्ध झाली). ह्या वर्षाच्या सुरुवातीला त्यांनीवंगदर्शन ह्या बंकिमचंद्रांनी स्थापन केलेल्या नियतकालिकांचे संपादकत्व स्वीकारले. चोखेर बाली (१९०३) ही त्यांची भारतीय भाषांतली पहिली म्हणता येईल अशी मनोविश्लेषणात्मक कादंबरी वंगदर्शनातूनच क्रमशः प्रसिद्ध झाली. चिरकुमार सभा(१९२६) हे विनोदी नाटकही याच वर्षी लिहून त्यांनी भारतीतून प्रसिद्ध केले. ऑक्टोबर महिन्यात ते शिलाइदहहून सहकुटुंब शांतिनिकेतनात आले आणि तपोवन पद्धतीची शाळा सुरू करण्याच्या कार्याला अधिक नेटाने लागून २२ डिसेंबर १९०१ ह्या दिवशी वडिलांचा आशिर्वाद घेऊन त्यांनी आश्रमशाळेची स्थापना केली. त्यांच्या बरोबर आलेल्या पहिल्या शिक्षकांत ब्रह्मबांधव उपाध्याय, रेवाचंद, जगदानंद राय, शिवधन विद्यारण्य आणि लॉरेन्स हे इंग्रज गृहस्थ होते.


नवीन आश्रमशाळा सुरू झाल्याच्या काळात त्यांना अनेक आर्थिक आणि कौटुंबिक आपत्तींना तोंड द्यावे लागले. १९०२ मध्ये नोव्हेंबर महिन्यात त्यांच्या पत्नींना गंभीर दुखणे झाले आणि २३ नोव्हेंबर रोजी वयाच्या अवघ्या एकोणतिसाव्या वर्षी त्यांचे निधन झाले. पुढल्याच वर्षी त्यांची कन्या रेणुका वारली (१९०३). सतीशचंद्र राय ह्या बुद्धिमान आणि त्यागी सहकारी मित्रालाही तरुण वयात मृत्यू आला. ह्या साऱ्‍या आपत्तींना तोंड देत असताना देशातील राजकीय चळवळींत त्यांचे सहकार्य चालू होते. ‘स्वदेशी समाज’ हा ग्रामीण पुनर्रचनेसंबंधीचा सुप्रसिद्ध निबंध याच वर्षी त्यांनी लिहिला. लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेतून ‘शिवाजी उत्सव’ सुरू केला आणि ‘शिवाजी’ ही देशभक्तीला प्रेरणा देणारी स्फूर्तिदायक दीर्घ कविताही लिहिली. विद्यार्थ्यांना उपयुक्त अशी पुस्तके लिहिली. नौकाडुबी (१९०६) ही कादंबरीही ह्याच काळात क्रमशः प्रसिद्ध होत होती. १६ मार्च १९०५ रोजी महर्षी देवेंद्रनाथांचे निधन झाले.


लॉर्ड कर्झन यांनी १९०५ मध्ये केलेल्या वंगभंगाच्या निर्णयाविरुद्ध देशभर प्रतिकाराची चळवळ सुरू झाली होती. बंगालच्या अभेद्यतेचे प्रतिक म्हणून रवींद्रनाथांनी ‘रक्षाबंधना’चा विराट कार्यक्रम हाती घेतला. याच वर्षी ‘प्रिन्स ऑफ वेल्स्’ यांनी भारताला भेट दिली. त्यांच्या स्वागत समारंभावर कठोर टीका करणारे लेखही त्यांनी लिहिले.


वंगभंगाच्या चळवळीला घातपाताचे स्वरूप येऊ लागल्यामुळे त्यांनी त्यातून लक्ष काढून घेऊन ग्रामीण भागातील विधायक कार्य व शांतिनिकेतनातील जीवनशिक्षणकार्याकडे ते केंद्रित केले. १९०७, साली वंगीय साहित्य संमेलनाच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती झाली. ह्या काळात सुप्रसिद्ध बंगाली संपादक रामानंद चतर्जी यांच्याशी त्यांचा स्नेह वाढत गेला आणि प्रवासी ह्या त्यांच्या मासिकातून त्यांची गोरा (१९१०) ही पुढे जागतिक लौकिक मिळवलेली कादंबरी प्रसिद्ध होऊ लागली. याच वर्षी त्यांचा कनिष्ठ पुत्र शमींद्रनाथ वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षी कॉलरा होऊन वारला. १९०९ साली लिहिलेल्या प्रायश्चित ह्या नाटकात धनंजय बैरागी ह्या पात्राकरवी त्यांनी असहकार आणि अहिंसात्मक प्रतिकाराचे जे तत्त्वज्ञान सांगितले आहे, ते नंतरच्या काळातील गांधीजींच्या तत्त्वज्ञानाशी जुळणारे आहे. राजा (१९१०) हे रुपकात्मक नाटकही त्यांनी याच वर्षी लिहिले. ज्येष्ठपुत्र रथींद्रनाथ १९१० साली अमेरिकेहून परतल्यावर त्याचा प्रतिमा देवी ह्या बालविधवेशी विवाह केला.


शांतिनिकेतनातील रहिवाशांनी त्यांचा पन्नासावा वाढदिवस १९११ साली साजरा केला. प्रवासीमधून त्यांच्या जीवनस्मृती क्रमशः प्रसिद्ध होत होत्या आणि गीतांजलीतून (१९१२) संगृहीत झालेल्या मूळ कविता व डाकघर (१९१२) हे नाटकही याच काळात लिहिले गेले. २७ डिसेंबर १९११ रोजी कलकत्त्यात राष्ट्रीय सभेचे सव्विसावे अधिवेशन भरले असताना ‘जणगणमन-अधिनायक जय हे भारत-भाग्यविधाता’ हे त्यांनी रचलेले आणि संगीतबद्ध केलेले गीत पहिल्या प्रथम गायले गेले. त्यानंतर माघोत्सवांत हे गीत ब्रह्मसंगीत म्हणून गात असत. भारत स्वतंत्र झाल्यानंतर ह्या गीताचा ‘राष्ट्रगीत’ म्हणून अधिकृतपणे स्वीकार झाला.


इंग्लंडमधील स्नेह्यांकडून त्यांना समानशील इंग्रज साहित्यप्रेमी लोकांना भेटण्याविषयी आग्रहाची निमंत्रणे येत होती. त्यांनी जाण्याचे ठरवले; परंतु ऐनवेळी आजारी पडल्यामुळे बेत रद्द केला व ते शिलाइदह येथे हवापालट करण्यासाठी गेले. ह्या ठिकाणी त्यांनी गीतांजलीत आलेल्या बंगाली कवितांचे स्वतः इंग्रजीतून भाषांतर केले. १९१२ च्या मे महिन्यात ते इंग्लंडला गेले. तेथे सुप्रसिद्ध चित्रकार रोदेन्‌स्टाइन यांनी ते वाचायची इच्छा प्रकट केल्यावरून ते त्यांच्या हाती दिले. त्यांनी श्रेष्ठ कवी डब्ल्यू. बी. येट्स ह्यांच्याकडे त्या रत्नाची पारख सोपवली. येट्स कविता वाचून मुग्ध झाले [बंगाली साहित्य]. पुढे अनेक नामवंत इंग्रज साहित्यिकांशी त्यांचा परिचय झाला. दीनबंधू सी. एफ्. अँड्र्यूज यांची पहिली भेट याच वेळी झाली आणि पुढे ते त्यांचे आजन्म स्नेही आणि सहकारी झाले. रॉयल आल्बर्ट हॉल ह्या प्रख्यात नाट्यगृहात त्यांच्या ‘दालिया’ नावाच्या कथेवरून इंग्रजीत रचलेल्या ‘महारानी ऑफ आराकान’ ह्या एकांकिकेचा प्रयोग झाला.


लंडनहून ते अमेरिकेत गेले. गीतांजलीच्या इंग्रजी आवृत्तीचे उत्तम स्वागत झाल्याची वार्ता त्यांना कळली. येट्सनी त्या संग्रहाला प्रस्तावना लिहिली होती. १९१३ च्या नोव्हेंबरात शांतिनिकेतनला ते परतले. १३ नोव्हेंबरला त्यांच्या गीतांजलि ह्या काव्यसंग्रहाला स्वीडिश अकॅडेमीने नोबेल पारितोषिक दिल्याची वार्ता कळली. साहित्यासाठी हे पारितोषिक मिळवलेले रवींद्रनाथ हे पहिले आशियाई लेखक होत. रवींद्रनाथांना नोबेल पारितोषिक मिळण्यापूर्वीच कलकत्ता विद्यापीठाने डी. लिट्. ही सन्मानदर्शक पदवी देण्याचा ठराव केला होता. प्रत्यक्ष समारंभ २६ डिसेंबरला झाला. त्यांच्या पुस्तकांची यूरोपातील महत्त्वाच्या भाषांतून तसेच भारतीय भाषांतूनही भाषांतरे होऊ लागली. आंद्रे झीद (फ्रेंच), झेनोबिया येमेनेझ (स्पॅनिश) यांच्यासारखे श्रेष्ठ यूरोपीय लेखक त्यांना भाषांतरकार म्हणून लाभले.


यूरोपात ४ ऑगस्ट १९१४ रोजी पहिल्या जागतिक महायुद्धाचा वणवा पेटला. ५ ऑगस्टला ‘मा मा हिंसी :’ ह्या विषयावर जगावर कोसळत असलेल्या ह्या द्वेषमूलक विध्वंसासंबंधी त्यांनी तळमळीने भाषण केले. त्यानंतरच्या सेहेचाळीस दिवसांत त्यांनी गीताली (१९१४) साठी एकशेआठ गाणी रचून ती स्वरबद्ध केली. शबूज पत्र (हिरवी पाने) ह्या नियतकालिकाचे ⇨ प्रमथ चौधुरी यांच्या संपादकत्वाखाली प्रकाशन सुरू झाले. येथून बंगाली साहित्याला नवीनच वळण लागले. रवींद्रनाथांच्या प्रतिभेचा एक नवीनच आविष्कार शबूज पत्र ह्या नियतकालिकातून प्रसिद्ध होणाऱ्‍या बलाका (१९१६) ह्या काव्यसंग्रहात नंतर ग्रथित झालेल्या कवितांतून व ‘सबूजेर अभियान’ सारख्या काव्यातून; चतुरंग (१९१६), घरे बाइरे (१९१६) सारख्या कादंबऱ्‍यांतून व अनेक निबंधांतून प्रकट होऊ लागला.


त्यांना ब्रिटिश सम्राटाकडून १९१५ साली ‘सर’ (नाइटहुड) हा किताब देण्यात आला आणि याच वर्षी सी. एफ्. अँड्र्यूज यांनी शांतिनिकेतनात त्यांची आणि गांधीजींची भेट घडवून आणली. या वर्षीच्या परदेश दौऱ्‍यांत युद्धाची आसुरी धुंदी चढलेल्या जपान व अमेरिकेतील जनसमुदायांपुढे त्यांनी विश्वशांतीच्या प्रचाराची भाषणे केली. त्याबद्दल अवहेलनाही सहन केली. भारतात परतल्यानंतर ॲनी बेंझट ह्या भारताच्या स्वातंत्र्याचा पुरस्कार करणाऱ्‍या थोर आयरिश महिलेच्या अटकेविरुद्ध त्यांनी आवाज उठवला आणि अखिल भारतीय काँग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनाचे अध्यक्षपद ॲनी बेंझटना मिळावे, यासाठी प्रचार केला. ह्या अधिवेशनात केलेल्या ‘कर्ताय इच्छाय कर्म’ ह्या त्यांच्या ओजस्वी देशभक्तिपर भाषणामुळे स्वदेशी युगातील राष्ट्रप्रेमी रवींद्रनाथांचे दर्शन जनतेला घडले. ह्या अधिवेशनात उत्साहाने भाग घेत असताना त्यांनी डाकघर ह्या नाटकाचा प्रयोग बसवून तो आपल्या वाड्यात, आमंत्रित सदस्यांपुढे करून दाखवला. हा प्रयोग पाहण्यासाठी लो. टिळक, पं. मदन मोहन मालवीय, गांधीजी प्रभृती थोर पुढारी हजर होते.


त्यांची सर्वांत थोरली कन्या माधुरीलता (बेला) हिचे १९१८ साली निधन झाले. त्यानंतर सु. चार महिने शांतिनिकेतनातील शिक्षणकार्यावर त्यांनी आपले लक्ष केंद्रित केले. ‘यंत्र विश्वं भवत्येक नीडम्’ ह्या भावनेने स्थापन केलेल्या ‘विश्वभारती’ ह्या संस्थेंची २२ डिसेंबर १९१८ रोजी पायाभरणी झाली. ‘भारतवर्षातील शिक्षणपद्धतीने वैदिक, पौराणिक, बौद्ध, जैन, मुसलमान इ. सर्व विचार एकत्र आणले पाहिजेत व ही विचारसंपत्ती एका ठिकाणी संगृहीत करायला पाहिजे’, हा विचार ह्या स्थापनेच्या मुळाशी होता. केवळ भारतातीलच नव्हे, तर जगातील संस्कृतींच्या अभ्यासाचे आणि संशोधनाचे ते केंद्र व्हावे आणि देश, राष्ट्र इ. मर्यादांचे उल्लंघन करून भूत, वर्तमान आणि भविष्यकाळातील मानवाची प्रगती ही त्या केंद्राच्या विकासाची दिशा रहावी, हे त्यामागील ध्येय होते.


ब्रिटिश सरकारने १९१९ साली पंजाबातील जालियनवाला बागेत केलेल्या अमानुष हत्याकांडामुळे ‘दहशतीच्या धसक्याने मूक झालेल्या माझ्या कोट्यवधी देशबांधवांच्या निषेधाला वाचा फोडण्यासाठी’ आपण हा किताब परत करीत आहोत असे व्हाइसरॉयना कळवून ‘सर’ हा किताब त्यांनी परत केला. विश्वभारतीला आर्थिक साहाय्याची मागणी करण्यासाठी त्यांनी भारताचा दौरा सुरू केला. देशातील प्रमुख शहरांतून व्याख्याने दिली, नाट्यप्रयोग केले, वयाची साठी उलटली असतानाही स्वतः त्यातून भूमिका केल्या. २० सप्टेंबर १९२२ रोजी पुण्यातील किर्लोस्कर नाट्यगृहात ‘भारतीय प्रबोधना’वर त्यांचे भाषण झाले आणि सार्वजनिक जाहीर सभेत त्यांनी लो. टिळकांना श्रद्धांजली वाहिली. विश्वभारतीच्या कार्यासाठी काढलेल्या यूरोप-अमेरिकेच्या दौऱ्‍याप्रमाणे आग्नेय आशियातील देशांतही त्यांनी दौरा काढला व जाव्हा, बाली वगैरे बेटांपर्यंत जाऊन तेथील नृत्य, नाट्य, गायन, धार्मिक पूजाविधी यांतून लाभलेले सांस्कृतिक धन त्यांनी गोळा करून आणले. तेथील ‘बाटिक’ कला रवींद्रनाथांनी आपल्या बरोबरचे चित्रकार सुरेंद्रनाथ कार यांना शिकायला लावून शांतिनिकेतनात त्या कलेचे शिक्षण देणारा विभाग उघडला. तो अद्यापही चालू आहे.


