गुरुवार, १३ जून, २०२४

शरीराला आलेला थकवा घालवण्यासाठी या गोष्टींचे सेवन*

*शरीराला आलेला थकवा घालवण्यासाठी या गोष्टींचे सेवन*
■■■■■■■■■■■■■■■■■■■

1. नारळ पाणी -दिवसभर ताजेतवाने राहण्यासाठी नारळ पाणी पिणे हा आरोग्याच्या दृष्टीकोनातून एक उत्तम आणि पौष्टिक असा पर्याय आहे. नारळाच्या पाण्यात प्रचंड प्रमाणात मिनरल्स असतात. यामुळे आपल्या शरीरातील ऊर्जेचा स्तर वाढण्यास मदत होते. दिवसाची सुरुवात करताना नारळ पाणी प्यावे. पण यामध्ये कोणत्याही अन्य साम्रगी मिसळू नये.

2. भाज्यांचा रस - आपल्या दिवसाची सुरुवात करताना भाज्यांचा रसाचे सेवन करावे. विशेषतः हिरव्या पालेभाज्यांचा यामध्ये समावेश करावा. पालक, पुदीना यांसारख्या हिरव्या पाल्यांचा ज्यूस प्यायल्यास थकवा जाणवत नाही.

3. गोजी बेरी -गोजी बेरी फळामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन्स, मिनरल्स, अ‍ॅ न्टीऑक्सिडेंट्स आणि 8 प्रकारचे अमिनो अॅसिड असतात.
नियमित स्वरुपात गोजी बेरीच्या एका ग्लासाचे सेवन केल्यास थकवा आणि तणाव दूर होण्यास मदत मिळते.

4. लिंबू पाणी - सकाळी तुम्ही लिंबू पाणी पित असाल, तर तुमचे संपूर्ण शरीर दिवसभर ताजेतवाने राहते. लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी आणि अ‍ॅ न्टीऑक्सिडेंट्स भरपूर प्रमाणात असल्यानं शरीरात रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मिळते.

5. ग्रीन टी -ग्रीन टीच्या सेवनाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. ग्रीन टीमुळे शरीरातील मेटाबॉलिझम चा स्तर वाढण्यास मदत होते आणि फॅट्सही बर्न होतात.

6. कोरफडीचा ज्यूस - सकाळच्या वेळेत कोरफडीचा ज्यूस प्यायल्यास शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडण्यास मदत होते. कोरफडीच्या गरामध्ये पाण्याचे प्रमाण भरपूर असते. यामुळे आपल्या शरीरातील पाण्याची पातळी समप्रमाणात राहण्यात मदत होते. यातील अ‍ॅ न्टी इन्फ्लेमेटरी तत्वामुळे वेदना, तणाव आणि थकवा दूर होतात.

7. आवळ्याचा ज्यूस - आवळ्याच्या ज्यूस प्यायल्याने संपूर्ण शरीर डिटॉक्स होते. यामुळे मेटाबॉलिक रेटदेखील वाढतो आणि संपूर्ण दिवस ताजेतवाने राहता. सोबत रोगप्रतिकारक क्षमताही वाढते
अग्निपंख शैक्षणिक समुह महाराष्ट्र राज्य

जीवनसत्वे* *Vitamins*

🟣🟣 *जीवनसत्वे*  *Vitamins*


*अ(A)*
प्रतिकारशक्ती वाढवते, त्वचेचे तसेच दातांचे आरोग्य सुधारते, उत्तम आरोग्याची भावना उत्पन्न करते.
पालक, गाजर, रताळे, कोबी, अंड्यातील पिवळा बलक, लोणी यातून मिळते.

*ब१(B1)*
पचन आणि शरीराचे चलनवलन सुधारते, चेतासंस्थेचे काम सुरळीत चालण्यासाठी आवश्यक आहे. हिरव्या पालेभाज्या, अंड्यातील पिवळा बलक, दाणे, ताजा अननस यातून मिळते.

*ब२(B2)*
मनावरील ताण कमी करते, पिष्टमय पदार्थांच्या पचनासाठी मदत करते, पेशींना प्राणवायू पुरवते. यीस्ट, अंड्यातील पिवळा बलक, हिरव्या पालेभाज्या, दूध यातून मिळते.

*ब३(B3)*
कोलेस्टरॉल कमी करते, रक्ताभिसरणातील दोष दूर करते, रक्तातील साखरेच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवते. हिरव्या पालेभाज्या, दाणे, यीस्ट यातून मिळते

*ब५(B5)*
शरीरातील शक्ती वाढवते. धान्ये, सोयाबीन, अंड्यातील पिवळा बलक यातून मिळते.

*ब६(B6)*
प्रथिनांच्या पचनासाठी उपयुक्त, मनावरील ताण कमी करते, हार्मोन्स तयार करते. सोयबीन, यीस्ट, हिरव्या पालेभाज्या, सूर्यफुलाच्या बीया यातून मिळते.

*ब१२(B12)*
पेशी निर्मिती साठी आवश्यक, लाल रक्तपेशी तयार करण्यात महत्वाचा सहभाग. यीस्ट, दुग्धजन्य पदार्थ यातून मिळते.

*फॉलिक ऍसिड*
लोह पचण्यास मदत करते, शरीरातील रक्ताची पातळी कायम राखते (गर्भवती स्त्रीला याची दुप्पट गरज असते)
गडद हिरव्या पालेभाज्या, यीस्ट, कंदभाज्या, दूध, खजूर, संत्र्याचा रस यातून मिळते.

*क(C)*
प्रतिकारशक्ती वाढवते, अल्सर निर्मितीस विरोध करते, दातांचे व हिरड्यांचे आरोग्य सुधारते, लोह पचविण्यास मदत करते
लिंबूवर्गातील फळे (संत्रे, मोसंबी) कांदा, लसुण, मिरची, हिरव्या पालेभाज्या, स्ट्रॉबेरी, कलिंगड, बटाटे, द्राक्षे यातून मिळते.

*ड(D)*
कॅल्शियम पचविण्यास मदत करते, हाडांच्या वाढीसाठी उपयुक्त, चेतासंस्थेचे काम सुरळीत चालण्यासाठी आवश्यक. (स्त्रीयांना दूध पाजताना अत्यंत आवश्यक) सुर्यप्रकाश, लोणी, दूध, अंड्यातील पिवळा बलक यातून मिळते.

*इ(E)*
रक्तात गुठळ्या होण्यास प्रतिबंध करते, रक्तप्रवाह सुरळीत ठेवते, पेशींना प्राणवायू पुरविण्यात मदत करते.
लोणी, अंडी, लेट्युस, पुर्ण धान्ये, दूध, पालक, सोयबीन, सुर्यफूल, भोपळा यातून मिळते.

*फ(F)*
कोलेस्टेरॉल कमी करते, हृदयरोगांचा प्रतिकार करते. दाणे, काजू यातून मिळते.

*के(K)*
रक्ताभिसरणासाठी उपयुक्त. यीस्ट, गडद हिरव्या पालेभाज्या, सोयाबीन, सुर्यफूलाचे तेल, अंड्यातील पिवळा बलक यातून मिळते.

....अग्निपंख शैक्षणिक समुह महाराष्ट्र राज्य

आरोग्य विषयक टिप्स*

*आरोग्य विषयक टिप्स*

*मासिक पाळी वेळेत येत नाही? या पाच सवयी बदला…* 
              महिलांना मासिक पाळीशी संबंधित अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. मासिक पाळी उशिरा येणे किंवा अनेक महिने न येणे हे देखील त्रासाचे कारण बनते. मासिक पाळीत काही महिन्यांचे अंतर असल्यास आणि जर पिरियड सायकल बिघडायला लागली तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. खरं तर, या कालावधीत त्रास होणे हे काही वाईट सवयींचे लक्षण असू शकते. मुलींनी या सवयी काढून टाकण्यावर आणि त्या सुधारण्यावर भर द्यावा, अन्यथा ही समस्या काळानुसार वाढू शकते.

 *मासिक पाळीवर परिणाम करणाऱ्या वाईट सवयी* 

 *खूप झोपणे* 
               महिलांनी जास्त वेळ झोपू नये. आपल्या शरीराला गरज आहे तेवढीच झोप घ्यावी. गरजेप्रमाणे झोप घेतल्यास, तुमची मासिक पाळी देखील नियमित होईल.

 *वजनात बदल* 
                   अचानक वजनात फरक दिसून आला, तर त्याचा परिणाम मासिक पाळीवर देखील होतो. झपाट्याने वजन कमी झाल्यामुळे किंवा वाढल्यामुळे शरीरात अनेक बदल होतात, ज्यामुळे पीरियड सायकल देखील बदलू शकते. म्हणजेच जर तुम्ही आवश्यकतेपेक्षा जास्त व्यायाम करत असाल किंवा तुमच्या वजनाकडे अजिबात लक्ष दिले नाही तर तुमची मासिक पाळी देखील अनियमित होऊ शकते.

 *आहारात अडथळा* 
                 उत्तम आहार हे उत्तम आरोग्याचे रहस्य आहे. जर तुमचा आहार योग्य नसेल तर त्याचा फटका तुमच्या शरीराला सहन करावा लागतो. जरी तुम्ही बाहेरचे जंक फूड जास्त खाल्ले किंवा तुमच्या आहारात आवश्यक पोषक तत्वांचा समावेश केला नाही तरीही तुमची मासिक पाळी वेळेवर येणे थांबू शकते. त्यामुळे सकस आहार खा. बाहेरील जंक फूड जास्त खाणे टाळा. ज्या पदार्थांत पोषक तत्वांचा समावेश असेल, असे पदार्थ खा.

 *गर्भनिरोधक गोळ्यांचा अतिरेक* 
                 अनेक मुली गर्भधारणा टाळण्यासाठी लग्नाआधी किंवा लग्नांनंतर गर्भनिरोधक गोळ्या जास्त प्रमाणात सेवन करतात. गर्भनिरोधक गोळ्या शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडवतात, ज्यामुळे अनियमित मासिक पाळीची समस्या देखील उद्भवते.

*ताण* 
             तणावामुळे शरीराचे अनेक नुकसान होते. जसा आरोग्यासाठी ताण हानीकारक आहे, तसाच हा ताण पीरियड सायकलवर देखील परिणाम करू शकतो. तणाव कमी करणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे, अन्यथा मासिक पाळीवर त्याचा परिणाम वेगवेगळ्या प्रकारे दिसून येतो. यामुळे तुमची मासिक पाळी अनियमित होवू शकते. त्यामुळे नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे तुमच्या शरीरावर देखील त्याचा चांगला परिणाम होईल.

 *तीन महिने अमृत ज्युस आणि लेडी केअर घ्या आणि वरील समस्यापासून मुक्त व्हा* 

अग्निपंख शैक्षणिक समुह महाराष्ट्र राज्य

विज्ञान केंद्र दिंडाळा गजानन गोपेवाड

प्रकाश हा विद्युत चुंबकीय तरंगांनी बनतो हा सिद्धांत मांडणारे भौतिकशास्त्रज्ञ - जेम्स क्लार्क मॅक्सवेल.*

*प्रकाश हा विद्युत चुंबकीय तरंगांनी बनतो हा सिद्धांत मांडणारे भौतिकशास्त्रज्ञ - जेम्स क्लार्क मॅक्सवेल.*

13 जून 1831.
5 नोव्हेंबर 1879.

विद्युत् चुंबकीय क्षेत्र सिद्धांत व  द्रव्याचा गत्यात्मक सिद्धांत या विषयांतील त्यांच्या कार्यामुळे भौतिकीच्या इतिहासात त्यांना अत्यंत महत्त्वाचे असे स्थान प्राप्त झाले आहे.

मॅक्सवेल यांचा जन्म एडिंबरो येथे झाला. १८४७ मध्ये ते एडिंबरो विद्यापीठात दाखल झाले. वयाच्या केवळ पंधराव्या वर्षी त्यांनी विशिष्ट अंडाकृती वक्र काढण्याची एक रीत शोधून काढली व तीवरील त्यांचा शोधनिबंध एडिंबरोच्या रॉयल सोसायटीने प्रसिद्ध केला. १८५० साली त्यांनी केंब्रिज विद्यापीठात प्रवेश केला आणि १८५४ मध्ये ते द्वितीय रॅंगलर म्हणून उत्तीर्ण झाले व पहिल्या स्मिथ परितोषिकाचे ई. जे. राउथ यांच्यासह मानकरी ठरले. १८५५ मध्ये ते ट्रिनिटी कॉलेजाचे फेलो झाले. पुढील वर्षी ॲबर्डींन येथील मारिशाल कॉलेजात भौतिक विज्ञानाच्या अध्यासनावर त्यांची नेमणूक झाली. त्याच कॉलेजाचे प्राचार्य ड्यूअर यांची कन्या कॅथरिन हिच्याशी जून १८५८ मध्ये त्यांनी विवाह केला. त्यांच्या पत्नीने त्यांना वर्णदृष्टी व वायूची श्यानता (दाटपणा) यांवरील प्रयोगशालीय संशोधनात पुष्कळ मदत केली. १८६० मध्ये ते लंडन येथील किंग्ज कॉलेजात ज्योतिषशास्त्र व भौतिकीचे प्राध्यापक झाले. पुढे १८६५ मध्ये ग्लेनलेअर येथील आपल्या वडिलोपार्जित इस्टेटीकडे लक्ष देण्यासाठी ते शिक्षण क्षेत्रातून निवृत्त झाले. तेथेच त्यांनी विद्युत् व चुंबकत्वावरील आपला प्रख्यात विवेचक ग्रंथ ट्रिटाइज ऑन इलक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम लिहिला व तो १८७३ मध्ये प्रसिद्ध झाला. १८७१ मध्ये केंब्रिज येथे प्रायोगिक भौतिकीचे पहिले प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक झाली. तेथेच त्यांनी कॅव्हेंडिश प्रयोगशाळेची योजना तयार करून ती उभारण्याचे आणि तिचा विकास करण्याचे महत्कार्य केले. १८७४ पासून मृत्यूपावेतो त्यांनी या प्रयोगशाळेचे संचालक म्हणून काम केले.

मॅक्सवेल यांनी मायकेल फॅराडे यांच्या भौतिकीय संकल्पनांना गणितीय स्वरूप दिले व त्यामुळे त्या मान्यता पावण्यास मदत झाली. मॅक्सवेल यांनी विद्युत् व चुंबकीय आविष्कारांसंबंधीच्या ‘दूरवर्ती क्रिये’ च्या (अवकाशातील एकमेकांपासून दूर अंतरावर असणाऱ्या वस्तूंमध्ये मध्यस्थ यंत्रणेशिवाय होणाऱ्या परस्परक्रियेच्या) संकल्पनेला विरोध करून हे आविष्कार माध्यमातील क्रियेद्वारे घडून येतात, या फॅराडे यांच्या दृष्टिकोनाचा पाठपुरावा केला.

दूरवर्ती क्रियेची संकल्पना टाळण्यासाठी त्यांनी विद्युत् व चुंबकीय आविष्कारांतील परस्परसंबंधाच्या स्पष्टीकरणाकरिता ईथर कल्पित माध्यमाच्या संकल्पनेचा पुरस्कार केला. या संकल्पनेला सैद्धांतिक गणितीय स्वरूप मॅक्सवेल यांनी आपल्या चार प्रमाणबद्ध अशा समीकरणांच्या द्वारे दिले. (मॅक्सवेल विद्युत् चुंबकीय समीकरणे). यांपैकी शेवटची दोन समीकरणे विद्युत् व चुंबकीय क्षेत्राचे सातत्य दाखवितात आणि उरलेली दोन समीकरणे विद्युत् व चुंबकीय यांपैकी कोणत्याही एका क्षेत्रामध्ये कालानुसार बदल झाला, तर त्यामुळे दुसऱ्या प्रकारच्या क्षेत्राची जी निर्मिती होते त्या दोन क्षेत्रांमधील परस्परसंबंध स्पष्ट करतात. आधुनिक भौतिकीमधील ⇨ पुंज सिद्धांत इ. घडामोडीमुळे रूढ भौतिकीपैकी बरेच भाग व मीमांसा कालबाह्य ठरल्या आहेत. मॅक्सवेल विद्युत् चुंबकीय समीकरणेच फक्त भौतिकीमधील आपले महत्त्वाचे स्थान तसेच टिकवून ठेवताना आढळतात ही एक नमूद करण्याजोगती गोष्ट आहे, असे म्हटले पाहिजे.

मॅक्सवेल यांना १८६५ मध्ये असे आढळले की, ज्या क्षोभांमुळे विद्युत् चुंबकीय प्रवर्तन निर्माण होते (चुंबकीय क्षेत्राच्या तीव्रतेत बदल केल्यास विद्युत् चालक प्रेरणा म्हणजे विद्युत् मंडलात प्रवाह वाहण्यास कारणीभूत होणारी प्रेरणा उत्पन्न होते) तो क्षोभ माध्यमामधून तरंगाच्या स्वरूपात व प्रकाशवेगाने प्रसारित होतो. या दोहोंचा विचार करून त्यांनी प्रकाश म्हणजे माध्यमातून प्रसारित होणारे विद्युत् चुंबकीय अवतरंग (माध्यमातील कणांचे कंपन तरंग प्रसारणाच्या दिशेशी लंबदिशेत होणारे तरंग) आहेत, असा क्रांतिकारी निष्कर्ष मांडला [विद्युत् चुंबकीय प्रारण]. १८८७ मध्ये हाइन्रिख हर्ट्झ या जर्मन भौतिकीविज्ञांनी मॅक्सवेल यांचे विधान सत्य असल्याचे प्रायोगिक रीत्या दाखवून दिले आणि याचबरोबर रेडिओविज्ञान व अभियांत्रिकी यांचा पाया घातला. प्रारण (तरंगरूपी ऊर्जा) जर एखाद्या वस्तूच्या पृष्ठभागावर पडले, तर यामुळे पृष्ठभागावर दाब निर्माण होईल, हा मॅक्सवेल यांचा निष्कर्षही सत्य असल्याचे पुढील काळात पी. एन्. ल्येब्येड्येव्ह या रशियन शास्त्रज्ञांनी १९०० साली तर ई. एफ्. निकल्स व जी. एफ्. हल या अमेरिकन वैज्ञानिकांनी जास्त सुविकसित उपकरण योजना वापरून १९०३ मध्ये दाखविले.

मॅक्सवेल यांनी विद्युत् चुंबकीय तरंगांच्या प्रसारणासाठी ईथराच्या आधाराची आवश्यकता प्रतिपादन केली होती आणि पुढे आपला विद्युत् चुंबकीय सिद्धांत विकसित केल्यावर ‘ईथर विस्थापना’ चा किंवा प्रकाश उद्‌गमाच्या गतीमुळे प्रकाशवेगात किती बदल होईल या प्रश्नाविषयीही सखोल विचार केला होता. पृथ्वीवर याकरिता प्रयोग केल्यास त्यामध्ये प्रकाशाच्या जाण्याचा व येण्याचा काळ मोजणे आवश्यक असते. या परिस्थितीमध्ये वरील परिणाम v²/ c² (v–उद्‌गमाचा वेग व c–प्रकाशाचा वेग) या कोटीचा असल्यामुळे तो मोजण्याच्या दृष्टीने अत्यल्प ठरेल, असे त्यांना दिसून आले. तथापि आपल्या आयुष्याच्या शेवटच्या वर्षी त्यांनी डी. पी. टॉड या ज्योतिर्विदांना पृथ्वीसापेक्ष गुरू ग्रहाचे स्थान बदलते तेव्हा त्याच्या उपग्रहांच्या आवर्तकालात (ग्रहाभोवती एक प्रदक्षिणा करण्यास लागणाऱ्या कालात) होणाऱ्या फरकाचे या परिणामाचे मापन करण्याकरिता निरीक्षण करावे, असे पत्राद्वारे सूचविले होते. या सूचनेमुळे पुढे आइन्स्टाइन यांच्या सापेक्षता सिद्धांताकरिता महत्त्वपूर्ण ठरलेल्या मायकेलसन-मॉर्ली प्रयोगास चालना मिळाली.

मॅक्सवेल यांचे वर्णदृष्टीवरील कार्य ते एडिंबरो येथे पदवीपूर्व विद्यार्थिदशेत असल्यापासूनच सुरू झाले व नंतर ते कित्येक वर्षे चालू होते. त्यांनी तांबडा, हिरवा व निळा हे प्राथमिक रंग म्हणून निवडले. एका भोवऱ्याच्या पृष्ठभागावर विविध तीव्रतेच्या रंगछटांचे कागद लावून भोवरा फिरवून या रंगाचे मिश्रण करण्याची रीत त्यांनी वापरात आणली. अशा प्रकारे कोणत्याही एका रंगाचे भोवऱ्याच्या साहाय्याने विश्लेषण करण्याची पद्धती त्यांनी उपयोगात आणली व ‘परिमाणात्मक वर्णमापना’ चा पाया घातला. जर एखाद्या रंगातील प्राथमिक रंगाचा ऋण तसेच धन अंश (वाटा) लक्षात घेतला, तरच टॉमस यंग यांनी प्रतिपादिलेले गृहीतक लागू पडते, असे मॅक्सवेल यांनी निरीक्षणांद्वारे दाखविले रंगांधत्व हे डोळ्यातील तांबड्या वर्णग्राहकाचा अभाव दर्शविते असे त्यांनी सुचविले आणि रंगांध व्यक्तीला तांबडा व हिरवा हे रंग वेगवेगळे ओळखता यावेत म्हणून एक चष्माही तयार केला. निरनिराळ्या रंगाच्या प्रकाशशलाका एकमेकींत वेगवेगळ्या प्रमाणात मिसळून दिलेल्या रंगछटेशी जुळती अशी रंगछटा मिळविता येईल, अशी एक पेटी त्यांनी तयार केली. या पेटीच्या साहाय्याने निरनिराळ्या व्यक्तींच्या रंगसंवेदानांचा तक्ता तयार करण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयोगात पुष्कळच अचूकता आली आणि त्यावरून प्राकृतिक (सर्वसाधारण) माणसाची रंगभेदनक्षमता खूपच चांगल्या प्रतीची असल्याचे त्यांनी दाखवून दिले.

वरील त्रिवेणी सिद्धांतावरून मॅक्सवेल यांनी असा निष्कर्ष काढला की, तीन निरनिराळ्या रंगाच्या प्रकाश गाळण्यांतून छायाचित्रण करून मग त्या प्रतिमांचे पुन्हा एकत्रीकरण केल्यास रंगीत छायाचित्र मिळविता येईल. यांचे प्रात्याक्षिकही त्यांनी १७६१ मध्ये रॉयल इन्स्टिट्यूशनमध्ये एका व्याख्यानात एका टार्टन फितीचे (निरनिराळ्या रंगांच्या पट्ट्या असलेल्या लोकरी कापडाच्या फितीचे) छायाचित्रण करून दाखविले.

ॲबर्डीन येथील वास्तव्यात त्यांनी चार वर्षे परिश्रम करून शनीच्या कड्यांसंबंधी लिहिलेल्या निबंधाला ॲडम्स पारितोषिक मिळाले. कड्यांच्या स्थैर्याचे गणितीय विश्लेषण करून ही कडी पृथक् कणांची बनलेली आहेत, असा निष्कर्ष त्यांनी काढला. या संशोधनामुळे वायूंच्या गत्यात्मक सिद्धांताविषयी त्यांनी नंतर केलेल्या कार्याचा पाया घातला गेला.

मॅक्सवेल यांनी १८५९ मध्ये असे प्रतिपादन केले की, वायूतील रेणूंचे वेग एखाद्या सांख्यिकीय वितरणानुसार असले पाहिजेत. त्यापूर्वी या सर्व रेणूंचे वेग सारखेच आहेत असे मानण्यात येत होते. ठराविक तापमानाच्या वायूकरिता मॅक्सवेल यांनी या वितरणाचे सूत्र सिद्ध केले आणि हे वितरण ‘मॅक्सवेल वेगवितरण’ या नावाने ओळखण्यात येते. त्यांच्या गणितीय सिद्धतेत काही विवाद्य गृहीतांचा समावेश आहे, असा आक्षेप घेतला जातो. तरीही त्यांचे अंतिम सूत्र ग्राह्य असून सांख्यिकीय यामिकीत व्यापक प्रमाणात वापरण्यात येणाऱ्या सूत्रांपैकी ते एक आहे. त्यामुळे वायूच्या गत्यात्मक सिद्धांतात सांख्यिकीय पद्धतीचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला. त्यानंतर त्यांनी वायूची श्यानता, ऊष्मीय संवाहकता व विसरण (रेणू एकमेकांत मिसळणे) या वायू परिवहन आविष्कारांवर महत्त्वाचे संशोधन केले. वायूची श्यानता दाबावर अवलंबून नसते व ती द्रवाप्रमाणे वाढत्या तापमानाबरोबर कमी न होता वाढत जाते, असे सैद्धांतिक दृष्ट्या व प्रयोगाद्वारे पण त्यांनी सिद्ध केले. आयुष्यातील शेवटच्या महत्त्वाच्या निबंधात त्यांनी विरल वायूंच्या गतिकी सिद्धांताचा पाया घातला.

मॅक्सवेल यांची कल्पनाशक्ती अतिशय तीव्र होती.  ऊष्मागतिकीच्या दुसऱ्या सिद्धांताचे सांख्यिकीय स्वरूप स्पष्ट करण्याकरिता त्यांनी ‘मॅक्सवेल यांचे भूत’ ही विलक्षण कल्पना पुढे मांडली. हे भूत आपल्या बुद्धीचा उपयोग करून या सिद्धांताच्या विरुद्ध प्रक्रिया सिद्ध करू शकत होते. या विरोधाभासाचे उत्तर अनेक वर्षेपर्यंत मोठमोठ्या वैज्ञानिकांस सापडले नाही. आधुनिक काळात ब्रीय्वँ यांनी अवगमाशी ऋण एंट्रॉपी निगडित असते, असे दाखवून या भूताला अखेरीस गाडून टाकले.

मॅक्सवेल यांनी १८६८ मध्ये गतिनियंता या प्रयुक्तींचे (गतिदायक शक्ती किंवा रोध यात बदल झाला तरी यंत्राची गती स्थिर राखण्यास मदत करणाऱ्या प्रयुक्तींचे) गणितीय विश्लेषण पद्धतीने प्रथमच विवरण केले. अशा प्रकारच्या प्रयुक्ती जेम्स वॉट (वाफ एंजिनाच्या नियंत्रणासाठी), सी. डब्ल्यू. सीमेन्स, एम्. फूको इत्यादींनी वापरलेल्या होत्या. मॅक्सवेल यांनी गतिनियंत्याच्या गतीकरिता अवकल समीकरणे शोधून काढली व त्यांत एका अतिरिक्त पदाचा समावेश केला. ज्याला नंतर ऋण पुनःप्रदाय अशी संज्ञा मिळाली. त्यांनी या समीकरणाद्वारे गती स्थिर राहून गतिनियंता कार्यरत राहण्यासाठी आवश्यक असणाऱ्या अटी निर्धारित केल्या. अशा प्रकारे या त्यांच्या कार्याद्वारे नियंत्रण सिद्धांताचा पाया घातला गेला. पारस्परिक विचलनाचे प्रमेय मांडून व प्रभाव गुणांक पद्धतीचा शोध लावून त्यांनी बांधकाम संरचना विश्लेषण सिद्धांताचाही पाया घातला. माशाच्या डोळ्यातील स्फटिकीय भिंगाच्या संरचनेच्या संदर्भात त्यांनी भूमितीय प्रकाशकीचा अभ्यास करण्यास १८५३ मध्ये प्रारंभ केला. एका बिंदूतून निघणारे सर्व किरण भिंगातून पलीकडे गेले असता दुसऱ्या बिंदूत अचूकपणे मिळतील असे परिपूर्ण केंद्रीकरण देणारे माध्यम त्यांना पाहिजे होते आणि अशा माध्यमाचे गणितीय विनिर्देश त्यांनी दिले. यावरूनच पुढे छायाचित्रणात वापरण्यात येणाऱ्या सुपरिचित ‘मत्स्यनेत्र’ भिंगाचा शोध लागला.

रॉयल सोसायटीचे सदस्य म्हणून १८६१ मध्ये त्यांची निवड झाली व सोसायटीच्या रम्फर्ड पदकाचा बहुमान त्यांना मिळाला (१८६०). टिट्राइज ऑन इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेवटिझम या प्रसिद्ध ग्रंथाखेरीज थिअरी ऑफ हिट (१९७१) व मॅटर अँड मोशन हे त्यांचे ग्रंथही प्रसिद्ध आहेत. त्यांचे शास्त्रीय कार्य एकत्रितपणे केंब्रिज विद्यापीठातर्फे १८९० मध्ये प्रसिद्ध करण्यात आले. मॅक्सवेल यांनी हेन्री कॅव्हेंडिश यांच्या विद्युत् शास्त्रावरील अप्रकाशित संशोधनाचे उत्तम प्रकारे संपादन करून ते १८७९ मध्ये प्रसिद्ध केले. त्यातील काही महत्त्वाचे प्रयोग त्यांनी स्वतः करून पडताळले, एन्सायक्लोनपीडिया ब्रिटानिकाच्या विख्यात नवव्या आवृत्तीकरिता त्यांनी टी. एच्. हक्‌सली यांच्या समवेत वैज्ञानिक संपादक म्हणून काम केले व अनेक लेखही लिहिले. यांखेरीज ते विनोदी कवितांकरिताही प्रसिद्ध होते. वयाच्या केवळ अठ्ठेचाळीसाव्या वर्षी ते कर्करोगाने केंब्रिज येथे मृत्यू पावले.

_Udise plus portal (SDMS) वर विद्यार्थी प्रमोशन खालील पद्धतीने करावे.._*

*_Udise plus portal (SDMS) वर विद्यार्थी प्रमोशन खालील पद्धतीने करावे.._*

_सर्वप्रथम खालील लिंक वर क्लिक करावे._👇

https://sdms.udiseplus.gov.in/g0/#/login

_त्यानंतर Login page येईल. तिथे UDISE ची माहिती भरण्यासाठी वापरलेला ID PASSWORD टाकावा._

_Login झाल्यावर Academic year 2023 - 24 व Academic year 2024-25असे दोन पर्याय दिसतील त्यापैकी आपण Academic year 2024 - 25 ला क्लिक करावे._

_त्यानंतर डाव्या कोपऱ्यात जे पर्याय दिसतात त्यामध्ये मध्यभागी Progression Activity हा पर्याय आहे त्याला क्लिक करायचे आहे._


_*प्रमोशन करण्यासाठी आपल्याला progression module वर  Go जिथे लिहिलेले आहे त्यावर क्लिक करायचे आहे.*_

_त्यानंतर आपल्याला विद्यार्थ्यांची मागील वर्षाची इयत्ता व तुकडी निवडण्याचा पर्याय येईल._

_तो निवडून go वर क्लिक केल्यावर आपल्या त्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांची यादी ओपन होईल._

*_त्यानंतर आपल्याला प्रत्येक विद्यार्थ्यांची माहिती भरायची आहे. माहिती भरत असताना त्यामध्ये Progression status मध्ये Promoted हा पर्याय निवडायचा आहे. Marks मध्ये आपल्याला त्याचे मागील वर्षाचे गुण टक्केवारी मध्ये टाकायचे आहेत हे गुण पूर्णांकातच टाकायचे आहेत. त्यानंतर त्याचे मागील वर्षाचे उपस्थित दिवस व Schooling status मध्ये तो आपल्या शाळेत शिकत आहे की शाळा सोडून दुसऱ्या शाळेत गेला आहे हा पर्याय निवडायचा आहे.Class and section to be promoted मध्ये आपल्याला त्याची तुकडी निवडायची आहे व हे सर्व झाल्यावर अपडेट वर क्लिक करायचे आहे._*

_अशा पद्धतीने एक एक करून आपल्याला सर्व विद्यार्थी promote करायचे आहे त्यानंतर सर्व विद्यार्थी promote झाल्यानंतर शेवटी असलेल्या Finalize या टॅबवर क्लिक करून तिथे आपल्याला promote झालेली संख्या दिसेल ते बरोबर असल्यावर confirm यावर क्लिक करायचे आहे अशा पद्धतीने आपला एक वर्ग promote झालेला असेल. याच पद्धतीने आपल्याला शाळेतील इतर वर्ग सुद्धा promote करायचे आहेत._

_वरील पद्धतीने आपण शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे udise portal वर Promotion अगदी मोबाईलवर सुद्धा सहज करू शकतो._

`अग्निपंख शैक्षणिक समुह लेखन गजानन गोपेवाड,✍️✍️

मंगळवार, ६ फेब्रुवारी, २०२४

गजानन गोपेवाड

सयाजीराव गायकवाड

*🌹||||| लोकशाहीतही हवाहवासा वाटणारा राजा म्हणजे महाराजा सर सयाजीराव गायकवाड महाराज |||||🌹*

      महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी बडोद्यात सुधारणा करताना हिंदुस्थानाबरोबरच जगभरातील लोकांच्या जीवनात बदल होण्यासाठी कार्य केले. अनेक जागतिक प्रश्नावर स्वतःच्या चिंतनाने भाष्य केले आणि त्यासाठी समर्पक पर्याय सुचविले. जागतिक पातळीवरील आपत्तीत सहाय्य केले. विचारवंत राजा सयाजीराव गायकवाड महाराजांना जागतिक मानववंश परिषद, ऑक्सफर्डचे अध्यक्षपद, दुस-या जागतिक धर्म परिषदेचे अध्यक्ष पद, अमेरिकन सरकारने दिलेला गार्ड ऑफ ऑनर, वेगवेगळ्या देशांत सन्मानपुर्वक मानपत्रे, पहिल्या जागतिक शांतता परिषदेचे अध्यक्ष, पतितपावन पदवी, जागतिक लायब्ररी संघटनेने केलेला सन्मान, लंडन लायब्ररीचे उपाध्यक्ष, अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद, अखिल भारतीय तत्त्वज्ञान परिषद आणि अखिल भारतीय हिंदी साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थान अशा प्रकारचे जागतिक पातळीवरील अनेक सन्मान प्राप्त झाले.
      सयाजीराव महाराजांच्या जागतिक पातळीवरील कार्यामुळे वेगवेगळ्या देशांतील महनीय व्यक्तींनी त्यांच्यावर लेख लिहिले. यामधील काही लेखकांनी *एक राजा म्हणून नव्हे; तर एक माणूस म्हणून महानता स्पष्ट केलेली आहे.*
      अशा या आदर्श राजाचे दि. ०६ फेब्रुवारी १९३९ रोजी मुंबई येथे निधन झाले.

*हिज हायनेस सर सयाजीराव गायकवाड महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन.*

शिका शिकवा गजानन गोपेवाड

शिका-शिकवा. ऐकमेकांना प्रेरणा द्या : गजानन गोपेवाड

 यवतमाळ : दिनांक 22 जाने. रोजी जागतिक दर्जाचे शिक्षण देण्यासाठी आमचे गुरूजनवर्ग सज्ज प्रत्येक मुलांमध्ये नैसर्गिक गुणवत्ता हि वेगवेगळी असते. त्या सोबत प्रत्येक मुलांना नैसर्गिक कौशल्य जन्मजात असते. मुल परिसर, परिवारातुन सर्व प्रथम भाषा विकसित करून बाहेर पडते. शाळेत विद्यार्थ्यांना या देशाचे, जगाचे भविष्यातील सुजाण नागरिक घडविण्याचे काम आमचे गुरूजी करत आहे. अशा ज्ञानार्जन विकसित झालेल्या विद्यार्थ्यांना आपले जग स्विकरते. आणि जागतिक दर्जाचे शिक्षण देणे आता काळाची गरज आहे. सोबतच जागतिक दर्जाचे विद्यार्थी घडविणे हे सुद्धा काळाची गरज आहे. शिक्षण क्षेत्रातील ईयत्ता निहाय क्षमता त्या त्या विषयातील पण विकसित होणे गरजेचे आहे. आणि या क्षमता विकसित करतांना बहुतांश गुरूजींच्या कौशल्ये पणाला लागतात. घटकानुरूप शैक्षणिक साहित्य आहे त्या परिस्थितीत मिळेल ते साहित्य वापरून शैक्षणिक साहित्य जर अध्यापनात वापरून शिक्षण दिले तर विद्यार्थ्यांना चिरकाल स्मरणात राहील. कारण शैक्षणिक साहित्य कसे बनवले. शैक्षणिक साहित्य बनवताना कुठल्या अडचणी आल्या. आलेल्या अडचणी विद्यार्थी कसे हाताळून शैक्षणिक साहित्य निर्माण केले. या स्वअनुभूतीतून विद्यार्थी शिकत असतो मुले स्वंयप्रेरणेतुन शिकत असतो. गुरूजी फक्त मार्गदर्शन करतो.सुलभक बनून राहतो. मुलांच्या जिज्ञासू वृत्तीचे सन्मान कसा करावा. सेल्फी विथ सक्सेस मधून विद्यार्थ्यांना कशी प्रेरणा देता येईल. वेगवेगळ्या खेळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांंचा, शारीरिक, मानसिक, भावनिक, बौद्धिक क्षमता विकसित करणे शक्य आहे. या साठी सुध्दा दर्जेदार शैक्षणिक साहित्य निर्माण करून जर आपण अध्यापन केले तर आपले अध्यापन दर्जेदार होईल. व विद्यार्थी चिरकाल स्मरणात राहील. हा आशावाद करायला काही हरकत नाही. आज वेगवेगळ्या शाळेत वेगवेगळी समस्या आहे. पण समस्या जरी असेल तरीही आपण या समस्येवर तोडगा काढु शकतो. एक सुसज्ज शैक्षणिक संग्रहालय आपण आपल्या शाळेत ऊभे करू शकतो. ईथे आवशयक त्या ठिकाणी, समाज सहभागातून, लोकवर्गणीतून, ईतर दान दात्याकडून आपण आपल्या शाळेत शैक्षणिक संग्रहालय निर्माण करून विद्यार्थ्यांना या शैक्षणिक संग्रहालयात मुक्त संचार करू दिला पाहिजे. त्याच सोबत वाचणाची गोडी लागावी म्हणून शाळेत विविध प्रकारची पुस्तके पण आपण एक बालवाचनालय निर्माण करून ऊपलब्ध करून दिले तर विद्यार्थी वाचनाची गोडी निर्माण करायला काही वेळ लागणार नाही. यात गुरूजी फक्त योग्य वेळी योग्य तिथे मार्गदर्शन करावे. आज आपण पाहतो हे जग स्पर्धेचे आहे, आपला विद्यार्थी पण या जागतिक स्पर्धेत टिकला पाहिजे हि आपली पण जबाबदारी आहे. सोबत पालकांची पण तेवढिच जबाबदारी आहे. विद्यार्थी स्वंयप्रेरणेतुन शिकताना विद्यार्थ्यांना कडे लक्ष देणे गरजेचे आहे. असाच एक कार्यक्रम ऊमरखेड पंचायत समितीचे मा. सतिश दर्शनवाड गटशिक्षणाधिकारी यांनी ऊमरखेड पंचायत समिती मधील शाळेत राबविले. वाचन, लेख कार्यक्रम सुरू केले. त्या कार्यक्रमास गुणवत्तेचा पँटर्न म्हणून बरेच वरिष्ठ अधिकारी यांनी दखल पण घेतली. यात नक्कीच उपक्रमशील शिक्षक, विद्यार्थी, पालक यांचा सहभाग तितकेच महत्त्वाचे आहे. त्याची फलनिष्पत्ती आज आपण सर्व बघत आहे. इथे फक्त ईच्छा शक्ती पाहिजे. अग्निपंख शैक्षणिक समुह पण असेच  विद्यार्थ्यांना व शिक्षकांना प्रेरित करत असतो. आपणास एक आव्हान या निमित्ताने आपण आपल्या शाळेत नवनवीन शैक्षणिक साहित्य, व्हिडीओ निर्मिती, शैक्षणिक साहित्य विध्यार्थाना उपलब्ध करून दिले पाहिजे.

शुक्रवार, १५ डिसेंबर, २०२३

आजचे विज्ञान प्रश्न

💥 *अग्निपंख    शैक्षणिक समुहाचा     उपक्रम💥*
 
        ✍🏻 *विज्ञान प्रश्न 🖋️

१. शेतीचे प्रमुख हंगाम कोणते?

२. सेंद्रिय शेती कशाला म्हणतात?

३. भारताचा सुमारे किती टक्के भूभाग शेतीसाठी वापरला जातो?

४. जून ते ऑक्टोबर पर्यंत घेतल्या जाणाऱ्या पिकांना काय म्हणतात?

५. मार्च ते जून मध्ये घेतल्या जाणाऱ्या पिकांना काय म्हणतात?
उत्तरे:
१. खरीप हंगाम व रबी हंगाम 

२. नैसर्गिक पदार्थ वापरून केलेल्या शेतीला सेंद्रिय शेती म्हणतात.

३. ६० टक्के

४. खरीफ पिके.

५. उन्हाळी पिके.
💥एकाच घटकावर प्रश्न विचारून 
मुलांची ती संकल्पना स्पष्ट करण्यासाठी अशा प्रकारे प्रश्न विचारले जातात ,त्यामुळे मुलांच्या ज्ञानात भर पडून तो घटक ,उपघटक त्यांच्या नेहमीसाठी लक्षात राहील  .   
 "विज्ञान साक्षरता हाच आमचा ध्यास".

     
       💎निर्मिती💎
💥 *अर्चना मेहरे💥*
( विषय शिक्षक)
*जि.प.कें. उच्च. प्राथमिक शाळा. माहुरगड जि.नांदेड*

बोधकथा

*************************
  *बोध कथा*
*************************
  *कर्म आणि भावना.*
----------------------------------------

  *कथा*

*एकदा एक बाई गायीला केळे खायला घालत होती.  पण गाय ते केळं खात नव्हती.  ती बाई परत -परत त्या गायी जवळ जाऊन केळे गायीच्या तोंडासमोर नेत होती पण गाय केळं खायला तयार नव्हती.*

 शेवटी गाय वैतागली आणि ती  बाईला शिंगाने मारायला धावली.  तशी ती बाई पळून गेली. 
त्या गायीच्या जवळच एक सांड उभा होता.  तो गायीच्या जवळ येऊन बोलला, ' ती बाई एव्हढं प्रेमाने खाऊ घालत होती तर तु का  नाही खालस? 
तेव्हा गाय म्हणाली, ' आज तिची एकादशी आहे म्हणून पुण्य कमावण्या साठी मला खाऊ घालत होती.  एरवी मी तिच्या घरासमोर जाऊन उभी राहते तर काठी घेऊन मारायला धावते आणि मला हाकलून देते. 

पुढे गाय बोलली,  ' *भुकेल्याला प्रेमाने सुखी भाकरी दिली तरी गोड  लागते.*  

जो स्वतःच्या स्वार्थासाठी पुण्य कर्म करण्याचा प्रयत्न करतो  तो *दुर्योधन* आहे. 
जो केवळ आपल्या माणसांचे भले करण्यासाठी पुण्य कर्म करण्याचा प्रयत्न करतो  तो *युधिष्टीर* आहे. 
आणि जो  सर्वांचे भले करण्यासाठी पुण्य कर्म करण्याचा प्रयत्न करतो  तो *श्रीकृष्ण* आहे. '

  *बोध*

 *तर लक्षात ठेवा पुण्य कर्म करण्याबरोबर भावना महत्वाच्या असतात*

⚡आजचे विज्ञान प्रश्न ⚡1)गुरुत्वाकर्षणाचा शोध सर आयझॅक न्यूटन यांनी------शतकात लावला. 2)वस्तूवर कोणत्याही प्रकारे ओढणे व ढकलण्यासाठी लावलेल्या जोरास------ म्हणतात. 3)वस्तूवरील--------बल म्हणजे त्या वस्तूचे वजन होय. 4)------- बल हे नेहमीच गतीच्या विरोधात कार्य करते. 5)शिलाई मशीन,विद्युत पंप,वाॅशिंग मशीन ही ------- बलाची उदाहरणे आहेत. ✨उत्तरे ✨1)17 व्या 2)बल 3)गुरूत्वीय 4)घर्षण 5)यांत्रिक 🪷निर्मिती 🪷 सौ अर्चना मेहरे

आजचे विज्ञान प्रश्न

⚡आजचे विज्ञान प्रश्न ⚡
1)गुरुत्वाकर्षणाचा शोध सर आयझॅक न्यूटन यांनी------शतकात लावला. 
2)वस्तूवर कोणत्याही प्रकारे ओढणे व ढकलण्यासाठी लावलेल्या जोरास------ म्हणतात. 
3)वस्तूवरील--------बल म्हणजे त्या वस्तूचे वजन होय. 
4)------- बल हे नेहमीच गतीच्या विरोधात कार्य करते. 
5)शिलाई मशीन,विद्युत पंप,वाॅशिंग मशीन ही ------- बलाची उदाहरणे आहेत. 
           ✨उत्तरे ✨
1)17 व्या 
2)बल 
3)गुरूत्वीय 
4)घर्षण 
5)यांत्रिक 
              🪷निर्मिती 🪷
              अर्चना मेहरे

गुरुवार, २० जुलै, २०२३

यवतमाळ जिल्ह्यातील माहिती

 #जिल्हा_माहिती


यवतमाळ जिल्हा


यवतमाळ जिल्हा पूर्वी येवतमाळ म्हणून ओळखला जायचा. हा राज्याच्या पूर्व-मध्य भागात विदर्भाच्या प्रदेशात आहे. नागपूर आणि अमरावतीनंतर हा विदर्भातला लोकसंख्येनुसार तिसरा सर्वात मोठा जिल्हा आहे. यवतमाळ शहर हे जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.

आर्णी, उमरखेड, कळंब, पांढरकवडा - केळापूर, घाटंजी, झरी जमनी, दारव्हा, दिग्रस, नेर, पुसद, बाभुळगाव, महागाव, मारेगाव, यवतमाळ, राळेगाव, वणी हे या जिल्ह्यातले तालुके आहेत. 

 यवतमाळ पूर्वीच्या बेरार प्रांताचा भाग होता. बेरार सातवाहन राजघराण्याच्या (इ.स.पू. दुसरं शतक ते इसवी सन दुसरं शतक), वाकाटक राजवंश (तिसरं ते सहावं शतक), चालुक्य घराणं ( सहावं ते आठवं शतक), राष्ट्रकूट घराणं (आठवं ते दहावं शतक), चालुक्य (दहावं ते बारावं शतक), आणि शेवटी देवगिरीचे यादव (बारावं शतक ते चौदावं शतक) यांच्या अधिपत्याखाली होतं. चौदाव्या शतकाच्या सुरुवातीला दिल्लीचा सुलतान अलाउद्दीन खिलजी यानं हा प्रदेश जिंकला तेव्हा खिलजी राजवटीचा काळ सुरू झाला. चौदाव्या शतकाच्या मध्यात दिल्ली सल्तनतपासून हा प्रदेश विभक्त झाला आणि बहमनी सल्तनतचा भाग झाला. पंधराव्या शतकाच्या शेवटी बहमनी सल्तनतचे पाच तुकडे झाले. १५७२ मध्ये बेरार अहमदनगर इथल्या निजामशाही सल्तनतचा भाग बनलं. निजामशाहीनं १५९५ मध्ये बेरारला मुघल साम्राज्याच्या स्वाधीन केलं. १८ व्या शतकाच्या सुरुवातीला मुघल राजवट कमकुवत झाल्यावर, हैदराबादचा निजाम असफ जाह पहिला, यानं १७२४ मध्ये साम्राज्याचा दक्षिणेकडचा प्रांत (बेरारसह) स्वतःच्या ताब्यात घेतला.

अबुल फजलच्या ऐन-इ-अकबरीमध्ये बेरारची तेरा सरकारांमध्ये किंवा महसूल जिल्ह्यांमध्ये विभागणी करण्यात आल्याचं नमूद आहे. यवतमाळ जिल्ह्यात अकबराच्या काळात कलाम (कळंब) आणि माहूरच्या सरकारांचा समावेश होता. या सरकारांचे काही मोजके महाल आताच्या यवतमाळ जिल्ह्यात होते. यवतमाळ हे यवत- लोहारा या नावाखाली परगण्याचं मुख्यालय म्हणून नोंदीमध्ये आढळतं. लोहारा हे यवतमाळच्या पश्चिमेला ५ किमी (३ मैल) अंतरावर असलेल्या गावाचं नाव आहे. यवत म्हणजे डोंगर, शिखर, पुडा. माळ हा प्रत्यय महाल (परगणा-नगर) चा अपभ्रंश आहे. अकबराच्या काळात या क्षेत्राचा जमीन महसुल दहा लाख रुपयांपेक्षा जास्त होता. 

१८५३ मध्ये बेरारच्या उर्वरित भागासह हा जिल्हा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या प्रशासनाखाली आला. बेरारची विभागणी पूर्व बेरार आणि पश्चिम बेरारमध्ये करण्यात आली. त्यात यवतमाळ जिल्ह्याचा समावेश पश्चिम बेरारमध्ये करण्यात आला. १८६४ मध्ये यवतमाळ आणि इतर काही तालुक्यांच्या प्रदेशाला सुरुवातीला आग्नेय बेरार आणि नंतर वणी असं नाव देण्यात आलं. १९०३ मध्ये बेरार हे हैदराबादच्या निजामानं भारताच्या ब्रिटिश सरकारला भाड्यानं दिलं असं म्हणतात किंवा ब्रिटिशांकडून भाड्यानं घेतलं असंही म्हणतात. 

यवतमाळ जिल्हा वर्धा आणि पैनगंगा-वैनगंगा खोऱ्याच्या नैऋत्य भागात वसलेला आहे. 

या जिल्ह्याचं क्षेत्रफळ १३,५८२ चौरस किमी (५,२४४ चौरस मैल) (राज्याच्या ४.४१ टक्के)  आहे. जिल्ह्याची एकूण लांबी १९० किलोमीटर (१२० मैल) आहे आणि उत्तर ते दक्षिण रुंदी १६० किमी (१०० मैल) आहे. त्याच्या उत्तरेकडच्या सीमेवर पाणिघाट आहे, ज्याला बेरारची दरी म्हणतात.

जिल्ह्यात पैनगंगा आणि वर्धा या दोन प्रमुख नद्या आहेत. वर्धा मध्य प्रदेशात उगम पावते. पैनगंगा नदी ही वर्धेची मुख्य उपनदी आहे आणि वर्धेत सामील होण्यापूर्वी जिल्ह्याच्या दक्षिण सीमेवर वाहते. वर्धेच्या इतर उपनद्यांमध्ये यवतमाळ पठारावरच्या बेंबळा आणि निर्गुडा यांचा समावेश होतो. त्या फक्त पावसाळ्यात वाहतात. 

जिल्ह्याचं हवामान कोरडं आणि उन्हाळ्यात मध्यम थंड तर हिवाळ्यात गरम असतं. जिल्ह्यात सरासरी वार्षिक ९११.३४ मिमी (३६ इंच) पाऊस पडतो. जिल्ह्याच्या पश्चिम भागात ८८९ मिमी (३५ इंच) आणि पूर्व भागात ११२५ मिमी (४४इंच) पाऊस पडतो. आहे. नैऋत्य मोसमी हंगामात जवळपास सर्वत्र पाऊस पडतो. अलीकडच्या वर्षांत अतिवृष्टीमुळं पिकांचा नाश होणं आणि जमीन लागवडीसाठी अयोग्य होणं, हा प्रकार वाढला आहे.

यवतमाळ शहर आणि जिल्ह्याची भारतातल्या सर्व प्रमुख शहरांशी आणि महाराष्ट्राशी वाहतुकीची चांगली जोडणी आहे. राष्ट्रीय महामार्ग ७ या जिल्ह्यातून जातो. तर राज्य महामार्ग ३६१ हा यवतमाळ शहर आणि जिल्ह्यातून जातो. खांडवा (म.प्र.) ते करंजी हा प्रस्तावित राष्ट्रीय महामार्ग परतवाडा, अमरावती, यवतमाळ मार्गे जाणार आहे. जिल्ह्यात जवाहरलाल दर्डा विमानतळ भरी इथं आहे. यवतमाळ-मूर्तिजापूर रेल्वे मार्ग आणि वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे मार्ग, यांचं काम चालू आहे. भारतातली पहिली ब्रॉडगेज मेट्रो नागपूर ते यवतमाळपर्यंत धावणार आहे. 

ज्वारी आणि कापूस हे जिल्ह्याचं मुख्य उत्पादन आहे. कापूस आणि सागवान ही इथली प्रमुख निर्यात आहे. निर्यात होणाऱ्या इतर वस्तूंमध्ये चुना, लाकडी फर्निचर आणि संत्री यांचा समावेश होतो. सोयाबीन हे महत्त्वाचं पीक आहे. २००६ मध्ये पंचायत राज मंत्रालयानं यवतमाळला देशातल्या २५९ सर्वाधिक मागासलेल्या जिल्ह्यांपैकी एक मानलं आहे. 

या जिल्ह्याच्या जमिनीत डेक्कन ट्रॅप खडक आहे. लाव्हा बेड. त्यावर या जिल्ह्यात खाणकाम चालतं. हा जिल्ह्याच्या उत्पन्नाचा एक भाग आहे.

जिल्ह्यात बिटरगाव, टिपेश्वर, तिवसाळा आणि उंबर्डा इथं सामाजिक वनिकरण जंगलं आहेत. तिथल्या झाडांमध्ये साग, तेंदू, हिरडा, आपटा आणि मोहा, बांबू यांचा समावेश होतो. जंगलात आढळणाऱ्या प्राण्यांमध्ये जंगली अस्वल, हरीण, नीलगाय, सांबर, हायना आणि मोर यांचा समावेश होतो. टिपेश्वर आणि पैनगंगा इथं वन्यजीव अभयारण्य आहेत. टिपेश्वरला व्याघ्र प्रकल्प करण्याची तयारी सुरू आहे.

आर्णी आणि दिग्रस तालुका ही तीर्थक्षेत्रे आहेत. बाबा कंबलपोश आणि घंटीबाबा मंदिर यासाठी प्रसिद्ध आहेत. कळंबचं चक्रवती नदीच्या कधी चिंतामणी मंदिर, घाटंजीतलं मारोती महाराज मंदिर, रंगनाथ स्वामी, वणी, अंबा देवी, केळापूर आणि जांभोरा माहूर इथलं दत्त मंदिर प्रसिद्ध आहे. नेर तालुक्यात धनज माणिकवाडा फकीरजी महाराज संस्थान आहे. 

जिल्ह्यात गोंड राजा, गोंड, गोंड परधान, कोलाम, आंध आणि बंजारा हे समुदाय आहेत. 

लाभ वन्यजीव अभयारण्य, सहस्त्रकुंड धबधबा, पेनगंगेच्या काठावर कपेश्वर जंगल आणि गरम पाण्याचे झरे आहेत. सहस्त्रकुंड धबधबा मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवर आहे. या धबधब्याच्या अलीकडचा भाग नांदेड जिल्ह्यातल्या किनवट तालुक्यात येतो तर पलिकडचा भाग यवतमाळ जिल्ह्यातल्या उमरखेड तालुक्यात आहे.

महाराष्ट्रावर सर्वाधिक काळ म्हणजे १९६३ ते १९७५ पर्यंत राज्य करणारे मुख्यमंत्री वसंतराव नाईक आणि अल्पकाळ मुख्यमंत्री आणि हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राहिलेले सुधाकरराव नाईक, विदर्भाचा वाघ म्हटले जाणारे आणि विदर्भ जनता काँग्रेसचे संस्थापक जांबुवंतराव धोटे, भारतीय फील्ड हॉकी खेळाडू आकाश चिकटे, लोकमत दैनिकाचे संस्थापक आणि राज्याचे मंत्री जवाहरलाल दर्डा, क्रिकेटपटू अलिंद नायडू, ललित यादव, भौतिकशास्त्रज्ञ फहीम हुसेन, वकील आणि मराठी गझलकार वासुदेव वामन उर्फ भाऊसाहेब पाटणकर हे याच जिल्ह्यातले. लंडनमध्ये गाजलेल्या आजीबाई बनारसे याही याच जिल्ह्यातल्या.

यवतमाळ शहर नगरपरिषद आहे. हे यवतमाळ जिल्ह्याचं प्रशासकीय मुख्यालय आहे. हे शहर एका पठारावर वसलेलं आहे, जे इतर तालुक्यांपेक्षा तुलनेनं जास्त उंचीवर आहे. पूर्वी येओती किंवा येवतमाळ म्हणून ओळखलं जाणारं यवतमाळ हे बेरार सल्तनतचं मुख्य शहर होतं आणि जुन्या लिखाणानुसार जगातलं सर्वात सुरक्षित ठिकाण होतं. १८६९ मध्ये यवतमाळ नगरपरिषदेची स्थापना करण्यात आली, परंतु त्यानंतर लगेचच ती विसर्जित करण्यात आली. १८९४ मध्ये ती पुन्हा स्थापन झाली आणि जिल्ह्यातली सर्वात जुनी नगरपरिषद बनली. एलियट हे इथले पहिले महापौर होते आणि लेफ्टनंट डब्ल्यू. हेगे उपमहापौर होते. गोविंद पुनाजी बारी हे यवतमाळ नगरपरिषदेचे पहिले भारतीय अध्यक्ष होते. (२ जाने. १९१४ ते ३१ मे १९३२). २२ डिसेंबर १९३४ रोजी नगरपरिषदेच्या अध्यक्षपदासाठी पहिली निवडणूक घेण्यात आली होती. त्यापूर्वी त्यांची नियुक्ती करण्यात येत असे.

या जिल्ह्यात शकुंतला नावाची मिनी ट्रेन ही ब्रिटिश सरकारनं कापसाची वाहतूक करण्यासाठी बांधली होती. ती ऐतिहासिक ट्रेन आता बंद आहे.

या शहरात उष्णकटिबंधीय हवामान आहे. यवतमाळमध्ये वार्षिक सरासरी तापमान २६.८ अंश सेल्सिअस असतं. इथं सरासरी ९४६ मिमी पाऊस पडतो.

ब्रिटिश राजवटीत यवतमाळ शहर हिल स्टेशन म्हणून वर्गीकृत होतं. यवतमाळमध्ये कापूस-जिनिंग आणि प्रेसिंग दोन्ही चालतं. हे शहर जिल्ह्यातलं प्रमुख व्यापारी केंद्र आहे. तिथून २९ मैल (४७ किमी) अंतरावर असलेल्या धामणगाव स्टेशनशी रस्त्यानं जोडलेलं आहे. यवतमाळमधल्या प्रमुख उद्योगांमध्ये जीन्ससाठी डेनिम फॅब्रिक्स तयार करणाऱ्या रेमंड यूसीओ मिलचा समावेश आहे. 

लोहारा, दारव्हा, दिग्रस, पुसद, उमरखेड, वणी, उमरी, केळापूर, राळेगाव बाभूळगाव, नेर, आणि वणी-मारेगाव इथं प्रमुख औद्योगिक केंद्र आहेत. यवतमाळ शहर, आर्णी, वणी, दारव्हा, दिग्रस, घाटंजी, मोहडा, पुसद, उमरखेड आणि केळापूर  या मुख्य बाजारपेठा आहेत.

जिल्ह्यात पुसद हा तालुका आहे. पूस नदीच्या नावावरून हे नाव पडलं आहे. त्याचं प्राचीन नाव 'पुष्पवंती' होतं. पुसद हे यवतमाळ जिल्ह्यातलं दुसऱ्या क्रमांकाचं मोठं शहर आहे. पुसद हा आदिवासी भाग आहे. बंजारांची संख्या जास्त आहे. १३ व्या शतकातली हेमाडपंती स्थापत्यकलेची दोन मंदिरं, १८७४ साली बांधलेली एक उत्तम टाकी इथं आहे.

इथली मुख्य पिकं बाजरी, गहू, तूर, कापूस, भुईमूग, सूर्यफूल आहेत. पुसद तालुक्यातील डोंगराळ भागात मातीचा प्रकार खडबडीत किंवा काळ्या रंगाचा सैल भुसभुशीत आहे. सिंचनासाठी पूस नदीवर मध्यम आकाराचं पुसद शहराच्या वायव्येला १८ किमी (११ मैल) वरचं पूस धरण १९७१ मध्ये बांधलं गेलं. नंतर १९८३ मध्ये पुसदच्या पूर्वेला ४० किमी (२५ मैल) महागावजवळ खालचं पूस धरण बांधलं गेलं. कार्प माशांचा मत्स्यपालनाच्या व्यवसाय इथं चालतो. १९५८ च्या पूर्वीपासून पुसदमध्ये कापूस जिनिंग आणि ऑइल प्रेस कारखाने आहेत.

उमरखेड हे पैनगंगा नदीजवळील नगरपालिकेचं शहर आहे. ते तालुक्याचं ठिकाण आहे. हे यवतमाळपासून ११० किमी अंतरावर आहे. हे तिन्ही बाजूंनी पर्वत आणि घाटांनी वेढलेलं आहे आणि त्याच्या एका बाजूनं सपाटी आहे. उमरखेड शहरापासून ३.६ किमी अंतरावर असलेल्या चुरमुरा गावाजवळ अंबोना तलाव हे पर्यटन स्थळ आहे. नौकाविहार आणि सूर्यास्त आणि सूर्योदय पाहण्यासाठी प्रसिद्ध आहे. उमरखेडपासून किमी अंतरावर जेवली गावाजवळ पैनगंगा नदीतला सहस्रकुंड धबधबा आहे. ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये इथं पर्यटक येतात.

उन्हाळ्यात इथलं तापमान ४५ अंश सेल्सिअसपर्यंत वाढतं, तर हिवाळ्यात ८ ते १२ अंश सेल्सिअसपर्यंत घसरतं.

पैनगंगा वन्यजीव अभयारण्य इथं आहे. पैनगंगा नदी या अभयारण्याच्या तिन्ही बाजूंनी वाहते. हे ३२५ चौरस किलोमीटरच्या विस्तीर्ण क्षेत्रात पसरलेलं आहे. यात विविध प्रकारच्या वनस्पती आणि प्राणी आहेत. पैनगंगा वन्यजीव अभयारण्यात मिश्र पानझडी जंगलं आणि सागवान जंगलं आहेत. प्राण्यांच्या असंख्य प्रजातींमध्ये कोल्हा, बिबट्या, जॅकल, हरे, चार शिंगांचा काळवीट, पोर्क्युपिन, सांबर, नीलगाय, काळवीट, चिंकारा आणि इतर अनेकांचा समावेश आहे. पक्षी निरीक्षकांसाठी गिधाड, बुलबुल, कबूतर, किंगफिशर, कोकिळ, पतंग आणि इतर आहेत. पैनगंगा वन्यजीव अभयारण्याला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ म्हणजे जानेवारी ते जून. 

वणी तालुका यवतमाळ जिल्ह्याच्या पूर्व भागात असून चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेला लागून आहे. एक तालुका असूनही, वणी हे बाजारपेठेमुळं महत्त्वाचं व्यावसायिक केंद्र आहे. यवतमाळ शहर वणीपासून ११९ किमी आणि चंद्रपूर फक्त ५५ किमी अंतरावर आहे. पूर्वी वणीला 'वुन' म्हणून ओळखलं जात असे. शहराला निर्गुडा नदी आहे, जी पुढं वर्धा नदीत विलीन होते.

कोल इंडिया लिमिटेडची वेस्टर्न कोलफिल्ड्स ही उपकंपनी वणी शहराच्या परिसरात कोळसा खाण चालवते शहराजवळ उकनी, पिंपळगाव, जुनाड, कोलारपिंप्री, राजूर, कुंबरखणी, घोन्सा, नीलजाई, नायगाव या कोळसा खाणी आहेत.

तालुक्याची अर्थव्यवस्था मुख्यतः आजूबाजूच्या परिसरातली शेती आणि खाण व्यवसायांवर चालते. अनेक कापूस जिनिंग आणि प्रेसिंग युनिट्सदेखील कार्यरत आहेत. अलिकडच्या काळात कापूस बियाणं तेल मिलिंग युनिटदेखील सुरू झालीत. याशिवाय चुनखडीच्या उपलब्धतेमुळं वॉल पुटी उत्पादन युनिट्स इथं ग्रामीण भागात कार्यरत आहेत. एमआयडीसीमध्ये मेटल फॅब्रिकेशन युनिट, सिमेंट प्रीकास्ट आणि पाईप बनवण्याचं युनिट, डाळ मिल (पल्स प्रोसेसिंग फॅक्टरी) इ. आहेत.

कोळशाचे प्रचंड साठे आणि लगतच्या भागात असलेल्या अनेक कोळशाच्या खाणींमुळं या शहराला ब्लॅक डायमंड सिटी हे नाव पडलं आहे. कापूस आणि सोयाबीन ही प्रमुख पिकं आहेत.

परिसरात चुनखडीची उत्खननही केली जाते.

रंगनाथ स्वामी मंदिर, जैताई माता मंदिर, जोड-महादेव मंदिर, जैन स्थानक, संभवनाथ जैन मंदिर, काळाराम मंदिर, साई मंदिर, जगन्नाथ महाराज मंदिर, हनुमान मंदिर, महाकाली माता मंदिर, गणपती मंदिर, शिवमंदिर, शनी मंदिर, राम मंदिर, विठ्ठल मंदिर, संत गाडगे बाबा मंदिर, जटाशंकर मंदिर, गजानन महाराज मंदिर, दत्त मंदिर, जगदंबा मंदिर, महादेव मंदिर, जामा मशीद, मस्जिद ई हयात, नगिना मशीद, मदिना मशीद, अक्सा मशीद, दर्गाह हजरत सय्यद मुराद अली शाह बाबा, दर्गा ख्वाजा मोहम्मद हयात, शीख गुरुद्वारा, सिंधी गुरुद्वारा, मेथोडिस्ट चर्च, नवीन मेथडिस्ट चर्च एवढं सगळं या शहरात आहे.

दारव्हा हा तालुका आहे. यवतमाळ जिल्ह्यातलं एक शहर आणि नगरपरिषद आहे. रंगो बापूजी गुप्ते हे स्वातंत्र्यसैनिक शहरात गुप्तपणे राहत होते, असं इथं सांगितलं जातं. हे शहर 'गोळीबार चौक' या चौकासाठीदेखील प्रसिद्ध आहे. इथं ब्रिटिश सैनिकांनी निशस्त्र मेळाव्यावर गोळीबार केला होता.

दारव्हा इसवी सन १८०० ते १९०० या काळात शेंगदाणा तेल आणि कापसाच्या मोठ्या बाजारपेठांपैकी एक होतं. तिथं ८ जिनिंग आणि २०९ तेल घाणी होत्या. सातवाहन काळात दारव्हा हे गुरं, दुग्धजन्य पदार्थ, कापूस आणि कापूस बियाण्यासाठी प्रसिद्ध बाजारपेठ होतं.

दारव्हा शहरापासून दोन किमी अंतरावर दिग्रस रस्त्यावर बैरागी बाबा मठ आहे. त्याची स्थापना रंगो बापूजी गुप्ते यांनी केली होती. ब्रिटिश शासकांपासून ते इथं लपून राहिले होते. 

जिल्ह्यातलं महागाव हे कॉटन टाउन म्हणून ओळखलं जाणारं छोटं तालुक्याचं गाव आहे. महागाव जवळपास सर्व बाजूंनी डोंगरांनी वेढलेलं आहे. पूस नदी इथून वाहते. ती पिण्याच्या पाण्याचा आणि सिंचनाच्या पाण्याचाही स्रोत आहे.

महागाव गावात साक्षरतेचं प्रमाण जास्त आहे. महागाव गावाचा साक्षरता दर महाराष्ट्राच्या ८२.३४% च्या तुलनेत ८५.५४% आहे. महागावमध्ये पुरुष साक्षरता ९१.३१% आहे, तर महिला साक्षरता दर ७९.६८% आहे.

महागाव आणि आजूबाजूचा परिसर बहुतांशी उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत म्हणून शेतीवर अवलंबून आहे. पूस धरण, वेणी धरणामुळं या भागातली जमीन चांगली सिंचनाखाली आहे. पूस नदीतून शेतीला थेट सिंचनाचं पाणीही मिळतं. 

इथल्या मुख्य पिकांमध्ये ऊस, कापूस, सोयाबीन, बंगाल हरभरा, ज्वारी आणि गहू यांचा समावेश होतो. शहरात कापूस आणि धान्याची बाजारपेठ आहे. महागावची मुख्य पिकं कापूस व ऊस ही असल्यानं वसंत सहकारी साखर कारखाना, वसंतनगर आणि पुष्पवंती सहकारी साखर कारखाना, सवना हे दोन सहकारी साखर कारखाने आहेत. पिंपळगाव इथं बाबासाहेब नाईक कॉटन मिल आहे.

जिल्ह्यात तालुका असलेलं आर्णी हे गाव अरुणावती नदीच्या काठावर वसलेलं आहे.आर्णी कापूस उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. त्याच्या लगतच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीन आणि कापूस पिकाची शेती आहे. इथं मोठा धान्य बाजार आहे आणि ३ उप-धान्य बाजार आणि एक खाजगी धान्य बाजारदेखील आहे.

आर्णी यवतमाळनंतर जिल्ह्यातली सर्वात मोठी बाजारपेठ आहे. शहरात ५ कापूस जिनिंग आणि प्रेसिंग मिल्स, २ पीनट मिल्स आणि एक डाळ मिल आहेत.

तालुका केळापूर (ज्याला पांढरकवडा असंही म्हणतात.) हे भारताच्या हे श्रीनगर - नागपूर - हैदराबाद - बंगलोर - कन्याकुमारी राष्ट्रीय महामार्ग ४४ वर आहे.

मल्लिकार्जुन मंदिर, घंटी बाबा मंदिर, भवानी देवी मंदिर, रामानंद महाराज मठ, शनी मंदिर, नगिना मशीद, लाल इमारत इथं प्रसिद्ध आहेत.

जिल्ह्यात घाटंजी हे खूप जुनं शहर आणि नगरपरिषद आहे. या भागात शेतकरी दर्जेदार कापसाचं उत्पादन घेत असल्यानं याला 'कॉटन सिटी' असंही म्हणतात. हे तालुक्याचं ठिकाण वाघाडी नदीच्या काठी आहे. वाघाडी नदी आणि तिच्या धरणामुळं पाण्याची सोय आहे. सागवान लाकूड, निलगिरीची झाडं आणि इतर अनेक मसाल्यांच्या झाडांचा समावेश असलेलं भरपूर वनक्षेत्र इथं आहे. या जंगलांमध्ये विविध प्रकारचे प्राणी राहतात.

नेर यवतमाळ जिल्ह्यातला तालुका आहे. फकीरजी महाराज मंदिर, गणपती मठ नावाचं गणेश मंदिर, सोमेश्वर मंदिर, जामा मशीद, कृषी उत्पन्न बाजार समिती आणि कापूस बाजार यांचा समावेश आहे.

राळेगाव यवतमाळ जिल्ह्यातलं तालुक्याचं ठिकाण आहे. राळेगाव कापूस उत्पादनात आणि सोयाबीन आणि इतर डाळींच्या उत्पादनात विशेष आहे. हे महाराष्ट्राची कापसाची राजधानी म्हणूनही ओळखलं जातं. या तालुक्यात दहाहून अधिक जिनिंग व प्रेसिंग व एक रॉ ऑइल मिल आहे. 

पूर्वी हे शहर यवतमाळ जिल्ह्यातल्या पांढरकवडा तालुक्याचा भाग होता आणि नंतर तो तालुका झाला. 

तालुका कळंब गणेश आणि मुस्लिम विद्वान बाबा बासुरीवाले यांच्या मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. कळंबकचं गणेश मंदिर हे विदर्भातल्या अष्टविनायकापैकी एक आहे. 

सतराव्या शतकाच्या सुरुवातीला हे गाव मुघल साम्राज्याच्या अंतर्गत त्याच नावाच्या सरकारची (सुभा) राजधानी होतं. एक महत्त्वाचं महसूल गाव होतं. त्याचं नाव पूर्वी 'कलाम' असं होतं.

बाभुळगाव हा यवतमाळ जिल्ह्यातला तालुका आहे. यवतमाळपासून २२ किमी अंतरावर आहे.

झरी जमनी हाही यवतमाळ जिल्ह्यातला तालुका आहे.

मारेगाव हा यवतमाळ जिल्ह्यातला तालुका आहे. मारेगाव हे एक लहान गाव आहे. इथं २०१५ मध्ये नगर पंचायत घोषित करण्यात आली. हे वणी यवतमाळ रस्त्यावर वणीपासून १८ किमी अंतरावर आहे.

इथला प्रमुख व्यवसाय शेती आहे. कापूस आणि सोयाबीन ही दोन्ही महत्त्वाची पिकं आहेत. काळी माती आहे. मारेगाव इथं तहसील कचेरी, पंचायत समिती, दिवाणी न्यायालय व इतर कार्यालयं व बँका आहेत. मार्डी रस्त्यावर चार किमीवर सिमेंट कारखाना, नवरगाव इथं धरण, नरसाळा इथं स्टोन व क्रशर खाणी, वणी रस्त्यावर गौराळा इथं चुनखडीच्या खाणी आहेत.

दोन जिनिंग आणि प्रेसिंग कारखाने आहेत. लोकसंख्येमध्ये बहुतेक आदिवासींचा समावेश आहे. त्यात गोंड आणि कोलाम जमाती आहेत. या तालुक्याचं विभाजन करूनच ‘झरी-जमनी’ हा दुसरा तालुका तयार करण्यात आला आहे. या भागात अलीकडच्या काळात नवीन कोळशाच्या खाणींचा शोध लागला आहे. लोअर पूस धरण, फॉक्सटेल इको रिट्रीट, टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य इथं आहे.

बोरेगाव बांध - यवतमाळपासून ५ कि.मी. अंतरावर बोरेगाव बांध हे लोकांच्या पाहण्याचं ठिकाण आहे. 

टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य - यवतमाळमधल्या सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळांमधे या अभयारण्याचा समावेश होतो. १४८.६३ वर्ग किलोमीटर परिसरात पसरलेल्या या अभयारण्याला निसर्गाचं वरदान आहे. अनेक प्रकारच्या वनस्पती या ठिकाणी आहेत. या जंगलात वाघ, जंगली डुक्कर, चित्ता, हरिण, ब्ल्यू बेल, एंटीलोप्स, बाइसन पाहायला मिळतात.

यवतमाळ जिल्ह्यातून संत्रा, लिंबू आणि लाकडाचं फर्निचर यांची निर्यात मोठ्या प्रमाणात केली जाते.

संकलन:-गजानन गोपेवाड

शुक्रवार, ३ फेब्रुवारी, २०२३

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव 🇮🇳*

 *🇮🇳 स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव 🇮🇳*

➿➿➿➿➿➿➿➿➿

       🇮🇳 *गाथा बलिदानाची* 🇮🇳

                 ▬ ❚❂❚❂❚ ▬                  संकलन : gajanan gopewad

                                                   

➿➿➿➿➿➿➿➿➿

🚩🤺🚩🇮🇳👳‍♀️🇮🇳🚩🤺🚩


                   *नरवीर*

    *तानाजी काळोजीराव मालुसरे*

         ( शिवरायांचे सरदार )


       *जन्म : इ.स. १६२६*

*(जावळी, सातारा जिल्हा, महाराष्ट्र, भारत)*


       *वीरमरण : ४ फेब्रुवारी १६७०*

   *(सिंहगड, पुणे, महाराष्ट्र, भारत)*


टोपणनाव : तान्हाजी

अपत्ये : रायबा


तानाजी मालुसरे हे शिवाजी महाराजांच्या सैन्यातील एक सरदार होते. त्यांनी स्वराज्य स्थापनेपासूनच अनेक महत्त्वाच्या घडामोडीत सहभाग घेतला होता.


🙎‍♂️ *बालपण*

                   सातारा जिल्ह्यातल्या जावळी तालुक्यातील गोडवली गावात तानाजी मालुसरे यांचे बालपण गेले.


🤺 *कामगिरी*

         अफजलखानाच्या स्वारीच्या वेळी महाराजांनी काही निवडक सरदारांना प्रत्येकी हजार मावळ्यांचे सैन्य दिले होते. तानाजींनी ह्या सैन्याच्या बरोबरीने खानाच्या फौजेवर तुटून पडून उत्तम कामगिरी बजावली होती.


🤺 *नरवीर तानाजी मालुसरेची एक अपरिचित लढाई*

                  तानाजी मालुसरे असे नाव घेतले की लोकांना त्याच्या सिंहगडावर केलेल्या पराक्रमाची आठवण होते. सर्वसामान्यांसाठी त्यांचे चरित्र या एकट्या प्रसंगापुरतेच मर्यादित झाले आहे. परंतु त्याने केलेल्या इतर पराक्रमांविषयी सर्व सामान्यांना अजिबातच माहिती नाही. तानाजी मालुसरेचे संगमेश्वरचे युद्ध हे असेच अपरिचित युद्ध आहे. या युद्धाला हवे आहे तेवढे महत्त्व देऊन लेखकांनी जगासमोर मांडले नाही. हा तानाजींवर झालेला अन्यायच आहे.


संगमेश्वरी असतांना शत्रूने केलेल्या अकस्मात हल्ल्यादरम्यान तानाजीने कमालीचे धाडस दाखविले होते. त्या प्रसंगाचे तपशीलवार वर्णन पुढीलप्रमाणे :


दाभोळ, चिपळूण, संगमेश्वर काबीज झाले, राजापूर लुटले गेले. ह्या बातम्या धडाधड आदिलशाहाच्या कानावर आदळत होत्या. तो या बातम्यांनी अस्वस्थ झाला. त्याने लगेच शृंगारपूरच्या सूर्याजीस आदेश केला. तो त्याला म्हणाला_ "तो (शिवाजी महाराज)आमचा उघड शत्रू, राजापुरावर चालून जात असताना त्यास तू का अडविले नाहीस? असो ते जाऊ दे, तो आता परत त्याच मार्गाने जवळ आला आहे. तेव्हा त्यास तेथे अडव व त्याच्याशी युद्ध कर,'. आदिलशाहाच्या दबावाखाली सूर्याजीने शिवाजी महाराजांच्या विरोधात उघडउघड शत्रुत्व धारण केले.

                        तेव्हा सूर्याजीं सुर्वे शृंगारपूरला होता. त्याने लगेच शिवाजी राजांच्या संगमेश्वरी असलेल्या सैन्यावर धावा बोलला. संगमेश्वरी शिवाजी राजांचे सैन्य अल्पसे होते. या अल्पशा सैन्याला सूर्याजीच्या सैन्याने चोहो बाजूंनी घेरले. शिवरायांनी या सैन्याचे नेतृत्व तेव्हा पिलाजी निळकंठरावाकडे दिले होते. आपले सैन्य शत्रूने चारही बाजूंनी घेरले आहे, असे जेव्हा पिलाजीला समजले तेव्हां पिलाजीं फ़ार भयभीत झाला. शत्रूला सामोरे जाऊन त्याच्याशी युद्ध करण्यापेक्षा युद्धातून पळून जाणेच त्यांनी योग्य ठरवले. ते आपला जीव वाचवण्याच्या भीतीने संगमेश्वरहून पळून जाऊ लागले. तोच भीतीने कापणाऱ्या त्या पिलाजीला आपल्या लोकांना मागे सोडून पळून जातांना तानाजी मालुसरेने पाहिले. तानाजींसारख्या प्रतापी पुरुषाला हे अजिबात खपणारे नव्हते. तानाजीने भ्याड पिलाजीला पळताना पाहताच त्याचा पायीच पाठलाग करून त्याला हातात धरले आणि त्याचा उघड धिक्कार केला. तानाजी मालुसरे पिलाजीस म्हणाला_ "या युद्धात मी तुझा साह्यकर्ता आहे. तू आपल्या लोकांना संकटात टाकून पळून जातोयस, ही खरच खेदाची गोष्ट आहे. आजपर्यंत तू तुझ्या परराक्रमांच्या एवढ्या बढाया मारत होतास त्या सगळ्या बढाया कुठे गेल्या? ज्या शिवाजी महाराजांनी तुला मोठेपण व सन्मानाची देऊन सांभाळले, तू त्यांचा सरदार असतांनाही सैन्य टाकून स्व:तच पळून जातोयस? आणि याची तुला खंतही वाटत नाही...." असे कित्येक कठोर शब्द बोलून तानाजीने पिलाजीला कैद केले. पिलाजीं घाबरलेला पाहुन तानाजीला वाटले की पिलाजीची ही दशा पाहून इतर मावळ्यांचीही हिंमत खचेल. त्यामुळे पिलाजीला मोकळे सोडण्यापेक्षा कैदेतच ठेवणे योग्य असा विचार करून तानाजीने पिलाजीला जवळच असलेल्या एका दगडाला दोरखंडाने बांधून ठेवले. पिलाजीला दगडाला बांधुू ठेवल्यानंतर तानाजी मालुसरेने स्व:तच सैन्याचे नेतृत्व केले.

                     तानाजीने व त्याच्या सोबती मावळ्यांनी शत्रूवर जोरदार हल्ला चढवला. शत्रूनेही तानाजीस रोखण्याच्या दिशेने पुढे सरसाव केला. आता दोन्ही सैन्य एकमेकांना भिडणार आणि रक्ताच्या चिळकांड्या उडणार तोच मराठ्यांच्या मागच्या तुकडीने तानाजीच्या रक्षणासाठी शत्रूवर बाणांचा वर्षाव केला. त्यामुळे तानाजीच्या समोर येणारी शत्रुची तुकडी घायाळ झाली आणि याचा फ़ायदा उचलत तानाजीच्या नेतृत्वाखाली मावळ्यांनी शत्रुची दाणादाण उडवली. तानाजीची मागची तुकडी शत्रूच्या पुढे सरसावणाऱ्या तुकड्यांवर बाणांचा वर्षाव करी व बाणांनी जखमी झालेल्या शत्रुच्या सैन्याला तानाजी सोबती मावळे कापून काढीत. मावळ्यांनी तानाजीच्या नेतृत्वाखाली शत्रूशी रात्रभर झुंज दिली व शत्रूच्या हातपाय कापलेल्या व धडापासून मुंडके वेगळे पडलेल्या शवांचे ढीगच्या ढीग मावळ्यांनी रणांगणात रचले. शेवटी सूर्याजीला या युद्धात मोठे नुकसान सोसावे लागले. त्याला त्याच्या सैन्याची सर्वत्र दशा झालेली दिसताच त्याने युध्दातुन पळ काढला. शेवटी वीर तानाजी मालुसरेंचा व सोबती मावळ्यांचा या युध्दात विजय झाला.

संदर्भ - शिवभारत

            स्वराज्यातील रायगडाच्या बाजूला, कोकण पट्ट्यात असणाऱ्या स्थानिक दंगलखोर जमातींचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी महाराजांनी तानाजीवर सोपविली होती. त्यासाठीच या भागातील उमरठे ह्या गावात येऊन तो राहिला होता. आपलेपणाने वागून ह्या भागातील लोकांना स्वराज्याच्या कार्यात त्याने सहभागी करून घेतले.


🤺 *कोंढाण्याची लढाई*

                स्वराज्यासाठी कोंढाणा किल्ला जिंकण्याची जबाबदारी छत्रपती शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसरेला दिली होती. जेव्हा तानाजीला ह्या जबाबदारी समजली तेव्हा तो स्वतःच्या मुलाच्या लग्ना़च्या तयारीत होता. त्याने ती तयारी अर्धवट सोडली. स्वराज्यासाठीचे आपले काम प्राधान्यात घेऊन जबरदस्त चौक्या-पहारे व अतिशय कडेकोट बंदोबस्त असलेला आणि उदयभानसारखा पराक्रमी किल्लेदार असलेला कोंढाणा किल्ला ताब्यात घेण्याचा विडा उचलला. तो कोंढाणा जिंकण्यासाठी आपल्या तुकडी बरोबर निघाला. *"आधी लगीन कोंढाण्याचे मग लगीन रायबाचे."*  हे त्याचे शब्द इतिहासात अजरामर झाले आहेत.

                      कोंढाणा गडावरचा किल्लेदार उदयभान राठोड एक शूर माणूस होता, आणि त्याच्या हाताखाली सुमारे १५०० हशमांची फौज होती. ४ फेब्रुवारीच्या (माघ वद्य अष्टमी) रात्री तानाजी मालुसरे याच्या नेतृत्वाखाली राजगडावरून निघालेले मराठा सैन्य गुंजवणी नदी पार करत सिंहगडाच्या पायथ्याला येऊन पोचले. ती भयाण काळोखी रात्र होती. कोंढाण्यावर जाण्याचा मार्ग त्यांनी निवडला, तो म्हणजे शत्रूच्या ध्यानीमनी न येणारा प्रचंड असा द्रोणगिरीचा कडा. रात्रीच्या वेळी केवळ पाचशे सैनिकांबरोबर हा कडा चढून त्यांनी सिंहगडावर हल्ला केला. कोंढाणा किल्यावरच्या तुकडीला कळू न देता किल्ला दिवसा चढणे कठीण होते. तानाजीने गडाच्या मागच्या बाजूने आपल्या घोरपडीला वर पाठवले. तिच्या शेपटीला दोर बांधला होता. मावळे त्या दोरीला पकडून वर चढून गेले. अचानक हल्ला करून त्यानी तेथील सैन्याला कात्रीत पकडले. आणि अखेरच्या श्वासापर्यंत लढाई करून त्यांनी हा किल्ला जिंकायचे प्रयत्‍न केले. शत्रूशी बेभान होऊन लढताना तानाजींच्या हातातील ढाल पडल्यावरही, डाव्या हातावर घाव घेत उदयभानाला निपचित पाडूनच स्वतःचे प्राण तानाजींनी सोडले. मात्र त्यांच्यामागून 'सूर्याजी मालुसरे' आणि 'शेलारमामा' यांनी नेतृत्व करून हा किल्ला काबीज केला. गडावरील गवताच्या गंज्या पेटवून किल्ला जिंकला गेल्याचा इशारा राजांना राजगडावरती दिला गेला होता. ही घटना ४ फेब्रुवारी, १६७० रोजी घडली.

           तिथे झालेल्या अटीतटीच्या लढाईत तानाजीला त्याच्या प्राणाची आहुती द्यावी लागली. हे दुसऱ्या दिवशी शिवाजीराजे सिंहगडावर पोचले तेव्हा त्यांना समजले.. महाराज म्हणाले  *"गड आला पण सिह गेला".* अत्यंत दुःखी झालेल्या राजांनी तानाजीचे शव त्यांच्या 'उमरठे' 

 (पोलादपूरजवळ)  या गावी पाठवले. ज्या मार्गाने तानाजी मालुसरे यांची प्रेतयात्रा गेली तो आता 'मढेघाट' या नावाने ओळखला जातो. तानाजी गेले त्या जागेवर त्यांचा 'वीरगळ' स्थापन केला गेला आहे. शिवाय एक सुंदर स्मारकसुद्धा उभे केले गेले.


🗽 *तानाजीची स्मारके*

                    तानाजी मालुसरेच्या स्मृतिप्रीत्यर्थ कोंढाणा गडाचे नाव बदलून सिंहगड ठेवण्यात आले. पुणे शहरातील वाकडेवाडी या भागाचे नाव बदलून ते नरवीर तानाजी वाडी असे करण्यात आले.

पुण्याजवळील सिहंगडावर नरवीर तानाजी मालुसरेचे स्मारक असून, त्यांचा अर्धपुतळा त्या ठिकाणी आहे.

रायगड जिल्ह्यातील उमरठे ह्या गावीही त्यांचा पुतळा व स्मारक उभारण्यात आले आहे.


📚 *पुस्तक*


दुर्ग सिंहगड - आनंद पाळंदे

गड आला पण सिंह गेला - ह.ना. आपटे

नरवीर तानाजी मालुसरे (बालसाहित्य) - पंडित कृष्णकांत नाईक

तानाजी (अमर चित्र कथा -६८२)

मराठ्यांची धारातीर्थे - प्रवीण भोसले, नरसिंह पब्लिकेशन्स

राजाशिवछत्रपती - ब.मो. पुरंदरे, पुरंदरे प्रकाशन

सिंहगड - पुरंदरे प्रकाशन

सिंहगड - प्र. के. घाणेकर

सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे - दत्ताजी नलावडे


🎖️ *पुरस्कार*


तानाजीच्या नावे शिवाजी ज्ञानपीठ इंटरनेशनल संस्थेचा वीर तानाजी मालुसरे राष्ट्रीय पुरस्कार दिला जातो.


🎞️ *चित्रपट*


▪️"तान्हाजी : द अनसंग वाॅरिअर" (हिंदी चित्रपट, सन २०२०, तानाजीच्या भूमिकेत अजय देवगण); दिग्दर्शक - ओम राऊत.

▪️यापूर्वी १९५२ साली राम गबाले यांनी दिग्दर्शित केलेला 'नरवीर तानाजी' हा मराठी चित्रपट निघाला होता. चित्रपटात दुर्गा खोटे आणि मास्टर विठ्ठल यांच्या भूमिका होत्या.


 🚩 *हर हर महादेव....!* 🚩


                                                                                                                                                                                                                                                            ➖➖➖➖➖➖➖➖➖  

गुरुवार, २ फेब्रुवारी, २०२३

३ फेब्रुवारी संशोधक जोहान्स गुटेनबर्ग स्मृतिदिन


३ फेब्रुवारी 

संशोधक जोहान्स गुटेनबर्ग स्मृतिदिन


जन्म - २४ फेब्रुवारी १३९८ (जर्मनी)

स्मृती - ३ फेब्रुवारी १४६८


सतत पुढे जाणाऱ्या आजच्या आधुनिक संगणकीय जगात छापील पुस्तके, वृत्तपत्रे यांचे स्थान किंचित कमी झाल्या सारखे वाटले तरी आपल्या दैनंदिन जीवनात ती अजूनही कायम आहेत. पुस्तकांच्या आणि वृत्तपत्रांच्या इ-आवृत्त्या आल्या तरी पुस्तकांचे मुद्रण पूर्वीसारखे चालू आहे. सर्वसामान्य माणूस आजही छापलेले पुस्तक आणि वृत्तपत्र हातात धरत आहे. हा लेख अत्याधुनिक मुद्रण यंत्राच्या साह्याने प्रत्यक्ष कागदावर छापला न जाता तुमच्या समोर आलेला आहे आणि मग तो आंतरजालाच्या माध्यमातून आज तुम्हाला संगणकाच्या पडद्यावर दिसत आहे. पण त्याचे मूळ कागदावर होते हे विसरून चालणार नाही.


कल्पना करा की आजचे मुद्रण तंत्र जन्मास येण्यापूर्वी काय परिस्थिती होती? पुस्तक ही एक अत्यंत महागडी व हाताने बनवण्याची बाब असल्यामुळे ती एक दुर्मिळ आणि तरीही सर्वांना हवीहवीशी वाटणारी चीज होती. मुद्रण तंत्रच अस्तित्वात नव्हते. म्हणून हातांनी लिहिलेल्या अक्षरांची पुस्तके बनवणे आणि मागाहून ती नकलून घेणे देशोदेशात होत असे. आपल्याकडे जे जे प्राचीन ग्रंथ, पोथ्या व पुराणे होती, ती सारी हस्तलिखिते होती. या अशा हाताने लिहिलेल्या पुस्तकांच्या प्रतींची संख्या कितीशी असणार? त्या अगदीच हाताच्या बोटांवर मोजण्या इतपत असत आणि त्यांचे जतन जीवापाड हिऱ्या मोत्यांच्या मोलाने केले जात असे. भारतात सर्व धार्मिक ग्रंथ हातानेच केले जात आणि त्यासाठी लागणारा कागदही कुठे उपलब्ध असे? लिहिण्यासाठी ताडपत्रांचा उपयोग केला जात असे. प्राचीन काळी भूर्जपत्रे वापरली जायची.


त्याहीपूर्वीची  पुस्तके कशी असत बरे? मध्य आशियातील प्राचीन राजवटीत ओल्या विटांवर अक्षरे कोरून मग त्या भाजून विहिरी भोवती ओळीने लावून ठेवल्या जात असत, असे नमूद केलेले आहे.।इजिप्तची संस्कृती फार प्राचीन. त्या वेळची पुस्तके तर जुन्या पिरामिडस मधून प्रत्यक्ष पाहायला मिळाली आहेत. ती झाडांच्या सालीच्या लांबलचक पट्ट्यावर लिहिलेली आहेत. त्यांना पपाइरस (Papyrus) असे नाव होते. नुसती कल्पना करून बघा. एकेक पान नव्वद ते शंभर फूट लांब एका काठी सारख्या हाडा भोवती गुंडाळलेले उलगडत जायचे, वाचीत जायचे आणि दुसऱ्या हाडाभोवती मिटत जायचे. ही पुस्तके अर्थातच प्रचंड लाकडी पेट्यात ठेवली जात. आणि पुस्तकाचे कव्हर? ते चामड्याचे असे. बकऱ्याच्या नाहीतर कोकराच्या पातळ चामडीचे हे आवरण असे. प्राचीन मठातले भिक्षु पुस्तकाच्या प्रती नकलून काढायचे. अशा एकेका प्रतीला सात-सात आठ-आठ महिने लागत असत. अशा आहेत प्राचीन हस्तलिखित पुस्तकांच्या गोष्टी.


थोडक्यात ज्या काळात पुस्तकांचे दुर्भिक्ष्य असायचे, त्या काळात बुद्धी व अलौकिक चिकाटी यांच्या जोरावर ज्याने मुद्रणाचे तंत्र शोधून काढले आणि जगातील पहिले छापलेले पुस्तक निर्माण केले, त्या जर्मनीच्या योहान गुटेनबर्ग (Johannes Gutenberg) या महापुरुषाला आपण कदापि विसरू शकत नाही. 


आजच्या आधुनिक मुद्रण तंत्राचा तो आद्य जनक मानला जातो. दुर्दैवाने आज गुटेनबर्ग विषयी फार थोडी माहिती उपलब्ध आहे. त्याचे व्यक्तिमत्व म्हणजे एक गूढ आहे. तो केव्हा जन्मला तसेच त्याचे निधन कधी झाले हे नक्की कुणालाच माहीत नाही. त्याचे असे रेखाचित्र त्याच्या सबंध आयुष्यात काढलेले नाही. गुटेनबर्गच्या विषयीची माहिती गोळा करण्यासाठी लेखक व इतिहासकार यांना गुप्तहेराच्या भूमिकेत जावे लागले.


नैऋत्य जर्मनीत ऱ्हाईन नदीच्या काठावर वसलेल्या मेंझ (Mainz) या गावात गुटेनबर्ग जन्माला आला. त्याची नेमकी जन्मतारीख अद्यापही अज्ञात आहे. इ.स.१३९४ ते १३९९ या काळात तो जन्मला असावा. मूळात गुटेनबर्ग हे त्याचे आडनाव नाही. त्याचे गेन्सफ़्लाईश कुटुंब हे मेंझ गावातील खानदानी घराण्यातील होते. ते ज्या वाड्यात रहात होते, त्याचा उल्लेख डोंगरावरील घर गुटेनबर्ग हॉफ असा होत असे, त्यावरून त्याला योहान गुटेनबर्ग असे नाव पडले असावे. अर्थातच ज्याची व्यक्तीशः माहिती आपल्याला फार थोडी ठाऊक असली, तरी त्याची महान कामगिरी आपल्याला ज्ञात झालेली आहे. आजच्या मुद्रण तंत्राचा तोच खरा जन्मदाता आहे.


इ.स.१४०० च्या सुरुवातीस पुस्तके अजिबात नव्हती, असे नव्हे, ती दुर्मिळ असत आणि ती मिळवायला खूप वेळ व पैसा खर्चावा लागे. तेव्हाचे प्रत्येक पुस्तक हे हातांनी बनवलेले असे. अक्षरन् अक्षर लिहून काढलेले असे. १४१०-११ च्या हिवाळ्यात दहा बारा वर्षे वयाचा योहान खूप अस्वस्थ असे. बाहेर हिम वादळाने थैमान घातलेले असायचे. त्यामुळे योहान बाहेर जाउन खेळू शकत नव्हता. जवळच्या जंगलातही फिरायला जाणे मुश्कील झाले होते. कधी कधी सर्व रस्ते व झाडे बर्फाच्छादित झाल्यामुळे त्याची शाळा बंद होती. सुदैवाने घरात थोडी पुस्तके होती आणि योहान ती वाचू शकत होता. 


घरातली सर्व पुस्तके वाचून झाल्यावर तो मित्रांकडून पुस्तके आणत असे. जवळच्या चर्च मधली पुस्तकेही त्याला वाचायला मिळत असत. पण काही मौल्यवान पुस्तके तेथील टेबलांना साखळीने बांधून ठेवलेली असत. त्या काळातली सर्व पुस्तके धर्म, तत्वज्ञान, कायदा आणि तत्सम विषयांना वाहिलेली असत. छोट्या मुलांसाठी पुस्तके तर विरळाच. या दिवसात योहानचा थोरला भाऊ घरात बुद्धीबळाचा पट मांडून बसत असे, तर बहीण विणकामात मग्न असे. 


योहानला वडलांच्या संग्रहातली पुस्तके, मग ते इतिहासावरचे ग्रंथ असो, की महत्वाच्या घटनांची नोंद असलेल्या बखरी असो, त्या चाळण्याशिवाय गत्यंतर नसे. या ग्रंथातून मात्र त्याला भूतकाळातील घटना, थोर लोकांची वचने, त्यांच्या त्यांच्या कामगिरीची माहिती होत असे.


जर्मनीतील हे मेंझ शहर तत्कालीन रोमन साम्राज्याचा एक भाग होता. जर्मनीपासून उत्तर इटलीतील अनेक छोटी छोटी राज्ये व शहरे या साम्राज्यात सहभागी होती. ऱ्हाईन नदीवरील मेंझ हे शहर त्या काळी एक महत्त्वाचे औद्योगिक केंद्र होते. युरोप व बाहेरच्या प्रांतातील व्यापारी तेथे येऊन सौदे करत. योहानचे कुटुंबीय त्यांच्याकडून अनेक महागड्या चीजा, उदा. इटलीच्या काचा, चीनमधून आणलेले कागद, हिंदुस्थानातून आयात केलेले मसाले, युरोपातील इतर देशातून आलेली उत्तमोत्तम सुंदर पुस्तके खरेदी करत.


हे सर्व ग्रंथ म्हणजे लॅटिन भाषेतील धार्मिक ग्रंथ असायचे. ते लेखणी व शाईने लिहिलेले असत. हे अत्यंत सुबक अक्षरात लिहिलेले ग्रंथ पूर्ण होण्यास काही महिने लागत आणि अर्थातच ते खूप महाग असत. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण सहाशे वर्षां पूर्वीच्या एकेका उत्तम पुस्तकाची किंमत चक्क एखाद्या बऱ्या पैकी आकाराच्या शेतजमिनीइतकी असे. त्याशिवाय योहानचे पिताश्री स्थानिक लेखनिकांना पैसे मोजून काही ग्रंथांच्या नकला करून घेत. हे नकला केलेले सुटे कागद मग नीटस व सुंदर अशा शीर्षकांनी नटलेल्या आवरणात काळजीपूर्वक ठेवले जात.


कागदाचा शोध लागण्यापूर्वी बकरे, मेंढ्यांच्या कातडी पासून बनवलेल्या चर्मपत्रांवर हे लेखन केलेले असे. ही कातडी व्यवस्थितरित्या कमवून घेऊन हवी तशी ताणली जात आणि त्यांचा पृष्ठभाग गुळगुळीत केला जाई. असे हे चर्मपत्रांचे पुस्तक पूर्ण होण्यापूर्वी त्यावर अनेक कारागीर काम करत असत. योहानला आपल्या घरातील प्रत्येक पुस्तक वाचण्याची उत्कंठा निर्माण झाली. ते कसे कसे तयार झाले, त्याच्या हरएक प्रक्रियांचे त्याने बारीक निरीक्षण केले. ही लिहून झालेली सुटी चर्मपत्रे एका लेखनिकाकडून दुसऱ्या लेखानिकाकडे सोपवली जात. तो त्यावर प्रत्येक प्रकरणाचे शीर्षक, मथळे, उपमथळे लाल रंगाच्या शाईच्या अक्षरात लिहित असे. ही लाल रंगातील अक्षरे काळ्या अक्षरांहून उठून दिसत. काही वेळा हे लेखनिक लाल रंगाच्या शाईने पहिल्या ओळीतील अक्षर अधोरेखित करत. या चर्मपत्राच्या शेवटी थोडी जरी जागा शिल्लक राहिली तरी लेखनिक आपले पुढील प्रकरण अगोदरच्या प्रकरणानंतर लगेच सुरू करत असे. 


एकूण काय, चर्मपत्रावरील इंच न इंच जागेचा उपयोग केला जाई. यासाठी हे लेखनिक आपले लेखन कौशल्य पणाला लावीत. यानंतर ही चर्मपत्रे सजावट काराला दिली जात. तो पत्रांवरील समासात छोटी छोटी चित्रे, भूमितीच्या आकृत्या, पानाफुलांच्या सीमारेषा रेखाटून चर्मपत्रे सुशोभित करत असे. आकर्षक रंगीत चित्रे व प्रत्येक प्रकरणाच्या प्रारंभीचे मोठे अक्षर काढण्यासाठी जादा आकार द्यावा लागे. पुस्तक अधिक आकर्षक दिसण्यासाठी पातळ असे सोनेरी आवरण घालण्यात येई. मग हे पुस्तक बांधणीसाठी दिले जाई. तो कारागीर सर्व चर्मपत्रे एकत्र करून काळजीपूर्वक एकात एक  शिवून दोन पातळ लाकडी तुकड्यांमध्ये बांधत असे. या तुकड्यांवर कापडी, चामड्याचे अथवा अगदी सोनेरी, रुपेरी एवढेच नव्हे तर हस्तिदंती कोरीव काम केलेले आवरण घालण्यात येई. काही पुस्तकांच्या सजवलेल्या आवरणावर पुस्तकाचे शीर्षक पितळी अक्षरात बसवले जाई. अशा प्रकारे बनवलेली ही पुस्तके इतकी महाग असत, की  ती हाताळताना पुष्कळ काळजी घ्यावी लागे. ती कशीही हाताळणे परवडणारे नव्हते.


अशी ही पुस्तकाची निर्मिती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत योहान वाट पाहत बसलेला असे. शेवटी शेवटी तर तो अगदी उतावीळ झालेला असे. कधी हे पुस्तक पूर्ण होते, याची त्याला घाई झालेली असे. पुस्तकाच्या प्रती नकलून देणारे लोक ते पुस्तक काही आठवड्यात देत असले, तरी सजावटकार पुस्तक पूर्ण करून द्यायला काही महिने तरी लावत असत. या सगळ्या लांबच लांब लागणाऱ्या प्रक्रियेवर काही तरी उपाय असला पाहिजे, असे योहानला राहून राहून वाटत असे. आणि खरोखर, एके दिवशी तो उपाय तोच शोधून काढणार होता.


हे सारे चालले असताना योहानच्या मागे त्याची शाळा, खेळ, सण, इतर काही कामे असत. त्याच्या वडिलांनी ठरवले होते की त्याच्या भावाला आणि त्याला उत्तम शिक्षण मिळाले पाहिजे. त्या काळात मुले चर्चने चालवलेल्या शाळात जात. तिथे धर्मगुरु त्यांना सर्वात कठीण असा लॅटिन हा विषय शिकवत. शाळेच्या वेळात शिक्षक व मुले त्याच भाषातून वाचत व बोलत. एखाद्या परकीय भाषेतून व्याकरण, भूगोल, अंकगणित शिकणे म्हणजे सोपे नव्हते.


शाळेत योहानने आपले योहान गुटेनबर्ग हे नाव धारण केले. त्याचा भाऊ व इतर कुटुंबीय मात्र गेन्सफ़्लाईश  (Gensfleisch) हे नाव लावत असत. गेन्सफ़्लाईश हे मोठे कुटुंब होते आणि मेंझ मधील अनेक व्यक्तींनी त्या वेळी ग्लेनफ़्लाईश हे नाव लावले होते. म्हणून कदाचित योहानने गुटेनबर्ग (Good Hill चांगली टेकडी ) हे नाव धारण केले असावे. (गेन्सफ़्लाईश याचा अर्थ Goose flesh हंसाचे मांस असाही होतो).


मध्ययुगीन काळातील घरांची रचना म्हणजे मध्यभागी आवार आणि सभोवार खोल्या असत. हिवाळ्यात वादळी हिमवर्षाव होत असे. त्या पासून बचाव करण्यासाठी कित्येक घरांच्या खिडक्यांना काचा लावलेल्या असतच असे नसे. तसेच प्रकाशासाठी मेणबत्या सर्वांना परवडत नसत. याचा परिणाम असा, की घराच्या अंतर्भागात काळोख व धुराचे राज्य असे. दिवसा जो काही प्रकाश छोट्या खिडक्यातून आलाच, तर तो खिडक्यांवरच्या तेल लावलेल्या फडक्यांमुळे अडत असे. रात्रौ आणि अति थंड तपमानामुळे दिवसाचा सारा काळ नैसर्गिक प्रकाश हा कधीच घरात येत नसे. घरात उबदारपणासाठी पेटवलेली शेकोटी हाच काय तो प्रकाशाचा मार्ग होता. स्त्रियांचा स्वयंपाक हा शेकोटीपाशी चाले आणि घरात सर्वत्र साचलेल्या धुरामुळे श्वास घेणे कठीण होउन  बसे.


गुटेनबर्ग कुटुंबाच्या घरातील स्नानघर घराच्या मागील बाजूस असलेल्या खोलीत होते. सर्व मंडळी स्नाना साठी त्या खोलीचा वापर करीत. फक्त अतिथंड दिवसात आणि रात्रीच्या वेळी घरात एक मोठे घंगाळ ठेवले जाई. त्या काळात गावात सर्वजनिक स्नानगृहे होती. घरोघर रोजच्या रोज स्नानाची तितकीशी कुणाला सवय  नसे. गावातील रस्ते अरुंद व नागमोडी असत. शाळेत जाताना योहान रस्त्याने चालत जात असे. रस्त्यावर दुतर्फा ओळीने घरे असून तळमजल्या वर दुकाने असत. तीन चार मजल्यांच्या इमारती उंच असल्या तरी त्या प्रशस्त नव्हत्या. त्यांचे वरचे मजले रस्त्यावर पुढे झुकलेले असत. योहानेस रस्त्यावरून चालत जाताना त्याला जी अनेक दुकाने दिसत ती सारी कारागीर व व्यापा-यांच्या संघाची असत. या संघांना गिल्ड असे म्हणत. सुवर्णकारांचे, विणकरांचे, सुतारांचे संघ असत. व्यापा-यांचे संघ त्या त्या क्षेत्रातील कारागीरांना कच्चा माल पुरवीत. उदा. जड जवाहीर बनवणा-यांना सोने चांदी, विणकरांना कापड इ. व्यापा-यांच्या संघाकडूनच विकत घ्यावे लागे.


योहानचे कुटुंबीय मात्र कुठल्याही संघाचे सभासद नव्हते. ते खानदानी घराण्यातले असल्यामुळे त्यांच्यापाशी वडिलोपार्जित पैसाअडका आणि स्थावरजमिनी होत्या. त्यांना पोटापाण्यासाठी काम करण्याची आवश्यकता नव्हती. तरी त्यांच्यापैकी अनेक लोक शहराच्या कारभारात काम पाहत. 


योहानच्या कुटुंबाची गणना उच्च स्तरावरील लोकांमध्ये होत असे. त्यांचे कुटंब मेंझमध्ये कित्येक पिढ्यान पिढ्या असल्याने त्यांच्याकडे शहराच्या व्यवहारासाठी लागणाऱ्या चलनातली नाणी बनवणाऱ्या टांकसाळीची व्यवस्था होती. शहराचे व्यवस्थापन जे लोकांकडून करवसुली करत असे, त्याची जबाबदारी टांकसाळीकडे सोपवलेली होती.


त्या काळीही करवसुलीचे काम करणाऱ्या विषयी जनतेत अप्रियता असे. १४१० मधील हिवाळ्यात या खानदानी घराण्याच्या लोकांविषयी सर्व संघात असंतोष निर्माण झाला. कारण एकच होते, करवसुलीची सक्ती.


योहानचे पिता हे मेंझ नगरपरिषदेचे एक सदस्य होते. संघाचे प्रतिनिधी या नगरपरिषदेवर असूनही खानदानी घराण्याच्या मताधिक्यामुळे मेंझची सत्ता त्यांच्याकडे होती. परिषदेने बीअर, मद्य व धान्यावर कर बसवल्यामुळे संघाचे प्रतिनिधी संतापले.


१४११ च्या प्रारंभी मेंझच्या नागरिकांची परिस्थिती  खालावली. हिवाळा लांबल्याने लोकांना आपले पोट भरणे कठीण होउन बसले होते. त्यातच नगरपरिषदेने करवाढीचा प्रस्ताव मांडला. अगोदर रुष्ट असलेल्या संघाच्या प्रतिनिधींनी परिषदेवरची खानदानी लोकांची सत्ता हिसकावून घेतली. योहानचा पिता काळजीत पडला. मेंझचे काय होणार याची त्याला भीती वाटत होती. कारण गिल्डच्या सभासदांना कामकाजाची तितकीशी माहिती नव्हती. त्यांच्यातील अनेक तर निरक्षर होते.


या सत्ताबदलामुळे खानदानी घराण्यातील लोकांबरोबर योहानच्या पित्याचे टांकसाळीतले काम गेले. कुटुंबीय रस्त्यातून जाता येतांना लोकांकडून त्यांची अवहेलना होऊ लागली. योहानचे वय त्या वेळी अवघे तेरा असूनही त्याची या प्रकारातून सुटका झाली नाही. या कारणामुळे १४११ मध्ये योहानच्या कुटुंबीयांनी मेंझ सोडून अन्यत्र स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला. एल्टविले  (Eltville) या मेंझपासून साडेसात मैलांवर असलेल्या गावी त्यांचे आपले असे एक घर होते, तेथे ते सारे राहण्यास गेले.


मेंझच्या गढूळलेल्या वातावरणापासुन दूर अशा एल्टविले येथे योहानने तीन वर्षे काढली. १४१४ मध्ये गिल्ड व खानदानी लोकांमध्ये समेट झाला. गेन्सफ़्लाईश कुटुंब पुनः गुटेनबर्ग वाड्यात परतले. योहानच्या पित्याचे परिषदेचे सदस्यत्व गेले. मोठ्या मुश्किलीने त्याला टांकसाळीची नोकरी मिळाली.


आता योहान सोळा वर्षांचा झाला होता. त्याचे शालेय शिक्षण पूर्ण होउन तो आपल्या पित्याबरोबर काम करू लागला होता. त्याला टांकसाळीतील कामात रस उत्पन्न झाला. तेथे मेंझसाठी नाणी बनवण्याबरोबर सरकारी शिक्के, सोन्याचांदीचे दागिने आणि चित्रांच्या चौकटी यांचे काम चालत असे. टांकसाळीतील सुवर्णकार व जवाहिरे यांच्याकडून योहानेसने तेथील कामाचे तंत्र शिकून घेतले.


सुवर्णकार मंडळी ही त्या काळातील शहरातली महत्वाच्या कारागीर संघापैकी मानली जात असत. ते काम शिकण्यासाठी खूप उमेदवारी करावी लागे. शिकाउ उमेदवार हे मुख्य कारागीराच्या घरी राहत असत. व्यवसायाच्या खाचाखोचा शिकत असताना त्याना बरीच वर्षे कोणतेही वेतन असे मिळत नसे. योहानला मात्र तो खानदानी घराण्यातला असल्यामुळे त्याला उमेदवारी करावी लागली नाही. तसे पाहता खानदानी लोक हे गिल्डचे सभासद कधीच नव्हते.


नाणी पाडण्याच्या कामासह सोन्याचांदीचे दागिने बनवण्याच्या तंत्रात योहान वाकबगार झाला. त्यात मौल्यवान रत्ने कशी कापावी व त्यांना पैलू कसे पाडावेत, हा महत्वाचा भाग असतो. उत्तमरित्या पैलू पाडलेला हिरा, मणी हा आकर्षकपणे चमकतो. योहानेसला या कामात उत्तम सराव होण्यासाठी आपल्या कुटुंबाकडे  जडजवाहीर असलेली रत्ने, माणके मिळाली होती.


नाणे व दागिन्यांचे काम करत असताना योहानच्या मनात अचानक एक कल्पना आली. पुस्तकाची बांधणी करणारे कारागीर ग्रंथांच्या कव्हरवर शीर्षकाची पितळी अक्षरे वापरत असत. साच्यातून बनवलेली ही अक्षरे पाहून योहानला वाटले, की हे तंत्र वापरून जलद गतीने पुस्तके का  बनवू नयेत? मग पुस्तके पुष्कळ संख्येने निर्माण होउ शकतील. ज्याचे स्वप्न योहान लहानपणापासून पहात आला होता, त्याचे भविष्य त्याच्या डोळ्यांसमोर उभे राहिले. यातून आपल्याला अगणित पैसे मिळतील. योहानने ही कल्पना प्रत्यक्षात आणण्याचे मनावर घेतले.

    संकलनातून 

बुधवार, २५ जानेवारी, २०२३

*@ २५ जानेवारी @* *राष्ट्रीय मतदार दिवस*


*@ २५ जानेवारी @*

*राष्ट्रीय मतदार दिवस*

********************************


२०११ सालापासून दरवर्षी २५ जानेवारीला भारतात ‘राष्ट्रीय मतदार दिवस’ साजरा केला जात आहे. २५ जानेवारी हा भारतीय निवडणूक आयोगाचा स्थापना दिवस आहे. या दिवशी आयोजित विविध कार्यक्रमामधून विशेषत: नवीन पात्र मतदारांची नोंदणी वाढवण्याचा प्रयत्न केला जातो. या दिवशी निवडणूक प्रक्रियेतील प्रभावी सहभागासाठी मतदारांमध्ये जागृती निर्माण केली जाते. भारतीय निवडणूक आयोग (ECI) ही भारतीय संविधानाद्वारे स्थापित केलेले एक स्वायत्त प्राधिकरण आहे आणि हे देशातील लोकसभा, राज्यसभा, राज्याच्या विधानसभा आणि राष्ट्रपती व उप-राष्ट्रपती यांची कार्यालये यामध्ये निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रामुख्याने जबाबदार असते. 


१९६२ साली मतदानाची प्रक्रि‍या कागदी मताद्वारे केले जात होते. वर्ष २००४ पासून मतदानासाठी इलेक्‍ट्रॉनि‍क व्होटर यंत्रांचा (EVM) वापर होत आहे. ECI ची अधिकृत स्थापना २५ जानेवारी १९५० रोजी करण्यात आली. तसेच राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून ही तारीख घोषीत केली गेली. याचे नवी दिल्लीत मुख्यालय आहे. सुनील अरोरा हे वर्तमान मुख्य निवडणूक आयुक्त आहे.


निवडणूक जगतातली व्यवस्थापनेसंबंधी सर्वात मोठी घटना म्हणजे, एप्रिल-मे २००९ मध्ये पार पाडलेल्या १५ व्या लोकसभेच्या निवडणुकीत ७१४ दशलक्ष मतदार, ८.३५ लक्ष मतदान केंद्र, १२ लक्ष EVM आणि ११ दशलक्ष मतदान कर्मचार्‍यांनी भाग घेतला होता. आयोगाला असे आढळून आले की, मतदारांच्या यादीतून १८ वर्षांच्या नव्या मतदारांची नावे वगळली गेलीत. या समस्येला पाहता तेव्हापासून देशभरात ८.५ लक्ष मतदान केंद्रांवर दरवर्षी १ जानेवारीला १८ वर्ष पूर्ण करणार्‍या सर्व मतदारांची ओळख केली जाते आणि त्यांचे नोंदणी केली जाते.


*संकलन : गजानन गोपेवाड*


*संदर्भ : इंटरनेट*


********************************

Featured Post

व्यायाम व योगा अवश्य करावा*

*व्यायाम व योगा अवश्य करावा*  *व्यायाम व योगा करण्याचे दहा फायदे:-*  1) व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते: व्यायाम करणारी...