मंगळवार, ३ ऑगस्ट, २०२१

गणितज्ञ रामानुज

 *गणितज्ञ रामानुजन यांना जवळचे मित्र नव्हते. कोणीतरी त्यांना त्याचे कारण विचारले.*


*त्यांनी उत्तर दिले की....* 👇


"जरी मला जवळचे मित्र हवे असले तरी कोणीही माझ्या अपेक्षांच्या कसोटीवर उतरू शकले नाही."


जेव्हा रामानुजन यांना तुमचा मित्र कसा असावा? याची विचारणा केली असता त्यांनी उत्तर दिले की, *"220 आणि 284 क्रमांकांप्रमाणे!"*


समोरील व्यक्ती गोंधळून गेली आणि विचारले की, "मैत्री आणि या संख्यांचा काय संबंध आहे का?"


रामानुजन यांनी त्याला 220 आणि 284 या संख्यांचे विभाजक शोधण्यास सांगितले!


बर्‍याच प्रयत्नाने त्या व्यक्तीने संख्यांचे विभाजक शोधले आणि त्यांची यादी केली.


*220 →* 1, 2, 4, 5, 10, 11, 20, 22, 44, 55, 110, 220.


*284 →* 1, 2, 4, 71, 142, 284.


त्यानंतर रामानुजन यांनी त्या व्यक्तीला 220 आणि 284 हे विभाजक वगळण्यास सांगितले आणि उर्वरित विभाजकांची त्या व्यक्तिला बेरीज किती होते ते विचारले.


ती व्यक्ती बेरीज पाहून थक्क झाली.....


 *220 →* 1 + 2 + 4 + 5 + 10 + 11 + 20 + 22 + 44 + 55 + 110= *284*


*284 →* 1 + 2 + 4 + 71 + 142= *220*


रामानुजन यांनी समजावून सांगितले की, *"एक आदर्श मैत्री या संख्यांसारखी असावी. एकमेकांना पूरक असावी.  एखादा गैरहजर असतानासुद्धा, दुसर्‍याने अनुपस्थित मित्राचे प्रतिनिधित्व केले पाहिजे!"*


माझ्या सर्व *220* आणि *284* सारख्या मित्रांना....

*'ग'* णि *'त'* विषयातील.....

*'गं'* म *'त'* शीर शुभेच्छा....🌷

संकलन ): गजानन गोपेवाड 



🙏🙏

सोमवार, २ ऑगस्ट, २०२१

हिमोग्लोबीन म्हणजे काय


══════════════════════

   *📒📒📒 @ संकलन @📒📒📒*

  *श्री. गजानन गोपेवाड 

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════

📕 *हिमोग्लोबीन म्हणजे काय ?* 📕


हिमोग्लोवीन म्हणजे जापल्या शरीराचा प्राणच आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. हिमोग्लोबीन रक्तातील लाल पेशींमध्ये असते. हिमोग्लोबीन हे हिम व ग्लोबीन या दोन घटकांचे बनलेले असते. ग्लोबीन हे एक प्रथिन असून हिंम या रंगद्रव्यात पॉफयरीन असते. पॉफयरीनमध्ये लोह असते व चार पायरॉल रचना असतात. हिमोग्लोबीनच्या या विशिष्ट रचनेमुळे ते ऑक्सिजन वा कार्बनडायऑक्साइडशी संयोग पावते व अनुक्रमे ऑक्सी व कार्बोक्सी हिमोग्लोबीन तयार होतात. या त्याच्या गुणधर्मामुळेच शरीराला ऑक्सिजन पुरविणे व शरीरात तयार झालेला कार्बन डाय ऑक्साइड फुफ्फुसापर्यंत पोहोचविणे, हे कार्य ते करू शकते. हिमोग्लोबीन लाल असते व त्यामुळे रक्ताला लाल रंग असतो. फुप्फुसामध्ये कार्बोक्सी हिमोग्लोबीनमधून कर्ववायू सोडला जातो व ऑक्सिजनशी हिमोग्लोबीनचा संयोग होऊन ऑक्सी हिमोग्लोबीन तयार होते. त्याद्वारे शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा होतो. हिमोग्लोबीनच्या निर्मितीसाठी प्रथिने, जीवनसत्त्वे, लोह यांची आवश्यकता असते. हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी होण्यास रक्तक्षय असे म्हणतात. प्रौढ माणसाच्या रक्तात दर १०० मिलीला १३ ते १५ ग्रॅम इतके हिमोग्लोबीन असते.


हिमोग्लोबीनचे प्रमाण वाढण्यासाठी समतोल आहार, हिरव्या पालेभाज्या यांचे खूप महत्त्व आहे. गरज पडल्यास लोहाच्या गोळ्या देऊन वा औषध देऊन वा क्वचित प्रसंगी व्यक्तीस रक्त देऊन हिमोग्लोबीनचे प्रमाण वाढविता येते. माणूस गुदमरल्यास वा श्वसनास ऑक्सिजन न मिळाल्यास रक्तातील कार्बोक्सी हिमोग्लोबीनचे प्रमाण वाढते. माणूस निळसर दिसतो. त्याला श्वास घेता येत नाही, दम लागतो व मृत्यूही ओढवतो. असे हे हिमोग्लोबीन आहे की नाही आपला जीव की प्राण ?


*डाॅ.अंजली दिक्षित व डाॅ.जगन्नाथ दिक्षित*

*यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' पुस्तकातून*


3 आँगष्ट नाना पाटील यांची जयंती

 *************************************

*३ ऑगस्ट - क्रांतिसिंह नाना पाटील जयंती*

************************************

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

जन्म - ३ ऑगस्ट १९०० (सांगली)

स्मृती - ६ डिसेंबर १९७६ (वाळवा)


    क्रांतिसिंह नाना पाटील हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील सैनिक आणि स्वातंत्र्योत्तर काळातील मराठी राजकारणी होते.


महाराष्ट्रात (प्रामुख्याने सातारा, सांगली भागात) स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व करणारे, तसेच पत्री सरकार किंवा प्रतिसरकार हा समांतर शासनाचा एकमेवाद्वितीय प्रयोग राबवणारे लढवय्ये राजकीय कार्यकर्ते म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटील होत.


नाना पाटील यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील येडे मच्छिंद्र या गावी झाला. लहानपणापासूनच नानांना दणकट शरीराचे वरदान लाभले होते. म्हणूनच पुढील काळातही त्यांच्या भारदस्त व्यक्तिमत्वामुळेच लोक त्यांच्याकडे आकर्षित होत. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नानांनी काही काळ तलाठी म्हणून नोकरी केली. पण समाजकारण व राजकारणाची ओढ असलेले नाना लवकरच नोकरीतून बाहेर पडले. १९३०च्या सविनय कायदेभंग चळवळीपासूनच त्यांचा स्वातंत्र्य लढ्यात सहभाग होता. स्वातंत्र्यलढा आणि बहुजन समाजाचा विकास या दोन्ही मार्गांनी त्यांचे कार्य चालू होते.


*स्वातंत्र्य लढा :*


१९३० च्या सविनय कायदेभंग चळवळीचे कार्य करण्यासाठी नाना पाटलांनी नोकरीचा त्याग केला. त्यांनी ग्रामीण जनतेला गुलामगिरीची जाणीव करून देऊन, जनतेला धाडसी बनवण्याचा प्रयत्‍न केला. नानांवर वारकरी संप्रदायाचा प्रभाव होता. तसेच लोकांच्या भाषेत प्रभावी भाषणे करून, त्यांच्यात प्रेरणा उत्पन्न करण्याची हातोटी नानांकडे होती. ग्रामीण भागातील, बहुजन समाजातील लोकांचा स्वाभिमान जागृत करून त्यांना स्वातंत्र्य चळवळीत सहभागी करून घेणे हे क्रांतिसिंहांचे प्रमुख योगदान होय.


ब्रिटिश शासनाला समांतर अशी शासन यंत्रणा उभी केली पाहिजे असा नाना पाटलांचा विचार होता. ‘आपुला आपण करू कारभार’ हे सूत्र त्यांनी १९४२च्या चले जाव चळवळीत प्रत्यक्ष अंमलात आणले. आपल्या देशाचा कारभार आपणच केला पाहिजे या जाणिवेतून प्रतिसरकार ही संकल्पना नानांनी प्रत्यक्षात आणली होती. प्रतिसरकारच्या माध्यमातून लोकन्यायालये, अन्नधान्य पुरवठा, बाजार व्यवस्था यासारखी लोकोपयोगी कामे केली जात. ब्रिटिशांची राज्यव्यवस्था नाकारून त्यांनी १९४२ च्या दरम्यान सातारा जिल्ह्यात स्वतंत्र राज्याची स्थापना केली. प्रतिसरकारचा प्रचार ज्येष्ठ कवी ग.दि. माडगुळकर लिखित पोवाड्यांच्या माध्यमातून आणि शाहीर निकम यांच्या खड्या आवाजाद्वारे केला जात होता.


नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रतिसरकारमध्ये विविध दलांची स्थापना झाली. त्यातल्या एका दलाचे "तुफान दलाचे" फील्ड मार्शल जी.डी. लाड होते. ह्या दलाची कुंडल येथे युद्धशाळा होती. या युद्धशाळेतून प्रशिक्षित अशा पाच हजारांवर जवानांच्या दोनशे शाखा स्वातंत्र्यपूर्व काळात गावोगाव काम करीत. तलवारी, जांबिया या परंपरांगत हत्याराबरोबरच पिस्तूल बॉंबगोळे फेकण्याचे प्रशिक्षण या जवानांना होते. प्रतिसरकारने गावटग्यांवर बसवलेल्या दहशतीमुळे या सरकारची पत्री सरकार अशी ओळख तयार झाली.


या प्रतिसरकारच्या माध्यमातून बाजारव्यवस्था, अन्नधान्य पुरवठा, भांडणतंटे सोडवण्यासाठी लोकन्यायालयांची स्थापना, दरोडेखोरांना-पिळवणूक करणार्‍या सावकारांना -पाटलांना कडक शिक्षा - अशी अनेक समाजोपयोगी कामे करण्यात येत होती. या सरकार अंतर्गत नाना पाटील यांनी ‘तुफान सेना’ या नावाने सैन्य दलाची स्थापना केली होती.