विश्वभारतीत फ्रेंच प्राच्यविद्यापंडित सिल्व्हँ लेव्ही, श्रीलंकेतील बौद्ध तत्त्वज्ञानविशारद धर्माधार राजगुरू महास्थविर, विधुशेखर भट्टाचार्य (संस्कृत पंडित), दिनेंद्रनाथ टागोर (रवींद्रसंगीतज्ञ), भीमराव शास्त्री हसूरकर (अभिजात हिंदुस्थानी संगीतज्ञ), ⇨नंदलाल बोस (चित्रकार), रवींद्रनाथ टागोर (कृषितज्ज्ञ) यांच्यासारख्यांनी कला आणि ज्ञानाच्या विविध शाखांचे नेतृत्व स्वीकारले. तिबेटी, चिनी यांसारख्या आशियाई भाषांचा अभ्यास सुरू झाला.


अहमदाबादला १९२० साली गुजराती साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांना देण्यात आले. त्या रात्री त्यांचा मुक्काम साबरमतीला गांधीजींच्या आश्रमात होता. १९२१ साली गांधीजींनी असहकाराची चळवळ सुरू केली. जनतेच्या आंदोलनाला जर तितक्याच प्रबळ विधायक कार्याची जोज नसली, तर त्या आंदोलनाला अनिष्ट वळणे लागतात, अशी रवींद्रनाथांची धारणा होती. ह्या बाबतीत त्यांचा गांधीजींशी मतभेद होता. बोलपूर जवळील सुरूल गावी ‘श्रीनिकेतन’ ही शेतकी शिक्षणाचे कार्य करणारी संस्था १९२२ मध्ये सुरू केली. सांस्कृतिक पुनरुत्थानाच्या कार्याबरोबर श्रीनिकेतनात ग्रामीण विकासाचे विधायक कार्य पिअर्सन आणि लेओनार्ड एल्महर्स्ट ह्या ध्येयवादी इंग्रज शेतकी तज्ज्ञांच्या साहाय्याने त्यांनी सुरू केले होते. खेड्यापाड्यांत पसरलेल्या मलेरिया रोगाच्या उच्चाटणापासून तो जपानी तज्ज्ञांच्या साहाय्याने चर्मोद्योग, कुटिरोद्योग चालवण्यापर्यंत ग्रामीण जनतेच्या स्वास्थ्य आणि सुखासाठी आवश्यक असणाऱ्‍या अनेक कार्यांचे प्रयोग श्रीनिकेतनात रवींद्रनाथांच्या देखरेखीखाली चालू होते. त्याचबरोबर मुक्तधारा (१९२२), रक्तकरवी (१९२४) यांसारख्या नवीन नाटकांचे प्रयोग, निरनिराळ्या ऋतूंच्या उत्सवांचे आयोजनही ते करीत होते. एवढेच नव्हे, तर आत्मसंरक्षणार्थ शांतिनिकेतनातील विद्यार्थी-विद्यार्थीनींना जपानी तज्ज्ञांकडून ⇨जूदो ह्या कुस्तीचे शिक्षणही सुरू केले होते. रवींद्रनाथांनी होमिऑपथी आणि जीवरसायनशास्त्र यांचा उत्तम अभ्यास करून स्वतः रोगनिवारणाच्या कार्यात भाग घेतला होता. जीवनातील मानवहिताचे कुठलेही अंग त्यांनी गौण मानले नाही. १९३० साली ऑक्सफर्डला ‘मानवाचा धर्म’ ह्या विषयावर त्यांचे व्याख्यान झाले. त्याच वेळी त्यांच्या चित्रांचे प्रदर्शनही भरविले गेले. उतार वयात त्यांनी चित्रकलेची आराधना सुरू केली. त्यातूनही रंगरेषांतील अभिव्यक्तीचे त्या कलेच्या क्षेत्रात त्यांनी नवीन दालन उघडले. हे प्रदर्शन यूरोपातील फ्रान्स, इंग्लंड, जर्मन, सोव्हिएट रशिया आणि अमेरिकेतील अनेक प्रमुख शहरांतून भरवले गेले.


कलकत्यातील अनेक संस्थांतर्फे १९३१ साली त्यांचा सत्तरावा वाढदिवस साजरा झाला. पुढल्याच वर्षी त्यांनी इराण व इराकचा दौरा केला. तेथून परतल्यानंतर कलकत्ता विद्यापीठाच्या रामतनू लाहिरी अध्यासनाच्या प्राध्यापक पदावर त्यांची नियुक्ती होऊन विद्यापीठाने ६ ऑगस्ट रोजी त्यांना मानपत्र दिले. याच सुमारास बंगाली कवितेत त्यांनी नव्यानेच मुक्तछंदाचा प्रयोग सुरू केला होता. त्या कवितांचा पुनश्च (१९३२) हा संग्रह होय. देशातील अल्पसंख्यांकांचे स्वतंत्र मतदारसंघ निर्माण करण्याच्या ब्रिटीश सरकारच्या निर्णयाविरुद्ध गांधीजींनी वीस सप्टेंबरपासून येरवड्याच्या तुरुंगात आमरण उपोषण सुरू केले. इतर राजकीय नेतेही बंदिवासात होते. रविंद्रनाथांनी गांधीजींच्या उपोषणाला जाहीर पाठिंबा दिला. त्यांना गांधीजींच्या उपोषणाची चिंता वाटून ते पुण्याला गेले. त्याच वेळी येरवडा तुरुंगात पंतप्रधान मॅक्डॉनल्ड यांनी वाटाघाटी करण्याचे मान्य केल्याची बातमी आली. गांधीजींनी उपोषण सोडले त्या प्रसंगी रवींद्रनाथ तेथे हजर होते. दुसऱ्‍या दिवशी तिथीप्रमाणे गांधीजींचा जन्मदिन होता. पुण्यातील शिवाजी मंदिरात पंडित मालवीय ह्यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या अभिनंदनपर प्रचंड सभेत रवींद्रनाथांचे ‘जातीयता आणि अस्पृश्यतेचे निर्मूलन’या विषयावर भाषण झाले.


संगीत-नृत्य आणि मूकाभिनय ह्या तिन्ही कलांच्या एकत्रीकरणातून चित्रांगदा (१८९२) नाटकाचे पुनर्लेखन करून त्यांनी प्रयोग केला (१९३३). ‘परिशोध’ कवितेला संगीत-नाट्यरूप दिले आणि श्यामा (१९३९) हे नवीन नृत्यनाटक लिहून त्याचा कलकत्त्याच्या रंगमंचावर प्रयोग केला. कठोर राज्यशासनामुळे माणसाचे आवडीनिवडीचे स्वातंत्र्य जाऊन त्याचे जीवन शुष्क होते. माणसे अल्पसंतुष्ट आणि भित्री होतात. जीवनाला अवकळा येते. हा विचार सांगणाऱ्‍या ताशेर देश (१९३३, म. शी. पत्त्यांचा देश) ह्या त्यांच्या प्रयोगदृष्ट्या यशस्वी अशा संगीत नाटकाचा प्रयोगही याच वर्षी कलकत्त्यात झाला. १९३७ साली कलकत्ता विद्यापीठाच्या पदवीदान समारंभाच्या प्रवक्तेपदावरून, तोपर्यंतची इंग्रजीतून भाषण करण्याची प्रथा मोडून, त्यांनी बंगालीतून भाषण केले. १९३६ मध्ये जवाहरलाल नेहरूंच्या विनंतीवरून, माणसाचे जन्मसिद्ध हक्क जतन करण्यासाठी स्थापन केलेल्या व्यक्तिस्वातंत्र्य संघाचे त्यांनी अध्यक्षपद स्वीकारले.


हिटलरने १९३८ साली चेकोस्लोव्हाकियावर हल्ला केला. प्राग येथील आपले मित्र व्ही. लेस्नी यांना पत्र पाठवून रवींद्रनाथांनी ह्या आक्रमणाचा कडाडून निषेध केला. जपानेही चीनवर हल्ला केला होता. त्यासंबंधी तीव्र निषेध व्यक्त करणारी पत्रे त्यांनी जपानमधील श्रेष्ठ कवी नोगुची यांना पाठवली.


दुसऱ्‍या महायुद्धाने १९४० सालापासून अतिशय उग्र स्वरूप धारण केले. विश्वशांतीच्या आणि मानवतेच्या कल्पनांचा वृद्ध रवींद्रनाथांना त्यांच्या डोळ्यापुढे विध्वंस होताना दिसत होता. याच वर्षी गांधीजींनी शांतिनिकेतनला भेट दिली. गांधीजींना निरोप देताना रवींद्रनाथांनी त्यांच्या हाती एक पत्र दिले. ‘माझ्या आयुष्यातल्या अमोल धनाचा साठा वाहून नेणाऱ्‍या जहाजासारख्या असणाऱ्‍या विश्वभारतीचा भार माझ्यामागून आपण सांभाळा’ अशी त्या पत्रात गांधीजींना विनंती केली होती. गांधीजींनी ते पत्र मौलाना अबुल कलाम आझाद यांना दिले. १९५१ साली मौलाना अबुल कलाम आझाद स्वतंत्र भारतातील केंद्रीय शिक्षणमंत्री झाल्यानंतर विश्वभारतीचा आर्थिक भार भारत सरकारने स्वीकारला. १९४० च्या ऑक्टोबरात ऑक्सफर्ड विद्यापीठाने शांतिनिकेतनात आपले प्रतिनिधी पाठवून सर मॉरिस ग्वियर (तत्कालीन सरन्यायाधीश) यांच्या हस्ते त्यांना ‘डॉक्टरेट’ची सन्माननीय पदवी देण्याचा खास समारंभ घडवून आणला.


त्यांचा ऐंशीवा वाढदिवस १४ एप्रिल १९४१ रोजी शांतिनिकेतनात साजरा झाला. मूत्रपिंडाच्या विकारामुळे प्रकृती खूपच ढासळली होती. तरीही ह्या प्रसंगी आपला संदेश म्हणून ‘सभ्यतार संकट’ (संस्कृतीवरील गडांतर) ह्या शीर्षकाखाली त्यांनी एक निबंध लिहिला. ऐंशीव्या वर्षी प्रकृती आणि भोवतालची परिस्थिती अत्यंत प्रतिकूल असतानाही रुग्णशय्येवरील रवींद्रनाथांनी आपल्या बालपणाच्या स्मृतींचा छेलेबेला (१९४०, म. शी. बालपण) हा अत्यंत हृदयंगम असा छोटेखानी ग्रंथ लिहिला. ‘ऐकतान’ ही त्यांची सुप्रसिद्ध कविता त्याच काळातील आणि जन्मदिने (१९४१) हा शेवटला कवितासंग्रहही याच काळातील होय.


त्यांची प्रकृती १९४१ च्या जून अखेरीला फारच ढासळली. डॉक्टरांनी कलकत्त्याला उपचारासाठी नेण्याचा सल्ला दिला. ३० जुलैला शस्त्रक्रिया होण्याच्या काही तास आधी त्यांनी आयुष्यातील शेवटची कविता लिहून घ्यायला सांगितली. आपल्या जीवनदेवतेला गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी दिलेले हे शेवटचे अर्घ्य. कृती आणि उक्ती यांतील अद्वैत आचरणातून सिद्ध करणाऱ्‍या, उपनिषदांच्या अभ्यासाला अनुसरून पिंडी ते ब्रह्मांडी पाहणाऱ्‍या, साहित्य, संगीत, कला, आणि विचारांचे बहुविध आणि बहुमोल भांडार अवघ्या मानवतेला देणाऱ्‍या, ह्या विश्वकवीची प्राणज्योत ७ ऑगस्ट १९४१ रोजी दुपारी १२ वाजून १० मिनिटांनी मालवली.


त्यांच्या जन्मशताब्दीचा उत्सव १९६१ साली जगभर साजरा झाला. त्या प्रसंगी देशोदेशींच्या तत्त्वज्ञांनी, कवी-कलावंतांनी आणि राष्ट्र धुरीणांनी त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करणारे लेख लिहिले. त्या प्रसंगी जवाहरलाल नेहरूंनी म्हटले आहे, ‘प्राचीन काळातील ज्ञानातून स्फूर्ती घेऊन अर्वाचीन काळाला उपयुक्त असा साज देणारे आणि ते ज्ञान सार्थ करणारे असे भारतीय द्रष्ट्यांच्या परंपरेतील ते एक ऋषी होते. त्यांनी अस्सल भारतीय परंपरेतील संदेश आजच्या युगधर्माला अनुरूप असणाऱ्‍या नव्या भाषेत दिला. हा थोर आणि उत्कट संवेदनाशीलता असणारा माणूस केवळ भारताचाच कवी नव्हता, तर साऱ्‍या मानवतेचा व सार्वजनिक स्वातंत्र्याचा कवी होता. त्याचा संदेश आपण सर्वांसाठी आहे’. 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

संकलन -गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवातमाळ ४४५२०६



Good morning

 🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

आषाढ मास,कृष्ण पक्ष, *चतुर्दशी*,पुनर्वसु नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,वर्षा ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

शनिवार, ०७ आॕगष्ट २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                        *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

         *"जब आप प्रातः जगें तो अपने माता-पिता को हृदय से धन्यवाद दें एवं शुभाशीष लें, क्योंकि माता-पिता के श्रेष्ठ लालन-पालन के कारण ही आप इस संसार में हैं एवं उत्तम जीवन जी रहे हैं। स्मरण रहे कि जो व्यवहार आपका अपने माता-पिता के लिए है, वही आपको अपने बच्चों से मिलेगा।"*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

अलेक्झांडर पेनीसीलीन आणि प्रतिजैविके

 *🧪🧪🧪अलेक्झांडर🧪🧪🧪🧪*

🧪🧪🧪🧪🧪🧪🧪🧪🧪🧪🧪

*पेनिसिलीन आणि प्रतिजैविक (antibiotics) चा शोध*

🧪🧪🧪🧪🧪🧪🧪🧪🧪🧪🧪

*जन्मदिन - ६ ऑगस्ट इ.स. १८८१*


सर अलेक्झांडर फ्लेमिंग हे ब्रिटनचे जीवशास्त्रज्ञ, औषधतज्ञ होते. (जन्म ६ ऑगस्ट १८८१ - म्रुत्यु ११ मार्च १९५५). त्यांनी केलेल्या पेनिसिलीन च्या शोधाबद्दल व त्याचा प्रतिजैविक म्हणून वापराच्या शोधाबद्दल त्यांना १९४५ मध्ये नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या या शोधाने वैद्यकक्षेत्रात प्रतिजैविकांचे युग चालू झाले व त्यामुळे अनेक अवघड जीवघेण्या रोगांवर मात करणे शक्य झाले. त्यांच्या पेनिसिलीनच्या शोधाबद्दल कहाणी प्रसिद्ध आहे. त्यांनी जीवाणूंचे ताटलीमध्ये कल्चर तयार केले होते. या कल्चरमध्ये चूकून पेनिसिलिन नामक बुरशी येउन पडली व त्यामुळे जीवाणूंचे संपूर्ण कल्चर मृत झाले. आपले श्रम वाया गेले म्हणून फ्लेमिंग ती ताटली फेकून देणार होते. परंतु त्याचवेळेस हे कल्चर का मृत झाले याबद्दल जीज्ञासा निर्माण झाली व पेनिसिलीन ही बुरशी जीवाणूंसाठी मरण आहे हे लक्षात आले व प्रतिजैविकांचा शोध लागला.

फ्लेमिंग यांनी जीवाणूशास्त्र, केमोथेरेपी यांवरती अनेक पुस्तके प्रकाशित केली आहेत.    

➿➿➿➿➿➿➿➿➿➿                             

संकलन -)

गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा - यवतमाळ ४४५२०६

प्रभात दर्शन

 🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

आषाढ मास,कृष्ण पक्ष, *त्रियोदशी*,आद्रा नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,वर्षा ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

शुक्रवार, ०६ आॕगष्ट २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                      *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

         *"झूठे ज्ञान एवं अधूरे ज्ञान से अत्यधिक सावधान रहिये, क्योंकि यह अज्ञान होने से भी अधिक भयानक एवं हानिकारक है"*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

कोरडा खोकला का येतो


══════════════════════

    संकलन ):गजानन गोपेवाड 

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════

📒 *कोरडा खोकला का येतो ?* 📒

************************************


एकदा सहज खोकून पाहा. आता सांगा तुम्ही काय काय केलेत ते? एवढे विचारात पडू नका. आधी तुम्ही दीर्घ श्वास घेतला. मग एपिग्लाॅटीस नावाचा घशातील पडदा श्वासनलिकेवर दाबला. त्यानंतर तुम्ही दाबाखाली हवा बाहेर सोडली. हे करताना आवाजही झाला (ज्याला आपण खोकला म्हणतो) व श्वासनलिकेतील चिकट पदार्थ व बेडकाही बाहेर आला, आपल्या लक्षातही न येता एवढ्या क्रिया आपण केल्या. श्वासनलिकेत काही गेले (धूळ, पाणी, अन्नकण इत्यादी), तर ते काढून टाकण्यासाठी खोकल्याचा उपयोग होतो. खोकला हे अशा प्रकारे शरीराचे प्रतिकाराचे शस्त्रच आहे. रोगांमध्ये मात्र जिवाणू व विषाणूच्या क्रियेमुळे व दाहामुळे वारंवार खोकला येतो. बेडके पडतात; पण खोकून खोकून छाती, घसा दुखायला लागतात, बेडक्यासहीत येणारा खोकला म्हणजे ओला खोकला. नुसताच येणारा खोकला म्हणजे कोरडा खोकला होय. कोरडा खोकला का येतो, ते आता पाहू. आपल्या इच्छेने आपण खोकू शकतो व आपल्या मनाविरुद्ध व इच्छेविरुद्धही आपल्याला खोकला येतो.


पोटात जंतू असतील, घशाचा व स्वरयंत्राचा दाह होत असेल किंवा कर्करोगाच्या गाठीमुळे किंवा फुगीर महारोहिणीमुळे जर श्वासनलिकेवर दाब येत असेल तर कोरडा खोकला येतो. काही मानसिक रोगातही कोरडा खोकला येतो. असा त्रासदायक खोकला थांबवण्यासाठी कोडेन व नोस्कापीनसारखे औषध उपयोगी

पडते. सोबत संबंधित रोगाचा उपचारही घेणे अगत्याचे ठरते. बेडके पडणाऱ्या खोकल्यात मात्र खोकलाविरोधी औषधे घेऊ नयेत. बेडके बाहेर आल्याने रोगजंतू शरीराबाहेर पडतात व ते आवश्यक असते. बेडक्याच्या तपासणीवरून रोगाचे निदानही करता येते. रोगाप्रमाणे उपाचार घेणेच श्रेयस्कर होय.


*डाॅ.अंजली दिक्षित व डाॅ.जगन्नाथ दिक्षित*

*यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' पुस्तकातून*

═══════════════════════

गुरुवार, ५ ऑगस्ट, २०२१

अग्निपंख ई मासिक

 खुश खबर ❗खुश खबर ❗आनंदाची बातमी‼️


आदरणीय शिक्षकांना सुचित करण्यात येत आहे की, अग्निपंख फाउंडेशन महाराष्ट्र राज्य परिवार आपले साठिच

 ई -मासिक घेऊन येत आहे. 

यामध्ये तुमचे शैक्षणिक उपक्रम व लेख,कविता,यशोगाथा,बालसाहित्य , सामाजिक विशेष कार्यक्रम, राष्ट्रीय विशेष कार्यक्रम जर आपण घेतले असेल तर फोटो सह सदर मेल वर पाठवावेत असे आव्हान करण्यात येत आहे, 

उपक्रमाची एका पेक्षा जास्त फोटो जर पाठवायचे झाले तर कोलाज मध्ये जास्तीत जास्तं तीन फोटो च पाठवा agnipankhfmhmasik@Yahoo.com

या ई मेल वर संकलन सुरू आहे, 

आपला ई मासिक दर महिन्याच्या एक तारखेस प्रकाशित होणार आहे याची नोंद घ्यावी 

काही अडचण असेल तर खालील नंबर वर संपर्क करा 


 संपर्क

गजानन गोपेवाड (मो नं 7378670283)वर थेट फोन करून विचारू शकाल

धन्यवाद  ‼️

राज्य पुरस्कार आँनलाईन फार्म

 https://forms.gle/2bJqAw1aQ5gMpwoJ6                                                                                                                             "अग्निपंख फौंडेशन महाराष्ट्र राज्य तर्फे राज्य स्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन- २०२०-२०२१ सूचना."


१. सदरील पुरस्कार हा फक्त नवोपक्रम शिक्षक/शिक्षिका यांच्या साठीच राहील. 

२. सदरील पुरस्कारा साठी लागणारे सर्व कागदपत्र हे हार्ड कॉपी (Hard Copy) मध्ये देणे अनिवार्य राहील. (हार्ड कॉपी चा बंच येताना सोबत घेऊन येणे. ) 

३. दिलेल्या लिंक मध्ये स्व-घोषित चारित्र्य प्रमाणपत्र दिलेले आहे. त्याला Download करून Print काढून आपली स्वाक्षरी व नाव पत्ता सह Upload करावे.

४. सदरील लिंक मध्ये ४ भाग (Section) आहेत.  (Section-1) पहिल्या भागामध्ये सूचना दिल्या आहेत.   (Section-2) दुसऱ्या भागामध्ये वैयक्तिक माहिती भरायची आहे.  (Section-3) तिसऱ्या भागामध्ये  "नवोपक्रम माहिती" भरावयाची आहे. (Section-4) चौथ्या भागामध्ये "नवोपक्रम यशस्वीते बाबत" माहिती भरावयाची आहे. 

५. (Section-4) चौथ्या भागामध्ये आपल्याला आपल्या   "नवोपक्रम बातम्या/ बातम्याचे कात्रण"  यांची 5 image : required size - 10mb  किंवा एकाच pdf  मध्ये एकत्र करूनआपले सर्व बातम्या व कात्रण टाकावे. 1pdf :  required size - 10mb 

  ६. वरील लिंक हि एक वेळच वापरता येईल (Link required only one Response) 

७. लिंक भरतांना चुका झाल्यास किंवा पुन्हा भरावयाची असल्यास दुसऱ्या E-Mail द्वारे भरावी. 

८. तसेच सदरील माहिती हि soft copy मध्ये तय्यार करून    "agnipankhfoundationmh@gmail.com"  या E-Mail वर टाकावी. (pdf file मध्ये तय्यार करून टाकावी.) 

