मंगळवार, ६ एप्रिल, २०२१

गर्भजल चिकित्सा

 *_आजची माहिती_*


📕 *_गर्भजलचिकित्सा_* 📕

***********************

_●गर्भावरणाभोवती असलेल्या उल्बी द्रवाची चिकित्सा. हे एक वैद्यकीय चिकित्सा तंत्र असून यामार्फत गर्भाच्या गुणसूत्रांमधील अपसामान्यता आणि संसर्ग यांचे जन्माअगोदर निदान केले जाते._

_●गर्भाभोवती असलेल्या गर्भावरणामुळे गर्भाचे संरक्षण होते. गर्भावरणाभोवती एक आवरण असते._

_●या आवरणाला उल्ब आवरण म्हणतात. गर्भावरण आणि उल्ब आवरण यांच्यामध्ये गर्भजल असते. गर्भजलात गर्भऊती असतात._

_●यातील थोडेसे गर्भजल काढून त्याच्यातील आनुवंशिक दोष पाहण्यासाठी गर्भाच्या डीएनएनचे (डीऑक्सिरिबोन्यूक्लिइक आम्लाचे) परीक्षण केले जाते._

_●गर्भजल चिकित्सा करताना मातेला स्थानिक बधिरक दिले जाते आणि तिच्या उदरात सुई टोचून ती उल्बापर्यंत नेली जाते. श्राव्यातीत (अल्ट्रासॉनिक) लहरींच्या साहाय्याने सुई उल्बात टोचण्याची जागा गर्भापासून दूर राहील हे पाहिले जाते. नंतर त्या जागेतून साधारण २० मिलि. गर्भजल बाहेर काढले जाते. मिळालेल्या नमुन्यातून गर्भाच्या पेशी वेगळ्या केल्या जातात आणि ऊती संवर्धन तंत्राने त्यांची वाढ केली जाते. सूक्ष्मदर्शकाखाली या पेशीतील गुणसूत्रांचे त्यांच्यातील विकृती पाहण्यासाठी निरीक्षण केले जाते. त्यांतून मुख्यत्वे डाऊन सिंड्रोम, एडवर्ड सिंड्रोम व टर्नर सिंड्रोम या गुणसूत्रांच्या विकृती पाहिल्या जातात._

_●साधारणतः २४ ते ४८ तासांत उल्बाची जखम भरून येते. तसेच या अवधीत गर्भाजलाची पातळी पूर्ववत होते._

_●गर्भजलचिकित्सा गर्भारपणाच्या १६ ते २० आठवड्यांत करता येते. त्याआधी गर्भजल चिकित्सा केल्यास गर्भपाताचा धोका असतो, तसेच अर्भकाच्या अवयवांना इजा होऊ शकते. हा धोका कमीत कमी करण्यासाठी ही चिकित्सा बहुधा १८ व्या आठवड्यात करतात._

_●३५ वर्षांहून कमी वयाच्या स्त्रीच्या गर्भामधील दोषांचे प्रमाण कमी असल्यामुळे आणि कुटुंबामध्ये गुणसूत्रामधील दोषांचा वैद्यकीय इतिहास नसेल, तर या वयातील गरोदर स्त्रियांना ही चिकित्सा करून घेण्याचा सल्ला दिला जात नाही. मात्र प्रौढ गरोदर स्त्रियांमध्ये अर्भकात गुणसूत्र दोष होण्याचे सरासरी प्रमाण वाढत जाते. तसेच गरोदरपणात मातेला मधुमेह असल्यास गर्भजलचिकित्सेचा सल्ला दिला जातो._

_●गर्भजलचिकित्सा गरोदरपणाच्या योग्य कालावधीत केल्यास गर्भाच्या डोक्याची अपुरी वाढ (अ‍ॅनेसेफाली), पाठीचा दुभंगलेला कणा (स्पिना बायफीडा), डाऊन सिंड्रोम अशा गुणसूत्रांच्या दोषाचे निदान करता येते. ही चिकित्सा गरोदरपणात नंतरच्या कालावधीत केल्यास गर्भाला झालेला संसर्ग, फुप्फुसांची अपुरी वाढ, माता आणि बालक यांच्या रक्तातील आरएच घटक न जुळणे अशा अन्य प्रकारच्या समस्य़ांचेही निदान होऊ शकते._

_●जगभर चालू असलेल्या संशोधनातून असे दिसून आले आहे की, उल्ब द्रवातून मध्यजनस्तर, रक्तनिर्मिती, चेता, अभिस्तर आणि अंतःस्तरातील मूलपेशींचा उत्तम स्रोत उपलब्ध होऊ शकतो. हृदय, यकृत, वृक्क (मूत्रपिंड) आणि प्रस्तिष्क ऊतींमध्ये दोष निर्माण झालेल्या रुग्णांसाठी उल्ब द्रवापासून मिळालेल्या ऊती उपकारक ठरू शकतात._

_●गर्भजलचिकित्सा ही गर्भामधील गुणसूत्र दोष आणि गर्भलिंग निश्चित करण्यासाठी अचूक आणि विश्वासार्ह चाचणी आहे. मात्र या चिकित्सेद्वारे लिंग निश्चिती करण्यास कायद्याने बंदी आहे._

_लेखक : मोहन मद्वाण्णा_

*~~~~~~~~~~~~~~~~~~*

*_संकलन : गजानन गोपेवाड_*

*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*

*_डॉ.जगन्नाथ दीक्षित, डाॅ.अंजली दीक्षित_*

_यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून_

30 मार्च भुल औषध

 *🎧आज 🎧*


*३० मार्च १८४२*


*📙अमेरिकन सर्जन डॉ. क्रॉफर्ड लॉंग यांनी भूल देणारे औषध म्हणजेच 'एनेस्थेसिया' चा वापर सर्वप्रथम एका रुग्णाच्या ब्रेनटयूमर शस्त्रक्रियेसाठी केला.📙*

***************************************


_संज्ञाहरण (एनेस्थेशिया) या संज्ञाहीनता (वर्तनी में अंतर देखें; ग्रीक के αν- से व्युत्पन्न, an-, "बिना"; और αἴσθησις, aisthēsis, "संवेदन"), का पारंपरिक अर्थ है संवेदनशीलता (दर्द महसूस करने सहित) महसूस करने की स्थिति का अवरोधन अथवा अस्थायी रूप से हरण. यह औषधीय प्रेरित होती है और शब्दस्मृतिलोप, पीड़ाशून्यता, सजगता की हानि, कंकालीय मांसपेशी प्रतिक्रिया या कम तनाव प्रतिक्रिया या सभी के साथ अनुवर्ती हैं। यह रोगियों को तनाव तथा दर्द महसूस किये बिना शल्यक्रिया से गुजरने की अनुमति देती है। एक वैकल्पिक परिभाषा है "प्रतिवर्ती जागरूकता की कमी" जिसमें जागरूकता का पूर्ण रूप से अभाव होता है (उदाहरण स्वरूप एक सामान्य चेतनाशून्य करने वाली औषधी), या शरीर के किसी एक भाग में चेतना का अभाव है जैसे रीढ़ में चेतनालोप. एनेस्थेसिया शब्द का गठन, वर्ष 1846 में ऑलिवर वेंडेल होम्स, सीनियर ने किया था।_

     _संज्ञाहरण के प्रकारों में स्थानीय संज्ञाहरण, क्षेत्रीय संज्ञाहरण, सामान्य संज्ञाहरण और अलग करनेवाली संज्ञाहरण शामिल हैं। स्थानीय संज्ञाहरण शरीर के एक विशिष्ट स्थान के भीतर संवेदना बोध को रोकता है जैसे दांत या मूत्राशय. शरीर के एक भाग और रीढ़ की हड्डी के बीच तंत्रिका आवेगों के संचारण को अवरूद्ध करने के द्वारा क्षेत्रीय संज्ञाहरण शरीर के एक बड़े क्षेत्र को घेरे में लेता है। क्षेत्रीय संज्ञाहरण के दो अक्सर प्रयुक्त होने वाले प्रकार हैं रीढ़ संज्ञाहरण और एपीड्यूरल संज्ञाहरण. सामान्य संज्ञाहरण मस्तिष्क के स्तर पर संवेदन, मोटर और तंत्रिका संचरण को रोकते हैं जिसके परिणामस्वरूप बेहोशी और संवेदन का अभाव होता है।[2] अलग करनेवाला संज्ञाहरण एजेंट का प्रयोग करता है जो कि दिमाग के उच्च केन्द्र (जैसे मस्तिष्क प्रांतस्था के रूप में) और निम्न केन्द्र जैसे लिम्बिक प्रणाली के भीतर पाया जाता है, के बीच तंत्रिका आवेगों के संचरण को रोकता है।_

*~~~~~~~~~~~~~~~~~~*

*_संकलन : गजानन गोपेवाड_*

*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*

*_सृष्टी विज्ञानगाथा विज्ञान व दिनविशेष मधून_*




30 मार्च जागतिक डॉक्टर दिवस

 ********************************


    *३० मार्च - जागतिक डॉक्टर दिन*


********************************


आज जागतिक डॉक्टर दिन !


आपण भारतात १ जुलै रोजी "राष्ट्रीय डॉक्टर दिवस" साजरा करतो.


सध्याच्या धावपळीच्या युगात अनारोग्य हा कळीचा मुद्दा आहे. जसे आईशी आपले नाते असते तसेच ते आपल्या डॉक्टरशी असते. कोणत्याही आरोग्य विषयक तक्रारीसाठी आपण ज्या व्यक्तीवर अवलंबून असतो ती व्यक्ती म्हणजे डॉक्टर. 


डॉक्टरांचा व्यवसाय आजही एक उदात्त व्यवसाय समजला जातो. आपणापैकी सगळ्याच लोकांचा डॉक्टरांशी आयुष्यात अनेकदा संबंध येतो. वैद्यकीय क्षेत्रात आपल्या मागण्यांसाठी डॉक्टरांची सततची होणारी आंदोलने, उपोषणे आणि या घटनांचे सर्वसामान्यांवर होणारे दुष्परिणाम तसंच इतर क्षेत्रांप्रमाणेच या क्षेत्रातही बोकाळलेला भ्रष्टाचार. तत्सम असंख्य गोष्टींमुळे एकूणच वैद्यकीय व्यवस्थेबद्दलचं सर्वसामान्यांचं मत काहीसं कलुषित झालेलं दिसतं. असं असताना आज हा दिवस नव्याने डॉक्टर-रुग्ण या नात्यातील विश्वासार्हता दृढ करण्याच्या उद्देशाने साजरा केला गेल्यास भविष्यात आंदोलनाप्रसंगी सर्वसामान्यांना वेठीस न धरण्याचे आशादायी चित्र आपण रंगवू शकतो. 


मुळात, समाजात चांगल्या-वाईट प्रवृत्ती समाजाच्या सर्वच स्तरावर आहेत. डॉक्टरही माणूस आहे, हे आपण विसरून चालणार नाही. आपल्या कर्तव्याप्रती दक्ष असणाऱ्या, दिनरात्रीची तमा न बाळगता सेवेसाठी तत्पर असणाऱ्या आणि संशोधनातून वैद्यकीय क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणाऱ्या तसंच कित्येकांना नवं जीवनदान देणाऱ्या अनेक डॉक्टरांची उदाहरणं आजही आपल्या आसपास दिसतात. त्यामुळे डॉक्टरांचा व्यवसाय आजही एक उदात्त व्यवसाय समजला जातो. 


आपणापैकी सगळ्याच लोकांचा डॉक्टरांशी आयुष्यात अनेकदा संबंध येतो. आज हा दिवस त्या चांगल्या गोष्टींची आठवण करण्याचा. आपल्या डॉक्टरांनी आतापर्यंत आपल्या जीवनात सुदृढ आरोग्यासाठी केलेल्या मदतीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा. 


आतापर्यंत आपल्या आरोग्याची वेळोवेळी काळजी घेत आलेल्या आपल्या डॉक्टरांना आजच्या जागतिक डॉक्टर दिना निमित्त त्यांच्याही उत्तम स्वास्थ्यासाठी आरोग्यदायी शुभेच्छा !

संकलन गजानन गोपेवाड


संदर्भ : इंटरनेट


********************************

30 मार्च जागतिक इडली दिवस

 ********************************


   *३० मार्च - जागतिक इडली दिवस*


********************************


आज जागतिक इडली दिवस. ३० मार्च हा दिवस जगभरात इडली दिवस म्हणून साजरा केला जातो.


जगभरात इडली अतिशय लोकप्रिय आहे. इडली नि सांबार हा प्रकार प्रत्येकालाच आवडतो. मुंबईत तर अगदी वडापाव प्रमाणेच इडलीवर जगणारे असंख्य लोक आहेत. सकाळी वेगवेगळ्या नाक्यावर हे इडलीवाले इडली विकत उभे असतात. या इडलीवाल्यांकडील चटणी, सांबारची एक वेगळीच चव असते. याबरोबर डाळवडा, मेदू वडा यांच्याकडे चवीने खाल्ला जातो.


इडली सांबार, इडली चटणी सर्वांना आवडणारा पदार्थ आहे. इडलीचा जेव्‍हा विषय येतो तेव्‍हा अप्रत्‍यक्षपणे साऊथचे म्‍हणजे दक्षिण भारताचे नाव समोर येते. मात्र वास्‍तवात इडली इंडोनेशियातून भारतात आलेली आहे. इडलीला खूप जूना इतिहास आहे. 


पाक शास्त्राचा अभ्‍यास करणार्‍यांच्‍या मते ८०० ते १२०० इ.पूर्व मध्‍ये भारतात इडली आली आहे. 'इडली' शब्‍दाची निर्मिती 'इडलीग' यापासून झाली होती. याचा उल्‍लेख 'कन्‍नड' साहित्‍यात आढळतो.


जागतिक इडली दिवस मागच्‍या ३ वर्षापासून साजरा केला जात आहे. या दिवसाची सुरुवात 'एम एनियावन' यांनी केली. एम एनियावन हे 'मल्लीपू इडली' चे संस्‍थापक आहेत. थोरांपासून ते लहानांच्‍यापर्यंत इडली सर्वांसाठी सुरक्षीत खाद्य आहे. 


एनियावन यांच्‍या मते, फादर डे, मदर डे असे डेज आपण साजरे करतो त्‍याचप्रमाणे मला वाटले की, इडली दिवसपण साजरा करायला हवा. मात्र फेरीवाल्‍या पासून ते हॉटेल पर्यंत इडली विक्रेत्‍ये जागतिक इडली दिवस साजरा केला जातो याविषयी अजून म्‍हणावी तेवढी माहिती पोहचलेली नाही.


ईडली हा मूळ भारताच्या दक्षिणेकडील प्रदेशातून आलेला आणि भारतभर लोकप्रिय झालेला तांदळाचा एक खाद्यपदार्थ आहे. तांदूळ आणि उडदाची डाळ, किंवा तत्सम पदार्थ आंबवून आणि वाटून झालेल्या घट्टसर लगद्याच्या चकत्या वाफेवर उकडून इडली बनवली जाते. इडली बरोबर सांबार आणि ओल्या खोबऱ्याची चटणी खातात. आंबवल्यामुळे इडलीची चव किंचित आंबट असते. 


दक्षिणी भारतात इडली भरपूर प्रमाणात खाल्ली जाते. महाराष्ट्रा मध्ये सुद्धा ही इडली नाष्ट्यासाठी बनवली जाते. हल्‍ली रव्‍याची इडली देखील बनवली जाते.


*कशी बनवायची इडली* :


३ वाट्या तांदूळ किंवा इडली रवा 

१ वाटी उडीद डाळ


डाळ आणि तांदूळ किंवा रवा धुवुन वेगवेगळे भिजत घालावे. ६ तासाने डाळ एकदम बारीक वाटावी. डाळ वाटुन होत आली की त्यात तांदूळ किंवा रवा घालुन वाटावे. फूडप्रोसेसर असेल तर त्यात घालुन थोडावेळ फिरवावे. पिठ साधारण भजाच्या पिठासरखे असावे. हे बारीक केलेले पिठ एका मोठ्या पातेल्यात काढून त्यात १/२ कांदा घालुन पिठात बुडेल असा ठेवावा. त्यावर झाकण ठेवुन पातेले उबदार जागी ठेवावे. थंडीत साधारण १०-१२ तासात पीठ फुगुन येते. इडली करत असताना यात चवीनुसार मीठ घालावे. यानंतर इडली पात्रात पीठ घालुन मोठ्या आचेवर कुकरमधे ठेवुन साधारण २० मिनीटे वाफवावे. वर दिलेल्या प्रमाणात साधारण ४०-४५ इडल्या होतात.


इडली म्‍हटले की सांबर आणि चटणी आलेच. यासाठी लागणारे साहित्‍य आणि कृती.


*साहित्‍य* :

१ जुडी कोथिंबीर 

२-३ हिरव्या मिरच्या

१ मुठ शेंगदाणे

१/४ वाटी ओले खोबरे

अर्ध्या लिंबाचा रस

१/२ इंच आल्याचा तुकडा

मीठ, साखर चवीप्रमाणे


*कृती* :

वरील सर्व साहित्य मिक्सरमधे घालुन बारीक वाटावे. गरज लागली तर थोडे पाणी घालावे. यानंतल चटणीला हिंग, जिरे, मोहरी, कढिपत्त्याची फोडणी घालावी.


*सांबार साहित्‍य आणि कृती* :

१ वाटी तुरडाळ

१ मोठा टोमॅटो

१ मध्यम कांदा

२ शेवग्‍याच्‍या शेंगा

लाल भोपळ्‍याचे १ काप 

२-३ टीस्पून सांबार मसाला

मोठ्या लिंबाएवढी चिंच पाण्यात कोळुन चवीप्रमाणे मीठ लाल मिरचीपावडर चवीप्रमाणे फोडणीसाठी तेल, हिंग, जिरे, मोहरी, कढीपत्ता, २-३ लाल सुक्या मिरच्या.


*कृती* :

डाळ, टोमॅटो, १/२ कांदा, शेवग्‍याच्‍या शेंगा, लाल भोपळ्‍याचे एक काप कुकरला एकत्र शिजवुन घ्यावा. शिजल्यावर कांदा, टोमॅटो आणि थोडी डाळ मिक्सरमधुन वाटुन घ्यावी. उरलेली डाळ घोटुन त्यात वाटलेले मिश्रण घालावे. गरजेप्रमाणे पाणी घालावे आणि एका जाड बुडच्या पातेल्यात उकळण्यासाठी ठेवावे. त्यात मीठ, तिखट, सांबार मसाला, चिंचेचा कोळ घालावा. उरलेला कांदा पातळ उभा कापुन उकळत्या सांबारमधे घालावा. सांबार उकळत आले की तेलात जिरे, मोहोरी, हिंग, कढिपत्ता, लाल मिरच्या घालुन फोडणी करुन त्यात ओतावी. एक उकळी आणुन गॅस बंद करावा.


आजच्‍या जागतिक इडली दिवसानिमित्त इडलीचा आस्‍वाद घ्‍यायला विसरु नका.


********************************

30 मार्च भास्कर सोमण यांचा स्मृतिदिन

 ********************************


*३० मार्च - माजी व्हाईस अ‍ॅडमिरल भास्कर सोमण यांचा जन्मदिन*


********************************


जन्म - ३० मार्च १९१३ (ग्वालीयर)

स्मृती - ८ फेब्रुवारी १९९५


माजी व्हाईस अ‍ॅडमिरल भास्कर सोमण यांचा आज जन्मदिन.


स्वतंत्र भारताचे दुसरे नौदलप्रमुख. वयाच्या अठराव्या वर्षी सोमण यांची रॉयल इंडियन मरिनसाठी निवड झाली आणि त्यांना प्रशिक्षणासाठी ग्रेट ब्रिटनला पाठविण्यात आले. अडीच वर्षांच्या प्रशिक्षणानंतर ऑगस्ट १९३४ ला सब लेफ्टनंट म्हणून ते तत्कालीन भारतीय नौदलात प्रविष्ट झाले. 


१९३९-४० दरम्यान दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ते फर्स्ट लेफ्टनंट होते. तांबडा समुद्र व इराणचे आखात यांमध्ये हिज मॅजेस्टिज इंडियन शिप (HMIS) ‘कॉर्नवॉलिस’ या युद्धनौकेचे कमांडिंग ऑफिसर म्हणूनही त्यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली. 


इटालियन पाणबुडी ‘गॅलिलिओ गॅलिलाय ‘ला एडन जवळ पकडण्यात सोमण यांचा सिंहाचा वाटा होता. त्यानंतर त्यांनी १९४२ मध्ये रॉयल इंडियन नेव्हीच्या HMIS ‘खैबर’ या फ्लीट माइन स्वीपरची अधिकारसूत्रे स्विकारली. दक्षिणेत रामेश्वरजवळील मंडपम येथे कार्यरत असलेल्या ‘हमला’ या भारतीय नौसेनेच्या प्रशिक्षण केंद्रावर त्यांची वरिष्ठ निदेशक व प्रशिक्षक म्हणून निवड झाली (१९४३). तिचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे भूसेना व नौसेना यांच्या संयुक्त कारवाईचे प्रशिक्षण देणे. 


२६ ऑगस्ट १९४५ रोजी त्यांची मुंबईतील ड्राफ्टिंग ऑफिसमध्ये ड्राफ्टिंग कमांडर या पदावर नियुक्ती झाली. या पदावर नेमले जाणारे ते पहिले भारतीय अधिकारी होते. तसेच जून १९४७ मध्ये पहिले भारतीय अधिकारी म्हणून ॲक्टिंग कॅप्टन या पदावर त्यांची नियुक्ती झाली होती. १९४९ मध्ये HMIS ‘जमुना’ या युद्धनौकेचे ते कमांडिंग ऑफिसर झाले. त्यानंतर ७ ऑक्टोबर १९५१ रोजी इंडियन नॅव्हल शिप खख (INS) ‘दिल्ली’ या नौसेनेच्या त्यावेळच्या सर्वांत मोठ्या युद्धनौकेचे कमांडिंग ऑफिसर म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. 


विशाखापटनम् येथील INS ‘सिरकर्स’ या नौदलाच्या प्रशिक्षण केंद्राची ११ डिसेंबर १९५१ रोजी त्यांनी अधिकारसूत्रे स्विकारली. तसेच ऑफिसर-इन-चार्ज ईस्ट कोस्ट ही भारताच्या पूर्व समुद्रतटाच्या प्रमुखाची जबाबदारीही त्यांनी स्विकारली.


भारतीय नौदलाच्या वेंडुतुथी (कोचीन) येथील सर्वांत मोठ्या प्रशिक्षण केंद्रावर सोमणांची कमोडोर इन चार्ज (कॉमचिन) या नौदलातील पहिली ‘फ्लॅग रँक’ असलेल्या पदावर नियुक्ती झाली (१९५४). त्यानंतर १९५६-५७ मध्ये त्यांची मुंबई बंदराचे कमोडोर इन चार्ज (कॉम्बे) या पदावर नियुक्ती झाली. या पदावर त्यांनी दीड वर्षे काम केले. त्यानंतर त्यांना रिअर ॲडमिरल या पदावर पदोन्नती मिळाली. 


एप्रिल १९६० मध्ये त्यांची फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इंडियन फ्लीट (फोसिफ) या पदावर नियुक्ती करण्यात आली. फोसिफ झाल्यावर सोमणांनी सर्वप्रथम INS ‘म्हैसूर ‘चा कार्यभार सांभाळला. त्यामुळे ते फोसिफ म्हैसूर या नावाने ओळखले जाऊ लागले. यानंतर पदोन्नती मिळून ते स्वतंत्र भारताचे दुसरे नौदलप्रमुख झाले (५ जून १९६२). तत्पूर्वी गोवा मुक्ती संग्रामातील ‘ऑपरेशन विजय’ मोहिमेत नौदलाची सर्व जबाबदारी सोमणांकडेच होती. भारतीय नौसेनेला १९६५ च्या भारत-पाक युद्धात विशेष भूमिका बजावता आली नाही. जून १९६६ मध्ये नौदलातील प्रदीर्घ सेवेतून ते निवृत्त झाले.


ॲडमिरल सोमण निवृत्तीनंतर पुण्यात स्थायिक झाले. त्यांना भारत सरकारने निवृत्तीनंतर भारतातील एका छोट्या राज्याचे राज्यपालपद व परदेशात भारताचे राजदूतपद या दोन उच्चपदाचे प्रस्ताव पाठविले; परंतु ती दोन्हीही पदे त्यांनी नाकारली आणि आपले उर्वरित आयुष्य सामाजिक कार्यात व्यतीत केले.


सोमण यांचे ८ फेब्रुवारी १९९५ रोजी निधन झाले.


मा.सोमण यांना आदरांजली !

