सोमवार, १९ जुलै, २०२१

जयंत विष्णू नारळिकर

 *🛰️🛰️जयंत विष्णू नारळीकर🛰️🛰️*

🔭🔭🔭🔭🔭🔭🔭🔭🔭🔭🔭

*भारतीय खगोलशास्त्रज्ञ व लेखक*

🔭🔭🔭🔭🔭🔭🔭🔭🔭🔭

*जन्म - १९ जुलै  १९३८*


नारळीकरांचा जन्म कोल्हापूर येथे १९ जुलै १९३८ रोजी झाला. त्यांचे वडील, रँग्लर विष्णू वासुदेव नारळीकर हे एक प्रसिद्ध गणितज्ञ, वाराणसी येथील बनारस हिंदू विद्यापीठाच्या गणित विभागचे प्रमुख होते. त्यांची आई सुमती विष्णू नारळीकर ह्या संस्कृत विदुषी होत्या. जयंत नारळीकरांचे शालेय शिक्षण वाराणसी येथे झाले. इ.स. १९५७ साली त्यांनी विज्ञानाची पदवी (B.Sc.) प्राप्त केली.या परीक्षेत त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते ब्रिटनमधील केंब्रिज येथे गेले. तेथे त्यांना बीए, एमए व पीएचडी च्या पदव्या मिळाल्या. शिवाय, रँग्लर ही पदवी, खगोलशास्त्राचे टायसन मेडल व इतर अनेक बक्षिसे मिळाली. १९६६ साली नारळीकर यांचा विवाह मंगला सदाशिव राजवाडे (गणितज्ञ) ह्यांच्याशी झाला. त्यांना तीन मुली आहेत - गीता, गिरिजा व लीलावती. १९७२ साली ते भारतात परतले. त्यांनी मुंबई येथील टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या (टी.आय.एफ.आर.) खगोलशास्त्र विभागात प्रमुख म्हणून पद स्वीकारले. १९८८ साली त्यांची पुणे येथील आयुका संस्थेचे संचालक म्हणून नियुक्ती झाली. डॉ. नारळीकर यांच्या पत्‍नी मंगला नारळीकर ह्या ’नभात हसते तारे’ या पुस्तकाच्या सहलेखिका आहेत. ’पाहिलेले देश भेटलेली माणसं’ हे त्यांनी स्वतंत्रपणे लिहिलेले पुस्तक आहे.

संशोधन

स्थिर स्थिती सिद्धान्त

चार दशकांहून अधिक कालावधीपासून त्यांचे खगोलभौतिकी क्षेत्रात संशोधन सुरू आहे. त्याच बरोबर सतत पुस्तके लिहिण्याचा कार्यक्रमही चालू आहे. सामान्य माणसाला खगोलशास्त्र समजवण्यासाठी त्यांनी गेली अनेक वर्षे प्रयत्‍न केले आहेत. यासाठी सर्व प्रसारमाध्यमांचा ते उपयोग करतात. त्यांच्या 'यक्षांची देणगी' या पहिल्याच पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे.

साहित्यातील भर

विविध मराठी नियतकालिकांतून जयंत नारळीकर सातत्याने विज्ञानचिषयक माहितीने भरलेले ललित लेखन प्रसिद्ध होत असते. नारळीकरांच्या पुस्तकांची जगांतील अनेक भाषांत रूपांतरे झाली आहेत.

विज्ञानकथा पुस्तके

अंतराळातील भस्मासुर अभयारण्य टाइम मशीनची किमया प्रेषित यक्षांची देणगी याला जीवन ऐसे नाव वामन परत न आला व्हायरस

इतर विज्ञानविषयक पुस्तके

आकाशाशी जडले नाते गणितातील गमतीजमती युगायुगाची जुगलबंदी गणित अन्‌ विज्ञानाची (आगामी) नभात हसरे तारे (सहलेखक : डॉ. अजित केंभावी आणि डॉ. मंगला नारळीकर) विज्ञान आणि वैज्ञानिक विज्ञानगंगेची अवखळ वळणे विज्ञानाची गरुडझेप विश्वाची रचना विज्ञानाचे रचयिते सूर्याचा प्रकोप Facts And Speculations In Cosmology (सहलेखक : Geoffrey Burbidge) Seven Wonders Of The Cosmos

आत्मचरित्र

चार नगरांतले माझे विश्व

पुरस्कार

१९६५ मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाला.

२००४मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्कार मिळाला.

२०१०मध्ये त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला.त्यांना भटनागर पुरस्कार आणि एम.पी.बिरला हे पुरस्कारही मिळाले आहेत. २०१४ साली मिळालेला तेनाली (हैदराबाद) येथील नायुद‍अम्मा ट्रस्टचा डॉ.वाय.नायुद‍अम्मा स्मृती पुरस्कार-२०१३ जयंत नारळीकर यांच्या आत्मचरित्राला दिल्लीच्या साहित्य अकादमीचा २०१४ सालचा पुरस्कार मिळाला आहे. *"यक्षाची देणगी"* या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार अमेरिकेतील फाउंडेशनतर्फे दिला जाणारा साहित्यविषयक जीवनगौरव पुरस्कार (२०१२)

चरित्र

डॉ. विजया वाड यांनी डॉ. नारळीकर यांचे ’विज्ञान यात्री डॉ.जयंत नारळीकर’ या नावाचे चरित्र लिहिले आहे.

*🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏*

संकलन -)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

शनिवार, १७ जुलै, २०२१

एन्टिबायटिक म्हणजे काय?


   संकलन:)  गजानन गोपेवाड 

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════

📕 *अँटीबायोटीक्स म्हणजे काय ?* 


अँटीबायेटीक्स अर्थात प्रतिजैविकांचे आजकालच्या औषधोपचारांत अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. कोणताही डॉक्टर प्रतिजैविकांचा उपयोग केल्याखेरीज वैद्यक व्यवसाय करूच शकणार नाही, अशी आजची परिस्थिती आहे.


अलेक्झांडर फ्लेमिंगने अपघाताने पेनिसिलीनचा शोध लावला व तेव्हापासून आजतागायत अनेक प्रतिजैविके विकसित करण्यात आली आहेत. बुरशीपासून ही प्रतिजैविके मिळतात. काही प्रतिजैविकांचे कृत्रिमरित्या तयार होणारे पर्यायही उपलब्ध झाले आहेत. प्रतिजैविके विविध मार्गांनी जंतूंचा नायनाट करतात. काही वेळा ती जिवाणूंचे पोषण त्याला मिळू देत नाहीत. कधी त्याच्या पेशीतील केंद्रकावर हल्ला चढवतात, तर कधी त्याला हानीकारक ठरणारे पदार्थ निर्माण करतात.


जिवाणूही हुशार असतात. प्रतिजैविक योग्य प्रमाणात दिले नाही वा कमी दिवस दिले, तर जिवाणूंमध्ये त्या प्रतिजैविकाविरुद्ध प्रतिकार शक्ती तयार होते. ही प्रतिकार शक्ती त्यांच्या पुढील पिढ्यांनाही आपोआप मिळू शकते. त्यामुळे त्या प्रतिजैविकांचा उपयोग त्या जिवाणूला मारण्यासाठी करता येत नाही. असे होऊ नये यासाठी प्रतिजैविके पुरेशा डोसमध्ये निदान ५ दिवस तरी द्यायला हवी. पेनिसिलीन, अँपीसिलीन, स्ट्रेप्टोमायसीन, निओमावसीन, सेफलोस्पोरीन अशी प्रतिजैविके आजकाल औषधोपचारांत वापरली जातात. रोगी अत्यवस्थ असेल तर वा पचनसंस्थेतून प्रतिजैविकाचे शोषण होत नसेल तर ही प्रतिजैविके शिरेतून वा स्नायूमध्येही देता येतात. अशावेळी बावडे वा अंतर्जीची विशेष काळजी घ्यावी लागते.


प्रतिजैविके म्हणजे रुग्णांसाठी जणू वरदानच होय. क्षयरोग, कुष्ठरोग यांसारख्या असाध्य समजल्या जाणाऱ्या रोगांपासून कॉलरा, विषमज्वर, घटसर्प, डांग्या खोकला अशा सर्वच रोगांवर प्रतिजैविकांमुळे हुकुमी

उपचार करता येतात.


*डॉ. जगन्नाथ दीक्षित*

*डाॅ. अंजली दीक्षित*

यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज'या पुस्तकातून


स्त्रोत- विज्ञान व दिनविशेष फेसबुक पेज

═════════════

किरणोपचार म्हणजे काय?


══════════════════════

   *📒📒📒 @ संकलन @📒📒📒*

  *श्री. गजानन गोपेवाड 

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════

📙 *किरणोपचार म्हणजे काय ?* 


अनेक पदार्थ किरणोत्सर्गी असतात. यात नैसर्गिक व कृत्रिम पदार्थांचा समावेश होतो. क्ष-किरण, गॅमा किरण, अल्फा, बीटा व प्रोटॉन असे अनेक किरणोत्सर्ग आपल्याला ज्ञात आहेत. अणुबॉम्बसारख्या विध्वंसक अस्त्रामुळे होणाऱ्या दुष्परिणामांमध्ये किरणोत्सर्गाचे दुष्परिणाम खूप महत्त्वाचे असतात. किरणोत्सर्गाच्या प्रभावामुळे रक्ताचा कर्करोग इतर इंद्रियांचे कर्करोग तसेच आयुष्यमान कमी होणे हे तीन महत्त्वाचे दुष्परिणाम होतात. उपरोक्त किरणोत्सर्गांपैकी क्ष-किरण व गॅमा किरण हे शरीरात खोलवर जाऊ शकतात.


क्ष-किरणांच्या शरीरातून आरपार जाऊ शकणाऱ्या गुणधर्माचा वापर क्ष-किरण फोटो काढण्यासाठी करतात. हाडे, स्नायू, हवा यांच्या वेगवेगळ्या घनतेमुळे कमी अधिक प्रमाणात क्ष-किरण त्यातून आरपार जाऊ शकतात व क्ष-किरण प्लेटवर पडतात. याचे दृश्य स्वरूप म्हणजे क्ष-किरण फोटो होय. किरणोत्सर्गी आयोडीनचा वापर थायरॉईड ग्रंथीचे कार्य व्यवस्थित चालू आहे वा नाही हे बघण्यासाठी होतो.


गॅमा किरणांमुळे शरीरातील पेशी मरतात. या गुणधर्माचा वापर किरणोपचारात केला जातो. एका यंत्राच्या सहाय्याने किरणोत्सर्गी कोबाल्ट धातूपासून निघणारे किरण विशेष नियंत्रणाखाली कर्करोग झालेल्या इंद्रियावर सोडले जातात. हा उपचार गरजेनुसार अनेक वेळा केला जातो. किरणोत्सर्गामुळे कर्करोगाच्या पेशी मरतात. सामान्यत: शस्त्रक्रियेने अथवा औषधी चिकित्सेने कर्करोग बरा होण्यासारखा नसल्यास किरणोपचाराचा वापर करतात. अशा प्रकारे किरणोपचाराने हजारो कर्करोगग्रस्त रुग्णांचे आयुष्य वाढवता येते.


*डॉ. जगन्नाथ दीक्षित*

*डाॅ. अंजली दीक्षित*

यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज'या पुस्तकातून


स्त्रोत- विज्ञान व दिनविशेष फेसबुक पेज

गाथा बलिदानाची भारतरत्न अरूणा असफ अली

 ➿➿➿➿➿➿➿➿➿➿

🇮🇳🇮🇳 *गाथा बलिदानाची* 🇮🇳🇮🇳

                 ▬ ❚❂❚❂❚ ▬                                                                                                  

📰✍️⛓️🇮🇳👩‍🦰🇮🇳⛓️✍️📰

                  *भारतरत्न*                                                                                                             

         *अरुणा आसफ अली* 


   *जन्म - १६ जुलाई १९०९*

                (हरियाणा)

   *मृत्यु - २९ जुलाई १९९६*                                    पूरा नाम - अरुणा आसफ़ अली

अन्य नाम - अरुणा गांगुली                

पति - आसफ़ अली

कर्म भूमि - भारत

कर्म-क्षेत्र - स्वतंत्रता सेनानी,शिक्षक

भाषा - हिन्दी,अंग्रेज़ी

पुरस्कार-उपाधि -

 'लेनिन शांति पुरस्कार' (१९६४), 'जवाहरलाल नेहरू अंतर्राष्ट्रीय सद्भावना पुरस्कार' (१९९१),

 'पद्म विभूषण' (१९९२),

 ‘इंदिरा गांधी पुरस्कार’, 'भारत रत्न' (१९९७)

विशेष योगदान - १९४२ ई. के ‘अंग्रेज़ों भारत छोड़ो’ आंदोलन में विशेष योगदान था।

नागरिकता - भारतीय

अन्य जानकारी - १९९८ में इनके नाम पर एक डाक टिकट जारी किया गया। उनके सम्मान में नई दिल्ली की एक सड़क का नाम 'अरुणा आसफ़ अली मार्ग' रखा गया।