९. Soft Copy ची प्रिंट करून त्यासोबत केलेले उपक्रमाचे  photos सोबतच्या बंच मध्ये आणावे. (पुरस्कार घेण्यास येतानां) 

१० वरील लिंक भरताना आपणास काही अडचणी आल्यास खालील नंबरवर संपर्क करावा.



- ७३७८६७०२८३

डॉ कलाम सरांच्या जीवनावर आधारित प्रश्न मंजुषा सन्मान

 *डॉ, ए पी अब्दुल कलाम सर यांचे पाचव्या पुण्यतिथी निमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. त्या कार्यक्रमात सहभागी असलेल्या ऊपक्रमशील शिक्षक/शिक्षिका ,व विद्यार्थी यांची नावे व क्रमांक जाहिर करण्यात आनंद होत आहे. आपणाकडुन असेच नवोपक्रम दर्जेदार करतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे 

                 धन्यवाद ❗


1)   *नरेश सिद्धार्थ रामटेके* 

       (विषय शिक्षक )

 शाळा : *जि प उच्च प्राथ.शाळा नांदळी* 

प स कोरची, जि गडचिरोली 


       ( प्रथम क्रमांक) 


2)  संदीप मधुकरराव कोल्हे

           (सहाय्यक शिक्षक )

 शाळा :: जि प प्राथ.शाळा सुकळी 

प स कळंब जि यवतमाळ 

     

        ( प्रथम क्रमांक) 



3)   अविनाश काशिनाथ पाटील


शाळा ::बापूसाहेब डी.डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, वलवाडी ता.धुळे जि. धुळे

    

        (प्रथम क्रमांक) 


 

4)   हेमराज फकिरा अहिरे 

 शाळा ::महादेव आदिवासी माध्यमिक आश्रम शाळा अनेर डॅम 

तालुका. शिरपूर .जिल्हा धुळे 

     

           (प्रथम क्रमांक) 




5)  सिंधू महेंद्र मोटघरे

       (पदवीधर शिक्षक)

शाळा ::जी .प .व. प्रा. शाळा

  तुमखेडा बु. ता.गोरेगाव जि.  गोदिया 

     

         ( प्रथम क्रमांक) 



 

6)  .हुमेंद्र रमेश चांदेवार 

शाळा ::जि. प. वरिष्ठ प्राथमिक शाळा परसोडी, 

पं स सडक अर्जुनी,             जिल्हा गोंदिया 


          (प्रथम क्रमांक) 



7)   दामोधर राजाराम डहाळे

शाळा::  जि प पुर्व माध्य,शाळा मांडवी 

     पं. स. - तुमसर

जिल्हा - भंडारा

            (प्रथम क्रमांक) 


8)    सुशांत प्रभाकर जगताप


शाळेचे नाव : सर्वोदय माध्यमिक विदयालय गुढे ,

 ता . भडगांव . जि . जळगांव

     

             (प्रथम क्रमांक) 




9)   निलेश दिवाकर गिरडकर 

(विषय शिक्षक )

शाळा ::जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मलेरा 

पं स मूलचेरा जिल्हा गडचिरोली 


          (प्रथम क्रमांक) 



10.)   भारती दिनेश तिडके (पदवीधर शिक्षिका) 

शाळा ::जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा घुमराऀ, 

पंचायत समिती गोरेगाव जिल्हा गोंदिया.

      

      (प्रथम क्रमांक) 


11)  जयश्री विजय खोण्डे.

.(माध्यमीक शिक्षिका) .

शाळा ::धर्मराव कृषी विध्यालय .अहेरी ..

तालुका अहेरी .जिल्हा 

गडचिरोली   


       (प्रथम क्रमांक) 



12)  अविनाश रमेश खैरनार


शाळा ::सर्वोदय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात हेंदरुण मोघन 

ता.धुळे, जि .धुळे


        (प्रभम क्रमांक) 


 *खालील सहभागी विद्यार्थी क्रमांक प्राप्त आहे* 


1)  दिपाली लक्ष्मण गवळी (10वी) 

  ( प्रथम क्रमांक) 


2)  चेतन गोकुळ पाटील (10वी)

      (द्वितीय क्रमांक )



13)   रोशनी राजाभाऊ दाते

      (पद::प्राथ शिक्षिका )

 

शाळा ::जि प उ प्राथ शाळा भिमपूर,  

ता- कोरची, जिल्हा- गडचिरोली


         (प्रथम क्रमांक) 


14)   नारायण पुंडलिक भिलाणे (माध्यमिक शिक्षक)

 शाळा ::नूतन माध्य.विद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय दोंडाईचा 

ता. शिंदखेडा जि. धुळे


           (प्रथम क्रमांक) 



15)    मंजुषा सिद्धार्थ नंदेश्वर  (पदवीधर शिक्षिका)

 शाळा:: जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा महालगाव 

केंद्र देव सर्रा

 तालुका. तुमसर .जिल्हा भंडारा.


          (प्रथम क्रमांक )


*कुमारी संजीवनी बनकर*

         (तृतीय क्रमांक) 


 *कुमार अमर सात देवे* 

       (प्रथम क्रमांक )


 प्रिया , दिव्या, संजीवनी 

    (अनुक्रमे सहभागी प्रमाणपत्र)


  *कुमार वेदांत  चौधरी*

         (व्दितीय क्रमांक) 




      *कुमार गिरीश इठुले*

         (सहभागी प्रमाणपत्र) 



16)   राजेंद्र धर्मदास बन्सोड


शाळा ::जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा निंबा


पंचायत समिती गोरेगाव

जिल्हा परिषद गोंदिया


        (द्वितीय क्रमांक )




17)  दत्तात्रय जालिंदर गव्हाणे

(प्रभारी मु.अा.)

शाळा ::जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देऊळगाव ताड

तालुका.भोकरदन जिल्हा.जालना


            (प्रथम क्रमांक) 


18)   राजश्री दयानंद कांबळे. 

     (पद -उपशिक्षिका) 

शाळा ::जि. प. प्राथ. केंद्रशाळा अहिरे 

ता. खंडाळा जि, सातारा 


       (प्रथम क्रमांक) 


टिप ::नाव व शाळा नाव, व ईतर माहिती हि तपासून बघावी जेणेकरून प्रमाणपत्रावर चुका होणार नाही, नंतर एकदा प्रमाणपत्र दिले तर परत दुरूस्ती करून मिळणार नाही व नजरचुकीने कुणी राहिले असतील अशांनी लक्षात आणून द्यावी ही नम्र विनंती आहे 

→_→→_→→_→→_→→_

 *अग्निपंख फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य*


1)गजानन गोपेवाड 

राज्य समन्वयक महाराष्ट्र 


निवड समिती सदस्य 

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

शिक्षक दिन विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला

 [9/4/2020, 5:05 PM] 🇮🇳सत्यमेव जयते जय हिंद 🇮🇳: *शिक्षक दिन विशेष*

'आनंदाची पर्वणी व शिक्षक दिनाच्या निमित्ताने विशेष कार्यक्रम'

       अग्निपंख फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य पुरस्कार गृप मधील सर्व ऊपक्रमशील शिक्षकांना कळविण्यात येत आहे की, दिनांक 5/09/2020 ला आँनलाईन झूम द्वारे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. 

या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून मा. मिलिंद कुबडे सर,उपस्थित राहणार असून प्रमुख पाहुणे म्हणून मा. दिपक चवणे मा. डहाके सर, मा. नितीन भालचक्र सर, मा. दिपक मेश्राम सर

 उपस्थित राहणार आहेत.

       दि. 27/07/2020 ला डॉ ए पी जे अब्दूल कलाम यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त विशेष कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रात आयोजित करण्यात आले होते. त्या कार्यक्रमात सहभागी असलेल्या शिक्षक /शिक्षिका यांना व विद्यार्थी यांना प्रथम क्रमांक /व्दितीय क्रमांक /तृतीय क्रमांकाचे प्रमाणपत्र देण्यात येतील. डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन साजरा करण्यात येणार आहे व या दिनाचे औचित्य साधून 

प्रमाणपत्र वितरण अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते  करण्यात येणार आहे 

कार्यक्रमाची प्रस्तावना आदरणीय सुवर्णा सातपुते जिल्हा समन्वयक करतील व तंत्र मार्गदर्शन व झूम सर्व आयोजन आदरणीय ऋतुजा कसबे करणार आहेत. कार्यक्रमाचे आभार आदरणिय अश्विनी वास्कर जिल्हा समन्वयक करणार आहेत याची सर्वानी नोंद घ्यावी व दिलेल्या झूम क्लाऊड मिटिंग ला आँनलाईन कार्यक्रमा साठी सर्व शिक्षकांनी न चुकता वेळेवर उपस्थित रहावे.


विशेष सुचना - *लिंक आपणास 5 सप्टेंबर ला 3 वाजे ग्रुपमध्ये पाठवली जाईल.

*सर्वांनी वेळेचे काटेकोरपणे पालन करावे.

*मोबाईल चार्जिंग करून घ्यावे.

*प्रत्येक जिल्ह्य़ातील एका शिक्षकाला प्रतिक्रिया व्यक्त करता येईल. तरी ज्यांना प्रतिक्रिया द्यायची तयारी असेल त्यांनी आपले नाव दि. 4 सप्टेंबर ला 4 वाजेपर्यंत आपले नाव गजानन गोपेवाड सर  7378670283

किंवा जयश्री सिरसाटे मॅडम 9423414686 या क्रमांकावर पाठवावे.

*प्रतिक्रिया 3 मिनिटात असावी.

*सर्वांनी आपण अप्रत्यक्ष रित्या सर्वांशी भेटत असल्याने आफिसियल कार्यक्रम समजून आपलं बैठक व्यवस्था इत्यादी असावी व गोंगाटापासून दुर असावे.

*जर चुकून जर का कुणी लेफ्ट झाले तर लगेच लिंक ला पुन्हा टच करून जाईन होता येईल. 


वेळ दुपारी 4 वाजता सुरू करण्यात येईल.


आयोजक 

श्री. गजानन गोपेवाड राज्य समन्वयक महाराष्ट्र 

सौ. जयश्री सिरसाटे 

महिला राज्य समन्वयक महाराष्ट्र 

श्री. ओंकार चेके निवड समिती सदस्य 

अग्निपंख फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य.



 🙏🏻सौ जयश्री निलकंठ सिरसाटे

राज्यसमन्वयक अग्निपंख फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य

[9/4/2020, 5:10 PM] 🇮🇳सत्यमेव जयते जय हिंद 🇮🇳: *शिक्षक दिन विशेष*

'आनंदाची पर्वणी व शिक्षक दिनाच्या निमित्ताने विशेष कार्यक्रम'

       अग्निपंख फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य पुरस्कार गृप मधील सर्व ऊपक्रमशील शिक्षकांना कळविण्यात येत आहे की, दिनांक 5/09/2020 ला आँनलाईन झूम द्वारे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. 

या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून मा. मिलिंद कुबडे सर,उपस्थित राहणार असून प्रमुख पाहुणे म्हणून मा. दिपक चवणे मा. डहाके सर, मा. नितीन भालचक्र सर, मा. दिपक मेश्राम सर

 उपस्थित राहणार आहेत.

       दि. 27/07/2020 ला डॉ ए पी जे अब्दूल कलाम यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त विशेष कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रात आयोजित करण्यात आले होते. त्या कार्यक्रमात सहभागी असलेल्या शिक्षक /शिक्षिका यांना व विद्यार्थी यांना प्रथम क्रमांक /व्दितीय क्रमांक /तृतीय क्रमांकाचे प्रमाणपत्र देण्यात येतील. डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन साजरा करण्यात येणार आहे व या दिनाचे औचित्य साधून 

प्रमाणपत्र वितरण अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते  करण्यात येणार आहे 

कार्यक्रमाची प्रस्तावना आदरणीय सुवर्णा सातपुते जिल्हा समन्वयक करतील व तंत्र मार्गदर्शन व झूम सर्व आयोजन आदरणीय ऋतुजा कसबे करणार आहेत. कार्यक्रमाचे आभार आदरणिय अश्विनी वास्कर जिल्हा समन्वयक करणार आहेत याची सर्वानी नोंद घ्यावी व दिलेल्या झूम क्लाऊड मिटिंग ला आँनलाईन कार्यक्रमा साठी सर्व शिक्षकांनी न चुकता वेळेवर उपस्थित रहावे.


विशेष सुचना - *लिंक आपणास 5 सप्टेंबर ला 3 वाजे ग्रुपमध्ये पाठवली जाईल.

*सर्वांनी वेळेचे काटेकोरपणे पालन करावे.

*मोबाईल चार्जिंग करून घ्यावे.

*प्रत्येक जिल्ह्य़ातील एका शिक्षकाला प्रतिक्रिया व्यक्त करता येईल. तरी ज्यांना प्रतिक्रिया द्यायची तयारी असेल त्यांनी आपले नाव दि. 4 सप्टेंबर ला 4 वाजेपर्यंत आपले नाव गजानन गोपेवाड सर  7378670283

किंवा जयश्री सिरसाटे मॅडम 9423414686 या क्रमांकावर पाठवावे.

*प्रतिक्रिया 3 मिनिटात असावी.

*सर्वांनी आपण अप्रत्यक्ष रित्या सर्वांशी भेटत असल्याने आफिसियल कार्यक्रम समजून आपलं बैठक व्यवस्था इत्यादी असावी व गोंगाटापासून दुर असावे.

*जर चुकून जर का कुणी लेफ्ट झाले तर लगेच लिंक ला पुन्हा टच करून जाईन होता येईल. 


वेळ दुपारी 4 वाजता सुरू करण्यात येईल.


आयोजक 

श्री. गजानन गोपेवाड राज्य समन्वयक महाराष्ट्र 

सौ. जयश्री सिरसाटे 

महिला राज्य समन्वयक महाराष्ट्र 

श्री. ओमकार चेके निवड समिती सदस्य 

अग्निपंख फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य.



 🙏🏻सौ जयश्री निलकंठ सिरसाटे

राज्यसमन्वयक अग्निपंख फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य



Tr. RUTUJA KASBE CRAFT is inviting you to a scheduled Zoom meeting.


Topic: Tr. RUTUJA KASBE CRAFT's Zoom Meeting

Time: Sep 5, 2020 04:00 PM Mumbai, Kolkata, New Delhi


Join Zoom Meeting

https://us04web.zoom.us/j/75270756226?pwd=dU80TW1PMXY3S1BTbVg5UEJkMTZ4Zz09


Meeting ID: 752 7075 6226

Passcode: 8777

राज्य पुरस्कार माहिती

 राज्य स्तरीय नवोपक्र स्पर्धा सन 2020--2021


 *उपक्रमशील शिक्षकांची वैयक्तिक माहिती खलील प्रमाणे भरावी* 


 1) शिक्षकांचे नाव ::


2) आईचे नाव ::


 3)शाळेचे नाव व पत्ता ::


4) कायमचा पत्ता ::


5) पत्रव्यवहार पत्ता ::


6) ईमेल ::


7) बेबसाईट लिंक किंवा ब्लाँग लिंक येथे टाका::


8) वँटस ऐप नंबर::



........................................


 9) नवोपक्रमाचे शीर्षक / नाव  :-



10) नवोपक्रमाची गरज व महत्त्व :-

          


11) नवोपक्रमाची उद्दिष्टे :-


    अ) हा उपक्रम मी का? करतो, ?


आ)कोणत्या स्वरूपात ऊपक्रम ::


ई) कोणासाठी साध्य होणार आहे ::



12) नवोपक्रमाचे नियोजन :-

 

1)कार्यवाहिचे टप्पे (वेळापत्रक) 


2)ऊपक्रम स्थितीचे निरीक्षण :-


13 )ऊपक्रमासाठी सादर करावयाचे पुरावे :-


(टिप ईथे लिंक टाका) 


अ) युट्यूब चॅनल 

आ) ब्लाँग

इ) ट्विटर 

ई) वँटस ऐप गृप

उ) फेसबुक 

ऊ) टेलिग्राम 


14) नवोपक्रमाची कार्यपद्धती :-


अ) कार्यवाही दरम्यान निरिक्षणे व माहिती संकलित ::


इ) उपक्रम पूर्ण झाल्यानंतर निरीक्षण व त्यांच्या नोंदी, 


ई) कार्यवाही मध्ये आलेल्या अडचणी :-



ऊ)  अडचणी आल्या तर आपण काय? ऊपाय योजना केली? ::



उ) माहितीचे विश्लेषण :-



15 )नवोपक्रमाची यशस्वीता / फलनिष्पत्ती /ऊदिष्टानुसार, :-


16) ऊपक्रमाची प्रत्यक्ष कार्यवाही ::


17) ऊपक्रमात सहभागी विद्यार्थी संख्या ::


18) ऊपक्रमाची बातमी कात्रण /

टिव्ही वरील बातमी व्हिडिओ ::



19)ऊपक्रमाची फलनिष्पत्ती ::


20) ऊपक्रमाचे फोटो किमान व कमाल पाच निवडक फोटो :


21) ऊपक्रमाचे ठिकाण कोणते::



22) आपण आपल्या वतीने शिक्षणासाठी केलेले विशेष प्रयत्न /कार्य ::


23)आपल्या माध्यमातून शिक्षण प्रवाहात नवीन पॅटर्न तयार केले असल्यास थोडक्यात माहिती द्यावी ::


24) महिला सबलीकरण आणि  महिला साठी विशेष कार्यक्रम आयोजित केला असेल तर थोडक्यात माहिती द्यावी ::


25) गरिब होतकरू  विद्यार्थी साठी काहि खास ऊपक्रम राबविले असेल तर थोडक्यात माहिती द्यावी ::


26)पुस्तक प्रकाशित (कविता /आत्मचरित्र  ई) केले असेल तर त्या संबंधित माहिती द्यावी ::


27) सामजिक विशेष ऊपक्रम जर राबवित असेल तर माहिती थोडक्यात द्यावी. 


28 ) या अगोदर तुम्हाला प्राप्त पुरस्कार नाव व वर्षे लिहावे::


29)राष्ट्रीय विशेष योगदान असेल तर थोडक्यात नमुद करणे,


टिप ::सर्व माहिती मराठीत च लिहिले पाहिजे, योग्य ती फाईल पी डि एफ स्वरूपात तयार करून द्यावी 

व पुरस्कार निवड झाल्यानंतर तुमची फाईल हार्ड काँपी व साँफ्ट काँपी सोबत घेऊन यावे, 

सोबत, चारित्र्य प्रमाणपत्र प्रींट काढुन, मुख्याध्यापक स्वाक्षरी व गटशिक्षणाधिकारी स्वाक्षरी करण्यात आली तेच प्रिंट काढून सोबत जोडण्यात यावी




,,,,,,,,,,,,,,,,,,,समाप्त ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

पोलीओमुळे पाय का लंगडा होतो


══════════════════════

  @ संकलन @

  *श्री. गजानन गोपेवाड 

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════

📕 *पोलिओने पाय लुळा का होतो ?* 📕 



पोलिओ हा विषाणूंमुळे होणारा एक रोग आहे. तीन प्रकारच्या विषाणूंमुळे हा रोग होतो. या रोगाचे जंतू रुग्णाच्या विष्ठेतून पिण्याच्या पाण्यात मिसळले जातात व निरोगी लोकांना हा रोग होतो. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची सुरक्षित व्यवस्था व मलमूत्र विसर्जनाची विल्हेवाटीची व्यवस्था नसलेल्या देशांमध्ये हा रोग मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. भारतात या सुविधांचा अभाव असल्याने पोलिओ आढळून येतो. पाच वर्षांखालील मुलांना हा रोग प्रामुख्याने होतो. दरवर्षी दर लाख लोकसंख्येमागे १५ जण पोलिओमुळे लुळे होतात.


पोलिओचे विषाणू दूषित पाण्यातून तोंडावाटे शरीरात प्रवेश करतात. पचनसंस्थेत प्रवेश केल्यानंतर सौम्य प्रकारचा आजार होतो (यात ताप, उलट्या व जुलाब ही लक्षणे असतात) व बऱ्याचदा तो आपोआप बरा होतो. अशा रुग्णांपैकी क्वचित एखाद्याच्याच आतड्यातून हे विषाणू रक्तात जातात. रक्तातून स्नायूत व मग मज्जासंस्थेत रतात. मज्जासंस्थेच्या ज्या भागावर वा नसेवर विषाणू हल्ला करून तिला निकामी करतात, त्यानुसार त्या नसेशी संबंधित असे स्नायू लुळे पडतात. सामान्यपणे पाय लुळा पडतो, कधी कधी हात, तर कधी हात व पाय वा शरीर लुळे पडू शकते.


रक्तात वा स्नायूत विषाणू असल्यास रुग्णाला जर इंजेक्शन दिले गेले, तर हातपाय लुळे पडण्याची शक्यता असते. त्यामुळे पावसाळ्याच्या काळात व विशेषत: पोलिओची साथ चालू असल्यास ताप, हगवण झाल्यास चुकूनही इंजेक्शन देऊ नये.


पोलिओ टाळण्यासाठी महत्त्वाचा उपाय म्हणजे सर्व लहान मुलांना पोलिओची लस पाजणे. जन्माच्या


दिवशी पहिली लस दिली जाते. त्यानंतर दीड, अडीच, साडेतीन महिने वय असताना व नंतर दीड वर्ष वय


असताना परत ही लस पाजली जाते. ही लस दिल्यास पोलिओ होत नाही. दूरगामी प्रतिबंध करण्यासाठी


राहणीमानाचा दर्जा उंचावणे, सुरक्षित पाण्याचा पुरवठा करणे व मलमूत्र विसर्जन विल्हेवाटीसाठी सुयोग्य


व्यवस्था करणे, हे आवश्यक ठरते.


पोलिओने पाय लुळा पडल्यास भौतिकोपचार तसेच कॅलीपर (पायाचा आधार) वगैरे वापरून शक्ती परत आणण्याचा प्रयत्न करता येतो. काही वेळा शस्त्रक्रियेचाही उपयोग होतो. अर्थात, हे सर्व करण्यापेक्षा लसीकरण करून रोग टाळणे, हेच योग्य ठरेल.


*डाॅ.अंजली दिक्षित व डाॅ.जगन्नाथ दिक्षित*

*यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' पुस्तकातून*


Featured Post

व्यायाम व योगा अवश्य करावा*

*व्यायाम व योगा अवश्य करावा*  *व्यायाम व योगा करण्याचे दहा फायदे:-*  1) व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते: व्यायाम करणारी...