*किती खाल्लं तरी शरीर हाडकुळं दिसतं?*
व्हिटामीन बी-१२ देणारे 5 पदार्थ खा, ताकद येईल-फिट दिसाल
Eat 10 Vitamin B3 And B-12 Rich Foods:-
थकव्यापासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही बी १२ किंवा बी३ च्या सप्लिमेंट्स घेऊ शकता.
थोडं काम केलं की लगेच थकवा येतो, झोप लागते, शरीराला आरामच मिळत नाही अशी अनेकांची तक्रार असते. तुम्हालाही सतत थकवा येत असेल तर याची अनेक कारणं असू शकतात. (Health Tips) आहारातज्ज्ञ श्वेता पांचळ यांनी शारीरिक कमजोरी, थकवा यामगे व्हिटामीन बी-१३, बी३ ची कमतरता, ताण-तणाव, लठ्ठपणा ही ३ कारणं असल्याचे सांगितले आहे. (Health Tips)
डॉक्टरांचा सल्ला आहे की थकव्यापासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही बी१२ किंवा बी३ च्या सप्लिमेंट्स घेऊ शकता. थकवा आणि कमकुवतपणा दूर करण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय फायदेशीर ठरतील.
*चीझ,दही*
हे पदार्थ व्हिटामीन्सचा चांगला स्त्रोत आहेत. व्हिटामीन बी १२, कॅल्शियम आणि प्रोटीन्स असे तिन्ही घटक यातून मिळतात. याशिवाय ब्रोकोली तिच्यातील पोषक तत्वांमुळे महत्वाची मानली जाते. बोकोलीत व्हिटामीन्स, मिनरल्स भरपूर असतात. ज्यामुळे कॅल्शियमची कमतरता दूर होते.
*ड्रायफ्रूट्स*
नियमित ड्रायफ्रुट्सचे सेवन करा, व्हिटामीन बी १२ ची कमतरता दूर करण्यासाठी बदामाचे अधिकाधिक सेवन करायला हवे. बदाम एक नट आहे. ज्यात व्हिटामीन बी व्यतिरिक्त प्रोटीन, कॅल्शियम, आयर्न आणि इतर मिनरल्स असतात. आपल्या आहारात फळं, टोमॅटो, टोफू, स्प्राऊट्स, मशरूममध्ये व्हिटामीन बी-१२ भरपूर प्रमाणात असते.
*व्हिटामीन बी-१२ ने परिपूर्ण खाद्यपदार्थांचे सेवन*
व्हिटामीन बी-१२ शरीरासाठी महत्वाचे असते. यामुळे हाडांपासून मसल्सपर्यंत सर्व अवयवांना ताकद मिळते. यासाटी तुम्ही लीन मीट, बीन्स, मटार, डाळी, नट्स, सि्डस, सोया उत्पादनांचा आहारात समावेश करू शकता.
*व्हिटामीन बी-३ युक्त पदार्थ खा*
व्हिटामीन बी३ ला नियासिन असेही म्हटले जाते. शरीरातील पोषक तत्वांची कमतरता, थकवा, कमकुवतपणा दूर होतो. याची कमतरता पूर्ण करण्यासाठी प्रोटीन्सयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा.
*ताण-तणाव घेऊ नका*
जास्त ताण-तणाव घेतल्यास याचा तुमच्या शारीरिक मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. हे टाळण्यासाठी नियमित व्यायाम करा, पौष्टीक आहार घ्या, चांगली झोप घ्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा