शनिवार, १८ सप्टेंबर, २०२१

लिओनार्ड आँयलर शास्त्रज्ञ

 *🗻🗻लिओनार्ड ऑयलर🗻🗻*

📐📐📐📐📐📐📐📐📐📐📐

*इतिहासातले एक सर्वोच्च गणितज्ञ, आणि भौतिकशास्त्रज्ञ*

🌋🌋🌋🌋🌋🌋🌋🌋🌋🌋🌋

*स्मृतिदिन - १८ सप्टेंबर १७८३*


लिओनार्ड ऑयलर (जर्मन: Leonhard Euler, १५ एप्रिल १७०७ - १८ सप्टेंबर १७८३) हे     

       स्विस गणिती जगाच्या इतिहासातले एक सर्वोच्च गणितज्ञ मानण्यात येतात.त्यांनी लिहिलेल्या गणितातल्या संशोधनपर लेखांनी ७५ जाडजूड ग्रंथ व्यापलेले आहेत. ते ७६ वर्षे जगले, पण त्यांच्या तरुणवयापासूनच त्यांची दृष्टी काही व्याधीने मंदावली होती. अविश्वसनीय पण सत्यस्थिती अशी की आपल्या वयाच्या ५९व्या वर्षी त्यांची दृष्टी अजिबात गेल्यानंतर त्यानी आपले गणितातले अर्ध्याहून अधिक संशोधनपर लेख रचले.

त्यांची बुद्धिमत्ता इतकी अलौकिक होती की गणितातल्या कूट समस्या ते मनातल्या मनात सोडवू शकत, आणि गरज पडली तर ते ५० दशांश अंकांपर्यन्तची आकडेमोड अचूक करू शकत.



विज्ञानातील योगदान

त्या काळी गणिताच्या निरनिराळ्या शाखांतील कार्य काहीसे अर्धवट व असंबंधित स्वरूपाचे होते. ऑयलर यांनी त्यांत एकसूत्रता आणून त्याला पद्धतशीर स्वरूप दिले. आजच्या महाविद्यालयीन गणितातील बराचसा भाग, ऑयलर यांनी २०० वर्षांपूर्वी लिहिला होता, तो तशाच स्वरूपात अद्यापही आहे.

गणितातील योगदान

प्राथमिक भूमितीपासून तो उच्च विश्लेषणापर्यंत अनेक चिन्हे, पदावल्या व प्रमेये ऑयलर यांच्या नावाने ओळखली जातात. e, ∏ व I (=√-1) ही चिन्हे त्यांनीच प्रचारात आणली व त्यांना जोडणारे e∏I + 1 = 0 व हे समीकरणही शोधून काढले. त्रिकोणमितीय फलनांचे सध्या वापरात असलेली संक्षिप्त चिन्हे वापरण्यास व या फलनांचे विश्लेषणात्मक विवरण करून त्यांचा संख्यात्मक गुणोत्तरे म्हणून उपयोग करण्यास त्यांनी प्रारंभ केला. तसेच एकरूप समीकरणांच्या साहाय्याने त्रिकोणमितीय फलनांचे असत् घातांकांशी (ज्यात i या संख्येचा समावेश आहे) असणारे संबंध दाखविण्याचे कार्यही त्यांनी केले. घातीय स्वरूपात मांडून लॉगरिथमांची मूल्ये सुलभपणे काढता येतात व प्रत्येक संख्येला असंख्य स्वाभाविक लॉगरिथम असतात, असे त्यांनी सिद्ध केले.

कार्य व सन्मान

बीजगणित, तसेच ज्योतिषशास्त्र व भौतिकी या विषयांवरील त्यांचे ग्रंथ सुप्रसिद्ध आहेत. त्यांच्या सर्व कार्यांचे संकलन करण्याचे काम १९११ पासून लायपझीग येथे व १९४२ नंतर लोझॅन येथे चालू आहे. ते लंडनच्या रॉयल सोसायटीचे फेलो होते. पॅरिस व सेंट पिट्सबर्ग येथील अकॅडेमींतर्फे त्यांना अनेक सन्मान देण्यात आले. ते सेंट पिट्सबर्ग येथे मृत्यू पावले.

🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

संकलन -)

गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

प्रभात दर्शन

 🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

भाद्रपद मास,शुक्ल पक्ष, *१२/१३*,घनिष्ठा नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,वर्षा ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

शनिवार, १८ सप्टेंबर २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                        *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


हीरा वहा ना खोलिये,

                जहाँ कुजडो की हाट,

बान्धो चुप की पोटरी,

                लागहु अपनी बाट ..


*भावार्थः- ज्ञान की बातें अथवा चर्चा उन लोंगों के बीच नहीं करनी चाहिए, जो इसका महत्व नहीं समझते हैं एवं उपहास करते हों। ज्ञान की बातें मूर्खों के सामने करने की अपेक्षा, मात्र योग्य पात्रों के बीच ही करनी चाहिए, वहीँ इसकी उपयोगिता है।*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

शुक्रवार, १७ सप्टेंबर, २०२१

गाथा बलिदानाची

 *🖥️ महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक समूह 🖥️*

➿➿➿➿➿➿➿➿➿

       🇮🇳 *गाथा बलिदानाची* 🇮🇳

                 ▬ ❚❂❚❂❚ ▬                  संकलन : गजानन गोपेवाड                                                     

➿➿➿➿➿➿➿➿➿

💥🔫⛓️🇮🇳👨🏻🇮🇳⛓️💥🔫


        *मदनलाल धिंग्रा*


    *जन्म : १८ सप्टेंबर १८८३*

(अमृतसर, पंजाब, ब्रिटिश भारत)


    *फाशी : १७ ऑगस्ट १९०९*

(पेन्टोनव्हिल तुरुंग, लंडन, इंग्लंड)


चळवळ : भारतीय स्वातंत्र्यलढा

संघटना : अभिनव भारत,

                होमरूल लीग

धर्म : हिंदू

प्रभाव : विनायक दामोदर सावरकर


                  मदनलाल धिंग्रा  हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक क्रांतिकारक होते. इंग्लंडमध्ये शिकत असताना त्यांनी सर विलियम हट कर्झन वायली या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या केली. या घटनेचा २०व्या शतकातील भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील पहिल्या क्रांतीकारी घटनांपैकी एक म्हणून उल्लेख केला जातो.


🕺 *सुरुवातीचे जीवन*

            त्यांचा जन्म अमृतसर येथे उच्च मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे वडील एक ख्यातनाम डॉक्टर होते आणि बंधू बॅरिस्टर होते. मदनलालांचे शिक्षण अमृतसरला झाले. ते पंजाब विद्यापीठातून बी. ए. झाले व १९०६ मध्ये उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेले. तत्पूर्वी विद्यार्थिदशेतच त्यांचा विवाह झाला. इंग्लंडमध्ये त्यांनी स्थापत्य अभियांत्रिकीचा अभ्यास केला. तेथील वास्तव्यात त्यांचा स्वातंत्र्यवीर सावरकर, श्यामजी कृष्णवर्मा, हरदयाळ शर्मा वगैरे क्रांतिकारकांशी स्नेह जमला.


👬 *सावरकरांशी संबंध*

           मदनलाल धिंग्रा हे उच्च शिक्षणासाठी लंडन येथे राहत होते. सावरकर जेव्हा तिथे होते तेव्हा त्यांना एका भोजनप्रसंगी वर्णद्वेषाचा अनुभव आला. त्यांना वेगळ्या टेबलावर बसण्यास सांगितले. जाज्वल्य देशाभिमान आणि अत्यंत स्वाभिमानी सावरकरांना ही गोष्ट सहन झाली नाही आणि ते तिथून बाहेर पडले. त्या वेळी मदनलाल आणि त्यांचे एक मित्र तिथे उपस्थित होते. मदनलालांनी सावरकरांना समजवण्याचा प्रयत्न केला की ही अशी वागणूक त्यांना अंगवळणी करून घ्यायला हवी. मदनलाल आणि सावरकर यांची ही पहिली भेट!!! मदनलाल तसे श्रीमंत घराण्यातले होते. त्यांच्यात देशभक्तीची भावना निर्माण झाली ते सावरकरांच्या विचारांमुळे. हा प्रभाव इतका प्रचंड होता की पुढे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ते कर्झन वायलीचा खून करण्यास तयार झाले.


🔫 *कर्झन वायलीचा खून*

                   ते होमरूल लीग व सावरकरांच्या अभिनव भारत या संस्थांचे सभासद झाले. त्यांच्या भावनाप्रधान मनावर खुदिराम बोस व कन्हैयालाल या क्रांतिवीरांच्या बलिदानाचा फार मोठा परिणाम झाला. त्यांनी सशस्त्र क्रांतिवीरास साजेसे शिक्षण घेतले. पुढे त्यांनी भारताच्या मंत्र्याचा स्वीय सहाय्यक कर्नल विल्यम कर्झन वायली याच्या खुनाचा कट केला. त्यांचा पहिला बेत फसला. पुढे १ जुलै १९०९ रोजी इंपीरियल इन्स्टिट्यूटच्या जहांगीर हाऊसमध्ये इंडियन नॅशनल असोसिएशनच्या सभेच्या वेळी त्यांनी कर्झन वायली यावर गोळ्या झाडल्या; त्या वेळी कोवास लालाकाका हाही मध्ये आला. दोघेही मरण पावले. कर्झन वायली खरेतर मदनलाल यांच्या वडिलांचा स्नेही होता. या खुनाबद्दल मदनलाल यांना फाशीची शिक्षा देण्यात आली. पेन्टोनव्हिल (लंडन) तुरुंगात ते ‘भारत माता की जय’च्या उद्‌घोषात फाशी गेले.


