*सर्वांनीच दुधाचे सेवन का करावे ?*
*दूध आरोग्यासाठी उत्तम का 🤔आहे?*
दुधामध्ये मोठ्या प्रमाणात पोषक 🛡️ तत्वे असतात. तसेच आरोग्यासाठी लाभदायक असणारे अनेक घटकांचा दुधामध्ये समावेश असतो. *दुधामध्ये कॅल्शियम , प्रथिने, पोटॅशियम आणि फॉस्फरस सारखे आवश्यक पोषक घटक असतात.* त्यामुळे दूध हे आरोग्यासाठी उत्तम मानले जाते.
▪️ *हाडे 🦴आणि स्नायू मजबूत होतात.*
दुधाचे सेवन केल्याने हाडे आणि स्नायू मजबूत होण्यासाठी मदत होते. कारण दुधामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचा 🛡️ समावेश असतो. हे दोन्ही घटक हाडांपासून महत्त्वाचे मानले जातात. दूध हाडे मजबूत करून ऑस्टियोपोरोसिस (हाडांचा प्रकार) आणि वृद्धापकाळातील 👴🏻 फ्रॅक्चर टाळण्यास मदत करू शकते. त्यामुळे दुधाचे नियमित सेवन करावे. याशिवाय दुधामध्ये प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट्स भरपूर असतात जे स्नायूंसाठी 🦵🏻 फायदेशीर मानले जातात .
▪️ *दातांच्या आरोग्यासाठी फायदेशीर*
दूध हे दातांकरता 🦷देखील लाभदायक आहे. दुधामध्ये असलेले कॅल्शियम आणि फॉस्फरस सारखे घटक दातांचे संरक्षण करतात. तसेच दुधाचे सेवन केल्याने दात निरोगी 🛡️ राहण्यास मदत होते. त्यामुळे दात मजबूत ठेवायचे असतील तर दररोज दुधाचे सेवन करा.
▪️ *दुधाच्या सेवनाने वजन कमी होते.*
वाढते वजन कमी 📉 करण्यासाठी दूध उपयुक्त ठरू शकते. एका संशोधनानुसार, दुग्धजन्य पदार्थाचे सेवन करणाऱ्या ३८% मुलांचे वजन कमी करणाऱ्यांच्या तुलनेत नियंत्रित ⚖️ होते. दूध आणि दुग्धजन्य पदार्थ हे प्रथिनांचे चांगले स्त्रोत आहेत आणि प्रथिने वजन कमी करण्यास आणि नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. दुधाचे 🥛 सेवन केल्याने जेवण अधिक प्रमाणात जात नाही. त्यामुळे वजन नियंत्रणात राहते.
▪️ *हृदयाचे आरोग्य चांगले राहते*
दररोज दुधाचे सेवन केल्याने हृदय 🫀 उत्तम राहण्यास मदत होते. दुधाचे नियमित सेवन केल्याने हृदयविकार टाळण्यास मदत होऊ शकते. एका अभ्यासानुसार, 📚 जे लोक दररोज २०० मिली दुधाचे सेवन करतात, *त्यांना स्ट्रोकचा धोका ७ टक्के कमी असतो.*
▪️ *मधुमेहासाठी फायदेशीर*
दररोज दूध प्यायल्याने मधुमेहाचा धोकाही 🦠 टाळता येतो. त्यात असलेले कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पेप्टाइड्स शरीरातील 🧍🏻♂️ ग्लुकोज आणि इन्सुलिनचे प्रमाण नियंत्रणात ठेवतात. *दुधात असलेल्या फॅटी अॕसिडमुळे टाईप-२ मधुमेह होण्याचा धोका कमी होतो.* याच अभ्यासात असेही म्हटले आहे की यावर अधिक संशोधन 🔬 आवश्यक आहे, ज्यामुळे टाइप २ मधुमेह टाळण्यासाठी मदत होईल.
▪️ *पोटासंबंधित आजार बरे होतात*
दुधामुळे अपचन आणि अॕसिडिटी तसेच पोटाशी संबंधित अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. दुधात 🥛 अँटासिडचा समावेश असतो. ज्यामुळे अपचन आणि आम्लपित्त यांसारख्या पोटाच्या समस्या दूर होण्यास मदत होते. यासाठी थंड ❄️ दूध वापरावे. थंड दूध पोटातील आम्ल कमी करते.
▪️ *झोपेसाठी उत्तम*
अनेक अभ्यासांमध्ये 📚 हे सिद्ध झाले आहे की रात्री झोपण्यापूर्वी दूध प्यायल्याने झोप चांगली लागते. दुधामध्ये ट्रिप्टोफॅन आणि मेलाटोनिन ही अमीनो अॕसिड असतात. ज्यामुळे झोप येण्यास मदत होते. रात्री झोप 🛌🏻 न लागणे किंवा अस्वस्थ वाटू लागणे अशा समस्या असल्यास रात्री झोपण्यापूर्वी कोमट दूध 🥛 रोज प्यावे.
परंतु दूध साय काढून दिले पाहिजे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा