मंगळवार, ६ एप्रिल, २०२१

लोकर कापड

 *_आजची माहिती_*


📙 *_लोकर_* 📙

*************


_थंडीची चाहूल लागली की लोकरीची आठवण होतेच. उबदार वस्तू, कपडे, पांघरुणे, मोजे, टोप्या या लोकरीच्या बनवल्या जातात. लोकरीचे कपडे महाग असतात पण नीट वापरले, तर टिकाऊ असतात. हल्ली पर्यायी प्रकार म्हणून कृत्रिम लोकर बाजारात आहे. आॅरलाॅन या कुत्रिम धाग्यांचा वापर त्यात असतो. पण खरी लोकर व तिची उब ही वेगळीच._

     _लोकर ही मुख्यतः मेंढ्यांपासून मिळवली जाते. काही अन्य प्राण्यांची लोकरही जगात वापरतात, पण ते प्राणी व त्यांची लोकर केवळ त्याच भागात वापरली जाते. लामा, याक ही त्यांची काही उदाहरणे. लोकर म्हणजे एक प्रकारचा केसासारखाच धागा असतो. पण हा धागा मुळापासून काढल्यानंतरही म्हणजे मृत झाल्यावरही स्थितिस्थापकत्व राखू शकतो. हवेतील आर्द्रता, पाणी, शरीरातील घाम यांना शोषून घेणे व गरजेप्रमाणे पुन्हा आपोआप कोरडे होणे हा लोकरीचा प्रमुख गुण. त्यामुळेच पावसाची भुरभुर असताना लोकरीचा स्वेटर अंगात असेल, तर वेळ निभावून जाते व स्वेटर आपोआप वाळत जातो. दुसरा लोकरीचा प्रमुख गुण म्हणजे मूळ आकार पुन्हा मिळवणे. त्यामुळे ताणली, दाबली, चुरगाळली, तरी लवकर शक्यतो मूळ आकार घेते. घाण, धूळ, माती, तेलकटपणा यांपासूनही लोकरीचे कपडे झटकन सोप्या रीतीने स्वच्छ होऊ शकतात. या सर्व गुणांमुळेच लोकर आजही स्वतःची मागणी टिकवून आहे. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड येथील मरीनो जातीच्या मेंढ्या आणि दक्षिण आफ्रिका व अर्जेंटिना येथील मेंढ्या ही जगातल्या लोकर पैदाशीची प्रमुख साधने. पश्मीना जातीच्या मेंढ्या ही याला उपयुक्त असतात. त्यांचा धागा खूप लांब, चिवट व पाहिजे त्या जाडीचा काढता येतो. मेंढीची लोकर यांत्रिक कात्रीने कापून पाण्यात भिजवून मग वाळवतात. एका मेंढीची लोकर शक्यतो सलग एकाच गठ्ठ्याप्रमाणे काढली जाते. हिवाळ्यानंतर हा प्रकार करतात म्हणजे पुढच्या हिवाळ्यापर्यंत मेंढी पुन्हा स्वतःचे संरक्षण करू शकते._

     _कापलेली लोक कार्डिंग मशिनवर कातून तिचे जाड दोर वळले जातात. त्यांना रंग देऊन व त्यांच्यावर प्रक्रिया करून मग योग्य तो ताण देत, पीळ देत त्यापासून लोकरीचे गुंडे बनवले जातात. कापड विणायचे असले, तर लोकरीबरोबर थोडाफार सुताचा वापरही केला जातो. लोकरीला दिलेला रंग पक्का असतो व त्यामुळे तिला चकाकी येते. लोकरीचा कपडा अंगावर घातला की, तिच्यातील धाग्यांमध्ये अडकून राहिलेली हवा हीच मुळी मुख्यत: आपल्या शरीरावरील ऊब व बाह्य गारवा यांमध्ये इन्सुलेशनप्रमाणे काम करते. त्यामुळे निर्माण झालेली ऊब टिकून राहते. चहाच्या किटलीवर टिकोझी (Tea-Cozy) यासाठीच घालतात. लोकरीच्या कपड्यांना ते टोचू नयेत म्हणून आतून मऊ अस्तर लावण्याची ही पद्धत आहे._

     _लोकरीचे कपडे वापरण्याचा काळ हा वर्षांतील थंडीचा काळ एवढाच असतो. अन्य वेळी ते ठेवून दिले जातात. लोकर खाणारे एक प्रकारचे किडे हे कपडे कुरतडतात. त्यामुळे हे कपडे ठेवताना नेहमीच कीटकनाशक औषधांचा वापर आवश्यक ठरतो. अन्यथा हवाबंद कपाटात कपडे ठेवावे लागतात. या प्रकारच्या किड्यांना कसर जातीचे किडे म्हणतात. चकचकीत, लहान, झपाट्याने हालचाल करणारे हे किडे खास करून लोकरीवरच वाढतात. लोकरीचे स्वेटर, शाली हाताने विणणे हे काम जगभराच्या स्त्रिया कलाकुसरीने व आवडीने करत आल्या आहेत. या क्षेत्रात आता यांत्रिक पद्धतीने जरी काम होत असले, तरीही आवडीच्या व्यक्तीने विणलेला स्वेटर जास्त आवडीने वापरला जातो, याला यानंतरही बाधा येईलसे वाटत नाही._

*~~~~~~~~~~~~~~~~~~*

*_संकलन : गजानन गोपेवाड_*

*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*

*_सृष्टी विज्ञानगाथा विज्ञान व दिनविशेष मधून_*

19 मार्च मेक्सिकन रसायन शास्त्रज्ञ

 *_🎧आजचे शास्त्रज्ञ 🎧_*


*_📒मारियो जे. मोलिना 📒_*


*_मेक्सिकन रसायन शास्त्रज्ञ_*


*_जन्म: १९ मार्च १९४३_*

*******************


_मारियो जे. मोलिना (स्पॅनिश: Mario José Molina-Pasquel Henríquez; जन्म: १९ मार्च १९४३) हा एक मेक्सिकन रसायनशास्त्रज्ञ आहे. पृथ्वीच्या वातावरणामधील अंटार्क्टिकावर पडलेले मोठे छिद्र शोधुन काढण्यासाठी त्याला पॉल जे. क्रुट्झन व फ्रँक शेरवूड रोलंड ह्या शास्त्रज्ञांच्या समवेत १९९५ सालचे रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले. नोबेल पारितोषिक मिळवणारा तो पहिला मेक्सिकन व्यक्ती आहे._

*~~~~~~~~~~~~~~~~~~*

*_संकलन : गजानन गोपेवाड _*

*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*

*_सृष्टी विज्ञानगाथा विज्ञान व दिनविशेष मधून_*

डिप्रेशन आणि औषधे

 🧠  *_मनोवेध_*  🧠

       

🎯 *_‘डिप्रेशन’ आणि औषधे_*

*************************

_मनासारखे झाले नाही की उदास वाटणे, दु:ख होणे नैसर्गिक आहे. पण दु:ख होणे आणि ‘डिप्रेशन’ हा आजार यांमध्ये फरक आहे. शरीरातील रसायनांत बदल झाल्याने रक्तदाब वाढतो, तसेच मेंदूतील रसायने बदलल्याने ‘डिप्रेशन’ होते. याची तीव्र अवस्था असेल तर त्या वेळी कोणतेच मानसोपचार फारसे उपयुक्त ठरत नाहीत. अशा वेळी मनोविकारतज्ज्ञांकडून औषधे घेणे गरजेचे असते. ‘मेजर डिप्रेशन’मध्ये उदासीसोबत थकवा आणि निष्क्रियता असते. कोणतीही हालचाल करू नये असे वाटते, पण झोपूनही चैन पडत नाही. सारखे रडू येते, एकटेपणा आणि निराशेचे विचार मनात काहूर माजवत असतात. काहीजणांना भीतीदायक दृश्ये दिसतात. प्रकाश चांगला असला तरी समोरील वस्तू मंद प्रकाश असल्यासारख्या गढूळ दिसतात. मनात येणाऱ्या विचारांचा आवर्त तीव्र असल्याने त्यांच्यापासून अलग होता येत नाही. या साऱ्या त्रासापासून पळून जावे असे वाटते आणि त्यामुळेच आत्महत्या घडतात._

     _अशा वेळी त्या माणसाला कोणताही उपदेश नको वाटतो. शारीरिक हालचाली केल्यानंतर बरे वाटते, हे माहीत असूनदेखील प्रचंड थकवा वाटत असल्याने तेही शक्य होत नाही. याकडे वेळीच लक्ष दिले नाही, तर आजार वाढत जातो. ‘थायरॉइड हार्मोन्स’ कमी-जास्त झाल्याने जसा त्रास होतो, तसाच मेंदूतील ‘सेरोटोनिन’ रसायन कमी झाल्याने ‘मेजर डिप्रेशन’ हा आजार होतो. कोणत्याही शारीरिक आजाराची माणसाला लाज वाटत नाही, ते लपवून ठेवले जात नाहीत. खरे म्हणजे, ‘डिप्रेशन’ हा तसाच आजार आहे. पित्त वाढले की उलटय़ा होतात, तसे ‘सेरोटोनिन’ कमी झाले की सारखे रडू येते. पण असे रडू येणे दुर्बलता समजली जाते. ‘उलटय़ा करू नको’ असा उपदेश केला जात नाही, पण ‘सारखे रडत राहू नकोस’ असा उपदेश केला जातो._

     _समाजात याविषयी जागृती करणे खूप आवश्यक आहे. या आजारावरील नवीन औषधे खूप परिणामकारक आहेत. ती सुरू केली की महिनाभरात फरक दिसू लागतो. जग पुन्हा सुंदर आणि स्वच्छ दिसू लागते. त्यामुळे या आजारात औषधांची भीती न बाळगता ती घ्यायला हवीत. औषधांनी आत्मभान वाढले की त्यानंतर मानसोपचार उपयोगी ठरतात. या आजारात लाजण्यासारखे काहीही नाही. तो नाकारल्याने वा लपवून ठेवल्याने बरा होत नाही, तर योग्य उपचारांनी बरा होतो._

*~~~~~~~~~~~~~~~~~~*

*_संकलन : गजानन गोपेवाड_*

*~~~~~~~~~~~~~~~~~~*

 *_📡 जय विज्ञान 🔬_*

*_दैनिक लोकसत्ता,दिनांक-०३ जुलै-२०२०_*

गणिती वर्गीकरण

 *_🔭मराठी विज्ञान परिषदेचे🔬_*

           🤔 *_कुतूहल_* 🤔


🎯 *_गणिताचे वर्गीकरण_*

*********************

_गणिताचे सहसा शुद्ध आणि उपयोजित गणित असे दोन भाग केले जातात. अमूर्त आणि लगेच वापरले जाईलच असे नसणारे शुद्ध गणित, ही मानवी बुद्धीची एक उत्कृष्ट उपलब्धी आहे. व्याख्या-प्रमेय-सिद्धता अशी त्याची सर्वसाधारण मांडणी असते. उपयोजित गणित हा गणिती पद्धतींचा वापर प्रत्यक्षात करणारा भाग आहे. अभियांत्रिकी गणित हे त्याचे एक रूप आहे. पिरॅमिडस् बांधणी ते चंद्रावर मानवी पाऊल पडणे हे त्याचे सामथ्र्य दाखवतात. त्याशिवाय मनोरंजनात्मक (रिक्रिएशनल) गणित असाही एक वेगळा वर्ग केला जातो, मात्र काही गणितींच्या मते तो फारसा महत्त्वाचा नाही. तथापि, हा गणिती भागही अनेक प्रकारे अध्यापनास आणि संशोधनास हातभार लावत असल्याचे आढळले आहे. त्यामुळे त्याला दुय्यम समजून उपेक्षू नये असा मतप्रवाह जोर धरत आहे._

     _गणिताचे वेगळे वर्गीकरणही केले जाऊ शकते. एक म्हणजे, औपचारिक गणित- जे अभ्यास व सराव यांनी आत्मसात केले जाणारे शालेय ते पदव्युत्तर गणित शिक्षण. तर दुसरे, स्वाभाविक गणित- जे मनुष्याच्या आणि निसर्गाच्या सजीव सृष्टीमध्ये उपजत असते. उदाहरणार्थ, रहदारीचा रस्ता ओलांडणे हा तसे पाहिल्यास अत्यंत जटिल गणिती प्रश्न आहे, जो आपण सहज सोडवतो; पण यंत्रमानवाला तसे करणे सोपे नसते. तसेच कोणतेही गणिती शिक्षण न घेता मधमाशा त्यांच्या पोळ्यात इष्टतम मात्रेत मधाचा साठा करण्यासाठी षट्कोनी कोठारे रचतात किंवा झाडावरील फुले आदर्श सममिती राखणारे रूप घेतात._

     _आपण औपचारिक आणि स्वाभाविक गणित या दोहोंचा वापर दैनंदिन आयुष्यात करतो. औपचारिक शिक्षणामुळे आपला गणिती अनुभव समृद्ध होतो. त्यामुळे एखादे पुस्तक खणात मावेल की नाही याचा अंदाज आपल्याला एका दृष्टिक्षेपात येतो. दर वेळी पुस्तकाचे आणि खणाचे क्षेत्रफळ/घनफळ काढावे लागत नाही. म्हणून ही गणिती दृष्टी विकसित करण्यावर भर दिला पाहिजे. काही वेळा सादृश्यदर्शी (अ‍ॅनेलॉग) गणित, तर अन्य वेळा विश्लेषणात्मक गणित गरजेचे असते. जसे की, पेल्यात किती पाणी आहे हे समजण्यासाठी ते पाणी प्रमाणित मापन-भांडय़ात ओतून किंवा पेल्याचे घनफळ काढून उत्तर मिळू शकते (सादृश्यदर्शी पद्धत). मात्र पुढील सूर्यग्रहण केव्हा होईल हे जाणून घेण्यासाठी गणिती विश्लेषणच करणे भाग असते._

     _संगणकामार्फत अनुरूपण (सिम्युलेशन) हा गणिताचा आणखी एक प्रकार अलीकडेच विकसित झाला आहे. हे आभासी गणित गणिताच्या सर्व वर्गाना साहाय्यक ठरू शकते; काही वेळा ते त्यांच्या मर्यादाही ओलांडू शकते. तरी त्याचा अभ्यास आणि त्या अनुषंगाने योग्य अशा संगणक आज्ञावली तयार करणे हे महत्त्वाचे ठरत आहे._



*~~~~~~~~~~~~~~~~~~*

*_संकलन : गजानन गोपेवाड_*

*~~~~~~~~~~~~~~~~~~*

 *_📡 जय विज्ञान 🔬_*

*_दैनिक लोकसत्ता,दिनांक- २२ मार्च २०२१_*

22 मार्च जागतिक जल दिन

 *_आज_*


*_२२ मार्च_*


💧 *_जागतिक जल दिन_* 💧

************************


_दरवर्षी २२ मार्च हा दिवस 'जागतिक जल दिन' म्हणून साजरा केला जातो._


_संयुक्त राष्ट्रसंघ म्हणजेच UNO च्या सर्वसाधारण सभेने २२ मार्च १९९३ रोजी पहिला ‘वर्ल्ड वॉटर डे’ साजरा केला. तेव्हा पासून दरवर्षी, युनोच्या जागतिक जलविकास अहवालाशी सुसंगत असलेली, वेगळी संकल्पना वापरण्याची प्रथा आहे._


*_पाण्याशी संबंधित प्रश्‍न नेमके कोणते ?_*

_●पाण्याकडे पाहण्याची मानसिकता कशी बदलता येईल?_

_●पावसाच्या पध्दतीत होणार्‍या बदलांची नोंद घेवून पाण्याची साठवणूक कशी करता येईल?_

_●भूजलाची घसरती पातळी कशी थांबविता येईल?_

_●नद्यांचे बारमाहीकरण कसे करता येईल?_

_●तलावांवरील आक्रमण थांबवून त्याचे संवर्धन कसे करता येईल?_

_●पाण्याचे वाढते दुर्भिक्ष लक्षात घेवून त्याचा पुनर्वापर कसा करता येईल?_

_●पाण्याच्या वाढत्या प्रदूषणाला आळा कसा घालता येईल?_

_●पाण्याचा अधिक उत्पादक पध्दतीने वापर कसा वाढविता येईल?_

_●पाणी वितरणाचे व्यवस्थापन कसे सुधारता येईल?_

_●पाण्याचे सरकारीकरण कसे थांबविता येईल?_


*_आपली भूमिका काय ?_*

_●स्वत: ला खरोखर किती पाण्याची गरज आहे? हे समजून घेऊन तितकेच पाणी प्रत्येकाने वापरले पाहिजे._

_●पाण्याचा स्रोत प्रदूषित न करणे. कुणी करत असेल तर त्याचा प्रतिकार करणे._

     _लक्षात घ्या, ‘जल है तो, जीवन है’! प्रत्येक गोष्टीसाठी पाणी हे लागतेच. पाण्याचा वापर करणे आपण थांबवू शकत नाही. पण पाण्याच्या सुयोग्य वापरामुळे आपण पाणी वाचवू शकतो ऊद्याची तहान भागवण्यासाठी._

*~~~~~~~~~~~~~~~~~~*

*_संकलन : गजानन गोपेवाड*

*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*

*_सृष्टी विज्ञानगाथा विज्ञान व दिनविशेष मधून_*

नवनिर्मिती ची प्रेरणा

 *_🔭मराठी विज्ञान परिषदेचे🔬_*

           🤔 *_कुतूहल_* 🤔


🎯 *_नवनिर्मितीची प्रेरणा_*

**********************


_गणितामध्ये कळीची नवनिर्मिती अनेकदा अंत:स्फूर्तीतून होते असे मानले जाते. मात्र अशी प्रेरणा आपल्या ताब्यात किंवा हुकमी नसल्यामुळे ती कशी आणि केव्हा जागृत होईल हे सांगणे अशक्यप्राय आहे. उदाहरणार्थ, थोर गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन सांगत की, त्यांच्या स्वप्नात त्यांच्या कुलदेवतेच्या जिभेवरून खाली पडणारी गणिती सूत्रे त्यांना दिसत आणि जागे झाल्यावर ते ती लिहून त्यांची सिद्धता देण्याचा प्रयत्न करत. अर्थात, रामानुजन अलौकिक गणितज्ञ होते, निसर्गाचा जणू चमत्कार होते. कारण ती बहुतांश सूत्रे बरोबर आहेत हे सिद्ध झाले असले, तरी ती मुळात इतकी सखोल व अफलातून म्हणता येतील अशी असून अगदी प्रज्ञावंत गणितीलादेखील सुचणार नाहीत हे जगजाहीर आहे._

     _म्हणजेच केवळ तार्किक संरचना- जसे की, पूर्णांकांसाठी उपलब्ध प्रमेय किंवा उपपत्ती वास्तव संख्यांसाठी सिद्ध करणे असे व्यापैकीकरण (जनरलायझेशन), हे पथदर्शी नावीन्यपूर्ण गणित निर्माण करीलच असे नाही. अनेकदा संदिग्धताही महत्त्वाची भूमिका बजावते; म्हणजे निष्कर्ष सदोष किंवा सकृद्दर्शनी विसंगत असू शकतात. तरीदेखील अटकळी, विरोधाभास आणि काही वेळा तर्कहीन वाटणारी स्थिती यांचा मागोवा गणितात उल्लेखनीय भर घालू शकतो. गणितज्ञ असे आव्हानात्मक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतात. काही वेळा पूर्णपणे वा आंशिकपणे ते प्रश्न सोडवले जातात, तर बरेचदा त्याला दिलेल्या चौकटीत उत्तर नाही असा निष्कर्ष मिळू शकतो. उत्तर अस्तित्वात नाही अशा निष्कर्षांना गणितात अनन्यसाधारण महत्त्व आहे. याला कारण म्हणजे कुठला रस्ता घेऊ नका याचे मार्गदर्शन मिळते. तसेच चपखल नसले तरी, आसन्न (जवळचे) उत्तर मिळवण्यासाठी नवे तंत्र विकसित करण्यास चालना मिळते. वाहत्या मार्गात आलेल्या खडकामुळे जलप्रवाह काही वेळ थांबतो, पण नंतर त्याला वळसा घालून पुढे जातो. गणिताचेही काहीसे तसेच आहे._

     _गणित ही मानवनिर्मिती आहे, मात्र तिच्या मर्यादा ओलांडून विजयी होण्याचा प्रयत्न करणेही आपल्या हाती आहे. मुख्य म्हणजे, असा प्रयास कोणीही करू शकतो. त्यासाठी साधा कागद आणि पेन्सिल ही साधने पुरेशी आहेत. जोडीला गणकयंत्र आणि संगणक असेल तर उत्तम. निष्कर्षांचे व्यापैकीकरण या सरळसोट मार्गाशिवाय अन्य वाटांनी गणिताला पुढे नेण्याचे प्रयत्न आवश्यक आहेत. यासंदर्भात अद्याप सिद्धता न मिळालेल्या गणिती अटकळींनी सुरुवात करता येईल किंवा अशी कोडी- जी धन संख्यांसाठी गुंफली आहेत ती ऋण संख्यांसाठीही खरी आहेत का, हे तपासणसुद्धा चालेल! तर करायची ना सुरुवात?_



*~~~~~~~~~~~~~~~~~~*

*_संकलन गजानन गोपेवाड _*

*~~~~~~~~~~~~~~~~~~*

 *_📡 जय विज्ञान 🔬_*

*_दैनिक लोकसत्ता,दिनांक- २२ फेब्रुवारी २०२१_*

7 एप्रिल जागतिक आरोग्य दिन

जागतिक आरोग्य दिन 


 

मूर्च्छा का येतो?

 *_आजची माहिती_*


📕 *_मूर्च्छा का येते ?_* 📕

*********************

_रामायणाच्या गोष्टींमध्ये लक्ष्मणाला मूर्छा आली ती गोष्ट तुम्हाला आठवत असेल. मग हनुमानाने औषधी बनस्पतीसाठी डोंगर उचलून आणला वगैरे..._

     _व्यक्ती वेशुद्ध किंवा मूर्च्छित होण्याची खूप कारणे आहेत. दारूचे जास्त सेवन केल्यास मूर्च्छा येते. डोक्यावर जोराचा मार लागला तरी व्यक्ती बेशुद्ध पडते. अचानक बसलेल्या मानसिक धक्क्यामुळेही काही जण बेशुद्ध पडतात. विषवाधा, मधुमेह, उष्माघात, मेंदूतील रक्तस्राव, हृदयविकाराचा झटका आणि मिरगी यांसारख्या कारणांमुळेही व्यक्ती बेशुद्ध होऊ शकते. अशक्तपणा किंवा रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण कमी झाल्यामुळेही चक्कर येते आणि व्यक्तीला मूर्छा येऊ शकते. जखमांमुळे खूप रक्तस्त्राव झाला तरी व्यक्ती बेशुद्ध होते._

     _तुमच्या एक लक्षात आले असेल की, वेशुद्ध पडण्याची अनेक कारणे म्हणजे गंभीर रोग होत. त्यामुळे घरच्या घरी प्रयत्न करून वेळ घालवण्यापेक्षा रुग्णाला तात्काळ दवाखान्यात न्यावे हेच योग्य होय. काही पथ्ये मात्र पाळावीत रुग्णाला वेशुद्धावस्थेत काहीही खायला किंवा प्यायला देऊ नये. अन्यथा पाणी वा अन्न फुफ्फुसात जाऊन न्यूमोनिया होऊ शकतो. रुग्णाची मान ताणून एका बाजूला वळवावी. त्याचा जबडा आणि जीभ पुढे ओढावेत. त्याच्या तोंडात काही असेल तर ते बाहेर काढावे. श्वसन चालू नसेल, तर आपल्या तोंडाने त्याच्या तोंडात हवा सोडावी. असे कृत्रिम श्वसन देण्यासाठी त्याच्या तोंडात हवा सोडताना त्याचे नाक दाबावे. त्याच्या तोंडात हवा सोडल्यानंतर आपले तोंड बाजूला घ्यावे. मिनिटातून १६ ते २० वेळा अशा प्रकारे त्याच्या तोंडात हवा सोडावी. लवकरात लवकर रुग्णालयात दाखल करावे, म्हणजे योग्य उपचार मिळून रुग्णाचे प्राण वाचतील._

*~~~~~~~~~~~~~~~~~~*

*_संकलन : गजानन गोपेवाड_*

*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*

*_डॉ.जगन्नाथ दीक्षित, डाॅ.अंजली दीक्षित_*

_यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून_

पू कशाचा बनलेला असतो

 *_आजची माहिती_*


*_📕'पू' कशाचा बनलेला असतो?📕_*

*******************************

_'पू' कशाचा बनलेला असतो?_


_'पू' हा शब्द उच्चारताच तुम्हाला किळस आली असेल! तुम्ही नाकही मुरडले असेल! 'पू' म्हणजे शरीरातील टाकाऊ पदार्थांचा अर्क वा कचराच जणू. यात शरीरातील पांढर्या व लाल रक्तपेशी तसेच इतर पेशी मृतावस्थेत असतात. याखेरीज जंतू व पांढऱ्या रक्तपेशी यांच्या लढाईनंतर मेलेले जंतू, पेशी व इतर द्रव्ये असतात. 'पू' पेशीही असतात. छोट्या फोडांमध्ये पू होतो. जंतूसंसर्गाचा हा परिणाम असतो. शस्त्रक्रियेच्या टाक्यांमध्ये, जखमांमध्ये जंतुसंसर्ग होऊन पू जमा होतो. पू जमा झाल्यास ताप येतो. थकवा येतो. बरे वाटत नाही. त्यामुळे कोठेही पू तयार झाल्यास तो शरीराबाहेर काढणे महत्त्वाचे असते. तसे न झाल्यास शरीराच्या आतील भागात असणाऱ्या ठिकाणचा पू वाहेर पडून रक्तात मिसळतो व जंतुसंसर्ग रक्तामार्फत शरीरभर पसरतो. मेंदूवर परिणामही होतो. प्रसंगी मृत्यू ओढवतो. त्यामुळे पू दिसल्याबरोबर तात्काळ खातमा करणे महत्त्वाचे पू मधील जंतूंचा प्रकार पाहून त्यानुसार जंतुघ्नचा वापर करावा लागतो._

*~~~~~~~~~~~~~~~~~~*

*_संकलन : गजानन गोपेवाड_*

*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*

*_डॉ.जगन्नाथ दीक्षित, डाॅ.अंजली दीक्षित_*

_यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून_

लेजर किरण

 *_🔭मराठी विज्ञान परिषदेचे🔬_*

            🤔 *_कुतूहल_* 🤔


🎯 *_लेझर किरण_*

****************


_जेव्हा एखादा अणू एखाद्या विशिष्ट लहरलांबीचा प्रकाश शोषतो, तेव्हा तो उत्तेजित होतो. अणूने शोषलेला विशिष्ट लहरलांबीचा हा प्रकाश अणूने उत्सर्जित केल्यास अणू पुन्हा मूळ स्थितीत परततो. सर्वसाधारण स्थितीत पदार्थातील उत्तेजित अणूंची संख्या ही उत्तेजित नसलेल्या अणूंपेक्षा खूपच कमी असते. मात्र उत्तेजित अणूंची संख्या जर एखाद्या मार्गाने वाढवली, तर त्या शोषलेल्या विशिष्ट लहरलांबीचे प्रकाशकिरणही मोठय़ा प्रमाणात उत्सर्जित होऊन तीव्र प्रकाशाची निर्मिती होते. आइन्स्टाइनने या क्रियेचे भाकीत १९१७ सालीच वर्तवले होते. आणि यातूनच आपल्याला सुपरिचित असलेल्या लेझर किरणांचा १९६० साली जन्म झाला! ‘लेझर’ या शब्दाचे पूर्णरूप म्हणजे ‘लाइट अ‍ॅम्प्लिफिकेशन बाय स्टिम्युलेटेड एमिशन ऑफ रेडिएशन’!_

     _पहिल्या लेझर किरणांची निर्मिती ही अमेरिकेतील ‘ह्य़ुझेस रिसर्च लॅब’मधील थिओडोर मायमान याने केली. यासाठी त्याने एक सेंटिमीटर व्यासाचे आणि दोन सेंटिमीटर लांबीचे गुलाबी रंगाचे माणिक (रुबी) घेतले. या माणकाच्या स्फटिकाच्या समोरासमोरच्या दोन्ही सपाट बाजूंवर प्रकाश परावर्तित होण्यासाठी त्याने चांदीचा थर दिला. यातील एका बाजूच्या चांदीच्या थराच्या मध्यावर, प्रकाश बाहेर पडण्यासाठी एक छोटेसे छिद्र ठेवले. मायमानने हा स्फटिक वेटोळ्यांच्या स्वरूपातल्या फ्लॅश लॅम्पच्या मध्यभागी ठेवला. त्यानंतर हे साहित्य त्याने आतून चकचकीत केलेल्या, अ‍ॅल्युमिनियमच्या सिलिंडरमध्ये ठेवले. छिद्रातून बाहेर येणाऱ्या प्रकाशाचे मापन करण्यासाठी प्रकाश संवेदक (फोटोमल्टिप्लायर) ठेवला. त्यानंतर मायमानने या फ्लॅश लॅम्पचा विद्युतदाब वाढवायला सुरुवात केली. विद्युतदाब साडेनऊशे व्होल्टवर पोहोचताच, चांदीच्या छिद्रातून बाहेर पडणाऱ्या अपेक्षित लहरलांबीच्या लाल प्रकाशकिरणांची तीव्रता मोठय़ा प्रमाणात वाढली. म्हणजे लेझर किरणांची निर्मिती सुरू झाली होती!_

     _माणकाच्या स्फटिकात असणारे क्रोमियमचे अणू फ्लॅश लॅम्पकडून येणाऱ्या प्रकाशातील लाल रंगाचा प्रकाश शोषून घेऊन उत्तेजित होत होते. त्यानंतर मूळ स्थितीत येताना ते हा लाल रंगाचा प्रकाश उत्सर्जित करत होते. स्फटिकाच्या आतला प्रकाश सर्व बाजूंनी आतल्या आत परावर्तित होत असल्याने, स्फटिकाच्या आतील प्रकाशाची तीव्रता वाढत होती. त्यामुळे क्रोमियमच्या उत्तेजित अणूंची संख्याही वाढून एकाच लहरलांबीचे, तीव्र प्रकाशकिरण- लेझर किरण- मोठय़ा प्रमाणावर उत्सर्जित होऊ लागले. या लेझर किरणांचा कालांतराने औद्योगिक तसेच वैद्यकीय क्षेत्रांपासून करमणुकीच्या क्षेत्रांपर्यंत सर्वत्र मुक्तपणे वापर सुरू झाला._


*~~~~~~~~~~~~~~~~~~*

*_संकलन : गजानन गोपेवाड_*

*~~~~~~~~~~~~~~~~~~*

 *_📡 जय विज्ञान 🔬_*

*_दैनिक लोकसत्ता, ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान, माझी शाळा माझी भाषा मधून_*

छातीत का? धडधडते?

 *_आजची माहिती_*


📒 *_छातीत का धडधडते?_* 📒

***************************


_छातीत डाव्या बाजूला हात लावल्यास हृदयाचे ठोके जाणवतात. हे ठोके स्टेथोस्कोपने स्पष्ट ऐकू येतात. एरवी हृदयाचे ठोके आपल्या दैनंदिन कामात जाणवत नाहीत. श्रमाची कामे केल्यावर, खेळल्यावर, धावल्यावर, भीती वाटल्यावर थोडावेळ धडधडते, श्वसनवेग वाढतो। शरीराची ऑक्सिजनची मागणी वाढल्यामुळे असे होते. काही वेळातच श्वसनाची गती, हृदयाचे ठोके पूर्ववत होतात. हृदयाच्या कार्याची होणारी अवाजवी जाणीव म्हणजे छातीत धडधडणे (Palpitation), असे म्हणतात._

     _हृदयाच्या कार्यात काही बिघाड असल्यास किंवा एखाद्या वेळेस तणावग्रस्त मानसिकता असेल तर छातीत धडधडते. रक्तक्षय, बेरीबेरी, हृदयाच्या झडपांचे आजार, हृदयातले कर्णिकांचे वाढलेले वा गतिमान ठोके किंवा नाडीचा वाढलेला दर, तणावग्रस्त मन, काही प्रकारचे कर्करोग या सर्वांमध्ये छातीत धडधडते. छातीत धडधडणे हा रोग नाही, ते रोगांचे लक्षण असू शकते. त्यामुळे त्याचे कारण शोधून त्या रोगावर उपचार केल्यास हा त्रास कमी होतो. साधारणतः भीती वाटल्यावर, खेळल्यावर, दचकल्यास तेवढ्यापुरते छातीत धडधडते. अशा धडधडण्याची काळजी करण्याची गरज नाही. ही धडधड थोड्याच वेळात कमी होते._

*~~~~~~~~~~~~~~~~~~*

*_संकलन : गजानन गोपेवाड_*

*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*

*_डॉ.जगन्नाथ दीक्षित, डाॅ.अंजली दीक्षित_*

_यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून_

डायलीसिस म्हणजे काय?

 *_आजची माहिती_*


📙 *_डायलिसिस म्हणजे काय ?_* 📙 

*******************************

_मूत्रपिंडाच्या विकाराने पीडित रुग्णांच्या बाबतीत अमक्या अमक्या व्यक्तीस डायलिसिसवर ठेवले आहे, असे बोलणे आपण ऐकतो. डायलिसिस म्हणजे काय करत असतील, हे समजून घेण्यासाठी प्रथम आपल्याला मूत्रपिंडाचे कार्य काय आहे ते बघावे लागेल. मूत्रपिंडाचे कार्य म्हणजे शरीरातील क्षार, पाणी यांचा समतोल कायम राखणे व शरीरात तयार होणार टाकाऊ पदार्थ, विषारी पदार्थ लघवीच्या माध्यमातून शरीराबाहेर टाकणे. सोडियम, क्लोराइड, पोटॅशियम, तसेच पाणी यांचे शरीरातील प्रमाण योग्य पातळीवर ठेवण्यासाठी मुत्रपिंड कार्यरत राहणे महत्त्वाचे असते. टाकाऊ पदार्थांमध्ये युरियाचा समावेश होतो. सर्वसामान्यपणे आपल्या रक्तात १५ ते ४० मिलीग्रॅम प्रति १०० मिली इतका युरिया असतो. दोन्ही मुत्रपिंडे आजारामुळे वा इतर कोणत्याही कारणाने निकामी झाली तर युरियाचे रक्तातील प्रमाण वाढते. हे प्रमाण खूप वाढल्यास युरिया मेंदूत जमा होऊ लागतो. उपचार न केल्यास रुग्ण कोमात जाऊ शकतो व पुढे त्याचा मृत्यूही होऊ शकतो._

     _मूत्रपिंडाच्या कार्याला मानवाने शोधलेला पर्याय म्हणजे डायलिसिस. रक्तातील टाकाऊ पदार्थ काढून टाकण्यासाठी विशिष्ट द्रव वापरला जातो. डायलिसिसचे २ प्रकार आहेत. एक म्हणजे पोटातील आवरणाच्या पोकळीत डायलिसिसचा द्रव २० मिनिटे ते १ तास ठेवतात. या काळात पोटातील आवरणात रक्तातील टाकाऊ पदार्थ या द्रवात मिसळले जातात. नंतर हा द्रव काढून टाकला जातो. ही क्रिया ३० ते ४० वेळा केली जाते. या प्रक्रियेला पेरिटोनियल डायलिसिस म्हणतात. दुसऱ्या पद्धतीत शरीरातील रक्ताचे कृत्रिम किडनी म्हणजे यांत्रिक उपकरणाद्वारे शुद्धीकरण केले जाते. शुद्ध झालेले रक्त परत शरीरात सोडले जाते. याला हिमोडायलिसिस म्हणतात. डायलिसिसमुळे मुत्रपिंडाचे गंभीर रोग झालेल्या रुग्णांना जीवदान मिळाले आहे. मुत्रपिंडाचा विकार झालेल्या रुग्णांसाठी डायलिसिस हे वरदानच आहे._

*~~~~~~~~~~~~~~~~~~*

*_संकलन : गजानन गोपेवाड_*

*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*

*_डॉ.जगन्नाथ दीक्षित, डाॅ.अंजली दीक्षित_*

_यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून_

गर्भजल चिकित्सा

 *_आजची माहिती_*


📕 *_गर्भजलचिकित्सा_* 📕

***********************

_●गर्भावरणाभोवती असलेल्या उल्बी द्रवाची चिकित्सा. हे एक वैद्यकीय चिकित्सा तंत्र असून यामार्फत गर्भाच्या गुणसूत्रांमधील अपसामान्यता आणि संसर्ग यांचे जन्माअगोदर निदान केले जाते._

_●गर्भाभोवती असलेल्या गर्भावरणामुळे गर्भाचे संरक्षण होते. गर्भावरणाभोवती एक आवरण असते._

_●या आवरणाला उल्ब आवरण म्हणतात. गर्भावरण आणि उल्ब आवरण यांच्यामध्ये गर्भजल असते. गर्भजलात गर्भऊती असतात._

_●यातील थोडेसे गर्भजल काढून त्याच्यातील आनुवंशिक दोष पाहण्यासाठी गर्भाच्या डीएनएनचे (डीऑक्सिरिबोन्यूक्लिइक आम्लाचे) परीक्षण केले जाते._

_●गर्भजल चिकित्सा करताना मातेला स्थानिक बधिरक दिले जाते आणि तिच्या उदरात सुई टोचून ती उल्बापर्यंत नेली जाते. श्राव्यातीत (अल्ट्रासॉनिक) लहरींच्या साहाय्याने सुई उल्बात टोचण्याची जागा गर्भापासून दूर राहील हे पाहिले जाते. नंतर त्या जागेतून साधारण २० मिलि. गर्भजल बाहेर काढले जाते. मिळालेल्या नमुन्यातून गर्भाच्या पेशी वेगळ्या केल्या जातात आणि ऊती संवर्धन तंत्राने त्यांची वाढ केली जाते. सूक्ष्मदर्शकाखाली या पेशीतील गुणसूत्रांचे त्यांच्यातील विकृती पाहण्यासाठी निरीक्षण केले जाते. त्यांतून मुख्यत्वे डाऊन सिंड्रोम, एडवर्ड सिंड्रोम व टर्नर सिंड्रोम या गुणसूत्रांच्या विकृती पाहिल्या जातात._

_●साधारणतः २४ ते ४८ तासांत उल्बाची जखम भरून येते. तसेच या अवधीत गर्भाजलाची पातळी पूर्ववत होते._

_●गर्भजलचिकित्सा गर्भारपणाच्या १६ ते २० आठवड्यांत करता येते. त्याआधी गर्भजल चिकित्सा केल्यास गर्भपाताचा धोका असतो, तसेच अर्भकाच्या अवयवांना इजा होऊ शकते. हा धोका कमीत कमी करण्यासाठी ही चिकित्सा बहुधा १८ व्या आठवड्यात करतात._

_●३५ वर्षांहून कमी वयाच्या स्त्रीच्या गर्भामधील दोषांचे प्रमाण कमी असल्यामुळे आणि कुटुंबामध्ये गुणसूत्रामधील दोषांचा वैद्यकीय इतिहास नसेल, तर या वयातील गरोदर स्त्रियांना ही चिकित्सा करून घेण्याचा सल्ला दिला जात नाही. मात्र प्रौढ गरोदर स्त्रियांमध्ये अर्भकात गुणसूत्र दोष होण्याचे सरासरी प्रमाण वाढत जाते. तसेच गरोदरपणात मातेला मधुमेह असल्यास गर्भजलचिकित्सेचा सल्ला दिला जातो._

_●गर्भजलचिकित्सा गरोदरपणाच्या योग्य कालावधीत केल्यास गर्भाच्या डोक्याची अपुरी वाढ (अ‍ॅनेसेफाली), पाठीचा दुभंगलेला कणा (स्पिना बायफीडा), डाऊन सिंड्रोम अशा गुणसूत्रांच्या दोषाचे निदान करता येते. ही चिकित्सा गरोदरपणात नंतरच्या कालावधीत केल्यास गर्भाला झालेला संसर्ग, फुप्फुसांची अपुरी वाढ, माता आणि बालक यांच्या रक्तातील आरएच घटक न जुळणे अशा अन्य प्रकारच्या समस्य़ांचेही निदान होऊ शकते._

_●जगभर चालू असलेल्या संशोधनातून असे दिसून आले आहे की, उल्ब द्रवातून मध्यजनस्तर, रक्तनिर्मिती, चेता, अभिस्तर आणि अंतःस्तरातील मूलपेशींचा उत्तम स्रोत उपलब्ध होऊ शकतो. हृदय, यकृत, वृक्क (मूत्रपिंड) आणि प्रस्तिष्क ऊतींमध्ये दोष निर्माण झालेल्या रुग्णांसाठी उल्ब द्रवापासून मिळालेल्या ऊती उपकारक ठरू शकतात._

_●गर्भजलचिकित्सा ही गर्भामधील गुणसूत्र दोष आणि गर्भलिंग निश्चित करण्यासाठी अचूक आणि विश्वासार्ह चाचणी आहे. मात्र या चिकित्सेद्वारे लिंग निश्चिती करण्यास कायद्याने बंदी आहे._

_लेखक : मोहन मद्वाण्णा_

*~~~~~~~~~~~~~~~~~~*

*_संकलन : गजानन गोपेवाड_*

*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*

*_डॉ.जगन्नाथ दीक्षित, डाॅ.अंजली दीक्षित_*

_यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून_

30 मार्च भुल औषध

 *🎧आज 🎧*


*३० मार्च १८४२*


*📙अमेरिकन सर्जन डॉ. क्रॉफर्ड लॉंग यांनी भूल देणारे औषध म्हणजेच 'एनेस्थेसिया' चा वापर सर्वप्रथम एका रुग्णाच्या ब्रेनटयूमर शस्त्रक्रियेसाठी केला.📙*

***************************************


_संज्ञाहरण (एनेस्थेशिया) या संज्ञाहीनता (वर्तनी में अंतर देखें; ग्रीक के αν- से व्युत्पन्न, an-, "बिना"; और αἴσθησις, aisthēsis, "संवेदन"), का पारंपरिक अर्थ है संवेदनशीलता (दर्द महसूस करने सहित) महसूस करने की स्थिति का अवरोधन अथवा अस्थायी रूप से हरण. यह औषधीय प्रेरित होती है और शब्दस्मृतिलोप, पीड़ाशून्यता, सजगता की हानि, कंकालीय मांसपेशी प्रतिक्रिया या कम तनाव प्रतिक्रिया या सभी के साथ अनुवर्ती हैं। यह रोगियों को तनाव तथा दर्द महसूस किये बिना शल्यक्रिया से गुजरने की अनुमति देती है। एक वैकल्पिक परिभाषा है "प्रतिवर्ती जागरूकता की कमी" जिसमें जागरूकता का पूर्ण रूप से अभाव होता है (उदाहरण स्वरूप एक सामान्य चेतनाशून्य करने वाली औषधी), या शरीर के किसी एक भाग में चेतना का अभाव है जैसे रीढ़ में चेतनालोप. एनेस्थेसिया शब्द का गठन, वर्ष 1846 में ऑलिवर वेंडेल होम्स, सीनियर ने किया था।_

     _संज्ञाहरण के प्रकारों में स्थानीय संज्ञाहरण, क्षेत्रीय संज्ञाहरण, सामान्य संज्ञाहरण और अलग करनेवाली संज्ञाहरण शामिल हैं। स्थानीय संज्ञाहरण शरीर के एक विशिष्ट स्थान के भीतर संवेदना बोध को रोकता है जैसे दांत या मूत्राशय. शरीर के एक भाग और रीढ़ की हड्डी के बीच तंत्रिका आवेगों के संचारण को अवरूद्ध करने के द्वारा क्षेत्रीय संज्ञाहरण शरीर के एक बड़े क्षेत्र को घेरे में लेता है। क्षेत्रीय संज्ञाहरण के दो अक्सर प्रयुक्त होने वाले प्रकार हैं रीढ़ संज्ञाहरण और एपीड्यूरल संज्ञाहरण. सामान्य संज्ञाहरण मस्तिष्क के स्तर पर संवेदन, मोटर और तंत्रिका संचरण को रोकते हैं जिसके परिणामस्वरूप बेहोशी और संवेदन का अभाव होता है।[2] अलग करनेवाला संज्ञाहरण एजेंट का प्रयोग करता है जो कि दिमाग के उच्च केन्द्र (जैसे मस्तिष्क प्रांतस्था के रूप में) और निम्न केन्द्र जैसे लिम्बिक प्रणाली के भीतर पाया जाता है, के बीच तंत्रिका आवेगों के संचरण को रोकता है।_

*~~~~~~~~~~~~~~~~~~*

*_संकलन : गजानन गोपेवाड_*

*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*

*_सृष्टी विज्ञानगाथा विज्ञान व दिनविशेष मधून_*




30 मार्च जागतिक डॉक्टर दिवस

 ********************************


    *३० मार्च - जागतिक डॉक्टर दिन*


********************************


आज जागतिक डॉक्टर दिन !


आपण भारतात १ जुलै रोजी "राष्ट्रीय डॉक्टर दिवस" साजरा करतो.


सध्याच्या धावपळीच्या युगात अनारोग्य हा कळीचा मुद्दा आहे. जसे आईशी आपले नाते असते तसेच ते आपल्या डॉक्टरशी असते. कोणत्याही आरोग्य विषयक तक्रारीसाठी आपण ज्या व्यक्तीवर अवलंबून असतो ती व्यक्ती म्हणजे डॉक्टर. 


डॉक्टरांचा व्यवसाय आजही एक उदात्त व्यवसाय समजला जातो. आपणापैकी सगळ्याच लोकांचा डॉक्टरांशी आयुष्यात अनेकदा संबंध येतो. वैद्यकीय क्षेत्रात आपल्या मागण्यांसाठी डॉक्टरांची सततची होणारी आंदोलने, उपोषणे आणि या घटनांचे सर्वसामान्यांवर होणारे दुष्परिणाम तसंच इतर क्षेत्रांप्रमाणेच या क्षेत्रातही बोकाळलेला भ्रष्टाचार. तत्सम असंख्य गोष्टींमुळे एकूणच वैद्यकीय व्यवस्थेबद्दलचं सर्वसामान्यांचं मत काहीसं कलुषित झालेलं दिसतं. असं असताना आज हा दिवस नव्याने डॉक्टर-रुग्ण या नात्यातील विश्वासार्हता दृढ करण्याच्या उद्देशाने साजरा केला गेल्यास भविष्यात आंदोलनाप्रसंगी सर्वसामान्यांना वेठीस न धरण्याचे आशादायी चित्र आपण रंगवू शकतो. 


मुळात, समाजात चांगल्या-वाईट प्रवृत्ती समाजाच्या सर्वच स्तरावर आहेत. डॉक्टरही माणूस आहे, हे आपण विसरून चालणार नाही. आपल्या कर्तव्याप्रती दक्ष असणाऱ्या, दिनरात्रीची तमा न बाळगता सेवेसाठी तत्पर असणाऱ्या आणि संशोधनातून वैद्यकीय क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणाऱ्या तसंच कित्येकांना नवं जीवनदान देणाऱ्या अनेक डॉक्टरांची उदाहरणं आजही आपल्या आसपास दिसतात. त्यामुळे डॉक्टरांचा व्यवसाय आजही एक उदात्त व्यवसाय समजला जातो. 


आपणापैकी सगळ्याच लोकांचा डॉक्टरांशी आयुष्यात अनेकदा संबंध येतो. आज हा दिवस त्या चांगल्या गोष्टींची आठवण करण्याचा. आपल्या डॉक्टरांनी आतापर्यंत आपल्या जीवनात सुदृढ आरोग्यासाठी केलेल्या मदतीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा. 


आतापर्यंत आपल्या आरोग्याची वेळोवेळी काळजी घेत आलेल्या आपल्या डॉक्टरांना आजच्या जागतिक डॉक्टर दिना निमित्त त्यांच्याही उत्तम स्वास्थ्यासाठी आरोग्यदायी शुभेच्छा !

संकलन गजानन गोपेवाड


संदर्भ : इंटरनेट


********************************

30 मार्च जागतिक इडली दिवस

 ********************************


   *३० मार्च - जागतिक इडली दिवस*


********************************


आज जागतिक इडली दिवस. ३० मार्च हा दिवस जगभरात इडली दिवस म्हणून साजरा केला जातो.


जगभरात इडली अतिशय लोकप्रिय आहे. इडली नि सांबार हा प्रकार प्रत्येकालाच आवडतो. मुंबईत तर अगदी वडापाव प्रमाणेच इडलीवर जगणारे असंख्य लोक आहेत. सकाळी वेगवेगळ्या नाक्यावर हे इडलीवाले इडली विकत उभे असतात. या इडलीवाल्यांकडील चटणी, सांबारची एक वेगळीच चव असते. याबरोबर डाळवडा, मेदू वडा यांच्याकडे चवीने खाल्ला जातो.


इडली सांबार, इडली चटणी सर्वांना आवडणारा पदार्थ आहे. इडलीचा जेव्‍हा विषय येतो तेव्‍हा अप्रत्‍यक्षपणे साऊथचे म्‍हणजे दक्षिण भारताचे नाव समोर येते. मात्र वास्‍तवात इडली इंडोनेशियातून भारतात आलेली आहे. इडलीला खूप जूना इतिहास आहे. 


पाक शास्त्राचा अभ्‍यास करणार्‍यांच्‍या मते ८०० ते १२०० इ.पूर्व मध्‍ये भारतात इडली आली आहे. 'इडली' शब्‍दाची निर्मिती 'इडलीग' यापासून झाली होती. याचा उल्‍लेख 'कन्‍नड' साहित्‍यात आढळतो.


जागतिक इडली दिवस मागच्‍या ३ वर्षापासून साजरा केला जात आहे. या दिवसाची सुरुवात 'एम एनियावन' यांनी केली. एम एनियावन हे 'मल्लीपू इडली' चे संस्‍थापक आहेत. थोरांपासून ते लहानांच्‍यापर्यंत इडली सर्वांसाठी सुरक्षीत खाद्य आहे. 


एनियावन यांच्‍या मते, फादर डे, मदर डे असे डेज आपण साजरे करतो त्‍याचप्रमाणे मला वाटले की, इडली दिवसपण साजरा करायला हवा. मात्र फेरीवाल्‍या पासून ते हॉटेल पर्यंत इडली विक्रेत्‍ये जागतिक इडली दिवस साजरा केला जातो याविषयी अजून म्‍हणावी तेवढी माहिती पोहचलेली नाही.


ईडली हा मूळ भारताच्या दक्षिणेकडील प्रदेशातून आलेला आणि भारतभर लोकप्रिय झालेला तांदळाचा एक खाद्यपदार्थ आहे. तांदूळ आणि उडदाची डाळ, किंवा तत्सम पदार्थ आंबवून आणि वाटून झालेल्या घट्टसर लगद्याच्या चकत्या वाफेवर उकडून इडली बनवली जाते. इडली बरोबर सांबार आणि ओल्या खोबऱ्याची चटणी खातात. आंबवल्यामुळे इडलीची चव किंचित आंबट असते. 


दक्षिणी भारतात इडली भरपूर प्रमाणात खाल्ली जाते. महाराष्ट्रा मध्ये सुद्धा ही इडली नाष्ट्यासाठी बनवली जाते. हल्‍ली रव्‍याची इडली देखील बनवली जाते.


*कशी बनवायची इडली* :


३ वाट्या तांदूळ किंवा इडली रवा 

१ वाटी उडीद डाळ


डाळ आणि तांदूळ किंवा रवा धुवुन वेगवेगळे भिजत घालावे. ६ तासाने डाळ एकदम बारीक वाटावी. डाळ वाटुन होत आली की त्यात तांदूळ किंवा रवा घालुन वाटावे. फूडप्रोसेसर असेल तर त्यात घालुन थोडावेळ फिरवावे. पिठ साधारण भजाच्या पिठासरखे असावे. हे बारीक केलेले पिठ एका मोठ्या पातेल्यात काढून त्यात १/२ कांदा घालुन पिठात बुडेल असा ठेवावा. त्यावर झाकण ठेवुन पातेले उबदार जागी ठेवावे. थंडीत साधारण १०-१२ तासात पीठ फुगुन येते. इडली करत असताना यात चवीनुसार मीठ घालावे. यानंतर इडली पात्रात पीठ घालुन मोठ्या आचेवर कुकरमधे ठेवुन साधारण २० मिनीटे वाफवावे. वर दिलेल्या प्रमाणात साधारण ४०-४५ इडल्या होतात.


इडली म्‍हटले की सांबर आणि चटणी आलेच. यासाठी लागणारे साहित्‍य आणि कृती.


*साहित्‍य* :

१ जुडी कोथिंबीर 

२-३ हिरव्या मिरच्या

१ मुठ शेंगदाणे

१/४ वाटी ओले खोबरे

अर्ध्या लिंबाचा रस

१/२ इंच आल्याचा तुकडा

मीठ, साखर चवीप्रमाणे


*कृती* :

वरील सर्व साहित्य मिक्सरमधे घालुन बारीक वाटावे. गरज लागली तर थोडे पाणी घालावे. यानंतल चटणीला हिंग, जिरे, मोहरी, कढिपत्त्याची फोडणी घालावी.


*सांबार साहित्‍य आणि कृती* :

१ वाटी तुरडाळ

१ मोठा टोमॅटो

१ मध्यम कांदा

२ शेवग्‍याच्‍या शेंगा

लाल भोपळ्‍याचे १ काप 

२-३ टीस्पून सांबार मसाला

मोठ्या लिंबाएवढी चिंच पाण्यात कोळुन चवीप्रमाणे मीठ लाल मिरचीपावडर चवीप्रमाणे फोडणीसाठी तेल, हिंग, जिरे, मोहरी, कढीपत्ता, २-३ लाल सुक्या मिरच्या.


*कृती* :

डाळ, टोमॅटो, १/२ कांदा, शेवग्‍याच्‍या शेंगा, लाल भोपळ्‍याचे एक काप कुकरला एकत्र शिजवुन घ्यावा. शिजल्यावर कांदा, टोमॅटो आणि थोडी डाळ मिक्सरमधुन वाटुन घ्यावी. उरलेली डाळ घोटुन त्यात वाटलेले मिश्रण घालावे. गरजेप्रमाणे पाणी घालावे आणि एका जाड बुडच्या पातेल्यात उकळण्यासाठी ठेवावे. त्यात मीठ, तिखट, सांबार मसाला, चिंचेचा कोळ घालावा. उरलेला कांदा पातळ उभा कापुन उकळत्या सांबारमधे घालावा. सांबार उकळत आले की तेलात जिरे, मोहोरी, हिंग, कढिपत्ता, लाल मिरच्या घालुन फोडणी करुन त्यात ओतावी. एक उकळी आणुन गॅस बंद करावा.


आजच्‍या जागतिक इडली दिवसानिमित्त इडलीचा आस्‍वाद घ्‍यायला विसरु नका.


********************************

30 मार्च भास्कर सोमण यांचा स्मृतिदिन

 ********************************


*३० मार्च - माजी व्हाईस अ‍ॅडमिरल भास्कर सोमण यांचा जन्मदिन*


********************************


जन्म - ३० मार्च १९१३ (ग्वालीयर)

स्मृती - ८ फेब्रुवारी १९९५


माजी व्हाईस अ‍ॅडमिरल भास्कर सोमण यांचा आज जन्मदिन.


स्वतंत्र भारताचे दुसरे नौदलप्रमुख. वयाच्या अठराव्या वर्षी सोमण यांची रॉयल इंडियन मरिनसाठी निवड झाली आणि त्यांना प्रशिक्षणासाठी ग्रेट ब्रिटनला पाठविण्यात आले. अडीच वर्षांच्या प्रशिक्षणानंतर ऑगस्ट १९३४ ला सब लेफ्टनंट म्हणून ते तत्कालीन भारतीय नौदलात प्रविष्ट झाले. 


१९३९-४० दरम्यान दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ते फर्स्ट लेफ्टनंट होते. तांबडा समुद्र व इराणचे आखात यांमध्ये हिज मॅजेस्टिज इंडियन शिप (HMIS) ‘कॉर्नवॉलिस’ या युद्धनौकेचे कमांडिंग ऑफिसर म्हणूनही त्यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली. 


इटालियन पाणबुडी ‘गॅलिलिओ गॅलिलाय ‘ला एडन जवळ पकडण्यात सोमण यांचा सिंहाचा वाटा होता. त्यानंतर त्यांनी १९४२ मध्ये रॉयल इंडियन नेव्हीच्या HMIS ‘खैबर’ या फ्लीट माइन स्वीपरची अधिकारसूत्रे स्विकारली. दक्षिणेत रामेश्वरजवळील मंडपम येथे कार्यरत असलेल्या ‘हमला’ या भारतीय नौसेनेच्या प्रशिक्षण केंद्रावर त्यांची वरिष्ठ निदेशक व प्रशिक्षक म्हणून निवड झाली (१९४३). तिचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे भूसेना व नौसेना यांच्या संयुक्त कारवाईचे प्रशिक्षण देणे. 


२६ ऑगस्ट १९४५ रोजी त्यांची मुंबईतील ड्राफ्टिंग ऑफिसमध्ये ड्राफ्टिंग कमांडर या पदावर नियुक्ती झाली. या पदावर नेमले जाणारे ते पहिले भारतीय अधिकारी होते. तसेच जून १९४७ मध्ये पहिले भारतीय अधिकारी म्हणून ॲक्टिंग कॅप्टन या पदावर त्यांची नियुक्ती झाली होती. १९४९ मध्ये HMIS ‘जमुना’ या युद्धनौकेचे ते कमांडिंग ऑफिसर झाले. त्यानंतर ७ ऑक्टोबर १९५१ रोजी इंडियन नॅव्हल शिप खख (INS) ‘दिल्ली’ या नौसेनेच्या त्यावेळच्या सर्वांत मोठ्या युद्धनौकेचे कमांडिंग ऑफिसर म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. 


विशाखापटनम् येथील INS ‘सिरकर्स’ या नौदलाच्या प्रशिक्षण केंद्राची ११ डिसेंबर १९५१ रोजी त्यांनी अधिकारसूत्रे स्विकारली. तसेच ऑफिसर-इन-चार्ज ईस्ट कोस्ट ही भारताच्या पूर्व समुद्रतटाच्या प्रमुखाची जबाबदारीही त्यांनी स्विकारली.


भारतीय नौदलाच्या वेंडुतुथी (कोचीन) येथील सर्वांत मोठ्या प्रशिक्षण केंद्रावर सोमणांची कमोडोर इन चार्ज (कॉमचिन) या नौदलातील पहिली ‘फ्लॅग रँक’ असलेल्या पदावर नियुक्ती झाली (१९५४). त्यानंतर १९५६-५७ मध्ये त्यांची मुंबई बंदराचे कमोडोर इन चार्ज (कॉम्बे) या पदावर नियुक्ती झाली. या पदावर त्यांनी दीड वर्षे काम केले. त्यानंतर त्यांना रिअर ॲडमिरल या पदावर पदोन्नती मिळाली. 


एप्रिल १९६० मध्ये त्यांची फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इंडियन फ्लीट (फोसिफ) या पदावर नियुक्ती करण्यात आली. फोसिफ झाल्यावर सोमणांनी सर्वप्रथम INS ‘म्हैसूर ‘चा कार्यभार सांभाळला. त्यामुळे ते फोसिफ म्हैसूर या नावाने ओळखले जाऊ लागले. यानंतर पदोन्नती मिळून ते स्वतंत्र भारताचे दुसरे नौदलप्रमुख झाले (५ जून १९६२). तत्पूर्वी गोवा मुक्ती संग्रामातील ‘ऑपरेशन विजय’ मोहिमेत नौदलाची सर्व जबाबदारी सोमणांकडेच होती. भारतीय नौसेनेला १९६५ च्या भारत-पाक युद्धात विशेष भूमिका बजावता आली नाही. जून १९६६ मध्ये नौदलातील प्रदीर्घ सेवेतून ते निवृत्त झाले.


ॲडमिरल सोमण निवृत्तीनंतर पुण्यात स्थायिक झाले. त्यांना भारत सरकारने निवृत्तीनंतर भारतातील एका छोट्या राज्याचे राज्यपालपद व परदेशात भारताचे राजदूतपद या दोन उच्चपदाचे प्रस्ताव पाठविले; परंतु ती दोन्हीही पदे त्यांनी नाकारली आणि आपले उर्वरित आयुष्य सामाजिक कार्यात व्यतीत केले.


सोमण यांचे ८ फेब्रुवारी १९९५ रोजी निधन झाले.


मा.सोमण यांना आदरांजली !

संकलन गजानन गोपेवाड


संदर्भ : पित्रे शशिकान्त / मराठी विश्वकोश


********************************

तेजोमय गणिती विदुषी

 *_🔭मराठी विज्ञान परिषदेचे🔬_*


           🤔 *_कुतूहल_* 🤔


🎯 *_तेजोमय गणिती विदुषी_*

************************


_आज आपण सोफी जर्मेन या विलक्षण फ्रेंच गणिती महिलेविषयी जाणून घेऊ. त्यांचा जन्म १ एप्रिल १७७६ रोजीचा. वडील श्रीमंत रेशीम व्यापारी होते त्यांचा मोठा ग्रंथसंग्रह होता. फ्रेंच राज्यक्रांतीचे ते दिवस असल्यामुळे बाहेरच्या अस्थिर वातावरणात वावरणे धोकादायक होते. त्यामुळे लहानगी सोफी घरी पुस्तके वाचत बसे. गणितात गढून गेलेल्या आर्किमिडीज्च्या दुर्दैवी मृत्यूची गोष्ट एका पुस्तकात वाचून तिच्या मनात गणिताचे आकर्षण निर्माण झाले. तिने गणिताचा अभ्यास सुरू केला. दिवसरात्र त्यातच मग्न. आई-वडिलांना काळजी वाटू लागली. त्यांनी तिच्या मेणबत्त्या, उबेची शेगडी, एवढेच काय उबदार कपडेही काढून घेतले, की जेणेकरून ती अभ्यासापासून परावृत्त होईल. पण ती मेणबत्तीचे तुकडे गोळा करून, चादरी अंगाभोवती लपेटून अभ्यास करू लागली._

     _अखेर आई-वडिलांचा नाइलाज झाला. फ्रान्समध्ये १७९४ साली सुप्रसिद्ध इकल पॉलिटेक्निकची स्थापना झाली. पण मुलींना तेथे तेव्हा प्रवेश नव्हता. मात्र, वडिलांच्या ओळखीमुळे सोफी यांना व्याख्यानांची टिपणे मिळण्याची व्यवस्था झाली. त्यांनी ‘ल ब्लांक’ हे पुरुषी टोपणनाव वापरून गणिती लाग्रांज यांना आपले गणितातील काम पाठवले. ते पाहून लाग्रांज इतके प्रभावित झाले, की त्यांनी प्रत्यक्ष भेटीला बोलावले. आता सोफी जर्मेनना आपली खरी ओळख उघड करावी लागली, पण लाग्रांजनी मदतच केली._

     _सोफी यांनी अंकशास्त्र आणि तन्यता (इलॅस्टिसिटी) या क्षेत्रांत काम केले. पुढे गाऊस या थोर गणितज्ञाशी पत्रव्यवहार सुरू केला. सुरुवातीस ‘ल ब्लांक’ या नावानेच पत्रे लिहिली. पुढे फ्रेंच-जर्मन युद्धकाळात, गाऊसना खरा पत्रकर्ता कोण हे कळले. त्यांनीही सोफींना प्रोत्साहन दिले. सोफींनी फर्माच्या शेवटच्या प्रमेयावर मूलभूत काम केले. जर ‘प’ आणि ‘(२प + १)’ या विषम मूळ संख्या असतील, तर अशा घातांकासाठी त्या प्रमेयाचा एक भाग सिद्ध केला. अशा संख्येला ‘सोफी जर्मेन मूळ संख्या’ म्हणतात. उदाहरणार्थ : ३, ५, ११, २३…_

     _१८१६ साली सोफी जर्मेनना कंपनांवरील शोधलेखासाठी पॅरिसच्या विज्ञान अकादमीचे बक्षीस मिळाले. त्यांचे संशोधन आयफेल टॉवरच्या उभारणीत वापरले गेले. पण केवळ स्त्री म्हणून, त्यावरील श्रेयनामावलीत त्यांचे नाव कोरलेले नाही. गाऊस यांच्या प्रयत्नांमुळे सोफींना जर्मन विद्यापीठाची डॉक्टरेटची पदवी मान्य झाली होती; पण ती मिळण्यापूर्वीच कर्करोगाने १८३१ साली सोफी यांचा मृत्यू झाला. गणिती स्त्री संशोधकांचा मार्ग थोडाफार सुकर होण्यात सोफी यांच्या अथक प्रयत्नांचा महत्त्वाचा वाटा आहे. म्हणूनच म्हणावेसे वाटते_


_‘तू मेणबत्तीचे तुकडे गोळा करून_


_गणित करता करता_


_स्वत:च मेणबत्ती होऊन गेलीस,_


_म्हणून प्रकाश पाहिला आम्ही’_



*~~~~~~~~~~~~~~~~~~*

*_संकलन : गजानन गोपेवाड*

*~~~~~~~~~~~~~~~~~~*

 *_📡 जय विज्ञान 🔬_*


अँस्पिरीन कशासाठी वापरतात

 *_आजची माहिती_*


📙 *_ॲस्पिरिन कशासाठी वापरतात ?_* 📙 

************************************


_सध्याच्या काळात अॅस्पिरिनचा उपयोग ठाऊक नसलेला माणूस सापडणे ही बाब परग्रहावर जीवसृष्टी सापडण्याइतकीच कठीण आहे ! पण तरीही या औषधाचा योग्य वापर कसा करायचा, या गोळीचे दुष्परिणाम काय होऊ शकतात याची शास्त्रशुद्ध माहिती मात्र फारच थोडय़ा जणांना असते._

     _अॅस्पिरिन या औषधातील मूलभूत घटक म्हणजे अॅसेटाइल सॅलिसिलीक अॅसिड. एका गोळीत त्याचे प्रमाण ३०० मिलीग्रॅम इतके असते अॅस्पिरिनचा वापर डोकेदुखी, अंगदुखी, सांधेदुखी, दातदुखी, कानदुखी, मासिक पाळीच्यावेळी होणारी पोटदुखी, मुक्कामार लागल्यावर, लचक, मुरगळणे इत्यादीसाठी वेदनाशामक म्हणून होतो. या खेरीज ताप कमी होण्यासाठी सूज कमी होण्यासाठीही ॲस्पिरिन वापरतात. ॲस्पिरिन हे एक स्वस्त असे बहुगुणी औषध आहे. परंतु अॅस्पिरीनचे काही दुष्परिणाम होऊ शकतात पोटात आम्लता वाढते जळजळ होते. मळमळ आंबट ढेकर उलटी क्वचित उलटीतून रक्त पडणे अशी लक्षणेही दिसून येतात. अॅस्पिरीनचे वावडे असणाऱ्यास खाज सुटणे दम लागणे अशी लक्षणे दिसतात ॲस्पिरिनमुळे रक्तस्रावाची प्रवृत्ती वाढते. अॅस्पेरीनचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी गोळी रिकाम्यापोटी घेऊ नये एकतर काहीतरी खाऊन मगच घ्यावी किंवा एक ग्लास पाणी त्याबरोबर थोडासा खायचा सोडा घेऊन मगच घ्यावी आम्लपित्ताचा त्रास असेल जठरात अल्सर असेल रक्तस्रावाची प्रवृत्ती असेल किंवा गरोदरपणात दिवस भरत आले असतील तर ही गोळी घेऊ नये. अॅस्पिरीनमुळे ताप, सूज, वेदना कमी झाल्या तरी मूळ रोग बरा होत नाही. त्यामुळे मूळ रोगावर उपचार करणे जास्त महत्त्वाचे ठरते. दम्याच्या रुग्णांनी ही गोळी घेताना विशेष काळजी घ्यावी लागते. शक्यतो न घेतलेलीच बरी._

*~~~~~~~~~~~~~~~~~~*

*_संकलन : गजानन गोपेवाड

*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*

*_डॉ.जगन्नाथ दीक्षित, डाॅ.अंजली दीक्षित_*

_यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून_

सचिवांची उत्पती

 *_आजची माहिती_*


📙 *सजीवांची उत्पत्ती* 📙

***********************


_'सजीवाचा जन्म पृथ्वीवर कसा झाला असेल?' या प्रश्नाने अनेक वर्षे असंख्य शास्त्रज्ञांची झोप उडवलेली आहे. हे शास्त्रज्ञ विविध क्षेत्रात काम करणारे आहेत, पण या प्रश्नाचे नेमके उत्तर आजही ठामपणे देता येत नाही. मात्र एक गोष्ट आता स्वच्छपणे स्पष्ट होऊ लागली आहे. सजीव म्हणजे काय? तर स्वतःच प्रतिकृतीप्रमाणे नवीनास जन्म देण्याची शक्ती असलेली ऑर्गेनिक गोष्ट वा सेंद्रियवस्तू. सर्व सजीव हे मुख्यतः प्राणवायू, हायड्रोजन, नायट्रोजन व कार्बन यांच्या अणूंनी बनलेले असतात, हेही आता कळलेले आहे. जसजसे या सजीवांच्या शरीरातील पेशींबद्दल ज्ञान वाढत जाऊ लागले, तसतसे एका ठाम निष्कर्षाला सर्व शास्त्रज्ञ येऊन पोहोचले. सर्व जगातील डीएनएचा रेणू डीऑक्सी रायबोन्यूक्लिक अॅसिडचा रेणू हा सजीवांच्या उत्पत्तीला कारणीभूत आहे कारण स्वतःसारखीच तंतोतंत निर्मिती करण्याची क्षमता या डीएनएच्या रेणूतच आहे. डीएनएचा रेणू म्हणजे थायमिन, अॅडेनिन, सायटोसीन, ग्वानिन यांसारख्या रासायनिक जोड्यांनी बनलेली सलग पिळाची मालिकाच असते. एखाद्या शिडीला पीळ दिल्यावर कसे दिसेल, तशी ही मालिका दिसते. यालाच डीएनए हेलिक्स असा शब्द वापरला जातो. रासायनिक प्रथिनांच्या या जोड्या जेव्हा उलगडतात, तेव्हा प्रत्येक जोडीतील एक भाग दुसऱ्या भागाची उपलब्ध द्रव्यातून निर्मिती करतो. यातूनच चक्क २ प्रतिकृती निर्माण होत जातात. डीएनएच्या उलगड्यातुन नवनिर्मिती होत जाते व ती अगदी तंतोतंत मूळच्या गोष्टीची प्रतिकृतीच असते. जेव्हा हा शोध लागला. तेव्हा सजीवांच्या उत्पत्तीचे कूट सोडवण्याच्या दृष्टीने एक मोठा पल्ला गाठला गेला._

     _पृथ्वीच्या निर्मितीनंतर डीएनए निर्माण होण्यासाठी आवश्यक अशी सर्व सेंद्रियद्रव्ये उपलब्ध होतीच. जेव्हा अल्ट्रा व्हाॅयलेट किरण अशा द्रव्यसमुच्चयातून जातात, तेव्हा किंवा विजेचा प्रवाह या द्रव्यसमुच्चयातून जातो, तेव्हा विविध स्वरूपाची सेंद्रिय वा ऑर्गेनिक संयुगे निर्माण होतात. असेच संयुग म्हणून डीएनए निर्माण झाला असावा, असा सध्याचा कयास आहे. यालाच 'अोपॅरीन व हाल्डेन यांची सजीव उत्पत्तीची थेअरी' म्हणतात. पहिल्या डीएनएची निर्मिती झाल्यानंतरचे काम खूपच सुकर होते. या डीएनएचे पुनरुत्पादनाचे म्हणजेच स्वतःची प्रतिकृती करायचे काम जोराने सुरू झालेले होतेच. यातूनच प्रथम प्राणवायूशिवाय वाढणारे जीवाणू निर्माण झाले असावेत. या ऍनेरोबिक जीवाणूंपासून २ वेगळ्या प्रकारच्या, प्राणवायू घेऊन वाढणार्‍या एरोबिक जिवाणूंचा जन्म झाला. एका प्रकारचे जीवाणू सूर्यप्रकाश व प्राणवायू यांचा वापर करून वाढू लागले. या प्रकारचेच पुढे वनस्पतीजीवनातील प्रकाशापासून अन्ननिर्मिती करणाऱ्या क्लोरोप्लास्टमध्ये रूपांतर झाले. दुसऱ्या प्रकारच्या जीवाणूंपासून केंद्रक असलेल्या पेशींची निर्मिती झाली._

     _केंद्रात असलेली पेशी (Nucleated Cell) जेव्हा निर्माण झाली, तेव्हा तिच्यातून वनस्पतीयपेशी, प्राणिजपेशी असे प्रकार जन्माला आले. वनस्पती पेशींना घट्ट अशी बाह्य़आवरणे असतात, तर प्राणिजपेशींना तसे आवरण नसते. तसेच वनस्पतीय पेशीत क्लोरोप्लास्ट हे द्रव्य असते, तर प्राणिजपेशीत ते नसते. यातूनच नंतर विशिष्ट कामे करणाऱ्या पेशींची निर्मिती होत जाऊन सजीवांचे विविध प्रकार तयार होत गेले. सजीवांची उत्पत्ती कधीची असावी? किमान साडेतीन अब्ज वर्षांपूर्वीचे अवशेष सध्या उपलब्ध आहेत. सजीवाच्या शरीरातील कार्बन आयसोटोप व खडकातील कार्बन आयसोटोप यांच्या निरीक्षणावरून हे निष्कर्ष काढले गेले आहेत फक्त पृथ्वीवरच जीवसृष्टी आहे काय सध्या दुसरीकडे कुठे सजीवसृष्टी असल्याचा आपल्या हाती तरी पुरावा आलेला नाही._

*~~~~~~~~~~~~~~~~~~*

*_संकलन : गजानन गोपेवाड

*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*

*_सृष्टी विज्ञानगाथा विज्ञान व दिनविशेष मधून_*

Featured Post

व्यायाम व योगा अवश्य करावा*

*व्यायाम व योगा अवश्य करावा*  *व्यायाम व योगा करण्याचे दहा फायदे:-*  1) व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते: व्यायाम करणारी...