ब्रिटिशांच्या रेल्वे, पोस्ट आदी सेवांवर हल्ला करून त्यांना नामोहरम करण्याचे तंत्रही नाना पाटील यांनी यशस्वीरीत्या राबवले. १९४३ ते १९४६ या काळात सातारा व सांगली जिल्ह्यातील सुमारे १५०० गावांत प्रतिसरकार कार्यरत होते. या संकल्पनेचा प्रयोग पुढे देशातही अनेक ठिकाणी करण्यात आला.


नाना पाटलांच्या ’प्रति सरकार’ला लोक ’पत्रीसरकार’ म्हणत आणि नाना पाटील ब्रिटिश अधिकार्‍याच्या तळपायाला पत्रा ठोकीत अश्या अफवा असत.


१९२० ते १९४२ या काळात नाना ८-१० वेळा तुरुंगात गेले. १९४२ ते ४६ या काळात ते भूमिगतच होते. ब्रिटिशांनी त्यांना पकडण्यासाठी बक्षीस लावले, जंगजंग पछाडले पण क्रांतिसिंह ब्रिटिशांना सापडले नाहीत. ते भूमिगत असताना ब्रिटिशांनी त्यांच्या घरावर जप्ती आणली, त्यांची जमीनही सरकारजमा केली. याच काळात त्यांच्या मातोश्रींचे निधन झाले. क्रांतिसिंहांनी आपला जीव धोक्यात घालून, धावपळीत मातोश्रींवर अंत्यसंस्कार केले होते. भारताला स्वातंत्र्य मिळणार हे नक्की झाल्यावरच (१९४६) क्रांतिसिंह कर्‍हाड तालुक्यात प्रकट झाले.


यांच्यावर महात्मा फुले यांच्या सत्यशोधक विचारांचा तसेच राजर्षी शाहूंच्या कार्याचा प्रभाव होता. त्यांनी 'गांधी -विवाह' ही अतिशय कमी खर्चात विवाह करण्याची पद्धत रुजवण्याचा प्रयत्न केला, तसेच शिक्षण प्रसार, ग्रंथालयांची स्थापना, अंधश्रद्धा निर्मूलन, ग्रामीण जनतेची व्यसनमुक्ती या माध्यमातून समाजसुधारणेचे कार्य केले. त्यांच्यामुळे शाहीर निकम, नागनाथअण्णा नायकवडी यांसारखे कार्यकर्ते घडले.


स्वातंत्र्यपूर्व काळापासून प्रामुख्याने सांगली जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणून सातत्याने प्रकाशात असणार्‍या क्रांतिसिंहांचे ६ डिसेंबर १९७६ वाळवा मध्ये निधन झाले. मला वाळव्यामधेच दहन करण्यात यावे ही त्याची इच्छा होती त्यानुसार वाळव्यामधेच दहन करण्यात आले.


*स्वातंत्र्योत्तर काळ :*


देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नाना पाटलांनी संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातही भाग घेतला. त्यांनी शेतकरी कामगार पक्ष व भारतीय कम्युनिस्ट पक्ष या पक्षांच्या माध्यमातून कार्य केले. १९५७ मध्ये ते उत्तर सातारा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले. १९६७ मध्ये कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार म्हणून ते बीड मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले. संसदेत मराठीतून भाषण करणारे ते पहिले खासदार होते.

🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

संकलन -)

गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६


********************************

प्रभात दर्शन

 🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

आषाढ मास,कृष्ण पक्ष, *दशमी*,रोहिणी नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,वर्षा ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

मंगलवार, ०३ आॕगष्ट २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                         *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

         *"पेड़ कभी भी उसकी शाखा काटने से नहीं सूखता है। पेड़ हमेशा उसकी जड़ काटने से ही सूखता हैं…. वैसे ही मनुष्य किसी और के कुछ कहने से नही हारता है। मनुष्य की जड़ उसके कर्म, व्यवहार एवं वाणी होते हैं। इसलिए मनुष्य स्वयं अपने अनुचित कर्म, शुष्क अथवा दूषित व्यवहार एवं कटु वाणी से ही अप्रिय होकर समाज में हारता है।"*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

अलेक्झांडर दुरध्वनी शोध

 *📞📞अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल📞📞*

☎️☎️☎️☎️☎️☎️☎️☎️☎️☎️

*☎️☎️दूरध्वनी यंत्राचा शोध☎️☎️*

☎️☎️☎️☎️☎️☎️☎️☎️☎️☎️

*स्मृतिदिन - २ ऑगस्ट १९२२*


अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल

    जन्म -) ३ मार्च १८४७

    मृत्यू -) २ ऑगस्ट १९२२

      यांचे सगळ्यात महत्त्वाचे संशोधन म्हणजे दूरध्वनी. दूर अंतरावर असलेल्या आपल्या प्रिय व्यक्तीचा आवज काही सेकंदात आपल्यापर्यंत पोहोचविणारे यंत्र असावे असे वाटत असल्याने बेल यांनी दूरध्वनी यंत्राचा शोध लावला.

बालपण

बेल यांचा जन्म ३ मार्च १८४७ रोजी एडिनबरा, स्कॉटलंड येथे झाला. त्यांचे आजोबा, वडील - अलेक्झांडर मेलव्हिल बेल आणि भाऊ या सगळ्यांचा मूक-बधिरांच्या शिक्षणाशी जवळचा संबंध होता. तर त्यांची आई आणि पत्नी या दोघीही कर्ण बधिर होत्या. लहानपणी अलेक्झांडर हे नाव ठेवण्यात तरी वयाच्या ११ व्या वर्षी स्वतःच्या नावात ग्रॅहॅम नाव टाकून घेऊन मग अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल या नावाने पुढे ते ओळखले जाऊ लागले. मूक-बधिरांसाठी शिक्षण सुलभ व्हावे, त्यांना इतरांचे बोलणे कळावे यासाठी अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल सतत प्रयत्नशील होते. त्यासाठी बोस्टन विद्यापीठात स्वरयंत्राचे कार्यशास्त्र शिकविण्यासाठी नेमण्यात आले. तेथेच बधिरांसाठी यंत्र तयार करण्याचे प्रयत्न बेल करीत होते. असे यंत्र बनविण्याच्या पयत्नात बेल असतांनाच ते मेबल ह्यूबर्ड नावाच्या कर्ण बधिर मुलीच्या प्रेमात पडले आणि तिच्याशी त्यांचा विवाह झाला. पत्नीला बेलच्या यंत्राविषयी कळल्यावर तिनेच ओठांची हालचाल वाचता येणे हाच बधिरांसाठी कसा सर्वोत्तम पर्याय आहे हे पटवून सांगितले. मग बेल यांनी तसे यंत्र बनविण्याचे प्रयत्न सुरू केले आणि त्यातच दूरध्वनी यंत्राचे कोडे उलगडले.

कार्य

बेल यांनी माणसाच्या स्वरयंत्राचा आणि कानाचा अभ्यास करून पहिले दूरध्वनी यंत्र तयार केले. दि. २ जून १८७५ या दिवशी आपले सहकारी वॉटसन यांच्यासह काम करीत असतांना दुसऱ्या खोलीतील वॉटसन यांच्या हाताच्या धक्याने ट्रान्समीटर थरथरला, तो लहानसा आवाजही बेल यांना ऐकू आला. मग बेल यांनी आपल्या ट्रान्समीटरचा उपयोग करून सहकारी वॉटसन यांना आपल्या खोलीत येण्याविषयी सांगितले. बेल यांचा तो संदेश सहकारी वॉटसन यांनी ऐकून तसा प्रतिसाद दिल्यावर संदेशाची देवाणघेवाण झाल्याबद्दल दोघांची खात्रीच पटली. बेल आणि वॉटसन यांनी या यंत्रावर आणखी प्रयोग करून दि. १५-०२-१८७६ या दिवशी आपल्या यंत्राचे पेटंट घेण्यासाठी अर्ज दाखल केला. तेव्हा पेटंट कार्यालयातच बेल यांना समजले की अशाच प्रकारच्या प्रयोगासाठी आणखी चार अर्ज पेटंट कार्यालयात पडून होते. हे पेटंट युद्ध बराच काळ सुरू होते, शेवटी बेल यांना दूरध्वनी यंत्राचे पेटंट मिळाले.

योगदान

बेल यांनी तयार केलेल्या आपल्या यंत्राचे प्रयोग अमेरिकेत आणि युरोपमध्ये केले. त्यानुसार नोव्हेंबर १८७७ साली बेल यांना बर्लीन शहरात दूरध्वनीचे जाळे पसरविले. १८८५ साली बेल यांनी द अमेरिकन टेलिफोन अँड टेलिग्राफ कंपनीची स्थापना केली. नंतर ही कंपनी बेल टेलिफोन कंपनी म्हणून ओळखली जावू लागली. दि. २ ऑगस्ट १९२२ या दिवशी बेल यांचे निधन झाले. त्यांना श्रद्धांजली म्हणून समस्त अमेरिकेतील दूरध्वनी संच एक मिनीट बंद ठेवण्यात आले.

उल्लेखनीय

विज्ञान विषयक सर्व प्रकारची माहिती नियतकालिकारुपाने जगाच्या समोर यावी या हेतुने १८८२ साली बेल यांनी सायन्स नावाचे नियतकालिक सुरू करण्यात पुढाकार घेतला तसेच आपल्याजवळील पैसा लावून हे नियतकालिक आठ वर्षे सतत सुरू ठेवले. पुढे हे नियतकालिक अमेरिकन असोसिएशन फॉर द ऍडव्हान्समेंट ऑफ सायन्स या संस्थेचे अधिकृत नियतकालिक झाले.१८९८ ते १९०४ या काळात बेल नॅशनल जिओग्राफिक सोसायटीचे अध्यक्ष होते.

🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

संकलन):  गजानन गोपेवाड  

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६


प्रभात दर्शन

 🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

आषाढ मास,कृष्ण पक्ष, *नवमी*,कृतिका नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,वर्षा ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

सोमवार, ०२ आॕगष्ट २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                         *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


मूढ़ैः प्रकल्पितं दैवं 

            तत परास्ते क्षयं गताः।

प्राज्ञास्तु पौरुषार्थेन

            पदमुत्तमतां गताः।।


*भावार्थः- भाग्य की कल्पना मूर्ख लोग ही करते हैं।  बुद्धिमान लोग तो अपने पुरूषार्थ, कर्म और उद्यम के द्वारा प्रत्येक उत्तम वस्तु को प्राप्त कर लेते हैं।*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

शनिवार, ३१ जुलै, २०२१

लोकशाहिर अन्नभाऊ साठे यांची आज जयंती निमित्त विशेष लेख

 ➿➿➿➿➿➿➿➿➿➿

🇮🇳🇮🇳 *गाथा बलिदानाची* 🇮🇳🇮🇳

➿➿➿➿➿➿➿➿➿➿                                        

   

    *साहित्यरत्न लोकशाहीर*   

          *अण्णाभाऊ साठे*


     *जन्म :  १ ऑगस्ट, १९२०*

(वाटेगाव,ता.वाळवा,जि. सांगली) 

        *मृत्यू :  १८ जुलै, १९६९*

                ( गोरेगाव, मुंबई )


जन्म नाव -) तुकाराम भाऊराव साठे

टोपणनाव -) अण्णाभाऊ साठे

शिक्षण -) अशिक्षित

राष्ट्रीयत्व -) भारतीय 

कार्यक्षेत्र -) लेखक, साहित्यिक

भाषा -) मराठी

साहित्य प्रकार -) शाहिर,कथा,कादंबरीकार

चळवळ -) संयुक्त महाराष्ट्र चळवळ

प्रसिद्ध साहित्यकृती -) फकिरा

प्रभाव -) बाबासाहेब आंबेडकर, 

            कार्ल मार्क्स

वडील -) भाऊराव साठे

आई -)  वालुबाई साठे

पत्नी -) कोंडाबाई साठे,

           जयवंता साठे

अपत्ये -) मधुकर,शांता आणि शकुंतला


            तुकाराम भाऊराव साठे हे अण्णाभाऊ साठे म्हणून ओळखले जाणारे एक मराठी समाजसुधारक,लोककवी आणि लेखक होते.साठे एका अस्पृश्य मांग समाजामध्ये जन्मलेले एक दलित व्यक्ती होते, त्यांची उपज आणि ओळख त्यांचे लेखन आणि राजकीय कृतीशीलतेचे केंद्रबिंदू होते.

       कथा,कादंबरी,लोकनाट्य,नाटक,पटकथा,लावणी,पोवाडे,प्रवासवर्णन अशा वेगवेगळ्या साहित्यप्रकारांतील लेखन केलेले ख्यातनाम मराठी साहित्यिक. ब्रिटिशराज्यकर्त्यांनी ‘गुन्हेगार’ म्हणून शिक्का मारलेल्या एका जमातीत त्यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भाऊ सिधोजी साठे,तर आईचे नाव वालबाई होते.त्यांचे मूळ नाव तुकाराम.जन्मस्थळ वाटेगाव (ता.वाळवा,जि.सांगली).त्यांचे शालेय शिक्षण झालेले नव्हते; तथापि त्यांनी प्रयत्नपूर्वक अक्षरज्ञान मिळविले.१९३२ साली वडिलांसोबत ते मुंबईला आले. चरितार्थासाठी कोळसे वेचणे, फेरीवाल्यांच्या पाठीशी गाठोडे घेऊन हिंडणे,मुंबईच्या मोरबाग गिरणीत झाडूवाला म्हणून नोकरी,अशी मिळतील ती कामे त्यांनी केली.मुंबईत कामगारांचे कष्टमय,दुःखाचे जीवन त्यांनी पाहिले.त्यांचे संप,मोर्चे पाहून त्यांचा लढाऊपणाही त्यांनी अनुभवला.१९३६ मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉ.श्रीपाद अमृत डांगे यांच्या प्रभावाखाली आल्यावर ते कम्युनिस्ट पक्षाचे क्रियाशील कार्यकर्ते झाले.

        मुंबईत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांपासून स्वातंत्र्यवीर सावरकरांपर्यंत अनेक नेत्यांची भाषणे त्यांनी ऐकली.पक्षाचे कामही ते करीत होतेच;तथापि वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची सगळी जबाबदारी अंगावर,पडल्याने ते पुन्हा आपल्या गावी आले.तेथे बापू साठे या चुलतभावाच्या तमाशाच्या फडात ते काम करू लागले.पुढे १९४२ च्या चळवळीत सहभागी झाल्यामुळे ब्रिटिश सरकारने त्यांच्यावर पकडवॉरंट काढले.पोलिसांना चुकवीत ते मुंबईला आले.मुंबईत लोकशाहीर म्हणून त्यांचा लौकिक झाला. त्यावेळी अमर शेख या ख्यातनाम मराठी लोकशाहीरांबरोबर अण्णाभाऊंचेही नाव लोकशाहीर म्हणून गाजू लागले.त्यांनी लिहिलेला ‘स्तालिनग्राडचा पवाडा’ १९४३ साली पार्टी या मासिकात प्रसिद्घ झाला.त्यांनी १९४४ साली शाहीर अमर शेख व गव्हाणकर यांच्या मदतीने ‘लाल बावटा’ कलापथक स्थापन केले. या कलापथकावर सरकारने बंदी घातली. ‘अमळनेरचे अमर हुतात्मे’ आणि ‘पंजाब-दिल्लीचा दंगा’ या त्यांच्या काव्यरचना १९४७ साली प्रसिद्घ झाल्या. ‘पंजाब-दिल्लीचा दंगा’ या रचनेत सर्व प्रागतिक शक्तींना एकत्र येऊन शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन त्यांनी केले होते.

         संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांनी स्वतःला झोकून दिले होते. त्यांच्या शाहिरीत लावणी, पोवाडे, गीते, लोकनाटये आदींचा समावेश होता. ‘महाराष्ट्राची परंपरा’ (१९५०) ह्या नावाने त्यांनी या चळवळीसाठी पोवाडा लिहिला;  त्याचप्रमाणे मुंबई कुणाची ?  ह्या लोकनाट्याचे महाराष्ट्रभर प्रयोग केले. अकलेची गोष्ट (१९४५), देशभक्त घोटाळे (१९४६), शेटजींचे इलेक्शन (१९४६), बेकायदेशीर (१९४७), पुढारी मिळाला (१९५२), लोकमंत्र्यांचा दौरा (१९५२) ही त्यांची अन्य काही लोकनाटये. अण्णाभाऊंनी पारंपरिक तमाशाला आधुनिक लोकनाट्याचे रूप दिले.

           अण्णाभाऊंच्या साहित्यात त्यांची कथा-कादंबरीची निर्मितीही ठळकपणे नजरेत भरते. जिवंत काडतूस, आबी, खुळंवाडी, बरबाद्याकंजारी (१९६०), चिरानगरची भुतं (१९७८), कृष्णाकाठच्या कथा हे त्यांचे काही कथासंग्रह; त्यांनी पस्तीस कादंबऱ्या लिहिल्या. चित्रा (१९४५) हीत्यांची पहिली कादंबरी. त्यानंतर ३४ कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. त्यांत फकिरा (१९५९, आवृ.१६– १९९५), वारणेचा वाघ (१९६८), चिखलातीलकमळ, रानगंगा, माकडीचा माळ (१९६३), वैजयंता ह्यांसारख्या कादंबऱ्यांचा समावेश होतो. त्यांच्या फकिरा ह्या कादंबरीला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला. वास्तव, आदर्श आणि स्वप्नरंजन यांचे मिश्रण त्या कादंबरीत आहे. सत्प्रवृत्तीचा, माणुसकीचा विजय हे अण्णाभाऊंच्या कादंबऱ्यांचे मुख्यसूत्र होय. त्यांच्या काही कादंबऱ्यांवर चित्रपटही निघाले : वैजयंता (१९६१, कादंबरी वैजयंता ), टिळा लावते मी रक्ताचा (१९६९, कादंबरी आवडी ),डोंगरची मैना (१९६९, कादंबरी माकडीचा माळ ), मुरली मल्हारीरायाची (१९६९, कादंबरी चिखलातील कमळ ), वारणेचा वाघ (१९७०, कादंबरीवारणेचा वाघ ), अशी ही साताऱ्याची तऱ्हा (१९७४, कादंबरी अलगूज ), फकिरा (कादंबरी फकिरा ). या शिवायव इनामदार (१९५८), पेंग्याचं लगीन,सुलतान ही नाटकेही त्यांनी लिहिली.

         उपेक्षित गुन्हेगार म्हणून कलंकित ठरवले गेलेले, दलित आणि श्रमिक यांच्या समृद्घीचे स्वप्न अण्णाभाऊ पाहात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरयांच्या लढाऊ आणि विमोचक विचारांचे संस्कार त्यांच्या मनावर खोलवर झालेले होते. ‘जग बदल घालुनी घाव। सांगूनि गेले मज भीमराव॥’ हे त्यांचे गीतखूप गाजले. त्यांनी लिहिलेल्या लावण्यांत ‘माझी मैना गावावर राहिली’ आणि ‘मुंबईची लावणी’ या अजोड आणि अविस्मरणीय आहेत.

          अतिशय तळमळीने लिहिण्याची त्यांची वृत्ती होती. ‘पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरली नसून ती दलितांच्या तळहातावर तरलेली आहे’,असे ते म्हणत; आणि हाच त्यांच्या लेखनाचा प्रेरणा स्रोत होता.मानवी जीवनातील संघर्ष,नाटय,दुःख,दारिद्र्य त्यांच्या साहित्यातून प्रकट होते.त्यांच्या कथा-कादंबऱ्यांतून त्यांनी उभ्या केलेल्या माणसांत जबरदस्त जीवनेच्छा दिसते.त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन दलित लेखकांची एक प्रतिभावान पिढी निर्माणझाली.त्यात बाबूराव बागूल,नामदेव ढसाळ,लक्ष्मण माने,यशवंत मनोहर,दया पवार,केशव मेश्राम,शरणकुमार लिंबाळे आदींचा अंतर्भाव होतो.

        अण्णाभाऊंची निरीक्षणशक्ती अत्यंत सूक्ष्म आहे. त्यांच्या लेखन शैलीला मराठमोळा,रांगडा पण लोभस घाट आहे.नाट्यमयता हाही त्यांच्यालेखनशैलीचा एक खास गुण.ज्या विपर्यस्त जीवनातून अण्णाभाऊंनी अनुभव आत्मसात केले, त्यांतील क्षणांचा वेग आणि आवेग त्यांच्या लेखनात जाणवतो.लवचिक भावचित्रे अंगासरशा मोडीने साकार करण्याची त्यांची लकबही स्वतंत्र आहे. लेखनावर त्यांनी जीव जडवला होता; त्यांनी ते विपुल केले.

         रशियाच्या ‘इंडो-सोव्हिएत कल्चरल सोसायटी’ च्या निमंत्रणावरून ते १९६१ साली रशियाला गेले. तेथील अनुभवांवर आधारित माझा रशियाचाप्रवास हे प्रवास वर्णन त्यांनी लिहिले.

          पुढे पुढे मात्र दारिद्र्य आणि एकाकी आयुष्य त्यांच्या वाट्याला प्रकर्षाने आले मराठी साहित्यातील प्रतिष्ठितांकडून त्यांची उपेक्षा झाली. विपन्नावस्थेत गोरेगाव (मुंबई) येथे त्यांचे निधन झाले.


महाराष्ट्रातील विद्यापीठांत अण्णाभाऊंवर अकरा प्रबंध प्रसिद्घ केले गेले आहेत. पुणे विद्यापीठात त्यांच्या सन्मानार्थ ‘अण्णाभाऊ साठे’ अध्यासन सुरु करण्यात आले आहे. त्यांच्या कथा-कादंबऱ्यांची केवळ भारतीयच नव्हे, तर २२ परकीय भाषांत भाषांतरे झाली आहेत.

🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

संकलन -)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६


➖➖➖➖➖➖➖➖➖➖

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची आज पुण्यतिथी निमित्त विशेष लेख

 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

*लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी*

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

*स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच’* अशी घोषणा करणारे *लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन..*

🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏

पूर्ण नाव -)  बाळ गंगाधर टिळक

जन्म तारीख -) २३ जुलै १८५६

           रत्नागिरी, महाराष्ट्र

वडिलांचे नाव -) गंगाधर रामचंद्र टिळक

आईचे नाव -) पार्वती बाई गंगाधर

पत्नीचे नाव -) तापीबाई (सत्यभामा बाई) १८७१

मुलांची नावे -) रमा बाई वैद्य, पार्वती बाई केलकर,

विश्वनाथ बलवंत तिलक, रामभाऊ बलवंत तिलक,

श्रीधर बलवंत तिलक और रमाबाई साणे

शिक्षण -) बी.ए. एल.एल. बी

पुरस्कार -) ‘लोकमान्य’

मृत्यू -) १ ऑगस्ट १९२०

              मुंबई, महाराष्ट्र

पॉलिटिकल पार्टी -) इंडियन नॅशनल कॉंग्रेस


टिळकांचा जन्म २३ जुलै १८५६ रोजी रत्नागिरी मधील चिखलगांवी झाला.तर मृत्यू १ आॕगष्ट १९२० रोजी मुंबई,महाराष्ट्रात झाला स्वातंत्र्यसाठी लढणारी जी अनेक रत्ने होती. त्यांतील हे रत्नागिरीचे ‘रत्न’ होते. त्यांचे ‘केशव’ हे नांव ठेवण्यात आले होते. पण ते ‘बाळ’ या टोपण नावाने प्रसिद्ध झाले. वडील शिक्षण खात्यात सेवेस होते. लहानपणी आई वारल्याने संगोपन चुलतीनेच केले. वडिलांची पुणे येथे बढती मिळाल्याने बदली झाली. वडिलांचे छत्र १९ व्या वर्षी निवर्तले. १६ व्या वर्षी मॅट्रिकची परीक्षा झाल्याने टिळकांचे लग्न १७ व्या वर्षी झाले. उच्च शिक्षणासाठी पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्यांना पदवीधर होण्यासाठी पैशाची फारशी अडचण भासली नाही. १८७६ साली टिळक बी. ए. ची परीक्षा गणित घेऊन पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाले. त्यांचे गणित व संस्कृत हे दोन विषय उत्तम होते. पुढे टिळकांनी एल. एल. बी. पर्यंत मजल मारली. 


महाविद्यालामध्ये टिळक असतांना गोपाळ गणेश आगरकर या तरुण मित्राची मैत्री जमली. दोघेही एका विचाराची मने घेऊनी चर्चा करीत. देशात सामाजिक सुधारणा व राजकीय स्वातंत्र्य हे झाले पाहिजे. आगरकरांचा विषय तत्त्वज्ञान तर टिळक गणितवाले ‘जोडणारे तोडणारे’ पण मातृभूमीबद्दल खळबळ आंतरिक एकत्र आले की चर्चा असे विद्यार्थी हवे आहेत. असतीलही कदाचित. दोघांवर पाश्चात्य विचारवंत मिल व स्पेन्सर यांचा प्रभाव होता. यातूनच २ जानेवारी १८८० ला पुणमध्ये नू इंग्लिश स्कूलची स्थापना करण्यात आली. 




टिळक-आगरकर यांच्यासमवेत तिसरे सहकारी चिपळूणकर मिळाले व लोकशिक्षण प्रभावी करण्याच्या दृष्टीने ‘केसरी’ आणि ‘मराठा’ ही वृत्तपत्रे सुरू करण्याचे ठरले. ‘केसरी’ मधून टिळकांनी आपले जहाल विचार व्यक्त करणे सुरू केलने हे साप्ताहिक महाराष्ट्रात सर्वत्र परिचित झाले. सामाजिक प्रश्नावर आगरकर लिहू लागले. आधी सामाजिक की आधी राजकीय यावर आगरकर आधी सामाजिक तर टिळक आधी राजकीय असे विचार पर्यायाने मतभेद होऊ लागले. टिळक म्हणायचे सामाजिक प्रश्न ही हृदयाची जखम आहे तिला सावकाशपणे हाताळले पाहिजे. राजकीय स्वातंत्र्य मिळाल्यावर सामाजिक प्रश्न सोडविणे सोपे जाते. यातूनच मतभेद विकोपाला गेला व आगरकरांनी केसरीचे संपादकत्व सोडले. आगरकरांनी सामाजिक प्रश्नासाठी ‘सुधारक’ हे वृत्तपत्र काढले. त्यातून टिळकांकडे केसरीचे संपादकत्व आले. टिळकांनी शैक्षणिक संस्थांचा राजीनामा दिला व पूर्णवेळ केसरीकडे दिला. अल्पावधीत ‘केसरी’ प्रसिद्धीस आला.


टिळकांनी गणपती उत्सवास सार्वजनिक स्वरूप दिले. ते एक लोकशिक्षणाचे प्रभावी वसपीठ निर्माण व्हावे अशी त्यांची इच्छा होती. महाराष्ट्रात अनेक गावी सार्वजनिक गणपती उत्सव त्या अनुषंगाने व्याख्याने, मेळे, लेझीम, पथके आदींमुळे लोक एकत्रित येऊ लागले. त्यापुढे जाऊन ‘शिवजयंती’ सार्वजनिक स्वरूपात सुरू केली. हे महत्त्वाचे पाऊल टिळकांनी उचलले. आपली भूमिका या उत्सवाच्या रूपाने केसरीतून व्यक्त केली. ‘राष्ट्रपुरूषाचे स्मरण’ व त्यातून कृतज्ञता व्यक्त करणे. महापुरूषाचे चरित्र सर्वसामान्यार्पंत पोहोचवणे हा असा हेतू स्पष्ट केला. १८७६-७७ साली पडलेल्या दुष्काळानंतर सरकारने ‘फॅमिन रिलिफ कोड’ पास केला. त्याचे मराठी भाषांतर पुस्तिका रूपाने ‘कर्ज काढून सारा भरू नका’ या वाक्याने ठाणे-कुलाबा येथील कार्यकर्त्यांवर खटले भरले. काद्याच्या चौकटीत राहून सरकारवर दबाव आणणे हे कार्य टिळकांनी प्रभावीपणे केले. पुण्यात १८९७ मध्ये प्लेगची आपत्ती आली. सरकारने रँड या अधिकार्‍याची नेमणूक केली. पण हा अधिकारी म्हणजे कर्दन काळ ठरला. रँडचा खून चाफेकर बंधूंनी केला. टिळकांनी अग्रलेख लिहिला. ‘राज्य करणे म्हणजे सूड घेणे नव्हे’ याबद्दल टिळकांना १८ महिने सक्त मजुरीची शिक्षा झाली. 


१९०७ मध्ये सुरतला काँग्रेसचे अधिवेशन झाले. तिथे जहाल व मवाळ गट असे होऊन अधिवेशन उधळले गेले. टिळकांनी तरुणांना साहसी कृत्ये न करण्याची, किंग्ज फोर्डला धडा शिकविण्याचा सल्ला दिला. पुढे पां. म. बापट यांनी बॉम्बचे मॅनुअल बंगालमधील तरुणांना मिळाले. त्याचे पडसाद उमटले. शेवटी टिळकांवर राजद्रोहाचा खटला होऊन टिळकांना ६ वर्षे ब्रह्मदेशातील मंडाले येथे नेले. टिळकांनी कारागृहात रामायण, महाभारत, तुकाराम, ज्ञानेश्वरी, दासबोध आदी ग्रंथांचे वाचन केले व ‘गीतारहस्य’ हा ग्रंथ केवळ चार महिन्यांत पूर्ण केला. 


मंडाले येथून सुटल्यावर ‘पुनश्च हरी ओम्’ ची गर्जना करून टिळकांनी कार्य सुरू केले. लखनौ करार घडवून हिंदू-मुस्लिम ऐक्य दाखवून दिले. अशा जहाल विचारसरणीच्या देशभक्ताची १ ऑगस्ट १९२० रोजी मुंबई येथील सरदारगृहात प्राणजेत मालवली. 


*‘दिव्यत्त्वाची जेथ प्रचीती, तेथे कर माझे जुळती'*

**********************************

संकलन -) गजानन गोपेवाड 


उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

प्रभात दर्शन

 🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

आषाढ मास,कृष्ण पक्ष, *अष्टमी*,भरणी नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,वर्षा ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

रविवार, ०१ आॕगष्ट २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                        *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

           *"किसी व्यक्ति को प्रशंसा मिलने पर अहंकार तभी उत्पन्न होता है जब अमुक व्यक्ति यह भूल जाता है कि प्रशंसा वास्तव में उसकी नहीं अपितु उसके गुणों की हो रही है।"*

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

माझ्या प्रत्येक सूख दुःखात नेहमी खंबीर पणे साथ देणाऱ्या *माझ्या सर्व श्री कृष्णा सारख्या मित्रांना* माझ्या सारख्या सुदामा कडून कोटी कोटी शुभेच्छा,

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

आपली मैत्री सदैव श्रीकृष्ण आणि सुदामा सारखी कायम राहो हिच मैत्री दिनाच्या शुभेच्छा...!

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

शुक्रवार, ३० जुलै, २०२१

31 जुलै क्रांतिकारी उधमसींह पुण्यतिथी

 ********************************

*३१ जुलै - क्रांतिकारक उधमसिंह पुण्यतिथी*

********************************


जन्म - २६ डिसेंबर १८९९ (पंजाब)

स्मृती - ३१ जुलै १९४० (लंडन)


सरदार उधम सिंग हे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात एक महान सैनिक आणि क्रांतिकारक होते. लंडन मधील जालियनवाला बाग घटनेदरम्यान त्याने पंजाबचा गव्हर्नर जनरल मायकेल ओ'ड्वायर यांना गोळ्या घातल्या. बर्‍याच इतिहासकारांचा असा विश्वास आहे की ही हत्या पंजाबवर नियंत्रण राखण्यासाठी पंजाबियांना धमकावण्यामागील ओ'ड्वायर आणि इतर ब्रिटीश अधिकाऱ्यांनी केलेली योजनाबद्ध योजना होती. इतकेच नाही तर जनरल डायर यांच्या पाठिंब्याने ओ'ड्वायर यांनी माघार घेतली नाही.


जालियनवाला बाग हत्याकांडासाठी उधम सिंगने जनरल डायर यांना ठार मारलेल्या समान नावामुळे सामान्य समज आहे, परंतु प्रशासक यांना असा विश्वास आहे की एका गोळ्यामुळे उधम सिंग यांचा मृत्यू झाला, तर गोळीबार करणार्‍या जनरल डायरचा अर्धांगवायू आणि विविध आजारांनी मृत्यू झाला.


उधम सिंगचा जन्म २६ डिसेंबर १८९९ रोजी पंजाबच्या संगरूर जिल्ह्यातील सुनम गावात झाला. १९०१ मध्ये उधम सिंगच्या आईचे आणि १९०७ मध्ये वडिलांचे निधन झाले. या घटनेमुळे त्याला आपल्या मोठ्या भावासोबत अमृतसर मधील अनाथाश्रमात आश्रय घ्यावा लागला. उधम सिंग यांचे बालपणीचे नाव शेरसिंह आणि त्याच्या भावाचे नाव मुक्तासिंग होते ज्यांना अनाथाश्रमात अनुक्रमे उधम सिंग आणि साधुसिंह असे नावे मिळाली. इतिहासकार मालती मलिक यांच्या मते, उधमसिंह हे देशातील सर्व धर्माचे प्रतीक होते आणि म्हणूनच त्यांनी आपले नाव राम मोहम्मदसिंग आझाद असे ठेवले जे भारताच्या तीन प्रमुख धर्मांचे प्रतीक आहे.


१९१७ मध्ये उधम सिंग अनाथ आश्रमात राहत होता नि त्याच वेळेस त्याच्या मोठ्या भावाचाही तेव्हा मृत्यू झाला. तो पूर्णपणे अनाथ झाला. १९१९ मध्ये त्यांनी अनाथाश्रम सोडले आणि क्रांतिकारकांसह स्वातंत्र्य लढ्यात सामील झाले. उधमसिंह अनाथ होते, परंतु असे असूनही तो विचलित झाला नाही आणि त्याने देशाच्या स्वातंत्र्यासाठी डायरची हत्या करण्याच्या वचनपूर्तीसाठी कार्य केले.


१३ एप्रिल १९१९ रोजी झालेल्या जालियांवाला बाग हत्याकांडातील उधम सिंग हे प्रत्यक्षदर्शी होते. जालियनवाला बागेत ठार झालेल्या लोकांची नेमकी संख्या राजकीय कारणांमुळे कधीच उघडकीस येऊ शकली नाही. या घटनेने वीर उधमसिंह 'तिलमिला' येथे गेला आणि मायकल डायरला धडा शिकवण्या साठी जालियनवाला बाग हातात घेतला. 


आपले ध्येय पार पाडण्यासाठी उधमसिंग आफ्रिका, नैरोबी, ब्राझील आणि अमेरिकेच्या विविध नावांनी प्रवास केला. १९३४ मध्ये उधम सिंग लंडनला पोहोचला आणि तेथे ९, एल्डर स्ट्रीट कमर्शियल रोड येथे वास्तव्य केले. तेथे त्याने प्रवासाच्या उद्देशाने एक कार खरेदी केली आणि आपले अभियान पूर्ण करण्यासाठी सहा बुलेटसह एक रिवॉल्व्हर खरेदी केली. मायकेल डायरचा ठावठिकाणा स्थापित करण्यासाठी भारताच्या या वीर क्रांतिकारकाने योग्य वेळी प्रतीक्षा केली.


उधम सिंग यांना १९४० मध्ये शेकडो भावंडांच्या मृत्यूचा बदला घेण्याची संधी मिळाली. जालियनवाला बाग हत्याकांडाच्या २१ वर्षांनंतर १३ मार्च १९४० रोजी रॉयल सेंट्रल एशियन सोसायटीची लंडनमधील कॅक्सटन हॉल येथे बैठक झाली जिथे मायकेल डायर हे देखील भाषक होते. उधम सिंग त्या दिवशीच सभास्थळी पोहोचला. त्याने आपली रिवॉल्व्हर जाड पुस्तकात लपविली. त्यासाठी त्यांनी पुस्तकातील पाने रिवॉल्व्हरच्या आकारात अशा प्रकारे कापली होती की, डायरचे जीवघेणे हत्यार सहज लपू शकेल.


बैठकीनंतर भिंतीच्या मागून उधम सिंगने मायकेल डायरवर गोळीबार केला. मायकल डायरला दोन गोळ्या लागल्या ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. उधम सिंगने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला नाही आणि त्याला अटक केली. त्याच्यावर खटला चालविला गेला. 


४ जून १९४० रोजी उधमसिंग हत्येचा दोषी ठरला आणि ३१ जुलै १९४० रोजी त्याला पेंटनविले कारागृहात फाशी देण्यात आली.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

संकलन -)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा - यवतमाळ ४४५२०६


प्रभात दर्शन

 🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

आषाढ मास,कृष्ण पक्ष, *अष्टमी*,अश्विनी नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,वर्षा ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

शनिवार, ३१ जुलै २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                        *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


           *"हर व्यक्ति अपने जीवन मे किसी न किसी व्यक्ति को अपना आदर्श मानता है। किसी को अपना आदर्श बनाना कोई बड़ी बात नहीं है। बड़ी बात तो ये है कि जीवन में आप स्वयं ऐसे अनुकरणीय, सद्कार्य करो कि लोग आपको अपना आदर्श माने।"*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

रात आंधळेपणा म्हणजे काय?


══════════════════════

   *📒📒📒 @ संकलन @📒📒📒*

  *श्री. गजानन गोपेवाड 

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════

📕 *'रातांधळेपणा म्हणजे काय ?* 📕


रात्रीच्या अंधारात कोणालाच नीट दिसत नाही. उजेडातून अंधारात गेल्यानंतर आपल्याला काही काळ काहीच दिसत नाही. त्यामुळेच सिनेमाला उशीरा येणारे लोक जेव्हा थिएटरमध्ये प्रवेश करतात, तेव्हा ते अक्षरश: आंधळ्यासारखे, चाचपडत चालत असतात. थिएटरमध्ये आधीपासून बसलेल्या लोकांना मात्र त्याची गंमत वाटते, कारण त्यांना व्यवस्थित दिसायला लागलेले असते. डोळ्याच्या अंतर्भागात रेटीना किंवा दृष्टिपटल असते. त्यात काही वैशिष्ट्यपूर्ण पेशी असतात. या पेशींना 'कोन व रॉड' असे म्हणतात. त्यापैकी कोन हे उजेडातील दृष्टीसाठी तसेच वस्तूचा आकार, रंग याचे ज्ञान होण्यासाठी आवश्यक असतात. रॉड हे अंधारातील दृष्टीसाठी आवश्यक असतात. रॉडमध्ये होडोप्सीन नावाचे रंगद्रव्य असते. याची निर्मिती जीवनसत्त्व 'अ' पासून होत असते. उजेडात होडोप्सीनचे रूपांतर जीवनसत्त्व 'अ' मध्ये, तर अंधारात जीवनसत्त्व 'अ' चे रूपांतर होडोप्सीनमध्ये होते. अंधारात दिसण्यासाठी होडोप्सीन निर्माण होणे महत्त्वाचे आहे. उजेडातून अंधारात आल्यावर हळूहळू होडाप्सीनची निर्मिती होते व आपल्याला दिसायला लागते. याला अंधाराला आपण सरावणे असे म्हणता येईल.


जीवनसत्त्व 'अ'च्या अभावामुळे होडोस्पीनची निर्मिती कमी प्रमाणात होते व साहजिकच अंधारातील दृष्टीवर विपरीत परिणाम होतो. जीवनसत्त्व 'अ'चा अभाव विशेषेकरून सहा वर्षांपर्यंतच्या मुलांमध्ये जास्त प्रमाणात आढळून येतो. अशी मुले सायंकाळी चाचपडत चालतात. आवाजाचा कानोसा घेऊन चालायचा प्रयत्न करतात व वस्तूंना अडखळून पडतात. यालाच 'रातांधळेपणा' असे म्हणतात.


रातांधळेपणा येणे ही जीवनसत्त्व 'अ'च्या अभावामुळे होणाऱ्या दुष्परिणामाची फक्त सुरुवात असते. जीवनसत्त्व ‘अ’चा पुरवठा न झाल्यास डोळ्यातील आवरण कोरडे पडून त्यावर व्रण पडतो. शेवटी डोळ्यात फूल वा टीक पडू शकते. अत्यंत गंभीर स्वरूपाच्या आजारात डोळा पूर्णपणे खराब होऊन अंधत्व येते. आपल्याला नवल वाटते, पण आपल्या देशातील एकूण अंधांपैकी २ टक्के अंध जीवनसत्त्व 'अ'च्या अभावामुळे अंध होतात. हे टाळण्यासाठी सोपा उपाय म्हणजे जीवनसत्त्व 'अ' असलेला आहार घेणे. ज्यात शार्क व कॉर्ड माशांच्या यकृताचे तेल, गाजर, शेवग्याच्या शेंगा, पाने, हिरव्या पालेभाज्या, पपई, आंबे इ. पदार्थांचा समावेश होतो. असे पदार्थ खाल्ल्याने जीवनसत्त्व 'अ'चा अभाव निर्माण होणार नाही व पर्यायाने रातांधळेपणा, तसेच अंधत्वही टाळता येईल.


*डाॅ.अंजली दिक्षित व डाॅ.जगन्नाथ दिक्षित*

*यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' पुस्तकातून*


═══════════════════════

  

रामचंद्र गुप्ते भुशास्त्रज्ञ यांचा जन्म दिवस

 *रामचंद्र भालचंद्र गुप्ते*

🏔️⛰️🗻🌋🏔️🌋🗻⛰️🏔️

*🗻🏔️⛰️भुशास्त्रज्ञ⛰️🏔️🗻*


*जन्मदिन - ३० जुलै १९१९*


प्रसिद्ध भूशास्त्रज्ञ डॉ.रामचंद्र भालचंद्र गुप्ते यांचा जन्म ऐतिहासिक सरदार घराण्यात झाला. तैल व चिकित्सक बुद्धी, त्याबरोबरच भूशास्त्रीय प्रश्‍नांची उकल करण्याची हातोटी व इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व, यामुळे त्यांनी भूशास्त्रीय क्षेत्रात आदराचे स्थान मिळविले होते. डॉ. गुप्ते खऱ्या अर्थी निरीश्वरवादी होते. त्यांनी अनेक दु:खाचे प्रसंग धीराने पचविले. महाविद्यालयात शिकणाऱ्या त्यांच्या एकुलत्या एका मुलाचे आकस्मिक दु:खद निधन झाल्याच्या दुसऱ्या दिवशी मुंबईला मंत्रालयात झालेल्या ‘कोयना टेमर्स कमिटी’च्या बैठकीतील चर्चेत त्यांनी अविचल मनाने भाग घेतला होता.


पुण्याच्या फर्गसन महाविद्यालयातून त्यांनी बी.एस्सी. पदवी मिळवली. त्यांना त्या परीक्षेत ‘दक्षिणा फेलोशिप’ मिळाली होती. संशोधन करून एम.एस्सी. पदवी प्राप्त केल्यावर काही महिने त्यांनी भारतीय भूशास्त्र संस्था (जी.एस.आय.) मध्ये काम केले. त्यानंतर १९६६ सालापर्यंत त्यांनी अहमदाबाद, नागपूर व पुण्याच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयांत अधिव्याख्याता म्हणून काम केले. मार्च १९६६ पासून जुलै १९७७ मध्ये निवृत्त होईपर्यंत ते पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक व भूशास्त्रीय विभागप्रमुख म्हणून होते.


१९५० सालापासून आयुष्याच्या शेवटपर्यंत महाराष्ट्राचा ८५ टक्के भूभाग व्यापणाऱ्या ‘डेक्कन टॅप’ खडकांविषयी त्यांनी मूलभूत संशोधन केले. त्यात खडकांचे विविध प्रकार, त्यांच्या क्षेत्रीय संरचना, त्यांचे विविध गुणधर्म याविषयी त्यांनी सखोल निरीक्षण व अभ्यास केला. त्यांच्या संशोधनामुळे या खडकांच्या बऱ्याच अज्ञात वैशिष्ट्यांविषयी नव्याने माहिती मिळाली. तसेच बऱ्याच जुन्या कल्पना चुकीच्या असल्याचे त्यांनी दाखवून दिले. संशोधनातील अप्रामाणिकपणा ते कधीच खपवून घेत नसत.


भूशास्त्र या विषयाचा अभ्यास प्रयोगशाळेपुरता मर्यादित न ठेवता, त्या संशोधनाचा उपयोग स्थापत्य अभियांत्रिकी कामात केला पाहिजे, असा त्यांचा आग्रह असे. खडकांच्या विविध गुणधर्मांविषयी त्यांनी जी अचूक माहिती मिळविली होती, त्या माहितीचा अभियांत्रिकी भूशास्त्र समजण्यास फार उपयोग झाला. गेरू, ज्वालामुखी, ब्रेशिया, डाइक, भरितकुहरी, बेसॉल्ट या खडकांबद्दल अभियंत्यांच्या मनात चुकीच्या कल्पना असल्यामुळे धरणांचा पाया घेताना त्यांच्या मनांत काहीशी भीती असे. त्यामुळे प्रकल्पावर निष्कारण बराच खर्च केला जाई. डॉ. गुप्ते यांच्या संशोधनामुळे कोट्यवधी रुपये वाचू शकले. त्यामुळेच स्थापत्य अभियंते त्यांचा सल्ला शिरसावंद्य मानत.


१९६२ सालापासून महाराष्ट्र सरकारचे पाटबंधारे खाते, सार्वजनिक बांधकाम खाते, मध्य रेल्वे, टाटा कन्सल्टिंग इंजिनिअर्स, टाटा इलेक्ट्रिसिटी कंपनीज, एम.आय.डी.सी., बृहन्मुंबई महानगरपालिका, न्युक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन, इलेक्ट्रिसिटी टू लाओस यांसारख्या अभियांत्रिकी संघटनांसाठी अनेक धरणे, कालवे, बोगदे, रस्ते, लोहमार्ग, भूमिगत विद्युतगृहे व पूल यांसारख्या अनेक प्रकल्पांच्या ठिकाणी भूशास्त्रीय अभ्यास करून त्यांचे आराखडे व बांधकाम यांविषयी डॉ. गुप्ते यांनी मोलाचा सल्ला दिला. या प्रकल्पांव्यतिरिक्त बृहन्मुंबई पाणीपुरवठ्यासाठी भातसा, मध्य वैतरणा धरण,समुद्राखालील वसई खाडी बोगदा (क्रीक टनेल), केळशी बोगदा (अंडरक्रीक टनेल), सहार ते रेसकोर्स हा प्रमुख बोगदा व ५० कि.मी. लांबीचे पाण्यासाठीचे मुंबई शहरातील इतर बोगदे, वैतरणा जलविद्युत प्रकल्प, कोयना जलविद्युत प्रकल्पाचा तिसरा व चौथा टप्पा, पुण्याजवळील पानशेत,वरसगाव,टेमघर,भाभाआसखेड,चासकमान इत्यादी धरणांवर,तसेच मध्य रेल्वेच्या थळ आणि बोरघाटातील तिसरे रेल्वे मार्ग, तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या तिसऱ्या व चौथ्या अणुभट्टीच्या जागा, लाओसमधील सेसेल, सेलाबाम इत्यादी जलविद्युत प्रकल्पांवर त्यांनी तज्ज्ञ म्हणून काम केलेले आहे.


नर्मदा पाणी तंट्याविषयी लवादाच्या कामासाठी महाराष्ट्र सरकारचे भूशास्त्रीय सल्लागार म्हणून नवागाव व जलसिंधी येथील धरणांच्या जागेचा तौलनिक अभ्यास करून त्यांनी महाराष्ट्र सरकारला लवादांशी संबंधित बाबींविषयी मोलाचा भूशास्त्रीय सल्ला दिला.


महाराष्ट्र सरकारच्या ‘कोयना ट्रेमर्स कमिटी’ व ‘एक्स्पर्ट कमिटी ऑन सिस्मॉलॉजी’चे एक तज्ज्ञ सदस्य म्हणून त्यांनी काम केले. कोयना भूकंप कोयना धरणामुळे झाला नाही हे भूशास्त्राच्या आधारे सिद्ध करण्यासाठी त्यांनी सखोल संशोधन केले. हा भूकंप धरणामुळे झाला असणे कसे शक्य नाही हे त्यांनी शोधनिबंध लिहून व विविध चर्चासत्रांत भाग घेऊन दाखवून दिले.


महाराष्ट्र सरकारच्या ‘सिंचन व जल आयोगा’चे सहयोगी तज्ज्ञ म्हणून त्यांनी आयोगाच्या अनेक कार्यशाळांत झालेल्या चर्चेत भाग घेतला व आयोगाला भूजलाच्या भूशास्त्रीय पैलूंविषयी टिप्पण्या तयार करण्यास सहकार्य केले.


भाषा संचालनालयाने मराठी भाषेत भूशास्त्रीय परिभाषा तयार करण्यासाठी नेमलेल्या समितीचे अध्यक्षस्थान त्यांनी भूषविले होते. परिभाषा तयार करण्याच्या चर्चांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला.


डेक्कन टॅप खडकांच्या मूलभूत स्वरूपाविषयी व त्यांच्या अभियांत्रिकी भूशास्त्रीय गुणधर्मांविषयी त्यांचे पंचवीसहून अधिक शोधनिबंध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मासिकांत प्रसिद्ध झालेले आहेत. ‘पी.डब्ल्यू.डी. हँड बुक प्रकरण क्र. ६’, तसेच ‘ए टेक्स्ट बुक ऑफ इंजिनिअरिंग जिऑलॉजी’ व ‘एजी सिरीज ऑफ जिऑलॉजिकल मॅप्स’ ही त्यांची पुस्तके भूशास्त्रातील आधारभूत ग्रंथ मानले जातात.


भूशास्त्रातील ज्ञानकोश असलेले डॉ. गुप्ते कालवश झाल्याने डेक्कन टॅप बेसॉल्ट खडकांच्या एका अभ्यासपर्वाचा अंत झाला, असेच म्हणावे लागेल.

— डॉ. बा. मो. करमरकर

🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏


संकलन -)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

प्रभात दर्शन

 🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

आषाढ मास,कृष्ण पक्ष, *सप्तमी*,रेवती नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,वर्षा ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

शुक्रवार, ३० जुलै २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                        *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


शूद्रो ब्राह्मणतामेति 

            ब्राह्मणश्चैति शूद्रताम।

क्षत्रियाज्जातमेवं तु 

            विद्या द्वैश्यात्तथैव च।


*अर्थात मनुस्मृति के अध्याय १०/६५  में महर्षि मनु कहते हैं कि कर्म के अनुसार ब्राह्मण शूद्रता को प्राप्त हो जाता है और शूद्र ब्राह्मणत्व को। इसी प्रकार क्षत्रिय और वैश्य से उत्पन्न संतान भी अन्य वर्णों को प्राप्त हो जाया करती हैं। विद्या और योग्यता के अनुसार सभी वर्णों की संतानें, अन्य वर्ण में जा सकती हैं।*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

गुरुवार, २९ जुलै, २०२१

गणिती कोडे

 गणितात कोणतीही संख्या 1 ते 10 पर्यंतच्या  सर्व संख्याने भागता येत नाहीत,   पण ही एक संख्या अशी विचित्र आहे की जगातले सर्व गणितज्ञ आश्चर्याने चकित झाले. ही संख्या भारतीय गणितज्ञांनी आपल्या अचाट बुद्धीने शोधली...!


ही संख्या - 2520 पहा. ही इतर अनेक   संख्यांपैकी एक आहे असे दिसते पण  वास्तव्यात मात्र तसे नाही, ही अशी संख्या आहे जगातील अनेक गणितज्ञांना थक्क करून सोडले...!!


ही विचित्र संख्या 1 ते 10 यापैकी प्रत्येक संख्येने भाग जाणारी आहे, ती संख्या सम वा विषम असली तरीही.

ह्या संकटाला 1 ते 10 पर्यंतच्या कोणत्याही संख्येने भागले असता बाकी शून्याचे रहाते. खरोखरच ही अद्भूत व अशक्य अशी संख्या वाटते...!! 

आता पुढील टेबल पहा, वरील विधानाची सत्यता स्वतः अनुभवा.


2520 ÷ 1 = 2520

2520 ÷ 2 = 1260

2520 ÷ 3 = 840

2520 ÷ 4 = 630

2520 ÷ 5 = 504

2520 ÷ 6 = 420

2520 ÷ 7 = 360

2520 ÷ 8 = 315

2520 ÷ 9 = 280

2520 ÷ 10 = 252


2520 या संखेचे रहस्य [ 7 × 30 × 12 ] या गुणाकारात दडले आहे.


भारतीय हिंदू संवत्सरच्या अनुषंगाने या 2520 संखेचे कोडे उलगडते,जे या संखेचे गुणाकार आहे::

ऐक आठवड्यांचे दिवस (7), एका महिन्याचे दिवस (30) व एका वर्षाचे महीने (12)

[7×30×12=2520]

हेच आहे भारतीय कालगणनेचे वैशिष्ट्य व श्रेष्ठत्व!!


29 जुलै जे आर डी टाटा जन्म दिवस

 ********************************

✈️✈️✈️✈️✈️✈️✈️✈️✈️✈️✈️

*२९ जुलै - जे.आर.डी. टाटा जन्मदिन*

🚗🚕🚙🚌🚑🚒🚐🚚🚛🚗🚕

********************************

🏭🏥🏤🏨🏢✈️🏢🏨🏤🏥🏭

जन्म -  २९ जुलै १९०४ (फ्रान्स)

स्मृती - २९ नोव्हेंबर १९९३


जहांगीर रतनजी दादाभॉय टाटा उर्फ जे.आर.डी. टाटा हे भारतीय उद्योजक होते.ते पहिले भारतीय वैमानिक असून,भारतातील✈️ विमान वाहतूक उद्योगाचे जनक मानले जातात.


टाटांचा जन्म २९ जुलै १९०४ मध्ये पॅरिस,फ्रान्स येथे झाला. रतनजी दादाभॉय टाटांचे ते दुसरे पुत्र होते. मुंबईतील कॅथेड्रल अँड जॉन केनॉन स्कूल येथे काही वर्ष ते शिकले,पण टाटांची आई फ्रेंच असल्यामुळे त्यांचे बालपण मुख्यत: फ्रान्सातच गेले.काही कारणाने ते मॅट्रीक परीक्षेपुढे शिकू शकले नाहीत.


इंग्लिश खाडी विमानाद्वारे पहिल्यांदा पार करणारे सुप्रसिद्ध फ्रेंच वैमानिक लुईस ब्लेरिअट यांच्या जीवनकार्याने जेआरडी खूप प्रभावित झाले होते.त्यामुळे त्यांनीही विमान शिकण्याचा ध्यास घेतला.१९२९ साली त्यांनी वैमानिकाचा परवाना मिळवला. वैमानिकाचा परवाना मिळवणारे ते पहिले भारतीय ठरले.१९३२ साली त्यांनी टाटा एरलाईन्स या पहिल्या भारतीय प्रवासी विमानवाहतूक कंपनीची स्थापना केली.पुढे १९४६ साली तिचे नाव बदलून एअर इंडिया ठेवले गेले.


वयाच्या अवघ्या ३४ व्या वर्षी म्हणजे १९३८ साली ते टाटा सन्स उद्योगसमूहाचे चेअरमन बनले. ते प्रदीर्घ काळ त्या पदावर होते. त्यांनी पदभार सांभाळला तेव्हा टाटा सन्स उद्योगसमूहाच्या १४ कंपन्या होत्या. टाटांच्या काळात ९१ कंपन्यांची भर पडली. रसायन,वाहन,चहा,माहिती,हॉटेले आणि तंत्रज्ञान अश्या नवीन क्षेत्रांत त्यांनी टाटा उद्योगसमूहाचा विस्तार केला. 


टाटांच्या पुढाकाराने १९५६ साली कंपनीतील कामगारांच्या कल्याणासाठी खास योजना राबविण्यात आली.त्यामध्ये 'दिवसातून आठ तास काम', 'मोफत आरोग्यसेवा', 'भविष्य निर्वाह निधी' आणि 'अपघात विमा योजना' अश्या पायाभूत गोष्टींचा समावेश करण्यात आला होता. पुढे या योजना भारतीय केंद्र शासनाने सर्व उद्योग-व्यवसायांसाठी कायदेशीर रित्या बंधनकारक केल्या.


टाटांच्या कारकिर्दीत उद्योगसमूहाच्या विस्ताराबरोबरच इतर अनेक संस्था स्थापन झाल्या. भारतात मूलभूत संशोधन व्हावे म्हणून त्यांनी १९३६ साली टाटा समाजविज्ञान संस्था आणि १९४५ साली टाटा मूलभूत संशोधन संस्था या संशोधनसंस्था स्थापण्यात पुढाकार घेतला. आशियातील पहिले कर्करोग रुग्णालय १९४१ साली मुंबईत सुरू केले.


टाटांना त्यांच्या हयातीत अनेक पुरस्कार मिळाली. भारतीय केंद्रशासनातर्फे त्यांना १९५७ साली पद्मविभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले, तर १९९२ साली त्यांना भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मानाने भूषवण्यात आले.

*🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏*

******************************

संकलन -) गजानन गोपेवाड 


उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

वडस म्हणजे काय?


══════════════════════

  संकलन

  *श्री. गजानन गोपेवाड 

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════

📕 *वडस म्हणजे काय ?* 📕


वडस हा डोळ्यांचा विकार आहे. तुम्ही काही लोकांच्या डोळ्यात पांढुरका पडदा पाहिला असेल. डोळ्यांच्या नाकाजवळच्या भागापासून बुबुळापर्यंत असणाऱ्या या पडद्याला वडस असे म्हणतात. वडस होण्याचे मुख्य कारण म्हणजे वयोमानानुसार डोळ्यातील श्लेष्मल आवरणाच्या खालील पेशी व उतींमध्ये होणारे हानिकारक बदल हे होय. सामान्यतः प्रौढ पुरुषांना हा रोग होतो.


वडस म्हणजे डोळ्यातील श्लेष्मल आवरणाची एक त्रिकोणाकृती घडीच असते. ती बुबुळापर्यंत व कधीकधी बाहुलीच्या वरच्या वाजूपर्यंत वाढते. बाहुलीवर या पडद्याची वाढ झाल्यास दिसायला त्रास होतो. डोळ्यांच्या हालचालींवर मर्यादा आल्याने क्वचित एकाऐवजी दोन वस्तू दिसायला लागतात.


वडसाचा आकार जर वाढत नसेल व त्यामुळे दिसायला त्रास होत नसेल, तर उपचार करण्याची आवश्यकता नसते. वडसाचा आकार जर वाढत असेल वा दिसायला त्रास होत असेल, तर मात्र उपचार करणे गरजेचे असते. यात शस्त्रक्रिया करावी लागते. ही सोपी शस्त्रक्रिया असून यात वाढलेला पडदा कापून टाकतात. वडस उपचाराने नक्कीच बरे होते.


