सोमवार, १९ ऑगस्ट, २०२४

पहाटेची लवकर उठण्याची अमर्याद ताकद.....*

*पहाटेची लवकर उठण्याची अमर्याद ताकद.....*

*तुम्ही सकाळी किती वाजता उठता...?*
हेल एरॉल्ड नावाचं एक जगप्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे, ते एक प्रचंड यशस्वी व्यावसायीक होते, मोठ्या जिद्दीने त्यांनी एका अपघातामुळे आलेल्या शारिरीक विकलांगतेवर मात केली होती.

पण २००८ च्या महामंदीत त्यांचा प्रचंड लॉस झाला, अब्जोपती हेल कर्जबाजारी झाला.पण तो हार मानणारा नव्हता, यातून बाहेर कसं पडावं, हे विचारण्यासाठी तो आपल्या एका यशस्वी मित्राकडे गेला, मित्राने त्याला काय सल्ला दिला असेल बरं?

“हेल, तु सकाळी लवकर उठ!” “बाकी सगळं आपोआप होईल”या चमत्कारिक सल्ल्याने हेल निराश झाला, त्याला काहीतरी आगळेवेगळे उपाय अपेक्षित होते, काही दिवस त्याने कसेबसे ढकलले, पण दिवसेंदिवस निराशा त्याला घेरत होती, मग नाईलाज म्हणुन त्याने सकाळी चार वाजता उठायची सुरुवात केली, आणि हेल सांगतो, त्याचं आयुष्यच बदलुन गेलं!

*पहाट आणि सुर्योदय इतके जादुई असतात का...?*
इतक्या सकाळी उठुन काय करावं? ह्या प्रश्नावर हेल ने एक कोडवर्ड सांगितला 

https://chat.whatsapp.com/G7SHhSXSekCFq3WmVKCDii

*ह्या आयुष्य बदलुन टाकणार्‍या सहा सवयी आहेत...*

*१) Silence (ध्यान)...* 
*शांत बसुन स्वतःच्या आत डोकावणे, म्हणजे ध्यान!
*स्वतःच्या आतल्या चेतनेला स्पर्श करणे, म्हणजे ध्यान!
*मनाच्या कॉम्पुटरला फॉर्मेट करुन व्हायरस रिमुव्ह करणे म्हणजे ध्यान!
*मन प्रफुल्लीत आणि ताजतवानं करण्यासाठी आवश्यक असते ध्यान!
*माणसाच्या गरजा किती कमी आहेत, आणि सगळ्या चिंता किती व्यर्थ आहेत याची आत्मप्रचिती म्हणजे ध्यान!
*अफाट, अदभुत आणि आनंददायी विश्वशक्तीसोबत स्वतःला जोडून घेणे, आणि स्वतःच्या मन-शरीराचा कणकण प्रफुल्लित करवुन घेण्याची कृती म्हणजे ध्यान! 

*२) Affirmations (सकरात्मक स्वयंसूचना)...*
*अफरमेशन्स म्हणजे स्वसंवाद!
*स्वतः स्वतःला सुचना देणं,
*प्रचंड शक्तिशाली असलेल्या अंतर्मनावर आपण निश्चित केलेलं ध्येय कोरणं!
*येत्या पाच वर्षात, येत्या एक वर्षात, पुढच्या एका महिन्यात, पुढच्या एका आठवड्यात, आणि आज दिवस भर मी काय काय करणार आहे, याचं मनातल्या मनात पुन्हा पुन्हा रिव्हीजन करणे म्हणजे स्वयंसूचना!
*स्वयंसुचनांमुळे कल्पना खोल अंतर्मनात झिरपतात, आणि नाटकीयरित्या सत्यातही उतरतात.
*अंतर्मनाची शक्ती प्रचंड असल्यामुळे तिथे रुजलेला प्रत्येक विचार मग तो चांगला असो की वाईट, खराच होतो.
*एखादी गोष्ट हजारो वेळा बोलली तर ती अंतर्मनात प्रक्षेपित होते, मग अशुभ कशाला बोलायचे?
*वाईट बोलुन विनाशाला आमंत्रण देण्यापेक्षा, ‘या सुखांनो या’!

*३) Visualize.(चांगल्या कल्पना मनात घोळवणे)...*
*तीव्र इच्छा पुर्ण झाली आहे, अशी मनातून कल्पना करणं, ती पूर्ण झाल्याचा आनंद व्यक्त करणं आणि मनःपटला वर तिला बारीक सारीक रुपात साकारणं, म्हणजे व्हिज्वलायजेशन!
*कल्पनाशक्ती ही निसर्गाने माणसाला दिलेली सर्वात अनमोल आणि सर्वात प्रभावशाली भेट आहे.
*कल्पनाशक्तीचा योग्य वापर केल्यास साधारण माणसाचं यशस्वी व्यक्तीमध्ये रुपांतर होतं.
*दररोज आपण आपली ध्येयं पूर्ण झाली आहेत, असं मनात घोळवलं पाहीजे.
*पोहण्याच्या स्पर्धेत सुवर्ण पदकांची रास उभी करणारा मायकेल फेल्प्स म्हणतो. ज्यावेळी मला झोप येऊ लागते, तेव्हा मला जे नक्की करायचे आहे, ते मनातल्या मनात बघण्याचा मी प्रयत्न करतो.
*ऑलंपिकविजेती एथलिट लेन बीचले म्हणाली होती, मागचे चार वर्ष मी एकच निकाल डोळ्यापुढे आणत होते, ते म्हणजे, मी हातात विजेतापदक घेऊन उभी आहे, आणि माझ्यावर शॅंपेनचा वर्षाव होत आहे. 
*मायकेस स्मिथ म्हणाला, मी मला हवे असलेल्या स्वप्नाचे रेखाचित्र कागदावर रेखाटतो, स्वप्नांबद्द्ल टिपण लिहतो, आणि वेगवेगळ्या पद्धतीने त्याला डोळ्यांसमोर उभे करतो.
*प्रसिद्ध उद्योगपती अझीम प्रेमजींना त्यांच्या यशाचे रहस्य विचारले तर ते म्हणाले, “यश दोनदा मिळते, एकदा मनात आणि दुसऱ्यांदा वास्तव जगात!” 


*4) शरीरातून आळसाला पळवून  लावण्यासाठी, शरीरातील उर्जा वाहती ठेवण्यासाठी, मनाने कणखर आणि आनंदी राहण्यासाठी आवश्यक असतो, व्यायाम...
*शरीर आळसावलं की मन भ्रष्ट झालंच समजा!
*व्यायाम, योगासने, प्राणायाम यांच्या माध्यमातून उर्जेला वळण न दिल्यास ती अतिरिक्त बाबीकडे वळते, आणि माणूस वासनांचा गुलाम बनतो.
*वाईट सवयींचा गुलाम झालेल्या माणसातले चैतन्य हरपते, अशा व्यक्तीला एकाकी असल्याची जाणीव अस्वस्थ करते.  
*तो कशावरच एकाग्र होवू शकत नाही, आणि म्हणून तो आनंदी होवू शकत नाही, मनात एक अनामिक भय तयार होते.
*ह्या सगळ्या दुष्ट श्रंखलेला तोडण्याचा एकच उपाय, तो म्हणजे, व्यायाम करा, डिप्स मारा, सूर्यनमस्कार घाला, पुलअप्स करा, ट्रेडमिलवर घाम गाळा,प्राणायाम करा.  शरीरातले चैतन्य जिवंत ठेवा.

*५) Reading (वाचन)...* 
*पुस्तकं वाचणारी माणसं एका आयुष्यात अनेक आयुष्य जगतात.
*पुढच्याच ठेस, मागचा शहाणा, ह्या न्यायाने दुसर्‍यांच्या अनुभवाने शहाणे होणारे लोक जगावर राज्य करतात.
*वॉरेन बफे, बिल गेटस, मार्क जुकरबर्ग हे सगळे आठवड्याला दोन पुस्तके वाचून पूर्ण करतात.

*६) Scribing (लिहिणे)...* 
*लिहिल्याने तुमची तुमच्याशी नव्याने भेट होते.
*लिहिल्याने मन रिकामे होते, दुःख नाहीसे होते, मनात नव्या उर्जेचा संचार होतो.
*लिहल्याने नवे रस्ते उघडतात, नव्या प्रगतीच्या वाटा खुलतात.
*संतानी सांगून ठेवले आहे, दिसामाजी काहीतरी लिहीत जावे.
*लिहणं, हे सुद्धा स्वसंवादाचं प्रभावी साधन आहे. लिहिल्याने विचार पक्के होतात.
*सकाळी उठल्यावर आज दिवस भर मी काय करणार आहे, ते लिहावं.
*एखादी समस्या छळत असेल तर ती लिहून त्याचे उपाय लिहावेत.
*मनाला स्वप्नांच्या आकाशात मुक्त पणे पाठवून कागदावर स्वप्ने रेखाटावीत.
*ती स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मी काय काय करणार आहे, त्याचं प्लानिंग, नियोजनही लिहावं,
*रोज स्वतःला कामे नेमून द्यावीत, आणि पूर्ण झाली की स्वतःला विजयी घोषित करावं.
*लिहिल्यानं मन मोकळं होतं, चिंतांचं ओझं हलकं हलकं होतं!
*जवळच्या व्यक्तीला पत्रं लिहावीत, कधी प्रेरणादायक किस्से कहाण्या लिहाव्यात.
*अशाने अंतरंग फुलुन येतात, उर्जेचा स्रोत खळखळत वाहतो.

*ह्या सहा सवयींपैकी प्रत्येक सवय आयुष्य बदलून टाकणारी आहे. वरील सहा सवयींपैकी किती सवयी तुम्ही स्वतःला लावून घेतल्या आहेत...?* 

 आता आपल्यापैकी प्रत्येकाकडे भरपूर रिकामा वेळ आहे. तो वेळ नकारात्मक पोस्ट वाचून त्यावर चिंतन करण्यात वाया घालवावा की वरील पैकी कोणत्याही एका किंवा जमत असल्यास सर्वच गोष्टी अमलात आणण्यासाठी प्रयत्न करायचा हे सर्वस्वी आपणच ठरवायचे आहे.

कोणतीही गोष्ट अंगवळणी पाडण्यासाठी किमान 21 दिवसांचा सराव आवश्यक असतो आणि आपल्याकडे आता कदाचित 21 पेक्षा जास्त दिवस रिकामे असणार आहेत.
तेव्हा या वेळेचा सदुपयोग करून भावी जीवनासाठी सशक्त मन आणि सशक्त शरीर बनवू. अशी वेळ व संधी पुन्हा येणार नाही व ती येऊ ही नये.
वेळ आहे स्वतःवर काम करण्याची स्वतःसाठी जगण्याची आलेल्या परिस्थिती चा फायदा करून घेण्याची...


💥🍇💥🍇💥🍇💥🍇💥🍇💥🍇💥🍇💥🍇💥

सोमवार, २९ जुलै, २०२४

आईबाबांची पावसाळ्यात घ्या जास्त काळजी, ३ गोष्टी खायला देणं टाळा! त्रासदायक आजारांचा धोका.....*

*आईबाबांची पावसाळ्यात घ्या जास्त काळजी, ३ गोष्टी खायला देणं टाळा! त्रासदायक आजारांचा धोका.....*
आई - बाबा ज्याप्रमाणे मुलांच्या आरोग्याची काळजी घेतात (Parents Health Care). लहानपणी जसं आपलं आरोग्य त्यांनी सांभाळलं. त्याच प्रमाणे वय वाढल्यानंतर मुलांनी आपल्या आई वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी (Monsoon). आई वडिलांचं वय वाढल्यानंतर त्यांना स्वतःच्या अनेक गोष्टी करायला कमी नाही (Health Tips). खाण्या पिण्याकडेही त्यांचं पुरेसं लक्ष नसतं. ज्यामुळे आरोग्याच्या निगडीत अनेक आजार शरीराभोवती घेरतात. शिवाय तब्येतही वारंवार बिघडते.

लॉन्जेविटी एक्सपर्ट प्रशांत देसाई सांगतात की, 'आपल्या आई - वडिलांवर सतत प्रेम करत रहा , त्यांना घालून पाडून बोलू नका ते होते म्हणून आपण आहोत एवढे लक्षात ठेवा, त्यांच्या आरोग्याची काळजी घ्या. त्यांना ३ गोष्टी कधीही खायला देऊ नका. यामुळे आई वडील वारंवार आजारी पडतील. शिवाय गंभीर आजार शरीराभोवती विळखा घालतील'

*साखरेचा चहा आणि बिस्कीट...*
तज्ज्ञांच्या मते, बऱ्याच लोकांना चहा पिण्याची सवय असते. पण ही सवय घातक ठरू शकतं. एक कप चहामध्ये ३६ ग्रॅम साखर असते. यामुळे त्यांना इन्शुलीन रेझिस्टन्स, लठ्ठपणा आणि मधुमेहाचा धोका वाढू शकतो. त्याऐवजी खाकरा, शेव मुरमुरा किंवा घरगुती नाश्त्यावर तूप घालून खाऊ शकता. यामुळे आरोग्याला फायदे मिळतील.

*व्हेजिटेबल ऑईल...*
बरेच जण आहारात व्हेजिटेबल ऑईलचा आहारात समावेश करतात. ज्यामुळे मेटाबॉलिक डिसऑर्डरची समस्या निर्माण होऊ शकते. यामुळे रक्तातील ट्रायग्लिसराईडची पातळी वाढते. ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. त्याऐवजी त्यांना तूप आणि खोबरेल तेलाचा आहारात सामावेश करा.

*रेस्टॉरंटमधलं अन्न...*
वयस्कर पालकांना शक्यतो रेस्टॉरंटमधून किंवा बाहेरचं खायला देऊ नका. त्यात मीठ, साखर आणि पाम तेलाचा जास्त वापर होतो. त्यात आरोग्यदायी आणि पौष्टीक गोष्टी नसतात. त्याऐवजी घरातील अन्न खायला द्या. तसेच मास मच्छी देणे सुद्धा टाळावे.
 

*३ ते ५ वयोगटातील मुलांना महत्त्वाच्या ६ गोष्टी करता येतात का? कशी शिकणार ही कौशल्यं..

*३ ते ५ वयोगटातील मुलांना महत्त्वाच्या ६ गोष्टी करता येतात का? कशी शिकणार ही कौशल्यं.....*

मुलांना शाळेला सुट्टी लागली की कुठे फिरायला जायचं, कोणत्या समर कॅम्पला जायचं याचं नियोजन सुरू होतं. हे सगळं ठिक असलं तरी पालक म्हणून आपणही मुलांना थोडा वेळ द्यायला हवा. नुसताच वेळ नाही तर त्या वेळात मुलांना काही कौशल्ये जरुर शिकवायला हवीत.  दैनंदिन जीवनात उपयुक्त असणारी ही कौशल्ये तुम्ही मुलांना जेवढ्या लवकर शिकवाल तेवढ्या लवकर तुमच्या मुलांना त्या कौशल्यांची सवय लागेल, मुलं स्वतंत्र व्हायला त्याची निश्चितच मदत होईल. ही कौशल्ये आत्मसात केल्याने मुलांमध्ये आत्मविश्वास वाढण्यासही मदत होईल. साधारण ३ ते ५ वर्षापर्यंतच्या मुलांना काही किमान कौशल्ये कोणत्या पद्धतीने शिकवू शकता याविषयी...

*१. भाषा आणि संवाद कौशल्य...*
भाषेचं महत्व आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. या वयातील मुलं साधारणपणे खूप चीडचीड करतात, ओरडून बोलतात, किंवा खूप कमी बोलतात अशा प्रकारच्या तक्रारी पालक करताना दिसतात. मग या सुट्टीमध्ये मुलांच्या भाषा कौशल्यावर थोडं जास्त लक्ष द्या. नवीन गोष्टी वाचणं, एखाद्या स्थळाबद्दल माहिती घेणं, चित्र काढून त्याबद्दल बोलणं अशा वेगवेगळ्या पद्धती तुम्ही भाषा कौशल्य वाढवण्यासाठी करू शकता.

*२. स्वत: ची काळजी घेण्याची कौशल्ये...*
साधारण ३ वर्षानंतरची मुलं वेग वेगळ्या पद्धतीने स्वतःची काळजी घेऊ शकतात. कपडे घालणे, आंघोळ करताना साबण लावणे, अंगावर पाणी घेणे, शू-शी स्वत:ची स्वत: करता येणे. स्वतःच्या हाताने जेवण करणे, घरामध्ये लहानसहान कामात मोठ्यांना मदत करणे अशी कामं मुलं करू शकतात.

*३. संज्ञानात्मक कौशल्ये...*  मुलांच्या मेंदूचा विकास होत असताना त्यातला महत्वाचा मुद्दा म्हणजे समस्या सोडवणे. आता, पालकांच्या दृष्टीने मुलांना कसली आलीये समस्या? तर, मुलांना घरामध्ये आणि बाहेर सुद्धा अनेक प्रश्न पडतात, त्या प्रश्नाचे उत्तर शोधणे म्हणजे समस्या सोडवणे. आता एक उदाहरण म्हणजे शाळेमध्ये पहिला दिवस असेल, तर कोणते मित्र असतील? कोणती शिक्षिका असेल? ही ३ ते ५ वर्षांच्या मुलांसाठी समस्या आहे. हळूहळू शाळेमध्ये जाऊन, मुलांच्या बरोबर रोज खेळून त्यांना मित्र बनवून मग ती समस्या सुटते. हेच अभ्यासाच्या बाबतीत, खेळ शिकण्याच्या बाबतीत वगैरे सुद्धा दिसून येत. 

*४. सामाजिक कौशल्य...*
काही वेळेस मुलं एकत्र असतात पण एकत्र खेळू शकत नाहीत. हे होण्यामागे मुख्य कारण म्हणजे सामाजिक खेळ ( ग्रुप प्ले ) कसे खेळायचे हे खूप वेळेस मुलांना माहीत नसतं. शेअरिंग, सूचना देणे आणि ऐकणे, खेळाचे वर्णन करून सांगता येणे वगैरे कौशल्ये वाढण्यासाठी मुलांना इतर मुलांशी खेळायची संधी उपलब्ध करून द्या. याशिवाय रस्ता ओलांडताना दोन्ही बाजूला पाहणे, रस्त्यावरती न पळणे, सिग्नल पाळणे, खेळताना स्वतःची काळजी घेणे इत्यादी. सामाजिक कौशल्ये पालक शिकवतील तेव्हाच मुलं शिकतील.

*५. शारीरिक कौशल्ये...* कोणतेही कार्य करण्यासाठी मुलांची शारीरिक कौशल्ये खूप महत्वाची भूमिका बजावतात. साधारण ४ वर्षापर्यंत मुलांमध्ये डोळे आणि हात यांचा समन्वय, दोन्ही हाताचे समन्वय, मेंदू आणि शरीर यातील समन्वय असणं गरजेचं आहे. पोहायला जाणे, सायकल चालवणे, नाच करणे, एखादा खेळ शिकणे  अशा प्रकारच्या गोष्टी मुलांसोबत केल्याने त्यांची शारीरिक कौशल्ये विकसित व्हायला मदत होते. 

*६. भावनिक कौशल्य...* मुलांच्या भावना या वयानुसार आणि स्वभावानुसार बदलत असतात. त्यांना आजूबाजूच्या गोष्टीचा जसा अनुभव येत जातो त्याप्रमाणे मुलं भावना व्यक्त करतात. काही वेळेस तीव्र तर काही वेळेस सौम्य भावना व्यक्त करताना दिसतात. एखादी गोष्ट खरी आहे की खोटी हे सुद्धा मुलांना या वयामध्ये समजतं. म्हणजे एखादं कार्टून कॅरॅक्टर हे प्रत्यक्षात नसतं त्यामुळे आपल्याला कितिही त्याप्रमाणे वागावंस वाटलं तरी सत्यात मला तसं वागत येणार नाही. 

*©संकलन*
*गजानन गोपेवाड*

शनिवार, २७ जुलै, २०२४

छअसून यामुळे केवळ पर्सनॅलिटी खराब होते नाही तर हा इतर आजारांनाही आमंत्रण देतो.*

*छअसून यामुळे केवळ पर्सनॅलिटी खराब होते नाही तर हा इतर आजारांनाही आमंत्रण देतो.*


लठ्ठपणा वाढल्यास हाय ब्लडप्रेशर, कंबरदुखी, हृदयाचे आजार, गुडघेदुखी यासारखे आजार होण्याचा धोका वाढतो. यामुळे वजन कमी करण्यासाठी लोक डायटिंग करतात किंवा तास न् तास जिममध्ये घाम गाळतात परंतु तरीही वजन कमी होत नाही. कारण त्यांचा डाएट चार्ट योग्य नसतो. आहाराकडे योग्य लक्ष आणि थोडासा व्यायाम केल्याने वजन लवकर कमी करणे शक्य आहे. आज आम्ही तुम्हाला असेच काही छोटे+छोटे उपाय सांगत आहोत ज्यामुळे 7 दिवसात तुमचे वजन कमी होऊ लागेल....

1. पपईचे नियमित सेवन करावे. हे फळ प्रत्येक ऋतूमध्ये मिळते. पपईचे सेवन केल्याने शरीरावरील अतिरिक्त चरबी कमी होते.

2. दह्याचे सेवन केल्याने चरबी कमी होण्यास मदत होते. दिवसातून दोन-तीन वेळेस ताक प्यावे.

3. पिंपळाच्या सालीचे चूर्ण भाजून घ्या, दररोज तीन ग्रॅम हे चूर्ण ताकामध्ये टाकून घेतल्यास बाहेर आलेले पोट कमी होईल.

4. वाढते वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी टोन्ड दुध, टोन्ड दही आणि टोन्ड पनीरचा वापर करावा. या पदार्थांमध्ये कॅलरी कमी असतात, परंतु पोट भरलेले जाणवते.

5. आवळा आणि हळद समान मात्रामध्ये बारीक करून चूर्ण तयार करा. हे चूर्ण ताकामध्ये टाकून घ्यावे. या उपायाने वजन जलद गतीने कमी होऊ लागेल.

6. दररोज सकाळी आणि संध्याकाळी चालावे. कमीत कमी 4 किलोमीटर चालण्याचा नियम करावा. दुपारचे जेवण केल्यानंतर शतपावली अवश्य करावी. जर तुम्ही रात्री 8:30 नंतर जेवण करत असाल तर पोळी आणि भाताऐवजी डाळ आणि भाज्यांना जास्त प्राथमिकता द्या. रात्री हलका आहार घ्यावा.

7. जेवणात वरून मीठ घेऊ नये. परंपरागत मसाले अन्नाची केवळ चव वाढवत नाहीt तर यामध्ये मायक्रोन्यूट्रिएंट , एंटीऑक्सीडेंट आणि फायबरही असते. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा की, हे मसाले भाजण्यासाठी तेलाचा जास्त उपयोग करू नये.
 
8. वजन लवकर कमी करण्याची इच्छा असेल तर जास्तप्रमाणात पांढरे पदार्थ (बटाटे, मैदा, साखर, तांदूळ) कमी करा आणि मल्टीग्रेन किंवा मल्टीकलर पदार्थ ( डाळी, गहू, गजर, पालक, सफरचंद, पपई) खाण्यावर जास्त भर द्या.

9. दिवसभराच्या आहारात सर्वात जास्त फोकस ब्रेकफास्टवर करा. अनेकवेळा लोक वजन कमी करण्याचा नादात ब्रेकफास्ट करत नाहीत परंतु एका रिसर्चनुसार नियमितपणे ब्रेकफास्ट केल्यास वजन कमी होण्यास मदत होते. ब्रेकफास्टमध्ये नेहमी एकसारखे पदार्थ सेवन करू नयेत.

10. सदाफुली झाडाच्या मुळाचे चूर्ण तयार करून घ्या. या चूर्णामध्ये मध टाकून सेवन करा आणि त्यानंतर ताक प्या. प्रसुतीनंतर येणाऱ्या लठ्ठपणामध्ये हा रामबाण उपाय आहे.
11. सर्वात महत्त्वाचे नेहमी उपाशी राहिल्यानंतर लठ्ठपणा वाढतोच. त्यामुळे उपाशी राहू नये . पोटभर जेवण्यापेक्षा थोडे थोडे चार वेळा जेवण केले तरी चालेल. वेळ मिळत नसल्यास सकाळ दुपार संध्याकाळ खूप चांगले. समजा तुम्ही एकाच वेळी तीन पोळ्या खात असाल तर थोडेसे बदल करून सकाळी एक दुपारी एक आणि संध्याकाळी एक याप्रमाणे जेवण करावे.

गुरुवार, २५ जुलै, २०२४

मूळव्याधी (पाईल्स)वर सुटकारा मिळवण्यासाठी घरगुती उपाय.*

*मूळव्याधी (पाईल्स)वर सुटकारा मिळवण्यासाठी घरगुती उपाय.*

*एका अध्ययनात किमान 50 टक्के लोकांना 50 वर्षाच्या वयापर्यंत पाईल्स होण्याची शक्यता असते. ही एक सामान्य आजार आहे ज्याचा संक्रमण पसरत नाही. पाईल्सवर उपचार असतो पण लोकांना डॉक्टरकडे जाण्यास थोडी शरम वाटते.*

*हा आजारपण वाढल्याने त्यातून रक्त येऊ लागत आणि फार दुखू लागत ज्यामुळे बसायला त्रास होतो. यासाठी आम्ही तुम्हाला काही घरगुती उपचार सांगत आहोत, ते केल्याने नक्कीच आराम मिळेल.*

*1. कोमट पाण्याने स्नान : दिवसातून तीन वेळा गरम पाण्याने स्नान करावी किंवा पाण्यात थोड्यावेळासाठी बसावे. त्या जागेवरची त्वचा ठीक होईल आणि जळजळ देखील कमी होण्यास मदत मिळेल.*

*2. संतुलित आहार घ्या : पाईल्स बरे करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला संतुलित आहार घेणे सुरू केले पाहिजे. ज्यामुळे कब्‍ज व पोटदुखी इत्यादीची समस्या दूर होते. जेवणात हिरव्या भाज्या, पाले भाज्या, ब्राउन राईस, दूध, सुजी इत्यादीचे सेवन करा.*

*3. बर्फाचा शेक द्या : ज्या भागात जळजळ होत असेल, तेथे बर्फाचा तुकडा ठेवा, याने आराम मिळेल व सूज कमी होण्यास मदत मिळेल.*

*4. एलोवेरा: पाईल्स झाल्यावर एलोवेरेला कापून आतला गर त्या जागेवर लावल्याने फायदा होतो. याचे जेल, जळजळ शांत करतो आणि सूज देखील कमी करण्यास मदत करतो.*

*5. लिंबाचा रस : तुम्हाला हे ऐकून आश्चर्य होईल, पण पाईल्स झाल्यावर लिंबाचा रस त्या जागेवर लावल्याने फार फायदा होतो. सुरुवातीत जळजळ होते पण थोड्यावेळाने आराम मिळतो.*

*6. जैतूनाचे तेल : जैतूनाचे तेल फारच उपयोगी असत. यात एंटीऑक्‍सीडेंट असत जे त्वचेची जळजळ शांत करत. पाईल्स झाल्यावर कॉटन बॉलमध्ये तेल घेऊन प्रभावित जागेवर लावायला पाहिजे. याने आराम मिळेल.*
 
*7. इतर प्राकृतिक उपाय: बर्‍याच वेळेपर्यंत ऐकाच मुद्रेत बसून राहणे टाळावे. व्यायाम करावा आणि रक्त आल्यावर लगेचच *डॉक्टरांना सल्ला* *घ्यावा.* 
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿

*चिंचेच्या झाडाखाली झोपणे वैज्ञानिकदृष्ट्या निषिद्ध का मानले जाते?

*चिंचेच्या झाडाखाली झोपणे वैज्ञानिकदृष्ट्या निषिद्ध का मानले जाते?*

चिंच.. म्हटली की जिभेवर रेंगाळते ती म्हणजे आंबट गोड चव. पाणीपुरी, शेवपुरी .. चिंचेची आंबट-गोड आमटी.. असे एक ना अनेक भारतीय पदार्थ चिंचेच्या वापराशिवाय पूर्ण होऊच शकत नाहीत. अगदी प्राचीन काळापासून भारतीय खाद्य संस्कृतीत चिंच हा अविभाज्य भाग आहे. चिंच हे भारतीय उपखंडातील सर्वात महत्त्वाच्या बहुउद्देशीय उष्णकटिबंधीय फळझाड प्रजातींपैकी एक आहे. चिंच हा बहुवर्षायू वृक्ष असून या झाडाचे मूळ ॲबिसिनियात आणि मध्य आफ्रिकेत असल्याचे अभ्यासक मान्य करतात. आज चिंच हे झाड उष्ण कटिबंधात सर्वत्र आढळते. भारतात विशेषेकरून कोकण व उत्तर कारवार येथील जंगलात चिंच मोठ्या प्रमाणात दिसते. चिंचेच्या झाडाचे मूळ आज आफ्रिकेतील असले तरी चिंचेचे फळ मोठ्या प्रमाणात प्रथम भारतात उत्पादित केले जात होते असे मानले जाते. 

उर्वरित भारतात हे झाड जगते परंतु कोकण आणि कारवार प्रमाणे चिंचेच्या फळाची गुणवत्ता तिथे मिळत नाही.. यामागील मुख्य कारण भारत आणि आफ्रिका सोळाशे लक्ष वर्षांपूर्वी एक भूभाग असल्याने हे साम्य आढळत असावे, असे अभ्यासक मानतात. किंबहुना काही अभ्यासकांच्या मते चिंचेचे बी हे समुद्रमार्गे कोकण आणि कारवार यांच्या किनाऱ्यावर रुजले गेले, आणि त्यानंतर ते उर्वरित भारतात पसरले. असे असले तरी उर्वरित जगाला चिंचेची ओळख झाली ती केवळ भारतामुळे. चिंचेला इंग्रजीत टॅमरिंड असे म्हणतात. चिंचेचे शास्त्रीय नाव ‘टॅमॅरिंडस इंडिकस’ आहे. हा शब्द मूलतः पर्शियन शब्दावरून आला आहे. पर्शियन भाषेत चिंचेला “तमार-इ-हिंद” असे म्हणतात. याचा अर्थ ‘हिंदचे खजूर’ असा आहे. संस्कृत मध्ये चिंचेला “अम्लिका” असे म्हटले जाते. तर संस्कृत ग्रंथांमध्ये चिंचेच्या वृक्षाला ‘तिन्त्रिणी वृक्ष’ असे संबोधले गेले आहे . चिंचेची पाने, बिया आणि साल अनेक आरोग्यविषयक आजार बरे करण्यासाठी उपयुक्त आहेत.

चिंचेशी संलग्न आख्यायिका
पौराणिक कथांमध्ये चिंचेच्या झाडाची सावली कृष्णासारखी पवित्र असल्याचे म्हटले आहे. राधेपासून विभक्त झालेला श्रीकृष्ण चिंचेच्या झाडाखाली बसला होता, अशी आख्यायिका आहे. चिंचेची पाने रात्रीची दुमडतात, यासंदर्भातील आख्यायिका शिव आणि भस्मासूर यांच्यातील संघर्षाशी सलंग्न आहे. शिव आणि भस्मासूर यांच्यातील युद्धाच्या दरम्यान जखमी भस्मासूर चिंचेच्या झाडावर लपला होता. शिवाने आपल्या अंतःचक्षूने भस्मासुराचा शोध घेतला त्यावेळेस भस्मासूर दिसावा म्हणून चिंचेच्या झाडाने आपली पाने दुमडून घेतली. अशा अनेक आख्यायिका चिंचेच्या झाडाशी संबंधित आहे. या पौराणिक आख्यायिका असल्या तरी एक दंतकथा विशेष करून चिंचेच्या झाडासंदर्भात प्रसिद्ध आहे, ती म्हणजे या झाडावर भूत, चेटकीण या सारख्या अमानवी शक्तींचा वास असतो. त्यामुळे रात्रीच्या वेळेस या झाडाखाली झोपू नये किंबहुना जाऊही नये असे सांगितले जाते, असे केल्यास भूतबाधा होते असा समज आहे. परंतु अशा स्वरूपाची कथा, आख्यायिका का प्रसिद्ध झाली यामागे वैज्ञानिक कारण असल्याचे तज्ज्ञ मानतात. रात्रीच्या वेळी चिंचेच्या झाडाखाली का झोपू नये, यामागील शास्त्रीय कारण समजून घेणे नक्कीच महत्त्वाचे ठरणारे आहे.

चिंच इतर वनस्पतींना मारणारी वनस्पती
चिंच हे एक Allelopathic झाड आहे. अ‍ॅलेलोपॅथी हा शब्द ग्रीक शब्द अ‍ॅलेलॉन आणि पॅथी या दोन शब्दांपासून तयार झाला आहे. अ‍ॅलेलॉन म्हणजे दुसऱ्यावर किंवा परस्पर आणि पॅथी म्हणजे सफरींग-वेदना. ज्या वनस्पतीमुळे दुसऱ्या वनस्पतींवर घातक परिणाम होतो त्यांना अ‍ॅलेलोपॅथी ही संज्ञा वापरण्यात येते. अ‍ॅलेलोपॅथी वनस्पती दुसऱ्या वनस्पतींवर घातक रसायनं सोडतात. ही रसायनं वनस्पतीच्या वेगवेगळ्या भागांद्वारे सोडली जाऊ शकते किंवा नैसर्गिक विघटनाद्वारे सोडली जाऊ शकतात. अ‍ॅलेलोपॅथी या शब्दाचे श्रेय ऑस्ट्रियन प्राध्यापक ‘हॅन्स मोलिश’ यांना दिले जाते, त्यांनी १९३७ साली “द इफेक्ट ऑफ प्लांट्स ऑन इच अदर” या पुस्तकात हा शब्द सर्वात आधी वापरला. असे असले तरी या वनस्पतींच्या या गुणधर्माविषयी प्राचीन काळापासून मानवाला प्रचिती असल्याचे नोंदविले गेले आहे. प्राचीन ग्रीक आणि रोमन नोंदींमध्ये या वनस्पतींचा उल्लेख विषारी असा करण्यात आलेला आहे. केवळ चिंचच नाही तर काळया अक्रोडच्या झाडाचाही याच प्रकारात समावेश होतो म्हणूनच प्लिनी द एल्डरने इसवी सनाच्या पहिल्या शतकात काळया अक्रोडाच्या झाडाला विषारी म्हणून नोंदविले आहे.

अ‍ॅलेलोपॅथी म्हणजे काय?
अ‍ॅलेलोपॅथी ही एक जैविक प्रक्रिया आहे ज्यामध्ये एक वनस्पती स्वतःच्या वाढीसाठी शेजारच्या वनस्पतीची वाढ पूर्णपणे थांबवते. अ‍ॅलेलोपॅथी ही एक जगण्याची यंत्रणा आहे. निसर्गात प्रत्येक सजीव हा जगण्याच्या स्पर्धेत असतो. चार्ल्स डार्विन याच्या ‘सर्व्हायव्हल ऑफ फिटेस्ट’ या सिद्धांताप्रमाणे अ‍ॅलेलोपॅथी या गटात मोडणाऱ्या वनस्पती, झाडे स्वतःच्या वाढीसाठी आपल्या सभोवताली असणाऱ्या इतर वनस्पतींची वाढ थांबवितात. या वनस्पती मुख्यत्त्वे आपल्या मुळांद्वारे जमिनीत विषारी रसायनं सोडतात, त्यामुळे त्या झाडाच्या आजूबाजूच्या झाडांची वाढ खुंटीत होवून झाडे मरतात. त्याचमुळे चिंचेच्या आजूबाजूला इतर वनस्पती आढळत नाही. चिंचेप्रमाणे काळं अक्रोड ही अंगणात न लावण्याचा सल्ला दिला जातो. अक्रोडाच्या झाडाचे सर्व भाग हायड्रोजुग्लोन तयार करतात, जे ऑक्सिजनच्या संपर्कात आल्यावर अ‍ॅलेलोटॉक्सिनमध्ये रूपांतरित होते. अक्रोडाच्या झाडांची मुळे, कुजणारी पाने आणि डहाळे हे सर्व आसपासच्या जमिनीत जुग्लोन सोडतात, ज्यामुळे इतर अनेक वनस्पतींच्या वाढीस प्रतिबंध होतो. नुकत्याच झालेल्या प्रयोगशाळा आणि ग्रीनहाऊस या दोन्ही प्रयोगांतून असे दिसून आले की ‘चिंचेच्या झाडाची पाने आणि मुळांमध्ये जैविक दृष्ट्या महत्त्वपूर्ण वाढ नियंत्रक असतात आणि ते अ‍ॅलेलोपॅथीद्वारे झाडाच्या खोडाजवळ तणमुक्त वातावरण तयार करण्यात गुंतलेले असतात (संदर्भ: Parvez, Syeda & Parvez, Mohammad & Fujii, Yoshiharu & Gemma, Hiroshi. (2003). Allelopathic competence of Tamarindus indica L. root involved in plant growth regulation. Plant Growth Regulation. 41. 139-148. 10.1023/A:1027387126878). म्हणूनच चिंचेचे झाड घराच्या आजूबाजूला किंवा अंगणात लावू नये असे सांगितले जाते. याच कारणामुळे चिंचेचे झाड नेहमीच एकांतवासात, एकाकी असते, त्याचमुळे या झाडाशी निगडित अमानवी कथा उत्त्पन्न झाल्या आहे.

*रात्री का झोपू नये या झाडाखाली?*
चिंचेच्या झाडावर भूत किंवा चेटकीण तत्सम वाईट शक्ती असल्याने या झाडाखाली रात्रीचे झोपू नये किंवा शक्यतो जाऊ नये असे म्हटले जाते. सर्वच झाडे रात्रीच्या वेळेस कार्बन डायऑक्साईड सोडत असल्याने रात्रीच्या वेळेस या झाडांखाली न झोपण्याचा सल्ला दिला जातो. या संदर्भात पुरावनस्पती अभ्यासक देवदत्त पोखरकर यांनी नमूद केले की ‘चिंचेच्या झाडापासून माणसाला भूतबाधा वगैरे होत नाही, इतर झाडांच्या तुलनेत चिंचेचे झाड अधिक कार्बन डायऑक्साईड सोडत असल्याने पक्षीही या झाडावर घरटी करत नाहीत, अपवादात्मक परिस्थिती वगळता. पक्षी चिंचेच्या झाडावरील फळे दिवसा खातात, त्या साठी त्या झाडावरही जातात, परंतु रात्रीच्या वेळेस पक्षीही चिंचेच्या झाडाजवळ भटकत नाहीत. दुसरं महत्त्वाचं कारण असं थंडाव्यासाठी साप-नाग -अजगर रात्रीच्या वेळेस चिंचेच्या झाडावर वास्तव्यासाठी जातात. त्यामुळे अज्ञानाने रात्रीच्या वेळेस या झाडाखाली झोपल्यास सर्प-विंचू चावण्याचा धोका असतो. इतर प्राण्यांच्या तुलनेत सापाची श्वसनक्रिया कमी ऑक्सिजन असलेल्या ठिकाणी अधिक प्रभावी असते त्यामुळे चिंचेच्या झाडावर साप रात्रीच्या वेळेस सहज वास्तव्य करू शकतो. बऱ्याच वेळा चिंचेच्या झाडावर घुबडाचा वावर असतो. जे काही मोजके पक्षी सापाला खातात, त्यात घुबडाचा समावेश होतो. त्यामुळे ‘जीवो जीवस्य जीवनम्:’ हे येथे अक्षरश: खरे ठरते. चिंचेचे झाड त्याच्या उपजत अ‍ॅलेलोपॅथी धर्मामुळे एकाकी असते. त्यात अधिक कार्बन डायऑक्साईड सोडणारे झाड, या झाडावर रात्रीच्या वेळेस साप, घुबड यांचा वावर, अक्राळ-विक्राळ फांद्या यासर्वांमुळे या झाडावर भूत असल्याच्या आख्यायिका प्रचलित झाल्या आहेत.

बुधवार, २४ जुलै, २०२४

आयुर्वेद health tips...Every one shud follow*

*आयुर्वेद health tips...Every one shud follow* 

1)तहान लागेल तेव्हाच पाणी प्या.
2)शाबुदाणा,शेंगदाणे,वरी,दही हे सगळे पित्त वाढवणारे पदार्थ खाऊन उपवास करू नयेत... खरा उपवास म्हणजे लंघन..पोटाला विश्रांती देणे..

3)जेवणाच्या वेळा नियमित असाव्यात..दुपारी १२ पर्यंत आणि रात्री ८ पर्यंत जेवण करावे.
4)दोन्ही जेवणानंतर शत पावली( Actual १०० steps च अपेक्षित आहेत .व्यायाम नव्हे )घालावी. म्हणजे अन्न पुढे सरकण्यास आणि पचनाला मदत होते.

5)लोणचे,पापड,अति तिखट,तेलकट, खारट अन्न पदार्थ खाऊ नयेत.
6)रात्री च्या वेळी दही खाऊ नये.

7)रोज ४५ मिनिटे चालण्याचा व्यायाम करावा.
8)मधल्या भुकेच्या वेळेत त्या त्या ऋतूमध्ये उपलब्ध असणारे फळ,राजगिरा लाडू,साळीच्या लाह्या,खजूर हे खावे...फरसाण,बिस्कीट,शेव हे सर्व पित्त वाढवणारे पदार्थ आहेत.

9)आपण जिथे राहतो तिथे ज्या स्थानिक भाज्या पिकतात,फळे मिळतात ते खावे..फळे नुसतीच खावीत, दुधात घालून,दह्यात मिक्स करून खाऊ नयेत...फळांची मूळ चव आणि गुणधर्म बदलतात अशाने..

10)जेवणात २ चमचे तुपाचा समावेश जरूर  असावा.तुपाने कोलेस्टेरॉल वाढत नाही..तूप हे दुधावर अनेक संस्कार केल्यानंतर तयार होते त्यामुळे पचनासाठी चांगले असते..
11)संडास,लघवी ,उलटी ,शिंक या वेगांचे धारण कधीही करू नये..लागल्यास लगेच जावे.

12)पाळीच्या दिवसात स्त्रियांनी लोणचे खाल्ले तर रक्त स्त्राव वाढण्याची शक्यता असते कारण लोणच्यात तेल,मीठ,तिखट यांचा जास्त वापर असतो आणि त्यामुळे स्त्री शरीरातील पित्त वाढते पर्यायाने रक्त सुध्दा वाढते..म्हणून लोणचे खाऊ नये.

13)दूध आणि फळं एकत्र करून खाऊ नये..विरुद्ध आहार आहे..त्याचे पचन होत नाही.आणि अनेक आजारांची निर्मिती त्यातून होते.
14)कधीही पोटाला तडस लागेपर्यंत खाऊ नये..वायू च्या संचरणासाठी पोटात जागा ठेवावी.

15) शिळे अन्न, processed food, preservatives असलेले पदार्थ शक्यतो टाळावेत..जितका आहार ताजा खाल्ला जाईल  तितके शरीराचे पोषण चांगले होईल...आपल्या शरीराचा संपूर्ण डोलारा हा आपण खात असलेल्या आहारावर च अवलंबून असतो..

शनिवार, १३ जुलै, २०२४

*डेंग्यू झाल्यावर रूग्णानें काळजी कशी घ्यावी? जाणून घ्या एक्सपर्ट्सचा सल्ला.

*डेंग्यू झाल्यावर रूग्णानें काळजी कशी घ्यावी? जाणून घ्या एक्सपर्ट्सचा सल्ला.....*

पाऊस आला की, डासांचं थैमान वाढतं. त्यामुळे वेगवेगळ्या आजारांचा धोकाही वाढतो. डेंग्यू डासांचं थैमानही वाढतं. डेंग्यूवर वेळीच उपचार केले नाही तर रूग्णाचा जीवही जाऊ शकतो. डेंग्यू झाल्यावर ताप, डोकेदुखी, मांसपेशींमध्ये वेदना, हाडे आणि जॉईंट्समध्ये वेदना, मळमळ, उलटी, डोळे दुखणे, सूज आणि त्वचेवर लाल चट्टे अशी लक्षणे दिसतात. अशात रूग्णाची खूप काळजी घ्यावी लागते. डेंग्यूची लागण झाल्यावर रूग्णाची काळजी कशी घ्यावी हे आज आपण जाणून घेणार आहोत.

डेंग्यू झाल्यावर या गोष्टींची घ्या काळजी

- *वेळीच ओळखा लक्षण...*
डेंग्यूची वेळेवर ओळख पटवणं फार गरजेचं आहे. जर कुणाला तापासोबत थंडी वाजत असेल, डोकेदुखी, कमजोरी किंवा थकवा जाणवत असेल तर वेळीच डॉक्टरांना दाखवा. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतंही औषध घेऊ नका. योग्य वेळेवर उपचार करून डेंग्यूपासून बचाव केला जाऊ शकतो.

- *पोषक आहार घ्या...*
डेंग्यूच्या रूग्णांनी आपल्या आहारावर खूप लक्ष दिलं पाहिजे. संतुलित आहार घ्यावा. ज्यात ताजी फळं, भाज्या, कडधान्य, डाळी, नट्स, बीन्स यांचा समावेश असावा. यादरम्यान बाहेर, तेलकट, मसालेदार काहीच खाऊ नये. सोडा, कोल्ड ड्रिंक्सचं सेवन करू नये. 

- *तरल पदार्थ जास्त घ्या...*
डेंग्यू झाल्यावर रूग्णाला जास्त लिक्विड दिलं पाहिजे. सूप, आल्या-पुदीन्याचा चहा यात फायदेशीर ठरतो. रूग्णाला भरपूर पाणी प्यायला द्यावं. कोमट पाणी द्यायला हवं.

- *दारू-सिगारेट ओढू नये...*
डेंग्यू झाल्यावर चुकूनही दारू किंवा सिगारेट ओढू नये. यामुळे डिहायड्रेशनची समस्या होऊ शकते. समस्या आणखी गंभीर होऊ शकते. 

- *डासांपासून बचाव...*
घरातील डासांपासून बचाव करण्यासाठी वेगवेगळे उपाय करावे जसे की, मच्छरदानी, स्प्रे, क्रीम. पूर्ण कपडे घाला. घरात किंवा आजूबाजूला पाणी साचू देऊ नका. थांबलेलं पाणी लगेच काढा

बुधवार, १० जुलै, २०२४

किडनी खराब होऊ द्यायच्या नसेल तर लगेच खाणं बंद करा 'हे' पदार्थ.....!*

*किडनी खराब होऊ द्यायच्या नसेल तर लगेच खाणं बंद करा 'हे' पदार्थ.....!*

किडनी आपल्या शरीरातील सगळ्यात महत्वाच्या अवयवांपैकी एक आहे. त्यामुळे किडन्यांची खूप जास्त काळजी घ्यावी लागते. पण लोकांच्या काही चुकीच्या सवयी आणि चुकीच्या लाइफस्टाईलमुळे किडनींचं मोठं नुकसान होतं. लोक अशा अनेक गोष्टी रोज खातात ज्यामुळे किडनी खराब होऊ शकतात. आज आम्ही अशाच काही पदार्थांबाबत तुम्हाला सांगणार आहोत.

*मेयोनीज...*
आजकाल सॅंडविच किंवा मोमोज किंवा इतर काही पदार्थांसोबत मेयोनीज खाण्याचं प्रमाण खूप वाढलं आहे. तुम्हाला कदाचित माहीत नसेल पण केवळ एक चमचा मेयोनीजमध्ये १०३ कॅलरी असतात. तसेच यात सामान्य सॅच्युरेटेड फॅट अधिक प्रमाणात असतं. फॅट नसलेलं किंवा कमी कॅलरीच्या मेयोनीजची निवड करा. हेही बघा की, त्यात सोडिअम आणि शुगर जास्त नसेल.

*फ्रोझन फूड...*
फ्रोजन फूड आणि मायक्रोवेवमध्ये शिजवलेले पदार्थ खाऊन टाइप २ डायबिटीसचा धोका वाढतो. कारण यात पदार्थांमध्ये फॅट, शुगर किंवा सोडिअम भरपूर प्रमाणात असू शकतं. ताजे आणि पौष्टिक पदार्थ खाणं नेहमी चांगलं असतं. 

*सोडा...*
सोड्यामध्ये शुगरचं प्रमाण फार जास्त असतं. सोबतच यात कोणतंही पोषण नसतं. याने तुमच्या आहारात जास्त कॅलरी जोडल्या जातात. ज्यामुळे तुमचं वजन वाढतं. रिसर्चमधून समोर आलं की, सोड्याचं सेवन ऑस्टियोपोरोसिस, किडनीचे आजार, खराब पचनक्रिया आणि दातांच्या समस्यांना निमंत्रण देतं.

*प्रोसेस़्ड मीट...*
बेकन, सॉसेज, हॉट डॉग आणि बर्गर पॅटीजसारखे प्रोसेस्ड मीट किडनीचं आरोग्य खराब करू शकतात. यात हाय सोडिअम असतं. नेहमीच जास्त सोडिअमचं सेवन केलं तर ब्लड प्रेशरची समस्या वाढू शकते. ज्यामुळे किडनीवर अतिरिक्त दबाव पडतो.

*डीप फ्राय पोटॅटो...*
जर तुम्ही फ्रेंच फ्राइजच्या रूपात चिप्ससारखे पॅकेज्ड फूड किंवा फास्ट फूडच्या रूपात बटाट्याचं सेवन करत असाल तर तुमच्या किडनीचं आरोग्य धोक्यात आहे. किडनी खराब होऊ द्यायची नसेल तर डीप-फ्राइड बटाटे खाणं टाळलं पाहिजे. बटाट्यामध्ये पोटॅशिअमचं प्रमाण जास्त असतं. जे कमी करण्याचा सल्ला दिला जातो.
 

