सोमवार, १७ जून, २०२४

वीज भौतिकशास्त्राचे नियम पाळते..*

*वीज भौतिकशास्त्राचे नियम पाळते..*

पावसाळ्याच्या आधी आणि पावसाळा संपताना विजा चमकतात. विजा पडल्याने जीवित, वित्तहानी होण्याच्या; तसेच विद्युत उपकरणे जळण्याच्या घटना दरवर्षी घडतात. वीज हा निसर्गचक्राचा भाग आहे. ‘कमीत कमी रोध असेल अशा वस्तू, ठिकाण किंवा व्यक्तीवर कोसळणे’ हा भौतिकशास्त्राचा नियम पाळण्याचे काम वीज करते. जीवघेणी वीज कधी, कुठे, कशी कोणावर कोसळते हे जाणून घेणे, त्यापासून स्वतःचे संरक्षण करणे आणि इतरांवर वीज कोसळलीच तर त्या व्यक्तीला मदत करून तिचे प्राण वाचविणे एवढेच या निसर्गचक्रात आपल्या हाती आहे. याबाबत घरच्या घरी *कशी खबरदारी घ्यावी याबाबतच्या काही सूचना..*

*ओल्या भिंती आणि धातूंचे फर्निचर* 

•  घरातील ओल आलेल्या भिंती आणि त्यांच्या संपर्कात ठेवलेले टेबल, खुर्च्या, सोफा, दिवाण, कपाटे आदी धातूंच्या वस्तू विद्युत संवाहक आहेत. घराबाहेर वीज पडली, तरी क्षणाचाही विलंब न करता या वस्तूंच्या माध्यमाने ती घरात व घरातील वस्तूंच्या संपर्काने आपल्यापर्यंत पोहचू शकते. 

•  घरात लाकडी फर्निचरचा उपयोग करणे आणि भिंतींना ओल येऊ नये म्हणून पावसाळ्याआधीच त्या दुरुस्त करून घेणे स्व संरक्षणासाठी नक्कीच लाभदायी ठरेल.

*पाण्याचे नळ* 

•  प्रत्येक घरात वापराच्या अथवा पिण्याच्या पाण्याची सोय ही धातूच्या पाइप आणि नळातूनच होत असते. दूर कोठेही या पाइपवर वीज कोसळली तरी विद्युत संवाहक असल्याकारणाने प्रचंड विद्युतधारा या नळाच्या पाइपवाटे व्यक्तीपर्यंत पोहचून जीवघेणी ठरू शकते. म्हणून गच्चीवर पाणी साठविण्याच्या टाक्यांचे गज व पाइप बाहेर निघालेले नसावेत. 

•  तसेच विजा चमकत असताना वाहत्या पाण्याचा उपयोग न करणे सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. 

•  विजा चमकताना स्वयंपाक घरात जेवण तयार करणे, भांडी स्वच्छ करणे आदी कामे काही काळासाठी थांबवावे. तसेच गॅस गिझर, शेगडी आदीचे गॅस सिलेंडरचे नॉब बंद करून ठेवावेत. 

•  विजा चमकत असताना स्विमिंग टँ‌क किंवा बाथरूममध्ये आंघोळीसाठी जाऊ नये.

*विद्युत उपकरणे* 

•  विजांची वादळे सुरू असताना सातत्याने विजा पडत असतात. विद्युत खांब उंच असल्याने त्यावर विजा पडण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. याशिवाय जमिनीवर पडणाऱ्या विजा जमिनीखाली असणाऱ्या विद्युतवाहक केबल्स ( अंडरग्राऊंड ) मधूनही घरातील विद्युत उपकरणापर्यंत पोहचून होणाऱ्या दुर्घटनांची संख्या मोठी आहे. म्हणून विजा कडाडत असताना विद्युत उपकरणे बंद ठेवणे, तसेच त्यांच्या संपर्कापासून दूर राहणे जास्त उपयोगी आहे. सर्वच विद्युत उपकरणे सॉकेटमधून विलग ( अनप्लग ) करून ठेवावीत. याशिवाय टीव्ही अँटिनाचे कनेक्शन टीव्हीपासून वेगळे करावे. ऑप्टिकल फायबर केबल विद्युत वाहक तारांपेक्षा सुरक्षित असतात. तरीही विद्युत प्रवाह देण्यासाठी येणाऱ्या विद्युततारा उपकरणे असुरक्षित बनवितात. 

•  टेलीफोनच्या खांबांवर व तारांवरही विजा कोसळतात. म्हणून तारा असलेल्या टेलीफोनचा वापर करणे हे सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत धोक्याचे आहे. 

•  विजा चमकत असताना टीव्ही प्रक्षेपण नेहमीच खराब दिसते. अशावेळी टीव्ही अँटेना फिरविण्यास गेल्याने व वीज कोसळल्यामुळे अनेकांनी आपले जीव गमावले आहे. 

•  गच्चीवर लाइटनिंग अरेस्टर सर्वाधिक उंचीवर लावणे आणि त्याचे अर्थिंग स्वतंत्र व उपकरणांपासून दूर करायला हवे अन्यथा लायटनिंग अरेस्टरने झेललेली वीज उलट्या मार्गाने येऊन उपकरणे जाळून टाकते.

*धातूच्या तारा* 

•  कधी गच्चीवर, तर कधी घराच्या बाहेर व्हरांड्यात झाडांना तारा बांधलेल्या असतात. विजा चमकू लागल्या की, महिला वर्ग पावसाने कपडे भिजतील व पुन्हा धुवावे लागतील म्हणून तारांवरील ( वळणीवरील ) कपडे काढण्यासाठी धाव घेतात. या तारांवर अथवा झाडांवर विजा कोसळून शेकडो लोक दगावले आहेत. कपडे धुण्याचा त्रास टाळण्यासाठी जीवावर उदार होणे म्हणजे शूरपणा नक्कीच नव्हे. तसेच कपडे वाळविण्यासाठी धातूंच्या तारांचा वापर करू नये, तर नायलॉनची दोरी वापरावी.

*सुरक्षितता कशी बाळगावी?*

*•  वाहते पाणी*

हे विद्युत संवाहक आहे. वाहत्या पाण्यात किंवा ओल्या जागी थांबू नये. दूर पडलेल्या विजेच्या विद्युतधारा वाहत येवून या पाण्यात उभी राहणारी व्यक्ती दुर्घटनाग्रस्त होऊ शकते. पाण्यासाठी हातपंपाचा किंवा शेतीत-मळ्यात वीजपंपाचा वापर करू नये. पोहण्याचे तलाव, विह‌िरीतदेखील उतरू नये. मच्छिमारांनीही ताबडतोब बाहेर निघावे.

*•  उंच झाडे* 

पावसामुळे ओली झालेली झाडे ही अत्यंत असुरक्षित आसरा आहेत. म्हणून विजा चमकताना झाडांखाली थांबणे अत्यंत धोकादायक असते. त्यामुळे विजा चमकत असताना झाडांखाली मुळीच थांबू नये. झाडावर वीज कोसळली, तरी झाडाच्या माध्यमाने विजेच्या शलाका निघून झाडाखाली थांबणाऱ्या व्यक्तीच्या शरीराच्या संपर्कात येतात व विजेचा शॉक लागून व्यक्ती दगावते.

*•  खेळांची मैदाने* 

खेळांची मैदाने, शेत, मळे, टेकड्या किनारपट्टी इत्यादी उघड्या ठिकाणी कधीही थांबू नये. विजांचा गडगडाट कानी पडण्याआधीच येथून दूर जावे. 

पक्की इमारत, घर, ऑफिस अशा कोरड्या ठिकाणी आसरा घ्यावा. 

धातूची दांडी असलेल्या छत्रीचा वापर करू नये. 

विजा कमीत कमी रोधकाचा व लहानात लहान मार्ग आपल्या प्रवासात निवडतात. 

मोकळ्या मैदानामध्ये आपली उंची सर्वाधिक असल्याने वीज आपल्यावर कोसळण्याची शक्यता जास्त असते. काहीच पर्याय न आढळल्यास जवळपासच्या उंच गोष्टींपेक्षा आपली उंची कमी करावी. अंगावर वीज कोसळण्याची शक्यता कमी करण्यासाठी खाली बसणे अथवा जमिनीवर सरळ लेटणे हा उपायही अनेकदा उपयोगी ठरू शकतो.

*•  कानांची सुरक्षितता*

विजा पडतात, तेव्हा त्या हवेला अक्षरशः जाळीत मार्गक्रमण करतात. परिणामी हवेची निर्वात पोकळी निर्माण होते. ही निर्वात पोकळी भरून काढण्यासाठी आजूबाजूची हवा प्रचंड वेगाने एकाच पोकळीत शिरू पाहते आणि हवेचे थर एकमेंकावर आदळल्याने प्रचंड गडगडाट ऐकू येतो. यातून निर्माण होणाऱ्या ‘ॲकॉस्टिक शॉक वेव्हज’ या खिडक्यांची काचेची तावदानेही तोडून टाकतात. या आवाजामध्ये कानाचा नाजूक पडदा फाडून टाकण्याएवढी ऊर्जा असते. म्हणून कानात बोटे घालून कानाच्या पडद्याचे संरक्षण करणे हा उत्तम उपाय होय.

*असुरक्षित जागा*

विजांचा कडकडाट-गडगडाट सुरू असताना असुरक्षित गोष्टींच्या यादीत खालील बाबी येतात..

•  गोल्फ, फूटबॉल, क्रिकेटची मैदाने.

•  उंच जागा, पहाड, टेकड्या, पाण्याच्या टाक्या, ओले शेत-मळे इत्यादी.

•  उंच झाडे

•  धातूचे शेड, धातूचे बसस्टॉप

•  धातूच्या तारा, धातूच्या तारांचे कुंपण इत्यादी.

•  खुले पिकनिक स्पॉट

•  समुद्र किनारा, किनारपट्टी 

•  ओल्या भिंती, वाहते पाणी.

•  मोबाइल टॉवर.

•  पाण्याचे पाइप व नळ.

शरीरातील आयर्न ची कमतरता ■*

*■  शरीरातील आयर्न ची कमतरता  ■*

➖➖➖➖➖➖➖➖
*जिवन संजीवनी* ★ 🌼
_आरोग्यपूर्ण आयुष्याची माहिती _ 

➖➖➖➖➖➖➖➖

आयर्न हे आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे असते. ते शरीराला मजबूत ठेवण्याचे काम करते. आयर्न हे शरीरातील हिमोग्लोबिन चा महत्वाचा घटक आहे. सामान्यतः पुरुषांमध्ये आयर्न १३.५ ते १७.५ ग्रॅम असले पाहिजे. तसेच स्त्रियांमध्ये याचे प्रमाण १२.० ते १५.५ ग्रॅम असले पाहिजे. आयर्नलाच 'ऍनिमिया' असे देखील म्हटले जाते. जे शाकाहारी आणि विगन आहेत त्यांना आयर्न ची कमतरता जाणवतेच. कॅल्शियम सुद्धा आयर्न वर परिणाम करू शकतो. स्त्रियांना तर पिरियडमुळे देखील आयर्न ची कमतरता वाढते. गरोदरपणात देखील स्त्रियांना आयर्नची खूप गरज असते. तसेच डिलिव्हरी नंतर तर त्यांना आयर्नची कमतरता वाढवते.

*आयर्न कमी होण्याची लक्षणे*
*१)* थकवा जाणवणे.
*२)* केसगळती होणे.
*३)* त्वचेचा रंग फिकट होणे.
*४)* रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे.
*५)* जीभ सुजणे आणि लाल होणे.
*६)* HB कमी होणे आणि त्यामुळे आयर्न च्या पेशी ह्या विकृत होऊ लागतात.
*७)* संसर्ग लगेच होणे.

*आयर्न कमतरतेवरील उपाय*
यासाठी आयर्नची तपासणी करावी लागते. त्यामध्ये हिमोग्लोबिन, रक्त तपासणी आणि हेमेटोक्राइट तपासणी करण्याची गरज असते. आयर्न असलेले सी फूड आहारात घेणे. तसेच आयर्न असलेले टॅबलेट आहेत त्याचा उपयोग करणे गरजेचे असते. तसेच डॉक्टरांच्या सल्याने औषध घ्यावीत. आयर्न कमतरता असणाऱ्यांनी दूध आणि दूधजन्य पदार्थ टाळले पाहिजेत. आयर्न कमतरतेच्या औषधांमुळे बद्धकोष्ठता होऊ शकते. आहारात हिरव्या पालेभाज्या रोज खाव्यात. तसेच पेरू, चिक्कू, सफरचंद, बीट,आंबा ह्या फळात आयर्न भरपूर प्रमाणात असते. मसूर, मूग, मोड आलेले कडधान्य, नारळ, शेंगदाणे, तीळ, गुळ हे आवश्य आहारात घ्यावेत. तसेच मासे, अंडी, मटण हे हि आहारात घ्यावेत. या सगळ्यामुळे हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते.



★ *तीन महिने अमृत ज्यूस घ्या आणि निरोगी रहा* ★

गुरुवार, १३ जून, २०२४

*❀ १४ जून ❀**संशोधक कार्ल लैंडस्टैनर जन्मदिन

*❀ १४ जून ❀*
*संशोधक कार्ल लैंडस्टैनर जन्मदिन*

जन्म - १४ जून १८६८ (ऑस्ट्रिया)
स्मृती - २६ जून १९४३ (न्यूयॉर्क,अमेरिका)

संशोधक कार्ल लैंडस्टैनर का जन्मदिन जागतिक रक्तदाता दिन के रूप मे मनाया जाता है। कार्ल लैंडस्टैनर आस्ट्रिया के एक जीववैज्ञानिक तथा चिकित्सक थे। सन १९०० मे उन्होने रक्त के मुख्य समूहो की पहचान की। जागतिक रक्तदान दाता दिन विशेष तौर पर एबीओ ब्लड ग्रुप प्रणाली के खोजकर्ता महान जीव-विज्ञानी और चिकित्सक कार्ल लैंडस्टैनर के जन्मदिन को समर्पित है, क्योंकि इस दिन 14 जून 1868 को कार्ल लैंडस्टैनर का जन्म आस्ट्रिया के शहर वियाना मे पिता लियोपोलड के घर माता फैनी से हुआ था। पिता लिओपोलड वियाना शहर के मशहूर पत्रकार थे। कार्ल लैंडस्टीनर ने प्रमाणित किया कि सभी मनुष्यो का खून एक तरह का ही होता है और अपनी दुर्लभ खोज के द्वारा यह पता लगाया था कि, किसी एक व्यक्ति का खून दूसरे को नही चढ़ाया जा सकता। हरेक व्यक्ति के खून का ग्रुप एक खास किस्म का होता है। दो व्यक्तियो के विभिन्न ब्लड ग्रुप संपर्क मे आने के साथ रक्त अणुओ पर विपरीत प्रभाव पड़ता है। सन 1900-1901 दौरान कार्ल लैंडस्टीनर ने इंसानी खून के एबीओ रक्त समूह और रक्त मे मिलने वाले एक अहम तत्व आरएच फैक्टर की खोज की। इसीलिए आज एबी ब्लड ग्रुप वाला व्यक्ति दूसरे ब्लड ग्रुप प्राप्त कर सकता है ओर ओ ग्रुप वाला दूसरे ब्लड ग्रुप वालो को रक्तदान कर सकता है। इनकी तरफ से की गई इस महान खोज के कारण ही आज दुनिया भर मे मरीजो की जिंदगी को खतरे मे डाले बिना ब्लॅड ट्रांसफ्यूजन का काम चल रहा है। सन 1930 मे इस महान विज्ञानी को शरीर क्रिया विज्ञान और मेडिसन के क्षेत्र मे की गई महान खोजों के लिए प्रसिद्ध नोबेल पुरस्कार भी मिला। इनको ट्रांसफ्यूजन मेडिसन के पितामह भी कहा जाता है।

*संकलन : गजानन गोपेवाड*
*संदर्भ : इंटरनेट*

आरोग्य विषयक टिप्स*

✡️ *आरोग्य विषयक टिप्स* ✡️
*•|| जीवन संजीवनी||•*

1)तहान लागेल तेव्हाच पाणी प्या.

2)शाबुदाणा,शेंगदाणे,वरी,दही हे सगळे पित्त वाढवणारे पदार्थ खाऊन उपवास करू नयेत... खरा उपवास म्हणजे लंघन..पोटाला विश्रांती देणे..

3)जेवणाच्या वेळा नियमित असाव्यात..दुपारी १२ पर्यंत आणि रात्री ८ पर्यंत जेवण करावे.

4)दोन्ही जेवणानंतर शत पावली( Actual १०० steps च अपेक्षित आहेत .व्यायाम नव्हे )घालावी. म्हणजे अन्न पुढे सरकण्यास आणि पचनाला मदत होते.

5)लोणचे,पापड,अति तिखट,तेलकट, खारट अन्न पदार्थ खाऊ नयेत.

6)रात्री च्या वेळी दही खाऊ नये.

7)रोज ४५ मिनिटे चालण्याचा व्यायाम करावा.

8)मधल्या भुकेच्या वेळेत त्या त्या ऋतूमध्ये उपलब्ध असणारे फळ,राजगिरा लाडू,साळीच्या लाह्या,खजूर हे खावे...फरसाण,बिस्कीट,शेव हे सर्व पित्त वाढवणारे पदार्थ आहेत.

9)आपण जिथे राहतो तिथे ज्या स्थानिक भाज्या पिकतात,फळे मिळतात ते खावे..फळे नुसतीच खावीत, दुधात घालून,दह्यात मिक्स करून खाऊ नयेत...फळांची मूळ चव आणि गुणधर्म बदलतात अशाने..

10)जेवणात २ चमचे तुपाचा समावेश जरूर  असावा.तुपाने कोलेस्टेरॉल वाढत नाही..तूप हे दुधावर अनेक संस्कार केल्यानंतर तयार होते त्यामुळे पचनासाठी चांगले असते..

11)संडास,लघवी ,उलटी ,शिंक या वेगांचे धारण कधीही करू नये..लागल्यास लगेच जावे.

12)पाळीच्या दिवसात स्त्रियांनी लोणचे खाल्ले तर रक्त स्त्राव वाढण्याची शक्यता असते कारण लोणच्यात तेल,मीठ,तिखट यांचा जास्त वापर असतो आणि त्यामुळे स्त्री शरीरातील पित्त वाढते पर्यायाने रक्त सुध्दा वाढते..म्हणून लोणचे खाऊ नये.

13)दूध आणि फळं एकत्र करून खाऊ नये..विरुद्ध आहार आहे..त्याचे पचन होत नाही.आणि अनेक आजारांची निर्मिती त्यातून होते.

14)कधीही पोटाला तडस लागेपर्यंत खाऊ नये..वायू च्या संचरणासाठी पोटात जागा ठेवावी.

15) शिळे अन्न, processed food, preservatives असलेले पदार्थ शक्यतो टाळावेत..जितका आहार ताजा खाल्ला जाईल  तितके शरीराचे पोषण चांगले होईल...आपल्या शरीराचा संपूर्ण डोलारा हा आपण खात असलेल्या आहारावर च अवलंबून असतो...

16)व्यक्ती तितक्या प्रकृती त्यामुळे सगळ्यांना सरसकट एक च औषध लागू पडत नाही..वय,वजन,प्रकृती,रुग्णाची नाडी परीक्षा ,पूर्वी होऊन गेलेले आजार अशा अनेक गोष्टींवर treatment अवलंबून असते.


किती खाल्लं तरी शरीर हाडकुळं दिसतं?* व्हिटामीन बी-१२ देणारे 5 पदार्थ खा, ताकद येईल-फिट दिसाल

*किती खाल्लं तरी शरीर हाडकुळं दिसतं?*
 व्हिटामीन बी-१२ देणारे 5 पदार्थ खा, ताकद येईल-फिट दिसाल

Eat 10 Vitamin B3 And B-12 Rich Foods:-
थकव्यापासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही बी १२ किंवा बी३ च्या सप्लिमेंट्स घेऊ शकता.


थोडं काम केलं की लगेच थकवा येतो, झोप लागते, शरीराला आरामच मिळत नाही अशी अनेकांची तक्रार असते.  तुम्हालाही सतत थकवा येत असेल तर याची अनेक कारणं असू शकतात. (Health Tips) आहारातज्ज्ञ श्वेता पांचळ यांनी शारीरिक कमजोरी, थकवा यामगे व्हिटामीन बी-१३, बी३ ची कमतरता, ताण-तणाव, लठ्ठपणा ही ३ कारणं असल्याचे सांगितले आहे.  (Health Tips)


डॉक्टरांचा सल्ला आहे की थकव्यापासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही बी१२ किंवा बी३ च्या सप्लिमेंट्स घेऊ शकता. थकवा आणि कमकुवतपणा दूर करण्यासाठी  काही सोपे घरगुती उपाय फायदेशीर ठरतील.


*चीझ,दही*
 हे पदार्थ व्हिटामीन्सचा चांगला स्त्रोत आहेत. व्हिटामीन बी १२, कॅल्शियम आणि प्रोटीन्स असे तिन्ही घटक यातून मिळतात. याशिवाय  ब्रोकोली तिच्यातील पोषक तत्वांमुळे महत्वाची मानली जाते. बोकोलीत व्हिटामीन्स, मिनरल्स भरपूर असतात. ज्यामुळे कॅल्शियमची कमतरता दूर होते.

*ड्रायफ्रूट्स*
नियमित ड्रायफ्रुट्सचे सेवन करा, व्हिटामीन बी १२ ची कमतरता दूर करण्यासाठी बदामाचे अधिकाधिक सेवन करायला हवे. बदाम एक नट आहे. ज्यात व्हिटामीन बी व्यतिरिक्त प्रोटीन, कॅल्शियम, आयर्न आणि इतर मिनरल्स असतात. आपल्या आहारात फळं, टोमॅटो, टोफू, स्प्राऊट्स, मशरूममध्ये व्हिटामीन बी-१२ भरपूर प्रमाणात असते. 


*व्हिटामीन बी-१२ ने परिपूर्ण खाद्यपदार्थांचे सेवन*

व्हिटामीन बी-१२ शरीरासाठी महत्वाचे असते. यामुळे हाडांपासून मसल्सपर्यंत सर्व अवयवांना ताकद मिळते. यासाटी तुम्ही लीन मीट, बीन्स, मटार, डाळी, नट्स,  सि्डस, सोया उत्पादनांचा आहारात समावेश करू शकता. 


*व्हिटामीन बी-३ युक्त पदार्थ खा*

व्हिटामीन बी३ ला नियासिन असेही म्हटले जाते. शरीरातील पोषक तत्वांची कमतरता, थकवा, कमकुवतपणा  दूर होतो. याची कमतरता पूर्ण करण्यासाठी प्रोटीन्सयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा. 



*ताण-तणाव घेऊ नका*

जास्त ताण-तणाव घेतल्यास याचा तुमच्या शारीरिक मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. हे टाळण्यासाठी नियमित व्यायाम करा, पौष्टीक आहार घ्या, चांगली झोप घ्या.

*पोटातील गॅस*

*पोटातील गॅस*

आज माणसाला लहानपणापासूनच अनेक आजार होतात.  जसे की बद्धकोष्ठता, गॅस, पाठदुखी, त्वचा रोग, रक्तदाब, दंत रोग… हे असे काही आजार आहेत ज्यांमुळे जगातील प्रत्येक दुसरा माणूस हैराण आणि त्रस्त आहे.  भरदिवसाही पोटाचा त्रास नसलेली व्यक्ती सापडणे अवघड वाटते.

 वास्तविकता अशी आहे की आज आधुनिक जीवनशैली जगणारी प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या शारीरिक किंवा मानसिक आजाराने ग्रस्त आहे.  या सामान्य परंतु अत्यंत घातक आजारांपासून दूर राहण्यासाठी आम्ही आजींचे काही उपाय तुमच्यासमोर मांडत आहोत जे 100% प्रभावी तर आहेतच पण त्यांचे कोणतेही दुष्परिणामही होत नाहीत.  आज आपण पाहणार आहोत की आपल्या अनुभवी आजी किंवा आजी आपल्या किचनमधून पोटाशी संबंधित असलेल्या मोठ्या समस्या, गॅसपासून मुक्ती मिळवण्यासाठी कोणते उपाय सुचवतात...

 1. गॅसच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी काळी मिरी आणि मीठ बारीक करून पाण्यासोबत घेतल्याने फायदा होतो.

 2. मठ्ठा, हिंग, सुंठ, सुंठ, गूळ इत्यादी पचनास अत्यंत उपयुक्त असलेल्या गोष्टींचे सेवन केल्याने हा आजार मुळापासून निघून जातो.

 3. एक ग्लास कोमट पाण्यात अर्धे लिंबू, थोडेसे काळे मीठ, भाजलेले जिरे आणि थोडी हिंग मिसळून प्यायल्याने गॅसच्या समस्येपासून त्वरित आराम मिळतो.
🍇🍇🍇🍇🍇🍇🍇🍇🍒🍒
 

शरीराला आलेला थकवा घालवण्यासाठी या गोष्टींचे सेवन*

*शरीराला आलेला थकवा घालवण्यासाठी या गोष्टींचे सेवन*
■■■■■■■■■■■■■■■■■■■

1. नारळ पाणी -दिवसभर ताजेतवाने राहण्यासाठी नारळ पाणी पिणे हा आरोग्याच्या दृष्टीकोनातून एक उत्तम आणि पौष्टिक असा पर्याय आहे. नारळाच्या पाण्यात प्रचंड प्रमाणात मिनरल्स असतात. यामुळे आपल्या शरीरातील ऊर्जेचा स्तर वाढण्यास मदत होते. दिवसाची सुरुवात करताना नारळ पाणी प्यावे. पण यामध्ये कोणत्याही अन्य साम्रगी मिसळू नये.

2. भाज्यांचा रस - आपल्या दिवसाची सुरुवात करताना भाज्यांचा रसाचे सेवन करावे. विशेषतः हिरव्या पालेभाज्यांचा यामध्ये समावेश करावा. पालक, पुदीना यांसारख्या हिरव्या पाल्यांचा ज्यूस प्यायल्यास थकवा जाणवत नाही.

3. गोजी बेरी -गोजी बेरी फळामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन्स, मिनरल्स, अ‍ॅ न्टीऑक्सिडेंट्स आणि 8 प्रकारचे अमिनो अॅसिड असतात.
नियमित स्वरुपात गोजी बेरीच्या एका ग्लासाचे सेवन केल्यास थकवा आणि तणाव दूर होण्यास मदत मिळते.

4. लिंबू पाणी - सकाळी तुम्ही लिंबू पाणी पित असाल, तर तुमचे संपूर्ण शरीर दिवसभर ताजेतवाने राहते. लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी आणि अ‍ॅ न्टीऑक्सिडेंट्स भरपूर प्रमाणात असल्यानं शरीरात रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मिळते.

5. ग्रीन टी -ग्रीन टीच्या सेवनाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. ग्रीन टीमुळे शरीरातील मेटाबॉलिझम चा स्तर वाढण्यास मदत होते आणि फॅट्सही बर्न होतात.

6. कोरफडीचा ज्यूस - सकाळच्या वेळेत कोरफडीचा ज्यूस प्यायल्यास शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडण्यास मदत होते. कोरफडीच्या गरामध्ये पाण्याचे प्रमाण भरपूर असते. यामुळे आपल्या शरीरातील पाण्याची पातळी समप्रमाणात राहण्यात मदत होते. यातील अ‍ॅ न्टी इन्फ्लेमेटरी तत्वामुळे वेदना, तणाव आणि थकवा दूर होतात.

7. आवळ्याचा ज्यूस - आवळ्याच्या ज्यूस प्यायल्याने संपूर्ण शरीर डिटॉक्स होते. यामुळे मेटाबॉलिक रेटदेखील वाढतो आणि संपूर्ण दिवस ताजेतवाने राहता. सोबत रोगप्रतिकारक क्षमताही वाढते
अग्निपंख शैक्षणिक समुह महाराष्ट्र राज्य

जीवनसत्वे* *Vitamins*

🟣🟣 *जीवनसत्वे*  *Vitamins*


*अ(A)*
प्रतिकारशक्ती वाढवते, त्वचेचे तसेच दातांचे आरोग्य सुधारते, उत्तम आरोग्याची भावना उत्पन्न करते.
पालक, गाजर, रताळे, कोबी, अंड्यातील पिवळा बलक, लोणी यातून मिळते.

*ब१(B1)*
पचन आणि शरीराचे चलनवलन सुधारते, चेतासंस्थेचे काम सुरळीत चालण्यासाठी आवश्यक आहे. हिरव्या पालेभाज्या, अंड्यातील पिवळा बलक, दाणे, ताजा अननस यातून मिळते.

*ब२(B2)*
मनावरील ताण कमी करते, पिष्टमय पदार्थांच्या पचनासाठी मदत करते, पेशींना प्राणवायू पुरवते. यीस्ट, अंड्यातील पिवळा बलक, हिरव्या पालेभाज्या, दूध यातून मिळते.

*ब३(B3)*
कोलेस्टरॉल कमी करते, रक्ताभिसरणातील दोष दूर करते, रक्तातील साखरेच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवते. हिरव्या पालेभाज्या, दाणे, यीस्ट यातून मिळते

*ब५(B5)*
शरीरातील शक्ती वाढवते. धान्ये, सोयाबीन, अंड्यातील पिवळा बलक यातून मिळते.

*ब६(B6)*
प्रथिनांच्या पचनासाठी उपयुक्त, मनावरील ताण कमी करते, हार्मोन्स तयार करते. सोयबीन, यीस्ट, हिरव्या पालेभाज्या, सूर्यफुलाच्या बीया यातून मिळते.

*ब१२(B12)*
पेशी निर्मिती साठी आवश्यक, लाल रक्तपेशी तयार करण्यात महत्वाचा सहभाग. यीस्ट, दुग्धजन्य पदार्थ यातून मिळते.

*फॉलिक ऍसिड*
लोह पचण्यास मदत करते, शरीरातील रक्ताची पातळी कायम राखते (गर्भवती स्त्रीला याची दुप्पट गरज असते)
गडद हिरव्या पालेभाज्या, यीस्ट, कंदभाज्या, दूध, खजूर, संत्र्याचा रस यातून मिळते.

*क(C)*
प्रतिकारशक्ती वाढवते, अल्सर निर्मितीस विरोध करते, दातांचे व हिरड्यांचे आरोग्य सुधारते, लोह पचविण्यास मदत करते
लिंबूवर्गातील फळे (संत्रे, मोसंबी) कांदा, लसुण, मिरची, हिरव्या पालेभाज्या, स्ट्रॉबेरी, कलिंगड, बटाटे, द्राक्षे यातून मिळते.

*ड(D)*
कॅल्शियम पचविण्यास मदत करते, हाडांच्या वाढीसाठी उपयुक्त, चेतासंस्थेचे काम सुरळीत चालण्यासाठी आवश्यक. (स्त्रीयांना दूध पाजताना अत्यंत आवश्यक) सुर्यप्रकाश, लोणी, दूध, अंड्यातील पिवळा बलक यातून मिळते.

*इ(E)*
रक्तात गुठळ्या होण्यास प्रतिबंध करते, रक्तप्रवाह सुरळीत ठेवते, पेशींना प्राणवायू पुरविण्यात मदत करते.
लोणी, अंडी, लेट्युस, पुर्ण धान्ये, दूध, पालक, सोयबीन, सुर्यफूल, भोपळा यातून मिळते.

*फ(F)*
कोलेस्टेरॉल कमी करते, हृदयरोगांचा प्रतिकार करते. दाणे, काजू यातून मिळते.

*के(K)*
रक्ताभिसरणासाठी उपयुक्त. यीस्ट, गडद हिरव्या पालेभाज्या, सोयाबीन, सुर्यफूलाचे तेल, अंड्यातील पिवळा बलक यातून मिळते.

....अग्निपंख शैक्षणिक समुह महाराष्ट्र राज्य

आरोग्य विषयक टिप्स*

*आरोग्य विषयक टिप्स*

*मासिक पाळी वेळेत येत नाही? या पाच सवयी बदला…* 
              महिलांना मासिक पाळीशी संबंधित अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. मासिक पाळी उशिरा येणे किंवा अनेक महिने न येणे हे देखील त्रासाचे कारण बनते. मासिक पाळीत काही महिन्यांचे अंतर असल्यास आणि जर पिरियड सायकल बिघडायला लागली तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. खरं तर, या कालावधीत त्रास होणे हे काही वाईट सवयींचे लक्षण असू शकते. मुलींनी या सवयी काढून टाकण्यावर आणि त्या सुधारण्यावर भर द्यावा, अन्यथा ही समस्या काळानुसार वाढू शकते.

 *मासिक पाळीवर परिणाम करणाऱ्या वाईट सवयी* 

 *खूप झोपणे* 
               महिलांनी जास्त वेळ झोपू नये. आपल्या शरीराला गरज आहे तेवढीच झोप घ्यावी. गरजेप्रमाणे झोप घेतल्यास, तुमची मासिक पाळी देखील नियमित होईल.

 *वजनात बदल* 
                   अचानक वजनात फरक दिसून आला, तर त्याचा परिणाम मासिक पाळीवर देखील होतो. झपाट्याने वजन कमी झाल्यामुळे किंवा वाढल्यामुळे शरीरात अनेक बदल होतात, ज्यामुळे पीरियड सायकल देखील बदलू शकते. म्हणजेच जर तुम्ही आवश्यकतेपेक्षा जास्त व्यायाम करत असाल किंवा तुमच्या वजनाकडे अजिबात लक्ष दिले नाही तर तुमची मासिक पाळी देखील अनियमित होऊ शकते.

 *आहारात अडथळा* 
                 उत्तम आहार हे उत्तम आरोग्याचे रहस्य आहे. जर तुमचा आहार योग्य नसेल तर त्याचा फटका तुमच्या शरीराला सहन करावा लागतो. जरी तुम्ही बाहेरचे जंक फूड जास्त खाल्ले किंवा तुमच्या आहारात आवश्यक पोषक तत्वांचा समावेश केला नाही तरीही तुमची मासिक पाळी वेळेवर येणे थांबू शकते. त्यामुळे सकस आहार खा. बाहेरील जंक फूड जास्त खाणे टाळा. ज्या पदार्थांत पोषक तत्वांचा समावेश असेल, असे पदार्थ खा.

 *गर्भनिरोधक गोळ्यांचा अतिरेक* 
                 अनेक मुली गर्भधारणा टाळण्यासाठी लग्नाआधी किंवा लग्नांनंतर गर्भनिरोधक गोळ्या जास्त प्रमाणात सेवन करतात. गर्भनिरोधक गोळ्या शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडवतात, ज्यामुळे अनियमित मासिक पाळीची समस्या देखील उद्भवते.

*ताण* 
             तणावामुळे शरीराचे अनेक नुकसान होते. जसा आरोग्यासाठी ताण हानीकारक आहे, तसाच हा ताण पीरियड सायकलवर देखील परिणाम करू शकतो. तणाव कमी करणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे, अन्यथा मासिक पाळीवर त्याचा परिणाम वेगवेगळ्या प्रकारे दिसून येतो. यामुळे तुमची मासिक पाळी अनियमित होवू शकते. त्यामुळे नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे तुमच्या शरीरावर देखील त्याचा चांगला परिणाम होईल.

 *तीन महिने अमृत ज्युस आणि लेडी केअर घ्या आणि वरील समस्यापासून मुक्त व्हा* 

अग्निपंख शैक्षणिक समुह महाराष्ट्र राज्य

विज्ञान केंद्र दिंडाळा गजानन गोपेवाड

प्रकाश हा विद्युत चुंबकीय तरंगांनी बनतो हा सिद्धांत मांडणारे भौतिकशास्त्रज्ञ - जेम्स क्लार्क मॅक्सवेल.*

*प्रकाश हा विद्युत चुंबकीय तरंगांनी बनतो हा सिद्धांत मांडणारे भौतिकशास्त्रज्ञ - जेम्स क्लार्क मॅक्सवेल.*

13 जून 1831.
5 नोव्हेंबर 1879.

विद्युत् चुंबकीय क्षेत्र सिद्धांत व  द्रव्याचा गत्यात्मक सिद्धांत या विषयांतील त्यांच्या कार्यामुळे भौतिकीच्या इतिहासात त्यांना अत्यंत महत्त्वाचे असे स्थान प्राप्त झाले आहे.

मॅक्सवेल यांचा जन्म एडिंबरो येथे झाला. १८४७ मध्ये ते एडिंबरो विद्यापीठात दाखल झाले. वयाच्या केवळ पंधराव्या वर्षी त्यांनी विशिष्ट अंडाकृती वक्र काढण्याची एक रीत शोधून काढली व तीवरील त्यांचा शोधनिबंध एडिंबरोच्या रॉयल सोसायटीने प्रसिद्ध केला. १८५० साली त्यांनी केंब्रिज विद्यापीठात प्रवेश केला आणि १८५४ मध्ये ते द्वितीय रॅंगलर म्हणून उत्तीर्ण झाले व पहिल्या स्मिथ परितोषिकाचे ई. जे. राउथ यांच्यासह मानकरी ठरले. १८५५ मध्ये ते ट्रिनिटी कॉलेजाचे फेलो झाले. पुढील वर्षी ॲबर्डींन येथील मारिशाल कॉलेजात भौतिक विज्ञानाच्या अध्यासनावर त्यांची नेमणूक झाली. त्याच कॉलेजाचे प्राचार्य ड्यूअर यांची कन्या कॅथरिन हिच्याशी जून १८५८ मध्ये त्यांनी विवाह केला. त्यांच्या पत्नीने त्यांना वर्णदृष्टी व वायूची श्यानता (दाटपणा) यांवरील प्रयोगशालीय संशोधनात पुष्कळ मदत केली. १८६० मध्ये ते लंडन येथील किंग्ज कॉलेजात ज्योतिषशास्त्र व भौतिकीचे प्राध्यापक झाले. पुढे १८६५ मध्ये ग्लेनलेअर येथील आपल्या वडिलोपार्जित इस्टेटीकडे लक्ष देण्यासाठी ते शिक्षण क्षेत्रातून निवृत्त झाले. तेथेच त्यांनी विद्युत् व चुंबकत्वावरील आपला प्रख्यात विवेचक ग्रंथ ट्रिटाइज ऑन इलक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम लिहिला व तो १८७३ मध्ये प्रसिद्ध झाला. १८७१ मध्ये केंब्रिज येथे प्रायोगिक भौतिकीचे पहिले प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक झाली. तेथेच त्यांनी कॅव्हेंडिश प्रयोगशाळेची योजना तयार करून ती उभारण्याचे आणि तिचा विकास करण्याचे महत्कार्य केले. १८७४ पासून मृत्यूपावेतो त्यांनी या प्रयोगशाळेचे संचालक म्हणून काम केले.

मॅक्सवेल यांनी मायकेल फॅराडे यांच्या भौतिकीय संकल्पनांना गणितीय स्वरूप दिले व त्यामुळे त्या मान्यता पावण्यास मदत झाली. मॅक्सवेल यांनी विद्युत् व चुंबकीय आविष्कारांसंबंधीच्या ‘दूरवर्ती क्रिये’ च्या (अवकाशातील एकमेकांपासून दूर अंतरावर असणाऱ्या वस्तूंमध्ये मध्यस्थ यंत्रणेशिवाय होणाऱ्या परस्परक्रियेच्या) संकल्पनेला विरोध करून हे आविष्कार माध्यमातील क्रियेद्वारे घडून येतात, या फॅराडे यांच्या दृष्टिकोनाचा पाठपुरावा केला.

दूरवर्ती क्रियेची संकल्पना टाळण्यासाठी त्यांनी विद्युत् व चुंबकीय आविष्कारांतील परस्परसंबंधाच्या स्पष्टीकरणाकरिता ईथर कल्पित माध्यमाच्या संकल्पनेचा पुरस्कार केला. या संकल्पनेला सैद्धांतिक गणितीय स्वरूप मॅक्सवेल यांनी आपल्या चार प्रमाणबद्ध अशा समीकरणांच्या द्वारे दिले. (मॅक्सवेल विद्युत् चुंबकीय समीकरणे). यांपैकी शेवटची दोन समीकरणे विद्युत् व चुंबकीय क्षेत्राचे सातत्य दाखवितात आणि उरलेली दोन समीकरणे विद्युत् व चुंबकीय यांपैकी कोणत्याही एका क्षेत्रामध्ये कालानुसार बदल झाला, तर त्यामुळे दुसऱ्या प्रकारच्या क्षेत्राची जी निर्मिती होते त्या दोन क्षेत्रांमधील परस्परसंबंध स्पष्ट करतात. आधुनिक भौतिकीमधील ⇨ पुंज सिद्धांत इ. घडामोडीमुळे रूढ भौतिकीपैकी बरेच भाग व मीमांसा कालबाह्य ठरल्या आहेत. मॅक्सवेल विद्युत् चुंबकीय समीकरणेच फक्त भौतिकीमधील आपले महत्त्वाचे स्थान तसेच टिकवून ठेवताना आढळतात ही एक नमूद करण्याजोगती गोष्ट आहे, असे म्हटले पाहिजे.

मॅक्सवेल यांना १८६५ मध्ये असे आढळले की, ज्या क्षोभांमुळे विद्युत् चुंबकीय प्रवर्तन निर्माण होते (चुंबकीय क्षेत्राच्या तीव्रतेत बदल केल्यास विद्युत् चालक प्रेरणा म्हणजे विद्युत् मंडलात प्रवाह वाहण्यास कारणीभूत होणारी प्रेरणा उत्पन्न होते) तो क्षोभ माध्यमामधून तरंगाच्या स्वरूपात व प्रकाशवेगाने प्रसारित होतो. या दोहोंचा विचार करून त्यांनी प्रकाश म्हणजे माध्यमातून प्रसारित होणारे विद्युत् चुंबकीय अवतरंग (माध्यमातील कणांचे कंपन तरंग प्रसारणाच्या दिशेशी लंबदिशेत होणारे तरंग) आहेत, असा क्रांतिकारी निष्कर्ष मांडला [विद्युत् चुंबकीय प्रारण]. १८८७ मध्ये हाइन्रिख हर्ट्झ या जर्मन भौतिकीविज्ञांनी मॅक्सवेल यांचे विधान सत्य असल्याचे प्रायोगिक रीत्या दाखवून दिले आणि याचबरोबर रेडिओविज्ञान व अभियांत्रिकी यांचा पाया घातला. प्रारण (तरंगरूपी ऊर्जा) जर एखाद्या वस्तूच्या पृष्ठभागावर पडले, तर यामुळे पृष्ठभागावर दाब निर्माण होईल, हा मॅक्सवेल यांचा निष्कर्षही सत्य असल्याचे पुढील काळात पी. एन्. ल्येब्येड्येव्ह या रशियन शास्त्रज्ञांनी १९०० साली तर ई. एफ्. निकल्स व जी. एफ्. हल या अमेरिकन वैज्ञानिकांनी जास्त सुविकसित उपकरण योजना वापरून १९०३ मध्ये दाखविले.

मॅक्सवेल यांनी विद्युत् चुंबकीय तरंगांच्या प्रसारणासाठी ईथराच्या आधाराची आवश्यकता प्रतिपादन केली होती आणि पुढे आपला विद्युत् चुंबकीय सिद्धांत विकसित केल्यावर ‘ईथर विस्थापना’ चा किंवा प्रकाश उद्‌गमाच्या गतीमुळे प्रकाशवेगात किती बदल होईल या प्रश्नाविषयीही सखोल विचार केला होता. पृथ्वीवर याकरिता प्रयोग केल्यास त्यामध्ये प्रकाशाच्या जाण्याचा व येण्याचा काळ मोजणे आवश्यक असते. या परिस्थितीमध्ये वरील परिणाम v²/ c² (v–उद्‌गमाचा वेग व c–प्रकाशाचा वेग) या कोटीचा असल्यामुळे तो मोजण्याच्या दृष्टीने अत्यल्प ठरेल, असे त्यांना दिसून आले. तथापि आपल्या आयुष्याच्या शेवटच्या वर्षी त्यांनी डी. पी. टॉड या ज्योतिर्विदांना पृथ्वीसापेक्ष गुरू ग्रहाचे स्थान बदलते तेव्हा त्याच्या उपग्रहांच्या आवर्तकालात (ग्रहाभोवती एक प्रदक्षिणा करण्यास लागणाऱ्या कालात) होणाऱ्या फरकाचे या परिणामाचे मापन करण्याकरिता निरीक्षण करावे, असे पत्राद्वारे सूचविले होते. या सूचनेमुळे पुढे आइन्स्टाइन यांच्या सापेक्षता सिद्धांताकरिता महत्त्वपूर्ण ठरलेल्या मायकेलसन-मॉर्ली प्रयोगास चालना मिळाली.

मॅक्सवेल यांचे वर्णदृष्टीवरील कार्य ते एडिंबरो येथे पदवीपूर्व विद्यार्थिदशेत असल्यापासूनच सुरू झाले व नंतर ते कित्येक वर्षे चालू होते. त्यांनी तांबडा, हिरवा व निळा हे प्राथमिक रंग म्हणून निवडले. एका भोवऱ्याच्या पृष्ठभागावर विविध तीव्रतेच्या रंगछटांचे कागद लावून भोवरा फिरवून या रंगाचे मिश्रण करण्याची रीत त्यांनी वापरात आणली. अशा प्रकारे कोणत्याही एका रंगाचे भोवऱ्याच्या साहाय्याने विश्लेषण करण्याची पद्धती त्यांनी उपयोगात आणली व ‘परिमाणात्मक वर्णमापना’ चा पाया घातला. जर एखाद्या रंगातील प्राथमिक रंगाचा ऋण तसेच धन अंश (वाटा) लक्षात घेतला, तरच टॉमस यंग यांनी प्रतिपादिलेले गृहीतक लागू पडते, असे मॅक्सवेल यांनी निरीक्षणांद्वारे दाखविले रंगांधत्व हे डोळ्यातील तांबड्या वर्णग्राहकाचा अभाव दर्शविते असे त्यांनी सुचविले आणि रंगांध व्यक्तीला तांबडा व हिरवा हे रंग वेगवेगळे ओळखता यावेत म्हणून एक चष्माही तयार केला. निरनिराळ्या रंगाच्या प्रकाशशलाका एकमेकींत वेगवेगळ्या प्रमाणात मिसळून दिलेल्या रंगछटेशी जुळती अशी रंगछटा मिळविता येईल, अशी एक पेटी त्यांनी तयार केली. या पेटीच्या साहाय्याने निरनिराळ्या व्यक्तींच्या रंगसंवेदानांचा तक्ता तयार करण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयोगात पुष्कळच अचूकता आली आणि त्यावरून प्राकृतिक (सर्वसाधारण) माणसाची रंगभेदनक्षमता खूपच चांगल्या प्रतीची असल्याचे त्यांनी दाखवून दिले.

वरील त्रिवेणी सिद्धांतावरून मॅक्सवेल यांनी असा निष्कर्ष काढला की, तीन निरनिराळ्या रंगाच्या प्रकाश गाळण्यांतून छायाचित्रण करून मग त्या प्रतिमांचे पुन्हा एकत्रीकरण केल्यास रंगीत छायाचित्र मिळविता येईल. यांचे प्रात्याक्षिकही त्यांनी १७६१ मध्ये रॉयल इन्स्टिट्यूशनमध्ये एका व्याख्यानात एका टार्टन फितीचे (निरनिराळ्या रंगांच्या पट्ट्या असलेल्या लोकरी कापडाच्या फितीचे) छायाचित्रण करून दाखविले.

ॲबर्डीन येथील वास्तव्यात त्यांनी चार वर्षे परिश्रम करून शनीच्या कड्यांसंबंधी लिहिलेल्या निबंधाला ॲडम्स पारितोषिक मिळाले. कड्यांच्या स्थैर्याचे गणितीय विश्लेषण करून ही कडी पृथक् कणांची बनलेली आहेत, असा निष्कर्ष त्यांनी काढला. या संशोधनामुळे वायूंच्या गत्यात्मक सिद्धांताविषयी त्यांनी नंतर केलेल्या कार्याचा पाया घातला गेला.

मॅक्सवेल यांनी १८५९ मध्ये असे प्रतिपादन केले की, वायूतील रेणूंचे वेग एखाद्या सांख्यिकीय वितरणानुसार असले पाहिजेत. त्यापूर्वी या सर्व रेणूंचे वेग सारखेच आहेत असे मानण्यात येत होते. ठराविक तापमानाच्या वायूकरिता मॅक्सवेल यांनी या वितरणाचे सूत्र सिद्ध केले आणि हे वितरण ‘मॅक्सवेल वेगवितरण’ या नावाने ओळखण्यात येते. त्यांच्या गणितीय सिद्धतेत काही विवाद्य गृहीतांचा समावेश आहे, असा आक्षेप घेतला जातो. तरीही त्यांचे अंतिम सूत्र ग्राह्य असून सांख्यिकीय यामिकीत व्यापक प्रमाणात वापरण्यात येणाऱ्या सूत्रांपैकी ते एक आहे. त्यामुळे वायूच्या गत्यात्मक सिद्धांतात सांख्यिकीय पद्धतीचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला. त्यानंतर त्यांनी वायूची श्यानता, ऊष्मीय संवाहकता व विसरण (रेणू एकमेकांत मिसळणे) या वायू परिवहन आविष्कारांवर महत्त्वाचे संशोधन केले. वायूची श्यानता दाबावर अवलंबून नसते व ती द्रवाप्रमाणे वाढत्या तापमानाबरोबर कमी न होता वाढत जाते, असे सैद्धांतिक दृष्ट्या व प्रयोगाद्वारे पण त्यांनी सिद्ध केले. आयुष्यातील शेवटच्या महत्त्वाच्या निबंधात त्यांनी विरल वायूंच्या गतिकी सिद्धांताचा पाया घातला.

मॅक्सवेल यांची कल्पनाशक्ती अतिशय तीव्र होती.  ऊष्मागतिकीच्या दुसऱ्या सिद्धांताचे सांख्यिकीय स्वरूप स्पष्ट करण्याकरिता त्यांनी ‘मॅक्सवेल यांचे भूत’ ही विलक्षण कल्पना पुढे मांडली. हे भूत आपल्या बुद्धीचा उपयोग करून या सिद्धांताच्या विरुद्ध प्रक्रिया सिद्ध करू शकत होते. या विरोधाभासाचे उत्तर अनेक वर्षेपर्यंत मोठमोठ्या वैज्ञानिकांस सापडले नाही. आधुनिक काळात ब्रीय्वँ यांनी अवगमाशी ऋण एंट्रॉपी निगडित असते, असे दाखवून या भूताला अखेरीस गाडून टाकले.

मॅक्सवेल यांनी १८६८ मध्ये गतिनियंता या प्रयुक्तींचे (गतिदायक शक्ती किंवा रोध यात बदल झाला तरी यंत्राची गती स्थिर राखण्यास मदत करणाऱ्या प्रयुक्तींचे) गणितीय विश्लेषण पद्धतीने प्रथमच विवरण केले. अशा प्रकारच्या प्रयुक्ती जेम्स वॉट (वाफ एंजिनाच्या नियंत्रणासाठी), सी. डब्ल्यू. सीमेन्स, एम्. फूको इत्यादींनी वापरलेल्या होत्या. मॅक्सवेल यांनी गतिनियंत्याच्या गतीकरिता अवकल समीकरणे शोधून काढली व त्यांत एका अतिरिक्त पदाचा समावेश केला. ज्याला नंतर ऋण पुनःप्रदाय अशी संज्ञा मिळाली. त्यांनी या समीकरणाद्वारे गती स्थिर राहून गतिनियंता कार्यरत राहण्यासाठी आवश्यक असणाऱ्या अटी निर्धारित केल्या. अशा प्रकारे या त्यांच्या कार्याद्वारे नियंत्रण सिद्धांताचा पाया घातला गेला. पारस्परिक विचलनाचे प्रमेय मांडून व प्रभाव गुणांक पद्धतीचा शोध लावून त्यांनी बांधकाम संरचना विश्लेषण सिद्धांताचाही पाया घातला. माशाच्या डोळ्यातील स्फटिकीय भिंगाच्या संरचनेच्या संदर्भात त्यांनी भूमितीय प्रकाशकीचा अभ्यास करण्यास १८५३ मध्ये प्रारंभ केला. एका बिंदूतून निघणारे सर्व किरण भिंगातून पलीकडे गेले असता दुसऱ्या बिंदूत अचूकपणे मिळतील असे परिपूर्ण केंद्रीकरण देणारे माध्यम त्यांना पाहिजे होते आणि अशा माध्यमाचे गणितीय विनिर्देश त्यांनी दिले. यावरूनच पुढे छायाचित्रणात वापरण्यात येणाऱ्या सुपरिचित ‘मत्स्यनेत्र’ भिंगाचा शोध लागला.

रॉयल सोसायटीचे सदस्य म्हणून १८६१ मध्ये त्यांची निवड झाली व सोसायटीच्या रम्फर्ड पदकाचा बहुमान त्यांना मिळाला (१८६०). टिट्राइज ऑन इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेवटिझम या प्रसिद्ध ग्रंथाखेरीज थिअरी ऑफ हिट (१९७१) व मॅटर अँड मोशन हे त्यांचे ग्रंथही प्रसिद्ध आहेत. त्यांचे शास्त्रीय कार्य एकत्रितपणे केंब्रिज विद्यापीठातर्फे १८९० मध्ये प्रसिद्ध करण्यात आले. मॅक्सवेल यांनी हेन्री कॅव्हेंडिश यांच्या विद्युत् शास्त्रावरील अप्रकाशित संशोधनाचे उत्तम प्रकारे संपादन करून ते १८७९ मध्ये प्रसिद्ध केले. त्यातील काही महत्त्वाचे प्रयोग त्यांनी स्वतः करून पडताळले, एन्सायक्लोनपीडिया ब्रिटानिकाच्या विख्यात नवव्या आवृत्तीकरिता त्यांनी टी. एच्. हक्‌सली यांच्या समवेत वैज्ञानिक संपादक म्हणून काम केले व अनेक लेखही लिहिले. यांखेरीज ते विनोदी कवितांकरिताही प्रसिद्ध होते. वयाच्या केवळ अठ्ठेचाळीसाव्या वर्षी ते कर्करोगाने केंब्रिज येथे मृत्यू पावले.

_Udise plus portal (SDMS) वर विद्यार्थी प्रमोशन खालील पद्धतीने करावे.._*

*_Udise plus portal (SDMS) वर विद्यार्थी प्रमोशन खालील पद्धतीने करावे.._*

_सर्वप्रथम खालील लिंक वर क्लिक करावे._👇

https://sdms.udiseplus.gov.in/g0/#/login

_त्यानंतर Login page येईल. तिथे UDISE ची माहिती भरण्यासाठी वापरलेला ID PASSWORD टाकावा._

_Login झाल्यावर Academic year 2023 - 24 व Academic year 2024-25असे दोन पर्याय दिसतील त्यापैकी आपण Academic year 2024 - 25 ला क्लिक करावे._

_त्यानंतर डाव्या कोपऱ्यात जे पर्याय दिसतात त्यामध्ये मध्यभागी Progression Activity हा पर्याय आहे त्याला क्लिक करायचे आहे._


_*प्रमोशन करण्यासाठी आपल्याला progression module वर  Go जिथे लिहिलेले आहे त्यावर क्लिक करायचे आहे.*_

_त्यानंतर आपल्याला विद्यार्थ्यांची मागील वर्षाची इयत्ता व तुकडी निवडण्याचा पर्याय येईल._

_तो निवडून go वर क्लिक केल्यावर आपल्या त्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांची यादी ओपन होईल._

*_त्यानंतर आपल्याला प्रत्येक विद्यार्थ्यांची माहिती भरायची आहे. माहिती भरत असताना त्यामध्ये Progression status मध्ये Promoted हा पर्याय निवडायचा आहे. Marks मध्ये आपल्याला त्याचे मागील वर्षाचे गुण टक्केवारी मध्ये टाकायचे आहेत हे गुण पूर्णांकातच टाकायचे आहेत. त्यानंतर त्याचे मागील वर्षाचे उपस्थित दिवस व Schooling status मध्ये तो आपल्या शाळेत शिकत आहे की शाळा सोडून दुसऱ्या शाळेत गेला आहे हा पर्याय निवडायचा आहे.Class and section to be promoted मध्ये आपल्याला त्याची तुकडी निवडायची आहे व हे सर्व झाल्यावर अपडेट वर क्लिक करायचे आहे._*

_अशा पद्धतीने एक एक करून आपल्याला सर्व विद्यार्थी promote करायचे आहे त्यानंतर सर्व विद्यार्थी promote झाल्यानंतर शेवटी असलेल्या Finalize या टॅबवर क्लिक करून तिथे आपल्याला promote झालेली संख्या दिसेल ते बरोबर असल्यावर confirm यावर क्लिक करायचे आहे अशा पद्धतीने आपला एक वर्ग promote झालेला असेल. याच पद्धतीने आपल्याला शाळेतील इतर वर्ग सुद्धा promote करायचे आहेत._

_वरील पद्धतीने आपण शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे udise portal वर Promotion अगदी मोबाईलवर सुद्धा सहज करू शकतो._

`अग्निपंख शैक्षणिक समुह लेखन गजानन गोपेवाड,✍️✍️

मंगळवार, ६ फेब्रुवारी, २०२४

गजानन गोपेवाड

सयाजीराव गायकवाड

*🌹||||| लोकशाहीतही हवाहवासा वाटणारा राजा म्हणजे महाराजा सर सयाजीराव गायकवाड महाराज |||||🌹*

      महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी बडोद्यात सुधारणा करताना हिंदुस्थानाबरोबरच जगभरातील लोकांच्या जीवनात बदल होण्यासाठी कार्य केले. अनेक जागतिक प्रश्नावर स्वतःच्या चिंतनाने भाष्य केले आणि त्यासाठी समर्पक पर्याय सुचविले. जागतिक पातळीवरील आपत्तीत सहाय्य केले. विचारवंत राजा सयाजीराव गायकवाड महाराजांना जागतिक मानववंश परिषद, ऑक्सफर्डचे अध्यक्षपद, दुस-या जागतिक धर्म परिषदेचे अध्यक्ष पद, अमेरिकन सरकारने दिलेला गार्ड ऑफ ऑनर, वेगवेगळ्या देशांत सन्मानपुर्वक मानपत्रे, पहिल्या जागतिक शांतता परिषदेचे अध्यक्ष, पतितपावन पदवी, जागतिक लायब्ररी संघटनेने केलेला सन्मान, लंडन लायब्ररीचे उपाध्यक्ष, अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद, अखिल भारतीय तत्त्वज्ञान परिषद आणि अखिल भारतीय हिंदी साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थान अशा प्रकारचे जागतिक पातळीवरील अनेक सन्मान प्राप्त झाले.
      सयाजीराव महाराजांच्या जागतिक पातळीवरील कार्यामुळे वेगवेगळ्या देशांतील महनीय व्यक्तींनी त्यांच्यावर लेख लिहिले. यामधील काही लेखकांनी *एक राजा म्हणून नव्हे; तर एक माणूस म्हणून महानता स्पष्ट केलेली आहे.*
      अशा या आदर्श राजाचे दि. ०६ फेब्रुवारी १९३९ रोजी मुंबई येथे निधन झाले.

*हिज हायनेस सर सयाजीराव गायकवाड महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन.*

शिका शिकवा गजानन गोपेवाड

शिका-शिकवा. ऐकमेकांना प्रेरणा द्या : गजानन गोपेवाड

 यवतमाळ : दिनांक 22 जाने. रोजी जागतिक दर्जाचे शिक्षण देण्यासाठी आमचे गुरूजनवर्ग सज्ज प्रत्येक मुलांमध्ये नैसर्गिक गुणवत्ता हि वेगवेगळी असते. त्या सोबत प्रत्येक मुलांना नैसर्गिक कौशल्य जन्मजात असते. मुल परिसर, परिवारातुन सर्व प्रथम भाषा विकसित करून बाहेर पडते. शाळेत विद्यार्थ्यांना या देशाचे, जगाचे भविष्यातील सुजाण नागरिक घडविण्याचे काम आमचे गुरूजी करत आहे. अशा ज्ञानार्जन विकसित झालेल्या विद्यार्थ्यांना आपले जग स्विकरते. आणि जागतिक दर्जाचे शिक्षण देणे आता काळाची गरज आहे. सोबतच जागतिक दर्जाचे विद्यार्थी घडविणे हे सुद्धा काळाची गरज आहे. शिक्षण क्षेत्रातील ईयत्ता निहाय क्षमता त्या त्या विषयातील पण विकसित होणे गरजेचे आहे. आणि या क्षमता विकसित करतांना बहुतांश गुरूजींच्या कौशल्ये पणाला लागतात. घटकानुरूप शैक्षणिक साहित्य आहे त्या परिस्थितीत मिळेल ते साहित्य वापरून शैक्षणिक साहित्य जर अध्यापनात वापरून शिक्षण दिले तर विद्यार्थ्यांना चिरकाल स्मरणात राहील. कारण शैक्षणिक साहित्य कसे बनवले. शैक्षणिक साहित्य बनवताना कुठल्या अडचणी आल्या. आलेल्या अडचणी विद्यार्थी कसे हाताळून शैक्षणिक साहित्य निर्माण केले. या स्वअनुभूतीतून विद्यार्थी शिकत असतो मुले स्वंयप्रेरणेतुन शिकत असतो. गुरूजी फक्त मार्गदर्शन करतो.सुलभक बनून राहतो. मुलांच्या जिज्ञासू वृत्तीचे सन्मान कसा करावा. सेल्फी विथ सक्सेस मधून विद्यार्थ्यांना कशी प्रेरणा देता येईल. वेगवेगळ्या खेळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांंचा, शारीरिक, मानसिक, भावनिक, बौद्धिक क्षमता विकसित करणे शक्य आहे. या साठी सुध्दा दर्जेदार शैक्षणिक साहित्य निर्माण करून जर आपण अध्यापन केले तर आपले अध्यापन दर्जेदार होईल. व विद्यार्थी चिरकाल स्मरणात राहील. हा आशावाद करायला काही हरकत नाही. आज वेगवेगळ्या शाळेत वेगवेगळी समस्या आहे. पण समस्या जरी असेल तरीही आपण या समस्येवर तोडगा काढु शकतो. एक सुसज्ज शैक्षणिक संग्रहालय आपण आपल्या शाळेत ऊभे करू शकतो. ईथे आवशयक त्या ठिकाणी, समाज सहभागातून, लोकवर्गणीतून, ईतर दान दात्याकडून आपण आपल्या शाळेत शैक्षणिक संग्रहालय निर्माण करून विद्यार्थ्यांना या शैक्षणिक संग्रहालयात मुक्त संचार करू दिला पाहिजे. त्याच सोबत वाचणाची गोडी लागावी म्हणून शाळेत विविध प्रकारची पुस्तके पण आपण एक बालवाचनालय निर्माण करून ऊपलब्ध करून दिले तर विद्यार्थी वाचनाची गोडी निर्माण करायला काही वेळ लागणार नाही. यात गुरूजी फक्त योग्य वेळी योग्य तिथे मार्गदर्शन करावे. आज आपण पाहतो हे जग स्पर्धेचे आहे, आपला विद्यार्थी पण या जागतिक स्पर्धेत टिकला पाहिजे हि आपली पण जबाबदारी आहे. सोबत पालकांची पण तेवढिच जबाबदारी आहे. विद्यार्थी स्वंयप्रेरणेतुन शिकताना विद्यार्थ्यांना कडे लक्ष देणे गरजेचे आहे. असाच एक कार्यक्रम ऊमरखेड पंचायत समितीचे मा. सतिश दर्शनवाड गटशिक्षणाधिकारी यांनी ऊमरखेड पंचायत समिती मधील शाळेत राबविले. वाचन, लेख कार्यक्रम सुरू केले. त्या कार्यक्रमास गुणवत्तेचा पँटर्न म्हणून बरेच वरिष्ठ अधिकारी यांनी दखल पण घेतली. यात नक्कीच उपक्रमशील शिक्षक, विद्यार्थी, पालक यांचा सहभाग तितकेच महत्त्वाचे आहे. त्याची फलनिष्पत्ती आज आपण सर्व बघत आहे. इथे फक्त ईच्छा शक्ती पाहिजे. अग्निपंख शैक्षणिक समुह पण असेच  विद्यार्थ्यांना व शिक्षकांना प्रेरित करत असतो. आपणास एक आव्हान या निमित्ताने आपण आपल्या शाळेत नवनवीन शैक्षणिक साहित्य, व्हिडीओ निर्मिती, शैक्षणिक साहित्य विध्यार्थाना उपलब्ध करून दिले पाहिजे.

शुक्रवार, १५ डिसेंबर, २०२३

आजचे विज्ञान प्रश्न

💥 *अग्निपंख    शैक्षणिक समुहाचा     उपक्रम💥*
 
        ✍🏻 *विज्ञान प्रश्न 🖋️

१. शेतीचे प्रमुख हंगाम कोणते?

२. सेंद्रिय शेती कशाला म्हणतात?

३. भारताचा सुमारे किती टक्के भूभाग शेतीसाठी वापरला जातो?

४. जून ते ऑक्टोबर पर्यंत घेतल्या जाणाऱ्या पिकांना काय म्हणतात?

५. मार्च ते जून मध्ये घेतल्या जाणाऱ्या पिकांना काय म्हणतात?
उत्तरे:
१. खरीप हंगाम व रबी हंगाम 

२. नैसर्गिक पदार्थ वापरून केलेल्या शेतीला सेंद्रिय शेती म्हणतात.

३. ६० टक्के

४. खरीफ पिके.

५. उन्हाळी पिके.
💥एकाच घटकावर प्रश्न विचारून 
मुलांची ती संकल्पना स्पष्ट करण्यासाठी अशा प्रकारे प्रश्न विचारले जातात ,त्यामुळे मुलांच्या ज्ञानात भर पडून तो घटक ,उपघटक त्यांच्या नेहमीसाठी लक्षात राहील  .   
 "विज्ञान साक्षरता हाच आमचा ध्यास".

     
       💎निर्मिती💎
💥 *अर्चना मेहरे💥*
( विषय शिक्षक)
*जि.प.कें. उच्च. प्राथमिक शाळा. माहुरगड जि.नांदेड*

बोधकथा

*************************
  *बोध कथा*
*************************
  *कर्म आणि भावना.*
----------------------------------------

  *कथा*

*एकदा एक बाई गायीला केळे खायला घालत होती.  पण गाय ते केळं खात नव्हती.  ती बाई परत -परत त्या गायी जवळ जाऊन केळे गायीच्या तोंडासमोर नेत होती पण गाय केळं खायला तयार नव्हती.*

 शेवटी गाय वैतागली आणि ती  बाईला शिंगाने मारायला धावली.  तशी ती बाई पळून गेली. 
त्या गायीच्या जवळच एक सांड उभा होता.  तो गायीच्या जवळ येऊन बोलला, ' ती बाई एव्हढं प्रेमाने खाऊ घालत होती तर तु का  नाही खालस? 
तेव्हा गाय म्हणाली, ' आज तिची एकादशी आहे म्हणून पुण्य कमावण्या साठी मला खाऊ घालत होती.  एरवी मी तिच्या घरासमोर जाऊन उभी राहते तर काठी घेऊन मारायला धावते आणि मला हाकलून देते. 

पुढे गाय बोलली,  ' *भुकेल्याला प्रेमाने सुखी भाकरी दिली तरी गोड  लागते.*  

जो स्वतःच्या स्वार्थासाठी पुण्य कर्म करण्याचा प्रयत्न करतो  तो *दुर्योधन* आहे. 
जो केवळ आपल्या माणसांचे भले करण्यासाठी पुण्य कर्म करण्याचा प्रयत्न करतो  तो *युधिष्टीर* आहे. 
आणि जो  सर्वांचे भले करण्यासाठी पुण्य कर्म करण्याचा प्रयत्न करतो  तो *श्रीकृष्ण* आहे. '

  *बोध*

 *तर लक्षात ठेवा पुण्य कर्म करण्याबरोबर भावना महत्वाच्या असतात*

⚡आजचे विज्ञान प्रश्न ⚡1)गुरुत्वाकर्षणाचा शोध सर आयझॅक न्यूटन यांनी------शतकात लावला. 2)वस्तूवर कोणत्याही प्रकारे ओढणे व ढकलण्यासाठी लावलेल्या जोरास------ म्हणतात. 3)वस्तूवरील--------बल म्हणजे त्या वस्तूचे वजन होय. 4)------- बल हे नेहमीच गतीच्या विरोधात कार्य करते. 5)शिलाई मशीन,विद्युत पंप,वाॅशिंग मशीन ही ------- बलाची उदाहरणे आहेत. ✨उत्तरे ✨1)17 व्या 2)बल 3)गुरूत्वीय 4)घर्षण 5)यांत्रिक 🪷निर्मिती 🪷 सौ अर्चना मेहरे

आजचे विज्ञान प्रश्न

⚡आजचे विज्ञान प्रश्न ⚡
1)गुरुत्वाकर्षणाचा शोध सर आयझॅक न्यूटन यांनी------शतकात लावला. 
2)वस्तूवर कोणत्याही प्रकारे ओढणे व ढकलण्यासाठी लावलेल्या जोरास------ म्हणतात. 
3)वस्तूवरील--------बल म्हणजे त्या वस्तूचे वजन होय. 
4)------- बल हे नेहमीच गतीच्या विरोधात कार्य करते. 
5)शिलाई मशीन,विद्युत पंप,वाॅशिंग मशीन ही ------- बलाची उदाहरणे आहेत. 
           ✨उत्तरे ✨
1)17 व्या 
2)बल 
3)गुरूत्वीय 
4)घर्षण 
5)यांत्रिक 
              🪷निर्मिती 🪷
              अर्चना मेहरे

गुरुवार, २० जुलै, २०२३

यवतमाळ जिल्ह्यातील माहिती

 #जिल्हा_माहिती


यवतमाळ जिल्हा


यवतमाळ जिल्हा पूर्वी येवतमाळ म्हणून ओळखला जायचा. हा राज्याच्या पूर्व-मध्य भागात विदर्भाच्या प्रदेशात आहे. नागपूर आणि अमरावतीनंतर हा विदर्भातला लोकसंख्येनुसार तिसरा सर्वात मोठा जिल्हा आहे. यवतमाळ शहर हे जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.

आर्णी, उमरखेड, कळंब, पांढरकवडा - केळापूर, घाटंजी, झरी जमनी, दारव्हा, दिग्रस, नेर, पुसद, बाभुळगाव, महागाव, मारेगाव, यवतमाळ, राळेगाव, वणी हे या जिल्ह्यातले तालुके आहेत. 

 यवतमाळ पूर्वीच्या बेरार प्रांताचा भाग होता. बेरार सातवाहन राजघराण्याच्या (इ.स.पू. दुसरं शतक ते इसवी सन दुसरं शतक), वाकाटक राजवंश (तिसरं ते सहावं शतक), चालुक्य घराणं ( सहावं ते आठवं शतक), राष्ट्रकूट घराणं (आठवं ते दहावं शतक), चालुक्य (दहावं ते बारावं शतक), आणि शेवटी देवगिरीचे यादव (बारावं शतक ते चौदावं शतक) यांच्या अधिपत्याखाली होतं. चौदाव्या शतकाच्या सुरुवातीला दिल्लीचा सुलतान अलाउद्दीन खिलजी यानं हा प्रदेश जिंकला तेव्हा खिलजी राजवटीचा काळ सुरू झाला. चौदाव्या शतकाच्या मध्यात दिल्ली सल्तनतपासून हा प्रदेश विभक्त झाला आणि बहमनी सल्तनतचा भाग झाला. पंधराव्या शतकाच्या शेवटी बहमनी सल्तनतचे पाच तुकडे झाले. १५७२ मध्ये बेरार अहमदनगर इथल्या निजामशाही सल्तनतचा भाग बनलं. निजामशाहीनं १५९५ मध्ये बेरारला मुघल साम्राज्याच्या स्वाधीन केलं. १८ व्या शतकाच्या सुरुवातीला मुघल राजवट कमकुवत झाल्यावर, हैदराबादचा निजाम असफ जाह पहिला, यानं १७२४ मध्ये साम्राज्याचा दक्षिणेकडचा प्रांत (बेरारसह) स्वतःच्या ताब्यात घेतला.

अबुल फजलच्या ऐन-इ-अकबरीमध्ये बेरारची तेरा सरकारांमध्ये किंवा महसूल जिल्ह्यांमध्ये विभागणी करण्यात आल्याचं नमूद आहे. यवतमाळ जिल्ह्यात अकबराच्या काळात कलाम (कळंब) आणि माहूरच्या सरकारांचा समावेश होता. या सरकारांचे काही मोजके महाल आताच्या यवतमाळ जिल्ह्यात होते. यवतमाळ हे यवत- लोहारा या नावाखाली परगण्याचं मुख्यालय म्हणून नोंदीमध्ये आढळतं. लोहारा हे यवतमाळच्या पश्चिमेला ५ किमी (३ मैल) अंतरावर असलेल्या गावाचं नाव आहे. यवत म्हणजे डोंगर, शिखर, पुडा. माळ हा प्रत्यय महाल (परगणा-नगर) चा अपभ्रंश आहे. अकबराच्या काळात या क्षेत्राचा जमीन महसुल दहा लाख रुपयांपेक्षा जास्त होता. 

१८५३ मध्ये बेरारच्या उर्वरित भागासह हा जिल्हा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या प्रशासनाखाली आला. बेरारची विभागणी पूर्व बेरार आणि पश्चिम बेरारमध्ये करण्यात आली. त्यात यवतमाळ जिल्ह्याचा समावेश पश्चिम बेरारमध्ये करण्यात आला. १८६४ मध्ये यवतमाळ आणि इतर काही तालुक्यांच्या प्रदेशाला सुरुवातीला आग्नेय बेरार आणि नंतर वणी असं नाव देण्यात आलं. १९०३ मध्ये बेरार हे हैदराबादच्या निजामानं भारताच्या ब्रिटिश सरकारला भाड्यानं दिलं असं म्हणतात किंवा ब्रिटिशांकडून भाड्यानं घेतलं असंही म्हणतात. 

यवतमाळ जिल्हा वर्धा आणि पैनगंगा-वैनगंगा खोऱ्याच्या नैऋत्य भागात वसलेला आहे. 

या जिल्ह्याचं क्षेत्रफळ १३,५८२ चौरस किमी (५,२४४ चौरस मैल) (राज्याच्या ४.४१ टक्के)  आहे. जिल्ह्याची एकूण लांबी १९० किलोमीटर (१२० मैल) आहे आणि उत्तर ते दक्षिण रुंदी १६० किमी (१०० मैल) आहे. त्याच्या उत्तरेकडच्या सीमेवर पाणिघाट आहे, ज्याला बेरारची दरी म्हणतात.

जिल्ह्यात पैनगंगा आणि वर्धा या दोन प्रमुख नद्या आहेत. वर्धा मध्य प्रदेशात उगम पावते. पैनगंगा नदी ही वर्धेची मुख्य उपनदी आहे आणि वर्धेत सामील होण्यापूर्वी जिल्ह्याच्या दक्षिण सीमेवर वाहते. वर्धेच्या इतर उपनद्यांमध्ये यवतमाळ पठारावरच्या बेंबळा आणि निर्गुडा यांचा समावेश होतो. त्या फक्त पावसाळ्यात वाहतात. 

जिल्ह्याचं हवामान कोरडं आणि उन्हाळ्यात मध्यम थंड तर हिवाळ्यात गरम असतं. जिल्ह्यात सरासरी वार्षिक ९११.३४ मिमी (३६ इंच) पाऊस पडतो. जिल्ह्याच्या पश्चिम भागात ८८९ मिमी (३५ इंच) आणि पूर्व भागात ११२५ मिमी (४४इंच) पाऊस पडतो. आहे. नैऋत्य मोसमी हंगामात जवळपास सर्वत्र पाऊस पडतो. अलीकडच्या वर्षांत अतिवृष्टीमुळं पिकांचा नाश होणं आणि जमीन लागवडीसाठी अयोग्य होणं, हा प्रकार वाढला आहे.

यवतमाळ शहर आणि जिल्ह्याची भारतातल्या सर्व प्रमुख शहरांशी आणि महाराष्ट्राशी वाहतुकीची चांगली जोडणी आहे. राष्ट्रीय महामार्ग ७ या जिल्ह्यातून जातो. तर राज्य महामार्ग ३६१ हा यवतमाळ शहर आणि जिल्ह्यातून जातो. खांडवा (म.प्र.) ते करंजी हा प्रस्तावित राष्ट्रीय महामार्ग परतवाडा, अमरावती, यवतमाळ मार्गे जाणार आहे. जिल्ह्यात जवाहरलाल दर्डा विमानतळ भरी इथं आहे. यवतमाळ-मूर्तिजापूर रेल्वे मार्ग आणि वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे मार्ग, यांचं काम चालू आहे. भारतातली पहिली ब्रॉडगेज मेट्रो नागपूर ते यवतमाळपर्यंत धावणार आहे. 

ज्वारी आणि कापूस हे जिल्ह्याचं मुख्य उत्पादन आहे. कापूस आणि सागवान ही इथली प्रमुख निर्यात आहे. निर्यात होणाऱ्या इतर वस्तूंमध्ये चुना, लाकडी फर्निचर आणि संत्री यांचा समावेश होतो. सोयाबीन हे महत्त्वाचं पीक आहे. २००६ मध्ये पंचायत राज मंत्रालयानं यवतमाळला देशातल्या २५९ सर्वाधिक मागासलेल्या जिल्ह्यांपैकी एक मानलं आहे. 

या जिल्ह्याच्या जमिनीत डेक्कन ट्रॅप खडक आहे. लाव्हा बेड. त्यावर या जिल्ह्यात खाणकाम चालतं. हा जिल्ह्याच्या उत्पन्नाचा एक भाग आहे.

जिल्ह्यात बिटरगाव, टिपेश्वर, तिवसाळा आणि उंबर्डा इथं सामाजिक वनिकरण जंगलं आहेत. तिथल्या झाडांमध्ये साग, तेंदू, हिरडा, आपटा आणि मोहा, बांबू यांचा समावेश होतो. जंगलात आढळणाऱ्या प्राण्यांमध्ये जंगली अस्वल, हरीण, नीलगाय, सांबर, हायना आणि मोर यांचा समावेश होतो. टिपेश्वर आणि पैनगंगा इथं वन्यजीव अभयारण्य आहेत. टिपेश्वरला व्याघ्र प्रकल्प करण्याची तयारी सुरू आहे.

आर्णी आणि दिग्रस तालुका ही तीर्थक्षेत्रे आहेत. बाबा कंबलपोश आणि घंटीबाबा मंदिर यासाठी प्रसिद्ध आहेत. कळंबचं चक्रवती नदीच्या कधी चिंतामणी मंदिर, घाटंजीतलं मारोती महाराज मंदिर, रंगनाथ स्वामी, वणी, अंबा देवी, केळापूर आणि जांभोरा माहूर इथलं दत्त मंदिर प्रसिद्ध आहे. नेर तालुक्यात धनज माणिकवाडा फकीरजी महाराज संस्थान आहे. 

जिल्ह्यात गोंड राजा, गोंड, गोंड परधान, कोलाम, आंध आणि बंजारा हे समुदाय आहेत. 

लाभ वन्यजीव अभयारण्य, सहस्त्रकुंड धबधबा, पेनगंगेच्या काठावर कपेश्वर जंगल आणि गरम पाण्याचे झरे आहेत. सहस्त्रकुंड धबधबा मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवर आहे. या धबधब्याच्या अलीकडचा भाग नांदेड जिल्ह्यातल्या किनवट तालुक्यात येतो तर पलिकडचा भाग यवतमाळ जिल्ह्यातल्या उमरखेड तालुक्यात आहे.

महाराष्ट्रावर सर्वाधिक काळ म्हणजे १९६३ ते १९७५ पर्यंत राज्य करणारे मुख्यमंत्री वसंतराव नाईक आणि अल्पकाळ मुख्यमंत्री आणि हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राहिलेले सुधाकरराव नाईक, विदर्भाचा वाघ म्हटले जाणारे आणि विदर्भ जनता काँग्रेसचे संस्थापक जांबुवंतराव धोटे, भारतीय फील्ड हॉकी खेळाडू आकाश चिकटे, लोकमत दैनिकाचे संस्थापक आणि राज्याचे मंत्री जवाहरलाल दर्डा, क्रिकेटपटू अलिंद नायडू, ललित यादव, भौतिकशास्त्रज्ञ फहीम हुसेन, वकील आणि मराठी गझलकार वासुदेव वामन उर्फ भाऊसाहेब पाटणकर हे याच जिल्ह्यातले. लंडनमध्ये गाजलेल्या आजीबाई बनारसे याही याच जिल्ह्यातल्या.

यवतमाळ शहर नगरपरिषद आहे. हे यवतमाळ जिल्ह्याचं प्रशासकीय मुख्यालय आहे. हे शहर एका पठारावर वसलेलं आहे, जे इतर तालुक्यांपेक्षा तुलनेनं जास्त उंचीवर आहे. पूर्वी येओती किंवा येवतमाळ म्हणून ओळखलं जाणारं यवतमाळ हे बेरार सल्तनतचं मुख्य शहर होतं आणि जुन्या लिखाणानुसार जगातलं सर्वात सुरक्षित ठिकाण होतं. १८६९ मध्ये यवतमाळ नगरपरिषदेची स्थापना करण्यात आली, परंतु त्यानंतर लगेचच ती विसर्जित करण्यात आली. १८९४ मध्ये ती पुन्हा स्थापन झाली आणि जिल्ह्यातली सर्वात जुनी नगरपरिषद बनली. एलियट हे इथले पहिले महापौर होते आणि लेफ्टनंट डब्ल्यू. हेगे उपमहापौर होते. गोविंद पुनाजी बारी हे यवतमाळ नगरपरिषदेचे पहिले भारतीय अध्यक्ष होते. (२ जाने. १९१४ ते ३१ मे १९३२). २२ डिसेंबर १९३४ रोजी नगरपरिषदेच्या अध्यक्षपदासाठी पहिली निवडणूक घेण्यात आली होती. त्यापूर्वी त्यांची नियुक्ती करण्यात येत असे.

या जिल्ह्यात शकुंतला नावाची मिनी ट्रेन ही ब्रिटिश सरकारनं कापसाची वाहतूक करण्यासाठी बांधली होती. ती ऐतिहासिक ट्रेन आता बंद आहे.

या शहरात उष्णकटिबंधीय हवामान आहे. यवतमाळमध्ये वार्षिक सरासरी तापमान २६.८ अंश सेल्सिअस असतं. इथं सरासरी ९४६ मिमी पाऊस पडतो.

ब्रिटिश राजवटीत यवतमाळ शहर हिल स्टेशन म्हणून वर्गीकृत होतं. यवतमाळमध्ये कापूस-जिनिंग आणि प्रेसिंग दोन्ही चालतं. हे शहर जिल्ह्यातलं प्रमुख व्यापारी केंद्र आहे. तिथून २९ मैल (४७ किमी) अंतरावर असलेल्या धामणगाव स्टेशनशी रस्त्यानं जोडलेलं आहे. यवतमाळमधल्या प्रमुख उद्योगांमध्ये जीन्ससाठी डेनिम फॅब्रिक्स तयार करणाऱ्या रेमंड यूसीओ मिलचा समावेश आहे. 

लोहारा, दारव्हा, दिग्रस, पुसद, उमरखेड, वणी, उमरी, केळापूर, राळेगाव बाभूळगाव, नेर, आणि वणी-मारेगाव इथं प्रमुख औद्योगिक केंद्र आहेत. यवतमाळ शहर, आर्णी, वणी, दारव्हा, दिग्रस, घाटंजी, मोहडा, पुसद, उमरखेड आणि केळापूर  या मुख्य बाजारपेठा आहेत.

जिल्ह्यात पुसद हा तालुका आहे. पूस नदीच्या नावावरून हे नाव पडलं आहे. त्याचं प्राचीन नाव 'पुष्पवंती' होतं. पुसद हे यवतमाळ जिल्ह्यातलं दुसऱ्या क्रमांकाचं मोठं शहर आहे. पुसद हा आदिवासी भाग आहे. बंजारांची संख्या जास्त आहे. १३ व्या शतकातली हेमाडपंती स्थापत्यकलेची दोन मंदिरं, १८७४ साली बांधलेली एक उत्तम टाकी इथं आहे.

इथली मुख्य पिकं बाजरी, गहू, तूर, कापूस, भुईमूग, सूर्यफूल आहेत. पुसद तालुक्यातील डोंगराळ भागात मातीचा प्रकार खडबडीत किंवा काळ्या रंगाचा सैल भुसभुशीत आहे. सिंचनासाठी पूस नदीवर मध्यम आकाराचं पुसद शहराच्या वायव्येला १८ किमी (११ मैल) वरचं पूस धरण १९७१ मध्ये बांधलं गेलं. नंतर १९८३ मध्ये पुसदच्या पूर्वेला ४० किमी (२५ मैल) महागावजवळ खालचं पूस धरण बांधलं गेलं. कार्प माशांचा मत्स्यपालनाच्या व्यवसाय इथं चालतो. १९५८ च्या पूर्वीपासून पुसदमध्ये कापूस जिनिंग आणि ऑइल प्रेस कारखाने आहेत.

उमरखेड हे पैनगंगा नदीजवळील नगरपालिकेचं शहर आहे. ते तालुक्याचं ठिकाण आहे. हे यवतमाळपासून ११० किमी अंतरावर आहे. हे तिन्ही बाजूंनी पर्वत आणि घाटांनी वेढलेलं आहे आणि त्याच्या एका बाजूनं सपाटी आहे. उमरखेड शहरापासून ३.६ किमी अंतरावर असलेल्या चुरमुरा गावाजवळ अंबोना तलाव हे पर्यटन स्थळ आहे. नौकाविहार आणि सूर्यास्त आणि सूर्योदय पाहण्यासाठी प्रसिद्ध आहे. उमरखेडपासून किमी अंतरावर जेवली गावाजवळ पैनगंगा नदीतला सहस्रकुंड धबधबा आहे. ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये इथं पर्यटक येतात.

उन्हाळ्यात इथलं तापमान ४५ अंश सेल्सिअसपर्यंत वाढतं, तर हिवाळ्यात ८ ते १२ अंश सेल्सिअसपर्यंत घसरतं.

पैनगंगा वन्यजीव अभयारण्य इथं आहे. पैनगंगा नदी या अभयारण्याच्या तिन्ही बाजूंनी वाहते. हे ३२५ चौरस किलोमीटरच्या विस्तीर्ण क्षेत्रात पसरलेलं आहे. यात विविध प्रकारच्या वनस्पती आणि प्राणी आहेत. पैनगंगा वन्यजीव अभयारण्यात मिश्र पानझडी जंगलं आणि सागवान जंगलं आहेत. प्राण्यांच्या असंख्य प्रजातींमध्ये कोल्हा, बिबट्या, जॅकल, हरे, चार शिंगांचा काळवीट, पोर्क्युपिन, सांबर, नीलगाय, काळवीट, चिंकारा आणि इतर अनेकांचा समावेश आहे. पक्षी निरीक्षकांसाठी गिधाड, बुलबुल, कबूतर, किंगफिशर, कोकिळ, पतंग आणि इतर आहेत. पैनगंगा वन्यजीव अभयारण्याला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ म्हणजे जानेवारी ते जून. 

वणी तालुका यवतमाळ जिल्ह्याच्या पूर्व भागात असून चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेला लागून आहे. एक तालुका असूनही, वणी हे बाजारपेठेमुळं महत्त्वाचं व्यावसायिक केंद्र आहे. यवतमाळ शहर वणीपासून ११९ किमी आणि चंद्रपूर फक्त ५५ किमी अंतरावर आहे. पूर्वी वणीला 'वुन' म्हणून ओळखलं जात असे. शहराला निर्गुडा नदी आहे, जी पुढं वर्धा नदीत विलीन होते.

कोल इंडिया लिमिटेडची वेस्टर्न कोलफिल्ड्स ही उपकंपनी वणी शहराच्या परिसरात कोळसा खाण चालवते शहराजवळ उकनी, पिंपळगाव, जुनाड, कोलारपिंप्री, राजूर, कुंबरखणी, घोन्सा, नीलजाई, नायगाव या कोळसा खाणी आहेत.

तालुक्याची अर्थव्यवस्था मुख्यतः आजूबाजूच्या परिसरातली शेती आणि खाण व्यवसायांवर चालते. अनेक कापूस जिनिंग आणि प्रेसिंग युनिट्सदेखील कार्यरत आहेत. अलिकडच्या काळात कापूस बियाणं तेल मिलिंग युनिटदेखील सुरू झालीत. याशिवाय चुनखडीच्या उपलब्धतेमुळं वॉल पुटी उत्पादन युनिट्स इथं ग्रामीण भागात कार्यरत आहेत. एमआयडीसीमध्ये मेटल फॅब्रिकेशन युनिट, सिमेंट प्रीकास्ट आणि पाईप बनवण्याचं युनिट, डाळ मिल (पल्स प्रोसेसिंग फॅक्टरी) इ. आहेत.

कोळशाचे प्रचंड साठे आणि लगतच्या भागात असलेल्या अनेक कोळशाच्या खाणींमुळं या शहराला ब्लॅक डायमंड सिटी हे नाव पडलं आहे. कापूस आणि सोयाबीन ही प्रमुख पिकं आहेत.

परिसरात चुनखडीची उत्खननही केली जाते.

रंगनाथ स्वामी मंदिर, जैताई माता मंदिर, जोड-महादेव मंदिर, जैन स्थानक, संभवनाथ जैन मंदिर, काळाराम मंदिर, साई मंदिर, जगन्नाथ महाराज मंदिर, हनुमान मंदिर, महाकाली माता मंदिर, गणपती मंदिर, शिवमंदिर, शनी मंदिर, राम मंदिर, विठ्ठल मंदिर, संत गाडगे बाबा मंदिर, जटाशंकर मंदिर, गजानन महाराज मंदिर, दत्त मंदिर, जगदंबा मंदिर, महादेव मंदिर, जामा मशीद, मस्जिद ई हयात, नगिना मशीद, मदिना मशीद, अक्सा मशीद, दर्गाह हजरत सय्यद मुराद अली शाह बाबा, दर्गा ख्वाजा मोहम्मद हयात, शीख गुरुद्वारा, सिंधी गुरुद्वारा, मेथोडिस्ट चर्च, नवीन मेथडिस्ट चर्च एवढं सगळं या शहरात आहे.

दारव्हा हा तालुका आहे. यवतमाळ जिल्ह्यातलं एक शहर आणि नगरपरिषद आहे. रंगो बापूजी गुप्ते हे स्वातंत्र्यसैनिक शहरात गुप्तपणे राहत होते, असं इथं सांगितलं जातं. हे शहर 'गोळीबार चौक' या चौकासाठीदेखील प्रसिद्ध आहे. इथं ब्रिटिश सैनिकांनी निशस्त्र मेळाव्यावर गोळीबार केला होता.

दारव्हा इसवी सन १८०० ते १९०० या काळात शेंगदाणा तेल आणि कापसाच्या मोठ्या बाजारपेठांपैकी एक होतं. तिथं ८ जिनिंग आणि २०९ तेल घाणी होत्या. सातवाहन काळात दारव्हा हे गुरं, दुग्धजन्य पदार्थ, कापूस आणि कापूस बियाण्यासाठी प्रसिद्ध बाजारपेठ होतं.

दारव्हा शहरापासून दोन किमी अंतरावर दिग्रस रस्त्यावर बैरागी बाबा मठ आहे. त्याची स्थापना रंगो बापूजी गुप्ते यांनी केली होती. ब्रिटिश शासकांपासून ते इथं लपून राहिले होते. 

जिल्ह्यातलं महागाव हे कॉटन टाउन म्हणून ओळखलं जाणारं छोटं तालुक्याचं गाव आहे. महागाव जवळपास सर्व बाजूंनी डोंगरांनी वेढलेलं आहे. पूस नदी इथून वाहते. ती पिण्याच्या पाण्याचा आणि सिंचनाच्या पाण्याचाही स्रोत आहे.

महागाव गावात साक्षरतेचं प्रमाण जास्त आहे. महागाव गावाचा साक्षरता दर महाराष्ट्राच्या ८२.३४% च्या तुलनेत ८५.५४% आहे. महागावमध्ये पुरुष साक्षरता ९१.३१% आहे, तर महिला साक्षरता दर ७९.६८% आहे.

महागाव आणि आजूबाजूचा परिसर बहुतांशी उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत म्हणून शेतीवर अवलंबून आहे. पूस धरण, वेणी धरणामुळं या भागातली जमीन चांगली सिंचनाखाली आहे. पूस नदीतून शेतीला थेट सिंचनाचं पाणीही मिळतं. 

इथल्या मुख्य पिकांमध्ये ऊस, कापूस, सोयाबीन, बंगाल हरभरा, ज्वारी आणि गहू यांचा समावेश होतो. शहरात कापूस आणि धान्याची बाजारपेठ आहे. महागावची मुख्य पिकं कापूस व ऊस ही असल्यानं वसंत सहकारी साखर कारखाना, वसंतनगर आणि पुष्पवंती सहकारी साखर कारखाना, सवना हे दोन सहकारी साखर कारखाने आहेत. पिंपळगाव इथं बाबासाहेब नाईक कॉटन मिल आहे.

जिल्ह्यात तालुका असलेलं आर्णी हे गाव अरुणावती नदीच्या काठावर वसलेलं आहे.आर्णी कापूस उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. त्याच्या लगतच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीन आणि कापूस पिकाची शेती आहे. इथं मोठा धान्य बाजार आहे आणि ३ उप-धान्य बाजार आणि एक खाजगी धान्य बाजारदेखील आहे.

आर्णी यवतमाळनंतर जिल्ह्यातली सर्वात मोठी बाजारपेठ आहे. शहरात ५ कापूस जिनिंग आणि प्रेसिंग मिल्स, २ पीनट मिल्स आणि एक डाळ मिल आहेत.

तालुका केळापूर (ज्याला पांढरकवडा असंही म्हणतात.) हे भारताच्या हे श्रीनगर - नागपूर - हैदराबाद - बंगलोर - कन्याकुमारी राष्ट्रीय महामार्ग ४४ वर आहे.

मल्लिकार्जुन मंदिर, घंटी बाबा मंदिर, भवानी देवी मंदिर, रामानंद महाराज मठ, शनी मंदिर, नगिना मशीद, लाल इमारत इथं प्रसिद्ध आहेत.

जिल्ह्यात घाटंजी हे खूप जुनं शहर आणि नगरपरिषद आहे. या भागात शेतकरी दर्जेदार कापसाचं उत्पादन घेत असल्यानं याला 'कॉटन सिटी' असंही म्हणतात. हे तालुक्याचं ठिकाण वाघाडी नदीच्या काठी आहे. वाघाडी नदी आणि तिच्या धरणामुळं पाण्याची सोय आहे. सागवान लाकूड, निलगिरीची झाडं आणि इतर अनेक मसाल्यांच्या झाडांचा समावेश असलेलं भरपूर वनक्षेत्र इथं आहे. या जंगलांमध्ये विविध प्रकारचे प्राणी राहतात.

नेर यवतमाळ जिल्ह्यातला तालुका आहे. फकीरजी महाराज मंदिर, गणपती मठ नावाचं गणेश मंदिर, सोमेश्वर मंदिर, जामा मशीद, कृषी उत्पन्न बाजार समिती आणि कापूस बाजार यांचा समावेश आहे.

राळेगाव यवतमाळ जिल्ह्यातलं तालुक्याचं ठिकाण आहे. राळेगाव कापूस उत्पादनात आणि सोयाबीन आणि इतर डाळींच्या उत्पादनात विशेष आहे. हे महाराष्ट्राची कापसाची राजधानी म्हणूनही ओळखलं जातं. या तालुक्यात दहाहून अधिक जिनिंग व प्रेसिंग व एक रॉ ऑइल मिल आहे. 

पूर्वी हे शहर यवतमाळ जिल्ह्यातल्या पांढरकवडा तालुक्याचा भाग होता आणि नंतर तो तालुका झाला. 

तालुका कळंब गणेश आणि मुस्लिम विद्वान बाबा बासुरीवाले यांच्या मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. कळंबकचं गणेश मंदिर हे विदर्भातल्या अष्टविनायकापैकी एक आहे. 

सतराव्या शतकाच्या सुरुवातीला हे गाव मुघल साम्राज्याच्या अंतर्गत त्याच नावाच्या सरकारची (सुभा) राजधानी होतं. एक महत्त्वाचं महसूल गाव होतं. त्याचं नाव पूर्वी 'कलाम' असं होतं.

बाभुळगाव हा यवतमाळ जिल्ह्यातला तालुका आहे. यवतमाळपासून २२ किमी अंतरावर आहे.

झरी जमनी हाही यवतमाळ जिल्ह्यातला तालुका आहे.

मारेगाव हा यवतमाळ जिल्ह्यातला तालुका आहे. मारेगाव हे एक लहान गाव आहे. इथं २०१५ मध्ये नगर पंचायत घोषित करण्यात आली. हे वणी यवतमाळ रस्त्यावर वणीपासून १८ किमी अंतरावर आहे.

इथला प्रमुख व्यवसाय शेती आहे. कापूस आणि सोयाबीन ही दोन्ही महत्त्वाची पिकं आहेत. काळी माती आहे. मारेगाव इथं तहसील कचेरी, पंचायत समिती, दिवाणी न्यायालय व इतर कार्यालयं व बँका आहेत. मार्डी रस्त्यावर चार किमीवर सिमेंट कारखाना, नवरगाव इथं धरण, नरसाळा इथं स्टोन व क्रशर खाणी, वणी रस्त्यावर गौराळा इथं चुनखडीच्या खाणी आहेत.

दोन जिनिंग आणि प्रेसिंग कारखाने आहेत. लोकसंख्येमध्ये बहुतेक आदिवासींचा समावेश आहे. त्यात गोंड आणि कोलाम जमाती आहेत. या तालुक्याचं विभाजन करूनच ‘झरी-जमनी’ हा दुसरा तालुका तयार करण्यात आला आहे. या भागात अलीकडच्या काळात नवीन कोळशाच्या खाणींचा शोध लागला आहे. लोअर पूस धरण, फॉक्सटेल इको रिट्रीट, टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य इथं आहे.

बोरेगाव बांध - यवतमाळपासून ५ कि.मी. अंतरावर बोरेगाव बांध हे लोकांच्या पाहण्याचं ठिकाण आहे. 

टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य - यवतमाळमधल्या सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळांमधे या अभयारण्याचा समावेश होतो. १४८.६३ वर्ग किलोमीटर परिसरात पसरलेल्या या अभयारण्याला निसर्गाचं वरदान आहे. अनेक प्रकारच्या वनस्पती या ठिकाणी आहेत. या जंगलात वाघ, जंगली डुक्कर, चित्ता, हरिण, ब्ल्यू बेल, एंटीलोप्स, बाइसन पाहायला मिळतात.

यवतमाळ जिल्ह्यातून संत्रा, लिंबू आणि लाकडाचं फर्निचर यांची निर्यात मोठ्या प्रमाणात केली जाते.

संकलन:-गजानन गोपेवाड

Featured Post

व्यायाम व योगा अवश्य करावा*

*व्यायाम व योगा अवश्य करावा*  *व्यायाम व योगा करण्याचे दहा फायदे:-*  1) व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते: व्यायाम करणारी...