अरुणा आसफ़ अली का नाम भारत के स्वतंत्रता आन्दोलन में विशेष रूप से प्रसिद्ध है। इन्होंने भारत को आज़ादी दिलाने के लिए कई उल्लेखनीय कार्य किये थे। भारत के स्वतंत्रता आंदोलन में अग्रणी भूमिका निभाने वाली क्रांतिकारी, जुझारू नेता श्रीमती अरुणा आसफ़ अली का नाम इतिहास में दर्ज है। अरुणा आसफ़ अली ने सन १९४२ ई. के ‘अंग्रेज़ों भारत छोड़ो’ आंदोलन में महत्त्वपूर्ण योगदान को विस्मृत नहीं किया जा सकता। देश को आज़ाद कराने के लिए अरुणा जी निरंतर वर्षों अंग्रेज़ों से संघर्ष करती रही थीं।

 ♦ *जीवन परिचय*

अरुणा जी का जन्म बंगाली परिवार में १६ जुलाई सन १९०९ ई. को हरियाणा, तत्कालीन पंजाब के 'कालका' नामक स्थान में हुआ था। इनका परिवार जाति से ब्राह्मण था। इनका नाम 'अरुणा गांगुली' था। अरुणा जी ने स्कूली शिक्षा नैनीताल में प्राप्त की थी। नैनीताल में इनके पिता का होटल था। यह बहुत ही कुशाग्र बुद्धि और पढ़ाई लिखाई में बहुत चतुर थीं। बाल्यकाल से ही कक्षा में सर्वोच्च स्थान पाती थीं। बचपन में ही उन्होंने अपनी बुद्धिमत्ता और चतुरता की धाक जमा दी थी। लाहौर और नैनीताल से पढ़ाई पूरी करने के बाद वह शिक्षिका बन गई और कोलकाता के 'गोखले मेमोरियल कॉलेज' में अध्यापन कार्य करने लगीं।

👫 *विवाह*

अरुणा जी ने १९ वर्ष की आयु में सन १९२८ ई. में अपना अंतर्जातीय प्रेम विवाह दिल्ली के सुविख्यात वकील और कांग्रेस के नेता आसफ़ अली से कर लिया। आसफ़ अली अरुणा से आयु में २० वर्ष बड़े थे। उनके पिता इस अंतर्जातीय विवाह के विरुद्ध थे और मुस्लिम युवक आसफ़ अली के साथ अपनी बेटी की शादी किसी भी क़ीमत पर करने को राज़ी नहीं थे। अरुणा जी स्वतंत्र विचारों की और स्वतः निर्णय लेने वाली युवती थीं। उन्होंने माता-पिता के विरोध के बाद भी स्वेच्छा से शादी कर ली। विवाह के बाद वह पति के पास आ गईं, और पति के साथ प्रेमपूर्वक रहने लगीं। इस विवाह ने अरुणा के जीवन की दिशा बदल दी। वे राजनीति में रुचि लेने लगीं। वे राष्ट्रीय आन्दोलन में सम्मिलित हो गईं।

🔷 *राजनीतिक और सामाजिक जीवन*

परतंत्रता में भारत की दुर्दशा और अंग्रेज़ों के अत्याचार देखकर विवाह के उपरांत श्रीमती अरुणा आसफ़ अली स्वतंत्रता-संग्राम में सक्रिय भाग लेने लगीं। उन्होंने महात्मा गांधी और मौलाना अबुल क़लाम आज़ाद की सभाओं में भाग लेना प्रारम्भ कर दिया। वह इन दोनों नेताओं के संपर्क में आईं और उनके साथ कर्मठता, से राजनीति में भाग लेने लगीं, वे फिर लोकनायक जयप्रकाश नारायण, राम मनोहर लोहिया और अच्युत पटवर्द्धन के साथ कांग्रेस 'सोशलिस्ट पार्टी' से संबद्ध हो गईं।


♦ *जेल यात्रा*

अरुणा जी ने १९३०,१९३२ और १९४१ के व्यक्तिगत सत्याग्रह के समय जेल की सज़ाएँ भोगीं। उनके ऊपर जयप्रकाश नारायण, डॉ. राम मनोहर लोहिया, अच्युत पटवर्धन जैसे समाजवादियों के विचारों का अधिक प्रभाव पड़ा। इसी कारण १९४२ ई. के ‘भारत छोड़ो आन्दोलन’ में अरुणा जी ने अंग्रेज़ों की जेल में बन्द होने के बदले भूमिगत रहकर अपने अन्य साथियों के साथ आन्दोलन का नेतृत्व करना उचित समझा। गांधी जी आदि नेताओं की गिरफ्तारी के तुरन्त बाद मुम्बई में विरोध सभा आयोजित करके विदेशी सरकार को खुली चुनौती देने वाली वे प्रमुख महिला थीं। फिर गुप्त रूप से उन कांग्रेसजनों का पथ-प्रदर्शन किया, जो जेल से बाहर रह सके थे। मुम्बई, कोलकाता, दिल्ली आदि में घूम-घूमकर, पर पुलिस की पकड़ से बचकर लोगों में नव जागृति लाने का प्रयत्न किया। लेकिन १९४२ से १९४६ तक देश भर में सक्रिय रहकर भी वे पुलिस की पकड़ में नहीं आईं। १९४६ में जब उनके नाम का वारंट रद्द हुआ, तभी वे प्रकट हुईं। सारी सम्पत्ति जब्त करने पर भी उन्होंने आत्मसमर्पण नहीं किया।


🌐 *कांग्रेस कमेटी की निर्वाचित अध्यक्ष*

दो वर्ष के अंतराल के बाद सन् १९४६ ई. में वह भूमिगत जीवन से बाहर आ गईं। भूमिगत जीवन से बाहर आने के बाद सन् १९४७ ई. में श्रीमती अरुणा आसफ़ अली दिल्ली प्रदेश कांग्रेस कमेटी की अध्यक्षा निर्वाचित की गईं। दिल्ली में कांग्रेस संगठन को इन्होंने सुदृढ़ किया।

       कांग्रेस से सोशलिस्ट पार्टी में

सन १९४८ ई. में श्रीमती अरुणा आसफ़ अली 'सोशलिस्ट पार्टी' में सम्मिलित हुयीं और दो साल बाद सन् १९५० ई. में उन्होंने अलग से ‘लेफ्ट स्पेशलिस्ट पार्टी’ बनाई और वे सक्रिय होकर 'मज़दूर-आंदोलन' में जी जान से जुट गईं। अंत में सन १९५५ ई. में इस पार्टी का 'भारतीय कम्यनिस्ट पार्टी' में विलय हो गया।

श्रीमती अरुणा आसफ़ अली भाकपा की केंद्रीय समिति की सदस्या और ‘ऑल इंडिया ट्रेड यूनियन कांग्रेस’ की उपाध्यक्षा बनाई गई थीं। सन् १९५८ ई. में उन्होंने 'मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी' भी छोड़ दी। सन् १९६४ ई. में पं. जवाहरलाल नेहरू के निधन के पश्चात् वे पुनः 'कांग्रेस पार्टी' से जुड़ीं, किंतु अधिक सक्रिय नहीं रहीं।

⭕ *दिल्ली नगर निगम की प्रथम महापौर*

श्रीमती अरुणा आसफ़ अली सन् १९५८ ई. में 'दिल्ली नगर निगम' की प्रथम महापौर चुनी गईं। मेयर बनकर उन्होंने दिल्ली के विकास, सफाई, और स्वास्थ्य आदि के लिए बहुत अच्छा कार्य किया और नगर निगम की कार्य प्रणाली में भी उन्हों ने यथेष्ट सुधार किए।


🌀 *संगठनों से सम्बंध*

श्रीमती अरुणा आसफ़ अली ‘इंडोसोवियत कल्चरल सोसाइटी’, ‘ऑल इंडिया पीस काउंसिल’, तथा ‘नेशनल फैडरेशन ऑफ इंडियन वूमैन’, आदि संस्थाओं के लिए उन्होंने बड़ी लगन, निष्ठा, ईमानदारी और सक्रियता से कार्य किया। दिल्ली से प्रकाशित वामपंथी अंग्रेज़ी दैनिक समाचार पत्र ‘पेट्रियट’ से वे जीवनपर्यंत कर्मठता से जुड़ी रहीं।


🏆 *सम्मान और पुरस्कार*

श्रीमती अरुणा आसफ़ अली को सन् १९६४ में ‘लेनिन शांति पुरस्कार’, सन् १९९१ में 'जवाहरलाल नेहरू अंतर्राष्ट्रीय सद्भावना पुरस्कार', १९९२ में 'पद्म विभूषण' और ‘इंदिरा गांधी पुरस्कार’ (राष्ट्रीय एकता के लिए) से सम्मानित किया गया था। १९९७ में उन्हें मरणोपरांत भारत के 'सर्वोच्च नागरिक सम्मान' भारत रत्न से सम्मानित किया गया। १९९८ में उन पर एक डाक टिकट जारी किया गया। उनके सम्मान में नई दिल्ली की एक सड़क का नाम उनके नाम पर 'अरुणा आसफ़ अली मार्ग' रखा गया।


👩‍💼 *एक संस्मरण*

अरुणा आसफ़ अली की अपनी विशिष्ट जीवनशैली थी। उम्र के आठवें दशक में भी वह सार्वजनिक परिवहन से सफर करती थीं। कहा जाता है कि एक बार अरुणा जी दिल्ली में यात्रियों से भरी बस में सवार थीं। कोई भी जगह बैठने के लिए ख़ाली न थी। उसी बस में आधुनिक जीवन शैली की एक युवा महिला भी सवार थी। एक व्यक्ति ने युवा महिला के लिए अपनी जगह उसे दे दी और उस युवा महिला ने शिष्टाचार के कारण अपनी सीट अरुणा जी को दे दी। ऐसा करने पर वह व्यक्ति बुरा मान गया और युवा महिला से बोला - 'यह सीट तो मैंने आपके लिए ख़ाली की थी बहन।' इसके उत्तर में अरुणा आसफ़ अली तुरंत बोलीं - 'बेटा! माँ को कभी न भूलना, क्योंकि माँ का अधिकार बहन से पहले होता है।' यह सुनकर वह व्यक्ति बहुत शर्मिंदा हुआ और उसने अरुणा जी से माफ़ी मांगी।


🔘 *निधन*

अरुणा आसफ़ अली वृद्धावस्था में बहुत शांत और गंभीर स्वभाव की हो गई थीं। उनकी आत्मीयता और स्नेह को कभी भुलाया नहीं जा सकता। वास्तव में वे महान् देशभक्त थीं। वयोवृद्ध स्वतंत्रता सेनानी अरुणा आसफ़ अली ८७ वर्ष की आयु में दिनांक २९ जुलाई, सन् १९९६ को इस संसार को छोड़कर सदैव के लिए दूर-बहुत दूर चली गईं। उनकी सुकीर्ति आज भी अमर है।

🇮🇳🇮🇳🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳🇮🇳🇮🇳

*🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏*

➖➖➖➖➖➖➖➖➖

संकलन-)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

एमिल हरमन फिशर रसायन शास्त्रज्ञ

 *⚗️⚗️⚗️एमिल हरमन फिशर⚗️⚗️⚗️*


*🧪🧪🧪रसायनशास्त्रज्ञ🧪🧪🧪*

⚗️🧪⚗️🧪⚗️🧪⚗️🧪⚗️🧪⚗️

*स्मृतिदिन - १५ जुलै १९१९*


जर्मन रसायनशास्त्रज्ञ कृत्रिम साखर आणि प्युरीनवर काम करण्यासाठी प्रख्यात


हर्मन एमिल लुई फिशर 

     ०९ ऑक्टोबर १८५२ 

     १५    जुलै     १९१९

जर्मन रसायनशास्त्रज्ञ (नोबेल पुरस्कार). त्याला फिशर एस्टरिफिकेशन सापडले. विकसित एक लाक्षणिक अर्थाने एसिमेट्रिक कार्बन अणू रेखांकन . त्याने आपले पहिले नाव कधीच वापरलेले नाही, आणि आयुष्यभर ते एमिल फिशर म्हणून ओळखले जात असे.


त्यांनी शॉनबर्ग विद्यापीठातील बॉन आणि केकल विद्यापीठात खरेदीदारांसह अभ्यास केला. 


१९०२ मध्ये त्यांनी रसायनशास्त्र आणि अनेक saccharides, अशा purines आणि polypeptides वर नोबेल पुरस्कार मिळवले. saccharides आणि purines वर कृत्रिम प्रयोग केले. पहिल्या जागतिक युद्धामध्ये,त्याने दोन पुत्र गमावले,परंतु ते संसाधन आणि अन्नाची समस्या सोडविण्यात सक्रिय होते आणि युद्धानंतरच्या पुनर्रचनेत प्रयत्न केले.बर्लिनमधील त्यांच्या प्रयोगशाळेत त्यांनी अभ्यास केला. त्यांचा मोठा मुलगा हरमन एक अग्रगण्य सेंद्रीय केमिस्ट म्हणून सक्रिय होता.

*🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏*

संकलन -)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

प्रभात दर्शन

 🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

अषाढ़ मास,शुक्ल पक्ष, *पँचमी*,उ.फा.नक्षत्र,सूर्य उत्तरायण,ग्रीष्म ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

गुरुवार, १५ जुलै २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                        *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

        *"यदि हर कोई आप से प्रसन्न है, तो ये निश्चित है कि आपने जीवन में बहुत से समझौते किये हैं...। और यदि आप सबसे प्रसन्न हैं, तो ये निश्चित है कि आपने लोगों की बहुत सी त्रुटियों को अनदेखा किया है।"*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

प्रभात दर्शन

 🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

अषाढ़ मास,शुक्ल पक्ष, *चतुर्थी*,पू.फा.नक्षत्र,सूर्य उत्तरायण,ग्रीष्म ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

बुधवार, १४ जुलै २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                        *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


कोऽतिभारः समर्थानां, 

            किं दूरं व्यवसायिनाम्। 

को विदेशः सुविद्यानां, 

            कः परः प्रियवादिनाम्।।"


*भावार्थः- समर्थ व्यक्ति के लिए कोई कार्य कठिन नहीं है, व्यवसायी के लिए कोई स्थान दूर नहीं है, विद्वान के लिए कोई देश विदेश नहीं है, प्रियवादी के लिए कोई व्यक्ति पराया नहीं है।*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

जन संग्राम बातमी गजानन गोपेवाड यांची


 

गुरुवार, १५ जुलै, २०२१

विवीध फुलांचा अभ्यास


 


गजानन गोपेवाड बातमी

 *जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक मराठी शाळा मुडाणा राबवितेय नाविन्यपूर्ण उपक्रम*

°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°

मुडाणा  प्रतिनिधी 

सुरेश कड



______________________*जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक मराठी शाळा मुडाणा राबवितेय नाविन्यपूर्ण उपक्रम*

°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°

मुडाणा  प्रतिनिधी 

सुरेश कड



______________________

सविस्तर बातमी वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

👇👇👇👇👇👇👇👇 https://www.patrakarshakti.com/07/2021/news-post/16331

सविस्तर बातमी वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

👇👇👇👇👇👇👇👇 https://www.patrakarshakti.com/07/2021/news-post/16331

लोकसत्ता बातमी गजानन गोपेवाड

 




बुधवार, १४ जुलै, २०२१

लोकसत्ता संघर्ष गजानन गोपेवाड यांची बातमी

 जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक मराठी शाळा मुडाणा राबवितेय नाविन्यपूर्ण उपक्रम https://loksattasangharsh.com/?p=1149


गोपाल गणेश आगकर

 *✒️🗒️🗞️गोपाळ गणेश आगरकर*

*(जन्म : टेंभू-सातारा, १४ जुलै १८५६; मृत्यू : १७ जून १८९५)*

         हे महाराष्ट्रातील थोर समाज सुधारक होते.आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासात सामाजिक जागृतीत गो.ग.आगरकर यांचे योगदान मोलाचे आहे.त्यांनी समाज प्रबोधन करण्यासाठी सुधारक, केसरी,मराठा या वृत्तपत्रांचा आधार घेतला.सामाजिक समता,स्त्री-पुरुष समानता आणि विज्ञान‌- निष्ठा‌ ही त्यांची जीवनमूल्ये होती.मुलींनासुद्धा शिक्षण मिळायला पाहिजे असा लेख त्यांनी सुधारक या वृत्तपत्रात लिहिला.असा लेख लिहिण्याचे धारिष्ट्य त्यापूर्वी कोणाचे नव्हते. बुद्धिप्रामाण्य वादाचे पुरस्कार करून महाराष्ट्रामध्ये समाज सुधारणा घडून आणणे या उद्देशाने समाजसुधारणा करणाऱ्या समाजसुधारकांमध्ये गोपाळ गणेश आगरकर यांचे नाव प्राधान्याने घ्यावी लागते महाराष्ट्रातील समाज सुधारकांच्या मांदियाळीतील क्रांतीकारी समाजसुधारक म्हणून गोपाळ गणेश आगरकर हे महत्त्वपूर्ण ठरतात.


गोपाळ गणेश आगरकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आचार्य अत्रे यांनी पुण्यात इ.स. १९३४साली आगरकर हायस्कूल ही मुलींची शाळा स्थापन केली.


*आरंभीचा काळ*

आगरकरांचा जन्म सातारा जिल्ह्यातील टेंभू या खेड्यात,एका गरीब देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण कुटुंबात झाला.घरच्या गरिबीमुळे शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी त्यांना अनेक मार्ग चोखाळावे लागले.कधी मामलेदार कचेरीत उमेदवारी करून, कधी माधुकरी मागून तर कधी कंपाउंडरचे काम करून त्यांनी आपले मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षणासाठी ते कर्‍हाड, अकोला, रत्नागिरी येथे गेले. १८७५ साली ते मॅट्रिक झाले व महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी पुण्याला आले. पुण्यात त्यांनी डेक्कन कॉलेजला प्रवेश घेतला.वर्तमानपत्रात लिखाण करणे,वक्तृत्व स्पर्धा,निबंध स्पर्धा यांत भाग घेऊन बक्षिसे जिंकणे,शिष्यवृत्ती मिळवणे अशा प्रकारे त्यांची गुजराण चालत असे. गोपाळ गणेश आगरकर व लोकमान्य टिळक यांची ओळख १८७९मध्ये एम. ए. करतांना झाली. त्यांनी एकत्रच शिक्षण घेतले होते. त्यांनीच त्यावेळेस केसरी वृत्तपत्र सुरु करायचे ठरवले होते.त्यात लोकमान्य टिळक,गोपाळ गणेश आगरकर,व विष्णुशास्त्री चिपळूणकर या तिघांचा पुढाकार होता.



*कारकीर्द*

आगरकर हे बाळ गंगाधर टिळकांनी सुरू केलेल्या केसरी वृत्तपत्राचे पहिले संपादक (१८८०-१८८१) होते.


पुण्यात महाविद्यालयीन शिक्षण घेत असतांना ते व लोकमान्य टिळक एकत्र आले. तोपर्यंत स्वदेशसेवेची प्रेरणा दोघांच्याही मनात जागी झाली होती. दिनांक १ जानेवारी, १८८० रोजी विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी ‘न्यू इंग्लिश स्कूल’ ची स्थापना केली. आगरकर १८८१ मध्ये एम. ए. झाल्यावर चिपळूणकरांना जाऊन मिळाले. आगरकर व टिळक यांनी १८८१ मध्ये इंग्रजीतून ‘मराठा’, तर मराठीतून ‘केसरी’ अशी दोन वृत्तपत्रे चालू केली. केसरीचे संपादकत्व आगरकरांनी स्वीकारले.


पुढे लोकमान्य टिळक व आगरकर यांनी २४ ऑक्टोबर १८८४ ला डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली व त्या अंतर्गत १८८५ साली फर्ग्युसन कॉलेजची स्थापना झाली. आगरकर याच कॉलेजात शिकवू लागले, पुढे ते फर्ग्युसनचे प्राचार्यही झाले


*उल्लेखनीय कार्य*

१८८४ साली बाळ गंगाधर टिळक, विष्णुशास्त्री चिपळूणकर आणि आगरकरांनी पुण्यात ‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी’ स्थापली.१८८८ साली त्यांनी ‘सुधारक’ हे वृत्तपत्र सुरू केले.


गोपाळ गणेश आगरकर हे, भौतिकता – ऐहिकता, बुद्धिप्रामाण्य, व्यक्तिस्वातंत्र्य या आधुनिक तत्त्वांना प्रमाण मानून जिवाच्या कराराने समाज सुधारणांचा पाठपुरावा करणारे समाजप्रबोधक होते. महाराष्ट्रातील समाज परिवर्तनाच्या प्रक्रियेला विवेकाचे, बुद्धिप्रामाण्याचे व व्यक्तिस्वातंत्र्याचे अधिष्ठान देऊन,परिवर्तनाचे विज्ञाननिष्ठ तत्त्वज्ञान निर्माण करण्याचे श्रेय गोपाळ आगरकरांकडे जाते.



राजकीय स्वातंत्र्याआधी समाजसुधारणा महत्त्वाची आहे. बालविवाह, अस्पृश्यता यांसारख्या समाजातील अनिष्ट रूढी आधी नष्ट केल्या पाहिजेत अशा विचारांचे ते होते. समाजसुधारणा विरुद्ध राजकीय स्वातंत्र्य याच वादातून १८८७ च्या ऑक्टोबरमध्ये त्यांनी केसरीचे संपादकत्व सोडले. १८८८ साली त्यांनी ‘सुधारक (वृत्तपत्र)’ हे वृत्तपत्र सुरू केले. व्यक्तिस्वातंत्र्य, बुद्धिवाद, भौतिकता या मूल्यांचा प्रचार त्यांनी सुधारकमधून केला, तसेच जातिव्यवस्था, चातुर्वर्ण्य, बालविवाह, ग्रंथप्रामाण्य- धर्मप्रामाण्य, केशवपन इत्यादी अन्यायकारक परंपरांना त्यांनी विरोध केला. अंधश्रद्धा, पाखंडीपणा यांच्यावर प्रहार केले. सुधारक हे इंग्रजी व मराठी या दोन्ही भाषांतून प्रकाशित केले जात होते. इंग्रजी सुधारकची जबाबदारी काही काळ नामदार गोखले यांनी सांभाळली होती.



आगरकर व्यक्तिवादाचे पुरस्कर्ते होते. बुद्धीला जी गोष्ट पटेल ती बोलणे व शक्य तितकी आचरणात आणणे, मग त्याला इतरत्र पूज्य ग्रंथात वा लोकरूढीत आधार असो वा नसो, हे आगरकरांचे महत्त्वाचे तत्त्व होते. स्त्रियांच्या अगदी पेहेरावाविषयीही त्यांनी आधुनिक विचार समाजासमोर मांडले होते. राजकीय व सामाजिक बाबतीत समता, संमती व स्वातंत्र्य हे घटक महत्त्वाचे आहेत; मनुष्यकृत विषमता शक्य तितकी कमी असावी; सर्वांस सारखे, निदान होईल तितके सारखे सुख मिळण्याची व्यवस्था होत जाणे म्हणजे सुधारक होत जाणे – अशी त्यांची सुटसुटीत विचारसरणी होती. ‘विचारकलह हा समाजस्वास्थ्याला आवश्यक आहे,’ असे त्यांचे मत होते. त्यांच्या या विचारसरणीमुळे त्यांना टोकाचा विरोध झाला. सनातनी लोकांनी त्यांच्या जिवंतपणीच त्यांची प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढली होती. पण तरीही निग्रहाने आणि निश्चयाने त्यांनी आपल्या विचारांचा पाठपुरावा केला.


वयाच्या अवघ्या एकोणचाळीसाव्या वर्षी त्यांचे निधन झाले


*पत्रकारिता*

१८८१ मध्ये ‘केसरी’ हे वृत्तपत्र सुरू केले. याचे प्रथम संपादक म्हणून आगरकरांनी १८८८ पर्यंत काम केले. आगरकर हे बुद्धिवादी होते. त्यांनी प्रारंभीच्या काळात जनतेच्या विचार परिवर्तनाविषयक लिखाणांवर भर दिला. समाज सुधारणांच्या मूलगामी विचारांतून सामाजिक सुधारणा वेग धरू शकतील याबाबत त्यांनी जागरूकतेने सामाजिक सुधारणांवर आग्रही राहून ‘केसरी’त लिखाण केले. त्याचबरोबर राजकीय स्वातंत्र्याचाही पुरस्कार केला. आगरकरांचा सडेतोडपणा, वैविध्य यामुळे ‘केसरी’ची लोकप्रियता वाढली खरी; परंतु पुढे टिळक व आगरकरांत वैचारिक मतभेद वाढत गेल्यामुळे १८९० पासुन ‘केसरी’चे काम लोकमान्य टिळक पाहू लागले.


आगरकरांनी पुण्यातच सुधारक वृत्तपत्र सुरू केले.सुधारक मधून आगरकरांनी व्यक्तिस्वातंत्र्य, अनिष्ट धार्मिक रूढींचा निषेध, शिक्षणाचे महत्त्व इ. मुद्यांचा प्रसार केला.तत्कालीन समाजाच्या विरोधात जाताना आगरकरांना प्रचंड मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागला.

=========================

*🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏*

संकलन -)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

प्रभात दर्शन

 🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

अषाढ़ मास,शुक्ल पक्ष, *चतुर्थी*,पू.फा.नक्षत्र,सूर्य उत्तरायण,ग्रीष्म ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

बुधवार, १४ जुलै २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                        *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


कोऽतिभारः समर्थानां, 

            किं दूरं व्यवसायिनाम्। 

को विदेशः सुविद्यानां, 

            कः परः प्रियवादिनाम्।।"


*भावार्थः- समर्थ व्यक्ति के लिए कोई कार्य कठिन नहीं है, व्यवसायी के लिए कोई स्थान दूर नहीं है, विद्वान के लिए कोई देश विदेश नहीं है, प्रियवादी के लिए कोई व्यक्ति पराया नहीं है।*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

मंगळवार, १३ जुलै, २०२१

बातमी

 *🔰अग्निपंख शैक्षणिक समुहातर्फे होळी साधेपणाने साजरी करण्याचे आवाहन*


         👇

 *◼️यवतमाळ ll* https://chandrapursaptarang.in/news/13368

एक आठवण शिवरायांची

 *🚩एक आठवण शिवरायांची🚩*

********************************

     *१३ जुलै इ.स.१६६०*

*बाजीप्रभू देशपांडे बलिदान दिन*

********************************


स्मृतिदिन - १३ जुलै १६६०


पावनखिंड ! लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे !


किल्ले पन्हाळगड १२ जुलै १६६०, आषाढ पौर्णिमा. गुरुवार रात्री १० वाजायच्या आसपास ठरल्याप्रमाणे शिवाजी महाराजांच्या संगे हिरडस मावळांतील सहाशे मावळे आणि सोबत बाजीप्रभू आणि फुलाजीप्रभू देशपांडे ठरलेल्या मार्गाने सिद्दी जौहरच्या वेढ्यातून निसटण्यासाठी पन्हाळ्याहून हेरांनी शोधलेल्या मार्गाने निघाले. अंधारलेल्या मार्गाने हेर पुढे आणि त्या मागोमाग सर्व.सोबत एक पालखी होतीच.


ऐन वेढ्यात शिरताच सर्वाँचेच काळीज धडधडू लागले. वेढ्याची हद्द संपली अन पालखी झपाट्याने पुढे पुढे धावत होती.


अन् घात झाला ! जौहरच्या हेरांनी पाहिलेच !


पण मावळ्यांनी राजांची पालखी जोरात पळवायला सुरवात केली. काही अतंर पळाल्यावर मावळे थांबले. रिकामी पालखी पुढे आली. महाराजांप्रमाणेच पोशाख केलेला एक मावळा पुढे आला. त्या मर्द मावळ्याचे नाव 'शिवा काशिद' हा जातीने न्हावी होता.


नवी पालखी सरळ मार्गाने विशाळगडाकडे निघाली आणि खुद्द शिवाजी महाराजांची पालखी निवडक मावळ्यांसह आडरानात घूसली.


"शिवाजी भाग गया" ही बातमी सिद्दी जौहरच्या छावणीत धडकली. अन राजांचा पाठलाग सूरु झाला. विशालगडाकडे मसूदची फौज निघाली. बराच पाठलाग केल्यावर पंधरा वीस मावळे एक पालखी पळवीत असताना दिसले. पालखी अडवली गेली. पालखीत शिवाजीराजे सापडले.


मसूदला आनंद झाला. मसूद आनंदाने पालखीसह जौहरच्या छावणीत पोहोचला. पालखीतून राजे उतरले. जौहर निरखून राजांना पाहू लागला. अन् त्याची खात्री झाली, हा शिवाजी नाही.


राजांची चौकशी केल्यावर कळलं हा शिवाजी महाराजांसारखाच दिसणारा दुसराच 'शिवा' नावाचा न्हावी आहे.


चिडून संतापून मसूद पुन्हा राजांच्या पाठलागावर निघाला. एवढ्या वेळात महाराज बरेच दूर गेले होते. पहाट झाली होती.


आषाढ वद्य प्रतिपदा उगवली. दि. १३ जुलै १६६०. अजून पाच कोस जायचे होते. मावळे पालखी पळवायची शिकस्त करत होतेच. मावळे, बाजीप्रभू आणि महाराज गजापूरच्या खिंडीत पोहचले. आणि आलाच मसूद. आता क्षणभरही थांबणे घातक होते.


बाजींनी राजांना कळवळून विनविले, "तुम्ही थांबू नका. गनीम जवळ येतोय. मी इथे खिंडीत थांबतो. एकालाही खिंड चढू देणार नाही. तुम्ही जा ! गडावर जाताच तोफांचे आवाज करा ! तोंपावेतो गनिमाला येऊ देत नाही !"


'लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे' हि म्हण बहुधा तेव्हाच बनली असावी. निम्मे मावळे घेऊन राजे विशाळगडाकडे निघाले. खिंडीत बाजींसोबत मावळ्यांनी मसूदच्या फौजेला रोखले.


पन्हाळ्याहून निघून सात प्रहर म्हणजे २१ तास झाले होते. बाजींनी शौर्याने खिंड लढवित ठेवली. महाराजांनी विशाळगडाखालील जसवंत सिंह आणि सुर्यराव यांचा प्रतिकार मोडीत विशाळगडावर धाव घेतली.


घोडखिंडीत बाजीप्रभू , फूलाजीप्रभू आणि मावळे तोफांच्या आवाजाची वाट पाहत होते. एवढ्यात...


तोफांचा आवाज कडाडला. तीन तोफांचे आवाज झाले. एवढ्यांत घात झाला. बाजींवर शत्रूचा घाव पडला. घळकन् रक्ताचा लोंढा फुटला. बाजींची मुर्ती कोसळली


गजापूरची खिंड पावन झाली ! पावनखिंड !!


फुलाजी प्रभू आणि बाजी प्रभूंना । 

तसा चित्तीं ध्यातो शिवा काशिदांना ॥

*🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏*

********************************

संकलन-)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६


प्रभात दर्शन

 🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

अषाढ़ मास,शुक्ल पक्ष, *तृतीय*,मघा नक्षत्र,सूर्य उत्तरायण,ग्रीष्म ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

मंगलवार, १३ जुलै २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                       *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


दानं पूजा तपश्र्चौव 

              तीर्थसेवा श्रुतं तथा,

सर्वमेव वृथा तस्य 

              यस्य शुध्दं न मानसम्।।


*भावार्थः- यदि व्यक्ति का मन शुद्ध नही है, तो दान, पूजा, तपस्या, तीर्थ, सेवा, कथा सुनना, सब व्यर्थ है।।*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

सोमवार, १२ जुलै, २०२१

औषध जेवना आधी घ्यावी की जेवणानंतर

 संकलन:) गजानन गोपेवाड 


══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════

 *औषधे जेवणापूर्वी घ्यावी की जेवणानंतर ?*


जेवल्यानंतरच औषधे घ्यावी, असा एक समज समाजात आढळून येतो. गोळ्या गरम पडतात, उष्ण असतात आणि त्यामुळे त्यांचे दुष्परिणाम टाळण्यासाठी जेवण करून मगच औषध घ्यावे; असेही काही जणांना वाटत असते. औषधे केव्हा घेणे जास्त योग्य ते आता पाहू. एक मात्र नक्की की आजारी पडल्याखेरीज औषधे कधीही घेऊ नयेत! कारण आजकाल काही लोक स्वतःच स्वतःचे डॉक्टर बनतात आणि टिव्हीवरच्या जाहिराती पाहून तापाच्या स्मरणशक्ती वाढवण्याच्या किंवा शक्ती वाढवण्याच्या गोळ्या घेतात. अर्थात याचे दुष्परिणाम त्यांना भोगावे लागतात.


काही औषधे उपाशीपोटी म्हणजे जेवणाच्या तासभर अगोदर घेतली, तर त्याचे रक्तात शोषण चांगले होते आणि त्यांचा परिणामही चांग घडून येतो. अशा औषधांमध्ये पेनिसिलीन, अॅम्पीसिलीन, रिफॅम्पीसीन, टेट्रासायक्लीन या जंतूनाशकांचा समावेश होतो. टेट्रासायक्लीन घेण्यापूर्वी किंवा घेतल्यानंतर तासभर तरी दूध पिऊ नये. अॅस्पीरिन, लोहयुक्त गोळ्या-औषधे, जीवनसत्त्वे, एरिथ्रोमायसीन, पॅराअमायनो सॅलीसिलीक अॅसीड आदी औषधे मात्र जेवणानंतर किंवा जेवताना घ्यावीत. औषधांमुळे जठराच्या आवरणावर दाह निर्माण होऊन आम्लनिर्मिती वाढते. त्यामुळे मळमळ, उलट्या आदी त्रास होण्याची शक्यता असते. जेल्यूसीलसारख्या गोळ्या पोट रिकामे असताना घेतल्यास त्यांचा चांगला परिणाम दिसून येतो.


औषधांबाबत एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी. प्रत्येक औषध प्रत्येक माणसाप्रमाणेच वेगळे असते. त्यामुळे ते केव्हा, कसे घ्यायचे याची डॉक्टरांकडून माहिती घ्यावी आणि मगच त्यांचा उपयोग करावा. कारण एक लक्षात ठेवा की, औषध आणि विष यांच्यात फक्त देणाऱ्याच्या हेतूचाच फरक असतो!


*डॉ. जगन्नाथ दीक्षित*

*डाॅ. अंजली दीक्षित*

यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज'या पुस्तकातून


स्त्रोत- विज्ञान व दिनविशेष फेसबुक पेज

═══════════════════════

एनिमा म्हणजे काय


══════════════════════

   *📒📒📒 @ संकलन @📒📒📒*

  गजानन गोपेवाड 

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════

📕 *'एनिमा म्हणजे काय ?* 


शौचास होत नसेल, तर कधी रुग्णास शस्त्रक्रियेपूर्वी पोट साफ होण्यासाठी गुदद्वाराच्या मार्गाने काही औषधी मोठ्या आतड्यात सोडतात, यास 'एनिमा' असे म्हणतात. जेवणात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश नसल्यास व आहार समतोल नसल्यास बद्धकोष्ठाचा त्रास होतो. कधी कधी मळाचे खडेही तयार होतात. लहान मुलांना संडास होत नसेल, तर कागदाची पुंगळी करून त्याला सावण लावून ती गुदद्वारात सारल्यास संडास होते किंवा गोडेतेल सोडल्यासही मळाचे खडे सुटतात व न दुखता संडास होते. संडास होत नसल्यास पोटातून औषध घेण्यापेक्षा गुदद्वारातून उपचार करणे सोयीचे ठरते. 


एनिमामध्ये पाव लिटर, अर्धा लिटर साबणाचे पाणी रबरी नळीच्या साहाय्याने व्यक्तीच्या गुदद्वारातून आत सोडतात. नंतर मळाचे खडे सुटून संडास होते. विष्ठा गोळा करण्यासाठी भांड्याची सोयसुद्धा असते. आयुर्वेद चिकित्सापद्धतीमध्ये गुदद्वारावाटे औषधी प्रविष्ट करून चिकित्सा केली जाते. हथा चिकित्सेस बस्ती चिकित्सा म्हणतात. मळास बाहेर काढणे याशिवाय इतर अनेक व्याधींची चिकित्सा, औषधी काढे व तेल गुदद्वारावाटे देऊन केली जाते. एनिमाचा वापर वारंवार करण्यापेक्षा आहारात योग्य ते बदल घडवून आणणेच आरोग्यपूर्ण जीवनाच्या दृष्टीने चांगले.


*डॉ. जगन्नाथ दीक्षित*

*डाॅ. अंजली दीक्षित*

यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज'या पुस्तकातून


स्त्रोत- विज्ञान व दिनविशेष फेसबुक पेज

═══════════════════════

  

सुक्ष्म दर्शक यंत्र कसे कार्य करते


══════════════════════

   *📒📒📒 @ संकलन @📒📒📒*

गजानन गोपेवाड 

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════

🔬 *सूक्ष्मदर्शक यंत्र कसे कार्य करते ?* 🔬 


जीवशास्त्राचे प्रयोग दाखवताना तुम्हाला सरांनी सूक्ष्मदर्शक यंत्र दाखवले असेलच. सूक्ष्मदर्शक यंत्रातून पहिल्यावर पेशी किंवा इतर सूक्ष्म जीव कित्येक पटीने मोठे असलेले आपल्याला दिसतात. हे कसे होते ते आता पाहू. साधे काचेचे भिंग घ्या. त्या भिंगातून वर्तमानपत्रातील अक्षरांकडे पाहा. अक्षरे मोठी झालेली दिसतात. सूक्ष्मदर्शक यंत्र याच तत्त्वावर काम करते. सूक्ष्मदर्शक यंत्रांमध्ये भिंगे अशा प्रकारे बसवलेली असतात की त्यांच्या एकत्रित परिणामांमुळे आपल्याला वस्तू हजारो पट मोठ्या दिसतात.

पेशी, सूक्ष्म जीवजंतू आपल्याला नुसत्या डोळ्यांनी दिसू शकत नाहीत. कारण त्यांचे मोजमाप १ मी.मी. च्या हजाराव्या भागाच्या प्रमाणात केले जाते. विषाणू तर याहूनही लहान असतात. त्यामुळे हजारो पट मोठे केल्यानंतरच हे जीव वा पेशी आपल्याला दिसू शकतात. पेशी व सूक्ष्म जीवजंतुच्या परीक्षणामुळे रोगाची अवस्था समजते आणि व्यक्ती रोगी आहे का ते कळते. रोग बरा होतो आहे काय तेही समजते. क्षयरोग, हिवताप, कुष्ठरोग, कॉलरा, हगवण आदी रोगांमध्ये तसेच रक्तक्षय, रक्ताचा कर्करोग, इतर कर्करोग यातदेखील सूक्ष्मदर्शकद्वारे केलेल्या तपासणीमुळे रोगाचे निदान होते व उपचार करण्यास मदत होते.


असे हे सूक्ष्मदर्शक यंत्र म्हणजे सूक्ष्म जीवांच्या अजब गुहेत प्रवेश करण्यासाठी मानवाला लाभलेला जादूचा दिवाच बनले आहे.


*डॉ. जगन्नाथ दीक्षित*

*डाॅ. अंजली दीक्षित*

यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज'या पुस्तकातून


स्त्रोत- विज्ञान व दिनविशेष फेसबुक पेज

═══════════════════════

Featured Post

व्यायाम व योगा अवश्य करावा*

*व्यायाम व योगा अवश्य करावा*  *व्यायाम व योगा करण्याचे दहा फायदे:-*  1) व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते: व्यायाम करणारी...