सोमवार, ८ जुलै, २०२४

*मेडिकल स्टोअर्स मध्ये उपलब्ध नसलेल्या औषधांचे प्रकार तुम्हाला माहीत आहेत का ?*

*मेडिकल स्टोअर्स मध्ये उपलब्ध नसलेल्या औषधांचे प्रकार तुम्हाला माहीत आहेत का ?*

*व्यायाम, योग, प्राणायाम व ध्यान* हे औषध आहे.
*सकाळ/संध्याकाळ चालणे* हे औषध आहे.
*उपवास* हे औषध आहे.
*संगीत ऐकणे* हे औषध आहे.
*आपले छंद जोपासणे* हे औषध आहे.
*कुटुंबासोबत जेवण* हे औषध आहे.*
*हसणे आणि विनोद* हे देखील औषध आहे.
*गाढ झोप* हे औषध आहे.
*सर्वांशी मिळून वागणे* हे औषध आहे.
*आनंदी राहण्याचा निर्णय* हे औषध आहे.
*मनातील सकारात्मकता* हे औषध आहे.
*प्रार्थना हा एक चांगला आध्यात्मिक व्यायाम आणि औषध आहे*
.*सर्वांचे भले हो हा विचार* हे औषध आहे.
*इतरांसाठी प्रार्थना* हे औषध आहे.
कधी कधी *मौन* हे औषध असते.
*प्रेम* हे औषध आहे.
*मन:शांती* हे औषध आहे.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही सर्व औषधे पूर्णपणे मोफत आहेत आणि सर्व एकाच ठिकाणी कुठे मिळवायचे?

*प्रत्येक चांगला मित्र* हे एक परिपूर्ण *मेडिकल स्टोअर* आहे.
 दुसऱ्याचा सतत चांगला विचार करणे व सकारात्मक विचार करणे  त्याचबरोबर आपले सुद्धा चांगले होते,
 *तीन महिने अमृत ज्यूस घ्या आणि निरोगी रहा*

*निरोगी रहा आणि आनंदी रहा*🌹🌹

*माहिती आवडली तर इतर ग्रुप वर शेअर करा 🙏*

रविवार, ७ जुलै, २०२४

काही पावलं चालूनच हृदयाची धडधड वाढते? मग वेळीच व्हा सावध.....*

*काही पावलं चालूनच हृदयाची धडधड वाढते? मग वेळीच व्हा सावध.....*

हे तर सगळ्यांनाच माहीत आहे की, आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी चालणं, धावणं किती महत्वाचं आहे. डॉक्टरही नेहमीच धावण्याचा आणि चालण्याचा सल्ला देत असतात. तुम्हीही चालत असाल किंवा रनिंग करत असाल तर तुम्हाला जाणवलं असेल की, रनिंग करताना अचानक हार्ट रेट म्हणजे हृदयाचे ठोके वेगाने होऊ लागतात. काही लोक या गोष्टीला घाबरतात. पण ही एक सामान्य प्रोसेस आहे. मात्र तरीही वॉक करताना किंवा रनिंग करताना हार्ट रेट का वाढतो आणि हार्ट रेट किती असायला हे जाणून घेणार आहोत.

*का वाढते हृदयाची धडधड...?*
हेल्थ एक्सपर्ट सांगतात की, रनिंग करताना जास्त एनर्जी लागते आणि ही एनर्जी मिळवण्यासाठी मांसपेशींना जास्त एनर्जी आणि ऑक्सिजनची गरज असते. ही गरज पूर्ण करण्याची जबाबदारी हृदयाची असते. हृदय वेगाने रक्त पंप करणं सुरू करतं ज्यामुळे हार्ट रेट वाढतो.

त्याशिवाय धावताना शरीराचं तापमानही वाढतं ज्यामुळे हृदय वेगाने रक्त पंप करून शरीर थंड करण्याचा प्रयत्न करत असतं. धावताना आपल्या शरीरात एड्रेनालाईन आणि कोर्टिसोलसारखे हार्मोन वाढतात. ज्यामुळे हृदयाचे ठोके वेगाने होतात.

*हार्ट रेट कसा मोजतात...?*
हार्ट रेट वाढणं व्यक्तीचं वय, आजूबाजूचं तापमान, फिटनेस लेव्हल आणि वजनावरही अवलंबून असतं. अनेकदा धावताना तणावात असलेल्या लोकांचाही हार्ट रेट वाढतो. हार्ट रेट फार जास्त वाढणंही घातक ठरू शकतं.

*किती हार्ट रेट नॉर्मल, कधी व्हावं सावध...*
सामान्यपणे एका रनिंग करत असलेल्या व्यक्तीचा हार्ट रेट जाणून घेणं खूप सोपं आहे. रनिंग करताना हार्ट रेट ६० ते १०० बीपीएम असतो. तुम्ही हार्ट मॉनिटरचा वापर करूनही हार्ट रेटची माहिती मिळवू शकता. आजकाल स्मार्ट वॉचमध्येही याची सोय असते.

*हृदयाची धडधड वाढणं कशाचा संकेत...*
सामान्यपणे पाहिलं तर ज्यांचं वजन जास्त असतं ते काही पावलं चालले किंवा धावले तर त्यांना दम लागतो. त्याशिवाय जर चालताना किंवा रनिंग करताना काही वेळातच त्यांना श्वास भरून येतो. अशात हा हृदयरोगाचा संकेत असतो. अनेकदा हे हार्ट अटॅकचंही लक्षण मानलं जातं. अशात गरजेचं आहे की, हार्टबीट मॉनिटर करत रहा आणि वेळीच डॉक्टरांना संपर्क करा. परंतु रोज एक तास चाला.
 

शुक्रवार, ५ जुलै, २०२४

सर्वांनीच दुधाचे सेवन का करावे ?**दूध आरोग्यासाठी उत्तम का 🤔आहे?*

*सर्वांनीच दुधाचे सेवन का करावे ?*

*दूध आरोग्यासाठी उत्तम का  🤔आहे?*

दुधामध्ये मोठ्या प्रमाणात पोषक 🛡️ तत्वे असतात. तसेच आरोग्यासाठी लाभदायक असणारे अनेक घटकांचा दुधामध्ये समावेश असतो. *दुधामध्ये कॅल्शियम , प्रथिने, पोटॅशियम आणि फॉस्फरस सारखे आवश्यक पोषक घटक असतात.* त्यामुळे दूध हे आरोग्यासाठी उत्तम मानले जाते.

▪️ *हाडे 🦴आणि स्नायू  मजबूत होतात.*

दुधाचे सेवन केल्याने हाडे आणि स्नायू मजबूत होण्यासाठी मदत होते. कारण दुधामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचा 🛡️ समावेश असतो. हे दोन्ही घटक हाडांपासून महत्त्वाचे मानले जातात.  दूध हाडे मजबूत करून ऑस्टियोपोरोसिस (हाडांचा प्रकार) आणि वृद्धापकाळातील 👴🏻 फ्रॅक्चर टाळण्यास मदत करू शकते. त्यामुळे दुधाचे नियमित सेवन करावे. याशिवाय दुधामध्ये प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट्स भरपूर असतात जे स्नायूंसाठी 🦵🏻 फायदेशीर मानले जातात .

▪️ *दातांच्या आरोग्यासाठी फायदेशीर*

दूध हे दातांकरता 🦷देखील लाभदायक आहे. दुधामध्ये असलेले कॅल्शियम आणि फॉस्फरस सारखे घटक दातांचे संरक्षण करतात. तसेच दुधाचे सेवन केल्याने दात निरोगी 🛡️ राहण्यास मदत होते. त्यामुळे दात मजबूत ठेवायचे असतील तर दररोज दुधाचे सेवन करा. 

▪️ *दुधाच्या सेवनाने वजन  कमी होते.*

वाढते वजन कमी 📉 करण्यासाठी दूध उपयुक्त ठरू शकते. एका संशोधनानुसार, दुग्धजन्य पदार्थाचे सेवन करणाऱ्या ३८% मुलांचे वजन कमी करणाऱ्यांच्या तुलनेत नियंत्रित ⚖️ होते. दूध आणि दुग्धजन्य पदार्थ हे प्रथिनांचे चांगले स्त्रोत आहेत आणि प्रथिने वजन कमी करण्यास आणि नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. दुधाचे 🥛 सेवन केल्याने जेवण अधिक प्रमाणात जात नाही. त्यामुळे वजन नियंत्रणात राहते. 

▪️ *हृदयाचे आरोग्य चांगले राहते*

दररोज दुधाचे सेवन केल्याने हृदय 🫀 उत्तम राहण्यास मदत होते. दुधाचे नियमित सेवन केल्याने हृदयविकार टाळण्यास मदत होऊ शकते. एका अभ्यासानुसार, 📚 जे लोक दररोज २०० मिली दुधाचे सेवन करतात, *त्यांना स्ट्रोकचा धोका ७ टक्के कमी असतो.* 

▪️ *मधुमेहासाठी फायदेशीर*

दररोज दूध प्यायल्याने मधुमेहाचा धोकाही 🦠 टाळता येतो. त्यात असलेले कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पेप्टाइड्स शरीरातील 🧍🏻‍♂️ ग्लुकोज आणि इन्सुलिनचे प्रमाण नियंत्रणात ठेवतात. *दुधात असलेल्या फॅटी अॕसिडमुळे टाईप-२ मधुमेह होण्याचा धोका कमी होतो.* याच अभ्यासात असेही म्हटले आहे की यावर अधिक संशोधन 🔬 आवश्यक आहे, ज्यामुळे टाइप २ मधुमेह टाळण्यासाठी मदत होईल.

▪️ *पोटासंबंधित आजार बरे होतात*

दुधामुळे अपचन आणि अॕसिडिटी तसेच पोटाशी संबंधित अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. दुधात 🥛 अँटासिडचा समावेश असतो. ज्यामुळे अपचन आणि आम्लपित्त यांसारख्या पोटाच्या समस्या दूर होण्यास मदत होते. यासाठी थंड ❄️ दूध वापरावे. थंड दूध पोटातील आम्ल कमी करते. 

▪️ *झोपेसाठी उत्तम*

अनेक अभ्यासांमध्ये 📚 हे सिद्ध झाले आहे की रात्री झोपण्यापूर्वी दूध प्यायल्याने झोप चांगली लागते. दुधामध्ये ट्रिप्टोफॅन आणि मेलाटोनिन ही अमीनो अॕसिड असतात. ज्यामुळे झोप येण्यास मदत होते. रात्री झोप 🛌🏻 न लागणे किंवा अस्वस्थ वाटू लागणे अशा समस्या असल्यास रात्री झोपण्यापूर्वी कोमट दूध 🥛 रोज प्यावे.
परंतु दूध साय काढून दिले पाहिजे 


गुरुवार, ४ जुलै, २०२४

*➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖* *गॅसेस का होतात ?**➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖*

*➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖*
    *गॅसेस का होतात ?*
*➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖*

खूप लोकांना गॅसेसचा त्रास होतो. म्हातारपणात तर बऱ्याच लोकांमध्ये हा त्रास आढळून येतो.‍ लहान मुलांमध्येही गॅसेस होऊ शकतात. गॅसेस किंवा वायूविकाराचे मुख्य कारण म्हणजे आपल्याला माहित नसताना हवा गिळण्याची सवय. 

खूप बोलणाऱ्या लोकांमध्ये (उदा. शिक्षक, राजकीय नेते) अशा प्रकारे जास्त हवा गिळली जाते आणि गॅसेसचा त्रास होतो. लहान मुलेही दूध पिताना हवा गिळतात आणि त्यामुळे गॅसेस होऊन त्यांचे पोट दुखायला लागते. 

मोठ्या आतड्यात सुक्ष्म जंतूंची अन्नावर क्रिया होऊनही वायू निर्माण होतो. याखेरीज शौचास साफ न झाल्यास किंवा बद्धकोष्ठाचा त्रास असल्यास मल शरीरात साचून राहतो व या मलाचे विघटन होऊनही वायू तयार होतात. वायू तयार झाल्यावर तो आतड्याच्या भिंतीवर ताण आणतो. त्यामुळे पोट दुखते. डोकेही दुखते.

गॅसेसचा त्रास होऊ नये यासाठी जेवणाच्या वेळा नियमित असाव्यात. थोडीशी भूक ठेवूनच जेवावे. हरभऱ्याच्या डाळीचे किंवा तेलकट तुपकट पदार्थ कमी खावेत. बैठे काम करणाऱ्यांनी भरपूर व्यायाम करावा. सर्वांनीच निदान जास्तीत जास्त पायी चालण्याचा प्रयत्न करावा. 

पवनमुक्तासन सारख्या आसनांमुळे गॅसेस बाहेर पडतात. अनावश्यक बडबड टाळावी. हिंग्वाष्टक चूर्ण घेतल्यास गॅसेसवर चांगला उपचार होतो. बैठे काम करणाऱ्यांनी जेवणानंतर दीड दोन तासांनी ताठ बसून बेबी आत ओढून पाच ते पंधरा सेकंद तशीच ठेवण्याचा प्रयत्न करावा. असा उपाय वारंवार केल्याने गॅसेसचा त्रास नक्कीच कमी होतो. 

चार चौघे जमल्यावर आपल्याला लाज आणणारा हा वायूविकार आहाराच्या सुयोग्य सवयी आणि व्यायाम यामुळे आपण आटोक्यात आणू शकतो.

*डाॅ. अंजली दिक्षित व डाॅ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन* 



*➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖*

🍑🍇🍑🍇🍑🍇🍑🍇🍑🍇🍑🍇🍑🍇🍑🍇🍑🍇🍑🍇🍑🍇🍑🍇🍑

बुधवार, ३ जुलै, २०२४

वृद्धत्व पायापासून वरच्या दिशेने सुरू होते!*

*वृद्धत्व पायापासून वरच्या दिशेने सुरू होते!*

🚶‍♀️🚶🚶‍♂️🚶‍♀️🚶‍♀️🚶🚶🚶‍♂️🚶‍♂️
       
*पाय सक्रिय आणि मजबूत ठेवा !!*

▪️जसे वर्षे घालवतो तसे रोज म्हातारा होत असतो,पाय नेहमी सक्रिय आणि मजबूत असले पाहिजेत.
जसजसे सतत म्हातारे होत असतो/वृद्ध होत असतो,तस तसे केस राखाडी होण्याची/ त्वचा निस्तेज/ चेहऱ्यावर सुरकुत्या पडण्याची भीती बाळगू नये.

*दीर्घायुष्य* प्रदीर्घ तंदुरुस्त आयुष्याच्या लक्षणांपैकी लोक प्रिय यूएस मॅगझिन"प्रिव्हेन्शन" द्वारे सारांशित केले आहे,पायां चे मजबूत स्नायू *सर्वात महत्त्वाचे आणि आवश्यक* म्हणून शीर्षस्थानी सूचीबद्ध आहेत.कृपया दररोज चालत जा.

▪️जर फक्त २ आठवडे पाय हलवले नाही तर पायाची खरी ताकद १० वर्षांनी कमी होईल.
*फक्त चाला*

▪️डेन्मार्कमधील कोपनहेगन विद्यापीठाच्या एका अभ्यासात असे आढळून आले आहे की वृद्ध,तरुण २ आठवड्यांच्या *निष्क्रियता* दरम्यान,पायां च्या स्नायूंची ताकद *एक तृतीयांश* कमकुवत होऊ शकते* जे २०-३० वर्षांच्या वृद्धत्वाच्या समतुल्य आहे !!
*म्हणून फक्त चाला*

▪️पायाचे स्नायू कमकुवत झाल्यामुळे नंतर पुनर्वसन व व्यायाम केले तरीही ते बरे होण्यास बराच वेळ लागेल.

म्हणून *चालण्यासारखा नियमित व्यायाम खूप महत्त्वाचा आहे*

▪️संपूर्ण शरीराचे वजन/भार शिल्लक राहून पायांवर विश्रांती घ्या.

*पाय हे १ प्रकारचे खांब* आहेत,जे मानवी शरीराचे संपूर्ण भार सहन करतात.
*रोज चाला.*

▪️मजेची गोष्ट म्हणजे,माणसा च्या ५०% हाडे, ५०% स्नायू २ पायांत असतात.*चालत जा*

▪️मानवी शरीरातील सर्वात मोठे व मजबूत सांधे,हाडे देखील पायांमध्ये असतात.
*10K पावले/दिवस*

▪️मजबूत हाडे,मजबूत स्नायू, लवचिक सांधे *लोह त्रिकोण* बनवतात जो सर्वात महत्वाचा भार वाहतो म्हणजेच *मानवी शरीर"*

▪️७०% मानवी क्रियाकलाप व व्यक्तीच्या जीवनातील ऊर्जा बर्न दोन पायांनी केली जाते.

▪️हे माहीत आहे का?जेव्हा एखादी व्यक्ती तरुण असते तेव्हा तिच्या *मांडीत ८०० किलो वजनाची छोटी गाडी उचलण्याइतकी ताकद असते*

*पाय हे शरीराच्या हालचाली चे केंद्र आहे*

▪️दोन्ही पायांना मिळून मानवी शरीराच्या ५०% नसा, ५०% रक्तवाहिन्या आणि ५०% रक्त त्यामधून वाहत असते.

▪️हे शरीराला जोडणारे सर्वात मोठे रक्ताभिसरण नेटवर्क आहे. *म्हणून रोज चाला*

▪️फक्त जेव्हा पाय निरोगी असतात तेव्हाच रक्ताचा प्रवाह सुरळीत होतो,त्यामुळे ज्यांच्या पायाचे स्नायू मजबूत असतात त्यांचे हृदय नक्कीच मजबूत असते.*रोज चाला.*

▪️ वृद्धत्व पायापासून वरच्या दिशेने सुरू होते

▪️एखादी व्यक्ती मोठी होते, मेंदू,पाय यांच्यातील सूचनांच्या प्रसारणाची अचूकता व गती कमी होते,ती व्यक्ती तरुण असताना कमी होते.*कृपया चालत जा*

▪️याशिवाय,तथाकथित हाडां चे खत कॅल्शियम कालांतराने लवकर/नंतर नष्ट होते,ज्यामुळे वृद्धांना हाडे फ्रॅक्चर होण्याची अधिक शक्यता असते.वृद्धां मध्ये हाडांचे फ्रॅक्चर सहजपणे अनेक गुंतागुंत निर्माण करू शकतात. विशेषत: मेंदूच्या थ्रोम्बोसिससारखे घातक रोगहोतात.

▪️हे माहीत आहे का ? साधारणपणे १५% वृद्ध रूग्ण जास्तीत जास्त मरतात. १ वर्षा च्या आत मांडीचे हाड फ्रॅक्चर !
*रोज न चुकता चाला*

*पायांचा व्यायाम,वयाच्या ६० वर्षानंतरही कधीही उशीर होत नाही*

▪️पाय कालांतराने हळूहळू म्हातारे होत असले तरी,पाय/पायांचा व्यायाम करणे हे आयुष्यभराचे काम आहे.
*10,000 पावले चाला*

▪️केवळ नियमितपणे पाय बळकट केल्याने पुढील वृद्धत्व टाळता येते/कमी करता येते.
*३६५ दिवस चाला*

▪️पायांना पुरेसा व्यायाम मिळावा,पायाचे स्नायू निरोगी राहतील याची खात्री करण्या साठी कृपया रोज किमान ३०- ४० मिनिटे चाला.
 *त्यासोबतच तीन महिने अमृत ज्यूस घ्या आणि निरोगी रहा*

*तुम्ही ही महत्त्वाची माहिती तुमच्या 40+ मित्र आणि कुटुंबातील सदस्यांसोबत शेअर केली पाहिजे, कारण प्रत्येकजण दररोज वृद्ध होत आहे*
 

मंगळवार, २ जुलै, २०२४

लेमन टी पिण्याचे आहेत अनेक आरोग्यदायी फायदे,*

*लेमन टी पिण्याचे आहेत अनेक आरोग्यदायी फायदे,*       
                                                                                              *कसा बनवायचा पर्फेक्ट लिंबाचा चहा*

एका स्वच्छ पातेल्यात पाणी घेऊन त्याला उकळी आणा.

रंग येण्यासाठी यात चहापूड घाला. लक्षात ठेवा की चहापूड खूप कमी घालायची आहे.

याला एक उकळी आणून कपात गाऴून घ्या.

या कपात वरून लिंबाच्या रसाचे काही थेंब टाका. (कोमट असताना)

चव वाढवण्यासाठी आपल्या आवडीनुसार यात आपण मध (कोमट असताना) आणि आलेही घालू शकता.

आपला लिंबाचा चहा तयार आहे.

*लेमन टी पिण्याचे अनेक आरोग्यदाचे फायदे :-*

आपल्याला माहित आहेतच की लिंबाचा चहा चरबी कमी करण्यासाठी फायदेशीर असतो. पण कसा? लिंबू शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकते आणि मेटाबोलिजम वाढवण्यास मदत करते.

लिंबू हा विटामिन सीचा प्रमुख स्रोत आहे. यामुळे शरीरातील पेशींची वाढ आणि विकास होण्याबरोबरच रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठीही मदत होते. विटामिन सी लोहाची कमतरता रोखते आणि रक्तदाब व हृदयरोगाचा धोका कमी करते.

लिंबाच्या चहात आले घातल्यास हे पेय सूज रोखण्यासाठी उपयुक्त असते. आले हा मळमळ व अंगदुखीवरचा उत्तम उपाय आहे. याशिवाय वारंवार भूक लागण्याच्या तक्रारीवरही गुणकारी असते. आल्यातील उच्च फायबरमुळे शरीरातील ऊर्जा वाढते आणि पचनास मदत होते.

लिंबाचा चहा जास्त आरोग्यकारक बनवण्यासाठी यात साखर घालू नका. याऐवजी मध वापरा. यातील नैसर्गिक गोडवा मेटाबोलिजम वाढवतो आणि चरबी कमी करतो.

आपल्या आवडीनुसार यात आपण चहा करताना कार्बनिक लेमनग्रास घालू शकता. यात अँटीऑक्सिडंट गुण असतात आणि हे त्वचा व केसांसाठी चांगले असते. यामुळे मासिक पाळीच्या वेदनांपासूनही आराम मिळतो.

🍒🍒🍒🍒🍒🍒🍒🍒
 

रविवार, ३० जून, २०२४

➖➖➖➖➖➖➖➖➖ *हृदयविकार कोणाला होतो ?*➖➖➖➖➖➖➖➖➖➖🍈🍈🍈🍈🍈🍈🍈

➖➖➖➖➖➖➖➖➖
      *हृदयविकार कोणाला होतो ?*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖🍈🍈🍈🍈🍈🍈🍈

हृदयविकार दोन किंवा तीन प्रकारचे असू शकतात. हृदयाचा ताल बिघडू शकतो. किंवा त्याच्या चार कप्प्यांमध्ये असलेल्या निरनिराळ्या प्रकारच्या झडपा नादुरुस्त होऊ शकतात. तसं झाल्यास शुद्ध आणि अशुद्ध रक्ताची एकमेकांमध्ये सरमिसळ होऊ शकते. परंतु हृदयाच्या स्रायूला रक्ताचा योग्य तितका पुरवठा न झाल्यामुळं त्याचं आकुंचन व प्रसरण नीट न होणं आणि त्यापायी त्याच्यावर ताण पडणं यालाच हृदयविकार असं सर्वसाधारणरीत्या म्हटलं जातं.
💥💥💥💥💥💥💥💥💥
आपण बराच काळ सतत वेगानं चालत असलो की पाय दुखु लागतात किंवा जड वजन उचलल्यामुळं हात दुखु लागतात. याचं कारण म्हणजे पायांच्या किंवा हाताच्या स्नायूंना काम करण्यासाठी ज्या वेगानं ऑक्सिजनचा वापर करावा लागतो त्या वेगानं त्यांना तो मिळत नाही. 

हृदय हाही एक स्रायूच असल्यामुळे त्यालाही जर योग्य प्रमाणात रक्ताचा पुरवठा झाला नाही तर तोही दुखू लागतो. जस तेल वाहून नेणार्‍या टँकरच्या इंजिनाला त्या टैंकरमधल्या तेलाचा काहीच उपयोग होत नाही तसंच हृदयाच्या आत कितीही रक्त असलं तरी त्याचा वापर त्या स्नायूंना करता येत नाही. त्यासाठी त्याच्यावर एखाद्या मुकुटाप्रमाणे विराजमान झालेल्या रक्तवाहिन्यांकडून त्याला रक्ताचा योग्य तितका पुरवठा व्हावा लागतो. 
🍇🍇🍇🍇🍇🍇🍇🍇
जर काही कारणानं या वाहिन्या चोंदल्या तर त्यांच्या मधून वाहणाऱ्या रक्ताच्या प्रवाहात अडथळे निर्माण होतात. त्यामुळे मग त्या वाहिन्या हृदयाच्या स्नायूला योग्य तितकं रक्त पुरवू शकत नाहीत. या वाहिन्या चोंदण्याची अनेक कारणं आहेत. ज्यांच्या शरीरात ही कारणं निर्माण होण्याची शक्यता जास्ती आहे अशांना मग हृदयविकार होण्याची शक्यताही वाढीस लागते.