🕯 *शेवटचे वक्तव्य*

           फाशीवर जाण्यापूर्वीच्या शेवटच्या वक्तव्यात धिंग्रानी असे म्हटले आहे "आत्म बलिदान कसे करावे ही एकच शिकवण सध्या हिंदुस्थानात देण्यायोग्य आहे.ही शिकवण देण्याचा एकच मार्ग म्हणजे स्वत:चे बलिदान करून मोकळे होणे होय. या जाणिवेने प्रेरित होऊन मी प्राणार्पण करत आहे व माझ्या हौतात्म्याचा मला अभिमान वाटत आहे.याच भारतभूचे संतान म्हणून मला पुनर्जन्म प्राप्त होवो व याच पवित्र कार्यात माझा देह पुन्हा पडो इतकीच ईश्वरचरणी माझी प्रार्थना आहे.भारतीय स्वातंत्र्याचा पक्ष विजयी होऊन, मानवजातीचे कल्याण व ईश्वराचे वैभव यांचा पुरस्कार करणारा स्वतंत्र भारतवर्ष जगात आत्मतेजाने तळपू लागेपर्यंत माझ्या जन्ममृत्यूचे हे चक्र असेच चालू राहावे अशी माझी परमेश्वराला प्रार्थना आहे."


💎 *नाटक*

            मदनलाल धिंग्रा आणि सावरकर यांच्या जीवनावर मराठीत 'चॅलेंज' नावाचे नाटक आले आहे. पहिल्या दहा प्रयोगांना मोफत किंवा 'नाटक पाहा आणि आवडेल तेवढे पैसे द्या' अशी सवलत आहे. नाटकाचे लेखक-दिग्दर्शक-वेशभूषा : दिग्पाल लांजेकर; सादरकर्त्या : मुक्ता बर्वे.


          🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳


🙏 *विनम्र अभिवादन* 🙏

                 

                                                                                                                                                                                                                                                            ➖➖➖➖➖➖➖➖➖                                          

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन

 ➿➿➿➿➿➿➿➿➿➿

*🇮🇳 मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन 🇮🇳*

➿➿➿➿➿➿➿➿➿➿

               *१७ सप्टेंबर १९४८*

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन हा महाराष्ट्रातील एक राजकीय उत्सव आहे. हा सण दरवर्षी १७ सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. या दिवशी १९४८ मध्ये मराठवाड्यातील निजामाची सत्ता संपली आणि १७ सप्टेंबर १९४८ रोजी मराठवाडा भारताचा एक भाग बनला.उत्सव साजरा केला जातो.

मराठवाड्यात तिरंगा फडकावला जातो.

मराठवाड्याशी संबंधित सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते

राजगोपालचारी उद्यान परभणी येथे सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे अयोजन केले जाते


मराठवाडा लढा इतिहास -)

१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला, पण त्यावेळी संपूर्ण देश विविध संस्थानांमध्ये विखुरलेला होता. त्यावेळच्या ५६५ पैकी ५६२ संस्थांनांनी स्वतंत्र भारतात सामील होण्याची सहमती दर्शविली आणि तशी कार्यवाही केली. मात्र हैदराबाद संस्थान, जम्मू आणि काश्मीर आणि जुनागड संस्थान ही तीन संस्थाने स्वतंत्र भारतात सामील झाली नव्हती.


हैदराबाद संस्थानावर निजाम मीर उस्मान अली खान यांचे राज्य होते. हैदराबाद संस्थानावर तब्बल सहा पिढ्यांपासून निझाम वंशाचे राज्य होते. त्यांच्या निजामांच्या राज्यातून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात सामील होण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण हैदराबाद संस्थानात मुक्ती संग्राम सुरु झाला होता.


हैदराबाद संस्थानची त्यावेळची लोकसंख्या १ कोटी ६० लाख होती. यात तेलंगणा, मराठवाडा आणि कर्नाटकचा कांही भाग येत होता. मुक्ती संग्राम सुरु झाल्यावर निजामाचा सेनापती कासीम रझवी याने मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (लघुरुप एम आय एम) या संघटनेच्या माध्यमातून रझाकार नावाने मुस्लिम स्वयंसेवकांची भरती केली आणि त्यांच्या मदतीने जनतेवर अनन्वित अत्याचार सुरु केले.


यांच नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ, दिंगबरराव बिंदू, गोविंदभाई श्रॉफ, रविनारायण रेड्डी, देवीसिंग चौहान, भाऊसाहेब वैशंपायन, शंकरसिंग नाईक, विजयेंद्ग काबरा, बाबासाहेब परांजपे या आणि इतर अनेक नेत्यांकडे होते. मराठवाडयाच्या गावागावात हा संग्राम लढला गेला. यात जीवाची पर्वा न करता अनेक स्वातंत्र्यवीर पुढे आले. मराठवाडयात निजामांच्या पंतप्रधानास रोखण्यासाठी पूल उडवून देणारे काशीनाथ कुलकर्णी, मराठवाडयाची राणी लक्ष्मीबाई म्हणून प्रसिद्ध झालेल्या बदनापूर तालुक्यातील धोपटश्र्वर गावच्या दगडाबाई शेळके, रोहिल्यांना जेरीस आणणारे बीडचे विठ्ठलराव काटकर, बर्दापूर पोलीस ठाणे उडवून देणारे लातूरचे हरिश्चंद्गजी जाधव, नळदूर्ग सर करणारे उस्मानाबाद जिल्हयातील होटी गावचे जनार्दन होर्टीकर गुरुजी तसेच परभणीत रझाकारांना हुसकावून लावणारे सूर्यभान पवार, विनायकराव चारठाणकर, विश्र्वनाथराव कातनेश्र्वरकर, नांदेड येथील देवरावजी कवळे, जीवनराव बोधनकर आदींच्या रुपाने मराठवाड्याच्या कानाकोपज्यात स्वातंत्र्य संग्राम तेजस्वीपणे लढला गेला.


या मुक्ती संग्रामात श्रीधर वर्तक, जानकीलालजी राठी, शंकरराव जाधव, जालन्याचे जनार्दन मामा, किशनसिंग राजपूत,गोविंदराव पानसरे, बहिर्जी बापटीकर, राजाभाऊ वाकड,विश्र्वनाथ भिसे,जयंतराव पाटील आदींसारख्यांनी आपल्या जीवाची तमा न बाळगता काम केले. या सर्व हुतात्म्यांनी आणि मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांनी केलेल्या संग्रामाचं मोल काढणं शक्य नाही. यासीन जूबेर हैद्राबादी मंत्री याने मुक्तीसेनेने ताब्यात घेतलेली परत घेण्याची प्रतिज्ञा केली त्यमुळे औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापुर तालूक्यातील जातेगाव माळावर निजामाच्या सैन्याला पुढे सरकु दिले नाहीत यामध्ये मानसिंग राजपुत, लक्ष्मण आवचार, रामलाल राजपूत, व रामचंद्र धंदेवार हे आघाडीवर होते यामध्ये रामचंद्र धंदेवार याना बाळगिर मठ सरला येथे बंदुकीच्या गोळीने वेध घेतल्याने शहीद झाले त्यावेळी गोदामाय दुथडी भरुन वाहत होती. रामचंद्र याना क्षिरसागर नावाच्या मर्दाने शहीदास आपल्या पाठीवरुन पैलतीरी आणुन भर पावसात खड्डा केला व त्यांचा विधी पूर्ण केला.


निझाम सरकारचे हे अत्याचार एवढे अनन्वित होते की हैदराबाद मुक्तिसंग्रातील काँग्रेस कार्यकर्यांच्या शस्त्रे हाती घेऊ देण्याच्या विनंतीस स्वतः महात्मा गांधींनी सुद्धा संमती दिली. शेवटी भारताचे तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी निझाम सरकारच्या विरोधात पोलीस ऍक्शन ची घोषणा केली. १८ सप्टेंबर १९४८ रोजी ऑपरेशन पोलो अंतर्गत मेजर जनरल जे एन चौधरीच्या नेतृत्वाखाली पाच दिशेने निझाम संस्थानावर कारवाई सुरू झाली. मुख्य फौजा सोलापूरकडून घुसल्या. पहाटे ४ वाजता ऑपरेशन सुरु झाल्यावर २ तासांत नळदुर्ग व सायंकाळपर्यंत तुळजापूर, परभणी ते मणिगढ, कनेरगाव, विजयवाड्याकडील बोनाकल ताब्यात घेतले. चाळीसगावकडून आलेल्या तुकडीने कन्नड, दौलताबाद तर बुलढाण्याकडेच्या तुकडीने जालना शहर ताब्यात घेतले. दुसरीकडे वरंगल, बीदर विमानतळावर भारतीय फौजांनी हल्ले केले. १५ सप्टेंबर रोजी औरंगाबाद सर करुन फौजा पुढे निघाल्या. भारतीय फौजे पुढे रझाकार फार वेळ टिकू शकले नाहीत. निजामी सैन्य माघार घ्यायला लागले आणि कासीम राजवी ला अटक झाली. शेवटी २२ सप्टेंबर १९४८ रोजी हैदराबादचे सेनाप्रमुख जन अल इद्गीस यांनी शरणांगती स्वीकारली आणि निझाम सरकारने हार मानली आणि हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले आणि हैदराबाद संस्थानात तिरंगा फडकला.

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

संकलन -)

गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा - यवतमाळ ४४५२०६

प्रभात दर्शन

 🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

भाद्रपद मास,शुक्ल पक्ष, *एकादशी*,श्रवण नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,वर्षा ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

शुक्रवार, १७ सप्टेंबर २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                        *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

       *"जीवन में बहुत से शत्रु उत्पन्न कर लेना परम् मूर्खता है, परन्तु उससे भी बढ़कर मूर्खता यह है कि अच्छे व्यक्तियों की मित्रता को छोड़ दिया जाए।*

        *श्रेष्ठ, सहृदयी, सहयोगी व् ज्ञानी मित्र ही आपके जीवन की वास्तविक पूंजी है, इन्हें सहेज कर रखना चाहिए।"*

 ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

गुरुवार, १६ सप्टेंबर, २०२१

भोपाळ दुर्घटना का झाली

Science expo 

══════════════════════

   *📒📒📒 @ संकलन @📒📒📒*

  *श्री. गजानन गोपेवाड 

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════             

📕 *भोपाळ दुर्घटना का झाली?* 📕


१९८५ मध्ये भोपाळच्या युनियन कार्बाईड या कंपनीत वायूगळती झाली व त्यात ५००० लोक बळी पडले. कित्येक हजार लोक आजारी पडले. या घटनेविषयी, त्यानंतरच्या नुकसानभरपाईसाठीच्या आंदोलनाविषयी, तसेच न्यायालयातील साक्षीपुराव्यांविषयीही तुम्ही वृत्तपत्रात वाचले असेल. भारतातील औद्योगिक क्षेत्रातील सुरक्षिततेविषयी सर्वांचे डोळे उघडणाऱ्या या दुर्घटनेविषयी माहिती घेऊ. भोपाळच्या कारखान्यात वायूगळती झाली. मिथाईल आयसोसायनेट हा तो वायू. सामान्यपणे मिथाईल आयसोसायनेट द्रव अवस्थेत असते, पण तापमान ३१° सेंटीग्रेडच्या वर गेले तर मात्र हा द्रव वायूरूप होतो.

पाणी व इतर अनेक द्रावणाशी मिथाईल आवसोसायनेट संयोग पावत असल्याने चांगल्या प्रकारे निष्क्रीय अशा परिस्थितीत तो साठवावा लागतो.

मिथाईल आयसोसायनेट हा अत्यंत विषारी पदार्थ आहे. हायड्रोजन सायनाईड व फॉस्जीन या विषारी वायूपेक्षाही तो जास्त विषारी आहे व त्यांच्यापेक्षा कमी प्रमाणात शरीरात गेला, तरीही गंभीर परिणाम होऊ शकतात.

हा वायू त्वचा, डोळे व शरीरातील इतर आवरणांमध्ये दाह निर्माण करतो. वायू शरीरात गेल्यानंतर ४८ तासात मरणाऱ्या व्यक्तीमध्ये घशात जळजळ, असहय अशी डोळ्यांची जळजळ, छातीत वेदना व श्वसनाला खूप त्रास अशी लक्षणे दिसतात. फुफ्फुसाला सूज आल्याने मृत्यू येतो. ५-६ दिवसांत गरणाऱ्या व्यक्तींमध्ये स्नायूमध्ये शक्तिपात, लुळेपणा, झटके, कोमा ही लक्षणे दिसतात व मृत्यू मेंदूच्या सुजेमुळे होतो. गरोदर स्त्रियांमध्ये या वायूमुळे गर्भपात, अपेक्षित तारखेच्या आधी बाळंतपण व मृत बालकाचा जन्म अशा गोष्टी आढळून आल्या.

रक्ताची रासायनिक तपासणी केल्यास त्यात मिथाईल आयसोसायनेट, सायनाईड आयन तसेच मोनोमेथीलामीन

हे पदार्थ सापडले. यांच्यावरून सहजगत्या निदान होऊ शकते.

या विषबाधेवरचे उपचार लक्षणानुरूप करावे लागतात. प्रतिजैविके, स्टेरॉईडस, डोळ्यांत औषधाचे थेंब व श्वसनासाठी प्राणवायू इ. उपायांचा यात समावेश होतो. अशी दुर्घटना होऊ न देणे, हाच उत्तम उपाय होय. त्यासाठी कारखान्यातील सुरक्षिततेकडे विशेष लक्ष द्यायला हवे. यंत्रसामुग्री, रसायने साठवण्याचे टँकर, रसायने वाहून नेणाऱ्या नळ्या इत्यादींची देखभाल नीट केल्यास अशा दुर्घटना टाळता येतील.


*डाॅ.अंजली दिक्षित व डाॅ.जगन्नाथ दिक्षित*

*यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' पुस्तकातून*

═══════════════════════

बुधवार, १५ सप्टेंबर, २०२१

अभियंता विश्वश्वरैय्या

 विश्वेश्वरैयांचे वंशज

आज अभियंता दिनाच्या निम्मिताने आपण भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरैया याचं स्मरण करतो.  या निम्मिताने मी आजवर जवळून पाहिलेल्या, अनुभवलेल्या विश्वेश्वरैयांच्या काही खास अशा वंशजांची ओळख करून देत आहे.

१. २०१६ साली कोल्हापुरात डॉ डी. वाय. पाटील यांना भेटायला एक VIP व्यक्ती हेलिकॉप्टरने आली होती. भेट झाल्यावर निघतांना हेलिकॉप्टर काही सुरु होईना. पायलट हेलिकॉप्टर कंपनीच्या टेक्निकल टीमशी बोलले पण  त्याचा काही उपयोग झाला नाही. त्या VIP नां तत्काळ पुढे निघायचं होतं, त्यात कंपनीच्या टेक्निकल टीमला दुरुस्तीसाठी जागेवर यायला ३ दिवसांचा वेळ लागेल असं कळवलं. परिसरात दुसरं हेलिकॉप्टरसुद्धा उपलब्ध नव्हतं. 

मग डी. वाय. पाटील यांचे चिरंजीव श्री संजय पाटील यानी कोल्हापुरातील एका कार मिस्त्रीला तिथं बोलावलं. या मिस्त्रीने आयुष्यात कधी हेलिकॉप्टरला हातही लावला नव्हता पण त्या अवलियाने अर्ध्या तासात हेलिकॉप्टरमध्ये झालेला बिघाड दुरुस्त केला. पायलटने खात्री केल्यावर आलेली VIP मंडळी सुखरूपपणे आपल्या गंतव्यस्थानी पोहोचली. गंमत म्हणजे बेकायदा हेलिकॉप्टर दुरुस्ती केली म्हणून नागरी उड्डयन मंत्रालयाने या मिस्त्रीची चौकशी लावली होती.

याच मिस्त्रीने २००६ साली भंगारात गेलेल्या एका कारमध्ये बदल करून ती कोल्हापुरात रंकाळ्याच्या पाण्यावर चालवून दाखविली होती.

फिरोज मोमीन हा तो अवलिया

२. विजार-शर्टातला ITI शिकलेला इचलकरंजीमधला एक तरुण ५० वर्षापूर्वी ४ सीटर इलेक्ट्रिक कार तयार करून शहरातून चालवत होता. सर्वजन कुतूहलाने पहात असतांना ही कार खंडाळ्याचा घाट चढणार का असा टोमणा त्यातील एकाने मारला. त्या तरूणाने कार चार्ज केली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ती कार मुंबईत मंत्रालयासमोर उभी केली. पुढे त्यांनी किमान ५० एक नवे शोध लावले, प्रत्येकाची एक इंडस्ट्री उभी केली, त्यातील काही कंपन्या जागतिक पातळीवर सुद्धा गेल्या.

१९७६ साली एका प्रख्यात जापनीज कंपनीला आपल्या एका प्रोडक्टच्या निर्मितीसाठी २० सेकंद लागणारं Cycle Time यांने इचलकरंजीमध्ये ते १२ सेकंदात बसवून दाखवलं. 

जगप्रसिद्ध फाय गृपचे संस्थापक श्री पंडितराव कुलकर्णी हे या अभियंत्याच नाव 

३. युरोप मध्ये फिरता रंगमंच पाहून “तो मी नव्हेच” या नाटकासाठी ते महाराष्ट्रात बनवायचं स्वप्न घेवून नटश्रेष्ठ प्रभाकर पणशीकर आले होते. बऱ्याच अभियंत्यांना, रचनाकारांना आणि कंपन्यांना भेटून सुद्धा त्यांना हवं तसं डिझाईन मिळत नव्हतं. कोल्हापुरात एकदा प्रयोग संपल्यावर त्यांच्या एका मित्राने पणशीकरानां एका लोहाराच्या पालावर घेवून गेले. पणशीकरांनी अगदी इनिछेने आपली संकल्पना त्याला समजावून सांगितली. त्या लोहाराने दुसऱ्या दिवशी कुंभाराच्या फिरत्या चाकावर पुली आणि लिव्हर गिअर वापरून फिरता बहुमजली रंगमंचाचा मॉडेल चालवून दाखविला जो पुढे पणशीकर आणि इतर सर्वच नाटककारांनी आपल्या वापरता आणला.

किर्लोस्करांनी डीझेलवर चालणारा जनरेटर मर्केतमध्ये आणला तेव्हां या लोहाराने कोळश्यावर चालणारा जनरेटर बनवला जो डीझेल जनरेटरच्या दुप्पट कार्यक्षमतेने चालणारा आणि फक्त ३० % किमतीती बनवला होता. 

ही असामी म्हणजे इयत्ता दुसरी शिकलेले म्हादबा मिस्त्री अर्थात महादेव शेळके

४. उद्योगाची आणि अभियांत्रिकी शिक्षणाची कुठलीही पार्श्वभूमी नसलेला पाथरवट (वडार समाजातील एक उपजात) समाजातील एका तरुण दगड फोडता-फोडता, धरणाच्या कालवा खुदाईची कंत्राटे घेऊ  लागला. पुढे बंधारे, धरण, रस्ते, पाईपलाईनची कामे घेत वस्त्रोद्योग, उर्जा, महामार्ग, बांधकाम सारख्या क्षेत्रात आपला उद्योगविस्तार १००० कोटींच्याही पुढे नेला.

कित्तेक उच्चशिक्षित अभियंत्याना घडवणारा बंडी, धोतर, गांधीटोपी वेशातला हा अशिक्षित पण विद्वान अभियंता म्हणजे रामचंद्र मारुती मोहिते 

५. सांगली जिल्ह्याच्या पेड गावातील चांभार कुटुंबातील एक युवक मुंबईतील माझगाव डॉक वर वेल्डरचं काम करणाऱ्या आपल्या मोठ्या भावासोबत शिकाऊ उमेदवार म्हणून रुजू झाला. तिथे काम करता-करता इंजिनीअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं. देश-विदेशात काम करून व्यावसाईक अनुभव मिळवला. पुढे स्वतःची कंपनी सुरु केली (त्या कंपनीच्या नावात आपल्या सर्व भावांच्या नावाचा समावेश आहे) जिथे ४५०० लोक काम करतात आणि आजचा टर्नओवर ५०० करोड आहे. २०१४ ला आपल्या भावाला मिरजेचा आमदार बनवला. बालपणी जाती-व्यवस्थेचे चटके खात ज्या गाव-विहिरीच्या पाण्याला स्पर्श करायला मनाई होती त्याच गावात त्यांनी सार्वजनिक विहीर खोदून दिली.

हे आहेत मुंबईतील DAS Offshore चे श्री अशोक खाडे

आणि DAS चा फुल्लफॉर्म आहे - दत्ता, अशोक, सुरेश

६. टाटा मोटर्स मध्ये काम करणाऱ्या एका इंजिनीअरने टाटा इस्टीम या गाडीच्या निर्मिती प्रक्रीयेमध्ये आपलं कौशल्य वापरून कंपनीचे २.५ करोड रुपये वाचविले. त्याच्या बक्षीसापोटी मिळणारं प्रमोशन नाकारून आपल्या गावाकडच्या अल्पशिक्षित तरुण मित्रांना कंपनीत नोकरी देण्यासाठी विनंती केली. टाटा मोटर्सने ती आनंदाने मान्य केली आणि अल्पावधीत याद्वारे ३०० तरुणांना रोजगार मिळाला. यातूनच २००१ साली सेवा क्षेत्रातील एका नव्या व्यवसायाचा उदय झाला ज्याची मजल आज ७५,००० लोकांच्या रोजगारापर्यंत येऊन पोचली आहे. पंतप्रधान कार्यालय, राष्ट्रपती भवन, संसद भवन, सुप्रीमे कोर्ट, १०० एक महत्वाच्या खाजगी कंपन्या, १५ महत्वाची विमानतळे, ५० महत्वाची मंदिरे आणि अजून बरंच काही... २२ राज्यातील ७० शहरात कार्यालये उघडली. सोबत शेती, Life Science, महाराष्ट्र आणि जम्मू मधील १०८ Emergency Medical Service , मेगा फूड पार्क, न्यूक्लिअर सायन्सचे Peace Applications, शहरी कचरा व्यवस्थापन या आणि अशा अजून बऱ्याच क्षेत्रात भरीव कामगिरी करून दाखवली. 

आपल्या वयाच्या १९ व्या वर्षी या युवकाने आपल्या देशाच्या विकासाच स्वप्नं पाहून त्याच नावाने कंपनी स्थापन केली होती. आज याची वार्षिक उलाढाल २००० कोटींची पुढे आहे. 

महाराष्ट्राच्या आजवरच्या प्रगतीत गेल्या ६० वर्षात महत्वाच योगदान दिलेल्या (हयात असलेल्या) ६० व्यक्तींमध्ये याचं नाव अग्रक्रमावर येतं.

आपल्या व्यवसायामुळे १० कोटी लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडले पाहिजेत, १० लाख लोकांना रोजगार मिळाला पाहिजे आणि आपली कंपनी १०० देशात कार्यरत असली पाहिजे या दिव्य स्वप्नपूर्तीसाठी अहोरात्र झटणारे, मानवता जपणारे आणि जगणारे, अत्यंत संवेदनशील आणि सदैव हसतमुख असणारे, मुळचे रहिमतपूरचे आणि VIT कॉलेजचे Electronics इंजिनीअर असणारे 

BVG म्हणजेच भारत विकास ग्रुपचे संस्थापक श्री हणमंतराव गायकवाड 


यां सगळ्यांनी आम्हांला प्रेरणा दिली, आमचं जीवन सुखकर केलं आणि देशाच्या निर्मितीत भरीव योगदान दिलं.

माहितीती असलेल्या, नसेलेल्या अशा सर्वच विश्वेश्वरैयांच्या खऱ्याखुऱ्या वंशजांना अभियंता दिनाच्या निम्मिताने मानाचा सलाम !

 (फेसबुक वॉल वरून साभार)

संकलन, गजानन गोपेवाड 

धुरामुळे गुदमरल्यासारखे का होते


══════════════════════

   *📒📒📒 @ संकलन @📒📒📒*

  *श्री. गजानन गोपेवाड 

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════             

📕 *धुरामुळे गुदमरल्यासारखे का होते?* 📕


धुरात माणूस गुदमरतो. याचे कारण काय ते आता पाहू. आपण हवा श्वासावाटे आत घेतो. त्यात ऑक्सिजन (२०.९३ टक्के), कार्बन डायऑक्साइड (०.०३ टक्के), नायट्रोजन (७८.१ टक्के) तसेच अत्यल्प प्रमाणात

निऑन, अॅगन, क्रिप्टॉन, झेनॉन व हेलीयम हे वायू असतात. या खेरीज पाण्याची वाफ, अमोनिया तसेच धूळ. जिवाणू, वनस्पतीजन्य कचरा असे तरंगणारे पदार्थही असतात.


धुरामध्ये कार्बन डाय ऑक्साइड असतो. हवेतील त्याचे प्रमाण वाढल्याने व ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्याने

गुदमरल्यासारखे वाटत असेल असा पूर्वी समज होता. प्रत्यक्षात मात्र ऑक्सिजनचे प्रमाण १८ टक्क्यांपर्यंत कमी झाले.

वा कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण ५ टक्क्यांपर्यंत वाढले, तरी आपल्याला फारसा त्रास होत नाही, असे शास्त्रीय

निरीक्षणाद्वारे सिद्ध झाले आहे.


धुरामध्ये माणसाला गुदमरल्यासारखे वाटते, अस्वस्थ वाटते. याचे कारण म्हणजे तापमानात होणारी वाढ.

तापमानातील वाढीमुळेच माणसाचा मृत्यूही ओढवू शकतो. कलकत्त्यामध्ये एका तुरुंगात १८ × १४ X १० फुटाच्या

खोलीत १४६ कैदी होते. खोलीला वायूवीजनासाठी पुरेशा अशा दोन लहान खिडक्या होत्या. ऑक्सिजन, कार्बन

डायऑक्साइड यांचे प्रमाण सामान्य राहूनही त्यातील फक्त २३ जण जिवंत राहिले. कारण त्या खोलीतील तापमान

व आर्द्रतेत खूपच वाढ झाली होती. अर्थात धुरामुळे हवेतील कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण ५ टक्क्यांच्या वर गेले, तर त्यामुळेही गुदमरल्यासारखे होते.


*डाॅ.अंजली दिक्षित व डाॅ.जगन्नाथ दिक्षित*

*यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' पुस्तकातून*

═══════════════════════

मंगळवार, १४ सप्टेंबर, २०२१

देशातील पहिली दूरचित्रवाणी

 ************************************

*१५ सप्टेंबर - देशातील पहिल्या दूरचित्रवाणी वाहिनीचा वाढदिवस*

************************************


*पहिले प्रसारण - १५ सप्टेंबर १९५९*


'दूरदर्शन' या केंद्र सरकारने सुरू केलेल्या देशातील पहिल्या दूरचित्रवाणी वाहिनीचा आज वाढदिवस.


१५ सप्टेंबर १९५९ रोजी एक छोटासा ट्रान्समीटर व स्टुडिओ यांच्या साह्याने दूरदर्शनचे काम चालू झाले. राजधानीत दूरदर्शनची ही मुहूर्तमेढ रोवली जाताना ज्येष्ठ साहित्यिक पु.ल. देशपांडे यांचा त्यात मोलाचा वाटा होता. दुरदर्शनचे पहिले संचालक होते प्रत्येक मराठी माणसाचे लाडके व्यक्तिमत्व पु.ल. देशपांडे. पु.लं. नीच "दुरदर्शन" हे नाव सुचवले. 


दूरदर्शनवरुन बातमीपत्राची नियमित सेवा १९६५ पासून सुरु झाली. १९७२ मध्ये दूरदर्शन सेवा मुंबईत आली. १९७५ मध्ये चेन्नई, श्रीनगर, अमृतसर व लखनौ या शहरांमध्ये दूरदर्शनचे प्रसारण सुरु झाले. उपग्रहाद्वारे सामाजिक शिक्षण अथवा अत्याधुनिक तंत्रज्ञानातून सामाजिक शिक्षण देण्याचा पहिला प्रयोग भारतात केला. सॅटेलाईट इंस्ट्रक्शनल टेलेव्हिजन एक्सपरीमेंट ची चाचणी १९७५-७६ या वर्षी घेण्यात आली. याद्वारेच जगात प्रथमच सामाजिक शिक्षणाचा प्रचार घरोघरी करण्यात आला. 


१९८२ मध्ये दिल्ली आणि अन्य ट्रान्समिटर्स दरम्यान उपग्रहांमार्फ़त प्रसारण सुरु करण्यात आले. १९८२ मध्ये टीव्ही रंगीत झाला. पंतप्रधानांचे लाल किल्ल्यावरचे भाषण देश पाहू लागला आणि 'नॅशनल ब्रॉडकास्टर' ही दूरदर्शनची ओळख रुजली. 'ऑल इंडिया रेडिओ'च्या सावलीतून दूरदर्शन बाहेर आले.१९८५ नंतर घरोघरी दूरचित्रवाणी संच दिसू लागले. आणि मालिकांविषयीच्या चर्चा रंगू लागल्या.


चिमणराव आणि गुंड्याभाऊ, चाळ नावाची वाचाळ वस्ती, गोट्या, बंदिनी, एक शुन्य शुन्य, सर्जा राजा, प्रतिभा आणि प्रतिमा, ज्ञानदीप, आमची माती आमची माणसं या मालिका ज्ञान, माहिती आणि निखळ मनोरंजन देण्याचं काम करीत होत्या. व्यत्यय नावाची पाटीही चांगलाच भाव खावून जायची. 


हिंदीतल्या बुनियाद, हमलोग, ये जो है जिंदगी, रजनी, तमस, रामायण, महाभारत, द वर्ल्ड धिस वीक, दर्पण या मालिकांनी तर मनोरंजनाच्या विश्वात अफाट प्रेक्षक वर्ग मिळवला. अनंत भावे, प्रदीप भिडे, शम्मी नारंग, अविनाश कौर सरीन यांचे आत्मविश्वासाने परिपूर्ण असलेले वृत्तनिवेदन दर्शकांना भारावणारे असेच होते. 


गेल्या दोन दशकांत झालेल्या संज्ञापन क्रांतीमुळे दूरदर्शनचा भारतातला एकाधिकार संपत गेला. नंतर सगळ्या राष्ट्रीय चर्चांमध्ये दूरदर्शनचे स्थान नगण्य होत गेले. सरकारने दूरदर्शनमध्ये चैतन्य यावे, यासाठी 'प्रसार भारती'ची स्थापना केली. देशात ९० टक्क्यांहून अधिक लोकसंख्येपर्यंत कोणतेही खासगी चॅनल जात नाही. दूरदर्शन मात्र जाते. याशिवाय, दूरदर्शनकडे देशभरात ४६ स्टुडिओंचे जाळे आहे. इतके विशाल जाळे कोणत्याही खासगी वाहिनीकडे नाही. असे असूनही दूरदर्शनचा समाजमनावर फारसा प्रभाव आज नाही. असे का, याचे आत्मपरीक्षण करायला हवे. 


सरकारच्या विरोधात फारशा न जाणाऱ्या पण वस्तुनिष्ठ बातम्या हे दूरदर्शनचे खरे शक्तिस्थान होते. गेल्या दशकभरात दूरचित्रवाणी हा मीडियाचा सर्वाधिक जाहिराती व त्यामुळे उत्पन्न मिळणारा अवतार झाला आहे.

🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

संकलन -)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

**********************************

कार्बन मोनाआँक्साईडचे दुष्परिणाम


══════════════════════

   *📒📒📒 @ संकलन @📒📒📒*

  *श्री. गजानन गोपेवाड 

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════             

📕 *कार्बन मोनॉक्साइडचे 'काय दुष्परिणाम होतात ?* 


कार्बन मोनॉक्साइड हा रंगहीन, गंधहीन वायू आहे. या वायूचे अस्तित्व आपल्या पंचज्ञानेंद्रियांच्या सहाय्याने आपल्याला जाणवू शकत नाही. कार्बन आणि सेंद्रिय पदार्थाच्या अर्धवट ज्वलनानंतर हा वायू तयार होतो. जुनाट, वापरात नसलेल्या विहिरी, घर जळताना, डायनॅमाईटचा स्फोट झाल्यानंतर अशा विविध ठिकाणी हा वायू तयार होतो. पाश्चिमात्य देशांत घरोघरी वापरल्या जाणाऱ्या 'कोलगेंस'मध्ये कार्बन मोनॉक्साइडचे प्रमाण ७ ते १५ टक्के इतके असते. अशा वायूमुळे २ ते ५ मिनिटांत मृत्यू ओढवू शकतो.


कार्बन मोनॉक्साइड रक्तातील हिमोग्लोबीनशी संयोग पावतो व कार्बोक्सीहिमोग्लोबीन तयार होते. साहजिकच त्यामुळे शरीराला प्राणवायूचा पुरेसा पुरवठा होत नाही. प्राणवायूच्या अभावामुळे रक्तवाहिन्यांची आवरणे दुबळी होतात, हृदयाला प्राणवायू न मिळाल्यामुळे त्याच्या कार्यक्षमतेतही घट होते. हिमोग्लोबीनला या वायूचे खूप आकर्षण असते. किती हिमोग्लोबीन प्राणवायू वाहण्यासाठी निकामी झाले आहे, यावर कोणती लक्षणे दिसून येतील है। अवलंबून असते. या लक्षणांमध्ये दम लागणे, डोकेदुखी, थकवा, घाम येणे, कानात आवाज येणे, चक्कर, मळमळ, उलटी, भ्रम, दृष्टी क्षीण होणे, छातीत धडधड होणे, झटके येणे, कोमा इत्यादींचा समावेश होतो. श्वसन बंद पडल्याने मृत्यू ओढवतो.


आपल्याकडे या वायूची विषबाधा अपघातानेच पाहायला मिळते. परंतु पाश्चिमात्य देशात मात्र या वायूमुळे खूप आत्महत्या होतात.


उपचारात प्रथमतः रुग्णाला वायूचा प्रादूर्भाव असलेल्या ठिकाणापासून दूर न्यावे. या वायूचे प्रमाण कमी झाल्यावर रुग्ण परत पूर्वपदावर येतो. ५ ते ६ तासात रक्तातील सर्व कार्बन मोनॉक्साइड बाहेर पडतो. गंभीर रुग्णांमध्ये रक्त द्यावे लागते. मेंदूवर वायूचा झालेला परिणाम जर कायमस्वरूपी नसेल, तर रुग्ण पुन: पूर्ववत होऊ शकतो.


*डाॅ.अंजली दिक्षित व डाॅ.जगन्नाथ दिक्षित*

*यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' पुस्तकातून*

═══════════════════════

 

प्रभात दर्शन

 🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

भाद्रपद मास,शुक्ल पक्ष, *नवमी*,ज्ये/मूळ नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,वर्षा ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

बुधवार, १५ सप्टेंबर २०२१.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

                        *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

           *जीवन में मनुष्य के आँखे बन्द करने से कभी समस्या नही टलती है,बल्कि उस समस्या का सामना करने से मनुष्य की आँखे खुला करती हैं। प्रत्येक मनुष्य को यह भी याद रखना चाहिये कि जब तक हम स्वयं पर विश्वास नही करेंगे,तब तक हम अपना सम्मान नही कर सकते और न ही किसी समस्या का समाधान...*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅 🚩

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

डासामुळे कोणता रोग होतो


══════════════════════

   *📒📒📒 @ संकलन @📒📒📒*

  *श्री. गजानन गोपेवाड 

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════             

📙 *डासांमुळे कोणते रोग होतात ?* 📙


जेथे माणूस तेथे डास, हे अगदी खरे आहे. डास हे माणसाच्या विकासाचेच एक फळ आहे. भारतात अनेक प्रकारचे डास आढळतात. यात मुख्यतः अॅनोफिलस, क्युलेक्स, एडिस व मान्सोनिया इत्यादी प्रकारांचा समावेश होतो. आपल्याला नुसत्या डोळ्यांनी सगळे डास सारखे दिसले, तरी प्रत्यक्षात त्यांच्यात खूप फरक असतो. डासांचे जीवनचक्र, विश्रांतीच्या व पोषणाच्या सवयी, भिंतीवर बसण्याची पद्धत, पैदास होण्यासाठी आवश्यक असलेले पर्यावरण, शारीरिक वैशिष्टय़े, इत्यादींवरून वेगवेगळ्या डासांची ओळख पटवता येते.


डासांमुळे हिवताप, हत्तीरोग, जपानी मेंदूज्वर, पीतज्वर, डेंग्यू इत्यादी रोगांचे संक्रमण होते. यांपैकी हिवताप व हत्तीरोग हे भारतातील महत्त्वाचे आरोग्यविषयक प्रश्न आहेत.


