बुधवार, २० जुलै, २०२२
स्मृतिदिन - २० जुलै १९३७* गुलियेल्मो मार्कोनीचा जन्म
*📬📬गुलियेल्मो मार्कोनी📬📬*
📧📧📧📧📧📧📧📧📧📧
*भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेता*
⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡
*स्मृतिदिन - २० जुलै १९३७*
गुलियेल्मो मार्कोनीचा जन्म इटलीतील 'बोलोन्या' शहरात २५ एप्रिल १८७४ रोजी झाला. मार्कोनीच्या जन्माच्या आधी १८६८ मध्ये मॅक्सेल या शास्त्रज्ञाने विजेचा प्रवाह वातावरणात आहे,अशी कल्पना मांडली होती. या वीजप्रवाहाचे गुणधर्मही त्याने वर्णिले होते. पण बाकीच्या शास्त्रज्ञांनी त्याकडे दुर्लक्ष केले.
मार्कोनीला लहानपणापासूनच विजेच्या प्रवाहाबाबत कुतूहल होते. हाइनरिक हर्ट्झचे लेखही त्याने वाचले होते.१८९५ मध्ये मार्कोनी हर्ट्झच्या संशोधनावर आपल्या वडिलांच्या बोलोन्यातील मोठ्या वाड्यात काम करू लागला.तो आपला पहिला बिनतारी संदेश एक मैल लांब पाठवू शकण्यात यशस्वी झाला.२ जून १८९४ मध्ये इंग्लंडमधील मुख्य पोस्ट ऑफिसच्या छपरावरून मार्कोनीचे पहिले प्रात्यक्षिक करण्यात आले.सरकारी अधिकारी, पोस्टातील मान्यवर त्या वेळी उपस्थित होते.
सॅल्सबरीमध्ये दुसर्या प्रात्यक्षिकाला वायुदल व सेनादलातील बरेच अधिकारी आले.आता दोन मैलांवरून बिनतारी संदेश दहा मैलांपर्यंत पोचू शकत होता. हळूहळू मार्कोनीच्या बिनतारी यंत्रणेचे जाळे सर्वत्र पसरत गेले. १९१४ मध्ये पहिले जागतिक युद्ध पुकारले गेले. मार्कोनीच्या बिनतारी यंत्रणेचा इटालियन नौदल, वायुदलास फार उपयोग झाला.जगातील सर्वांत मोठे वायरलेस स्टेशन मार्कोनीने उभारले.मार्कोनीला भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक व इतर अनेक पारितोषिके मिळाली.
🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏
संकलन -) गजानन गोपेवाड उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
Featured Post
व्यायाम व योगा अवश्य करावा*
*व्यायाम व योगा अवश्य करावा* *व्यायाम व योगा करण्याचे दहा फायदे:-* 1) व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते: व्यायाम करणारी...
-
*🔭🔬१० नोव्हेंबर 🔬🔭* 🔬⚗️🔭🔬⚗️🔭🔬⚗️🔭🔬 *जागतिक विज्ञान दिवस* 🔬⚗️🔭🔬⚗️🔭🔬⚗️🔭🔬 १० नोव्हेंबर, या दिवशी जगातील शांतता आणि विकास या व...
-
45 वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन महागाव येथे नुकतेच संपन्न झाले त्यामधील निवडक क्षण दिनांक 16/12/2019 ला या कार्यक्रमाला आमचे प्रेरणास...
-
तुषार धुळधुळे व आनंद पतंगे व सुरज धोत्रे प्राषी पेशी माहिती सादर करताना.
-
=================================================================...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा