सोमवार, ११ ऑक्टोबर, २०२१

जागतिक मानसिक आरोग्य दिन

 ************************************

*१० ऑक्टोबर - जागतिक मानसिक आरोग्य दिन*

************************************


आज जागतिक मानसिक आरोग्य दिन.


मानसिक आजारातून पुन्हा लोकांना आपल्या पायांवर खंबीरपणे उभे राहता यावे यासाठी 'वर्ल्ड फेडरेशन फॉर मेंटल हेल्थ' ही संस्था काम करते. याच संस्थेने १९९२ मध्ये जागतिक मानसिक स्वास्थ्य दिनाची (World Mental Health Day) सुरवात केली. 


अंपगत्व येण्यासाठी मानसिक आजार हे प्रमुख कारण असल्याचे ही संस्था सांगते. मानसिक आजाराविषयी जागरूकता निर्माण व्हावी यासाठी ही संस्था मोठ्या प्रमाणात काम करते आणि यासाठीच दरवर्षी १० ऑक्टोबरला मनासिक स्वास्थ्य दिन साजरा केला जातो. 


हा दिवस साजरा करण्याचे अजून एक मुख्य कारण म्हणजे कोणत्याही वयातील व्यक्तीला हा आजार होण्यापूर्वीच त्याला याबाबत माहिती असणे गरजेचे आहे.

🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

संकलन -)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा - यवतमाळ ४४५२०६

************************************

आंतरराष्ट्रीय मुलगी दिवस

 *११ ऑक्टोबर*


*‘आंतरराष्ट्रीय मुलगी दिन'*


आज ११ ऑक्टोबर हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय मुलगी दिन’ म्हणून साजरा करण्याची सूचना संयुक्त राष्ट्रसंघाने (यूनो) केली आहे. महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने त्याची दखल घेऊन ‘मुलगी दिना’चे कार्यक्रम आयोजित करण्याचे निर्देश राज्यातील सर्व शाळांना दिले आहेत. सर्व शाळांमध्ये मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व पटवून देणारे कार्यक्रम आज होत आहेत. ‘यूनो’कडून आलेले शिक्षण अधिकारविषयक राष्ट्रगानही शाळांमध्ये दाखविले जाणार आहे. नाशिक जिल्ह्यातील ३,५०० शाळा या उपक्रमात सहभागी होणार आहेत. पालक, शाळा समिती पदाधिकारी, शिक्षकांना यावेळी आवर्जून हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. उपक्रम सरकारी असला तरी मुलींच्या सबलीकरणाच्या दृष्टीने तो अतिशय चांगला आहे. या उपक्रमाचे सर्वांनीच कौतुक, स्वागत केले पाहिजे. चांगल्या उपक्रमांना विरोध होणारच, पण त्या विरोधाला न जुमानता, त्याकडे दुर्लक्ष करून जाणकार नागरिक उपक्रमात सहभागी होऊन तो नक्कीच यशस्वी करतील यात शंकाच नाही. दहावी, बारावी परीक्षांमध्ये मुलांपेक्षा मुलीच अव्वल असल्याचे दरवर्षीचे निकाल सांगतात. अभियांत्रिकी, वैद्यकीय, कृषी आदी सर्वच शैक्षणिक शाखांमध्येही मुलींचाच बोलबाला आहे. मिळालेल्या संधीचा त्या पुरेपूर लाभ उठवून पालकांचे स्वप्न साकारत आहेत. हल्ली खेड्यापाड्यांतील मुलीही तालुक्याच्या ठिकाणी एसटीचा प्रवास करून शिक्षणासाठी जाताना दिसतात. अर्थात प्रगतीच्या विस्तीर्ण आकाशात चमकण्याचे भाग्य सर्वच मुलींच्या नशिबी नाही, हे वास्तव नाकारता येणार नाही. शिक्षणाला पारख्या झालेल्या मुलींचे प्रमाण आजही मोठे आहे. ग्रामीण भागांत गोरगरिबांच्या लेकी शाळेत दिसत असल्या तरी त्यांच्या शिक्षणाकडे वा आरोग्याकडे लक्ष पुरवायला पालकांना वेळ नसतो. इतर मुली शाळेत जातात म्हणून त्यांच्यासोबत आपलीही लेक पाठवायची, एवढेच त्यांना ठाऊक असते. तिने शाळेत गेलेच पाहिजे, शिक्षण घेतलेच पाहिजे, असा त्यांचा आग्रह असतो असे नाही. त्यामुळेच कधी लहान भावंडांना सांभाळण्यासाठी, घरकामासाठी त्यांना घरी ठेवून घेतले जाते. पुरोगामी राज्य म्हणून गणल्या जाणार्‍या महाराष्ट्रात स्त्री भ्रूणहत्येचे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. मुलीचा गर्भ काढून टाकण्याची अमानुष प्रवृत्ती वाढीस लागली आहे. आधुनिक तंत्रांचा गैरवापर त्यासाठी सर्रास होत आहे. बीडमधील डॉ. मुंडे दांपत्याने गर्भातच कोवळ्या कळ्यांचा गळाघोट करून त्यावर पैसे कमावण्याचे सोनोग्राफीचे दुकान थाटले होते. अशा प्रकारांतूनच मुलींंचे लोकसंख्येतील दरहजारी जन्मप्रमाण घटत आहे. मुलींचा जन्मदर वाढावा म्हणून सरकारी पातळीवर विविध उपक्रम राबविले जात आहेत. ‘लेक वाचवा’ अभियान त्यापैकीच एक! विविध व्यासपीठांवरून स्त्री भू्रणहत्या रोखण्यासाठी समाजप्रबोधन केले जात आहे, ही चांगली बाब असली तरी अशा विचारांचा अंगिकार करण्याकडे अजूनही समाजाचा तेवढा कल दिसून येत नाही. प्रगत राज्यांतील काही जातींमध्ये तर जन्माआधीच मुलीचा गळा घोटला जातो. खाप पंचायतीसारख्या कुप्रथा मुलींच्या मुळावर आल्या आहेत. मुलाच्या विवाहासाठी गरीब कुटुंबांतील, जातीतील मुली विकत घेण्यासारखे वेगवेगळे मार्ग अवलंबले जात आहेत. मुलींच्या घटत्या संख्येचा प्रश्‍न भयानक स्वरुप धारण करू लागला आहे. यातून अनेक सामाजिक प्रश्‍न निर्माण होत आहेत. २०११ च्या जनगणनेत ते आणखी घटल्याचे दिसून आले आहे. गेल्या २० वर्षांत देशात सव्वा कोटीच्यावर स्त्रीभ्रूण हत्या झाल्याचे सांगितले जाते. २०११च्या जनगणनेतील आकडेवारी धक्कादायक आहे. राज्यात १९९१ साली दर हजार पुरुषांमागे ९३४ स्त्रिया असे प्रमाण होते. ते २००१ मध्ये ९१२ झाले. २००९ मध्ये ते ९०९ होते तर २०११ मध्ये हाच आकडा ८८३ वर घसरला. ही आकडेवारी स्त्री-पुरुष समतोल धोक्यात आल्याची निदर्शक आहे. १९९१ मध्ये ० ते ६ वर्षाच्या हजार मुलांमागे मुलींचे प्रमाण ९४६ होते. २००१ मध्ये ते ९२७ वर आले. राज्यातील ३८ तालुक्यांमध्ये मुलींचे प्रमाण ११ टक्क्यांनी घटल्याचे आकडे बोलके आहेत. राज्याच्या आरोग्य सेवा विभागाच्या आकडेवारीनुसार ० ते ६ वयाच्या मुलींचे प्रमाण शहरी भागात झपाट्याने घटत आहे. आदिवासी व मागासबहुल जिल्ह्यांत मुलींचा जन्मदर त्यापेक्षा जास्त आहे. मुंबईसारख्या शहरात मुलींचे प्रमाण दर हजार मुलांमागे ९२७ आहे. नाशकात ते ९२० इतके आहे. गर्भजल परीक्षणविरोधी कायदा कठोर असला तरीही सोनोग्राफी सेंटर्सवर मोठ्या प्रमाणात गर्भजल निदान होत असल्याच्या तक्रारी नेहमीच येतात. मुलींच्या घटत्या जन्मदराबाबत जागतिक आरोग्य संघटनेनेही तीव्र चिंता व्यक्त केली आहे. महिला दिन, मातृत्व दिन दरवर्षी साजरे होतात. ते साजरे होताना किती स्त्रिया मुलीच्या जन्माबाबत आनंद व्यक्त करतात? घराण्यासाठी ‘वंशाचा दिवा हवा’ म्हणून सासूच्या भूमिकेत आग्रह धरणारी आणि सुनेला गर्भपातासाठी प्रवृत्त करणारी स्त्रीच असते. देशात सध्या सर्वत्र नवरात्रोत्सव साजरा होत आहे. देवीच्या रुपाने शक्तीची पूजा केली जात आहे. अनेक वेळा स्त्रियांचा मानसन्मान केला जातो. मात्र हल्ली स्त्रियांवर होणारे बलात्कार, अत्याचार, छळाच्या घटना वाढल्या आहेत. त्या पाहता या समाजाला अशी कोणती कीड लागली आहे, असा प्रश्‍न पडतो. हल्ली स्त्रियाच स्त्रियांच्या वैरी होत असल्याची उदाहरणे पाहावयास मिळत आहेत, ही दुर्दैवी बाब आहे. आजारी आईच्या सेवेसाठी गौरी त्रिवेदी यांनी सनदी अधिकारीपदाची नोकरी सोडली. गुजरातमधून पहिली आयएएस अधिकारी होण्याचा मान त्यांनी मिळविला होता. आई-वडिलांप्रती मुलींना अधिक माया असते असे म्हटले जाते, याचे हे ठळक उदाहरण होय. मुला-मुलींमधील तुलनात्मक प्रमाण दिवसेंदिवस घसरत आहे, ही चिंतेची बाब आहे. ती लक्षात घेता सुजाण नागरिक या प्रश्‍नाकडे निश्‍चितच गांभीर्याने पाहतील.


🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

➿➿➿➿➿➿➿➿➿➿

संकलन -)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

प्रभात दर्शन

 🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

अश्विन मास,शुक्ल पक्ष, *षष्ठी*,ज्येष्ठा नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,शरद ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

सोमवार, ११ आॕक्टोबर २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                        *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

          *"समय और परिस्थिति पर कभी किसी का वश नही रहा है, ये कभी भी बदल सकते है। इसलिए जब समय एवं परिस्थिति आपके अनुकूल हो तो कभी किसी का अपमान मत करो, कभी किसी को कम मत आंको। तुम महाशक्तिशाली एवं समृद्ध हो सकते हो, पर समय तुमसे कहीं अधिक शक्तिशाली है, समय ने बड़े बड़े सम्राटों को भी मिट्टी में मिलाया है। अतः सहज, सरल एवं सुलभ रहें। इसी में जीवन वास्तविक आनंद है।*

 ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


शुक्रवार, ८ ऑक्टोबर, २०२१

शिंका का? येतात


══════════════════════

   *📒📒📒 @ संकलन @📒📒📒*

  *श्री. गजानन गोपेवाड 

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════   

📙 *शिंका का येतात ?* 📙


हिवाळ्यात किंवा गार वाऱ्यात फिरून आल्यावर तुम्हाला फटाफट शिंका आल्या असतील. काहीतरी बोलायला तोंड उघडावे आणि तेवढ्यात शिंका येऊन बोलता येऊ नये, असेही कधी झाले असेल. सर्दी पडसे झाल्यावर शिंका येतात. विशेषत: वावड्यामुळे सर्दी आली असेल, तर शिंका जास्तच येतात. धुळीत गेल्यास, विशिष्ट फूल हुंगल्यास, किंवा अत्तराचा, उदबत्तीचा वास आल्यास वावडे असलेल्या लोकांना शिंका येतात आणि सर्दी होते. काय म्हणता तुम्हाला शिंका येत नाहीत ? मग एक काम करा. आजोबांच्या कोटाच्या खिशातली तपकिरीची डबी घ्या आणि एक चिमूटभर नाकात सोडा! काय आता आल्या का शिंका ? शिंका येणे शुभ की अशुभ ? काहीजण म्हणतात एक शिंक येणे वाईट, पण दोन शिंका येणे चांगले. अर्थात या सर्व अंधश्रद्धा बरं का ! पण शिंका का येतात, ते पाहू.

खोकला आणि शिंका यात बरेच साधर्म्य आहे. आपल्या श्वसन नलिकेत काही त्रासदायक पदार्थ आला तर खोकला येतो. आपण खोकतो म्हणजे काय करतो ? सर्वात आधी आपण दीर्घ श्वास घेतो. त्यानंतर एपिग्लाॅटीस नावाचा पडदा श्वासनलिकेवर दाबला जातो. त्यानंतर आपण जोराने श्वास सोडतो. सहाजिकच खोकताना हवा दाबाखाली बाहेर पडते व श्वास नलिकेतील घाण, जिवाणू बेडक्याच्या रूपाने बाहेर टाकले जातात. आता शिंकेविषयी नाकातील हवा जाण्याच्या मार्गात जर काही अपायकारक, त्रासदायक असे पदार्थ आले तर शरीर खोकल्याप्रमाणेच प्रतिसाद देते. नाकातील ही संवेदना मेंदूपासून निघणाऱ्या पाचव्या नसेमार्फत मेंदुच्या मेड्युला या भागात जाते. येथील पेशींमध्ये संवेदनेचे विश्लेषण होऊन शिंक येण्याची प्रक्रिया होण्याचा आदेश दिला जातो. यात सुरुवातीचे दीर्घ श्वास, नंतर एपिग्लाॅटीसचे श्वासनलिकेवर येणे व नंतर जोरात उच्छवास हे खोकल्याप्रमाणेच असते, मात्र जोरात श्वास सोडताना पडजीभ खाली पडते व त्यामुळे हवा तोंडातून बाहेर न पडता नाकातून बाहेर पडते. नाकातील अपायकारक पदार्थ यामुळे बाहेर पडतो.


वावड्यामुळे वा जंतूसंसर्गामुळे नाकातील आवरण हुळहुळे होते व त्यामुळे वारंवार शिंका येतात. एव्हीलसारखी गोळी देऊन वावड्यामुळे येणाऱ्या शिंका कमी करता येतात. तसेच ज्या पदार्थांमध्ये आपल्याला वावडे आहे त्यापासून दूर राहून स्वतःचे संरक्षण करणे जास्त योग्य होय.


*- डॉ.बाळ फोंडके यांच्या 'का?' या पुस्तकातून*

गुरुवार, ७ ऑक्टोबर, २०२१

जागतिक सेरेब्रल पाल्सी दिवस

 *********************************

*७ ऑक्टोबर - जागतिक सेरेब्रल पाल्सी दिवस*

*********************************


*आज जागतिक सेरेब्रल पाल्सी दिवस..!*


गर्भधारणेच्या कालावधीत आईला काही इन्फेक्शन झाल्यास, रक्तदाब, मधुमेह असल्यास, श्वास घेण्यास किंवा थायरॉईड ग्रंथीचा त्रास असल्यास, वेळे आधीच प्रसूती झाल्यास, फार कमी वजनाचे बाळ असल्यास व इतरही काही कारणांमुळे जन्माला येणारे बाळ हे ‘सेरेब्रल पाल्सी’ (गतीमंद) राहू शकते.


भारतात प्रत्येक एक हजार मुलांपैकी तिघांना सेरेब्रल पाल्सी असल्याचे आढळते. महाराष्ट्रात हे प्रमाण जास्त असून सेंटर फॉर डिसीज कंट्रोलच्या अभ्यासा नुसार ३२३ मुलांपैकी एकात हा आजार आढळतो. 

🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

संकलन -)

गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

*********************************

प्रभात दर्शन

 🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

अश्विन मास,शुक्ल पक्ष, *प्रथम*,चित्रा नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,शरद ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

गुरुवार, ०७ आॕक्टोबर २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                        *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


*या देवी सर्वभूतेषु* 

               *शक्ति रूपेण संस्थिता,*

*नमस्तस्यै नमस्तस्यै* 

               *नमस्तस्यै नमो नम:।।*


भावार्थः- *हे माँ ! आप सर्वत्र विराजमान हैं, शक्ति का रूप हैं, माँ अम्बे, आपको मेरा बार-बार प्रणाम है।*

 ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*शारदीय नवराञी आरंभ*

*छञधारी श्री अग्रसेन जयंती*


बुधवार, ६ ऑक्टोबर, २०२१

पृथ्वी स्वताभोवती का फिरते


══════════════════════

   *📒📒📒 @ संकलन @📒📒📒*

  *श्री. गजानन गोपेवाड 

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════   

🌎 *पृथ्वी स्वतःभोवती गिरकी का मारते?* 

"""""""""""""""""""""""""""""""""""""


आपली पृथ्वीच नाही तर सगळे ग्रह अशी गिरकी घेत असतात. प्रत्येकाचा अशी एक प्रदक्षिणा करण्याचा 'वेग' वेगवेगळा असतो. ज्या प्रक्रियेतून ग्रहांचा जन्म होतो, त्याचाच हा परिणाम आहे. आकाशात इतस्तत: अनेक पदार्थ, वायू वेडेवाकडे पसरलेले असतात. त्यापैकी प्रत्येकाला इतर सर्वांच्या गुरुत्वाकर्षणाची ओढ जाणवत असते. कालांतराने त्या अोढीपायी त्यातले काही पदार्थ एकत्र येतात. त्यांचा जुडगा बनतो. साहजिकच त्याचं वस्तुमान जास्त असल्यामुळे त्यांची इतरांना वाटणारी ओढ जास्त होते. त्यामुळे पदार्थांचे आणखी काही कण त्याला येऊन चिकटतात. अशा साखळी पद्धतीने हळूहळू ग्रहाचा जन्म होतो. तो होत असताना त्या गुरुत्वाकर्षणाच्या सर्व बाजूंना सारख्याच वाटणाऱ्या ओढीपायी ते पदार्थ ओढले जात असताना त्यांना चक्राकार गती मिळते. तीच मग ते पदार्थ ज्याला चिकटतात त्या ग्रहांकुरालाही मिळते.

ग्रहांकुराच्या केंद्रस्थानात त्यातल्या पदार्थाची घनता साहजिकच जास्त असते. एखादा लाडू वळताना तो दाबला जात असतो. त्यामुळे त्याचा मध्यभाग जास्त घट्ट झालेला असतो तशातलाच हा प्रकार. त्यामुळं त्या ग्रहाच्या परिघावरच्या पृष्ठभागाला केंद्राच्या गुरुत्वाकर्षणाची जास्त ओढ वाटते. पण विखुरलेल्या पदार्थांपासून घन ग्रहाचा जन्म होताना त्याचा व्यास कमी होत जातो. त्यामुळे त्या वर्तुळाकार गतीचा वेगही वाढत जातो. कथक नृत्य करणारी नर्तकी जेव्हा गिरकी घ्यायला लागते तेव्हा त्या गिरकीची गती वाढवायची असेल तर ती आपले हात अंगासरशी ओढून घेते, म्हणजेच अंगाच्या गोलाचा व्यास कमी करते. तेच हा हात पसरलेले असले की त्या गिरकीचा वेगही कमी होतो. तशीच ग्रहाचीही अवस्था असते. त्याचा पसारा कमी होत जातो, तो अधिक घन बनतो तसा त्याचा वर्तुळाकार भ्रमणाचा वेगही वाढत जातो. त्यामुळे गिरकी घेणं हा प्रत्येक ग्रहाचा स्थायीभावच आहे. पृथ्वी ही त्याला अपवाद नाही.


मग चंद्र का गिरकी घेत नाही ? त्याचा एक भाग सतत आपल्या डोळ्यांसमोर राहतो ते का ? असे प्रश्न कोणीही विचारेल; पण चंद्र गिरकी घेत नाही हे म्हणणं चुकीचं आहे. चंद्राचा स्वतःभोवती गिरकी घेण्याचा वेग हा पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालण्याच्या वेगाइतकाच असल्यामुळे त्याचा एक चेहरा आपल्याला सतत दिसत असतो एवढंच. एरवी आकाशातला इतर कोणत्याही गोल गोलासारखा तोही स्वतःभोवती गिरकी घेतच असतो.


*डाॅ.अंजली दिक्षित व डाॅ.जगन्नाथ दिक्षित*

*यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' पुस्तकातून*

═══════════════════════

मंगळवार, ५ ऑक्टोबर, २०२१

ऐपल संस्थापक स्मृतिदिन

 ********************************

*५ ऑक्टोबर - अॕपलचे संस्थापक स्टीव्ह जॉब्स यांचा स्मृतिदिन*

********************************


जन्म - २४ फेब्रुवारी १९५५ (अमेरिका)

स्मृती - ५ ऑक्टोबर २०११


अॕपलचा संस्थापक सदस्य, माजी अध्यक्ष स्टीव्ह जॉब्स यांचा आज स्मृतिदिन.


सिरीयाचा मुस्लिम विद्यार्थी अब्दुल फतेह जॉन जंदाली व जोआन शिबिल यांनी विवाहाआधी जन्मलेले मूल अनाथालयाला दिले होते. त्यासाठी त्यांची एकच अट होती. त्यांचे मूल दत्तक घेणारे कुटुंब हे सुशिक्षित असले पाहिजे. कॅलिफोर्नियातील पॉल व क्लरा जॉब्स या आर्मिनियन कुटुंबाने त्यांचे मूल दत्तक घेण्याचा प्रस्ताव मान्य केला. जॉन-जोआन यांचे मूल त्यांना दत्तक देण्यात आले. त्या मुलाला स्टिव्हन पॉल जॉब्स असे नाव मिळाले. 


जॉब्स यांचे कुटुंब मजुरी करणारे आहे हे समजल्या नंतर त्यांची आई जोआनने स्टीव्हला दत्तक देण्यास आक्षेप घेतला. सहा  महिन्यांच्या चर्चेनंतर जोआन दत्तक करारावर स्वाक्षरी केली. या ओढाताणीचा स्टीव्ह याच्या मनावर गंभीर परिणाम झाला. कुणालाच न आवडणारा मी एकमेव मुलगा आहे, असे त्याचे मत बनले होते. हायस्कूलमध्ये असताना स्टीव्हला ह्यूलेट पॅकर्डच्या कारखान्यात काम करण्याची संधी मिळाली. येथेच त्याची स्टीव्ह व्होज्नियाक सोबत ओळख झाली. 


जॉब्स आणि रीड कॉलेज मधील त्यांचा मित्र स्टीव्ह व्होज्नियाकने शिक्षण अर्ध्यावरच सोडले होते. १९७१ मध्ये त्यांची पहिल्यांदा भेट झाली तेव्हा जॉब्स १६, तर व्होज्नियाक २१ वर्षांचा होता. तंत्रज्ञानाची आवड असलेल्या व्होज्नियाकने पहिल्या व्हिडिओ गेमचा टेलिटाईप व नंतर मायक्रोप्रोसेसर बनविला होता. मात्र, त्या वेळी हा गेम विकावा कसा, अशी अडचण होती. ७०च्या दशकात कॉम्प्युटर क्षेत्रात नवनवे प्रयोग व नवनिर्मिती होत होती. नेमकी हीच नस पकडत जॉब्स यांनी १९७६ मध्ये व्होज्नियाकवर कॉम्प्युटर निर्मितीची जबाबदार सोपवीत स्वत: मार्केटिंगमध्ये लक्ष घातले. अशा रितीने अॕपलची सुरुवात झाली. त्यांना ५० कॉम्प्युटर्सची पहिली ऑर्डरही मिळाली खरी, मात्र हे संगणक वेगवेगळ्या सुट्या भागांत न देता पूर्णपणे एका मशिनीच्या स्वरुपात मिळावे, अशी अट होती. आजचे वर्तमान आणि उद्याच्या भविष्याचा अचूक वेध घेत त्यांनी वयाच्या २१ व्या वर्षीच कॉम्प्युटरच्या व्यवसायात शिरकाव केला.


तंत्रशिक्षणाची पदवी नसल्याने त्यांनी या क्षेत्रातील तरबेज सहकार्याने निवडले. बाजारपेठेच्या गरजेची नस पकडत जॉब्स यांनी एकापेक्षा एक अत्याधुनिक व सरस उत्पादने धूमधडाक्यात उतरवली. प्रख्यात कॉप्युटर कंपनी आयबीएमने पर्सनल कॉम्प्युटर आणण्याच्या चार वर्षे आर्धीच त्यांनी आपला अॕपल-१ हा पीसी लाँच केला. अॕपलच्या सहकाऱ्या सोबत मतभेद झाल्याने आपलीच कंपनी सोडली. 


१९८६ मध्ये स्टीव्हने नवा प्रयोग करण्याचे ठरवले आणि फिल्म निर्देशक जॉर्ज लुकास यांच्यासह १० मिलियन डॉलरची भागीदारी असणारी एक कंपनी स्थापन केली. तिला नाव देण्यात आले पिक्सार. येथे अॕनिमेशन फिल्म बनवण्यात आल्या. फाइंडिंग निमो सारख्या फिल्मने मोठे यश मिळाल्यावर त्याने ही कंपनी बाजारात आणण्याचे ठरवले. यासाठी वॉल्ट डिझ्नी सोबत करारही करण्यात आला होता. १९९७ मध्ये तोट्यात चालत असलेल्या अॕपलच्या सल्लागार पदावर ते परतले. २००७ मध्ये अॕपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी बनले. यानंतर त्यांनी बाजारात आयपॉड, आयफोन अणि आयपॅड सादर केला. त्यांच्या या नेतृत्व व दूरदर्शीपणास जगभराने सलाम ठोकला. 


२००१ साली अॕपलने ५ गिबाबाईट क्षमतेचा पहिला आयपॉड लाँच केला. हा सर्वांत लहान म्युझिक प्लेअर होता. यात एक हजार गाणे स्टोअर करता येतील, असे कंपनीने सांगितले होते. अॕपलच्या मार्केटिंगने सोनी वॉकमनला कडवे आव्हानच दिले नाही तर बाजारपेठेतून जवळपास बाहेरच रवानगी केली.


अॅपल कंपनीच्या घडामोडींवर पुस्तक लिहिणाऱ्या जिम कार्लटन यांनी अॕपल हे नाव कसे निवडण्यात आले या मागिल कहाणी सांगितली आहे. बिटल्स अॕपल रेकॉर्ड या कंपनीच्या लोगोमधून हे नाव घेण्यात आले आहे. स्टीव्हला हा त्या कंपनीचा हिरवेगार अॕपल असलेला लोगो फार आवडायचा म्हणून त्याने कंपनीचे नाव अॕपल ठरवले आणि लोगो म्हणून एक तुकडा तोडलेले अॕपल निवडण्यात आले. यामुळे या दोन कंपन्यांमध्ये कायद्याची लढाई रंगली.


२००७  वर्षात आयफोन लाँचही केला. टचस्क्रीन आणि सोप्या इंटरफेसमुळे हा मोबाईल अपेक्षेपेक्षा अधिक लोकप्रिय झाला. वर्षभरातच कंपनीने आयफोन थ्रीजीही सादर केला. याच्या वेगवान डाटा ट्रान्स्फरने मोबाईल वेड्यांना आणखीच वेड लावले. २०१० साली आलेला पहिला टॅब्लेट पीसीने पुन्हा जगभरातील गॅजेटप्रेमींना वेड लावले. हा टॅब्लेट हातोहात विकला गेला. टचपॅड तंत्रज्ञानावर आधारलेल्या या अतिशय छोट्या कॉम्प्युटरने अनेक उणीवा असतानाही इंटरफेस, वेगवान प्रोसेसर आणि चित्राच्या स्पष्ट गुणवत्तेमुळे लोकप्रिय झाला. नंतर आयपॅड थ्रीजी आणि आयपॅड-२ मध्ये अनेक उणीवा दुरुस्त करण्यात आल्या. 


जॉब्स अनेक वर्षांपासून अन्नाशयाच्या कॅन्सरशी झुंज देत होते. या मृत्यूची चाहूल त्यांन आधीच लागली असावी. अॕपलचे सहसंस्थापक वॉल्टर आयजॅक्सन यांचे स्टीव्ह जॉब्स यांच्यावरील पुस्तक लिहिले आहे. 


स्टीव्ह जॉब्स यांचे निधन ५ ऑक्टोबर २०११ रोजी झाले.

🙏🙏शुभ प्रभात...🙏🙏


*************************************

संकलन -)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

प्रभात दर्शन

 🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

भाद्रपद मास,कृष्ण पक्ष, *चतुर्दशी*,उ.फा.नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,शरद ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

मंगलवार, ०५ आॕक्टोबर २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                        *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


        *"दूसरों की प्रशंसा करने वाला मनुष्य बड़ी सोच और उत्तम हृदय वाला होता है। हीन भावना, अहंकार और ईर्ष्या से ग्रसित मनुष्य दूसरों की प्रशंसा करने में स्वयं को तुच्छ अनुभव करता है।*

          *स्मरण रहे कि कई बार किसी की प्रशंसा में बोले गए शब्द अमुक के लिए मरुस्थल में एक बूँद की तरह सहायक सिद्ध हो सकते हैं, किसी कार्य के लिए की गयी प्रशंसा उसे और अधिक उत्तम कार्य के लिए प्रेरित कर सकती है।"*

 ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


सोमवार, ४ ऑक्टोबर, २०२१

कान का? खाजतात


══════════════════════

   *📒📒📒 @ संकलन @📒📒📒*

  *श्री. गजानन गोपेवाड 

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════             

📕 *कान का खाजतात ?* 


सार्वजनिक ठिकाणी कानात बोट घालून कान गदागदा हलवणारे किंवा कानात काड्या घालून तल्लीन कान कोरणारे महाभाग तुम्ही पाहिले असतील. कान कोरडा पडला २ थोडीफार खाज येऊ शकते. ही खाज आपोआपच कमी होते; परंतु कानाच्या रोगांमध्ये मात्र खाज सारखीच येत राहते व उपचार केल्याशिवाय कमी होत नाही. पावसाळ्यात, दमट वातावरणात किंवा पोहणाऱ्या व्यक्तींमध्ये कर्णपथात (Auditory canal) बुरशीचा संसर्ग होऊ शकतो. अॅस्परजीलस, नायगर व कँडीडा अल्बीकन्स या बुरशींमुळे होणाऱ्या संसर्गात कान खाजतात व बहिरेपणाही येतो. कानाची तपासणी केल्यास कर्णपथात काळपट वा विटकरी काळपट रंगाची घाण जमा झालेली दिसते. ओल्या वर्तमानपत्राच्या बोळ्यासारखा रंग त्या घाणीला येतो.


कानातील घाण वारंवार काढून टाकणे, पुसून घेणे, सॅलीसिलिक अॅसिड कर्णपथात लावणे, निस्टॅटीनसारखे बुरशीनाशक वापरणे अशा विविध उपायांनी हा रोग पूर्णपणे आटोक्यात येतो. कानावर अॅलर्जीमुळे किंवा जंतूसंसर्गामुळे फोड आले, तरीही कान सुरुवातीच्या काळात अथवा फोड फुटून खपली येण्याच्या काळात खाजतात. यावर अॅलर्जी व जंतुसंसर्गावरील उपचार करावे लागतात.


*डाॅ.अंजली दिक्षित व डाॅ.जगन्नाथ दिक्षित*

*यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' पुस्तकातून*

═══════════════════════

  

स्वामी रामानंद तीर्थ जयंती

 *************************************

*३ ऑक्टोबर - स्वामी रामानंद तीर्थ जन्मदिन*

*************************************


   *जन्म - ३ ऑक्टोबर १९०३* 

                  (विजापूर)

     स्मृती - २२ जानेवारी १९७२ 

                  (हैद्राबाद)


*हैदराबाद मुक्तिसंग्रामातिल मराठवाड्यासाठी योगदान देणारे नेतृत्व !*


स्वामी रामानंद तीर्थ (ऊर्फ व्यंकटेश भगवानराव खेडगीकर हे संन्यासी व हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे नेतृत्व करणारे चळवळकर्ते होते. रामानंद तीर्थ यांचा जन्म विजापूर जिल्ह्यातील सिंदगी या ठिकाणी झाला. त्यांचे शिक्षण सोलापूर येथील सरकारी शाळेत झाले. 


उस्मानाबाद जिल्ह्यातील हिप्परगा या गावी गुरुकुलात ते कार्यरत होते. १९३० मध्ये स्वामी नारायण तीर्थ यांनी रामानंदांना दीक्षा दिली व ते स्वामी रामानंद तीर्थ झाले. अंबेजोगाई या ठिकाणी त्यांनी योगेश्वरी नूतन विद्यालयाचे नूतनीकरण केले.


हैदराबाद येथील निजामाचा सेनापती कासीम रझवी याच्या ‘रझाकार’ या संघटनेने मराठवाडा जनतेवर अत्याचार सुरू केले होते. याचा विरोध करणे आवश्यक झाले होते. यासाठी काम करणाऱ्या महाराष्ट्र परिषदेचे चिटणीस म्हणून स्वामी काम पाहत होते. यासाठीची चळवळ अनेक वर्षे चालली होती. २७ ऑक्टोबर १९३८ रोजी स्वामी रामानंद सत्याग्रहा साठी कार्यकर्त्यांसह हैदराबाद शहरातील राजमार्गावर आले. त्यांना अटक झाली होती. ते सुमारे चार महिने कारावासात होते. सुटका होताच स्वामीजींनी भूमिगतपणे काम केले.


‘हैदराबाद संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करून लोकशाही मान्य करा व संस्थानाचे स्वतंत्र अस्तित्व संपवा’ अशी हाक रामानंद तीर्थ यांनी सरकार आणि जनतेला दिली. याचा परिणाम होऊन लोक या संग्रामात सामील झाले. मुक्तिसंग्रामात आपल्या विचारांचा प्रसार करण्यासाठी त्यांनी ’व्हिजन’ हे साप्ताहिक चालवले होते. यामार्फत ते भारतीय स्वातंत्र्याच्या विचारांचा प्रचार करत. 


माणिकराव पहाडे, शंकरभाई पटेल, बाबासाहेब परांजपे. गोविंदभाई श्रॉफ हे तरुण स्वातंत्र्यसैनिक होते. हैदराबाद मुक्तिसंग्राम चळवळीत स्वामी रामानंद तीर्थ यांचे ते प्रमुख समर्थक होते.


तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी सशस्त्र पोलीस कारवाई करून निजामाला शरण आणले. हैदराबाद संस्थान १७ सप्टेंबर १९४८ रोजी भारतात विलीन झाले.


लोकसभेच्या लागोपाठच्या दोन निवडणुकात गुलबर्गा व औरंगाबाद येथून रामानंद तीर्थ हे निवडून गेले होते. 


१९७२ साली त्यांचे हैदराबाद येथे निधन झाले.

🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

*संकलन* -) गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा - यवतमाळ ४४५२०६

*************************************

प्रभात दर्शन

 🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

भाद्रपद मास,कृष्ण पक्ष, *द्वादशी*,मघा नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,शरद ऋतु, युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

रविवार, ०३ आॕक्टोबर २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                        *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

तुलसी मीठे वचन ते,

               सुख उपजत चहुँ ओर !

वशीकरण एक मन्त्र है,

               तज दे वचन कठोर !!


भावार्थः- आवेश में कठोर वचन बोलकर मनुष्य न केवल दूसरों के ह्रदय को दुःख पहुचाने के पाप का भागी बनता है अपितु पग-पग पर अपने शत्रु पैदा कर लेता है। जबकि मीठा बोलकर सबको आनंदित करके अपने प्रेम के वशीभूत कर लेता है।

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


शुक्रवार, १ ऑक्टोबर, २०२१

2 आँक्टोंबर गांधी जयंती आणि लालबहादूर शास्त्री जयंती

 *************************************

*०२ ऑक्टोबर - लाल बहादूर शास्त्री जन्मदिन*

*************************************


   *जन्म - २ ऑक्टोबर १९०४*

     मृत्यू - ११ जानेवारी १९६६ 

                   (ताश्कंद)


भारताला 'जय जवान जय किसान' हा मंत्र देणाऱ्या भारताचे दुसरे प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री यांची आज जयंती.


त्यांचे आडनाव श्रीवास्तव होते पण शास्त्री झाले. त्यांच्या जन्मा नंतर लवकरच त्याच्या वडिलांचे देहांत झाले. त्यामुळे त्यांच्या आईने माहेरी जावून त्यांचे संगोपन केले. त्यांचे बालपण आजोळी मामाच्या आश्रयात झाले. महात्मा गांधीजींच्या विचारांचा जबरदस्त पगडा शास्त्री जींच्या मनावर होता. 


शास्त्री जेवढे मृदू होते तेवढे निश्चयी होते. महात्मा गांधींचे पहिले दर्शन त्यांना १९१६ साली झाले. त्यावेळी ते आफ्रिकेत सत्याग्रह करून नुकतेच भारतात आले होते. तेव्हा पांढरा काठेवाडी फेटा, अंगरखा व जोडा सर्वांच्या नजरेत भरेल असा त्यांचा पेहराव होता. साधा पेहरावां खाली दडलेल्या विचारांची श्रीमंती त्यांच्या भाषणा वरून दिसून आली. राजे महाराजाच्या समोर केलेल्या भाषणात गांधी म्हणाले होते, "भारतातील जनता दाळीद्र्यात मरत असताना एवढे अलंकार चढवून राजे महाराजे येथे आलेत. त्यांनी अगोदर आपले जडजवाहीर विकून टाकावे व मिळालेला पैसा गोरगरिबांना वाटावा." महाराजांच्या श्रीमंतीची घाणाघात करणारे शब्द ऐकून अनेक राजे भर सभेतून उठून गेले. पण सभा एकण्यासाठी आलेली जनता गांधीजींच्या या भाषणाने टाळ्या वाजवून यथोचित सन्मान केला. हे दृश्य शास्त्रीजींनी पाहिले. व ते देश प्रेमाने प्रेरित झाले. 


त्यांचे मन अभ्यासात लागे ना तेव्हा त्यांनी शाळेला राम राम ठोकला व ते स्वातंत्र्याच्या चळवळीत सामील झाले. पण त्या नंतर ते पुन्हा शिक्षणाकडे वळले. त्यांना ज्ञान संपादनाची विशेष हौस होती कॉलेजला जाण्यासाठी त्यांना रोज ५ ते १० मैलाची पायपीट करावी लागायची. कॉलेज झाल्या नंतर त्यांचा एक निश्चय होता कि नोकरी न करता समाजसेवा करायची. त्या वेळी लाला लजपतरायांनी गोखल्यांच्या धर्तीवर ‘लोकसेवक समाज’ संस्था काढली व त्या द्वारे शास्त्रीजींनी अस्पृश्योध्दाराचे काम सुरु केले. स्त्रियांची स्वतंत्रता आणि स्वदेशी हि त्यांची व्रते होती. 


१९२७ साली ललितादेवी यांच्याशी त्यांचा विवाह झाला. आपला पती लोकसेवक आहे. त्याकरिता शास्त्रीजीचा वेळ संसाराच्या व्यापात जावू नये यासाठी त्या दक्षता घेत. ते देशासाठी ठिक ठिकाणी जावून आले तिथे तिथे आपल्या मृदू व निश्चयी शब्दांनी ती आपली छाप पाडीत. आणि आपल्या देशात काय उणे आहे, दुसऱ्या देशापासून काय घेण्या सारखे हे त्या प्रमाणे स्वदेशी परतल्या नंतर ते कामाला लागत. 


२७ मे १९६४ ला नेहरूजींचे निधन झाल्या नंतर देशाची सर्वस्वी जबाबदारी लाल बहाद्दूर शास्त्री यांचेवर आली. त्यांनी आपल्या कृतीने माणसाचे शील व निश्चय किती प्रभावशाली असू शकतात हे त्यांनी स्वत:वरून दाखविले. अठरा महिन्याच्या छोट्याशा कारकिर्दीत आपण पंतप्रधान पदाला किती लायक होतो हे शास्त्रींनी आपल्या कृतीने दाखवून दिले. 


शास्त्रीजी चे संपूर्ण जीवन हीच एक आदर्श आचार संहिता होय. त्यांच्या अंगच्या अनेक गुणांचा प्रत्यय आज पर्यंत अनेक वेळा आला असला तरी या वामन मूर्तीने अनेक धैर्यशाली मार्गदर्शन भारताला केले. त्याने सारे जग स्तिमित झाले आहे. भारताची मान जगात उंचावली. ”जय जवान जय किसान” या शास्त्रीजींच्या नव्या घोषणेत त्यांच्या देश विषयक खंबीर धोरणाचे पडसाद उमटले. 


लाल बहाद्दूर शास्त्री यांचे ११ जानेवारी १९६६ रोजी ताश्कंद येथे निधन झाले. 


*लाल बहाद्दूर शास्त्री यांना आदरांजली...!*

🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏






संकलन -)गजानन गोपेवाड  

उमरखेड जिल्हा -यवतमाळ ४४५२०६

*************************************

प्रभात दर्शन

 🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

भाद्रपद मास,कृष्ण पक्ष, *एकादशी*,अश्लेषा नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,शरद ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

शनिवार, ०२ आॕक्टोबर २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                         *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


         *"इच्छा अथवा कामना पूरी करने के लिए पूजा करना, यह बात प्रलोभन भर है, तथ्यपूर्ण नहीं। ईश्वर को हमें अपनी इच्छानुसार चलाने में तभी सफलता मिल सकती है, जब हम पहले उसकी इच्छानुसार चलना सीखें।* 

         *प्रलोभन और प्रशंसा की कीमत पर भगवान् जैसी दिव्य चेतना को फुसलाकर अपना उल्लू सीधा करने में न तो आज तक किसी को सफलता मिली है और न भविष्य में किसी को मिलेगी।*


 

 ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

भुक का लागते


══════════════════════

   *📒📒📒 @ संकलन @📒📒📒*

  *श्री. गजानन गोपेवाड 

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════             

📙 *आपल्याला भूक का लागते ?* 📙 


आपलं शरीर सतत काम करत असतं. जेव्हा आपण विश्रांती घेत असतो किंवा झोपेत असतो तेव्हाही श्वसन, रक्ताभिसरण, हृदयाची धडधड यांसारख्या प्रक्रिया चालूच असतात. त्यामुळे शरीराला सतत ऊर्जेची गरज भासते. हिचा पुरवठा अखंड असण्यासाठी शरीराला वेळोवेळी पोषण मिळणं आवश्यक असतं. आपण जेव्हा अन्न खातो तेव्हा हे पोषण मिळतं. ते साठवूनही ठेवलं जातं. पण तो साठा संपला की परत पोषक पदार्थ शरीराला मिळण्याची गरज असते. याचीच जाणीव आपल्याला करून देण्यासाठी भुक लागण्याची भावना निर्माण होते.


आपल्या मेंदूमधील हायपोथॅलॅमस या अवयवामध्ये भुकेवर नियंत्रण ठेवणारं केंद्र असतं. त्याला संदेश मिळाला की ते कार्यरत होतं आणि भुकेची भावना जागृत करतं. त्या केंद्राला मिळणारे संदेश विविध प्रकारचे असतात. त्यातले काही शरीराच्या आतून उत्पन्न होतात. म्हणजेच ते अंतर्गत असतात, तर काही बाहेरून येणारे असतात.

शरीराला ऊर्जा मिळते ते ग्लुकोजच्या ज्वलनातून. त्यामुळे रक्तात ग्लुकोजचं प्रमाण एका निर्धारित पातळीवर नेहमी राहील याची व्यवस्था केलेली असते. ते जर त्या पातळीपेक्षा फारच चढलं तर ते आरोग्याला बाधक असल्यानं इन्सुलीन या संप्रेरकाचा  पाझर सुरू होतो. ते संप्रेरक ग्लुकोजची निर्धारित पातळी राखण्यात मदत करतं. जर ग्लुकोजची पातळी या निर्धारित प्रमाणापेक्षा फारच घसरली तर तो संदेश मिळून भुकेचं केंद्र जागृत होतं. त्यावेळी आपण पुरेसं अन्न पोटात टाकलं तर मग भुक मिटल्याची भावनाही याच केंद्रातून निर्माण केली जाते.

आपल्या पोटाचं आकारमानही विशिष्ट पातळीवर ठेवण्याची व्यवस्था केली जाते. तसंच ते काही विविक्षित प्रमाणात भरलेलं असेल हेही बघितलं जातं. पोट जर रिकामं झालं तर ते आकुंचन पावून त्याचं आकारमान घटतं. भुकेचं केंद्र जागृत करायला तोही एक संदेश पुरतो. अशा वेळी पाणी पिऊन आकारमान वाढवलं तरीही भुक भागल्याची भावना निर्माण होते.


आज जरी आपल्याला हवं तेव्हा अन्न उपलब्ध होत असलं तरी आदिमानवाच्या काळात जेव्हा रानावनात कंदमुळे गोळा करून किंवा शिकार करून मनुष्यप्राणी आपली पोषणाची गरज भागवत होता. तेव्हा अन्न केव्हा मिळेल याची शाश्वती नव्हती. त्यामुळे असं ते मिळालं की प्रत्यक्ष पोषणाची आवश्यकता असो-नसो, त्याच्या दर्शनाने किंवा गंधानंही भुकेची भावना चाळवली जात असे. उत्क्रांतीच्या ओघात हा गुणधर्म टिकून राहिला आहे. त्यामुळे स्वादिष्ट अन्न दिसलं किंवा त्याचा दरवळ नाकपुड्यांना चाळवून गेला म्हणजेही आपल्याला भूक लागते.


*डाॅ.अंजली दिक्षित व डाॅ.जगन्नाथ दिक्षित*

*यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' पुस्तकातून*


आपल्या ला पाच बोटे का असतात?


══════════════════════

   *📒📒📒 @ संकलन @📒📒📒*

  *श्री. गजानन गोपेवाड 

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════             

📙 *आपल्याला पाच बोटे का असतात ?* 📙


खरं तर हा प्रश्न, आपल्याला पाचच बाटं का असतात, असा विचारायला जायला हवा. आपल्या हातांना तसंच पायांना पाच पाच बोटंच असतात. क्वचित काही जणांना एका किंवा दोन्ही हातांना वा पायांना सहावं बोट असतं. सहापेक्षा अधिक बोटं सहसा आढळत नाहीत; पण सहा बोटं असणंही अपवादात्मकच आहे. ती काही सामान्य स्थिती नाही. बरं, फक्त मनुष्यप्राण्याच्या बाबतीतच ही स्थिती आहे असं नाही. कोंबड्या, उंदीर, मांजर, कुत्रा, वाघ, सिंह, वानर अनेक प्राण्यांच्या पायांना पाच बोटं असतात. खुरं असणाऱ्या जनावरांना पाचापेक्षा कमी बोटं असतात. म्हणजेच त्यांची एकापेक्षा अधिक बोटं जोडली जाऊन त्यांचं एकच एक जाडजूड बोट तयार होतं. त्यामुळे त्यांच्या बोटांची संख्या पाचापेक्षा अधिक होत नाही. 

हे असं का होतं ? बोटांवर ही पाचाची मर्यादा का पडली ? असे प्रश्न मनात उमटायला लागतात. याला जसं उत्क्रांतीच्या प्रवाहाचं कारण आहे तसंच सर्व प्राणीमात्रांच्या वाढीला कारणीभूत असणाऱ्या जनुकांची प्रणालीही जबाबदार आहे. उत्क्रांतीच्या प्रवाहात ज्या एखाद्या गुणधर्मामुळे जीवनकलह सुसह्य़ व्हायला त्या विशिष्ट पर्यावरणात तगून राहायला मदत होते, त्या गुणधर्माचा जतन होतं. झाडाच्या फांदीवरची पकड घट्ट होण्यासाठी किंवा हातात पकडलेल्या वस्तूवरची पकड घट्ट होण्यासाठी पाच बोटांची मदत होते, हे स्पष्ट झाल्यावर त्या गुणधर्माच्या प्रकटीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या जनुकांचं संवर्धन झालं. उत्क्रांतीच्या ओघात प्राण्यांच्या नवनवीन प्रजाती उदयाला येताना या गुणधर्मात बदल होण्याचं टळलं.

प्रत्येक प्राण्याची सुरुवात एकमेव फलित पेशीपासून होत असते. प्रथम त्या पेशीचं विभाजन होऊन दोन पेशी जन्माला येतात. याच प्रकारे केवळ विभाजन होऊन पेशींच्या संख्येत वाढ होते. या सर्व पेशी हुबेहुब एकसारख्या असतात. त्यानंतर विशिष्ट काळी या पेशींपासून वेगवेगळ्या अवयवांच्या निर्मितीची मुहूर्तमेढ रचली जाते. ती होण्यासाठी त्याला कारक असणारी जनुकं कार्यान्वित होतात. त्यांना 'होमिओबॉक्स जीन्स' असं म्हणतात. त्याच्या प्रभावापोटी गर्भामधील अवयवांकुराचं पाच भागांमध्ये विभाजन होतं. त्यातील काही भाग शरीराच्या पुढच्या भागातील अवयवांच्या निर्मितीच्या कामाला लागतात, तर इतर पाठीमागील अवयवांच्या निर्मितीचं काम करायला लागतात. या अवयवांकुराचे असे पाचच भाग होत असल्यामुळं मग हातापायांना फुटणाऱ्या बोटांच्या संख्येवरही मर्यादा येते. शिवाय अशी पाच बोटं त्यांच्यावर सोपवल्या जाणार्‍या पकडीच्या कामासाठी पर्याप्त असल्यामुळं त्यांच्या संकेत काही बदल करण्याचं प्रयोजनच पडलं नाही. जेव्हा कधी या जनुकांमध्ये होणाऱ्या उत्परिवर्तनापायी पाचाहून अधिक बोटं तयार होतात त्या वेळीही ते अतिरिक्त बोट पाचांपैकी कोणत्या तरी एका बोटाला जोडलेलंच राहतं. हृतिक रोशनच्या डावीकडील हाताच्या अंगठ्याकडे पाहा म्हणजे याची खात्री पटेल.


*डाॅ.अंजली दिक्षित व डाॅ.जगन्नाथ दिक्षित*


नासाचे काम सुरू

 ***********************************

*१ ऑक्टोबर - 'नासा' अवकाश संशोधन संस्थेचे काम सुरु*

***********************************

🛰️🛰️🛰️🛰️🛰️🛰️🛰️🛰️🛰️🛰️🛰️

*🛰️🛰️१ ऑक्टोबर १९५८🛰️🛰️*


नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन, लघुरूप नासा, (National Aeronautics and Space Administration, NASA) ही अंतराळ संशोधन करणारी अमेरिकन संस्था आहे.


२९ जुलै १९५८ रोजी अमेरिकेच्या राष्ट्रीय वैमानिकी व अंतराळ संशोधन कायद्यान्वये आधीच्या नॅशनल अ‍ॅड्वायझरी कमिटी ऑफ एरोनॉटिक्स ऊर्फ नाका या संस्थेच्या जागी, नासा स्थापण्यात आली. १ ऑक्टोबर १९५८ पासून संस्थेचे कामकाज चालू झाले.


मुख्य मोहिमा :


स्पेस शटल अटलांटिस

स्पेस शटल एंटरप्राइझ

स्पेस शटल एंडेव्हर

स्पेस शटल कोलंबिया

स्पेस शटल चॅलेंजर

स्पेस शटल 

🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

************************************

संकलन -)

गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

प्रभात दर्शन

 🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

भाद्रपद मास,कृष्ण पक्ष, *दशमी*,पुष्य नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,शरद ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

शुक्रवार, ०१ आॕक्टोबर २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                        *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


बचन वेष क्या जानिए, 

              मन मलीन नर नारि,

सूपनखा मृग पूतना, 

            दस मुख प्रमुख विचारि ।


*भावार्थः- किसी भी व्यक्ति को उसकी मीठी वाणी और अच्छे वस्त्रों से यह नहीं जाना जा सकता कि वह सज्जन है या दुष्ट, बाहरी सुशोभन और आलंबन से उसकी मनोस्थिति पता नहीं कर सकते ... जैसे शूपर्णखां, मरीचि, पूतना और रावण के परिधान, वाणी व रूप अच्छे थे लेकिन मन गंदा एवं विकार युक्त था।*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~



*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

गुरुवार, ३० सप्टेंबर, २०२१

प्रभात दर्शन


 🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

भाद्रपद मास,कृष्ण पक्ष, *नवमी*,पुनर्वसु नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,शरद ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

गुरुवार, ३० सप्टेंबर २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                        *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

         *"महत्त्वपूर्ण सफलताएँ न तो भाग्य से मिलती हैं और न सस्ती पगडंडियों के सहारे काल्पनिक उड़ानें भरने से मिलती हैं। उसके लिए योजनाबद्ध अनवरत पुरुषार्थ करना पड़ता है। योग्यता बढ़ाना, साधन जुटाना और बिना थके, बिना साहस खोये अनवरत श्रम करते रहना...., यह सूत्र ही सफलताओं के उद्गम स्रोत हैं।"*

 ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

गाथा बलिदानाची

 ➿➿➿➿➿➿➿➿➿➿

🇮🇳🇮🇳 *गाथा बलिदानाची* 🇮🇳🇮🇳

➿➿➿➿➿➿➿➿➿➿


            *रामानन्द चैटर्जी*

             (स्वतंत्रता सेनानी)                                                                        

           जन्म : २९ मई, १८६५

        (बांकुड़ा ज़िला, बंगाल)

     *मृत्यु : ३० सितंबर, १९४३* 

                (कोलकाता)

नागरिकता : भारतीय

प्रसिद्धि : स्वतंत्रता सेनानी


अन्य जानकारी : रामानन्द भारतीय राष्ट्रीय कांग्रेस के प्रबल समर्थक थे। कुछ वर्षां के पश्चात् उन्होंने कांग्रेस राष्ट्रवादी पार्टी और हिन्दू सभा का सहयोग दिया। रामानन्द सम्पादकीय विचार की स्वाधीनता के प्रबल समर्थक थे।


रामानन्द चैटर्जी  पत्रकारिता जगत के एक पुरोगामी शख्सियत थे। वे कोलकाता से प्रकाशित पत्रिका 'मॉडर्न रिव्यू' के संस्थापक, संपादक एवं मालिक थे। उन्हें "भारतीय पत्रकारिता का जनक" माना जाता है। पत्रकारिता के क्षेत्र में उन्होंने विशेष रूप से कार्य किया। इसके अतिरिक्त उन्होंने अध्यापक और प्राचार्य के पद पर काम किया था।


💁🏻‍♂️ *परिचय*

रामानन्द चैटर्जी का जन्म २९ मई, १८६५ को बांकुड़ा ज़िला, बंगाल में हुआ था। उन्होंने कलकत्ता और बांकुड़ा से अपनी शिक्षा-दीक्षा ग्रहण की। उन्होंने कलकत्ता विश्वविद्यालय से सन १८९० में अंग्रेज़ी में स्नात्तकोत्तर परीक्षा प्रथम श्रेणी में उत्तीण की थी। वे आचार्य जगदीश चन्द्र बोस तथा शिवनाथ शास्त्री से अत्यन्त प्रभावित थे। उनके सामने इंग्लैंड जाकर आगे अध्ययन करने का प्रस्ताव भी आया, पर रामानंद ने उसे स्वीकार नहीं किया। तब तक उन पर ब्रह्म समाज का प्रभाव पड़ चुका था।                                         📰✍️ *सम्पादन कार्य*

रामानन्द चैटर्जी पत्रकारिता जगत के पुरोगामी शख्सियत थे। उन्होंने प्रवासी, बंगाल भाषा, 'मॉडर्न रिव्यू' अंग्रेज़ी में तथा 'विशाल भारत' जैसी पत्रिकाएँ निकालीं। रामानंद चटर्जी ने प्रसिद्ध भारतीय मासिक पत्र 'मॉडर्न रिव्यु' का दिसंबर १९०६ में प्रकाशन आरंभ किया। १९०१ ई. में उन्होंने बांग्ला भाषा के पत्र 'प्रवासी' का संपादन किया। विद्यार्थी जीवन में ही उन्होंने 'द इंडियन मैसेंजर' के संपादन का काम अपने हाथ में ले लिया था और बांग्ला पत्र 'संजीवनी' में नियमित रूप से लिखा करते थे। उनका 'देशाश्रय' नाम के सामाजिक संगठन से संपर्क हुआ तो उसकी मुखपत्र 'दासी' का सम्पादन भी उन्होंने ही किया। उन्होंने बच्चों की पत्रिका 'मुकुल' और साहित्यिक पत्रिका 'प्रदीप' के संपादन में भी सहयोग दिया। इनके माध्यम से ही रामानंद का रबींद्रनाथ टैगोर से परिचय हुआ था। शीघ्र ही यह 'प्रवासी' नामक पत्रिका बंगला भाषा-भाषियों की अत्यंत प्रिय पत्रिका बन गई। यह अपने समय का अत्यंत प्रसिद्ध पत्र बन गया। उच्च कोटि के लेखक‍ इसमें अपनी रचनाएं भेजते थे। इसकी संपादकीय टिप्पणियां ज्ञानवर्धक और प्रेरक होती थीं।


⚛️ *प्रधानाचार्य का पद*

कुछ समय बाद रामानन्द चैटर्जी की कायस्थ पाठशाला, इलाहाबाद के प्रधानाचार्य के पद पर नियुक्ति हुई और वे कोलकाता से इलाहाबाद आ गए। इसी बीच जातीय भेदभाव के कारण उन्हें कायस्थ पाठशाला से त्यागपत्र देना पड़ा।


🛳️ *विदेश यात्रा*

रामानन्द चैटर्जी कुछ वर्ष बाद हिंदू महासभा के अध्यक्ष बने। पत्रकार के रूप में उनकी ख्याति के कारण राष्ट्र संघ ने अपनी कार्यवाही स्वयं देखने के लिए उन्हें जिनेवा आमंत्रित किया था। तभी उन्होंने यूरोप के विभिन्न देशों का भी भ्रमण किया। उन्हें रूस से भी निमंत्रण मिला था, पर वहां अभिव्यक्ति पर प्रतिबंधों को देखते हुए उन्होंने उसे स्वीकार नहीं किया। वे 'प्रवासी बंग साहित्य सम्मेलन' के संस्थापकों में से थे और उसके अध्यक्ष भी रहे।               

⚜️ *कांग्रेस समर्थक*

रामानन्द भारतीय राष्ट्रीय कांग्रेस के प्रबल समर्थक थे। कुछ वर्षों के पश्चात् उन्होंने कांग्रेस राष्ट्रवादी पार्टी और हिन्दू सभा का सहयोग दिया। रामानन्द सम्पादकीय विचार की स्वाधीनता के प्रबल समर्थक थे।


🪔 *मृत्यु*

रामानन्द चैटर्जी का निधन कोलकाता में ३० सितंबर, १९४३ को हो गया।


        🇮🇳 *वंदे मातरम्...!* 🇮🇳

              🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳

*🙏🌹🙏शुभ प्रभात🙏🌹🙏*

संकलन -)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा-

यवातमाळ ४४५२०६

Featured Post

व्यायाम व योगा अवश्य करावा*

*व्यायाम व योगा अवश्य करावा*  *व्यायाम व योगा करण्याचे दहा फायदे:-*  1) व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते: व्यायाम करणारी...