*डाॅ.अंजली दिक्षित व डाॅ.जगन्नाथ दिक्षित*

*यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' पुस्तकातून*

═══════════════════════

  

प्रभात दर्शन

 🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

आषाढ मास,कृष्ण पक्ष, *पँचमी*,पू.भा.नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,वर्षा ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

बुधवार, २८ जुलै २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                        *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


षण्णामात्मनि नित्यानाम्

              ऐश्वर्यं योऽधिगच्छति।

न स पापैः कुतोऽनर्थै:

              युज्यते विजितेन्द्रियः॥


भावार्थः-  *जो व्यक्ति मन के अंदर रहने वाले काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार तथा ईर्ष्या नामक छह शत्रुओं को जीत लेता है, वह जितेंद्रिय हो जाता है। ऐसा व्यक्ति दोषपूर्ण कार्य एवं पाप-कर्मों में लिप्त नहीं होता।*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

बुधवार, २८ जुलै, २०२१

रक्त गट कसे ओळखावे


══════════════════════

    संकलन ):

  *श्री. गजानन गोपेवाड 

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════

🌡 *रक्तगट कशावरून ठरवतात ?* 📊

_____________________________


*🔴तुमचा रक्तगट कोणता हे अनेकदा अनेकांनी तुम्हाला विचारले असेल. रक्तगट माहीत नसण, हे सुशिक्षित लोकांना कमीपणाचे वाटू लागले आहे. ही चांगली गोष्ट आहे. या रक्तगटांविषयी थोडक्यात माहिती करून घेऊ. सगळ्यांचे रक्त लाल असते व सगळ्यांच्या रक्तात लाल, पांढऱ्या पेशी, हिमोग्लोबिन, पाणी हे घटक सारखेच असले तरी रक्तगटाच्या बाबतीत मात्र ते सारखे नसते.*


*🔴लॅण्डस्टीनर या शास्त्रज्ञाने रक्तगटाचा शोध लावला. लाल रक्तपेशींवर A, B या घटकांच्या (अॅंग्ल्युटीनोजेन) असण्या वा नसण्यावर रक्ताचे चार गट करण्यात येतात. A व B या घटकांशी क्रिया करून लाल पेशी साकळवणाऱया घटकांना अॅग्लुटीनीन असे म्हणतात.*


*🔴A रक्तगट असणाऱ्या माणसाच्या रक्तात बीटा, B गटाच्या रक्तात अल्फा, O गटाच्या रक्तात अल्फा, बीटा दोन्ही अॅग्लुटिनीन उपस्थित असतात. AB गटाच्या रक्तात हे दोन्ही नसतात. A, B, O, AB अशा वरील वर्गीकरणाखेरीच रक्ताचे RH* *+ Ve आणि Rh - Ve असे वर्ग असतात. + Ve रक्त असेल तर त्यात D-* *अॅग्लुटोनोजेन असते व - Ve असेल तर ते नसते.*


*🔴त्यामुळे वरील वर्गीकरणावरून एकूण रक्तगट असे करता येतील :  A+, A-, B+, B-, AB+, AB-, O+, O-*

***यात कुणाचे रक्त कोणाला देता येते ? यासाठी एक* *विशिष्ट प्रकारचा चार्ट असतो.*


*यातही जर कुणाचा रक्तगट - Ve असेल तर त्यास + Ve रक्तगटांचे रक्त चालणार नाही. त्यास - Ve* *रक्तगटाचेच रक्त द्यावे लागते* *परंतु + Ve ला - Ve रक्तगटाचे रक्त चालू शकते.*


*या रक्तगटांचे महत्त्व आपल्याला रक्त स्वीकारण्याची वेळ येते तेव्हा लक्षात येते. तसेच जर मातेचा रक्तगट - Ve असेल आणि तिच्या गर्भात जर + Ve रक्तगटाचे मूल असेल तर त्या रक्तांमध्ये विरोधी क्रिया होऊ शकते आणि मातेवर व गर्भावर विपरीत परिणाम होऊ शकतात.*


*🔴रक्तगटाचा आणखी एक उपयोग म्हणजे यावरून पालकत्व सिद्ध करता येऊ शकते. लँडस्टीनरच्या या शोधामुळे रक्तदानाच्या क्षेत्रात खूप मोलाचा विकास झाला आहे.*


═══════════════════════

 

28 जुलै जागतिक कावीळ दिवस

 *२८ जुलै*

*जागतिक कावीळ दिवस*

(Hepatitis B Day)

💉💉💉💉💉💉💉💉💉💉

*Baruch Blumberg*

*कावीळ आजारावर लस शोधुन काढली*


*जन्मदिन - २८ जुलै १९२५*


संसर्गजन्य रोगांच्या उत्पत्ती आणि त्यांचा प्रसार याबद्दलचे संशोधन तसेच त्यावरील नवीन यंत्रणेसंबंधित शोधांसाठी ब्लॉम्बरग यांना नोबेल पारितोषिक प्राप्त झाले." ब्लंबर्गने हेपेटायटीस बी विषाणूची ओळख पटविली आणि नंतर त्याचे निदान चाचणी आणि लस विकसित केली .


कावीळ किंवा कामला हा एक स्वतंत्र विकार मानण्यापेक्षा ते एक रोगलक्षण मानणे सयुक्तिक आहे. यकृतातून बाहेर जाणाऱ्या पित्तरसापेक्षा अधिक पित्तरस यकृतात तयार होऊ लागला म्हणजे कावीळ होते. जास्तीचा शिल्लक राहिलेला पित्ताचा भाग रक्तात मिसळला जातो व सर्व शरीरभर पसरतो. यातूनच डोळ्यांचा पांढरा भाग पिवळा दिसू लागतो. त्वचेचा रंग पिवळसर होऊ लागतो. लघवी पिवळी होते व तीव्र काविळीत लालसर पिवळी दिसते. पित्त यकृतातून बाहेर पडताना पित्तनलिकेत किंवा प्रत्यक्ष यकृतांतर्गत अडथळा निर्माण झाला, तर शौचास पांढरेफिके होऊ लागते.

कावीळ हे यकृतविकृतीचे किंवा रक्तातील तांबड्यापेशी जास्त नाश पावत असल्याचे चिन्ह होय. या रोगाचे निदान मुत्रपरीक्षेतून व रक्ताच्या चाचण्यांतून होते. नवजात बालकाला रक्तपेशींचे दान निसर्गाने जरा सढळपणे दिलेले असते. त्यामुळे जन्मानंतर काही दिवसांतच या जास्तीच्या पेशी नाश पावतात व मंद स्वरूपात कावीळ उद्भवते. पण ती आपोआपच थोड्याच दिवसांत नाहीशी होते. क्वचित ती तीव्र स्वरूपात व अगदी पहिल्या दुसऱ्या दिवशीच दिसल्यास त्या बालकाला फोटोथेरपी हा अल्ट्राव्हाॅयलेट किरणांचा उपचार दिला जातो. हिमोलायटिक ऍनिमिया या रक्तक्षयाच्या आजारातही रक्तपेशींचा नाश होत असल्याने कावीळ होते. मूळ कारण दूर झाल्यास ती बरी होते.

आपण सहसा काविळीचा रुग्ण पाहतो, तो विषाणूजन्य पाण्यातून झालेल्या संसर्गाचा बळी असतो. तोंडावाटे पाण्यातून हे विषाणू शरीरात प्रवेश करतात व त्यामुळे यकृताला सूज येते, कार्यात अडथळा होतो. यकृताचे तांबड्या रक्तपेशी नष्ट करण्याचे काम नीट न झाल्याने कावीळ दिसू लागते. मळमळ,ओकारी,भूक मंदावणे, गुबारा धरणे,शरीराला कंड सुटणे, मलावरोध ही लक्षणे प्राधान्याने सर्वच रुग्णांत दिसतात. डोळ्यांचा, त्वचेचा व मूत्राचा रंग पिवळा होतो, तर शौचास पांढरट चिकणमातीसारखे होऊ लागते. पचनास आवश्यक पित्तरसाचा अभाव झाल्याने ही लक्षणे दिसतात. सामान्यपणे पाच ते दहा दिवसांत हा आजार बरा होतो.

दुसऱ्या प्रकारच्या काविळीत म्हणजे रक्ताद्वारे संसर्ग होणाऱ्या काविळीत विषाणू एकाच्या रक्तातून दुसऱ्याच्या शरीरात प्रवेश करतात. इंजेक्शनच्या सुया, शस्त्रक्रियेच्या सुया वा रक्त यांच्याशी सतत संपर्क येणाऱ्या सिस्टर, डॉक्टर यांसारखी व्यक्ती, सर्जन यांना हा संसर्ग होण्याची शक्यता असते. ही कावीळ तीव्र स्वरूपाची असून बरी व्हायला खूप वेळ लागतो. काही वेळा यकृतदाह होऊन यकृताचे काम कायमचेच मंदावत जाते. यालाच 'लिव्हर सिर्‍हाॅसिस' असे म्हणतात. सिर्‍हाॅसिसमध्ये यकृत आक्रसत जाऊन त्याचे काम बंद पडत जाते. हा एक गंभीर रोग आहे. सध्या काविळीची लस (हेपॅटायटिस बी) टोचली जाते, ती या प्रकारच्या काविळीला प्रतिबंध करते. या प्रकारच्या काविळीवर उपचार नसल्याने प्रतिबंध हाच योग्य उपाय तर ठरतो.

अंथरुणात पडून पूर्ण विश्रांती, तोंडावाटे भरपूर शर्करायुक्त पेयद्रव्ये, हलका कर्बयुक्त आहार घेतल्यास सर्वसामान्य कावीळ आपोआप नियंत्रणात येते. तीव्र लक्षणांत शिरेवाटे ग्लुकोज सलाईन देऊन रुग्णाच्या पचनसंस्थेला आराम देऊन मदत केली जाते.

कावीळ हा विषाणूजन्य आजार असल्याने रुग्णाशी संपर्क आल्यास हात स्वच्छ धुणे, त्याची भांडी, अंथरूण, कपडे यांची वेगळी व्यवस्था करणे व अन्य लोकांनी पाणी उकळून पिणे हा प्रतिबंधाचा महत्त्वाचा मार्ग असतो.

शेवटी पण महत्त्वाचे, काविळीची लक्षणे व प्रत्यक्ष संसर्ग होण्याची कारणे जरी दूर झाली, तरी रुग्णाच्या डोळ्यांचा रंग काही आठवडे पिवळसर राहतो व हळूहळू नेहमीसारखा होतो.

*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*


🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

संकलन -)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

Featured Post

व्यायाम व योगा अवश्य करावा*

*व्यायाम व योगा अवश्य करावा*  *व्यायाम व योगा करण्याचे दहा फायदे:-*  1) व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते: व्यायाम करणारी...