अॅनोफिलस डासांच्या मादीमुळे हिवताप, तर क्युलेक्समुळे हत्तीरोग हे आजार रुग्णापासून निरोगी माणसांपर्यंत संक्रमित होतात. डासांचा नायनाट करण्यासाठी अनेक उपाय अवलंबावे लागतील. महत्त्वाचे म्हणजे घरात व घराभोवती पाण्याची डबकी जमा होऊ न देणे. त्यात भर घालून ती बुजवावी, कारण त्यात डासांची पैदास होते. हे शक्य नसल्यास डबक्यांमध्ये रॉकेल व इंजिन ऑईल टाकावे. डीडीटीच्या नियमित फवारणीमुळे (वर्षांतून दोनदा) प्रौढ डासांवर नियंत्रण मिळवता येते. एवढे करूनही डासांची समस्या न सुटल्यास स्वतःचे डासांच्या चाव्यांपासुन संरक्षण तरी करावे. यासाठी डासांना पळवून लावणारे मलम, तेल व अगरबत्ती इत्यादींचा वापर करता येतो. पण सगळ्यात उत्तम म्हणजे मच्छरदाणी.


*डाॅ.अंजली दिक्षित व डाॅ.जगन्नाथ दिक्षित*

*यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' पुस्तकातून*

═══════════════════════

  

गोंगाटाचे दुष्परिणाम


══════════════════════

   *📒📒📒 @ संकलन @📒📒📒*

गजानन गोपेवाड 

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════             

*📕गोंगाटामुळे काय दुष्परिणाम होतात ?* 


गोंगाटामुळे परीक्षेच्या काळात अभ्यासात लक्ष लागत नाही, मन एकाग्र होत नाही हे तुम्ही नक्कीच अनुभवले असेल. कारण वैयक्तिक वा सार्वजनिक आनंदाच्या कोणत्याही प्रसंगी मोठ्या आवाजात लाउडस्पीकरवर गाणी लावून गोंधळ घालायचा प्रकार आपल्याकडे आहे. भले मग कोणाचे कान बहिरे का होईनात!


चुकीच्या वेळी, चुकीच्या जागी, चुकीचा आवाज म्हणजेच गोंगाट होव. आवाजाची तीव्रता डेसीबल या एककात मोजतात. माणूस ८५ डेसीबल इतक्या तीव्रतेपर्यंतचा आवाज सहन करू शकतो. तसेच २० ते २०,००० हर्दश एवढ्या वारंवारतेचा (Frequency चा) आवाजच तो ऐकू शकतो.


गोंगाटाचे अनेक दुष्परिणाम होतात. यात कानात आवाज होणे, दडे वसणे, थकवा येणे तसेच बहिरेपणा यांचा समावेश होतो. गोंगाटामुळे संवाद साधण्यात अडथळा येतो. चिडचिडेपणा येतो. काम करण्याची व्यक्तीची क्षमता कमी होते, याखेरीज गोंगाटात रक्तदाब वाढतो, नाडीचे ठोके वाढतात, श्वसनाचा दर वाढतो तसेच घाम येण्याच्या प्रमाणातही वाढ होते. अशा प्रकारे गोंगाटामुळे अनेक दुष्परिणाम होतात. हे दुष्परिणाम टाळण्यासाठी आवाज जेथे निर्माण होतो तेथेच त्यावर नियंत्रण ठेवणे, ध्वनिरोधक साधनांचा वापर, व्यक्तीचे कानातील सारख्या साधनांनी आवाजापासून रक्षण करणे इत्यादी उपाय करता येतात.


*डाॅ.अंजली दिक्षित व डाॅ.जगन्नाथ दिक्षित*

*यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' पुस्तकातून*

═══════════════════════


महालक्ष्मी

 *🌹👣 🌹श्रीमहालक्ष्मी 🌹👣🌹* 

*गौरी आवाहन / गौरी पुजन / गौरी विसर्जन* 


             👣 *गौरी आली घरा* 👣   


आली आली लक्ष्मी, 

आली तशी जाऊ नको बाळाला सांगते,धरला हात सोडू नको....

मला आहे हौस, चांदीच्या ताटाची

लक्ष्मीच्या नैवेद्याला मूद साखरभाताची.


श्री लक्ष्मीबाई आली सोन्याच्या👣 पावलांनी , ज्येष्ठेच्या घरी कनिष्ठा आली

मालकाच्या घरी लक्ष्मी आली.......


काल घरोघरी 👣 श्रीमहालक्ष्मीचे आगमन झाले॥


'गौरीपूजन वा महालक्ष्मी पूजन' हे हिंदू महिलांचे भाद्रपद महिन्यातील एक महत्त्वाचे व्रत आहे.

         गौरीपूजन हा महाराष्ट्रातल्या सणांपैकी एक महत्त्वाचा सणही आहे. यास महालक्ष्मीपूजन असेही म्हणतात.


👣  गौरी शब्दाचा अर्थ -) 

संस्कृत शब्दकोशातील अर्थानुसार 'गौरी' म्हणजे आठ वर्षाची, अनाघ्रात अशी पवित्र कन्या. तसेच गौरी म्हणजे पार्वती, पृथ्वी, वरुण पत्नी, तुळशीचे झाड, मल्लिका उर्फ जाईची वेल हेही अर्थ कोशात दिले आहेत.या आधारेच तेरड्याच्या फुलाचीही गौरी म्हणून पूजा केली जाते.

   गौरीला महालक्ष्मी म्हणतात व  तो सर्वार्थाने रुढ शब्द सबंध महाराष्ट्रात पूर्वापार वापरला जातो. लक्ष्मी ही विष्णूपत्नी तर महालक्ष्मी ही महादेव पत्नी पार्वती होय. जी जेष्ठा गौरी म्हणून संबोधली जाते.


👣 व्रताचे स्वरूप -)

भाद्रपद महिन्यात शुद्ध पक्षात अनुराधा नक्षत्रावर आपापल्या कुलाचाराप्रमाणे महालक्ष्मी/गौरीच्या प्रतिमा वा प्रतीके बसवितात. ज्येष्ठा नक्षत्रावर महालक्ष्मीची पूजा करतात व महानैवेद्य दाखवितात. तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रावर महालक्ष्मीचे विसर्जन करतात. गौरीलाच महालक्ष्मी म्हणतात आणि तिची ज्येष्ठा नक्षत्रावर पूजा होते म्हणून तिला ज्येष्ठा गौरी म्हणतात.


👣 आख्यायिका आणि इतिहास -)

     हिंदू देवताशास्त्रात तसेच समाजजीवनात गौरी हे शिवाच्या शक्तीचे आणि गणेशाच्या आईचे रूप मानले गेले आहे.

     अपराजितपृच्छा या ग्रंथामध्ये द्वादशगौरींचा उल्लेख येतो. अग्निपुराणामध्ये गौरी मूर्तीचे सामूहिक पूजन केले जाई असे सांगितले आहे. लातूर येथील नीलकंठेश्वर मंदिरात शिवाची आणि गौरीची एक सुंदर कोरीव प्रतिमा आहे. त्यांच्या पायाशी एक घोरपड दाखवली आहे. गौरीच्या डाव्या हातात बीजपूरक आहे, केसांवर फुलांची वेणी आहे.ही शिव परिवारातील देवता असून कनोज येथे हिचे मंदिर आहे.


एकदा असुरांच्या त्रासाला कंटाळून सर्व स्त्रिया महालक्ष्मी गौरीकडे गेल्या आणि त्यांनी आपले सौभाग्य अक्षय्य करण्याविषयी तिची प्रार्थना केली.त्याला अनुसरून गौरीने असुरांचा संहार केला व शरण आलेल्या स्त्रियांच्या पतींना व पृथ्वीवरील प्राण्यांना सुखी केले.महालक्ष्मीच्या कृपाप्रसादाने आपापल्या सौभाग्य प्राप्त झाले म्हणून तेव्हापासून सर्व स्त्रिया महालक्ष्मी गौरीची पूजा करू लागल्या.

  👣  गौरी पुजनचे वैज्ञानिक महत्त्व -)

महालक्ष्मीचा सण हा कुलाचार म्हणून सर्व जाती-जमातीतून श्रद्धापूर्वक पाळला जातो. शेती हा प्रमुख व्यवसाय असणाऱ्या घरांतून मात्र स्त्रिया धान्याची राशी मांडून पूजा करतात. लक्ष्मी वा गौरीच्या मांडणीत विविधता असली तरी मूळ हेतू धान्य लक्ष्मीच्या पूजेचा, भूमीच्या सुफलीकरणाचा आहे.


स्थळपरत्वे गौरींच्या पूजेंची पद्धत आणि परंपरा बदलल्या आहेत. काही कुटुंबात गौरींचे मुखवटे असतात, तर काही कुटुंबात परंपरेनुसार पाणवठ्यावर जाऊन पाच, सात किंवा अकरा खडे आणून त्यांची पूजा करतात. काही ठिकाणी पाच मडक्यांच्या उतरंडी करून त्यावर गौरीचे मुखवटे लावून त्या उतरंडींनाच साडी चोळी नेसवतात आणि त्यांची पूजा करतात. काही घरांत धान्यांची रास म्हणजेच गहू, तांदूळ ,ज्वारी, हरभरा, डाळ इत्यादींपैकी एकदोन धान्याचे ढीग करून त्यावर मुखवटे ठेवतात. बाजारात पत्र्याच्या, लोखंडी सळयांच्या किंवा सिमेंटचे कोथळे मिळतात. त्यावर मुखवटे ठेवतात आणि कोथळ्यांना साडी चोळी नेसवतात.सुपात धान्याची रास ठेवून त्यावर मुखवटा ठेवतात. किंवा गहू आणि तांदूळ यांनी भरलेल्या तांब्यांवर मुखवटे ठेवून पूजा करतात. तेरड्याचीही गौर असते. तेरड्याची रोपे मुळासकट आणतात. ही मुळे म्हणजेच गौरींची पावले, असा समज आहे. आधुनिक काळात गौरीपूजनाच्या व मांडणीच्या पद्धतीत व गौरीच्या रूपातही आधुनिकता दिसून येते. विविध रूपांत अनेक घरांत गौरी/महालक्ष्मी येतात. आगमनाच्या दिवशी संध्याकाळी किंवा पंचांगात शुभ वेळ बघून मुखवट्यांची आणि लक्ष्मींच्या हातांची पूजा होते. त्याच रात्री गौरी उभ्या केल्या जातात. या गौरी/महालक्ष्मी किंवा सखी-पार्वतींसह त्यांची मुलेही (एक मुलगा आणि एक मुलगी) मांडतात. कोणी धातूची लक्ष्मीची प्रतिमा करून पूजतात, कोणी मातीची बनवितात तर कोणी कागदावर देवीचे चित्र काढून त्याची पूजा करतात.


  👣 गौरी आवाहन (दिवस पहिला) -)

आपापल्या परंपरेप्रमाणे घराच्या उंबऱ्यातून आत आणताना, जिच्या हातात गौरी असतील त्या बाईचे पाय दुधाने व पाण्याने धुतात आणि त्यांवर कुंकवाचे स्वस्तिक काढतात. घराच्या दरवाज्यापासून ते जिथे गौरी बसवायच्या त्या जागेपर्यंत लक्ष्मीच्या पायांचे ठसे उमटवत उमटवत गौरींचे मुखवटे आणतात. त्यावेळी ताट चमच्याने किंवा घंटेने वाजवत आवाज केला जातो. यानंतर त्यांची स्थापना करण्यापूर्वी त्यांना घरातील समृद्धी, दुध-दुभत्याची जागा इ. गोष्टी दाखविण्याची प्रथा आहे. तेथे त्यांचे आशीर्वाद मिळून ऐश्वर्य नांदो अशी प्रार्थना करतात.काही ठिकाणी लोक तेरड्याची रोपे एकत्र बांधून त्यांची प्रतिमा बनवितात व तिच्यावर मातीचा मुखवटा चढवितात.नंतर त्या मूर्तीला साडी नेसवून दागदागिन्यांनी सजवितात.

     पहिल्या दिवशी संध्याकाळी गौरीला भाजी-भाकरीचा नैवैद्य दाखवण्याची पद्धत काही भागात विशेषत: पश्चिम महाराष्ट्रात आहे. या प्रथेला गौरी आवाहन करणे असे संबोधतात.


👣  गौरीपूजन (दिवस दुसरा) -)

      दुसऱ्या दिवशी म्हणजेच ज्येष्ठा नक्षत्रावर गौरींची पूजा होते. सकाळी गौरींची/महालक्ष्मीची पूजा-आरती करून केलेल्या फराळाचा (रव्याचा लाडू, बेसनलाडू, करंजी, चकली, शेव, गुळपापडीचा लाडू) नैवेद्य दाखवतात. नंतर संध्याकाळी आरती करतात. पुरणपोळी, ज्वारीच्या पिठाची आंबील, अंबाडीची भाजी, सोळा भाज्यांची एकत्र भाजी, दिवेफळ वगैरे पदार्थांचा नैवेद्यात समावेश असतो.

     नैवेद्यात शेंगदाणा आणि डाळीची चटणी, पंचामृत, पडवळ घालून केलेली ताकाची कढी, कटाची आमटी, वेगवेगळ्या प्रकारची भजी, पापड, लोणचे इत्यादी. केलेले सर्व पदार्थ केळीच्या पानावर ठेवतात.

      महाराष्ट्रात काही जागी याच सायंकाळी महिलांचा हळदीकुंकवाचा कार्यक्रम केला जातो. दर्शनाला आलेल्या महिला व मुलींचे आदरपूर्वक स्वागत करण्याची पद्धती प्रचलित आहे.


 👣 गौरी विसर्जन (दिवस तिसरा) -)

तिसऱ्या दिवशी म्हणजेच मूळ नक्षत्रावर गौरींचे/महालक्ष्मींचे विसर्जन करतात. त्या दिवशी सकाळी पोवत्याच्या/सुताच्या गाठी पाडतात. त्या सुतात हळदीकुंकू, सुकामेवा, बेलफळ, फुले, झेंडूची पाने, काशीफळाचे फूल, रेशमी धागा असे एक एक जिन्नस घालून गाठी पाडतात. यांमध्ये हळदीकुंकू, रेशमी सूत, झेंडूची पाने, काशीफळाचे फूल हे महत्त्वाच्या वस्तू असतात. नंतर गौरींची/ महालक्ष्मींची पूजा आणि आरती करतात. गोड शेवयाची खीर, उडीद डाळीचा भाजलेला पापड याचा नैवेद्य दाखवतात. या तिसऱ्या दिवशी गौरींच्या/ महालक्ष्मींच्या चेहऱ्यावर एक प्रकारची उदासीनता दिसून येते. गौरींची पूजा, आरती करून पुढील वर्षी येण्याचे आमंत्रण देऊन त्यांचा निरोप घेतला जातो, आणि त्यांचे विसर्जन केले जाते (धातूच्या किंवा कायम स्वरूपाच्या मूर्ती असतील तर त्यांचे विसर्जन करत नाहीत.) गौरींचे पाण्यात विसर्जन केल्यावर परत येताना थोडी वाळू घरी आणून ती सर्व घरभर व परसातल्या झाडांवर टाकतात. त्यायोगे घरात समृद्धी नांदते व झाडाझुडुपांचे कीटकांपासून संरक्षण होते अशी समजूत आहे.


👣 दोरकाची पूजा -)

या तिसऱ्या दिवशी महाराष्टातील ग्रामीण बहुजनसमाजात गौरींच्या पूजेबरोबरच सुताच्या गुंड्याला सोळा गाठी देऊन त्याचीही पूजा करतात. तो गुंडा मग हळदीने रंगवून त्यातला दोरा घरातल्या सुवासिनी आपल्या गळ्याभोवती बांधतात व नवीन पीक येईपर्यंत गळ्यात ठेवतात.आश्विन वद्य अष्टमीला तो गळ्यातून काढून त्याची पूजा करतात. या दोऱ्यालाच महालक्ष्मी समजतात.


👣 वेगवेगळ्या प्रांतानुसार पुजन -)

दक्षिण भारत-

भाद्रपद शुक्ल तृतीयेला गौरीचा सण सुरू होतो व तो बरेच दिवस चालतो. प्रत्येक गावात गौरीची एक पिठाची प्रतिमा करतात व तिला मखरात बसवून पूजतात. तिची रस्त्यातून मिरवणूकही काढतात.


कोकण -

महाराष्ट्रातील कोकण प्रांतातील कोळी समाजगटातील ,महिला या दिवशी तेरड्याची फांदी आणून तिला लक्ष्मीस्वरूप मानून तिची पूजा करतात. या दिवशी देवीला माशाचा नैवेद्य दाखविला जातो.

➿➿➿➿➿➿➿➿➿➿

 *🙏🌹जय श्री महालक्ष्मी🌹🙏*

➿➿➿➿➿➿➿➿➿➿

संकलन -)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा - यवतमाळ ४४५२०६

प्रभात दर्शन

 🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

भाद्रपद मास,शुक्ल पक्ष, *अष्टमी*,ज्ये/मूळ नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,वर्षा ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

मंगळवार, १४ सप्टेंबर २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                        *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

           *"जो बीत गया सो गया। जो आने वाला है, वह भविष्य के गर्भ में है। वर्तमान हमारे हाथ में है। हम चाहें तो उसका सदुपयोग करके समाज, राष्ट्र कल्याण के लिए अपना कुछ योगदान करके इस नश्वर जीवन में से कुछ अनश्वर लाभ प्राप्त कर सकते हैं।"*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

रविवार, १२ सप्टेंबर, २०२१

ध्यान साधना

 *लक्ष्मी*


*पण काहीही म्हणा*

 *ज्या ज्या घरात सगळ्या सुना , मुलं , जावा , नातवंडं एकत्र येतात*

*सर्वजण मिळून कामं करतात*

*तिथं खरंच प्रसन्न वाटतं , करमतं !*

*दोन तीन दिवस अगदी मजेत जातात !*


*मित्र हो ,*

*हे करमणं , मजा वाटणं , प्रसन्न वाटणं म्हणजेच आपल्याकडे लक्ष्मी आलेली असते !*


*ती येते , रहाते , जेवते* *आणि जातांना म्हणते* 

*खुशाल रहा असंच मिळून मिसळून रहात जा !*


*कुणी आणि का लावलं असेल आपल्या मागे हे सगळं ?*

*शास्त्रीयदृष्ट्या असेल का काही अर्थ या सणसमारंभाना ?*

*थोडा विचार केला , चिंतन केलं*

*तर आपल्याला कळेल..........*


*या सणाच्या निमित्ताने आपलं घर भरून जातं* 

*आपुलकीला उधाण येतं* 

*माणसं एकत्र येतात ,भेटतात , बोलतात* 

*आणि पुन्हा आपापल्या गावी पोट भरण्यासाठी निघून जातात ......!* 


*बैठकीत झालेली माणसांची गर्दी* 

*आणि दारा समोर झालेली पादत्राणांची , पाऊलांची दाटी हीच खरी लक्ष्मी .......!*


*चार दिवस सर्व कुटुंबाचं एका छता खाली येणं*

*गुण्यागोविंदाने रहाणं*

*आणि सुखदुःखाच्या गप्पा गोष्टी करणं ...... हीच खरी लक्ष्मी !*


*पोरांनी आई म्हणून मारलेली प्रेमळ हाक*

*दिरानी वहिनींकडे हक्काने मागीतलेला कपभर चहा* 

*तुम्ही राहूद्या मी करते असा एका जावेने दुसऱ्या जावेला केलेला प्रेमळ हट्ट*

*हीच खरी लक्ष्मी ....!*


*मित्रहो त्यामुळे पूर्वजांना नाव ठेऊ नका* 

*ते आर्थिकदृष्ट्या गरीब होते पण मनाने श्रीमंत होते* 

*सुशिक्षित नसतीलही पण नम्र होते* 

*एखाद्या वेळेस रागवत असतील पण डुख धरत नव्हते* 

*ते फॉरेन रिटर्न नव्हते परंतू एखाद्या वादाच्या प्रसंगी नेमकं कुठून आणि कोणी माघार घ्यायची हे त्यांना चांगलं कळत होतं*

 

*योग्य वेळी योग्य वागणं आणि घर नावाच्या मंदिराच्या भिंतीला तडे न जाऊ देणं ...... हीच खरी लक्ष्मी !*


*मला मला करण्यापेक्षा* 

*तू घे , तू घे चा आग्रह करणे* 

*आधी काहीतरी खाऊन घ्या आणि नंतर काम करा* 

*अशी  जेष्ठांनी केलेली मायेची सूचना*

*घर , कुटुंब आणि नातं टिकण्यासाठी केलेला प्रत्येक सदस्याचा त्याग* 


*....हीच खरी लक्ष्मी ....*

जतींद्रनाथ दास

 *************************************

*१३ सप्टेंबर - क्रांतिकारक जतींद्रनाथ दास स्मृतिदिन*

*************************************

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  जन्म - २७ ऑक्टोबर १९०४ 

             (कलकत्ता)

*स्मृती - १३ सप्टेंबर १९२९* 

               (लाहोर)


जतींद्रनाथ दास एक भारतीय क्रांतिकारी होते.लाहोर कटातील आरोपी म्हणून शिक्षा भोगत असताना तुरुंगातील जुलुमाचा निषेध म्हणून केलेल्या उपोषणात ६१व्या दिवशी १३ सप्टेंबर १९२९ रोजी त्यांचा मृत्यू झाला.


१३ सप्टेंबर १९२९ मध्ये दुपारी १ वाजता जतींद्रनाथ दास या क्रांतीकारकाने ६१ दिवसांचा उपवास करून आपले प्राण सोडले. ते सुभाषचंद्र बोस यांचा उजवा हात मानले जायचे. 


त्या काळी जतींद्रनाथांनी ३ वेळा तुरुंगवास भोगला. सुटून आल्यावर त्यांनी ‘दक्षिण कलकत्ता तरुण समिती’ काढली. परिणामतः बेंगाल ऑर्डिनन्स दंडविधानान्वये जतींद्रनाथांना परत कारागृहात डांबण्यात आले. 


कारागृहातील छळाचा निषेध म्हणून त्यांनी ३३ दिवस अन्न त्याग केला आणि त्यांची सुटका झाली; पण परत लाहोर कटात गोवून त्यांना तुरुंगात डांबले. त्या वेळी राजकीय बंदींना मिळणार्‍या निकृष्टतम वागणुकीचा निषेध म्हणून त्यांनी उपवास चालू केला.


त्यांनी बलपूर्वक देण्यात आलेले अन्न नाकारले. त्यामुळे सात-आठ जण त्यांच्या छातीवर बसले. आधुनिक वैद्यांनी नाकात नळी घातली. जतीनदास खोकले. त्यामुळे दूध फुफ्फूसात जाऊन ती बिघडली. त्यामुळे आधुनिक वैद्यांना पुन्हा बलपूर्वक घशात दूध वगैरे दवडणे अशक्य झाले. 


दिवसेंदिवस जतीन अशक्त होत चालले होते. हात हलवेना. पापणी हलवेना. इंग्रज शासनाने त्याला बाहेर रुग्णालयात नेऊन कोणाचा तरी खोटा जामीन देऊन सोडण्याचे ठरवले; पण जतीनदास यांनी खूण करून त्यास नकार दिला आणि त्याच्या खोलीतील अन्य क्रांतीकारकांनी ‘आमच्या मुडद्यावरून त्यांना न्यावे लागेल’, असे पोलिसांना ठणकावले. या झटापटीतच जतींद्रनाथाचे हृदय थांबेल, अशी भीती अधिकार्‍यांना वाटली आणि ते गेले. 


*भारतमातेचा त्यागी सुपुत्र...! दुसर्‍यांना नीट जगता यावे म्हणून मरणारा...! राजकीय बंदीचे हाल बंद व्हावेत म्हणून अग्निदिव्य करणारा जतीन...! त्याची स्मृती भारतियांना अखंड स्फूर्ती देत राहील.* 


आपल्या राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या होमकुडांत अशा नरश्रेष्ठांच्या आहुती पडलेल्या आहेत. हे सर्वांनीच विशेषत: तरुणांनी लक्षात घेण्यासारखा हा दिवस आहे.’

🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

संकलन -)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

************************************

प्रभात दर्शन

 🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

भाद्रपद मास,शुक्ल पक्ष, *सप्तमी*,अनुराधा नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,वर्षा ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

सोमवार, १३ सप्टेंबर २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                         *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

         *"समस्या व्यक्तिगत हो, पारिवारिक अथवा सामाजिक... समस्या के बारे में सोचने से बहाने अथवा तनाव मिलता है, जबकि समाधान के बारे में सोचने पर मार्ग मिलता है।*

       *स्मरण रहे... जीवन सदैव सरल नहीं होता, अपितु स्वयं को ही देश, काल, परिस्थिति अनुसार मजबूत बनाना पड़ता है।"*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

शनिवार, ११ सप्टेंबर, २०२१

ऊत्तम नेमाजी सावंत

 ************************************

*१२ सप्टेंबर - उत्तम नेमबाज तेजस्विनी सावंत जन्मदिन*

************************************

🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹

*जन्म - १२ सप्टेंबर १९८०*   

               (कोल्हापूर)


तेजस्विनी सावंत ही जागतिक विजेतेपद मिळवणारी महाराष्ट्रातल्या कोल्हापूर शहरातली एक भारतीय महिला नेमबाज आहे.तिचे वडील भारताच्या नौदलात अधिकारी होते.


इस्लामाबादमध्ये २००४ साली झालेल्या ९ व्या दक्षिण आशिया क्रीडा महासंघ खेळांत तेजस्विनीने भारताचे प्रतिनिधित्व केले आणि भारताला सुवर्णपदक मिळवून दिले.


त्यानंतर राष्ट्रीय विजेतेपद स्पर्धेत आशियाई खेळातील सुवर्णपदक विजेती अंजली वेदपाठक भागवत आणि जागतिक विक्रमाची नोंद असलेली सुमा शिरूर यांना मागे टाकत तिने पाच सुवर्णपदके, सहा रजतपदके आणि पाच कांस्यपदकांची कमाई केली.


२००६च्या मेलबोर्न राष्ट्रकुल खेळांत महिलांच्या १० मीटर एअर रायफल सिंगल्स आणि महिलांच्या १० मीटर एअर रायफल दुहेरी प्रकारात अवनीत कौर सिद्धूसोबत तिने सुवर्णपदकांची कमाई केली.


जर्मनीत म्युनिख येथे २००९ साली झालेल्या आयएसएसएफ विश्वकरंडक स्पर्धेत ५० मीटर रायफल-थ्री पोझिशन्स प्रकारात तेजस्विनीने कांस्यपदक पटकावले. त्यानंतर म्युनिख मध्येच ५० मीटर रायफलप्रोन इव्हेंटमध्ये तिने ८ ऑगस्ट २०१० रोजी जागतिक विजेतेपद प्राप्त केले. ५० मीटर रायफलप्रोन प्रकारात जागतिक विक्रमाची बरोबरी करीत विजेतेपद मिळवणारी तेजस्विनी ही पहिली भारतीय महिला नेमबाज आहे. 


ऑ्लिंपिक आणि विश्वचषक स्पर्धेत पदक मिळवणे हे तेजस्विनीचे स्वप्न आहे. सध्या भारतीय ज्युनिअर नेमबाजी संघात तेजस्विनीचा समावेश झाला होता.

********************************* 

🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

संकलन -) गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

प्रभात दर्शन

 🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

भाद्रपद मास,शुक्ल पक्ष, *षष्ठी*,विशाखा नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,वर्षा ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

रविवार, १२ सप्टेंबर २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                         *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

         *"चरण उनके पूजे जाते हैं, जिनके आचरण पूजने योग्य होते हैं। आप अपने मधुर स्वभाव, वैभव-धन-सम्पदा, बहुमूल्य कपड़ों आदि से किसी को कुछ समय के लिए ही प्रभावित कर सकते हैं किन्तु किसी को आजीवन अपना बनाये रखने के लिए आपका वास्तविक उच्च आचरण और आत्मीय व्यवहार अति आवश्यक है"*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Featured Post

व्यायाम व योगा अवश्य करावा*

*व्यायाम व योगा अवश्य करावा*  *व्यायाम व योगा करण्याचे दहा फायदे:-*  1) व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते: व्यायाम करणारी...