ज्यांना उच्च रक्तदाबाचा विकार जडलेला आहे त्यांना हृदयविकारही जडण्याची शक्यता जास्ती असते. रक्तदाब वाढण्याचीही अनेक कारणं आहेत. अतिधुम्रपान, लठ्ठपणा तसंच शरीराची फारशी हालचाल न करणं यामुळं रक्तदाब वाढीस लागतो. काहींच्या आनुवंशिक गुणधर्मामुळे रक्तदाब वाढलेला असतो. तसंच अतितणावग्रस्त परिस्थितीही रक्तदाब वाढण्यास कारणीभूत होते.
🍓🍓🍓🍓🍓🍓🍓🍓
पण त्याहूनही अधिक घोकादायक आहे ते रक्तातलं कोलेस्टेरॉलचं प्रमाण. हे वाढलेलं असेल तर मग हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या वाहिन्या कोंडण्याची शक्यताही वाढीस लागते. मांसजन्य पदार्थांच्या अतिसेवनामुळे तसंच संपृक्त म्हणजेच सॅच्युरेटेड चरबी सेवनही याला कारणीभूत असतं. आपल्या जेवणात तळणासाठी सॅच्युरेटेड फैट्स ज्याच्यात कमी प्रमाणात आहेत अशा सूर्यफूल, करडई यासारख्या तेलांचा वापर केल्यास कोलेस्टेरॉलच्या प्रमाणाला काही प्रमाणात आळा घालता येतो.
🍒🍒🍒🍒🍒🍒🍒
मधुमेह असणाऱ्या मंडळींनाही हृदयविकार होण्याची शक्यता जास्ती असते. तसंच लठ्ठपणा, मेदवृद्धी हीही हृदयविकाराला पोषक परिस्थिती निर्माण करतात. बॉडी मास इंडेक्स म्हणजेच वजन आणि उंची यांचं गुणोत्तर हे लठ्ठपणा मोजण्याचं एक एकक आहे.

ज्यांचा बॉडी मास इंडेक्स पेक्षा जास्ती आहे अशांना हृदयविकार होण्याची शक्यताही जास्ती असते. अति धूम्रपान किंवा अति मद्यपान हेही हृदयविकाराला कारणीभूत असतात.
 म्हणून सर्वांनी आपल्या आहार विहाराकडे लक्ष ठेवून रोज सकाळी मॉर्निंग वॉल्क करावा 

 *यासाठी तीन महिने रियांश अमृत ज्यूस घ्या आणि निरोगी रहा*

*डाॅ. बाळ फोंडके यांच्या 'कोण ?' या पुस्तकातुन*    

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🍑🍇🍑🍇🍑🍇🍑🍇🍑🍇🍑🍇🍑🍇🍑

शाळेतील कामकाजाचे वार्षिक नियोजन🌹*🌹🌹🥇🥇🌹🌹🏆🏆🌹🌹

*🌹शाळेतील कामकाजाचे वार्षिक नियोजन🌹*
🌹🌹🥇🥇🌹🌹🏆🏆🌹🌹

     🏵️ *जुन महिना* 🏵️
*1) SMC मिटिंग आयोजन 14/6*
*2) पाठ्यपुस्तक व गणवेश वाटप नियोजन.*
*3) शिक्षक -पालक संघ सभा आयोजन*
*4) Student pramotion करणे.*
*5) अनुदानातुन शालेय साहित्य खरेदी करणे.*
*6) शाळा-लाँगबुक(वर्ग जबाबदारी) भरणे.*
*7) पटनोंदणी पंधरवडा अभियान राबविणे.*
*8) पायाभुत परीक्षा पुर्वतयारी.*
*9) वर्गस्वच्छता व वर्गसजावट उपक्रम*
*10) वर्ग व शालेय मंत्रीमंडळ निवड*
*11) शाळास्तरावर आदर्श उपक्रम निवडून वर्षभर अंमलबजावणी  करणे.*
*12) Staff Attach-deteach करणे.*
*13) आंतरराष्ट्रीय योग दिन-उपक्रम 21/6*
*14)इ.1 ली व नविन दाखलात-स्वागतसमारंभ*
*15) Student Request पाठविणे व coinfirm करणे.*
*16)शा.पो.आ. करारनामा करणे.*
*17)शा.पो.आ. मेन्यु /पूरक आहार/धान्यादी माल नियोजन व स्वच्छता ठेवणे.*
*18) वृक्षारोपन व वृक्षसवंर्धन उपक्रम राबविणे.*

       🏵 *जुलै महिना* 🏵️
*1) माता-पालक संघ सभा*
*2) सरल st. request-coinfirm पाठविणे.*
*3) मीना राजु मंच सभा*
*4) SMC मिटिंग*
*5) कथाकथन स्पर्धा आयोजन*
*6) शा.पो.आ.सभा*
*7) दिंडी उपक्रम आयोजन*
*8) पालक सभा आयोजन*
*9) आदर्श परिपाठ तयारी*
*10) गुरुपोर्णिमा उपक्रम*
*11) शिष्यवृत्ती वर्ग सुरुवात 5 वी/8वी*
*12) नवोद्य विद्यार्थी निवड व वर्ग सुरुवात 5वी*
*13)पायाभुत चाचणी 1 आयोजन*

        🏵️ *आँगस्ट महिना* 🏵️
*1) Student माहिती online भरणे.*
*2) शिक्षक -पालक संघ सभा*
*3) SMC मिटिंग आयोजन*
*4) स्वातंत्र दिन पुर्व तयारी*
*5) सरल school portal भरणे.*
*6) सरल Staff portal भरणे*
*7) गोपाळकाला (दहिहंडी)उपक्रम*
*8) अकारिक चाचणी १ आयोजन*
*9) प्रगत/अप्रगत उपक्रम(जादा तास) आयोजन*
*10) लो.टिळक पुण्यतिथी 1/8*
*11)रक्षाबंधन उपक्रम आयोजन*
*12) परिसर सहल आयोजन*

     🏵️ *सप्टेंबर महिना*🏵️
*1) माता-पालक संघ सभा*
*2) संच मान्यता portal भरणे.*
*3) गणपती उपक्रम*
*4) SMC मिटिंग*
*5) शाळेत गणेशोत्सव साजरा करणे.*
*6) वक्तृत्व स्पर्धा आयोजन.*
*7) शा.पो.आ.सभा*
*8) मीना राजु मंच सभा*
*9) पालक सभा आयोजन*
*10) अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती online भरणे.*
*11) पायाभुत online marks भरणे.*
*12) विद्यार्थी प्रगत-अप्रगत ठरविणे.*
*13) समाजकल्याण शिष्यवृत्ती online भरणे.*
*14)  अध्ययन निष्पत्ती उपक्रम*
*15) शाळेत शिक्षक दिन साजरा करणे.5/9*

    🏵️ *आँक्टोंबर व नोव्हेंबर महिना* 🏵️
*1) 15 oct वाचन प्रेरणा दिन साजरा करणे.*
*2) सत्र 1 परीक्षा घेणे.*
*3) नवरात्र दिवसात परिसर सहल आयोजन*
*4) स्वच्छता अभियान राबविणे.*
*5) SMC मिटिंग*
*6) दिवाळी अभ्यास नियोजन*
*7) गांधी जयंती साजरी करणे. 2/10*
*8) नवरात्र भोंडला आयोजन.*
*9) चित्रकला उपक्रम आयोजन.*
*10) नवोदय,शिष्यवृत्ती online form भरणे.*
*11) शैक्षणिक सहल पुर्वतयारी*
*12) क्रिडा स्पर्धा पुर्वतयारी.*
*13)  पायाभुत चाचणी 2 आयोजन**
*14) शिक्षक -पालक संघ सभा*
*15) पं.नेहरु जयंती 14/11 बाल दिन*
*16) सरदार वल्लभभाई पटेल जयंती 31/10*

      🏵️ *डिसेंबर  महिना*  🏵️
*1) माता पालक संघ सभा SMC मिटिंग*
*3) शा.पो.आ.सभा*
*4) पालक सभा आयोजन*
*5) कला व क्रिडा स्पर्धा*
*6) शैक्षणिक सहल आयोजन*
*7) Udise+ Online भरणे*
*8) शाळेचा वार्षिक आराखडा भरणे.*
*9)अध्ययन निष्पत्ती उपक्रम*

      🏵️ *जानेवारी महिना* 🏵️
*1) शिक्षक -पालक संघ सभा*
*2) प्रजासत्ताक दिन कार्यक्रम*
*3) सा.फुले जयंती उपक्रम*
*4) सांस्कृतिक कार्यक्रम*
*5) बाल आनंद मेळावा*
*6) स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती.12/1*
*7)नेताजी जयंती 23/1*
*8) शिष्यवृत्ती सराव परीक्षा 5 वी/8 वी सरावप्रश्नपत्रिका नियोजन*

   🏵️ *फेब्रुवारी महिना* 🏵️
*1) माता पालक संघ सभा*
*2) शा.पो.आ.सभा*
*3) पालक सभा आयोजन*
*4) शिष्यवृत्ती परीक्षा 5वी व 8 वी परीक्षा*
*5) आकारिक चाचणी 2 आयोजन*
*6) वार्षिक तपासणी पूर्वतयारी*
*7) शिवजयंती कार्यक्रम 19/2*
*8) Udise + online भरणे.*

      🏵️ *मार्च महिना* 🏵️
*1) शिक्षक -पालक संघ सभा*
*2)SMC मिटिंग*
*3) वार्षिक तपासणी*
*4) इयत्ता 7 वी/8 वी/5 वी/4 थी निरोप समारंभ*
*5) शाळेची वार्षिक तपासणी*
*6) समग्र शिक्षा अभियान खर्च वार्षिक विनियोग*
*7) SSA online link भरणे.*
*8) जागतिक महिला दिन 8/3*
*9) यशवंतराव चव्हाण जन्मदिन 12/3*
*10) जागतिक अपंग दिन 17/3*
*11) संत गाडगेबाबा जयंती 4/3*
*12) वर्गनिहाय सत्र 2 पर्यतचा वार्षिक  नियोजन प्रमाणेअभ्यासक्रम पुर्ण करणे.*

      🏵️ *एप्रिल महिना* 🏵️
*1) माता-पालक संघ सभा*
*2)शा.पो.आ. सभा*
*3) द्वितीय सत्र परीक्षा*
*4) पायाभुत चाचणी 3*
*5) माँडरेशन तयारी*
*6) महात्मा फुले जयंती 11/4*
*7) पेपर तपासणे.निकाल तयार करणे.*
*8) शा.पो.आ.वार्षिक एकुणात करणे.*
*9) आंबेडकर जयंती 14/4*
*10) नवोद्य परीक्षा 5 वी*
*11) RTE केंद्र बोर्ड परीक्षा 5 वी व 8 वी*

         🏵️ *मे महिना* 🏵️
*1)निकाल जाहीर करणे*
*2) 1 मे महाराष्ट्र दिन साजरा करणे.*
*3) पुढील वर्ष वर्गवाटप,*
*4) शिक्षक कामकाज वाटप -लाँगबुक भरणे.*
*5) 33 कोटी वृक्षलागवड माहीती online.*
*6) प्रशिक्षण तयारी-अभ्यासक्रम बदल*
*7) पुढील शैक्षणिक वर्ष नियोजन....*
🙏🙏🙏🏵️🏵️🥇🥇🏵️🏵️🙏🙏🙏

शनिवार, २९ जून, २०२४

आरोग्याचा सर्वात मोठा शत्रु...

*आरोग्याचा सर्वात मोठा शत्रु...*

रोजच्या दिनचर्येचा नैसर्गिक आणि आवश्यक भाग म्हणजे निद्रा ही आपल्याला ऊर्जा देते, जी निरामय आरोग्यासाठी अत्यंत गरजेची आहे. योग्य प्रमाणात घेतलेली गाढ झोप आपल्या तनमनाला पुरेपूर विश्रांती देते, ज्यामुळे आपणास ताजेतवाने, प्रसन्न व उर्जावान वाटते.

 *झोपण्याची योग्य पद्धत -* 
                 चांगली झोप घेण्यासाठी रात्रीचा आहार कमी व पचेल असाच घ्यावा . झोपताना डोके पूर्व किंवा दक्षिण दिशेला असावे पश्चिम किंवा उत्तरेकडे डोके करून झोपल्यास जिवनशक्तीचा ह्रास होतो. झोपताना डाव्या कुशीवर झोपावे.

