गुरुवार, ११ नोव्हेंबर, २०२१

डॉ. सलीम अली पक्षीशास्त्रज्ञ

 *🦚🦚🦚डाॅ. सलिम अली🦚🦚🦚*

🦅🦉🦇🦆🦃🦚🦜🦢🦩🕊️🐥

*🦜🦩🦢🕊️पक्षीशास्त्रज्ञ🕊️🦢🦩🦜*

🦅🦉🦇🦆🦃🦚🦜🦢🦩🕊️🐥

*जन्मदिन - १२ नोव्हेंबर १९०४*      


डॉ सलिम अली  (सलिम मोईझुद्दीन अली)

     जन्म १२ नोव्हेंबर १८९६

      मृत्यू - २७ जुलै १९८७    भारतातील आद्य पक्षिशास्त्रज्ञ  तसेच भारताचे आद्य पर्यावरणवादी होते. सलिम अली यांनी ब्रिटिश राजमधील काळात भारतातील पक्ष्यांचा मोठ्या प्रमाणावर अभ्यास केला. पक्ष्यांचा आढळ, त्यांच्या सवयी, विविध प्रकारच्या जाती, जातींमधील विविधता यांचा बारकाईने अभ्यास केला. त्यांच्या                                                                                                                                                                                                    सवयी, विविध प्रकारच्या जाती, जातींमधील विविधता यांचा बारकाईने अभ्यास केला. त्यांच्या ह्या कार्याने भारतात *हौशी पक्षीनिरिक्षक* बनण्याची परंपरा चालू झाली. *भारतात पक्षी निरिक्षक सलिम अली यांना आद्य गुरु मानतात*.

आपल्या आत्मचरित्रात डॉ. अली आपण पक्षीनिरिक्षणास कसे वळलो याचे वर्णन करतात. जुन्या मुंबईच्या खेतवाडी मध्ये मुस्लिम कुटुंबात अली यांचा जन्म झाला. लहानपणी भेटवस्तू म्हणून दिलेल्या छ-याच्या बंदूकीने लहान पक्षी टिपायचे हा त्यांचा छंद होता. एके दिवशी टिपलेल्या चिमण्यांमध्ये त्यांना वेगळी चिमणी मिळाली. हिच्या गळ्यापाशी पिवळा ठिपका होता. नेहेमी पेक्षा वेगळा दिसल्याने त्यांची उत्सुकता चाळवली व त्यांच्या मामांकडे हा पक्षी कोणता याची विचारणी केली. मामांनी सरळ त्याला बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीच्या 

( *BNHS* ) 

संचालकाकडे घेउन गेले. तेथे संचालकांनी लहान अलीला हा कोणता पक्षी आहे हे सविस्तर सांगितले. तसेच भुसा भरलेल्या पक्ष्यांचा संग्रह दाखवला. भारावलेल्या लहान सलिम अलींना पक्ष्यांची जी भुरळ पडली ती कायमचीच.

यानंतरच्या काळात सलिम अलींचा पक्षिछंद त्यांची टिपणे व नोंदी करणे यात मर्यादीत राहिला. शालेय शिक्षणानंतर त्यांना प्राणी शास्त्रात पदवी घ्यायची होती परंतु शास्त्रातील अनेक अवघड विषयांमुळे माघार घ्यावी लागली. दरम्यान ते ब्रम्हदेशातील आपल्या बंधूंच्या धंद्याला मदत म्हणून रंगूनला गेले. तेथे धंद्यात मदतीसोबत ब्रम्हदेशातील जंगले फिरुन पक्ष्यांना टिपून नोंदी ठेवायचा छंद चालू ठेवला. १९१८ मध्ये त्यांचा *तेहमिना यांच्यांशी विवाह झाला.  एका यशस्वी पुरुषामागे पत्नीचा हात असतो ही म्हण सलिम अलींच्या बाबतीत तंतोतंत लागू होते. १९२४ मध्ये रंगून मधील धंद्यात अपयश आल्यानंतर अली भारतात परत आले. दरम्यान तेहमिना यांनी सलिम अलींचा पक्ष्यांबद्दलचा कल जाणून घेतला होता व त्यांना अशी नोकरी करण्यास प्रोत्साहन दिले ज्यात त्यांचा छंद जोपासला जाईल. परंतु सलिम अलींचे शिक्षण अशी नोकरी मिळवण्यास एकदम जुजबी होते. जवळच्या ओळखीने त्यांना बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीमध्ये गाईड लेक्चररची नोकरी मिळाली परंतु अलींना ते पुरेसे नव्हते. त्यावेळेस भारतात *पक्षीशास्त्र* (ornithology) हा विषय अस्तित्वातच नव्हता. यासाठी त्यांनी जर्मनीमध्ये जाऊन पक्षीशास्त्रावर प्रशिक्षण घेतले व काही काळ इंग्लंडमध्ये काम केले.

भारतात आल्यानंतर या विषयात नोकरी मिळणे कठीण काम होते. सलीम अली अजूनही हौशी पक्षी निरिक्षकांमध्येच गणले जात. आर्थिक परिस्थिती खालावल्याने त्यांनी आपल्या पत्नीच्या मदतीने अलिबागजवळ किहीम येथे आपला मुक्काम हलवला. या मुक्कामात त्यांनी सुगरण पक्ष्याच्या वर्तनावर अतिशय बारकाईने अभ्यास केला व त्यावर *BNHS* च्या जर्नलमध्ये प्रदीर्घ शोधनिबंध लिहीला. या निंबधाने त्यांना पक्षीशास्त्रज्ञ म्हणून नावलौकिक मिळवून दिला. तसेच केवळ टिपून भुसा भरुन संग्रहालयात ठेवण्यापुरते पक्षीशास्त्र नाही हे त्यांनी जगाला दाखवून दिले व एकूणच पक्षीशास्त्राला वेगळी दिशा दिली.

या नंतर १९३० च्या सुरुवातीला सलीम अलींना ब्रिटीश सरकार तसेच विविध संस्थाने पुरस्कृत पक्षी मोहिमांवर बोलवणे येऊ लागली. अलींनी या मोहिमांवर आपण नोंदी तसेच पक्ष्यांचा जीवनशैलींवर अभ्यास करणार असल्याचे स्पष्ट केले, केवळ पक्षी टिपून नोंदी ठेवण्यात आपल्याला रस नाही ते काम कोणीही स्थानिक कामगार करु शकेल असे स्पष्ट केले.

आता अली सर्वमान्य पक्षी शास्त्रज्ञ झाल्यामुळे तत्कालिन ब्रिटिश अधिका-यांनी मंजूरी दिली व सलीम अलींचे खरेखुरे पक्ष्यांचे काम सुरु झाले. या नंतरच्या काळात भारताच्या मोठ्या भूभागावर त्यांनी पक्षी निरिक्षण मोहिमा आखल्या. वायव्य सरहद्दीपासून ते केरळच्या जंगलांपर्यंत तसेच कच्छच्या दलदली पासून पुर्वेकडे सिक्कीम व अरुणाचलपर्यंत त्यांनी पक्ष्यांच्या नोंदी केल्या. त्यांचे वर्तन, हवामानानुसार होणारे त्यांचे बदल, स्थलांतराच्या सवयी, विणीचे हंगाम यावर मोठ्या प्रमाणावर माहिती गोळा केली.

सुरुवातीला या कामी त्यांची पत्नी तेहमीनाने खूप मदत केली. त्याच सलीम अलींच्या मोहिमांचे प्रोजेक्ट मॅनेजमेंट बघत. १९३९ मध्ये तेहमिनांचा मृत्यु झाल्यानंतर अली खुपच व्यथित झाले व त्यांच्या आयुष्यात खुप मोठी पोकळी निर्माण झाली. परंतु त्यातून सावरुन पुन्हा लग्न न करता त्यांनी आपले आयुष्य संपूर्णपणे पक्ष्यांना वाहून देण्याचे ठरवले. आपला मुक्काम मुंबईला बहिणीच्या घरी हलवला व तेथूनच आपले उर्वरित आयुष्य घालवून भारतीय पक्षीशास्त्रासाठी अजरामर ठेवा निर्माण केला.

*सलीम अलींचे पक्षी शास्त्रज्ञ म्हणून मोठेपण कशात आहे तर त्यांनी प्रकाशित केलेली पुस्तके.*

भारतभर फिरुन त्यांनी जी तपशीलवार माहिती गोळा केली होती, त्यांचे त्यांनी केवळ रेकॉर्डसमध्ये स्थान न ठेवता ती माहिती सर्व सामान्यांना वापरता येईल अश्या शैलित पुस्तके लिहिली.

सुरुवातीच्या काळात त्यांचे लिखाण सुधारण्यातही त्यांना तेहमिनांनी मदत केली.

१९४३ मध्ये लिहिलेले द बुक ऑफ इंडियन बर्डस हे आजही पक्षी ओळखण्यासाठी पहिल्या पसंतीचे आहे. आज हे पुस्तक १३व्या आवृतीत असून पुस्तकातील मुख्यत्वे पक्ष्यांची चित्रे बदलण्यात आली आहेत. या वरुन त्यांनी केलेल्या सूक्ष्म निरिक्षणांची अचूकता लक्षात येते.

त्यांनी लिहीलेल्या *हँडबुक ऑफ इंडिया अँन्ड पाकिस्तान व पिक्टोरियल गाईड या दहा खंडीय पुस्तकाने त्यांना खर्या अर्थाने अजरामर केले.* डॉ सिडने डिलन रिप्ली यांच्या साथीत त्यांनी अपार परिश्रम घेउन भारतीय पक्ष्यांच्या १२०० जाती, २१०० उपजातींच्या नोंदी, सवयी, शास्त्रशुद्ध सर्वांगीण माहिती चित्रांसहीत एकाच ठिकाणी उपलब्ध केली.

१९५० व ६० च्या दशकात जेव्हा भारतात *पर्यावरण* हा शब्द अस्तित्वातच नव्हता त्यावेळेस भरतपूरच्या केवलदेव घाना राष्ट्रीय उद्यान तसेच केरळमधील सायलंट व्हॅली राष्ट्रीय उद्यानात तत्कालिन होणारे पर्यावरणास हानीकारक प्रकल्पांना विरोध दर्शावला. त्यांनी केलेल्या शास्त्रीय वादावर सरकारने नमते घेऊन इंदिरा गांधी सरकारने हे प्रकल्प स्थगित केले. तसेच अंततः त्यांना राष्ट्रीय उद्यानांचा दर्जा देऊन कायमचे संरक्षित केले. तसेच अनेक दुर्मिळ प्राणी व पक यांबाबत आपल्या पुस्तकांद्वारे, संस्थेद्वारेशिष्यांमार्फत सरकार तसेच सामान्य नागरिकात केलेले प्रबोधन भारतात पर्यावरचळवळीचा पाया ठरले. त्यामुळेच भारतातील आद्य पर्यावरणवाद्यांमध्ये डॉ अली यांचा समावेश होतो..!

🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

संकलन -)गजानन गोपेवाड  

उमरखेड जिल्हा - यवतमाळ ४४५२०६



प्रभात दर्शन

 🌳⛳ *शुभ प्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

कार्तिक मास,शुक्ल पक्ष, *नवमी*,धनिष्ठा नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,हेमन्त ऋतु,युगाब्द ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

शुक्रवार, १२ नोव्हेंबर २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                         *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


मृगा मृगैः संगमुपव्रजन्ति 

              गावश्च गोभिस्तुरगास्तुरंगैः,

मूर्खाश्च मूर्खैः सुधयः सुधीभिः

              समानशीलव्यसनेषु सख्यं॥


*भावार्थ - मृगों के साथ मृग, गायों के साथ गाय, घोड़ों के साथ घोड़े, मूर्खों के साथ मुर्ख और बुद्धिमानों के साथ बुद्धिमान रहते हैं। अर्थात समान आचरण और आदतों वालों में ही मित्रता सहज होती है।"*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


बुधवार, १० नोव्हेंबर, २०२१

10 शिवप्रताप दिवस

 

*संकटात संधी शोधली !आणि....अफजलखानाचा वध झाला.*

10 नोव्हेंबर  1659
आज या प्रसंगाला 362 वर्षे  झाले तरी या प्रसंगाची उत्सुकता  आजही कायम आहे.
छत्रपती  शिवाजी महाराजांनी स्वराज्याची  मुर्हतमेढ रोवल्यानंतर पहिले मोठे संकट आले ते म्हणजे  अफजलखानाचे ! अफजलखान  हा विजापूर दरबारातील मातब्बर सरदार ... त्यांची दहशत मोठी होती.  दख्खनच्या पठारावरील सर्वात मोठा योध्दा , ज्याला सिलोनचा [श्रीलंका] अधिपती घाबरत असे. तो स्वतःला  बुतशिकन आणि  कुफ्रशिकन  म्हणजे  मूर्ती  आणि  मूर्तिपूजेचा विध्वंस करणारा असे स्वतःला म्हणवून घेत असे. विजापूर दरबाराने शिवरायांच्या स्वराज्याला पायबंद घालण्यासाठी अफजलखानाला ३५००० हजारांची फौज देऊन महाराष्ट्रात  पाठवले.याबाबत आदिलशाही दरबारातील समकालीन इतिहासकार  नेरुल्ला आपल्या  "तारीखे अली " पुस्तकात  स्पष्ट  म्हणतो की , खानाला निरोप  देताना आदिलशाहने  स्पष्ट  सांगितले  होते की,  शिवरायांशी तह न करता ," त्यांच्या जीवनरुपी धान्याच्या राशीवर मृत्यूरुपी अग्नीचा वर्षाव करणे. " यावरुन खानाचा हेतू शिवरायांना  ठार मारण्याचाच होता हे स्पष्ट  होते. शिवराय त्यावेळी राजगडावर होते.*जिहादी आतंकवाद असा संपवा*


मंगळवार, ९ नोव्हेंबर, २०२१

शिवप्रताप दिवस

 शिवप्रताप दिन...गाथा शौर्याची...

१० नोव्हेंबर...शिवप्रताप दिन..!!

संकटाच संधीत रूपांतर करून ऊत्कर्ष कसा साधायचा याचा मुलमंत्र शिवरायांनी दिला...

अशा या विश्ववंद्य छत्रपती शिवरायांना शिवप्रताप दिनी मानाचा मुजरा ...!!

अफजलखानाविरूद्धच्या प्रतापगड रणसंग्रामात तलवार गाजवणाऱ्या दहा शिवराजरक्षक योद्ध्यांचा गौरव करताना कवी परमानंद आपल्या शिवभारतपुराणात लिहीतात...

तदा संभः कावुकीयःकाट्कश्वेंगालसंभवः ।

कुंडजिच्च यशोजिच्च द्वाविमौ कंकवंशजौ ।।

गोकपाटान्वयः कृष्णः शूरजित् कांटकोपि~च ।

तथैव माहिलो जीवो विश्वजिच्च मुरूंबकः ।।

संभः करवरस्तद्वदिभरामोपि बर्बरः ।

एते दश महावीराः शिवराजाभिरक्षिण ।।

कृतश्वेडारवाः कोषनिष्कासितमहासयः ।

प्रत्यगृह्रन्त तांस्तत्न पवनानिव पर्वताः ।।

अर्थात :

संभाजी कावजी, काताजी इंगळे, कोंडाजी व येसाजी हे दोन कंक, कृष्णाजी गायकवाड, सुरजी कांटके, त्याचप्रमाणे जिवा महाला, विसाजी मुरंबक, संभाजी करवर व इभ्राहम शिद्दी(बर्बर) अशा ह्या शिवराजरक्षक दहा वीरांनी गर्जना करून, म्यानातून प्रचंड तलवार उपसून, पर्वतांनी जसे वायूस आडवावे तसा त्यांना (खानाच्या योद्ध्यांस) विरोध केला..

प्रतापगडच्या रणसंग्रामात शिवरायांचे रक्षण करणाऱ्या ह्या महान समशेरबहद्दरांना मानाचा मुजरा....

जय जिजाऊ ...जय शिवराय..!!

⛳⛳⛳⛳

――――――――――――

#शिवप्रतापदिन #_10_नोव्हेंबर

#शिवप्रतापदिन...


प्रभात दर्शन

 🌳⛳ *शुभ प्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

कार्तिक मास,शुक्ल पक्ष, *षष्ठी*,उ.षा.नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,हेमन्त ऋतु,युगाब्द ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

बुधवार, १० नोव्हेंबर २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                         *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


        *"एक मुर्ख व्यक्ति को समझाना सरल है, एक बुद्धिमान व्यक्ति को समझाना उससे भी सरल है, लेकिन एक अधूरे ज्ञान से भरे व्यक्ति को भगवान ब्रह्मा भी नहीं समझा सकते, क्यूंकि अधूरा ज्ञान मनुष्य को घमंडी और तर्क के प्रति अँधा बना देता है।"*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


ध्यान साधना

 *राग काटकसरीने कसा वापराल ?* 

*रागातल्या ऊर्जेचा सकारात्मक वापर कसा करावा ?*


मी चुकतोय.... हे कळणे म्हणजे आपोआपच पुढची चूक टाळणे.


*मी तर म्हणेन, दाग अच्छे है*, च्या धर्तीवर राग चांगला असतो, असे म्हणणे योग्य ठरेल.


*उदा*. आपल्याला कचर्‍याचा राग येतो, म्हणून तर आपण स्वच्छता ठेवतो, आपल्याला गरिबीचा तिटकारा असतो म्हणून आपण रोज कामावर जातो, लोकांनी केलेल्या अपमानाचा आपल्याला राग येतो म्हणून तर, इच्छा असो वा नसो, आपण आपलं काम चोखपणे पार पाडतो!


*राग ही एक उर्जा आहे, आपल्यालाही राग येतो आणि असामान्य लोकांनाही राग येतो, पण ते लोक आपल्या रागातून निर्माण झालेल्या उर्जा व्यर्थ घालवत नाहीत, तिचा सकारात्मक वापर करुन विश्व बदलून टाकतात.*


*मार्टीन ल्युथर किंगला* राग आला आणि त्याने अमेरीकाच बदलून टाकली.


*नेल्सन मंडेलाला* कृष्णवर्णीयांवर होणार्‍या अन्यायाची चीड आली आणि त्याने अफ्रिका हादरुन टाकली.


 *शिवाजी महाराजांनी* केलं, *आंबेडकरांनी* तेच केलं. त्यांनी आपला राग एकदाच व्यक्त होवून शांत होऊ दिला नाही, तो निखारा त्यांनी आपल्या हृदयात सतत पेटता ठेवला, आणि शेवटच्या श्वासापर्यंत त्यातून मिळलेलं इंधन आपल्या स्वप्नपूर्तीसाठी वापरलं!..


ते जे करु शकतात ते आपणही करु शकतो की!


*फालतू गोष्टींवर रागराग करुन आपली बहुमूल्य उर्जा वाया घालवण्यापेक्षा तिचं रुपांतर तीव्र इच्छाशक्तीमध्ये करायला शिकणं, हीच खरी आनंदाची आणि यशाची गुरुकिल्ली आहे.*


जिथं राग येतो अशा परिस्थितीला हाताळण्यासाठी काही टिप्स देत आहे.


१) *स्विकार करा.*

समजा, तुम्ही कॉम्पुटरवर खूप महत्वाचं काम करत आहात, आणि लाईटस गेले, आता तुम्ही चिडचिड करुन काही फायदा आहे का? शिव्या देऊन, डोकं खराब केल्याने फायदा काहीच होणार नाही, झालं तर नुकसानच होईल, म्हणुन ‘लाईट गेली’, याचा स्विकार करा, आणि दुसरे एखादे काम शोधा, त्यात रममाण व्हा!, त्याचा आनंद घ्या!


असचं समजा, तुम्ही ट्रॅफीक जॅममध्ये अडकला आहात, मग आता किरकिर करुन कर्कश हॉर्न वाजवुन, आजुबाजूच्यांशी भांडून काय साध्य होणारे? त्यापेक्षा कारमध्ये मस्त गाणे लावा, आणि आनंद घ्या!


२) *स्वतःला दररोज सुधारा. सिद्ध करा.*

कोणी तुमची चुक नसताना अपमान केला, फसवले किंवा भांडले तर त्यावर जास्त विचार करुन वेळ वाया घालवणं, म्हणजे मुर्खपणा आहे, नको त्या आठवणी कुरवाळत बसायचे नसते, त्या विसरायच्या असतात पण त्यातून कमवलेला अनुभव, मिळालेला धडा मात्र आयुष्यभर आपोआप लक्षात ठेवायचा.


३) *चुप्प बसा. विसरा.*

कधी कधी आपल्याला दुखावणारे आपलेच लोक असतात, अशा लोकांना जबर प्रत्युत्तर देऊन आपणच घायाळ होतो, अशा जखमा होतात, ज्या भरण्यासाठी आयुष्य जावे लागते. म्हणून अशा वेळी मौन पाळणे सोयीस्कर ठरते.


आईवडील, भाऊ बहीण, बायकोमुले, जिवलग मित्र, जवळचे नातेवाईक, कर्मचारी, सहकारी, भागीदार, ग्राहक यांच्याशी लढाई करुन आपण जिंकलो तरी त्या युद्धात आपलेचं लोक हरलेले असतात, आपल्या शब्दांनी रक्तबंबाळ झालेले असतात.


अशा विजयश्रीचा आनंद साजरा तरी कसा करावा?


म्हणून काही ठिकाणी गप्प राहणं, तिथून निघून जाणं आणि मौन पाळणं, श्रेष्ठ असतं!


४) *आभार मानून आनंदी व्हा!*

ज्या व्यक्तिचा राग येतोय, त्याच्यात काही चांगले गुणसुद्धा आहेत, त्याने कधी तुम्हाला मदत सुद्धा केलीय, ते आठवून त्याचे आभार माना. राग पळून जाईल.


५) *हसा!*

कितीही वाईट परिस्थीती असो, त्याकडे पाहून हसा, विनोद करा, खळखळून हसा, मजा घ्या, दुःखाची तिव्रता नाहिशी होईल!


*ठरवा रागाचा वापर कशासाठी करायचा.*


*आपला प्रत्येक दिवस आनंदात जावो हीच सदिच्छा*

10 नोव्हेंबर जागतिक विज्ञान दिवस

 *🔭🔬१० नोव्हेंबर 🔬🔭*

🔬⚗️🔭🔬⚗️🔭🔬⚗️🔭🔬

*जागतिक विज्ञान दिवस*

🔬⚗️🔭🔬⚗️🔭🔬⚗️🔭🔬

१० नोव्हेंबर, या दिवशी जगातील शांतता आणि विकास या विषयावर जागतिक विज्ञान दिन साजरा केला जातो.हा दिवस समाजात विज्ञानाची महत्त्वपूर्ण भूमिका आणि उदयोन्मुख वैज्ञानिक समस्यांवर सार्वजनिक चर्चा करण्याची गरज ह्यावर भर देतो.


ह्या दिवसाचा हेतू नागरिकांना विज्ञान मध्ये विकासाविषयी माहिती दिली असल्याचे सुनिश्चित करण्याचा आहे. हा दृष्टिकोन वाढवण्यासाठी वैज्ञानिक भूमिका बजावतात ती भूमिका लोकांसमोर आणायला हा दिवस साजरा केला जातो.


*शांती आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिन उद्देश*


• शांततापूर्ण आणि टिकाऊ समाजासाठी विज्ञानाच्या भूमिकेवर जन जागरूकता बळकट करणे

• देशांमधील सामायिक विज्ञानांसाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय एकता वाढवणे

• समाजाच्या फायद्यासाठी विज्ञान वापरण्यासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बांधिलकीचे नूतनीकरण करणे

• विज्ञानासमोर आलेल्या आव्हानांवर लक्ष केंद्रित करणे आणि वैज्ञानिक प्रयत्नांना आधार देणे


या दिनाची सुरुवात

१९९९ साली यूनेस्को आणि बुडापेस्टमधील आंतरराष्ट्रीय परिषदेच्या विज्ञान संघटनेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विज्ञान परिषदेच्या पाठोपाठ शांती व विकासासाठी जागतिक विज्ञान दिवस तयार करण्यात आला.

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

संकलन -)

गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा - यवतमाळ ४४५२०६


सोमवार, ८ नोव्हेंबर, २०२१

अध्यात्म ध्यान साधना

प्रसिद्ध खगोल, रसायनशास्त्रज्ञ कार्ल सेगन

 



*🎇🌠🎆कार्ल सेगन🎆🌠🎇*

⚗️⚗️⚗️⚗️⚗️⚗️⚗️⚗️⚗️⚗️

*प्रसिद्ध खगोलशास्त्री और खगोल रसायनशास्त्री*

🔬🔬🔬🔬🔬🔬🔬🔬🔬🔬

*जन्मदिन - ९ नवम्बर १९३४*

 🔭🔭🔭🔭🔭🔭🔭🔭🔭🔭

कार्ल सेगन -)

      *०९ नवम्बर १९३४*

        २० दिसम्बर १९९६

प्रसिद्ध खगोलशास्त्री और खगोल रसायनशास्त्री थे जिन्होंने खगोल शास्त्र, खगोल भौतिकी और खगोल रसायनशास्त्र को लोकप्रिय बनाया। इन्होंने पृथ्वी से इतर ब्रह्माण्ड में जीवन की खोज करने के लिए सेटी नामक संस्था की स्थापना भी की।

इन्होंने अनेक विज्ञान संबंधी पुस्तकें भी लिखी हैं। ये १९८० के बहुदर्शित टेलिविजन कार्यक्रम कॉसमॉस: ए पर्सनल वॉयेज (ब्रह्माण्ड: एक निजी यात्रा) के प्रस्तुतकर्ता भी थे। इन्होंने इस कार्यक्रम पर आधारित कॉसमॉस नामक पुस्तक भी लिखी। अपने जीवनकाल में सेगन ने ६०० से भी अधिक वैज्ञानिक शोधपत्र और लोकप्रिय लेख लिखे और २० से अधिक पुस्तकें लिखी। अपनी कृतियों में ये अकसर मानवता, वैज्ञानिक पद्धति और संशयी अनुसंधान पर जोर देते थे।


🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

संकलन -)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६


प्रभात दर्शन

 🌳⛳ *शुभ प्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

कार्तिक मास,शुक्ल पक्ष, *पँचमी*,पू.षा. नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,हेमन्त ऋतु,युगाब्द ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

मंगलवार, ०९ नोव्हेंबर २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                        *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


        *"हमारा सामना निरन्तर बडे-बडे अवसरों से होता रहता है, जो चालाकी पूर्वक असाध्य लगने वाली विकट समस्याओं के वेष में छिपे रहते हैं। स्मरण रहे कि संकट के समय ही नायक बनाये जाते हैं, किन्तु जो प्रमादी है, वह सुयोग गँवा देता है।*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfdrBZzyvJLva78wmk4hHZ9HOFNerBXH4Zum6x4DRwOfxzrLQ/viewform

 https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfdrBZzyvJLva78wmk4hHZ9HOFNerBXH4Zum6x4DRwOfxzrLQ/viewform

 



 

प्रश्न मंजुषा निर्मिती गजानन गोपेवाड

 https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfdrBZzyvJLva78wmk4hHZ9HOFNerBXH4Zum6x4DRwOfxzrLQ/viewform

रविवार, ७ नोव्हेंबर, २०२१

जागतिक शहरीकरण दिन

 🏘️🏘️🏘️🏘️🏘️🏘️🏘️🏘️🏘️🏘️🏘️

*🏘️🏘️🏘️🏘️८ नोव्हेंबर 🏘️🏘️🏘️🏘️*

🏘️🏘️🏘️🏘️🏘️🏘️🏘️🏘️🏘️🏘️🏘️

*🏘️🏘️जागतिक शहरीकरण दिन🏘️🏘️*

%%%%%%%%%%%%%%%%%%%%

शहरीकरण


एकविसाव्या शतकात शहरीकरणाचा वेग प्रचंड वाढला आहे. पुढील काही दशकांत विकसनशील देशांमध्ये, विशेषतः आशिया, आफ्रिका खंडांत, शहरीकरणाचा वेग अभूतपूर्व असणार आहे असे भाकीत आहे. २०३० पर्यंत या दोन खंडांत जगातील एकूण शहर निवासी लोकसंख्येपैकी ७०% शहर निवासी असणार आहेत. भारतात देखील शहरीकरणाचा वेग आशियातील सर्वाधिक वाढीच्या बरोबरीचा आहे. गेल्या ५० वर्षांत भारतातील शहरी लोकसंख्या १०% नी वाढली. २०३० पर्यंत भारतातील किमान ४०% लोक शहरांत राहात असतील.याकडे लक्ष वेधण्यासाठी युनो ने हा दिवस साजरा करण्यासाठी नियोजन केले.


महाराष्ट्रातील शहरीकरण


महाराष्ट्र हे भारतातील चवथ्या क्रमांकाचे शहरीकरण झालेले राज्य आहे. १९६१ ते २००१ या कालावधीत महाराष्ट्रातील शहरी लोकसंख्या दुप्पट झाली आहे. महाराष्ट्रात १० लाख लोकसंख्येपेक्षा जास्त लोकसंख्या असलेली ७ शहरे आहेत आणि ती भारतातील इतर कुठल्याही राज्यापेक्षा सर्वाधिक आहेत.


शहरीकरणाचा वेग


२००१ ते २०११ या दशकात भारतात शहरीकरणाचा वेग लक्षणीय वाढला. या कालखंडात शहरी लोकसंख्या ९.०९९ कोटींनी वाढली, तर ग्रामीण लोकसंख्या ९.०४७ कोटींनी वाढली. म्हणजे शहरी लोकसंख्या वाढीने ग्रामीण लोकसंख्या वाढीला अंगुळभर का होईना मागे टाकले. हे प्रथमच घडले. टक्केवारीत बोलायचे तर शहरी लोकसंख्या वाढ ३१.८% झाली, तर ग्रामीण लोकसंख्या वाढ १२.१८% झाली. शहरात राहाणाऱ्या लोकांची संख्या २००१ मध्ये २७.८२% होती ती २०११ मध्ये ३१.१६% वर पोहोचली. शहरीकरणात अग्रक्रम दिल्ली राज्याचा होता जेथे ९७.५% शहर निवासी होते. त्यानंतर तामिळनाडू ४८.४५%, केरळा ४७.७२%, महाराष्ट्र ४५.२३%, गुजराथ ४२.५८% अशी क्रमवारी होती.


भारत खेड्यांचा देश


भारत स्वतंत्र झाला आणि भारताची घटना लिहिली गेली तेव्हा भारत हा खेड्यांचा देश आहे असे मानले गेले. भारतीय घटनेमध्ये ते स्पष्टपणे प्रतिबिंबित होते. भारतीय घटनेप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्था या राज्यांच्या यादीत समाविष्ट होत्या. त्यामुळे राज्य सरकारांचे त्यावर नियंत्रण होते. १९५० ते १९९२ या कालखंडात हे नियंत्रण उत्तरोत्तर वाढतच गेले. या काळात नगरपालिकांची ताकद क्षीण होत गेली. अनेकदा नगरपालिका राज्य सरकारे या ना त्या कारणाने बरखास्त करीत. नागरिकांचा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सहभाग मतदानापुरता सीमित झाला. निवडणुकाही अनियमितच होत.


वाढते शहरीकरण आणि घटना दुरुस्ती


१९९२ च्या ७४ व्या घटना दुरुस्ती कायद्याने हे चित्र बदलले. या कायद्याने तीन स्तरीय सरकार दिले. ज्यात नगरपालिका या शहरातील स्थानिक स्वराज्य संस्थेला अनेक अधिकार आणि कार्यकक्षा प्राप्त झाल्या.


देशातील वाढत्या शहरीकरणाला ही एकप्रकारे राजमान्यता होती आणि न्याय होता.

*🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏*

संकलन -)गजानन गोपेवाड  

उमरखेड जिल्हा- यवातमाळ ४४५२०६

क्ष -किरणांचा शोध

 *८  नोव्हेंबर  १८९५*

🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️

*विल्यम राँटजेन यांना इलेक्ट्रिसीटीवर प्रयोग करत असताना 'क्ष-किरणाचा' (x-ray) शोध लागला*


क्ष-किरण ही एक प्रकारची विद्युतचंबकीय विकीरणे असतात. यांची तरंगलांबी ०.०१ ते १० नॅनोमीटरपर्यंत असते व वारंवारिता३० पेंटाहर्ट्‌झ ते ३० एक्झाहर्ट्‌झ इतकी असते. क्ष-किरणांची तरंगलांबी ही गॅमा किरणांपेक्षा कमी व अतिनील किरणांपेक्षा जास्त असते.


*शोध*

विल्यम राँटजेनने क्ष-किरणांचा शोध लावला असे मानले जाते, परंतु क्ष-किरणांवर संशोधन आधीपासून चालू होते. फक्त विल्यम राँटजेनने त्याची माहिती व्यवस्थितपणे प्रसारित केली. विल्यम राँटजेनच्या आधी जॉन हित्रॉफ, इव्हान Pulyui, निकोला टेस्ला, फरनँडो सॅनफोर्ड, फिलिप लेनार्ड यांनी यावर संशोधन केले होते. १८९५ मध्ये विल्यम राँटजेनयाने प्रयोगशाळेत अल्फा किरणांचा अभ्यास करताना असे आढळून आले की, काही न वापरलेल्या फोटोग्राफिक प्लेट्स काहीही न करता खराब झाल्या होत्या. त्यावेळी असे अनुमान निघाले, की काही किरणे दिसत नाहीत, परंतु असतात व ती वस्तूंच्या आरपार जातात. या किरणांना 'क्ष' किरण असे नाव ठेवले गेले.


*उपयोग*


*वैद्यकीय* व्यवसायात हाडांचे प्रतिमा (फोटो) घेण्यास याचा उपयोग होतो. आधुनिक निदान पद्धतीमध्ये वापरले जाणारे क्ष-किरण यंत्रणांमध्ये किरणोत्साराचा वापर होतो. शरीर न फाडता आतल्या हाडाला झालेली इजा क्ष-किरण प्रतिमेने तपासता येते.


*सीटी स्कॅन*

सीटी स्कॅनच्या साहाय्याने क्ष-किरणांचा वापर करून शरीराच्या आतील अवयवांची प्रतिमा मिळवली जाऊ शकते. जिथे नेहमीची क्ष-किरण प्रतिमा मिळू शकत नाही,(उदा. मेंदू) तिथे हाडांना भेदून अवयवांचे त्रिमिती प्रतिमा सीटी स्कॅनच्यासाहाय्याने मिळू शकते.


*अँजिओग्राफी*

ह्रदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये क्ष-किरणांद्वारे दिसणारे रंग सोडून रक्तवाहिन्यांची भरण क्षमता तपासली जाते. याद्वारे रक्त वाहिन्यांतील अडथळे दिसून येतात.


*अंर्ततपासणी*

विमानतळावर किंवा इतर संवेदनशील ठिकाणी सामानाच्या अंतर्भागात असलेल्या संभाव्य स्फोटकांच्या तपासणीकरता क्ष-किरणांचा वापर केला जातो.


*अंतराळ संशोधन*

चंद्रा दुर्बिणीमध्ये अंतराळात क्ष-किरण प्रतिमा प्राप्त करून संशोधन केले जाते.


*औद्योगिक*

औद्योगिक वापर - मुख्यतः धातूंच्या जोडांतील छिद्रे शोधण्याकरिता क्ष-किरणांचा वापर केला जातो

🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

संकलन -)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

प्रभात दर्शन

 🌳⛳ *शुभ प्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

कार्तिक मास,शुक्ल पक्ष, *चतुर्थी*,मूल नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,हेमन्त ऋतु,युगाब्द ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

सोमवार, ०८ नोव्हेंबर २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                       *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


        *हर असफलता के बाद हमें दुगनी क्रियाशीलता के साथ आगे बढ़ना चाहिए, यह पुरुषार्थ की चुनौती है। जो एक ही ठोकर में निराश होकर बैठ गया, जिसका आशा दीप एक ही फूँक में बुझ गया, उस दुर्बल मन व्यक्ति ने न ही जीवन का स्वरूप समझा और न संसार का।*

      *यहाँ पग-पग पर संघर्ष करना होता है। कदम-कदम पर साहस, धैर्य और पुरुषार्थ की परीक्षा देनी होती है। जो उस मूल्य को चुकाने के लिए तैयार न हों, उन्हें सफलता जैसे वरदान की आशा भी नहीं करनी चाहिए।"*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


सी. व्ही, रमन भौतिकशास्त्राचे माहती

 ➿➿➿➿➿➿➿➿➿➿

*🇮🇳🇮🇳 भारतिय भौतिक शास्त्री 🇮🇳🇮🇳*

➿➿➿➿➿➿➿➿➿➿

*सर चन्द्रशेखर वेंकटरामन*

*सीवी रामन* (तमिल: சந்திரசேகர வெங்கட ராமன்) 

(७ नवंबर १८८८ - २१ नवंबर, १९७०) भारतीय भौतिक-शास्त्री थे। प्रकाश के प्रकीर्णन पर उत्कृष्ट कार्य के लिये वर्ष १९३० में उन्हें भौतिकी का प्रतिष्ठित नोबेल पुरस्कार दिया गया। उनका आविष्कार उनके ही नाम पर रामन प्रभाव के नाम से जाना जाता है। १९५४ ई. में उन्हें भारत सरकार द्वारा भारत रत्न की उपाधि से विभूषित किया गया तथा १९५७ में लेनिन शान्ति पुरस्कार प्रदान किया था।


जन्म -) ०७ नवम्बर १८८८

तिरुचिरापल्ली, तमिल नाडु

मृत्यु -) २१ नवम्बर १९७० (उम्र ८२)

बंगलुरु, कर्नाटक, भारत

राष्ट्रीयता -) भारत

क्षेत्र -)भौतिकी

संस्थान -) भारतीय वित्त विभाग

इंडियन एसोसिएशन फॉर कल्टिवेशन ऑफ साइंस

भारतीय विज्ञान संस्थान

शिक्षा -)  प्रेसीडेंसी कालिज

डॉक्टरी शिष्य

जी एन रामचंद्रन

प्रसिद्धि -)  रामन इफेक्ट

उल्लेखनीय सम्मान -) नाइट बैचेलर (१९२९)

भौतिकी में नोबल पुरस्कार (१९३०)

भारत रत्न

लेनिन शांति पुरस्कार

*परिचय*

चन्द्रशेखर वेंकटरामन का जन्म ७ नवम्बर सन् १८८८ ई. में तमिलनाडु के तिरुचिरापल्‍ली नामक स्थान में हुआ था। आपके पिता चन्द्रशेखर अय्यर एस. पी. जी. कॉलेज में भौतिकी के प्राध्यापक थे। आपकी माता पार्वती अम्मल एक सुसंस्कृत परिवार की महिला थीं। सन् १८९२ ई. मे आपके पिता चन्द्रशेखर अय्यर विशाखापतनम के श्रीमती ए. वी.एन. कॉलेज में भौतिकी और गणित के प्राध्यापक होकर चले गए। उस समय आपकी अवस्था चार वर्ष की थी। आपकी प्रारम्भिक शिक्षा विशाखापत्तनम में ही हुई। वहाँ के प्राकृतिक सौंदर्य और विद्वानों की संगति ने आपको विशेष रूप से प्रभावित किया।


*शिक्षा*

आपने बारह वर्ष की अल्पावस्था में ही मैट्रिक की परीक्षा उत्तीर्ण कर ली थी। तभी आपको श्रीमती एनी बेसेंट के भाषण सुनने का सौभाग्य प्राप्त हुआ। उनके लेख पढ़ने को मिले। आपने रामायण, महाभारत जैसे धार्मिक ग्रंथों का अध्ययन किया। इससे आपके हृदय पर भारतीय गौरव की अमिट छाप पड़ गई। आपके पिता उच्च शिक्षा के लिए विदेश भेजने के पक्ष में थे; किन्तु एक ब्रिटिश डॉक्टर ने आपके स्वास्थ्य को देखते हुए विदेश न भेजने का परामर्श दिया। फलत: आपको स्वदेश में ही अध्ययन करना पड़ा। आपने सन् १९०३ ई. में चेन्नै के प्रेसीडेंसी कॉलेज में प्रवेश ले लिया। यहाँ के प्राध्यापक आपकी योग्यता से इतने प्रभावित हुए कि आपको अनेक कक्षाओं में उपस्थित होने से छूट मिल गई। आप बी.ए. की परीक्षा में विश्वविद्यालय में अकेले ही प्रथम श्रेणी में आए। आप को भौतिकी में स्वर्णपदक दिया गया। आपको अंग्रेजी निबंध पर भी पुरस्कृत किया गया। आपने १९०७ में मद्रास विश्वविद्यालय से गणित में प्रथम श्रेणी में एमए की डिग्री विशेष योग्यता के साथ हासिल की। आपने इस में इतने अंक प्राप्त किए थे, जितने पहले किसी ने नहीं लिए थे।


*युवा विज्ञानी*

आपने शिक्षार्थी के रूप में कई महत्त्वपूर्ण कार्य किए। सन् १९०६ ई. में आपका प्रकाश विवर्तन पर पहला शोध पत्र लंदन की फिलसोफिकल पत्रिका में प्रकाशित हुआ। उसका शीर्षक था - 'आयताकृत छिद्र के कारण उत्पन्न असीमित विवर्तन पट्टियाँ'। जब प्रकाश की किरणें किसी छिद्र में से अथवा किसी अपारदर्शी वस्तु के किनारे पर से गुजरती हैं तथा किसी पर्दे पर पड़ती हैं, तो किरणों के किनारे पर मद-तीव्र अथवा रंगीन प्रकाश की पट्टियां दिखाई देती है। यह घटना `विवर्तन' कहलाती है। विवर्तन गति का सामान्य लक्षण है। इससे पता चलता है कि प्रकाश तरगों में निर्मित है।


वृत्ति एवं शोध

उन दिनों आपके समान प्रतिभाशाली व्यक्ति के लिए भी वैज्ञानिक बनने की सुविधा नहीं थी। अत: आप भारत सरकार के वित्त विभाग की प्रतियोगिता में बैठ गए। आप प्रतियोगिता परीक्षा में भी प्रथम आए और जून, १९०७ में आप असिस्टेंट एकाउटेंट जनरल बनकर कलकत्ते चले गए। उस समय ऐसा प्रतीत होता था कि आपके जीवन में स्थिरता आ गई है। आप अच्छा वेतन पाएँगे और एकाउँटेंट जनरल बनेंगे। बुढ़ापे में उँची पेंशन प्राप्त करेंगे। पर आप एक दिन कार्यालय से लौट रहे थे कि एक साइन बोर्ड देखा, जिस पर लिखा था 'वैज्ञानिक अध्ययन के लिए भारतीय परिषद (इंडियन अशोसिएशन फार कल्टीवेशन आफ़ साईंस)'। मानो आपको बिजली का करेण्ट छू गया हो। तभी आप ट्राम से उतरे और परिषद् कार्यालय में पहुँच गए। वहाँ पहुँच कर अपना परिचय दिया और परिषद् की प्रयोगशाला में प्रयोग करने की आज्ञा पा ली।


तत्पश्चात् आपका तबादला पहले रंगून को और फिर नागपुर को हुआ। अब आपने घर में ही प्रयोगशाला बना ली थी और समय मिलने पर आप उसी में प्रयोग करते रहते थे। सन् १९११ ई. में आपका तबादला फिर कलकत्ता हो गया, तो यहाँ पर परिषद् की प्रयोगशाला में प्रयोग करने का फिर अवसर मिल गया। आपका यह क्रम सन् १९१७ ई. में निर्विघ्न रूप से चलता रहा। इस अवधि के बीच आपके अंशकालिक अनुसंधान का क्षेत्र था - ध्वनि के कम्पन और कार्यों का सिद्धान्त। आपका वाद्यों की भौतिकी का ज्ञान इतना गहरा था कि सन् १९२७ ई. में जर्मनी में प्रकाशित बीस खण्डों वाले भौतिकी विश्वकोश के आठवें खण्ड के लिए वाद्ययंत्रों की भौतिकी का लेख आपसे तैयार करवाया गया। सम्पूर्ण भौतिकी कोश में आप ही ऐसे लेखक हैं जो जर्मन नहीं है।


कलकत्ता विश्वविद्यालय में सन् १९१७ ई में भौतिकी के प्राध्यापक का पद बना तो वहाँ के कुलपति आशुतोष मुखर्जी ने उसे स्वीकार करने के लिए आपको आमंत्रित किया। आपने उनका निमंत्रण स्वीकार करके उच्च सरकारी पद से त्याग-पत्र दे दिया।


कलकत्ता विश्वविद्यालय में आपने कुछ वर्षों में वस्तुओं में प्रकाश के चलने का अध्ययन किया। इनमें किरणों का पूर्ण समूह बिल्कुल सीधा नहीं चलता है। उसका कुछ भाग अपनी राह बदलकर बिखर जाता है। सन् १९२१ ई. में आप विश्वविद्यालयों की कांग्रेस में प्रतिनिधि बन गए आक्सफोर्ड गए। वहां जब अन्य प्रतिनिधि लंदन में दर्शनीय वस्तुओं को देख अपना मनोरंजन कर रहे थे, वहाँ आप सेंट पाल के गिरजाघर में उसके फुसफुसाते गलियारों का रहस्य समझने में लगे हुए थे। जब आप जलयान से स्वदेश लौट रहे थे, तो आपने भूमध्य सागर के जल में उसका अनोखा नीला व दूधियापन देखा। कलकत्ता विश्वविद्यालय पहुँच कर आपने पार्थिव वस्तुओं में प्रकाश के बिखरने का नियमित अध्ययन शुरु कर दिया। इसके माध्यम से लगभग सात वर्ष उपरांत, आप अपनी उस खोज पर पहुँचें, जो 'रामन प्रभाव' के नाम से विख्यात है। आपका ध्यान १९२७ ई. में इस बात पर गया कि जब एक्स किरणें प्रकीर्ण होती हैं, तो उनकी तरंग लम्बाइया बदल जाती हैं। तब प्रश्न उठा कि साधारण प्रकाश में भी ऐसा क्यों नहीं होना चाहिए?


आपने पारद आर्क के प्रकाश का स्पेक्ट्रम स्पेक्ट्रोस्कोप में निर्मित किया। इन दोनों के मध्य विभिन्न प्रकार के रासायनिक पदार्थ रखे तथा पारद आर्क के प्रकाश को उनमें से गुजार कर स्पेक्ट्रम बनाए। आपने देखा कि हर एक स्पेक्ट्रम में अन्तर पड़ता है। हरएक पदार्थ अपनी-अपनी प्रकार का अन्तर डालता है। तब श्रेष्ठ स्पेक्ट्रम चित्र तैयार किए गए, उन्हें मापकर तथा गणित करके उनकी सैद्धान्तिक व्याख्या की गई। प्रमाणित किया गया कि यह अन्तर पारद प्रकाश की तरगं लम्बाइयों में परिवर्तित होने के कारण पड़ता है। रामन् प्रभाव का उद्घाटन हो गया। आपने इस खोज की घोषणा २९ फ़रवरी सन् १९२८ ई. को की।


सम्मान

आप सन् १९२४ ई. में अनुसंधानों के लिए रॉयल सोसायटी, लंदन के फैलो बनाए गए। रामन प्रभाव के लिए आपको सन् १९३० ई. मे नोबेल पुरस्कार दिया गया। रामन प्रभाव के अनुसंधान के लिए नया क्षेत्र खुल गया।


१९४८ में सेवानिवृति के बाद उन्होंने रामन् शोध संस्थान की बैंगलोर में स्थापना की और इसी संस्थान में शोधरत रहे। १९५४ ई. में भारत सरकार द्वारा भारत रत्न की उपाधि से विभूषित किया गया। आपको १९५७ में लेनिन शान्ति पुरस्कार भी प्रदान किया था।


२८ फरवरी १९२८ को चन्द्रशेखर वेंकट रामन् ने रामन प्रभाव की खोज की थी जिसकी याद में भारत में इस दिन को प्रत्येक वर्ष 'राष्ट्रीय विज्ञान दिवस' के रूप में मनाया जाता है।

➿➿➿➿➿➿➿➿➿➿

संकलन -)

गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा - यवतमाळ ४४५२०६


प्रभात दर्शन

 🌳⛳ *शुभ प्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

कार्तिक मास,शुक्ल पक्ष, *तृतीया*,ज्येष्ठा नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,हेमन्त ऋतु,युगाब्द ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

रविवार, ०७ नोव्हेंबर २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                         *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


हृदय से अधिक उपजाऊ, अन्य कोई स्थान हो ही नही सकता, 

क्योंकि.. 

यहाँ कुछ भी बोया जाये, पनपता बहुत है, फिर वो चाहे "प्रेम" हो या "घृणा"....

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


शनिवार, ६ नोव्हेंबर, २०२१

अब्राहम लिंकन

 ➿➿➿➿➿➿➿➿➿➿

*🇺🇸🇺🇸🇺🇸अब्राहम लिंकन🇺🇸🇺🇸🇺🇸*

➿➿➿➿➿➿➿➿➿➿

*०६ नोव्हेंबर १८६० रोजी अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचे १६ वे राष्ट्राध्यक्ष बनले.*


 जन्म -) १२ फेब्रुवारी १८०९ 

 मृत्यू  -) १५ एप्रिल १८६५ लिंकन हे अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचे सोळावे राष्ट्राध्यक्षाचा जन्म एका गरीब शेतकऱ्याच्या कुटुंबात हॉजनव्हिल (केंटकी) येथे. वडील टॉमस व आई नान्सी हॅन्क्‍स. हे कुटुंब बॅप्टिस्ट पंथीय होते व या पंथाचा गुलामगिरीला विरोध होता. त्यांना सेरा, अब्राहम व टॉमस ही तीन अपत्ये झाली. त्यांपैकी सेरा लग्‍नानंतर वारली व टॉमस बालवयातच गेला. अब्राहम नऊ वर्षांचा असतानाच आई नान्सी वारली व टॉमस लिंकन यांनी सेरा बुश जॉन्स्टन या तीन मुलांच्या विधवेबरोबर दुसरे लग्न केले (१८१८). जमिनीच्या कोर्टकचेऱ्याला कंटाळून लिंकन कुटुंबाने इंडियाना राज्यातील पीजन क्रीक या गावी स्थलांतर केले. सावत्र आईच्या प्रेमळ वागणुकीमुळे व प्रोत्साहनाने आपल्याला चांगले वळण लागले, असे अब्राहम लिंकन म्हणत. लेखनवाचन करण्याइतपत शिक्षण त्यांना कसेबसे घेता आले; पण अधिक रीतसर शिक्षणाची संधी लाभली नाही. लहानपणापासून लिंकन यांना वाचनाचे विलक्षण वेड होते. बायबल, इसापच्या गोष्टी, पिलग्रिम्स प्रोग्रेस, रॉबिन्सन क्रूसो, ग्रिमशॉचा अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचा इतिहास, वीमचे जॉर्ज वॉशिंग्टनचे चरित्र यांसारखे ग्रंथ परिश्रमपूर्वक मिळवून त्यांनी वाचून काढले. गावातील चर्चची साफसफाई, जंगलतोड, गावकऱ्यांची पत्रे लिहिणे, मुले जमवून कथा सांगणे इ. उद्योग ते करीत असत. उत्कृष्ट कथाकथनकार म्हणून त्यांचा लौकिक होता.


याच सुमारास जेम्स केन्ट्री हा व्यापारी पीजन क्रीकमधील आपला शेतमाल मिसिसिपी नदीतून न्यू ऑर्लीअन्सला पाठविणार होता. त्याने अब्राहम लिंकन व अन्य दोन तरुण ह्यांच्याकडे ही कामगिरी सोपविली. या तीन महिन्यांच्या प्रवासात त्यांना अनेक अनुभव आले; विशेषतः गुलामगिरीचे विदारक दर्शन घडले. पुढे लिंकन कुटुंबाने १८३० मध्ये पीजन क्रीक सोडून इलिनॉयला स्थलांतर केले. त्या काळात अब्राहम लिंकन यांनी न्यू सेलमच्या दुकानात, तसेच पोस्टमास्तर, वजनमापाचा सर्वेक्षक आदी कामे केली. याच सुमारास रेड इंडियन पुढारी ब्‍लॅक हॉक याने संघराज्यांविरुद्ध युद्ध सुरू केले होते (१८३२). त्याच्या प्रतिकारार्थ उभारलेल्या स्वयंसेवक सेनेचे कप्तानपद लिंकन यांना देण्यात आले; परंतु प्रत्यक्ष युद्धात भाग घेण्याचा प्रसंग मात्र उद्‍भवला नाही. न्यू सेलममधील वास्तव्यात त्यांना वर्तमानपत्रे वाचण्याची संधी लाभली व ते राजकरणाकडे आकृष्ट झाले.


लिंकन यांनी विधानसभेची एक अयशस्वी निवडणूक लढविली (१८३४). इलिनॉयच्या विधानसभेत जाण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा होती. जॉन स्ट्यूअर्ट या व्हिगपक्षीय वकील मित्राच्या सल्लामुळे त्यांनी वकिली व्यवसाय करण्याचे ठरविले. त्यांनी १८३६ मध्ये कायद्याची परीक्षा देऊन सनद मिळविली व प्रारंभी स्ट्यूअर्टच्या भागीदारीत व नंतर लोगन स्टिव्हनबरोबर वकिली व्यवसाय केला. १८४४ नंतर विल्यम हर्नडन यांस त्यांनी आपल्या भागीदारीत घेतले. अखेरपर्यंत ते या फर्ममध्ये होते. अमेरिकेतील फिरत्या न्यायालयातून ते वकिली करीत असत. यामधून त्यांना पैसा व प्रतिष्ठा दोन्ही लाभले. पुढे इलिनॉयच्या विधानसभेत व्हिगपक्षाचा सदस्य म्हणून ते चार वेळा निवडून आले (१८३४-४०). विधानसभेत त्यांनी गुलामगिरीविरुद्ध आपले मत मांडले.


लिंकन यांनी मेरी टॉड (१३ डिसेंबर १८१८ — १६ जुलै १८८२) या केंटकीमधील देखण्या, सुशिक्षित, महत्त्वाकांक्षी पण फटकळ मुलीशी प्रारंभी नकार देऊन नंतर विवाह केला (४ नोव्हेंबर १८४२). त्यांना रॉबर्ट टॉड, एडवर्ड बेकर, विल्यम वॉलस व टॉमस असे चार मुलगे झाले. त्यांपैकी रॉबर्ट टॉड हा दीर्घायुषी ठरला. लिंकन यांच्या वैवाहिक जीवनाबद्दल अनेक वदंता आहेत; परंतु ऐतिहासिक दृष्ट्या त्यात फारसे तथ्य नाही. आपला पती एक थोर नेता व्हावा, याची जबरदस्त महत्त्वाकांक्षा मेरी टॉडला होती आणि ती त्या दृष्टीने लिंकन यांना उत्तेजन देत असे. पुढे लिंकन यांच्या अनपेक्षित हत्येनंतर मानसिक धक्का बसून तिला बुद्धीभ्रंश झाला. त्याच अवस्थेत ती मरण पावली.


लिंकन व्हिग पक्षातर्फे इलिनॉयमधून काँग्रेसमध्ये निवडून आले (१८४७-४९). या काळात त्यांनी राष्ट्राध्यक्ष जेम्स पॉकच्या मेक्सिकोबरोबरच्या युद्धास तीव्र विरोध केला आणि झॅकरी टेलरचा अध्यक्ष पदासाठी प्रचार केला. टेलर निवडूनही आला; पण लिंकनना हवे असलेले आयुक्ताचे पद त्याने दिले नाही. तेव्हा त्यांची घोर निराशा झाली. सक्रिय राजकारणातून त्यांनी अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला आणि स्प्रिंगफील्डमध्ये वकिलीत लक्ष घातले. एक कुशल वकील, तडफदार वक्ता व राजकारणी म्हणून त्यांचा लौकिक उत्तरेकडील राज्यांत वाढत होता. या काळात त्यांनी अनेक महत्त्वाचे खटलेही जिंकले.


अमेरिकेत गुलामगिरीविषयी १८२० च्या सुमारास एक तडजोड झाली होती. विशिष्ट सीमारेषेच्या उत्तरेस गुलामगिरी उरू नये, हा या तडजोडीचा हेतू होता. १८५४ च्या सुमारास स्टीफन आर्नाल्ड डग्‍लस या लोकप्रतिनिधीने सीनेटमध्ये कायद्याचा मसुदा सादर केला. संघराज्यांत सामील होऊ पाहणारी कॅनझस व नेब्रॅस्का ही घटकराज्ये करारांतल्या सीमारेषेच्या उत्तरेस होती. तेथे गुलामगिरी चालू द्यावयाची की नाही, हे घटक राज्यांनी ठरवावे, हा मसुद्याचा आशय होता. प्रचाराच्या फेरीत स्पिंगफील्डमध्ये जाहीर सभेत लिंकन व डग्‍लस यांची चकमक झडली. स्वसमर्थन करणे डग्‍लसला अशक्य झाले. या सभेमुळे गुलामगिरीला विरोध करणाऱ्या अमेरिकन जनतेला लिंकन हे नेतृत्व मिळाले. गुलामगिरीला विरोध करणाऱ्या लोकांनी रिपब्‍लिकन पक्षाची स्थापना केली (१८५५).


अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने ड्रेड स्कॉट नावाच्या गुलामाच्या बाबतीत या सुमारास दिलेला निर्णय गुलामगिरीच्या पुरस्कर्त्यांना अनुकूल होता. दक्षिणेकडची घटकराज्ये व उरलेली घटकराज्ये यांच्या दरम्यान धुमसणारा लढा आता तीव्र बनणार, हे लिंकन यांनी ओळखले. १८५८ सालच्या सीनेटच्या निवडणुकीत त्यांनी डग्‍लसला विरोध केला. १८६० साली राष्ट्राध्यक्षपद पटकाविण्याची डग्‍लसची इच्छा आहे व त्याच्यासारखा डळमळीत अध्यक्ष राष्ट्रीय ऐक्य अभंग राखू शकणार नाही, असे लिंकन यांना वाटू लागले. डग्‍लसच्या महत्त्वाकांक्षेला आव्हान म्हणून त्यांनी १८५८ साली निवडणूक लढविली.


लिंकन अमेरिकन नेते म्हणून ओळखले जाऊ लागले. १८६० च्या फेब्रुवारीत त्यांनी न्यूयॉर्क येथे व्याख्याने दिली. थोड्या महिन्यांनी होणाऱ्या राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीत रिपब्‍लिकन पक्षाचा उमेदवार म्हणून त्यांची निवड झाली. लिंकन राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले (६ नोंव्हेंबर १८६०). गुलामगिरी हळूहळू नाहीशी होणारच, तिचा प्रसार किंवा निर्मूलन या प्रश्नाबद्दल आग्रह धरून राष्ट्रैक्य बिघडविणे हिताचे नाही, असे लिंकन यांचे मत होते. त्याबरोबर दक्षिणेकडच्या राज्यांपैकी काहींनी संघराज्यातून फुटण्याबद्दलचे ठराव केले. जेम्स ब्यूकॅनन या जुन्या राष्ट्राध्यक्षाने याबद्दलची नापसंती व्यक्त करण्यापलीकडे काही केले नाही. लिंकन यांच्या हाती राष्ट्राध्यक्षाचे अधिकार प्रत्यक्षपणे येण्यापूर्वीच फुटू पाहणाऱ्या राज्यांनी आपले अलग संयुक्त संघराज्य बनवून जेफर्सन डेव्हिसला राष्ट्राध्यक्ष बनविला. सरकारी कारभारात दक्षिणेकडचे अनेक लोक होते. युद्ध होणार हे ओळखून त्यांनी आपल्या पक्षाला सोयीस्कर अशा अनेक तरतुदी केल्या. हे सारे घडत होते व अनेक सहकारी लिंकनना सतावीत होते, तरी त्यांनी धीमेपणाने कारभार चालविला. आपल्या पक्षाने कुरापत काढली असे ठरू नये म्हणून ते जपत होते. १२ एप्रिल १८६१ रोजी दक्षिणेच्या लष्कराने फोर्ट समटरवर तोफा डागल्या. अमेरिकेच्या राष्ट्रध्वजाचा अपमान केला आणि अमेरिकेच्या लष्करावर शरणागतीचा प्रसंग लादला. त्यामुळे यादवी युद्ध सुरू झाले.


यादवी युद्ध चार वर्षे चालले. संघराज्यातील तेवीस घटकराज्ये विरुद्ध फुटून निघालेली अकरा राज्ये यांच्या दरम्यानच्या लढाईत सुरुवातीला संघराज्याला पराभव पतकरावे लागले. अनेकवेळा सेनापती बदलण्याचा प्रसंग लिंकन यांच्यावर आला. बंडवाल्या पक्षाला मदत मिळावी म्हणून यूरोपियन राष्ट्रांची संघटना करू पाहणाऱ्या फ्रान्सला स्वस्थ बसावे लागले; कारण ब्रिटनने या उठावाचा पुरस्कार केला नाही. युद्धकाळात अमेरिका व ब्रिटन यांचे संबंध बिघडले नाहीत. याचे एक कारण लिंकन यांचा धीमेपणा. रणांगणाचा रागरंग अमेरिकेच्या दृष्टीने अनुकूल होऊ लागल्यावर १८६२ च्या सप्टेंबरमध्ये लिंकन यांनी एक घोषणा केली, ‘‘नवे वर्ष सुरू होण्याच्या आत फुटून निघालेली घटकराज्ये संघराज्यात सामील झाली नाहीत, तर त्या भागातल्या गुलामांचे स्वातंत्र्य अमेरिका मान्य करील.’’ या घोषणेमुळे यूरोपातले लोकमत अमेरिकेला सर्वस्वी अनुकूल बनले.


लोकशाही कारभार व लिखित संविधान यांमुळे युद्धकार्य नेटाने चालविणाऱ्या लिंकनना त्रास होत होता. त्यांचा स्वभाव धीमा, शांत व खेळकर असल्यामुळे सर्वांना सांभाळून त्यांनी युद्ध चालविले. युद्ध प्रसंगोपात्त आहे, भावी काळातील विकासाला महत्त्व आहे, हे लक्षात ठेवून ते वागत होते. १८६३ मध्ये गेटिझबर्ग गावी झालेल्या संग्रामाचे राष्ट्रीय महत्त्व ओळखून तेथे धारातीर्थी पडलेल्या सैनिकांचे स्मारक करण्याचे त्यांनी ठरविले. जिव्हाळ्याने रसरसलेले साधे वक्तृत्व कसे चिरंजीव ठरते, हे लिंकन यांच्या त्या वेळच्या भाषणाने सिद्ध केले.


राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीची १८६४ सालच्या आरंभी वेळ आली. युद्धोत्तरकालीन धोरणाचे भडक नकाशे रंगविणाऱ्या रिपब्‍लिकन पक्षातल्याच एका गटाने जॉर्ज मॅकलेलन या लष्करी पेशाच्या इसमाचा लिंकन यांचा प्रतिस्पर्धी म्हणून पुकारा केला. मतदान झाले त्या सुमारास युलिसिझ ग्रॅन्ट या सेनापतीने मिळविलेल्या यशाच्या बातम्या धडकल्या. लिंकन पुन्हा निवडून आले. फिरून अधिकार स्वीकार करताना त्यांनी केलेल्या भाषणात त्यांची दूरदृष्टी, माणुसकी, न्याय्यदृष्टी, ईश्वरावरील श्रद्धा इ. गुण स्पष्टपणे दिसतात.


अमेरिकेत विजयाबद्दल आनंदोत्सव चालू होता. फोर्ड थिएटरमध्ये १४ एप्रिल १८६५ रोजी रात्री होणाऱ्या नाट्यप्रयोगाला लिंकन, पत्‍नी व मित्रपरिवार यांच्यासह उपस्थित होते. त्यावेळी जॉन विल्क्स बूथ या नटाने पाठीमागून त्यांच्या डोक्यावर पिस्तुलातून गोळ्या झाडल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचे प्राणोत्क्रमण झाले.


लिंकन यांच्या अल्पकारकिर्दीत अनेक सुधारणांविषयक कायदे संमत झाले. त्यांपैकी टपाल व तारखाते, रेल्वेवाहतूक, किमान जमीन धारणा इत्यादी सुधारणा महत्त्वाच्या होत. रेल्वे अधिनियमांमुळे रेल्वेच्या प्रगतीस उत्तेजन मिळाले आणि सैन्याची वाहतूक सुकर झाली. होमस्टेड ॲक्टमुळे ६५ हेक्टर सार्वजनिक जमीनमर्यादा ठरली. यामुळे धान्योत्पादन वाढले. मॉरील लँड ग्रँड कॉलेज ॲक्टमुळे प्रत्येक घटक राज्यात शेतीविषयक व औद्योगिक महाविद्यालये उघडण्यात आली. अमेरिकेच्या अन्नधान्यविषयक सुबत्तेचा पाया या दोन कायद्यांनी घातला आणि त्याचे श्रेय लिंकन यांनाच द्यावे लागेल. याशिवाय यादवी युद्धाच्या वेळी लिंकन यांनी युद्धाच्या पद्धतीत आमूलाग्र बदल करून लांब पल्ल्याची हत्यारे आणि वेगवान वाहतुकीची साधने यांच्या साहाय्याने युद्धाची व्याप्ती वाढविली. यामुळे त्यांना आधुनिक युद्धशास्त्राचा जनक म्हणतात.


लोकांचेच, लोकांसाठी, लोकांनी केलेले राज्य म्हणजे लोकशाही, ही त्यांनी केलेली लोकशाहीची व्याख्या इतिहासात अजरामर झाली आहे. गुलामगिरीचे निर्मूलन, मानवी स्वातंत्र्याचा पुरस्कार, खंबीर युद्धनेतृत्व आणि युद्धोत्तर काळात देशाची पुनर्रचना करण्याची दूरदृष्टी ह्या संदर्भात लिंकन ह्यांनी केलेल्या विशेष कार्यामुळे अमेरिकेत त्यांना ‘राष्ट्रपिता ’ म्हणून गौरविण्यात येते.

➿➿➿➿➿➿➿➿➿➿

संकलन -) गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६


Featured Post

व्यायाम व योगा अवश्य करावा*

*व्यायाम व योगा अवश्य करावा*  *व्यायाम व योगा करण्याचे दहा फायदे:-*  1) व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते: व्यायाम करणारी...