संकलन गजानन गोपेवाड


संदर्भ : पित्रे शशिकान्त / मराठी विश्वकोश


********************************

तेजोमय गणिती विदुषी

 *_🔭मराठी विज्ञान परिषदेचे🔬_*


           🤔 *_कुतूहल_* 🤔


🎯 *_तेजोमय गणिती विदुषी_*

************************


_आज आपण सोफी जर्मेन या विलक्षण फ्रेंच गणिती महिलेविषयी जाणून घेऊ. त्यांचा जन्म १ एप्रिल १७७६ रोजीचा. वडील श्रीमंत रेशीम व्यापारी होते त्यांचा मोठा ग्रंथसंग्रह होता. फ्रेंच राज्यक्रांतीचे ते दिवस असल्यामुळे बाहेरच्या अस्थिर वातावरणात वावरणे धोकादायक होते. त्यामुळे लहानगी सोफी घरी पुस्तके वाचत बसे. गणितात गढून गेलेल्या आर्किमिडीज्च्या दुर्दैवी मृत्यूची गोष्ट एका पुस्तकात वाचून तिच्या मनात गणिताचे आकर्षण निर्माण झाले. तिने गणिताचा अभ्यास सुरू केला. दिवसरात्र त्यातच मग्न. आई-वडिलांना काळजी वाटू लागली. त्यांनी तिच्या मेणबत्त्या, उबेची शेगडी, एवढेच काय उबदार कपडेही काढून घेतले, की जेणेकरून ती अभ्यासापासून परावृत्त होईल. पण ती मेणबत्तीचे तुकडे गोळा करून, चादरी अंगाभोवती लपेटून अभ्यास करू लागली._

     _अखेर आई-वडिलांचा नाइलाज झाला. फ्रान्समध्ये १७९४ साली सुप्रसिद्ध इकल पॉलिटेक्निकची स्थापना झाली. पण मुलींना तेथे तेव्हा प्रवेश नव्हता. मात्र, वडिलांच्या ओळखीमुळे सोफी यांना व्याख्यानांची टिपणे मिळण्याची व्यवस्था झाली. त्यांनी ‘ल ब्लांक’ हे पुरुषी टोपणनाव वापरून गणिती लाग्रांज यांना आपले गणितातील काम पाठवले. ते पाहून लाग्रांज इतके प्रभावित झाले, की त्यांनी प्रत्यक्ष भेटीला बोलावले. आता सोफी जर्मेनना आपली खरी ओळख उघड करावी लागली, पण लाग्रांजनी मदतच केली._

     _सोफी यांनी अंकशास्त्र आणि तन्यता (इलॅस्टिसिटी) या क्षेत्रांत काम केले. पुढे गाऊस या थोर गणितज्ञाशी पत्रव्यवहार सुरू केला. सुरुवातीस ‘ल ब्लांक’ या नावानेच पत्रे लिहिली. पुढे फ्रेंच-जर्मन युद्धकाळात, गाऊसना खरा पत्रकर्ता कोण हे कळले. त्यांनीही सोफींना प्रोत्साहन दिले. सोफींनी फर्माच्या शेवटच्या प्रमेयावर मूलभूत काम केले. जर ‘प’ आणि ‘(२प + १)’ या विषम मूळ संख्या असतील, तर अशा घातांकासाठी त्या प्रमेयाचा एक भाग सिद्ध केला. अशा संख्येला ‘सोफी जर्मेन मूळ संख्या’ म्हणतात. उदाहरणार्थ : ३, ५, ११, २३…_

     _१८१६ साली सोफी जर्मेनना कंपनांवरील शोधलेखासाठी पॅरिसच्या विज्ञान अकादमीचे बक्षीस मिळाले. त्यांचे संशोधन आयफेल टॉवरच्या उभारणीत वापरले गेले. पण केवळ स्त्री म्हणून, त्यावरील श्रेयनामावलीत त्यांचे नाव कोरलेले नाही. गाऊस यांच्या प्रयत्नांमुळे सोफींना जर्मन विद्यापीठाची डॉक्टरेटची पदवी मान्य झाली होती; पण ती मिळण्यापूर्वीच कर्करोगाने १८३१ साली सोफी यांचा मृत्यू झाला. गणिती स्त्री संशोधकांचा मार्ग थोडाफार सुकर होण्यात सोफी यांच्या अथक प्रयत्नांचा महत्त्वाचा वाटा आहे. म्हणूनच म्हणावेसे वाटते_


_‘तू मेणबत्तीचे तुकडे गोळा करून_


_गणित करता करता_


_स्वत:च मेणबत्ती होऊन गेलीस,_


_म्हणून प्रकाश पाहिला आम्ही’_



*~~~~~~~~~~~~~~~~~~*

*_संकलन : गजानन गोपेवाड*

*~~~~~~~~~~~~~~~~~~*

 *_📡 जय विज्ञान 🔬_*


अँस्पिरीन कशासाठी वापरतात

 *_आजची माहिती_*


📙 *_ॲस्पिरिन कशासाठी वापरतात ?_* 📙 

************************************


_सध्याच्या काळात अॅस्पिरिनचा उपयोग ठाऊक नसलेला माणूस सापडणे ही बाब परग्रहावर जीवसृष्टी सापडण्याइतकीच कठीण आहे ! पण तरीही या औषधाचा योग्य वापर कसा करायचा, या गोळीचे दुष्परिणाम काय होऊ शकतात याची शास्त्रशुद्ध माहिती मात्र फारच थोडय़ा जणांना असते._

     _अॅस्पिरिन या औषधातील मूलभूत घटक म्हणजे अॅसेटाइल सॅलिसिलीक अॅसिड. एका गोळीत त्याचे प्रमाण ३०० मिलीग्रॅम इतके असते अॅस्पिरिनचा वापर डोकेदुखी, अंगदुखी, सांधेदुखी, दातदुखी, कानदुखी, मासिक पाळीच्यावेळी होणारी पोटदुखी, मुक्कामार लागल्यावर, लचक, मुरगळणे इत्यादीसाठी वेदनाशामक म्हणून होतो. या खेरीज ताप कमी होण्यासाठी सूज कमी होण्यासाठीही ॲस्पिरिन वापरतात. ॲस्पिरिन हे एक स्वस्त असे बहुगुणी औषध आहे. परंतु अॅस्पिरीनचे काही दुष्परिणाम होऊ शकतात पोटात आम्लता वाढते जळजळ होते. मळमळ आंबट ढेकर उलटी क्वचित उलटीतून रक्त पडणे अशी लक्षणेही दिसून येतात. अॅस्पिरीनचे वावडे असणाऱ्यास खाज सुटणे दम लागणे अशी लक्षणे दिसतात ॲस्पिरिनमुळे रक्तस्रावाची प्रवृत्ती वाढते. अॅस्पेरीनचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी गोळी रिकाम्यापोटी घेऊ नये एकतर काहीतरी खाऊन मगच घ्यावी किंवा एक ग्लास पाणी त्याबरोबर थोडासा खायचा सोडा घेऊन मगच घ्यावी आम्लपित्ताचा त्रास असेल जठरात अल्सर असेल रक्तस्रावाची प्रवृत्ती असेल किंवा गरोदरपणात दिवस भरत आले असतील तर ही गोळी घेऊ नये. अॅस्पिरीनमुळे ताप, सूज, वेदना कमी झाल्या तरी मूळ रोग बरा होत नाही. त्यामुळे मूळ रोगावर उपचार करणे जास्त महत्त्वाचे ठरते. दम्याच्या रुग्णांनी ही गोळी घेताना विशेष काळजी घ्यावी लागते. शक्यतो न घेतलेलीच बरी._

*~~~~~~~~~~~~~~~~~~*

*_संकलन : गजानन गोपेवाड

*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*

*_डॉ.जगन्नाथ दीक्षित, डाॅ.अंजली दीक्षित_*

_यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून_

सचिवांची उत्पती

 *_आजची माहिती_*


📙 *सजीवांची उत्पत्ती* 📙

***********************


_'सजीवाचा जन्म पृथ्वीवर कसा झाला असेल?' या प्रश्नाने अनेक वर्षे असंख्य शास्त्रज्ञांची झोप उडवलेली आहे. हे शास्त्रज्ञ विविध क्षेत्रात काम करणारे आहेत, पण या प्रश्नाचे नेमके उत्तर आजही ठामपणे देता येत नाही. मात्र एक गोष्ट आता स्वच्छपणे स्पष्ट होऊ लागली आहे. सजीव म्हणजे काय? तर स्वतःच प्रतिकृतीप्रमाणे नवीनास जन्म देण्याची शक्ती असलेली ऑर्गेनिक गोष्ट वा सेंद्रियवस्तू. सर्व सजीव हे मुख्यतः प्राणवायू, हायड्रोजन, नायट्रोजन व कार्बन यांच्या अणूंनी बनलेले असतात, हेही आता कळलेले आहे. जसजसे या सजीवांच्या शरीरातील पेशींबद्दल ज्ञान वाढत जाऊ लागले, तसतसे एका ठाम निष्कर्षाला सर्व शास्त्रज्ञ येऊन पोहोचले. सर्व जगातील डीएनएचा रेणू डीऑक्सी रायबोन्यूक्लिक अॅसिडचा रेणू हा सजीवांच्या उत्पत्तीला कारणीभूत आहे कारण स्वतःसारखीच तंतोतंत निर्मिती करण्याची क्षमता या डीएनएच्या रेणूतच आहे. डीएनएचा रेणू म्हणजे थायमिन, अॅडेनिन, सायटोसीन, ग्वानिन यांसारख्या रासायनिक जोड्यांनी बनलेली सलग पिळाची मालिकाच असते. एखाद्या शिडीला पीळ दिल्यावर कसे दिसेल, तशी ही मालिका दिसते. यालाच डीएनए हेलिक्स असा शब्द वापरला जातो. रासायनिक प्रथिनांच्या या जोड्या जेव्हा उलगडतात, तेव्हा प्रत्येक जोडीतील एक भाग दुसऱ्या भागाची उपलब्ध द्रव्यातून निर्मिती करतो. यातूनच चक्क २ प्रतिकृती निर्माण होत जातात. डीएनएच्या उलगड्यातुन नवनिर्मिती होत जाते व ती अगदी तंतोतंत मूळच्या गोष्टीची प्रतिकृतीच असते. जेव्हा हा शोध लागला. तेव्हा सजीवांच्या उत्पत्तीचे कूट सोडवण्याच्या दृष्टीने एक मोठा पल्ला गाठला गेला._

     _पृथ्वीच्या निर्मितीनंतर डीएनए निर्माण होण्यासाठी आवश्यक अशी सर्व सेंद्रियद्रव्ये उपलब्ध होतीच. जेव्हा अल्ट्रा व्हाॅयलेट किरण अशा द्रव्यसमुच्चयातून जातात, तेव्हा किंवा विजेचा प्रवाह या द्रव्यसमुच्चयातून जातो, तेव्हा विविध स्वरूपाची सेंद्रिय वा ऑर्गेनिक संयुगे निर्माण होतात. असेच संयुग म्हणून डीएनए निर्माण झाला असावा, असा सध्याचा कयास आहे. यालाच 'अोपॅरीन व हाल्डेन यांची सजीव उत्पत्तीची थेअरी' म्हणतात. पहिल्या डीएनएची निर्मिती झाल्यानंतरचे काम खूपच सुकर होते. या डीएनएचे पुनरुत्पादनाचे म्हणजेच स्वतःची प्रतिकृती करायचे काम जोराने सुरू झालेले होतेच. यातूनच प्रथम प्राणवायूशिवाय वाढणारे जीवाणू निर्माण झाले असावेत. या ऍनेरोबिक जीवाणूंपासून २ वेगळ्या प्रकारच्या, प्राणवायू घेऊन वाढणार्‍या एरोबिक जिवाणूंचा जन्म झाला. एका प्रकारचे जीवाणू सूर्यप्रकाश व प्राणवायू यांचा वापर करून वाढू लागले. या प्रकारचेच पुढे वनस्पतीजीवनातील प्रकाशापासून अन्ननिर्मिती करणाऱ्या क्लोरोप्लास्टमध्ये रूपांतर झाले. दुसऱ्या प्रकारच्या जीवाणूंपासून केंद्रक असलेल्या पेशींची निर्मिती झाली._

     _केंद्रात असलेली पेशी (Nucleated Cell) जेव्हा निर्माण झाली, तेव्हा तिच्यातून वनस्पतीयपेशी, प्राणिजपेशी असे प्रकार जन्माला आले. वनस्पती पेशींना घट्ट अशी बाह्य़आवरणे असतात, तर प्राणिजपेशींना तसे आवरण नसते. तसेच वनस्पतीय पेशीत क्लोरोप्लास्ट हे द्रव्य असते, तर प्राणिजपेशीत ते नसते. यातूनच नंतर विशिष्ट कामे करणाऱ्या पेशींची निर्मिती होत जाऊन सजीवांचे विविध प्रकार तयार होत गेले. सजीवांची उत्पत्ती कधीची असावी? किमान साडेतीन अब्ज वर्षांपूर्वीचे अवशेष सध्या उपलब्ध आहेत. सजीवाच्या शरीरातील कार्बन आयसोटोप व खडकातील कार्बन आयसोटोप यांच्या निरीक्षणावरून हे निष्कर्ष काढले गेले आहेत फक्त पृथ्वीवरच जीवसृष्टी आहे काय सध्या दुसरीकडे कुठे सजीवसृष्टी असल्याचा आपल्या हाती तरी पुरावा आलेला नाही._

*~~~~~~~~~~~~~~~~~~*

*_संकलन : गजानन गोपेवाड

*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*

*_सृष्टी विज्ञानगाथा विज्ञान व दिनविशेष मधून_*

आयुर्वेदिक वनस्पती मोह

 मोह ( शास्त्रीय नाव:Madhuca longifolia, मधुका लॉंगीफोलिया/लॉन्जीफोलिया;) हा उष्ण, कोरड्या जमिनीत येणारा पानझडी वृक्ष आहे. ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे.


मोह


या झाडाला काही आदिवासी जमाती देव मानतात. या झाडाखाली त्यांचा देव मांडतात. बहुतेक आदिवासींचे सण/धार्मिक कार्यक्रम या झाडाच्या फुलांपासून बनविलेल्या पेयाशिवाय पूर्ण होत नाहीत. पोलो हा सण साजरा करून फुले गोळा करण्याला सुरुवात करतात.


मोहाची फुले पहाटे गोळा करतात आणि ती वाळवून,साठवून ठेवतात. रोख पैशांची गरज असेल तेव्हा बाजारात विकतात. मोहाच्या फळामध्ये असणाऱ्या बीजाला टोळी असे म्हणतात. या बीपासून तेल काढले जाते. पूर्वीच्या काळी खाण्यासाठी मध्य भारतातील आदिवासी हेच तेल वापरत असत. अजूनही या भागातील गरीब लोक हे तेल वापरतात. फुले व फळे मार्च ते मे या कालावधीत मिळतात.या झाडाची मुळे व फ़ांद्या इंधन म्हणून वापरतात. मोहाचे लाकूड मोठे असते,पण जास्त काळ टिकत नाही. मोहफुले मार्च महिन्यात येतात. देवा-धर्मात,औषधात मोहफुलांचा फार उपयोग होतो. या फुलांपासून दारू काढतात. टोळ म्हणजे मोहाच्या झाडाचे फळ आहे. या टोळीचे तेल काढतात. दिवा लावायला व खाण्यासाठी हे तेल वापरतात. पण टोळीचे तेल गरम खाल्ले तर चांगले असते. थंड झाल्यास त्याचा खवट वास येतो. टोळीच्या आतल्या बियांपासून साबण बनवतात. टोळीचा जेवणात बराच उपयोग होतो. मोहाचे फुल पोष्टिक आहे;म्हणून ते गरोदर बाईला, आजारी माणसाला ते खायला देतात. मोहाने पोट भरते. मोह पथ्यावर चालते. कारण मोह गरम आहे. मोहाने खोकला होत नाही.ःःःः



संकलन गजानन गोपेवाड 


सोमवार, ५ एप्रिल, २०२१

सैमुएल मोर्स 2 एप्रिल स्मृतिदिन






 *_🎧आजचे शास्त्रज्ञ 🎧_*


*_सैमुएल मोर्स_*


*_📙मोर्स कोड का संशोधन📙_*


*_स्मृतिदिन - २ एप्रिल १८७२_*

************************


_मोर्सकोड, सन्देश भेजने की एक पद्धति है। इसकी रचना सैमुएल मोर्स ने १८४० के दशक के आरम्भिक वर्षों में वैद्युत टेलीग्राफ के माध्यम से सन्देश भेजने के लिये की थी। बाद में १८९० के दशक से मोर्स कोड का उपयोग रेडियो संचार के आरम्भिक दिनों में भी हुआ। मोर्स कोड के अन्तर्गत एक लघु संकेत तथा दूसरा दीर्घ संकेत प्रयोग किये जाते हैं। इन दो संकेतों के पूर्व निर्धारित मानकीकृत समन्वय से किसी भी संदेश को अभिव्यक्त किया जा सकता है। कागज आदि पर मोर्स कोड में कुछ लिखने के लिये लघु संकेत के लिये डॉट का प्रयोग तथा दीर्घ संकेत के लिये डैश का प्रयोग किया जाता है। किन्तु मोर्स कोड के लघु और दीर्घ संकेतों के लिये अन्य रूप भी प्रयुक्त हो सकते हैं; जैसे - ध्वनि, पल्स या प्रकाश संकेत आदि_


*_अन्तर्राष्ट्रीय मार्स कोड के पाँच अवयव हैं:_*

*१)* _लघु मार्क, डाट या डिट (·) - एक इकाई लम्बा_

*२)* _दीर्घ मार्क, डैश या डा (-) - तीन इकाई के तुल्य लम्बा_

*३)* _लघु एवं दीर्घ संकेतों के बीच रिक्त स्थान या समय - एक इकाई लम्बा_

*४)* _छोटा रिक्त स्थान (दो अक्षरों के बीच में) - तीन इकाई लम्बा_

*५)* _मध्यम रिक्ति (दो शब्दों के बीच में) - सात इकाई लम्बा_

     _मोर्सकोड, बाइनरीकोड (द्विककोड) से मिलता जुलता है किन्तु ध्यान से इसका विश्लेषण करनेसे पता चलेगा कि यह बाइनरी नहीं है क्योंकि लघु एवं दीर्घ संकेत के अलावा रिक्तस्थान भी छोड़ना पडता है।_

*~~~~~~~~~~~~~~~~~~*

*_संकलन : गजानन गोपेवाड

*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*

*_सृष्टी विज्ञानगाथा विज्ञान व दिनविशेष मधून_*

24 मार्च जागतिक क्षय दिन

 *२४ मार्च*

➿➿➿➿➿➿➿➿➿➿

*🔘जागतिक क्षय रोगदिन🔘*

➿➿➿➿➿➿➿➿➿➿

🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘

क्षय रोग हा एक जिवाणुजन्य आजार आहे. क्षयरोग हा आजकाल बहुधा पूर्ण बरा होणारा आजार आहे. एके काळी हा रोग दुर्धर समजला जाई. सामान्यतः या आजाराला टीबी (ट्युुबरक्युलॉसिस) म्हणून ओळखले जाते. हा आजार 'मायकोबॅक्टेरिया' या प्रकारच्या जिवाणूंमुळे होत असतो. त्यातील मुख्यत्वे 'मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलॉसिस' या प्रकारामुळे माणसाला क्षयरोग होतो. यात मुख्यतः ७५% रुग्णांमध्ये फुफ्फुसांना बाधा होत असते. काही रुग्णांमध्ये फुफ्फुसेतर अवयवांना ही बाधा होत असते. साधारण ३५ टक्के वा जास्त लोकांच्या शरीरात क्षयरोगाचे जंतू वास्तव्य करून असतात. पण या सर्वानाच क्षय रोग होत नाही कारण हे जंतू निद्रिस्त अवस्थेत असतात. पण शरीरातील प्रतिकारशक्ती कमी झाल्यास हे झोपी गेलेले जंतू जागे होतात. क्षयरोग हा मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसीस नावाच्या जंतूमुळे होणारा अत्यंत संसर्गजन्य असा रोग आहे. इ.स.१८८२ साली डॉ.रॉबर्ट कॉक यांनी क्षयरोगाच्या जिवाणूंचा शोध लावला.त्यांचा प्रबंध जागतिक शास्त्रज्ञांच्या परिषदेत मांडला व त्यास दिनांक २४ मार्च रोजी मान्यता मिळाली.म्हणून दरवर्षी २४ मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो.ज्या व्यक्तीला क्षयरोग (टि.बी.) असेल तो माणूस बोलला, थुंकला किंवा शिंकला तरी त्याच्या शरीरातील क्षयाचे जंतू बाहेर पडतात आणि हवेद्वारे जवळ असलेल्या निरोगी व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतात व त्या निरोगी व्यक्तीला क्षय जंतूचा संसर्ग होतो. संसर्ग झालेल्या व्यक्तीची रोग प्रतिकार शक्ती कमी झाल्यास अशा व्यक्तींना क्षयरोगाची लागण होते.एखाद्या व्यक्तीला सतत दोन आठवड्यापेक्षा जास्त काळ खोकला असणे, वजन कमी होणे, भूक मंदावणे, हलकासा परंतु संध्याकाळी वाढणारा ताप, छातीत दुखणे, रात्री घाम येणे इत्यादी पाठवून देऊन त्याची दोन बेडक्याची तपासणी करून घेणे आवश्यक आहे.फुफ्फुसांशिवाय इतर अवयवांमध्ये क्षयरोग होतो. उदा. हाडे सांध्याचा क्षयरोग,लसिकाग्रंथीचा क्षयरोग, मज्जासंस्थेचा क्षयरोग,आतड्यांचा क्षयरोग इत्यादी. हा रोग पूर्णपणे बरा होण्यासाठी ६ महिने अथवा अधिक काळ उपचार घेणे गरजेचे असून जर उपचार मधेच बंद केले तर क्षयरोग परत उलटण्याची शक्यता असते. रुग्णांचा compliance (औषधांना चिकटून रहाणे) ही गोष्ट क्षयरोगाच्या उपचारांत अतिशय आवश्यक आहे.


ते अवयव

मेंदूची आवरणे,

मणके व इतर हाडे,

लैंगिक अवयव.


क्षय रोग 


उपवर्ग

primary bacterial infectious disease,

mycobacterium infectious disease,

endemic disease,

संसर्गजन्य रोग

मध्ये प्रकाशित

Annals of Internal Medicine (ITC6, 150)

मृत्युंची संख्या

१७,००,००० (worldwide, इ.स. २०१६)

अधिकार नियंत्रण

विकिडाटा Q12204

प्रकार संपादन करा

फुफ्फुसाचा क्षयरोग

दूषित थुंकी (स्पुटम पॉसिटिव्ह)

अदूषित थुंकी (स्पुटम निगेटिव्ह)

फुफ्फुसाव्यतिरिक्त इतर अवयवांचा

ग्रंथीचा क्षय्ररोग ( लिम्फ नोड )

हाडाचा व सांध्याचा क्षय्ररोग

जनन व विसर्जन संस्थाचा क्षयरोरोग (जनायटो-युरिनरी ट्रॅक्ट )

मज्जासंस्थेचा क्षय्ररोग (नर्व्हस सिस्टिम )

आतडयाचा क्षय्ररोग



क्षय रोगाची लक्षणे

कमी होणारे वजन

थकवा

श्वास घेण्यास त्रास होणे

ताप

रात्री येणारा घाम

भूक न लागणे

आजार टाळण्याचे उपाय "

क्षय रोगासाठी बी.सी.जी नावाची लस वापरली जाते.हि लस लहान मुलांना या रोगापासून वाचवते.पण मोठ्यांना लस टोचून घेतल्यावरहि हा रोग होण्याची शक्यता आहे.

क्षय रोगासाठी एक लस उपलब्ध आहे .ती म्हणजे बी. सी.जी. ही लस लहान मुलांना या रोगापासून वाचवते, पण मोठ्या माणसांना मात्र लस टोचल्यावरही हा रोग होऊ शकतो.

क्षय रोग टाळण्यासाठीच्या चांगल्या पद्धती म्हणजे


पौष्टिक आहार घेऊन रोगप्रतिकारकशक्ती वाढवणे.

क्षय रोग तपासण्या करून घेणे

क्षय रोग झाला असेल तर इतरांपासून दूर राहणे

तोंड झाकणे

लक्षणे संपादन करा


क्षयरोगाच्या रुग्णांची लक्षणे

दोन आठवडय़ांहून अधिक काळ


बेडकायुक्त खोकला (१५ दिवसांपेक्षा जास्त काळ असणारा )

हलकासा परंतु रात्री येणारा ताप

घटणारे वजन.

भूक कमी होणे.

बेडक्यातून रक्त पडणे.

थकवा

छातीत दुखणे

रात्री येणारा घाम

मानेला गाठी येणे (इंग्लिश: Lymph Node - लिम्फ नोड )

जीवाणू पसरण्याचे मार्ग संपादन करा


*जीवाणू*

उपचार न घेतलेला क्षयरोगाचा एक रुग्ण वर्षभरात १० ते १५ व्यक्तींना संसर्ग करू शकतो दाट लोकवस्ती, कोंदट घरे, प्रदूषण, एड्सचे वाढते प्रमाण, कुपोषण, अस्वच्छता, अपुरे/चुकीचे उपचार अशा अनेक कारणांनी हा रोग होतो.


दूषित धुलिकण

बाधित व्यक्तीची थुंकी.

बाधित व्यक्तीचे इतर स्राव

क्षय रोग होण्याची जास्ती शक्यता असलेले लोक संपादन करा

जास्ती वय असलेले

लहान बाळे

दुसऱ्या कोणत्यातरी कारणांनी ज्यांची रोग प्रतिकारक शक्ती कमी झाली आहे असे

कमी पोषकता

दारूच्या आहारी गेलेले

जास्ती गर्दीच्या ठिकाणी राहणारे

गरीब लोक

अस्वच्छतेत राहणारे

उपचार संपादन करा

सहा ते नऊ महिन्यांकरिता विविध औषधोपचाराच्या पद्धती

औषधोपचार खूप कालावधीसाठी चालतो कारण ह्या रोगाचे जीवाणू खूप हळूहळू वाढतात व अौपधोपचाराने खूप हळूहळू मरतात.

जीवाणू कमी करण्यासाठी विविध औषधे घ्यावी लागतात.

*निदान*

खकाऱ्याची तपासणी, एक्सरे, रक्ताच्या चाचण्या यांवरून या क्षयरोगाचे रोगनिदान केले जाते.


चाचण्या-)


*खकाऱ्याची तपासणी-*

वयस्कांमध्ये- सकाळीचचा खकारा निर्जंतुक बाटलीत घेतला जातो. तो काचपट्टीवर पसरवून त्यावर अल्कोहोलची प्रक्रिया करून चिकटवला जातो. त्यावर झिअल नेल्सन स्टेन या पद्धतीने पेशींना रंग देउन सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने निरीक्षण केले जाते. यामध्ये जर जीवाण् सापडले तर अशा रुग्णास थुंकी दूषित रुग्ण समजले जाते.

लहान मुलांमध्ये- सकाळीच उपाशीपोटी अन्ननलिकेतून एनजीटी टाकून जठरातील द्रव निर्जंतुक बाटलीत घेतला जातो. तो काचपट्टीवर पसरवून त्यावर अल्कोहोलची प्रक्रिया करून चिकटवला जातो. त्यावर झिनलेन्स स्टेन या पद्धतीने पेशींना रंग देऊन सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने निरीक्षण केले जाते.

मॉन्टुक्स टेस्टद्वारेही रोगाचे निदान केले जाते.

*रक्ताच्या तपासण्या-*

इएसआर- (एरिथ्रोसाइट सेडिमेंटेशन रेट) यामध्ये रक्ताचा नमुना न गोठू देणाऱ्या द्रवाच्या सहाय्याने संकलित करून तो नलिकेमध्ये भरला जातो व त्या नलिकेवरील आकड्यांनुसार नोंद घेतली जाते. ही तपासणी विश्वासार्ह नाही, कारण इतर रोगांमध्येही ही तपासणी असामान्य असू शकते.

*आजारपणातील घ्यावयाची काळजी*

खोकताना तोंडावर हातरूमाल धरणे.

खूप कफ पडत असल्यास एका कपात जंतुनाशक (डेटॉल, सेव्हलॉन, इ.) घालून त्यातच थुंकावे; इतरत्र कुठेही न थुंकणे महत्त्वाचे.

रुग्णाच्या राहण्याची व कामाची जागा हवेशीर ठेवावी

लहान मुलांचा व रुग्णाचा संपर्क टाळणे

घरात इतरांनीही टीबीची काही लक्षणे वाटल्यास वैद्यकीय तपासणी करून घेणे आवश्यक असते.


*उपलब्ध उपचार*


क्षयरोगाचा जागतिक नकाशा

TB incidence.png

क्षयरोगाच्या उपचारासाठी प्रभावी व गुणकारी औषधे उपलब्ध आहेत. दोन, तीन किंवा चार औषधे एकत्रितपणे व कमीत कमी सहा महिने घ्यावी लागतात. रायफामपिसिन, आयसोनिआझिड, पायराझिनामाईड, इथॅमबूटॉल, स्ट्रेप्टोमायसिन ही काही प्रतिजैविक औषधे आहेत मात्र ती डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावीत. उपचारांच्या पहिल्या एक ते दीड महिन्यातच रुग्णाला चांगला गुण येतो. खोकला कमी होतो, वजन वाढू लागते, ताप येणे बंद होते. पण उपचार अर्धवट सोडून देऊ नयेत. असे केल्यास नवीन प्रकारचे क्षयरोगाचे जीवाणू तेथे येतात औषधांना दाद न देणारा, घातक स्वरूपाचा रेझिस्टंट क्षयरोग होतो.


*औषधांचे दुष्परिणाम*

या औषधांचे काही दुष्परिणाम दिसू शकतात. उदा.- सांधेदुखी, हाता-पायांना जळजळ, बधीरता, काविळ, दृष्टीदोष, कमी ऐकू येणे, लघवीस लाल रंग, मळमळ, उलटी इत्यादी. पण सहसा रुग्ण औषधांना सरावतात व फारसे दुष्परिणाम न होता उपचार घेऊ शकतात. पण कुठल्याही दुष्परिणामाची थोडी जरी शक्यता वाटली तरी स्वतःच उपचार बंद करू नयेत. त्वरीत वैद्यकीय सल्ला घेणेच योग्य असते.पण हा रोग बरा होतो


*आजार टाळण्यासाठीची काळजी*

समतोल आहार, नियमित व्यायाम, धूम्रपान टाळणे अशी काही पथ्ये पाळल्यास प्रतिकारशक्ती उत्तम ठेवू शकतो. सार्वजनिक ठिकाणी न थुंकणे, स्वच्छता बाळगणे जरूरीचे असते.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

संकलन -)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा - यवतमाळ ४४५२०६

क्ष किरणाचा शोध विल्हेम राँटजेन

 *👨‍🔬👨‍🔬विल्हेम राँटजेन👨‍🔬👨‍🔬*

📽️📽️📽️📽️📽️📽️📽️📽️📽️📽️

*एक्स-रे अर्थात क्ष-किरणांचा शोध*

🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️

*जन्मदिन - २७ मार्च १८४५*

 🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️

जीवन

एक्स-रे अर्थात क्ष-किरणांचा शोध लावणारे प्रा. विल्हेम कॉनरॅड राँटजेन यांचा जन्म जर्मनी देशातील लेनेप येथे २७ मार्च १८४५ ला एका शेतकरी कुटुंबात झाला. विल्हेम यांचे वडील हे जर्मन तर आई डच होती. त्यांचे शालेय शिक्षण नेदरलँड्स देशात आणि उच्च शिक्षण स्वित्झर्लंड देशात झाले. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी युरोपमधल्या अनेक विश्वविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम केले.

संशोधन

सन १८८५ साली जर्मनीतल्या वुर्झबर्ग विश्वविद्यालयातल्या प्रयोगशाळेत काम करत असतांना प्रा. राँटजेन यांना क्ष-किरणांचा शोध अचानकपणे लागला. एकदा काही प्रयोग करण्यासाठी त्यांनी त्यांच्या प्रयोगशाळेत अंधार केला. कॅथॉड रे ट्युब (सी.आर.टी.) वापरून ते त्यांच्या प्रयोगाच्या तयारीला लागले होते. त्या प्रयोगात त्यांनी बेरियम प्लॅटिनो सायनईड वापरले होते. अंधार्‍या खोलीत प्रयोग सुरू असल्याने काही वेळाने प्रा. राँटजेन यांना वेगळ्याच रंगांच्या प्रकाश लहरी चमकतांना दिसल्या शिवाय खोलीच्या काळा पडद्यावरही विचित्र आकृती उमटलेल्या दिसल्या. ते प्रयोग करीत असलेल्या सी. आर. टी. चे तोंड पक्के झाकलेले असूनही भिंतीवरच्या पडद्यावर आकृत्या पाहून त्यांनी त्या अज्ञात किरणांना एक्स असे नाव दिले. या किरणांच्या आरपार जाण्याच्या गुणधर्माचा उपयोग माणसाच्या शरीरातील भाग पाहण्यासाठी होवू शकतो असे प्रा. राँटजेन यांनी सप्रयोग दाखवून दिले.

पुरस्कार

क्ष-किरणांचा उपयोग करून माणसाच्या हाडांच्या विविध समस्यांचा अभ्यास आणि उपाय करणे अत्यंत सुलभ झाले. या अनमोल शोधामुळे प्रा. राँटजेन यांना १९०१ साली भौतिक शास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले.

१० फेब्रुवारी १९२३ रोजी प्रा. राँटजेन आणि त्यांचे दोन विद्यार्थी याच क्ष-किरणांच्या घातक मार्‍यामुळे मृत्यु पावले.

🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️

*🇮🇳🇮🇳🌞शुभ प्रभात🌞🇮🇳🇮🇳*

संकलन गजानन गोपेवाड

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

शरीराला आवश्यक खनिजे

 अत्यंत महत्वाची पोस्ट आहे जास्तीत जास्त शेअर करा


संपूर्ण आयुर्वेद लिहिलंय शॉर्ट मध्ये

हे वाचल्यावर अक्षरशः काही वाचायची गरज नाही!

वाचा आणि पालन करा.


|| शरीराला आवश्यक खनिजं ||


*🔺कॅल्शिअम*

कशात असतं?

शेंगदाणे, तीळ, दूध, खोबरं, मुळा, कोबी. ज्वारी, राजगिरा, खरबूज, खजूर

कमतरतेमुळे काय होतं?

हृदयरोग, ऑस्टियोपोरोसिस, दंतरोग, केस गळणे

कार्य काय असतं?

शरीरातील सर्वात मुख्य खनिजं असून ते हाडांची मजबुती आणि शरीराच्या निर्मितीसाठी आवश्यक असतं.

🌺🌺🌺े


*🔺लोह*

कशात असतं?

खजूर, अंजीर, मनुका, सफरचंद, डाळिंब, पालक, सीताफळ, उस, बोर, मध, पपई आणि मेथी

कमतरतेमुळे काय होतं?

शरीरात रक्ताची कमतरता भासते. अशक्तपणा, कावीळ किंवा पोटात मुरडा येतो.

कार्य काय असतं?

शरीराच्या वाढीसाठी अतिशय आवश्यक असतं.

🌺🌺🌺े


*🔺सोडिअम*

कशात असतं?

मीठ, पाणी, बटाटा, आलं, लसूण, कांदा, मिरची, पालक, सफरचंद, कारलं

कमतरतेमुळे काय होतं?

रक्तदाबाशी निगडित समस्या, निद्रानाश, अंगदुखी, अपचन, मूळव्याधीसारखे आजार, मोतीबिंदू, बहिरेपणा, हात अणि पाय कडक होणे.

कार्य काय असतं?

शरीराला आवश्यक असणारी पाचक रसायनाची निर्मिती करतात, त्याचप्रमाणे शरीरात होणारा गॅस नष्ट होतो.

🌺🌺🌺े


*🔺आयोडिन*

कशात असतं?

शिंघाडा, काकडी, कोबी, राजगिरा, शतावरी, मीठ आणि लसूण.

कमतरतेमुळे काय होतं?

थायरॉइडची समस्या, केस गळणे, डिप्रेशन किंवा बैचेनी येणे.

कार्य काय असतं?

शरीरात उत्पन्न होणाऱ्या विषारी पदार्थापासून मेंदूला बचावण्याचं काम करतो.

🌺🌺🌺े


*🔺पोटॅशिअम*

कशात असतं?

सर्व प्रकारची धान्य, डाळ, संत्र, अननस, केळं, बटाटा, लिंबू, बदाम.

कमतरतेमुळे काय होतं?

अ‍ॅसिडिटी, त्वचेवर सुरकुत्या किंवा मुरुमं येणं, त्वचा रोग, केस पिकणे.

कार्य काय असतं?

शरीरात तंतू आणि यकृत यांना सुरळत ठेवण्याचं कार्य करतं.

🌺🌺🌺े


*🔺फॉस्फरस*

कशात असतं?

दूध, पनीर, डाळी, कांदा, टोमॅटो, गाजर, जांभळं, पेरू, काजू, बदाम, बाजरी आणि चणे.

कमतरतेमुळे काय होतं?

ऑस्टिओपोरोसिस, गतिमंद होणे, मानसिक थकवा, दंत रोग.

कार्य काय असतं?

मेंदूला ताजंतवानं ठेवण्याचं काम हे खनिजं करतं.

🌺🌺🌺े


*🔺सिलिकॉन*

कशात असतं?

गहू, पालक, तांदूळ, कोबी, काकडी, मध,

कमतरतेमुळे काय होतं?

कॅन्सर, त्वचारोग, बहिरेपणा, केस गळणे.

कार्य काय असतं?

जननेंद्रियांची कार्यक्षमता वाढवून शरीरातील तंतूना मजबूत करतात.

🌺🌺🌺े


*🔺मॅग्नेशिअम*

कशात असतं?

बाजरी, बीट, खजूर, सोयाबीन, दूध, लीची, कारलं.

कमतरतेमुळे काय होतं?

उदास होणे, आळस येणे, तणाव असणे, झोप न लागणे, बैचेनी, सोरायसिस, फोडं, नपुंसकता किंवा वांझपणा.

कार्य काय असतं?

पेशीचं कार्य सुधारतं. रेचक म्हणून काम करतं.

🌺🌺🌺े


🔺सल्फर

कशात असतं?

दूध, पनीर, डाळ, टोमॅटो, बटाटा, आलं, मिरची, सफरचंद, अननस, सुरण.

कमतरतेमुळे काय होतं?

प्रतीकारशक्ती कमी होते, केस गळतात, वजन वाढतं, मधुमेहाला आमंत्रण मिळतं.

कार्य काय असतं?

इन्सुलिनचं रेचन म्हणून कार्य करतं.

🌺🌺🌺े


*🔺क्लोरिन*

कशात असतं?

पानी, बीट, कोबी, मीठ, दूध, लिंबू, आवळा, मध.

कमतरतेमुळे काय होतं?

अ‍ॅसिडिटी, अल्सर, कॅन्सर, आणि अ‍ॅलर्जी.

कार्य काय असतं?

सोडिअम आणि पोटॅशिअमला पाचक बनवण्यासाठी सहायता करतं, त्याचप्रमाणे शरीरातील आम्लक्षाराचं संतुलन राखलं जातं.

🌺🌺🌺े


*🔺खाद्यपदार्थामधील खनिजं शरीराला मिळावीत म्हणून काय केलं पाहिजे.🔺*

» फळं किंवा भाज्या कापल्यानंतर कधीच धुवू नयेत. असं केल्याने त्यातील खनिजं पाण्यावाटे नष्ट होतात.

» डाळ, तांदूळ किंवा धान्यदेखील उकडण्यापूर्वीच स्वच्छ धुऊन घ्यावेत.

» काही धान्य, फळं तसंच भाज्यांच्या सालींमध्ये खनिजांचा मोठा प्रमाणावर साठा असतो. त्यामुळे अशा सालींचा आहारात समावेश करावा.

» दुधात खनिजांचा भरपूर स्रेत असतो म्हणूनच दूध जास्त प्रमाणात उकळू नये. दूध जास्त प्रमाणात उकळल्याने त्यातील खनिजं नष्ट होतात.

» फळं कापून खाण्याऐवजी शक्यतो आहे तशीच खावीत. उदाहरणार्थ, चिकू किंवा सफरचंद ही फळं संपूर्ण खावीत.

🌺🌺🌺े


*▫ब्लड प्रेशर  आणि  नियंत्रण▫*

*============================*


ब्लडप्रेशर असलेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. धकाधकीच्या जीवनात फास्ट फूड आणि अनियमित दिनचर्या या कारणामुळे या आजाराचे रुग्ण भारतातही मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. ब्लडप्रेशरमुळे हृदयाचे आजार, स्ट्रोक अशा समस्या निर्माण होण्याची दाट शक्यता असते. ब्लडप्रेशरच्या रुग्णाला दररोज औषध घ्यावे लागते. आज  तुम्हाला काही घरगुती उपायांची माहिती देत आहोत. तुम्हालाही ब्लडप्रेशरचा त्रास असेल तुम्ही हे घरुगुती उपाय अवश्य करून पाहा. या उपायांनी तुमचे ब्लडप्रेशर नियंत्रणात राहील.

🌺🌺🌺े


*▫लसूण -*


ब्लडप्रेशरच्या रुग्णांसाठी लसूण अमृतासमान औषधी आहे. यामध्ये एलिसीन नावाचे तत्त्व असते, जे नायट्रिक ऑक्साइडचे प्रमाण वाढवते आणि यामुळे आपल्या मासपेशींना आराम मिळतो. ब्लडप्रेशरच्या डायलॉस्टिक आणि सिस्टॉलिक कार्यप्रणालीला आराम मिळतो. यामुळे ब्लडप्रेशरच्या रुग्णांनी दररोज लसणाची एक पाकळी अवश्य खावी.

🌺🌺🌺े


*▫शेवगा -*


यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आणि व्हिटॅमिन तसेच खनिज लवण आढळून येतात. एका संशोधनानुसार, या झाडाच्या पानांचा अर्क पिल्यास ब्लडप्रेशरच्या डायलॉस्टिक आणि सिस्टॉलिक कार्यप्रणालीवर सकारत्मक प्रबाव पडतो. ब्लडप्रेशरच्या रुग्णाने मसूरच्या डाळीसोबत शेवग्याचे सेवन करावे.

🌺🌺🌺े


*▫जवस -*


जवसामध्ये अल्फा लिनोनेलिक अ‍ॅसिड भरपूर प्रमणात असते. हे एक प्रकारचे महत्त्वपूर्ण ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड आहे. विविध संशोधनामध्ये समोर आले आहे, की ज्या लोकांना हायपरटेन्शनची समस्या असेल त्यांनी जेवणात जवसाचा उपयोग अवश्य करावा. यामुळे कॉलेस्टेरॉलची मात्रा कमी होते आणि याच्या सेवनाने ब्लडप्रेशर नियंत्रणात राहते.

🌺🌺🌺े


*▫विलायची -*


एका संशोधनानुसार विलायचीचे नियमित सेवन केल्यास ब्लडप्रेशर व्यवस्थित राहते. याच्या सेवनाने शर

हळद   Turmeric

🌺🌺🌺े


*गुणधर्म  -----*


तिखट,  कडवट,  रूक्ष,  गरम,  जंतुनाशक,  रक्तशुद्धीकारक,  वात,  पित्त,  कफ  शमन  करणारी.


*उपयोग -----*


*१)*  जखमेवर  किंवा  मुका  मार  लागणे.  हळद  लावा.

*२)*  रक्ती  मुळव्याध  -  बकरीचे  दूध  +  हळद  घ्या.

*३)*  सर्दी,  कफ,  खोकला -  गरम  दूध  +  तूप  +  हळद  घ्या.

*४)*  जास्त  लघवी  -  पांढरे  तीळ  +  गुळ  +  हळद  घ्या.

*५)*  आवाज़  बसणे  -  हळद  +  गुळ  गोळ्या  करून  खा.

*६)*  काविळ  -  ताक  +  हळद.

*७)*  ताप  -  गरम  दूध  +  हळद  +  काळीमिरी  पुड.

*८)*  लघवितून  पू  जाणे  -  आवळा  रस  +  हळद  +  मध.

*९)*  मुतखडा  ( स्टोन )  -   ताक  +  हळद  +  जूना  गुळ.

🌺🌺🌺े


      #    *आरोग्य   संदेश*    #

     

हळदच  आहे  जंतुनाशक, रक्तशुद्धीकारक,

नक्कीच   आजारांना    आहे   ती   मारक.

  

*तोंडाचे  विकार*

  

*कारणे -----*


जागरण  करणे,  जास्त  तिखट  खाणे,  पोट  साफ  नसणे,  पित्त  होणे,  अपचन  होणे,  उष्णता  वाढणे,  रोगप्रतिकारक  शक्ति  कमी  होणे. व्यसन  करणे.


*उपाय -----*


*१)*  जेवणात  गाईचे  तूप  व  ताक  घ्या.

*२)*  गुलकंद  खा.

*३)* ज्येष्ठमधाची  कांडी  चघळावी.

*४)*  दुधाची  साय  आणि  शंखजीरे  मिक्स  करून  तोंडातून  लावा.

*५)*  हलका  आहार  घ्या.

*६)*  वरील  कारणे  कमी  करा. त्रिफळा  चूर्ण  घेऊन  पोट  साफ  ठेवा. 

*७)*  दही  उष्ण  असल्याने  जास्त  खाऊ  नका.

*८)*  जाईची  पाने  किंवा  तोंडलीची  पाने  किंवा  पेरूची  पाने  किंवा  उंबराची  कोवळी  कांडी  चावून  थुंका.

*९)*  नियमित  प्राणायाम  करा.

*१०)*  आवळा  पदार्थ  खा.

*११)*  एकाचवेळी  सर्व  उपाय  करू  नका.

🌺🌺🌺े


*जीभेची  साले  निघत  असल्यास*


*उपाय -----*


*१)*  पुदिन्याची  पाने  आणि  खडीसाखर  मिक्स  करून  चावून  थुंकत  रहा.

*२)*  एक  केळ  गाईच्या  दूधाबरोबर  खावे.

*३)*  त्रिफळाच्या  काड्याने  गुळण्या  करा. जंतुसंसर्ग  कमी  होतो.

🌺🌺🌺े


     #     *आरोग्य  संदेश*    #


*व्यायामानेच  पचनशक्ती  वाढवा*


*उपाय -------*


*१)*  नारळाची  शेंडी  जाळून  राख  बनवा.

*२)*  ती  राख  २/३  ग्रँम  ताकातून  घ्या.

*३)*  रिकाम्या  पोटीच  घ्या.

*४)*  सकाळ  व  संध्याकाळ  घ्या.

*५)*  मुळा /  सुरण  भाजी  खा.

*६)*  अक्रोड  खाऊन  वर  दूध  प्या.

*७)*  जेवणात  कच्चा  कांदा  खा.

*८)*  श्वास  रोखू  बटरफ्लाय  व्यायाम  करा.

*९)*  हलका  आहार  घ्या.  गाईचे  तुप  खा.

*१०)*  पोट  साफ  ठेवा.

*११)*  नियमित  प्राणायाम  करा.

*१२)*  चोथायुक्त  पदार्थ  खा.

*१३)*  शाकाहारी  राहण्याचा  प्रयत्न  करा.

*१४)*  एकाचवेळी  सर्व  उपाय  करू  नका.

🌺🌺🌺े


#     *आरोग्य   संदेश*      #


पोट  राहूद्या  नियमित  साफ,

मुळव्याधीचा   चूकेल   व्याप.


*काळ्या द्राक्षांचे 10 फायदे, वाचाल तर रोज खाल*


*1. डायबिटीस, ब्लड प्रेशरवर नियंत्रण*


काळी द्राक्ष नियमित खाल्यामुळे डायबिटीस आणि ब्लड प्रेशर नियंत्रणात राहतं. काळ्या द्राक्षांमध्ये रेसवटॉल नावाचा पदार्थ असतो, ज्यामुळे रक्तात इन्सुलिन वाढतं. ही द्राक्ष खाल्यामुळे शरिरातलं रक्त वाढायलाही मदत होते, त्यामुळे ब्लड प्रेशरचा त्रास होत नाही. 


*2. एकाग्रता वाढायला मदत*


काळी द्राक्ष खाल्यामुळे एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढायला मदत होते. तसंच मायग्रेनसारखा आजारही या द्राक्षांमुळे बरा होतो. 

🌺🌺🌺े


*3. हार्ट ऍटेकचा धोका कमी*


काळ्या द्राक्षांमध्ये सायटोकेमिकल्स असतात जे हृदयाला स्वस्थ ठेवतात. तसंच या द्राक्षांमुळे कोलेस्ट्रॉलही नियंत्रणात राहतं, ज्यामुळे हार्ट ऍटेकचा धोका कमी होतो.


*4. वजन होतं कमी*


नियमित काळी द्राक्ष खालली तर वजन कमी होऊ शकतं. यामध्ये असणारा एँटीऑक्साईड शरिरात जास्तीचं असलेलं टॉक्सिन्स बाहेर काढायला मदत करतो. ज्यामुळे वजन कमी होतं. 

🌺🌺🌺े


*5. अस्थमा होतो बरा*


काळी द्राक्ष शरिरात असलेल्या बॅक्टेरिया आणि फंगसला मारायचं काम करतात, जी इंफेक्शन तयार करतात. पोलिओविरुद्ध लढण्यासाठीही द्राक्ष हा चांगला उपाय आहे. काळ्या द्राक्षांमुळे अस्थमा बरा व्हायला मदत होते. 


*6. कॅन्सरला रोखा*


काळी द्राक्ष खाल्यामुळे ब्रेस्ट, लंग, प्रोस्टेट आणि आतड्यांच्या कॅन्सरच्या धोक्यापासून वाचता येऊ शकतं. 


*7. अपचन होत नाही*


काळ्या द्राक्षांमध्ये शुगर, ऑरगॅनिक ऍसिड आणि पॉलीओस जास्त प्रमाणात असल्यामुळे अपचन आणि पोटाची जळजळ होत नाही. 

🌺🌺🌺े


*8. डोळ्यांसाठी गुणकारी*


दृष्टी सुधारण्यासाठीही काळी द्राक्ष गुणकारी आहेत. 


*9. सुरकुत्या होतात कमी*


काळ्या द्राक्षांमुळे डोळ्यांखाली होणारा काळा भाग कमी करतो. तसंच त्वचेवर पडणाऱ्या सुरकुत्याही यामुळे कमी होतात. 

🌺🌺🌺े


*10.  केस गळती थांबवायला मदत*


काळ्या द्राक्षांमध्ये असलेल्या विटॅमिन इ मुळे केस गळणं, केस पांढरे होणं यासारख्या समस्या दूर होतात. द्राक्ष खाल्यानं केसांच्या मुळापर्यंत रक्त पोहोचायला मदत होते, त्यामुळे केस मुलायम आणि मजबूत होतात.

शरीरावरील  काळे  डाग  

🌺🌺🌺े


*उपाय -----*


*१)*  नियमित  प्राणायाम  करा.

*२)*  पचनशक्ती  स्ट्राँग  ठेवा.

*३)*  पोट  साफ  राहूद्या.

*४)*  पालेभाज्या  व  फळभाज्या  खा.

*५)*  सकाळी  ऊठल्यावर  तोंडातील  लाळ  सर्व  डागांवर  चोळून  लावा.  तोंड  धुण्यापूर्वीची  लाळ  पाहिजे.  हा  जबरदस्त  उपाय  आहे.

*६)*  कोरफड  पानातील  गर  लावा.

*७)*  आवळा  रस /  पदार्थ  घ्या.

*८)*  डागांवर  कच्च्या  पपईचा  रस  लावा.

*९)*  कडुलिंबाची  पाने  आंघोळीच्या  पाण्यात  टाकून  पाणी  उकळवून  घ्या.  नंतर  त्याच  पाण्याने  आंघोळ  करा.  मात्र  साबण  वापरू  नका.

🌺🌺🌺े


     #     *आरोग्य   संदेश*     #


करा  योग,  पळतील  रोग. संपतील  भोग.

🍲 आहार तज्ञ - ऋजुता दिवेकर यांच्या मते  आहाराविषयीच्या संकल्पना.


🍲  *नियोजनबद्ध आहार कोणता?*


आपला भारतीय संस्कृतीतील आहार योग्य आहे. भाजी, पोळी, भात, आमटी, पोहे, उपमा हे पदार्थ अतिशय पौष्टिक आहेत. आपण आपला आहार सोडून अन्य पदार्थांचे पर्याय शोधतो. म्हणून खाद्यसंस्कृती बदलते आहे. आपले वेगळेपण आपणच जपले पाहिजे. आपल्या चौरस आहाराची किंमत आपल्यालाच समजत नाही, याची खंत आहे.

🌺🌺🌺े


🏃 *वाढलेली चरबी कशी कमी करावी?*


आपल्या खाण्या-पिण्याला शिस्त असेल, तर चरबी वाढणार नाही. वाढली तरी कमी होण्यासही मदत होईल. सलग ३० मिनिटे एका जागेवर बसू नका. आपण शरीराचा पुरेसा वापर करीत नाही म्हणून चरबी वाढते. दरवर्षी अर्ध्या किंवा एक किलोने वजन वाढते. वजन वाढते, याचा अर्थ आपण आळशी होत आहोत, हे समजून घ्या. म्हणून गरज आहे ती `मूव्ह मोअर अँड सिट लेस` या मंत्राची.

🌺🌺🌺े


🍇 *कोणती फळे खावीत?*


आंबा, केळे, सीताफळ, चिकू आणि द्राक्ष ही फळे प्रत्येक भारतीयाच्या आहारात आवर्जून आलीच पाहिजेत. आरोग्यासाठी केळे हे सर्वोत्तम असल्याचा दुजोरा आता जगभरातून मिळत आहे. बाळाच्या आहारातही आईच्या दुधानंतर फळांमध्ये केळ्याचाच समावेश होतो.


◆ *मधुमेहासाठी आहार कसा असावा?*


खरं तर मधुमेहींनी जे पदार्थ खाल्ले पाहिजेत, तेच पदार्थ डॉक्टर टाळण्यास सांगतात. मात्र, भात, केळं आणि तुपाचा समावेश आहारात अवश्य असावा. दोन जेवणांमध्ये फार अंतर ठेऊ नये, व्यायाम भरपूर करावा आणि अगदी झोपेपर्यंत टीव्ही पाहणे टाळावे.

🌺🌺🌺े


◆ *शुगर-फ्रीचा वापर करावा का?*


शुगर फ्री आहारातून वर्ज्यच करा. आहारात जेवढी साखर आवश्यक असते, तेवढी खावी. लाडू, हलवा यासारख्या घरी बनणाऱ्या गोड पदार्थांत वापरली जाणारी साखर आरोग्यासाठी चांगली असते. ऊस आणि गूळ यांना एकमेकांशी रिप्लेस करू नये. आवश्यकतेनुसार पदार्थात साखर किंवा गुळाचा वापर करावा. शरीरातील उष्णता वाढवायला गुळाची मदत होते.

🌺🌺🌺े


◆ *वाढतं वजन आणि ताण यांचा संबंध कसा आहे?*


वाढत्या ताणामुळे वजन वाढतं. फर्गेट, फर्गिव्ह आणि फॉर्वर्ड या सूत्रानुसार जीवन जगायला सुरवात केल्यास आयुष्यातील तणाव कमी होतील.

🌺🌺🌺े


● *कडधान्य कशी खावीत..*


आपण उसळ करताना कडधान्य शिजवून घेतो. त्यामुळे मोड आलेली कडधान्ये कच्ची कशासाठी खायची? ती उकडून, उसळ करून खाणेच योग्य.


● *जेवणात कोणते तेल आणि किती वापरावे?*


शेंगदाण्याचे घाण्यावरून करून आणलेले तेल स्वयंपाकासाठी सर्वोत्तम आहे. शंभर ग्रॅम शेंगदाण्याचे २५ ते ३० टक्के तेल निघते. बाकी चोथा वाया जातो. तेल बनविण्याची पारंपरिक पद्धत अतिशय शुद्ध आहे. आहारात तेल बदलण्याची गरज नसते. पिशव्या किंवा डब्यांमध्ये मिळणारे आणि हृदयाच्या आकाराचे चित्र डब्यांवर दिसणारे तेल आरोग्याला योग्य नाही. तेल जेवढे वापरावेसे वाटते, तेवढे वापरावे. लोणचे, तळलेला पापड, भजी हे पदार्थ आहारात आलेच पाहिजेत. जास्त तेल पोटात जाईल, म्हणून ते खाणे टाळू नये.

🌺🌺🌺े


🚫 *आहारातून ड जीवनसत्त्व कमी झाल्यास काय होते?*


शरीरात हवे असलेले फॅट मिळत नाहीत, म्हणून ड जीवनसत्व कमी होते. वेळेवर त्यावर उपाय न केल्यास हाडे दुखतात, केस गळतात, त्वचेवर डाग पडतात. मधुमेह किंवा कॅन्सर होण्यापर्यंत ही पातळी जाऊ शकते.


*आजकाल बिझी रुटीनमुळे व्यायाम करणे अनेकांना शक्य होत नाही. व्यायामाला दुसरा काही पर्याय आहे का?*


आजच्या युगात आपण नवीन गाडी घेतली, तरीसुद्धा ती नियमितपणे चालवतो. बाहेरगावी गेलो, तरी शेजारी किंवा नातेवाईकांना गाडी सुरू ठेवायला सांगतो. व्यायामाचेसुद्धा तसेच आहे. व्यायामाला कोणताही पर्याय नाही, तो नियमितपणे केलाच पाहिजे. अंग दुखतं, म्हणून व्यायाम करत नाही, अशी सबब अनेक जण देतात. पण खरे तर व्यायाम करत नाही, म्हणून अंग दुखतं. व्यायाम करण्यासाठी आठवड्यात फक्त १५० मिनिटे लागतात. आठवड्याच्या व्यायामाचे नीट प्लानिंग करून ते वेळापत्रक पाळले जायला हवे. व्यायाम अनेकदा उद्यावर ढकलला जातो, त्याचं योग्य नियोजन होत नाही, त्याचं गांभीर्य लोकांच्या लक्षात येत नाही.

🌺🌺🌺े


✌ *दोन- दोन तासाने खा, असे सांगितले जाते. हे योग्य की अयोग्य?*


सकाळी उठल्या उठल्या आपण चहाने सुरुवात केली, तर दिवसभराची भूक मरते आणि दिवसभराचे रुटीन बिघडते. दोन- दोन तासाने खावे. सकाळी उठून एखादं केळ खाल्लं की, आपण नंतर नीट नाश्ता करू शकतो. सकाळी नाश्त्याला डोसा, घावन, थालीपीठ असं खावं. त्यानंतर जेवणाआधी पन्हं, कोकम सरबत यासारखं पेय घेऊन त्यानंतर आपण नियमित जेवण घेऊ शकतो. जेवताना शक्यतो पाणि पिऊ नये,जेवणाच्या अर्धा तास आधी एक ग्लास पाणि प्यावे व जेवणानंतर एक तासाने पाणि प्यावे.त्यानंतर मध्ये एखाद- दुसरं फळ, संध्याकाळी चार ते सहाच्या मध्ये पुन्हा सकाळच्या नाश्त्याप्रमाणे आहार घेतला की, आपल्याला रात्री फार भूक लागत नाही. मग रात्री पेज किंवा भात खावा, म्हणजे आपल्याला शांत झोप लागू शकते.


🍚 *घरी केलेले चिवडा, लाडू खाण्याची योग्य वेळ कोणती?*


चिवडा आणि लाडू आपण कधीही खाण्यासाठीच तयार करून ठेवतो. चिवड्यासारखी व्हर्सेटाइल गोष्ट कोणतीच नाही. चिवडा कशातही मिक्स करून खाऊ शकतो, त्यामुळे चिवडा कोणत्याही वेळी खाता येईल. लाडूसुद्धा संध्याकाळी ५-६च्या आसपास किंवा सकाळी नाश्त्यालासुद्धा लाडू चांगला.

🌺🌺🌺े


👨👩 *वाढत्या वयाबरोबर कसा व्यायाम करावा ?*


वयानुसार आपलं शरीर बदलतं, पण ते बिघडू देऊ नये. आपलं रुटीन नियमित फॉलो केलं पाहिजे. आठवड्याला १५० मिनिटे व्यायाम केला, तर ते कोणत्याही वयाला चालतं. वय वाढलं म्हणून व्यायाम कमी करण्याची गरज नाही.


💧 *सकाळी उठून गरम पाणी प्यायल्याने चरबी कमी होते, असा समज आहे. यात किती तथ्य आहे?*


सकाळी उठल्यावर आवड म्हणून गरम पाणी पिण्यास काहीच हरकत नाही. पण त्यामुळे चरबी अजिबात कमी होत नाही. सकाळी उठल्यावर साधं, माठाचं किंवा गरम कोणतेही पाणी आपण पिऊ शकतो.


🍲 *साखरेऐवजी गूळ वापरल्याने फायदा होतो का ?*


प्रत्येक गोष्टीचा एक विशिष्ट गुणधर्म असतो. त्यामुळे ज्या गोष्टीत साखर वापरण्याची गरज आहे, त्यात साखर वापरली पाहिजे आणि ज्या गोष्टीत गूळ वापरण्याची गरज आहे, त्यात गूळच वापरला पाहिजे. अन्यथा पदार्थाची चव बिघडते. साखर ही चांगलीच आहे. उगाच साखरेच नाव वाईट आहे. साखरेने उष्णता कमी होते, तर गुळाने उष्णता वाढते. त्यामुळे आपण पदार्थानुसार साखर किंवा गूळ वापरावा,

🌺🌺🌺े


🙆 *केस, त्वचेसाठी काय सल्ला.*


केस गळण्यापासून वाचण्यासाठी तसेच तजेलदार त्वचेसाठी आहारात भात, नारळ, तूप यांचा समावेश हवा. आहारामध्ये हळदीचा समावेश असण्याची गरज आहे. हळद केसांच्या वाढीसाठी फायदेशीर आहे.


🌞 *आपला दिवस कसा असतो?*

मी ज्या शहरात असेन, त्यानुसार दिवस प्लॅन करते. ऋतूमानानुसार आणि स्थानिक पदार्थांना आहारात प्राधान्य देतेत. रोज सकाळी पोहे खाते. सध्या उन्हाळ्यामुळे कोकम आणि पन्हं घेते. जे आवडतं, तेच पदार्थ खाते. जे पदार्थ शरीराला लागतात, ते आवर्जून खाते. कारण, आपण जे खातो, तेच आपल्या चेहऱ्यावर दिसते.


🍌 *फळ किंवा सुका मेव्याने दिवसाची सुरुवात करा*


🍲 *नाश्त्याला पोहे, उपमा, शिरा खा*


🍷 *जेवणापर्यंतच्या वेळेत सरबत घ्या*


🍎 *जेवणानंतर एखादे फळ खा*


🍲 *संध्याकाळी गूळ, तूप, पोळी किंवा फोडणीचा भात*


😇  *रात्री   ८.३०  च्या दरम्यान हलका आहार घ्या*


हलका आहार घेतल्याने झोप चांगली लागते आणि दुसऱ्या दिवशी व्यायाम करण्यास उत्साह राहतो.

🌺🌺🌺े


*आहारातून  उपचार*


पुढील  आजार  झाल्यास  त्यांच्या  खाली  दिलेले  अन्नपदार्थ  खा.  आजार  लवकर  बरे  होतील.


*१)  आम्लपित्त :-*

काळी  मनुका,  आलं,  थंड  दुध,  आवळा, जिरे  खा.


*२)  मलावरोध  :-*

पेरु,  पपई,  चोथा /  फायबरयुक्त  असलेले  अन्न,  दुध + पाणी,  कोमटपाणी ,  त्रिफळा  चूर्ण  घ्या.  पोटाचे  व्यायाम  करा,  टाँयलेटला  बसल्यावर  हनुवटी  प्रेस  करा.  लवकर  पोट  साफ  होते.


*३)  हार्टअटैक / ब्लॉकेज :-*

लसूण,  कांदा,  आलं  खा.  रक्ताच्या  गाठी  होत  नाहीत.  रक्ताभिसरण  उत्तम  होते.


*४)  डिसेन्टरी / जुलाब :-*

कापूर  +  गुळ  एकत्र  करून  खा.  त्यावर  पाणी  प्या.  लगेच  गुण  येतो.


*५)  खोकला :-*

२ / ३   काळीमिरी  चोखा.  दिवसातून  तीन  वेळा.  खोकला  थांबतो.


*६)  मुळव्याध :-*

नारळाची  शेंडी  जाळून  राख  ताकातून  दिवसातून  २ / ३  वेळा  घ्या.  चांगला  गुण  येतो.  रामदेव  बाबांचा  उपाय  आहे.


*७)  दारूचे  व्यसन :-*

वारंवार  गरम  पाणी  प्या.  तसेच  दारू  पिण्याची  आठवण  येईल  त्यावेळी  जरूर  गरमच  पाणी  प्या.  २ / ३  महीन्यात  दारू  सुटेल.


*८)  डोळे  येणे :-*

डोळ्यांना  गाईचे  तुप  लावा.  आराम  पडेल.  कापूर  जवळ  ठेवा.  संसर्ग  वाढणार  नाही.


*९)  स्टोन :-*

पानफुटीची  पाने  खा.  कुळीथ  भाजी  खा.  भरपूर  पाणी  प्या.  


*१०)   तारूण्यासाठी :-*

भाज्यांचा  रस,  आरोग्य  पेय,  फळे  खा. गव्हांकुराचा  रस,  Green  Tea  ,प्या.

🌺🌺🌺े


    📢     *आरोग्य  संदेश*    🔔


*संतुलित  आहारात  उपचार  आहेत खरे, सर्वच    आजार    नक्कीच   होतील  बरे.*

  


*आर्टीकल जरा मोठे आहे ,पण जीवनावश्यक आहे*🙏🏼🙏🏼

🌺🌺🌺े


स्रोत - आयुर्वेदाचा शोध लावणारे आणि जगातील पहिली शस्त्रक्रिया करणारे ऋषी सुश्रुत आणि वागभट्ट यांचा ग्रंथावर आधारित.

संकलन गजानन गोपेवाड

शुक्रवार, २६ मार्च, २०२१

होळी निमित्त लेख गजानन गोपेवाड यांचा

 ✍️http://www.publicpanchanama.com/2021/03/blog-post_245.html






🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹


          *उप संपादक*

      *विलास मोहिनकर*

होळी निमित्त लेख गजानन गोपेवाड

 ▪️होळी सण साजरा करताना काळजी घ्यावी- अग्निपंख शैक्षणिक समुह महाराष्ट्र राज्य यांचे आवाहन

 https://www.purogamisandesh.in/news/26370

👆👆👆👆👆👆👆👆👆

✒️गजानन गोपेवाड (अग्निपंख शैक्षणिक समुह महाराष्ट्र राज्य)

---------------------------------------------

🔹पुरोगामी संदेश न्युज नेटवर्क🔹


जलसाक्षरता लेख गजानन गोपेवाड

 जागतिक जलदिन, 

मार्च 22, 2021.

*"वाचवाल तर वाचाल, अन्यथा नष्ट व्हाल! "*

काय वाचवाल, 

पाणी, 

(Water)

______________

या वर्षाच्या २९ व्या वर्धापनदिनानिमित्तची जलदिनाची मध्यवर्ती विषय -संकल्पना आहे, *" पाण्याचे मोल म्हणजेच पाण्याला मोल देणे "*

( Valuing Water) होय. 

22 मार्च 1993 रोजी, संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण सभेने पहिला *"जागतिक जलदिन "* साजरा केला. तेंव्हापासून दरवर्षी संयुक्त राष्ट्रसंघाच्या जागतिक जलविकास अहवालाशी सुसंगत असलेली, वेगळी संकल्पना वापरण्याची पध्दत रूढ झाली आहे. 2020 ची संकल्पना होती, *" पाणी आणि हवामान बदल "*. कारण हवामान बदलांविरूध्द लढण्यासाठी पाण्याची मदत होऊ शकते. जलदिनानिमित्त सर्वांनी जलसाक्षर होऊन जलसंवर्धनासाठी योग्य त्या उपाययोजना करणे ही काळाची गरज आहे. कारण ' जल है तो कल है और कल है तो हम है!' 

पिण्यायोग्य म्हणजेच गोड्या पाण्याचे निसर्गातील प्रमाण अत्यल्प आहे. त्याचा वापर काटकसरीने करणे, स्त्रोतांचे संवर्धन करणे अगत्याचे ठरते. 

पिण्यायोग्य पाण्याची कमतरता यासाठी की पृथ्वीवर पाण्याचा साठा पुष्कळ आहे. तो सर्वच साठा मानवासाठी उपयोगाचा नाही. पृथ्वीवरील पाण्यापैकी सुमारे 97 टक्के पाणी सागरी पाण्याच्या स्वरूपात आहे. म्हणजेच ते पाणी क्षारयुक्त आहे. केवळ 2 टक्के पाणी धृव प्रदेशातील बर्फ रूपात आहे. तर उरलेले 1 टक्का जेमतेम पाणी नद्या, नाले, विहिरी, तलाव, सरोवरे व भूगर्भात गोड्या पाण्याच्या स्वरूपात आहे. याच 1 टक्का पाण्यावर मानवाचे भौतिक, संस्कृतीमधील सर्व चलनवलन अवलंबून आहे. या पाण्याशिवाय मानवाच्या भौतिक प्रगतीचे एकही पाऊल पुढे पडू शकत नाही. तथापि, मानवी जीवनास व प्रगतीस आवश्यक असलेले हे पाणी झपाट्याने प्रदूषित होत आहे. पृथ्वीवरील सर्व प्रकारचे जलप्रदूषण हीच मानवाची मोठी, औद्योगिक व सांस्कृतिक समस्या म्हणून उभी राहिली आहे. 

ग्रीक तत्ववेत्ता थेलीस म्हणतो, " सगळे पाण्यातून येते आणि पुन्हा पाण्याशीच एकरूप होऊन जाते. " अन्न, वस्त्र व निवारा या उपभोग्य वस्तूंची निर्मिती जलस्त्रोतांवर अवलंबून असते. तर उपभोगांतून निर्माण होणारे उत्सर्जित पदार्थ वाहून नेण्याचे कामही पाण्यालाच करावे लागते. 

यंदा कडक उन्हाळ्यामुळे आपल्यांपुढे पाणी टंचाईचे संकट उभे राहण्याची शक्यता असल्याने उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून त्याची बचत करणे, लिकेज, नासाडी थांबवणे अत्यावश्यक आहे. 

नेमकी गरजेपुरतेच आवश्यक पाणी वापरून, बचत व संवर्धन केले तरी खूप काही साध्य होईल. जागतिक तज्ञांच्या मते तिसरे महायुद्ध पाण्यासाठी होईल, म्हणून पाणी हे जीवन हे जाणून त्याचे जतन व काटकसरीने वापर हा रामबाण उपाय होय. 

पाणी पंचायत या जागतिक संकल्पनेचे अध्वर्यू तथा थोर तत्वज्ञ, पाणी शास्त्रज्ञ, भारतातील प्रथम व्यक्तीमत्व म्हणून जगद्विख्यात असलेले कै विलासराव साळुंखेजी! जे आम्हांस पूज्य दैवत व स्फूर्ती, प्रेरणादायी असून त्यांचे यांतील महान् कार्याचे स्मरण झाल्याशिवाय राहत नाही. 

श्री विलासराव साळुंखे यांनी 1972 ते 2002 या तीन तपांच्या सातत्यपूर्ण अनेक प्रयोग व शोध करून, पाण्याचे समन्यायी वाटप ही संकल्पना सर्व जगमान्य केली. जलसंपत्ती ही समाजाची सामुहिक संपत्ती आहे, आणि पाण्याचे वाटप हे सर्वांना समन्यायानं व्हावं यासाठी त्यांनी स्वतःचे संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. 

जगाचे नाक असलेल्या, हेरिटेज संस्था गव्हमेंट काँलेज आँफ इंजिनियरिंग, पुणे ची प्रोफेसरशीपचा 1972 च्या देशव्यापी भयंकर दुष्काळात, मोठ्या पदाची नोकरीचा त्याग करून, मानव जातींसाठी अनन्यसाधारण आदर्श प्रस्थापित केला. 

आज तोच त्यांचा वारसा त्यांच्या सहचारिणी कल्पनाताई साळुंखेजी, ग्रामगौरव प्रतिष्ठान तथा पाणी पंचायतच्या माध्यमातून अविरतपणे सर्वदूर पोहोचवत आहेत. सेंद्रिय शेती हा एक महत्त्वाचा भाग म्हणून त्यावरही एकाग्रतेने कृतीशील असून, राज्यातील, देशातील हजारो लाभार्थी शेतकर्‍यांच्या त्या अधिकार वाणीने मार्गदर्शक म्हणून वंदनीय आहेत. 

हेच आजचे जागतिक जलदिनाचे संक्षिप्त चिंतन ठरावे!           


गजानन गोपेवाड राज्य समन्वयक महाराष्ट्र

गुरुवार, २५ मार्च, २०२१

चला जाऊ फुलांच्या जगतात संकलन गजानन गोपेवाड


 









जाऊ फुलांच्या जगतात संकलन गजानन गोपेवाड


 





मादागास्कर लेख गजानन गोपेवाड


_______________________________

*🖥️✒️संकलन✒️💻*

गजानन गोपेवाड 

~==========================~


*नवदेशांचा उदयास्त : मादागास्करचे जैववैविध्य*

  


मादागास्कर हा स्वायत्त देश म्हणून अस्तित्वात आल्यावर १९६० साली त्यास संयुक्त राष्ट्र संघटनेचे सदस्यत्व मिळाले. स्वातंत्र्यानंतरच्या मधल्या दहा-बारा वर्षांत मादागास्करमध्ये माक्र्सवादी सरकारच्या काळात अर्थव्यवस्था गडगडली. दिवाळखोरीत निघालेल्या या देशाच्या सरकारवर पुढे २००४ मध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने काही आर्थिक बंधने लादून बरीचशी कर्जे माफ केली. सध्या मादागास्करची अर्थव्यवस्था विविध शेतमाल आणि खनिजांच्या निर्यातीवर अवलंबून आहे. मादागास्कर व्हॅनिलाचा सर्वात मोठा जागतिक पुरवठादार आहे. त्याशिवाय येथून कॉफी, लवंगा आणि मासे यांची निर्यात होते. खनिजांपैकी कोबाल्ट आणि निकेल यांच्या निर्यातीतूनही या देशाला चांगले उत्पन्न मिळते. मादागास्करमधील सध्याचे सरकार अमेरिका, जपान यांच्या साहाय्याने काही खाणींचे आधुनिकीकरण करून निर्यात वाढविण्याचा प्रयत्न करीत आहे.


सुमारे अडीच कोटी लोकसंख्या असलेल्या मादागास्करमध्ये ८५ टक्के लोक ख्रिस्ती धर्मीय, तर आठ टक्के इस्लाम धर्मीय आहेत. फ्रेंच, इंग्रजी या मादागास्करच्या राजभाषा असल्या, तरी तेथील स्थानिक मालागासी भाषा अधिक प्रचलित आहे. अंतानानारिवो हे राजधानीचे शहर येथील सर्वाधिक लोकसंख्येचे औद्योगिक शहर आहे.

मादागास्करचे खरे वैशिष्ट्य तेथील अनन्य जैववैविध्यात आहे. इथे असलेल्या वनस्पती आणि कीटक, सरपटणाऱ्या प्राण्यांपैकी ७५ टक्के प्रजाती दुर्मीळ आहेत, त्या अन्यत्र कुठेही आढळत नाहीत! या जैव प्रजातींचा अभ्यास करण्यासाठी तसेच पर्यटनाच्या हेतूनेही मोठ्या संख्येने पर्यटक मादागास्करला येत असतात. येथील सुमारे १२ हजार वनस्पती प्रजाती जगात अन्यत्र आढळत नाहीत. त्यामध्ये १६५ प्रकारचे पामवृक्ष आहेत. रविनाला या पामवृक्षाचे चित्र मादागास्करचे राष्ट्रीय बोधचिन्ह आहे आणि ते त्यांच्या राष्ट्रीय ध्वजावरही दिसते. काळी-पांढरी चक्रे असलेल्या लांब शेपटीचे लिमूर (चित्र पाहा) आणि त्याच्या ९६ उपजाती ही मादागास्करची खासियत! टेनरेक हा काटेदार उंदीर, चमकणारे सरडे, २७० जातींचे सरपटणारे प्राणी हे जगात मादागास्करशिवाय अन्यत्र आढळत नाहीत. मात्र, अलीकडे मादागास्करचे हे प्राणिवैभव शिकार आणि तस्करीमुळे कमी होत चालले आहे.


~=========================~


════════════════════


व्दिपद प्रमेय गजानन गोपेवाड

 

▬▬▬▬❚❂❚❂❚❚❂❚❂❚▬▬▬


══════════════════

______________________________

संकलन गजानन गोपेवाड 

~==========================~


*कुतूहल : द्विपद प्रमेय*

 

~प्रा. सलिल सावरकर

-


गणितातील प्रसिद्ध प्रमेयांच्या मालिकेतील एक प्रमेय म्हणजे बीजगणितातील द्विपद प्रमेय (बायनॉमिअल थिअरम)! ‘अ’ आणि ‘ब’ या कोणत्याही दोन पदांसाठी (अ+ब)२ = अ२ + २अब + ब२, हे सूत्र आपण शालेय बीजगणितात शिकतो. (अ+ब)(अ+ब) हा गुणाकार सोडवून सदर सूत्र सिद्ध होते. तसेच (अ+ब)(अ+ब)(अ+ब) असा गुणाकार म्हणजेच (अ+ब)३ करून अ३ + ३अ२ब + ३अब२ + ब३ हे सूत्र मिळेल; (अ+ब)४ = अ४ + ४अ३ब + ६अ२ब२ + ४अब३ + ब४ हे सूत्रही मिळू शकते. जर ‘न’ हा कोणताही धन पूर्णांक असेल तर (अ+ब)न साठी (अ+ब) या राशीचा तिच्याशीच ‘न’वेळा गुणाकार करून आवश्यक सूत्र नक्कीच मिळवता येईल.

तथापि, या वेळखाऊ मार्गाऐवजी एखादे सर्वसमावेशक सूत्र तयार करता येईल का? याचे उत्तर म्हणजे (अ+ब)न, याचे सूत्र द्विपद प्रमेय हे महत्त्वाचे प्रमेय देते. त्याच्या विविध सिद्धता न देता ते सोप्या तºहेने समजून घेऊ. त्यासाठी वरील तीन सूत्रांकडे पाहा. त्यांच्यात उजवीकडे असलेल्या पदांची संख्या ही डावीकडील घातांकापेक्षा एकने जास्त आहे, तसेच उजवीकडील पदांमध्ये ‘अ’चा घातांक पदागणिक एकेक कमी, तर ‘ब’चा घातांक एकेक वाढतो आहे. त्यामुळे (अ+ब)न च्या सूत्रासाठी आता फक्त प्रत्येक पदाचे सहगुणक हवे आहेत. त्यासाठी पिंगल (इ.स.पूर्व २००) यांनी दिलेला आणि आता ‘पास्कल-त्रिकोण’ नावाने संबोधला जाणारा आकृतीत दाखवलेला प्रस्तार पाहावा.


या आकृतिबंधात डावीकडील आणि उजवीकडील तिरक्या रेषांवर १ आहे; तर इतर कोणताही आकडा त्याच्या डोक्यावरच्या उजवी-डावीकडील दोन आकड्यांच्या बेरजेइतका आहे. यात तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या ओळीतील आकडे हेच क्रमाने (अ+ब)२, (अ+ब)३ आणि (अ+ब)४ यांच्या सूत्रांतील सहगुणक (कोइफिशिअंट्स) आहेत. यावरून (अ+ब)५ = अ५ + ५अ४ब + १०अ३ब२ + १०अ२ब३ + ५अब४ + ब५ हा विस्तार समजेल. आकृतीतील प्रस्तार हवा तितका वाढवून ‘न’च्या कोणत्याही किमतीसाठी (अ+ब)न चे सूत्र लिहिणे सहजसाध्य आहे.

द्विपद प्रमेयाचा वापर राष्ट्रीय अर्थस्थितीचे मापन, अभियांत्रिकी प्रकल्पाचा खर्च व वेळ यांचा अंदाज घेणे, तसेच हवामानाचे भाकीत वर्तवणे अशा अनेक महत्त्वाच्या कार्यांत केला जातो.





~==========================~

*📱गणित 📱*

▬▬▬▬❚❂❚❂❚❚❂❚❂❚▬▬▬▬


════════════════════

Featured Post

व्यायाम व योगा अवश्य करावा*

*व्यायाम व योगा अवश्य करावा*  *व्यायाम व योगा करण्याचे दहा फायदे:-*  1) व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते: व्यायाम करणारी...