 *निद्रानाशाचे परिणाम*
                 निद्रानाशामुळे शरीरात वेदना होणे, डोके जड पडणे, शरीर जड पडणे, अपचन होणे तसेच वातजन्य रोग जडतात. त्यामुळे योग्य निद्रा घेणे आवश्यक आहे. अपुरी झोप ( गरजेपेक्षा कमी, जास्त वा अयोग्य) ही दुःख, अशक्तपणा, सुस्ती, अल्पायुष्य अशा व्याधी निर्माण करण्यास कारणीभूत ठरते.
                     आता आपण निद्रे बद्दल सविस्तर जाणून घेऊ या. आयुर्वेदानुसार एक सामान्य, निरोगी व्यक्तीस सहा तासांची झोप पुरेशी आहे. म्हणूनच पित्त आणि कफ कारक प्रकृतीच्या लोकांनी सहा तासांच्या झोपेची सवय करून घेतल्यास ते निरोगी राहतील.

 *शांत आणि योग्य प्रमाणात झोप घेण्याचे फायदे:-*

🛌 1-चांगली झोप घेतली तर आपल्या शरीरातील हार्मोन्स ची पातळी व्यवस्थित राहण्यास मदत होते , त्यामुळे आपला उत्साह व स्फूर्ती वाढते.

🛌 2-व्यवस्थित झोप घेतली तर लठ्ठपणासारखा मोठा आजार आपल्या जवळ ही येणार नाही.

🛌 3-सर्वेक्षणामध्ये असे समोर आले आहे की जे लोक कमी झोप घेतात त्यांची आजारी पडण्याची शक्यता जास्त असते.

🛌 4- चेहऱ्यावरील डाग कमी होतात : लवकर झोपण्याचे परिणाम चेहऱ्यावर दिसू लागतात. चेहऱ्यावरील पिंपल्स कमी होऊ लागतात. आणि काळे डाग हळूहळू कमी व्हायला लागतात.

🛌 5-ब्लड ग्लुकोज कमी होत नाहीः पुरेशा झोपेचा परिणामामुळे ब्लड ग्लुकोज कमी होत नाही.

🛌 6-भूकेत सुधारणा होते : पुरेशी झोप झाल्यास चांगली भूक लागते. हेल्दी पदार्थ खावेसे वाटतात.

🛌 7- मायग्रेनचा त्रास कमी होतो : पुरेशी झोप घेतल्याने कमी खाणे , जास्त किंवा कमी झोप, खूप रडणे किंवा खूप हसणे या कशाही मुळे मायग्रेनचा त्रास जाणवत नाही.

🛌 8- कार्यक्षमतेत वाढ होते: 8 तास पुरेशी आणि शांत झोप घेतल्यामुळे अधिक तत्परतेने काम करू शकता. व आपली कार्यक्षमता वाढते.

🛌 9-पुरेशी झोप घेतल्यामुळे अभ्यास केलेला लक्षात राहू लागतो.

            अशा प्रकारे योग्य, व्यवस्थित व वेळेवर झोप घेतल्यास आपले आरोग्य निरोगी राहते. म्हणूनच तर जेव , व्यायाम, योगासने या बरोबरच झोपेलाही आपल्या आयुष्यात महत्वाचे स्थान आहे.

गुरुवार, २७ जून, २०२४

ही लक्षणे सांगतात शरीरात वाढलं आहे Uric Acid, जाणून घ्या हे दूर करण्याचे उपाय....

*ही लक्षणे सांगतात शरीरात वाढलं आहे Uric Acid, जाणून घ्या हे दूर करण्याचे उपाय.....*

यूरिक अ‍ॅसिड एक अपशिष्ट पदार्थ आहे जो काही खाद्य पदार्थांमध्ये आढळणाऱ्या प्यूरीन तत्वाच्या तुटण्याने तयार होतो. यूरिक अ‍ॅसिड सामान्यपणे रक्तात मिक्स होतं आणि लघवीच्या माध्यमातून बाहेर निघतं. पण जेव्हा असं होत नाही तेव्हा ते जॉइंट्स आणि किडन्यांमध्ये जमा होतं. असं झाल्याने संधीवातासारखी समस्या गाउट आणि किडनी स्टोन होण्याचाही धोका असतो.

यूरिक अ‍ॅसिडवर उपचार करण्यासाठी याच्या लक्षणांना वेळीच ओळखणं गरजेचं आहे. यूरिक अ‍ॅसिड वाढल्याची काही लक्षणं तुम्हाला लघवीमध्ये दिसू लागतात. चला जाणून घेऊ यूरिक अ‍ॅसिड वाढल्यावर लघवीत काय लक्षणं दिसतात आणि ते कमी करण्यासाठी काय करावं.

*लघवीमध्ये फेस...*
नॅशनल किडनी फाऊंडेशननुसार, लघवीमधून फेस येणं या गोष्टीचा संकेत आहे की, यूरिक अ‍ॅसिडने छोट्या स्टोनचं रूप घेतलं आहे. जर यासोबत तुम्हाला डिहायड्रेशनची समस्या असेल तर तुम्ही वेळीच सावध व्हायला पाहिजे.

*किडनी स्टोन होणं...*
यूरिक अ‍ॅसिड जेव्हा लघवीसोबत निघत नाही तेव्हा ते क्रिस्टलचं रूप घेतं आणि किडनीमध्ये स्टोन तयार होतात. ज्यामुळे गंभीर वेदना, लघवीतून रक्त आणि पुन्हा लघवीच्या मार्गात इन्फेक्शन होऊ शकतं.

*गर्द रंगाची लघवी...*
गर्द किंवा लाल रंगाची लघवी येणं संकेत आहे की, तुमच्या किडनीमध्ये सगळं काही ठीक सुरू नाही. यातून हे दिसतं की, तुमच्या किडनीमध्ये यूरिक अ‍ॅसिडशी संबंधित स्टोन बनत आहे किंवा लघवीसंबंधी समस्याचं एक संभावित लक्षण असू शकतं.

*पुन्हा पुन्हा लघवी...*
काही लोकांना लघवीदरम्यान वेदना किंवा अस्वस्थता जाणवते. खासकरून किडनीमध्ये स्टोन किंवा लघवीच्या मार्गात अडथळा असणं. पुन्हा पुन्हा लघवीची ईच्छा हेही एक यूरिक अ‍ॅसिडसंबंधी लक्षण असू शकतं.

*ही लक्षण दिसल्यावर काय करावे...*
जर तुम्हाला यूरिक अ‍ॅसिडसंबंधी वरील लक्षण दिसत असतील तर तुम्हाला वेळीच डॉक्टरांकडे जायला हवं. ते यूरिक अ‍ॅसिडचं प्रमाण बघण्यासाठी टेस्ट करण्याचा सल्ला देऊ शकतात.

*यूरिक अ‍ॅसिड कमी करण्यासाठी काय करावे...*

*पाणी भरपूर प्यायल्याने...* यूरिक अ‍ॅसिड पातळ करण्यास मदत मिळते आणि लघवीच्या माध्यमातून ते बाहेर पडतं. दिवसातून कमीत कमी 10-12 ग्लास पाणी प्यावे.

*जास्त प्यूरीन असणारे पदार्थ सेवन करणं बंद करा...*
जसे की, ऑर्गन मीट, रेड मीट, समुद्री मासे आणि काही भाज्या जसे की, शतावरी व पालक.

*कमी फॅट असलेले डेअरी उत्पादनं जसे की, दूध आणि दही यूरिक अ‍ॅसिडचं प्रमाण करण्यासाठी मदत करतात.*

*मद्यसेवन खासकरून बीअर आणि स्प्रिट, यूरिक अ‍ॅसिड उत्पादन वाढवू शकतात. यांचं सेवन बंद करा.*

*हाय फ्रुक्टोज कॉर्न सिरप, जे सामान्यपणे शुगर ड्रिंक्समध्ये आढळतं. यामुळे यूरिक अ‍ॅसिड वाढू शकतं.*

*लठ्ठपणा हाय यूरिक अ‍ॅसिडशी संबंधित आहे. अशात कमी वजन केलं तर यूरिक अ‍ॅसिड कमी होण्यास मदत मिळेल.*

*चेरी किंवा चेरीचा ज्यूस यूरिक अ‍ॅसिड कमी करण्यास मदत करतो.* 

*कडधान्य, फळं आणि भाज्यांसारखे ठोस कार्बोहायड्रेट निवडा. ज्यांनी यूरिक अ‍ॅसिड कमी करण्यास मदत मिळते.*


बुधवार, २६ जून, २०२४

अंगावर चामखीळ का येतात? त्याची कारणे चामखीळचे प्रकार व उपचार*

*अंगावर चामखीळ का येतात? त्याची कारणे चामखीळचे प्रकार व  उपचार*
👇👇👇👇👇👇👇👇
*चामखीळ म्हणजे काय ..?*

चामखीळचा त्रास अनेकांना असतो. त्वचेवर चामखीळ होण्यासाठी ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस (human papillomavirus) कारणीभूत असतो. ह्यूमन पॅपिलोमा व्हायरसला HPV व्हायरस असेही म्हणतात. चामखीळला *warts* असे म्हणतात. चामखीळ हे शरीरासाठी फारसे धोकादायक नसतात. मात्र अंगावर चामखीळ असल्याने त्वचेच्या सौंदर्यावर थोडा परिणाम होऊ शकतो.

*चामखीळ येण्याची कारणे*

ह्यूमन पॅपिलोमा व्हायरसमुळे (HPV व्हायरसमुळे) अंगावर चामखीळ येतात. शरीरावर असलेले चामखीळ नखाने कोचत राहणे यासारख्या सवयीमुळे चामखीळीतील स्त्राव शरीराच्या इतर ठिकाणीही लागण्याची शक्यता असते. त्यामुळे व्हायरसमुळे चामखीळ शरीराच्या इतर भागातही पसरत असतात. अशाप्रकारे शरीरावर चामखीळ येतात. यासाठी चामखीळ असल्यास त्यावर नखाने कोचत राहणे टाळावे.

तसेच चामखीळची लागण ही एकाकडून दुसऱ्याला होऊ शकते. यासाठी एकमेकांचे रेजर, अंतर्वस्त्रे, टॉवेल, कपडे, साबण, कंगवा इत्यादी वस्तू वापरणे टाळावे.

*चामखीळचे प्रकार*

चामखीळचे एकूण पाच प्रमुख प्रकार (types) असतात. प्रत्येक प्रकारचे चामखीळ शरीराच्या वेगवेगळ्या भागावर येत असतात तसेच त्यांचे स्वरूपही वेगवेगळे असते.

1) Common warts
2) Plantar warts
3) Flat warts
4) Filiform warts
5) Periungual warts

ह्या प्रकारचे चामखीळ शरीरावर कोठेही होऊ शकतात त्यातही बोटांवर अधिक प्रमाणात येतात.

*2) Plantar warts*

ह्या प्रकारचे चामखीळ पायाच्या तळव्यात येतात. इतर चामखीळ त्वचेच्या वर येत असतात तर या प्रकारातील चामखीळ पायाच्या तळव्याच्या त्वचेच्या आत येत असतात.

*3) Flat warts -*

ह्या प्रकारचे चामखीळ चेहरा, हात आणि पायावर येतात.ह्या प्रकारचे चामखीळ नाक व तोंडाभोवती तसेच मानेवर आणि हनुवटीच्या खाली येतात.

*5) Periungual warts -*

ह्या प्रकारचे चामखीळ नखांच्या आत येतात. यामुळे नखांच्या वाढीवर परिणाम होऊन त्या ठिकाणी वेदना होत असतात. चामखीळ ज्या HPV व्हायरसमुळे येतात त्या HPV व्हायरसचे 100 हून अधिक प्रकार आहेत. हातापायावर येणारे चामखीळ हे फारसे धोकादायक नसतात. मात्र काही वेळा गुप्तांगावरही चामखीळ येऊ शकतात. त्याला genital warts असे म्हणतात. स्त्रियांमध्ये गुप्तांगावर येणाऱ्या चामखीळमुळे गर्भाशय मुखाचा कर्करोग (cervical cancer) होण्याचा धोका असतो. त्यामुळे अशावेळी दुर्लक्ष न करता स्त्रियांनी गुप्तांगावर चामखीळ असल्यास तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

कुठल्याही प्रकारचे बाह्य त्वचेवरील चामखीळीसाठी ऑपरेशन, जालीम उपाय यांची गरज पडत नाही.

*केवळ बारीक दोऱ्याने घट्ट बांधल्यास तेथील रक्ताभिसरण थांबून चार-पाच दिवसांत ते कडक होऊन गळून पडते.*

 

Featured Post

व्यायाम व योगा अवश्य करावा*

*व्यायाम व योगा अवश्य करावा*  *व्यायाम व योगा करण्याचे दहा फायदे:-*  1) व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते: व्यायाम करणारी...